Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळावर भारताचा हल्ला

श
श्रीगुरुजी
गुरुवार, 09/29/2016 - 11:46
🗣 290 प्रतिसाद
वेगवेगळ्या वाहिन्यांवरील वृत्तानुसार व वेगवेगळ्या संकेतस्थळांवरील बातमीनुसार भारतीय सैन्याच्या तुकड्यांनी आज पहाटे भारत व पाकिस्तानमधील नियंत्रण रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मीरमधील काही अतिरेकी प्रशिक्षण केंद्रांवर हल्ला करून काही अतिरेकी व सैनिकांना मारून भारतीय सैनिक सुखरूप भारतीय प्रदेशात परतले. काही वाहिन्यांवरून ५ अतिरेकी प्रशिक्षण केंद्रांवर हल्ले केले असे सांगण्यात येत आहे. काही वाहिन्या हीच संख्या ६ व ७ असे सांगत आहेत. आपले २ सैनिक मारले गेले व काही जखमी झाले असे पाकिस्तानने जाहिररित्या मान्य केले आहे. परंतु भारताने सीमारेषा ओलांडलेली नाही असा त्यांचा दावा आहे. या हल्ल्यात भारतीय सैनिकांनी ३०-३५ अतिरेकी मारले असेही आकडे वाहिन्यांवरून सांगण्यात येत आहे. एकंदरीत प्रत्येक वृत्तसंस्था वेगवेगळे आकडे सांगत आहे. इंडियन एक्स्प्रेसमधील वृत्तानुसार, (http://indianexpress.com/article/india/india-news-india/india-conducted-surgical-strikes-last-night-in-pok-to-safeguard-our-nation-defence-ministry-3055715/) ndia conducted surgical strikes last night along the LoC to safeguard our nation, the Defence Ministry said on Thursday. “Significant casualties have been caused to terrorists and those trying to shield them. We don’t have a plan to further conduct such strikes. India has spoken to Pakistan,” DGMO Lt Gen Ranbir Singh said. “… Now, based on very specific and credible information we received yesterday, that some terrorist teams had positioned themeselves at launch pads along the LoC with an aim to carry out infiltration and terrorist strikes in J&K and various other metros in our country. There were launch pads at the LoC where terrorists were present waiting to infiltrate the nation and attack areas in Kashmir and metros across the country,” the DGMO said. No Indian casualties occurred during the surgical strikes that were carried out last night by the Indian Army. Meanwhile, Pakistan, in a statement issued has said: At least two Army men were killed as Indian and Pakistani troops exchanged fire over the Line of Control in “Azad Jammu and Kashmir”. The exchange of fire began at 2:30am, ISPR said, and continued till 8:00am. “Pakistani troops befittingly responded to Indian unprovoked firing on the LoC in Bhimber, Hotspring Kel and Lipa sectors,” the statement said. दोनच दिवसांपूर्वी अमेरिकेचे मंत्री जॉन केरी यांनी सुषमा स्वराजांची २ वेळा भेट घेऊन "पाकिस्तानबरोबरील वाद चिघळवू नका" असा सल्ला दिला होता. या सल्ल्यानंतर दोनच दिवसात हा हल्ला झाल्यामुळे भारत या हल्ल्याची तयारी करीत आहे असा अमेरिकेला अंदाज आलेला असावा. या हल्ल्याची व्याप्ती वाढली तर त्याचे छोट्या युद्धात रुपांतर होऊ शकते व त्यामुळे अमेरिकेच्या भारतीय उपखंडातील हितसंबंधावर परीणाम होऊ शकतो. म्हणूनच केरी यांनी जाहीररित्या हा सल्ला दिला असावा. http://indianexpress.com/article/india/india-news-india/india-pakistan-situation-relations-saarc-cancel-indus-water-kerry-sushma-swaraj-uri-3055405/ _________________________________________________________________________ असे हल्ले करण्याशिवाय भारताकडे पर्यायच शिल्लक नव्हता. आपली वाट लागली तरी चालेल, पण भारताला सुखाने जगू द्यायचे नाही हा विडा उचललेल्या पाकिस्तानला इतर कोणत्याही मार्गाने थोपविण्याचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले आहेत. पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदी, संयुक्त राष्ट्रसंघात पाकिस्तानवर टीका, ट्रॅक २ डिप्लोमसी, पीपल-टू-पीपल कॉंटॅक्ट, बस-ट्रेन सेवा, मोस्ट फेवर्ड नेशन दर्जा, भूतकाळातील सर्व युद्धात झालेले पराभव . . . अतिरेक्यांना प्रशिक्षण देऊन व शस्त्रे व इतर सर्व तर्‍हेची मदत देऊन भारतात पाठवून दहशतवादी कारवाया घडवून आणणे व अतिरेक्यांना आपल्या देशात आश्रय देण्याचे धोरण पाकिस्तान बदलायला तयार नाही. त्यामुळे जशास तसे उत्तर देणे हा एकमेव पर्याय शिल्लक होता. आधी पठाणकोट हल्ला आणि आता झालेला उरी हल्ला यामुळे मोदींना जोरदार टीकेचा सामना करावा लागला. आपल्यात व आधीच्या सरकारमध्ये काहीच फरक नाही, आपण नुसते बोलघेवडे आहोत इ. स्वरूपाच्या टीकेमुळे मलीन झालेली आपली प्रतिमा बदलण्यासाठी हा हल्ला करणे आवश्यकच होते. परंतु असे हल्ले करून शत्रूला जरब बसविण्यामागे जी प्रगल्भता लागते ती अजूनही भारताकडे आलेली दिसत नाही. मागील वर्षी आणि परत यावर्षी सुद्धा भारतीय सैन्याने म्यानमारमध्ये प्रवेश करून फुटीरतावाद्यांना मारले होते. सिंधू पाणीवाटप करार रद्द करावा यासाठी चर्चा सुरू आहे. आणि आता आज पहाटे हा हल्ला झाला. या प्रत्येक घटनेनंतर प्रकर्षाने दिसतोय तो प्रसिद्धीचा उतावीळपणा. असे हल्ले गुपचूप करून हल्ले केल्यावरसुद्धा त्याची जाहिरात किंवा गाजावाजा केला नाही तर ते योग्य ठरेल. गतवर्षी म्यानमारमधील कारवाईनंतर लगेच लष्कराने पत्रकार परीषद घेऊन हल्ल्याची माहिती दिल्यावर लगेच म्यानमारने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. अतिरेकी किंवा शत्रूच्या सैनिकांवर ज्या कारवाया केल्या जातात त्याची वाच्यता करण्याची गरज नाही. जुलैमध्ये सुरक्षा दलांनी काश्मिरमध्ये अतिरेकी बुर्‍हान वाणीला मारल्यानंतर लगेच ते जाहीर केले होते. त्यामुळे काश्मिरमध्ये जनतेला भडकावण्यात येऊन आजही तिथली परिस्थिती अशांत आहे. बुर्‍हान वाणी ७-८ महिने फरारी होता. त्याला मारल्यानंतर ते जाहीर न करता त्याचा अंत्यविधी गुपचुप उरकला असता तर तो मेल्याचे बाहेर समजले नसते व त्यामुळे पुढील समस्याही निर्माण झाल्या नसत्या. निदान भविष्यात तरी अशा कारवाया शेवटपर्यंत गुपचूप ठेवल्या तर नवीन समस्या निर्माण होणार नाहीत. आजच्या कारवाईची जाहीर माहिती देऊन मोदी सरकारला आपली प्रतिमा उजळून घेण्यास मदत झाली असेल. परंतु त्यातून जिन्गोइझम निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. आता पुढील काही दिवसात अत्यंत बेजबाबदार वाहिन्यांवरून वेगवेगळ्या पक्षांचे प्रतिनिधी व माजी लष्करी अधिकारी एकत्र बोलावून चर्चांचा कीस पाडला जाईल. भाजपचे प्रवक्ते स्वतःची पाठ थोपटून घेतील व काँग्रेसमध्ये असे करायची हिम्मतच नव्हती असे टोमणे मारतील. काँग्रेसवाले बांगलादेश मुक्तीचे उदाहरण देऊन आम्हीचे कसे ग्रेट होता व आमच्या काळातसुद्धा अशा कारवाया होत होत्या, पण आम्ही जाहिरातबाजी करीत नव्हतो असे प्रत्त्युत्तर देतील. यातून युद्ध होऊन दोन्ही देशातील नागरिकांना त्रास होईल व म्हणून अशा हल्ल्यांऐवजी चर्चा करावी असा सल्ला पाकिस्तानप्रेमी निधर्मांध देतील (मराठी वाहिन्यांवर प्रकाश बाळ, जतीन देसाई, हेमंत देसाई इ. मंडळी यात आघाडीवर असतील). भारताने काय करायला हवे याबाबत अनेकांचे सल्ले सुरू होतील. एकंदरीत पुढील काही दिवसात वाहिन्यांवरून प्रचंड धुरळा उडणार आहे. आज झालेल्या हल्ल्यामुळे पाकिस्तान वठणीवर येईल व भारतावर हल्ले थांबवेल असे मानणे भाबडेपणाचे ठरेल. भारताने अशा कारवाया सुरूच ठेवाव्यात, परंतु त्याचा गाजावाजा करू नये.

प्रतिक्रिया द्या
72104 वाचन

💬 प्रतिसाद (290)
व
विशुमित Sat, 10/08/2016 - 06:34 नवीन
सर्जिकल स्ट्राईक मोदींनी केला का सैन्यांनी? मग एवढी पोस्टर बाजी कशा साठी? http://www.ndtv.com/india-news/pms-message-yet-to-reach-up-as-bjp-plans-to-honour-defence-minister-parrikar-1470850 सर्जिकल स्ट्राईक करून मोदींनी आणि भाजप ने उपकार नाही केले देशावर. त्या सरकारच्या **डा ला पेट्रोल लावल्याशिवाय काम करणारच नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ब
बोका-ए-आझम Sat, 10/08/2016 - 07:46 नवीन
शिव्या देण्यामुळे तुमचंच frustration समोर येतंय हे लक्षात येतंय का? Surgical Strike करुन मोदींनी देशावर उपकार केले असं कुठे म्हटलंय? त्यांनी पंतप्रधान म्हणून स्वतःचं काम केलंय. पोस्टर लावण्याची गोष्ट असेल तर त्यात चुकीचं काय आहे? जर काँग्रेसने केलं असतं तर त्यांनी पोस्टर्स छापली नसती असं जर तुमचं म्हणणं असेल तर बोलणंच खुंटलं. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या दुर्दैवी हत्या ' मां बेटे का यह बलिदान, नही भूलेगा हिंदुस्तान ' अशा घोषणा देऊन काँग्रेसवाले अजूनही वापरतात; स्वातंत्र्यलढ्यातली काँग्रेस आणि आत्ताचा काँग्रेस पक्ष हे पूर्णपणे वेगळे असतानाही ' आम्ही देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं' असं धादांत खोटं बोलतात ते चालतं, मग भाजपच्या पंतप्रधानाने घेतलेल्या निर्णयामुळे झालेल्या सकारात्मक गोष्टीचा जर त्यांच्या पक्षाने राजकीय फायदा उठवायचा प्रयत्न केला तर त्यात चुकीचं काय आहे? जे दोन वर्षे सत्तेवर असलेला पक्ष करु शकला ते १० वर्षे सत्तेवर असलेला आणि त्याही आधी सत्ता उपभोगणारा पक्ष का करु शकला नाही? सैन्य तेच होतं, त्याची क्षमताही तीच होती. एका पक्षाने इच्छाशक्ती दाखवली, ते त्याचा फायदा उठवणार. दुस-याने संधी असताना दवडली. ते आरडाओरडा करणार. हे अगदी स्वाभाविक आहे. त्यामुळे तुमच्या प्रतिक्रियेचं आश्चर्य वाटलं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
क
कैलासवासी सोन्याबापु Sat, 10/08/2016 - 08:05 नवीन
बरोबर! सैन्य सत्ताधारी पक्षाची बटीक असल्याचे ट्रेंड सेट करणे म्हणजे अत्युच्च देशभक्ती आहे, जय हिंद!.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
क
कैलासवासी सोन्याबापु Sat, 10/08/2016 - 08:07 नवीन
जे चुकीचे आहे त्याचे समर्थन तुमच्याकडून तरी अपेक्षित नव्हते बोक्याभाऊ, असो. बाजू निवडायची अहमहमिकाच लागली आहे त्याला कोण लय करणार, वाईट वाटले मनापासून इतकेच म्हणतो :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
ब
बोका-ए-आझम Sat, 10/08/2016 - 09:08 नवीन
' सैन्य ही सत्ताधारी पक्षाची बटीक आहे ' या तुमच्या उद्गारांबद्दल सखेद आश्चर्य वाटलं. शेवटी लोकशाहीत सैन्य हे लोकप्रतिनिधींनी बनवलेल्या सरकारच्या आदेशाप्रमाणे चालतं. सैन्याने सरकारचे आदेश पाळणे म्हणजे सैन्य बटीक होणं आहे का हे आपण सांगावे. आपल्याला अनुभव आहे. १९७१ मध्ये बांगलादेशसाठी लढताना आणि १९८६-८८ मध्ये श्रीलंकेत लढताना आपलं सैन्य बटीक होतं का हेही जाता जाता सांगून टाकावे. तुमच्यामते जर कोणता पक्ष सत्ताधारी आहे यावर हे अवलंबून असेल तर तसंही सांगा म्हणजे यापुढे गैरसमज होणार नाही. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कैलासवासी सोन्याबापु Sat, 10/08/2016 - 10:16 नवीन
लोकशाही तत्वधनात तुम्ही वर्णन केलेला सैन्याचा रोल ह्यात असहमती दर्शवण्यालायक काहीच नाही हे आधीच स्वच्छ शब्दात मान्य करतो, "सैन्य हे सरकारचे बटीक आहे" हे विधान का आले त्याच्याकडे जरा वळतो आता मी. पहिली गोष्ट, तुम्ही जे बांगलादेश युद्ध किंवा इतर युद्धाचे रेफरन्स देत आहात ते इथे गैरलागू होतात कारण सर्जिकल स्ट्राईक अन फुल स्केल वॉर ह्यात फरक असतो (तो वरती एक्का काकांनी उत्तमरीत्या विशद केला आहेच) सर्जिकल स्ट्राईकवर एक राजकारणाचे सावट कायम असते, ह्याचे भान कायम ठेवायला लागते, सुदैवाने मोदींना त्या बाबीची पूर्ण जाण आहेच हे ही मी नमूद करतो, फक्त त्या बाबतीत त्यांची पार्टी महामूर्ख आहे हे तुम्ही मान्य कराल काय? क्षणभर जर 71 वगैरे युद्धे अन त्याचे राजकीय वापर जे तुम्ही सांगताय ते valid धरले तर इथेही धरायला हरकत नाही, पण किती?? हा कळीचा मुद्दा आहे, राजकीय पोस्टरबाजी इतकी करावी का ? हा पण मुद्दा आहे , काल कामानिमित्त आग्रा मार्गे हिंडन एअरबेसला गेलो होतो, आग्रा महानगर बीजेपी ने जी आचरट पोस्टर लावली आहेत त्याचे मला दुर्दैवाने फोटो घेता आले नाहीत, पण त्या पोस्टर्सवर कुठेही सैन्याला धन्यवाद आभार वगैरे नाहीये तर फक्त अन फक्त मोदी आहेत, ह्या दळभद्री उद्योगांनी कमीपणा कोणाला येतोय? इतका की शेवटी मोदींना त्यांच्या मंत्री अन कार्यकर्त्यांना "इनफ ऑफ चेस्ट थांपिंग नाऊ" सांगावे लागले असावे?? ज्या पार्टीला आपण जगातली सर्वात मोठी कॅडर बेस्ड पार्टी असल्याचा अभिमान आहे तिला एका गावातली पोरेटोरे सांभाळता येऊ नयेत? बरं परत एक मुद्दा मांडतो, दरवेळी जर बीजेपी ने काही चूक केल्यास काँग्रेसनेही हेच केले होते असे उद्धृत करावे लागले तर माझ्यामते त्याच्याइतका पॉलिटिकली इनकरेक्त स्टँड दुसरा नसावा कारण जनतेने काँग्रेसला कंटाळून बहुमत दिलेले आहे, दिल्लीत बसून प्रतिकाँग्रेस व्हायला नाही हे आपण एकमेकांना अन बीजेपीला सांगून उपयोग नाही असेही नोंदवतो. बाकी दिल्लीकर जाणोत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ब
बोका-ए-आझम Mon, 10/10/2016 - 13:10 नवीन
बाकी सर्जिकल स्ट्राईक आणि फुल स्केल वाॅर यात फरक आहे हे मान्य आहेच, पण दोन्हीही वेळा हे निर्णय लोकनियुक्त सरकारचे असतात या संदर्भात ते उदाहरण आहे, बाकी काही नाही. Real reason why Cong never took credit for pre-2014 surgical strikes in Pak http://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/heres-the-real-reason-behind-congress-silence-on-pre-2014-cross-border-raids/articleshow/54778781.cms via The Economic Times App(Download Now): http://ecoti.in/etapps बाकी भाजप हा काही धुतल्या तांदळासारखा पक्ष नाही, पण जेव्हा ते काही चुका करतात तेव्हा ज्या पद्धतीने त्या media मध्ये highlight होतात त्यावरून media चा anti-BJP bias स्पष्टपणे दिसतो. इतर पक्षांनी असं करूनही भाजपने ती चूक भारतीय राजकारणात पहिल्यांदाच केल्याचा जो आव आणला जातो ते खटकतं. इथे मिपावरही तसंच होतं. लोकांनी भाजपच्या चुका, घोडचुका जरुर दाखवाव्या पण मग दुस-या पक्षांबाबतही तसं वागावं. भाजपच्या चुका दाखवायच्या आणि दुस-या पक्षांच्या चुका दाखवल्या की भक्त, नमोरुग्ण असे शेरे मारायचे याला अर्थ नाही. किंवा मग सरळ आपण biased आहोत हे मान्य करावं. निस्पृह असल्याचे दावे करु नयेत. (हे अर्थातच तुम्हाला उद्देशून नाही. प्रतिसाद जरी तुम्हाला असला तरी.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
अ
अर्धवटराव Sat, 10/08/2016 - 08:24 नवीन
तवा गरम असेल तर पोळी भाजणे हा राजकारणाचा गुण आहे. मागच्या काहि दिवसांमधे अनेकवेळा बॅकफुटवर गेलेलं सरकार आणि पक्ष आल्या संधीचं सोनं लुटायला बघतय हे दुर्दैवी असलं तरी स्वाभावीक आहे (फार काहि दुर्दैवीसुद्धा नाहि... राजकारणातली नैतिकता स्वच्छ व्हायला अजुन बरच साबण घासायचं आहे भारताला)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
स
सुबोध खरे Sat, 10/08/2016 - 08:37 नवीन
बोका साहेब भाजपने या बातमीचा राजकीय लाभ उठवावा कि नाही हा प्रश्न वेगळा आहे ( कोणताही राजकीय पक्ष त्याचा फायदा उठवणार नाही असे होणारच नाही) परंतु अजून तशी वेळ आलेली नाहि. हा मामला थंड होऊ द्यायला हवा होता. पाकिस्तानी लष्कर याचे काय उत्तर देते आहे ते पाहणे आवश्यक आहे. आणि या राजकीय धुरळ्यामुळेच संजय निरुपम किंवा केजरीवाल सारखे लोक लष्करावर उघडपणे अविश्वास दाखवत आहेत. राजकीय इच्छाशक्ती मोदी साहेबानी दाखवली हि वस्तुस्थिती. अन्यथा आता त्यांच्या वर टीका करणारे मिपावरील हेच लोक कुठे गेली तुमची ५६ इंची छाती म्हणून विचारत होते. आता त्याला उत्तर मिळाले म्हणून हि कोल्हेकुई चालू आहे. तरीही हि वेळ योग्य नाही असेच मी म्हणेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ब
बोका-ए-आझम Sat, 10/08/2016 - 09:20 नवीन
हे मला सांगून काय फायदा आहे? भाजपची राजकीय धोरणं मी ठरवतो का? मी फक्त वस्तुस्थिती सांगितली. हा सर्जिकल स्ट्राईक होण्याआधी मिपावर उरी हल्ल्यासंदर्भात जो धागा धर्मराज मुटकेंनी काढलेला आहे त्यावर एका प्रतिक्रियेत मी स्पष्टपणे म्हटलं आहे की उत्तर प्रदेशात निवडणुका असल्यामुळे आणि त्या महत्वाच्या असल्यामुळे सरकारला उरी प्रकरणावर काहीतरी ठोस कृती करावीच लागेल. कुठलाही राजकीय पक्ष हा त्याच्यासंदर्भात होणाऱ्या सकारात्मक गोष्टींचा राजकीय फायदा उचलण्याचा किंवा पोळी भाजण्याचा प्रयत्न करतोच. ते नाकारणं चुकीचं आहे. जर कुणाचा दोष असला तर तो लोकशाही आणि त्याच्या अनुषंगाने निवडणूक आणि ती जिंकणं या ज्या अपरिहार्य गोष्टी आहेत त्याचा आहे. आज भाजप आहे, उद्या काँग्रेस असती तरी ते असंच वागले असते याबद्दल मला खात्री आहे. आपल्या नैतिकतेच्या कल्पना आणि राजकीय पक्षांचे आडाखे यात फरक असल्यामुळे आपल्याला धक्का बसत असेल, पण मी पत्रकारिता करत असताना जे थोडंफार राजकारण पाहिलंय त्यावरून मला अजिबात आश्चर्य वाटलेलं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
व
विशुमित Sat, 10/08/2016 - 12:14 नवीन
<<<<<<शिव्या देण्यामुळे तुमचंच frustration समोर येतंय हे लक्षात येतंय का?>>>> साहेब तुम्हीच शिव्या देताय मी नाही--- आमच्या कडे उखडण्याला उपटणे म्हणतात., हे लक्षात येतंय का????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ब
बोका-ए-आझम Mon, 10/10/2016 - 12:52 नवीन
तर मग ** असे दोन तारे का टाकलेत? सरळसरळ जो शब्द वापरायचा होता तो वापरायचा. मी जो शब्द वापरला आहे तो शिवी नसल्यामुळे व्यवस्थित पूर्णपणे वापरला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
श
श्रीगुरुजी Sat, 10/08/2016 - 12:07 नवीन
सर्जिकल स्ट्राईक मोदींनी केला का सैन्यांनी? मग एवढी पोस्टर बाजी कशा साठी? http://www.ndtv.com/india-news/pms-message-yet-to-reach-up-as-bjp-plans-...
या विशिष्ट लिंकवर एक पूर्ण पोस्टर आहे व दुसर्‍या एका फलकाचा थोडासा भाग आला आहे. दोन्ही फलकांवर जे लिहिले आहे ते अत्यंत अस्पष्ट असल्यामुळे नक्की काय लिहिले आहे ते समजत नाही. पहिल्या पूर्ण फलकावर मोदी व पर्रीकरांची चित्रे आहेत. परंतु त्यावर भाजप या पक्षाचे नाव व कमळ हे चिन्ह नाही. त्यामुळे हा फलक भाजपने लावलेला नाही असे दिसत आहे. दुसर्‍या फलकाचा जो अगदी थोडासा भाग दिसतो त्यात मोदींचे चित्र व त्याखाली कमळाचे चिन्ह एवढेच दिसते. उर्वरीत फलक दिसत नाही व त्यामुळे त्या फलकावर काय लिहिले आहे ते सांगता येत नाही. त्यामुळे ही पोस्टरबाजी भाजपने केली आहे असे दिसत नाही. हा वृत्तांत 'एनडीटीव्ही'ने दिला असल्याने मिठाची चिमूट घेऊनच त्याकडे पहायला हवे. मुद्दाम अस्पष्ट चित्रे टाकून वाचकांची दिशाभूल करणे व भाजपबद्दल मत कलुषित करणे हाच त्यामागचा उद्देश दिसतो.
सर्जिकल स्ट्राईक करून मोदींनी आणि भाजप ने उपकार नाही केले देशावर. त्या सरकारच्या **डा ला पेट्रोल लावल्याशिवाय काम करणारच नाही का?
कोण म्हणतंय मोदींनी किंवा भाजपने देशावर उपकार केले आहेत? जे केलंय ते त्यांचं कामच आहे व ते करायलाच हवं होतं. आणि **डा ला पेट्रोल लागल्याचं म्हणाल तर निदान पेट्रोल लागल्यावर तरी त्यांनी काम केलं. आधीच्या सरकारने तर आग लागून **ड पूर्ण जळून गेलं होतं तरी ते ढिम्म होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Sat, 10/08/2016 - 12:21 नवीन
म्हणजे NDTV सुद्धा खोटा आणि अतिरंजित चॅनेल म्हणायचं. जी अगदी विश्वासू अशी वृत्त वाहिन्या असतील त्याची कृपया यादी देता का म्हणजे पुढे मला अडचण येणार नाही खरे खोटे करण्याची. <<<<<<<<कोण म्हणतंय मोदींनी किंवा भाजपने देशावर उपकार केले आहेत?>>> तुम्हीच. तुमच्या प्रत्येक प्रतिसादामध्ये. बाकी हा प्रतिवाद बोका शेठना होता, तुम्ही त्यासाठी कष्ट घेतले अत्यानंद झाला .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sat, 10/08/2016 - 12:31 नवीन
तुम्हीच. तुमच्या प्रत्येक प्रतिसादामध्ये.
कोणत्या प्रतिसादात? मोदींनी देशावर उपकार केले आहेत असे लिहिलेला एकतरी प्रतिसाद दाखवा.
म्हणजे NDTV सुद्धा खोटा आणि अतिरंजित चॅनेल म्हणायचं.
एनडीटीव्ही हे पराकोटीचे भाजपविरोधी चॅनेल आहे. भाजप विरोधी व्यक्तीना या वाहिनीवरून कायमच मोठे कव्हरेज मिळते. या चॅनेलची मते मिठाची चिमूट घेऊनच पहायला हवीत. तुम्ही वर दिलेल्या लिंकमध्ये अस्पष्ट फोटो का दिले असावेत हे सांगता का जरा? तसेच त्या फलकांवर भाजप किंवा कमळ नसताना सुद्धा ही पोस्टरबाजी भाजपचीच आहे असे ते कोणत्या आधारावर सांगतात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 10/07/2016 - 12:55 नवीन
युपिएच्या काळात "सर्जिकल स्ट्राईक्स" झाले नाहीत. जे काही झाले ते "जरा मोठ्या प्रमाणावर झालेली लाईन ऑफ कंट्रोल जवळची स्किर्मिशेश" होती; सर्जिकल स्ट्राईक ही विशिष्ट व्याख्या असलेली कारवाई असते; अश्या अर्थाची माहिती त्या काळात DGMO पदावर काम करणार्‍या लष्करी अधिकार्‍याने (ज्यांच्या नेतृत्वाखाली या दोन्ही प्रकारच्या कारवाया होतात) एका राष्ट्रिय वाहिनीवर दिली आहे. त्या अधिकार्‍याच्या मते भारतिय सेनेने "काही दिवसांपूर्वीचे म्यानमार ऑपरेशन" आणि "आताचे पाकिस्तान ऑपरेशन" हे केवळ दोनच सर्जिकल स्ट्राईक्स आत्तापर्यंत केले आहेत. म्यानमारमध्ये आपले सैन्य व म्यानमारचे सैन्य यांच्यामध्ये एक समन्वय होता. त्याविरुद्ध, पाकिस्तान ऑपरेशनमध्ये सहकार्य नसलेल्या (किंबहुना अत्युच्च्य पातळीवरच्या सामरिक तयारीत उर्फ रेड अ‍ॅलर्टमध्ये असलेल्या शत्रूच्या ताब्यातल्या) प्रदेशात घूसून २५० किलोमीटर लांबीच्या लाईन ऑफ कंट्रोलवरून ०.५ ते ३ किलोमीटर आतवर घूसून ७ ते ८ अतिरेकी तळ उद्धवस्त केले गेले आहेत. इतक्या मोठ्या स्तराचा आणि आवाक्याचा सर्जिकल स्ट्राईक यश्स्वीपणे करणे हे भारतालाच नव्हे तर सामरिक महासत्ता म्हणवणार्‍या देशानाही भूषणावह वाटेल. दुसर्‍या एका मान्यवर सैन्यतज्ञाच्या मते हा सर्जिकल स्ट्राईक काही दिवसांनी देशोदेशीच्या लष्करी शिक्षणसंस्थांत "केस स्टडी" म्हणुन शिकवला जाईल. गेल्या काही दिवसांत पाकिस्तानी सरकार आणि सैन्य यांच्याबद्दल ज्या बातम्या पाकिस्तानी व इतर माध्यमांत येत आहेत त्यावरून या सर्जिकल स्ट्राईकचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष पुरावे बाहेर येत आहेत. विषेशतः पाकिस्तानी संसदेमधिल भाषणे; मुलकी सरकारच्या आणि सैन्याच्या (व विशेषतः ISI च्या) अधिकार्‍यांमधिल सभांचे तपशील; आणि एका वरिष्ठ पाकिस्तानी पोलिस अधिकार्‍याच्या केलेल्या स्टींग ऑपरेशनमध्ये त्याच्या तोंडून मिळालेली माहिती; इत्यादींमुळे सर्जिकल स्ट्राईकसंबंधी अतीसंशयी लोकांचेही संदेह दूर झाले आहेत. सर्जिकल स्ट्राईकची पहिली माहिती भारताच्या DGMO या उच्च्पदस्थ सैनिक अधिकार्‍याने दिली होती, त्यांची विश्वासार्हता आव्हान देण्यापलिकडची आहे. पाकिस्तानी मुलकी सरकार, सैन्य आणि ISI इत्यांदीसारखे खोटे बोलण्याची परंपरा भारतिय सैन्यात नाही, हे सांगायला नकोच. त्यामुळे जे झोपल्याचे सोंग घेऊन आपल्या स्वार्थी संकुचित हितसंबंधांसाठी अजून खुसपटे काढत आहेत, त्यांना जागे करण्याचे प्रयत्न करणे म्हणजे आपल्या वेडपटपणाचे प्रदर्शन करण्यासारखे होईल. आपली शक्ती फुका खर्च करण्याऐवजी त्यांच्या चालू असलेल्या अजेंड्याला अनुल्लेखाने मारणेच योग्य होईल. सर्जिकल स्ट्राईकची माहिती/पुरावे अजिबात उघड करू नये असे मला वाटते, कारण... १. पाकिस्तानी सैन्याला सर्जिकल स्ट्राईक होताना तर कळले नाहीच, पण "हा स्ट्राईक कसा काय झाला ?" हे पण त्यांना अजून उमगलेले नाही. या कारवाईला "अ बोल्ट फ्रॉम द ब्ल्यू" हा इंग्लिश वाक्प्रचार चपखलपणे बसतो. थोडक्यात या सर्जिकल स्ट्राईकचे तंत्र भारतिय सेनेचे गुपित म्हणा, Intellectual Property Right (IPR) म्हणा, आहे. पाकिस्तानी सैन्याला येन केन प्रकारेण (स्वतःच्या र्‍हेटोरीकने किंवा उल्लू भारतीय वाचाळविरांच्या टीकाटीप्पणीने) याबद्दलची माहिती मिळाली तर हवी आहेच. कारण त्या माहितीचा उपयोग त्याला (अ) भविष्यातले सर्जिकल स्ट्राईक्स टाळण्याचे उपाय करायला आणि (आ) स्ट्राईक्स झालेच तर त्यांचा प्रतिकार करायला होईल. २. याचा दुसरा अर्थ असा की, या स्ट्राईक्सची माहिती उघड करण्याने (अ) आपले भविष्यातले स्ट्राईक्स धोक्यात येतील व (आ) त्यातली गुपिते उघड झाल्यामुळे, स्ट्राईक करणार्‍या भारतिय सैनिकांच्या सुरक्षेला, आरोग्याला आणि जीवाला धोका वाढेल, हे नक्की. ३. आपल्या शक्तीबद्दल शत्रूला जेवढी कमी माहिती असते, तेवढा त्याच्या मनातला गोंधळ जास्त असतो आणि त्याच्यामध्ये यशाबद्दलची खात्री कमी राहते. "Keep them guessing." या तत्वामुळे मिळणारा वरचढपणा युद्धात बर्‍याचदा अस्त्र-शस्त्रांपेक्षा जास्त फायदा देऊन जातो. ===================================== अवांतर : कारगिल युद्धात आपल्या सैन्याला "लाईन ऑफ कंट्रोल" चे जमिनीवर अथवा हवेत उल्लंघन करू नये असा सरकारच आदेश होता. त्यामुळे... (अ) भारतिय स्थलसेनेला खडतर मार्ग चोखाळायला लागून त्यांचे काम कठीण झाले होते आणि (आ) भारतिय वायूसेनेच्या कारवायांवर बंधने येऊन त्यांचेही काम कठीण झाले होते. याचाच अर्थ असा की, "लाईन ऑफ कंट्रोलचे जमिनीवर अथवा हवेत उल्लंघन करू नये" ही अट त्यावेळेस नसती तर भारतिय सैनिकांची जीवितहानी, इजा व इतर सामरिक खर्च लक्षणीय प्रमाणात कमी झाला असता.
  • Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर Fri, 10/07/2016 - 13:09 नवीन
या स्ट्राईक्सची माहिती उघड करण्याने (अ) आपले भविष्यातले स्ट्राईक्स धोक्यात येतील व (आ) त्यातली गुपिते उघड झाल्यामुळे, स्ट्राईक करणार्‍या भारतिय सैनिकांच्या सुरक्षेला, आरोग्याला आणि जीवाला धोका वाढेल, हे नक्की. जर कधी पुरावे जाहीर झालेच तर ते बहुधा सेन्सर्ड असतील पण १. ही कारवाई सैन्याने केली. सरकारने त्यासाठी आवश्यक तो पाठिंबा दिला. त्याबद्दल कौतुक आहेच. पण पुरावे सरकारने जाहीर केले तर उगाच सरकारने कारवाई केली असा मेसेज जाईल आणि सैन्याला या कारवाईसंदर्भात दिले जाणारे महत्व कमी होईल. २. सैन्य कोणाही सोम्यागोम्याला अ‍ॅन्सरेबल आहे असा मेसेज जाईल. हेही चुकीचे आहे. (लादेनच्या कारवाईच्या चित्रफीती कोणीही न मागता उपलब्ध करुन दिल्या गेल्या.) निदान यासाठी तरी पुरावे जाहीर होऊ नयेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 10/07/2016 - 13:54 नवीन
जर कधी पुरावे जाहीर झालेच तर ते बहुधा सेन्सर्ड असतील (अ) अश्या कारवाईचे सेन्सर्ड पुरावे हे "डॉक्टर्ड" आहेत असे म्हणणे विरुद्ध पार्टीला सोपे असते (आणि पाकिस्तान तर १००% सबळ पुराव्याला, तो पुरावाच नाही असे म्हणतो असा आतापर्यंतचा अनुभव म्हणतो, नाही का? ) या प्रकरणात तर अधिकाधिक माहिती उघड व्हावी म्हणुन तो नकाराच्या अनेक क्लृप्त्या वापरेल हे सूर्याहून जास्त सत्य आहे !! आणि (आ) पुरेसे सबळ पुरावे देण्यामध्ये कारवाईची गुप्तता आणि प्रक्रिया उघड होते, जे करणे आत्मघातकी होईल. तज्ञ लोक शीत पाहून पूर्ण भाताचे पातेले ओळखतात, हे सांगायला नकोच ! ++++++++++++++ लादेनच्या कारवाईच्या चित्रफीती कोणीही न मागता उपलब्ध करुन दिल्या गेल्या. लादेनची कारवाई कही शेकडा किमी पाकिस्तानच्या हद्दीत शिरून केलेली होती. अशी कारवाई पाकिस्तानी सैन्यदलाच्या सहकार्याशिवाय होणे शक्य नाही. कारण देशाच्या इतक्या आत अनेक हेलिकॉप्टर्स शिरतात आणि त्यांचा सुगावा रडार्सच्या अनेक रांगांना लागू शकत नाही, इतकीही पाकिस्तानी फौज बुळी नाही ! पाकिस्तानी सैन्याकडे लादेनच्या घराचा पुरेसा पुरावा देऊन "ही कारवाई तुम्ही करा किंवा ती आम्हाला विनाअडथळा करू द्या" अन्यथा "तुमच्या अबोटाबाद या महत्वाच्या सैनिकी तळाशेजारी होणारी ड्रोन/रॉकेट हल्ल्याची तयारी ठेवा व त्यामुळे होणारी नामुष्की सोसा" असा काहीसा सज्जड दम दिला गेला होता असे अंदाज आहेत. पाकिस्तानी सैन्याकडे लादेनला मारण्याचे श्रेय/आरोप पचविण्याची ताकद/धमक/तयारी नव्हती. तसे केले असते तर पाकिस्तानातले सर्व रंगांचे सर्व अतिरेकी गट उलटून त्यांचे जानी दुष्मन होण्याचा धोका होता. या ऑपरेशन नंतर कोणाही लष्करी अधिकार्‍यावर कामचुकारीच्या आरोपावरून कारवाई झाली नाही. फक्त लादेनच्या जागेची माहिती देणारा सिविलियन डॉक्टर कैदेत खितपत पडला आहे आणि अमेरिका त्याला सोडविण्याची अजून धडपड करत आहे; यावरून काही बोध होऊ शकतो. राहता राहिला प्रश्न चित्रफितीचा. ती जाहीर केली किंवा न केली असती तरी तात्कालीक गदारोळ सोडता (आणि तो झालाच ! ) काही फार फरक पडला नसता. अमेरिकेने "बनवलेल्या" कोणत्या पुराव्याला कोणता महत्वाचा देश चुकीचा म्हणतो ? आणि जे चिल्लर लोक त्याला चुकीचा म्हणतात त्यांना भीक घालायची गरज अमेरिकेला वाटत नाही. "वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शनच्या पुराव्यांच्या" आधारे इराकवरचा हल्ला केला गेला तेव्हा त्यांना कोणी फारसा विरोध केला नव्हता. इथे तर ओसामाचा खातमा व्हावा असे, अतिरेकी गट आणि पाकिस्तान या दोघांना सोडून, बहुतेक सर्व जगाला वाटत होते. अर्थातच, अमेरिकेने दिलेला भलाबुरा कोणताही पुरावा खोटा आहे असे म्हणून स्वतःला अवलक्षण करून घ्यावे असे कोणा महत्वाच्या देशाला वाटले नाही, आणि ज्यांनी त्या पुराव्यावर विश्वास ठेवला नाही त्यांची दखल घ्यावी असे इतरांना वाटले नाही... उलट "गुड रिडन्स" असे म्हणत जगाने सुस्कारा सोडला. याला जागतिक राजकारण म्हणतात ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
स
संदीप डांगे Fri, 10/07/2016 - 13:57 नवीन
मस्त!! +1111
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
अ
अप्पा जोगळेकर Fri, 10/07/2016 - 14:22 नवीन
माहितीपूर्ण प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 10/07/2016 - 13:09 नवीन
वरचे आवांतर लिहिण्याचा उद्देश हाच की... "लाईन ऑफ कंट्रोल ओलांडा" अशी आज्ञा सैन्यदलांना देणे ही अत्युच्च्य दर्जाची "राजकीय इच्छाशक्ती असणे आणि ती वापरण्याची धमक असणे" याचे लक्षण आहे. कारण अशी आज्ञा देणार्‍यावर (म्हणजेच भारतात, पंतप्रधानांवर) त्या आज्ञेमुळे होणार्‍या सर्व जागतिक-देशांतर्गत-सामरिक परिणामाची जबाबदारी असते... तेथे राजकारणी सारवासारव चालत नाही. पूर्णविराम (PERIOD).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
अ
अनिरुद्ध.वैद्य Fri, 10/07/2016 - 13:17 नवीन
"लाईन ऑफ कंट्रोल ओलांडा" अशी आज्ञा सैन्यदलांना देणे ही अत्युच्च्य दर्जाची "राजकीय इच्छाशक्ती असणे आणि ती वापरण्याची धमक असणे" याचे लक्षण आहे. अगदी अगदी!! आणि हीचे महत्व अजुन वाढते, जेव्हा ती प्रत्युत्तर म्हणुन, बदला घेण्यासाठी केली जाते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
श
श्रीगुरुजी Fri, 10/07/2016 - 20:46 नवीन
वरचे आवांतर लिहिण्याचा उद्देश हाच की... "लाईन ऑफ कंट्रोल ओलांडा" अशी आज्ञा सैन्यदलांना देणे ही अत्युच्च्य दर्जाची "राजकीय इच्छाशक्ती असणे आणि ती वापरण्याची धमक असणे" याचे लक्षण आहे. कारण अशी आज्ञा देणार्‍यावर (म्हणजेच भारतात, पंतप्रधानांवर) त्या आज्ञेमुळे होणार्‍या सर्व जागतिक-देशांतर्गत-सामरिक परिणामाची जबाबदारी असते... तेथे राजकारणी सारवासारव चालत नाही. पूर्णविराम (PERIOD).
पूर्ण सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
स
संदीप डांगे Fri, 10/07/2016 - 13:30 नवीन
म्हात्रेसाहेब, व्याख्या करण्याच्या तांत्रिकेत न शिरता आपल्याला असे म्हणता येईल काय कि लष्कराने पाकी व आतंकी हल्ल्यांचे बदले घेण्याची - युपीए व एनडीए काळातही- कारवाई केली? कारण आतापावेतो असे काही (हल्ल्यानंतर कारवाई केल्याचे) झाले नसल्याचे जनमानसात रूढ असल्यानेच चीड जास्त होती, जर असे झालं असेल तर ते skirmish होते की strike ह्याने जनतेला काय फरक पडतो? म्हणजे कि आपण उत्तर दिले होते व नेहमी देतो, ह्यावेळेस जरा जास्त केले. ( जागतिक राजकारनावर या तांत्रिकतेने खूप फरक पडतो हे थोडा वेळ नाही मानले तर)
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 10/07/2016 - 15:11 नवीन
तीव्र असहमत ! याची कारणे वरचे प्रतिसाद परत वाचलेत तर सहज कळेल. सोईसाठी त्यातले काही महत्वाचे भाग खाली परत देत आहे (पण त्यातली सर्व वाक्ये मुळातून वाचल्यास जास्त योग्य होईल)... १. युपिएच्या काळात "सर्जिकल स्ट्राईक्स" झाले नाहीत. जे काही झाले ते "जरा मोठ्या प्रमाणावर झालेली लाईन ऑफ कंट्रोल जवळची स्किर्मिशेश" होती; सर्जिकल स्ट्राईक ही विशिष्ट व्याख्या असलेली कारवाई असते; अश्या अर्थाची माहिती त्या काळात DGMO पदावर काम करणार्‍या लष्करी अधिकार्‍याने (ज्यांच्या नेतृत्वाखाली या दोन्ही प्रकारच्या कारवाया होतात) एका राष्ट्रिय वाहिनीवर दिली आहे. २. त्या अधिकार्‍याच्या मते भारतिय सेनेने "काही दिवसांपूर्वीचे म्यानमार ऑपरेशन" आणि "आताचे पाकिस्तान ऑपरेशन" हे केवळ दोनच सर्जिकल स्ट्राईक्स आत्तापर्यंत केले आहेत. ३. "लाईन ऑफ कंट्रोल ओलांडा" अशी आज्ञा सैन्यदलांना देणे ही अत्युच्च्य दर्जाची "राजकीय इच्छाशक्ती असणे आणि ती वापरण्याची धमक असणे" याचे लक्षण आहे. कारण अशी आज्ञा देणार्‍यावर (म्हणजेच भारतात, पंतप्रधानांवर) त्या आज्ञेमुळे होणार्‍या सर्व जागतिक-देशांतर्गत-सामरिक परिणामाची जबाबदारी असते... तेथे राजकारणी सारवासारव चालत नाही. पूर्णविराम (PERIOD). लाईन ऑफ कंट्रोलचा छोटामोठा भंग आणि तिच्यावरीन गोळीबार ही पाकिस्तानच्या बदमाशीमुळे होणारी नेहमीची गोष्ट आहे. त्यामुळे त्यातल्या त्यात जास्त स्किरमिश (चकमक) होणे ते करताना काही मीटर्स LOC ओलांडणे हे नेहमीपेक्षा जास्त असले तरी आक्रमण समजले जात नाही. तसा आताही आपला एक जवान चुकून LOC पलिकडे जाऊन पाकिस्तानी लष्कराच्या ताब्यात आहे हे वाचले असेलच. हे आक्रमण नाही. याविरुद्ध... "आम्ही लाईन ऑफ कंट्रोल ओलांडून खोलवर लष्करी कारवाई केली व त्यात अनेक लोकांना (मग ते अतिरेकी असले तरी ते परकिय सत्तेच्या ताब्यात असलेल्या भूमीवरचे लोक असतात) ठार करून आलो" असे सीमेवरच्या सर्व्वोच्च अधिकार्‍याने पत्रकार परिषद घेऊन सांगणे... म्हणजेच साध्या शब्दांत "आम्ही तुमच्या घरात घुसून काही जणांना ठार करून आलो आहोत. तुमच्यात हिम्मत असेल तर काय करायचे ते करा" असे "अधिकृतरित्या" सांगणे होते." यात गैरसमजाला थारा नाही. जागतिक राजकारनावर या तांत्रिकतेने खूप फरक पडतो हे थोडा वेळ नाही मानले तर हा राजकारणी तांत्रिकतेचा भाग नाही "रोजच्या ओढाताणीत धक्काबुक्की करणे" आणि "घरात घूसून हातपाय तोडून व काहींना यमसदनाला पोचवणे" या दोघातला फरक आहे. यातून पुढे एस्कॅलेशन होत होत फुल स्केल युद्ध होऊ शकते... व त्या सगळ्याची जबाबदारी भारतामध्ये पंतप्रधानांवर पडते, त्यात कोणतीही सारवासारवी किंवा कारणे चालत नाहीत. याच कारणांसाठी... अ) १९६५ च्या युद्धाच्या आदेशाचे श्रेय योग्य रितीने श्री लाल बहादूर शास्त्रींना दिले जाते. आ) १९७१ च्या युद्धाच्या आदेशाचे श्रेय श्रीमती इंदिरा गांधींना दिले जाते. त्यावेळेस, वाजपेयींनी सर्वात पुढे राहून इंदिरा गांधींना दुर्गादेवीची उपमा दिली होती हे विसरता कामा नये. मात्र, इ) कारगिल युद्धाचे श्रेय "तेवढ्याच मोकळ्या मनाने" श्री वाजपेयींना दिले गेले असे दिसले नाही, आणि ई) आताच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर, सद्याची राजकीय अवस्था पाहूनच असावे बहुतेक राजकीय गदारोळ टाळण्यासाठी, मोदींनी नाही तर भारताच्या DGMO नी पत्रकार परिषद घेऊन ती बातमी सांगितली. (आठवण असू द्या : अमेरिकेची दर लष्करी कारवाई व ओसामाच्या प्रकरणातही त्यांच्या प्रेसिडेंटने ती बातमी सर्वप्रथम सांगताना त्या प्रत्येक कारवाईचे श्रेय "माझ्या आदेशाने झालेल्या कारवाईने" अश्या अर्थांच्या शब्दांनी घेतले आहे.) असे असतानाही, "किमान पाकिस्तानला दाखविण्यासाठी तरी देशाची एकता स्पष्ट व्हावी इतकीही प्रगल्भता न दाखवता" केवळ राजकिय पोळी भाजण्यासाठी, (भारत सरकार नव्हे तर) भारताचे DGMO यांनी जे सांगितले आहे ते कसे विश्वासू नाही आणि त्या दाव्याचे पुरावे द्यावे" अश्या अर्थाची वक्तव्ये देऊन, वर आमचा सैन्यावर पूर्ण विश्वास आहे पण तरीही सरकारला दोष द्यायचा आहे असा जगावेगळा पवित्रा घेतला आहे. एकंदरीत, भारतात किती दुही आहे आणि तात्कालिक स्वार्थासाठी आम्ही शत्रूला मदत होईल असे वागायलाही कमी करणार नाही याचे पुरावे दिले आहे. याचा भारतिय सैन्याच्या मनोबलावर काय परिणाम होईल आणि याचा उपयोग पाकिस्तान सरकार, सैन्य आणि माध्यमे पुरेपूर करतील / करत आहेत याचे आपल्या राजकारण्यांना काही देणे घेणे पडलेले दिसत नाही. पाकिस्तानात याबद्दल आश्चर्ययुक्त (इतर वेळी ठीक आहे पण आताही तेच या अर्थाने) आनंद होत असेल हे नक्की. हे वरचे सर्व लिहिण्याची कारणे अशी आहेत... अर्थात, अशी कारवाई हे केवळ सैन्यबळावर शक्य नसते. अश्या कारवाईमुळे होणारे परिणाम (जगातल्या इतर देशांचा विरोध आणि ज्यावर हल्ला केला त्याला प्रतिहल्ला करण्यास दिलेले कारण) टाळण्यासाठी जागतिक पटलावर पार्श्वभूमी तयार करावी लागते... जी गेल्या दोन-अडिच वर्षात झाली आहे. मोदींच्या परदेश दौर्‍यांवर टीका करणार्‍यांची अडचण होणे आणि त्यामुळे धागा हायजॅक होणे हे टाळण्यासाठी हा मुद्दा मी मुद्दामहून टाळला होता ! जागतिक राजकारणात अथवा अर्थकारणात यशस्वी व्हायचे असले तर पुढची २५-३० वर्षे पाहून खेळ्या खेळाव्या लागतात. त्यामानाने गेल्या दोन-अडिच वर्षांत या सरकारने जागतिक स्तरावर मिळवलेल्या पतीमुळेच, माध्यमांतल्या बातम्यांवरून पूर्वी न दिसणारे खालील संकेत दिसत आहेत... (अ) भारताने आक्रमक कारवाई केली असली तरीसुद्धा कोणत्याही देशाने पाकिस्तानची बाजू घेतलेली नाही. अगदी चीनही स्पष्टपणे हल्ल्यांविरुद्ध बोललेला नाही. (आ) उलट, सर्व महत्वाच्या देशांची वक्तव्ये भारताच्या बाजूची आहेत. (इ) पाकिस्तानातले मुलकी सरकार सैन्यदलाला अतिरेक्यांना मदत करू नका असे म्हणण्याची धमक दाखवू लागले आहे. (इ) पाकिस्तानच्या लोकसभेत अतिरेक्यांच्या विरोधी स्पष्टपणे बोलले जात आहे. असो, त्याच त्याच मुद्द्यांवर खूप चर्वण झाले. समझदार को इशारा काफी है । परत परत तेच न विचारता / लिहिता, इतर काही वेगळा मुद्दा आला तरच लिहायला आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Fri, 10/07/2016 - 15:33 नवीन
प्रतिसाद उत्तमच आहे आणि पूर्ण सहमतही आहेच पण माझा मुद्दा वेगळा व एवढाच की भारतीय जनतेची तगमग ह्यासाठी होती की 'आपण फक्त हल्ले सहन करतोय व लष्कर गप्प, बंदुकीवर बंदूक ठेऊन बसलंय' अशी जी प्रतिमा होती, त्याच्या बद्दल वरचा माझा प्रतिसाद होता, आपण लिहिलेला प्रतिसाद सर्व बाजूने बिनतोड असला तरी माझ्या मुद्द्याशी सुसंगत वाटला नाही, प्रस्तुत स्ट्राईक वर इतर मोदी विरोधक काय म्हणतायत (ज्याच्याशी मी पूर्णपणे असहमत आहे) ते बिल माझ्यावर फाडले जात आहे असे दिसते.. तेही न झाले तर बरेच होईल, ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 10/07/2016 - 18:17 नवीन
प्रस्तुत स्ट्राईक वर इतर मोदी विरोधक काय म्हणतायत (ज्याच्याशी मी पूर्णपणे असहमत आहे) ते बिल माझ्यावर फाडले जात आहे असे दिसते.. तेही न झाले तर बरेच होईल, ;) माझे लेखन नेहमीच व्यक्तीकेंद्रित नसून मुद्दाकेंद्रित असते. विष्लेषण सर्वसमावेशक व पूर्ण होण्यासाठी अनेकदा 'अगोदर पुढे आलेले' आणि 'न आलेले' असे दोन्ही प्रकारचे मुद्दे त्यात समाविष्ट करणे आवश्यक होते. त्यामुळे, प्रतिसादात मी जर/तर, जेव्हा/तेव्हा, जो/तो अशी वाक्यरचना नेहमी वापरतो. त्यामुळे, जो मुद्दा ज्याला लागू असेल त्यांच्या नावेच त्यातले बिल 'सकारण' फाडले जाते ('बिल फाडणे' हा वाक्पचार मला नवीन आहे, पण आवडला म्हणून वापरला आहे :) ) . तुम्ही जर एखाद्या गटांत नसाल, तर त्यावरची टिप्पणी तुम्ही स्वतःवर ओढून घेण्याची गरजच नाही :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Sat, 10/08/2016 - 04:36 नवीन
वोक्के सर, गॉट इट! मुद्दाकेंद्रित चा माझा अर्थ तुमच्या अर्थापेक्षा वेगळा आहे म्हणून गोंधळ झाला, प्रतिपक्षाने उपस्थित न केलेले व करणार नाही असे मुद्दे आपणच मांडून ते मुद्दे डिफेन्ड करणे हे माझ्यासाठी नवीन आहे, मी शक्यतो चर्चा भले मेगाबायटी झाली तरी चालेल पण असे करत नाही त्यामुळे तुमची मांडणी समजून घेण्यात माझीच चूक झाली, क्षमा असावी. धन्यवाद चांगल्या चर्चेबद्दल, विशेषतः गप्प बसून राहणे, रेटारेटी करणे आणि घरात घुसून मारणे ह्या तिघांतला फरक कळला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
स
सुबोध खरे Sat, 10/08/2016 - 06:48 नवीन
डॉक्टर साहेब बाडीस एकच पुरवणी अगोदरचे हल्ले आणि आताच यातील फरक सांगतो. अगोदरचे हल्ले हे पाठलाग या स्वरूपातील होते (hot persuit). म्हणजे एखादा दहशतवादी सीमेच्या आत घुसून घातपाती कारवाई करीत असताना त्याच्याशी सामना होतो. यावेळेस हा दहशतवादी पळून जाताना आपली सीमा ओलांडूनपरत पाकिस्तानात गेल्यावर त्याचा पाठलाग करून पाकिस्तानी हद्दीत त्याला कंठस्नान घातले जात असे. या हल्ल्याला सरकारची मूक संमती होती परंतु अशा प्रत्येक हल्ल्याच्या वेळेस सरकारची औपचारिक स्वरूपात परवानगी घेतलेली नसे. आताचा हल्ला हा फार वेगळ्या प्रमाणात होता. हा म्यानमारमध्ये केलेल्या हल्ल्यापेक्षा नक्कीच धाडसाचं आणि खतरनाक हि होता. याचे कारण या वेळेस आपले कमांडो पाकिस्तानात घुसले होते आणि तेथल्या लष्कराचा त्यांना नुसता पाठिंबाच नव्हता तर ते लष्कराच्या तावडीत सापडले असते तर पाक लष्कराने त्यांना हाल हाल करून ठार मारले असते. म्यानमारच्या हल्ल्याच्या वेळेस सार्वजनिक न्यासांवर ( कि मिपावरच) अनेक लोकांनी हिम्मत असेल तर पाकिस्तान बरोबर असे करून दाखवा असे हि बोलून दाखवले होते. या वेळेस आपल्या नकाशा दर्शक उपग्रह कार्टो सॅट २ बी याच्या प्रतिमांचा वापर करून( यात इसरोच्या शास्त्रज्ञांचे मोठे योगदान आहे) पाकिस्तानात असलेल्या दहशतवादी तळांचा अचूक ठावठिकाणा शोधण्यात आला. यानंतर एक आठवडाभर त्या तळावर हल्ला करायला जाण्यासाठी लष्कराची ठाणी टाळून जाण्याचे(आणि येण्याचे) सोपे मार्ग शोधून काढले. एवढा वेळ पाकिस्तानशी चर्चेचे गुऱ्हाळ चालू ठेवले आणि शेवटी ठरलेल्या वेळेस एकाच वेळेस सहा( कि सात) ठिकाणी ( ही ठिकाणे एकमेकांपासून २५० किमी दूर आहेत) हल्ला केला. पाकिस्तानलष्कराला याचा सुगावा सुद्धा लागला नाही त्यामुळे त्याचा प्रतिकार (जवळ जवळ) झालाच नाही. अत्याधुनिक शस्त्रे आणि अस्त्रे वापरून केलेला हा हल्ला एकमेवाद्वितीय असा होता. लष्कर असे हल्ले करायला अगोदरही तयार होते परंतु त्याची पार्श्वभूमी तयार नसेल किंवा राजकीय इच्छा शक्ती नव्हती म्हणून असे हल्ले(surgical strikes) पूर्वी झालेले नाही. (माझी माहिती माझ्या खात्रीच्या लष्करी स्रोतांकडून मिळालेली आहे.) श्री मोदींच्या कणखरणाबद्दल त्यांना मिळत असलेल्या प्रसिद्धी चा द्वेष वाटल्यामुळे श्री शरद पवार दर्पोक्ती करीत आहेत असे मी स्पष्टपणे म्हणतो. हा प्रश्न पक्षीय दृष्टिकोनातून पहिला गेला नसता तर बरे झाले असते. मोदीभक्तांनी इतका उदो उदो करायला नको होता किंवा त्याचा राजकीय फायदा उठवायचा प्रयत्न करायला नको होता. परंतु एकंदर श्री चिदंबरम, शरद पवार यांनी कोतेपणा दाखविला आणि श्री केजरीवाल किंवा राहुल गांधी यांच्या प्रगल्भ पणा बद्दल न बोललेलेच बरे. दुर्दैवाने मोदी द्वेषाची कावीळ झालेले लोक मिपावरही बेताल वक्तव्ये करीत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
स
संदीप डांगे Sat, 10/08/2016 - 07:56 नवीन
बाकी प्रतिसादाशी सहमत, पण, दुर्दैवाने मोदी द्वेषाची कावीळ झालेले लोक मिपावरही बेताल वक्तव्ये करीत आहेत. ^^^ कोणी कुठे केलीयेत अशी वक्तव्य??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 10/08/2016 - 13:17 नवीन
सहमत. "hot persuit" ! त्याचा मराठी प्रतिशब्द शोधण्याचा नादात तो लिहायला विसरलो... त्याचा चपखल अर्थाचा मराठी प्रतिशब्द मला अजून सापडलेला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ग
गामा पैलवान Sun, 10/09/2016 - 07:37 नवीन
.... = निकराचा पाठलाग ? -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 10/09/2016 - 12:50 नवीन
हा चपखल शब्दप्रयोग होणार नाही. निकराचा याचा "अर्थ सर्व बळानिशी" असा होतो. हॉट परसूट म्हणजे, "शत्रू पळून जात असताना त्याचा खातमा करण्यासाठी केलेला पाठलाग", यात बळ किती वापरले आहे त्यापेक्षा घटना "हॉट" असताना (घटनेचा भाग म्हणून किंवा घटनेचा त्वरीत पाठपुरावा करताना) केलेली कारवाई असते. म्हणजेच बळापेक्षा कारवाईची वेळ हे जास्त महत्वाचे परिमाण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
व
विशुमित Fri, 10/07/2016 - 14:07 नवीन
तर्क आवडला...
  • Log in or register to post comments
व
विकास Fri, 10/07/2016 - 15:41 नवीन
राहूल गांधींचे ज्ञान लक्षात घेता त्यांना राजीव गांधींनी शांतीसेना श्रीलंकेत कशी पाठवली, त्यातून पुढे काय घडले, त्या सेनेतील सैनिकांचे नंतर कसे हाल घडले आणि एका अर्थी भारताचे लहान प्रमाणात पण जे अमेरीकेचे व्हिएटनाम मधे घडले तसे कसे झाले हे माहीत नसावे.
  • Log in or register to post comments
स
सचु कुळकर्णी Fri, 10/07/2016 - 15:49 नवीन
राहूल गांधींचे ज्ञान लक्षात घेता ;) बास ईतनाईच काफी है
  • Log in or register to post comments
व
विकास Fri, 10/07/2016 - 17:18 नवीन
=)) =)) ज्ञानाच्या आधीचा "अ" सायलेंट आहे हो! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचु कुळकर्णी
स
सचु कुळकर्णी Fri, 10/07/2016 - 18:06 नवीन
अहो तो सायलेंट असलेला 'अ' युवराज रोज बोल्ड & ईटँलीक फॉंट मध्ये सादर करतात.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sat, 10/08/2016 - 08:29 नवीन
सोन्याबापु, तुमचा इथला संदेश वाचला. तिथे तुम्ही दिलेल्या बलुची युवकांच्या चलचित्राच्या या दुव्याबद्दल धन्यवाद! चलचित्र उडतउडत बघितलं. हे युवक अतिशय शांत आणि ठामपणे युक्तिवाद करंत होते, त्यावरून ते सुशिक्षित दिसंत आहेत. आता सुशिक्षित बलुच्यांत बुगती मराठ्यांचे प्राबल्य आहे. हे आपले दुरावलेले भाऊबंद तर नसतील? चेहऱ्यावरून पठाण कमी आणि मराठा जास्त वाटतात काय? की मलाच असे भास होताहेत? आ.न., -गा.पै. टीप : एकाच्या बोलण्यात कुलमुखत्यार हा मराठी शब्द ऐकला.
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके गुरुवार, 09/19/2024 - 14:29 नवीन
इस्त्रायलने लेबनॉनमधील हिजबुल्लाच्या दहशतवाद्यांना टार्गेट करुन एकदम मोठ्या संखेने पेजर, वॉकी टॉकी चे स्फोट केले यावर मिपाकरांच्या काय प्रतिक्रिया आहेत ?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा