ताज्या घडामोडी :भाग २
पाकव्याप्त काश्मीरही भारताचेच आहे अशी डरकाळी फोडून नरेंद्र मोदींनी आपण एक कणखर पंतप्रधान असल्याचे सूचित केले, त्याच बरोबर गिलगिट बालटीस्थानात जनभावना उसळल्याने पाकिस्तानचे जरा कठीणच झाले आहे, भारतीय यंत्रणा योग्य काम करत असल्याचे हे चिन्ह समजावे काय?
Dawood Ibrahim's money was not swindled, Indian government had it seized
For months Dawood Ibrahim thought that he was being cheated by his own men, but when he realized that his hawala transactions were being blocked by Indian agencies, he was flabbergasted. http://indiatoday.intoday.in/story/dawood-ibrahim-hawala-money-india-seized-dubai/1/762238.htmlयाचसाठी होता केला अट्टाहास
आधीच वादात अडकलेल्या किंवा शोच्या सेटवर वाद निर्माण करु शकतील अशाच काही स्पर्धकांची निवड ‘बिग बॉस’मध्ये केली जाते. याच पार्श्वभूमीवर तृप्ती देसाई बिग बॉसच्या आगामी सिझनमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. टीआरपीचे गणित साधण्याच्यादृष्टीने तृप्ती देसाई यांना ‘बिग बॉस ९’साठी विचारणा करण्यात आल्याचे वृत्त आहे. आता खरी मजा येईल. बिग बॉसमधील इतर स्पर्धक पहिल्याच दिवशी पळून जातील. तृप्ती देसाईच्या बरोबरीने बिग बॉसमध्ये केजरीवाल, कन्हैय्या कुमार व पप्पू सुद्द्धा हवेत. http://www.loksatta.com/manoranjan-news/trupti-desai-will-be-participating-in-bigg-boss-9-1300502/प्रवाशाच्या एका ट्विटमुळे रेल्वेच्या टीटीवर काही तासांत निलंबनाची कारवाई
रेल्वेमधून प्रवास करताना शुल्क आकारून त्याची पावती न दिल्याची तक्रार थेट ट्विटरच्या माध्यमातून एका प्रवाशाने रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत केली आणि पुढच्या दोन तासांत संबंधित टीटीआय (ट्रॅव्हेलिंग टिकट इन्स्पेक्टर) अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाईही झाली. अगदी वेगाने झालेल्या या कारवाईमुळे रेल्वे प्रशासनाच्या कारभाराची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. बाडमेर-कालका एक्स्प्रेसमधून गोविंद नारायण हे शनिवारी बाडमेरहून बिकानेरला निघाले होते. नियमाप्रमाणे सामान्य तिकीट काढून गाडीमध्ये टीटीआयकडे १५ रुपयांचे अतिरिक्त शुल्क भरून या गाडीतून प्रवास करता येऊ शकतो. त्याप्रमाणे त्यांनी आपल्या डब्यामध्ये टीटीईकडे १५ रुपयांचे अतिरिक्त शुल्क जमा केले. पण टीटीआय श्यामलाल यांनी त्याची कोणतीही पावती गोविंद नारायण यांना दिली नाही. त्यामुळे लगेचच त्यांनी सुरेश प्रभू आणि रेल्वेच्या इतर अधिकाऱ्यांना मेन्शन करून या संदर्भातील ट्विट केले. या एका ट्विटमुळे सरकारी कार्यालयातील सूत्रे वेगाने फिरली. लगेचच गोविंद नारायण यांना रेल्वे अधिकाऱ्यांकडून फोन आला आणि त्यांच्याकडे सविस्तर माहिती विचारण्यात आली. संबंधित विभागाचे अधिकारी मुकेश गेहलोत हे लगेचच टीटीआय श्यामलाल यांच्यासोबत संबंधित डब्यामध्ये पोहोचले. तिथे त्यांनी गोविंद नारायण यांच्यासह इतरही प्रवाशांकडे चौकशी केल्यावर त्यांना समजले की अनेक प्रवाशांकडून १५ रुपयांचे अतिरिक्त शुल्क गोळा करून त्यांना त्याबदल्यात कोणतीही पावती देण्यात आलेली नव्हती. टीटीआय यांच्याकडील रोकड तपासल्यावर अतिरिक्त रक्कम त्यांच्याकडे जमा असल्याचेही निदर्शनास आले. त्यानंतर लगेचच गेहलोत यांनी याची माहिती आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार श्यामलाल यांना तातडीने सेवेतून निलंबित करण्यात आले आणि पुढील स्थानकावर त्यांना रेल्वेतून खाली उतरविण्यात आले. http://www.loksatta.com/desh-videsh-news/railway-tti-suspended-after-complaint-on-twitter-1301433/