हात दाखवून अवलक्षण
करण जोहरच्या आगामी सिनेमाच्या निमित्ताने उठलेल्या वादामुळे झालेली परिस्थीती आणि त्याच्या प्रदर्शनाला होणारा मनसेचा तीव्र विरोध याच्यावर तोडगा काढण्यात आला.
पण या सगळ्या प्रकाराने खालील प्र्श्न उदभवले आणि त्यावरच मिपाकरांची नक्की काय मते आहेत म्हणून हा काथ्याकुट.
- सिनेमावर एखाद्या राजकीय पक्षाने बंदी घातल्यावर सरकारची नक्की काय भूमीका असावी.
- निर्माते न्यायालयात जाण्याऐवजी थेट मुख्यमंत्र्यांकडे का जात असावेत.
- महाराष्ट्र वगळून हा सिनेमा व्य्वसाय करणार नाही काय? का तशी निर्मात्यांना भिती वाटली असावी?
- मुख्य्मंत्र्यांनी राज ठाकरेंना चर्चेस बोलावून अवाजवी महत्व दिले काय? असे तुम्हाला वाटते काय?
- आणि राज ठाकरेंनी ५ कोटीची सैनीक फंडाला मदत करण्याची सूचना करण्याची वाश्यकता काय किंबहुना त्यांना तसा अधिकारच कसा काय आहे?
- या वादात राज ठाकरे आणि फडणविस यांनी विनाकारण हात दाखून अवलक्षण केले आहे (आणि विरोधकांना आयते कोलीत दिले आहे) असे माझे प्रांजळ मत आहे.
मोगाखान ला सर्रास शिव्या पडताना गप्प एन्जॉय करणारे, गुरुजींची पडेल बाजू सांभाळायला, (पर्यायाने भाजपची ) सरसावून मैदानात येतायत, कभी ख़ुशी कभी गम!गुरूजींची पडेल बाजू कोण सांभाळत आहे..? इथे तुमच्या प्रतिसादाला विरोध नोंदवणार्या किती जणांनी गुरूजींना पाठिंबा दर्शवला आहे? नीट बघा जरा.'माझी भाषा' याविषयी चाललेले विचारमंथन म्हणजे गुरुजींच्या उघड्या पडलेल्या पितळाला झाकण्याची, मूळ मुद्द्यावरून लक्ष हटवण्याची केविलवाणी धडपड, ऐ दिल है मुश्किल!हा हा.. खूपच विनोदी प्रतिवाद. यावर शब्द खुंटले. मुद्द्यावरून लक्ष हटवणे...??? - गिव्ह अ ब्रेक..!!!!!माझे प्रतिसाद आक्षेपार्ह असतील तर संपादक मालक कार्यवाहीसाठी समर्थ आहेत, मालकांची द्वाही देणाऱ्यांना इतके समजले तरी पुरे! कभी अलविदा ना कहना!असो. यावर पास.कुणाचेही नाव घेऊन कुणाला अपशब्द वापरला नाही ही नेहमीची अलिबाय, माझ्याच बाबतीत नेहमी विसरतात कसे, याचेही आश्चर्य नाही! कल हो ना हो!यासाठी आपण स्वतः शब्द जपून वापरायचे असतात. कोण कुणाच्या सहाय्याने कोणत्या विचारधारेची भलामण करत असते आणि कोण सरसकटीकरणाचे पिवळे चष्मे घालून प्रतिसादांचा रतीब पाडत असते हे न कळण्याइतके पब्लीक खुळे नसते. असो, तुमच्या प्रतिसादाला विरोध केला तर लगेचच सरसकट वैयक्तीक लेबले लाऊन आलेला प्रतिसाद पाहून आश्चर्य वाटले नसले तरी याही प्रतिसादाचा टोन पटला नाही हे खेदपूर्वक नमूद करतो.एक तर संशय म्हणजे आरोप नव्हे.आरोपाच्या पूर्वीची पायरी किंवा आरोप करण्याइतके पुरावे नाहीत पण धुरळा उडवायचा आहे म्हणून काढलेली पळवाट असे काही आहे का..?आणि असे संशय व्यक्त करण्यासाठीच तर माध्यमे असतातपैशांच्या मोहाने माध्यमांची विश्वासार्हता रसातळाला गेली आहे हे माहिती होते पण असे सार्वजनिकरीत्या कबूल होईल असे वाटले नव्हते. असो. माध्यमे संशय व्यक्त करण्यासाठी नसतात तर माध्यमांचे काम "निरपेक्षपणे विचार मांडणे आणि कोणत्याही घडामोडींवर संतुलीत भुमीकेने व्यक्त होणे" असे असावे. अर्थात हे मी माझ्या अत्यल्प अनुभवावरून आणि कोणत्याही विचारधारेच्या दावणीला बुद्धी न बांधता बोलत आहे. तुमचे विचार वेगळे असतील तर मान्यच आहे.तुम्ही आमच्यावर संशय घ्यायचे, आम्ही तुमच्यावर हे चालतेचतुम्ही / आम्ही..?? मी कोणत्याही पक्षाचा प्रवक्ता नाहीये हो, तसेच कोणत्याही प्रकरणाचे पुरावे माझ्यापर्यंत गुप्तपणे पोहोचण्याची सुतराम शक्यता नसल्याने मी कधीही कोणताही संशय व्यक्त करत नाही.आणि भाजपसुद्धा काही धुतल्या तांदळासारखा नाही. डाळ घोटाळे, व्यापम (हा तर अनेक खून पडलेला न भूतो न भविष्यति असा घोटाळा, यात एकटा भाजप नव्हता, तरीसुद्धा) वगैरे..या वाक्याचा संदर्भ कळाला नाही.आरोप केलेला नाही याबद्दल ठाम. त्यामुळे तुमची आव्हानेबिव्हाने स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही.मी आव्हान दिले आहे हे शोधून दाखवा बरं. तुम्ही खुलेपणाने संशय व्यक्त करत आहात म्हणजे तुमच्याकडे काहीतरी खास पुरावे असावेत म्हणून मी म्हटले आहे की "भाजपाने पैसे खाल्ले आहेत आहे असे छातीठोकपणे सांगत असाल तर पुरावे आणा" सांगोवांगीच्या गप्पा असतील तर तसे सांगा.@मोदक भाऊ, @बोक्याभाऊ, @मृत्युंजय भाऊ, इथे कोणाच्यातरी नावाचा श्लेष अतिशय हीन पद्धतीने होतोयबापू - वरती संडास अशा शब्द वापरला आहे ते संदीप डांगेना उद्देशून आहे असे तुमचे म्हणणे आहे का? नीरक्षीरविवेकाबद्दल - श्रीगुरूजींना या धाग्यावरच नव्हे तर अनेक ठिकाणी त्यांचे प्रतिसाद चुकत आहेत, त्यांच्या प्रतिसादांनी भाजपाचे नुकसानच होत आहे असे सांगून झाले आहे. त्यामुळे येथेही त्यांच्या विचारांना दोन वेळा विरोध दर्शवून नवीन मुद्द्याची वाट बघत आहे. आणखी काय नीरक्षीरविवेक अपेक्षित आहे..? सुज्ञ यांच्या कमेंटबद्दल - मुळात या धाग्यावर मुख्यमंत्र्यांना हरामखोर म्हटलेले मला आढळलेले नाहीये. त्यामुळे त्यांना नक्की काय अभिप्रेत आहे माहिती नाही. जर त्यांना मिपावर कुठेतरी म्हटले गेलेले अपेक्षित असेल तर त्याबद्दल इतकेच म्हणू शकतो की इथे साक्षात शिवाजी महाराजांना शिव्या दिल्या गेल्या आहेत त्यांच्या कामगिरीवर त्यांनी अफझलखानाला मारलेच नाही असेही सर्टिफिकेट देवून खोटे ठरवले गेले आहे (हे प्रतिसाद आता उडाले आहेत) मग मुख्यमंत्री किस झाड की पत्ती..? मी जसे डांगेंच्या प्रतिसादाला विरोध दर्शवला तसा गुरूजींच्या अनेक प्रतिसादाला विरोध दर्शवला आहे. अर्थात गुरूजींनी स्वत:च्या प्रतिसादांना नेहमी स्वतः प्रतिवाद केला आहे, चुकीचा असला तरी. माझ्या मते डांगे या मुद्द्यापासून कोसो दूर आहेत कारण त्यांच्यावर शेकलेल्या कांही प्रकरणामध्ये ते स्वत: कमी आणि त्यांच्या वतीने तुम्हीच लगेच प्रतिवाद करता असेही दिसून आले आहे. आता हे सगळे सांगावयाचे काम जर संपादक मंडळाचे असेल आणि त्याबाबत आमच्यासारख्या सामान्य सदस्याने बोलू नये असे कोणाचे मत असले तर तसे सांगा.मोगाने एकदातरी कोणाची पत्नी, भाऊ, जीवशास्त्रीय संबंध ह्यावर थिल्लर कॉमेंट केली आहे का ??अनेकदा केली आहे. दाखवून देऊ का..? अर्थात नक्की कोणत्या आयडीने केली आहे आणि तो आयडी मोगाखानचा आहे का? हा वादाचा मुद्दा आहे आणि रोज आयडी बदलण्याची वेळ आल्याने असे होणारच. तरीही त्याचे मोदींबद्दलचे विचार शोधून बघा, तुम्हाला अपेक्षित असलेल्या कमेंट्स पेक्षाही विखारी कमेंट्स मिळतील.मी किंवा डांगेंसारख्या कोणी जर फक्त त्या प्रश्नांची उत्तरे मागितली तर आम्हाला सरसकट मोगा समर्थक अन यझ वगैरे म्हणणाऱ्या लब्धप्रतिष्ठित भद्रजनांनाही कधी जाब विचाराबापू, या प्रकरणाची मला कल्पना नाही. रोज नवीन नवीन कपडे घालून इतके आयडी अवतरतात. किती जणांचा ट्रॅक ठेवणार..? आणि असा किती जणांना विरोध दर्शवणार..? जेथे शक्य आहे तेथे विरोध दर्शवला आहे आणि जेथे विरोध दाखवला नाही तेथे मी (विरोध दाखवला नाही म्हणून) त्या विचारांशी सपशेल सहमत आहे असेही नक्कीच नाही. मी विरोध असेल तर स्पष्ट आणि सहमती असेल तर तीही सुस्पष्टरीत्या दाखवतो. प्रत्येक धाग्यावर प्रत्येक ठिकाणी प्रतिसाद देणे शक्य होत नाही ही माझी मर्यादा समजा. माझ्यापुरते बोलायचे झाले तर मी तुम्हाला मोगा समर्थक म्हटलेले मला आठवत नाही आणि तसे घडेल याची शक्यता नाही.