Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळावर भारताचा हल्ला

श
श्रीगुरुजी
गुरुवार, 09/29/2016 - 11:46
🗣 290 प्रतिसाद
वेगवेगळ्या वाहिन्यांवरील वृत्तानुसार व वेगवेगळ्या संकेतस्थळांवरील बातमीनुसार भारतीय सैन्याच्या तुकड्यांनी आज पहाटे भारत व पाकिस्तानमधील नियंत्रण रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मीरमधील काही अतिरेकी प्रशिक्षण केंद्रांवर हल्ला करून काही अतिरेकी व सैनिकांना मारून भारतीय सैनिक सुखरूप भारतीय प्रदेशात परतले. काही वाहिन्यांवरून ५ अतिरेकी प्रशिक्षण केंद्रांवर हल्ले केले असे सांगण्यात येत आहे. काही वाहिन्या हीच संख्या ६ व ७ असे सांगत आहेत. आपले २ सैनिक मारले गेले व काही जखमी झाले असे पाकिस्तानने जाहिररित्या मान्य केले आहे. परंतु भारताने सीमारेषा ओलांडलेली नाही असा त्यांचा दावा आहे. या हल्ल्यात भारतीय सैनिकांनी ३०-३५ अतिरेकी मारले असेही आकडे वाहिन्यांवरून सांगण्यात येत आहे. एकंदरीत प्रत्येक वृत्तसंस्था वेगवेगळे आकडे सांगत आहे. इंडियन एक्स्प्रेसमधील वृत्तानुसार, (http://indianexpress.com/article/india/india-news-india/india-conducted-surgical-strikes-last-night-in-pok-to-safeguard-our-nation-defence-ministry-3055715/) ndia conducted surgical strikes last night along the LoC to safeguard our nation, the Defence Ministry said on Thursday. “Significant casualties have been caused to terrorists and those trying to shield them. We don’t have a plan to further conduct such strikes. India has spoken to Pakistan,” DGMO Lt Gen Ranbir Singh said. “… Now, based on very specific and credible information we received yesterday, that some terrorist teams had positioned themeselves at launch pads along the LoC with an aim to carry out infiltration and terrorist strikes in J&K and various other metros in our country. There were launch pads at the LoC where terrorists were present waiting to infiltrate the nation and attack areas in Kashmir and metros across the country,” the DGMO said. No Indian casualties occurred during the surgical strikes that were carried out last night by the Indian Army. Meanwhile, Pakistan, in a statement issued has said: At least two Army men were killed as Indian and Pakistani troops exchanged fire over the Line of Control in “Azad Jammu and Kashmir”. The exchange of fire began at 2:30am, ISPR said, and continued till 8:00am. “Pakistani troops befittingly responded to Indian unprovoked firing on the LoC in Bhimber, Hotspring Kel and Lipa sectors,” the statement said. दोनच दिवसांपूर्वी अमेरिकेचे मंत्री जॉन केरी यांनी सुषमा स्वराजांची २ वेळा भेट घेऊन "पाकिस्तानबरोबरील वाद चिघळवू नका" असा सल्ला दिला होता. या सल्ल्यानंतर दोनच दिवसात हा हल्ला झाल्यामुळे भारत या हल्ल्याची तयारी करीत आहे असा अमेरिकेला अंदाज आलेला असावा. या हल्ल्याची व्याप्ती वाढली तर त्याचे छोट्या युद्धात रुपांतर होऊ शकते व त्यामुळे अमेरिकेच्या भारतीय उपखंडातील हितसंबंधावर परीणाम होऊ शकतो. म्हणूनच केरी यांनी जाहीररित्या हा सल्ला दिला असावा. http://indianexpress.com/article/india/india-news-india/india-pakistan-situation-relations-saarc-cancel-indus-water-kerry-sushma-swaraj-uri-3055405/ _________________________________________________________________________ असे हल्ले करण्याशिवाय भारताकडे पर्यायच शिल्लक नव्हता. आपली वाट लागली तरी चालेल, पण भारताला सुखाने जगू द्यायचे नाही हा विडा उचललेल्या पाकिस्तानला इतर कोणत्याही मार्गाने थोपविण्याचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले आहेत. पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदी, संयुक्त राष्ट्रसंघात पाकिस्तानवर टीका, ट्रॅक २ डिप्लोमसी, पीपल-टू-पीपल कॉंटॅक्ट, बस-ट्रेन सेवा, मोस्ट फेवर्ड नेशन दर्जा, भूतकाळातील सर्व युद्धात झालेले पराभव . . . अतिरेक्यांना प्रशिक्षण देऊन व शस्त्रे व इतर सर्व तर्‍हेची मदत देऊन भारतात पाठवून दहशतवादी कारवाया घडवून आणणे व अतिरेक्यांना आपल्या देशात आश्रय देण्याचे धोरण पाकिस्तान बदलायला तयार नाही. त्यामुळे जशास तसे उत्तर देणे हा एकमेव पर्याय शिल्लक होता. आधी पठाणकोट हल्ला आणि आता झालेला उरी हल्ला यामुळे मोदींना जोरदार टीकेचा सामना करावा लागला. आपल्यात व आधीच्या सरकारमध्ये काहीच फरक नाही, आपण नुसते बोलघेवडे आहोत इ. स्वरूपाच्या टीकेमुळे मलीन झालेली आपली प्रतिमा बदलण्यासाठी हा हल्ला करणे आवश्यकच होते. परंतु असे हल्ले करून शत्रूला जरब बसविण्यामागे जी प्रगल्भता लागते ती अजूनही भारताकडे आलेली दिसत नाही. मागील वर्षी आणि परत यावर्षी सुद्धा भारतीय सैन्याने म्यानमारमध्ये प्रवेश करून फुटीरतावाद्यांना मारले होते. सिंधू पाणीवाटप करार रद्द करावा यासाठी चर्चा सुरू आहे. आणि आता आज पहाटे हा हल्ला झाला. या प्रत्येक घटनेनंतर प्रकर्षाने दिसतोय तो प्रसिद्धीचा उतावीळपणा. असे हल्ले गुपचूप करून हल्ले केल्यावरसुद्धा त्याची जाहिरात किंवा गाजावाजा केला नाही तर ते योग्य ठरेल. गतवर्षी म्यानमारमधील कारवाईनंतर लगेच लष्कराने पत्रकार परीषद घेऊन हल्ल्याची माहिती दिल्यावर लगेच म्यानमारने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. अतिरेकी किंवा शत्रूच्या सैनिकांवर ज्या कारवाया केल्या जातात त्याची वाच्यता करण्याची गरज नाही. जुलैमध्ये सुरक्षा दलांनी काश्मिरमध्ये अतिरेकी बुर्‍हान वाणीला मारल्यानंतर लगेच ते जाहीर केले होते. त्यामुळे काश्मिरमध्ये जनतेला भडकावण्यात येऊन आजही तिथली परिस्थिती अशांत आहे. बुर्‍हान वाणी ७-८ महिने फरारी होता. त्याला मारल्यानंतर ते जाहीर न करता त्याचा अंत्यविधी गुपचुप उरकला असता तर तो मेल्याचे बाहेर समजले नसते व त्यामुळे पुढील समस्याही निर्माण झाल्या नसत्या. निदान भविष्यात तरी अशा कारवाया शेवटपर्यंत गुपचूप ठेवल्या तर नवीन समस्या निर्माण होणार नाहीत. आजच्या कारवाईची जाहीर माहिती देऊन मोदी सरकारला आपली प्रतिमा उजळून घेण्यास मदत झाली असेल. परंतु त्यातून जिन्गोइझम निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. आता पुढील काही दिवसात अत्यंत बेजबाबदार वाहिन्यांवरून वेगवेगळ्या पक्षांचे प्रतिनिधी व माजी लष्करी अधिकारी एकत्र बोलावून चर्चांचा कीस पाडला जाईल. भाजपचे प्रवक्ते स्वतःची पाठ थोपटून घेतील व काँग्रेसमध्ये असे करायची हिम्मतच नव्हती असे टोमणे मारतील. काँग्रेसवाले बांगलादेश मुक्तीचे उदाहरण देऊन आम्हीचे कसे ग्रेट होता व आमच्या काळातसुद्धा अशा कारवाया होत होत्या, पण आम्ही जाहिरातबाजी करीत नव्हतो असे प्रत्त्युत्तर देतील. यातून युद्ध होऊन दोन्ही देशातील नागरिकांना त्रास होईल व म्हणून अशा हल्ल्यांऐवजी चर्चा करावी असा सल्ला पाकिस्तानप्रेमी निधर्मांध देतील (मराठी वाहिन्यांवर प्रकाश बाळ, जतीन देसाई, हेमंत देसाई इ. मंडळी यात आघाडीवर असतील). भारताने काय करायला हवे याबाबत अनेकांचे सल्ले सुरू होतील. एकंदरीत पुढील काही दिवसात वाहिन्यांवरून प्रचंड धुरळा उडणार आहे. आज झालेल्या हल्ल्यामुळे पाकिस्तान वठणीवर येईल व भारतावर हल्ले थांबवेल असे मानणे भाबडेपणाचे ठरेल. भारताने अशा कारवाया सुरूच ठेवाव्यात, परंतु त्याचा गाजावाजा करू नये.

प्रतिक्रिया द्या
72104 वाचन

💬 प्रतिसाद (290)
म
मोदक Mon, 10/10/2016 - 11:25 नवीन
तसा संबंध तुम्ही शोधल्यास तुमच्यावर आमचे परममित्र मोदकभाऊ ह्यांची अवकृपा होईल अन तुम्ही कसे देशद्रोही आहात हे परत एकदा सगळ्यांना उच्चारवाने सांगितले जाईल, तेव्हा हा तुमचा सुडो सिक्युलर दंगा बंद करा! शिक्के मारणे वाईट असते असे आमचे मित्र सोन्याबापू सांगतात त्याची आठवण आली. बाकी मी संदिप डांगेंना दिलेला प्रतिसाद आणि त्याच्या वरचे खालचे त्यांचे प्रतिसाद पुन्हा एकदा वाचावेत ही नम्र विनंती. असो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कैलासवासी सोन्याबापु Mon, 10/10/2016 - 14:03 नवीन
जालीम एक मूहर लग गई तो तुम तिल मिला उठ्ठे हो दोस्त, सोचो रोज जो मूहरे लगाते हो क्या रोता होगा ! ;) कसंय न मोदक भाऊ, चर्चा कोणाची चालली अन कश्यावर चालली होती हे जरा तुम्ही अगोदर पहा, बाकी एरवी कोणाला तात्विक समर्थन दिले की त्याला "महफिल" संबोधणारे महान सरजी इथे मात्र सोईस्कर वाचन मात्र मोड घेऊन बसलेत हे एक नव्याने निघालेले निरीक्षण, चिंता नको, आम्ही तसे करत नाही, ती आमची रीत नाही, तुम्ही वैयक्तिक होत नाही हा किमान अमच्यासंबंधी तुमचा ट्रॅक रेकॉर्ड पाहून मी तुमच्याशी मोकळ्या मनाने वाद घालू शकतो(च) ते संबंध तसेच राहतील, मुद्दे पटो न पटो माणूस आम्हाला मोदक पटतो, बाकी तुम्ही समर्थ आहात :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Mon, 10/10/2016 - 14:20 नवीन
असो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
व
विशुमित Fri, 10/07/2016 - 12:56 नवीन
व्हेरी रडका प्रतिसाद...!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
अ
अनिरुद्ध.वैद्य Fri, 10/07/2016 - 12:47 नवीन
तसेच ह्या ताज्या कारवाईसाठी मोदींनी पवारांना पाचारण केले ते का बुआ?
अगदी आतल्या गोटातली माहिती नसेल तर एखादी लींक वगैरे शेअर करु शकाल का? धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ब
बोका-ए-आझम Fri, 10/07/2016 - 11:35 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
क
कैलासवासी सोन्याबापु Fri, 10/07/2016 - 11:39 नवीन
कृषीमंत्रालय महत्वाचे नाही म्हणता ?? अजून कियी लवासा झाले तयार की मग महत्वाचे वाटू लागेल?
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Fri, 10/07/2016 - 11:41 नवीन
आत्ता कोण आहेत कृषिमंत्री? महत्वाचे नसतील ते मंत्रीमहोदय ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
व
विशुमित Fri, 10/07/2016 - 11:48 नवीन
नाव आठवत नाही... गुरुजींना पण सांगता येणार नाही लवकर..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
श
श्रीगुरुजी Fri, 10/07/2016 - 12:01 नवीन
राधामोहन सिंग हे केंद्रीय कॅबिनेट कृषी मंत्री असून या खात्यासाठी अजून ३ राज्यमंत्री सुद्धा आहेत. मुळात हे खाते फारसे महत्त्वाचे नसल्याने पोलिटिकल हेवीवेट्स कधीही हे खाते स्वीकारत नाहीत. पोलिटिकल लाईटवेट्स किंवा ज्यांना नाईलाजाने मंत्रीमंडळात घ्यावे लागते अशांना कृषी, अवजड उद्योग, क्रीडा इ. दुय्यम खाती दिली जातात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Fri, 10/07/2016 - 12:20 नवीन
भाजपचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे म्हणून तर गावाकडे उगाच शेतकरी लोक या सरकारला शिव्या देत नाहीत. साधं उधाहरण दुधाचं घेतला तर रु.25/ लिटर सरकारी रेट असताना हे आल्यावर रु.16-17 झाला. शेणाचे सुद्धा पैसे गवळ्यांकडे राहत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Fri, 10/07/2016 - 11:42 नवीन
सत्तेच्या राजकारणात कृषी मंत्रालय महत्त्वाचे समजले जात नाही. पंतप्रधानाखालोखाल गृह, अर्थ, परराष्ट्र व्यवहार व संरक्षण ही चारच खाती याच क्रमाने महत्त्वाची समजली जातात. त्यामुळे कोणताही खासदार या ४ पैकी एक खाते मिळविण्याची धडपड करीत असतो. महाराष्ट्रात सुद्धा भाजपमधील व सेनेमधील अनेकांना गृहमंत्रीपद हवे होते. परंतु फडणविसांनी चतुराईने हे खाते स्वतःकडेच ठेवले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
व
विशुमित Fri, 10/07/2016 - 12:10 नवीन
गुर्जींच्या म्हण्या प्रमाणे कृषी मंत्रीपद हे खूपच हलक्या दर्जाचे आणि बिन कामाचे खाते आहे. मान्य आहे. पण देश आणि देशातील नागरिक फक्त वित्त, गृह, संरक्षण आणि पराष्ट्र व्यवहारा वरतीच देशात जिवंत आहेत अशी यांची धारणा झालेली झालेली दिसतेय. शेतकऱ्याचे काय नेहमीचेच रडगाणे आहे, अशी पक्की समजूत काही लोकांची झालेली दिसत आहे. असो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Fri, 10/07/2016 - 12:14 नवीन
हलक्या दर्जाचे किंवा बिनकामाचे खाते असे शब्द माझे नाहीत. तुमचे शब्द माझ्या तोंडात टाकू नका. मी फक्त एवढंच सांगतोय की भारतीय राजकारणात अर्थ, गृह इ. च्या तुलनेत कृषी खाते हे दुय्यम किंवा कमी महत्त्वाचे समजले जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Fri, 10/07/2016 - 12:25 नवीन
दर्जा काय आणि महत्वाचे काय, मतीतअर्थ तर तोच आहे ना. शरद पवारांकडे एकदम खालच्या क्लास च खातं होतं, एवढ्यासाठीच तर लोकांचा आटापिटा चालू दिसतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Fri, 10/07/2016 - 12:26 नवीन
खालच्या क्लासचं नाही हो, सत्तेच्या राजकारणात दुय्यम किंवा फारसं महत्त्वाचं नसलेलं असा त्याचा अर्थ आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
ब
बोका-ए-आझम Fri, 10/07/2016 - 11:47 नवीन
काय करतो केंद्रीय कृषिमंत्री? Rural Development आणि Agriculture एकत्र असायला हवेत आणि agriculture आणि food वेगळे असायला हवेत ही जुनी मागणी आहे. FCI मध्ये अन्नधान्याचे पडून असणारे आणि सडणारे साठे आणि किरकोळ स्तरावर होणारी भाववाढ हेच कुठल्याही केंद्रीय कृषीमंत्र्याचं आजवरचं कर्तृत्व आहे. Correct me if I am wrong.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
व
विशुमित Fri, 10/07/2016 - 12:09 नवीन
बोका साहेब- पवारांच्या कृषिमंत्रिपदाच्या काळामध्ये- अन्न धान्य उत्पादकता, फळबागा, फुलशेती, मत्यशेती, वेगवेगळ्या संशोधन, ऊस उत्पादकांचे कल्याण, डाळिंब-द्राक्ष- सफरचंद- आंबे-इ फळांसाठी जागतिक बाजारपेठेत शिरकाव करण्या साठी घेतलेले कष्ट उल्लेखनीय आहे. एक विदा देतो आता आणखी ही देऊ शकतो. http://pib.nic.in/newsite/PrintRelease.aspx?relid=80384 पवारांबाबत फक्त द्वेष दिसतो लोकांच्या मनामध्ये त्याची खंत वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
श
श्रीगुरुजी Fri, 10/07/2016 - 12:16 नवीन
हे प्रसिद्धीपत्रक पवारांच्याच (Press Information Bureau, Government of India, Ministry of Agriculture) खात्याने प्रसिद्ध केले आहे. सुज्ञांस अधिक सांगणे नलगे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Fri, 10/07/2016 - 12:22 नवीन
म्हणजे हे खोटे किंवा अतिरंजित आहे, असं तुम्हाला म्हणायचं का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Fri, 10/07/2016 - 12:23 नवीन
सुज्ञांस अधिक सांगणे नलगे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
स
संदीप डांगे Fri, 10/07/2016 - 12:25 नवीन
हे हे, हा हा, हो हो! गुरुजींचा हा प्रतिसाद सर्वांनी सेव्ह करून ठेवा, वारंवार गरज पडणार आहे यापुढे! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
व
विशुमित Fri, 10/07/2016 - 12:40 नवीन
मला वाटते या पुढे गुरुजींच्या प्रत्येक प्रतिसादाला मला फक्त एवढाच प्रतिवाद करावा लागेल.. "" एक हास्यापद रडका प्रतिसाद"'" ("श्रीगुरुजी हालके घ्या पण मी तसं करणार नाही कारण अजून तरी सुसंस्कृतपणा टिकून आहे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
श
श्रीगुरुजी Fri, 10/07/2016 - 20:44 नवीन
हे हे, हा हा, हो हो! गुरुजींचा हा प्रतिसाद सर्वांनी सेव्ह करून ठेवा, वारंवार गरज पडणार आहे यापुढे! ;)
हरकत नाही. करा सेव्ह. आवश्यकता भासल्यास खालील वाक्ये सुद्धा सेव्ह करून ठेवा. पवारांची राजकीय कारकीर्द संपुष्टात आली आहे व वर्तमानात आणि भविष्यात त्यांना व त्यांच्या पक्षाला काहीही भवितव्य नाही. अर्थात राष्ट्रवादीतील नेत्यांनी (पवारांसहीत) राष्ट्रवादी सोडून इतर पक्षात प्रवेश केला तर त्यांचे भवितव्य बदलू शकते. पण ते राष्ट्रवादीलाच चिकटून राहिले तर त्यांना काहीही भवितव्य नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Sat, 10/08/2016 - 04:23 नवीन
आप समझे नही, "मंत्र्यांच्या खात्याने प्रसिद्ध केलेल्या कोणत्याही पत्रकाला खरे मानू नये" ह्यासाठी तुमचा प्रतिसाद जपून ठेवूया म्हटले,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sat, 10/08/2016 - 11:58 नवीन
"मंत्र्यांच्या खात्याने प्रसिद्ध केलेल्या कोणत्याही पत्रकाला खरे मानू नये" ह्यासाठी तुमचा प्रतिसाद जपून ठेवूया म्हटले,
"मंत्र्यांच्या खात्याने प्रसिद्ध केलेल्या कोणत्याही पत्रकाला डोळे झाकून खरे मानू नये" असा त्याचा अर्थ होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
क
कैलासवासी सोन्याबापु Sat, 10/08/2016 - 12:42 नवीन
बरोबर, फक्त मंत्री कोण होता त्यावर तुमचे डोळे उघडे होते की झाकलेले होते हे तुम्हीही नाही तिसरेच कोणीतरी ठरवणार! अन त्यांनी दिलेला निर्वाळा नाही ऐकला तर तुम्ही एकतर अंधभक्त म्हणवले जाल किंवा सिक्युलर किंवा ते कोण ते क्लिंटन का कोण म्हणतात तसे बुबुडा का काय म्हणतात ते म्हणवले जाल! तात्पर्य काय बेंबट्या कुंपणावर बसणे आवडत असले तर बुडास तारा रुतत राहतात म्हणून रडण्यात हशील नाही ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sun, 10/09/2016 - 11:24 नवीन
बरोबर, फक्त मंत्री कोण होता त्यावर तुमचे डोळे उघडे होते की झाकलेले होते हे तुम्हीही नाही तिसरेच कोणीतरी ठरवणार! अन त्यांनी दिलेला निर्वाळा नाही ऐकला तर तुम्ही एकतर अंधभक्त म्हणवले जाल किंवा सिक्युलर किंवा ते कोण ते क्लिंटन का कोण म्हणतात तसे बुबुडा का काय म्हणतात ते म्हणवले जाल! तात्पर्य काय बेंबट्या कुंपणावर बसणे आवडत असले तर बुडास तारा रुतत राहतात म्हणून रडण्यात हशील नाही ;)
पवारांच्या खात्याच्या प्रसिद्धीपत्रकावरून काही वर्षांपूर्वी घडलेली सत्य घटना आठवली. २००४-२००९ या काळात लालू रेल्वेमंत्री होता. २००५ पासून २००९ पर्यंत रेल्वे खात्याच्या अंदाजपत्रकात प्रचंड नफा दाखविला गेला. विशेषत: आधीच्या अनेक वर्षांच्या कालखंडात रेल्वे अंदाजपत्रकात कायमच तोटा दिसायचा. त्या पार्श्वभूमीवर रेल्वे नफ्यात आल्याने लालूवर स्तुतीसुमनांचा वर्षाव सुरू झाला. लालूच्या दूरदृष्टीचे व मॅनेजमेंट स्किल्सचे अग्रलेखातून कौतुक करताना संपादकांच्या लेखण्या झिजल्या. लालू दिसायला व बोलायला गावंढळ असला तरी अत्यंत बुद्धिमान असून त्याच्याकडे कमालीचे व्यवस्थापन कौशल्य आहे असे अनेकजण प्रमाणपत्र देऊ लागले. कहर म्हणजे आयआयएम (अहमदाबाद) या देशातील प्रथम क्रमांकाच्या व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्रात लालूला व्याख्यानासाठी निमंत्रित करून लालूचा सन्मान करण्यात आला (त्यावेळी मला आयआयएम मधील विद्यार्थ्यांची व प्राध्यापकांची कीव वाटली होती). लालूला हॉर्वर्ड विद्यापीठाने व्याख्यानासाठी सन्मानपूर्वक निमंत्रण पाठविले आहे असेही वृत्तपत्रात छापून येत होते. एकंदरीत लालू म्हणजे मॅनेजमेंट गुरू म्हणून प्रसिद्धीस पावला. २००९ मध्ये लोकसभा निवडणुकीत लालूने काँग्रेसबरोबर युती न करता स्वतंत्र निवडणुक लढविली. त्यात लालूच्या खासदारांची संख्या २२ वरून ४ वर आली व कॉंग्रेसची संख्या १४५ वरून २०६ वर पोहोचली. आता काँग्रेसला लालूची गरज राहिली नसल्याने लालूला मंत्रीमंडळात घेतले गेले नाही. युपीए-२ मध्ये ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री झाल्या. रेल्वे खात्याचा पहिला अर्थसंकल्प मांडताना त्यांच्या लक्षात आले की लालूने मागील ५ वर्षे आकडेवारीत गडबड करून अर्थसंकल्पात खोटे आकडे टाकून रेल्वे नफ्यात आहे असे दाखविले होते. अर्थसंकल्पातले आकडे व प्रत्यक्षातले आकडे यात प्रचंड तफावत होती. आता अर्थसंकल्प मांडायचा तर त्यात खरे आकडे टाकावे लागून त्यात तोटा दिसणार व केवळ एक वर्षात तुफान नफ्यात असणारी रेल्वे सेवा ममता बॅनर्जींनी तोट्यात नेली असा त्यांच्यावर दोषारोप होणार हे ओळखून ममता बॅनर्जींनी श्वेतपत्रिका काढून खरे आकडे जाहीर केले व लालूचे पितळ उघडे पाडले. आता लक्षात आलं असेल की मंत्र्याच्या खात्याने प्रसिद्ध केलेल्या आकड्यांवर व प्रसिद्धीपत्रकांवर डोळे झाकून का विश्वास ठेवू नये. तो मंत्री जर कै. मधू दंडवते यांच्यासारखा अत्यंत स्वच्छ व प्रामाणिक असेल तर असा विश्वास ठेवायला अजिबात हरकत नाही. पण लालू, पवार इ. मंत्र्यांच्या खात्याने प्रसिद्ध केलेल्या आकड्यांवर मिठाची चिमूट घेऊनच बघावे लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
स
संदीप डांगे Sun, 10/09/2016 - 14:13 नवीन
एखादं उदाहरण भाजप मंत्र्यांचे नाही आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
म
मोदक Sun, 10/09/2016 - 21:35 नवीन
तुम्ही शोधा की, सापडल्यावर गुरुजींना "मिपावरून पायउतार व्हा" असे सांगूया. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Sun, 10/09/2016 - 22:31 नवीन
आम्हाला शोधायला गुरुजींइतका रिकामा वेळ असता तर... काश!! गुरुजींचे लै कौतुक वाटते, इतक्या लोकांची इतकी लफडी इतक्या अचूक घटनां-तारखांसकट लक्षात ठेवतात आणि क्षणाचाही विलंब लागू न देता भदाभदा ओतत जातात. भारी!!! बाकी, कोणाला पायउतार व्हा सांगणारे आपण कोण राव? समझदार को इशारा काफी. आपण फकस्त इशारे करायचे काम इमानेइतबारे करायचे. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
श
श्रीगुरुजी Mon, 10/10/2016 - 04:52 नवीन
>>> आम्हाला शोधायला गुरुजींइतका रिकामा वेळ असता तर... काश!! +१ खरं आहे तुमचं म्हणणं. आम्ही रिकामटेकडे असल्याने आमच्याकडे रिकामा वेळ भरपूर आहे हे सर्वांना ठाऊक आहे. तुम्ही यच्चयावत प्रत्येक धाग्यावर अनेक टेराबायटी प्रतिसाद लिहिण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या कार्यात व्यस्त असता. त्यामुळे माहिती शोधण्यासाठी पुरेसा रिकामा वेळ तुम्हाला मिळू शकत नाही याची सर्वांना जाणीव आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Mon, 10/10/2016 - 05:41 नवीन
तुम्ही यच्चयावत प्रत्येक धाग्यावर अनेक टेराबायटी प्रतिसाद लिहिण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या कार्यात व्यस्त असता >>>> काहीही खोटं बोलू नका गुरुजी, आधी सिद्ध करा बघू वरचं विधान कि आम्ही यच्चयावत प्रत्येक धाग्यावर अनेक टेराबायटी प्रतिसाद देत असतो ते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Mon, 10/10/2016 - 11:29 नवीन
त्यात काय सिद्ध करायचंय. सगळ्यांनाच माहिती आहे ते. तरीसुद्धा पुरावेच हवे असतील तर देतो पुरावे. सहर्ष सादर करीत आहोत नामदार श्रीमान संदीप डांगे यांच्या टेराबायटी प्रतिसादांच्या मालिकेतील प्रथम पुष्प - http://www.misalpav.com/comment/884032#comment-884032
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Mon, 10/10/2016 - 19:16 नवीन
अहो गुरुजी, "यच्चयावत प्रत्येक धाग्यावर" ह्याचा अर्थ कळतो का, कि उचलले बोट आणि निघाले बडवत किबोर्ड? मी लिहितोच टेराबायटी, त्यात काय लाजायचं? तुम्ही फक्त एवढं सिद्ध करा की "मिपाच्या यच्चयावत प्रत्येक धाग्यावर".
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Mon, 10/10/2016 - 19:46 नवीन
तेच सिद्ध करतोय की. टेराबायटी प्रतिसादांचं रोज एक उदाहरण देणार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Wed, 10/12/2016 - 07:22 नवीन
ओके! माझं विधान सिद्ध करताय.. । ;) आणि माझी जाहिरातही!!! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Wed, 10/12/2016 - 11:14 नवीन
वेगळी जाहिरात करण्याची गरजच नाही. तुमचे असंख्य टेराबायटी प्रतिसाद त्यासाठी पुरेसे आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
D
diggi12 गुरुवार, 09/19/2024 - 10:21 नवीन
??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
स
संदीप डांगे Fri, 10/07/2016 - 12:23 नवीन
विरोधी पक्षाचे व नेत्याचे जे चांगले आहे ते चांगले म्हणायला जीभ अडखळणे आणि जे चुकीचे ते तिखटमीठ लावून बेंबीच्या देठापासून ओरडून सांगणे हे 'सर्वच' राजकीय पक्षांचे गुण असतात, पण एक सामान्य नागरिक म्हणून निरक्षीर विवेकाची अपेक्षा असते तेही हल्ली पूर्ण होत नाही, मी काही भाजप नेते व काही काँग्रेस नेते ह्यांच्यासोबत काही विशिष्ट प्रसंगी काम केले आहे, नेते मंडळींची चांगली कामे पुढे येत नाहीत हि खंत आहे, 'कोणत्याही' नेत्याला सामान्य जनता विरोधचयच नजरेतून बघायला लागली तर कठीण होत जाते,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Fri, 10/07/2016 - 12:27 नवीन
मलाही तेच म्हणायचं आहे. दुसऱ्याला कमी करून आपण मोठे होत नसतो, त्या दोन काड्यांची गोष्ट शाळेत ऐकली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
अ
अप्पा जोगळेकर Fri, 10/07/2016 - 12:38 नवीन
हा प्रतिसाद पवारांच्या काँटेक्स्ट मधे आहे का ? तसे असेल तर पवारांचे कोणते गुण भारतीय किंवा महाराष्ट्रीय राजकारणाला दिशा देऊन गेले यावर प्रकाश टाकाल का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
न
नाखु Fri, 10/07/2016 - 12:46 नवीन
महाराष्ट्रीय राजकारणाला दिशा देऊन गेले यावर प्रकाश टाकाल का ?
नसलयास पक्षी महाराष्ट्रीय राजकारणाला (दु)र्दशा देऊन गेले यावर प्रकाश टाकाल का ? साठीही चालेल. मीही पवार पंप्र व्हावेत असे (सन १९९० पर्यंत अगदी ) वाटणारा एक होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
व
विशुमित Fri, 10/07/2016 - 12:47 नवीन
ह्या धाग्यावर नाही... येईल येईल लवकर येईल..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
ब
बोका-ए-आझम Sat, 10/08/2016 - 03:30 नवीन
पाणी घातलेलं दूध प्यायची एवढी सवय झालेली आहे लोकांना की नीरक्षीरविवेक वगैरे गोष्टी बाराच्या भावात गेलेल्या आहेत. शिवाय मोदींनी सर्जिकल स्ट्राईक हा राजकीय फायद्यासाठी आणि ब्रँड मोदीची पडझड रोखण्यासाठी केला वगैरे मत जर प्रसारमाध्यमं व्यक्त करत असतील तर लोक्स आपल्याला हवे तेच तर्क काढणार आणि मांडणार. नीरक्षीरविवेक हा दोन्ही बाजूंनी असावा लागतो. मोदींना शिव्या घालण्याला निःपक्षपातीपणा म्हणणं आणि दुसरीकडे नीरक्षीरविवेकाची अपेक्षा करणं हा बावळटपणा आजकाल राहुल गांधी पण करत नाहीत. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Sat, 10/08/2016 - 04:12 नवीन
अंदाधुंद प्रतिसाद, मी व्यक्त केलेले मत आणि तुमचा प्रतिसाद याचा काहीच संबंध नाही, ;) असो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
अ
अनिरुद्ध.वैद्य Fri, 10/07/2016 - 12:52 नवीन
शेतकरी आत्महत्या रोखण्याचे त्यांचे प्रयत्न वादातीत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
ब
बोका-ए-आझम Fri, 10/07/2016 - 17:59 नवीन
पवारांबाबत फक्त द्वेष दिसतो लोकांच्या मनामध्ये त्याची खंत वाटते
त्याला जबाबदार ते स्वतः आहेत.
पवारांच्या कृषिमंत्रिपदाच्या काळामध्ये- अन्न धान्य उत्पादकता, फळबागा, फुलशेती, मत्यशेती, वेगवेगळ्या संशोधन, ऊस उत्पादकांचे कल्याण, डाळिंब-द्राक्ष- सफरचंद- आंबे-इ फळांसाठी जागतिक बाजारपेठेत शिरकाव करण्या साठी घेतलेले कष्ट उल्लेखनीय आहे.
हे कष्ट पवारांनी स्वतः घेतले की त्यांच्या मंत्रालयात काम करणाऱ्या अधिका-यांनी घेतले? बरं, यात सडलेल्या धान्याची दारु बनवायचा प्रतिसाद कसा नाही? आणि सर्वात शेवटचं - एक कृषीमंत्री म्हणून हे करणं पवारांचं कामच होतं. काय उपकार केले का? किंवा आमच्या अकोल्याच्या भाषेत - काय उखाडलं बे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
स
संदीप डांगे Sat, 10/08/2016 - 04:17 नवीन
एक कृषीमंत्री म्हणून हे करणं पवारांचं कामच होतं. काय उपकार केले का? किंवा आमच्या अकोल्याच्या भाषेत - काय उखाडलं बे ? ^^^ हा पण प्रतिसाद सेव्ह करून ठेवतो, भाजपच्या कोणत्याही केंद्रीय व राज्य मंत्र्याने यापुढे अमूक केले तमुक केले म्हटले की असेच म्हणता येईल, काय म्हणता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ब
बोका-ए-आझम Sat, 10/08/2016 - 05:39 नवीन
जोपर्यंत लोकांची वृत्ती अशी demanding होत नाही, तोपर्यंत लोकप्रतिनिधी, मग ते कुठल्याही पक्षाचे का असेना, काम करणार नाहीत हे तर तुम्हीही मान्य कराल.जर लोकशाहीमध्ये लोक अंतिम सत्ताधारी आहेत तर असले appraising प्रश्न विचारायलाच पाहिजेत. पण असेच प्रश्न इतर पक्षांनाही विचारा. 'पक्ष'पात करु नका. Is it a fair expectation?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा