ओवेसिंचा गळा
ओवेसी ह्यांची भाषणे मी पहिली आहेत आणि हि व्यक्ती अतिशय अभ्यासू आहे ह्यांत शंकाच नाही.
जेव्हा नक्षलवादी हल्ला करतांत तेंव्हा सगळे म्हणतात कि "we must encoruage naxalites to join mainstream and solve problem democratically ". माझ्या मते ओवेसी सारखा कट्टर मुसलमान संसदेत असणे हि चांगली गोष्ट असून त्याला योग्य तो मान इतरांनी दिला पाहिजे, मन व्यक्तीला असून त्याच्या विचारणा किमत देण्याची गरज नाही. जर संसदेत त्याला बोलायला दिले नाही किंवा जेल मध्ये डांबले तर त्याच्या सारख्या कट्टर लोकांपुढे कायद्याच्या बाहेर जावून आपल्या भावना लोकंवर लादणे हा एकाच पर्याय बाकी राहतो. माझ्या मते ओवेसी म्हणजे एक नक्सल type माणूस आहे ह्याने शस्त्र घेण्याच्या नादात न पडता लोकशाही मार्गाने आपले विचार आणि धोरण प्रकट करण्याचा मार्ग अवलंबला आहे. आणि तो स्तुत्य आहे.
कोन्ग्रेस पार्टी मध्ये हिंदुना जेंव्हा दुय्यम वागणूक मिळत होती तेंव्हा संघा कडे दोन पर्याय होते, लोकशाही मार्गाने पार्टी उभी करून निवडणूक जिंकणे आणि किंवा कायद्याच्या बाहेरून काही तरी भानगडी करणे (उद रामसेना). जे लोक संघाला कट्टर वगैरे समजतात खरे तर त्यांनी संघाच्या निर्णयाचे स्वागत करायला पाहिजे कारण त्यांनी खडतर पण अ-हिंसक मार्ग स्वीकारला. संघाला खरे तर शांततेचा नोबेल मिळायला पाहिजे.
त्याच प्रमाणे मराठी माणसाच्या मनात कोन्ग्रेस विषयी द्वेष आणि स्वता विषई अन्यायाची भावना निर्माण झाली तेंव्हा बाळासाहेब ठाकरे ह्यांनी पक्ष उभारून कोन्ग्रेस ला माती चारली. कायद्याच्या बाहेर जावून ठोकशाही करत त्याना स्वताचे साम्राज्य निर्माण करता आले असते पण त्यांनी सुद्धा खडतर मार्ग पत्करला. शिवसेनेने भलेही अनेक वेळा कायदा तोडला असेल पण तरी सुद्धा काही बेसिक तारतम्य त्यांनी सांभाळले होतेच.
माझ्या मते कट्टरपंथी लोकांनी निवडून येवून संसदेत, वर्तमान पत्रांत इत्यादी आपले कट्टर विचार प्रकट करणे हि चांगली गोष्ट असून त्यात वायीत काहीच नाही उलट संसंद हि त्याच साठी बनवली गेली आहे.
उद्धव ठाकरे ह्यांचे "गळा कापावा" वगैरे बोल केवळ अलंकारिक स्वरूपाचे असावेत असे मला वाटते.
💬 प्रतिसाद
(251)
अ
अर्धवटराव
गुरुवार, 03/17/2016 - 22:47
नवीन
यात 'हेतुपुरस्सर' हा शब्द टाकायचा राहिला का? :ड
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
गुरुवार, 03/17/2016 - 23:12
नवीन
गुहा काय खोटं बोललेत? जरा आम्हाला पण कळू द्या कोण कोणाला गंडवतंय ते?
- Log in or register to post comments
व
विकास
गुरुवार, 03/17/2016 - 23:41
नवीन
अहो बदनामी करणारे जोकर ;) आधी गोळवलकरासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले त्याबद्दल आपले मत सांगा. नुसते प्रश्न विचारू नका. मान्य करा काही मिळत नाही म्हणून.
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
गुरुवार, 03/17/2016 - 23:57
नवीन
कसली घाई आहे तुम्हाला? दबाव आणण्याचा तर अजिबात प्रयत्न करु नका. तुमच्या प्रश्नांची उत्तरे तुमच्या वेळेत द्यायला मी इथे येत नाही. इथे प्रतिसाद आल्या आल्या उत्तर नाही दिले तर कुणाचा तडफडून जीव जाणार नाही. तसेच गोळवलकरांच्या भूमिकेच्या प्रश्नावर तुम्हीच उलट प्रश्न विचारला. गुहांची लिंक दिली होती, त्यातल्या भूमिकेवर प्रश्न होता. तो चुकवून तुम्ही तुमच्या सोयिस्कर तुकडा आणून पिवळे करुन दाखवुन हेच का ते असे विचारले. त्यामुळे माझा मूळ प्रश्न तर बाकीच आहे. त्याचे आधी बघा कसे जमते ते?
बाकी, निसर्गाची हाक दबावाच्या घाईस कारण असेल तर सावकाश जाऊन या. मला वेळ मिळाला की स्वतंत्र धागा टंकेन. भाजपबद्दल टंकायचाच आहे, संघाशिवाय कसा होइल? घाबरु नका, सगळं नीट होइल. देवाकडे प्रार्थना करा.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Fri, 03/18/2016 - 05:37
नवीन
ही तुमची नेहमीची style झालीय आता. सनसनाटी, वाट्टेल ती विधानं करायची; पुरावे मागितले की मागे सरायचं; विरोधासाठी विरोध करायचा आणि सगळी चर्चा गढूळ करुन टाकायची. मराठी आणि हिंदी सीरियल्समधल्या ज्या नकारात्मक स्त्री व्यक्तिरेखा असतात त्यांचं वागणं आणि तुमचं वागणं याच्यात मला तरी काहीच फरक दिसत नाहीये. खुसपटं काढणं आणि अंगाशी आलं की ' मला असं म्हणायचंच नव्हतं, मला वेळ नाही, तुम्हाला उत्तरं देण्याची मला काही गरज भासत नाही वगैरे थुकरट स्पष्टीकरणं द्यायची. आता यावर तुमचं उत्तर काय असणार आहे तेही सांगतो - मी आमंत्रण दिलं नव्हतं तुम्हाला वाद घालायला वगैरे वगैरे. एवढं मुद्दे सोडून वाद घालण्याचं तुमचं कौशल्य बघून माझी तर खात्री पटलेलीच आहे की....
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Fri, 03/18/2016 - 07:45
नवीन
असु देत. कधी कधी एका विधानामागे एक ग्रंथभर स्पष्टीकरण आवश्यक असतं. तुमची इच्छा असेल पण माझी ताकत नाही ग्रंथभर लिहित बसायची. हिंदु म्हणजे काय याची व्याख्या लोक एका वाक्यात करतात पण ती तशी नाही हे तुम्हाला माहित आहे. तसेच संघाचे वागने मी एका वाक्यात बसवले, त्याला पुरावे हवे असतील तर जरा धीर धरावा लागेल. बाकी इथे काहीही सांगितलं तरी उडवून लावण्याचे, मान्यच न करण्याचं स्वातंत्र्य उपभोगायचे, वरुन इतरांना दोष द्यायचे हेही कौशल्य परिचयाचे झाले आहे. बाबरी मस्जिद ही मस्जिदच नव्हती असे ठोकून देणारे सदस्यही इथे बघितलेत. त्यामुळे असो. तुमचे विचार तुमच्याजवळ, माझे माझ्याजवळ.
- Log in or register to post comments
प
पैसा
Fri, 03/18/2016 - 08:32
नवीन
भाषा अजिबात आवडली नाही. लोक राजकीय चर्चांना का कंटाळतात याचे उत्कृष्ट उदाहरण इथेच दिल्याबद्दल धन्यवाद!
- Log in or register to post comments
ज
जयंत कुलकर्णी
Sat, 03/19/2016 - 11:47
नवीन
पैसा,
वाईट ! अत्यंत वाईट !
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Fri, 03/18/2016 - 09:16
नवीन
प्रतिसाद उड्वावा.
संपादकमहोदय, http://www.misalpav.com/comment/818633#comment-818633 प्रतिसाद उड्वावा.
- Log in or register to post comments
D
DEADPOOL
Sun, 03/20/2016 - 10:01
नवीन
इथे प्रतिसाद आल्या आल्या उत्तर नाही दिले तर
कुणाचा तडफडून जीव जाणार नाही.>>>>>>>.
हे टायपिंग करताना तुमची लईच तड्फड होत होती वाटत!
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Sun, 03/20/2016 - 10:13
नवीन
इथली तडफड दिसली नाही वाटतं तुम्हाला
अहो बदनामी करणारे जोकर ;) आधी गोळवलकरासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले त्याबद्दल आपले मत सांगा. नुसते प्रश्न विचारू नका. मान्य करा काही मिळत नाही म्हणून.
- Log in or register to post comments
D
DEADPOOL
Wed, 03/23/2016 - 12:06
नवीन
इथली तडफड दिसली नाही
वाटतं तुम्हाला
अहो बदनामी करणारे जोकर ;) आधी
गोळवलकरासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले त्याबद्दल
आपले मत सांगा. नुसते प्रश्न विचारू नका. मान्य करा
काही मिळत नाही म्हणून.
मग बरोबर आहे ना,समोरचा उत्तर मागतोय आणि आपण नुसते प्रश्न विचारल्यावर तड्फड होईलच!
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Wed, 03/23/2016 - 12:09
नवीन
सोयिस्कर तेवढे बघायचे आणि समजायचे. ह्याला तोडगा नाही.
- Log in or register to post comments
S
sagarpdy
Fri, 03/18/2016 - 05:33
नवीन
तथाकथित विदा पोचला. आपण जी भूमिका मांडताय ते उघड सत्य आहे असे तरी नक्की वाटत नाही.
सबब
हे वाक्य मागे घ्यावं हि अपेक्षा आहे.
यापलीकडे, आपला दृष्टीकोन बाळगण्यास आपण स्वतंत्र आहात, धाग्यावर अती विषयांतर नको.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Fri, 03/18/2016 - 08:09
नवीन
मी बघितले ते संघी यांच्यात एक टिपिकल साम्य आहे. त्यांचे विचार छापखान्यातल्या खिळ्यांसारखे फिक्स आहेत. महाराष्ट्राच्या एका टोकापासून ते दुसर्या टोकापर्यंत अनेक संघी संपर्कात आले. अशा संघींच्या समावेशाने संघ बनतो की नाही?
काय विधान आहे?
जोकर बुवा
मग मी चांद्या पासून बांद्यापर्यंत( इतकेच कशाला काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत) बरेच मुसलमान पहिले त्यात बरेच पाकिस्तानचे समर्थक होते आणी त्यांच्या विचारसरणीचा इतर मुसलमान निषेध करत नाहीत म्हणजे आपल्याच विचारसरणी प्रमाणे "सगळेच" मुसलमान पाकिस्तानचे समर्थक आहेत असेच म्हणावे लागेल.
आपल्या मुद्द्याचे समर्थन करण्यासाठी आपण कोणत्या थराला जाता ते स्वच्छ दिसते आहे. संघ (किंवा मोदी) द्वेष इतका पराकोटीचा?
याला आपला परत मेगाबायती प्रतिसाद येईलच परंतु मला त्यात काडीचा रस नाही.
असो.
- Log in or register to post comments
व
विकास
गुरुवार, 03/17/2016 - 20:22
नवीन
खालील भुमिकेबद्दल बोलत आहात का? नक्की काय वाटते आपल्याला?
"... We are not so mean as to say that with a mere change in the method of worship, an individual ceases to be a son of the soil. We have no objection to God being called by any name whatever. We, in the Sangh, are Hindus to the core. That is why we have respect for all faiths and religious beliefs. He cannot be a Hindu at all who is intolerant of other faith..." (संदर्भः Bunch of Thoughts)
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
Fri, 03/18/2016 - 16:22
नवीन
माझ्याकडे ज्येष्ठ संघ स्वयंसेवक दामूआण्णा दाते आणि वि.रा. करंदीकर यांची 'स्मरणशिल्पे' अाणि 'तीन सरसंघचालक' ही पुस्तके आहेत. त्यात संघाची किंवा सरसंघचालकांची विचारसरणी दाखवणारी खालील वाक्ये आहेत.
१. गोळवलकर गुरुजी व लालबहाद्दूर शास्त्री यांच्यातील संवादः "मुसलमान हे अराष्ट्रीय आहेत व अशा अराष्ट्रीय मुसलमानांना जे आपल्यात सामावून घेतात, ते राष्ट्रद्रोही आहेत. त्यामुळे एक आदेश काढा व अशा सर्वांनाच बाहेर घालवा"
२. ज्यांच्या राष्ट्रीयत्वाबद्दल शंका असेल त्यांचा मतदानाचा हक्क रद्द करा. ते जर या राष्ट्राचे नाहीत, तर या देशात त्यांना मत नाही, हे प्रस्थापित करा.
३. मुसलमान मनोवृत्ती नेहमी सत्कार्यात विघ्न आणणारी असते, हे आपण जाणताच आहात.
असो हे नोट्स काढून ठेवलेले मुद्दे असल्याने चटकन आठवले. पुस्तके मुळातूनच वाचली तर आणखी विदा निश्चितच मिळेल.
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
Fri, 03/18/2016 - 16:25
नवीन
वरील मुद्दा १ मधील संवादातील वाक्य हे गोळवकर यांचे आहे. शास्त्री यांचे नाही. गैरसमज नसावा!
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Fri, 03/18/2016 - 17:43
नवीन
आजानुकर्ण,
मुस्लिम अराष्ट्रीय आहेत या विधानात काय चुकीचं आहे? इस्लाम मध्ये राष्ट्र ही संकल्पनाच नाही. मिल्लत नावाची एक संकल्पना आहे, पण तिचा राष्ट्राशी संबंध नाही. पाकिस्तानाकडे पाहून हे कळतं की. वेगळं उदाहरण कशाला पाहिजे?
शिवाय जगभरच्या मुस्लिमांना सर्वात जास्त धोका आहे तो स्वत:ला मुस्लिम म्हणवून घेणाऱ्या दहशतवाद्यांचा. हिंदूंचा नाही.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
Fri, 03/18/2016 - 18:43
नवीन
'संघ मुस्लिम विरोधात आहे असं कुठं म्हटलंय' पासून आता 'मुस्लीम अराष्ट्रीय आहेत या विधानात चुकीचं काय आहे' इथपर्यंत स्वयंसेवकांची गाडी आली याचं समाधान वाटतंय. हळूहळू सगळंच मान्य कराल.
मुसलमानांचं जाऊद्या. आधी हिंदूंकडं पाहू. हिंदूंमध्ये आहे का राष्ट्र ही संकल्पना? असल्यास ती कुठं धर्मग्रंथात, भगवद्गीतेत, पुराणात, उपनिषदात, वेदात लिहिली आहे ते सांगा. की हिंदुत्त्व म्हणजेच राष्ट्रीयत्व? म्हणजे आपोआप बाकीचे सगळे अराष्ट्रीय ठरतात?
मुस्लीमांना कसला धोका आहे तो असेल पण त्यापेक्षा हिंदूंना कसला धोका आहे हे तुमचे प्रतिसाद पाहून स्पष्ट कळतंय.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Sat, 03/19/2016 - 03:48
नवीन
की गा.पै.यांच्या ' अराष्ट्रीय ' या शब्दाचा अर्थ आपण नकारात्मक दृष्टीने घेतलेला आहे. इस्लाममध्ये धर्माला राष्ट्रापेक्षा जास्त प्राधान्य दिलं जातं ही वस्तुस्थिती आहे. हिंदूंचा धर्मग्रंथ नसल्यामुळे आणि हे सगळे ग्रंथ ज्या काळात लिहिले गेले तेव्हा राष्ट्र ही संकल्पनाच नव्हती. पण इस्लामचे पाठीराखे अजूनही जे कुराणात आहे त्याच्यापुढे काहीही असूच शकत नाही असं मानतात. जे मानत नाहीत त्यांची संख्या नगण्य आहे. हिंदूंनी राष्ट्र ही संकल्पना काळाप्रमाणे स्वीकारली, तशी ती मुस्लिमांनी स्वीकारली नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि पुस्तकात कोणीही काहीही म्हणू दे - प्रत्यक्ष वागणूक हा त्याहून मोठा पुरावा आहे. भारतात पाकिस्तानपेक्षा किंवा सौदी अरेबियापेक्षा जास्त मुस्लिम आहेत. त्यांना राज्यघटनेने समान मानलेलं आहे आणि संघाने राज्यघटनेपेक्षा आपलं वाङ्मय मोठं आहे असं म्हटलेलं नाही. इस्लामिक देशांत अशी परिस्थिती आहे का? प्रत्येक देश आपला धर्म जाहीर करतो तिथे. Islamic Republic of Pakistan असं पाकिस्तानचं अधिकृत नाव आहे. धर्म हा republic च्या आधी येतो. याहून अराष्ट्रीयत्वाचा मोठा पुरावा काय असू शकतो?
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
Mon, 03/21/2016 - 14:56
नवीन
'अराष्ट्रीय' या शब्दाचा सकारात्मक अर्थ काय घ्यायचा?
वस्तुस्थिती अशीही आहे की धर्माला राष्ट्रापेक्षा तथाकथित प्राधान्य देऊनही वेगवेगळे अनेक मुस्लिम देश जगात आहेत. धर्माला राष्ट्रापेक्षा जास्त प्राधान्य देऊनही पाकिस्तान-बांगलादेश वेगवेगळे होतात आणि भारतासारख्या देशाला त्यात हस्तक्षेप करावा लागतो. धर्माला राष्ट्रापेक्षा जास्त प्राधान्य देऊनही इराण-इराक-कुवेत एकमेकांच्या उरावर बसतात आणि या सर्व गोंधळात सौदी अरेबियाला अमेरिकेची मदत घ्यावीशी वाटते. मग वस्तुस्थिती वेगळी असू शकते याचा किमान विचार सूज्ञ सदस्यांनी करायला काय हरकत आहे?
मुस्लिम धर्मग्रंथ ज्या काळात लिहिला गेला तेव्हा राष्ट्र ही संकल्पना नव्हती.
वर वेगवेगळ्या देशांतील मुस्लिम एकमेकांशी कसे वागतात याची किंचित माहिती दिली आहे. जर राष्ट्र ही संकल्पना स्वीकारली नसती तर जगात एकमेव मुस्लिम राष्ट्र हवे होते.
तेच मी ही म्हणतोय.
पाकिस्तानात धर्म रिपब्लिकच्या आधी येऊनही बलुचिस्तानाला स्वातंत्र्याची चळवळ करावी वाटते. बांगलादेशानेही काडीमोड घेतलाच आहे हा काही वर्षांपूर्वीचा इतिहास आहे.
आता समारोपाचे भाषणः
मुळात या संघाबाबतच्या उपचर्चेला सुरुवात झाल्यावर अपेक्षित मार्गानेच चर्चा झाली आहे. 'संघ मुसलमान विरोधी आहे' हा तर्राट जोकर यांचा दावा खोडून काढण्यासाठी संघसमर्थकांनी आधी विदा मागितला. तो विदा (सरसंघचालकांची खाजगीतील वक्तव्ये व पुस्तकातील लेख) दिल्यावर - बरं तो विदा कुणी स्वयंघोषित श्रीगुरुजींचा नसून संघाच्या गुरुजींचाच आहे - तर तो विदा दिल्यावर मुसलमान देशविरोधी आहेत किंवा संघाचे विचार आता बदलले आहेत असा गोंधळ घालायला सुरुवात झाली. संघाचा हा पवित्रा नेहमीचाच आहे. सतत बुद्धीभेद करुन स्पष्ट भूमिका न घेता केवळ वैचारिक गोंधळ उडवून देणे आणि समाजात फूट पाडणे या कारणांसाठी तरी डोळस विचाराच्या नागरिकांनी संघापासून सावध राहिले पाहिजे.
मला कोणत्याच धर्माविषयी विशेष ममत्व नाही. असलीच तर हिंदू धर्माविषयी थोडी आपुलकी आहे. मात्र आमचा हिंदू धर्म हा 'जय श्रीराम'वाल्यांचा नाही
एवढे बोलून मी खाली बसतो. भारतमाता की जय!
- Log in or register to post comments
S
sagarpdy
Mon, 03/21/2016 - 16:31
नवीन
आपले संघाबद्दलचे मत नकारात्मक असेल तर त्याबद्दल पूर्ण आदर आहे, पण विदा मागणे आणि समर्थक असणे याचा काडीमात्रही संबंध नाही. काही चर्चेत लिहिलेली संदिग्ध माहिती अथवा मते यांस आधार मागणे एवढीच इच्छा त्यामागे असू शकते. आपण दिलेल्या विदा चा पूर्ण आदर आहे, वाचण्यात येईल.
आजच्या काळात हि मते कितपत जशीच्या तशी स्वयंसेवक वापरतात यावर आपण कोणत्याही प्रकारचा विदा दिलेला नाही, तो द्यावा अशी अपेक्षा नाही. एवढेच सांगतो कि काँग्रेस, MIM , हिंदू महासभा इ. संस्थांचे देखील विचार/तत्त्वे काळानुसार बदलत आलेले आहेत (मध्यंतरी हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी प्रजासत्ताक दिनी काळा दिवस कि काहीसा पाळला होता).
याखेरीज जसे लेखात मांडले आहे कि MIM हा मुस्लिमांसाठी लोकशाही/अधिक शांतीपूर्ण माध्यम देतो, त्याच तर्काने संघ हिंदूंसाठी अधिक विधायक माध्यम देतो हे मान्य आहे का ?
अवांतर : तुम्ही दिलेल्या मुस्लिम राष्ट्रातील मारामाऱ्या आणि असंतोषाबद्दल पुढील चर्चा दार-उल-हरब, दार-उल-इस्लाम, इस्लामोफोबिया ई. कडे जाण्याची शक्यता वर्तवतो (संदर्भ : शेषराव मोरे, राजघराण), तोच विषय उगाळण्याची इच्छा नाही. (पुराण कालच्या पुस्तकांतील माहितीवर भांडणे निरर्थक आणि सोपे दोन्ही एकाच वेळी आहे)
अधिक माहिती मिळेपर्यंत खाली बसतो. जय हिंद!
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
Mon, 03/21/2016 - 18:05
नवीन
मग हे विचार बदलले आहेत का? याबाबत माहिती कुठे मिळेल? अजूनही 'आपला नम्र गामा पैलवान' सारखे सदस्य 'मुसलमानांना हाकला' म्हणणारे गोळवलकर हे द्रष्टे होते असे म्हणतात तेव्हा त्यांना नक्की कुठले विचार अभिप्रेत आहेत?
हे मान्य नाही. एमआयएम हा पक्ष लोकशाही प्रक्रियेत भाग घेणारा आहे. लोकसभा-विधानसभा-नगरपालिका अशा विविध निवडणुकांमध्ये उमेदवार उभे करुन प्रतिनिधींना निवडून आणून जनतेचे प्रश्न विधायक मार्गाने योग्य त्या ठिकाणी मांडण्याची जी पद्धत असते तिचे पालन करणारा आहे. संघाची कार्यपद्धती याउलट आहे. संघात निवडणुकांमध्ये भाग घेण्याचे धैर्य नाही. बरं, संघ-भाजपा एकमेकांशी संबंधित आहे असे म्हटले तर लगेच संघी मंडळी तावातावाने आमचा काही संबंध नाही असे म्हणत धावून येतात. मग संघाचे विधायक माध्यम कुठल्या स्वरुपाचे आहे? बजरंग दल, विहिंप किंवा दुर्गा वाहिनी यांना मी विधायक माध्यम मानत नाही. वनवासी कल्याण आश्रम हे एकमेव उदाहरण दिसते. पण अशा स्वरुपाचे कार्य करणाऱ्या महाराष्ट्रात अनेक संघटना आहेत. शिवाय हे विधायक कार्य करण्यासाठी त्यांना हिंदू-मुस्लिम अशा ध्रुवीकरणाची गरजही भासत नाही.
हो या मुद्द्यांवर चर्चा करण्यात मला रस नाही. संघ मुसलमान विरोधी आहे का या उपचर्चेत माहिती देण्याचा माझा प्रयत्न होता.
भारत माता की जय!
- Log in or register to post comments
S
sagarpdy
Mon, 03/21/2016 - 18:20
नवीन
विविध नैसर्गिक आपत्तिंच्या काळात संघ स्वयंसेवकांनी केलेली मदत विसरणे अयोग्य ठरेल.
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
Mon, 03/21/2016 - 18:59
नवीन
विविध नैसर्गिक आपत्तीच्या काळात हाफिज सैय्यदही पाकिस्तानात मदत करतो.
- Log in or register to post comments
व
विकास
Wed, 03/23/2016 - 20:32
नवीन
'मुसलमानांना हाकला' म्हणणारे गोळवलकर हे द्रष्टे होते असे म्हणतात
नक्की कुठे म्हणले आहे?
"... We are not so mean as to say that with a mere change in the method of worship, an individual ceases to be a son of the soil. We have no objection to God being called by any name whatever. We, in the Sangh, are Hindus to the core. That is why we have respect for all faiths and religious beliefs. He cannot be a Hindu at all who is intolerant of other faith..." (संदर्भः Bunch of Thoughts)
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Tue, 03/22/2016 - 04:02
नवीन
असा साधा सरळ अर्थ आहे. मला वाटतं आपण तो राष्ट्रद्रोही या नकारात्मक अर्थाने घेतला असावा.
तुम्ही माझाच मुद्दा मांडताय, आणि हे बरोबर आहे कारण केवळ धर्म समान आहे म्हणून हे भाग एकत्र आणले गेले आणि त्यांना लष्कराच्या जोरावर एकत्र ठेवायचा प्रयत्न केला गेला. भौगोलिक अंतर (पश्चिम आणि पूर्व पाकिस्तानमधलं) हाही एक मुद्दा होताच. शेख मुजीबूर रहमान यांच्या अवामी लीगने लोकशाही मार्गाने जिंकलेल्या बहुमताला नाकारण्यात आलं आणि त्यावरून बांगलादेश मुक्तिसंग्राम सुरु झाला. त्याच वेळी भारतात असं काही झालं नाही - कारण लोकशाही आणि स्वतःची भाषा बोलण्याचं आणि तिचं संवर्धन करण्याचं स्वातंत्र्य.
देश - एक भूभाग. राष्ट्र - एक सामायिक संस्कृती. त्या अर्थाने मुस्लिम अराष्ट्रीय आहेत. त्यामुळे लोकशाहीशिवाय
दुस-या कोणत्याही राज्यव्यवस्थेत ते सुरक्षित राहू शकणार नाहीत. त्यामुळेच ज्या मुस्लिम देशांमध्ये एकतंत्री राज्यसत्ता आहे (बहुतेक सगळेच) ते यादवी युद्धाला बळी पडले किंवा अस्थिर झाले. तुर्कस्तान आणि इराणसारखे देश तरीही ब-यापैकी प्रगती करु शकले कारण थोडीफार लोकशाही तिथे आहे.
- Log in or register to post comments
D
DEADPOOL
Wed, 03/23/2016 - 12:13
नवीन
'हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रीची इच्छा'
असे म्हणणारे छत्रपती हिंदूच होते ना!
आणि त्यांच्या स्वराज्यात सगळ्याना सारखीच वागणूक मिळाली!
- Log in or register to post comments
S
sagarpdy
Fri, 03/18/2016 - 18:18
नवीन
धन्स. पुस्तके मीळवायचे बघतो. हे मुद्दे कधी मांडले गेले होते, त्यांचा आजच्या संघकार्यावर कितपत आणि कशा प्रकारचा प्रभाव आहे याबद्दल माहिती असल्यास जाणून घेण्यास आवडेल.
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
Fri, 03/18/2016 - 18:55
नवीन
या विचारांचा आजच्या संघकार्यावर कितपत प्रभाव आहे याविषयी सद्यकालीन स्वयंसेवकांनीच लिहावे.
उदा.
हे मत खाली 'आपला नम्र गा.पै.' यांनी मांडले आहे. त्यावरुन सद्यस्वयंसेवकांना अजूनही हे विचार योग्य वाटतात असे प्रथमदर्शनी मत होते आहे.
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
गुरुवार, 03/17/2016 - 16:50
नवीन
कै च्या कै! मुस्लिमांचे नक्की काय प्रॉब्लेम्स आहेत माहित नाही, पण घटनेने सर्वांना समान अधिकार दिले आहेत. संघ काय म्हणतो ह्याचा काही संबंधच नाही.
देशविघातक कारवायांमध्ये दहशतवादी म्हणुन असणारे मुसल्मानांचे लक्षणीय प्रमाण मुस्लिम द्वेषाचा फार मोठे कारण असावे. हा धर्म माणसाच्या मतांवर फार मोठा पगडा ठेवुन आहे. इतर धर्मियांशी सामोपचाराने घेणे ह्यांच्या धर्मात मान्य नाही. मौलवीच फतवे काढुन समाजाची दिशाभुल करताना दिसतात. ह्या फतव्यांना फारसा विरोध होताना दिसत नाही. चार बायका, खंडीभर पोरं हा ह्यांच्या संस्कृतीचा भाग आहे. हिंदु मुले शक्यतो सर्वसाधारण शाळांमध्येच शिकताना दिसतात, मदरसे हा प्रकार मुस्लिमांमध्येच आहे.
अता ह्या परिस्थिती मध्ये इतरांनी काय प्रयत्न कराय्चेत मुख्य प्रवाहात आणायला हे समजले नाही.
हिंदुंची मेजोरिटी असुनही जिथे अल्पसंख्याकांना महत्व दिले जाते, कायदे वेगळे बनवले जातात, ज्या झपाट्याने संख्या वाढवली जातेय, ते बघता मुस्लिमांना इथे उपरे समजले जाते हा जोक आहे. बहुसंख्य हिंदु असुनही त्याचा निधर्मी देशात काय फायदा आहे? अल्पसंख्याक म्हणुन किमान फायदे तरी आहेत.
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
गुरुवार, 03/17/2016 - 16:59
नवीन
वरील प्रतिसादात भारतीय मुस्लिमांबद्दलचे नेहमीचे गैरसमज आहेत.
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
गुरुवार, 03/17/2016 - 17:07
नवीन
आणि तुम्ही जे लिहीलय ते मात्र संशोधन करुन मांडलेले सत्य आहे ना?
बाकी मी माझी निरीक्षणेच मांडली आहेत. फतवे, मदरसे, चार लग्नं आणि त्यातुन खुप अपत्ये, धर्माचा पगडा हे गैरसमज कसे ते ही सांगा. आणि संघ गेला चुलीत, घटनेने कधी मुस्लिमांना उपरे वागवले तेही सांगा.
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
गुरुवार, 03/17/2016 - 21:38
नवीन
१. चार बायका.
एकापेक्षा अधिक बायका असण्याचे प्रमाण
१९६१ च्या सर्वे नुसार (सर्व आकडे %)
मुस्लिमः ५.७ | हिंदु: ५.८ | बुद्धीस्ट: ७.९ | जैनः ६.७ | आदीवासी: १५.२५
तृतीय राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणानुसार, २००६
मुस्लिमः २.५५ | हिंदु: १.७७ | बुद्धीस्टः ३.४१ | क्रिश्चनः २.३५
संदर्भः
http://scroll.in/article/669083/muslim-women-and-the-surprising-facts-about-polygamy-in-india
http://paa2010.princeton.edu/papers/100754
२. ढिगभर मुले:
मुस्लिमांमधला एकूण प्रजजनदर हिंदूंच्या प्रजननदरापेक्षा वेगाने कमी होत आहे.
(NFHS) 1 (1992-93): मुस्लिमः ४.४ | हिंदू: ३.३
NFHS 2 (1998-99): मुस्लिमः ३.५९ | हिंदु: २.७८
NFHS 3 (2005-06): मुस्लिमः ३.१ | हिंदू: २.७
संदर्भः
http://indianexpress.com/article/explained/population-growth-slowing-for-all-on-sex-ratio-muslims-better-than-hindus/#sthash.stN2IlgS.dpuf
http://factchecker.in/the-myth-of-indias-muslim-population-rise/
मुस्लिमांमधे स्त्री-पुरुष गुणोत्तर >> २००१: ९३६ | २०११: ९५१
हिंदूंमधे स्त्री-पुरुष गुणोत्तर>> २००१: ९३१ | २०११: ९३९
(हिंदूंप्रमाणे मुस्लिमांमधे मुलीला गर्भातच मारण्याचे प्रकार नाहीत. तसेच मुस्लिमांमधे जास्त मुले होण्याचे कारण एकापेक्षा जास्त बायका नसून मुलींचे लवकर लग्न करणे, गर्भनिरोधके न वापरणे हे आहे. )
संदर्भः
http://indianexpress.com/article/explained/population-growth-slowing-for-all-on-sex-ratio-muslims-better-than-hindus/#sthash.stN2IlgS.dpuf
http://factchecker.in/the-myth-of-indias-muslim-population-rise/
३. शिक्षण
मदरसात शिक्षण घेणारे विद्यार्थी >> एकूण मुस्लिम विद्यार्थ्यांपैकी फक्त ३%
उच्चशिक्षण घेण्याचे प्रमाण>> मुस्लिम ११% | हिंदू २०% | क्रिस्चन ३१%
साक्षरतेचे प्रमाण, २००१ >>
पुरुषः मुस्लिम ५५% | गैरमुस्लिम ६४.५ %
स्त्रिया: मुस्लिम ४१% | गैरमुस्लिम ४६%
पदवीधर होण्याचे प्रमाण >> मुस्लिम ४% | सार्वत्रिक ६%
४. फतवा
मिडीयामधून नेहमी वाईट बातम्या येत राहिल्याने फतवा म्हणजे विकृत घोषणा असावी असा समज होत राहिला आहे. प्रत्यक्षात फतवा म्हणजे मुस्लिम धर्मगुरुंचे एखाद्या विषयावरचे धार्मिक ग्रंथाधारित मत. असे कोणत्याही बाबतीत धार्मिक व्यक्त करण्याचा अधिकार धर्मगुरूंना असला तरी सर्व मुस्लिमांनी हे फतवे मानलेच पाहिजेत असे बंधनकारक नसते. कैक फतवे तर मजेदाररित्या एकमेकांच्या प्रचंड विरोधातही असतात.
फतवा टैपचे हिंदू जातपंचायतींचेही निर्णय असतात. पण ते बंधनकारक असतातच. ह्यात काही गंभिर बातम्या एवढ्यात माध्यमांमधून येऊ लागल्या आहेत. विद्यमान भाजप सरकार त्याविरोधात कायदा करण्याच्या तयारीत आहे ह्यावरुन प्रश्न गंभीर व खरा आहे हे समजण्यास हरकत नसावी.
७०,००० मौलवींनी आयसिस व इतर दहशतवादी संघटनांविरुद्ध फतवा जाहीर केला आहे. सुमारे पंधरा लाख मुस्लिमांनी ह्या फतव्याला आपले समर्थन दिले आहे.
५. धार्मिक पगडा तर सर्वच धर्मांमधे आहे. आपल्या धर्माच्या बाहेरचं दुसर्याचं वर्तन आपल्याला धार्मिक पगडा वाटतं. बरेच मुस्लिम दाढी ठेवतात, धार्मिक पारंपरिक वेश करतात, सण-उत्सव साजरे करतात. असंच भारतातले इतर धार्मिकही करतात. भारतात सगळेच धार्मिक पगड्याचे शिकार आहेत. काही कॉस्मोपोलिटन शहरे, नागरी वस्त्या सोडल्या तर ८० टक्क्याच्यावर देशात धार्मिक, पारंपारिक प्रथांचा पगडा आहे. ह्यात बालविवाह, जातपंचायती, इत्यादी प्रकार सर्व जातीधर्मात होतात. मंदिरांमधे वाढत चाललेली सुशिक्षितांची गर्दी हे धार्मिक पगड्याचेच लक्षण आहे.
मुस्लिमांबद्दल बर्याच गोष्टी फुगवून रंगवून सांगितल्या जातात. त्यातून समजूती घट्ट बनत जातात. मुस्लिमांमधे अगदी सगळे ऑल्वेल, खाऊन पिऊन मजा करतायत असं काहीही नाही. पण प्रत्येक मुस्लिम घरात कुराणावर हात ठेवून जिहादच्या शपथा रोज घेतल्या जातात, पोटाला बाँब लावायची प्रेक्टीस केली जाते, निव्वळ पोरांची पैदास करण्याचे कार्यक्रम अव्याहत चालू असतात असे नव्हे. समस्या आहेत पण त्या इतक्या भयावह नाहीत जेवढ्या प्रोजेक्ट केल्या जातात. मुस्लिम अगदी तुमच्या कल्पनेतल्या प्रमाणे असते तर वरच्या आकडेवारीत दिसलेच नसते. माझ्यालेखी भले नॉर्मलपेक्षा १०-२० टक्क्यांनी मुस्लिम मागे असतील पण मागे असले तरी चालत आहेत हे चित्र जास्त आशादायक वाटते.
- Log in or register to post comments
स
साहना
Fri, 03/18/2016 - 03:08
नवीन
ह्या आकड्यांत सुद्धा नेहमीचा गोंधळ आहे. बहुपत्नी लोकांचे पाहूया. बहुपत्नी असेलेले लोक हिंदू समाजांत जास्त आहेत हा गैर समाज आणि धांदात खोत आकडा मुस्लिम लोक पसरवत आहेत. ह्या आकड्याचा उगम "Conversion to Islam" ह्या मुहाजिद ह्यांच्या पुस्तकाने पोपुलर केला आहे. पण त्याच पुस्तकांत लेखकाने हे स्पष्ट केले आहे कि ह्या आकड्या साठी हिंदूमध्ये आदिवासी, बौद्ध आणि जैन लोकांचा समावेश केला असून बहुपत्नी लोकांचे प्रमाण ह्या तीन घटकांत कित्येक पटींनी जास्त आहे. तसेच हे आकडे १९६१ च्या सेन्सस मधील असून ह्यात लग्ने त्या पेक्षा सुद्धा जुनी आहेत. मुस्लिम लोकांना ४ बायका कायद्याने ठेवता येतात पण हिंदुना नाही हा माझ्या मते प्रमुख मुद्दा आहे.
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Fri, 03/18/2016 - 06:53
नवीन
१. चार बायका.
The Hindu Marriage Act of 1955 It is illegal for a man to have more than one wife.
असा कायदा मुस्लिमांसाठी नाही. तसेच घटस्फोटाचेही कायदे वेगळे आहेत. मला वाटते की नवर्याने नुसते तलाक म्हणणे पुरेसे आहे. तसा काही हक्क बायकांना नाही. त्यामुळे बायकांची परिस्थिती मुस्लिमांअम्ध्ये जास्त बिकट आहे. मुद्दा इतकाच आहे.
२. ढिगभर मुले:
घ्या माझी पण एक लिंक - मुद्दामच मी वर्तमानपत्रांच्या लिंक्स घेत नाही. कारण माझा त्यांच्या बातमीवर विश्वास नसतो. चांगली असो वा वाईट.
https://en.wikipedia.org/wiki/Muslim_population_growth#India
Islam is the fastest-growing religion in India.[14] The ratio of young children (age 0–6) to the total population is also significantly higher among Muslims than Hindus in India.[15][16] Demographers have put forward several factors behind high birthrates among Muslims in India. Sociologists point out that religious factors can explain high Muslim birthrates. Surveys indicate that Muslims in India have been relatively far less willing to adopt family planning measures and that Indian Muslim girls get married at a much younger age compared to non-Muslim girls.[17] According to Paul Kurtz, Muslims in India are much more resistant to modern contraceptive measures compared to other Indians and, as a consequence, the decline in fertility rate among non-Muslim women is much higher compared to that of Muslim women.[18][19] According to a 2006 committee appointed by the Indian Prime Minister Manmohan Singh, if the current trend continues, by the end of the 21st century India's Muslim population will reach 320 to 340 million people (or 18–19% of India's total projected population).[20] Islam is the second-largest religion in India, making up 14.9% of the country's population with about 180 million adherents (2011 census).[21][22] India has the second largest population of Muslims, after Indonesia.[23]
३. मदरसे
मला ह्यात % मध्ये पडायचं नाहीये कारण मी म्हणतच नाहीये की "सर्व" मुलं मदरशांमध्ये जातात. माझा मुद्दा हा मुस्लिमांकडे मुलांना शिक्षणासाठी मदरशांमध्ये पाठवायची पद्धत आहे. ३% लोक जातातही. मग उरलेले जर सर्वसाधारण शाळांमध्ये शिकत असतील तर "इतर मुलांसोबत" शाळेत पाठवायचा मुद्दा उद्भवायला नाही पाहिजे.
४. फतवा
मी तरी अनेक फतवे वाचत असते बायकांविरुद्ध. ते असे काढु शकतात ह्याचे मला नवल वाटते. माझा खाप पंचायतीलाही विरोधच आहे. त्यांचे ऐकणार्यांचेही मला नवलच वाटते. मला फारशी % वारी सापडली नाही की साधारण किती लोक ह्यांच्यानुसार (खाप / फतवे) वागतात. जर लोक ऐकत नसतील आणि जे योग्य आहे तेच होत असेल तर आनंदच आहे.
५. हओ अर्थातच कट्टर हिंदु आहेतच. पण हिंदु धर्मात अर्थातच खुप स्वातंत्र्य आहे. देव मानणे न मानणे पासुन ते रुढी/प्रथांपर्यंत. इतर धर्मांसोबत कसे वागावे ह्या बद्दल हिंदुचे धोरण सहिष्णुच आहे. कधी कुणाची प्रार्थनास्थळे / ग्रंथ इ हिंदु धर्मियांनी उद्ध्वस्त केल्याचे ऐकिवात नाही. आहेच हिंदु धर्म जास्त लिबरल. त्याचे क्रेडिट द्यायला हरकत नसावी.
पण मी अनेकदा हे वाचलेले आहे की कुराणात इतरांना काफिर का काय म्हणणे इ आहे. भले मुठवर लोक असतील पण त्यांच्या समजुतींचे उपद्रवमुल्य खुप आहेच. ते ही मान्य करायला हरकत नसावी.
मुळात मला मुस्लिम किती वाईट आहे हे म्हणायचे नाहीच. मी सरसकटीकरणाच्या विरोधातच आहे. मी ओवेसी बद्दलही चार शब्द चांगलेच बोलले आहे. संघाला प्रसंगी २ वाईटही बोललेले आहे.
माझा आक्षेप हा तुम्ही संघाच्या नावाने वर केलेल्या विधानांना होता. मुळात संघ असे काही म्हणतच नाही. तुम्हाला चार दोन माणसे भेटली म्हणजे ती संघाची अधिकॄत भुमिका होत नाही. शिवाय घटनेने मुस्लिमांना तेवढेच हक्क दिले आहेत जेवढे हिंदुंना. त्यांची धार्मिक मते जपण्याचा तर आटोकाट प्रयत्न राजकीय पक्ष करतात. त्यांच्या समाजात जे दोष आहेत तयंचे खापर हिंदुंच्या माथी का?
आपल्याला समान अधिकार आहेत हे सांगावे लागते??? कमाल आहे. जो देश मेजोरिटी हिंदु असुनही स्वत:ला निधर्मी घोषित करतो तो देश मुस्लिमांचाही आहे हे सांगावे लागते?? अहो लोक काय म्हणतात सोडा हो.. संविधान काय म्हणते हे समजायला ओवेसी का लागतो?
तेढ कमी व्हावी ही सर्वांचीच इच्छा असेल. पण तुम्ही संघाविषयी बिनबुडाची विधाने करुन फार काही वेगळे करत नाही आहात.
- Log in or register to post comments
य
यमगर्निकर
Fri, 03/18/2016 - 08:26
नवीन
अगदि माझ्या मनातले बोललत, ह्या लोकांच्या अश्या भंगार चालिरिति व मानसिकतेमुळे भारतच काय सर्व जगातिल लोक ह्यांच्यवर थुंकतात, आणि इथे येउन त्याचे खापर संघाच्या डोक्यावर फोडु पहाताहेत, खरोखरच कमाल आहे ह्यालोकांचि.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Fri, 03/18/2016 - 09:39
नवीन
१००% सहमत!
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Fri, 03/18/2016 - 11:51
नवीन
मी तुमच्या प्रतिसादातल्या मुस्लिमांबद्दलच्या गैरसमजांबद्दल पुरावे दिले तर ते आपण सपशेल नाकारत आहात.
१. चार बायका, खंडीभर पोरं हा ह्यांच्या संस्कृतीचा भाग आहे हे तुमच्या प्रतिसादातलं वाक्य आहे. ह्या बद्दल पुरावा दिला तर तुम्ही नेहमीचं बायका करण्याची कायद्याने परवानगी आहे हे बोललात. 'कायद्याने परवानगी आहे' हे 'संस्कृतीच्या भागा'त कसं बसतं ते कळलं नाही. एकापेक्षा जास्त बायका असणार्या पुरुषांचे प्रमाण सरकारी आकड्यानुसार दिले आहे. कुठल्या वृत्तपत्राची बातमी नाही. 'चार बायका करतात' हे सरसकटीकरण करण्यासाठी किमान ५१ टक्के मुस्लिम पुरुषांच्या एकापेक्षा जास्त किंवा चार बायका असने आवश्यक आहे. खरेतर सरसकटीकरण करु शकत नाही, फारतर बहुसंख्य म्हणू शकाल. पण तीही सवलत आकडेवारी देत नाही. इथे कायद्याने परवानगी नसून हिंदूंमधेही एकापेक्षा जास्त बायका असण्याचे पुरावे आहेत. तोही संस्कृतीचा भाग म्हणायला हरकत नसावी. खंडीभर पोरं ह्याबद्दल तुम्ही विकिवरचा लेखातलं गरजेपुरतं पेस्ट केलंत. आकडेवारी जास्त बोलकी आणि स्पष्ट आहे. ही आकडेवारीही सरकारी आहे. वृत्तपत्रातली बातमी नाही. मुस्लिमांचा प्रजननदर हिंदूंपेक्षा जास्त असण्याचे कारणही मीच माझ्या प्रतिसादात दिले आहे. तेच वेगळ्या शब्दात इंग्रजीत बोल्ड करुन तुम्ही पेस्ट केलंत.
साहना यांनी २००६ चे आकडे जाणीवपूर्वक बघितले नाहीत तेही आहेच.
२. हिंदु मुले शक्यतो सर्वसाधारण शाळांमध्येच शिकताना दिसतात, मदरसे हा प्रकार मुस्लिमांमध्येच आहे.
मला ह्यात % मध्ये पडायचं नाहीये कारण मी म्हणतच नाहीये की "सर्व" मुलं मदरशांमध्ये जातात. माझा मुद्दा हा मुस्लिमांकडे मुलांना शिक्षणासाठी मदरशांमध्ये पाठवायची पद्धत आहे. ३% लोक जातातही. मग उरलेले जर सर्वसाधारण शाळांमध्ये शिकत असतील तर "इतर मुलांसोबत" शाळेत पाठवायचा मुद्दा उद्भवायला नाही पाहिजे.
>> मदरसे हा प्रकार मुस्लिमांमधे नाहीच असे मी कुठे म्हणालो, पण तुमच्या विधानाचा अर्थ सर्वसाधारणपणे मुस्लिम मुले मदरश्यात जाता असा निघतो. शब्दांची आलटपालट करुन आपण असे म्हणलोच नाही असे तुम्ही म्हणू शकता. ३ टक्के प्रमाण ही पद्धत म्हणू शकता येईल काय? उरलेले सगळे कुठे आणि काय शिकतायत ते आकडेवारीत आहे. अल्पसख्यांकाच्या स्वत:च्या शाळा आहेत. मुस्लिमांच्याही आहेत. त्या शासकिय मान्यताप्राप्त आहेत. त्या मुस्लिमांच्या शाळा असल्या म्हणून मदरसे म्हणायचे नसते. मदरसे वेगळे, शाळा वेगळ्या. मदरसे हे पाठशाळांप्रमाणे आहेत, त्यांना कायदेशीर शैक्षणिक मान्यता नाही. तुम्ही इथे पद्धत शब्द वापरुन जणू सर्व मुस्लिम मदरशांमधे धाडले जातात अशा अर्थाचे विधान केले.
इतर मुलांसोबत पाठवण्याचा मुद्दा फार सरळ आहे. मुस्लिम मुले अल्पसंख्यांकाच्या शाळांमधे शिकतात. त्यांना सर्वसामान्य शाळांमधे इतर मुलांसोबत शिकावे असे माझे मत आहे. अल्पसंख्यांकाच्या शाळा हा प्रकारच घटनेद्वारे असला तरी अतिशय चुकीचा आहे हे माझे मत आहे. सकल समाजाच्या एकजिनसीपनाला घातक आहे.
३. मौलवीच फतवे काढुन समाजाची दिशाभुल करताना दिसतात. ह्या फतव्यांना फारसा विरोध होताना दिसत नाही.
फतवे आणि त्यामागचे सत्य सांगितल्यावर इथेही तुम्ही घुमजाव करत आहात. तुम्ही बायकांविरुद्धचे फतवे नेहमी वाचता, विरोध होत नाही हेही म्हणता परत वृत्तपत्रातल्या बातम्यांवर खर्या खोट्या असल्यातरी विश्वास ठेवत नाही असे म्हणता. तुमचेही फतव्यांबद्दलचे मत हे वृत्तपत्रांतून येणार्या बातम्याम्वर आधारलेले आहे असे दिसते.
४. बर्याच भारतीयांचे भारतीय मुस्लिमांबद्दलचे मत हे जागतिक माध्यमांतून येणार्या बातम्यांवर आधारलेले आहे असे दिसते. भारतीय मुस्लिमांमधे समस्या नाहीतच असे मी म्हनत नाही. पण दहशतवाद, कट्टरता, धार्मिक दंगे ह्यातुन एकांगी चित्र मनात बसवलं जाते व तेच तुमच्या मुळ प्रतिसादात दिसून येते.
माझा आक्षेप हा तुम्ही संघाच्या नावाने वर केलेल्या विधानांना होता. मुळात संघ असे काही म्हणतच नाही. तुम्हाला चार दोन माणसे भेटली म्हणजे ती संघाची अधिकॄत भुमिका होत नाही. शिवाय घटनेने मुस्लिमांना तेवढेच हक्क दिले आहेत जेवढे हिंदुंना. त्यांची धार्मिक मते जपण्याचा तर आटोकाट प्रयत्न राजकीय पक्ष करतात. त्यांच्या समाजात जे दोष आहेत तयंचे खापर हिंदुंच्या माथी का?
>> चला, एक मान्य करु की मी संघाच्या नावाने खोटी, बिनबुडाची विधाने केली. ठिक आहे. पण त्यांच्या समाजात जे दोष आहेत त्यांचे खापर हिंदूंच्या माथी फोडल्याचं माझ्या प्रतिसादात मी लिहिलेलं नाही. असे कुठे दिसले?
आपल्याला समान अधिकार आहेत हे सांगावे लागते??? कमाल आहे. जो देश मेजोरिटी हिंदु असुनही स्वत:ला निधर्मी घोषित करतो तो देश मुस्लिमांचाही आहे हे सांगावे लागते?? अहो लोक काय म्हणतात सोडा हो.. संविधान काय म्हणते हे समजायला ओवेसी का लागतो?
>> असे का सांगावे लागते हे आधीच्या प्रतिसादात आले आहे.
तुम्ही दोन-तीन वेगवेगळ्या मुद्यांची सरमिसळ करत आहात. मुस्लिमांची स्वतःची सामाजिक अवस्था, कायद्याने दिलेले अधिकार, सामाजिक ओळख ह्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एकमेकांवर आधरलेल्या असल्या तरी.
जर कायद्याने मुस्लिमांना चार बायकांची खुली परवानगी दिली आहे तर प्रत्येक मुस्लिम पुरुषाला चार बायका असायला हव्या, ढिगभर मुले असायला हवी, ते शिकत नाहीत तर त्यांच्यातून डॉक्टर, इन्जिनियर, इत्यादी उच्चशिक्षित यायलाच नको. लाखो मुस्लिम मुली रितसर शाळांमधे जाऊन शिक्षण घेत आहेत ते दिसायलाच नको. कायद्याने तर भरपुर दिले आहे, हिंदू पण अजिबात त्रास देत नाहीत. तरी मुस्लिम हे कट्टर धार्मिक असल्यामुळे ठार वाया गेलेले आहेत असा एक सूर तुमच्या प्रतिसादात दिसला. तो चुकीचा आहे ह्यासाठी आकडेवारी दिली. बाकी तुमची इच्छा.
ओवेसी आणि संघ यांचे नेहमीचे वाद हे सगळे मुस्लिम विरूद्ध सगळे हिंदू असे नाहीयेत. माझ्या प्रतिसादातुन तुमचा असा समज झाला असेल तर तो चूक आहे असे समजावे.
- Log in or register to post comments
भ
भंकस बाबा
Fri, 03/18/2016 - 14:02
नवीन
चुकीचे विधान आहे हे,
इथे मदर्शात जातात हे धार्मिक शिक्षण घ्यायला जातात असे घेतले पाहिजे.
मुस्लिमबहुल वस्तीत मदरशे पावलापावलावर असतात अशा ठिकाणी जाण्याचे प्रमाण पुष्कळ असते.
जेव्हा मदरसा घराजवळ नसतो तेव्हा मुस्लिम मौलवीना आपल्या घरी बोलवतो.
यात कुराणाचा अर्थ, अरबी, हदिसचि तत्वे शिकवली जातात. यातून पण कट्टरता जोपासलि जाते.
जन्नत मधे फ़क्त अरबी बोलली जाते त्यामुळे अरबी येणे आवश्यक आहे हे मुस्लिम जनतेच्या मनावर ठसवले जाते.
मुस्लिम वस्तीत जनगणना करणार्याचे अनुभव भयानक असतात. एकतर फक्त स्त्री कर्मचारीला प्रवेश मिळतो. शिवाय घरातील कर्ता पुरुष सांगेल तसच सांगायचे बंधन असते. यात मग मदरशातले शिक्षण लपवले जाते. हिन्दुबहुल वस्तीत मुस्लिम धार्मिक शिक्षण घेतात ही बाब लपवतात.
ओवेसी बद्दल काय लिहायचे? शब्दाचे अलंकार वापरून कोणी आपला मूळ उद्देश् लपवत असेल आणि आपले विद्वान मिपाकर(काही) त्याला बुद्धिमान मानत असतील तर मग त्याने फ़क्त संसदेत वा बहुसंख्यक समाजापुढे केलेल्या भाषणावर जाऊ नका. त्याची यू ट्यूब वर बरीच भाषणे मुस्लिम समाजापुढे केलेली आहेत ती उपलब्ध आहेत. ती बघा आणि विचार मांडा. हा माणूस सरडयासारखा आहे, परिस्थिति बघुन रंग बदलतो. इशरत जहां व् हिमायत बेगचे समर्थन त्याचे बेगडी संविधान प्रेम उघड करते.
मुस्लिमाचा द्वेष इथे मला करायचा नाही आहे पण त्यांची धर्मांधता एक दिवस या देशाला यादवी दाखवणार.
तेव्हा हे सेक्युलर नेते जे आज मुस्लिम लांगुलचालन करत आहेत ते बिळात लपून बसतील.
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Fri, 03/18/2016 - 14:47
नवीन
काही काळजी करु नका. तुमच्या कुठल्याच विधानाला इथे कोणी कसलाच पुरावा मागणार नाही. होउ दे खर्च!
- Log in or register to post comments
भ
भंकस बाबा
Fri, 03/18/2016 - 16:30
नवीन
बीफ खायचे असेल तर आम्हाला मत द्या,
तुम्ही एक बाबरी पाडलित आम्ही शंभर उभारु,
कसली राम जन्मभूमि , कोण गेले होते बघायला,
अशी विद्वत्ता ओसन्डून वाहत आहे. तजो आंघोळ करून घ्या.
बाकी तुम्ही वकील बनायला पाहिजे. जीत पक्की, फ़क्त प्रतिपक्षाचा वकील श्रीगुरुजी नको, नाहीतर होईल काय की तुम्ही अर्धवट केस सोडाल, आणि तुमच अशील राहील बोम्बलत.
मी लिंक जोडू शकत नाही कारण मला ते येत नाही, शिवाय मी हे सर्व मोबाइल वर टायपत आहे. माझा जॉबच असा आहे की फावला वेळ मिळतं नाही. ज्या दिवशी तो मिळेल त्या दिवशी लिंक कशा पेस्टवायच्या शिकुन घेइन. तुमचा आशीर्वाद असावा.
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Sat, 03/19/2016 - 09:46
नवीन
वकिल बनायला हरकत नाही. प्रतिपक्षाचा वकिल स्वतःची मते हेच कायदे असे मानणारा नसला म्हणजे झालं.
- Log in or register to post comments
D
DEADPOOL
Wed, 03/23/2016 - 12:18
नवीन
कारण आपणांस भीती वाटते की पुरावा दिल्यास आपण उघडे पडू!
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Wed, 03/23/2016 - 12:20
नवीन
द्या की पुरावा. कोण भीतो?
- Log in or register to post comments
L
lakhu risbud
Fri, 03/18/2016 - 16:04
नवीन
तजो शेठ,तारेक फ़तह यांच्या या काही मुलाखती शांतपणे बघा आणि त्यानंतर आपण तुमच्या मतांवर चर्चा करू.
- Log in or register to post comments
L
lakhu risbud
Fri, 03/18/2016 - 16:06
नवीन
- Log in or register to post comments
L
lakhu risbud
Fri, 03/18/2016 - 16:10
नवीन
या लिंक्स
https://www.youtube.com/watch?v=z5WBceo0bIg
https://www.youtube.com/watch?v=pgvRdybVOcc
https://www.youtube.com/watch?v=qO_ArwyeB6w
- Log in or register to post comments
L
lakhu risbud
Fri, 03/18/2016 - 16:15
नवीन
https://www.youtube.com/watch?v=SK5IYU-fkRo
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- ›
- »