हात दाखवून अवलक्षण
करण जोहरच्या आगामी सिनेमाच्या निमित्ताने उठलेल्या वादामुळे झालेली परिस्थीती आणि त्याच्या प्रदर्शनाला होणारा मनसेचा तीव्र विरोध याच्यावर तोडगा काढण्यात आला.
पण या सगळ्या प्रकाराने खालील प्र्श्न उदभवले आणि त्यावरच मिपाकरांची नक्की काय मते आहेत म्हणून हा काथ्याकुट.
- सिनेमावर एखाद्या राजकीय पक्षाने बंदी घातल्यावर सरकारची नक्की काय भूमीका असावी.
- निर्माते न्यायालयात जाण्याऐवजी थेट मुख्यमंत्र्यांकडे का जात असावेत.
- महाराष्ट्र वगळून हा सिनेमा व्य्वसाय करणार नाही काय? का तशी निर्मात्यांना भिती वाटली असावी?
- मुख्य्मंत्र्यांनी राज ठाकरेंना चर्चेस बोलावून अवाजवी महत्व दिले काय? असे तुम्हाला वाटते काय?
- आणि राज ठाकरेंनी ५ कोटीची सैनीक फंडाला मदत करण्याची सूचना करण्याची वाश्यकता काय किंबहुना त्यांना तसा अधिकारच कसा काय आहे?
- या वादात राज ठाकरे आणि फडणविस यांनी विनाकारण हात दाखून अवलक्षण केले आहे (आणि विरोधकांना आयते कोलीत दिले आहे) असे माझे प्रांजळ मत आहे.
💬 प्रतिसाद
(306)
व
विशुमित
Mon, 10/24/2016 - 07:06
नवीन
इसकाळ वरील हे दोन्ही विचार पटले --
सैनिक कल्याण निधीसाठी दिल्या जाणाऱ्या रकमेमागील भारतीय नागरिकांच्या भावनेबद्दल लष्कराच्या मनात जराही शंका नाही; मात्र, ही रक्कम राज ठाकरेंच्या खंडणीचा भाग असू शकत नाही.
- मनमोहन बहादूर, एअर व्हाइस मार्शल (निवृत्त)
उत्तर कमांडचे माजी लेप्टनंट जनरल बी. एस.जैस्वाल यांनी म्हटले की, सैनिक कल्याण निधी कोणाला भीक मागत नाही. जर एखादा चित्रपट निर्माता सैनिक कल्याण निधीला योगदान देत असेल, तर त्याने अन्य भारतीय नागरिकांप्रमाणे मदत करावी. मात्र, यापद्धतीने जमा केलेला पैसा सैनिक कधीही स्वीकारणार नाही. सैनिक कल्याण निधीसाठी देण्यात येणारी रक्कम ही स्वेच्छेने देण्यात आली असल्यासच स्वीकारली जाते. खंडणी वा बळजबरी करून देण्यास भाग पाडलेला निधी हा सैनिक कल्याण निधीसाठी स्वीकारला जात नाही,‘
- Log in or register to post comments
ख
खेडूत
Mon, 10/24/2016 - 07:39
नवीन
समाज शेकडो विकृतींनी भरलेला आहेच. ही त्यातलीच एक मनोवृत्ती.
आपल्याला राग आला की आपण एक सकारात्मक गोष्ट करावी, जेणेकरून आपल्याला थोडे समाधान मिळेल.
या संस्थळावर जाऊन आपण सारेजण एक हजार किंवा त्या पटीत रक्कम देऊ शकतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एक हजार कोटी रुपये तिथेही पडून आहेत, आणि दरवर्षी जमतात त्यातले निम्मेही खर्च् केले जात नाहीत.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Mon, 10/24/2016 - 07:42
नवीन
हा सारा पब्लिसिटी स्टंट आहे, घाणेरड्या लेव्हलवर!
- Log in or register to post comments
च
चांदणे संदीप
Mon, 10/24/2016 - 07:56
नवीन
मुद्दा क्र. १ व २ यावरच काथ्याकूट बास आहे!
अशा वेळेस न्यायालय स्वत:हून मध्ये का पडू शकत नाही हाही मला पडलेला एक प्रश्न आहे.
Sandy
- Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद
Mon, 10/24/2016 - 08:10
नवीन
हि सेटलमेंट म्हणजे राजकीय अपरिहार्यता वाटली, फडणवीस आणि राज ठाकरे यांची. ऐन दिवाळीत महाराष्ट्रात अशांतता हि गृहविभागाच्या दृष्टीने चान्गली गोष्ट नव्हती आणि आंदोलनात सहभागी लोकांची ऐन दिवाळीत अटक हि मनसेच्या दृष्टीने चांगली गोष्ट नव्हती. तेव्हा हा मधला मार्ग काढला गेला असावा.
बाकी "कुणी काहीही करावे आणि सैनिक कल्याण निधीस पसे दिले तर त्यांचे अपराध/ चुका माफ केल्या जातील हे गृहितकच मोठे लाजिरवाणे आहे" हे सार कशावरून ते कळले नाही. कारण मनसेने पैसे द्या आणि काहीही करा असे म्हटलेले नाही. त्यांची पत्रकार परिषद आणि मराठी वाहिन्यांवरून मला वाटतं ह्या खालील अटी मनसेने ठेवल्या होत्या - त्याही चित्रपट प्रदर्शितच न होऊ देण्याची भूमिका मागे घेण्यासाठी.
१. चित्रपट निर्माता संघाने यापुढे पाकिस्तानी कलाकारांना सिनेमात घेऊ नये असा निर्णय लिखित स्वरूपात द्यावा.
२. करण जोहर ने आपल्या सिनेमाच्या सुरुवातीला जवानांना श्रद्धांजली वाहणारा फलक दाखवावा.
३. चित्रपट "चालो अथवा न चालो", करण जोहरने सैनिक कल्याण निधीला ५ कोटी रुपये द्यावेत.
४. मनसे चित्रपट प्रदर्शित न होऊ देण्याची भूमिका मागे घेत आहे, चित्रपटावरील बहिष्कार कायम आहे आणि लोकांनाही तसे आवाहन आहे.
यावरून पैसे द्याआणि पाक कलाकरांना आणा असा अर्थ निघू शकत नाही. बाकी शेपटाला कशाकशाचे आणि कसले कसले बोळे लावून आग लावत फिरणाऱ्या इतर कोणाचीही जनतेला घृणा वाटत नाही हे काही नवल नाही.
बाकी मनसेने ह्या प्रकरणात काय केले असते तर ते सर्वग्राह्य झाले असते ते वाचायला आवडेल. बाकी आज ऐकलेल्या दोन बातम्यांनी मन विषण्ण झाले. आपले बीएसएफचे अजून एक जवान गुरनामसिंग शहीद झाले आणि इकडे श्याम बेनेगल यांनी फवाद खान याला घेऊन चित्रपट काढायचा ठरवल्याचे बातमी ऐकिवात आली. छान आहे!
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
Mon, 10/24/2016 - 08:16
नवीन
सरकारने यापुढे मांडवली किंग म्हणुन नावलौकिक कमवावा. या क्षेत्रात त्यांना बर्याच संधी आहेत आणि सरकारचे अश्या प्रकरणांना हाताळण्याचे कौशल्य देखील वादातीत दिसते.
पाकिस्तानी कलाकारांनी चित्रपटांमध्ये काम करु नये अशी इच्छा एखाद्या पक्षाची मनसा असण्यात काहिच गैर नाही. सर्वसामान्य जनतेची अशी भावना किंवा इच्छा होणे देखील समजु शकते. सर्वसामान्यांच्या भावनांना आवाहन घालत स्वतःची इमेज सुधारण्याचा एखाद्या पक्षाचा प्रयत्न देखील समजुन येतो, पण ... पण जर:
१. पाकिस्तानचा मोस्ट फेव्हर्ड नेशन चा दर्जा अजुनही काढुन घेतला गेलेला नसेल
२. पाकिस्तानी नागरिकांना (भारतीय संविधानानुसार बनवलेल्या) कायद्याने भारतीय चित्रपटांमध्ये काम करण्यास बंदी नसेल
३. चित्रपट वगळता इतर क्षेत्रांत हे साटेलोटे चालुच असेल
तर मग २-४ भारतीय चित्रपटांत काम करुन पाकिस्तानी अभिनेत्यांनी असे काय घोडे मारले आहे? बर मारलेच असेल तर सरकार काय झोपा काढते आहे काय? बर झोपा काढत असेल तर त्याची झळ सामान्य (पक्षी करण जोहर इत्यादी) नागरिकांनी का सोसावी? जर सरकारने या सव्रांवर बंदी घालणारा कुठलाही कायदा आणला नसेल, जर करण जोहर ने कुठलेही बेकायदेशीर कृत्य केले नसेल तर सरकारची ही नैतिक आणी कायदेशीर जबाबदारी आहे की त्यांनी अश्या चित्रपटांना योग्य ती सुरक्षा द्यावी आणि एखाद्या पक्षाच्या मनमानी कारभाराला आळा घालावा.
मनसेबरोबर मांडवली करायला लावुन फडणावीसांनी असे चित्र निर्माण केले आहे की जणू:
१. मनसे म्हणजे प्रतिसरकार आहे
२. राज ठाकरे हे सर्वोच्च पातळीवरचे देशभक्त आहेत (तसे ते नाहित असे काही मी म्हणत नाही.)
३. सरकार कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात अपयशी आहे
४. यापुढे व्यवसाय / धंदा करण्यापुर्वी फक्त कायदा पाळणे महत्वाचे नसुन सर्व राजकीय पक्षांची महत्वाकांक्षा आणि त्यांची व्हिजन पाळणेही महत्वाचे आहे.
५. सरकार इतके नाकर्ते आहे की एका नगण्य अस्तित्व असलेल्या राजकीय पक्षासमोर देखील त्याला मान तुकवावी लागते.
६. कायदा आणि सुवव्यवस्था इतकी विस्कळीत आहे की हम करे सो कायदा म्हणणार्या विचारशक्तीच्या खळळ खट्ञाक परंपरेला आभान देउ शकत नाही.
हे असले मांडवली धंदे करण्यापेक्षा सरकारने चित्रपटांना चोख सुरक्षा द्यायला हवी होती, या विरोधात जाउन हिंसात्मक निदर्शने करणार्ञांवर कायदेशीर कारवाई करायला हवी होती, योग्य वेळीस अशातता माजवण्यार्या घटकांना कायदेशीर आणी सनदशीर मार्गाने योग्य समज द्यायला हवी होती. पण तसे केल्याने विरोधकांनी सरकारच्या "देशभक्तीवर" ताशेरे ओढवले असते. याला भिन बहुधा सरकारने असले उरफाटे निर्णय घेतले असावेत,
- Log in or register to post comments
च
चांदणे संदीप
Mon, 10/24/2016 - 09:08
नवीन
अधोरेखित करण्यासारखा मुद्दा म्हणजे:
पाकीस्तान बरोबर मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे व्यवहार राजरोसपणे सुरू असतील. मालाची आयात-निर्यात सुरळीत सुरू असेल. सीमेवर बससेवा निर्धोक सुरू असेल. लोकांचे येणे-जाणे इकडून तिकडे नेहमीसारखे सुरू असेल तर फक्त चित्रपट उद्योगाला मार का??
Sandy
- Log in or register to post comments
स
साहना
Tue, 10/25/2016 - 02:51
नवीन
राज ठाकरे काही मूर्ख नाहीत. चित्रपट हा time sensitive धंदा आहे. योग्य वेळी चित्रपट रिलीस नाही झाला काही दिवस जरी लेट झाला तरी गल्ला ५०% कमी होऊ शकतो. त्यामुळे मूठभर गुंड घेऊन खूप त्रास निर्माण करता येतो.
- Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ
Mon, 10/24/2016 - 11:00
नवीन
आणि हि असली मांडवली मुख्यमंत्र्यांनी दोन्ही 'पार्टींना' आपल्या बंगल्यावर बोलावून करावी हे पाहून भयानक चीड आली!
महाराष्ट्रात काय राजेशाही आहे कि हुकूमशाही?
म्हणजे मनात आलं कि एखादी गोष्ट स्वतःच चुकीची ठरवून, त्यावर 'निवाडा' करण्यासाठी लोकांना बोलवून दंडाची रक्कम आणि शिक्षेचे स्वरूप स्वतःच ठरवून परत, हि आमच्या रयतेची इच्छा होती म्हणूनच कारवाई केली असे म्हणणे?!
असल्या प्रवृत्तींना 'सरकारमान्यता' मिळून गेली या प्रसंगातुन... आता असले कुठलेही राजकीय अस्तित्वासाठी झगडणारे पक्ष आपल्या 'मना'नुसार लोकांना वेठीला धरणार आणि सरकार समंजसपणे मध्यस्ती करून मांडवली घडवून आणणार!(अर्थात स्वतःचा फायदा दिसत असेल तरच!)
<<"या वादात राज ठाकरे आणि फडणविस यांनी विनाकारण हात दाखून अवलक्षण केले आहे (आणि विरोधकांना आयते कोलीत दिले आहे) असे माझे प्रांजळ मत आहे.">>
आयते कोलीत म्हणजे काय? हा जो काही कारनामा केला गेला आहे, तो काही अनावधानाने केला आहे असे आपल्याला वाटते का? स्पष्ट राजकीय खेळी आहे हि...
आपल्याला आठवत असेल पुरंदरेना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याच्या कार्यक्रमात गोंधळ करण्याच्या धमक्या दिल्या गेल्या होत्या तेव्हा सरकारने पोलीस बंदोबस्तात तो कार्यक्रम पार पडला होता. कारण त्यावेळी कणखर सरकार हि प्रतिमा दाखवून द्यायची होती!
आता, निवडणूक जवळच आहेत आणि शिवसेनेला धडा देखील शिकवायचा आहे. मग शिवसेनेची मते खाणारा पक्ष कोणता तर मनसे! त्याला जरा बळकटी देणे पण गरजेचे आहे... पण हे सगळे जनकल्याणार्थ असेही दिसले पाहिजे, मग सैन्यदल आठवते!
सैन्याला समर्थन म्हणजेच राष्ट्रवाद हि जी प्रतिमा आजकाल बनवायची चालली आहे ती देशाला घातक आहे असे वाटते! त्या विरोधात जास्त काही बोलणे म्हणजे राष्ट्रद्रोह असे काहीसे चित्र तयार होऊ लागले आहे...
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Mon, 10/24/2016 - 11:20
नवीन
राज्याचा मुख्यमंत्री या नात्याने राज्यात शांतता राखणे हे मुख्यमंत्र्यांना करावेच लागते. जर बोलणी करून हिंसक आंदोलन रद्द करता येत असेल तर त्यात काय चुकीचे आहे. जर बोलणी करूनसुद्धा समोरचा ऐकत नसेल तर शेवटी पोलिस वापरावेच लागले असते.
दोन्ही गोष्टीत प्रचंड फरक आहे. पुरंदरेंच्या महाराष्ट्रभूषण पुरस्काराला विरोध फक्त मूठभरांचाच होता. सामान्य जनतेत याविषयी विरोधाची भावना नव्हती. याउलट सध्या समाजात मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानविरोधी भावना आहे व काहीही करून, कोणत्याही मार्गाने पाकिस्तानला अद्दल घडवा ही जनतेची मागणी आहे.
दुसरा महत्त्वाचा फरक म्हणजे महाराष्ट्रभूषण पुरस्कार देण्याचा कार्यक्रम हा फक्त एकदाच व एकाच ठिकाणी होणार होता. त्यामुळे त्या कार्यक्रमाला पोलिस संरक्षण देणे फारच सोपे होते. याउलट हा चित्रपट राज्यात शेकडो चित्रपटगृहातून अनेक दिवस दाखविला जाणार होता. इतके दिवस इतक्या सर्व ठिकाणी पोलिस संरक्षण देणे हे अत्यंत अवघड होते.
- Log in or register to post comments
म
मराठी_माणूस
Mon, 10/24/2016 - 12:23
नवीन
जनतेला चित्रपट न बघण्याचा अहींसक मार्ग उपलब्ध आहे. चित्रपट न बघणे हा गुन्हा होउ शकत नाही.कोणाला काहीही करायची गरज नाही. सुंठी वाचुन खोकला जाईल.
- Log in or register to post comments
स
साहना
Tue, 10/25/2016 - 02:58
नवीन
> राज्याचा मुख्यमंत्री या नात्याने राज्यात शांतता राखणे हे मुख्यमंत्र्यांना करावेच लागते.
उद्या मुख्यमंत्र्यांनी tutu घालून चौपाटीवर नाच करून शांतता आणता येईल तर करावी काय ?
कायद्याची कसोटी तेंव्हाच असते जेंव्हा कायद्याची अंबलबजावणी करणे कठीण असते. खंडणी देऊन कसली शांतता ? मग द्यावे काश्मीर पाकिस्तानला आणि घ्यावी विकत शांतता !
> पुरंदरेंच्या महाराष्ट्रभूषण पुरस्काराला विरोध फक्त मूठभरांचाच होता.
विरोध १ माणसाचा असेल किंवा १०० कोटी जनतेचा काहीही फरक पडत नाही. रिपब्लिक ह्याचा अर्थच मुळांत कायद्याचे राज्य असा असतो. कायदा लागू करण्याचे काम मुख मंत्र्यांचे आहे. "बाई संध्याकाळी वाड्यावर या मदत केली जाईल " हे निळू फुलेंचे (चित्रपट मधील) काम आहे.
लोकांची भावना असेल पाकिस्तान विरोधी तर लोक पाहणार नाहीत चित्रपट. आणि एक आमदार असणाऱ्या राज ठाकरेला मूठभर नाही तर काय म्हणायचे ?
> इतके दिवस इतक्या सर्व ठिकाणी पोलिस संरक्षण देणे हे अत्यंत अवघड होते.
तर उद्या हिजाब ना घालता येणाऱ्या प्रत्येक मुलीच्या तोंडावर ऍसिड फेकू अशी कुना मुस्लिम संघटनेने धमकी दिल्यास मुख्यमंत्री वाटाघाटी करून "मुलींनी फक्त केस झाकावेत" हा तोडगा काढणार आहेत का ?
पक्ष भक्ती आणि व्यक्ती पूजा सुविचारी माणसाला सुद्धा कशी लाचार बनवू शकते हे तुमचे उत्तर दाखवून देते.
- Log in or register to post comments
म
मोदक
Mon, 10/24/2016 - 11:30
नवीन
सहमत..
सरकारने हे प्रकरण हाताळताना थोडी परिपक्वता दाखवणे अपेक्षित आहे. :(
- Log in or register to post comments
व
विशुमित
Mon, 10/24/2016 - 09:03
नवीन
<<<हे असले मांडवली धंदे करण्यापेक्षा सरकारने चित्रपटांना चोख सुरक्षा द्यायला हवी होती, या विरोधात जाउन हिंसात्मक निदर्शने करणार्ञांवर कायदेशीर कारवाई करायला हवी होती, योग्य वेळीस अशातता माजवण्यार्या घटकांना कायदेशीर आणी सनदशीर मार्गाने योग्य समज द्यायला हवी होती.>>>
-- सहमत..
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Mon, 10/24/2016 - 09:55
नवीन
या वादात एकूण ३ हितसंबंधी (स्टेकहोल्डर्स) होते. करण जोहर (म्हणजेच निर्माते), राज ठाकरे (म्हणजेच मनसे) आणि फडणविस (म्हणजेच राज्य सरकार). तसे चित्रपटगृहांचे मालक, वितरक, प्रेक्षक इ. सुद्धा हितसंबंधी होते, परंतु वरील ३ हे प्रमुख हितसंबंधी होते.
- यातील करण जोहरची भूमिका पूर्णतः कायदेशीर असली तरी ती लोकभावनेच्या दृष्टीकोनातून अयोग्य होती.
- राज ठाकरेची भूमिका पूर्णत: बेकायदेशीर असली तरी ती लोकभावनेच्या दृष्टीकोनातून योग्य होती.
- फडणविसांना कायदेशीर भूमिकेच्या बाजूने उभे राहणे बंधनकारक होते आणि त्याचवेळी लोकभावनेकडे पूर्ण दुर्लक्ष करूनही चालले नसते.
राज्य सरकारला कोणत्याही तर्हेने हिंसाचार, तोडफोड होऊन न देता कायद्याच्या बाजूने उभे राहण्याची व त्याचवेळी लोकभावनेचा आदर करण्याची दुहेरी कसरत करायची होती. समजा राज्य सरकार पूर्ण गप्प राहून या वादात पडलेच नसते तर तोडफोड वगैरे होऊन प्रचंड नुकसान होऊन अशांतता निर्माण झाली असती व बेकायदेशीर मार्गाचा विजय झाला असता व त्यामुळे राज्य सरकारला मोठ्या प्रमाणात टीका सहन करावी लागली असती. समजा राज्य सरकारने लोकभावनेकडे पूर्ण दुर्लक्ष करून चित्रपटाला पूर्ण संरक्षण दिले असते तरीसुद्धा तोडफोड, लाठीमार होऊनही चित्रपट चालू राहिलाच असता व अशा परिस्थितीत आपण लोकभावनेकडे दुर्लक्ष करून विजय मिळविला व भविष्यात सुद्धा याच मार्गाने पाकड्यांना घेऊन चित्रपट निर्माण करून सरकारच्या संरक्षणाखाली चित्रपट प्रदर्शित करू शकतो अशी विजयी भावना करण जोहरच्या मनात निर्माण होऊन त्याने आपल्यात भूमिकेत कोणताही बदल केला नसता. अशा परिस्थितीतही लोकभावनेकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका राज्य सरकारवर आला असता.
त्यामुळे कायदेशीर बाजूने उभे राहणे व त्याचवेळी लोकभावनेचा आदर करण्याच्या भूमिकेच्या बाजूने उभे राहणे हे राज्य सरकारसाठी आवश्यक होते. या दोन्ही गोष्टी या विशिष्ट प्रकरणात पूर्णतः परस्परविरोधी असल्याने राज्य सरकारची पंचाईत झाली होती.
इतर कोणत्याही सूज्ञ सरकारने जे केले असते तेच फडणविसांनी केले. अशांतता व हिंसाचार टाळण्यासाठी त्यांनी चर्चेच्या माध्यमातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला व त्यात यश आले. मनसेने चित्रपटाविरूद्ध आंदोलन न करण्याचे मान्य केल्यामुळे कायदा हातात घेण्याचा प्रश्न निकालात निघाला. त्याचवेळी भविष्यात पाकड्यांना काम ने देण्याचे जाहीर केल्यामुळे लोकभावनेचाही आदर राखला गेला. त्याचबरोबर सैनिक कल्याण निधीला ५ कोटी रूपये देणगी देण्याचे जाहीर करून करण जोहरने सैनिकांप्रती कृतज्ञताही व्यक्त केली. अर्थात तो खरोखरच ५ कोटी देईल का, भविष्यात पाकड्यांना न घेण्याचा निर्णय खरोखरच पाळेल का हे आज तरी सांगता येणे अवघड आहे. या ५ कोटीला खंडणी म्हणणे पटत नाही कारण हे पैसे सैनिकांना जाणार असून राज ठाकरेच्या खिशात जाणार नाहीत. या चर्चेत काही डील झाले का, राजला टेबलाखालून काही मिळाले का, फडणविस मनसेपुढे झुकले का इ. गोष्टी अजून तरी माहित नाहीत व जोपर्यंत त्याविषयी काही ठोस माहिती मिळत नाही तोपर्यंत त्याबद्दल स्पेक्युलेशन करणे योग्य नाही.
माझ्या दृष्टीने दृष्टीने फडणविसांनी एका वादग्रस्त व अशांतता निर्माण करू शकणार्या या स्फोटक विषयावर शांततेच्या मार्गाने तोडगा काढण्यासाठी योग्य प्रयत्न केले व त्यात ते यशस्वी झाले. माझ्या दॄष्टीने हा विन-विन तोडगा होता.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Mon, 10/24/2016 - 09:58
नवीन
यझ प्रतिसाद!
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Mon, 10/24/2016 - 10:26
नवीन
आम्ही तुमच्या महफिलीतले नाही का त्यामुळे आमचा प्लस वन =))
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Mon, 10/24/2016 - 15:13
नवीन
संदीप डांगे,
यझ प्रतिसाद म्हणून हेताल्नी करण्यापेक्षा प्रतिवाद करा म्हणून सुचवेन.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Mon, 10/24/2016 - 15:54
नवीन
मृत्युंजय साहेबांनी केलेला प्रतिवाद पुरेसा आहे, मी केल्यास पुनरुक्ती होईल , वेळेचा अपव्यही!
- Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद
Tue, 10/25/2016 - 06:23
नवीन
यझ प्रतिसाद म्हणजे नेमकं काय?
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
Mon, 10/24/2016 - 11:36
नवीन
सरकारने सनदशीर आणी कायदेशीर मार्गाने या प्रकरणाचा निकाल लावणे अपेक्षित होते. हा विन विन तोडगा नाही. ही तर चक्क मांडवली आहे. एका नगण्य अस्तित्व असलेल्या पक्षाविरुद्ध कायद्याचा आणि पोलिस यंत्रणेचा वापर करुन जर निर्दोष चित्रपटनिर्मात्याला संरक्षण पुरवता येत नसेल तर ते सरकारचे नाकर्तेपण आहे, सूज्ञपणा नाही.
सरकारचे काम काय्दा आणि सुव्यवस्था राखणे आहे. कायद्याच्या विरोधात जाउन अहिंसक मार्गांचा अवलंब करणार्यांना लोकभावनेच्या गोंडस नावाखाली पाठिशी घालणे हे नाही. ही गोष्ट (पाकिस्तानी कलाकारांना काम देणे) जर बेकायदेशीर असले असते तर मी चित्रपट प्रदर्शनालाचा विरोध केला असता. आणी जर करण जोहर ने कुठलेही बेकायदेशीर कृत्य केले नसेल तर त्याला नाहक या मनस्तापाला तोड द्यावे लागणे हे सरकारसाठी लाजिरवाणे आहे. कुठलाही सोम्यागोम्या पक्ष, संघटना अथवा व्यक्ती अश्याप्रकारे व्यावसायिकांना आणि सरकारला धारेवर धरु शकत नाही.
लोक्भावना महत्वाची आहेच पण ती कधीही कायद्यापेक्षा वरचढ होउ शकत नाही. होत असेल तर कायदे बदलणे सरकारच्या हातात आहे आणि मग लोकभावनेचा आदर कायदेशीर मार्गाने करणे हे देखील. बलात्कार्याला भर चौकात गुप्तांग तोडुन मग फाशी द्यावी ही लोकभावना झाली पण जर ते कायद्याच्या विरोधात असेल तर तसे न करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. बलात्कार्याला कायद्यानुसार शिक्षा जरुर द्यावी पण उद्या लोकभावनेचा आदर म्हणुन मांडवली करुन "गुप्तांग न कापता " केवळ भर चौकात बांधुन १०० फटक्यांची शिक्षा आणि मग भर चौकात फाशी ही मांडवली सरकारने करणे अपेक्षित नाही मग ती भलेही सो कॉल्ड विन विन सिच्युएशन का असेना.
एकीकडे सरकार पाकिस्तानबरोबर संबंध सुधारण्याचे प्रयत्न करणार. फील गुड फॅक्टर तयार करण्याचा प्रयत्न करणार मग एखाद्या चित्रपट निर्मात्याने पाकड्यांना घेउन चित्रपट काढला की त्याला वेठीस धरणार. हे कसे जमावे. चित्रपट बनवायला ३-४ महिन्यांचा कालावधी जातो, कधी कधी वर्षभराचा सुद्धा. मग अश्यावेळेस एकाएकी (युद्ध पुकारलेले नसताना आणी असे करणे बेकायदेशीर नसताना) केवळा कुणीतरी माणुस किंवा व्य्क्तीसमूह अशी मागणी करतो म्हणून एकाएकी चित्रपट बॅन करण्याला माझा विरोध आहे.
शिवाय जर हा निर्णय लोकभावनेचा आदर ठेउन घेतला असेल तर सर्वोत्तम मार्ग होता की चित्रपट प्रदर्शित होउ देणे. जर जनभावना इतकीच विरोधात होती तर चित्रपट साफ कोसळलाच असता की. लोकभावना दिसलीच असती. प्रत्यक्षात मात्र ही भावनाप्रधान जनता मोठ्या प्रमाणावर चित्रपट पहायला उत्सुक असेल. मनसे ज्या लोकभावनेच्य आधारावर हे राजकारण करते आहे ती जनता पाकिस्तानी कलाकार चित्रपटात आहे म्हणुन पेटुन उठुन कदाचित चित्रपटाचा द्वेष करेल पण तरीही चित्रपट पाहिलच. मग कसली आलीय डोंबलाची भावना. कित्येकांना या सगळ्या प्रकरणाशी काडीचे घेणेदेणे नसेल. खास पब्लिसिटी केलेले ऐश्वर्या रणबीर ची गरमा गरम चुंबनालिंगनादी दृष्ञे पाहण्यासाठी चित्रपटात गर्दी देखील होइल आणि मग चित्रपट संपल्यावर या भावनाशील लोकांपैकीच काही लोक "फवाद कित्ती क्युट दिसतो ना?" म्हणून उसासे पण सोडतील.
त्यामुळे लोकभावनेच्या गोंडस आवरणाखाली नाकर्तेपणा लपवण्याचा जो प्रकार चालला आहे तो निव्वळ हास्यास्पद आहे. खरे सांगायचे तर स्वतः प्रमोट करत असलेल्या नॅशनलिजमच्या बुरख्याआडुन केल्या गेलेल्या या शरसंधानाला तोंड कसे द्यावे हे भाजपाला कळत नाही आहे. करण जोहरला संरक्षण द्यावे तर नॅशनलिजम आडवा येतो आणि न देणे " सरकार " साठी शक्य नाही. त्यातुन हा बनियाचा मध्यममार्ग निघाला. पण हा राजधर्म होउ शकत नाही.
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Mon, 10/24/2016 - 11:55
नवीन
प्लसच वन, शिवाय लोकभावना लोकभावना करणाऱ्यांना आत्ता बोलूनही उपयोग नाहीये मृत्युंजय भाऊ, हातच्या काकणाला आरसा कश्याला ह्या नियमाने, करण जोहरचा जो सिनेमा (नावही आठवत नाही) रीलीज होणार आहे, त्याचे कलेक्शन फिगर पाहून ही लोकभावना होती का लोकभावनेच्या गोंडस नावाखाली मांडवली होती हे चित्र स्पष्ट होईलच, तोवर तुमच्या प्रतिसादाला मम् म्हणतो आम्ही बापडे
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Mon, 10/24/2016 - 12:08
नवीन
सरकारने सनदशीर व कायदेशीर मार्गानेच या प्रकरणावर तोडगा काढलेला आहे. जर कायद्याच्या बडग्याची सक्ती करण्यापेक्षा चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सुटत असेल तर सर्वप्रथम चर्चेचाच मार्ग स्वीकारावा लागतो व फडणविसांनी तेच केले आहे. या प्रकरणातील दोन्ही बाजूंनी काही गोष्टी मान्य केल्या आहेत ज्या संपूर्णपणे कायदेशीर आहेत. मनसेच्या आंदोलनाविरूद्ध निश्चितच पोलिस यंत्रणेचा वापर करता आला असता. परंतु पोलिस वापरूनसुद्धा तोडफोड, हिंसात्मक आंदोलन पूर्णपणे टाळता आले नसते. श्रीनगरमध्ये अनेक महिने संचारबंदी असूनसुद्धा व सैनिक/पोलिस अश्रुधूर, पेलेट गन्स इ. चा वापर करत असूनसुद्धा जनता दगडफेकीसाठी संचारबंदी मोडून रस्त्यावर येत होती. इथे तर फक्त लाठ्या हातात असलेले थोडे पोलिस चित्रपटगृहांवर तैनात असते व आंदोलकांनी त्यांना भीक घातली नसती.
राज्य सरकारने चित्रपटाला संरक्षण द्यायचे आधीच कबूल केले होते, चित्रपटावर बंदी घालणार नसल्याचेही सांगितले होते, मनसेच्या काही कार्यकर्त्यांना आधीच अटक झाली होती व चित्रपट प्रदर्शनाच्या वेळी मनसेचे बरेच कार्यकर्ते पकडले गेले असते. एवढे होऊनसुद्धा अशांतता टाळता आली नसती. त्यामुळे चर्चेच्या माध्यमातून कायदेशीर तोडगा काढण्याचा यशस्वी प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला.
सरकार कायद्याचे पालन करीत होतेच. राज्य सरकारने चित्रपटाला संरक्षण द्यायचे आधीच कबूल केले होते आणि चित्रपटावर बंदी घालणार नसल्याचेही सांगितले होते कारण या दोन्ही गोष्टी कायद्याच्या विरूद्ध झाल्या असत्या. जर मनसेने हिंसक आंदोलन केले असते तर त्याला तोंड द्यायची सरकारची तयारी होतीच. परंतु कोणत्याही परिस्थितीत सर्वात आधी चर्चेच्या माध्यमातून कायदेशीर तोडगा काढण्याचा प्रयत्न करणे व चर्चा अपयशी झाल्यास कायद्याच्या बडग्याची सक्ती करणे हेच मार्ग सरकारपुढे असतात व फडणविसांनी नेमके तेच केले आहे.
लोकभावना कायद्यापेक्षा वरचढ होऊ शकत नाही, परंतु लोकभावनेकडे पूर्णपणे दुर्लक्षही करता येत नाही. कायदे बदलणे ही अत्यंत वेळखाऊ प्रक्रिया आहे व या विशिष्ट प्रकरणात इतक्या कमी वेळात कायदे बदलणे अशक्य आहे. लोकभावनेचा आदर कायदेशीर मार्गाने करता येतो आणि चर्चेच्या माध्यमातून नेमके तेच झाले आहे. निदान भविष्यात तरी पाकड्यांना चित्रपटात घेणार नाही ही जाहीर कबुली हे त्याचेच उदाहरण आहे.
संबंध हे एकतर्फी सुधारत नसतात. संबंध सुधारणे हा एकेरी मार्ग नसतो. भारताने आपल्या बाजूने संबंध सुधारण्याचे असंख्य प्रयत्न केले आहेत. परंतु ते सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. एखाद्या पाकड्याला चित्रपटात घेतल्यामुळे संबंध सुधारतील असे मानणे हे भाबडेपणाचे लक्षण आहे. चित्रपट बॅन झालेला मला आवडला असता. परंतु तसे करणे कायदेशीर नाही व त्यामुळे तसे होणे शक्य नाही.
भारतासारख्या प्रचंड विविधता असलेल्या प्रचंड लोकसंख्येच्या देशात एखाद्या गोष्टीवर एकमत होणे जवळपास अशक्य आहे. जर लोकांना पाकड्यांची तीव्र चीड असेल तर ते नक्कीच तो चित्रपट बघणार नाहीत.
नॅशनलिझमचा कसला आला आहे बुरखा? सत्ताधारी पक्ष या नात्याने भाजप ती जबाबदारी ओळखूनच हे प्रकरण हाताळत आहे. फडणविसांनी संघर्षाचा मार्ग टाळून दोन्ही बाजूंना समोरासमोर बसवून एक कायदेशीर तोडगा काढून शांतताभंग टाळला व लोकभावनेचाही आदर केला.
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Mon, 10/24/2016 - 12:18
नवीन
सरकारने सनदशीर व कायदेशीर मार्गानेच या प्रकरणावर तोडगा काढलेला आहे.
कुठल्या सनदी नुसार हा सनदशीर तोडगा काढला आहे म्हणे?
कायदेशीर म्हणता आहात तर कुठल्या कायद्यान्वये हा तोडगा वर्षांवर काढायचा ठरला त्याचा मसुदा किंवा किमान कलम क्रमांक अन त्या कलमाची वाक्यरचना विदास्वरूप द्यावीत ही नम्र विनंती.
जाता जाता
सनदशीर ह्या शब्दाचा उगम सनद उर्फ इंग्रजीत "charter" ह्यावरून आलेला आहे त्यामुळे सनदशीर म्हणले की मूळ सनदीची संहिता देणे बंधनकारक असते किंवा त्या सनदीच्या अंतर्गत कार्य करणे अपेक्षित असते म्हणूनच टॅली प्रो वापरणारे खंडीभर "अकाउंटंट" असले तरी महत्व "चार्टर्ड अकाउंटंट" उर्फ सनदप्राप्त सनदी लेखपालालच असते, हेच सीएस, वकील, डॉक्टर इत्यादी पेशांना सुद्धा लागू होते, ह्याची नोंद घेऊन संबंधितांनी "सनदशीर" हा शब्द वापरला असावा अशी अपेक्षा आहे.
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Mon, 10/24/2016 - 12:22
नवीन
कुठल्या कोर्टाने "असे वाद झाल्यास परस्पर मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर दोन्ही वादी अन फिर्यादी पक्षाला बोलवून तोडगा काढावा अन शांतता प्रस्थापित करावी" असा आदेश दिलाय का? असल्यास तो लेखी असेलच, त्याची प्रत जमल्यास द्यावी ही विनंती, तसेही असे आदेश द्यायचेच असले तर ती शक्ती फक्त सुप्रीम कोर्टाकडे आहे असे वाटते, कारण "एपेलेट ज्यूरीसडीक्शन" फक्त सुप्रीम कोर्टाचे असते असे वाटते, तरीही असा कायदा असल्यास तो द्यावा म्हणजे पुढील अभ्यासाला बरे पडेल
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Mon, 10/24/2016 - 17:14
नवीन
फडणविसांनी राज व करणला एकत्र बोलावून तोडगा काढण्याचे केलेले प्रयत्न हे बेकायदेशीर किंवा घटनेच्या विरोधी होते का?
एखाद्या वादावर चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्याची पद्धत अनेक वर्षांपासून वापरली जाते. १९८५ मध्ये राजीव गांधींनी शिरोमणी गुरूद्वारा प्रबंधक कमिटी या धार्मिक संस्थेशी व त्या संस्थेच्या लोंगोवाल (जे कोणत्याही घटनात्मक पदावर नव्हते किंवा निवडून आलेले जनतेचे प्रतिनिधीही नव्हते) यांच्याशी वाटाघाटी करून तोडगा काढला होता. त्याच वर्षी अखिल आसाम विद्यार्थी परीषदेच्या विद्यार्थी प्रतिनिधींशी चर्चा करून तोडगा काढण्यात आला होता. १९८६ मध्ये मिझोराममधील बंडखोर लाल डेंगाशी वाटाघाटी करून शांततेसाठी तोडगा काढण्यात आला होता. फुटिरतावादी हुरियत नेत्यांशी सुद्धा केंद्र सरकारने वाटाघाटी केल्या आहेत.
कोणत्याही वादात सुरवातीला चर्चेच्या माध्यमातूनच तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केला जातो. घटस्फोटाचे प्रकरण असो किंवा एकाने दुसर्याची बदनामी केल्याचा आरोप असो, सर्वात आधी दोन्ही बाजूंनी एकत्र बोलून वाद मिटवावा यासाठीच प्रयत्न केले जातात. ते प्रयत्न अपयशी ठरले तर कायद्याची कारवाई सुरू होते.
फडणविसांनी नेमके तेच केले आहे. दोन्ही बाजूंना समोरासमोर बसवून शांततामय मार्गाने तोडगा काढण्याचा प्रयत्न केला गेला. समजा तो प्रयत्न अयशस्वी ठरला असता तर त्यांना चित्रपटाला संरक्षण द्यायची आपली घटनात्मक जबाबदारी पार पाडावीच लागली असती.
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Mon, 10/24/2016 - 17:55
नवीन
अच्छा म्हणजे एका सिनेमाला विरोध करणे अन खलिस्तानी किंवा पूर्वोत्तरी फुटीरतावादी लोकांच्या बरोबरीचं वाटतं का काय तुम्हाला? का फक्त किल्ला लढवायचा म्हणून कायच्या काय बोलताय का काय? तुम्ही किती खालिस्तानी किंवा उल्फा , एनएस्सीएनवाल्या लोकांचे राडे पाहिले आहेत? एकतर तुम्ही ते पाहिलेले नाहीत किंवा मनसेची बेडकी फुगवून दाखवताय कारण नाव तुमच्या सीएमचं अडकलंय म्हणून कदाचित. रक्तपाती राडे अन असल्या दीड दमडीच्या राजकीय स्टंट मध्ये फरक असतो हो साहेब, प्लिजच ___/\__
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Mon, 10/24/2016 - 20:14
नवीन
मनसेने पूर्वी बिहारींविरूद्ध केलेले राडे आठवत असतील. यावेळीही तसेच राडे होण्याची वाट बघायची होती का?
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Mon, 10/24/2016 - 17:55
नवीन
अच्छा म्हणजे एका सिनेमाला विरोध करणे अन खलिस्तानी किंवा पूर्वोत्तरी फुटीरतावादी लोकांच्या बरोबरीचं वाटतं का काय तुम्हाला? का फक्त किल्ला लढवायचा म्हणून कायच्या काय बोलताय का काय? तुम्ही किती खालिस्तानी किंवा उल्फा , एनएस्सीएनवाल्या लोकांचे राडे पाहिले आहेत? एकतर तुम्ही ते पाहिलेले नाहीत किंवा मनसेची बेडकी फुगवून दाखवताय कारण नाव तुमच्या सीएमचं अडकलंय म्हणून कदाचित. रक्तपाती राडे अन असल्या दीड दमडीच्या राजकीय स्टंट मध्ये फरक असतो हो साहेब, प्लिजच ___/\__
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Mon, 10/24/2016 - 18:51
नवीन
राष्ट्रवादी एक फुटकळ पक्ष असतो.
पण मनसे तोडफोड करणारा, विध्वंसकारी, राज्यव्यापी, जनतेपेक्षा मोठा पक्ष असतो.
त्याईची सतरंजी अटकेल हाये, एवढी दलाली(इंग्रजीत Pimp या अर्थाने)….? _/\_
- Log in or register to post comments
भ
भक्त प्रल्हाद
Mon, 10/24/2016 - 18:54
नवीन
काश्मिर मध्ये १०० लोक मेले तर तिथे तोडगा काढायला कोणि प्रयत्न करत नाही. पण इथे करतात, यावरुनच मनसे किती मोठी दहशतवादी संघटना असेल याची कल्पना येते. याची कल्पना महाराष्ट्राबाहेर राहणार्या बीड-नंदुरबार च्या लोकांना येणार नाही, पण ती मुख्यमंत्र्याना आहे, म्हणुनच त्यांनी जिवाची बाजी लावुन हा संघर्ष टाळला.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Mon, 10/24/2016 - 19:55
नवीन
महाराष्ट्रात १०० माणसे मरण्याची वाट बघायला हवी होती का?
- Log in or register to post comments
भ
भक्त प्रल्हाद
Mon, 10/24/2016 - 21:13
नवीन
तोडगा काढताना फक्त एका बाजुला पैसे खर्च कराय्ला लावायला नको होते.
राज ठाकरें नी प्रत्येक पाकिस्तानी कलाकाराच्या बदल्यात ५ करोड स्वतः आर्मीला द्याय्ला हवे होते.
किंवा निदान २.५ करोड तरी.
किति माणसे मारायची हे ठरवायला राजबरोबर वेगळी मीटींग ठेवावी. फक्त मोदिंना बोलवु नका म्हणजे झाले.
==
हिच गोष्ट एखद्या मुस्लीम पुढार्याने केलि असती तर अशी मांडवली झाली असती का?
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 10/25/2016 - 11:32
नवीन
मला नाही वाटत की ५ कोटी रूपये देणे हा तोडग्याचा प्राथमिक भाग होता म्हणून. अशांतता टाळण्यासाठी आंदोलन मागे घेतले जावे हा चर्चेचा मुख्य मुद्दा होता. ५ कोटी देणे, चित्रपटाच्या सुरवातीला उरी हल्ल्याच्या निषेधाचा फलक दाखविणे इ. गोष्टी नंतर आलेल्या आहेत. राज ठाकरेंनी किती द्यावे किंवा अजिबातच न द्यावे हा त्यांचा प्रश्न आहे.
मुस्लिमांबरोबरही यापूर्वी बोलणी करून तडजोड केल्याची उदाहरणे आहेत. हुरियतच्या नेत्यांबरोबर चर्चा करणे हे एक उदाहरण. दुसरे उदाहरण म्हणजे सप्टेंबर १९९३ मध्ये ५-६ पाकिस्तानी अतिरेक्यांनी हजरतबाल मशिदीत प्रवेश केल्यावर सैनिकांनी मशिदीला वेढा घालून त्यांना अडकवून ठेवले होते. मशिदीत अतिरेक्यांव्यतिरिक्त इतर कोणीही नव्हते. अतिरेक्यांना पळून जाणे अशक्य होते. तरीसुद्धा तत्कालीन केंद्र सरकारने अतिरेक्यांशी बोलणी करून मशिदीचे नुकसान न करण्याच्या अटीवर वेढा उठवून त्यांना सुखरूप पाकिस्तानला जाऊन दिले होते.
- Log in or register to post comments
ग
गणामास्तर
Tue, 10/25/2016 - 11:38
नवीन
गुरुजी, पाच कोटी देणे हा तोडग्याचा प्राथमिक वा दुय्यम भाग होता हेचं मुळात इथे दुय्यम आहे. मुख्य प्रॉब्लेम या असल्या
तोडग्याशीचं आहे.
बाकी पूर्वी कुणा कुणासोबत कसे तोडगे काढले गेले याचा इथे काही संबंध आहे असे मला वाटत नाही, उगाचं समोरचा
चिखलात खेळला म्हणून आम्ही शेणात लोळलो म्हणण्याला काही अर्थ नसतो.
- Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद
Tue, 10/25/2016 - 11:41
नवीन
मग नक्की काय करायला हवे होते हे जरा सांगाल का?
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Tue, 10/25/2016 - 12:00
नवीन
मुख्य प्रॉब्लेम या असल्या
तोडग्याशीचं आहे.
^^^ सहमत!
काय करायला पाहिजे होते?
१. सरकार: चित्रपटाला संरक्षण देणे.
2. मनसे: धरणे आंदोलन करून किंवा कोणत्याही अहिंसक मार्गाने चित्रपट बघू नये म्हणून प्रचार करणे.
3. करण जो ने यापुढे कोणत्याही पाकी कलाकाराला ना घेण्याचे वचन देणे,
मनसे दंगा करेल म्हणून हा सरकारने दोघांना बोलावून तोडगा काढणे चुकीचा पायंडा पाडणे आहे, हुर्रीयात किंवा इतर आतंकवादी, नक्षलवादी, अलगाव्वदी संघटन यांची मनसे सारख्या राजकीय पक्षाबरोबर तुलना करणेच चुकीचे.
ह्या प्रकरणात चित्रपट किंवा पाच कोटी महत्वाचे नाहीत, मुख्यमंत्र्यासारख्या घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीने गुंडगिरी करणाऱ्याला भिऊन असले तोडग्याचे पाउल उचलणे लोकशाहिस मारक आहे. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य नाही, चारपाच हजार गुंड हाताशी असले की कोणीही काहीही कबूल करून आपल्या मागण्या मान्य करून घेऊ शकतो हा संदेश जात आहे.
राज ठाकरे ह्या घटनाबाह्य व्यक्तीला महत्त्व देणे खटलेलं आहे,
व्हाटबौटेरीच करायची असेल तर राहुल गांधीने अध्यादेश मागे घ्यायला लावल्यावर विरोधकांनी केलेला थयथयाट आठवावा.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 10/25/2016 - 12:09
नवीन
चित्रपटाला संरक्षण देण्यात येणारच होते. परंतु ते देऊनसुद्धा तोडफोड टाळता आली नसती. त्यामुळे सामोपचाराने मार्ग काढण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणे आवश्यक होते.
मनसे धरणे आंदोलन करण्याची किंवा कोणत्याही अहिंसक मार्गाने चित्रपट बघू नये असा प्रचार करण्याची शक्यता दिसत नव्हती आणि करण तर चर्चेच्या आदल्या दिवसापर्यंत गप्प होता व त्याच्या वतीने काही जण पाकड्यांना घेण्याचे समर्थन करीत होते. या दोघांपैकी कोणीतरी एकाने अशी भूमिका आधीच घेतली असती तर तडजोडीची वेळच आली नसती.
- Log in or register to post comments
ग
गणामास्तर
Tue, 10/25/2016 - 12:43
नवीन
१. सरकार: चित्रपटाला संरक्षण देणे.
= सहमत. आपण अशी अपेक्षा सरकार कडून करणे योग्य आहे.
2. मनसे: धरणे आंदोलन करून किंवा कोणत्याही अहिंसक मार्गाने चित्रपट बघू नये म्हणून प्रचार करणे.
= मनसे कसलाही विरोध अहिंसक मार्गाने करेल असे वाटत नाही. आपल्या सारख्या काही लोकांचा जरी अशा प्रकारांना विरोध असला तरी काही लोकांचा त्याला सपोर्ट आहे आणि अजून काही लोक सपोर्ट करतील अशी मनसे ला अपेक्षा असल्यामुळे ते धिंगाणा घालून स्वताचे उपद्रवमूल्य वाढवणे हा हेतू साध्य करण्यासाठी प्रयत्न करणारचं.
3. करण जो ने यापुढे कोणत्याही पाकी कलाकाराला ना घेण्याचे वचन देणे,
= जर सरकारने अशी काही बंदी घातलेली नाही आणि बहुसंख्य लोकांना त्याचा काही फरक पडत नसेल तर कायद्याच्या चौकटीत राहून पाकी कलाकारांना घेण्यात काय प्रॉब्लेम असू शकतो हे मला कळत नाहीये. जेव्हा या चित्रपटाचे चित्रीकरण चालू होते तेव्हा तरी वातावरण इतके तापलेले नव्हते, आपले पंप्र सुद्धा पाकिस्तान दौरा करत होते आणि नवाझ शरीफांना आमंत्रणे धाडीत होते.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Mon, 10/24/2016 - 12:06
नवीन
बेष्ट प्रतिसाद !
- Log in or register to post comments
प
पैसा
Mon, 10/24/2016 - 13:53
नवीन
कुठले विन विन? कुठली लोकभावना? माझा दुसरीकडचा प्रतिसाद इथे चिकटवते. ही आहे लोकभावना.
सैनिक खंडणीच्या पैशांवर जगत नाहीत म्हणून माजी अधिकार्यांनी झोडपून काढले आहे ना, त्याचा अर्थ समजत असला तर जरा तरी लाज वाटून घेऊ देत हे नालायक. अकोल्याच्या एका दुकानदाराने करण जोहरला ३२० रुपयाचा चेक पाठवून भीक घातली आहे ही आहे लोकभावना.
फडणवीस मोर्चांचा प्रसंग ज्या चातुर्याने हाताळत होते त्याबद्दल त्यांचे कौतुक वाटले होते पण मांडवली करणार्यांच्या रांगेत बसून खरेच त्यानी हात दाखवून अवलक्षण करून घेतले आहे.
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Mon, 10/24/2016 - 14:15
नवीन
आमच्या गावचा असा रास्त उल्लेख वाचून छाती टरारली पाव इंच! थँकयु ताय! बातमी दिल्या बद्दल
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Mon, 10/24/2016 - 17:24
नवीन
क्षणभर असं गृहित धरू की त्यांनी राज व करणला एकत्र बोलवून त्यांच्याशी वाटाघाटी करून गंभीर घोडचूक केली. पण मग हे न करता त्यांनी नक्की काय करायला हवं होतं?
- Log in or register to post comments
प
पैसा
Mon, 10/24/2016 - 17:31
नवीन
उद्या कोणा नवरा बायकोचे भांडण झाले तर ते फडणवीस सोडवत बसणार का?
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Mon, 10/24/2016 - 17:34
नवीन
काहीही काय? नवराबायकोचे भांडण हा एका कुटुंबातला खाजगी वाद आहे. समाजाचा त्याच्याशी संबंध नाही.
बादवे, वरील प्रतिसाद वाचून कायम विषय भलतीकडेच भरकटविणार्या, असंख्य डुआय असणार्या आणि प्रचंड फॅन फॉलोइंग असणार्या एका ट्रोलची आठवण झाली.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Mon, 10/24/2016 - 17:43
नवीन
बादवे, खालील वाक्यांवर प्रतिसाद अपेक्षित होता.
- Log in or register to post comments
प
पैसा
Mon, 10/24/2016 - 19:17
नवीन
करण जोहरने कोर्टात जायचे होते आणि मनसेने शांततापूर्ण आंदोलन करायचे होते. हे ब्लॅकमेलिंग कशाला? आम्ही तो सिनेमा बघणार नाहीच पण म्हणून मनसे गुंडगिरी करणार असेल तर आमचा अजिबात पाठिंबा नाही. करण जोहर आणि मनसे यांच्याकडून कसलीही चांगल्या कामाची अपेक्षा अजिबात नाही पण ही मांडवली फडणविसानी करावी याचा जास्त राग आला आहे. धमक्या देऊन मनसे दंगल करणार होते? करून बघू देत. आतापर्यंत महाराष्ट्रात किती दंगलीमधे सैन्याला बोलावावे लागले? गुंडगिरीचा समाचार घ्यायला महाराष्ट्र पोलीस समर्थ आहेत.
फडणविसानी एजंटाचे काम न करता गप्प बसून लक्ष ठेवायचे होते. नसते धंदे करायला सांगितले कोणी? महाराष्ट्रातली सगळी कोर्ट आणि पोलीस मेले का?
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Mon, 10/24/2016 - 20:05
नवीन
>>> करण जोहरने कोर्टात जायचे होते आणि मनसेने शांततापूर्ण आंदोलन करायचे होते.
ते दोघे तसे करीत नव्हते, त्यामुळेच फडणविसांना त्यात पडावे लागले.
>>> गुंडगिरीचा समाचार घ्यायला महाराष्ट्र पोलीस समर्थ आहेत.
पोलीस संरक्षण हा शेवटचा पर्याय शिल्लक होताच. परंतु त्यापूर्वी चर्चने मार्ग काढणे आवश्यक होते.
>>> फडणविसानी एजंटाचे काम न करता गप्प बसून लक्ष ठेवायचे होते. नसते धंदे करायला सांगितले कोणी? महाराष्ट्रातली सगळी कोर्ट आणि पोलीस मेले का?
नुसते गप्प बसून लक्ष ठेवायचे? दंगेधोपे टाळून वाद मिटविणे हे त्यांचे कर्तव्य होते व तेच त्यांनी केले.
- Log in or register to post comments
प
पैसा
Mon, 10/24/2016 - 20:10
नवीन
तेच तेच लिहायचा कंटाळा आला. आता पुढे टंकाळ्याचा अधिकार वापरत आहे. तुमचे म्हणणे कुठूनही मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचायची काही शक्यता असेल तर महाराष्ट्रातल्या १०० पैकी ९५ लोकांना या प्रकाराचा भयंकर राग आला आहे हेही त्यांच्यापर्यंत पोचवा ही हात जोडून विनंती. आपण सगळ्यानीच बापड्या करण जोहरला यथाशक्ती १०/११ रुपयाचे चेक्स पाठवून देऊया. गरिबाला तेवढीच मदत. त्यातले पैसे त्याने अजून कोणाला दानधर्म केले तरी आमचे काही म्हणणे नाही. पण सैनिकांची चेष्टा कृपा करून थांबवा आता.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Mon, 10/24/2016 - 20:19
नवीन
१०० पैकी ९५? सोशल मिडियावर जसा अनेकांनी विरोध केला आहे, तसेच अनेकांना हा तोडगा पटलेला आहे.
- Log in or register to post comments
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- ›
- »