Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळावर भारताचा हल्ला

श
श्रीगुरुजी
गुरुवार, 09/29/2016 - 11:46
🗣 290 प्रतिसाद
वेगवेगळ्या वाहिन्यांवरील वृत्तानुसार व वेगवेगळ्या संकेतस्थळांवरील बातमीनुसार भारतीय सैन्याच्या तुकड्यांनी आज पहाटे भारत व पाकिस्तानमधील नियंत्रण रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मीरमधील काही अतिरेकी प्रशिक्षण केंद्रांवर हल्ला करून काही अतिरेकी व सैनिकांना मारून भारतीय सैनिक सुखरूप भारतीय प्रदेशात परतले. काही वाहिन्यांवरून ५ अतिरेकी प्रशिक्षण केंद्रांवर हल्ले केले असे सांगण्यात येत आहे. काही वाहिन्या हीच संख्या ६ व ७ असे सांगत आहेत. आपले २ सैनिक मारले गेले व काही जखमी झाले असे पाकिस्तानने जाहिररित्या मान्य केले आहे. परंतु भारताने सीमारेषा ओलांडलेली नाही असा त्यांचा दावा आहे. या हल्ल्यात भारतीय सैनिकांनी ३०-३५ अतिरेकी मारले असेही आकडे वाहिन्यांवरून सांगण्यात येत आहे. एकंदरीत प्रत्येक वृत्तसंस्था वेगवेगळे आकडे सांगत आहे. इंडियन एक्स्प्रेसमधील वृत्तानुसार, (http://indianexpress.com/article/india/india-news-india/india-conducted-surgical-strikes-last-night-in-pok-to-safeguard-our-nation-defence-ministry-3055715/) ndia conducted surgical strikes last night along the LoC to safeguard our nation, the Defence Ministry said on Thursday. “Significant casualties have been caused to terrorists and those trying to shield them. We don’t have a plan to further conduct such strikes. India has spoken to Pakistan,” DGMO Lt Gen Ranbir Singh said. “… Now, based on very specific and credible information we received yesterday, that some terrorist teams had positioned themeselves at launch pads along the LoC with an aim to carry out infiltration and terrorist strikes in J&K and various other metros in our country. There were launch pads at the LoC where terrorists were present waiting to infiltrate the nation and attack areas in Kashmir and metros across the country,” the DGMO said. No Indian casualties occurred during the surgical strikes that were carried out last night by the Indian Army. Meanwhile, Pakistan, in a statement issued has said: At least two Army men were killed as Indian and Pakistani troops exchanged fire over the Line of Control in “Azad Jammu and Kashmir”. The exchange of fire began at 2:30am, ISPR said, and continued till 8:00am. “Pakistani troops befittingly responded to Indian unprovoked firing on the LoC in Bhimber, Hotspring Kel and Lipa sectors,” the statement said. दोनच दिवसांपूर्वी अमेरिकेचे मंत्री जॉन केरी यांनी सुषमा स्वराजांची २ वेळा भेट घेऊन "पाकिस्तानबरोबरील वाद चिघळवू नका" असा सल्ला दिला होता. या सल्ल्यानंतर दोनच दिवसात हा हल्ला झाल्यामुळे भारत या हल्ल्याची तयारी करीत आहे असा अमेरिकेला अंदाज आलेला असावा. या हल्ल्याची व्याप्ती वाढली तर त्याचे छोट्या युद्धात रुपांतर होऊ शकते व त्यामुळे अमेरिकेच्या भारतीय उपखंडातील हितसंबंधावर परीणाम होऊ शकतो. म्हणूनच केरी यांनी जाहीररित्या हा सल्ला दिला असावा. http://indianexpress.com/article/india/india-news-india/india-pakistan-situation-relations-saarc-cancel-indus-water-kerry-sushma-swaraj-uri-3055405/ _________________________________________________________________________ असे हल्ले करण्याशिवाय भारताकडे पर्यायच शिल्लक नव्हता. आपली वाट लागली तरी चालेल, पण भारताला सुखाने जगू द्यायचे नाही हा विडा उचललेल्या पाकिस्तानला इतर कोणत्याही मार्गाने थोपविण्याचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले आहेत. पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदी, संयुक्त राष्ट्रसंघात पाकिस्तानवर टीका, ट्रॅक २ डिप्लोमसी, पीपल-टू-पीपल कॉंटॅक्ट, बस-ट्रेन सेवा, मोस्ट फेवर्ड नेशन दर्जा, भूतकाळातील सर्व युद्धात झालेले पराभव . . . अतिरेक्यांना प्रशिक्षण देऊन व शस्त्रे व इतर सर्व तर्‍हेची मदत देऊन भारतात पाठवून दहशतवादी कारवाया घडवून आणणे व अतिरेक्यांना आपल्या देशात आश्रय देण्याचे धोरण पाकिस्तान बदलायला तयार नाही. त्यामुळे जशास तसे उत्तर देणे हा एकमेव पर्याय शिल्लक होता. आधी पठाणकोट हल्ला आणि आता झालेला उरी हल्ला यामुळे मोदींना जोरदार टीकेचा सामना करावा लागला. आपल्यात व आधीच्या सरकारमध्ये काहीच फरक नाही, आपण नुसते बोलघेवडे आहोत इ. स्वरूपाच्या टीकेमुळे मलीन झालेली आपली प्रतिमा बदलण्यासाठी हा हल्ला करणे आवश्यकच होते. परंतु असे हल्ले करून शत्रूला जरब बसविण्यामागे जी प्रगल्भता लागते ती अजूनही भारताकडे आलेली दिसत नाही. मागील वर्षी आणि परत यावर्षी सुद्धा भारतीय सैन्याने म्यानमारमध्ये प्रवेश करून फुटीरतावाद्यांना मारले होते. सिंधू पाणीवाटप करार रद्द करावा यासाठी चर्चा सुरू आहे. आणि आता आज पहाटे हा हल्ला झाला. या प्रत्येक घटनेनंतर प्रकर्षाने दिसतोय तो प्रसिद्धीचा उतावीळपणा. असे हल्ले गुपचूप करून हल्ले केल्यावरसुद्धा त्याची जाहिरात किंवा गाजावाजा केला नाही तर ते योग्य ठरेल. गतवर्षी म्यानमारमधील कारवाईनंतर लगेच लष्कराने पत्रकार परीषद घेऊन हल्ल्याची माहिती दिल्यावर लगेच म्यानमारने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. अतिरेकी किंवा शत्रूच्या सैनिकांवर ज्या कारवाया केल्या जातात त्याची वाच्यता करण्याची गरज नाही. जुलैमध्ये सुरक्षा दलांनी काश्मिरमध्ये अतिरेकी बुर्‍हान वाणीला मारल्यानंतर लगेच ते जाहीर केले होते. त्यामुळे काश्मिरमध्ये जनतेला भडकावण्यात येऊन आजही तिथली परिस्थिती अशांत आहे. बुर्‍हान वाणी ७-८ महिने फरारी होता. त्याला मारल्यानंतर ते जाहीर न करता त्याचा अंत्यविधी गुपचुप उरकला असता तर तो मेल्याचे बाहेर समजले नसते व त्यामुळे पुढील समस्याही निर्माण झाल्या नसत्या. निदान भविष्यात तरी अशा कारवाया शेवटपर्यंत गुपचूप ठेवल्या तर नवीन समस्या निर्माण होणार नाहीत. आजच्या कारवाईची जाहीर माहिती देऊन मोदी सरकारला आपली प्रतिमा उजळून घेण्यास मदत झाली असेल. परंतु त्यातून जिन्गोइझम निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. आता पुढील काही दिवसात अत्यंत बेजबाबदार वाहिन्यांवरून वेगवेगळ्या पक्षांचे प्रतिनिधी व माजी लष्करी अधिकारी एकत्र बोलावून चर्चांचा कीस पाडला जाईल. भाजपचे प्रवक्ते स्वतःची पाठ थोपटून घेतील व काँग्रेसमध्ये असे करायची हिम्मतच नव्हती असे टोमणे मारतील. काँग्रेसवाले बांगलादेश मुक्तीचे उदाहरण देऊन आम्हीचे कसे ग्रेट होता व आमच्या काळातसुद्धा अशा कारवाया होत होत्या, पण आम्ही जाहिरातबाजी करीत नव्हतो असे प्रत्त्युत्तर देतील. यातून युद्ध होऊन दोन्ही देशातील नागरिकांना त्रास होईल व म्हणून अशा हल्ल्यांऐवजी चर्चा करावी असा सल्ला पाकिस्तानप्रेमी निधर्मांध देतील (मराठी वाहिन्यांवर प्रकाश बाळ, जतीन देसाई, हेमंत देसाई इ. मंडळी यात आघाडीवर असतील). भारताने काय करायला हवे याबाबत अनेकांचे सल्ले सुरू होतील. एकंदरीत पुढील काही दिवसात वाहिन्यांवरून प्रचंड धुरळा उडणार आहे. आज झालेल्या हल्ल्यामुळे पाकिस्तान वठणीवर येईल व भारतावर हल्ले थांबवेल असे मानणे भाबडेपणाचे ठरेल. भारताने अशा कारवाया सुरूच ठेवाव्यात, परंतु त्याचा गाजावाजा करू नये.

प्रतिक्रिया द्या
72104 वाचन

💬 प्रतिसाद (290)
ट
ट्रेड मार्क गुरुवार, 09/29/2016 - 20:49 नवीन
कॉन्स्पिरसी थिअरीच करायची झाली तर एक भारी थिअरी आहे. गेली २ वर्षे पाकला सगळीकडून घेरण्याची तयारी चालू होती. या कालावधीत पाकने त्यांच्या कारवाया काही थांबवल्या नाहीत. इकडे तयारी पूर्ण झाली पण मग पुढचा दहशतवादी हल्ला होण्याची वाट बघायची का आपण आपल्या सोयीच्या वेळेला म्हणजे UN ची परिषद, SAARC परिषद आहे याचा संधी म्हणून वापर करायचा. पूर्वतयारी - शेजारी देश व जगातील बलवान देश यांच्याबरोबर संबंध वाढवणे. काही बलवान राष्ट्रप्रमुखांबरोबर जिव्हाळयाचे संबंध तयार करणे. बलुच लोकांना पाठिंबा दाखवणे. यामुळे बलुचिस्तान, सिंध ई प्रदेशात खळबळ माजली. एकीकडे पाकची मारली गेली तर तिकडे चीनला चिंता लागून राहिली कारण CPEC चा मोठा भाग बलुचिस्तानातून जातो. बांगलादेश, अफगाणिस्तान यासारख्या पाकच्या अतिरेकी कारवायांना त्रासलेल्या देशांशी मैत्री केल्यामुळे देशांकडून भारताला वाढता पाठिंबा मिळू लागला. कॉन्स्पिरसी - उरीचा हल्ला भारतानेच प्लॅन केला. त्यासाठी भारतीय सैन्याच्या ताब्यात असलेल्या २०-२२ पाकिस्तानी लोकांना उरीच्या सैनिकी तळावर कैद करून ठेवण्यात आले व योग्य वेळ येताच त्यांना मारून टाकले. नक्की चेहरे कळू नयेत म्हणून नंतर त्यांना जाळण्यात आले. आणि मग भारतानेच बोंबाबोंब केली की अतिरेक्यांच्या हल्ल्यात सैनिक मारले गेले. यात आपले नुकसान काय झाले तर फक्त एक लष्करी छावणीचा भाग जळाला. उरी हल्ल्यानंतर - नेहमीप्रमाणे अतिरेकी हल्ला असल्याने पाकने स्वीकारण्याचा न स्वीकारण्याचा प्रश्नच नव्हता. लागलीच आपण ठरल्याप्रमाणे कडी निंदा केलीच पण मोदींनी आम्ही प्रत्युत्तर देऊ म्हणून जाहीर केलं. मग सिंधू करार, MFN दर्जा या बाबतीत चर्चा चालू केली. भारतातले वाचाळ व बुद्धिवादी लोक्स अगदी निष्कर्ष काढून मोकळे झाले की नमो आणि ममो मध्ये काहीच फरक नाही. तोपर्यंत सैन्याच्या तत्कालीन तयारीला सहज वेळ मिळाला. फायदा - तिकडे पाक गाफील राहिले की नेहमीप्रमाणे भारत अप्रत्यक्ष कारवाई करणार. आणि भारतीय त्यांना पाहिजे तसा व पाहिजे तिथे बदला घेतला.
ही फक्त कॉन्स्पिरसी थिअरी आहे. यात हुतात्मा झालेल्या सैनिकांचा, भारत देशाचा व सरकारचा कुठलाही अपमान करण्याचा हेतू नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
स
सुबोध खरे गुरुवार, 09/29/2016 - 19:03 नवीन
प्रत्यक्ष मारले गेलेले दहशतवादी हे कितीतरी जास्त आहेत. सध्या इतकेच.
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या गुरुवार, 09/29/2016 - 19:08 नवीन
ब्राव्हो !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
व
विकास गुरुवार, 09/29/2016 - 19:06 नवीन
सावरकरांच्या काव्यपंक्ती आज प्रत्यक्षात आणल्या आहेत... "साप विखारी देशजननीचा ये घेऊ चावा अवचित गाठूनी, ठकवूनी, भुलवूनी कसाही ठेचावा"
  • Log in or register to post comments
स
साहना गुरुवार, 09/29/2016 - 19:28 नवीन
माझ्या मनात ह्या हल्ल्याने धडकी भरली आहे. आता जागोजागी भाऊ, अण्णा, दादा इत्यादी मंडळींच्या अभिनंदपर फेल्क्स बॅनर ची घाण सर्वत्र पसरणार आहे. सैनिकापेंक्षा ह्याच खलपुरुषांनी पाकिस्तानवर हल्ला केला कि काय असे वाटणार आहे.
  • Log in or register to post comments
स
साहना गुरुवार, 09/29/2016 - 19:40 नवीन
भारतीय सेना अश्या प्रकारचे हल्ले नेहमीच करते. बोभाटा ह्यावेळी करण्यात आला आहे. हेलिकॉप्टर ने पॅराट्रूपर्स टाकणे हे कदाचित नवीन असेल. ह्यावेळी १७ सैनिक मारले गेले त्याचा सर्वत्र बोभाटा झाला. म्हणून सार्वजनिक रित्या पाकिस्तानला संदेश पाठवणे आवश्यक होते. हल्ला कितीही सौम्य/प्रखर असला तरी मोदी सरकाने (ज्याला PR कसे करावी ह्याची फार चांगली माहिती आहे) ज्या प्रकारे मेसिजिंग केले आहे ते अतिउत्तम आहे. ह्यामुळे दोन गोष्टी झाल्या आहेत. १. पाकिस्तानने हल्ला झालाच नाही अशी भूमिका घेतली आहे. आपण एकदा दुसऱ्याचा कानफटात लावली आणि त्याने असे काही झालेच नाही अशी भूमिका घेतली तर दुसऱ्या वेळी आणखीन एक वाजवणे सोपे जाते. पाकिस्तान कडे विशेष पर्याय नाहीत हेच ह्यांतून स्पष्ट झाले आहे. २. पाकिस्तानने बदला वगैरे घ्यायचा प्रयत्न केला आंतराष्ट्रीय स्तरावरून आमच्यावर जो प्रेशर होता तोच प्रेशर पाकिस्तान वर पडेल. पूर्वी प्रमाणे नॉन-स्टेट अक्टर्स वगैरे अशी भूमिका इथे पाकिस्तानला शक्य नाही. आणि भारताकडे सामोरासमोरून युद्ध करायचे नाही हि जी भूमिका घेतली आहे ती मागे घेणे म्हणजे पाकिसन साठी सेटबेक आहे. है दोन्ही पैकी शेवटी कुठल्या भूमिकेवर पाकिस्तानी सेना भर देईल हे पाहणे आवश्यक आहे. ताजा कलम : स्टोक मार्केट पडले आहे. काही शेर्स उचला.
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क गुरुवार, 09/29/2016 - 20:10 नवीन
आत्तापर्यंत आपण फक्त retaliate करत होतो. स्वतःहून LOC च्या पलीकडे जाऊन हल्ला करून परत येणे याप्रकारची (पाकविरुद्ध) कारवाई युद्ध सोडले तर पहिलीच असावी. जर का अतिरेकी येथे येऊन हल्ला करतात याचा बोभाटा होतो तर आपण केलेल्या कारवाईचा बोभाटा का करू नये?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साहना
स
सुबोध खरे Fri, 09/30/2016 - 06:21 नवीन
भारतीय सेना अश्या प्रकारचे हल्ले नेहमीच करते. हे आपल्याला कुणी सांगितले? hot pursuit --दहशतवाद्याचा पाठलाग करीत सीमा पार जाऊन त्याला कंठस्नान घालणे वेगळे (यात तुमचे सैनिक "चुकून" सीमेच्या पलीकडे गेले असे म्हणता येते. आणि surgical strike -- म्हणजे सीमा पार करून पूर्वनियोजित ठिकाणी "ठरवून" एकाच वेळेस सात ठिकाणी हल्ले करणे (येथे शत्रूशी युद्ध करण्याच्या हेतूनेच जाता) या दोन संपूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. तेंव्हा अशा गोष्टी आपण करीतच होतो आणि आता मोदी साहेबानी काही वेगळे केलेच नाही, फक्त बोलबच्चन गिरी केली असे म्हणणे साफ चूक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साहना
अ
अमितदादा Fri, 09/30/2016 - 06:48 नवीन
भारतीय सेना अश्या प्रकारचे हल्ले नेहमीच करते. यातील नेहमीच या शब्द चुकीचा आहे, मात्र अश्या घटना ह्याआदी घडलेल्या आहेत. हे पहा माजी लष्करप्रमुख बिक्रम सिंग NDTV बर बोलताना काय म्हणाले ते Former Army chief General Bikram Singh has told NDTV that India crossed the Line of Control many times in the past but it has never been made public and never at this scale . He complimented the political leadership for sending out a strong message at this time with this move आता हि बातमी वाचा यात डेटेल मध्ये लिहिलंय कि भारताने ह्याआदी revenge कसे घेतले ते. आर्मी च एकाच धोरण राहील आहे Nothing goes unpunished. बातमी अर्थात ह्यावेळचा हल्ला मोठा आणि नियोजनबद होता, मोठी राजकीय इच्छाशक्ती यातून दिसून येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
अ
अशोक पतिल गुरुवार, 09/29/2016 - 19:55 नवीन
श्री गुरुजि नीं अत्यंत प्रगल्भतेने हा लेख लिहलाय, व जसे लेखात लिहलेय तसेच चर्चा टी वी वहीन्यांवर दिसु लागल्याय. तरीही भारतिय सेना व मोदी सरकार ने विचार्पुर्वक हा निर्णय घेतला असेलच , व असेच पुर्वीही १-२ वेळेस अशी कार्रवाही सेनेने केलेली आहे, असे माजी सेनाधिकार्यानीं न्युज च्यनेल वर सागिंतले. पण जनतेचा रोष कमी व्हावा म्हणुन हे जाहिर केले असावे. पण यात पाकिस्तान ची चागंलीच तारांबळ उडालेय, त्याला हल्ला झालाय हे कबुल पण करता येत नाही व नाराजी पण लपवता येत नाही.
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क गुरुवार, 09/29/2016 - 20:05 नवीन
भारतीय सैन्याचे व सरकारचे अभिनंदन. यापूर्वीच्या सरकारांनी आणि मोदींनी पण आत्तापर्यंत सामोपचाराचे धोरण घेतले होते. भेद फक्त इंदिरा गांधींनी बांगलादेश स्वतंत्र झाला त्यावेळी वापरला. दंड म्हणून आत्ताची कारवाई एकदम भारी आहे. मोदींनी आत्ता पाकिस्तानची सगळ्या बाजूनी गोची करून ठेवली आहे. एकीकडे बलुचिस्तान, सिंधू प्रदेश वेगळे व्हायला बघत आहेत तर SAARC रद्द झाल्यामुळे जगात नाचक्की झाली. वरून हा हल्ला असा करून ठेवला की पाकड्यांना धड ओरडता पण येणार नाही. बहुतेक गेली २ वर्षे हे करायची तयारी चालू असावी आणि मग उरीचा हल्ला हे एक आयतं कोलीत मिळालं. एवढी मैत्री दाखवणं, गळ्यात गळे घालणं हा शत्रूला गाफील ठेवण्याचा भाग असू शकतो. मोदींचे सततचे परदेश दौरे हे निव्वळ स्थलदर्शन आणि चैन यासाठी नव्हते हे पण बाकी देशांच्या प्रतिक्रियेतून समजून येतंय. फक्त अतिरेक्यांच्या विरोधात कारवाई असून पाक सैन्याचा यात काही संबंध नाही असे सांगितल्यामुळे आता पाक नैतिकदृष्ट्या फारसं काही करू शकेल असं वाटत नाही. परंतु याबरोबरच छुपे हल्ले वाढू शकतील, पाक पुरस्कृत भारतात राहणाऱ्या लोकांकडून अवॉर्ड वापसी सारखे अजून काही कार्यक्रम केले जाऊ शकतील. अर्थात सरकारने याचा आधीच विचार व तयारी केली असेलच.
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया गुरुवार, 09/29/2016 - 20:23 नवीन
हे पाऊल उचलून एक चांगला संदेश पाकिस्तानला दिला गेला आहे ह्या बद्दल दुमत नाही. ह्या अगोदर पण अशा प्रकारची कारवाई केली गेली असेल असे वाटते. फक्त ती आपल्यापर्यंत पोचली नसेल.
  • Log in or register to post comments
व
विकास गुरुवार, 09/29/2016 - 20:57 नवीन
भाईचारा करत बसण्याऐवजी भाईला चारले गेले, ते बरेच झाले! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया
इ
इल्यूमिनाटस Fri, 09/30/2016 - 05:10 नवीन
चोरांच्या भडव्यांच्या उलट्या बोंबा डॉन(DAWN) म्हणतंय की पाकिस्तानने भारताचा एक सैनिक पकडला आणि बरेच मारले! कधी सुधारणार पाकडे
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 09/30/2016 - 06:38 नवीन
यापुढेही अशाच कारवाया सुरू ठेवाव्यात. बातम्या नाही आल्या तरी चालेल. बादवे, आमच्या टॅक्सच्या पैशांवर सैन्य पोसते म्हणणारे कोण होते ते?
  • Log in or register to post comments
न
नाखु Fri, 09/30/2016 - 07:45 नवीन
बरखा दत्तला भेटून यांना भेटायला गेले आहेत. ज्ञानामृत घेऊन आले की परत यांच्याबरोबर काश्मीरचा दौरा करणार आहेत. तोपर्यंत वाट पहाणे आपल्य हाती आहे. जय हिंद नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ग
गामा पैलवान Fri, 09/30/2016 - 08:34 नवीन
आता लक्ष्य एकंच, ते म्हणजे वराहनगर. रावळपिंडी म्हणजे शंकराचं देऊळ. सोबत विष्णूच्या तिसऱ्या अवताराचं मंदिर बांधलेलं शोभून दिसावं, नाहीका? याला म्हणतात सर्वधर्मसमभाव. -गा.पै.
  • Log in or register to post comments
त
तिमा Fri, 09/30/2016 - 09:50 नवीन
कृपया त्या ५६ इंची छातीचा उल्लेख थांबवा. त्यामुळे मोदी विरोधक आणि भक्त, दोघेही चेकाळतात.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दिता Fri, 09/30/2016 - 10:10 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
श
श्रीगुरुजी Fri, 09/30/2016 - 10:36 नवीन
खालील 'डॉन'मधील लेखाचा लेखक भारतीय असावा याचे काहीच आश्चर्य वाटत नाही. भारतात राहून पाकिस्तानवर प्रेम करणारे व सर्व दोष भारताचाच आहे असे मानणारे सुझन अरंधती रॉय, राजदीप सरदेसाई, बरखा दत्त, महेश भट्ट यांच्यासारखे असंख्य निधर्मांध (निधर्मी मानवतावादी आणि पुरोगामी विचारवंत) भारतात आहेत. Modi has become a prisoner of his own image - A war hysteria has gripped India. It has never happened that those who want peace have been so muted.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Fri, 09/30/2016 - 10:44 नवीन
श्रीगुरुजी, सुझन अरुंधती रॉयवरून हे प्रचि आठवलं : Image removed. अर्थात, तुम्ही उल्लेखलेल्या लेखाची संगती चटकन लागते हेवेसांन. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
प
पैसा Fri, 09/30/2016 - 10:51 नवीन
पाकिस्तानात जाऊन रहा म्हणावे. भारतात राहून बडबड करायला खूप सोपे. नाहीतर परवा जाळून मारले गेले त्या किंवा डोकी कापून नेली त्या जवानांच्या घरी जाऊन हे पांडित्य सांगू देत. सरळ शत्रू परवडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ग
गॅरी ट्रुमन गुरुवार, 10/06/2016 - 07:33 नवीन
पाकिस्तानात जाऊन रहा म्हणावे. भारतात राहून बडबड करायला खूप सोपे. नाहीतर परवा जाळून मारले गेले त्या किंवा डोकी कापून नेली त्या जवानांच्या घरी जाऊन हे पांडित्य सांगू देत. सरळ शत्रू परवडले.
छ्या!! पैसाताई तुम्ही पण पाकिस्तानी पर्यटनविभागाच्या ब्रॅन्ड अ‍ॅम्बॅसॅडर विभागात सामील झालात की!! ह.घ्या.हे.वे.सां.न.ला (पाकिस्तानी पर्यटनविभागाच्या प्रमोशन विभागात शाळेपासून कामाला असणारा) ट्रुमन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
व
विकास Fri, 09/30/2016 - 13:25 नवीन
पाकीस्तान आणि पाक माध्यमे कमीअधिक प्रमाणात असा सर्जिकल स्ट्राईक झाला हे मान्य करत आहेत. पण अजूनही कोणिही त्यात सामान्य नागरीक अथवा (२ सोडल्यास) सैनिकांनाच मारले आहे असे म्हणलेले नाही... मग ते मारले ते कुणाला आणि ते कुणाच्या भुमिवर काय करत होते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
स
सुबोध खरे Fri, 09/30/2016 - 15:23 नवीन
What happened in Uri, where 19 Indian soldiers were killed in an alleged militant attack, is condemnable. हे वाक्य पहा खिळे मारलेल्या जोड्याने यांचे थोबाड फोडले पाहिजे. व्यक्ती आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरफायदा किती घ्यावा? या १९ हुतात्मा सैनिकांना कोणी मारले कि त्यांनी पण आत्महत्या केल्या? "तथाकथित दहशतवादी हल्ल्यात" म्हणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
प
पैसा Sat, 10/01/2016 - 07:22 नवीन
http://timesofindia.indiatimes.com/india/4000-soldiers-killed-since-1999-Kargil-conflict/articleshow/17377613.cms ही बातमी खरी असेल तर २०१२ पर्यंतच १३ वर्षात कारगिलमधले साडेपाचशे आणि त्यानंतर सुमारे ४००० सैनिक आपण गमावले. हजारावर सैनिकानी आत्महत्या केल्या. तर ३ वर्षात २५००० वर सैनिकानी मुदतपूर्व निवृत्ती घेतली. नंतरच्या चार वर्षातली आकडेवारी मला कुठे बघायला मिळाली नाही. म्हणजे प्रत्यक्ष युद्ध न लढता आपले एवढे सैनिक फुकट मरत आहेत. किंवा त्यांना असह्य ताण होतो आहे. या सगळ्याचा हिशेब कोणी कोणाला विचारायचा? तथाकथित मानवतावाद्यांना?? जवळपास दरवर्षी एक कारगिल युद्धाइतकी किंमत आपण युद्ध न करताच मोजतो आहोत. प्रत्येक मरणार्‍या सैनिकाबरोबर देशाचे, सैन्याचे पैशात नुकसान तर होतेच. पण एक एक घर उध्वस्त होत जाते. विचार करणेही असह्य होत आहे. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
श
श्रीगुरुजी Sat, 10/01/2016 - 11:54 नवीन
What happened in Uri, where 19 Indian soldiers were killed in an alleged militant attack, is condemnable. हे वाक्य पहा खिळे मारलेल्या जोड्याने यांचे थोबाड फोडले पाहिजे. व्यक्ती आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरफायदा किती घ्यावा? या १९ हुतात्मा सैनिकांना कोणी मारले कि त्यांनी पण आत्महत्या केल्या? "तथाकथित दहशतवादी हल्ल्यात" म्हणे
मी पूर्वीच लिहिलेले पुन्हा एकदा सांगतो. पाकिस्तान भारताविरूद्ध ४ वेगवेगळ्या मार्गाने लढत आहे. १) पाकिस्तानी नेतृत्व - आंतरराष्ट्रीय पातळीवर सातत्याने भारतविरोधी प्रचार, चीनशी जवळीक साधून भारताला शह देणे, सातत्याने काश्मिरींना भडकावणे, काश्मिरमध्ये सार्वमताची मागणी करणे, अतिरेक्यांना पाकिस्तानात आश्रय देऊन त्यांना सर्व तर्‍हेचा पाठिंबा देण इ. मार्गाने पाकिस्तानी नेतृत्वाच्या भारतविरोधी कारवाया सुरू असतात. २) पाकिस्तानी लष्कर - भारतावर छुपे हल्ले चढविणे, अतिरेक्यांना सर्व तर्‍हेची प्रत्यक्ष मदत (प्रशिक्षण, शस्त्रे इ.), सीमेवर कायम अशांतता ठेवणे इ. मार्गाने पाकिस्तानी लष्कर भारताविरूद्ध कारवाया करीत असते. ३) अतिरेकी संघटना - भारतावर दहशतवादी हल्ल्यांची योजना आखणे व आपल्या संघटनेच्या अतिरक्यांकडून दहशतवादी हल्ले करणे या मार्गाने या संघटना भारतात दहशत पसरविण्याचा प्रयत्न करीत असतात. ४) भारतातील निधर्मांध (तथाकथित निधर्मी, तथाकथित पुरोगामी आणि तथाकथित विचारवंत) - ही मंडळी सातत्याने पाकिस्तानला भेट देऊन पाकिस्तानचे गोडवे गाण्यात मग्न असतात. भारत-पाकिस्तान संबंधांवर चर्चासत्र आयोजित करणे, भारत-पाकिस्तानमधील संबंधांसाठी दोन्ही देशातील राजकारणीच जबाबदार आहेत व दोन्ही देशातील जनतेला मात्र एकमेकांविषयी खूप प्रेम आहे असा सातत्याने प्रचार करणे, पाकिस्तानातील अतिरेकी संघटना व भारतातील संघ परिवार यांना एकाच मापाने मोजून यांच्यामुळेच दोन्ही देशात अशांतता आहे असा खोटा प्रचार करणे, पीपल-टू-पीपल काँटॅक्ट/कलाकारांची देवाणघेवाण इ. मुळेच दोन्ही देशातील प्रश्न सुटतील असे ठासून सांगणे, काश्मिरींना अधिक स्वायत्तता द्या/तेथील लष्कर काढून दोन्ही देशांच्या सीमा मोकळ्या करा अशा अव्यवहार्य मागण्या करणे, काश्मिरींवरील कथित मानवी हक्क उल्लंघनाबद्दल बोंब मारत फिरणे, भारतीय सैनिक काश्मिरींवर अत्याचार करीत आहेत असा आरडाओरडा करणे, पाकिस्तानी व भारतीय वृत्तपत्रात मोठमोठे लेख लिहून सर्व दोष भारताच्याच माथ्यावर मारणे, अतिरेक्यांबद्दल सहानुभूती व सैनिकांबद्दल तिरस्कार दाखविणे . . . . अशा अनेक मार्गांनी पाकिस्तानला जे आवडेल ते करण्यात मग्न असतात. या मंडळींना पाकिस्तानकडून मोबदला मिळत असावा असा माझा अंदाज आहे. त्याचबरोबरीने अशी भूमिका घेतली तर लगेच विचारवंत, निधर्मी, पुरोगामी असल्याचे प्रमाणपत्र मिंंळून उच्चभ्रूंच्या वर्तुळात प्रवेश मिळतो हा अजून एक जबरदस्त फायदा. चुकुन भारताच्या बाजूने किंवा हिंदूंच्या बाजूने बोलले तर संकुचित विचारांचे, प्रतिगामी, जातीयवादी इ. शिक्के बसण्याची भीति. यातील सर्वात धोकादायक आहेत ते हे भारतातील निधर्मांध. खाल्ल्या घरचे वासे मोजणारी ही जमात सर्वात आधी नष्ट व्हायला हवी. या यादीतील पहिले ३ जण हे भारताचे उघडउघड शत्रू आहेत आणि ते सीमेपार आहेत. मात्र निधर्मांध ही जमात भारतातच राहून कृतघ्नपणे भारताशी दगाबाजी करीत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
श
श्रीगुरुजी Fri, 09/30/2016 - 10:54 नवीन
हे चित्र पण आठवलं. Nawaz Sharif with his three daughters. The middle one is eldest and most patriotic.... - Gini Khan Image removed.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 09/30/2016 - 21:06 नवीन
आज देशात सामान्य लोकांमध्ये आणि लष्करात { विशेषतः रिटायर्ड आर्मी प्रोफेशनल्स मध्ये } प्रचंड आक्रोष आहे, कारण आपल्या देशात एक निर्बुद्ध घर भेदी जमात तयार झाली आहे,अशा लोकांना आता धडा शिकवायची वेळ आली आहे कारण ते मो़काट सुटले आहेत ! यात जेएनयु पासुन चु केजु येतात, ज्यांना बरळण्या शिवाय काही येत नाही ! काश्मिरात पॅलेट गन वापरल्या बद्धल बराच गारादोळ करण्यात आला, का ? लष्करातील जवानांना तुम्ही दगड मारणार / हिंदुस्थान कि बरबादी तक लढेंगे चे नारे देणार / पाकिस्तान आणि आयएस चे झेंडे लावणार त्या बदल्यात यांना गुलाबाची फुले ध्यायची काय ? मला शक्य झाले असते तर आर्मीवर दगड फेक करणार्‍या प्रत्येकाला पकडुन बोफोर्स तोफेला लावुन उडवुन दिले असते ! पॅलेट गन वापरल्या हे लष्कराने / पोलिसांनी आणि सरकारनी त्यांना मोठी मुभाच दिली आहे असे म्हणीन मी. आंधळे झाले/ लुळे पांगळे झाले ते यांना सहन होत नाही ? कॅप्टन कालिया आणि त्याच्या सहकार्‍यांना अत्यंत यातनामय मॄत्यु देण्यात आला / सौनिकांची मुंडकी कापुन ती भेट म्हणुन नेउन त्यावर इनाम जाहिर केले गेले आणि घेतले गेले तेव्हा या सो कॉल्ड लेफ्टिट्स आणि बुद्धीजीवी मंडळींची वाचा बसली होती काय ? अतिरेक्यांन बरोबरच या मंडळीचे सुद्धा चांगले सर्जिकल ऑपरेशन झाले पाहिजे... इतकी मजबुत मारली पाहिजे कि देश विरोधी घोषणाच काय पण पुढच्या जन्मी या देशात पैदा व्हायचीच भिती यांच्या मनात बसली पाहिजे ! जाता जाता :-

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Top Jewish body writes to PM Narendra Modi on Uri attack
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
अ
अनिरुद्ध.वैद्य Sat, 10/01/2016 - 06:38 नवीन
प्रचंड सहमत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
ख
खटपट्या Mon, 10/03/2016 - 21:13 नवीन
सद्या कायप्पावर शरीफ कन्येचा एक फोटो फीरतोय. ती कैच्या कै सुंदर आहे या दोघींपेक्षा. पाकीस्तानातल्या सुंदर्‍यांना बघून "पाकीस्तानात वुमन एम्पॉवरमेंट लवकर होउ देरे महाराजा" असे बोलावेसे वाटतेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
स
सचु कुळकर्णी Fri, 09/30/2016 - 15:11 नवीन
व्हॉट्स अ‍ॅप ढकल साभार. ***ब्रेकिंग न्यूज*** (दै. वर्हाडी वार्ता) वार्तांकन- xxxxx "पाकिस्तानी पंतप्रधानांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी केलेले संभाषण लीक"... टुर्रुक टुर्रुक...टुर्रुक टुर्रुक... ओबामा- (सकाय सकाय कोन व्हय त का चीन, मी मिशेल हाव म्हनुन ईतले वर्ष संसार टिकून हाय, थे भांडे राहू द्या आधी फोन घ्या कोन मसन्या व्हय त...) गुपचाप बस न व माय, अअअ ह्यालो!! कोन बोलत हाय?? बराक ओबामा बोलून रायलो... शरीफ- ह्यालो ह्यालो ह्यालो भाऊ भाऊ भाऊ मी नवाज शरीफ नवाज शरीफ बोलून रायलो इस्लामाबादवरून...भाऊ ह्यालो आवाज येते काय?? (माय बहीन निरे बॉम्ब फोडू फोडू निकाल टावर उडवून देल्ले आता Xट रेंज भेटत नाई) ओबामा- कोनचा शरीफ?? कोन बोलते?? शरीफ- भाऊ मी नवाज शरीफ बोलतो ना बावा, इतल्या लवकर भुलले काय मले, नीरा मोदी मोदीच करता तुमी... ओबामा- हं बोल नव्या का म्हनत... का काम हाय?? शरीफ- भाऊ थो मोदी पायना बावा, आमच्या घरात घुसून त्यायच्या लोकायने आमाले बम कुनारल ना...मले अथी सब्बन श्या द्यून रायले...आता शिंदुच पानी बी देत नाई म्हन्ते मंग आता आमी काय GNGT करावं...?? ओबामा- GNGT म्हंजे?? शरीफ- xx गोटा हो...पानीच नाही राहीन त धुवाची कायन आता?? ओबामा- मंग कायले त्याच्या वाटी जाता तुमी?? बहीन मा खाजवाले नखं नाई तुमाले अन त्यायले लपून छपून लिचुंडे घेता...मंग थो मोदी व्हय...त्यानं देल्ली रयपटीत त आता काऊन टेम्बलत?? शरीफ- पन आज परेंत अस झालं नाई न बा, "हम इस हमले की कठोर शब्दो में निंदा करते है" यवढच म्हनत जाय म्याडमचा मानुस... ह्या मोदी त सायचा नीरा अंगावरच यून रायला...चिबीन!! ओबामा- अबे म्याटा थो जमाना गेला आता पार्टी हायकमांडवाला...तवा सब जमून जाय...आता ह्या पुरा रंगबाज हाय, मलेच त आयकत नाही मंग तू कोन टिप्पूनजी लागून गेला... शरीफ- पन तुमी काईच बोलले नाई भाऊ त्यायन अंदर घुसून ४० मानस मारले आमचे... ओबामा- अबे मी काय बोलू?? थ्या सुषमान UNO च्या मीटिंगमध तुम्हाले नंग करू करू झोडपल न...आता निक्काल देश मोदीच्या बाजून हाये...अन का बे सायच्या तुले का गरज होती उरीत तूर पेराची, आता तनकट निंगाल त मी काय करू?? घेन्न खायन अजून चायनिस शेवड्या, मंचुरी अन मोमो...घे अजून चायनाले उरावर... शरीफ- पन भाऊ आपला दोस्ताना लय जुना हाय...मी हात जोडतो बावा, ह्या मोदी आयकतच नाही ना... ओबामा- चाsssल नखरे नक्करु जास्त, शिक्कुन रायला का?? मी आता काहीस करू शकत नाही...आमच्या इथय सगडे म्याट झाले मोदीपाई, त्यानं सिनेटमध झुईझप भाषन देलल्यापासून माह्या आचार्यान बीफ, पोर्क सार सोडून देल्ल... निरे दाल तडके खाऊ घालते न माही मुयव्याध उमयली... बायकोय दुपारची कुरड्या-पापड लाटाले लावते... (हो आलोच हा जान, एक मिनिट) शरीफ- भाऊ अस नका बोलू न बा, तुमीच अशे बोलले त आमचं कस हुईन, थो मोदी नीरा घुररावून पायते, माह इकडं बीपी वाहाडल... ओबामा- अबे जाऊन पाय पकड त्याचे, आता युपीये सरकार नाई मोदी सरकार हाय, आता जास्तीचे लाडाकपन ज्यमत नाई भाऊ, टाईम हाय सुधरुन जाय... (डार्लिंग आलो ना बस कनिक भिजवली हाय, रपरप पोया टाकतो, झुनका भाजतो न लेकरायले ज्यू घालतो, डोन्ट वरी स्वीटहार्ट, लव्ह यु ममम्मुऊऊ) अबे ठेव फोन सायच्या इकडं माई सर्जिकल स्ट्राईक हुन रायली अन डबल मले फोन कराचा नाई... शरीफ- पन भाऊ...भाऊ...बराकभाऊ...मी का म्हंतो... टुsssक...टुsssक...टुsssक... इस रूट की सभी लाईने व्यस्त है...कृपया थोडी देर बाद ट्राय करे... (दिलचस्प न्यूज एवं ताजी खबरो के जानकारी के लिये पढते रहीये दै. वर्हाडी वार्ता)
  • Log in or register to post comments
व
विद्यार्थी Fri, 09/30/2016 - 18:51 नवीन
लै भारी!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचु कुळकर्णी
प
पैसा Fri, 09/30/2016 - 19:15 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचु कुळकर्णी
र
रेवती Fri, 09/30/2016 - 19:51 नवीन
हा हा हा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचु कुळकर्णी
य
यशोधरा Sat, 10/01/2016 - 06:20 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचु कुळकर्णी
न
नाखु Sat, 10/01/2016 - 06:41 नवीन
सच्चु भारी रे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
ब
बांवरे Sat, 10/01/2016 - 21:23 नवीन
:):) :) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचु कुळकर्णी
त
तेजस आठवले Fri, 09/30/2016 - 19:52 नवीन
लोकमान्य लोकशक्ती असलेल्या दैनिकातील खालील लेख वाचनात आला. सध्या लोकसत्ता वाचणे खूप कमी केले आहे पण भारताच्या कारवाईमुळे अतिशय आनंद झाला आणि मन प्रसन्न झाले होते, म्हणून वृत्तपत्रे चाळत होतो, तेव्हा हे विचारपुष्प हाती लागले. http://www.loksatta.com/desh-videsh-news/amit-shah-congratulates-pm-modi-for-surgical-strikes-1310658/ ‘रॅम्बो‘ कारवाईचे अर्थ आणि परिणाम
‘ब्रँड मोदी’ची पडझड रोखण्यात सफल.
स्वतःची इमेज राखण्यासाठी देशाच्या पंतप्रधानांनी सर्जिकल स्ट्राईक करण्याचा निर्णय घेतला असा तर अर्थ ह्यातून काढला जाईल. ह्या वृत्तपत्राचा मोदी विरोध इतका टोकाला पोचला आहे की भारताच्या ह्या कारवाईचा फायदा मोदींनी स्वतःची प्रतिमा उजळवण्याकरता केला असा बेधडक बुद्धिभेद इथे करून टाकला आहे.मोदी भारताचे पंतप्रधान आहेत, त्यांच्या परवानगीशिवाय असा हल्ला होऊ शकत नाही ह्या गोष्टीचा इथे खुबीने वापर करून घेतला आहे. पाकिस्तान ने आपल्याला इतका त्रास दिला आहे की कोणताही पंतप्रधान असता तरी भारतीय जनतेने हीच प्रतिक्रिया व्यक्त केली असती.इंदिरा गांधींची प्रतिमा बांगलादेश युद्धानंतर कायमची बदलली हे वास्तव आहे. त्यांनी त्या वेळी दाखवलेली धडाडी आणि शौर्य कौतुकास्पदच होते आणि आहे.
देशांतर्गंत अनेक प्रश्नांवरून लक्ष वळविण्यात आणि विरोधकांच्या हातातून अनेक मुद्दे हिसकाविण्यात यश. उत्तर प्रदेशातील निवडणुकीत फायदा करून घेण्याचे मनसुबे. त्यामुळे ५६ इंचाचे गोडवे उत्तर प्रदेशात पुन्हा गायले गेले नाही तर नवलच.
म्हणजे देशांमधले अंतर्गत प्रश्नावरून लक्ष वळवण्यासाठी भारताने हल्ला केले तर! किंवा उत्तर प्रदेश निवडणूक जवळ येत आहेत म्हणून मोदी आणि अमित शहा यांनी हा बनाव रचला ? काय नक्की म्हणायचे तरी काय आहे या लेखकाला? देशात काय अंतर्गत प्रश्न आहेत की ज्यामुळे मोदी सरकार उलटवले जाऊ शकते ? किती ही काही झाले तरी जोपर्यंत 2019 साठी एक सशक्त पर्याय पंतप्रधानपदासाठी उभा राहत नाही तो पर्यंत मला नाही वाटत मोदी सरकार जाऊन दुसरे सरकार येईल. अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे. माझ्या मते तरी हा लेख नेहमीसारखा नथीतून तीर मारण्यासाठी आहे. लाडके संपादक अमेरिकेत निवडणूक कव्हर करायला गेले आहेत, ते तिकडून मोदी विरोधाची परंपरा चालू ठेवणार ही अपेक्षा होतीच, ह्या लेखामुळे त्यावर शिक्कामोर्तब झाले.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 10/01/2016 - 12:19 नवीन
.

(अ) "हायेस्ट स्टेट ऑफ अ‍ॅलर्ट" वर असलेल्या शत्रूच्या प्रदेशात (आ) काही किलोमीटर आतवर घुसून (इ) त्याला पत्ता न लागू देता (ई) त्याचा पत्ता काटून (उ) भारतिय सैन्य एकही सैनिक न गमावता परतते... आणि (ऊ) दुसर्‍या दिवशी आपला DGMO फोन करून पाकिस्तानच्या DGMO ला त्या ऑपरेशनची माहिती ठणकावून देतो.

अश्या कृतीचा अर्थ समजावून द्यायला लागतो अश्या व्यक्तीला तो अर्थ समजावून देणे निरर्थक असते... कारण... (अ) त्या व्यक्तीच्या तर्कशक्तीत मूल कमतरता असते आणि/किंवा (आ) तर्क समजाऊन घेणे त्या व्यक्तीला सोईचे नसल्याने ती "झोपेचे सोंग" घेऊन आहे ! :) ******************************************* "आम्ही आणि इतर कोणी दट्ट्या दिला म्हणून केवळ पाच-सात दिवसांच्या कालावधीत ही कृती भारतिय सैन्याने केली" असा दावा करणार्‍यांचे मी अभिनंदन करतो ! कारण... अ) ते एका अर्थाने भारतिय सैन्याच्या कर्तबगारीचे कौतूक व समर्थनच करत आहेत. "हायेस्ट स्टेट ऑफ अ‍ॅलर्ट" वर असलेल्या शत्रूच्या प्रदेशात काही किलोमीटर आतवर घुसून त्याला पत्ता न लागू देता त्याचा पत्ता काटून भारतिय सैन्य एकही सैनिक न गमावता परतले. इतक्या कमी वेळात, इतक्या कमी संख्येने असलेले, भारतिय सैनिक इतकी प्रभावी कृती करू शकतात तर मग पुरेसा वेळ दिल्यावर पुरेश्या संख्येने असलेले भारतिय सैनिक शत्रूची काय अवस्था करू शकतील, याची कल्पना करायला फार जास्त कल्पनाशक्तीची जरूर नाही ! :) ;) त्याबरोबरच... आ) असा दावा करणारे लोक "पूर्वीच्या सर्व छटांच्या सर्व भारतिय सरकारांमध्ये धमक व राजकिय इच्छाशक्ती यांचा अभाव होता आणि आताच्या सरकारमध्ये नाही" हे कळत-नकळत कबूल करत आहेत. कारण...

भूतकालात आणि आजही भारतिय सैन्य तेच होते/आहे, फक्त यावेळेस सरकार वेगळे आहे... हाच एक फरक आहे, नाही का ? :)

  • Log in or register to post comments
व
विकास Sat, 10/01/2016 - 14:52 नवीन
तुम्ही काय बी म्हना! आम्ही आपलं झोपेचे सोंग घेऊनच राहणार... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ग
गामा पैलवान Sat, 10/01/2016 - 19:04 नवीन
लोकहो, बघा मी म्हणंत होतो ना की आता लक्ष्य वराहनगर हेच असायला पाहिजे. नेमका असाच विचार मजदक दिलशाद बलुच नामक एका बलुची बांधवांच्या नेत्याने व्यक्त केला आहे. आ.न., -गा.पै. टीप : ज्यांना सनातन प्रभात या वृत्तपत्राचं वावडं आहे त्यांच्यासाठी :- http://www.pudhari.com/news/desh/86207.html
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 10/02/2016 - 06:13 नवीन

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- After Karachi, flight curbs over Lahore too
  • Log in or register to post comments
ध
धनावडे Sun, 10/02/2016 - 08:44 नवीन
पाटकर बाई म्हणतायत की भारतान हिंसेने नाही अहिंसक मार्गान उत्तर द्यायला हव होत.
  • Log in or register to post comments
म
मोदक Sun, 10/02/2016 - 09:04 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनावडे
अ
अनिरुद्ध.वैद्य Sun, 10/02/2016 - 19:19 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनावडे
ग
गॅरी ट्रुमन गुरुवार, 10/06/2016 - 07:11 नवीन
चळवळीच्या नेत्यावरून चळवळीतील अनुयायी, समर्थक आणि कार्यकर्ते यांची पारख करता येते. असल्या चळवळीतील/आंदोलनातील जवळपास सगळेच लोक माझ्यासारख्या अनेकांच्या डोक्याला शॉट कित्येक वर्षांपासून लावत आलेले आहेत.ज्यांना ही गोष्ट अनुभवायला लागली नव्हती त्यांनाही हे आता लक्षात येईल. पाटकरबाईंनी हे वक्तव्य उघडपणे केले हे एक चांगले झाले. असल्या फडतूस माणसांची जी काही विश्वासार्हता शिल्लक होती ती पण धुळीस मिळाली आहे आणि भविष्यात असल्यांच्या बडबडीला फारसे कोणी गांभीर्याने घेणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनावडे
क
कैलासवासी सोन्याबापु Sun, 10/02/2016 - 08:53 नवीन
आता पलिकडे जाऊन दहशतवाद्यांना अन पाकी फौजेला दे माय धरणी ठाय करुन सोडणा-या भारतीय स्पेशल फोर्सेस बद्दल एक अतिशय जबरदस्त विडीयो, ही माणसे काय कोटीचं प्रशिक्षण घेतात हे पाहुन छाती दडपुन जाते १४ तासात १०० किमी रनिंग वगैरे भयानक प्रकार असतात ह्या प्रशिक्षणात. जरुर आनंद घ्या (?) ह्या विडीयोचा.
  • Log in or register to post comments
व
विकास Sun, 10/02/2016 - 14:57 नवीन
धन्यवाद! सगळा बघितला नाही, पण जबरा आहे हे जे काही पाहीले त्यावरून समजले!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कैलासवासी सोन्याबापु Sun, 10/02/2016 - 19:16 नवीन
पुर्ण पहावात ही आग्रहाची विनंती!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा