Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळावर भारताचा हल्ला

श
श्रीगुरुजी
गुरुवार, 09/29/2016 - 11:46
🗣 290 प्रतिसाद
वेगवेगळ्या वाहिन्यांवरील वृत्तानुसार व वेगवेगळ्या संकेतस्थळांवरील बातमीनुसार भारतीय सैन्याच्या तुकड्यांनी आज पहाटे भारत व पाकिस्तानमधील नियंत्रण रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मीरमधील काही अतिरेकी प्रशिक्षण केंद्रांवर हल्ला करून काही अतिरेकी व सैनिकांना मारून भारतीय सैनिक सुखरूप भारतीय प्रदेशात परतले. काही वाहिन्यांवरून ५ अतिरेकी प्रशिक्षण केंद्रांवर हल्ले केले असे सांगण्यात येत आहे. काही वाहिन्या हीच संख्या ६ व ७ असे सांगत आहेत. आपले २ सैनिक मारले गेले व काही जखमी झाले असे पाकिस्तानने जाहिररित्या मान्य केले आहे. परंतु भारताने सीमारेषा ओलांडलेली नाही असा त्यांचा दावा आहे. या हल्ल्यात भारतीय सैनिकांनी ३०-३५ अतिरेकी मारले असेही आकडे वाहिन्यांवरून सांगण्यात येत आहे. एकंदरीत प्रत्येक वृत्तसंस्था वेगवेगळे आकडे सांगत आहे. इंडियन एक्स्प्रेसमधील वृत्तानुसार, (http://indianexpress.com/article/india/india-news-india/india-conducted-surgical-strikes-last-night-in-pok-to-safeguard-our-nation-defence-ministry-3055715/) ndia conducted surgical strikes last night along the LoC to safeguard our nation, the Defence Ministry said on Thursday. “Significant casualties have been caused to terrorists and those trying to shield them. We don’t have a plan to further conduct such strikes. India has spoken to Pakistan,” DGMO Lt Gen Ranbir Singh said. “… Now, based on very specific and credible information we received yesterday, that some terrorist teams had positioned themeselves at launch pads along the LoC with an aim to carry out infiltration and terrorist strikes in J&K and various other metros in our country. There were launch pads at the LoC where terrorists were present waiting to infiltrate the nation and attack areas in Kashmir and metros across the country,” the DGMO said. No Indian casualties occurred during the surgical strikes that were carried out last night by the Indian Army. Meanwhile, Pakistan, in a statement issued has said: At least two Army men were killed as Indian and Pakistani troops exchanged fire over the Line of Control in “Azad Jammu and Kashmir”. The exchange of fire began at 2:30am, ISPR said, and continued till 8:00am. “Pakistani troops befittingly responded to Indian unprovoked firing on the LoC in Bhimber, Hotspring Kel and Lipa sectors,” the statement said. दोनच दिवसांपूर्वी अमेरिकेचे मंत्री जॉन केरी यांनी सुषमा स्वराजांची २ वेळा भेट घेऊन "पाकिस्तानबरोबरील वाद चिघळवू नका" असा सल्ला दिला होता. या सल्ल्यानंतर दोनच दिवसात हा हल्ला झाल्यामुळे भारत या हल्ल्याची तयारी करीत आहे असा अमेरिकेला अंदाज आलेला असावा. या हल्ल्याची व्याप्ती वाढली तर त्याचे छोट्या युद्धात रुपांतर होऊ शकते व त्यामुळे अमेरिकेच्या भारतीय उपखंडातील हितसंबंधावर परीणाम होऊ शकतो. म्हणूनच केरी यांनी जाहीररित्या हा सल्ला दिला असावा. http://indianexpress.com/article/india/india-news-india/india-pakistan-situation-relations-saarc-cancel-indus-water-kerry-sushma-swaraj-uri-3055405/ _________________________________________________________________________ असे हल्ले करण्याशिवाय भारताकडे पर्यायच शिल्लक नव्हता. आपली वाट लागली तरी चालेल, पण भारताला सुखाने जगू द्यायचे नाही हा विडा उचललेल्या पाकिस्तानला इतर कोणत्याही मार्गाने थोपविण्याचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले आहेत. पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदी, संयुक्त राष्ट्रसंघात पाकिस्तानवर टीका, ट्रॅक २ डिप्लोमसी, पीपल-टू-पीपल कॉंटॅक्ट, बस-ट्रेन सेवा, मोस्ट फेवर्ड नेशन दर्जा, भूतकाळातील सर्व युद्धात झालेले पराभव . . . अतिरेक्यांना प्रशिक्षण देऊन व शस्त्रे व इतर सर्व तर्‍हेची मदत देऊन भारतात पाठवून दहशतवादी कारवाया घडवून आणणे व अतिरेक्यांना आपल्या देशात आश्रय देण्याचे धोरण पाकिस्तान बदलायला तयार नाही. त्यामुळे जशास तसे उत्तर देणे हा एकमेव पर्याय शिल्लक होता. आधी पठाणकोट हल्ला आणि आता झालेला उरी हल्ला यामुळे मोदींना जोरदार टीकेचा सामना करावा लागला. आपल्यात व आधीच्या सरकारमध्ये काहीच फरक नाही, आपण नुसते बोलघेवडे आहोत इ. स्वरूपाच्या टीकेमुळे मलीन झालेली आपली प्रतिमा बदलण्यासाठी हा हल्ला करणे आवश्यकच होते. परंतु असे हल्ले करून शत्रूला जरब बसविण्यामागे जी प्रगल्भता लागते ती अजूनही भारताकडे आलेली दिसत नाही. मागील वर्षी आणि परत यावर्षी सुद्धा भारतीय सैन्याने म्यानमारमध्ये प्रवेश करून फुटीरतावाद्यांना मारले होते. सिंधू पाणीवाटप करार रद्द करावा यासाठी चर्चा सुरू आहे. आणि आता आज पहाटे हा हल्ला झाला. या प्रत्येक घटनेनंतर प्रकर्षाने दिसतोय तो प्रसिद्धीचा उतावीळपणा. असे हल्ले गुपचूप करून हल्ले केल्यावरसुद्धा त्याची जाहिरात किंवा गाजावाजा केला नाही तर ते योग्य ठरेल. गतवर्षी म्यानमारमधील कारवाईनंतर लगेच लष्कराने पत्रकार परीषद घेऊन हल्ल्याची माहिती दिल्यावर लगेच म्यानमारने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. अतिरेकी किंवा शत्रूच्या सैनिकांवर ज्या कारवाया केल्या जातात त्याची वाच्यता करण्याची गरज नाही. जुलैमध्ये सुरक्षा दलांनी काश्मिरमध्ये अतिरेकी बुर्‍हान वाणीला मारल्यानंतर लगेच ते जाहीर केले होते. त्यामुळे काश्मिरमध्ये जनतेला भडकावण्यात येऊन आजही तिथली परिस्थिती अशांत आहे. बुर्‍हान वाणी ७-८ महिने फरारी होता. त्याला मारल्यानंतर ते जाहीर न करता त्याचा अंत्यविधी गुपचुप उरकला असता तर तो मेल्याचे बाहेर समजले नसते व त्यामुळे पुढील समस्याही निर्माण झाल्या नसत्या. निदान भविष्यात तरी अशा कारवाया शेवटपर्यंत गुपचूप ठेवल्या तर नवीन समस्या निर्माण होणार नाहीत. आजच्या कारवाईची जाहीर माहिती देऊन मोदी सरकारला आपली प्रतिमा उजळून घेण्यास मदत झाली असेल. परंतु त्यातून जिन्गोइझम निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. आता पुढील काही दिवसात अत्यंत बेजबाबदार वाहिन्यांवरून वेगवेगळ्या पक्षांचे प्रतिनिधी व माजी लष्करी अधिकारी एकत्र बोलावून चर्चांचा कीस पाडला जाईल. भाजपचे प्रवक्ते स्वतःची पाठ थोपटून घेतील व काँग्रेसमध्ये असे करायची हिम्मतच नव्हती असे टोमणे मारतील. काँग्रेसवाले बांगलादेश मुक्तीचे उदाहरण देऊन आम्हीचे कसे ग्रेट होता व आमच्या काळातसुद्धा अशा कारवाया होत होत्या, पण आम्ही जाहिरातबाजी करीत नव्हतो असे प्रत्त्युत्तर देतील. यातून युद्ध होऊन दोन्ही देशातील नागरिकांना त्रास होईल व म्हणून अशा हल्ल्यांऐवजी चर्चा करावी असा सल्ला पाकिस्तानप्रेमी निधर्मांध देतील (मराठी वाहिन्यांवर प्रकाश बाळ, जतीन देसाई, हेमंत देसाई इ. मंडळी यात आघाडीवर असतील). भारताने काय करायला हवे याबाबत अनेकांचे सल्ले सुरू होतील. एकंदरीत पुढील काही दिवसात वाहिन्यांवरून प्रचंड धुरळा उडणार आहे. आज झालेल्या हल्ल्यामुळे पाकिस्तान वठणीवर येईल व भारतावर हल्ले थांबवेल असे मानणे भाबडेपणाचे ठरेल. भारताने अशा कारवाया सुरूच ठेवाव्यात, परंतु त्याचा गाजावाजा करू नये.

प्रतिक्रिया द्या
72104 वाचन

💬 प्रतिसाद (290)
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 09/29/2016 - 12:10 नवीन
असे हल्ले करून शत्रूला जरब बसविण्यामागे जी प्रगल्भता लागते ती अजूनही भारताकडे आलेली दिसत नाही.
????
  • Log in or register to post comments
न
नाखु गुरुवार, 09/29/2016 - 12:28 नवीन
त्यांनी हल्ले करू नयेत असे म्हटले नाही तर त्याचा गाजावाजा कम बोभाटा करू नये पाहिजे तर बी सी सी आय धोरणासारखे चार पाच महिन्यानंतर कुठेतरी सांगावे.. अत्ताच नाही सांगीतले तर बघा नमो पण ममो सारखे आहेत असे म्हणणार. सांगीतले तर हा वांधा .. गुरुजी यात माध्यमांची आणि विचारवंताची प्रगल्भता हा मुद्दा असला पाहिजे.लोकांची स्मरणशक्ती जास्ती तीव्र नसते. पण विचारवंत आणि दांडकेवाले (वाहिनीलोलुप) यांना टी आर पी साठी भणंग+वाचाळ (अगदी काटजू पासून राणे पर्यंत हवे असतात) ते बरळणार आणि तारे तोडणार आणि लोकांना बसल्या जागी करमणूक करणार.

आप्ल्या मिपावरच किती मिपाकरांनी गेल्या १० वर्षात वर्तमानपत्रातील चांगल्या लेखा वर किंवा लेखमालेवर चर्चा केली आहे?. मते मांडली आहेत ? शिफारस केली आहे पण एखाद्या उठवळ/सवंग विषयावर पाने न पाने खर्ची पडली आहेत. सगळेच फक्त वाईट घडत आहे असे समजणे जसे निराशा/वैफल्यग्रस्तेचे लक्षण आहे तसे सगळे फक्त चांगले चालत/घडत आहे असे समजणे हे ही आंधळेपणाचे लक्षण सत्य हे कायम या दोन्हींच्या मध्ये (कुठेतरी) असते आणि ते दुस्र्या बाजूकडे जास्त असावे अशी आपली वागणूक असावी.

ल.तों.मो.घा.बद्दल क्षमा. मिपा नितवाचक नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
म
महासंग्राम गुरुवार, 09/29/2016 - 12:16 नवीन
आखिर केहना क्या चाहते हो गुरुजी
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य गुरुवार, 09/29/2016 - 12:28 नवीन
आज झालेल्या हल्ल्यामुळे पाकिस्तान वठणीवर येईल व भारतावर हल्ले थांबवेल असे मानणे भाबडेपणाचे ठरेल. भारताने अशा कारवाया सुरूच ठेवाव्यात, परंतु त्याचा गाजावाजा करू नये. पाकीस्तान सुधरेल अशी अपेक्षा नाहीच. ह्या हल्याचा मुख्य उद्देश भारताचा संयम संपलाय अन भारत आता सीमा ओलांडुन दहशतवाद्यांना मारेल हा संदेश जगाला देणं हा असेल असं मला वाटतंय. आतापोतुर असं काही आपण करत नव्हतो.
  • Log in or register to post comments
म
मास्टरमाईन्ड गुरुवार, 09/29/2016 - 12:30 नवीन
पाकीस्तान सुधरेल अशी अपेक्षा नाहीच. ह्या हल्याचा मुख्य उद्देश भारताचा संयम संपलाय अन भारत आता सीमा ओलांडुन दहशतवाद्यांना मारेल हा संदेश जगाला देणं हा असेल असं मला वाटतंय
+१११११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य
अ
अनिरुद्ध.वैद्य गुरुवार, 09/29/2016 - 12:32 नवीन
कितपत हल्ले केले तर पाकिस्तान प्रत्युत्तर देणार नाही, ह्याची चाचपणी करणे अन कितपत हल्ला झाला तर त्याच पर्यावसान फुलस्केल वॉरमध्ये होईल ह्याचा अभ्यास करणे हे उद्देशही असु शकतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य
म
मास्टरमाईन्ड गुरुवार, 09/29/2016 - 12:45 नवीन
"आमच्याकडे पण शस्त्रं आहेत आणि ती आम्ही वेळ आल्यावर वापरूही शकतो" असा संदेश पाकिस्तान, त्यांचे पाळीव अतिरेकी आणि इतर सर्व जगाला देण्याचा पण हेतू असू शकतो. कदाचित अजूनही काही वेगळं कारण असू शकेल. बाकी टुकार दर्जाच्या भिकार चॅनल्स वर होणार्या तथाकथित लोकांना घेऊन होणार्या चर्चा, polls इ. ची काळजी सरकार चालवणारे करत असतील असं वाटत नाही. (आणी पूर्वीही करत नव्हते).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य
प
प्रसाद_१९८२ Sun, 10/02/2016 - 12:07 नवीन
+१००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य
म
मदनबाण गुरुवार, 09/29/2016 - 12:35 नवीन
मी काय म्हणतो... कशाला ते युद्ध करायचे ? अर्थव्यवस्थेला फटका बसेल, बॉलिवुडला फटका बसेल, मेणबत्ती मोर्चे काढता येणार नाही,व्यापर-व्यवसाय करणार्‍यांचे नुकसान होईल इं इं इं... आपल्या घरचे कोणी ठार झाले नाही ना ? मग बस्स झाले... आपण बरे आणि आपली अत्यंत स्वार्थी कातडी बरी ! मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- दिल ले डूबा मुझको अराबिक आँखों में आज लूटा लूटा मुझको फ़रेबी बातों ने... :- AIRLIFT
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य गुरुवार, 09/29/2016 - 12:37 नवीन
लगेच आता लोक्स मार्केट कसं आपटलं अन रुप्या कसा रसातळाला गेला ३६ पैसयानी ह्याबाबत गळे काढायला सुरुवात करतील!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
क
कलंत्री गुरुवार, 09/29/2016 - 12:43 नवीन
गुरुजी यांनी फारच चांगली सूचना केली आहे. बोभाटा करु नका. शांतपणे कारवाई करा. नेत्यांच्या प्रतिमेपेक्षाही काही महत्वाचे असतेच.
  • Log in or register to post comments
A
alokhande गुरुवार, 09/29/2016 - 12:43 नवीन
पितृपक्षातल्या चतुर्दशीलाच सीमोल्लंघन करुन पराक्रम जगाला दाखवणारे आमचे भारतीय सैन्य; आणि त्यांच्या पाठीशी खंबीर उभे असणारे मोदी सरकार ! समस्त भारतीय जनतेचा तुम्हाला पाठींबा आहे ! भारत माता की जय ! वंदे मातरम्
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी गुरुवार, 09/29/2016 - 12:58 नवीन
मला असं वाटत कि, बाहेर जाऊन हल्ले वगैरे करण्यापेक्षा (म्हणजे आता जे आर्मी ने केले त्याच्या विरोधात मी नाही, हे व्हायलाच हवे होते आणि जे केले ते योग्यच केले याच मताचा मी आहे. हि काळाची गरज आणि योग्य सुरवात आहे.) , आपले घर आणि घराचे कुंपण जास्त सुरक्षित करावं. अमेरिकेवर ९/११ नंतर कुठला हल्ला झाला? कारण त्यांनी त्यांच्या बॉर्डर सील केल्या आणि अतंर्गत सुरक्षा आधिक कडक केली. तसचं भारतालाही करणे शक्य आहे कि नाही? त्याच बरोबरीने भारतीय लष्कराने broken earth policy (मराठी शब्द??) लागू करावी. या पॉलीसी अंतर्गत, पाकिस्तानशी सर्व प्रकारचे संबंध तोडून टाकावेत, त्यात कला, क्रिडा, व्यापार, परराष्ट्रीय, लष्करी, नैसर्गिक संसाधने इ. इ. सर्व आले. जणू काही पाकिस्तान नावाचा देशच या जगाच्या नकाशावर नाही. असे समजून चालावे. पाकिस्तान किंवा इतर कोणिही ज्या ज्या मार्गांनी म्हणून घुसखोरी करु शकतात ते सर्व मार्ग सील करुन तिथे सुरक्षा अत्यंत कडक आणि निर्दयी असावी. तिथे कुठलाही आणि कोणाचाही मुलाहिजा ठेवण्यात येऊ नये. असे झाले तर घुसखोरी, आतंकवाद वगैरे काही त्रास राहणारच नाही किंवा किमान त्याची तीव्रता अत्यंत मोठ्याप्रमाणात कमी करता येईल. अर्थात हे सगळ करण प्रॅक्टिकली फार म्हणजे फारच अवघड आहे. आणि भारतासारख्या राष्ट्राला तर नक्कीच अवघड आहे. पण युध्द टाळण्याचा आणि तरीही पाकिस्तानला नामोहरम करण्याचा हा एक प्रभावी उपाय ठरु शकतो. मला फार अक्कल नाही या विषयात पण एक सामान्य नागरीक म्हणून मला असं वाटतयं.
  • Log in or register to post comments
म
मास्टरमाईन्ड गुरुवार, 09/29/2016 - 13:29 नवीन
मग मानवी हक्कांचं काय?
पाकिस्तान किंवा इतर कोणिही ज्या ज्या मार्गांनी म्हणून घुसखोरी करु शकतात ते सर्व मार्ग सील करुन तिथे सुरक्षा अत्यंत कडक आणि निर्दयी असावी. तिथे कुठलाही आणि कोणाचाही मुलाहिजा ठेवण्यात येऊ नये.
छे छे छे.... मानवी हक्कांची पायमल्ली होईल असं कसं करायचं ब्वॉ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी
द
दिगोचि Fri, 09/30/2016 - 06:57 नवीन
फक्त एक शन्का आहे ती अशी आपली बॉर्डर सील करणे शक्य आहे का? अजून नागरीकामधे देशाविषयी फार भक्ती दिसत नाही असती तर आपण जे वाहतुकीचे किम्वा इतर नियम सतत मोडले नसते. देशात लाखो नागरीक असे आहेत की त्याना पाकिस्तानविषयी भारतापेक्शा जास्त प्रेम आहे. यात अनेक नेते पण आहेत. यानी इतकी वर्षे लष्कराला अत्याधुनिक शस्त्रे घेउ दिली नाहीत. अजुन सैन्याकडे जुनाट बन्दुकाच आहेत. ङेल्या आठवड्यतल्या बातमीप्रमाणे त्यानी आत्ता नव्या आधुनिक बन्दुका कुठे मिळतील हे शोधायला सुरवात केली आहे म्हणजे दोन-तीन वर्षे सहज जातील व अनेक जनरलसाहेब त्यातील कोत्यवधी पैसे खातीलच. अशी आपली परिस्थिती आहे. शेवटी मी कोणत्याही पक्शाचा भक्त किम्वा वैरी नाही हे नमुद करू इच्चितो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी
अ
अभ्या.. गुरुवार, 09/29/2016 - 13:22 नवीन
शब्बास रे वाघांनो, गपचीप करा, सांगून करा, पब्लिकला झाला तर नॅशनल इंटरनॅशनल त्रास भोगू दे काही काळ पण... हाणा तिज्ययला. हाणा असेच भोसडीच्याना.
  • Log in or register to post comments
स
संजय पाटिल Fri, 09/30/2016 - 07:08 नवीन
हेच म्हंटलो होतो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
स
सचु कुळकर्णी गुरुवार, 09/29/2016 - 13:35 नवीन
सहमत रे अभ्या
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ गुरुवार, 09/29/2016 - 13:51 नवीन
भारतीय सैन्याचे व भाजपा सरकारचे हार्दिक अभिनंदन. अतिरेकी किंवा शत्रूच्या सैनिकांवर ज्या कारवाया केल्या जातात त्याची वाच्यता करण्याची गरज नाही. याच्याशी सहमत नाही. उलट ह्या कारवाईचे व्हिडीओ शुटींग भारतीय सैन्याने केलेय, असे वाचले. ते व्हिडीओ शुटींग सरकारने सर्व प्रसारमाध्यमांत व्हायरल करुन टाकायला हवे. दरवेळी अश्या कारवाई नंतर पाकिस्तान असे काही झालेच नाही वगैरे रडगाणे सुरु करतो ते व्हायचे देखिल बंद होईल.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे गुरुवार, 09/29/2016 - 15:20 नवीन
श्रीगुरुजींशी सहमत. पण त्याच वेळी अतिशय हुशारीने पाकव्याप्त जमीनीवर, नियंत्रण रेषेच्या जवळ हल्ले करुन जगात व भारतीयांत योग्य संदेश पोचवल्याबद्दल सरकार व सेनेचे खूप खूप आभार. मनोबल उंचावण्याबद्दल काही दिवस आधी बोललो होतो. ती अपेक्षा पूर्ण झाली. अशा दोन चार सर्जिकल ऑपरेशन्सनी भारतासाठी देशातले किंवा जागतिक वातावरण बिघडावे असे काही घडण्याची शक्यता नाही. गालावर चापट मारल्यावर माणूस मरत नाही पण त्याला योग्य ती समज मिळते. अशा ऑपरेशन्स मधून योग्य तो धडा त्या त्या पार्टीला मिळाला असावा अशी अपेक्षा आहे. अशी ऑपरेशन्स सरकारच्या कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय लष्कराला करायची कायमची परवानगी असावी असे माझे मत आहे. त्याबद्दल जाहिर वाच्यता केली नाही तरी चालेल. कदाचित असे घडतही असेल. अवांतरः कदाचित कळण्यास किंवा समजून घेण्यास आत्ता कठिण जाईल पण माझा दुसरा मुद्दा असा होता की एखाद्या घटनेला मिळणारी न्यूजवॅल्यू सदर घटनेबद्दल जी प्रतिमा निर्माण करते त्याने फार परिणाम होतो. उरी किंवा पठाणकोटचे हल्ले देशपातळीवर मोठ्या प्रमाणात गाजवले गेले त्यामुळे त्याबद्दलचे शल्य, दु:ख, बोच फार मोठी होती. अशाच प्रकारचे हल्ले जेव्हा नक्षलवादप्रभावित भागांमधे होतात व अनेक पोलिस, निमलषकरी दलाचे सैनिक शहिद होतात तेव्हा ती बातमी परिणाम देईल अशी पसरवली जात नाही. त्यामुळे अशा हल्ल्यांमधे होणार्‍या जीवितहानीचे शल्य, बोच सामान्य जनमानसात नाही असे जाणवते. दुसरे असेही की शत्रूराष्ट्राने केलेल्या हल्ल्यात हानी झाली तर आत्मसन्मानास ठेच लागत असावी. माझे यावर असे मत होते की जरी आपले सैनिक शहिद होत असतील तरी त्या बातम्या जनसामान्यांचे मनोबल खच्ची होणार नाही ह्या पद्धतीने प्रसारित कराव्यात. अन्यथा जिन्गोइजम उफाळून येतो व भावनाविवश जनतेच्या दबावाखाली सरकारला धोकादायक किंवा अविचारी कृती करायची गरज पडू शकते. हा परिच्छेद आत्ताच्या सरजिकल ऑपरेशनबद्दल नाही हे समजून घ्यावे. उरी हल्ल्याच्या वेळेस हे विचार आले होते, तेव्हा लिहू शकलो नाही म्हणून आता लिहिले. दुसरे अवांतर असे की मानव अधिकारांबद्दल अनेक प्रतिसाद दिसत आहेत, म्हणजे मानवीहक्कसमर्थकांची खिल्ली उडवली जात आहे. माझ्यामते मानवाधिकाराबद्दल काहीही लिहिण्याआधी ती संकल्पना समजून घेणे आपल्यासाठीच आवश्यक आहे. मानवाधिकार ही संकल्पना स्टेट-स्पॉन्सर्ड-अ‍ॅक्शनच्या (पोलिस, सैन्य, सरकारी अधिकारी) सामान्य नागरिकांवर होणार्‍या परिणामाबद्दल आहे. दहशतवादी किंवा इतर समाजकंटक ह्यांच्या कृतीचे परिणाम व त्याबद्दलची मीमांसा मानवाधिकाराच्या कक्षेत येत नाही. कटू असले तरी हे सत्य व सर्वमान्य आहे. हे समजून घेणे गरजेचे आहे. 'सरकार'तर्फे कोणत्याही नागरिकावर तो अगदी खूनी, बलात्कारी, दहशतवादी, माथेफिरु असला तरी अन्याय होऊ नये अशी ती संकल्पना आहे, त्याने केलेल्या गुन्ह्याबद्दल सरकार नव्हे तर 'तटस्थ' अशी न्यायपालिका न्याय करण्यास नेमलेली आहे. सरकारी बळाचा सामान्य नागरिकांवर कोणी गैरवापर करु नये असा त्यामागे विचार आहे. (प्रत्यक्षात असे होते असे म्हणवत नाही हा भाग वेगळा)
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा गुरुवार, 09/29/2016 - 15:51 नवीन
सुरूवातीच्या हल्याची बातमी जगाला देणे ही राजकीय अपरिहार्यता होती. सबब बातमी जाहीरपणे देणे बरोबर. पुन्हा वारंवार आता दहशती तळांवर हल्ली करण्याची आमची मानसिकता तयार झाली आहे हा संदेश पाकिस्तानला गेला आहे व पाकचे दोन बाप अमेरिका व चीन यानाही. पुन्हा असे ऑपशेशन झाल्यास त्याचा पुसटसा उल्लेख ही कुठे केला जाणार नाही याची मला खात्री वाटते. लोकांमध्ये उन्माद किंवा क्षोभ निर्माण न होण्याची काळजी लष्कर व सरकार घेईलच.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 09/29/2016 - 16:00 नवीन
सुरूवातीच्या हल्याची बातमी जगाला देणे ही राजकीय अपरिहार्यता होती. सबब बातमी जाहीरपणे देणे बरोबर. पुन्हा वारंवार आता दहशती तळांवर हल्ली करण्याची आमची मानसिकता तयार झाली आहे हा संदेश पाकिस्तानला गेला आहे व पाकचे दोन बाप अमेरिका व चीन यानाही. पुन्हा असे ऑपशेशन झाल्यास त्याचा पुसटसा उल्लेख ही कुठे केला जाणार नाही याची मला खात्री वाटते.
सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
झ
झेन गुरुवार, 09/29/2016 - 16:06 नवीन
वाहिन्यांचा उथळपणा थांबवला पाहिजे. एका वाहिनीवर प्रतिनिधी विचारत होता कि अश्या वेळी व्यूहरचना कशी असते, कुठली हत्यारे वापरतात असे अनेक संवेदनशील प्रश्न. बाकी गेम मस्तच म्हणजे पाकिस्तान असे ऑपरेशन झाले हे मान्य करू शकत नाही कारण अतिरेक्यांचे कँप चालवल्याची जाहीर कबुली आणि कांगावा पण करू शकत नाही.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे गुरुवार, 09/29/2016 - 16:13 नवीन
वाहिन्यांच्या उथळ प्रश्नांना अगदी सत्य आणि व्यवस्थित उत्तरे दिली गेली पाहिजेत, म्हणजे बॉर्डर चित्रपटांत वापरली गेलेली शस्त्रे व त्यांची माहिती, सुनिल शेट्टीने वापर्लेली एमएमजी, त्याची तुटलेली स्प्रिण्ग व तीच्या वेटोळ्यांची संख्या, सनी देओलने केलेली व्यूहरचना, अक्शय खन्ना ने वाप्रलेले वायरलेस फोनयंत्र, ज्याकीस्र्हाफ ने आकाशात फिरवलेली "रातकोउडनहीसकताफेम" विमाने इत्यादी. त्यांना तीच अपेक्षा असते ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झेन
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 09/29/2016 - 16:17 नवीन
ख्या ख्या ख्या...अगदी अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजी हवी असेल तर एलियन टेक्नॉलॉजी आहेच ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
प
प्रसाद_१९८२ गुरुवार, 09/29/2016 - 16:25 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
त
तेजस आठवले गुरुवार, 09/29/2016 - 16:27 नवीन
+1 खुसखुशीत प्रतिसाद. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 09/29/2016 - 17:27 नवीन
=)) =)) =)) वाचण्याच्या ओघात "सनी देओलने केलेली व्यूहरचना" हे "सनी लिओनने केलेली व्यूहरचना" असे वाचले... शप्पत ! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
च
चाणक्य गुरुवार, 09/29/2016 - 18:25 नवीन
'मनी वसे ते प्रतिसादात दिसे' म्हणतात ते काही खोटं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
न
नाखु Fri, 09/30/2016 - 05:07 नवीन
काकांनी उल्लेखलेल्ली व्यक्ती जर व्यूह रचना करणार असेल तर "अश्य्या" हल्यांचीच पाकीस्तानकडूनच मागणी होईल असे वाटते.(आणि हल्यात त्या व्य्क्तीने नेतृत्व केले तर्च आम्ही हल्ला स्वीकारू अशी अट असू शकते. ख खो हल्लेखोर्,शंकेखोर आणि सनी व जाणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चाणक्य
स
सुबोध खरे गुरुवार, 09/29/2016 - 17:02 नवीन
वाहिन्यांचा उथळपणा थांबवला पाहिजे. एका वाहिनीवर प्रतिनिधी विचारत होता कि अश्या वेळी व्यूहरचना कशी असते, कुठली हत्यारे वापरतात असे अनेक संवेदनशील प्रश्न. बहुतांश वाहिन्या आणि त्यांचे पत्रकार यांच्या अगाध ज्ञानाबद्दल जितके कमी बोलावे तितके चांगले. बाकी व्यूहरचना कशी करतात आणि हत्यारे कोणती वापरतात इतके बाळबोध प्रश्न आपण पत्रकारितेत खोल आणि गाढे ज्ञानी आहोत हा दाखवण्याचा प्रयत्न असतो. आणि त्याला जी उत्तरे देतात ती माझ्यासारखा डॉक्टर (न लढणारा सैनिक) सुद्धा देऊ शकेल अशी असतात. त्याचा कोणताही गवगवा होणार नाही अशीच उत्तरे लष्करी नेतुत्व देत असते. त्यामुळे तो विषय संवेदनशील अजिबात नाही हि खात्री बाळगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झेन
स
सुबोध खरे गुरुवार, 09/29/2016 - 16:51 नवीन
सीमा पार करून कार्यवाही करण्याची लष्कराची आणि लष्करी नेतृत्वाची नेहमीच तयारी होती. अशी मानसिक तयारी राजकारण्यांनी दाखविणे आवश्यक होते. ती दाखविल्याबद्दल श्री नरेंद्र मोदी आणि त्यांचे सरकार यांचे मी एक निवृत्त सैनिक म्हणून अभिनंदन करतो. "सज्जनपणा" हा बर्याच वेळेस "भेकडपणा) समजला जातो decency is taken as spinelessness. आतापर्यंत पाकिस्तानी लष्करी आणि मुलकी नेतृत्वाची अशी समजूत होती कि भारतीय नेते कडक आणि भयंकर कडक खलिते देण्यापेक्षा जास्त काही करू शकत नाहीत. या त्यांच्या गोड गैरसमजाला जोरदार धक्का बसला आहे आणि अशा परिस्थितीत काय प्रत्युत्तर द्यावे हे त्यांना कळत नाहीये . लष्करी आणि मुलकी नेतुत्व बावचळलेल्या अवस्थेत आहे. नवाझ शरीफ याना लष्कर सत्ता हातात घेऊन आपल्याला पदच्युत करेल काय याची भीती वाटत आहे. तर जनरल राहील शरीफ यांचा कार्यकाळ समाप्त होत आला आहे त्यांना अपयश घेऊन निवृत्त व्हायचे कि सत्ता हातात घेऊन अवलक्षण करायचे हि शृंगापत्ती पडली आहे. बाकी सरताज अझीझसारख्या लोकांना भुंकायलाच ठेवले आहे ते भुंकत राहतील. श्री मोदी यांनी अनपेक्षित कार्यवाही करून पाकिस्तानची "आई जेवू घालीना आणि बाप भीक मागू देईना" अशी केविलवाणी अवस्था करून ठेवली आहे. त्यातून आम्ही फक्त दहशतवाद्यांविरुद्ध कार्यवाही केली आहे आणि आमचे पाकिस्तान लष्कराशी भांडण नाही सांगून त्यांची गोची पण करून ठेवली आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ गुरुवार, 09/29/2016 - 16:57 नवीन
त्यातून आम्ही फक्त दहशतवाद्यांविरुद्ध कार्यवाही केली आहे आणि आमचे पाकिस्तान लष्कराशी भांडण नाही सांगून त्यांची गोची पण करून ठेवली आहे. छान प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
श
श्रीगुरुजी गुरुवार, 09/29/2016 - 17:02 नवीन
सीमेच्या दुसर्‍या बाजूकडील मते - Should we rethink Kashmir? Kashmir: why talk to India?
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या गुरुवार, 09/29/2016 - 18:10 नवीन
हा विचार त्यांना करावा लागतोय यातच सर्व आलं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
अ
अर्धवटराव गुरुवार, 09/29/2016 - 17:28 नवीन
तसच आशीया, युरोप, अमेरीका आदि खंडातल्या महासत्ता व त्यांचे चेलेचपपाटे या सर्वांचं अभिनंदन. भारत आणि पाकिस्तानला ऑल द बेस्ट. भारताकरता खरी रणभूमी कारखाने, विद्यापीठं, प्रयोगशाळा, संसद... अगदी मंदीरं, मशीदी इ. सर्व ठिकाणं असणार आहे. त्याची वेळीच जाणीव व्हावी, अगदी तीव्रतेने व्हावी अशी इच्छा. बाकि गोपालजी कि इच्छा. आखीर सब भूमी उन्हिकी है. _/\_
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे गुरुवार, 09/29/2016 - 17:33 नवीन
धन्यवाद!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
ब
बहुगुणी गुरुवार, 09/29/2016 - 17:35 नवीन
फ्रेंच आणि ब्रिटिश माध्यमांत या घटनेचं कव्हरेज असलं तरी अमेरिकेत (निदान या घटकेला तरी) एक तर काहीच नोंद नाही किंवा पाकिस्तानी व्हर्जन सादर केलं जातंय: फ्रान्स 24 बीबीसी अमेरिकेतः सी एन एन पाकिस्तानी व्हर्जन दिसतंय (पण यांचंच भारतीय भावंडं आय बी एन मात्र भारतीय व्हर्जन मांडतांना दिसतंय.) ए बी सी
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी गुरुवार, 09/29/2016 - 17:39 नवीन
ए बी सी सी बी एस फॉक्स वाहिनीला (अपेक्षेप्रमाणेच!) भारतात/ पाकिस्तानात काय घडतंय याच्याशी काहीही घेणं देणं नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 09/29/2016 - 17:36 नवीन
काल इराणने सुद्धा बलुचिस्तान सीमेवरून किरकोळ गोळीबार केल्याच्या बातम्या आहेत. http://indiatoday.intoday.in/story/pakistan-iran-fires-mortars-balochistan-india-loc-surgical-strike/1/776265.html
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 09/29/2016 - 18:32 नवीन
तुम्हाला मोरटार किरकोळ वाटतात :O __________________/\_____________________ सनी देओलच्या जागी तुम्ही मेजर कुलदीपसिंह चांदपुरींचा रोल करायला हवा होतात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
स
साहना गुरुवार, 09/29/2016 - 19:42 नवीन
तीन मोर्टार शेल्स म्हणजे किरकोळच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
अ
अनिरुद्ध.वैद्य Fri, 09/30/2016 - 05:10 नवीन
सुतली बोंब फोडले असते तर जास्त आवाज झाला असता!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साहना
श
श्रीगुरुजी Fri, 09/30/2016 - 10:28 नवीन
मॉर्टर किरकोळ नाहीत हो. इराणने फक्त ३ मॉर्टर सोडले व त्यातून काहीही वित्तहानी किंवा जीवितहानी झाली नाही, म्हणून किरकोळ म्हटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
आ
आजानुकर्ण गुरुवार, 09/29/2016 - 18:27 नवीन
भारताने अशा कारवाया सुरूच ठेवाव्यात, परंतु त्याचा गाजावाजा करू नये.
+१ झाले ते बरे झाले!. हाणा साल्यांना.
  • Log in or register to post comments
J
John McClain गुरुवार, 09/29/2016 - 18:29 नवीन
सैन्य, सरकार, गुप्तचर संस्था आणि पडद्या मागचे/पुढचे सगळे कलाकार यांचे करकचून अभिनंदन! Uncle Sam ने आपल्याला या कार्यवाही बद्दल discuss केलं असू शकते का? किंवा त्यांना काही कल्पना असून आपल्याला इंडिरेक्ट aid केलं असू शकत का? कारण susan rice यांनी अजित दोवल ना कॉल केलेला... काही दिवसांपूर्वी डिप्लोमॅट। Kerry ची पण भारत भेट होती... दोघांनी पाक च्या terrorist activities बद्दल रोखठोक मतप्रदर्शन केला होत... या वर चीन ची काय reaction आली नाही.... चीन ची मोठी गुंतवणूक असल्यामुळे त्यांची फेदरली असेल... त्यांच्या media मध्ये किंवा त्यांची ऑफिसिल reaction?
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव गुरुवार, 09/29/2016 - 18:34 नवीन
अशा अनेक बकर्‍यांचा ताफा चिनच्या दिमतीला उभा केलाय पाकने. चीनी अश्वमेध यज्ञात बळी द्यायचे आहेत ना...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: John McClain
अ
अमितदादा गुरुवार, 09/29/2016 - 18:46 नवीन
भारतीय सरकार आणि लष्कर यांचं अभिनंदन. पण अश्या घटना ह्या पूर्वीही झाल्या आहेत हे नमूद करू इच्छितो. मात्र ह्या वेळी हल्ल्याची तीव्रता जास्त आणि खंबीर राजकीय इछ्याशक्ती दिसून येते. भारतीय लष्कराने एक मेसेज च दिला आहे Nothing goes unpunished.
  • Log in or register to post comments
र
राघव गुरुवार, 09/29/2016 - 19:00 नवीन
पत्रकार परिषद घेऊन स्वतः ही बातमी सांगणे हे आर्मी आणि सरकार या दोघांचाही खंबीरपणा आणि ताकद दाखवते. कोणताही बलवान देश अशी कारवाई केल्यास असेच सांगेल. आता आपण हा पर्याय वापरू हा एक अत्यंत आक्रमक संदेश यातून पाकिस्तानला गेलेला आहे, जे फार महत्त्वाचे आहे. घडामोडींवर नीट लक्ष दिल्यास, अमेरिका आणि रशिया यांसकट आणखीही काही देशांना असा पर्याय वापरण्याची कल्पना बर्‍याच आधी दिलेली वाटते. अर्थात् त्या पातळीच्या बातम्या आपल्याला समजू शकत नाहीत हा भाग निराळा. यापुढे पाकिस्तान काय करतो व कसा वागतो यांवर बरेच काही अवलंबून आहे. - सध्या त्यांची परिस्थिती अशी आहे कि असा हल्ला झाल्याचेही मान्य करता येत नाही. कारण त्यामुळे होणारी नाचक्की आणि देशांतर्गत उद्भवू शकणारी भिती हे पेलण्याची ताकद त्यांची नाही. - दुसरे असे मान्य केले तर भारतावर हल्ला करणे त्यांना जवळपास भाग पडेल. पण सध्या आंतरराष्ट्रीय जनमत त्यांच्या बाजूने नाही. त्यात असे केल्यास भारताला आक्रमणाला आयते निमंत्रण दिल्यासारखे होईल आणि ते पाकिस्तानला [आणि चीनला] अजिबात परवडणारे नाही. - शरीफ यांच्यावर अंतर्गत दबाव वाढीला लागला आहे. त्यांची खुर्ची वाचवण्यासाठी ते काय करतात यावर कडक लक्ष ठेवण्याचे काम सरकार करतच असेल. पाकिस्तानी लष्कराची भूमिका बरेच काही सांगून जाईल. . . . . . सध्या इतकेच. काही दिवसांनी आणखीही काही तर्क करता येतील.
  • Log in or register to post comments
व
विकास गुरुवार, 09/29/2016 - 19:01 नवीन
ज्या गोष्टीला भारतीय सेना कायमच जागृकतेने तयार होती त्याला प्रथमच सरकारी पाठींबा देऊन मोदी सरकारने नक्कीच पाकीस्तानला कडवट संदेश दिला आहे आणि भारतीयांना त्यांच्या नैराश्यातून काही अंशी आणि आत्तापुरते का होईना, पण बाहेर काढले आहे. त्याबद्दल सैन्य आणि सरकार दोघांचे अभिनंदन... अर्थात असे समजू नका सगळे अकलेचे कांदे (अर्थात स्वत:ला बुद्धीवादी समजणारे) असेच समजत असतील. त्यांच्या दृष्टीने मोदी सरकार नक्कीच खोटे सांगत असणार, विशेष करून पाकीस्तानने असे काही झालेच नाही असे म्हणलेले असल्याने त्यात सरकारी कॉन्स्पिरसी थिअरीज यांच्याकडून सांगितल्या जाणारच... अर्थात असे कॉन्स्पिरसी थिअरीज आधी तयार कुठल्या संदर्भात झाल्या होत्या ते पाहू म्हणजे हे अकलेचे कांदे कुठल्या कळपातल्या जनुकांचे बनलेले आहेत ते समजेलः
  1. पृथी गोल नसून सपाटच आहे हे अगदी गेल्या दशकात देखील समजणारे ख्रिस्ती भावीक होते.
  2. अमेरीका चंद्रावर गेलीच नाही, उगाच खोटे चित्रिकरण (कदाचीत हॉलिवूड स्टूडीओज) मधे केले असेल असे म्हणणारे कुठल्याही धर्माचे नाही तर असेच सामाजीक पांथिक आहेत.
  3. ९/११ चा हल्ला हा अमेरीकेनेच केला असे समजणारे मध्यपुर्वेत आणि त्यांचे अमेरीकेतले नातेवाईक समजतात.
  4. बिन लादेन मेलेलाच नाही कारण त्याचे शव कोणी पाहीले आहे? असे देखील म्हणणारे आहेत.
(आणि हो, ओबामा अमेरीकेत जन्माला आला नाही म्हणणारे देखील असल्याच जनुकांचे घडलेले आहेत! ) आता याच शेपटाचे पुढचे टोक म्हणजे भारताने सर्जिकल स्ट्राईक केलेच नाहीत! खरेच दयनीय अवस्था ह्या कांद्यांची! भलताच वांदा झाला आहे, ह्या कांद्यांचा. धड निषेध करू शकत नाहीत की इन्टॉलरन्स म्हणू शकत नाहीत. यातून उद्या पाकपुरस्कृत दहशतवाद्यांकडून हल्ला झाला तर परत "मोदी सरकारने असे करायला नको होते" असे म्हणत, कसा मोदींच्या राज्यात हल्ला झाला असला विकृत आनंद उपभोगायला तयार राहतील ते वेगळेच! असो.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा