Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सदाहरित धागा - मनातले प्रश्न..शंका..जिज्ञासा..सल्ला, माहिती- भाग ५

त
तर्राट जोकर
Sun, 05/08/2016 - 19:35
🗣 265 प्रतिसाद
ह्या मालिकेचा चौथा भाग दोनशे प्रतिसाद पार करुन गेल्याने पाचवा भाग. माझा प्रश्नः एखाद्या लेखमालेचे आंतरजालासाठी लेखन करतांना किती शब्दमर्यादा असावी जेणेकरुन ती कंटाळवाणी वाटणार नाही, किंवा 'अरे हे काय संपला पण हा भाग' असे वाटणार नाही? तसेच दोन भागांमधे अंदाजे किती काळाचे अंतर असावे? शब्दमर्यादेचा प्रश्न ह्यासाठी की पीसी-मोबाईलवर वाचतांना अनेक व्यवधाने, व्यत्यय येतात. सलग खूप वेळ मिळणे शक्य नसते. किमान पंधरा मिनिटांत वाचून होईल इतपत भाग असावा असे माझे वैयक्तिक मत. बाकी लेखक-वाचकांच्या अनुभवसिद्ध उत्तरांच्या प्रतिक्षेत.

प्रतिक्रिया द्या
107834 वाचन

💬 प्रतिसाद (265)
प
प्रचेतस Mon, 05/09/2016 - 03:59 नवीन
ते लेखनसापेक्ष आहे. लेखन उत्कृष्ट असेल तर कितीही मोठा भाग असेल तरीही वाचकांना कंटाळवाणे वाटणार नाही. मात्र लेखनातच दम नसेल तर लेख लहान काय किंवा मोठा काय..
  • Log in or register to post comments
त
तर्राट जोकर Mon, 05/09/2016 - 05:54 नवीन
हो. हे बाकी सौ टका खरंच. मी थोडंसं टेक्निकली थिंकत होतो उगाच. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
पिशी अबोली Tue, 05/17/2016 - 20:03 नवीन
सौ टका
:D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
S
sagarpdy Mon, 05/23/2016 - 12:36 नवीन
सौ. टका :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली
ट
टवाळ कार्टा Sat, 06/18/2016 - 17:21 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy
ख
खेडूत Mon, 05/09/2016 - 06:13 नवीन
माझा प्रश्नः जुनी हार्ड डिस्क आहे.चार वर्षे पडून आहे- त्यातले फोटू, आणि अन्य माहिती यू एस बी द्वारे लॅप्टॉप वर घ्यायची आहे. जालावर १५-२० डॉलर्सचे काही उपकरण दाखवत आहेत, ते वापरून थेट पोर्टेबल हार्ड डिस्क करू शकतो म्हणे. हे कुणी केले आहे का?
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Mon, 05/09/2016 - 16:13 नवीन
पुण्यात ४००-५०० रुपयांमध्ये युएसबी कन्वर्टर मिळतो. त्यात आयडीई, साटा ५" व लॅपटॉपची साटा ३.५" हार्डडिस्क जोडून युएसबीने संगणकाला जोडता येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत
त
तुषार काळभोर Mon, 05/09/2016 - 16:15 नवीन
वरती इंचातली साईज अनुक्रमे ३.५ व २.५ इंच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
स
स्वच्छंदी_मनोज Mon, 05/09/2016 - 16:25 नवीन
जुन्या हार्डड्राईव्हला एक्स्टर्नल ड्राईव्ह म्हणून कन्वर्ट करा कींवा पाय सारखे उपकरण वापरून नॅस मधे रुपांतर करा. जर जुनी ड्राईव्ह फार मोठी नसेल तर पहीला पर्याय सोपा आणी मस्त.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत
स
सांरा Fri, 05/27/2016 - 19:47 नवीन
माझा संगणक बिघडला होता तेव्हा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत
अ
अभ्या.. Mon, 05/09/2016 - 07:19 नवीन
Sata to USB or ATPI To USB adapter 350 rs aprox.
  • Log in or register to post comments
आ
आनंदी गोपाळ Tue, 05/24/2016 - 05:39 नवीन
हे पुण्यात नक्की कोणत्या दुकानात मिळते, सांगता येईल काय? व्यनि/खरड केल्यास कृतज्ञ राहीन. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
स
सांरा Fri, 05/27/2016 - 19:46 नवीन
मी स्वतः हि वापरून बघितली आहे... येथे पहा. दुकानात ३००, ४०० देण्यापेक्षा हे स्वस्तात मस्त.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
आ
आनंदी गोपाळ Wed, 06/01/2016 - 10:49 नवीन
अमेझॉन लिंकबद्दल धन्यवाद! माझी जुनी डिस्क साटा न निघता पाटा निघाली. तिच्यासाठी लागणारी बॉक्स पॉवरसप्लायसह ६०० रुपयांत मिळाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सांरा
ख
खेडूत Mon, 05/09/2016 - 10:04 नवीन
धन्यवाद अभ्या.. हे करून बघतो आता.
  • Log in or register to post comments
ज
जेपी Mon, 05/09/2016 - 14:41 नवीन
माझ्याकडे एक जुनी vcr कॅशेट आहे.. त्याला dvd अथवा पेनड्राईव्हात बदलता येते का ?
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Mon, 05/09/2016 - 15:01 नवीन
तुम्हाला स्वतःला हे करायचे असेल तर तुमच्याकडे VCR असायला हवा १) VCR मधे ती कॅसेट पळवा, VCR च output (RF असावं असं मला वाटतय) computer ला जोडलेल्या TV Tuner card la द्या . TV tuner card च्या मदतीने computer वर ते विडीओ साठवा नंतर pen drive / dvd मध्ये टाकू शकता २) बाजारात VCR cassete वरुन dvd बनवणारे व्यावसायिक सापडू शकतील. अर्थात हळूहळू त्यांची संख्या कमी होत जाणार आणि दर वाढत जातील हे गृहीत धरा. जुने मोठे फोटो लॅब्स, विडिओ शूटींग करणारे, टीवी VCR चे ग्रे मार्केट (उदा: पिंपरी) अशा ठिकाणी/या लोकांच्या मदतीने शोधल्यास असे व्यावसायिक सापडतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
ज
जेपी Mon, 05/09/2016 - 15:08 नवीन
सविस्तर उत्तरासाठी धन्यवाद..मकले.. आताच एकाशी बोलण झाल..700 रु.. dvd करुन मिळेल अस एकाने सांगितल..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
म
मराठी कथालेखक Mon, 05/09/2016 - 15:21 नवीन
अजुन शोधाशोध करा, थोडी घासाघीस करुन बघा, पण महत्वाचे विडिओ असतील तर फार लांबणीवर नका टाकू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
र
रेवती Wed, 05/11/2016 - 02:37 नवीन
धन्यवाद, लक्षात ठेवते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
ल
लालगरूड Mon, 05/09/2016 - 15:28 नवीन
मिपावर लेखाला like dislike चा पर्याय असावा फक्त आयडीसाठी
  • Log in or register to post comments
भ
भाते Mon, 05/09/2016 - 17:07 नवीन
स्वारगेट बस स्थानकापासून चितळे बंधू मिठाईवाले दुकानापर्यंत जायला मार्गदर्शन हवे आहे. कोल्हापुर स्थानकापासुन रंकाळा तलावापर्यंत जायला मार्गदर्शन हवे आहे. दादर स्थानकापासुन शिवाजी पार्कपर्यंत जायला मार्गदर्शन हवे आहे. बायको माहेरी गेली आहे. वरणभाताचा कुकर लावायला मदत हवी आहे. शर्टाचे बटण तुटले आहे. सुईत दोरा ओवायला मदत हवी आहे. मुलीची गृहपाठाची वही घरातच हरवली आहे. शोधायला, अर्थातच, मदत हवी आहे. मिपाकर या शंकांचे निरसन करतील याची खात्री आहे. मिपावर येणारे पुढील धागे :) मिपाच्या सध्याच्या प्रथेप्रमाणे प्रत्येकासाठी वेगळा एकोळी धागा काढू का?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 05/09/2016 - 18:30 नवीन
प्रत्येक प्रश्र्नासाठी वेगळा धागा काढल्यास उत्तम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाते
ख
खटासि खट गुरुवार, 05/12/2016 - 06:36 नवीन
स्वारगेटला पोलीस चौकी आहे. तिथे जाऊन चितळेंच्या दुकानात मोठी ऑर्डर द्यायची आहे. आपण मला दुकानात नेउन सोडल्यास कमिशन देऊ असे सांगावे. स्वतःच्या गाडीने सोडतील. नंतर पाव किलो पेढे घ्यावेत आणि त्याचे एक टक्का कमिशन द्यावे. बसचा खर्च अधिक मारदर्शन फी यापेक्षा ते स्वस्तच पडल्याचे लक्षात येईल. या सल्ल्याचे रूपये दोनशे पाठवून द्यावेत ही नम्र विनंती. तशी आमची फीज करोडो मधे असते, परंतु प्रश्नांचे स्वरूप पाहून आकारली आहे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाते
म
मराठी कथालेखक Tue, 05/10/2016 - 09:54 नवीन
एक नवीन कथा लिहण्याकरिता स्त्रीवंध्यत्वाविषयी काही माहीती हवी आहे. कथेतील तपशील चुकू नयेत म्हणून जाणकाराकडून अप्लसे मार्गदर्शन हवे आहे. कुणी आहे का ?
  • Log in or register to post comments
त
तर्राट जोकर Tue, 05/10/2016 - 09:59 नवीन
काडी...? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
म
मराठी कथालेखक Tue, 05/10/2016 - 11:15 नवीन
नाही हो.. खरेच कथा लिहायची आहे. कथानक मनात तयार आहे पण तपशीलात चूक नको म्हणून केवळ थोडं ताडून घ्यायचं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
स
सुबोध खरे Tue, 05/10/2016 - 13:25 नवीन
Ring me up on 9819170049
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
म
मराठी कथालेखक Wed, 05/11/2016 - 11:27 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ए
एकुलता एक डॉन Tue, 05/10/2016 - 10:22 नवीन
मुक्तपीठ वर लेख कसा पाठवावा ?
  • Log in or register to post comments
ख
खेडूत Tue, 05/10/2016 - 13:32 नवीन
बहुधा सकाळ च्या मुक्तपीठाबद्दल विचारताय? थेट चौकशी करा: संपादकः Contact No. – +91 20 24405500 Fax No. - +91 20 24450583 Email – webeditor@esakal.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एकुलता एक डॉन
ए
एकुलता एक डॉन Wed, 05/11/2016 - 01:28 नवीन
प्रतिसाद नाही मिळणार सदर संपर्क क्रमाक व ईमेल एकाहून जास्त गोष्टींसाठी वापरण्यात येतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत
स
सुयोग पुणे गुरुवार, 05/12/2016 - 06:25 नवीन
मदत हवी आहे..
  • Log in or register to post comments
ग
गोंडस बाळ Sat, 05/14/2016 - 04:53 नवीन
मासिकासाठी ISSN क्रमांक कसा मिळवायचा? कुणी त्याची प्रक्रिया सांगेल का?
  • Log in or register to post comments
ए
एकुलता एक डॉन Tue, 05/17/2016 - 19:39 नवीन
गुटखा मुक्ती साठी काय करावे? हर्बल किवा आयुर्वेदिक गुटखा असा काही उपाय आहे का ?
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Tue, 05/17/2016 - 19:47 नवीन
पिवळ्या रंगाच पासपास म्हणून एक प्रॉडक्ट आहे, त्यात सुपारी ऐवजी खजुराचे तुकडे आणि पानमसाला असतो, त्याने सुटते सवय. नंतर तेही बंद होते. तंबाकू पण सवय असेल तर मुशकील आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एकुलता एक डॉन
ब
बोका-ए-आझम Tue, 05/17/2016 - 20:02 नवीन
त्याने तंबाखू सुटायला मदत होते असं ऐकलेलं आहे. कृपया ते वापरण्याआधी डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा. आणि मुश्किल आहे, पण अशक्य नाही हे लक्षात ठेवावे. एखादी सवय हा आपला problem आहे आणि ती सोडावीशी वाटते आहे - ही ती सवय कायमची सोडण्याच्या प्रक्रियेतली सर्वात महत्वाची पायरी असते हे लक्षात ठेवावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
ए
एकुलता एक डॉन Tue, 05/17/2016 - 20:05 नवीन
majhe manlele bhau ,20 varshe मोठे आहेत ,त्यांना द्याचे आहे गुटखा सुटावे mhanun
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 05/18/2016 - 02:26 नवीन
भायखळा राणीच्या बागेत एक झाड आहे.बारापंधरा फुट उंच आहे.याची पाने थेट चुना लावून तंबाखू चघळल्याची चव देतात.परंतू तंबाखू नव्हे. झाडाच्या पानांचे काही अरेबिक देशांत व्यसन वाढल्यावर तिकडे ब्यान केले आहे.
  • Log in or register to post comments
भ
भाते Wed, 05/18/2016 - 13:12 नवीन
नुकतीच तुनळीवर हि शॉर्ट फिल्म बघितली. ०९:४६ ला भारताच्या तिरंग्यावर इंग्रजीत लिखाण केलेले पाहिले. हे मनाला न पटल्यामुळे विकीवर इथे शोध घेतला. स्पष्टीकरण ५ (एफ) मध्ये लिहिल्याप्रमाणे तिरंग्यावर लिखाण करणे हा तिरंग्याचा अपमान आहे. भारतीय नागरिक म्हणुन मी याच्याविरुद्ध कोणाकडे किंवा कुठे तक्रार करू शकतो?
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Mon, 05/23/2016 - 07:29 नवीन
घरी नवीन वॉटर प्युरीफायर घेतला आहे. त्याची TDS लेव्हल कंपनीच्या माणसाने ३०-३५ इतकी ठेवली आहे. इतकी कमी लेव्हल पिण्याच्या पाण्यासाठी योग्य आहे का ? याबाबतीत जालावर अधिकृत माहिती कुठे मिळाली नाही. काही लोकांचे म्हणणे आहे की ती कमीतकमी १५० असावी. कृपया कुणाला अधिकृत माहिती असल्यास किंवा लिंक असल्यास द्या.
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Mon, 05/23/2016 - 08:56 नवीन
माझ्यामते TDS कमी असणं चांगलंच आहे. Corporation कडून देण्यात येणार्या पाण्याची TDS कमीच असते. नदीच्या वाहत्या पाण्याची ही कमी असावी बहूधा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
च
चिनार Mon, 05/23/2016 - 09:27 नवीन
याच क्षेत्रात काम करत असल्यामुळे सांगू शकतो. TDS लेव्हल १५० पर्यन्त असेल तरी शरीराला काहीही अपाय होत नाही. उलट ३५-४० इतक्या कमी TDS लेव्हलचे पाणी पिउन आपण आपल्या पोटाला तशीच सवय लाऊन ठेवतो. मग बाहेरचे पाणी चालत नाही अशी परिस्थिती येते. शक्य असल्यास TDS लेव्हल १०० पर्यन्त ठेवा. तुमच्या घरी जर महानगर पालिकेचे पाणी येत असेल तर प्युरीफायरची गरज नाही. बोअरचे पाणी असेल तर प्युरीफायर लावावा. खरं सांगायचं तर पाण्यामुळे होणारे पोटाचे विकार TDS नव्हे तर TSS (Total suspended solid ) या मुळे होतात. पण तस कमी करणारे घरगुती प्युरीफायर माझ्या माहितीप्रमाणे बाजारात उपलब्ध नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
स
सस्नेह Mon, 05/23/2016 - 10:42 नवीन
पाणी नगरपालिकेचे आहे. या दिवसात तरी स्वच्छ नसतेच. TDS लेव्हल कमी असल्यामुळे पोटाला सवय लागणे याशिवाय आणखी काही दुष्परिणाम होतात का ? म्हणजे शरीरात सॉल्ट इनटेक कमी होणे वगैरे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार
व
विअर्ड विक्स Mon, 05/23/2016 - 10:34 नवीन
TSS साध्या तलम कपड्याने सुद्धा गाळून वेगळे करता येतात वा तुरटी वापरून !!!!! आजार हे पाण्यातील रोगकारक जीवाणू नि विषाणु मुळे होतात. सर्व पुरिफ़िएर मध्ये ultra filtration असते. ज्याने TSS सुद्धा वेगळे होतात ..
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Mon, 05/23/2016 - 10:43 नवीन
होय. दर एका आठवड्याने त्यातील फिल्टर स्वच्छ करावा लागतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विअर्ड विक्स
व
विअर्ड विक्स Mon, 05/23/2016 - 12:30 नवीन
बरोबर. तो cartridge ( मराठी शब्द ???) फिल्टर . तो मुख्यतः TSS वेगळे करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
ए
एकुलता एक डॉन Mon, 05/23/2016 - 12:18 नवीन
आजकाल बरेच वाचण्यात येत आहे कि पालेभाज्या गटाराच्या पाण्यात उगवतात ,कीटक नाशके टाकून फळे पिकवतात ,टरबूज साठी अनैसर्गिक रसायने वापरतात निदान पुण्यात फळे व भाज्या कुठे मिळतील जे व्यवस्थित पिकवलॆल असेल ?
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Wed, 06/01/2016 - 11:33 नवीन
सेंद्रिय सेतु म्हणून नेत वर सर्च करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एकुलता एक डॉन
ए
एकुलता एक डॉन गुरुवार, 06/02/2016 - 19:31 नवीन
खूप खूप आभार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा