Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सदाहरित धागा - मनातले प्रश्न..शंका..जिज्ञासा..सल्ला, माहिती- भाग ५

त
तर्राट जोकर
Sun, 05/08/2016 - 19:35
🗣 265 प्रतिसाद
ह्या मालिकेचा चौथा भाग दोनशे प्रतिसाद पार करुन गेल्याने पाचवा भाग. माझा प्रश्नः एखाद्या लेखमालेचे आंतरजालासाठी लेखन करतांना किती शब्दमर्यादा असावी जेणेकरुन ती कंटाळवाणी वाटणार नाही, किंवा 'अरे हे काय संपला पण हा भाग' असे वाटणार नाही? तसेच दोन भागांमधे अंदाजे किती काळाचे अंतर असावे? शब्दमर्यादेचा प्रश्न ह्यासाठी की पीसी-मोबाईलवर वाचतांना अनेक व्यवधाने, व्यत्यय येतात. सलग खूप वेळ मिळणे शक्य नसते. किमान पंधरा मिनिटांत वाचून होईल इतपत भाग असावा असे माझे वैयक्तिक मत. बाकी लेखक-वाचकांच्या अनुभवसिद्ध उत्तरांच्या प्रतिक्षेत.

प्रतिक्रिया द्या
107834 वाचन

💬 प्रतिसाद (265)
त
तेजस आठवले Sat, 09/03/2016 - 18:26 नवीन
मागे ह्या बद्दल एका धाग्यात उल्लेख झाला होता पण मला सापडत नाहीये. तर कोणी ऑनलाईन पद्धतीने फर्निचर मागवले आहे का ?कितपत विश्वासार्ह आहे ? pepperfry बद्दल काय मत आहे? कोणी विकत घेतले असल्यास कळवावे , तसेच खर्च कितपत असतो, हिडन चार्जेस असतात का काही, गॅरंटी बद्दल कसे काय असते? रिटर्न पोलिसी वगैरे. हे पण सांगितल्यास बरे होईल. तसेच खराब लाकूड (वाळवी अथवा बोअरर लागलेले) असे फर्निचर नाही हे कसे बघावे? जेवढी शक्य होईल तेवढी माहिती द्यावी हि विनंती.धन्यवाद. -तेजस आठवले.
  • Log in or register to post comments
अ
अभिदेश Tue, 09/06/2016 - 16:53 नवीन
फर्निचर बघा. चांगला अनुभव आहे. फक्त लाकडाचं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तेजस आठवले
अ
अभ्या.. Sun, 09/11/2016 - 18:11 नवीन
पेपरफ्रायचे अनुभव मीच लिहिलेले आधीच्या धाग्यात. चांगला होता अनुभव. स्वस्त मिळाला बेड, मार्केट पेक्षा. मटेरिअल अत्युत्तम आहे. इथले डिलर त्याला नाके मुद्दामुन मुरडतात. मिस्त्रीने चेक करुन सांगितले. त्याचे बोर्ड पार्टिकल असले तरी डेन्सिटी उत्तम आहे. मज्बूत काम आहे. अगदी प्युर वूडचा बेड सद्य काळात परवडणार नाही, मेन्टेनन्स जमत पण नाही. पेपरफ्रायन्ने फ्री डिलिव्हरी दिली. फेस्टिइव्ह ऑफर असतात. पुण्यात तर घरी येऊन फिट करुन देतात. अर्बन लॅडर पण चेक करायला हरकत नाही. मला एकदम भारी ऑफिस चेअर्स १७०० ला एक अशा मिळाल्या. फ्री डिलिव्हरी. (इथे मार्केटात त्या ३००० च्या खाली नव्हत्या) . (टीपः माझा पेपरफ्रायशी झैरात संदर्भात कोणताही करार नाही अथवा ही जाहिरात ऑर पेड रिव्ह्यु नाही)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिदेश
अ
अभिदेश Mon, 09/12/2016 - 17:31 नवीन
छान केलंत , डिस्क्लेमर टाकून ...नाहीतर काही लोकांचे लगेच प्रतिसाद आले असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
त
तेजस आठवले Tue, 09/27/2016 - 15:22 नवीन
धन्यवाद श्री अभ्या जी, जर ती लिंक देऊ शकत असाल तर बरे पडेल, एकदा नजरेखालून घालतो. व्यनि मधून कळवलीत तरी चालेल. धन्यवाद. -तेजस आठवले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
प
पिशी अबोली Wed, 09/14/2016 - 09:21 नवीन
पेपरफ्रायचा अनुभव चांगला आहे. फक्त वेळ लागतो. अगदी त्याच आठवड्यात मिळत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तेजस आठवले
क
कंजूस Mon, 09/05/2016 - 12:25 नवीन
बरेच स्वस्त आणि स्टाइलिश फर्निचर भुस्सा बोर्ड पासून बनवतात शिवाय त्यात सांधा नसतो.दुकानाचे इंटिअरिअर जे वाटरप्रुफ प्लाइचे सांधे मारून सन माइका लावून करतात त्या कामाशी या स्वस्त फर्निचरची तुलना होऊ शकत नाही.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Mon, 09/05/2016 - 12:39 नवीन
सहमत आहे काका, स्वस्त फर्निचर खर्‍या लाकडापासून बनवलेल्या फर्निचरच्या एक तृतीयांश किंमतीत मिळते पण आयुष्य अगदी काही महिन्यांचे असू शकते. तसेच आजकाल पार्टिकल बोर्ड हे इतके प्रगत झाले आहेत की सहजासहजी फरक लक्षात येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
च
चिनार Tue, 09/06/2016 - 06:25 नवीन
मिपावर कालपासून नवीन लेख प्रकाशित करायचा प्रयत्न करतोय. पण "this website has encountered a problem " अशी error येत आहे. कृपया मदत करावी.
  • Log in or register to post comments
व
वाल्मिक Tue, 09/06/2016 - 12:34 नवीन
मिपाचा 10 व वर्धापन दिन ,पण डाउन time सोडून कितवा ?
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 09/07/2016 - 04:25 नवीन
किती ते ---? तू तेरा देख.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाल्मिक
स
सानझरी Sun, 09/11/2016 - 17:37 नवीन
मिपाकरांनो.. तुमच्या एरियातला गणपती उत्सव काय म्हणतोय. आमच्याइथे हनी सिंगच्या लुंगी डॅन्स नंतर पोलीस सायरनचं म्युझिक लावलंय. अतिशय बिभत्स म्युझिक लागोपाठ सुरू आहे..4 वाजल्यापासून.. आता 5 तास झाले, साधारण अकरा वाजेपर्यंत अजुन सुरू राहील..तुमच्या इथला काय हालहवाल?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sun, 09/11/2016 - 18:55 नवीन
मुंबई पोलिसांनी दिनांक ६ आणि १० तारखेला रात्री बारा म्हणजे बारा वाजता सर्व ढोल ताशे इ. कानठळ्या बसवणारे प्रकार बंद केले अन आज रात्री दहाच्या ठोकळ्याला सर्व मिरवणुकांचे ढोल ताशे बोंबले( लाऊड स्पीकर) इ बंद केले आहेत. मुंबई पोलिसांचे आभार मानावे तेवढे थोडेच. उद्या जमल्यास मुलुंड पोलीस स्टेशन ला जाऊन तेथल्या पोलिसांना धन्यवाद देणार आहे. एका गणेश मूर्ती बरोबर फक्त चार माणसे आणि दहा ढोल ताशे आणि बोंबले घेऊन हजारो लोकांच्या आरोग्याला धोका देणारे हे प्रकार केंव्हा बंद होतील हे त्या श्री गजाननालाच ठाऊक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सानझरी
स
सानझरी Mon, 09/12/2016 - 06:27 नवीन
दहाला सगळे लाऊड स्पीकर बंद केले हे ऐकून आनंद झाला. आमच्या इथे काल अकरा वाजेपर्यंत सगळं सुरूच होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
मिपापन्खा गुरुवार, 09/15/2016 - 08:16 नवीन
मला 8 ते 5 या वेळात स्टडी साठी जागा हवी आहे फी असल्यास माफक असावी जागा शांत आणि हवेशीर असावी कृपया माहिती असल्यास सुचवावे
  • Log in or register to post comments
व
वाल्मिक गुरुवार, 09/15/2016 - 09:27 नवीन
फेरगुसून कॉलेज शेजारी रानडे वाचनालय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिपापन्खा
म
मिपापन्खा गुरुवार, 09/15/2016 - 09:55 नवीन
धन्यवाद वाल्मिक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाल्मिक
V
vikramaditya गुरुवार, 09/15/2016 - 16:44 नवीन
मंडळी , मी गोरेगाव मुम्बई येथे राहतो. ऑक्टोबर च्या शेवटच्या आठवड्यामध्ये सहकुटुंब ३ दिवसांची सहल काढू म्हणतो. बेसिकली , आराम करणे आणि चांगले सामिष (मासळीचे) भोजन करणे असा कार्यक्रम असेल. जवळपास काही टुरिस्ट स्पॉट असेल तर ठीक... किंवा समुद्र किनारा असेल तर उत्तमच. वडिलांचे वय (७५) लक्षात घेता बोरिवली ते डहाणू या मध्ये एखादा रिसॉर्ट शोधत आहे. कारण फार जास्त प्रवास करू इच्छित नाही. एखादा चांगला (फॅमिली साठी) रिसॉर्ट कोणी सुचवू शकेल का? धन्यवाद.
  • Log in or register to post comments
प
पिशी अबोली गुरुवार, 09/15/2016 - 19:42 नवीन
सोनी आय सी रेकॉर्डरमधून महत्वाच्या फाईल्स डिलीट केल्या आहेत चुकून. रिकव्हर करता येतील का?
  • Log in or register to post comments
ए
एकुलता एक डॉन Sun, 09/18/2016 - 14:52 नवीन
सरकार कोणताही कर केव्हाही कमी जास्त करू शकते कि काही नियमावली आहे ? कृपया मार्गदर्शन द्यावे
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Mon, 09/19/2016 - 14:01 नवीन
ऑर्डिनन्समार्फत कायद्यात बदल करून काहीही बदल ताबडतोब करता येतात. पण ऑर्डिनन्सचं आयुष्य सहा महिन्याचं असतं, त्यानंतर तो कायद्यात रूपांतरित करावा लागतो. (संसदेत/विधानसभेत चर्चा वगैरे करून, मतदान घेऊन.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एकुलता एक डॉन
ए
एकुलता एक डॉन Wed, 09/28/2016 - 19:05 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
प
पुंबा गुरुवार, 10/13/2016 - 08:19 नवीन
आबा, सरकार कोणताही कर कधीही कमी करू शकते मात्र वाढवायचा असेल तर मात्र तो बजेट्मध्ये फायनान्स बील मध्येच शक्य असते. हे बरोबर आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
आ
आदूबाळ गुरुवार, 10/13/2016 - 15:58 नवीन
कराच्या दरात काही कमीजास्त करायचं असेल तर बजेट / फायनान्स बिलच लागतं असं नाही. राष्ट्रपतींच्या सहीने काढलेला ऑर्डिनन्सही चालतो. (राज्यघटनेच्या दृष्टीने बजेट हे "मनी बिल" असतं. आर्टिकल १२३ प्रमाणे संसद ज्या विषयांवर कायदा करू शकते अशा सर्व विषयांवर ऑर्डिनन्स काढायची पावर राष्ट्रपतींना असते. त्यामुळे मनी बिलही ऑर्डिनन्सच्या स्वरूपात आणता येतं.)
सरकार कोणताही कर कधीही कमी करू शकते
मला असा काही नियम असल्याचं ठाऊक नाही. पण मला नाही वाटत असं असेल. लॉजिकली विचार करता - सरकार बजेटचा प्रस्ताव मांडतं, त्यावर चर्चा होते आणि फा० बिलचा फा० अ‍ॅक्ट होतो. आता, त्यात लिहिलेला रेट मध्येच स्वतःच कमी करणं म्हणजे संसदेचा अवमान करण्यासारखं होईल. (पुन्हा हे राजकीय शस्त्र म्हणूनही वापरता येईल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
स
समी Mon, 09/19/2016 - 09:31 नवीन
डोंबिवलीत चांगला ज्योतीषी माहित आहे का?
  • Log in or register to post comments
म
मिपापन्खा Wed, 09/21/2016 - 06:56 नवीन
मी स्टॅंडिंग डेस्क विकत विचार करतो आहे. मार्गदर्शन हवे आहे. वापारल्याचा अनूभव असाल्यास पाटदूख़ी मधे काही फरक जनावतो काय?
  • Log in or register to post comments
स
सचु कुळकर्णी Wed, 09/28/2016 - 12:30 नवीन
जर आपल्यापैकि कोणि फॅशन टेक्नोलॉजि / डिझायनिंग चा कोर्स केला असल्यास किंवा माहिति असल्यास ठाणे - डोंबिवलि परिसरात त्यासाठि चांगले कॉलेज किंवा ईन्स्टिट्युट सुचवा. कोर्स केल्यानंतर जॉब च्या संधि कश्या असतिल ? किंवा स्वतः च काहि छोटेखानि युनिट सुरु करता येईल का ? कोणाला काहि अनुभव किंवा माहिति असल्यास कृपया शेअर करा. धन्यवाद
  • Log in or register to post comments
व
वाल्मिक Wed, 09/28/2016 - 13:11 नवीन
मुंबई आणि पुणे येतेच मोफत वायफाय कुठे कुठे आहे ?
  • Log in or register to post comments
आ
आनंदी गोपाळ Fri, 10/14/2016 - 07:20 नवीन
रेल्वे स्टेशन वेटिंग रूम्स.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाल्मिक
अ
अभ्या.. Tue, 10/11/2016 - 08:18 नवीन
माझ्या हपिसातल्या मुलाला १० हजार स्टेट बँकेच्या सीडीएम ला भरायला सांगितली. बँक टाइम संपला होता. तो भरत असताना नोटा ठेवल्यावर ड्रोवर शटर बंद झाले आणि सर्वर टाइमाऊट झाला. ट्रन्झॅक्शन झालेच नाही. (अकाउंटला जमा झालेच नाही) वॉचमनने एक रिटन कंप्लेंट लिहून घेतली फॉर्मवर. नंबर्/अकाउंट्/डिटेल्स. सकाळी मॅनेजरला बोलले असता त्याने २ दिवस लागतील असे सांगितले. दोन दिवसानी त्याने सांगितले मशीन सर्व्हिसिंग चार दिवसानी आहे. नंतर बँकेच्या सुट्ट्या लागल्या. आता म्हणतोय १५ दिवस लागतील. ह्याला काही नियम, भरपाई, कारवाई असु शकते का? एक कर्मचारी म्हणाला की सीडीएम ही तुम्हाला दिलेली फॅसिलिटी आहे. त्यावर भरपाई मिळत नाही. बँकेने देईल तेंव्हाच मिळतील. कसे करावे?
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Wed, 10/12/2016 - 10:06 नवीन
ब्यांका उपकार केल्यासारखी सेवा का देतात? Cdm ला Atm चा सात दिवस वाला नियम लागू असला पाहिजे असे वाटते,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
क
कंजूस Wed, 10/12/2016 - 11:15 नवीन
हे सिडिएमचे प्रश्न इथे सांगिलल्याबद्दल धन्यवाद.जागरुकता वाढेल.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. गुरुवार, 10/13/2016 - 15:39 नवीन
कुणी तरी मार्ग सांगा यार. अजून पैसे मिळाले नाही. :( रात्री जाऊन मशीन खोलू का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
त
तुषार काळभोर Fri, 10/14/2016 - 06:36 नवीन
नको! सायरन वाजंल! त्यापेक्षा उचलून घेऊन ये!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
ट
टवाळ कार्टा Fri, 10/14/2016 - 07:29 नवीन
मशीनपेक्शा सायबाला उचललस तर पैशावर व्याजपण मिळेल =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
स
सिरुसेरि गुरुवार, 10/13/2016 - 15:31 नवीन
मिसळपाव सारखी ईंग्रजी लेख वाचण्यासाठी कुठली वेबसाईट चांगली आहे .
  • Log in or register to post comments
र
राघवेंद्र गुरुवार, 10/13/2016 - 15:58 नवीन
https://www.quora.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिरुसेरि
प
प्रदीप Sat, 11/05/2016 - 06:19 नवीन
छानच आहे. पण अलिकडे त्यात एक गंमत अनुभवली. मी परदेशात रहातो, तेथून मी ते वापरायला लागलो. तेव्हा कुठल्याही विषयावर उत्तरे देणारे बहुराष्ट्रीय असत. मध्यंतरी मी भारतात गेलो असतां, तेथून कोराला लॉग- इन केल्यावर त्याच विषयांवरील बहुसंख्य उत्तरे भारतांतील भारतीयांनी दिलेलीच येऊ लागली. मी स्वतः हे काही बदलू शकलो नाही. नंतर मी माझ्या देशात आल्यावर फीड पूर्ववत झाला. आता येथे भारतातील भारतीयांनी दिलेली उत्तरे दिसत नाहीत. आणि मी तसा प्रयत्न करूनही ती माझ्या फीडमधे येत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघवेंद्र
स
साधा मुलगा Fri, 10/14/2016 - 07:53 नवीन
आठवड्या पूर्वीच्या पावसामुळे आतील भिंत ओली झाली आहे, त्यावर रंग मारायचा आहे, रंगारी भिंत वाळू द्या म्हणतो, भिंत लवकर सुकेल यासाठी काही उपाय आहेत काय?
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे Fri, 10/14/2016 - 12:53 नवीन
ऑक्टोबर हीटने वाळेल भिंत. हा प्रयोग करुन बघा. आठवडाभराने ओल नसलेल्या व ओलवाल्या भिंतीचा एक छोटा भाग पॉलिश पेपरने घासून घ्या व त्यावर पत्र्याने वॉल पुट्टी लावा. २४ तासानंतर दोन्ही भिंतींच्या पुट्टीत काहीही फरक दिसत नसेल तर रंगकाम करायला हरकत नाही.
  • Log in or register to post comments
स
साधा मुलगा Sat, 11/05/2016 - 05:58 नवीन
धन्यवाद,वाळली भिंत ऑक्टोबर हिट ने! रंग काम पण झाले!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
प
पिशी अबोली Fri, 10/14/2016 - 18:43 नवीन
1. टोपली कारवी रायरेश्वर पठारावर फुलली आहे का? 2. तिचा बहर कधीपर्यंत टिकतो साधारण? नोव्हेंबर पर्यंत असू शकेल का 15-20 दिवसात संपेल?
  • Log in or register to post comments
स
सिरुसेरि गुरुवार, 10/20/2016 - 20:00 नवीन
मुंबई डोमेस्टिक एअरपोर्टवर पुणे इथे जाण्यासाठी चार्टर्ड कॅब मिळतात का ? या कॅबची उपलब्धता कशी असते ? भाडे किती घेतात ?
  • Log in or register to post comments
प
पिशी अबोली गुरुवार, 10/20/2016 - 20:30 नवीन
Kk travels. मला वाटतं 24 तास आधी बुक करावी लागते. चार्टर्ड साठी 2700 च्या दरम्यान असेल भाडं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिरुसेरि
स
साधा मुलगा Sat, 11/05/2016 - 06:02 नवीन
माझ्या अँड्रॉइड फोने वरचे सर्व काँटॅक्टस हे G-mail account वर सेव्ह झाले आहेत, सिम कार्ड वर नाही, त्यामुळे मी सिम कार्ड change करून दुसऱ्या फोन वर टाकले तर सर्व काँटॅक्टस गायब होतात, ते gmail चे सीम कार्ड वर परत कसे आणायचे?
  • Log in or register to post comments
प
पी. के. Sat, 11/05/2016 - 07:15 नवीन
कॉन्टॅक्टस>म्यानेज कॉन्टॅक्टस > इंपोर्ट/ एक्सपोर्टस कॉन्टॅक्टस > एक्स्पोर्ट टु सिम कार्ड. आशा प्रकारे तुमी कॉन्टॅक्टस चा बॅकअप मेमरी कार्ड वर पण घेऊ शकता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साधा मुलगा
स
साधा मुलगा Sat, 11/05/2016 - 08:47 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पी. के.
स
साधा मुलगा Sat, 11/05/2016 - 08:48 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पी. के.
स
साधा मुलगा Sat, 11/05/2016 - 08:50 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पी. के.
स
साधा मुलगा Sat, 11/05/2016 - 08:51 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पी. के.
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा