ताज्या घडामोडी :भाग २
पाकव्याप्त काश्मीरही भारताचेच आहे अशी डरकाळी फोडून नरेंद्र मोदींनी आपण एक कणखर पंतप्रधान असल्याचे सूचित केले, त्याच बरोबर गिलगिट बालटीस्थानात जनभावना उसळल्याने पाकिस्तानचे जरा कठीणच झाले आहे, भारतीय यंत्रणा योग्य काम करत असल्याचे हे चिन्ह समजावे काय?
💬 प्रतिसाद
(306)
स
संदीप डांगे
Tue, 08/23/2016 - 16:17
नवीन
मी असं कुठं म्हटलंय?
हिंदूंच्या हत्या होतांना जे ओरडत नाहीत, पुरस्कार परत करत नाहीत त्यांना श्रीगुरुजी पुरोगामी व निधर्मी विचारवंत म्हणत आहेत. अक्चुअली हा प्रश्न तुम्हीच त्यांना विचारायला हवा.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Tue, 08/23/2016 - 16:24
नवीन
त्यांच्या बोलण्यातला उपहास तुम्हाला कळला नसेल असं मला वाटत नाही. आणि या दोन प्रतिक्रियांमधला (जेव्हा मारले जाणाऱ्यांचे धर्म वेगवेगळे असतात तेव्हा ज्या प्रतिक्रिया येतात) विरोधाभासही जाणवत नसेल असंही वाटत नाही. तरीही तुम्ही गुरुजींना प्रश्न विचारलात याचं आश्चर्य वाटलं.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Tue, 08/23/2016 - 16:35
नवीन
गुरुजींच्या वागण्यातही तोच सोयिस्करपणा, तीच विसंगती असते जे ती दुसर्यांमधे शोधून शोधून (राजकिय कारणास्तव) इथे आणून टाकत असतात. गुरुजींना प्रश्न विचारण्याचे कारण हीच विसंगती उघड करणे.
त्यात काय आश्चर्य, "जबतक तेरे पैर चलेंगे, उसकी सांसे चलेंगी" असं नातं आहे आमचं. =))
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 08/23/2016 - 20:48
नवीन
चुकीचा निष्कर्ष. हिंदूंच्या हत्या होतांना जे ओरडत नाहीत, पुरस्कार परत करत नाहीत त्यांना मी पुरोगामी व निधर्मी विचारवंत म्हणत नसून जे पुरोगामी व निधर्मी विचारवंत (म्हणजेच निधर्मांध) आहेत ते हिंदूंच्या हत्या होतांना ओरडत नाहीत व पुरस्कार परत करत नाहीत असे मी म्हणतो. (गणिती प्रमेयातील कॉन्व्हर्स आहे हा).
- Log in or register to post comments
अ
अमितदादा
Tue, 08/23/2016 - 11:12
नवीन
बातमीच्या हेडींग वरून बातमी दुर्लक्षित केलेली परंतु तुम्ही इथं पोस्ट केल्यावर वाचली. हीन आणि हिंसक मनोवृत्ती आहे. रॅडिकल मनोवृत्ती दिसून येतेय. गुरुजी एखादी लिंक पोस्ट केल्यावर त्याची समरी 2 वाक्यात मराठीत दिली तर बरं होईल, अर्थात ही विनंती आहे.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 08/23/2016 - 11:24
नवीन
वरील बातमीनुसार म्हैसूर मधील अबिद पाशा व त्याच्या टोळक्याने गेल्या ८ वर्षात भाजप, संघ व बजरंग दलाशी संबंधित असल्याच्या कारणावरून एकूण ८ जणांचा खून केलेला आहे असे पोलिस तपासात दिसते.
त्यांनी २००८ मध्ये शशीकुमार नावाच्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचा मुस्लिम मुलीशी संबंध असल्यावरून खून केला. त्यानंतर २००९ मध्ये त्यांनी आनंद पै या स्थानिक भाजप नेत्यावर व त्याच्या रमेश नावाच्या साथीदारावर हल्ला केला. त्यात रमेशचा मृत्यु झाला. त्यानंतर भाजप, बजरंग दलाशी संबंधित असल्याच्या कारणावरून त्यांनी अनेक खून केले.
हे सर्व खून जातीयवादी, धार्मिक कारणांवरून झालेले दिसतात. अगदी अलिकडचा खून म्हणजे के राजू नावाच्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचा मार्च २०१६ मध्ये झालेला खून.
ऑक्टोबर २०१५ मध्ये अखलाखच्या खुनावरून रान उठविणारे, पुरस्कार परत करणारे निधर्मांध या ८ हिंदूंच्या धार्मिक कारणावरून केलेल्या खुनांबद्दल तोंडात मिठाची गुळणी धरून गप्प आहेत. ही मंडळी खून झाल्यानंतर आधी मरणार्याचा व मारणार्याचा धर्म बघतात आणि नंतर ठरवितात की बेंबीच्या देठापासून किचाळायचे का डोळे मिटून मौन पाळायचे.
- Log in or register to post comments
च
चंपाबाई
Tue, 08/23/2016 - 11:40
नवीन
तुमची आठ प्यादी मेली तर तुम्ही का नाही किंकाळ्या फोडल्या ?
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Tue, 08/23/2016 - 15:17
नवीन
चंपाबाई,
फोडल्या की किंकाळ्या. तुम्हाला ऐकू नाही आल्या? कान फुटले काय?
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Tue, 08/23/2016 - 15:58
नवीन
तुमची म्हणजे? जे मारले गेले ते भारतीय नव्हते का? का हिंदू भारतीय नसतात असं तुमचं मत आहे?
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Tue, 08/23/2016 - 15:51
नवीन
ती केरळमधल्या बातमीची लिंक कुठे आहे? का ती बातमी तुम्हाला झालेला साक्षात्कार होता?
- Log in or register to post comments
च
चंपाबाई
Tue, 08/23/2016 - 16:40
नवीन
http://m.firstpost.com/india/kerala-bjp-worker-dies-as-bomb-made-by-him-goes-off-2969000.html
गुगलवर केरळ बीजेपी बाँब शोधा.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Tue, 08/23/2016 - 20:26
नवीन
याचा अर्थ अजून काही निश्चित झालेलं नाही. Selective reporting म्हणतात ते हेच.
- Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी
Tue, 08/23/2016 - 16:41
नवीन
'पाकिस्तान हा नरक नाही, तिथे आपल्यासारखीच माणसं राहातात.' हे विधान केल्याबद्दल कोणावर तरी देशद्रोहाचा खटला घातला. अशा भलत्यासलत्या अफवा पसरवणारांना अशीच शिक्षा पाहिजे. माणसं राहातात म्हणे तिथे! जिभेला काही हाडबिड काही आहे की नाही?
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/advocate-registers-case-against-ex-mp-ramya-in-somwarpet/articleshow/53823363.cms
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 08/24/2016 - 10:49
नवीन
विधान केल्याचा हेतू अपेक्षेपेक्षा जास्त यशस्वी झाला आहे. रम्याला अपेक्षेपेक्षा जोरदार प्रसिद्धी मिळाली आहे. सवंग आणि बिनभांडवली प्रसिद्धी मिळविण्याचे जे यशस्वी मार्ग आहेत त्यामध्ये मोदींविरूद्ध १४० अक्षरांचे ट्वीट करणे (उदा. अडगळीत पडलेली नेहा धुपिया नावाची एक सुमार नटी एका ट्वीटमुळे एकदम चर्चेचा विषय झाली होती) किंवा पाकिस्तानचे तोंड भरून कौतुक करणे. असे काही केले की तुम्ही अडगळीतून बाहेर येऊन एकदम प्रसिद्धीच्या झोतात येता.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 08/24/2016 - 11:09
नवीन
सवंग आणि बिनभांडवली प्रसिद्धी मिळविण्याचा अजून एक खात्रीशीर मार्ग म्हणजे देशातील वाढत्या फॅसिझममुळे आणि वाढत्या असहिष्णुतेमुळे आपण व्यथित झालो असून त्याच्या निषेधार्थ आपण आपल्याला मिळालेला पुरस्कार परत करीत आहोत असे जाहीर करणे. असे केले की अफाट प्रसिद्धी मिळते. कोणालाही माहित नसलेले अनेक लुंगेसुंगे गतवर्षी हा मार्ग वापरून प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले होते.
- Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी
Wed, 08/24/2016 - 20:34
नवीन
बरोब्बर. मला तर वाटतं की 'पाकिस्तान नरक नाही' असं विधान केल्याबद्दल वस्सकन अंगावर येणारे सगळे त्या रम्याचे भक्त असणार. हे सगळं प्लॅंडच आहे. किंबहुना तिच्यावर खटला ठोकणारा माणूसही तिला किंवा कॉंग्रसला सामील असणार. काय चाललंय हे? पूर्वी असं नसायचं. खुद्द वाजपेयींनी 'पाकिस्तानात माझं चांगलं स्वागत झालं' असं म्हटलं होतं. तेव्हा असलं काहीतरी षडयंत्र नव्हतं.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 08/25/2016 - 06:12
नवीन
अगदी बरोबर. फुकट आणि सवंग प्रसिद्धी मिळविण्याचा हक्क सर्वांनाच आहे.
- Log in or register to post comments
U
Ujjwal
Tue, 08/23/2016 - 18:33
नवीन
मटा ऑनलाइन वृत्त । संयुक्त राष्ट्रे
भारताचा मोस्ट वाँटेड गुंड दाऊद इब्राहिम आमच्याकडे नाहीच, असं म्हणणाऱ्या पाकिस्तानचं पितळ पुन्हा उघडं पडलं आहे. पाकमध्ये दाऊदनं वास्तव्य केलेल्या नऊ ठिकाणांचे पत्ते भारतानं संयुक्त राष्ट्रांच्या एका समितीला दिले होते, त्यापैकी सहा ठिकाणी दाऊद राहिल्याचं स्पष्ट झालं आहे, तर तीन पत्ते चुकीचे आढळले आहेत.
दाऊद इब्राहिम पाकिस्तानातच आहे, याबद्दल भारत ठाम आहे. पाकनं त्याला संरक्षण दिल्याचा भारताचा आरोप असून त्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भारताने संयुक्त राष्ट्रांच्या निर्बंध समितीकडे केली होती. त्यासोबत त्यांनी दाऊदच्या पाकमधील नऊ निवासस्थानांचे पत्ते दिले होते. या ठिकाणी दाऊदचं सतत येणं-जाणं आणि मुक्काम असतो, असं भारतानं नमूद केलं होतं.
संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या आयएस आणि अल् कायदा प्रतिबंधक समितीने भारताने दिलेले पत्ते तपासून पाहिले असता, तीन पत्ते चुकीचे आढळले, तर सहा पत्ते बरोबर निघाले आहेत. त्यामुळे 'आम्ही नाही त्यातले' म्हणणाऱ्या पाकिस्तानची पुन्हा 'पोल खोल' झाली आहे.
भारताने दाऊदचा म्हणून दिलेला एक पत्ता युनोच्या राजदूत मालेहा लोधी यांचा असल्याचे समोर आले. त्याशिवाय, आठवा मजला, मेहरान स्क्वेअर, परदेशी हाऊस-३, तलवार एरिआ, क्लिफ`टन, कराची, पाकिस्तान आणि ६/अ, कजुबाम तंजीम, फेज-५, डिफेन्स हौसिंग एरिया, कराची, पाकिस्तान हे दोन्ही पत्ते चुकीचे असल्याचे समितीने म्हटले असून हे तीनही पत्ते यादीतून वगळण्यात आले आहेत
http://m.maharashtratimes.com/international/international-news/dawood-ibrahims-3-of-9-addresses-in-pakistan-cited-by-india-found-incorrect-un/articleshow/53828221.cms?utm_source=facebook.com&utm_medium=referral&utm_campaign=DawoodIbrahim230816
- Log in or register to post comments
ख
खालीमुंडी पाताळधुंडी
Wed, 08/24/2016 - 09:53
नवीन
अरूणाचलमध्ये ब्राह्मोस तैनातीने चीनवर दबाव.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 08/24/2016 - 19:28
नवीन
राहुलबाबा घाबरले.
http://m.rediff.com/news/report/never-blamed-rss-as-a-body-for-gandhis-killing-rahul-to-sc/20160824.htm
- Log in or register to post comments
च
चंपाबाई
Wed, 08/24/2016 - 19:31
नवीन
बरोबर्च बोलले ... त्यांचा घात करणारा संघात होता , इतकेच ते बोलले होते.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
गुरुवार, 08/25/2016 - 07:24
नवीन
आणि नारायण आपटे हे दोघेही संघाचे नाही तर हिंदू महासभेचे सदस्य होते आणि हिंदू महासभा संघाचा भाग नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर संघाशी संबंधित नव्हते तरीही त्यांना गांधीहत्येच्या खटल्यात आरोपी बनवण्यात आलं होतं. पुढे निर्दोष सोडावं लागलं ही गोष्ट वेगळी. जर नथुराम संघात होता तर सावरकरांना अटक करायची काय गरज होती?
-(चंपाबाईंच्या गुणपत्रकावरचे इतिहासात मिळालेले गुण जाणण्यास उत्सुक) बोका-ए-आझम
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
गुरुवार, 08/25/2016 - 07:26
नवीन
हिंदुमहासभा अन रास्वसंघ वेगळे का झाले हो??
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
गुरुवार, 08/25/2016 - 09:45
नवीन
हिंदू महासभा आणि रा.स्व.संघ हे कधीच एकत्र नव्हते. निदान तसं कुठेही वाचनात आलेलं नाही. अगदी डाव्यातल्या डाव्या इतिहासकारांच्या पुस्तकांतही या दोन्ही संघटना वेगवेगळ्या आहेत असाच उल्लेख पाहिलेला आहे. त्यामुळे त्या कधी वेगळ्या झाल्या हे कसं सांगणार? हिंदू महासभा हा पक्ष लाला लाजपतराय आणि पं. मदनमोहन मालवीय यांच्या अखिल भारतीय हिंदू सभेमधून उदयाला आला आणि या सभेची स्थापना ही १९०५ मध्ये बंगालच्या फाळणीनंतर (लाॅर्ड कर्झनकृत) मुस्लिम लीगच्या स्थापनेला उत्तर म्हणून झाली होती असं वाचलेलं आहे. संघाची स्थापना १९२५ मध्ये नागपूरला झाली.
- Log in or register to post comments
च
चंपाबाई
गुरुवार, 08/25/2016 - 10:40
नवीन
Godse dropped out of high school and became an activist with Hindu nationalist organizations Rashtriya Swayamsevak Sangh (RSS) and Hindu Mahasabha, although the exact dates of his membership are uncertain
https://en.m.wikipedia.org/wiki/Nathuram_Godse
http://indianexpress.com/article/india/india-others/retracing-nathuram-godses-journey-2/
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
गुरुवार, 08/25/2016 - 15:12
नवीन
तुम्ही नाही आहात मिपावर?
- Log in or register to post comments
ख
खालीमुंडी पाताळधुंडी
गुरुवार, 08/25/2016 - 16:52
नवीन
याला म्हणतात "पळता भुई थोडी"
पळा अजून कुठे कुठे पळताय बघू.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
गुरुवार, 08/25/2016 - 17:38
नवीन
आणि आमची मुंडी पण ताठ असते. खाली नसते.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
गुरुवार, 08/25/2016 - 17:37
नवीन
राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कधी होते आणि गांधीजींच्या हत्येच्या वेळी संघाचे सदस्य होते का याबद्दल निश्चित माहिती नाहीये. पण हिंदू महासभेचं नियतकालिक ' अग्रणी ', ज्याला नंतर ' हिंदू राष्ट्र ' हे नाव देण्यात आलं, त्याचं संपादन त्याने केलं होतं. आता हिंदू महासभेच्या मुखपत्राचा संपादक हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सदस्य होता हे तुम्ही तुमच्या दिव्यदृष्टीने पाहून बोलू शकता. तुम्हाला भारतीय राज्यघटनेने धादांत खोटं बोलायचं स्वातंत्र्य दिलेलं आहेच.
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
गुरुवार, 08/25/2016 - 17:52
नवीन
रास्वसंघ अन हिंदुमहासभा वेगळे का झाले बोक्याभाऊ??
- Log in or register to post comments
न
नाखु
Fri, 08/26/2016 - 08:50
नवीन
अध्यक्ष जे कॉण्ग्रेस विचारांचे आणि पक्षाचेही नेते होते
- Log in or register to post comments
च
चिनार
गुरुवार, 09/01/2016 - 13:18
नवीन
बापू , बोकाभाऊ,चंपाताई,
ते संघ, हिंदू महासभा वगैरे जाऊ द्या हो...मला एक सांगा
1. "संघाच्या लोकांनी गांधीजींना मारलं -- इति राहुल गांधी
2. "संघाच्या लोकांनी गांधीजींना मारलं असं मी कधीही म्हटलं नव्हतं, गांधीजींना मारणारा संघाशी संबंधित होता असं मी म्हटलंय -- इति राहुल गांधी ह्यांचे सुप्रीम कोर्टातील प्रतिज्ञापत्र.
3. मी जे म्हटलंय त्यावर मी ठाम आहे. मी कोठेही घुमजाव केलं नाही-- इति राहुल गांधी
अरे आखिर केहना क्या चाहते हो ??
माझं प्रामाणिक मत -- राहुल गांधींच्या फोनवर पोकेमॉन गो डाऊनलोड करून द्यावा. काँग्रेसला अच्छे दिन येतील
- Log in or register to post comments
च
चिनार
गुरुवार, 09/01/2016 - 13:32
नवीन
आता हे वाचा
http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5156553692926799985&SectionId=28&SectionName=%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE&NewsDate=20160901&Provider=-&NewsTitle=%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80%20%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9A%20%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%80-%20%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%B2%20%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%20%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%AE
- Log in or register to post comments
च
चंपाबाई
गुरुवार, 09/08/2016 - 04:36
नवीन
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/nathuram-godse-never-left-rss-says-his-family/articleshow/54160475.cms
नथुराम संघाचे सदस्य होते.
- Log in or register to post comments
च
चंपाबाई
गुरुवार, 09/08/2016 - 05:04
नवीन
१. नथुराम संघाचा नव्हता.
२. गांधीजी संघाला प्रातःस्मरणीय आहेत
यांचा वारंवार उच्चार करण्यात संघवाले धन्यता का मानतात, हे अगदी उघड आहे.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 08/25/2016 - 05:10
नवीन
नवीन सिंद्धांत -
१) भारतातील दहशतवादासाठी पाकिस्तानी दहशतवादी जबाबदार आहेत. पाकिस्तान त्यासाठी जबाबदार नाही.
२) जगभरातील दहशतवादासाठी इसिस जबाबदार नसून इसिसचे सदस्य त्यासाठी जबाबदार आहेत.
३) भारतातील भ्रष्टाचारासाठी खांग्रेस जबाबदार नसून त्यासाठी खांग्रेसी जबाबदार आहेत.
- Log in or register to post comments
च
चंपाबाई
गुरुवार, 08/25/2016 - 05:39
नवीन
ठाणे नाट्यगृह स्फोट प्रकर्णात सनातननेही जाहिर केले होते , हे त्या व्यक्तींचे वैयक्तिक काम आहे . संस्थेचा संबंध न्हाय.
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
गुरुवार, 08/25/2016 - 05:47
नवीन
=)) =)) चंपाबाई म्हणते गुर्जीसनी काय सुट्टीच नाय ! =)) =))
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Fri, 08/26/2016 - 14:52
नवीन
चंपाबाई,
संस्थेचा संबंध नाही हे केवळ संस्थेचं म्हणणं नसून न्यायालयाचंही अगदी तस्संच मत आहे.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
गुरुवार, 08/25/2016 - 17:42
नवीन
Organization is an artificial, legal person.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 08/25/2016 - 14:53
नवीन
पडलो तरी नाक वर
http://m.rediff.com/news/report/stand-by-every-word-i-said-about-rss-rahul
- Log in or register to post comments
अ
अमितदादा
Wed, 08/24/2016 - 21:35
नवीन
नागा बंडखोरांच्या शिखर संघटनेशी भारत सरकार ची चालू असलेली बोलणी शेवटच्या टप्यात आहेत अशी बातमी आहे. फायनल aggrement काय असेल याची कोणतीही माहिती बातमी मध्ये दिली नाही.
http://indianexpress.com/article/india/india-news-india/nagaland-india-peace-talk-conflict-nscn-gprn-2994606/
नागा peace commitee च खालील स्टेटमेंट मुळे उत्सुकता आणखी वाढली आहे "The NSCN and the Naga people highly appreciate the government of India for recognizing the sovereign rights of the Nagas through the framework agreement.”
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 08/25/2016 - 06:19
नवीन
काय चाललंय हे. आता मुलांवर सुद्धा हे हिंदू संस्कृती लादायला लागले. णिषेध!
http://m.rediff.com/news/report/bmc-okays-proposal-to-make-yoga-mandatory-in-mumbai-civic-schools
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
गुरुवार, 08/25/2016 - 09:10
नवीन
http://www.rediff.com/news/report/bmc-okays-proposal-to-make-yoga-mandatory-in-mumbai-civic-schools/20160824.htm
-गा.पै.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
गुरुवार, 08/25/2016 - 09:28
नवीन
लोकहो,
कन्नड अभिनेत्री आणि (माजी?) काँग्रेस आमदार रम्या हिच्याविरुद्ध देशद्रोहाचा खटला दाखल झाला आहे. अधिक माहिती : http://maharashtratimes.indiatimes.com/nation/advocate-registers-case-against-ex-mp-ramya-in-somwarpet/articleshow/53823363.cms
वरील बातमीनुसार हा खटला सरकारकडून नसून खाजगी आहे. तसेच तिच्या वक्तव्यावरून कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाहीये.
माझ्या मते तिचं वक्तव्य अपराधपात्र नाही. पाकिस्तान नरक नाही हे तिचं व्यक्तीनिष्ठ मत आहे. तिला ते बाळगायची पूर्ण मुभा आहे. तिने तिथले लोकं आपल्यासारखेच आहेत असं म्हंटलं आहे. त्यातही काहीही आक्षेपार्ह नाही. तसं पाहायला गेलं तर १९४७ साली फाळणीच्या वेळेस पाकिस्तानी लोकांनी वेगळा पाकिस्तान मागितलाच नव्हता. तो त्यांच्यावर लादला गेला आहे. अर्थात, आज पाकिस्तानात जे नरकसदृश्य अराजक आणि दहशतवाद आहे तो तिथल्या नाकर्त्या राज्यकर्त्यांमुळे आहे. पाकिस्तानी सत्ताधारी भारताचे शत्रू आहेत. पाकिस्तानी जनता नव्हे.
त्यामुळे रम्याच्या वक्तव्यात देशद्रोह शोधायला जाणे म्हणजे हातचा हुकुमी एक्का घालवणे आहे. शेवटी ती तिच्या वक्तव्यावर ठाम आहे हे वाचून संतोष वाटला.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
गुरुवार, 08/25/2016 - 14:45
नवीन
लोकहो,
हा काय प्रकार आहे? : पूजा, विवाहादी कार्यक्रमांसाठी १०० पेक्षा अधिक पाहुण्यांना आमंत्रित करण्यासाठी पोलिसांची अनुमती आवश्यक !
पोलिसांच्या हाती अमर्याद अधिकार येणार असं दिसतंय. आमच्या (एकत्रित) घरी न बोलावता तीनचारशे माणसं सहज जमतात कुठल्याही कार्यास. दरवेळेस पोलिसांना कळवणार कोण!
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
गुरुवार, 08/25/2016 - 14:52
नवीन
"हिटलरशाहीकडे एक पाऊल" असं वर्णन करायचं का ह्या कायद्याचं...?
- Log in or register to post comments
म
मोदक
गुरुवार, 08/25/2016 - 16:17
नवीन
सूचना आणि आक्षेप कळवा. home_special4@maharashtra.gov.in या मेल आयडी वर.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
गुरुवार, 08/25/2016 - 16:26
नवीन
अरेवा, माहितीसाठी अनेक धन्यवाद! नक्की मेल करतो.
- Log in or register to post comments
म
मोदक
गुरुवार, 08/25/2016 - 16:39
नवीन
धन्यवाद.. इथेही एक प्रत चिकटवा.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- ›
- »