Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सदाहरित धागा - मनातले प्रश्न..शंका..जिज्ञासा..सल्ला, माहिती- भाग ५

त
तर्राट जोकर
Sun, 05/08/2016 - 19:35
🗣 265 प्रतिसाद
ह्या मालिकेचा चौथा भाग दोनशे प्रतिसाद पार करुन गेल्याने पाचवा भाग. माझा प्रश्नः एखाद्या लेखमालेचे आंतरजालासाठी लेखन करतांना किती शब्दमर्यादा असावी जेणेकरुन ती कंटाळवाणी वाटणार नाही, किंवा 'अरे हे काय संपला पण हा भाग' असे वाटणार नाही? तसेच दोन भागांमधे अंदाजे किती काळाचे अंतर असावे? शब्दमर्यादेचा प्रश्न ह्यासाठी की पीसी-मोबाईलवर वाचतांना अनेक व्यवधाने, व्यत्यय येतात. सलग खूप वेळ मिळणे शक्य नसते. किमान पंधरा मिनिटांत वाचून होईल इतपत भाग असावा असे माझे वैयक्तिक मत. बाकी लेखक-वाचकांच्या अनुभवसिद्ध उत्तरांच्या प्रतिक्षेत.

प्रतिक्रिया द्या
107834 वाचन

💬 प्रतिसाद (265)
म
मराठी कथालेखक Wed, 01/10/2018 - 09:21 नवीन
एखाद्या अंध व्यक्तीला नेत्रदानाने दृष्टी लाभली असेल तर अशी व्यक्ती मृत्युपश्चात नेत्रदान करु शकते का ? जर उत्तर हो असेल तर असे किती वेळा एखादे नेत्र दान केले जावू शकते ?
  • Log in or register to post comments
ए
एमी Wed, 01/10/2018 - 16:13 नवीन
अंदाजाने उत्तर देतेय: शरीरातील प्रत्येक अवयव एक्सपायरी डेट घेऊन येत असणार. त्यामुळे डोळे खराब होणार. परतपरत वापरता येणार नाही. + दुसर्या व्यक्तिचा अवयव सूट होणं हे बऱ्यापैकी अवघड असणार. त्यामुळे नेत्रदान केले तरी त्याचा उपयोग कोणालातरी होईलच अशी खात्री नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
क
कंजूस Wed, 01/10/2018 - 14:55 नवीन
नेत्रदानाने दृष्टी लाभली ??? - नेत्रदानाने दृष्टी लाभते? सर्वच आंधळे डोळस झाले नसते का?
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 01/10/2018 - 16:29 नवीन
नेत्रदान हा एक प्रकारे चुकीचा शब्द (मिसनोमर) आहे. नेत्रदानातून मिळालेल्या संपूर्ण डोळ्याचे (आयबॉल) रोपण केले जात नाही, तर केवळ डोळ्यातील समोरच्या पारदर्शक पडद्याचे (स्वच्छमण्डल, कॉर्निया) रोपण केले जाते. Image removed. (चित्र जालावरून साभार) अर्थातच, १. कॉर्नियातील दोषामुळे (ती अपारदर्शक असणे/होणे, तिच्या वक्रतेत/गोलाईत खूप दोष असणे/होणे, इ) दृष्टीदोष असल्यासच नवीन कॉर्नियाचे रोपण करून फायदा होऊ शकतो. २. डोळ्याच्या इतर भागांच्या... उदा. दृष्टि तन्त्रिका (ऑप्टिक नर्व्ह), नेत्र/दृष्टी-पटल (रेटिना), डोळ्याचे भिंग (लेन्स), इत्यादींच्या... आजारांवर कॉर्नियाचे रोपण हा उपाय होऊ शकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
म
मराठी कथालेखक गुरुवार, 01/11/2018 - 13:10 नवीन
बरं पण कार्नियाचे रोपण एकाकडून दूसर्‍याकडे होते.. मग दूसर्‍याकडून तिसर्‍यकडे आणि पुढे असे होवू शकते का
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
क
कंजूस Fri, 01/12/2018 - 01:35 नवीन
चांगले डोळे मिळत असताना कोण दुसय्रा तिसय्रा पायरीवर उतरेल? प्रश्नाचा रोख नक्की कशाबद्दल आहे?
  • Log in or register to post comments
ह
हस्तर Fri, 06/07/2019 - 16:01 नवीन
एखाद्या राज्याला किती उप मुख्य मंत्री पाहिजे ह्याला काही नियम आहेत का ? आंध्र ला ५ आहेत
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Fri, 06/07/2019 - 17:57 नवीन
अशी आहे. समजा N एवढे विधानसभा सदस्य असतील तर जास्तीत जास्त N-2 एवढे उपमुख्यमंत्री होऊ शकतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हस्तर
ज
जॉनविक्क Fri, 06/07/2019 - 19:12 नवीन
पण याला लीप इयर इलेकशन अपवाद आहे असे कोणतरी म्हणत होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
श
श्वेता२४ Fri, 06/07/2019 - 20:27 नवीन
उपमुख्यमंत्री पद घटनात्मक पद नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
ह
हस्तर Fri, 06/14/2019 - 07:29 नवीन
N-२ कसा ?
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Fri, 06/14/2019 - 07:54 नवीन
N - (मुख्यमंत्री + विधानसभा अध्यक्ष) = संभाव्य उपमुख्यमंत्र्यांची संख्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हस्तर
ह
हस्तर Fri, 06/14/2019 - 09:11 नवीन
विरोधी पक्ष ?
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Fri, 06/14/2019 - 10:18 नवीन
सत्तेत नसलेल्या पक्षाच्या किंवा विरोधी पक्षाच्या किंवा अपक्ष आमदाराला उपमुख्यमंत्रीपपद किंवा फॉर दॅट मॅटर कोणतंही मंत्रीपद देणं घटनाबाह्य नसावं. त्यामुळं आतासुद्धा देवेंद्रफडणवीस अजित पवार, धनंजय मुंडे यांना उपमुख्यमंत्री बनवू शकतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हस्तर
ज
जॉनविक्क Fri, 06/14/2019 - 17:21 नवीन
फडणवीस साहेब उप सोडा मुख्यमंत्री पदही अनिल कपूर ला देउ शकतात ;) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा