काल मध्यरात्री भोपाळ येथीत तुरूंगात असलेल्या सिमीच्या ८ संशयित दहशतवाद्यांनी मध्यरात्री एका रक्षकाची हत्या करून तुरूंग फोडून पलायन केले. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या शोधावर जाऊन ते जिथे लपले होते ती जागा शोधून काढली व त्यांच्याशी झालेल्या चकमकीत सर्व ८ संशयित दहशतवादी ठार झाले.
अपेक्षेप्रमाणे हे एनकाऊंटर बनावट असावे असा संशय काँग्रेस, आआप व माकपच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे. सर्व संशयित दहशतवादी मुस्लिम असल्याने त्यांची प्रतिक्रिया अपेक्षितच होती. यापूर्वीही बाटला हाउसमधील चकमकीत मारल्या गेलेल्या २ दहशतवाद्यांच्या मृत्युबद्दल काँग्रेसने गळा काढला होताच.
मला व्यक्तिशः हे संशयित दहशतवादी मारले गेल्याचे अजिबात दु:ख नाही. परंतु यावेळी घडलेल्या घटनाक्रमात पूर्ण सुसंगती दिसत नाही. काहीतरी मिसिंग आहे. नक्की काय घडले ते काही दिवसात बाहेर येईलच.
SIMI activists’ jailbreak: Encounter, contradictions, politics and all that happened today
Candyman about 7 hours ago
Pakistan is dealing with a completely different neighbour this time now. Wisdom says, as a CBMs, both the states should take steps that demonstrate they are serious about peace in the region.
झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवर ५ वर्षांची बंदी !
चुकीच्या वेळी घेतलेला निर्णय.
नोटबंदीचा निर्णय अंमलात आणतानाच आधिच देशाची आणि व्यवस्थेची तारांबळ उडत आहे.
हा निर्णय थोडा लांबविला असता तर आभाळ कोसळण्यासारखी परिस्थिती नव्हती.
विरोधकांच्या आणि माथेफिरुंच्या हातात आयतं कोलीत मिळणार की राडा करायला पैसे असणार नाही म्हणून ही वेळ साधली कोणास ठाऊक !
या निर्णयाकडे माध्यमांनी दुर्लक्ष केलेले दिसते. इतर राजकीय पक्षांनीही प्रतिक्रिया दिल्याचे दिसले नाही. नोटा बदलण्याच्या गोंधळात हा निर्णय दुर्लक्षिला जाईल हे ओळखून बंदी घातलेली दिसते.
+१११
आपले काळे पैसे वाचवण्यासाठी प्रयत्न करण्याच्या आणि / किंवा आपले राजकिय भांडवल वाचविण्याची धडपड करण्याच्या गडबडीत कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही नेत्याला झाकीर नाईकबद्दल उमाळा आलेला दिसत नाही ! :)
या निर्णयाकडे माध्यमांनी दुर्लक्ष केलेले दिसते. इतर राजकीय पक्षांनीही प्रतिक्रिया दिल्याचे दिसले नाही. नोटा बदलण्याच्या गोंधळात हा निर्णय दुर्लक्षिला जाईल हे ओळखून बंदी घातलेली दिसते.
तसं झालं तर ठीक आहे मात्र सध्याच्या गोंधळाचा फायदा किंवा नोटबंदीचे कारण वरवर दाखवून विघातक तत्त्वांनी अराजक माजवू नये हीच इच्छा आहे.
The Reserve Bank of India (RBI) has proposed opening of "Islamic window" in conventional banks for "gradual" introduction of Sharia-compliant or interest-free banking in the country.
लोकहो,
ट्रंप निवडून आलेत आणि त्यांना रशियाशी सहकार्य करायचंय. म्हणून बाल्टिक देशांना म्हणे रशियाचा धोका वाटतोय. इथे बातमी आहे : http://www.bbc.co.uk/news/world-us-canada-38051155
च्यायला, ट्रंप नाटोचं महत्व कमी करणार म्हणून कुणाच्या तरी पोटात दुखू लागलंय. आता ओबामा जरी नाटोची भलामण करीत युरोपभर फिरंत असला तरी त्याचा भरवसा कोणालाच वाटंत नाहीये. नाटोवाल्यांची जाम गोची झालीये.
उपरोक्त लेखात बाल्टिक देशांना भीती घातलीये, की रशिया विस्तारवादी आहे. क्रीमिया जसा ताब्यांत घेतला तसेच बाल्टिक प्रदेश रशियन लोकसंख्येच्या जोरावर ताब्यांत घेतले जातील, असा युक्तिवाद आहे. पण युक्रेनमध्ये दंगल माजवण्यासाठी रीतसर निवडून आलेल्या यानुकोव्हीचला बंडखोरांनी हुसकून लावलं याविरुद्ध बीबीसी चकार शब्द काढायला तयार नाही.
शिवाय, बाल्टिकांना रशियाच्या विस्तारवादाची भीती घालतांना बीबीसीला पोलंडच्या विस्तारवादाचा सोयीस्कर विसर पडला आहे. १९३८ च्या आसपास पोलंडच्या सर्वेसर्वा जनरल स्मिगली-रिड्झ ने लिथुआनिया काबीज केला होता हे आजून लोकांच्या स्मरणात आहे. त्यावेळेस कुठे गेला होता राधासुता (= ब्रिटन) तुझा धर्म? ब्रिटनसारख्या बेभरवश्याच्या देशावर विश्वास ठेवण्यापेक्षा बाल्टिक देशांनी रशियाशी सलोख्याचे संबंध राखलेले काय वाईट? निदान काहीतरी तोडगा तरी मिळेल. याउलट ट्रंपमुळे नाटोचा म्हणावा तेव्हढा उपयोग नाही. नाटोमुळे फक्त तणावच वाढेल. अशी एकंदरीत बाल्टिकांची धारणा आहे.
आ.न.,
-गा.पै.
३ दिवसांपूर्वी भारतातील काही राज्यात ४ लोकसभा व १४ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुक झाली. त्याची मतमोजणी आज आहे.
६ महिन्यांपूर्वी आसाम, तामिळनाडू, केरळ, पाँडिचेरी व बंगाल मध्ये विधानसभेची निवडणुक झाली होती. त्यावेळी जो ट्रेंड होता तोच या पोटनिवडणुकीत कायम राहिला आहे. ज्या पक्षाने ६ महिन्यांपूर्वी विधानसभेत बहुमत मिळविले होते, त्यांच्याच बाजूने पोटनिवडणुकीचे निकाल लागले आहेत.
या व्यतिरिक्त त्रिपुरा मध्ये २ जागांवर विधानसभेची पोटनिवडणुक होती व मध्य प्रदेश मध्ये १ लोकसभा व २ विधानसभेच्या जागांवर पोटनिवडणुक होती. त्रिपुरामधील दोन्ही जागांवर सत्ताधारी माकपने विजय मिळविला आहे. यापैकी एका मतदारसंघात भाजपच्या मतात लक्षणीय वाढ झाली आहे. मध्य प्रदेशातील सर्व जागा भाजपनेच जिंकल्या आहेत.
मध्य प्रदेश मध्ये डिसेंबर २०१३ मध्ये विधानसभा निवडणुक व मे २०१४ मध्ये लोकसभा निवडणुक झाली होती. सुमारे अडीच ते तीन वर्षानंतर सुद्धा तिथे भाजपचा प्रभाव टिकून आहे. मध्यंतरी गाजलेल्या व्यापम घोटाळ्यामुळे व ८ नोव्हेंबरला जाहीर केलेल्या जुन्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचा भाजपच्या मतदारांवर प्रतिकुल परीणाम झालेला दिसत नाही.
महाराष्ट्रात विधानपरीषदेच्या ६ जागांसाठी निवडणुक होती. या ६ पैकी ५ जागा राष्ट्रवादीकडे होत्या व १ जागा भाजपकडे होती. परंतु आजच्या निकालानुसार काँग्रेसने २, भाजपने २, शिवसेनेने १ व राष्ट्रवादीने फक्त १ जागा जिंकली आहे. विधानपरीषद निवडणुकीत जनमानसाचे प्रतिबिंब उमटत नाही. परंतु या निकालामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला झटका मिळाला आहे हे नक्की.
काल पुन्हा एकदा भारताच्या लष्करी तळावर हल्ला होऊन भारताचे दोन अधिकारी व पाच जवान मारले गेले. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. भारतीय भूभागात असलेल्या लष्करी तळावर अतिरेकी इतक्या सहज पद्धतीने येऊन हल्ला करून अनेकांना मारू शकतात याचे खेदपूर्वक आश्चर्य वाटते. कोठेतरी, काहीतरी नक्की चुकत आहे. पाकिस्तानवर क्षेपणास्त्रे डागायची वेळ आली आहे असे वाटते.
पाकिस्तानवर क्षेपणास्त्रे डागायची वेळ आली आहे असे वाटते.
गुर्जी, तसे पाहता तुमच्याशी संवाद साधायचा नाही असे ठरवले होते, पण माझ्या कामसंबंधीत तुम्ही बोलल्यामुळे आता बोलतोय. आपण एक काम करू, आम्ही ठेवतो वर्दी उतरवून, बाकी उच्चपदस्थ लष्करी अधिकारी, सामरिक निर्णयकार, सुप्रीम कमांडर, न्यूक्लियर ट्रायड, प्रधानमंत्री सगळे जाऊ दे झिलप्या झाडायला, तुम्हाला वाटतंय न क्षेपणास्त्र डागायची वेळ आली आहे, या मग आता तुम्हीच इथे बटन दाबायला क्षेपणास्त्र प्रणालीचे! कसे? =))
तुमच्याकडून अशाच प्रतिसादाची अपेक्षा होती. टकाच्या एका धाग्यात वर्णन केलेल्या प्रकारचाच हा प्रतिसाद आहे. सुज्ञांस अधिक सांगणे नलगे!
बाकी इतर जे काही तुम्ही ठरविले आहे, त्यास फाट्यावर मारण्यात येत आहे याची आपणास जाणीव आहेच.
सगळे जाऊदे झिलप्या झाडायला? असे गुरुजींचे म्हणणे आहे असे का वाटले साहेब आपल्याला? पाकिस्तानवर क्षेपणास्त्रे डागायची वेळ आली आहे असे वाटते. या वाक्यातून तसा अर्थ निघतो ?
नाही पण बापूसाहेब एक सांगाच . कोठेतरी, काहीतरी नक्की चुकत आहे. पाकिस्तानवर क्षेपणास्त्रे डागायची वेळ आली आहे असे वाटते या गुरुजींच्या या वाक्यांमधून आपल्याला गुरुजींनी बाकीच्या लोकांना ( सैनिक , पंतप्रधान वगैरे ना) काही काम नाही आणि क्षेपणास्त्रे डागणे वगैरे सगळे सोप्पे असते असे म्हटलेले का आढळले ? मुद्दाम विचारतोय . एक अभ्यास म्हणून .
बाकी कौन किससे गरम हे तुम्ही तो पूर्वीचा एका सदस्यांवरचा श्लेष ओळखलात तेव्हाच आमी ओळखले :)
सर्वोच्च न्यायालयाने चित्रगॄहात खेळ सुरु होण्याआधी राष्ट्रगीत वाजवावे असा आदेश दिला आहे. हे तर आधीपासून होते आहेच ना? मग नव्याने काय बदल किंवा सुरुवात करायला सांगितली आहे न्यायालयाने?
अतिशय भंपक निर्णय. केवळ लोकानुनय करणारा. चित्रपट बघायला जाणाऱ्यांनी राष्ट्रगीत ऐकावे हे किती arbitrary आहे. म्हणजे याच न्यायाने सर्कस, नाटक, तमाशा, खेळाचे सामने इ. बघायला जाणाऱ्यांना अशी सक्ती नसावी आणि केवळ चित्रपटगृहांनाच हा नियम हे गैर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, राष्ट्रगीत वाजवूनच फक्त राष्ट्रीय भावना दिसते का? राष्ट्रभक्ती हे महान मूल्य आहे, त्याला असं symbols नि मर्यादित करायला नको.
पण आता राष्ट्रगीत चालू असताना फक्त तिरंग्याचं चित्र दाखवा असा निर्णय आहे . बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे देशभक्ती व्हिडीओ दाखवायचे ते नको फक्त तिरंगा दाखवा असा निर्णय आहे
नक्की माहित नाही पण ती याचिकाच यासाठी होती कि - "भारतातील सर्व सिनेमाग्रहांमध्ये राष्ट्रगीत सिनेमाआधी लावणे अनिवार्य करावे आणि त्याचा एक प्रोटोकॉल असावा". तिरंगा दाखवणे, राष्ट्रगीत चालू असताना सिनेमागृहाचे दरवाजे बंद करणे शिवाय राष्ट्रगीताचे नाटकीय रूपांतर न करणे वगैरे प्रोटोकॉल अंतर्गत ठरवले गेले असावे.
तामिळनाडू मधल्या कमुठी इथला ६४८ मेगावॅटचा सोलार ऊर्जा प्रकल्प नुकताच कार्यान्वित झाला त्यासंदर्भातील हि बातमी.
http://thenextweb.com/insider/2016/11/30/india-solar-power-plant-huge/
या बातमीत नॅशनल जिऑग्राफिकच्या मेगास्ट्रक्चर्स या मालिकेतला या प्रकल्पासंदर्भातला डॉक्युमेंट्री व्हिडीओहि जोडलेला आहे. तो अवश्य पाहावा. अदानी उद्योगसमूहाकडे उत्तम अभियंत्यांबरोबर चांगल्या प्रोजेक्त मॅनेजर्सचीही उत्तम टीम असावी असे म्हणायला हरकत नाही.
छान बातमी आहे. भारतात वीज क्षेत्रात मोठे बदल गेल्या ४ वर्षात झाले आहेत आणि मोठे बदल येवू घातले आहेत. UPA च्या शेवटच्या काळात कोळश्याच तुटवडा झाल्यामुळे मोठे वीज संकट (किंवा वीज टंचाई) निर्माण झालेली. UPA ने शेवटच्या काळात पाऊले उचलाय चालू केलेली परंतु खरा बदल पियुष गोयल यांनी घडवून आणला. मोदी सरकार मधील अत्यंत कार्यक्षम मंत्री पण प्रसिद्धी पासून सतत दूर. हवामानविषय झालेल्या अंतराष्ट्रीय करारामुळे भारतास कोल्श्यावर अवलंबित्व हळू हळू कमी करून अपारंपरिक आणि अणु उर्जेवर भर द्यावाच लागणार आहे. वीज क्षेत्रातील अजून काही उत्तम बदलाच्या बातम्या सापडल्यास लिंक देईन.
या माहितीसाठी धन्यवाद. खालची फर्स्टपोस्टची लिंक भारत सरकारच्या रुफटॉप सोलर प्रोजेक्टबद्दल माहिती देते. अदानी आणि इतर एनर्जी कंपन्यांचे मार्केट शेअरबद्दलचे स्टॅट्स अतिशय इंटरेस्टिंग आहेत.
http://www.firstpost.com/business/adanis-largest-solar-power-project-in-tn-is-good-but-rooftop-solar-is-the-way-ahead-3017408.हटमळ
ह्या सोलार आणि रिन्यूएबल एनर्जी प्रकल्पाचा (100GW) मूळ आराखडा UPA सरकारच्या काळात झाला असावा असे मानून चालतो आहे. त्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे. (कोणते मंत्री किंवा कोणते ब्युरोक्रॅट्स). याबद्दल काही माहिती मिळाल्यास नक्की सांगा.
अदानी उद्योगसमूहाकडे उत्तम अभियंत्यांबरोबर चांगल्या प्रोजेक्त मॅनेजर्सचीही उत्तम टीम असावी असे म्हणायला हरकत नाही.
आजकाल असे म्हणणे म्हणजे बुर्ज्वा प्रतिगामी आणि भांडवदारांशी साठगाठ असल्याचे मानले जाते.
अडानी, अंबानी इ उद्योजक आणि त्यांनी घेतलेली कर्जे याबद्दल गळा काढणे हे पुरोगामित्वाचे लक्षण आहे.
सहमत! आणि अशा गळे काढणाऱ्यांची तथाकथित कर्जघोटाळेबहाद्दर किंवा सरकारमित्र उद्योजकांची यादी अंबानी-अदानी यापलीकडे जात नाही. कारण सोपे दिसते - मोदी गुजरातचे, अंबानी गुजरातचे, अदानी गुजरातचे!
म्हणजेच निर्णय चांगला कि वाईट हे 31 डिसेंम्बर नंतर ठरणार आहे , मग तो चांगलाच आहे असं मानण्याची घाई का करावी?
तसेही तीनही मुख्य उद्देश तोंडावर आपटले आहेत...
म्हणजेच निर्णय चांगला कि वाईट हे 31 डिसेंम्बर नंतर ठरणार आहे , मग तो चांगलाच आहे असं मानण्याची घाई का करावी?
मग याच लॉजिकने "निर्णय चुकले" म्हणून कशाला आकांडतांडव करत आहात..?
थांबा की ३१ पर्यंत.
म्हणजेच निर्णय चांगला कि वाईट हे 31 डिसेंम्बर नंतर ठरणार आहे , मग तो चांगलाच आहे असं मानण्याची घाई का करावी?मग याच लॉजिकने "निर्णय चुकले" म्हणून कशाला आकांडतांडव करत आहात..? थांबा की ३१ पर्यंत.