सदाहरित धागा - मनातले प्रश्न..शंका..जिज्ञासा..सल्ला, माहिती- भाग ५
ह्या मालिकेचा चौथा भाग दोनशे प्रतिसाद पार करुन गेल्याने पाचवा भाग.
माझा प्रश्नः एखाद्या लेखमालेचे आंतरजालासाठी लेखन करतांना किती शब्दमर्यादा असावी जेणेकरुन ती कंटाळवाणी वाटणार नाही, किंवा 'अरे हे काय संपला पण हा भाग' असे वाटणार नाही? तसेच दोन भागांमधे अंदाजे किती काळाचे अंतर असावे?
शब्दमर्यादेचा प्रश्न ह्यासाठी की पीसी-मोबाईलवर वाचतांना अनेक व्यवधाने, व्यत्यय येतात. सलग खूप वेळ मिळणे शक्य नसते. किमान पंधरा मिनिटांत वाचून होईल इतपत भाग असावा असे माझे वैयक्तिक मत. बाकी लेखक-वाचकांच्या अनुभवसिद्ध उत्तरांच्या प्रतिक्षेत.
💬 प्रतिसाद
(265)
व
विअर्ड विक्स
Mon, 05/23/2016 - 12:27
नवीन
TDS नि hardness या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मुख्यतः body salt balance हा sodium नि chloride वर अवलंबून असतो. Salt Intake वर filtered पाणी प्यायल्याने काही दुष्परिणाम होत नाही.
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Mon, 05/23/2016 - 12:36
नवीन
कमी TDS चे पाणी पिऊन सवय झाल्याने नंतर कधीतरी बाहेरचे पाणी पिण्याचा प्रसंग आला तर काही त्रास होऊ शकतो का ?
- Log in or register to post comments
व
विअर्ड विक्स
Mon, 05/23/2016 - 14:37
नवीन
होऊ शकतो. कारण असे पाणी पचवण्याची शरीरास सवय नसते.
- Log in or register to post comments
क
कंजूस
Mon, 05/23/2016 - 14:03
नवीन
चिनार ने बरोबर सांगितलंय.ती सोय वापरा पण अतिरेक नको.
टिडिएस ची लेवल ५० करा.पाणी मचूळ वाटत नसेल तर ७५ करा नाहीतर मचूळ लागेपर्यंत वाढवा आणि तो आकडा पाहा.मचूळ लागणार नाही इतकेच खाली सेटिंग करा.त्याने पाण्याचा फ्लो वाढेल आणि कार्टिज फार लवकर बदलावी लागणार नाही.
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Mon, 05/23/2016 - 16:53
नवीन
धन्यवाद कं काका आणि विवि :)
- Log in or register to post comments
अ
अगम्य
Mon, 05/23/2016 - 22:39
नवीन
नवी मुंबई (किंवा मुलुंड, ठाणे) येथे आयुर्वेदिक उपचार (पंचकर्म वगैरे ) मिळण्याची सोय कुठे आहे. मला वाटते कि स्वस्त पासून अतिशय महाग अश्या सर्व प्रकारचे पर्याय उपलब्ध असतील. त्याचप्रमाणे प्रामाणिक ते भोंदू असेही सर्व प्रकारचे पर्याय असतील :-) कदाचित काही वैद्यकीय महाविद्यालयांच्या तर्फे सुद्धा काही उपचार उपलब्ध असतील. तर ज्यांना याबद्दल माहिती आहे त्यांनी कृपया येथे द्यावी अशी विनंती.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Fri, 05/27/2016 - 07:05
नवीन
नमस्कार मित्रांनो,
पुणे जिल्ह्यातील नारायणगावात दिर्घकाळ वास्तव्यासाठी फ्लॅट भाड्याने हवा आहे. मिपाकरांच्या ओळखीत कोणाचा फ्लॅट असेल तर कृपया मदत करावी. मला वारंवार मिसळपाव संस्थळाला भेट देणे शक्य होणार नाही त्यामुळे माझ्या फोन वर संपर्क केला तर योग्य होईल. माझा क्रमांक ९५५ २६ ९९ ३३३. खूप खूप धन्यवाद!
- संदीप डांगे
- Log in or register to post comments
ज
जेपी
Fri, 05/27/2016 - 19:25
नवीन
पुण्यातील अश्या संस्थांची माहिती हवी आहे जिथे लहान मुलांसाठी खेळणी भेट देता येईल..!
आगावु धन्यवाद
- Log in or register to post comments
स
सही रे सई
Tue, 07/12/2016 - 01:25
नवीन
आपलं घर नावाची संस्था आहे डोणजे, सिंहगड पायथ्याशी. तेथे खेळणी, कपडे, पुस्तके, शैक्षणिक साहित्य व मुलांच्या रोजच्या वापरातील वस्तु देऊ शकाल. त्यांना फोन केलात तर त्यांची गाडी सामान घ्यायला येते.
- Log in or register to post comments
ए
एकुलता एक डॉन
Fri, 05/27/2016 - 21:29
नवीन
?पुण्यात स्वस्तात केसांचा विग कोठे मिळेल ?
- Log in or register to post comments
आ
आनंदी गोपाळ
Wed, 06/01/2016 - 12:29
नवीन
भाड्याने हवाय, की विकत?
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
Wed, 06/01/2016 - 12:39
नवीन
कॅन्सर पेशंटसाठी विग मोफत देणार्या चॅरिटीचा पत्ता कोणीतरी दिला होता.
नाटकासाठी हवा असेल तर मॅकड्रपमध्ये मिळेल.
तुळशीबागेत राम मंदिराजवळ काही गंगावनांची दुकानं आहेत. तिथे खास अलका कुबल स्टैल विग मिळतात.
- Log in or register to post comments
ए
एकुलता एक डॉन
Wed, 06/01/2016 - 16:43
नवीन
स्वतःसाठी पाहिजे
- Log in or register to post comments
ए
एकुलता एक डॉन
Sun, 06/12/2016 - 09:53
नवीन
तुळशीबागेत बघितला
पुरुष विग नाहीये
- Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक
Wed, 06/01/2016 - 08:25
नवीन
फोबिया चित्रपट पाहिला का कुणी ? थोडक्यात समीक्षण (चांगला, बरा, वाईट ई) सांगता येईल का ?
- Log in or register to post comments
च
चिनार
Wed, 06/01/2016 - 10:25
नवीन
अकुकाकांचे लिखाण लेख/चारोळी/कविता/कादंबरी/ललित लेखन/कथा यापैकी किंवा याशिवाय अस्तित्वात असलेल्या कोणत्या साहित्यप्रकारात येतं ?
-- अज्ञानी पामर चिनार
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Wed, 06/01/2016 - 11:25
नवीन
भूछत्र.
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Wed, 06/01/2016 - 11:34
नवीन
अविनशी साहित्याला कोणताही प्रकार नसतो.
- Log in or register to post comments
न
नाखु
Wed, 06/01/2016 - 13:03
नवीन
देवळे/देव स्वयंभू असतात त्या प्रमाणे ते साहीत्यही स्व्ययंभूपणाने दशांगुळे व्यापुन उरले आहे कसलया प्रकाराच्या कक्षेत बसवून त्याचे अवमुल्यन करू नये...
अखिल याचक वेधकवाचक रेचकपाचक भेदकजाचक महासंघांकडून खुलासा निवेदन......
माहीती संकलक नाखु
- Log in or register to post comments
च
चिनार
Wed, 06/01/2016 - 14:11
नवीन
माफी असावी नाखुकाका
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Wed, 06/01/2016 - 18:50
नवीन
हायला भारीच. ते वारूळ दशांगुळे उरले असल्याची कल्पना करून हस हस हसलो.
- Log in or register to post comments
क
कंजूस
Wed, 06/01/2016 - 11:36
नवीन
आयुर्वेदिक उपचार:/ अगम्य
केरला आयुर्वेदिक उपचार माटुंगा पोलिस स्टेशनच्या मागे ( किंग्ज सर्कल रे स्टे ला उतरुन जाता येईल.)
२) सायन रे स्टे बाहेर चर्चच्या नंतर आयुर्वेद कॅालेज चे बाह्य उपचार दवाखाना आहे.तुमच्या रोगावर औषध देतात.त्यांना गरज वाटल्यास पंचकर्म सुचवतात.
- Log in or register to post comments
अ
अगम्य
Tue, 06/21/2016 - 08:42
नवीन
सायन आणि माटुंगा बरेच लांब पडेल तरी तुमच्या प्रतिसाद आणि माहितीबद्दल धन्यवाद
- Log in or register to post comments
स
सतिश पाटील
Wed, 06/01/2016 - 12:37
नवीन
नवी मुंबईत भांगेची गोळी कुठे मिळेल?
आजकाल केसांचा व्यवस्थित भांग पडत नहीये.
- Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक
Wed, 06/01/2016 - 12:58
नवीन
काही चुकीचे , विचित्र शब्द वापरण्याची मिपावर प्रथा आहे. अशा प्रकारे भाषेत नसलेले मराठीला इंग्लिशचा तडका दिलेले वगैरे शब्द वापरले जावू नये असे मला वाटते म्हणून मी हे आवाहन करत आहे. (बाकी ज्याचा त्याचा प्रश्न)
१) लोक्स
२) अॅडवणे
(अजून आठवतील / सापडतील तसे लिहीन)
धन्यवाद
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
Wed, 06/01/2016 - 13:02
नवीन
भाषा प्रवाही असते दादा. आपण कितीही काहीही म्हटलं तरी भाषेचं स्वरूप बदलत जाणारच.
रच्याकने [ ;) ] तुम्ही "फोडणी" ऐवजी दिलेला "तडका" मराठी मानलाच की नाही?
- Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक
Wed, 06/01/2016 - 13:25
नवीन
शब्द निदान कोणत्या तरी एका भाषेतला असावा "तडका" मूळ मराठी नसेल पण निदान हिंदी तरी आहे ना.
अॅडवले म्हणण्या ऐवजी "अॅड केले" म्हंटले तरी चालू शकेल.
बाकी कीबोर्डला कळफलक किंवा अॅक्सिलरेटरला गतीवर्धक असेच म्हंटले पाहिजे असा आग्रह मी धरत नाहीये.
भाषा प्रवाही असते हे मान्य केले तरी मग कुणी काहीही नवीन शब्दांची भर घालत गेलेत तर ती भाषा कळण्यापलीकडे होईल.
झका तयरका ?
- Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक
Wed, 06/01/2016 - 13:28
नवीन
बाकी मराठीत (म्हणजे मराठी बोलणार्यांच्या संवादात) फोडणी आणि तडका हे दोन्हीही शब्द वापरले जातात आणि माझ्यामते त्या दोन्हीत काहीसा फरक आहे.
स्वयंपाकनिपुणांनी अधिक प्रकाश टाकायला हरकत नाही.
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Wed, 06/01/2016 - 18:51
नवीन
हो फोडणी घातली जाते, तडका मारला जातो.
- Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक
गुरुवार, 06/02/2016 - 16:04
नवीन
'वाटा जागलेल्या' हे काही महिन्यांपुर्वी प्रसिद्ध झालेले एक स्वतंत्र (चित्रपटबाह्य) मराठी गाणे.
आधुनिक पद्धतीचा संगीतसाज आणि साधे सोपे, शुद्ध मराठी शब्द (हिंदी , इंग्लिशची भेसळ नाही) असलेले हे गाणे माझ्या मते आवर्जुन दखल घ्यावे असे आहे. मात्र 9x झकासच्या पलीकडे ते फारसे पोहोचले असे वाटत नाही म्हणून इथे मिपाकरांना या गाण्याबद्दल सांगावेसे वाटले.
https://www.youtube.com/watch?v=urUrqusXwR8
- Log in or register to post comments
च
चिनार
Fri, 06/03/2016 - 10:27
नवीन
'आंब्यापासून तयार होणारे खाद्यपदार्थ' ह्यावर एक लेखमाला सुरु करावी अशी विनंती मी संपादक मंडळाला करतो.
असे केल्यास मिपा खऱ्या अर्थाने 'मोहरून' येईल.
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Fri, 06/03/2016 - 10:56
नवीन
तुम्हाला 'आंबून' असे म्हणायचे आहे काय ?
- Log in or register to post comments
च
चिनार
Fri, 06/03/2016 - 10:58
नवीन
आंब्याच्या झाडाला मोहर येतो ना..तसा
ऑलरेडी आम्बलोय !!
- Log in or register to post comments
क
कंजूस
Fri, 06/03/2016 - 18:20
नवीन
थांबा थोडे आता बाठ्याचे वेफर्स,भाजी,मिश्र लोणचे,उपवासाचे पदार्थ,कांतीसुधारक उटणे येत आहे.तोपर्यंत धुतलेल्या कोयींची कढी ,रसम प्या.उन्हाळ्यासाठी हितकारक.
- Log in or register to post comments
अ
अजया
Wed, 06/08/2016 - 14:56
नवीन
US undergraduate engineering ला मुलांना पाठवणे कितपत योग्य अयोग्य कोणी सांगू शकाल का मिपाकरांनो.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
गुरुवार, 06/09/2016 - 07:08
नवीन
undergraduate engineering ला पाठवून मुलांना फारसा फायदा होत नाही. कारण तुम्ही जेंव्हा MASTERS करता तेंव्हा तुमची पदवी कुठल्या महाविद्यालयातील आहे याचा शष्प फरक पडत नाही. तेथे पाठविणारे SAT चे क्लास वाले "अचाट आणी अफाट" चढवून सांगतात. वार्षिक १०-१२ लाख खर्च दोन वर्षे करा मग शिष्यवृत्ती मिळेल.सगळे पुढचे शिक्षण फुकट होईल ई ई. मी पण त्याक्षणी हुरळून गेलो होतो. मग थंड डोक्याने विचार केला आणी माझ्या अनेक निवासी आणी अनिवासी मित्रांशिया चर्चा करण्यात आली तेंव्हा यातील मिथ्या भाग लक्षात आला.शिष्यवृत्ती १०० मध्ये फारतर एखाद्या मुलाला मिळते. शिक्षणाचा एक कोटी रुपयापर्यंत खर्च येतो आणी त्याचा पुढच्या आयुष्यात फारसा काहीही उपयोग होत नाही असे अनेक मित्रांनी स्वच्छ आणी स्पष्ट शब्दात सांगितले.
- Log in or register to post comments
अ
अजया
Fri, 06/10/2016 - 18:54
नवीन
हो.मलाही दोन्ही प्रकारचे सल्ले मिळत आहेत.अजून सॅट क्लासला नाही जाऊन आले.ते असेच चढवून सांगतील कल्पना आहे.
- Log in or register to post comments
अ
अगम्य
Tue, 06/21/2016 - 08:39
नवीन
खरे साहेबांना अनुमोदन. undergrad भारतात करून masters साठी अमेरिकेला पाठवणे उत्तम. जर भारतात undergrad साठी चांगल्या कॉलेजला प्रवेश मिळत नाही म्हणून SAT चा विचार करत असाल तर तसे अजिबात नको. उगाच खर्च करून खड्डयात पडाल. भारतात undergrad शिक्षण चांगले आहे. मुंबई पुणे ह्यासारख्या विद्यापीठांचा syllabus सुद्धा चांगला आहे. म्हणजे, भारतात undergrad केले म्हणून अमेरिकेत masters करताना काही disadvantage होतो असे नाही.
- Log in or register to post comments
ज
जेपी
गुरुवार, 06/09/2016 - 06:12
नवीन
मोबाईल साठी पॉवर बँक घेताना काय निकष लावावा.?
- Log in or register to post comments
अ
असंका
गुरुवार, 06/09/2016 - 06:50
नवीन
गुगल क्रोम कास्ट काय आहे ?
- Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक
गुरुवार, 06/09/2016 - 08:48
नवीन
Computer ( WIndows, MAC ई) किंवा मोबाईलची screen जशीच्या तशी TV वर पाहता यावी , सोबत आवाजही ऐकता यावा यासाठीचे एक छोटे उपकरण. ते टीव्हीला जोडले जाते, मग घरातील WiFi चा उपयोग करुन (मला वाटतय router नसेल तर मोबाईलच्या hotspot नेहि जोडता येत असावं) याचा साधा सरळ उपयोग असा की समजा तुम्ही मोबाइलवर एक विडीओ बघत आहात पण तुम्हाला तो मोठ्या स्क्रीनवर बघायचा आहे तर त्याकरिता पेन ड्राईव मध्ये वगैरे कॉपी करत बसण्याची गरज नाही. तुम्ही तो मोबाईलवर चालवायचा आणि स्क्रीन कास्ट करुन मोठ्या स्क्रीनवर बघायचा. तुमच्या टीवीला HDMI port असणे गरजेचे ते नसेल तरी योग्य ते adapter लावून तुम्ही हे उपकरण वापरु शकता. तुमचा टिवी पेन ड्राईव्ह सपोर्ट करत नसेल तरी या उपकरणामुळे तुम्हाला टीव्ही लगेच अपग्रेड करायची घाई करण्याची गरज नाही हा नेमका फायदा ...
- Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक
गुरुवार, 06/09/2016 - 08:53
नवीन
टीप : मी स्वतः हे उपकरण वापरेलेले नाही , त्याबद्दल वाचून जी माहिती झाली ती लिहिली आहे.
- Log in or register to post comments
अ
असंका
गुरुवार, 06/09/2016 - 09:05
नवीन
टीवी नवीन आहे..फोन / टेब जुना झालाय. एच एम एल सपोर्ट नैये म्हणे.
मग क्रोम कास्ट घ्यावा की एच एम एल सपोर्ट वाला फोनच नवीन घ्यावा...आपल्याला काय वाटतं?
- Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक
गुरुवार, 06/09/2016 - 10:11
नवीन
MHL support वाले मोबाइल फारसे नाहीयेत असं मला वाटतं. तुम्हाला फोन तसाही बदलायचाच असेल तर तुम्ही MHL support वाला घेवू शकता.
बाकी तुमची गरज नेमकी काय आहे ?
युट्युब वगैरेवरुन तुम्हाला टीवीवर विडीओ बघायचे आहेत का ? यासाठी MHL support वाला फोन किंवा chrome cast सारखं उपकरण घ्याव लागेल. (Chrome cast सध्या ebay वर १९९९ ल दिसत आहे, हा खर्च तुम्हाला फार जास्त वाटत नसेल तर बिनधास्त घेवून टाका) एकूणातच MHL support वाला फोन पेक्षा मी chrome cast आधी सुचवेन कारण याने तुम्ही pc वरुनही स्क्रीन टीवीवर कास्ट करु शकता.
की save केलेले mp4 वगैरे विडीओ टीवीवर बघायचे आहेत ? हे तुम्ही प्रेन ड्राईव्ह किंवा मोबाईल टीवी ला थेट जोडूनही करु शकता. हो पण टीवी अनेक formats नीट दाखवत नसेल तर मात्र पुन्हा वरचेच पर्याय शिल्लक राहतात.
- Log in or register to post comments
अ
असंका
गुरुवार, 06/09/2016 - 10:15
नवीन
मी तर सरळ केबल टीवी च्या सेट टॉप बॉक्स ला ऑप्शन म्हणून बघत होतो. यू ट्युब लावलं की काम झालं.
- Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक
Fri, 06/10/2016 - 19:05
नवीन
नेहमीच यूट्युब वरुन फक्त कार्यक्रम बघणार असाल तर हे शक्य आहे.
- Log in or register to post comments
म
मोहनराव
गुरुवार, 06/09/2016 - 11:33
नवीन
sinus infection चा त्रास मला गेल्या महिन्यापासुन होत आहे. अॅलोपेथीक उपचार घेत आहे पण लवकर बरा होत नाहिये.
यावर काही घरगुती उपचार आहेत का? आयुर्वेदिक उपचार कोणी घेतले आहेत का?
- Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक
गुरुवार, 06/09/2016 - 11:39
नवीन
नियमित वाफ घेणे, झेपेल तसा व्यायाम करणे, पाठीचे आणि गळ्याचे थंडीपासून रक्षण करणे (थंड गोष्टींना पाठ टेकून बसू नका, एसी मध्ये तसेच थंड हवेतून बाइकवरुन जाताना वगैरे गळ्याबोवती मफलर लपेटा)
बाकी थोडा थोडा ओवा खूप वेळ चावून खाण्याची सवय चांगली.
पण वाफ सगळ्यात महत्वाची असे मला वाटते, अगदी अॅलोपथीचे डॉक्टर पण वाफ घेण्याचा सल्ला देतातच.
- Log in or register to post comments
म
मोहनराव
Fri, 06/10/2016 - 09:34
नवीन
धन्यवाद!
- Log in or register to post comments
P
palambar
Fri, 06/10/2016 - 09:09
नवीन
PGD ERP course SAP coep college one year full
time ,Is it useful forBcom studen?
kindly guide. thank you.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- ›
- »