Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ओवेसिंचा गळा

स
साहना
गुरुवार, 03/17/2016 - 10:54
🗣 251 प्रतिसाद
ओवेसी ह्यांची भाषणे मी पहिली आहेत आणि हि व्यक्ती अतिशय अभ्यासू आहे ह्यांत शंकाच नाही. जेव्हा नक्षलवादी हल्ला करतांत तेंव्हा सगळे म्हणतात कि "we must encoruage naxalites to join mainstream and solve problem democratically ". माझ्या मते ओवेसी सारखा कट्टर मुसलमान संसदेत असणे हि चांगली गोष्ट असून त्याला योग्य तो मान इतरांनी दिला पाहिजे, मन व्यक्तीला असून त्याच्या विचारणा किमत देण्याची गरज नाही. जर संसदेत त्याला बोलायला दिले नाही किंवा जेल मध्ये डांबले तर त्याच्या सारख्या कट्टर लोकांपुढे कायद्याच्या बाहेर जावून आपल्या भावना लोकंवर लादणे हा एकाच पर्याय बाकी राहतो. माझ्या मते ओवेसी म्हणजे एक नक्सल type माणूस आहे ह्याने शस्त्र घेण्याच्या नादात न पडता लोकशाही मार्गाने आपले विचार आणि धोरण प्रकट करण्याचा मार्ग अवलंबला आहे. आणि तो स्तुत्य आहे. कोन्ग्रेस पार्टी मध्ये हिंदुना जेंव्हा दुय्यम वागणूक मिळत होती तेंव्हा संघा कडे दोन पर्याय होते, लोकशाही मार्गाने पार्टी उभी करून निवडणूक जिंकणे आणि किंवा कायद्याच्या बाहेरून काही तरी भानगडी करणे (उद रामसेना). जे लोक संघाला कट्टर वगैरे समजतात खरे तर त्यांनी संघाच्या निर्णयाचे स्वागत करायला पाहिजे कारण त्यांनी खडतर पण अ-हिंसक मार्ग स्वीकारला. संघाला खरे तर शांततेचा नोबेल मिळायला पाहिजे. त्याच प्रमाणे मराठी माणसाच्या मनात कोन्ग्रेस विषयी द्वेष आणि स्वता विषई अन्यायाची भावना निर्माण झाली तेंव्हा बाळासाहेब ठाकरे ह्यांनी पक्ष उभारून कोन्ग्रेस ला माती चारली. कायद्याच्या बाहेर जावून ठोकशाही करत त्याना स्वताचे साम्राज्य निर्माण करता आले असते पण त्यांनी सुद्धा खडतर मार्ग पत्करला. शिवसेनेने भलेही अनेक वेळा कायदा तोडला असेल पण तरी सुद्धा काही बेसिक तारतम्य त्यांनी सांभाळले होतेच. माझ्या मते कट्टरपंथी लोकांनी निवडून येवून संसदेत, वर्तमान पत्रांत इत्यादी आपले कट्टर विचार प्रकट करणे हि चांगली गोष्ट असून त्यात वायीत काहीच नाही उलट संसंद हि त्याच साठी बनवली गेली आहे. उद्धव ठाकरे ह्यांचे "गळा कापावा" वगैरे बोल केवळ अलंकारिक स्वरूपाचे असावेत असे मला वाटते.

प्रतिक्रिया द्या
43245 वाचन

💬 प्रतिसाद (251)
R
Rahul D Sat, 03/19/2016 - 19:36 नवीन
प्रचंड अनुमोदन...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
स
सुबोध खरे गुरुवार, 03/17/2016 - 13:31 नवीन
पण दुय्यम नागरिक, आश्रित म्हणून राहा असं संघाचं म्हणणं आहे हे तुम्ही कुठं वाचलं? का असंच बार मध्ये ऐकलं? त्याच्या माध्यमातून मुस्लिमांना योग्य मार्गदर्शन करणे दुसरं कोणी नाही का मुसलमानाचा तारणहार? हा धूर्त वकील माणूस मुसलमानांच्या मानसिक असुरक्षिततेचा राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न करतो आहे. याला महत्त्व देणे हि हाराकिरी होईल. त्यापेक्षा मुसलमानांना तुम्ही इथलेच नागरिक आहात तेंव्हा मुल्ला मौलवींच्या नादाला न लागता आधुनिक शिक्षणाची कास धारा हे पटवले तर नक्कीच फायदा होईल. या दृष्टीने मदरशामध्ये आधुनिक शिक्षण देणे चालू केले पाहिजे.
  • Log in or register to post comments
न
नाना स्कॉच गुरुवार, 03/17/2016 - 14:23 नवीन
असद ओवैसी ने सेम हेच मत दिले होते, मुस्लिम शिक्षण ह्याच विषयावर. प्रसंग होता कोर्टाने 10 वर्षात हज सब्सिडी बंद करायचा दिलेला निवाडा. त्याने कोर्टच्या निर्णयाचेही स्वागत केले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
अ
अनुप ढेरे गुरुवार, 03/17/2016 - 14:45 नवीन
हेच बोल्तो. मला त्याची काही मतं पटतात. काँग्रेस/ समाजवादी पार्ट्या ज्या विषयांना कधीही हात घालत नाहीत त्याला हा हात घालतो. हज सबसिडी बंद करून त्या पैशात मुस्लिम मुलींना स्कॉलरशिप सुरू करा असं मत व्यक्त केलेली मुलाखत पाहिली होती. काल लोकसभेत केलेलं भाषणपण आवडलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच
न
नाना स्कॉच गुरुवार, 03/17/2016 - 14:51 नवीन
अहो काँग्रेस समाजवादी तर आहेतच पण साक्षात् बीजेपी चे मुख़्तार अब्बास नक्वी सुद्धा म्हणाले होते की

"आम्ही कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत करतो , तरीही हज यात्रेकरु मंडळीला "बेसिक सर्विसेज" दिल्या जाव्यात असे आम्हाला वाटते"

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
श
श्री गावसेना प्रमुख गुरुवार, 03/17/2016 - 13:42 नवीन
बारमधे बसल्यावर जेवढं कानावर येतं तेवढं इथं लिहिलंय.तुम्हाला बार असोसिऍशन म्हणायचं आहे काय,
  • Log in or register to post comments
त
तिमा गुरुवार, 03/17/2016 - 14:02 नवीन
कुठलीही घोषणा देण्याची सक्ती करणे, चुकीचे आहे. असले बालिश हट्ट कोर्टात टिकणार नाहीत. 'भारतमाताकी जय' असं तोंडाने म्हणून तिच्यावर वाईट नजर ठेवणारे, या देशांत काही कमी नाहीत. वाद घालायचा तर योग्य मुद्द्यांवरच घातला पाहिजे.
  • Log in or register to post comments
त
तर्राट जोकर गुरुवार, 03/17/2016 - 14:34 नवीन
शंभर टक्के सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
ब
बोका-ए-आझम गुरुवार, 03/17/2016 - 14:50 नवीन
न म्हणताही देशासाठी चांगलं काम करता येतं असं ओवेसींनी म्हणायला पाहिजे होतं. भारतमाता की जय म्हणणार नाही असं म्हणून त्यांनी एक चुकीची खेळी केली आहे. अशाने फक्त कटुता आणि तणाव वाढणार आहे. उत्तर प्रदेश आणि तेलंगण इथलं सांगता येत नाही पण मुंबईत वांद्रे पूर्व मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीत MIM ने शिवसेना-भाजप युतीच्या तृप्ती सावंत आणि काँग्रेसचे नारायण राणे यांच्याविरूद्ध उमेदवार दिला होता. त्याच्यासाठी अत्यंत आक्रमक आणि विखारी म्हणावं अशा भाषेत प्रचार केला गेला होता. वांद्रे पूर्व म्हणजे मुस्लिम वस्ती भरपूर. तरीही MIM ला फारशी मतं मिळाली नाहीत, किंवा ती राण्यांनाही मिळाली नाहीत. शिवसेनेने राण्यांविरुद्ध राड्याचीच भाषा वापरली होती तरीही त्याची फारशी चर्चा झाली नाही, पण MIM च्या कट्टर भाषेमुळे मुस्लिम मतदारांनी त्यांना नाकारलं. त्यानंतर ओवेसी शांत होते. आपण बिहारमधील निवडणुका लढवणार आहोत अशी घोषणा त्यांनी केली होती पण बिहारमध्ये भाजपचाच काही निभाव लागला नाही, त्यामुळे MIM चं अपेक्षित अपयश झाकलं गेलं. आता ओवेसी परत सक्रीय होऊ बघताहेत पण अशा अतिआक्रमक आणि टोकाच्या भूमिकेने त्यांना फार मतदार मिळतील असं वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
त
तर्राट जोकर गुरुवार, 03/17/2016 - 14:58 नवीन
माध्यमातल्या अर्धवट विधानांवर बेतुन मत देत नाही आहात ना? बाकी हा कलगीतुरा संगनमताने आहे असे निरिक्षण नोंदवतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ब
बोका-ए-आझम गुरुवार, 03/17/2016 - 17:19 नवीन
पण म्हणून मी किती वेळा ऐकून घ्यायचं त्याला लिमिट आहे! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Fri, 03/18/2016 - 00:06 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
व
विकास गुरुवार, 03/17/2016 - 15:13 नवीन
सहमत... "भारतमाता की जय" असे ज्यांना म्हणायचे त्यांना तसे म्हणूंदेत, पण तसे न म्हणता देखील आमचे इमान भारताशी आहे, असे ज्यांना कुणाला "भारतमाता की जय" म्हणायचे नसेल त्यांनी बोलणे महत्वाचे आहे. त्यात केवळ ओवेसी अथवा मुस्लीमच आहेत असे नाही. एखाद्याने (म्हणजे बिगर मुस्लीम व्यक्तीने/विचारवंताने) पुर्णपणे तत्व म्हणून असे मत प्रदर्शिले म्हणून काहीच बिघडत नाही. किंबहूना चांगली चर्चा घडू शकेल... एका अर्थी जावेद अख्तर यांनी ते त्यांच्या राज्यसभेतील शेवटच्या भाषणात करून दाखवले. जे एन यु मधे ज्या पद्धतीने "तुकडे करण्याची" भाषा केली गेली, त्यात एकप्रकारचे नुसतेच सरकारला नाही तर एकूणच घटनात्मक पद्धतीस आव्हान होते. त्या पाठोपाठ म्हणूनच जादवपूरला पण ते चालू झाले. आणि सरकार बधत नाही आणि उलट प्रतिक्रीया जनतेकडून येऊ शकते हे ध्यानात आल्यावर त्यांनी माघार घेतली आहे असे वाटते. हे काही अचानक उचलली जिभ लावली टाळ्याला अशा पद्धतीने झाले नव्हते... असले आव्हान कुठलेही राष्ट्र खपवून घेणार नाही. मला १००% म्हणणार नाही पण अगदी ९०% नक्की वाटते की आत्ता काँग्रेसचे सरकार असते तरी देखील या बाबतीत त्यांनी देखील कन्हैय्याच्या विरोधात काहीतरी कारवाई केली असती. बाकी ओवेसी जर, वर काही प्रतिसादात आल्याप्रमाणे काही चांगले बोलले असले अथवा मुस्लीम समाजासाठी चांगले करू इच्छीत असले तर ते स्वागतार्हच आहे. पण धर्माच्या नावाने कुठलाच राजकीय पक्ष असू नये अशा मताचा मी आहे. मला वाटते घटनेनुसार धर्माच्या नावाने मते मागता येत नाही. मग धर्माचे नाव पक्षाच्या नावात असले की ते देखील तसेच धरले जावे...जो पर्यंत ते The All India Majlis-e-Ittehad-ul Muslimeen or AIMIM translation: All India Council of the Union of Muslims) अशा नावाच्या पक्षाने राजकारण करत आहेत तो पर्यंत कितीही स्वागतार्ह बोलले तरी सगळे संशयास्पदच असेल असे म्हणावे लागेल. (जेंव्हा www.aimim.in बघायचा प्रयत्न केला तेंव्हा व्हायरसवरून लाल अक्षरात मोठ्ठी वॉर्निंग आली. कदाचीत त्यांना देखील हे माहीत नसेल... पण माहीती करता येथे सांगत आहे. असो.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
त
तर्राट जोकर गुरुवार, 03/17/2016 - 15:16 नवीन
पक्षात तसे नाव न घेता पण हिंदूंच्या नावाने मत मागणारा पक्ष संशयातीत आहे का विकासभाऊ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
व
विकास गुरुवार, 03/17/2016 - 15:17 नवीन
सिद्ध करा नक्की काय म्हणायचे आहे ते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर गुरुवार, 03/17/2016 - 15:23 नवीन
इथेच ह्या संस्थळावर भाजप हिंदूंच्या हितासाठी काम करणारा पक्ष आहे असे म्हटले गेले. ते खोटे आहे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
व
विकास गुरुवार, 03/17/2016 - 15:26 नवीन
तुम्ही पुरावे नसताना या संस्थळावर संघाबद्दल काही लिहीता, म्हणून उद्या त्याला पण खरे मानायचे का? अधिकृत काय आहे याला महत्व आहे. बाकी बोंब ठोकायला कन्हैय्या सारखे आहेतच की!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
न
नाना स्कॉच गुरुवार, 03/17/2016 - 15:42 नवीन
बरोबर आहे तुमचे! एकटे कैलास विजयवर्गीय आहेत खरे!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
व
विकास गुरुवार, 03/17/2016 - 15:56 नवीन
ते देखील मी वर म्हणल्याप्रमाणे. "कन्हैय्यासारखे" च्या सदरात मोडतात..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच
त
तर्राट जोकर गुरुवार, 03/17/2016 - 15:56 नवीन
अधिकृतला महत्त्व आहे का? बरं. मग त्याच्या पक्षात, धोरणात तुम्हाला संशयास्पद काय वाटले आणि कोणत्या आधारावर वाटले तेही सांगण्याची कृपा करा. तसेच जेव्हा इथले सदस्य भाजपाला, संघाला हिंदुंचे रक्षणकर्ते, पाठिराखे, कैवार घेणारे म्हणतात तेव्हाही विदा मागायला येत जावा. फक्त माझीच विधानं स्कॅन करायची आणि सिद्ध करुन घ्यायची, त्याला दांभिकपणा म्हणतात. एक राहिलंच, ते बाबरी मस्जिद पाडली ते कोणत्या पक्षाचे अधिकृत राष्ट्रकार्य होते आणी मंदिर वहीं बनायेंगे असे नारे देत देशभर रथयात्रा करत कोणता पक्ष फिरत होता? अजून बरेच प्रश्न आहेत. पण ते स्वतंत्र धाग्यात. तेव्हाचे तेव्हा बघू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
व
विकास गुरुवार, 03/17/2016 - 16:02 नवीन
जेंव्हा बदनामी केली जाते तेंव्हा अधिकृत महत्वाचे धरले जावे. तुम्ही एका संघटनेबाबत खोटे लिहून बदनामी करत आहात जी आक्षेपार्ह आहे. मग त्याच्या पक्षात, धोरणात तुम्हाला संशयास्पद काय वाटले आणि कोणत्या आधारावर वाटले तेही सांगण्याची कृपा करा. आधी म्हणल्याप्रमाणे, धर्माच्या नावाने पक्षच नसावा. त्यामुळे तसा कुठल्याही धर्माच्या नावाने असला तर ते मला मान्य नाही. पक्षाचे धोरण बघायला म्हणूनच तर त्यांच्या संस्थळावर जायचा प्रयत्न केला. पण व्हायरस अ‍ॅ़टॅक होईल म्हणून मोठ्ठा अ‍ॅलर्ट आला... मग जर कुठेच अधिकृत धोरण बघता येत नसेल तर ते संशयास्पद आहे असे मी कुणाच्याही बाबतीत म्हणेन. पण ते स्वतंत्र धाग्यात. तेव्हाचे तेव्हा बघू. अवश्य. मात्र त्याच्या आधी इथे आधी झालेल्या चर्चांचा अभ्यास देखील करावात ही विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर गुरुवार, 03/17/2016 - 16:09 नवीन
https://en.wikipedia.org/wiki/All_India_Majlis-e-Ittehadul_Muslimeen#Party_vision_and_mission त्यांच्याच साइटवरुन रीट्रीव केलेले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
स
सुबोध खरे गुरुवार, 03/17/2016 - 17:17 नवीन
विकास राव त जो साहेबांनी एक चुकीचे किंवा बिनबुडाचे विधान केले. ते लक्षात आले तरीही आता ते त्याचे प्राण पणाला लावून समर्थन करीत राहतील कारण तो त्यांचा स्वभाव आहे. तेंव्हा तुम्ही तुमचा वेळ वाया घालवू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
त
तर्राट जोकर गुरुवार, 03/17/2016 - 21:37 नवीन
तुम्ही वैयक्तिक, स्वभाव इत्यादीवर घसरता आहात तेव्हा ते योग्य व अनुकरणीय वर्तन असेल असे समजून चालतो व असे म्हणतो की तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे सर, माझ्या प्रतिसादात 'मी लष्करात असतांना' इत्यादी शब्दरचना नसल्याने माझी विधाने बिनबुडाची व चुकीचीच असतात. आम्ही आताच मातेच्या गर्भातून बाहेर आलो आणि थेट लॅप्टॉपवर बसून वातानुकूलित खोलीतून जगाला शानपन शिकवायला लागलो आहोत. त्यामुळे आमची विधाने अजिबात गांभिर्याने घेण्याची गरज नाही असे सांगणे आहे. बाकी, तुमच्याएवढे सुज्ञ, सर्वज्ञ तर पृथ्वीतलावर कोणीच नाही. आमच्यासारख्या अज्ञ बालकांवर कृपादृष्टी ठेवावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ब
बोका-ए-आझम गुरुवार, 03/17/2016 - 17:26 नवीन
असं धरून चालू. पण हिंदूंचं हित म्हणजे मुस्लिमांचं अहित किंवा त्यांच्यावर अन्याय असा निष्कर्ष का काढायचा? तुम्ही काढतात असं म्हणत नाहीये. मला माझ्या धर्माचा असलेला अभिमान हा दुस-या धर्माच्या अवहेलनेशिवाय आणि दुस-या धर्माच्या माणसाला नैसर्गिकपणे वाटणाऱ्या त्याच्या धर्माच्या अभिमानाबरोबर co-exist करु शकतो असं मला वाटतं. तुम्हाला तसं वाटत नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर गुरुवार, 03/17/2016 - 18:26 नवीन
मला वाटतं आपण इथे आपल्या वैयक्तिक भूमिकांबद्दल चर्चा करत नसून संघाच्या, एम आय एम च्या भूमिकांबद्दल चर्चा करत आहोत. मला वा तुम्हाला काय वाटतं हे आता इथं महत्त्वाचं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ब
बोका-ए-आझम गुरुवार, 03/17/2016 - 19:20 नवीन
मला वाटतं आपण इथे आपल्या वैयक्तिक भूमिकांबद्दल चर्चा करत नसून संघाच्या, एम आय एम च्या भूमिकांबद्दल चर्चा करत आहोत. मला वा तुम्हाला काय वाटतं हे आता इथं महत्त्वाचं नाही.
असहमत. आपण इथे आपल्या मते संघ आणि MIM यांची काय भूमिका आहे त्यावर चर्चा करतोय. त्यामुळे आपल्या मतांना महत्व आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर गुरुवार, 03/17/2016 - 20:18 नवीन
मला माझ्या धर्माचा असलेला अभिमान हा दुस-या धर्माच्या अवहेलनेशिवाय आणि दुस-या धर्माच्या माणसाला नैसर्गिकपणे वाटणाऱ्या त्याच्या धर्माच्या अभिमानाबरोबर co-exist करु शकतो असं मला वाटतं. तुम्हाला तसं वाटत नाही का? >> उपरोक्त विधानातली भूमिका ही तुमची आहे की संघ-एमायम पैकी कोणाची आहे? इथे माझ्या, मला हे शब्द बोका-ए-आझम ह्या सदस्याने स्वतःला उद्देशून म्हटले आहे की संघ-एमायम ला उद्देशून म्हटले आहे? तुम्हाला तसं वाटत नाही का हा प्रश्न संघ-एमायम ह्यांना विचारला आहे की तर्राट जोकर ह्या सदस्याला विचारला आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ब
बोका-ए-आझम Sat, 03/19/2016 - 11:09 नवीन
अर्थात तुम्हाला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Sat, 03/19/2016 - 11:18 नवीन
आता हे विषयांतर नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
D
DEADPOOL Wed, 03/23/2016 - 12:22 नवीन
मग जाऊ द्या ना, सगळे हिंदूंना त्रास देत असताना एक पक्ष बाजू घेतोय त्यात काय वाईट?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Wed, 03/23/2016 - 12:30 नवीन
सगळे कोण?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: DEADPOOL
भ
भंकस बाबा गुरुवार, 03/24/2016 - 17:44 नवीन
संसदेत स्मृति इराणी दुर्गा देवी बद्दल जेएनयूमधे आलेली पत्रके वाचून दाखवत असताना कॉंग्रेसचे काही खासदार त्यास विरोध करत होते. त्यांचे म्हणणे असे होते की इराणी बाईनीं हा मजकूर संसदेत वाचायलाच नाही पाहिजे होता. त्यांच्यामुळेच दुर्गा मातेचा पर्यायाने हिन्दू देवतांचा अपमान झाला. आता हे तर्कट कशाला? तर पप्पूने आधीच जाऊन जेएनयू मधे अभिव्यक्तिस्वातंत्रयावर येणाऱ्या घाल्याविषयी तारे तोडले होते. आता ही अशी सूट तेथील विद्यार्थयाना पाहिजे होती तर पप्पूचे वस्त्रहरण झाले असते. मग काय ईमानी कुत्री भूंकली थोड़ी! बाकी पुष्कळ वेळा सिद्ध झाले आहे की इतर पक्ष म्हणजे राजद, बसपा, सीपीएम, राष्ट्रवादी हे सर्व सर्वधर्मसम्भावच्या आड़ हिन्दुवरच संधान साधतात. खरे म्हणजे ते हिंदुना गृहीत धरतात. तुमच्या संघाच्या विधानाबाबत, मी स्वतः शाखेत दोन वर्षे गेलो आहे, तेव्हा मला कुठेही हिंदू एजेंडा दिसला नाही. उलट त्यांच्या त्या लाठीकाठि चालवण्याच्या प्रकाराची गंमत वाटायची. कारण मुंबईत कुठे दंगे झाले की शाखा सुट्टीवर जायची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Fri, 03/25/2016 - 09:31 नवीन
पुष्कळ वेळा सिद्ध झाले आहे की इतर पक्ष म्हणजे राजद, बसपा, सीपीएम, राष्ट्रवादी हे सर्व सर्वधर्मसम्भावच्या आड़ हिन्दुवरच संधान साधतात. खरे म्हणजे ते हिंदुना गृहीत धरतात. >> जसे की? उदाहरणार्थ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भंकस बाबा
भ
भंकस बाबा Mon, 04/04/2016 - 02:46 नवीन
इशरत जहां केस मधे अहमहिका लागली होती तिला शहीद बनवायची! जे काही बेसिक प्रश्न उदभवत होते तिथे हे सर्व राजकीय पक्ष दुर्लक्ष करत होते. आता जेव्हा तिचे कनेक्शन उघड होत आहे तेव्हा तिला खोटया चकमकीत मारले हे कारण पुढे केले जात आहे. एकतर या माणसांना पोलिस कारवाई कशी होते ह्याची कल्पना नसावी तसेच केसेस कशा चालतात ह्याची माहिती नसावी. आपले पोलिस काय सार्वजनिक जागेतिल बोराचे झाड़ आहे जे कोणीही यावे आणि दगड मारून पाडावे? वा त्यांनी काय कास्टडीतून या टीनपाट दहश्तवाद्याची वाहतूक करण्यात आपला वेळ घालवावा? बाटला हाउस चकमकीत देखिल वरील काही पक्षाच्या प्रतिक्रिया चीड़ आणणाऱ्या होत्या. तरिही या पक्षाणा इथे मत मिळतात व् ते देणारे हिंदुच असतात. अशा प्रकारची वक्तव्य मुस्लिम समाजाच्या विरोधात हे कधीच करत नाही उदा. भगवा दहशतवाद हां कोंग्रेस, राजद, कमुनिस्ट यांचा आवडता शब्द आहे पण यांच्या तोंडी हिरवा दहश्तवाद हां शब्द कधी येत नाही, तेव्हा मात्र दहशतवादाला रंग नसतो अशी नाटकछाप विधाने येतात. पहल्यान्दा चीड़ यायची पण आता हसु फूटते हे बघुन. आता सत्तेत आल्यावर भाजपा देखिल असे बोलायला लागली आहे. अलीकडेच राजनाथ सिंगानि असेच काहीसे विधान केले होते आणि त्यानंतर मुंबईत इसिसचे काही कनेक्शन उघड झाले होते. अशा पुष्कळ कनेक्शनवर गुप्तहेरखाते नजर ठेउन आहे व् ते वारंवार सांगत देखिल आहे की हे देशाला विघातक आहे. तरिही हे नेते ऐकायला तयार नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Mon, 04/04/2016 - 04:39 नवीन
इशरत जहां व बाटला हाऊसबद्दल तुमच्याशी सहमत. भगवा दहशतवाद हा शब्द ज्यांचा आवडता आहे ते समस्त हिंदूबद्दल तो वापरत नाहीत हे लक्षात घ्यावे लागेल. ते हिंदुत्ववादी संघटनांबद्दल वापरतात, कारण त्यांच्या (काँग्रेस व इतर) आयडॉलॉजीप्रमाणे ह्या संघटना भारताची धार्मिक हुकूमशाही बनवतील असे त्यांना वाटते. जेव्हा जेव्हा ते असं काही बोलतात तेव्हा ते समस्त हिंदु नव्हे तर कट्टर हिंदुत्ववादी पक्षांबद्दल बोलत असतात, त्यांच्या विचारपद्धतीबद्दल बोलत असतात. हे केवळ राजकारण आहे. नीच पद्धतीचे. ते हिरवा दहशतवाद बोलणार नाहीत कारण राजकारनात त्यांनी मुस्लिमांना गृहित धरलेले आहे. जेव्हा मुस्लिमांचे स्वतःचे राजकिय पक्ष हिंदुत्ववादी पक्षांसारख्या तुल्यबळ लढती देऊ लागतील तेव्हा एका पायावर हे सगळे हिरवा दहशतवादाचा शंखनाद करायला सुरुवात करतील. ह्याची चुणूक महाराष्ट्र विधानसभेत एम आय एमच्या आमदारास निलंबीत करण्यामधे दिसून आली. सो इट्स ऑल पॉलिट्क्स. डोन्ट टेक इट पर्सनल. ह्या सगळ्या पक्षांमधेही हिंदू कार्यकर्ते आहेत. पुजा, पाठ कर्मकांडे, मंदिर इत्यादी करणारे. ते सगळे काही मुस्लिम नाहीत. आता त्यांचे हिंदू कार्यकर्ते ते गुलाम आणि हिंदुत्ववाद्यांचे कार्यकर्ते हेच खरे देशप्रेमी, हिंदुप्रेमी अशी व्याख्या होत असेल तर हा वाद अनाठायी असेल, त्यावर बोलणे मला शक्य नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भंकस बाबा
व
विजुभाऊ गुरुवार, 03/17/2016 - 14:37 नवीन
मुस्लिमांना राष्ट्रीय प्रवाहात सामील करुन घेतले पाहिजे या मताशी अनेक सहमत होतील
हे वाक्य अजून किती वर्षे वापरायचं? कोणी अडवलंय? शिक्षणाची दारे नाकारायची; मग दुसरे काय होणार
  • Log in or register to post comments
त
तर्राट जोकर गुरुवार, 03/17/2016 - 14:40 नवीन
शिक्षणाची दारे नाकारायची; >> कुणी नाकारलीत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
न
नाना स्कॉच गुरुवार, 03/17/2016 - 14:41 नवीन
हे वाक्य गेली किती वर्षे "गुळगुळीत" केले जाते आहे आपल्या मता/अनुभवानुसार???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
स
साहना Fri, 03/18/2016 - 02:52 नवीन
हा राष्ट्रीय प्रवाह नक्की काय प्रकरण आहे ? आम्ही कधी ह्या प्रवाहांत डुबकी लावल्याचे आठवत नाही, उच्च शिक्षण घ्यायचे, चांगली नोकरी करायची, धंदा करायचा शक्य असेल तर विदेशांत जावून स्थायिक व्हायचे अशीच लिमिटेड स्वप्ने होती. मुसलमान लोकांची स्वप्ने वेगळी असतात का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
न
नाना स्कॉच Fri, 03/18/2016 - 03:26 नवीन
फ़क्त मार्ग खडतर असतो, स्वप्ने पुर्ण करायला पैसा पण लागतो अन ही बातमी काहीतरी वेगळेच सांगते. माझ्या आकलना प्रमाणे प्रॉब्लम खालील प्रमाणे असावे (मी फाइनेंस एक्सपर्ट नाही फ़क्त सामान्य निरिक्षण आधारित तर्क देतोय चुक असल्यास संबंधित तज्ञ लोकांनी मला दुरुस्त करावे बँक्सच्या बाजुने :- 1. ओवरऑल इस्लामोफोबियाचा असर असणे 2. मुस्लिमांस डिसबर्स केलेली सगळी लोन्स एनपीए होतीलच ही अनाठाई भीती मुस्लिमांच्या बाजुने 1. मुळात परिवार हे यूनिट मोठे असल्याकारणे मॉर्गेज करण्यालायक हिश्श्यात आलेले एसेट छोटे / अंडरवैल्यू असणे 2. नॉर्म्स कंप्लाय करण्यात अनकम्फ़र्टेबल असणे (उदा स्त्रियांच्या नावे लोन असता बुरका वर करून फ़ोटो काढणे वगैरे) एक सकारात्मक चित्र अन संभाव्य उपाय - मुद्रा लोन्स उपयोगी ठरू शकतात, ही लोन्स योजना हा एक अतिशय सकारात्मक भाग आहे. -बँक ला सरकारी स्तरावरुन प्रोत्साहन देणे तसेच हुशार मुस्लिम विद्यार्थी उद्योजक ह्यांचे सार्वजनिक कौतुक अन encouragement. - सेल्फ हेल्प गृप उर्फ़ स्वयं सहाय्यता गट हा माइक्रो फाइनेंस मधला एक उत्तम पर्याय आहे सुदैवाने मुस्लिम लोकांत त्याला चांगला प्रतिसाद आहे तो पुढे कंटिन्यू राहील अश्या स्टेप्स घेणे , त्याच्यासाठी गरजेचे वोकेशनल कोर्सेज उदा शिवण क्लास, शेळी पालन, पत्रावळी द्रोण तयार करणे, एमएमसीजी मधले डिप्लोमा वगैरे प्रोत्साहित करणे, एग्रो वन मार्केट किंवा खाद्य महोत्सव वगैरे आपण आयोजित करतो तसे त्यांना कस्टमर एक्सपोज़र देणारे मेळावे आयोजित करणे पण करता येईल, वरील सगळे वोकेशनल कोर्सेज स्किल इंडिया अंतर्गत सुरु करता येतील -नोबेल पारितोषिक विजेते बांग्लादेशचे महंमद युनुस अन त्यांच्या ग्रामीण बँक ह्या माइक्रोफाइनेंस मधल्या कार्याचा अभ्यास अन त्यात लोकल भारतीय कंडीशन नुसार मॉडिफिकेशन करून वापर करणे (हे आमचे स्वगत झाले सरकार ने असे काही केलेही असेल, असल्यास स्तुत्य आहे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साहना
ब
बोका-ए-आझम Sat, 03/19/2016 - 12:23 नवीन
यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्याशी याबद्दल बोलणं करण्याचं भाग्य मला लाभलेलं आहे. २००७ च्या मार्च महिन्यात मुंबई विद्यापीठात त्यांचं भाषण झालं होतं. तेव्हा त्यांनी आपल्या ग्रामीण बँकेची तत्वं ऐकवली होती. ग्रामीण बँक फक्त स्त्रियांना कर्ज देते आणि त्यासाठी त्या स्त्रीचं राहतं घर तिच्या नावे असणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचा एक चांगला परिणाम म्हणजे पुरूषांनी दारु पिऊन बायकांना मारणं खूप कमी झालेलं आहे कारण घर हे आता त्या स्त्रीच्या नावाने असल्यामुळे ती नव-याला घराबाहेर काढू शकते. परतफेडीचा काळ एक महिन्याचा आहे आणि गावातलं पोस्ट आॅफिस किंवा पानवाला हे पैसे स्वीकारणारे बँकेचे एजंट्स आहेत. कर्जाची रक्कम जी वस्तू विकत घ्यायची आहे त्या वस्तूपेक्षा जास्त नसते, जेणेकरून कर्ज घेणाऱ्याला पैसे दुस-या एखाद्या गोष्टीवर उडवायचा मोह होऊ नये. आपल्याकडे जेव्हा ही पद्धत राबवली गेली तेव्हा यातली सगळी थ्वं पूर्णपणे अंमलात आणली गेली नाहीत. विशेषतः घर स्त्रीच्या नावे असणे. त्यामुळे त्याचा म्हणावा तेवढा प्रभाव दिसला नाही. हे स्वतः युनुस यांच्याकडून ऐकलेलं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच
आ
आबा Fri, 03/18/2016 - 09:55 नवीन
..नाही, उच्च शिक्षण घ्यायचे, चांगली नोकरी करायची, धंदा करायचा शक्य असेल तर विदेशांत जावून स्थायिक व्हायचे अशीच लिमिटेड स्वप्ने होती बोला, भारत माता की जय :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साहना
न
नाना स्कॉच Fri, 03/18/2016 - 10:06 नवीन
ठ्ठो sssssssss :D :D :D :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आबा
आ
आजानुकर्ण Fri, 03/18/2016 - 16:11 नवीन
वंदे मातरम्!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आबा
त
तर्राट जोकर गुरुवार, 03/17/2016 - 14:39 नवीन
हिंदूंच्या मानसिक असुरक्षिततेचा राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न काही धूर्त संघटनाही करत आहेत.
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क गुरुवार, 03/17/2016 - 19:35 नवीन
चला हिंदू असुरक्षित आहेत हे तरी मान्य केलं, मग ते मानसिकरीत्या का होईना. बाकी मुसलमानांच्या तथाकथित असुरक्षिततेचा फायदा तर घेतला गेलाय बऱ्याच अतिधूर्त व्यक्ती, संघटना आणि राजकीय पक्षांकडून. अजूनही घेतला जातोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
स
सर्वसाक्षी गुरुवार, 03/17/2016 - 16:21 नवीन
त्याच प्रमाणे मराठी माणसाच्या मनात कोन्ग्रेस विषयी द्वेष आणि स्वता विषई अन्यायाची भावना निर्माण झाली तेंव्हा बाळासाहेब ठाकरे ह्यांनी पक्ष उभारून कोन्ग्रेस ला माती चारली. कायद्याच्या बाहेर जावून ठोकशाही करत त्याना स्वताचे साम्राज्य निर्माण करता आले असते पण त्यांनी सुद्धा खडतर मार्ग पत्करला.
काय सांगता! माती कधी चारली? १९६६ साली? १९७० साली? सेना अजूनही महाराष्ट् राज्यात स्वबळावर एकदाही सत्तेवर आलेली नाही. आपण महाराष्ट्र राज्याचे विधानसभा/ लोकसभा निकाल पाहा, अनेकदा कॉन्ग्रेसला आसराच मिळाला आहे. गेल्या निवडणुकीत कॉन्ग्रेसला हाग्या मार खावा लागला तो मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा कडुन. सेनेने कधी कायद्याबाहेर जाऊन ठोकशाही केली नाही असे आपले मत आहे का? सेनेने स्विकारलेला खडतर मार्ग कोणता ते सांगा. सेनेने सुरुवातीच्या मराठी माणसांना नोकर्‍या मिळवुन देण्यात पुढाकार घेतला हे निश्चित पण मराठी प्रेमामुळे कुणी कॉन्ग्रेस सोडुन सेनेत गेल्याचे ऐकिवात नाही. हिंदू मुस्लिम दंगलीत मुंबईकर हिंदुंना सेनेचा खूप मोठा आधार वाटायचा हे निर्विवाद सत्य आहे. मात्र महापालिका ताब्यात असताना, भरपूर नगरसेवक असताना मुंबईत अमराठी लोकांच्या दाट वसाहती कशा काय उभ्या राहिल्या? मी सेना जवळपास स्थापनेपासून पाहत आहे आणि एकेकाळी सेनेचे समर्थनही करायचो. पण 'तारतम्य' वाली सेना कधीच संपली. प्रमोद नवलकर, दत्ताजी साळवी, दत्ता नलावडे, गजानन किर्तिकर, मनोहर जोशी, रमेश प्रभु, सुधीर जोशी, वामनराव महाडिक हे कधीच इतिहास जमा झाले.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 03/17/2016 - 17:28 नवीन
+९९९९९९९९९९९.... सेनेने स्वतःच्या ताकदीबद्दल अनेक गैरसमज पसरविले होते/आहेत. भाजप म्हणे सेनेमुळे महाराष्ट्रात वाढला. वस्तुस्थिती याच्या बरोब्बर उलट आहे. एप्रिल १९८० मध्ये भाजपची स्थापना झाल्यावर महाराष्ट्रात मे १९८० मध्ये पूर्णपणे स्वतंत्र लढून भाजपने महाराष्ट्राच्या जवळपास सर्व भागातून आपले १२ आमदार निवडून आणले होते. त्यावेळी शिवसेनेचे शून्य आमदार निवडून आले होते. १९७९ च्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशात इंदिरा कॉंग्रेसची लाट होती. इंदिरा काँग्रेसला देशात ५४३ पैकी तब्बल ३५५ जागा मिळाल्या होत्या. महाराष्ट्रात इंदिरा काँग्रेसने शिवसेनेबरोबर युती करून निवडणुक लढविली होती. त्यात शिवसेनेने मुंबईत २ जागांवर शिवसेनेचे उमेदवार उभे होते. उर्वरीत ४६ जागांवर इंदिरा काँग्रेसचे उमेदवार होते. इंदिरा काँग्रेसने ४६ पैकी तब्बल ३९ जागा जिंकल्या. परंतु आपला बालेकिल्ला समजला जाणार्‍या मुंबईत, प्रचंड लाट असलेल्या इंदिरा काँग्रेसबरोबर युती करूनसुद्धा शिवसेनेला एकही उमेदवार निवडून आणता आला नव्हता. आणि म्हणे मुंबई आमचा बालेकिल्ला आणि भाजप आमच्यामुळे वाढला! शिवसेना १९६६ साली स्थापन झाली. त्यानंतर १९६९ मध्ये एका पोटनिवडणुकीत शिवसेनेचा १ आमदार निवडून आला आणि नंतर १९८५ च्या विधानसभा निवडणुकीत १ आमदार निवडून आला. १९८५ च्या निवडणुकीत भाजपचे १६ आमदार निवडून आले होते. म्हणजे १९६६-१९८९ या २३ वर्षात शिवसेनेला फक्त २ आमदार निवडून आणता आले होते. १९९० साली भाजपबरोबर युती केल्यावर शिवसेनेने दांडगाई करून भाजपचा बालेकिल्ला असलेले अनेक मतदारसंघ (उदा. शिवाजीनगर) हिसकावून घेऊन स्वत:च्या घशात घातले आणि २८८ पैकी तब्बल १८३ जागा लढविल्या. तरी फक्त ५२ आमदार निवडून आले (म्हणजे ५१ आमदार वाढले). भाजपने फक्त १०५ जागा लढवून ४२ आमदार निवडून आणले (म्हणजे २६ आमदार वाढले). म्हणजे भाजपबरोबर युती करून भाजपला जेवढा फायदा झाला त्याच्या दुप्पट फायदा शिवसेनेला झाला. ठाणे व मुंबईतील काही ठराविक भाग सोडले तर सेनेला महाराष्ट्रात कोणीही ओळखत नव्हते. भाजपने मराठवाड्यातून गोपीनाथ मुंडे, मुंबईतून राम नाईक व हशू अडवाणी, ठाण्यातून राम कापसे, कोकणातून डॉ. नातू, पुण्यातून अरविंद लेले, अण्णा जोशी असे वेगवेगळ्या भागातून १-२ का होईना पण स्वबळावर आमदार निवडून आणले होते. भाजपमुळेच महाराष्ट्रात शिवसेनेची वाढ झाली आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात कोण मोठा भाऊ याच स्पष्ट उत्तर जनेतेने दिले आहे. २००२ च्या मुंबई महापालिका निवडणुकीत सेना १०० + भाजप ३२ अशी स्थिती होती. २००७ मध्ये सेना ८४ + भाजप २८ व २०१२ मध्ये सेना ७५ + भाजप २९ अशी स्थिती होती. भाजपने आपल्या नगरसेवकांची संख्या फारशी कमी होऊन दिलेली नाही. परंतु सेनेची सातत्याने घसरण सुरू आहे. २०१७ मध्ये जर सेना स्वबळावर लढली तर सेनेचे ५० पेक्षा कमी नगरसेवक असतील. मराठी, मराठी गजर करताना शिवसेनेने अनेक अमराठी लोकांना राज्यसभेचे खासदार केले. सेनेने खडतर मार्ग वगैरे कधीही स्वीकारलेला नाही. वाटेल ते प्रक्षोभक बोलणे एवढेच सेनेचे व्यवच्छेदक लक्षण. तसं पाहिलं तर शिवसेनेत तारतम्य कधीच नव्हतं. १९९२ साली बाबरी मशीद प्रकरणानंतर बाळासाहेब कसे शूर होते असे चघळले जाते. त्यावेळचे त्यांचे उद्गार हे सावध व जरतर शब्द वापरून काढलेले आहेत हे सोयिस्कररित्या दुर्लक्षिले जाते. २०१४ मध्ये बाळासाहेब असते तर त्यांनी भाजपने युती तोडल्यावर अशी भाषा वापरली असती की त्यापुढे उद्धव, राऊत इ. ची भाषा सुसंस्कृत वाटली असती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी
आ
आजानुकर्ण गुरुवार, 03/17/2016 - 21:02 नवीन
वाटेल ते प्रक्षोभक बोलणे एवढेच सेनेचे व्यवच्छेदक लक्षण.
+४२० श्रीगुरुजी आणि सर्वसाक्षी यांच्याशी एकाच वेळी सहमत होण्याची वेळ कधी येईल असे वाटले नव्हते. मात्र आमचा येथे अपेक्षाभंग झाला आहे हे या ठिकाणी या माध्यमातून जाहीर करत आहोत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा