सदाहरित धागा - मनातले प्रश्न..शंका..जिज्ञासा..सल्ला, माहिती- भाग ५
ह्या मालिकेचा चौथा भाग दोनशे प्रतिसाद पार करुन गेल्याने पाचवा भाग.
माझा प्रश्नः एखाद्या लेखमालेचे आंतरजालासाठी लेखन करतांना किती शब्दमर्यादा असावी जेणेकरुन ती कंटाळवाणी वाटणार नाही, किंवा 'अरे हे काय संपला पण हा भाग' असे वाटणार नाही? तसेच दोन भागांमधे अंदाजे किती काळाचे अंतर असावे?
शब्दमर्यादेचा प्रश्न ह्यासाठी की पीसी-मोबाईलवर वाचतांना अनेक व्यवधाने, व्यत्यय येतात. सलग खूप वेळ मिळणे शक्य नसते. किमान पंधरा मिनिटांत वाचून होईल इतपत भाग असावा असे माझे वैयक्तिक मत. बाकी लेखक-वाचकांच्या अनुभवसिद्ध उत्तरांच्या प्रतिक्षेत.
💬 प्रतिसाद
(265)
र
रघुनाथ.केरकर
गुरुवार, 07/28/2016 - 15:08
नवीन
गेट डेटा बॅक , स्टेलार फीनीक्स, आय डेटा केअयर, इजअस तस्सम डेटा रीकोवरी अअॅप्स डेटा परत मिळवुन देतिल.
अधीक डीटेल्लः
युसबी हार्ड डिस्क उघडुन तीच्या साटा इन्टर्फेस ला केबल ने मदर्बोड ला कन्नेक्ट करा. वींडोज एक्सप्लोरर मध्ये जाउन काही दीसते का बघा, नाही दीसल्यास. रन मध्ये compmgmt.msc टाइप करुन एंटर करा. एक वींडो ओपेन होइल त्यात disk management शोधा. त्यात physical volume दीसतील. त्यात तुमची क्रॅश झालेलि हार्ड डिस्क दीसते का बघा. दीसत असेल तर वरिल पैकि कोणतेही एक अॅप डाउन लोड करुन रन करा.
दिसत नसल्यास मात्र डीस्क क्लोन करुन r & D करा.
फोटो होतील पण मुवी चि खात्री नाही. आणी मुवी झाल्या तरी दोन मुवीच्या फ्रेम एक मेकांत मिक्स होतील. (हे फार भयंकर, आधीच्या जुन्या मुवीज च्या फ्रेम पण दीसतात मधेच)
मराठी पटापट टाइप करता येत नसल्याने इथेच थांबतो.
- Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक
Mon, 08/22/2016 - 19:07
नवीन
चिंचवडमधील माझ्या फ्लॅटमध्ये FM Radio अनेक मोबाईल / निटसा चालत नाही. माझ्याकडे एक म्युजिक सिस्टीम होती तीवर नीट चालत नव्हता, काही मोबाईल्सवर पण नीट चालत नाही. पण एका पाहूण्यांच्या samsung मोबाईल वर बर्यापैकी चालला, एका sansui मोबाईल वर पण बरा चालला.
तरी सर्वात उत्तम प्रकारे कोणत्या मोबाईल वर चालेल असा स्वस्तातला मोबाईल घ्यायचा आहे (फक्त FM Radio साठी ..मोबाईलचा स्पीकर फार उत्तम नसला तरी चालेल कारण मी मोबाईल म्युजिक सिस्टीमला जोडणार आहे)
किंवा दुसरा पर्याय म्हणजे नुसता रेडिओ..पण नुसत्या रेडिओचीसुधा खात्री हवी की नीट वाजेल.. मोबाईल गाजराची पुंगी असेल अगदीच worst case fm नीट चालले नाहि तरी मोबाईल घरात कुणाला वापरायला देता येईल (ज्यांना स्मार्ट फोन नकोय अशा कुणाला)
samsung, nokia, sansui अशा पर्यांयाचा विचार करतो आहे
- Log in or register to post comments
इ
इल्यूमिनाटस
Tue, 08/23/2016 - 04:57
नवीन
माझ्याकडे आहे सॅमसंग हिरो. चालतो बऱ्यापैकी रेडू त्याच्यावर (चिंचवड मध्येच). फक्त जरा मोबाईल उंचीवर ठेवावा लागतो.
हे मॉडेल बंद झाले असेल पण आता. तरी सॅमसंग लाच द्या प्राधान्य
- Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक
Tue, 08/23/2016 - 08:04
नवीन
धन्यवाद. मी सॅमसंग गुरू चा विचार करतोय. त्याबद्दल काही माहिती आहे का ?
- Log in or register to post comments
इ
इल्यूमिनाटस
Tue, 08/23/2016 - 12:14
नवीन
हा बघा
- सॅमसंग गुरु music 2
- Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक
Tue, 08/23/2016 - 12:16
नवीन
अहो पण त्याचा FM कसा वाजतो...सिग्नल्स नीट पकडतो का याबद्दल माहिती हवीये. अॅमेझॉन वर विकत मिळतो हे तर माहीत आहे हो ;)
- Log in or register to post comments
इ
इल्यूमिनाटस
Tue, 08/23/2016 - 12:20
नवीन
आवं, गुरु मधेच 2- 3 मोडेल आहेत!
ह्याचा स्पीकर चांगला आहे म्हणून याची लिंक दिली
- Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक
Tue, 08/23/2016 - 14:16
नवीन
धन्यवाद.
पण मी मोबाईल ४.१ म्युजिक सिस्टीमला जोडेन त्यामुळे मोबाइलच्या स्पीकरचे जास्त महत्व नाहि, तरि बहूधा याच मॉडेलचा विचार करेन.
- Log in or register to post comments
श
शलभ
Fri, 08/26/2016 - 15:58
नवीन
तुम्ही रेडियो साठी antenna चा विचार केला का. आम्ही कॉलेज ला असताना टेरेस वरून एक वायर घेऊन रेडियो च्या antenna ल जोडायचो. तुम्ही DTH च्या डिश ला वायर जोडून त्याच्याच केबल बरोबर खाली आणा. असा काहितरी जुगाड बघा नवीन मोबाईल घेण्यापेक्षा.
- Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक
Fri, 09/02/2016 - 13:26
नवीन
आधीच्या म्युजिक सिस्टिमला १०० रु चा एक अँटेना बसवून पाहिला होता, पण फारसा उपयोग झाला नाही.
- Log in or register to post comments
इ
इल्यूमिनाटस
Tue, 08/23/2016 - 12:14
नवीन
हा बघा
- सॅमसंग गुरु music 2
- Log in or register to post comments
व
वाल्मिक
Mon, 08/22/2016 - 19:18
नवीन
online radio eika ki
- Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक
Tue, 08/23/2016 - 08:03
नवीन
पुण्यातले कोणते FM online उपलब्ध आहेत ? कोणत्या site वर?
पण तरीही रेडिओ हवाच म्हणा..
- Log in or register to post comments
स
सानझरी
Tue, 08/23/2016 - 13:45
नवीन
गाना च्या अॅप वर ऑनलाईन रेडिओ ऐकता येईल.
आकाशवाणी ऐकायचं असेल तर बर्याच DTH वर दिल्ली प्रसारण उपलब्ध आहे. (Dish TV चं channel no 2400 or 2401.)

- Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक
Tue, 08/23/2016 - 14:14
नवीन
धन्यवाद. gaanaa बघतो. माझ्याकडे Airtel dth आहे , त्यात FM channels नाहीत. शिवाय मला स्थानिक म्हणजे पुण्यातली प्रसारणे (विशेषतः मिर्ची आणि रेड ) ऐकण्यात रस आहे.
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Tue, 08/23/2016 - 15:25
नवीन
अहो, आमचं ऐका ना. रेडिओ सिटी 91.1. पुण्यात पण आहे.
- Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक
Tue, 08/23/2016 - 15:44
नवीन
हो. ते पण. ते ही ऐकतो. तेच म्हणायचय की स्थानिक प्रसारण ऐकायचेत. सकाळी सकाळी रेडिओ ऐकायला बर वाटतं
- Log in or register to post comments
क
कंजूस
Sun, 08/28/2016 - 10:32
नवीन
१)मोबाइलातला रेडिओसाठी सॅमसंग गुरू आहेच,रेकॅार्डींगही होते m4a (mp4)format मध्ये.
पण स्क्रीन 128x196 - 1.8inch फार ताण देते.
२)इंटर्नल एंटेनावाले मोबाइल आता येत नाहीत,हेडफोन वायर लावावी लागतेच.
३)स्पाइसचे मोबाइलात एक एंटेना असायची.
४)माझ्याकडे ट्रान्झिस्टरला १०वाटचा फिलिप्स स्पिकर जोडलेला आहे.दणाणा वाजतो.दोन सेल दोन महिने पुरतात.
५)इंटरनेट रेडिओ म्हणजे तासाला साठ एमबी डेटा उडतो,चारपाच जिबी डेटा महिन्याला लागेल.
६) माझ्याकडे कार्बनचा बटणवाला मोबाइल दोनवर्षांपुर्वी घेतलाय.१८०० एमेच ब्याटरी पाच दिवस जाते.१६०० रु K20+,
एफेम रेकॅार्डींग wavमध्ये/amr होते.
७) एफेम रेकॅार्डींगवालाच घ्या.
८) म्यु सिस्टमला मोबाइल कसा जोडणार?ते कळलं नाही
- Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक
Fri, 09/02/2016 - 13:33
नवीन
धन्यवाद
मोबाईलला ३.५ mm output असते, त्याच्याने तो music system ला जोडू शकतो, bluetooth चा ही पर्याय आहेच.
internal antenna च हवी अस काही नाही, मला फक्त fm नीट ऐकायला मिळावे इतकीच इच्छा आहे
internet वर पुण्यातले live प्रक्षेपण सापडले नाहित. gaana.com वर पण नाही. (इकडे साधा रेडिओ लावला आणि तिकडे internet रेडिओ वर तोच स्टेशन वाजवला तर एकच कार्यक्रम ऐकाय्ला मिळावा, पण असं कुठे सापडलं नाही. बाकी broadband असल्याने data usage बद्दल काहि अडचण नाही.
- Log in or register to post comments
क
कंजूस
Mon, 09/05/2016 - 12:18
नवीन
वाइरलेस एँटेनावाले फोन I ball कंपनीचे बाजारात आले आहेत १५००च्या आसपास किंमत आहे.रेकॅार्डींगही आहे.चारपाच हँडसेटस पैकी दोघांत कॅाल रेकॅार्डींगही आहे.अशा रेडियोत चार्जरची /हेडफोनची वायर लावलेली असल्यास रेडियो जोरदार वाजतो असा अनुभव आहे.
Iball feature phones
Neon, skipper,leader,biggy,tarang.
- Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक
Mon, 09/05/2016 - 12:19
नवीन
धन्यवाद
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Mon, 09/05/2016 - 12:44
नवीन
एफेम रेडीओसाठी मी पाह्यलेला सर्वोत्तम फोन. नोकीया एक्स२-०२. साधा बेसिक फोन आहे ड्युएल सिमचा. आवाज एकदम पत्थरफोड आहे. वजन कमीय, कव्हरेज चांगले पकडतो, बॅटरी लाईफ जबरा. विदाउट वायर एफेम वाजतो. अगदी क्लीअर. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्याला एफेम ट्रान्समीटर पण आहे. त्याच्यावर बरेच प्रयोग केले पण ते काय असते अजून कळले नाही. बहुधा आपण स्वतंत्र एफेम चालवू शकू असे माझ्या भाबड्या मनाला वाटलेले. :(
- Log in or register to post comments
क
कंजूस
Wed, 09/07/2016 - 04:21
नवीन
खरंय त्यावेळी २०११ मध्ये तीन फोन आलेले X2 00/01/02
परंतू स्पेसि वाचल्यावर कळलं की नोकियाने प्रत्येकात काही विशेष दिलंय तर ते दुसय्रातून गाळलंय.
00 - 5 mp camera,flash,wireless fm.
01 - full big keypad पण कॅम्रा 2 mp,128video
02 - wireless fm. radio trans, fm recording,पण कॅम्रा 2 mp,128video
मी 00 घेतला आणि अजून अफलातून फोटो देतो.
- Log in or register to post comments
प
पाटीलभाऊ
Fri, 09/02/2016 - 14:22
नवीन
विंडोज मोबाईलसाठी 'ऑल इंडिया रेडिओ' (AIR) म्हणून एक अँप आहे. त्यावर विविध भारती, आकाशवाणी मराठी ह्या वाहिन्यादेखील आहेत. अँड्रॉइड साठी देखील असेच एखादे अँप असावे.
- Log in or register to post comments
अ
असंका
Tue, 08/23/2016 - 10:02
नवीन
गोव्याला एन्ट्री फी चालू आहे का? किती आहे?
धन्यवाद...
- Log in or register to post comments
प
प्रीत-मोहर
Tue, 08/23/2016 - 12:01
नवीन
आहे. एंट्री फी वाहनापरत्वे बदलते.
- Log in or register to post comments
झ
झेन
Tue, 08/23/2016 - 12:45
नवीन
छोटी चारचाकी 250 रू.
- Log in or register to post comments
अ
असंका
Tue, 08/23/2016 - 13:25
नवीन
आभार्स.. :)
- Log in or register to post comments
स
सोनुली
Tue, 08/23/2016 - 17:02
नवीन
स्वप्नरेखा नावाचे एक पुस्तक याचे काही भाग आहेत. हे पुस्तक काही वर्षांपूर्वी एका लायब्ररीतून आणून वाचले होते. ह्यात प्रमुख पात्र त्रिशला नावाची छोटी मुलगी आहे. सध्या हे पुस्तक कुठे मिळेल??
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
Tue, 08/23/2016 - 17:49
नवीन
जयवंत दळवींचं स्वप्नरेखा
- Log in or register to post comments
स
सोनुली
Tue, 08/23/2016 - 18:18
नवीन
नाही.स्त्री लेखिका आहेत. पूर्ण पुस्तक या त्रिशला वर आधारित आहे. छोटी साधारण २-५ वयापर्यंतचा कालखंड आहे.
- Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक
Wed, 08/24/2016 - 07:08
नवीन
आवर्जुन दखल घ्यावे असे मधूर गाणे ..पण 9x झकास पलीकडे फारसे पोहोचले असे वाटत नाही. म्हणून इथे देत आहे. रसिकांनी आनंद घ्यावा,
- Log in or register to post comments
प
पी. के.
Fri, 08/26/2016 - 07:43
नवीन
उद्या व परवा नवी मुंबई-भंडारदरा-अमृतेश्वर मंदिर- रंधा दबदबा-शिवनेरी किल्ला- भीमाशंकर- नवी मुंबई अशी बुलेट राईड करायचे योजले आहे.
1) ओन द व्हे आणि भंडारदरा च्या आजूबाजूला बगण्यासारखी ठिकाणे कोणती?
2)भंडारदरा ते भीमाशंकर रोड कसा आहे? या रोड वर निवासाची सोय कुठे होईल?
एकटा आसल्यामुळे कुठेही निवास करू शकतो.
कृपया मदत करा...
- Log in or register to post comments
स
सिरुसेरि
Fri, 08/26/2016 - 10:29
नवीन
बेसिक , विदाउट कॅमेरा मोबाईल हँडसेटमध्ये सध्या कुठले हँडसेट चांगले आहेत .
- Log in or register to post comments
व
वाल्मिक
Fri, 08/26/2016 - 10:44
नवीन
नोकिया 1110 आणि 3310 सोडून काही पण घेऊ नये
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Sun, 08/28/2016 - 07:14
नवीन
3310 मिळतो का अजून??
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Sun, 08/28/2016 - 08:37
नवीन
११०० पाह्यला बाप्पू आज, ८०० रु. ला आहे शॉपक्ल्युजला. म्युझिक एक्स्प्रेस सिरिजमधला पण एक दिसला. त्याच्यासाठी आधी लै मरमर केलेली. आता बघू पण वाटेना.
३३१० चा हातोडा काय दिसला नाही.
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Sun, 08/28/2016 - 18:42
नवीन
आपल्याला 3310 हवा भावड्या, आपण अँड्रॉइड फेकून देऊ त्याच्याकरता
- Log in or register to post comments
व
वाल्मिक
Mon, 08/29/2016 - 08:27
नवीन
कितीतला घ्याल?
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sun, 08/28/2016 - 17:25
नवीन
पुण्यात पांढरा चाफा (देवचाफा) व लाल चाफ्याची रोपे कोठे मिळतील?
- Log in or register to post comments
र
रिकामटेकडा
Mon, 08/29/2016 - 18:53
नवीन
परवा तळ्यात पोहायला उतरलेल्या व्यक्तीचा पाण्यात सोडलेल्या इलेक्ट्रिक मोटार मुळे पाण्यात सप्लाय येऊन शॉक लागून मृत्यू झाला अशी बातमी वाचनात आली. त्यावरून मनात असा प्रश्न आला कि तळ्याच्या पाण्यात हा इलेक्ट्रिक शॉक लागण्याचे क्षेत्र केवढे असेल. आणि ते कशावर अवलंबून असेल. कारण त्या तळ्यातील पाण्याला जे जे स्पर्श करतील त्याना शॉक लागायला हवा पण तसे होत नाही
कृपया जाणकारांनी खुलासा करावा
- Log in or register to post comments
स
सानझरी
Fri, 09/02/2016 - 06:57
नवीन
सुंबरान चित्रपटात दाखवलेले मंदिर कोणते आणि कुठे आहे, याची कोणाला माहिती आहे का?
- Log in or register to post comments
R
ray
Mon, 09/05/2016 - 19:32
नवीन
पण ते घर दाखवालय ते.. कुरुंदवाडच्या राजवाड्यातलं हाय
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Fri, 09/02/2016 - 07:21
नवीन
रिलायन्स जियोची डोंगल आहेत का उपलब्ध, घ्यावीत काय?
- Log in or register to post comments
स
सामान्य वाचक
Fri, 09/02/2016 - 09:42
नवीन
राउटर किंवा डोन्गल मिळतात का सिम च घ्यावे लागते
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Fri, 09/02/2016 - 12:24
नवीन
डॉण्गल नाही, वायफाय हॉट्स्पॉट आहे.
जियोडॉटकॉम ला विजिट करा.
- Log in or register to post comments
व
वाल्मिक
Sat, 09/03/2016 - 17:09
नवीन
दात किडलाय
पुण्यात कोणता डेंटिस्ट्स आहे जो रूट कॅनॉल ना सांगता व्यवस्थित सल्ला देईल ?
- Log in or register to post comments
स
सानझरी
Mon, 09/05/2016 - 09:04
नवीन
डॉ. जोशी, झांबरे पॅलेस, चव्हाण नगर, सातारा रोड
माझी दाढ किडुन पूर्ण पोकळ झाली होती, सिरॅमिकने भरुन दिली त्यांनी. २ वर्ष झालेत, नंतर कधिच काही प्रॉब्लेम नाही आला.
हवा असेल तर त्यांचा मोबाईल नंबर व्यनि करते.
- Log in or register to post comments
व
वाल्मिक
Mon, 09/05/2016 - 11:12
नवीन
धन्यवाद
खर्च किती झाला ?
- Log in or register to post comments
स
सानझरी
Mon, 09/05/2016 - 11:34
नवीन
सधारण १०००-१२००..
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- ›
- »