Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ताज्या घडामोडी :भाग २

स
संदीप डांगे
Sun, 08/14/2016 - 05:27
🗣 306 प्रतिसाद
पाकव्याप्त काश्मीरही भारताचेच आहे अशी डरकाळी फोडून नरेंद्र मोदींनी आपण एक कणखर पंतप्रधान असल्याचे सूचित केले, त्याच बरोबर गिलगिट बालटीस्थानात जनभावना उसळल्याने पाकिस्तानचे जरा कठीणच झाले आहे, भारतीय यंत्रणा योग्य काम करत असल्याचे हे चिन्ह समजावे काय?

प्रतिक्रिया द्या
69645 वाचन

💬 प्रतिसाद (306)
श
श्रीगुरुजी Sat, 09/03/2016 - 04:40 नवीन
>>> अक्षरश: डोक्याचा भुगा होणारे प्रॉब्लेम येतात. कधी कधी 16-16 तास काम करून issues फिक्स केलेले आहेत. काही लोक (तुम्ही असे म्हणत नाही) समजतात तितके आय.टी. फिल्ड म्हणजे टाईमपास नाही. + 1
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया
श
श्रीगुरुजी Fri, 09/02/2016 - 11:07 नवीन
प्रस्न मोदकभाऊंना असला तरी मी उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. भारतात ओरिजिनल कोड डेव्हलपमेंट सुद्धा होते. अनेक कंपन्यांनी स्वतःच्या प्रोपायटरी लायब्रर्‍या डेव्हलप केलेल्या आहेत. अनेक कंपन्यांनी स्वतःचे प्रोप्रायटरी प्रॉडक्टस् डेव्हलप केले आहेत. 'टॅली' हे अकाउंटिग प्रॉडक्ट भारतीय आहे. भारतीय कंपन्या कोड एनहान्समेंट, डिफेक्ट फिक्सिंग इ. कामांप्रमाणे ओरिजिनल कोड डेव्हलपमेंटचे काम सुद्धा करतात. सीडॅक या निमसरकारी कंपनीचे सुद्धा स्वतःचे प्रॉडक्ट आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
अ
अनिरुद्ध.वैद्य गुरुवार, 10/27/2016 - 19:08 नवीन
भरपुर ओरिजिनल डेव्हलपमेंट असते. अगदी रॉकेट सायंन्स नसलं तरी लोकांच्या मोबाईलचे लोकेशन (जीपीएस न वापरता) शोधण्यापासुनतर प्रचंड स्पीडनी होणारे स्टॉक मार्केटचे व्यवहार सांभाळणारी प्रणाली वगैरे वगैरे भरपुर होत असतं काम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
श
श्रीगुरुजी Fri, 09/02/2016 - 11:17 नवीन
प्रॉडक्ट बेस्ड कंपनी आणि सर्विस बेस्ड कंपनीतला हा मूलभूत फरक असतो. मी काम केलेल्या एका कंपनीत ८ तासाचे बंधन नाही, फुल / हाफचड्डीचे बंधन नाही. चप्पल बुटाचे बंधन नाही. तेच आधीच्या एका कंपनीत मंगळवारी टाय कंपल्सरी होता.
गुळगुळीत व स्वच्छ दाढी केलेली असणे, स्वच्छ इस्त्रीचे कपडे असणे, पदवेशांना पॉलिश असणे, लो वेस्ट व शॉर्ट टॉप सारखे अंतर्वस्त्रांचे (आणि काहीसे आतील अंगाचे सुद्धा) दर्शन घडविणारे लक्षवेधक कपडे नसणे हे धोरण सर्व दृष्टीने योग्य आहे. फक्त सॉफ्टवेअर कंपन्यांमध्येच नव्हे तर सर्व सार्वजनिक ठिकाणी या गोष्टी असाव्यात. फक्त प्रॉडक्ट बेस्ड किंवा किंवा फक्त सर्व्हिस बेस्ड कंपन्या फारश्या नसतात. बहुतेक कंपन्यात या दोन्ही प्रकारची व इतरही अनेक प्रकारची कामे चालतात. जुने ग्राहक व संभाव्य ग्राहक, सर्वेक्षक कंपन्यांना अनेकवेळा भेटी देतात. आपले सहकारी सुद्धा दाढीचे खुंट वाढलेले, चुरगाळलेले अस्वच्छ कपडे घातलेल्या अवस्थेत कसे तरी दिसतात. बाहेरील ग्राहकांनी तर असे कर्मचारी बघितल्यावर कंपनीबद्दल वाईट मत होईल. त्यामुळे कंपनीने स्वच्छ व व्यवस्थित राहण्याची सक्ती करणे योग्यच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
स
संदीप डांगे Fri, 09/02/2016 - 11:45 नवीन
सहमत आहे, कॅज्युअल कपड्यांचा ट्रेण्ड मावळत चालला आहे. तो येण्याचं कारणही टीनेजर-वीशीतल्या मुलांनी टेक्नॉलॉजी जगतावर मुसंडी मारली होती, तेव्हा त्यांच्या कॅज्युअल वागण्याला ग्राहक कंपन्या मान तुकवून समजून घेत होत्या. आता माहोल बदलला आहे. अनेक सॉफ्टवेअर कंपन्या व अनेक धुरंधर निर्माण झाल्याने ज्याचे प्रेझेंटेशन चांगले त्याला प्राधान्य मिळायला लागले आहे, त्यामुळे परत ऑफिशियल कपड्यांचा काळ परत आलाय. जेव्हा एखादी प्रजाती व तिचे काम दुर्मिळ व परम आवश्यक असते तेव्हा तिचे कसलेही नखरे सहन केल्या जातात, जाहिरात क्षेत्रात आजही कॅज्युअल वातावरण असण्याचे व कायमच राहण्याचे कारण तेच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
स
सुबोध खरे Fri, 09/02/2016 - 07:59 नवीन
गाड्या किंवा मोबाईल मध्ये सक्ती करणे याचा एक दुसरा पैलू पण आहे. आपण टाटा मोटर्स मध्ये काम करीत असताना मारुतीची गाडी चालवत असाल तर साहजिक लोक विचारतात का हो टाटाची गाडी चांगली नाही का? म्हणजे तुम्ही आतले म्हणून विचारतोय? यामुळे कुप्रसिद्धी फार पटकन होते. आणि मग हे असे विनोद (?) म्हणून व्हॉट्स अँप वर पटकन प्रसारित होतात. उद्या अशीच गोष्ट रिलायन्स च्या मोबाईल बद्दल होईल यासाठी कंपनी तुम्हाला काही अति घालते तसेच हे आहे. बाकी रतन टाटांचे माहित नाही पण जे आर डी टाटा स्वतः रोज अँबेसेडर गाडी चालवीत घरी जात असत आणि त्यांच्या गाडीत कुलाब्याला जाणाऱ्या कुणालाही लिफ्ट देत असत अगदी चपराशाला सुद्धा. हे माझ्या वडिलांनी स्वतः पाहिलेले आहे.
  • Log in or register to post comments
त
तर्राट जोकर Fri, 09/02/2016 - 15:24 नवीन
रिलायन्स जिओने खूप आनंदी व्हायची गरज नाही. जगात काहीही मोफत मिळत नाही हे परत एकदा सिद्ध झालं. पाचशे रुपयाच्या प्लानमधे चार जीबी डेटा आहे जो १३५एम्बी च्या स्पीडने चार ते सात दिवसात संपेल. फुकट बोलायचे पैसे आधीच वसूल केले आहेत. रात्रीचा डेटा मोफत - ती रात्र २ ते ५. जिओच्या वेबसाईटवर प्लान्स व पॅकेज दिलेत त्यात कॉलींगचे व एसएमएस चे दर ठळक दिले आहेत. जर लाईफ्टाईम फ्री कॉलिंग आहे तर ते दर कशाचे? आजच्या पेपरात प्रधानसेवकांची खाजगी कंपनीच्या जाहिरातीतली उपस्थिती इथे नाकाने कांदे सोलणार्‍या कोणाला अजून खटकलेली दिसत नाही. नमो नमः
  • Log in or register to post comments
च
चंपाबाई Fri, 09/02/2016 - 15:40 नवीन
मैं ब्यापारी हूं .. असे प्रधानसेवक निवडणुकीपूर्वीच कबूल करुन बसलेत... मग केली जाहिरात तर बिघडलं कुठं ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
स
सुबोध खरे Fri, 09/02/2016 - 18:24 नवीन
जगात काहीही मोफत मिळत नाही हे परत एकदा सिद्ध झालं. त्यात नवीन काहीच नाही.त्यातुन अम्बानीकडुन काहीही फुकंट मिळेल ही अपेक्शा करणे हे अतीच आहे मी एअर टेल चे ४ G गेले दिड वर्श वापरतो आहे. ५०० च्या आस पास बिल येत. यात १ जि बि नेट आणी ५००० मिनिटे बोलणे मिळते . त्याच पैशात रिलायन्स जर ४ जि बि नेट आणी अमर्याद बोल्णे देत असेल त र काय वाईट ? बाकि त्यान्च्या जाहिरातीत न मो च नव्हे तर महात्मा गान्धी स्वामी विवेकानन्द सुद्धा येत आहेत. अम्बानी कुणा कुणाला वेठिस धरतील ते सान्गता येणार नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
क
कैलासवासी सोन्याबापु Fri, 09/02/2016 - 19:04 नवीन
दुर्दैवाने विवेकानंद अन बापूजी कुठल्या संवैधानिक पदावरही नाहीत हयातही नाहीत !! नमो आपल्या सुदैवाने आहेत एका संवैधानिक पदावर... बाकी काय बोलणार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
त
तर्राट जोकर Sat, 09/03/2016 - 07:23 नवीन
अम्बानीकडुन काहीही फुकंट मिळेल ही अपेक्शा करणे हे अतीच आहे
डॉक्टर, इथे अम्बानीकडून भारतातल्या कोणीही कोणतीही भिकार्‍यासारखी अपेक्षा करत नाही आहे/केली नव्हती. अम्बानी स्वतः तोंड वर करुन 'फुकट कॉलिंग' सुविधा आहेत असे जाहिर करतात. फाईन प्रिन्टमधे घोटाळा करतात. फ्री शब्दावर भुललेल्या जनतेला जागृत करण्याचा प्रतिसादाचा उद्देश आहे.
मी एअर टेल चे ४ G गेले दिड वर्श वापरतो आहे. ५०० च्या आस पास बिल येत. यात १ जि बि नेट आणी ५००० मिनिटे बोलणे मिळते . त्याच पैशात रिलायन्स जर ४ जि बि नेट आणी अमर्याद बोल्णे देत असेल त र काय वाईट ?
अमर्याद बोलणे ह्यावर अधिक माहिती काढा.
बाकि त्यान्च्या जाहिरातीत न मो च नव्हे तर महात्मा गान्धी स्वामी विवेकानन्द सुद्धा येत आहेत. अम्बानी कुणा कुणाला वेठिस धरतील ते सान्गता येणार नाही
म्हणजे अंबानीच्या जाहिरातीत देशाच्या पंतप्रधानांनी मॉडेलिंग करणे तुम्हाला पटलेले आहे तर? उद्या हार्पिक च्या जाहिरातीत स्वच्छ भारत मिशनला वेठीस धरुन पंतप्रधान वापरलेले चालतील. आणखी खूप योजना आहेतच. चांगलंय.. ये तो बस शुरुवात है.. खरंय. आप्टार्ड्सनाच का उगा नेहमी शिव्या द्यायच्या? त्यांचे भाऊबंद तर सगळीकडे आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
श
श्रीगुरुजी Sat, 09/03/2016 - 09:38 नवीन
उगी उगी . . .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Sat, 09/03/2016 - 09:49 नवीन
धन्यवाद. तिकडे केजरु के गुलाम धाग्यावर आपण येता जाता रडत असता त्याबद्दल काय? आपण म्हणे लोकाला शेंबुड आपल्या नाकाला अशी गत झाली भक्तांची. हा हा हा हा हा हा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sat, 09/03/2016 - 10:46 नवीन
उगी उगी . . . मिपावरील शेंबूड आख्यानाचा धागा वाचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Sat, 09/03/2016 - 10:52 नवीन
वरचा प्रतिसाद स्वगत आहे वाटतं. प्रधानसेवकांनी भक्तांना कुठे तोंड दाखवायच्या लायकीचं नाही ठेवलं. जियो मेरे लाल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sat, 09/03/2016 - 10:53 नवीन
उगी उगी . . .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
स
सुबोध खरे Sat, 09/03/2016 - 09:47 नवीन
त जो साहेब अंबानी जर एक रुपयात हत्ती विकत असतील तर तो अटी लागू शिवाय येणारच नाही आणि ती अट अशीच असेल कि माझा उंदीर १ लाख रुपयात घेणाऱ्याला एक रुपयात हत्ती मिळेल. तेंव्हा ते जे काही सांगतात त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. अंबानी "धंदा करायलाच" बसलेले आहेत ते काही धर्मार्थ व्यवसाय करीत नाहीत. पण त्यांच्या अशा जाहिरातींमुळे इतर कंपन्यांना आपले दर कमी करायला लागतील ग्राहकांच्या दृष्टीने हा फायदा आहे. लाईफ बॉय जेंव्हा हात धुण्याचा साबण विकतात तेंव्हा ९९ .९९ % जंतू धुतले जातात असे सांगतात. त्यात चूक काहीच नाही पण ते कोणत्याही साबणाने होते हेमंतर सांगत नाहीत. कॉम्प्लान घेणाऱ्यांची उंची हि ते न घेणाऱ्यांच्या उंचीपेक्षा हि जास्त वाढते. सरासरी ३ मिमी वाढते असे आमच्या एका सर्व्ह मध्ये आढळले आहे असे खाली * लावून लिहिलेले असते. सफोला मध्ये शून्य कोलेस्टेरॉल आहे अशी जाहिरात करतात पण कुठल्याही तेलात कोलेस्टेरॉल नसतेच. तेल खाल्ल्याने ते वाढते. अंबानी त्यापेक्षा वेगळे नाहीतच. बाकी नमो असलेली जाहिरात मी पाहिली नाही. ते गुरुदेव टागोर पासून म. गांधी पर्यंत सर्व महान लोकांच्या फोटोखाली यांचे स्वप्न पूर्ण करूया म्हणून म्हणत आहेत तसेच काही आहे का ते माहिती नाही. अमर्याद बोलणे आहे ते तुम्ही नेट पॅक घेतला तर त्यावरच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Sat, 09/03/2016 - 10:00 नवीन
परत तेच. अहो इथे आश्चर्य कोणाला वाटतंय? अंबानी धडधडीत खोटं बोलून जनतेला उल्लू बनवत आहेत एवढंच इथं सांगायचं होतं. कोणीही धंदा करावा काही समस्या नाही, खोटं बोलून फसवून धंदा करावा ह्याला तुमची सहमती असेल काय? इतर कंपन्यांचे दर जिओ च्या तुलनेत कमीच आहेत. खोटं बोलल्यामुळे फक्त उलटं दिसत आहे. बाकी सगळेच तुमच्यासारखे अतिहुशार-अ‍ॅड्व्हान्स स्मार्ट नसतात. त्यासाठी हा प्रतिसाद प्रपंच. तुमच्यासारख्या सर्वज्ञ माणसाला काय सांगायचे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Sat, 09/03/2016 - 10:07 नवीन
अंबानी धडधडीत खोटं बोलून जनतेला उल्लू बनवत आहेत एवढंच इथं सांगायचं होतं अहो कोण खोटं बोलत नाहीये HD रेडी टीव्ही म्हणजे काय तर HD पण नाही. फेअर अँड लव्हली लावून १५ दिवसात गोरेपण मिळवा रोज फक्त २० रुपयाचे बॉर्न व्हीटा देणाऱ्या आईला मुलगा मी इंजिनियर झालो कि तुझ्यासाठी घर घेईन म्हणतो. वानगी दाखल हि उदाहरणे पुरेशी आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Sat, 09/03/2016 - 10:31 नवीन
https://www.jio.com/en-in/plans जरा अभ्यास करुन घ्या. आय विल बी बॅक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
श
श्रीगुरुजी Sat, 09/03/2016 - 10:51 नवीन
अहो कोण खोटं बोलत नाहीये HD रेडी टीव्ही म्हणजे काय तर HD पण नाही. फेअर अँड लव्हली लावून १५ दिवसात गोरेपण मिळवा रोज फक्त २० रुपयाचे बॉर्न व्हीटा देणाऱ्या आईला मुलगा मी इंजिनियर झालो कि तुझ्यासाठी घर घेईन म्हणतो. वानगी दाखल हि उदाहरणे पुरेशी आहेत.
१५ लाख सीसी टीव्ही लावणार, आम्ही इथली व्यवस्था बदलायला आलो आहोत, जनलोकपाल आणणार, सर्वत्र फुकट वायफाय देणार, ५ वर्षात २५ नवीन महाविद्यालये उभारणार, आम्ही भ्रष्टाचार अजिबात सहन करणार नाही, . . . ही खोटी आश्वासने विसरलात की काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
च
चंपाबाई Sat, 09/03/2016 - 10:54 नवीन
तुमचे सत्यवादी मोदी माझे १५ लाख कधी देणार ? शीश महल चा हप्ता भरायचा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
स
सुबोध खरे Sat, 09/03/2016 - 10:57 नवीन
तुम्हाला कर्ज कुणी दिलँ? आणि कोणत्या नावानं ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई
श
श्रीगुरुजी Sat, 09/03/2016 - 11:05 नवीन
ROFL
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
श
श्रीगुरुजी गुरुवार, 09/08/2016 - 11:16 नवीन
बाहेरील देशात काळा पैसा इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे की जर तो सर्व आपल्याला परत आणता आला तर प्रत्येक कुटुंबाला १५-२० लाख रूपय मिळू शकतील. - नरेंद्र मोदी (२०१४ साली एका प्रचारसभेत बोलताना) काळा पैसा परत आणून प्रत्येक भारतीयाच्या खात्यात १५ लाख रूपय जमा करू असे मोदींनी २०१४ साली प्रचारसभेत आश्वासन दिले होते. आता मात्र ते पैसे न देता ते यू टर्न घेत आहेत. - काँग्रेस, आआप व उर्वरीत मोदी विरोधक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Sat, 09/03/2016 - 11:31 नवीन
अमर्याद बोलणे आहे ते तुम्ही नेट पॅक घेतला तर त्यावरच आहे. माफ करा आपल्याच दुव्यात म्हटल्याप्रमाणे खरोखरच अमर्याद बोलणे फुकट आहे. 1. Voice is truly free – no charge towards voice or the data used to make 4G voice calls.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
च
चंपाबाई Fri, 09/02/2016 - 19:36 नवीन
करलो दुनिया मुठ्ठी में .... अशी टॅग लाईन घेवुन रिलायन्स मोबाईलच्या क्षेत्रात उतरलं. भारतातला सर्वात मोठा उद्योग समुहांपैकी एक असल्याने यशाची खात्री होतीच. त्यात राजकारण्यांचं पाठबळ. ५०० रु. दोन फोन अशी स्किम दिली आणि अभुतपुर्व प्रतिसाद मिळाला. पुढे त्याची बिलं आल्यावर लोकांनी ते फोन फेकुन दिले आणि परत जुन्या ऑपरेटरकडे वळाले. रिलायन्सचा हा डाव फारसा यशस्वी झाला नाही. तोटाच झाला असावा. आता परत एकदा तोच डाव खेळतेय तीच कंपनी. फोर जीचं आमिष देवुन. अनलिमिटेड डाटा आणि कॉल्स फ्री आहेत तिन का चार महिन्यासाठी.त्यामुळे त्या सीमकार्डासाठी उड्या पडताहेत लोकांच्या . काल अनुभव घेतला त्याच्या स्पीडचा. भन्नाट स्पीड आहे. पण मागच्या अनुभवातुन यावेळी कंपनी शहाणी झालीय असं वाटतंय. मागच्या चुकांवर काहितरी तोडगे आणि उपाय केलेत असं दिसतंय. मागच्या योजनेत हॅंडसेट त्यांचाच होता,नंतर मग इतर वापरायला अलाउड केलं. या वेळीही ते हॅंडसेट देताहेत किंवा तुमच्याही हॅंडसेटवर हे सीम वापरता येतं. अनलिमिटेड कॉलिंग आणि डाटा फ्री आहे म्हणुन लोक आता वापरु नंतर फेकुन देवु अशा मुडमधे आहेत. "फुकट घावलं अन बापलेक धावलं"अशा पध्दतीने लाईनी लावुन लोक फोन घेताहेत, पण सावधान ... कंपनीने यावेळी चाल खेळलीय. तुम्ही बरोबर सापडणार त्यांना. ते सीम तुमच्या मोबाईल मधे घातलं की पहिले तुमचे मोबाईल मधे त्याचे अॅप्लिकेशन डाउनलोड करावं लागतं. त्यात तुम्हाला आलेला अॅक्टिव्हेशन कोड टाकावा लागतो आणि मग तुमचा फोन सुरु होतो. म्हणजे तुमच्या फोनचा आयएमआयई क्रमांक त्यांच्याकडे नोंदला गेलाय. भविष्यात त्या पोर्टवरुन इतर कार्ड टाकुन फोन चालणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे तोच नंबर त्याच फोनमधे वापरावा लागेल. जर दुसरा वापरायचा असेल तर अनलॉक किंवा कंपनीची परवानगी लागु शकते अशी शक्यता आहे . चार महिन्यानी बंद करता येणार नाही. आणि जर बंदच करायचा झाला तर रिलायन्स तुमच्याकडे मागच्या काळाचं बील मागु शकते. आपल्या महागड्या हॅंडसेटपेक्षा त्याचं बिल जास्त आलं नाही म्हणजे मिळवली.कारण यावेळीही सरकार त्यांच्या पाठीशी आहे आणि रिलायन्स बिलाच्या बाबत फार बदनाम आहे. त्यांचाच फोन घेवुन चार महिने वापरुन मग नंतर नसेल परवडत तर हॅंडसेट चे पैसे अक्कलखाती टाकुन फुकट डाटा वापरायचा असेल तर हरकत नाही. नाहितर नेहेमीप्रमाणे रिलायन्स च्या जाळ्यात अडकुन "नाटक फुकट ,थेटर बाहेर पडायचे १०० रु " असला प्रकार होवु नये म्हणजे झालं ........................
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
अ
अभ्या.. Fri, 09/02/2016 - 19:54 नवीन
हे जराजरा खरं वाटतय बरं का. चंबा कवाबवा मुद्द्याचे बोलतीय. तर मी १ म्हैन्यापूर्वी जिओ घेतले विथ एल्वायेफ हॅन्डसेट. त्याच्या वायफायवर सगळे पीसी, लॅपटॉप, मोबाईल वापरतो. स्पीड समाधानकारक. जवळपास ५ एमबीपीएस. ऑक्टो एन्ड पर्यंत फ्री डेटा असे बोललेले त्यावेळी. आता डिसेंबरपर्यंत आहे. माझ्या एका म्हैन्याच्या डेटा खर्चात पाच महिने मिळाले. प्लस पीस ला पीस अँड्रोईड आहेच. आता एक सीम घ्यावे म्हणून मी रिला. डिजीटल स्टोअर ला गेलो. तो म्हणाला सगळे जिओ अ‍ॅप डाउनलोड करा. त्यत माय जिओ आणि जॉइन जिओ असतात. त्यातून क्युआर/बार कोड मिळेल. तो दाखवा आणि सीम न्या. ते अ‍ॅप सुरुवातीला २० एम बी दाखवतत. डाउनलोडिंग पूर्ण झाल्यावर ४०० च्या आसपास एमबी होतात. तेवढे करताच माझा फोन हँगला. आधीचे आयडीया चक्क बंद. कॉलिंग नाही की कांड्या दिसेनात. शेजारीच आयडीया स्टोअर होते. तेथे विचार्ल्यावर तो म्हणे की रिलायन्सचे अ‍ॅप्स फोनचे सेटिंग बदलतात. ते इतर कंपन्याना न चालणेबल होतात. ते आधी अनैन्स्टोल करा. तेवढे केल्यावर आणि फोन रिस्टोअर केल्यावरच (२ दिवसाचा नवा अस्ल्याने केला) आयडीया पूर्ववत चालू झाले. असल्या काड्या ह्यापुढे मला तरी झेपणार नाहीत सो.. रामराम जिओ. अगदी रुळल्यानंतर पहाता येईल. तोपर्यंत हॉटस्पॉटचे नेट वापरणारच. आयडीया व्होडाफोनवाले सुधरले तरी बरेच आहे म्हणा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई
च
चंपाबाई Fri, 09/02/2016 - 21:34 नवीन
ते मला व्हाट्सपवर आले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
स
सुबोध खरे Sun, 09/11/2016 - 17:41 नवीन
ते मला व्हाट्सपवर आले. म्हणजे व्हॉट्स ऍप वर आलेले "काहीही" प्रतिसाद म्हणून चालेल म्हणता? नक्की ना ? लक्षात ठेवू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई
श
श्री गावसेना प्रमुख Sun, 09/11/2016 - 13:59 नवीन
ते सीम तुमच्या मोबाईल मधे घातलं की पहिले तुमचे मोबाईल मधे त्याचे अॅप्लिकेशन डाउनलोड करावं लागतं. त्यात तुम्हाला आलेला अॅक्टिव्हेशन कोड टाकावा लागतो आणि मग तुमचा फोन सुरु होतो. म्हणजे तुमच्या फोनचा आयएमआयई क्रमांक त्यांच्याकडे नोंदला गेलाय. भविष्यात त्या पोर्टवरुन इतर कार्ड टाकुन फोन चालणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे तोच नंबर त्याच फोनमधे वापरावा लागेल. जर दुसरा वापरायचा असेल तर अनलॉक किंवा कंपनीची परवानगी लागु शकते अशी शक्यता आहे . चार महिन्यानी बंद करता येणार नाही. आणि जर बंदच करायचा झाला तर रिलायन्स तुमच्याकडे मागच्या काळाचं बील मागु शकते. चम्पाबाइ तुम्हि तद्दन खोटी माहीती देत आहात,तुम्ही अगदि जिओ चे सिमकार्ड काढुन फेकुन दिले तरि LYF चे मोबाइल चालतात.आणी बाकीच्या हँडसेट निर्मात्यांना काय करायच आहे त्यांच्या मोबाईल मध्ये ग्राहक कोनतेही कार्ड वापरेना.असे जर आयएमइआय वरुन जर बाकिच्या सेवा प्रदात्यांची सेवा जर बन्द करता आलि असती तर हा खेळ कधीचा सुरु झाला असता,जास्तीत जास्त काय होइल त्या मोबाइल शिवाय दुसरिकडे स्किम देणार नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई
च
चंपाबाई Sun, 09/11/2016 - 15:18 नवीन
ते मला व्हाट्सपवर आले. त्याची खात्री करुन घ्यायची म्हणूनच इथे टाकले. अशाच प्रकारचा मेसेज व्हाट्सपवर अजुन एका ठिकाणीही आला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख
ह
हेमन्त वाघे Wed, 09/14/2016 - 21:05 नवीन
Reliance telecom आणि Reliance Energy दोन्ही कंपन्या आतून एकच आहेत . खरे तर eliance telecom ची युक्ती आहे कि कि ते आपल्या घरातील विद्युतशक्ती परत Reliance Energy ला पाठवणार आहेत. आणि प्रत्येक घरातून प्र्त्येक्वेलेला अतिशय थोडी जास्तीची वीज घेवून ती परत Reliance Energy च्या ग्रीड मध्ये परत पाठवली जाईल . ज्यांनी Einstin चे सूत्र वाचले असेल त्यांना लगेच कळेल ( E = m c वर्ग ) कि उर्जेचे येका प्रकारातून दुसर्यात हस्तातरण होऊ शकते . डेटा चे प्रसारण म्हणजे उर्जेचाच प्रवास आहे . आणि हा डेटा तर फोनकडून operator कडे हि जात असतो . पण चार्जिंग करताना जो आपण जास्ती वेळ चार्जर लावतो त्यातून , तसेच आपण बोलतो तेव्हा आपल्या फोनची विद्युतशक्ती हि Reliance Energy कडे पाठवली जाईल . असे करणे फक्त Reliance लाच शक्य आहे कारण जगात अशी फक्त येकच कंपनी आहे जी telecom आणि Energy त आहे . जास्ती झालेली वीज ते आपल्याला विकू शकतात किंवा तिचे पेट्रोल मध्ये रुपांतर करू शक्तातात. Energy can neither be created nor destroyed; rather, it transforms from one form to another. - Conservation of energy ) आणि पेट्रो केमिकॅल्स मध्ये कोणती कंपनी आहे - Reliance !!!! Whatsapp वरून
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई
भ
भिंगरी Fri, 09/02/2016 - 15:35 नवीन
पैलवान योगेश्वर दत्तला सुवर्ण पदक मिळू शकत. लंडन ऑलिंपिक मधले सुवर्ण पदक तसेच रजत पदक विजेते उत्तेजक चाचणीत दोषी असण्याची शक्यता.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Fri, 09/02/2016 - 15:39 नवीन
अहो, त्याचं स्वतःचंही पदक अजून कन्फर्म नाही ना? चाचण्यांचे निकाल येतंच आहेत अजून... रजत पदकाचे रद्द होणे कन्फर्म झाले होते दोन दिवसांआधी. आता सुवर्णपण काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भिंगरी
भ
भिंगरी Fri, 09/02/2016 - 15:42 नवीन
हो तेही खरेच. नाहीतर तेलही गेले तूपही गेले आणि........... असे व्हायचे.
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Sat, 09/03/2016 - 08:28 नवीन
रेफ्रीला सुवर्ण पदक मिळायचे !!!!
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Sat, 09/03/2016 - 08:28 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल
अ
अभ्या.. Sat, 09/03/2016 - 09:51 नवीन
हा ना. भारतीय खेळाडूंनो. आलिम्पिकाला जावाच पण त्यापेक्षा चारित्र्य स्वच्छ ठेवा (म्हणजे डोपिंग बिपिंग करु नका). न जाणो कधी पदक मिळेल. थोड्या दिवसानी सोज्ज्वळ टीम ह्यासाठी पण पदक जाहीर होणारे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल
अ
अमितदादा Sun, 09/04/2016 - 09:11 नवीन
काश्मीर मध्ये काळजी करण्यासारखी परिस्थिती निर्माण होत आहे. काश्मीर मध्ये दहशतवाद कमी करण्यामध्ये j&k पोलिसांचा मोलाचा वाटा आहे. काश्मीर पोलिसांचा SOG हे युनिट आर्मी बरोबर प्रत्येक चकमकी मध्ये भाग घेत तसेच स्थानिक गुप्त माहिती गोळा करण्यात SOG चा मोठा वाटा आहे. काश्मीर मधील कायदा सुव्यवस्था सुद्धा सांभाळण्यात यांचा मोठा वाटा आहे. आता हळूहळू काश्मीर पोलिसांच्यात असंतोष पसरत चाललाय, पोलीस घरी जायला सुद्धा भिऊ लागले आहेत. दक्षिण काश्मीर मध्ये तर पोलीस ड्युटी वर जात नाहीत त्यामुळं कायदा सुवस्थेचा ताण CRPF वर येऊन पडला आहे आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीशिवाय त्यांचं काम खूप अवघड होऊन बसलंय. काश्मीर मध्ये 12 कि 14 वर्षानंतर कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी BSF तैनात कारावी लागली आहे. राज्य शासन हे जाणीवपूर्वक inactive झालं आहे. काश्मीर पोलीस असंतुष्ट होणं हि धोक्याची घंटा आहे. http://indianexpress.com/article/india/india-news-india/kashmir-unrest-valley-curfew-police-clashes-protests-3012133/ http://scroll.in/article/814100/why-the-mehbooba-flag-fiasco-is-symbolic-of-the-collapse-of-the-state-machinery-in-kashmir
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sun, 09/04/2016 - 09:34 नवीन
लोकहो, कामावर असतांना प्राणघातक हल्ल्यात दिवंगत झालेले वाहतूक पोलीस विलास शिंदे यांच्या अंत्यसंस्काराची बातमी इथे आहे : http://www.esakal.com/Tiny.aspx?K=JAQUAV प्रकाशचित्र : Image removed. यात शवपेटिका स्पष्ट दिसते आहे. तसेच वार्तेनुसार हा मंत्राग्नी नसून भडाग्नी होता. एव्हढं तपशीलवार वर्णन कशासाठी केलं असावं? खास कारण आहे का? यापूर्वी अशा प्रकारे अनेक पोलीस मृत्युमुखी पडले आहेत. त्यांचे वार्तांकन फारसे होत नसे. म्हणून शंका आली. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sun, 09/04/2016 - 10:28 नवीन
http://m.hindustantimes.com/mumbai-news/maha-second-only-to-up-on-police-deaths-in-2015/story-UyJizsuUa6cdoN9raOFMOL.html पुढील वर्षी निवडणूका आहेत.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 09/04/2016 - 11:13 नवीन
सिधु आता नवीन पक्ष काढतोय. आआप आपल्याला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करेल व बायकोलाही आआपचे तिकीट मिळेल या भरवश्यावर राज्यसभेची खासदारकी सोडणार्‍या सिधुला आआपनेही ठेंगा दाखविलेला दिसतोय. पंजाबी जनता बहुतेक त्याला पहिल्याच चेंडूवर शून्यावर त्रिफळाबाद करेल. एकंदरीत त्याची अवस्था 'तेल गेले, तूप गेले, हाती राहिले धुपाटणे' अशी होताना दिसतेय. http://www.ndtv.com/india-news/navjot-sidhu-to-join-new-party-awaz-e-punjab-to-be-launched-next-week-1453715
  • Log in or register to post comments
च
चंपाबाई Sun, 09/04/2016 - 11:20 नवीन
आणि असा हुश्श्शार माणूस एकेकाळी भाजपात होता म्हणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
च
चंपाबाई Sun, 09/04/2016 - 11:22 नवीन
मोदीनी जिओची जाहिरात केली म्हणे ... डिजिटल इंडियाचा भाग म्हणून. पण हे चायनामेड आहे म्हणे .. मग मेक इन इंडियाचे काय होणार ?Image removed.
  • Log in or register to post comments
च
चंपाबाई Sun, 09/04/2016 - 16:13 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई
च
चंपाबाई Mon, 09/05/2016 - 17:26 नवीन
लिट्टी चोखा खात मुख्यमंत्री फडणवीस उद्गारले ... मुंबैच्या प्रगतीत यूपी बिहारवाल्यांचे मोठे योगदान आहे. .... चंपाबाई वेटींग फॉर बकरी ईद ...
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Mon, 09/05/2016 - 17:30 नवीन
चंपाबाई, म्हणजे वाजवु का ?
  • Log in or register to post comments
च
चंपाबाई Tue, 09/06/2016 - 15:28 नवीन
नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
अ
अमितदादा Mon, 09/05/2016 - 19:56 नवीन
मालदीव च हिंदी महासागर मध्ये स्ट्रॅटेगिक दृष्ट्या असणार महत्व खालील लेखात उत्तमरीत्या नमूद केलं आहे. भारत समर्थक मोहम्मद नाशिद यांची उचलबांगडी होऊन सुद्धा भारताने मालादिव बरोबर सलोख्याचे संबंध ठेवले आहेत, कारण चीन चा वाढता प्रभाव थांबवणे. 2015 साली मालदीव ने आपली घटना बदलून मालदीव मधील जमीन परदेशी व्यक्ती किंवा संस्था विकत घेऊ शकते अशी तरतूद केली. हि तरतूद भविष्यात चीन च्या नौदलाचा स्थळ स्थापण्याची तयारी नाही ना याची चर्चा भारतीय विश्लेषकात आहे. The Maldives Takes Its Place in Indian Ocean Geopolitics भारताने हि मोहम्मद नाशिद बरोबर नवीन खेळ खेळाय सुरुवात केलीय, नाशिद गुप्तरित्या श्रीलंकेत येऊन गेले हे वाचले आहे. पाहूया पुढं काय होतंय ते.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा