ताज्या घडामोडी :भाग २
पाकव्याप्त काश्मीरही भारताचेच आहे अशी डरकाळी फोडून नरेंद्र मोदींनी आपण एक कणखर पंतप्रधान असल्याचे सूचित केले, त्याच बरोबर गिलगिट बालटीस्थानात जनभावना उसळल्याने पाकिस्तानचे जरा कठीणच झाले आहे, भारतीय यंत्रणा योग्य काम करत असल्याचे हे चिन्ह समजावे काय?
मुकेश अंबानींनी रिलायन्सच्या सर्व कर्मचाऱ्यांना जिओ सोडून इतर सर्व्हिस प्रोव्हायडर वापरू नये असे सांगितले आहे. एच आर कडून तसे लिखित आदेश सुद्धा दिले गेले आहेत.तुम्ही फक्त आणि फक्त MS Office वापरून जे काही काम असेल ते करायचे. कोरल ड्रॉ, फोटोशॉप किंवा आणखी तुम्हाला आवडतील ती सॉफ्टवेअर्स वापरायची नाहीत. ही "सक्ती" चुकीची आहे असे माझे आणि मास्तरचे मत आहे.सॉफ्टवेअर विकसनाला डोके फ्रेश असावे म्हणतात मग खरेतर पोरांना हाफचड्डी सुद्धा अलौड कराय हवीप्रॉडक्ट बेस्ड कंपनी आणि सर्विस बेस्ड कंपनीतला हा मूलभूत फरक असतो. मी काम केलेल्या एका कंपनीत ८ तासाचे बंधन नाही, फुल / हाफचड्डीचे बंधन नाही. चप्पल बुटाचे बंधन नाही. तेच आधीच्या एका कंपनीत मंगळवारी टाय कंपल्सरी होता.