Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

हात दाखवून अवलक्षण

न
नाखु
Mon, 10/24/2016 - 06:56
🗣 306 प्रतिसाद
करण जोहरच्या आगामी सिनेमाच्या निमित्ताने उठलेल्या वादामुळे झालेली परिस्थीती आणि त्याच्या प्रदर्शनाला होणारा मनसेचा तीव्र विरोध याच्यावर तोडगा काढण्यात आला. पण या सगळ्या प्रकाराने खालील प्र्श्न उदभवले आणि त्यावरच मिपाकरांची नक्की काय मते आहेत म्हणून हा काथ्याकुट.
  • सिनेमावर एखाद्या राजकीय पक्षाने बंदी घातल्यावर सरकारची नक्की काय भूमीका असावी.
  • निर्माते न्यायालयात जाण्याऐवजी थेट मुख्यमंत्र्यांकडे का जात असावेत.
  • महाराष्ट्र वगळून हा सिनेमा व्य्वसाय करणार नाही काय? का तशी निर्मात्यांना भिती वाटली असावी?
  • मुख्य्मंत्र्यांनी राज ठाकरेंना चर्चेस बोलावून अवाजवी महत्व दिले काय? असे तुम्हाला वाटते काय?
  • आणि राज ठाकरेंनी ५ कोटीची सैनीक फंडाला मदत करण्याची सूचना करण्याची वाश्यकता काय किंबहुना त्यांना तसा अधिकारच कसा काय आहे?
  • या वादात राज ठाकरे आणि फडणविस यांनी विनाकारण हात दाखून अवलक्षण केले आहे (आणि विरोधकांना आयते कोलीत दिले आहे) असे माझे प्रांजळ मत आहे.
विधायक कामाबाबत चर्चा/विरोध याची सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात वानवा असताना हा विनाकारण शेपटीला आग लावून फिरण्याचा प्रकार आणि बळजुबरीने सैनीकांना यात ओढण्याचा प्रयत्न पाहून मला व्य्क्तीशः राज ठाकरे यांच्याबद्दल कीव +घृणा च वाटली. (एके काळी मनसे स्थापनेवेळी मी खंदा समर्थक होतो त्या पार्श्वभूमीवर जास्तीच राग आला) कुणी काहीही करावे आणि सैनिक कल्याण निधीस पसे दिले तर त्यांचे अपराध/ चुका माफ केल्या जातील हे गृहितकच मोठे लाजिरवाणे आहे. काही माजी सैनीक अधिकार्यांनी याचा धिक्कार आणि निषेधही केला आहे. मिपाकरांना काय वाटते?
वर्गीकरण
घडामोडी

प्रतिक्रिया द्या
65050 वाचन

💬 प्रतिसाद (306)
स
साहना Wed, 10/26/2016 - 01:11 नवीन
महाराष्ट्र पोलीस म्हणजे वस्त्र हरण होणारी द्रौपदी आहे का ? मग देवेंद्र काय डोळ्यावर पट्टी बांधणारे धृतराष्ट्र आहेत ? पोलिसांना वाचवायची जबाबदारी १ आमदार असलेल्या ठाकरे पक्षावर आहे तर मुंबईची आणि महाराष्ट्राची परिस्तिथी कठीण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Tue, 10/25/2016 - 16:20 नवीन
भक्त प्रल्हाद,
कोणापासुन? मनसे पासुन? हाच विचार दहशतवादी हल्ल्याच्या वेळी करावा काय?
पोलिसांचा जीव कोणामुळे धोक्यात आहे ते इथे पाहायला मिळेल : http://marathi.eenaduindia.com/State/Thane/2016/10/14215945/Court-Order-23-accused-police-custody-in-thane-case.vpf संजय राठोड आणि पंढरीनाथ माळी जिवंत आहेत का मेलेत ते तरी कोणी सांगतोय का? राज ठाकऱ्यांच्या नावाने शिमगा कशासाठी? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
ह
हुप्प्या Tue, 10/25/2016 - 16:50 नवीन
सिनेमा हे मनोरंजनाचे साधन आहे. ते निवांतपणे, आनंदी वातावरणात बघण्यातच लोकांना स्वारस्य असणार. राज ठाकरेशी पंगा घेऊन, त्याच्या नाकावर टिच्चून समजा मुख्यमंत्र्यांनी तमाम थेटरांना कडेकोट संरक्षण दिले, तर अशा बंदूकधारी लोकांनी वेढलेल्या थेटरात, अत्यंत तंग वातावरणात सिनेमा बघायला प्रेक्षक मोठ्या प्रमाणात येतील का? उगाच कशाला लफड्यात पडा? असा विचार करुन घरीच बसणारे जास्त असणार. "जेव्हा डीव्हीडी येईल तेव्हा पाहू" किंवा "वातावरण निवळल्यावर पाहू" असेच बहुतांश लोक ठरवणार. सिनेमा ही काही तळहातावर शीर घेऊन पहायची गोष्ट नाही! पंगा घेतला तर धंद्याचे वांधे होणार हे ओळखून करण जोहरने तडजोड करायचे ठरवले असणार. मला वाटते सिनेमासारखे क्षेत्र जे निव्वळ लोकप्रियतेवरच चालते त्यांना हे करावेच लागणार.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Tue, 10/25/2016 - 18:17 नवीन
काय गम्मत आहे बघा, राज ठाकरे 'पाकिस्तान कलाकार विरोधी जनभावना' त्यांच्यासोबत आहे ह्या गृहितकातून आंदोलन करण्याची धमकी देतात, कसले आंदोलन तर एक चित्रपट प्रदर्शित होऊ न देण्याचे, प्रदर्शित झाला तर लोक बघतील आणि निर्मात्याला पैसे मिळतील, हा सैनिकांचा अपमान आहे असं त्यांचं म्हणणं, जर जनभावना ह्यांच्या सोबत आहे तर मग चित्रपटगृहात सिनेमा बघायला नक्की कोण जातंय? फडणवीस नक्की कोणत्या जनभावना सांभाळत आहेत?
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Tue, 10/25/2016 - 18:34 नवीन
इतका पोकळ युक्तिवाद चाललाय, असो. राम राम! रजा घेतो.
  • Log in or register to post comments
स
सुज्ञ Tue, 10/25/2016 - 19:51 नवीन
नक्कीच रजा घ्या . कितीही निरर्थक बोललात आणि स्वतः ची खळखळ बाहेर काढलीत तरी जितके जास्त बोलाल तितके अजूनच अडकत जाल आणि व्यक्तिगत व्हाल. कारण १. मुख्यमंत्र्यांनी योग्य मार्ग निवडून प्रश्न सोडवला आहे , २. सर्वाना संरक्षण देण्याचे कायम मान्य आहे , ३. त्यांनी स्वतः कोणतेही पैसे मागितले नाहीत अथवा ठाकरे जे म्हणतात त्याला त्यांचे कुठलेच समर्थन नाही ४. मुख्यामंत्र्यांचे याला समर्थन आहे असे राज ठाकरेही कोठे म्हणाले नाहीत.५. बोलावलेली चर्चा घटनाबाह्य नियमबाह्य नाही. हे सर्व सडेतोड मुद्दे आहेत. या व अनेक मुद्यांवर उगीचच ठाकरे मोठे झ्हाले काय , त्यांची ताकद मोठी झ्हाली का , घटनादत्त पदापेक्षा कोण मोठे वगैरे बालिश युक्तिवाद करून स्वतःचे हसे करून घेऊ नका . राज ठाकर्यांनी आंदोलन चालू केले म्हणून त्यांचे नाव आले इतकेच. ६१ आमदारांच्या पक्षाने हे केले असते तर त्यांनाही मुख्यमंत्र्यांनी चर्चेस बोलावलेच असते . असो .आपला राज ठाकर्यांना अवाजवी महत्व मिळाल्यामुळे आलेला राग आम्ही समजू शकतो त्यावर "राज ठाकरे एक सत्य" असा एक्सपिरियंसी धागा काढा आणि चर्चेस विराम द्या. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ Tue, 10/25/2016 - 23:23 नवीन
मला पडलेले काही प्रश्न मी वरती विचारले आहेत, त्याची कृपया उत्तरे द्याल का??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुज्ञ
ग
गामा पैलवान Tue, 10/25/2016 - 20:24 नवीन
पैसाताई, १.
मुंबई हल्ल्यात स्वतःचा जीव घालवून कसाबला कोणी पकडला हो?
२००६ साली भिवंडीत घांगुर्डे आणि जगताप या पूर्णपणे निरपराध पोलिसांना जाळून आणि गळे कापून ठार मारण्यात आलं. काय कारवाई झाली त्या धर्मांधांवर? तरीपण २००८ साली तुकाराम ओंबळे जिवावर उदार झाले हे त्यांचं वैयक्तिक शौर्य आहे. शासनाकडून कसलाही पाठींबा नाही. परत लिहितो, २६/११ ची चौकशी दडपण्यात आलेली आहे. हे माझं मत नसून हुतात्मा अशोक कामते यांची वीरपत्नी विनिता कामते यांचं मत आहे. भेकडकसाबला जिवंत पकडलं म्हणजे पोलीस सुरक्षित आहेत असा अर्थ निघंत नाही. २.
सैन्याचे कमांडो मुंबईत येईपर्यंत किल्ला कोणी लढवला होता? एवढे मोठे उदाहरण असताना पोलीस अगदी हतबल आहेत असा प्रचार का सुरू आहे?
पोलीस हतबल आहेतंच. महिला पोलिसांची अब्रू दिवसाढवळ्या राजरोस लुटली जातेय आणि त्याबद्दल साधी बातमीही येऊ नये? प्रत्यक्ष आयुक्त अरूप पटनायक दंगेखोरांना मोकळं सोडतोय. पोलिसांना जाळून ठार मारण्यात येतंय आणि तुम्ही विचारताय की ते हतबल कसे? वस्तुस्थितीपासून इतकी फारकत घ्यायची? हस्तिदंती मनोरा सोडा आता. ३.
बरं समजा एकदा उपकार केले तर आता त्याची किंमत वसुली करत आहेत ते असं म्हणताय का तुम्ही?
हे असंबद्ध विधान आहे. कोण कसली किंमत पोलिसांकडून वसूल करतोय म्हणताहात तुम्ही? चालू प्रकरणाचा पोलिसांशी काडीमात्र संबंध नाही. जर राज ठाकऱ्यांना अटक व/वा अटकाव करायचा ठरवला असता तर आणि तरंच पोलिसांचा हस्तक्षेप झाला असता. नेमका तोच होऊ नये म्हणून फडणवीस आटापिटा करताहेत. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क Tue, 10/25/2016 - 20:40 नवीन
इथे पोलीस काय व किती करू शकतात हा प्रश्नच नाहीये/ नसावा. पोलीस दंगे हाताळायला १००% सक्षम आहेत तरी पण दंगे झाले की सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान आलंच. दंगेखोरांबरोबरच निरपराध नागरिक तसेच पोलीस सुद्धा जखमी होऊ शकतात. हे यापूर्वी झालेल्या कित्येक आंदोलनात सिद्ध झालेलं आहे. ते टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी चर्चेचा मार्ग स्वीकारला असावा. सध्याची एकूण पार्श्वभूमी बघता म्हणजे आरक्षणाच्या मागण्या, विविध मोर्चे, खुसपट काढायला तयार असलेले विरोधक ईई मुळे मुख्यमंत्र्यांनी अजून एका चित्रपट प्रदर्शनाच्या मुद्द्यावरून वाद आणि दंगे नको अशी भूमिका घेतली असावी. मुख्यमंत्रांनी ५ कोटी द्यावेत असा प्रस्ताव ठेवलेला नाही. राजने केलेली ही मागणी आहे आणि जी KJ ने मान्य केली. आता यात मुख्यमंत्र्यांनी दोन्ही पार्टीज मान्य असताना स्वतः नाही म्हणणे म्हणजे सुटत आलेला तिढा परत वाढवणे झाले असते. जर का आतबट्याचा व्यवहार करायचाच असता तर हा ५ कोटींचा मुद्दा जाहीर केलाच नसता. परस्पर व्यवहार झाले असते व तुम्हाआम्हाला पत्ता सुद्धा लागला नसता. त्यातूनही आतबट्ट्याचा व्यवहार झालाच नसेल असं पण नाही, पण ते सिद्ध होण्यासाठी पुरावे नाहीत. त्यातून याला खंडणीचे स्वरूप देणे ही चाल ज्याने कोणी खेळली ती यशस्वी झाली म्हणायची. सध्या परिस्थिती अशी आहे की काहीही केलं तरी ते कसं चूक आहे हे सांगायला कोणीतरी पुढे येतंच. त्यातून परिस्थिती, वाक्य, शब्द तोडूनमोडून वा सरमिसळ करून दाखवण्यात बरेच लोक्स वाकबगार झालेत.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Tue, 10/25/2016 - 21:29 नवीन
जाताजाता: बापूसाहेब, जाऊद्या, काही लोकांचे सुसंस्कृतपणाचे नियम आयडी बघून ठरतात, 'लोक भुंकतात' असे म्हटले की भुकम्प होतो पण 'कोल्हेकुई, गरळ ओकणे' हे शालीनतेचे लक्षण, मोदी, वाजपेयींबद्दल वाईट लिहिणे ब्रह्महत्या पण केजरीवालला थेट शिवीच म्हणणे सुसंस्कृत. इथे आत्ताच एक टेराबाईटी लिहून इतरांच्या सुसंस्कृतपणाचे माप काढण्याचा प्रयत्न करणारे विद्वान, त्यांचा माझा काहीही संबंध नसताना 'मी माझ्या आईबद्दल लैंगिक भावना ठेऊन आहे' असा स्पष्ट आरोप करून मोकळे झाले होते, अजूनही तो प्रतिसाद तिथेच असेल, मी काही स्क्रीनशॉट घेत नाही कि एक्सेल मेंटेन करत नाही, तक्रार करूनही कोणतीही कारवाई झाली नव्हती, ------------ असो.
  • Log in or register to post comments
म
मोदक Tue, 10/25/2016 - 21:47 नवीन
हे स्वसंवादातले किंवा व्यनीतले चुकून इथे आले काय..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
सुज्ञ Tue, 10/25/2016 - 22:09 नवीन
अवघड आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
अ
अभिदेश Tue, 10/25/2016 - 23:23 नवीन
फारच विनोदी प्रतिसाद..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
अ
अप्पा जोगळेकर Wed, 10/26/2016 - 08:17 नवीन
दुसर्‍याने तुमच्या कपड्यावर चिखल फेकला तर 'हा बघा कपड्यावर चिखल आहे' असे लोकांना दाखवत फिरायचे असते का ? एका फडतूस चर्चा. त्याकरता एवढ संतापून स्वतःचा आब घालवण्याची काय गरज आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Wed, 10/26/2016 - 08:34 नवीन
चिखल फेकणारा 'मी कित्ती सुंसंस्कृत' असा बोभाटा करत गावभर हिंडत असेल तर त्याला त्याची खरी ओळख करून द्यावी लागतेच! बाकी, तुम्हाला काय अर्थ काढायचे ते तुम्ही काढा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
अ
अर्धवटराव Wed, 10/26/2016 - 00:02 नवीन
या धाग्यावर इतकं दळण कांडण चाललय अजून ?? तिकडे बिचारा सायरस मिपाकरांच्या अमुल्य मदतीकडे आशेने बघतोय... कसं होणार मिपाचं... १) कुठल्याही प्रकारचं आंदोलन व्हावं हे करण मंडळींच्या हिताचं नव्हतं. चित्रपटाच्या पहिल्या आठवड्याचं कलेक्शन महत्वाचं... दुसरा हप्ता हा जुगाराचा. पिच्चर चालला तर ठीक, नाहि तर परत बाँबे वेल्व्हेट व्हायचा. आपल्या लोकशाही/नागरी अधीकारांकरता वगैरे असला जुगार खेळणार्‍यातला करण नक्कीच नाहि. हा प्रसंगही अशा लढ्याला उचीत नाहि. तस्मात, अशी डील होऊन प्रकरण मिटवावं हि चित्रपट निर्मात्यांची अपेक्षा. २) आंदोलन नक्की फसणार हा राज मंडळींचा होरा. काहि लोकांची सहानुभूती, काहि कार्यकर्त्यांना सरकारी पाहुणचार, यापलिकडे काहि हाती लागणार नाहि हे ठाकरे साहेबांना नक्की ठाऊक होतं. तेंव्हा काहि मध्यस्थी व्हावी आणि प्रकरण बाईज्जत मिटावं हि त्यांची अपेक्षा. ३) अशी सेटलमेण्ट करणं, त्याला प्रोत्साहन देणं, शक्य असल्यास त्यातुन काहि (राजकीय/आर्थीक) फायदा मिळवणं हा सर्वमान्य सरकारी शिरस्ता. फडणवीसांच्या हातात गृहखाते असल्यामुळे, आणि "प्रत्यक्ष्य" राजसाहेब जातीने मीटींगला येणार म्हटल्यावर देवेंद्र स्वत: बैठक जमवतात. ४) इतक्या सोप्या भांडवलावर एकमेकांची पार ऐसीतैसी करून मिपाकर आपली दिवाळी साजरी करतात. मजा आहे.
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Wed, 10/26/2016 - 04:20 नवीन
ते इथल्या यच्चयावत स्वघोषित राजकीय पंडितांना समजलं नाही. माझं मत फडणवीसांनी चूक केली असं जरी असलं तरी तुमचं हे विश्लेषण पटण्यासारखं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
ह
हतोळकरांचा प्रसाद Wed, 10/26/2016 - 04:38 नवीन
सहमत! हि फक्त फडणवीस आणि राज यांची राजकीय अपरिहार्यता होती आणि करणची व्यावहारिक. आणि त्यातून वाईट काहीही घडले नाही असे मला वाटते. पण काही लोक असा आव आणत आहेत की सगळे कायदे पायाखाली तुडवून काहीतरी जगावेगळं करण्यात आलं. मला वाटतं भारतीय राजकारणाचा आणि राजकारण्यांचा पूर्वोतिहास पहिला तर हे अजिबात अयोग्य नाही. पण असो, सध्या मोदींविरोध (आणि राजविरोधही) इतका उत्स्फूर्त असतो की काहीही केलं तरी ठोक पडणारच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
स
सुबोध खरे Wed, 10/26/2016 - 06:15 नवीन
+ १००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
स
साहेब.. Wed, 10/26/2016 - 06:37 नवीन
+१००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
क
कैलासवासी सोन्याबापु Wed, 10/26/2016 - 08:08 नवीन
पहिले म्हणजे पूर्वोतिहासात जे झाले ते आत्ता विरोध करणाऱ्यांना मंजूर होते हा निष्कर्ष कसा काढलात?? सगळे जरी नाही तरी बरेच कायदे आधीही पायदळी तुडवले गेले होते (आणीबाणीत तर सगळेच समजा) जे चूकच होते, अन आजही माफक प्रमाणात कायदेबाह्य झाले आहे काम, मध्यस्थ कोणी असावे कोणी नाही त्याच्या कंडिशन , गरज, परिस्थिती ह्यांचा पूर्ण धांडोळा घेणार मध्यस्तीचा कायदा उर्फ "लॉ ऑफ आर्बिट्रेशन" भारतात अस्तित्वात असून इच्छूकांनी त्याचा लाभ घ्यावा ही विनंती. त्या उपरही जर ठाकरे अन फडणवीस बिचारे वगैरे वाटत असले तर सोडून द्या. फडणवीस जिथे उत्तम काम करतायत तिथे कौतुक करायलाच हवे, मराठा मोर्चाला त्यांनी जितके संयतपणे हँडल केले ते स्तुत्यच होते, फक्त इथे खेळी चुकली, अन त्या चुकलेल्या खेळीवर टीका करायचा हक्क एक नागरिक म्हणून प्रत्येकाला असावा, टीका करणारा फुल टाईम राजकीय विरोधक आहे असे समजणे म्हणजे शिक्के मारणे होय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ह
हतोळकरांचा प्रसाद Wed, 10/26/2016 - 12:19 नवीन
सोन्याबापू मी कसलाही निष्कर्ष काढला नाही आणि कोणाहीबद्दल वैयक्तिक तर नाहीच! वरील प्रतिसादांवरून जे निरीक्षण आहे ते सांगितले. बाकी आर्बिट्रेशन कायद्याचा म्हणाल तर तो व्यावसायिक तंट्यांसाठी (कमर्शिअल डिस्प्युट्स) असावा. भावनिक तंटे (सेंटीमेंटल डिस्प्युट्स) कव्हर करतो कि नाही माहित नाही. पण मुळात इथे कायद्याने मध्यस्थी करण्याचा प्रश्नच कुठं आहे? इथे राज्याचा मुख्यमंत्री दोन गटांना बोलावून दोघांची बाजू बाजू समजावून घेऊन घातलेले आंदोलन स्थगित करवतो यात चुकीचं किंवा बेकायदेशीर ते काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कैलासवासी सोन्याबापु Wed, 10/26/2016 - 12:40 नवीन
१. करण जौहरचं जे काही नुकसान होणार होतं, ते आर्थिक होतं का भावनिक? बरं तो स्वतः सीएम कडे गेला होता का?? २. कायद्याने मध्यस्थीथी होऊ शकली असती का? तर होय, पहिले तर मुख्यमंत्र्यांना ह्या शुल्लक भांडणात पडायची गरज नव्हती, दुसरे म्हणजे स्वतःहून बोलवायचीही गरज नव्हती, जर कैक प्रतिसाद म्हणतायत तसे की भविष्यातली हानी टाळायला जर मध्यस्थी करायचीच होती तर सरळ कोर्टाला विनंती करून परस्पर दोन्ही पार्टी रुपी बॉल कोर्टाच्या कोर्टात टाकून नामानिराळे राहून आपलीच छवी वाचवता आली असती. ए दिल है मुश्किल ह्या चित्रपटनिमित्ताने महाराष्ट्रात झालेला वाद हा नवा नाहीये, तर असले वाद ह्या अगोदर तामिळनाडू मध्ये "कट्टी" ह्या चित्रपटाच्या रिलीजच्या वेळी झाला होता, त्याच्याबद्दल जालावर वाचले जाऊ शकते, इच्छा असल्यास जरूर लाभ घ्यावा ही विनंती. जर आपण कायदाबाह्य नाही असे म्हणता आहात तर प्रथम आपण ते तसे का म्हणता आहात ह्याला समर्थनार्थ काही तर्क द्या, हि अजून एक पूरक विनंती करतो. शांतपणे चर्चे बद्दल आभार :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
अ
अप्पा जोगळेकर Wed, 10/26/2016 - 14:24 नवीन
ते लॉ ऑफ अर्बायट्रेशन वगैरे अधिकॄत मध्यस्ठी साठी लागू होते. म्हणजे कमिशन मिळणार असेल तर. इथे कमिशन वगैरे मिळाले नाही. निदान तसे सिद्ध करता येत नाही. नोटरी पेपरवर मध्यस्थ म्हणून सीएमचे नावसुद्धा नाही. ज्या दोन पार्टीत मध्यस्थी झाली त्यांचे नाव सुद्धा नोटरी पेपरवर नाही. शिवाय ते कोर्टात जाऊन स्वतःची छबी वाचवणे वगैरे भानगडीत जनतेचे नुकसान व्हायचे ते झालेच असते. स्वतःच्या छबीची पर्वा न करता जनतेच्या,पक्षाच्या, स्वतःच्या हिताचा निर्णय घेतला म्हणून त्यांना मार्कच द्यायला पाहिजेत. हे वर्तन कायदाबाह्य आहे असे म्हणता तर त्याच्या समर्थनार्थ काही तर्क मिळाले तर आमच्या माहितीत भर पडेल. म्हणजे ते कोणत्या सेक्षन अन्वये कायदाबाह्य आहे वगैरे. आणि जर हे भांडण इतके क्षुल्लक होते तर मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी केली या कॄतीला मुख्यमंत्र्यांनी एखादा गुन्हा किंवा घटनाबाह्य वर्तन केले अशा पद्धतीने का झोडपले जात आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
अ
अप्पा जोगळेकर Wed, 10/26/2016 - 14:30 नवीन
मला खालील व्याख्या सापडली. Any commercial matter including an action in tort if it arises out of or relates to a contract can be referred to arbitration. इथे सरळ सरळ कॉन्ट्रॅक्ट म्हणजे सौदा असा शब्द आहे. त्यामुळे हा कायदा प्रस्तुत केसमधे गैरलागू असावा असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
श
श्री गावसेना प्रमुख Wed, 10/26/2016 - 07:43 नवीन
आपले फुरोगामित्व सिद्ध करण्यासाठी कुठल्याही थराला जाउ शकणार्‍या लोकांना बीजेपी ने केलेली विधायक कामे का दिसत नसावी बरे,तसेही बर्‍याच प्रमाणात इंग्रजी मिडीया,त्यांची मराठी भावंडे,नावातच हिंदु असलेले एक वर्तमानपत्र रांगेत पुढे आहेतच आणी त्यांना ओवरटेक करणे म्हणजे खुपच अवघड आहे बुवा.
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Wed, 10/26/2016 - 09:58 नवीन
ह्यात पुरोगामित्वाचा काय अन कधी संबंध आला?? मुख्यमंत्र्यांनी चुकीचा पायंडा पाडायला नको होता, इतका साधा मुद्दा आहे, त्याला सहमती अगदी भाजप समर्थक मित्रांनी सुद्धा दर्शवली आहे, मग आता एका मुद्द्याला विरोध केला म्हणून ते पण फुरोगामी झाले का काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख
श
श्री गावसेना प्रमुख Wed, 10/26/2016 - 11:01 नवीन
शरद पवारांनी शशांक मनोहर ह्यांच्या सोबत ऑस्ट्रेलियन खेळाडुंसाठी बाळासाहेबांची भेट घेतली होति तेव्हा पवारांनी नव्हता का चुकीचा पायंडा पाडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
प
पुंबा Wed, 10/26/2016 - 14:48 नवीन
तसेही बर्‍याच प्रमाणात इंग्रजी मिडीया,त्यांची मराठी भावंडे,नावातच हिंदु असलेले एक वर्तमानपत्र रांगेत पुढे आहेतच आणी त्यांना ओवरटेक करणे म्हणजे खुपच अवघड आहे बुवा.
हो.. हे अत्यंत अवघड आहे. विशेशतः द हिंदूने आपला दर्जा खूप कसोशीने टिकवला आहे. त्यांचे रिपोर्टर्सचे जाळे, कॉन्टॅक्ट्स, अतिशय विद्वान सदरलेखक(काही बायस्ड डावी मंडळी वगळता) हे जबरदस्त समीकरण आहे, त्यामुळे त्यांची एडीटोरियल मते कितीही एकांगी वाटली तरी हिंदूची बातमी म्हटलं की विश्वासार्ह वाटते, ती विश्वासार्हता दुसर्‍या कुठल्या वृत्तपत्राला मिळाली नाही असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख
न
नाखु Wed, 10/26/2016 - 08:30 नवीन
(अता मीच काकु टाकल्याने धाग्यावर येणे अनिवार्य आहे) हा तुमचा मूळ प्रतिसाद (९०% पर्यंत वस्तुस्थीतीला धरून आणि तर्कसंगत आहेच)
१) कुठल्याही प्रकारचं आंदोलन व्हावं हे करण मंडळींच्या हिताचं नव्हतं. चित्रपटाच्या पहिल्या आठवड्याचं कलेक्शन महत्वाचं... दुसरा हप्ता हा जुगाराचा. पिच्चर चालला तर ठीक, नाहि तर परत बाँबे वेल्व्हेट व्हायचा. आपल्या लोकशाही/नागरी अधीकारांकरता वगैरे असला जुगार खेळणार्‍यातला करण नक्कीच नाहि. हा प्रसंगही अशा लढ्याला उचीत नाहि. तस्मात, अशी डील होऊन प्रकरण मिटवावं हि चित्रपट निर्मात्यांची अपेक्षा. २) आंदोलन नक्की फसणार हा राज मंडळींचा होरा. काहि लोकांची सहानुभूती, काहि कार्यकर्त्यांना सरकारी पाहुणचार, यापलिकडे काहि हाती लागणार नाहि हे ठाकरे साहेबांना नक्की ठाऊक होतं. तेंव्हा काहि मध्यस्थी व्हावी आणि प्रकरण बाईज्जत मिटावं हि त्यांची अपेक्षा. ३) अशी सेटलमेण्ट करणं, त्याला प्रोत्साहन देणं, शक्य असल्यास त्यातुन काहि (राजकीय/आर्थीक) फायदा मिळवणं हा सर्वमान्य सरकारी शिरस्ता. फडणवीसांच्या हातात गृहखाते असल्यामुळे, आणि "प्रत्यक्ष्य" राजसाहेब जातीने मीटींगला येणार म्हटल्यावर देवेंद्र स्वत: बैठक जमवतात.
माझे चार पैसे (ही वयक्तीक माझी मते आहेत ती सगळ्यांना मान्य्/दुजोरा देण्या लायक घ्यावीत असे नाही) फडणवीसांना या निर्णयाचे संभाव्य (अपप्रचार आणि माध्यम मोडतोड अनुभव लक्ष्यात घेता ) काय होणार हे राजकीय परिपक्वतेने माहीत होते तर संयुक्त पत्रकार परिषद घेऊन राजच्या तोंडून आंदोलन मागे घेण्याची,करणच्या तोंडून स्वयंस्फुर्तीने सैनीक मदतनिधीची आणि निर्माता संघाकडून नैतीकतेच्या मुद्द्यावर पुन्हा पाक कलाकार न घेण्याची घोषणा करणे क्रमप्राप्त होते. शेवटी हा निर्णय वजा मध्यस्ती तोडगा मी शांततेसाठी आणि लोकभावनेचा आदर म्हणून व दोन्ही बाजूंच्या मागणीवरून केला आहे असे जाहीर करणे (धोनी फिनिशींग टच ९७ धावा गंभीरच्या,कोहली ४८,पण लक्ष्यात धोनीचा फटका, ही उपमा खास श्री गुरुजींसाठी) नेमके हेच टाळावे म्हणून मोदींनी संवेदन्शील विषयाबाबत सर्व राजकीय पक्ष्याच्या मातब्बर नेत्यांना बोलावून देशाच्या सुरक्षेबाबत कल्पना दिली आणि पुढचा (गणंगाचा अपवाद वगळता) अपप्रचार खुबीने टाळला. खरे तर या तोडगा चर्चेत आवर्जून अगदी शिवसेना नेत्याला व राष्ट्रवादी,आणि इं कॉ नेत्यालाही बोलावले असते तरी चालले असते.मुख्यमंत्री फक्त राज ठाकरेंनाच महत्व देतात असे चित्र झालेच नसते.(ते किती महत्वाचे आहेत हा वेगळा चर्चा विषय आहे)

सगळ्यांसमोर पत्रकार परिषद झाली असती तर मुख्यमंत्र्याने असे खुलासे देत बसावे लागले नसते (अशी चतुराई करण्याची सुवर्णसंधी फडणवीसांनी घालवली असे माझे प्रामाणीक मत आहे) एकीकडे मराठी मोर्च्याचे आयोजक चर्चेस येण्यास तयार नाहीत पण त्यांच्या वतीने निलेश राणे ईशारा मात्र देत आहेत तेंव्हा फडणवीसांनी चर्चेस आलात तर काहीतरी सकारात्मक नक्कीच घडते असा निर्भेळ संदेश दिला गेला असता. (फडणवीस काही चुकीचे वागले असतील तरीही त्यांची पाठराखण करण्याइतका झापडबंद विचार मी नक्कीच करू शकत नाही, जे सत्ता स्थापनेच्या वेळी अपरिपक्व वर्तन सेनेने केले तेच अता फडणविसांनी केले इतकेच मी म्हणेन आणि हे माझे ठाम मत आहे०)

  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 10/26/2016 - 08:45 नवीन
प्रतिसादाखाली तुमची सही नसल्याने हा प्रतिसाद बाद धरणेत येत आहे. - प्रचेतस (कार्यकारी अध्यक्ष, नाखु फ्यान क्लब)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
न
नाखु Wed, 10/26/2016 - 09:05 नवीन
नंतर सही जोडण्याची काही व्यवस्था/तरतूद आहे काय? खुलाश्यातील खलाशी नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
अ
अभ्या.. Wed, 10/26/2016 - 09:08 नवीन
तर्तूद आहे की, किती देणार निधीसाठी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
न
नाखु Wed, 10/26/2016 - 09:11 नवीन
सांगणार नसाल तर नक्कीच देऊ. अपेक्षीत व्यनीत पाठवणे (उगा पत्रकार परिषद बोलवू नै) सुमडीतला नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
म
मोदक Wed, 10/26/2016 - 12:13 नवीन
छ्या, मला वाटले "निधी देतो पण पत्ता द्या" असे काही म्हणाल!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
न
नाखु Wed, 10/26/2016 - 12:46 नवीन
म्हणून ही चाचपणी केली. पक्षातल्याच कार्यकर्त्याकडून निधी का मागीतला गेला याच धक्क्यातून अजून न सावरतो तोच हा पत्ता मागणे म्हणजे फार थोर वगैरे. किलवर सत्ती नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
अ
अर्धवटराव Wed, 10/26/2016 - 17:36 नवीन
तुम्ही म्हणताय तो एंगल आहेच या घटनेला. संभाव्य राजकीय परिणामांची गोळाबेरीज करण्यात मुख्यमंत्री चुकले काय हा निराळा मुद्दा आहे. माझं म्हणणं इतकच, कि हे सेटलमेण्ट एक सामान्य, सर्वमान्य आणि सरळधोप घटना आहे. यात कायद्याची दलाली, घटनाबाह्यता, बेकायदेशीर घटना, चुकीचे पायंडे वगैरे सारखं अजीबात काहि झालं नाहि. मिपाकरांचं एक आगळं (थोडं विचीत्र) रूप प्रकटलं या धाग्यावर. त्याचं थोडं आश्चर्य वाटलं मात्र :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
श
श्रीगुरुजी Wed, 10/26/2016 - 11:18 नवीन
हा लेख सुद्धा चांगला आहे. http://www.pudhari.com/news/rajniti/94840.html
  • Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ Wed, 10/26/2016 - 11:27 नवीन
या बातमीमध्ये चांगले विश्लेषण दिलंय! "स्पष्ट होते ते हेच की, केंद्रातून चित्रपटाला बंदी नाही म्हणायचे, पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा चालू ठेवायचा, केंद्रीय मंत्र्यांकडून मनसे हा गुंडांचा पक्ष आहे असे बोलवून घ्यायचे आणि इकडे राज्यात कायदा, न्यायालय, संविधान न मानणाऱ्या राज यांच्याशी खलबते करायची अशी दुटप्पी भूमिका भाजपने घेतली. तसे पहिले तर पूर्वी झाल्याप्रमाणे भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांच्याकरवी शेलक्या शब्दात राज यांच्यावर शब्दांचे अस्त्र सोडता आले असते. परंतु भाजपने शेलार यांना शांत बसविले. ‘मनसे’ आणि राज यांना सूट दिली. १२ मनसेच्या कार्यकर्त्यांची दिखाऊ धरपकड केली. चित्रपट संघटनेने राज यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याने राज किती देशभक्त आणि मुंबईत किती प्रभावी आहेत हे ‘मनसे’पेक्षा भाजपला जास्त दाखवायचे होते. शिवसेनेला या प्रकरणामध्ये बघ्याची भूमिका घ्यायला लावून भाजपने एका दगडात दोन-तीन पक्षी मारले." आता चुकीच्या गोष्टींना कोणी विरोध केला कि लगेच ते सगळे लोक "फुरोगामी" वगैरे होणार असतील तर असो मग! केवढी ती पक्षनिष्ठा! (अवांतर: सत्ताबदल होण्यासाठी मी हि बराच लांबचा प्रवास करून भाजपा ला मतदान केलं होत बर का! पण इतका 'कट्टर' नाहीये मी, कुठल्या पक्षासाठी ते पण!) मग नेहमीची कारण सुरु होतात "आधी असे तसे झाले होते त्या वेळी तुम्ही कुठं होतात? आत्तापर्यंत सगळे सज्जन होते का?" जमलंच तर वरती काही प्रश्न विचारले आहेत त्यांची उत्तरे द्यावीत... बऱ्याच प्रश्नांची उत्तरे वरच्या परिच्छेदातच आहेत पण अर्थातच ती चुकीची असणार! :)
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Wed, 10/26/2016 - 11:33 नवीन
सहमत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
स
सुज्ञ Wed, 10/26/2016 - 12:14 नवीन
आपण विचारलेले प्रश्न आपल्याला खूप भारी आणि सडेतोड वाटत असतील पण ते तसे नाहीत हे खेदाने नमूद करावेसे वाटते . उत्तर दिले न्हवते कारण प्रश्नातच मुळात दम न्हवता तरी आपल्या समाधानासाठी थोडक्यात उत्तरे. तुम्ही सांगा पाहू... 1. कारण जोहर ने कुठला कायदा मोडला होता? <<कोणताही कायदा मोडला नाही तरी त्याला दमदाटी झ्हाली व त्याच्या व त्याच्या चित्रपटावरील होणार हल्ला थांबवता येईल म्हणून बैठक बोलावो. 2. पाकिस्तानी कलाकार चित्रपटात घेऊ नयेत हा कायदा अस्तित्वात होता का? << नाही 3. पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्याची परवानगी कोणी दिली बरे? . << ते येऊन काम करू शकतात . ते नियमबाह्य नाही. 4. सेन्सर बोर्ड नि चित्रपट प्रदर्शित करायला परवानगी दिल्यावर त्याला अडवणारे समांतर सेन्सर बोर्ड कुठले? << सेन्सर बोर्ड आणि राजकीय पक्ष यात गफलत करू नका . 5. चित्रपटाच्या सुरुवातीला उरी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहून आणि 5 कोटी रुपये दान करून चित्रपट "पवित्र" झाला का?(मला सैनिकांबद्दल आदर नाही हे सोयीस्कर मत काढू नये) << राज ठाकर्यांनी असे धमकीवजा बोलणे चुकीचेच आहे त्याबद्दल मुख्यमंत्र्यांसकट कोणाचेच दुमत नाही. 6. मुख्यमंत्र्यांना असा तोडगा गैर आहे असे वाटले नाही का? त्यांना या पैसे देऊन काढायच्या तोडग्याबद्दल कल्पना देखील नव्हती का?(म्हणजे तुम्ही अगदी लिहिलंय कि 5 कोटी का ठाकरेंचा मुद्दा होता, मुख्यमंत्रांच्या संमती शिवाय मान्य झाला का तो?) << मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंबरोबर चर्चा केली तेंव्हाच हि रक्कम ठरली आणि त्यांनी यास संमाती दिली असे तुम्ही पुरावे असल्यासारखे सांगताय. मी उद्या तुमच्याबरोबर चर्चा कारेन आणि बाहेर येऊन म्हणेन कि शब्दबंबाळ या मूर्ख आहेत तर त्यास तुमची संमती असते का ? तो माझ्हा स्वतःचा विचार 7. कुठल्याही निरपराध नागरिकाला कोण्या राजकीय व्यक्तीमुळे(अथवा गुंड) काही कारण नसताना धमक्या दिल्या गेल्या तर मुख्यमंत्री मध्यस्ती करून त्या नागरिकाला "गुंड लोक जे करायला सांगत आहे ते ऐक" असा सल्ला देणार का?(शेवटी हिंसा नको ना व्हायला) भलेही नागरिकांची काहीही चूक नसो! << मुख्यमंत्र्यांनी कारण जोहर ला ५ कोटी दे असे सांगितले नाही किंवा राज ठाकरेंचे समर्थन केले नाही अथवा राज ठाकरे देखीळ असे काही म्हणत नाहीत.. असल्या धमक्या वगैरे राज ठाकरे स्वतःच्या पक्ष संस्कृतीस अनुसरून देतच असतात . त्यात नवीन काही नाही. 8. इथून पुढे कुठल्याही गुंडाने दंगल करायची धमकी दिली तर त्याला तंबी द्यावी कि चर्चेला घरी बोलावून त्याच्या मागण्या मान्य कराव्यात? << रस्त्यावरील गुंड आणि एक राजकीय पक्ष यात गफलत करू नका. बादवे संरक्षण काढून घेतो असे कोणीही म्हटले नाही अथवा या चर्चेनंतरही केजो व त्याच्या चित्रापास संरक्षण कायम आहे . मी त्या जोहर चा एकही चित्रपट सिनेमागृहात पहिला नाही आणि पाहण्याची शक्यता देखील नाही. पण हे सगळे जे झालंय ते चुकीचेच होते... << तुम्ही कितीही चूक चूक करून ओरडला तरी योग्य मार्ग आधीच निवडला गेला आहे. अवांतर : कृपया आता अजून प्रश्न विचारून हसे करून घेऊ नका. हसायचा देखील कंटाळा आला
  • Log in or register to post comments
स
सुज्ञ Wed, 10/26/2016 - 12:22 नवीन
माननीय श्री शब्दबंबाळ. आपण विचारलेले प्रश्न आपल्याला खूप भारी आणि सडेतोड वाटत असतील पण ते तसे नाहीत हे खेदाने नमूद करावेसे वाटते . उत्तर दिले न्हवते कारण प्रश्नातच मुळात दम न्हवता तरी आपल्या समाधानासाठी थोडक्यात उत्तरे. तुम्ही सांगा पाहू... 1. कारण जोहर ने कुठला कायदा मोडला होता? -- कोणताही कायदा मोडला नाही तरी त्याला दमदाटी झ्हाली व त्याच्या व त्याच्या चित्रपटावरील होणार हल्ला थांबवता येईल म्हणून बैठक बोलावलि 2. पाकिस्तानी कलाकार चित्रपटात घेऊ नयेत हा कायदा अस्तित्वात होता का? -- नाही 3. पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्याची परवानगी कोणी दिली बरे? . -- ते येऊन काम करू शकतात . ते नियमबाह्य नाही. 4. सेन्सर बोर्ड नि चित्रपट प्रदर्शित करायला परवानगी दिल्यावर त्याला अडवणारे समांतर सेन्सर बोर्ड कुठले? -- सेन्सर बोर्ड आणि राजकीय पक्ष यात गफलत करू नका . 5. चित्रपटाच्या सुरुवातीला उरी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहून आणि 5 कोटी रुपये दान करून चित्रपट "पवित्र" झाला का?(मला सैनिकांबद्दल आदर नाही हे सोयीस्कर मत काढू नये) ---राज ठाकर्यांनी असे धमकीवजा बोलणे चुकीचेच आहे त्याबद्दल मुख्यमंत्र्यांसकट कोणाचेच दुमत नाही. 6. मुख्यमंत्र्यांना असा तोडगा गैर आहे असे वाटले नाही का? त्यांना या पैसे देऊन काढायच्या तोडग्याबद्दल कल्पना देखील नव्हती का?(म्हणजे तुम्ही अगदी लिहिलंय कि 5 कोटी का ठाकरेंचा मुद्दा होता, मुख्यमंत्रांच्या संमती शिवाय मान्य झाला का तो?) --- मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंबरोबर चर्चा केली तेंव्हाच हि रक्कम ठरली आणि त्यांनी यास संमाती दिली असे तुम्ही पुरावे असल्यासारखे सांगताय. मी उद्या तुमच्याबरोबर चर्चा कारेन आणि बाहेर येऊन म्हणेन कि शब्दबंबाळ या मूर्ख आहेत तर त्यास तुमची संमती असते का ? तो माझ्हा स्वतःचा विचार 7. कुठल्याही निरपराध नागरिकाला कोण्या राजकीय व्यक्तीमुळे(अथवा गुंड) काही कारण नसताना धमक्या दिल्या गेल्या तर मुख्यमंत्री मध्यस्ती करून त्या नागरिकाला "गुंड लोक जे करायला सांगत आहे ते ऐक" असा सल्ला देणार का?(शेवटी हिंसा नको ना व्हायला) भलेही नागरिकांची काहीही चूक नसो! -- मुख्यमंत्र्यांनी कारण जोहर ला ५ कोटी दे असे सांगितले नाही किंवा राज ठाकरेंचे समर्थन केले नाही अथवा राज ठाकरे देखीळ असे काही म्हणत नाहीत.. असल्या धमक्या वगैरे राज ठाकरे स्वतःच्या पक्ष संस्कृतीस अनुसरून देतच असतात . त्यात नवीन काही नाही. 8. इथून पुढे कुठल्याही गुंडाने दंगल करायची धमकी दिली तर त्याला तंबी द्यावी कि चर्चेला घरी बोलावून त्याच्या मागण्या मान्य कराव्यात? --- रस्त्यावरील गुंड आणि एक राजकीय पक्ष यात गफलत करू नका. बादवे संरक्षण काढून घेतो असे कोणीही म्हटले नाही अथवा या चर्चेनंतरही केजो व त्याच्या चित्रापास संरक्षण कायम आहे . मी त्या जोहर चा एकही चित्रपट सिनेमागृहात पहिला नाही आणि पाहण्याची शक्यता देखील नाही. पण हे सगळे जे झालंय ते चुकीचेच होते... -- तुम्ही कितीही चूक चूक करून ओरडला तरी योग्य मार्ग आधीच निवडला गेला आहे. अवांतर : कृपया आता अजून प्रश्न विचारून हसे करून घेऊ नका. हसायचं देखील कंटाळा आला
  • Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ Wed, 10/26/2016 - 12:49 नवीन
आपण किती सुज्ञ आहात ते दिसले प्रतिक्रियेवरून!! :D चालूदे आपली पूजा...!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुज्ञ
स
सुज्ञ Wed, 10/26/2016 - 20:24 नवीन
मग नक्की कशी बांधली पूजा ? :D कशी वाटली ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
स
सुबोध खरे Wed, 10/26/2016 - 15:54 नवीन
येथे प्रत्येक माणूस एक गोष्ट विचारताना दिसला कि कारण जोहर ने काय बेकायदेशीर केले? उद्या समजा चार्ल्स हेब्दो सारख्या विचारसरणीच्या भारतीय माणसाने महंमदावर सिनेमा काढला (ज्यात महम्मद पैगंबरांविषयी कोणतेही अनुदार उदगार नाहीत) आणि त्याला सेन्सर बोर्डाचे सर्टिफिकेटही मिळाले. त्यावर मुस्लिम संघटनांनी कडवा विरोध केला आणि आम्ही हा सिनेमा चालवू देणार नाही अशी "धमकी" दिली तर त्यावर श्री देवेंद्र फडणवीस यांनी काय करावे? वाटाघाटी कराव्यात कि नाही? कि केवळ "प्रक्रिया" म्हणून कायद्याचा "रक्षक" होऊन मुंबईत दंगली होऊ द्याव्यात. मिपावरील "सुजाण,निधर्मी, सुधारक किन्वा सनातनी अशा सर्व" माणसांची काय प्रतिक्रिया असेल?
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Wed, 10/26/2016 - 16:20 नवीन
तुम्ही धार्मिक दंगली आणि हा विषय कसा कुठे जोडत आहात हे कळले तर उत्तम! धार्मिक दंगली व्यापक असतात, त्यांच्यावर चर्चेतूनच मार्ग काढतात, तसेच पोलीस व सैन्याची मदत घेतली जाते. तुम्ही वरील बादरायण मुद्दा उपस्थित करून सदर घटनेविरोधात लोक का बोलत आहेत हे समजले नाही असे दाखवत आहात. या आधीही असे विरोध झालेले आहेत, त्यावर काय झाले? वेलेन्टाइन डे , गर्ल्फ़्रेंड व वॉटर हे चित्रपट याबद्दल हिंदू संघटनांनी आंदोलने (काही वेळेस हिंसक) केली आहेत, त्यावेळी ते कसे हाताळले गेलेत ह्याबद्दल तुम्हाला माहिती असेल तर जरूर द्यावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुज्ञ Wed, 10/26/2016 - 20:28 नवीन
सुबोध काका .. मुद्दा बरोबर आहे पण चार्ली हेब्दो वगैरे खूप होतय.. उदाहरण देण्यात अतिरेक झ्हाला .. इथले वाचक मुद्दा सोडून चोथा चघळतात म्हणून म्हटले हो ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुज्ञ Wed, 10/26/2016 - 20:31 नवीन
साडीच्या पदराचा कसा चोथा चघळला . मुद्दा सोडून .. तसेच काहीसे . :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
भ
भक्त प्रल्हाद Wed, 10/26/2016 - 21:49 नवीन
त्यावर मुस्लिम संघटनांनी कडवा विरोध केला आणि आम्ही हा सिनेमा चालवू देणार नाही अशी "धमकी" दिली तर त्यावर श्री देवेंद्र फडणवीस यांनी काय करावे? वाटाघाटी कराव्यात कि नाही?
सुबोध काका अशा वेळीहि त्यांनी काय्द्याचाच मार्ग वापरावा आणि फाजिल धमक्यांना भीक घालु नये असे माझे मत असेल. शासनाने हैदर, रश्दी, तस्लिमा, आणि हुसेन, सगळ्यांच्याच अभिव्यक्तीचा हक्क अबाधित राखावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Wed, 10/26/2016 - 16:34 नवीन
बेकायदेशीर आणि कायदेशीर यात फरक करायचा तर तो धार्मिक किंवा सामाजिक असा करून कसा चालेल? तुम्हाला झेपत नसेल तर उत्तर देऊ नका. फाटे फोडू नका.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा