Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

हात दाखवून अवलक्षण

न
नाखु
Mon, 10/24/2016 - 06:56
🗣 306 प्रतिसाद
करण जोहरच्या आगामी सिनेमाच्या निमित्ताने उठलेल्या वादामुळे झालेली परिस्थीती आणि त्याच्या प्रदर्शनाला होणारा मनसेचा तीव्र विरोध याच्यावर तोडगा काढण्यात आला. पण या सगळ्या प्रकाराने खालील प्र्श्न उदभवले आणि त्यावरच मिपाकरांची नक्की काय मते आहेत म्हणून हा काथ्याकुट.
  • सिनेमावर एखाद्या राजकीय पक्षाने बंदी घातल्यावर सरकारची नक्की काय भूमीका असावी.
  • निर्माते न्यायालयात जाण्याऐवजी थेट मुख्यमंत्र्यांकडे का जात असावेत.
  • महाराष्ट्र वगळून हा सिनेमा व्य्वसाय करणार नाही काय? का तशी निर्मात्यांना भिती वाटली असावी?
  • मुख्य्मंत्र्यांनी राज ठाकरेंना चर्चेस बोलावून अवाजवी महत्व दिले काय? असे तुम्हाला वाटते काय?
  • आणि राज ठाकरेंनी ५ कोटीची सैनीक फंडाला मदत करण्याची सूचना करण्याची वाश्यकता काय किंबहुना त्यांना तसा अधिकारच कसा काय आहे?
  • या वादात राज ठाकरे आणि फडणविस यांनी विनाकारण हात दाखून अवलक्षण केले आहे (आणि विरोधकांना आयते कोलीत दिले आहे) असे माझे प्रांजळ मत आहे.
विधायक कामाबाबत चर्चा/विरोध याची सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात वानवा असताना हा विनाकारण शेपटीला आग लावून फिरण्याचा प्रकार आणि बळजुबरीने सैनीकांना यात ओढण्याचा प्रयत्न पाहून मला व्य्क्तीशः राज ठाकरे यांच्याबद्दल कीव +घृणा च वाटली. (एके काळी मनसे स्थापनेवेळी मी खंदा समर्थक होतो त्या पार्श्वभूमीवर जास्तीच राग आला) कुणी काहीही करावे आणि सैनिक कल्याण निधीस पसे दिले तर त्यांचे अपराध/ चुका माफ केल्या जातील हे गृहितकच मोठे लाजिरवाणे आहे. काही माजी सैनीक अधिकार्यांनी याचा धिक्कार आणि निषेधही केला आहे. मिपाकरांना काय वाटते?
वर्गीकरण
घडामोडी

प्रतिक्रिया द्या
65050 वाचन

💬 प्रतिसाद (306)
प
पैसा Mon, 10/24/2016 - 19:59 नवीन
मग करण जोहर आणि राज ठाकरे असे कोण मोठे समाजाचे धुरीण लागून गेले की स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यासाठी आपला बहुमूल्य वेळ खर्च करावा? एक फडतूस सिनेमा म्हणजे काय लाखो लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे का? करण जोहर रडला म्हणे आपली, आपल्या लोकांची रोजीरोटी बुडाली मग उद्या कोणा रस्त्यावरच्या मजुराला मुकादमाने कामावरून काढून टाकले आणि त्याची रोजीरोटी बुडाली तर त्याला मुख्यमंत्री स्वत मदत करणार का? कायदा आणि सरकारला मजूर आणि करण जोहर दोघे सारखेच ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Mon, 10/24/2016 - 20:10 नवीन
ती बैठक राज किंवा करणसाठी किंवा त्याच्या चित्रपटासाठी नसून दंगेधोपे टाळण्यासाठी होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Mon, 10/24/2016 - 21:12 नवीन
काहीही हं श्री! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 10/25/2016 - 10:20 नवीन
अकोल्याच्या एका दुकानदाराने करण जोहरला ३२० रुपयाचा चेक पाठवून भीक घातली आहे ही आहे लोकभावना. भारीच कल्पक आहे तो दुकानदार ! पण, असे बरेच चेक आले तर पैश्याच्या मागे धावणारे बॉलीवूडी लोक ते निर्लज्जपणे घेतीलही. पैसा सोडून त्यांना इतर काही दिसते असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
स
साहना Tue, 10/25/2016 - 03:04 नवीन
> या वादात एकूण ३ हितसंबंधी (स्टेकहोल्डर्स) होते. करण जोहर (म्हणजेच निर्माते), राज ठाकरे (म्हणजेच मनसे) आणि फडणविस (म्हणजेच राज्य सरकार). तसे चित्रपटगृहांचे मालक, वितरक, प्रेक्षक इ. सुद्धा हितसंबंधी होते, परंतु वरील ३ हे प्रमुख हितसंबंधी होते. इथे राज ठाकरेंना स्टॅकहोल्डर म्हणणेच मुळांत चुकीचे आहे. ठाकरे ह्यांनी स्टेक होल्डर बनण्याचा प्रयत्न केला तेंव्हाच त्यांना हिसका दाखवायला पाहिजे होता. उद्या मुलीची छेड काढणाऱ्याला तिच्या लग्नाच्या वेळी "स्टेक होल्डर' म्हणावे काय ? रेड रायडींग हूड मध्ये लांडग्याची जी भूमिका होती, शोले मध्ये गब्बर ची जी भूमिका होती, रामायणात रावणाची जी भूमिका होती, बाजारांत हफ्ता गोळा करायला येणार्यांची जी भूमिका असते, काश्मीर मध्ये पाकिस्तानची जी भूमिका आहे तीच भूमिका राज ठाकरे ह्यांची वरील घटनेत होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ट
टर्मीनेटर Mon, 10/24/2016 - 10:46 नवीन
सब गंदा है...पर धंदा है ये... जिथे आर्थिक फायदा नुकसानीच्या गोष्टी येतात तिथे चित्रपट व्यावसायिक काय किंवा राजकारणी व मुख्यमंत्री काय सगळे कमरेच सोडून डोक्याला गुंडाळायला तयार होतात. हीच गोष्ट ह्या प्रसंगातून ह्या तिघांनी दाखवून दिली आहे....बाकी सेना आणि सैनिक वगैरे गोष्टी ह्या लोकांसाठी नगण्य आहेत.
  • Log in or register to post comments
र
रविकिरण फडके Mon, 10/24/2016 - 11:28 नवीन
(ह्यातील काही मुद्दे रिपीट झाले असतील तर क्षमस्व.) शेवटी लावलेच की नाही करण जोहरला गुढगे टेकायला खळ्ळ खट्याक 'संस्कृती'पुढे (चुकलो, लोकेच्छेपुढे)? आपली लोकशाहीदेखील अशीच गुढगे टेकील लवकरच केंव्हातरी. मग आपण आपली शस्त्रे खाली ठेवू व आनंदोत्सव साजरा करू. आपण खाली ठेवलेली शस्त्रे केव्हातरी आपल्यावरच उगारली जातील पण ते नंतर पाहता येईल. पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्याची परवानगी देऊ नये व जे कोणी इथे असतील त्यांनी भारत सोडून जावे अशी हाकाटी उरीच्या हल्ल्यानंतर सुरु झाली. ज्या कोणी (उदा. सलमान खान) त्याविरुद्ध सूर लावला त्याच्यावर हल्लाबोल झाला. आपली राष्ट्रनिष्ठा कशी मोठी हे सिद्ध करण्याची अहमहिका लागली. पाकिस्तानी कलाकारांना भारतात का येऊ देऊ नये ह्यासाठी हास्यापद कारणे देण्यात आली - भारतात कलाकार नाहीत का, पाकिस्तानी कलाकारांना म्हणजे शेवटी पाकिस्तानी अतिरेक्यांना पैसे द्यायचे, आपण परकीयांना पैसे द्यायचे म्हणजे आपला तेवढा तोटा करून घायचा, पाकिस्तानी कलाकार भारताच्या सुरक्षेला धोका आहेत, हे प्रमुख आक्षेप होते. पण जर आपल्या सरकारचीदेखील अधिकृत भूमिका अशी असेल की आम्ही अतिरेक्यांच्या तळांवर हल्ले करून ते उद्वस्थ केले; आमचे पाक सरकारशी वा जनतेशी भांडण नाही, तर त्यासाठी काही कारण असेल ना? ते कारण एकच असू शकते ते म्हणजे पाकिस्तानातील कट्टरतावाद्यांना जमेल तितके एकटे पाडावयाचे आणि इतरांचा पाठिंबा मिळवायचा नाहीतर किमान ते तटस्थ राहतील असे बघायचे. हे ह्या 'राज'कारणी नेत्यांना समजत नसेल असे नाही पण स्वतःच्या क्षुल्लक राजकारणासाठी त्यांना ते समजूनच घ्यायचे नाही. दुसरा मुद्दा पाकिस्तानी कलाकार भारतात पैसे मिळवितात म्हणजे आपण अतिरेक्यांना आर्थिक मदत करतो. असे असेल तर इथल्या हिंदी चित्रपटसृष्टीला कितीतरी पट जास्त पैसे पाकिस्तानातून मिळतात ते चालतात का? पाकिस्तानी कलाकार भारतात येउन हेरगिरी करू शकतात, हा आक्षेपही पोकळ आहे. सलमान म्हणतो त्याप्रमाणे आपल्या सरकारनेच त्यांना व्हिसा दिलेले आहेत ना? मग जर सरकारला त्यांना इथे येऊ देण्यात धोका वाटत नसेल तर हे कोण लागून गेले स्वतःचा कायदेबाह्य अधिकार चालवणारे? (आता जर कोणी म्हणत असेल की सरकारच शिवसेना आणि मनसेचा वापर करून त्यांना भारताबाहेर काढीत आहे तर पुढे बोलावे असे काही राहात नाही.) शेवटचा मुद्दा म्हणजे करण जोहरला किंवा तत्सम कुणाला भारतीय कलाकार मिळत नाहीत का? हा तर प्रतिवाद करण्याच्याही लायकीचा मुद्दा नाही. ह्या तमाशाची परवाच्या दिवशी तात्पुरती सांगता झाली. ('तात्पुरती' अशासाठी की 'ह्यापुढे मी पाकिस्तानी कलाकारांना माझ्या चित्रपटात घेणार नाही' अशी हमी करण जोहरकडून घेतली आहे.) महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मध्यस्ती, म्हणजे मांडवली, केली. करण जोहरने पाच कोटी रुपये सैनिक कल्याण निधीला द्यायचे असा करार झाला. त्यावर शिवसेनेने 'लष्कराला खंडणीचा पैसा नको' अशी कॉमेंट देण्याचा उपचारदेखील पार पाडला. असे सर्व यथासांग झाले. ह्यात एक बरे झाले; भाजपाचे खरे रूप प्रकटले. 'party with a difference' म्हणजे काय ते लोकांसमोर आले. सत्य कटू असले तरी भ्रम दूर झालेला केव्हाही चांगलाच, नाही का? पाकिस्तानी कलाकाराला घेतले ही काही करण जोहरची चूक नव्हे. परिस्थिती बदलली म्हणून पूर्वीचे करार रद्द करता येत नसतात. तशी कोणी मागणी जर करत असेल तर ते घटनाबाह्य आहे. प्रत्येक नागरिकाचे अधिकार राखण्यास सरकार बांधील आहे अशी तर्कशुद्ध आणि न्यायाची भूमिका सरकारची असायला हवी होती. त्याविरुद्ध कोणी येत असेल तर त्याचा कठोरपणे बीमोड करणे हे सरकारचे कर्तव्य होते. निदान ज्या पक्षाचे पंतप्रधान 'भारताची राज्यघटना हा माझा धर्म आहे' अशी जाहीर भूमिका घेतात त्या पक्षाची तरी. पण कसचे काय? निवडणुकींच्या आणि मतांच्या हिशोबापुढे सगळे दुय्यम असते, हेच खरे. (शिवसेनाशी आपले फाटलेलेच आहे. मनसे तरी आपल्या बाजूला असलेला बरा, निदान विरुद्ध तरी नको अशी भाजपाची भूमीका असावी.) आता ह्या त्रिपक्षीय कराराचा निषेध करणाऱ्यांविरुद्ध हल्लाबोल करता येईल. 'आता मनसे आमची देशभक्ती ठरवणार का' असा प्रश्न शबाना आझमी हिने केला आहे, तिलाही राष्ट्रद्रोही ठरविता येईल. आणि हो, देशातील वाढत्याअसहिष्णुतेबद्दल चिंता व्यक्त करणाऱ्या रतन टाटा ह्यांना देखील. आणि हे सर्व लिहिल्याबद्दल मलासुद्धा. पण मी काही शबाना आझमी, रतन टाटा ह्यांच्या पंक्तीत बसणारा नव्हे. मी एक क्षुल्लक इसम. म्हणून मला माफही करतील कदाचित. शेवटी एवढेच, की हे राजापेक्षा राजनिष्ठ लोक राजालाही तापदायक ठरू शकतात.
  • Log in or register to post comments
स
साहना Tue, 10/25/2016 - 03:10 नवीन
माझ्या मते सर्व घटनेचे अनालिसिस करणारा सर्वांत चांगला कमेंट हा आहे. > ह्यात एक बरे झाले; भाजपाचे खरे रूप प्रकटले. 'party with a difference' म्हणजे काय ते लोकांसमोर आले. सत्य कटू असले तरी भ्रम दूर झालेला केव्हाही चांगलाच, नाही का? पाकिस्तानी कलाकाराला घेतले ही काही करण जोहरची चूक नव्हे. भाजपचे खरे रूप हेच आहे ह्याची शंका अनेकांना आधीपासून होतीच म्हणून विशेष आश्चर्य वाटत नाही. आश्चर्य अश्या गोष्टीचे वाटते कि सभ्य, चांगली माणसे अचानक "लोकेच्छा", "दिवाळीचं वेळी शांतता" इत्यादी इत्यादी करणे देऊन आणि शाब्दिक कोलांट्या उड्या मारून आपल्या आवडत्या पक्षाचे समर्थन करीत आहेत. काँग्रेस पक्ष भ्रष्ट असला तरी किमान आपल्या चमच्याची खूप काळजी घेतो. भाजपच्या समर्थानात नाचणाऱ्या भक्तगणांच्या गळ्यांत मात्र शेवटी धोंडाच पडेल असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रविकिरण फडके
श
श्रीगुरुजी Mon, 10/24/2016 - 11:43 नवीन
पाकिस्तानी कलाकारांना भारतात का येऊ देऊ नये ह्यासाठी हास्यापद कारणे देण्यात आली - भारतात कलाकार नाहीत का, पाकिस्तानी कलाकारांना म्हणजे शेवटी पाकिस्तानी अतिरेक्यांना पैसे द्यायचे, आपण परकीयांना पैसे द्यायचे म्हणजे आपला तेवढा तोटा करून घायचा, पाकिस्तानी कलाकार भारताच्या सुरक्षेला धोका आहेत, हे प्रमुख आक्षेप होते.
या कारणात काय हास्यास्पद आहे? ज्या प्रमाणात भारतात पाकड्यांना कामे दिली जातात त्या प्रमाणात भारतीय कलाकारांना पाकिस्तानी चित्रपटात कामे दिली जात नाहीत ही वस्तुस्थिती आहे (खरं पाकिस्तानी चित्रपटात काम करणार्‍या भारतीय कलाकारांची संख्या शून्याच्या जवळपासच आहे). कोणतीही देवाणघेवाण/व्यापार/व्यवहार एकतर्फी होऊ शकत नाही. आपण इथे बोलावून पाकड्यांना कोट्यवधी रूपये देऊन चित्रपटात झळकवायचे आणि आपल्या एकाही कलाकाराला तिथे काम नाही असे किती दिवस चालणार? पाकिस्तानी कलाकारांना जे पैसे मिळतात त्यातील काही भाग करांच्या रुपाने त्यांच्या सरकारकडे जातोच व सरकारकडून त्यातला काही भाग दहशतवादासाठी वापरला जातो. म्हणजे आपणच पाकिस्तानी दहशतवाद्यांना पाकड्या कलाकारांच्या माध्यमातून अर्थपुरवठा करीत आहोत.
पण जर आपल्या सरकारचीदेखील अधिकृत भूमिका अशी असेल की आम्ही अतिरेक्यांच्या तळांवर हल्ले करून ते उद्वस्थ केले; आमचे पाक सरकारशी वा जनतेशी भांडण नाही, तर त्यासाठी काही कारण असेल ना? ते कारण एकच असू शकते ते म्हणजे पाकिस्तानातील कट्टरतावाद्यांना जमेल तितके एकटे पाडावयाचे आणि इतरांचा पाठिंबा मिळवायचा नाहीतर किमान ते तटस्थ राहतील असे बघायचे. हे ह्या 'राज'कारणी नेत्यांना समजत नसेल असे नाही पण स्वतःच्या क्षुल्लक राजकारणासाठी त्यांना ते समजूनच घ्यायचे नाही.
पाकिस्तानमधील कट्टरतावाद्यांना एकटे पाडायचे हे त्यामागे कारण नाही. भारताने अशी कारवाई करून पहिल्यांदाच तसे अधिकृतरित्या जाहीर केले. पहिल्यांदाच कारवाईची जाहीर कबुली करताना भारत अत्यंत सावध होता. आम्ही फक्त दहशतवाद्यांविरूद्ध कारवाई करीत आहोत, ही कारवाई पाकिस्तानविरूद्ध नसून पूर्वी आमचाच भाग असलेल्या पाकव्याप्त काश्मिरमध्ये केली इ. स्पष्टीकरण भारताने दिले. आंतरराष्ट्रीय राजकारणात इतर देश आपल्याविरूद्ध जाऊ नयेत, आम्ही स्वसरंक्षणासाठी असे केले, इतर देशांचा आपल्याला पाठिंबा मिळावा हा त्यामागे उद्देश होता व तो उद्देश सफल झाला.
दुसरा मुद्दा पाकिस्तानी कलाकार भारतात पैसे मिळवितात म्हणजे आपण अतिरेक्यांना आर्थिक मदत करतो. असे असेल तर इथल्या हिंदी चित्रपटसृष्टीला कितीतरी पट जास्त पैसे पाकिस्तानातून मिळतात ते चालतात का?
का चालू नये? हरकत काय आहे?
पाकिस्तानी कलाकार भारतात येउन हेरगिरी करू शकतात, हा आक्षेपही पोकळ आहे. सलमान म्हणतो त्याप्रमाणे आपल्या सरकारनेच त्यांना व्हिसा दिलेले आहेत ना? मग जर सरकारला त्यांना इथे येऊ देण्यात धोका वाटत नसेल तर हे कोण लागून गेले स्वतःचा कायदेबाह्य अधिकार चालवणारे? (आता जर कोणी म्हणत असेल की सरकारच शिवसेना आणि मनसेचा वापर करून त्यांना भारताबाहेर काढीत आहे तर पुढे बोलावे असे काही राहात नाही.)
सरकारने व्हिसा दिला असला तरी सरकारी निर्णयाला विरोध करण्याचा कायदेशीर हक्क सर्वांना आहे. मनसेने त्यांना विरोध केला यात काहीही चुकीचे नाही. तो मनसेला घटनेने दिलेला हक्क आहे.
शेवटचा मुद्दा म्हणजे करण जोहरला किंवा तत्सम कुणाला भारतीय कलाकार मिळत नाहीत का? हा तर प्रतिवाद करण्याच्याही लायकीचा मुद्दा नाही.
पाकिस्तान व पाकिस्तानी आपले शत्रू आहेत. त्यामुळे शत्रूला अर्थपुरवठा करण्याऐवजी इथलेच कलाकार घ्यावेत हा मुद्दा योग्यच आहे.
  • Log in or register to post comments
र
रविकिरण फडके Mon, 10/24/2016 - 12:14 नवीन
"सरकारने व्हिसा दिला असला तरी सरकारी निर्णयाला विरोध करण्याचा कायदेशीर हक्क सर्वांना आहे. मनसेने त्यांना विरोध केला यात काहीही चुकीचे नाही. तो मनसेला घटनेने दिलेला हक्क आहे." कायदेशीर? होच की! आणि पाच कोटी रुपये खंडणी उकळण्याचाही हक्कच. असो. ह्यावर वाद घालण्यात अर्थ नाही. आपण सहमत होणार नाही ह्यावर सहमत होऊया.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 10/24/2016 - 12:15 नवीन
कायदेशीर? होच की! आणि पाच कोटी रुपये खंडणी उकळण्याचाही हक्कच.
ते पैसे मनसेला मिळणार नाहीत हो किंवा राजच्या खिशातही जाणार नाहीत. सैनिक कल्याण निधीला ते पैसे दिले जाणार आहेत.
  • Log in or register to post comments
म
मोदक Mon, 10/24/2016 - 12:35 नवीन
याच गोष्टीचा अनेक लोकांना राग आला आहे गुरूजी.. सैनीक कल्याण निधीला पैसे देण्याचा हा मार्ग चुकीचा आहे हे तरी मान्य आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Mon, 10/24/2016 - 17:28 नवीन
याच गोष्टीचा अनेक लोकांना राग आला आहे गुरूजी.. सैनीक कल्याण निधीला पैसे देण्याचा हा मार्ग चुकीचा आहे हे तरी मान्य आहे का?
ती बैठक मुळात सैनिक कल्याण निधीला देणगी देण्यासाठी बोलविलेली बैठक नव्हती. चर्चेच्या माध्यमातून दिवाळीत निर्माण होणारी संभाव्य अशांतता टाळणे हा बैठकीचा मुख्य उद्देश होता. तो साध्य झाला व त्यातून भविष्यात पाकड्यांवर बंदी, सैनिक कल्याण निधीला देणगी, चित्रपटाच्या सुरवातीला उरी हल्ल्याच्या निषेधाचा फलक इ. अजून काही गोष्टी बाहेर आल्या. परंतु मूळ उद्देश आंदोलन रद्द करणे हाच होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Mon, 10/24/2016 - 17:35 नवीन
ते काहीही असले तरी अशा पद्धतीने ब्लॅकमेल करून सैनीक कल्याण निधीला देणगी देणवण्याची गोष्ट पटली नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Mon, 10/24/2016 - 17:38 नवीन
ते ठीक आहे. परंतु ही देणगी हा चर्चेतला सेकंडरी आऊटकम आहे. तो चर्चेतला प्राथमिक मुद्दा नव्हताच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
क
कैलासवासी सोन्याबापु Mon, 10/24/2016 - 12:45 नवीन
सैनिक कल्याण नाव घेतले की काहीही कायदेशीर होईल का? असे असले तर सैन्याचे नाव संबंधित खराब करत आहेत असे दुर्दैवाने म्हणावे लागेल, उद्या तुमची कॉलर धरून कोणी काढ सगळे खिशातले पैसे आर्मी फंडला द्यायचे म्हणले तर तुम्ही राष्टरकार्य असल्यासारखा द्याल का आपल्या घामाचा पैसा? अन तो पैसा सैन्य स्वीकारेल ह्याची काय शाश्वती, त्यांनी नाकारल्यास तुमचा पैसा तुम्हाला परत पोच करायचे ओनस कोणाचे असेल? आपण गणपतीची वर्गणी नामे खंडणी प्रमाणे आर्मी वेल्फेयर फंड नामे नवी खंडणी जन्माला घालतोय का ? ह्याचा जरूर विचार केला जावा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
अ
अभ्या.. Mon, 10/24/2016 - 13:13 नवीन
आपण गणपतीची वर्गणी नामे खंडणी प्रमाणे आर्मी वेल्फेयर फंड नामे नवी खंडणी जन्माला घालतोय का
सेमच बाप्पू, मला सेम उधारण आमच्या इथले आठवलेले. सगळ्यांच्या होलसेल जयंत्या ब्यंत्याचे पैसे आम्ही देत नै. नवीन दुकान टाकले की एरीयावाईज एक सर्टिफिकेट मिळते. त्याला ४-५ ह्जार मोजायचे एकवट्ट. मग त्यांचे ते सगळ्या मंडळांना पैसे देतात. मंडळे आमच्याकडे फिरकत नैत. एकूणच ह्या मिलिभगत प्रकरणात प्रथमदर्शनी विनविन सगळे दिसत असले तरी स्वतःचे मत (वर्गणी नाहि द्यायची असे) मांडायची सोय नाही. एकट्याने ह्या सिस्टिमशी लढायची ताकद नाही आणि धंदा करु की हेच करत बसू म्हणून आम्ही सहन करतो. जवळपास सर्वत्र शहरात ही सर्वमान्य प्र्याक्टीस झालीय. वरील आर्मीसाठी खंडणी प्रकरणात तोच पायंडा पडू नये हीच इच्छा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
स
साहना Tue, 10/25/2016 - 03:11 नवीन
तुमच्या मुलाला कुणी किडनॅप करून उद्या सैनिक निधीला पैसे द्यायला लावले तर ते नैतिक दृष्ट्या बरोबर वाटते का ? (उदाहरणादाखल)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
र
रविकिरण फडके Mon, 10/24/2016 - 13:02 नवीन
आणि BTW , आपण सर्वानीच पाकड्या पाकडे इत्यादी शब्द टाळावेत. सुसंकृत माणसे असे बोलत नाहीत आपापसात. (अर्थात, ह्यालाही उत्तर असेलच. आम्ही असंस्कृत लोकांबद्दल बोलतोय, असे.)
  • Log in or register to post comments
व
विशुमित Mon, 10/24/2016 - 13:13 नवीन
++ सहमत..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रविकिरण फडके
ब
बोका-ए-आझम Mon, 10/24/2016 - 13:27 नवीन
असताना मनसेला एवढं महत्व देण्याची गरज होती का? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. तो पक्ष स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडतोय. त्यामुळे त्यांनी असले स्टंट करणं हे समजण्यासारखं आहे. पण मुख्यमंत्र्यांना हे अचाट शक्तीचे पुचाट प्रयोग करण्याची काय गरज होती? येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीत मनसेला चुचकारून शिवसेनेची कोंडी करण्याची व्यूहरचना हे एक कारण असू शकतं, पण त्यासाठी मनसेच्या एवढ्या पायघड्या घालणं आवश्यक नव्हतं.
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Mon, 10/24/2016 - 13:30 नवीन
पोचट शक्तीचे अफाट प्रयोग हो ! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
श
श्रीगुरुजी Mon, 10/24/2016 - 17:25 नवीन
क्षणभर असं गृहित धरू की त्यांनी राज व करणला एकत्र बोलवून त्यांच्याशी वाटाघाटी करून गंभीर घोडचूक केली. पण मग हे न करता त्यांनी नक्की काय करायला हवं होतं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ब
बोका-ए-आझम Mon, 10/24/2016 - 20:54 नवीन
राज ठाक-यांच्या कार्यकर्त्यांना आणि त्यांना स्वतःलाही प्रतिबंधात्मक अटक करायला हवी होती, ज्याचे आदेश गृहमंत्री म्हणून ते देऊ शकत होते. सरकारने मध्यस्थी करावी असं ना करण जोहर म्हणत होता, ना राज ठाकरे म्हणत होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Tue, 10/25/2016 - 11:54 नवीन
- चित्रपटावर बंदी घालण्यात येणार नाही हे सरकारने यापूर्वीच स्पष्ट केले होते. - चित्रपटाला पूर्ण संरक्षण देण्यात येईल हे राजनाथसिंग व फडणविसांनी पूर्वीच सांगितले होते. - एका चित्रपटगृहावर निदर्शने करणार्‍या मनसेच्या १२ कार्यकर्त्यांना आधीच अटक केलेली होती. - प्रत्यक्ष चित्रपट प्रदर्शित होताना सर्व चित्रपटगृहांना संरक्षण देण्यात येणार होते. सरकार संपूर्णपणे कायदेपालन करणार होते. परंतु एवढे करून तोडफोड, दंगेधोपे व त्यातून निर्माण होणारी अशांतता व हिंसाचार पूर्णपणे टाळणे अशक्य होते. प्रत्यक्ष राज ठाकर्‍यांना व त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांना अटक करूनसुद्धा काही कार्यकर्ते मोकळे राहिलेच असते व त्यांनी तोडफोड केलीच असती. संपूर्ण महाराष्ट्रात किमान ७००-८०० चित्रपटगृहात हा चित्रपट दाखविला जाईल असा अंदाज आहे. प्रत्येक चित्रपटगृहावर किमान १० पोलिस ठेवले तरी ७-८ हजार पोलिस गुंतुन पडले असते. दिवाळीत दहशतवादी हल्ल्याचा धोका कायमच असतो आणि अशा परिस्थितीत इतके पोलिस वेगळ्या कामात अडकवून ठेवणे योग्य झाले नसते. आणि एवढे पोलिस ठेवूनसुद्धा तोडफोड पूर्णपणे टाळता आली नसती. काश्मिरमध्ये संचारबंदी असून व सैनिक पॅलेट गन्स घेऊन उभे असताना सुद्धा तिथले नागरिक संचारबंदी मोडून गन्सची भीति न बाळगता रस्त्यावर येऊन दगडफेक करीत होते. इथे तर हातात लाठ्या घेतलेले १०-१२ पोलिस काय करू शकणार होते? अशा परिस्थितीत आंदोलन टाळण्यासाठी सामोपचाराच्या माध्यमातून प्रयत्न करणे आवश्यक होते. समजा बोलणी फिसकटली असती तर शेवटी पोलिस फोर्स होताच. परंतु कोणत्याही संघर्षात/वादात बलाचा वापर हा शेवटचा पर्याय असतो. वादावर चर्चेच्या, सामोपचाराच्याच माध्यमातून मार्ग काढण्याचा प्रयत्न आधी केला जातो. खलिस्तान आंदोलन, काश्मिर आंदोलन, आसाम आंदोलन, नक्षलवादी, मिझोराम आंदोलन इ. वादात वाटाघाटी करण्याचा जास्तीतजास्त प्रयत्न केला गेला होता. नक्षलवादी, शिरोमणी गुरूद्वारा प्रबंधक कमिटीचे सदस्य, मिझोरामचा लाल डेंगा, आसाममधील विद्यार्थी, हुरियतचे सदस्य हे काही जनतेचे निवडून आलेले प्रतिनिधी नव्हते. तरीसुद्धा त्यांचे उपद्रवमूल्य ओळखून चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. अगदी रामायणात सुद्धा प्रभू रामचंद्रांनी युद्ध करण्यापूर्वी अंगदाला शिष्टाईसाठी पाठविले होते आणि भगवान श्रीकृष्णानेसुद्धा महाभारत युद्ध टाळण्यासाठी दुर्योधनाशी वाटाघाटी केल्या होत्या (इथे मी फडणविसांची श्रीराम किंवा श्रीकृष्णाशी तुलना करीत आहे असा गैरसमज करून घेऊ नये). मनसेचा एकच आमदार असला तरी मनसेकडे भरपूर कार्यकर्ते आहेत व मनसे या पक्षाचे उपद्रवमूल्य खूप मोठे आहे. मनसेचे आंदोलन म्हणजे अण्णा हजारेंचे मौन किंवा उपोषण नाही किंवा अंनिसचा मोर्चा नाही. मनसे आंदोलनातून हिंसाचार, तोडफोड होण्याचा इतिहास आहे. मनसेचे आंदोलन कायद्याच्या दृष्टीने बेकायदेशीर असले तरी त्यातून अशांतता निर्माण होऊन जनतेला त्रास होणार होता. राज ठाकर्‍यांना किंवा मनसेच्या कार्यकर्त्यांना अटकेत ठेवून आंदोलन दडपता आले नसते. कायद्याचे पालन करणे हे जसे मुख्यमंत्र्यांवर बंधनकारक आहे तसेच शांतताभंग होऊन न देणे ही देखील त्यांचीच जबाबदारी आहे. त्यामुळे आधी मनसेशी बोलणी करून आंदोलन रद्द करण्याचा प्रयत्न करणे व बोलणी फिसकटल्यास पोलिस फोर्स वापरून कायद्याचे पालन करणे हाच मार्ग त्यांच्यापुढे होता. परंतु पोलिस फोर्स वापरून तोडफोड पूर्णपणे टाळणे शक्य झाले नसते. त्यामुळेच त्यांनी दोघांना एकत्र बोलावून वाटाघाटींच्या माध्यमातून आंदोलन रद्द करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. आधी लिहिल्याप्रमाणे ५ कोटींची देणगी हा काही चर्चेतील मुख्य मुद्दा किंवा अट नव्हती. आंदोलन रद्द करण्याचा प्रयत्न करणे हाच चर्चेतील प्राथमिक मुद्दा होता. या विषयावर खालील लेख चांगला आहे. http://indianexpress.com/article/india/india-news-india/devendra-fadnavis-ae-dil-hai-mushkil-ban-karan-johar-5-crore-raj-thackeray-3101411/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
श
शब्दबम्बाळ Mon, 10/24/2016 - 21:03 नवीन
जर कायदेशीर पद्धतीनेच जायचं असतं तर एक निवेदन द्यायला हवं होत, ज्यात स्पष्टपणे सांगितलं असत कि जर या आंदोलनातून कुठल्याही पद्धतीचे मालमत्तेचे नुकसान झाले तर ते 'मनसे' कडून वसूल करण्यात येईल. आंदोलन करताना पकडण्यात आलेले कार्यकर्ते मनसे चे आढळल्यास 'मनसे' प्रमुखांना अशा हिंसक आंदोलनास पाठबळ देण्यासाठी अटक करण्यात येईल! पण हे केलं असत तर काही लोकांचा रोष घ्यावा लागला असता! त्यात निवडणूक आल्यात त्यात शिवसेना ताप देतेय!! मग मनसे ला दुखवून कसे चालेल? मनसे चे कार्यकर्तेसुद्धा आजकाल पक्षप्रमुखांच्या नावाने ओरडत असतात. आधीच दहीहंडीच्या केसेस पडल्यात कार्यकर्त्यांवर त्यात अशी काही कणखर कारवाई होण्याची शक्यता दिसली असती तर 10 वेळा विचार करावा लागला असता कार्यकर्त्यांना सुद्धा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
व
विशुमित Tue, 10/25/2016 - 06:29 नवीन
बरोबर आहे.. मनसे अध्यक्षा सकट सर्व पदाधिकाऱ्यांवर प्रतिबंदात्मक कारवाई करायला पाहिजे होती. वेळ पडली तर अध्यक्षा ला चोप देत पोलीस स्थानकात डांबून ठेवायला पाहिजे होते. मागील आघाडी सरकार ने त्यांचे खूप लाड पुरवले. खळ खट्याक ची धमकी देऊन सार्वजनिक स्वास्थ्य बिघडवणाऱ्या प्रवृत्तीना चाप बसवण्याची संधी फडणवीस यांच्या सारख्या कर्तबदार मुख्यमंत्र्यानी घालवली आहे. याचा खेड वाटतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
श
श्रीगुरुजी Tue, 10/25/2016 - 12:04 नवीन
जर कायदेशीर पद्धतीनेच जायचं असतं तर एक निवेदन द्यायला हवं होत, ज्यात स्पष्टपणे सांगितलं असत कि जर या आंदोलनातून कुठल्याही पद्धतीचे मालमत्तेचे नुकसान झाले तर ते 'मनसे' कडून वसूल करण्यात येईल. आंदोलन करताना पकडण्यात आलेले कार्यकर्ते मनसे चे आढळल्यास 'मनसे' प्रमुखांना अशा हिंसक आंदोलनास पाठबळ देण्यासाठी अटक करण्यात येईल!
वर सविस्तर उत्तर दिले आहे. त्यामुळे परत लिहित नाही.
पण हे केलं असत तर काही लोकांचा रोष घ्यावा लागला असता! त्यात निवडणूक आल्यात त्यात शिवसेना ताप देतेय!! मग मनसे ला दुखवून कसे चालेल? मनसे चे कार्यकर्तेसुद्धा आजकाल पक्षप्रमुखांच्या नावाने ओरडत असतात. आधीच दहीहंडीच्या केसेस पडल्यात कार्यकर्त्यांवर त्यात अशी काही कणखर कारवाई होण्याची शक्यता दिसली असती तर 10 वेळा विचार करावा लागला असता कार्यकर्त्यांना सुद्धा!
राज ठाकरे हा उधोजींइतकाच बेभरवशाचा व स्वतःच्या ताकदीबद्दल अवास्तव भ्रम बाळगणारा आहे. शेवटी हे दोन्ही बंधू शिवसेना संस्कृतीत वाढले आहेत. आपला पक्ष फार मोठा आहे, आपल्याला महाराष्ट्रात प्रचंड पाठिंबा आहे, आपण स्वबळावर सत्ता काबीज करू शकतो अशा भ्रमात हे दोघेही वावरत असतात. या दोघांबरोबरही युती किंवा तडजोड करणे अत्यंत अवघड आहे हे भाजप पुरेपूर ओळखून आहे. भाजपचे मुख्य ध्येय स्वबळावर लढण्याचेच आहे. त्यामुळे मनसेला दुखवू नये किंवा सेनेला चुचकारावे अशा गोष्टी भाजप करणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
र
राजाभाऊ Tue, 10/25/2016 - 17:05 नवीन
>>पण मग हे न करता त्यांनी नक्की काय करायला हवं होतं?<< सत्तेत नसुनहि राज ठाकरेंचीच चालते महाराष्ट्रात, तेंव्हा जनाची नाहि तरी मनाची लाज असेल तर फडणविसांनी मुख्यमंत्रीपदाची खुर्ची खाली करावी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ब
बोका-ए-आझम Mon, 10/24/2016 - 15:38 नवीन
डावीकडून आणि उजवीकडून थपडा खाणे. सेन्सॉरने मंजुरी दिली असताना एका राजकीय पक्षाच्या दंडेलीला भीक घातली म्हणून डावीकडून आणि देशभक्ती खंडणीखोरांच्या दावणीला बांधली म्हणून उजवीकडून. #तोंडघशीफडणवीस
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Mon, 10/24/2016 - 15:44 नवीन
हि सगळी पवारसाह्यबांनी राज ठाक्रे, करन जोहर आदींकडून करवून आणलेली गेम आहे. फडनवीस बिचारे तोंडघशी पडले. आता त्यांनी जायला हरकत नाही. उगा मोर्चामुळे गेले असते तर महाराष्ट्रात वेगळा मेसेज गेला असता. ;) #सर्वकाहीसाहेबांमुळे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
व
विशुमित Tue, 10/25/2016 - 06:32 नवीन
सकल महाराष्ट्राचा करता करविता फक्त साहेब...!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
ट
टवाळ कार्टा Tue, 10/25/2016 - 11:45 नवीन
आयला...तुम्हाला सगळीकडे नाखूनचाचाच दिसतात??? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Tue, 10/25/2016 - 11:57 नवीन
अयो...खरंच की.. नाखु साहेब नाही "अभ्या" नाना आय माय सॉरी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
स
सोत्रि Mon, 10/24/2016 - 18:34 नवीन
१. मुंबई नगरपालिकेच्या २०१७ निवडणूकीची ही नांदी आहे २. 'टायमिंग' साधून केलेली राजनिती आहे (आठवा टोल राड्याचे टायमिंग) ३. भाजपाने शिवसेनेला दाखवलेले 'मधले बोट' आहे ४. मनसे पार्टी फक्त पैसा छापण्याचे माॅडेल म्हणून कसा एस्टॅब्लिश झाला आहे त्याचे उदाहरण आहे ५. राजकारणातले निवडणूकपूर्व स्कोर सेटलिंग आहे ६. करण जोहरचा सिनेमा आणि पाक कलाकार हे निनीत्त आणि ह्या प्रकरणातले बळी आहेत ७. पाक कलाकारांना कधीच काम मिळणार नाही हा विजयी मुद्दा, मूळ मुद्द्याला झाकोळूना टाकण्याची तजवीज आहे - (दिलसे) सोकाजी
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Mon, 10/24/2016 - 18:46 नवीन
गुरुजी, फालतू टिवटिव बंद करा. घटनात्मक पदावर बसून काय निर्णय घ्यावे ह्याची अक्कल नसेल तर ... असो. डोकं फार तापलं आहे. उगा उणादुणा शब्द निघायचा... श्रीगुरुजी, मिपाची जनभावना तुमच्या विचारांविरुद्ध आहे असेच चर्चेत दिसत आहे, योग्य ती समज आपल्याला येवो, भाजपचे दलाल नकोत इथे मिपावर,
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय Mon, 10/24/2016 - 19:30 नवीन
आपल्या प्रतिसादातील भाषा अस्थायी आणि सौजन्यशील आहे असे खेदाने नमूद करतो. श्रीगुरुजींनी अजुनतरी पातळी सोडुन बोलल्याचे किमान या धाग्यावर दिसत नाही. ते चुकीच्या गोष्टीचे समर्थन करताना दिसत आहेत. त्यात त्यांची केविलवाणी धडपड दिसते पण जाणुनबुजुन एखाद्या व्यक्तीची, पक्षाची अथवा समुदायाची खोडी काढलेली दिसत नाही. अश्या परिस्थितीत त्यांची कानौघडणी करणारा प्रतिसाद रास्तच असावा पण " फालतू टिवटिव बंद करा" आणि "भाजपाचे दलाल नकोत इथे मिपावर" ही वाक्ये पुर्णतः अस्थायी आहेत. मिपावर सर्वच पक्षांचे समर्थक आहेत. सर्वांचे विरोधक आहेत. आपण स्वतः भाजपाचे कट्टर विरोधक आहात. अश्या परिस्थितीत कोण्या एकाला "दलाल" वगैरे संबोधणे ही फारच वैयक्तिक टिप्पणी होते. शिवाय एखाद्याच पक्षाचे समर्थक नकोच असे म्हणणे ही चुकीचे आहे. आम्ही तर मिपावर आप आणी राष्ट्रवादीच्या समर्थकांना पण सहन करतो. त्यात काय एवढे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
म
मृत्युन्जय Mon, 10/24/2016 - 19:31 नवीन
* सौजन्यहीन असे वाचावे. चुकुन सौजन्यशील लिहिले :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
स
संदीप डांगे Mon, 10/24/2016 - 19:44 नवीन
ओके. आता तुम्हीच ठरवा सगळं. धन्यवाद! रच्याकने, मी कोणाचा कट्टर विरोधक आहे किंवा नाही हेही तुम्हीच ठरवा.. परत असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
स
सुबोध खरे Tue, 10/25/2016 - 06:51 नवीन
डांगे अण्णा गुरुजींच्या मताशी मी पण सहमत नाही परंतु आपली भाषा (दलाल इ शब्द) हि कमरेच्या खाली उतरते आहे हे खेदाने नमूद करावेसे वाटते. आपल्याला गुरुजी दलाल आहेत हे सिद्ध करून दाखवता येईल काय? तुम्ही भक्त म्हणत होतात तोवर ठीक होते. याबाबतीत मृत्युंजय यांच्याशी सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Tue, 10/25/2016 - 07:01 नवीन
मी गुरुजींनाच दलाल बोललो हे सिद्ध करता येईल काय? मिपावर भाजपचे दलाल नकोत अशी इच्छा व्यक्त केली आहे, ह्यात काय गैर? आणि हो, 'भाजपचे नकोत तर इतरांचे चालतील का' असा बुद्धिमान प्रश्न कोणी विचारू नये, ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
अ
अनुप ढेरे Tue, 10/25/2016 - 07:03 नवीन
डांगे अण्णा.. कशाला वाद वाढवताय उगाच. जाऊ द्या ना. कोणाला इथे दलाल म्हणू नये हे ठीक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
म
मोदक Tue, 10/25/2016 - 07:08 नवीन
तुमचा प्रतिसाद लिहिताना तोल सुटला आहे असे तुम्हाला वाटत असेल तर गुरूजींना बोललेले शब्द मागे घ्या. अशी शब्दांची कसरत करत तुम्ही पायर्‍या खाली उतरत जाण्यापेक्षा शब्द मागे घेणे सोपे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
श
शब्दबम्बाळ Tue, 10/25/2016 - 10:01 नवीन
दलाल वगैरे शब्द अयोग्य आहेत वगैरे सगळ्यांनी बोलून झालाय आणि ते बरोबर हि आहे. पण एखाद्या आयडी ला (तो नावडता असल्याकारणाने) "चड्डीला हात घातला", "सुंता केला" असे दिले गेलेले प्रतिसाद हे कमरेच्या वरचे आहेत का? कि आयडी च्या प्रसिद्धी आणि कंपू नुसार 'कमरेचे' माप बदलते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
मृत्युन्जय Wed, 10/26/2016 - 10:06 नवीन
तुम्ही दोन्ही ठिकाणी आक्षेप घेतला आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
श
शब्दबम्बाळ Wed, 10/26/2016 - 11:39 नवीन
मी एकाच ठिकाणी दोन्ही ठिकाणचा आक्षेप घेतला आहे! ;) असाही माझ्या आक्षेपाला कोण विचारतो? आमची ना फॅन फॉलोविंग ना कंपू त्यामुळे ज्या धाग्यावर प्रतिक्रिया देत असतो तिथे ताळतंत्र सोडून प्रतिक्रिया दिल्याचे दिसले तर थोडं सांगायचं प्रयत्न करतो... पण तुमच्या प्रश्नाचा रोख काय आहे हे कळलं तर नीट उत्तर देऊ शकेन...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
म
मृत्युन्जय Wed, 10/26/2016 - 13:18 नवीन
इथे कुणाच्याच आक्षेपाला कुणीच विचारत नाही. मुद्दा बरोबर असेल तर कंपु असो वा नसो समर्थन मिळते. त्यामुळे इथे कंपुचा संबंध नाही. ताळतण्त्र सोडुन कुणी वागत असेल तर जरुर समज द्यावी. जिथे मला दिसते तिथे तशी समज मी देतोच. जर तसे करणे मला योग्य वाटले तर,. त्यामुळे माझ्या प्रतिक्रियेवर प्रतिसाद देण्याचे प्रयोजन कळाले नाही हा मुख्य रोख आहे. शिवाय प्रतिसाद देताना मी प्रतिसाद अयोग्य का वाट्तो याची कारणेही दिलेली आहेतच. असो. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
क
कैलासवासी सोन्याबापु Wed, 10/26/2016 - 13:39 नवीन
मुद्दा बरोबर असेल तर कंपु असो वा नसो समर्थन मिळते. मिळत नाही.धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
श
शब्दबम्बाळ Wed, 10/26/2016 - 13:47 नवीन
अहो ती प्रतिक्रिया खरे काकांच्या प्रतिसादाला दिलेली आहे.. बघा पुन्हा! खरे काका काही वेळा मी त्या प्रतिक्रियेत लिहिल्या वाक्यांपैकी काहीतरी वापरतात(प्रसिद्ध आयडीला ) , त्या अनुषंगाने विचारले होते मी... असो, दिवाळीच्या तुम्हालाही हार्दिक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
म
मृत्युन्जय Wed, 10/26/2016 - 10:06 नवीन
अरेच्या. मग सगळे ठरवण्याचा ठेका काय मिपा व्यवस्थापनाने तुम्हालाच दिलाय की काय? तुम्ही नाही का श्री गुरुजींना " भक्त", ठरवुन टाकलेत? जर तुम्ही भाजपा विरोधक नसाल तर श्री गुर्जी आपचे खंदे कार्यकर्ते आहेत असे पण म्हणूयात की. हाकानाका. असो. असोच. ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा