हात दाखवून अवलक्षण
करण जोहरच्या आगामी सिनेमाच्या निमित्ताने उठलेल्या वादामुळे झालेली परिस्थीती आणि त्याच्या प्रदर्शनाला होणारा मनसेचा तीव्र विरोध याच्यावर तोडगा काढण्यात आला.
पण या सगळ्या प्रकाराने खालील प्र्श्न उदभवले आणि त्यावरच मिपाकरांची नक्की काय मते आहेत म्हणून हा काथ्याकुट.
- सिनेमावर एखाद्या राजकीय पक्षाने बंदी घातल्यावर सरकारची नक्की काय भूमीका असावी.
- निर्माते न्यायालयात जाण्याऐवजी थेट मुख्यमंत्र्यांकडे का जात असावेत.
- महाराष्ट्र वगळून हा सिनेमा व्य्वसाय करणार नाही काय? का तशी निर्मात्यांना भिती वाटली असावी?
- मुख्य्मंत्र्यांनी राज ठाकरेंना चर्चेस बोलावून अवाजवी महत्व दिले काय? असे तुम्हाला वाटते काय?
- आणि राज ठाकरेंनी ५ कोटीची सैनीक फंडाला मदत करण्याची सूचना करण्याची वाश्यकता काय किंबहुना त्यांना तसा अधिकारच कसा काय आहे?
- या वादात राज ठाकरे आणि फडणविस यांनी विनाकारण हात दाखून अवलक्षण केले आहे (आणि विरोधकांना आयते कोलीत दिले आहे) असे माझे प्रांजळ मत आहे.
💬 प्रतिसाद
(306)
स
संदीप डांगे
Wed, 10/26/2016 - 09:54
नवीन
=)) =))
आताही कोणी काय बघायचे हे कोणीतरी दुसरंच ठरवत आहे !!!
जनतेलाच ठरवू द्या ना थेट चित्रपट बघायचा कि नाही!!!
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 10/26/2016 - 11:17
नवीन
हा युक्तीवाद वरवर पाहता लॉजिकल वाटू शकेल, पण प्रत्यक्षात प्रत्येक गोष्टीत असे करता येईलच असे नाही. पॉर्न फिल्म्स अजिबात सेन्सॉर न करता, अॅडल्ट असे प्रमाणपत्र न देता उघडउघड चित्रपटगृहात प्रदर्शित कराव्यात. त्या पहायच्या का नाही ते जनतेलाच ठरवू देत असा युक्तीवाद सुद्धा करता येईल. जो देश भारताचा शत्रू आहे, ज्या देशातील नागरिक भारताचे शत्रु आहेत, जो देश सातत्याने भारतात दहशतवादी हल्ले करून इथल्या नागरिकांचे प्राण घेऊन, इथली मालमत्ता उद्ध्वस्त करून भारत नष्ट करण्याचा अथक प्रयत्न करीत आहे अशा देशातील नागरिकांना इथे येण्यास अधिकृत बंदी नसल्याने इथे बोलावून त्यांचे खिसे भरणे याला विरोध करणे योग्यच आहे.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Wed, 10/26/2016 - 11:24
नवीन
सेन्सॉर आहे! पण तो मुद्दा नाहीये!
देशभक्ती दाखवायची जबरदस्ती किंवा देशभक्ती दिसणार नाही याची भीती किंवा हे दोन्ही... ;)
- Log in or register to post comments
ग
गणामास्तर
Wed, 10/26/2016 - 11:29
नवीन
भारीचं आयडिया कि एकदम. मोठ्या पडद्यावर निळे चित्रपट लागलेच्च पाहिजेत असा कुणी तरी युक्तिवाद (यशस्वी) केला पाहिजे खरा.
- Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद
Wed, 10/26/2016 - 08:35
नवीन
ख्खिक! नाहीतर बहुतेक वेळेस लोकशाहीला सन्मानाने पालखीत घेऊन मिरवलाच जातं!
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Wed, 10/26/2016 - 09:52
नवीन
क्लासच!!!!!!
बहुतेक वेळा मिरवले गेले नाही म्हणून आम्हीही मिरवणार नाही असं म्हणणं आहे का प्रसाद भाऊ??
- Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद
Wed, 10/26/2016 - 14:13
नवीन
अजिबात नाही बापु! जरूर नाचावं कि पण सोयीस्करपणे नाही! उगाच पराचा कावळा करण्यासाठी लोकशाहीचा मुडदा वगैरे जरा जास्त वाटतं!
- Log in or register to post comments
प
पैसा
Tue, 10/25/2016 - 14:28
नवीन
ती मोठी अचिव्हमेंट असल्यासारखे सैन्याला चार पैशे मिळाले तर बरे अशी आधी कशाला झैरात करत होते? सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांनी का सांगितले नाही की आपला खंडणीला विरोध आहे? (आता पर्रीकर बोलल्यामुळे हा शब्द मी अधिकृतरित्या वापरत आहे.) ते समजले मारे तडजोड घडवून आणली म्हणून आपले कौतुक होईल. आता चारी बाजूनी फटके बसले, पर्रीकारांनी तर मस्त पूजा केली असणार खाजगीत. आता तो मी नव्हेच का!
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 10/25/2016 - 14:31
नवीन
कोणी अशी जाहिरात केली?
- Log in or register to post comments
प
पैसा
Tue, 10/25/2016 - 14:54
नवीन
http://www.misalpav.com/comment/892286#comment-892286
http://www.misalpav.com/comment/892316#comment-892316
http://www.misalpav.com/comment/892293#comment-892293
हे सगळे तुमचेच प्रतिसाद एकदा नीट वाचून बघा बघू! त्यात मुख्यमंत्र्यानी सगळा तोडगा काढला असे तुम्ही म्हणालात ना!
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 10/25/2016 - 19:10
नवीन
वरीलपैकी एका प्रतिसादात मी लिहिले आहे की "बाकी ५ कोटी रूपये देणगी किंवा चित्रपटाच्या सुरवातीला उरी हल्ल्यातील शहीद सैनिकांना श्रद्धांजलीचा फलक दाखविणे या तोडग्यातूनच निघालेल्या दुय्यम गोष्टी आहेत. हिंसक आंदोलन रद्द होऊन शांतताभंग टळला आणि त्यामुळे कायदापालन झाले व निदान भविष्यात तरी पाकड्यांना काम मिळणे बंद होईल या घोषणेमुळे लोकभावनेचाही विजय झाला हेच दोन महत्त्वाचे निर्णय या यशस्वी तोडग्यातून निघाले."
वरील वाक्यातून ५ कोटी रूपये मिळाले अशी फडणविसांनी किंवा मी जाहिरात केली आहे का? मी सुरवातीपासूनच हेच लिहिले आहे की रा़ज ठाकर्यांना आंदोलन करण्यापासून परावृत्त करणे हाच वाटाघाटींचा प्रमुख उद्देश होता. तो साध्य झाला. त्याव्यतिरिक्त ५ कोटींची देणगी, चित्रपटाच्या सुरवातीला फलक, भविष्यात पाकड्यांवर बंदी हे त्यातून निघालेले दुय्यम मुद्दे आहेत.
- Log in or register to post comments
र
रविकिरण फडके
Tue, 10/25/2016 - 13:50
नवीन
"म्हातारी मेल्याचे दु:ख नाही, काळ सोकावतो" हे खरे.
तो सोकावू नये असे वाटत असेल तर Pastor Niemoller च्या खालील ओळी लक्षात ठेवाव्या, हे बरे.
First they came for the Socialists, and I did not speak out,
Because I was not a Socialist.
Then they came for the Trade Unionists, and I did not speak out,
Because I was not a Trade Unionist.
Then they came for the Jews, and I did not speak out,
Because I was not a Jew.
Then they came for me—and there was no one left to speak for me.
झुंडशाही ही कुणाच्या, कधी, आणि कशी अंगावर येईल,
काय ठाऊक कधी तुमचाही करण जोहर होईल?
- Log in or register to post comments
ब
बबन ताम्बे
Tue, 10/25/2016 - 15:41
नवीन
.
- Log in or register to post comments
स
साहना
Wed, 10/26/2016 - 01:00
नवीन
सदर पास्टर महोदयांना भारतांतील भक्त मंडळींची ओळख नव्हती. इथे भक्त मंडळींना आपल्या परसांत काहीही गोंधळ झाला तरी शेजाऱ्याच्या भानगडींत नाक खुपसण्याची सवय. भाजप आणि संघाला मुस्लिम महिलांची चिंता, आपल्या हिंदूंना शाळा किंवा देऊळ चालवू देत नाहीत त्या बाबतीत डोके जमिनीत.
सध्या भाजप आपल्याच समर्थकांना ढोला प्रमाणे दोन्ही बाजूने वाजवत आहे आणि भक्त मंडळी त्याचे सुद्धा समर्थन करीत आहेत.
- Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर
Tue, 10/25/2016 - 14:43
नवीन
हैला,
पा़किस्तानला क्रिकेट खेळू देण्याबद्दल 'शरद पवार' बाळ ठाकरेंना 'मातोष्री' वर भेटतात तेंव्हा ती चर्चा असते.
आता 'राज ठाकरे' एका चित्रपटा संदर्भात 'वर्षा' वर गेले तर ती मांडवली असते.
यावेळी पहिल्यानेच श्री गुरुजींच्या सगळ्या प्रतिसादांशी सहमत आहे.
- Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद
Tue, 10/25/2016 - 15:03
नवीन
म्हणूनच म्हणतो - कि दुखणं चर्चा किंवा तथाकथित खंडणी हे नाहीये! दुखणं आहे मनसे सारख्या "फुटकळ", "गुंडांच्या" पक्षाला इतके महत्व कसे दिले जाऊ शकते!!
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Tue, 10/25/2016 - 15:09
नवीन
मनसे च्या ठिकाणी कोणतंही नाव टाका, चित्रपटाच्या ठिकाणी कोणताही विषय घ्या, गुंडगिरीला घाबरून एका घटनादत्त पदावरील व्यक्तीने असे तोडगे काढणे लोकशाहिस मारक आहे, पक्षभक्ती व विरोध क्षणभर बाजूला ठेवून विचार करावा सर्वांनी!
- Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर
Tue, 10/25/2016 - 15:50
नवीन
घटनादत्त पदावरील व्यक्तीने असे तोडगे काढणे लोकशाहिस मारक आहे
साहेब, कसल्या लोकशाहीच्या बाता चालू आहेत. राजकारण कोणत्या थरापर्यंत बोकाळले आहे हे सगळ्यांनाच ठाऊक आहे.
माझ्या मते मुख्यमंत्र्यांनी कोणताही कायदा न तोडता जनतेचे, पक्षाचे,स्वतःचे कमीत कमी नुकसान होईल असा तोडगा काढला.
राज ठाकरेंसारख्या व्यक्ती प्रमाणापेक्षा जास्त ताकदवान झाल्या याबद्दल सांप्रतच्या मुख्यमंत्र्यांना कसा काय दोष देणार?
तो तर या व्यवस्थेचा दोष आहे.
व्यवस्था बदलण्यासाठी सत्तेत असणे आवश्यक आहे. सत्तेत राहण्यासाठी 'ऐ दिल..' किंवा 'नाणिंज' सारख्या तडजोडी करणे आवश्यक आहे.
पाच कोटींच्या प्रस्तावाला माझा विरोध होता असे मुख्यमंत्री स्पष्ट म्हणत आहेत. त्यांच्यावर विश्वास ठेवायचा की नाही हे ज्याने त्याने ठरवायचे.
शिवाय पाच कोटींची मागणी राज ठाकरेंनी केली तरीदेखील त्याचा दोष मुख्यमंत्र्यांच्या डोक्यावर का फोडला जातो ते कळत नाही.
या वाटाघाटी करत असताना त्यांनी नजिकच्या निवडणुकांसंदर्भात काही वाटाघाटी केल्या असतील तर त्यात काही गैर आहे असे वाटत नाही.
फार फार तर मुख्यमंत्र्यांनी साधन शुचिता पाळली नाही इथपर्यंत आरोप त्यांच्यावर करता येईल. पण मुख्यमंत्रीपदी बसणार्या माणसाला अशी साधन्शुचिता पाळता येत नाही.
माझ्या मते मुख्यमंत्र्यां साठी ही 'विन-विन' नसून 'लूज-लूज' सिचुएशन होती. म्हणजे काहीही केले तरी या क्रूतीबद्दल मार खावा लागणार हे त्यांना स्पष्ट माहीत असावे. पैकी कमीत कमी त्रास होईल असा पर्याय त्यांनी निवडला.
प्रूथ्वीराज चव्हाण किंवा फडणवीस यांच्यासारख्या चतुर आणि स्वच्छ सीएमना अशा कसरती करण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. अन्यथा त्यांना राजकीय आत्महत्या करावी लागेल. शिवाय नंतर एखादा बनेल माणूस त्यांच्या जागी येउन बसेल नाही का ?
- Log in or register to post comments
प
पैसा
Tue, 10/25/2016 - 16:01
नवीन
जर का सैनिक वेल्फेअर निधीला मदत ही मागणी मुख्यमंत्र्यांची नव्हती तर ते त्यानी आता दोन दिवसानी का स्पष्ट केले? सुरुवातीला का सांगितले नाही?
त्याहून बेसिक प्रश्न. जर का ती करण जोहर आणि राज ठाकरे यांच्यातली सेटलमेंट असेल तर त्यात मुख्यमंत्री नेमके कशासाठी होते आणि काय करत होते? त्यांनी त्या दोघांच्या मधे असायची गरजच नव्हती ना!
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Tue, 10/25/2016 - 16:05
नवीन
परत एकदा टंकनश्रम वाचवल्याबद्दल धन्यवाद!
दोघांच्या वादात मुख्यमंत्री का कडमडले?
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 10/25/2016 - 19:21
नवीन
मुख्यमंत्र्यांनी यच्चयावत प्रत्येक गोष्टीचे स्पष्टीकरण देणे गरजेचे नाही. सुरवातीला करण जोहर व इतर काही जण राजनाथसिंगांना भेटून आले होते. त्यांनी चित्रपटाला संरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते व त्याबाबतीत फडणविसांशी बोलण्यास सांगितले होते कारण राज्यातील कायदासुव्यस्थेचा प्रश्न केंद्राच्या नसून राज्याच्या हातात असतो. त्याला अनुसरूनच मुख्यमंत्र्यांनी दोघांना एकत्र समोरासमोर आणले. जर राज व करण आपापपसात बोलून प्रश्न सोडवू शकले असते तर तिसर्या व्यक्तीची गरजच नव्हती. परंतु ते दोघेही आपल्या भूमिकेवर अडून होते.
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Tue, 10/25/2016 - 19:34
नवीन
हायला, नावांत पण राजकारण
- Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर
Wed, 10/26/2016 - 07:38
नवीन
जर का ती करण जोहर आणि राज ठाकरे यांच्यातली सेटलमेंट असेल तर त्यात मुख्यमंत्री नेमके कशासाठी होते आणि काय करत होते?
गॄहखाते फडणवीसांकडेच आहे ना.ही सेटलमेंट करुन शांतता राखता आली तर बरे, शिवसेनेला शह देता आला तर बरे, मुंबई निवडणूकीच्या वाटाघाटी करता आल्या तर बरे असा प्रयन असावा. त्यात चुकीचे काय आहे ?
जर का सैनिक वेल्फेअर निधीला मदत ही मागणी मुख्यमंत्र्यांची नव्हती तर ते त्यानी आता दोन दिवसानी का स्पष्ट केले? सुरुवातीला का सांगितले नाही?
शंकेखोर लोकांनी जेव्हा वर्तमानपत्रे, समाज माध्यमे इत्यादीतून प्रश्न विचारले तेंव्हा सांगितले. आधीच एक्स्प्लनेशन देणे म्हणजे जणू काही गुन्हा केला आहे असे वाटून घेतल्यागत झाले असते.
- Log in or register to post comments
प
पैसा
Wed, 10/26/2016 - 08:12
नवीन
ज्या कसल्या वाटाघाटी देवघेव करायची ती त्यांना करू देत. सैनिक कल्याण निधीला देणगी द्या हे सांगण्याचा शहाजोगपणा, अगोचरपणा मला अजिबात आवडलेला नाही. मला कोण विचारतोय म्हणा! खरे तर स्वतः मुख्यमंत्र्यानीच इतर दोघांशी चर्चा करायचे कारण नव्हतेच. कोणीही सेक्रेटरी, पोलीस आयुक्त करू शकले असते. बरे चर्चा केली तर स्पष्ट सांगायला पाहिजे होते की तुम्हा दोघाना कुठच्या खड्ड्यात जाऊन पडायचे तिकडे पडा, पण सैनिकांना यातून लांब ठेवा. आता आमच्यासारखे आलतूफालतू लोक सोडा, पर्रीकरांनी हे एक्झॅक्ट शब्द वापरले आहेत तेव्हा हे वागणे किती अश्लाघ्य आहे हे तुम्ही लोकच ठरवा.
पर्रीकरांबद्दल काय वाटेल ते इथे मिपावर बोलले गेले आहे. त्या लोकांच्या माहितीसाठी सांगते. केंद्रात आणि महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता होती. पर्रीकर गोव्यात मुख्यमंत्री होते. तेव्हा एकदा नारायण राणेंचे आमदार नसलेले चिरंजीव गोव्यात गाड्यांचा ताफा घेऊन येत होते. प्रवेश कर भरायच्या बूथवर कर्मचार्यांनी त्याना अडवले आणि नियमाप्रमाणे ज्या गाड्या सिंधुदुर्गात नोंदणी झालेल्या आहेत त्या सोडून मुंबई रजिस्ट्रेशन वाल्या इतर गाड्यांसाठी प्रवेश कर भरा सांगितले. राणेंच्या ताफ्यातल्या लोकांनी लगेच गुंडगिरी करून टोल बूथची मोडतोड केली आणि तिथल्या कर्मचार्यांना दमदाटी करून मारहाण केली. त्यावेळी राणे सुपुत्राला झोडून काढून आत टाकला होता आणि त्याला सोडवायला स्वतः नारायण राणेंनी येऊन जामीन भरला होता. ही एका लहान राज्याच्या मुख्यमंत्र्याची धमक.
- Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर
Wed, 10/26/2016 - 09:00
नवीन
सैनिक कल्याण निधीला देणगी द्या हे सांगण्याचा शहाजोगपणा, अगोचरपणा मला अजिबात आवडलेला नाही.
हे चुकीचेच आहे. 'देणगी द्या' असे राज ठाकरे यांनी सांगितले. सीएमने नाही. काल तर त्यांनी मी या देणगी प्रस्तावाला विरोध केला असेही सांगितले.
कोणीही सेक्रेटरी, पोलीस आयुक्त करू शकले असते.
फडणविसांकडे गॄहखाते सुद्धा आहेच ना.
पर्रीकर चांगले काम करतात. फक्त त्यांनी वाचाळ पणा कमी केला तर मस्तच.
प्रत्येकाची काम करण्याची शैली वेगळी.
फ्डणवीसांनी मध्यस्थी केली म्हणजे फार मोठा गुन्हा केला अशा स्वरुपाच्या आरोपांना आक्षेप आहे. इतकेच.
- Log in or register to post comments
प
पैसा
Wed, 10/26/2016 - 11:27
नवीन
पर्रीकर वाचाळ अजिबात नाहीत. फटकळ जरूर आहेत. काही कृती न करता नुसती बडबड करणार्याला वाचाळ म्हणतात. पर्रीकर १० करतील आणि एक बोलतील. एक तर ते खरे बोलतात किंवा मग बोलत नाहीत. इतके खरे बोलणे नुसते ऐकायलाही बर्याच लोकांना सोसत नाही.
- Log in or register to post comments
इ
इरसाल
Wed, 10/26/2016 - 14:04
नवीन
हे मुख्यमंत्री मधे पडायचं प्रकरण, घटस्फोटातुर कौन्सिलिंगसाठी गेलेल्या पतिपत्नी सारखं नाही वाट्त ???
- Log in or register to post comments
प
पैसा
Wed, 10/26/2016 - 14:47
नवीन
सांभाळा! साधारण असंच कायतरी मी म्हटलं की उद्या नवराबायकोच्या भांडणात मुख्यमंत्री पडणार का, तर गुर्जी मला म्हणले मी जामोप्यासारखे लिहिते आहे. =))
बादवे, या नव्राबायकोला घटस्फोट नको होता. 'वो' ला संसारात सामावून घेण्यासाठी नवर्याने बायकोला काय गिफ्ट द्यावी, का तिच्या माहेरच्याना गिफ्ट द्यावी असा काहीसा मामला होता. असं नाही का तुम्हाला वाटत? =)) =)) मग तिथे कौन्सेलर काय सांगणार? मेव्हणीला हिर्याचा सेट द्या आणि तिघांनी नांदा सौख्यभरे? =))
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Tue, 10/25/2016 - 16:03
नवीन
राज ठाकरेंसारख्या व्यक्ती प्रमाणापेक्षा जास्त ताकदवान झाल्या याबद्दल सांप्रतच्या मुख्यमंत्र्यांना कसा काय दोष देणार?
^^ आप्पा, तुम्ही नक्की काय बोलताय हे लक्षात येतंय काय?
राज ठाकरे ताकदवान आहेत व तेही मुख्यमंत्री ह्या पदापेक्षा?
मग सारा कारभार राज ठाकरे का चालवत नाहीत? किंबहुना इतका ताकदवान माणूस राज्यात सत्तेवर का नसावा?
एखादी व्यक्ती ताकदवान आहे हे म्हणतांना तुम्ही सांप्रत सरकारला कमकुवत म्हणत आहात चक्क! आताच्या सरकारचे हात मागच्या सरकारने बांधलेत का?
राष्ट्रवादीवर, पवारांवर ते किती क्षुद्र आहेत अशी हिरीरीने मांडणी करणारे आज बस फडणवीस अडकलेत म्हणून राज ठाकरेला खूप महत्त्वाचा, डेंजर वगैरे सिद्ध करण्यात टंकनबळ घालवत आहेत,
आधी संताप येत होता आता हसू येतंय...
- Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर
Tue, 10/25/2016 - 18:26
नवीन
राज ठाकरे मुख्यमंत्रीपदापेक्षा ताकदवान आहेत, सांप्रत सरकार कमकुवत आहे, आताच्या सरकारचे हात बांधलेत असे मी कुठेच लिहिले नाही.ते कदाचित तुम्ही ठरवून टाकले असेल.
मी फक्त ते म्हणजे राज ठाकरे ताकदवान आहेत इतकेच लिहिले.
कोणत्याही पक्षाच्या राज्य सरकारला दखल घ्यावी लागते इतके उपद्रव मूल्य आहे म्हणून ताकदवान.
सत्ता मिळवण्याइतके बलवान नव्हेत.
बाकी राष्ट्रवादी, पवार आणि फडणवीस ही तुलना उचित नाही.
पवारांना फडणविसांइतकी राजकीय उंची गाठणे अशक्य आहे.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Tue, 10/25/2016 - 18:32
नवीन
चार पाच हजार गुंड हाताशी धरून कोणी एखादा मुख्यमंत्री जेरीस आणू शकतो तो नक्कीच ताकदवान असेल,
काय राव बोलताय? आपली विधानं परत एकदा वाचून बघा, नक्की काय अर्थ निघतोय,
राज ठाकरेंना अटक झाली होती तेव्हाचे वातावरण आठवत असेल... ते तेव्हा होतं आता नाही.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Wed, 10/26/2016 - 06:10
नवीन
डांगे अण्णा
आपला मुद्दा सिद्ध करण्याच्या नादात एका राजकीय पक्षाला आपण फक्त गुंडांचा गट म्हणुन ठरवून मोकळे झालात. आजही या पक्षाचे विविध महापालिकांत सव्वाशे च्या वर नगरसेवक असतील. मागच्या निवडणुकीत एक आमदार निवडून आला परंतु त्यांच्या अगोदरच्या निवडणुकीत १३ आमदार होते.
तेंव्हा चार पाच हजार गुंड हाताशी धरून हि भाषा अति होते आहे असे वाटते.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Wed, 10/26/2016 - 07:15
नवीन
'फक्त गुंडांचा गट' हे माझे नव्हे, तुमचे शब्द आहेत.
आपले शब्द दुसऱ्यांच्या तोंडी कोंबून फार मोठा तीर मारला असे वाटून घेण्याचा नाद अनेकांना लागलाय, तुमच्यासारखे सुविद्य लोकही त्यात सामील होतात हे बघून सखेद आश्चर्य वाटले.
- Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद
Wed, 10/26/2016 - 07:00
नवीन
हे कशावरून ठरवता बुआ तुम्ही? मला वाटतं खरंच गल्लत होतेय, तुमचा वैयक्तिक विरोध आणि मनसेची खरी ताकद यात! साहेब आज हि राज ठाकरेंचं भाषण सर्व माध्यमे बाकी सगळं बाजूला सारून थेट प्रक्षेपित करतात! प्रत्येक वेळेला मतदान आणि निवडून आलेल्या लोकांची संख्या हेच एकमेव गणित नसतं हे सांगण्याची गरज आहे का? या हिशेबाने आठवलेंना तर राजकारणातून संन्यासाच घ्यावा लागला असता!
- Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर
Wed, 10/26/2016 - 07:43
नवीन
चार पाच हजार गुंड हाताशी धरून कोणी एखादा मुख्यमंत्री जेरीस आणू शकतो तो नक्कीच ताकदवान असेल
मुख्यमंत्री जेरीस आले असे तुम्हीच ठरवून टाकले त्याला काहीही आधार नाही. माझ्या मते करण जोहर चित्रपट रिली व्हावा यासाठी आणि राज ठाकरे काहीच वाटाघाटी कशा होत नाहीत यासाठी जेरीस आले होते. त्याचा फायदा मुख्यमंत्र्यांनी करुन घेतला. त्यात काहीच चूक नाही.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 10/25/2016 - 19:16
नवीन
प्रत्येकाचं वेगवेगळं दुखणं आहे. आपला नेहमीचा मुद्दा आपण उचलण्याच्या आतच मनसेने यशस्वीपणे पळविला व मनसे त्याचा निवडणु़कीत फायदा घेईल हे शिवसेनेचे दुखणं. तर फडणविसांनी वाटाघाटी केल्याने तोडफोड, दंगे टळले व त्यामुळे फडणविसांना धारेवर धरण्याची संधी गेल्याचं काँग्रेस-राष्ट्रवादीचं दुखणं. तर कलेला, कलाकारांना देशाचं, सीमेचं बंधन नसतं असा फुटकळ व संतापजनक प्रतिवाद करून पाकड्यांची चाटणं आता आता बंद करावे लागणार असं पाकिस्तानप्रेमी शबाना आझमी वगैरेंचं दुखणं.
- Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ
Tue, 10/25/2016 - 23:30
नवीन
<पाकड्यांची चाटणं आता आता बंद करावे लागणार असं पाकिस्तानप्रेमी शबाना आझमी वगैरेंचं दुखणं.>
वा वा!! सुंदर भाषा... आपल्यापेक्षा वेगळे मत असणे म्हणजे गुन्हाच नाही का??
मग काय म्हणताय, पाठवायचय का त्यांना पाकिस्तानला? का कोणी तशी मागणी करेपर्यंत थांबायच म्हणता??
- Log in or register to post comments
स
साहना
Wed, 10/26/2016 - 01:08
नवीन
कायद्याचे राज्य आणण्याची अपेक्षा असलेल्या एका तरुण मुख्यमंत्र्याने आपली जबाबदारी हटकून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकां बरोबर वाटाघाटी करून आपल्या पदाचा आणि जनतेने दिलेल्या मतांचा अपमान केला हे दुखणं सुद्धा आमच्या सारख्या अनेकांना आहे. उद्या मुंबईत इस्लामी गुंड प्रभावी झाल्यानंतर मुख्य मंत्री असल्या वाटाघाटी करून "१००% हिजाब नको पण हिंदू मुलींनी किमान केस तरी झाकावेत" असा तोडगा काढतील. आणि भक्त मंडळी "इस्लामी गुंडापासून होणारी हिंसा मुख्यमंत्र्यांनी आपल्या मुसुद्देगिरीने कशी टाळली" ह्याहूची हरिकथा सांगत बसतील.
- Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद
Wed, 10/26/2016 - 09:05
नवीन
एकूणच जनतेच्या मतांचा खूप आदर करता तर तुम्ही. म्हणूनच जनतेच्या मतांवर अधिकृत बनलेल्या आणि अजूनही जनप्रतिनिधी बाळगून असणाऱ्या पक्षाचा उल्लेख तुम्ही वारंवार फुटकळ गुंडांचा पक्ष असा करत आहात. बाकी तुमची उदाहरणे मात्र फक्त तुमचा मुद्दा पुढे रेटण्यासाठीची आहेत असं मला वाटतं. असे झाले तर तसे झाले तर... बरेच काही झाले तर बरेच काही होऊही शकते. सद्यपरिस्थितीत तरी तसे काही घडले नाही आणि घडण्याची शक्यता नाही. मुख्यमंत्र्यानी चर्चेने प्रश्न सोडवला (मूळ प्रश्न सुटलाय कि नाही माहित नाही, कारण अजून हि काही चित्रपट रांगेत आहेत आणि श्याम बेनेगल सारखे लोक हेकेखोरपणे चित्रपट बनवण्याच्या तयारीतच आहेत) म्हणून उद्या राज्यात बेकायदेशीरपणा बोकाळणार असे म्हणणे हा "क्राय फाऊल" वाटतो.
- Log in or register to post comments
प
पुंबा
Wed, 10/26/2016 - 09:53
नवीन
श्याम बेनेगल सारखे लोक हेकेखोरपणे चित्रपट बनवण्याच्या तयारीतच आहेत
हे खोटे आहे असा खुलासा स्वतः बेनेगलांनी केला आहे.
- Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद
Wed, 10/26/2016 - 14:22
नवीन
ओह्ह! आय इट माय वर्ड्स देन! त्या नारायण कि काहीतरी नावाच्या दिग्दर्शकाने तसं म्हटल्याचा विडिओ आला होता मध्ये त्यावरून माझं तसं मत होतं. तसं नाही घडलं तर छानच!
- Log in or register to post comments
ज
ज्योति केंजळे
Tue, 10/25/2016 - 15:39
नवीन
"मातोश्री"
अप्पा लीहा बघु १०० वेळा ;)
- Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क
Tue, 10/25/2016 - 19:39
नवीन
तुम्ही "लिहा" लिहा बघू १०० वेळा ;)
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Tue, 10/25/2016 - 15:48
नवीन
पा़किस्तानला क्रिकेट खेळू देण्याबद्दल 'शरद पवार' बाळ ठाकरेंना 'मातोष्री' वर भेटतात तेंव्हा ती चर्चा असते
^^^
आप्पा, डिटेल्स प्लिज...!
- Log in or register to post comments
ग
गणेश उमाजी पाजवे
Wed, 10/26/2016 - 18:12
नवीन
खालील लिंक पहा http://www.dnaindia.com/mumbai/report-pawar-and-thackeray-talked-cricket-1141499यात शरद पवार, बाळासाहेब ठाकरेंना भारत-पाकिस्तान म्याच साठी भेटल्याची स्पष्ट बातमी आहे.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Tue, 10/25/2016 - 16:16
नवीन
पैसाताई,
साफ चूक ! इथे पोलीसच बलात्कारित आहेत. त्यांना वाचवणारा माणूस राज ठाकरे आहे. मग पोलिसांच्या जोरावर फडणवीस राज ठाकऱ्यांना काय अटक करणार?
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
प
पैसा
Tue, 10/25/2016 - 16:28
नवीन
खरेच वाचवले? का सगळी स्टंटबाजी नुसती? बरं समजा एकदा उपकार केले तर आता त्याची किंमत वसुली करत आहेत ते असं म्हणताय का तुम्ही? मग तसे असेल तर पोलिसांच्या वाईट अवस्थेला इतर राजकारण्यांइतकेच तेही जबाबदार आहेत.
मुंबई हल्ल्यात स्वतःचा जीव घालवून कसाबला कोणी पकडला हो? सैन्याचे कमांडो मुंबईत येईपर्यंत किल्ला कोणी लढवला होता? एवढे मोठे उदाहरण असताना पोलीस अगदी हतबल आहेत असा प्रचार का सुरू आहे? त्याना फ्री हँड द्या आणि मग बघा काय होते ते. आपल्याला वाचवणार्या राजला पोलीस अटक करणार नाहीत असे व्हायला ही काही मोगलाई नाही. मग आरोपी कोणी सोम्या गोम्या असो की कोणी तथाकथित मोठा माणूस. जो आदेश असेल तो पोलीस पाळतीलच.
- Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद
Tue, 10/25/2016 - 17:41
नवीन
स्टंटबाजी होती की नाही हे एखाद्याच्या पूर्वग्रहदूषित विचारांवर अवलंबून नसेल काय? मला नाही वाटत ती स्टंटबाजी होती..बाकीच्या पक्षांना त्या गोष्टीची दाखल घ्यावी वाटली नाही. आणि आता ते पोलिसांकडून कसली बुआ वसुली करत आहेत? त्यांनी त्यांच्या आंदोलनाचा रोख जाहीर केला होता आणि त्यासाठी तरीही कायदेशीर कारवाई करू नका असा सांगीतल्याचं ऐकिवात नाही.
- Log in or register to post comments
प
पैसा
Tue, 10/25/2016 - 18:31
नवीन
या गामा पैलवान यांच्या विधानावर मी प्रश्न विचारलाय. आता क्लिअर आहे ना? वाचवण्याची किंमत म्हणून पोलीस राजला पकडणार नाहीत असा पैलवान यांच्या म्हणण्याचा अर्थ होतो ना? त्यापलिकडे मी एक अक्षरही बोललेले नाही. राज ठाकरे काय म्हणाले का म्हणाले नाहीत हे इथे कुठून काय आले?
- Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद
Wed, 10/26/2016 - 04:24
नवीन
ओके,क्लीअर! पण इथे पोलीस हा मुद्दाच नाही आणि त्यांना मोकळीक देण्याचा तर आणखीनच नाही. त्यांची भूमिका आंदोलनानंतर आली असती आणि मला वाटतं ती त्यांनी नक्कीच पार पाडली असती.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- ›
- »