Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ताज्या घडामोडी - ३

श
श्रीगुरुजी
Mon, 10/31/2016 - 15:46
🗣 314 प्रतिसाद
ताज्या घडामोडी - १ ताज्या घडामोडी - २ मागील धाग्यात ३००+ प्रतिसाद झाल्याने नवीन धागा उघडत आहे.

प्रतिक्रिया द्या
66485 वाचन

💬 प्रतिसाद (314)
स
संदीप डांगे Sun, 02/12/2017 - 16:44 नवीन
काय नाही समजलं ते जरा सांगता काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sun, 02/12/2017 - 16:46 नवीन
"आजतक" नावाच्या सनसनाटी बातम्या देणार्‍या वाहिनीने काहीतरी बातमी दिली आहे एवढंच समजलं. तसंही आमचं हिंदी अंमळ कच्चंच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Sun, 02/12/2017 - 17:05 नवीन
अस्सं अस्सं...! ते भारत तेरे तुकडे होंगे, कन्हयाकुमारची भाषणं वगैरे हिंदी समजलं होतं की जे एन यु वाल्यांनी खास तुमच्यासाठी मराठी ट्रान्सलेट केलं होतं..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sun, 02/12/2017 - 17:47 नवीन
मराठीत भाषांंतर करायला जनेविवाले कशाला हवेत? त्यासाठी मराठी वाहिन्या व वर्तमानपत्रे आहेत की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ग
गामा पैलवान Sun, 02/12/2017 - 21:09 नवीन
बायकोस ढकलपत्रातनं एक प्रस्तावपुडके ( = प्याकेज डील) आले. तिनं दाखवल्यावर वाचू जाता म्हंटलं की खास अंधश्रद्धा निर्मूलन समितीसाठी निर्माण केलेलं दिसतंय. तर प्रस्ताव येथे आहे : http://www.wowcher.co.uk/email-deals/brighton/deal-2716191-detail/19-instead-127-centre-excellence-certified/deal.html -गा.पै.
  • Log in or register to post comments
व
वरुण मोहिते Tue, 02/14/2017 - 06:47 नवीन
४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा.ओपीएस ह्यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 02/14/2017 - 10:38 नवीन
अजून नाही. तुरंगात जाऊन पडायची वेळ अगदी जवळ आली, तरी शशिकला या उपटसुंभ बाईची कारस्थाने थांबलेली नाहीत. तुरूंगात जाता जाता तिने पनीरसेल्वमला पक्षातून हाकलले असून पलानीसामी नावाच्या आपल्या पित्त्याला विधीमंडळ पक्षाच्या प्रमुखपदी नेमले आहे. निधन झाल्याने जयललिता सुदैवाने सुटली. आज जयललिता असती तर शशिकलाच्या बरोबरीने तीसुद्दा तुरूंगात गेली असती. तामिळनाडूतील जयललिता, शशिकला, करूणानिधी, करूणानिधीची मुले (स्टॅलिन, अळगिरी, काणीमोडी), करूणानिधीचे नातू मारन बंधू, पी चिदंबरम्, मण्या अय्यर इ. सर्वजण एकाच माळेचे मणी आहेत. सर्वजण अत्यंत अहंमन्य व कमालीचे भ्रष्टाचारी आहेत. एकाला झाकावा आणि दुसरा काढावा अशी परिस्थिती आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते
अ
अनुप ढेरे Tue, 02/14/2017 - 11:01 नवीन
शरद पवार/अजित पवार यांचा भ्रष्टाचाराशी याची तूलना होऊ शकेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
आ
आनंदयात्री Tue, 02/14/2017 - 16:45 नवीन
>>निधन झाल्याने जयललिता सुदैवाने सुटली. निधन नसते झाले तर निकाल लागला असता का असा प्रश्न पडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
म
मराठी_माणूस Wed, 02/15/2017 - 07:13 नवीन
निधन नसते झाले तर निकाल लागला असता का असा प्रश्न पडला.
तथ्य आहे. आजचा अग्रलेख http://www.loksatta.com/agralekh-news/sasikala-convicted-in-da-case-1405670/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
ध
धर्मराजमुटके Wed, 02/15/2017 - 08:02 नवीन
देशभरातून सरकारी आस्थापनांबाबत सातत्याने नकारात्मक बातम्या येत असताना इस्त्रो ने मात्र स्वतःला कायमच सकारात्मक बातम्यांमधे ठेवले आहे. आज तब्बल १०४ उपग्रहांचे यशस्वी उड्डाण करुन इस्त्रोने एक नवा अध्याय लिहिला आहे. हा मला वाटते की एक जागतिक विक्रमच असावा. इस्त्रो टीमचे अभिनंदन !
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 02/15/2017 - 10:17 नवीन
इस्रोच्या शास्त्रज्ञांनी पुन्हा एकदा जबरदस्त यश मिळविले. भारताला सातत्याने अभिमान वाटावा अशी कामगिरी इस्रो करीत आहे. हार्दिक अभिनंदन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
स
संदीप डांगे Wed, 02/15/2017 - 08:06 नवीन
ह्या देशात म्हणे स्वातंत्र्य आहे! गुंडागर्दीचे स्वातंत्र्य असावे बहुतेक! तिकडे इस्रो १०४ उपग्रह एकाच वेळेस अवकाशात सोडून जागतिक विक्रम घडवते, इकडे ही माकडं स्वतःला काय करता आलं नाही म्हणून रामाचे नाव घेऊन दुसर्‍यांना बडवण्यात धन्यता मानतात. अच्छे दिन!
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Wed, 02/15/2017 - 09:34 नवीन
व्ह्यालेंटाईन डे हा तद्दन गल्लाभरू उत्सव आहे. तो बंद पाडून संस्कृतीचे रक्षण करणे मला तरी आवडते. -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Wed, 02/15/2017 - 09:49 नवीन
गल्लाभरु नसलेल्या उत्सवांची यादी मिळेल काय? प्रेमिकांना मारहाण करणे हे कोणत्या संस्कृतीचे लक्षण आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ध
धर्मराजमुटके Wed, 02/15/2017 - 09:52 नवीन
असेल. पण मारहाण करुन बंद पाडण्याऐवजी प्रबोधन करुन किंवा जन्तेच्या खिशाला भोके पडून बंद झाला तर उत्तम. ! मारहाण करण्याचे समर्थन होऊच शकत नाही. नाही बंद झाला तरी काही फरक पडत नाही. अक्कल न वापरता कोणताही सण इव्हेंट म्हणून साजरे करणारे आणि दहशतीच्या जोरावर ते बंद करु पाहणारे दोघांनाही एकाच तराजुत तोलले तरी चालून जावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
श
श्रीगुरुजी Wed, 02/15/2017 - 10:16 नवीन
संपूर्ण असहमत. व्हॅलेंटाईन डे साजरा केला म्हणून इतरांना मारहाण करणारे गुंड आहेत. व्हॅलेंटाईन डे व संस्कृती यांचा काहीही संबंध नाही. गणेशोत्सव, होळी इ. सार्वजनिक उत्सवात मद्यपान करणारे, धागडधिंगा करणारे, स्त्रियांची छेड काढणारे हेच संस्कृतीला मारक आहेत. बंद पाडायचेच असतील तर हे सार्वजनिक उत्सव सर्वात पहिल्यांदा बंद व्हायला हवेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
प
पुंबा Wed, 02/15/2017 - 10:56 नवीन
अगदी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ग
गामा पैलवान गुरुवार, 02/16/2017 - 09:12 नवीन
हिंदू सण योग्य प्रकारे साजरे करता येतात. व्हॅलेंटाईन डे ची गरजच काय मुळातून? -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 02/16/2017 - 11:01 नवीन
धोतर, उपरणे, करगोटा, लंगोटी, टोपी इ. हिंदू वस्त्रप्रावरणे वापरून योग्य पोषाख करता येतो. विजार, सदरा, कंठलंगोटी, पदवेश, मोजे इ. ची गरजच काय मुळातून?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान गुरुवार, 02/16/2017 - 16:15 नवीन
प्रेमाच्या नावाखाली नवतरुणांना वासनाभिमुख करण्यापलीकडे काही घडतं का व्हया.डेत? आधीच फेमिनाझींनी हैदोस घालून कुटुंबव्यवस्था मोडकळीस आणायचा विडा उचलला आहे. भरीस भर म्हणून लव्ह जिहाद फोफावतोय. नवरात्रीसारख्या हिंदू सणांत गैरफायदा घेणारे वासनांध बोकाळलेत. अशा वेळेस संयमाचे धडे द्यायचे की खरे पैसे खर्च करून खोट्या प्रेमाचे फुगे उडवंत बसायचं? -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
स
संदीप डांगे गुरुवार, 02/16/2017 - 19:07 नवीन
संयम?? कसला संयम सांगत आहात गा. पै. लग्नाची वयं आणि अटी दिवसेंदिवस वाढत चालल्यात, शहरातल्या बहुतांश मुलींची २४ व मुलांची वयं २८ च्या पुढे निघून जातात पहिला अनुभव घेईस्तो.. अर्ध आयुष्य (खरेतर संभोगसुख उपभोगायचे सर्वोत्तम वय) संपेपर्यंत संयम बाळगायला सांगताय त्या जीवांना त्यापेक्षा जन्मालाच कशाला घालायचे...? तेव्हाही संयमच बाळगायचा ना! बिचार्‍यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार.. तेही खरोखर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गॅरी ट्रुमन गुरुवार, 02/16/2017 - 09:23 नवीन
२००० साली शिवसेनेनेही व्हॅलेंटाईन डे ला विरोध केला होता. त्यावेळी अनेक प्रेमी युगुलांनी 'हॅप्पी व्हॅलेन्टाईन्स डे' ही ग्रिटिंग कार्डे मातोश्रीवर रवाना केली होती हे पण आठवले :) एकूणच काय बजरंग दल आणि शिवसेना. दोघेही तद्दन गुडघ्यातले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
श
श्रीगुरुजी गुरुवार, 02/16/2017 - 11:04 नवीन
२००० नंतरही अनेक वर्षे शिवसेनावाले व्हॅलेंटाईन डे च्या विरोधात होता. पुण्यात अगदी ५-६ वर्षांपूर्वी 'आर्चीज्' च्या दुकानांची मोडतोड केल्याच्या बातम्या आल्या होत्या. सध्या निवडणुक असल्याने सेनावाले गप्प आहेत. निवडणुक नसती तर विरोध परत सुरू झाला असता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ह
हतोळकरांचा प्रसाद गुरुवार, 02/16/2017 - 12:37 नवीन
सध्या निवडणुक असल्याने सेनावाले गप्प आहेत. निवडणुक नसती तर विरोध परत सुरू झाला असता.
माझ्या माहितीने आदित्य ठाकरेंनी याबाबतीत शिवसेनेचा स्टॅन्ड दोन-तीन वर्षांपूर्वी स्पष्ट केला आहे. शिवसेना वॅलेंटिने डेला विरोध करणार नसल्याचं त्यांनी म्हटल्याचे आठवतंय. तरीही जर कोणी इतर कोणालाही वैयक्तिकरित्या त्रास न देता विरोध-निदर्शने करणार असेल तर काय हरकत असावी? हा मार्ग सगळ्या विरोधकांना मोकळा ठेवायला आणि त्यांनी तो पाळायला हरकत नसावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ग
गामा पैलवान गुरुवार, 02/16/2017 - 09:15 नवीन
लोकहो, सौदी अरेबियाचा हरामाचा पैसा गिळून असदुद्दिन औवेश्या बघा कसा हुतात्मा बनायला निघाला आहे. अधिक माहिती : http://m.maharashtratimes.com/maharashtra/pune-news/asaduddin-owaisi-rally-in-pune/articleshow/57151469.cms सविस्तर वृत्त : http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/asduddin-owesi-visits-pune-for-election-rally/articleshow/57154660.cms आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन गुरुवार, 02/16/2017 - 10:58 नवीन
शशीकला नटराजन यांनी तुरूंगात जाण्यापूर्वी निवडलेले एडापड्डी के. पलानीस्वामी यांना तामिळनाडूचे राज्यपाल के.विद्यासागर राव यांनी सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केले आहे. त्यांचा मुख्यमंत्री म्हणून आज शपथविधी होईल. त्यांच्याकडे विधानसभेत बहुमत सिध्द करायला १५ दिवसांचा कालावधी आहे.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान गुरुवार, 02/16/2017 - 20:10 नवीन
संदीप डांगे,
बिचार्‍यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार.. तेही खरोखर!
हे व्हया.डे साजरं करायचं कारण होऊ शकंत नाही. ज्यांना अनैतिक संबंध ठेवायचे आहेत त्यांनी खुशाल ठेवावेत. त्यास जाहीर उत्तेजन मिळू नये इतकाच माझा आग्रह आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
प
पुंबा Fri, 02/17/2017 - 05:33 नवीन
पण जाहीर उत्तेजन कोण देतं व्हॅ डेला? व्यक्तीला असा उत्सव साजरा करण्याचे स्वातंत्र्य असावे इतकेच म्हणताहोत आम्ही. जर स्वखुशीने प्रेमी जोडपे सेलीब्रेट करत असेल तर त्याला झुंडशाहीच्या बळावर मारहाण करायला लोक येऊ नयेत एवढी साधी अपेक्षा आहे. व्हॅ डे साजरा करण्यासाठी कोणी स्टायपेंड, सबसीडी, फेलोशीप असं कोणी जाहीर केलेलं नाहीये. संविधानाने दिलेल्या स्वातंत्र्याचा अधिक्षेप होऊ नये हे पाहणं सरकारचं काम आहे, तसंच नागरी समाजाचंही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Fri, 02/17/2017 - 08:48 नवीन
सौरा, दारू पिऊन गणपतीसमोर नाचू नये असं संविधानात कुठेही लिहिलेलं नाही. तरीपण हिंदू सण यथोचितपणे साजरे व्हावे म्हणून आपण प्रयत्नशील असतोच ना? मग हाच न्याय व्हया.डे या सणास लावूया. याप्रसंगी प्रेम वगैरे व्यक्त करायचा आग्रह कशासाठी? जुन्या काळी विवाहित पुरुषांना सैन्यभरतीची सक्ती नसे. संत व्हयालेंटाईन सक्तीची सैन्यभरती टळावी म्हणून मुलामुलींची लागणे लावून देत असे. आता यात प्रेमाचा संबंध आलाच कुठे? त्यातूनही कुण्या जोडप्याला अनैतिक कृत्ये करायची असतील तर चार भिंतींच्या आड खुशाल करावीत. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
स
संदीप डांगे Fri, 02/17/2017 - 09:00 नवीन
प्रेम करणे अनैतिक कृत्य केव्हापासून झालं...? आपलं यथासांग उपभोगून झालं की किंवा आपलं काहीच ठिकठाक नाही झालं तर असले नैतिक-अनैतिक, संस्क्रुती बचाव वगैरे चाळे सुचतात रिकामटेकड्या जळावू लाकडांना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
श
श्रीगुरुजी Fri, 02/17/2017 - 10:22 नवीन
ज्यांना अनेकवेळा प्रयत्न करूनसुद्धा मुलगी पटत नाही, पटविता येत नाही त्यांनाच मत्सरातून असली नैतिकता-अनैतिकता सुचते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ग
गॅरी ट्रुमन Fri, 02/17/2017 - 09:19 नवीन
याप्रसंगी प्रेम वगैरे व्यक्त करायचा आग्रह कशासाठी?
प्रेम व्यक्त करायचा आग्रह कोण करत आहे? किंबहुना प्रेम केलेच पाहिजे किंवा प्रेम व्यक्त केलेच पाहिजे असा कोणावरही आग्रह कसा करता येईल हेच समजत नाही.
जुन्या काळी विवाहित पुरुषांना सैन्यभरतीची सक्ती नसे. संत व्हयालेंटाईन सक्तीची सैन्यभरती टळावी म्हणून मुलामुलींची लागणे लावून देत असे. आता यात प्रेमाचा संबंध आलाच कुठे?
व्हॅलेंटाईन्स डे साजरा करणार्‍या ९०% नाही ९९% प्रेमी युगुलांना ही गोष्ट माहित नसेल. मुळातील गोष्ट काहीही असली तरी १४ फेब्रुवारीला "प्रेमाचा दिवस" म्हणून ते सगळे मानत असतील तर त्यात आक्षेप घेण्यासारखे काय आहे? स्वयंघोषित संस्कृतीरक्षक जाम डोक्यात जातात राव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
प
पुंबा Fri, 02/17/2017 - 09:23 नवीन
याप्रसंगी प्रेम वगैरे व्यक्त करायचा आग्रह कशासाठी?
अहो गा. पै, मी म्हणतो, कोण आग्रह करतंय साजरा करण्याचा? जोपर्यंत कुठला कायदा मोडला जात नाही तोवर लोकांनी लाठ्या काठ्या घेऊन येऊ नये एवढंच. आणि कायदा मोडला तरीही शिक्षा देण्याचा अधिकार न्यायालयांनाच फक्त. व्हॅ डे साजरा करू नये याचा तुमच्यासारखा अहिंसक प्रचार करणार्‍यांबद्दल काही आक्षेप नाही.
दारू पिऊन गणपतीसमोर नाचू नये असं संविधानात कुठेही लिहिलेलं नाही. तरीपण हिंदू सण यथोचितपणे साजरे व्हावे म्हणून आपण प्रयत्नशील असतोच ना?
दारू पिऊन नाचले म्हणून कुठल्या मंडळांच्या कार्यकर्त्यांना मारहाण झालीये हो?
संत व्हयालेंटाईन सक्तीची सैन्यभरती टळावी म्हणून मुलामुलींची लागणे लावून देत असे. आता यात प्रेमाचा संबंध आलाच कुठे?
बरं मग? तरीही ज्या लोकांना करायचा अहे हा दिवस साजरा, त्यांनी का नाही म्हणे करायचा? एक प्रश्नः तुमच्यामते प्रेम करणे नैतीक आहे की नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
श
श्रीगुरुजी Fri, 02/17/2017 - 10:20 नवीन
दारू पिऊन गणपतीसमोर नाचू नये असं संविधानात कुठेही लिहिलेलं नाही.
दारू पिऊन अचकट विचकट नाचावे, गर्दीत मुलींची छेड काढावी, त्यांच्या अंगचटीला जावे हे तरी संविधानात लिहिले आहे का? व्हॅलेंटाईन डे साजरा करू नये असेसुद्धा संविधानात कोठेही लिहिलेले नाही.
तरीपण हिंदू सण यथोचितपणे साजरे व्हावे म्हणून आपण प्रयत्नशील असतोच ना? मग हाच न्याय व्हया.डे या सणास लावूया. याप्रसंगी प्रेम वगैरे व्यक्त करायचा आग्रह कशासाठी? जुन्या काळी विवाहित पुरुषांना सैन्यभरतीची सक्ती नसे. संत व्हयालेंटाईन सक्तीची सैन्यभरती टळावी म्हणून मुलामुलींची लागणे लावून देत असे. आता यात प्रेमाचा संबंध आलाच कुठे?
कोण प्रयत्नशील असतो? कोणत्या मंडळाने रस्त्यावर खड्डे करून मांडव न टाकता स्वतःच्या दिवाणखान्यात सार्वजनिक गपपतीची प्रतिष्ठापना करून उत्सव साजरा केला आहे का? कोणते मंडळ वाहतुकीला अडथळा होऊ नये, ध्वनी प्रदूषण होऊ नये यासाठी प्रयत्नशील आहे. गणपती रस्त्यावरच बसविण्याचा आग्रह कशासाठी? त्
यातूनही कुण्या जोडप्याला अनैतिक कृत्ये करायची असतील तर चार भिंतींच्या आड खुशाल करावीत.
ज्यांना हिंदू उत्सव साजरे करायचेत त्यांनी ते चार भिंतीच्या आड खुशाल साजरे करावेत. रस्त्यावर येऊन समाजाला उपद्रव देऊ नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
श
श्रीगुरुजी Fri, 02/17/2017 - 10:14 नवीन
नैतिक-अनैतिक कोण ठरविणार आहे? जाहीर उत्तेजन द्यायचं म्हणजे नक्की काय? गणपती उत्सवात दमदाटी करून प्रसंगी मारहाण करून वर्गणी (खंडणी) वसूल करणे, वर्गणीतील पैशांचा अपहार करणे, त्याच पैशातून दारू ढोसणे, प्रचंड ध्वनीप्रदूषण करणे, आकडे टाकून वीज चोरणे, रस्त्यावर खड्डे करून मांडव टाकून रस्ते अडविणे असे अनेक उपद्रवी प्रकार चालतात. तर मग गणपती बसायच्या दोनदोन महिने आधी "मी येतोय" असे फलक लावून अशा उत्सवाला जाहीर उत्तेजन कशासाठी? किंबहुना सार्वजनिक गणपती उत्सव बंद व्हायलाच हवा, पण त्याबरोबरीने रस्त्यावर साजरा होणारा कोणताही उत्सव बंदच व्हायला हवा.व्हॅलेंटाईन डे असल्या सार्वजनिक उत्सवांपेक्षा शतपटीने चांगला. निदान या उत्सवात समाजाला उपद्रव तर होत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ह
हतोळकरांचा प्रसाद Fri, 02/17/2017 - 14:36 नवीन
श्रीगुरुजी, तुम्ही गणेशोत्सव आणि व्हॅलेंटाईन डे या दोन्ही सणांच्याबाबतीत सरसकटीकरण करत आहात असे नाही वाटत? गणेशोत्सवात फक्त दारू पिऊन धिंगाणाच चालतो असे आपले म्हणणे आहे का? पुण्या-मुंबईतील ठराविक(खरेतर राजकीय पक्षांनी कार्यकर्त्यांसाठी चालवलेली) गणेशमंडळे आणि त्यांचे १० दिवसाचे सादरीकरण म्हणजेच गणेशोत्सव का? कितीतरी गणेश मंडळे अत्यंत सुंदरपणे सामाजिक जाणिवेचे भान ठेवून कितीतरी सामाजिक कार्यक्रम चालवतात तेही बंदच करायला हवेत का? अनेक रहिवासी सोसायट्यांमध्ये, गावांमध्ये, खेड्यांमध्ये या १० दिवसांमध्ये लोक एकत्र येऊन एकोप्याच्या भावनेने सण साजरा करत नाहीत का? तसेच, व्हॅलेंटाईन डे ला जसे काही मनाचे मिलन होऊन प्रेमाचा बहर फुलतो तसंच ज्यांचा नाही फुलाला त्यांच्यात वितुष्ट येऊ शकतं, प्रकरणं हाताबाहेरही जातात. ज्या वयात प्रेम करायला हवं त्या वयात प्रेम करायला मिळायला हवं हे खरं आहेच. पण प्रेमाच्या यशाचं टोक म्हणजे त्या वयात त्यांना शरीरसुख मिळायला हवं हे परिमाण बरोबर वाटत नाही. आपल्या समाजाची लैंगिक शिक्षणाबाबतीतील परिस्थिती आपण जाणतोच. अशा शिक्षणाच्या अभावामुळे होणारी गुंतागुंत निस्तरण्याची तयारी बरेच वेळेस त्या वयात नसते. बऱ्याच वेळेस अशा गोष्टी निस्तरण्याची वेळ पालकांवर येते. तेव्हा प्रेम ही गोष्ट जरी निखळ असली तरी ती शोभून दिसते जबाबदारी आणि धीराने असे माझे वैयक्तिक मत आहे. तस्मात, व्हॅलेंटाईन डे जरूर साजरा करावा पण आपल्या सामाजिक परिस्थितीचं, समाजाच्या लैंगिक जडणघडणीचं आणि पालकांच्या मनस्थितीचं भान राखून! सार्वजनिक ठिकाणी "उत्स्फूर्त" प्रेम करताना बाजूला असलेली आधीची पिढी हि आपली कोणीच नसली तरी आपल्या आई-वडीलांसारखीच आहे हे समजलं तरी पुरे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ग
गामा पैलवान Fri, 02/17/2017 - 15:44 नवीन
श्रीगुरुजी, १.
नैतिक-अनैतिक कोण ठरविणार आहे?
बहुसंख्य हिंदू जनता. २.
जाहीर उत्तेजन द्यायचं म्हणजे नक्की काय?
व्हयाडे या सणावर बंदी घालणे. या सणाची गरज नाही. हिंदूंना सण कमी पडताहेत का, म्हणून परदेशी सण तोही मोडकातोडका साजरा करायचा? ३.
तर मग गणपती बसायच्या दोनदोन महिने आधी "मी येतोय" असे फलक लावून अशा उत्सवाला जाहीर उत्तेजन कशासाठी?
कारण की हा हिंदूंचा देश आहे. ४.
पण त्याबरोबरीने रस्त्यावर साजरा होणारा कोणताही उत्सव बंदच व्हायला हवा.
असेल हिंमत तर रस्त्यावरच्या बुडोत्तानप्रार्थना करून दाखवा बंद. गेलाबाजार प्रभातबांग जरी बंद करवून दाखवलीत तरी काम भागेल. न्यायालयाचा निर्देश आहेच. त्यामुळे संविधान वगैरे कायदेशीर बाबींची चिंता नको. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 02/18/2017 - 10:21 नवीन
बहुसंख्य हिंदू जनता.
हिंदू जनतेचा व्हॅलेंटाईन डे ला अजिबात विरोध नसून पाठिंबा आहे.
व्हयाडे या सणावर बंदी घालणे. या सणाची गरज नाही. हिंदूंना सण कमी पडताहेत का, म्हणून परदेशी सण तोही मोडकातोडका साजरा करायचा?
या सणाची गरज आहे का नाही ते लोकांना ठरवू द्या. ज्यांना गरज नाही ते त्यापासून दूर राहतील. ज्यांना गरज वाटते ते साजरा करतील. तुम्ही कशाला जळताय आणि त्रास करून घेताय? तो मोडकातोडका साजरा करायचा का पूर्ण साजरा करायचा का अजिबात साजरा करायचा नाही हे लोक ठरवतील. मुळात हा सण वगैरे नसून एक इव्हेंट आहे. तुम्हाला पटत नसेल तर नका साजरा करू किंवा तुमच्या बाळासाहेब ठाकरेंच्या आदेशाप्रमाणे "बाजीराव-मस्तानी दिन" साजरा करा. तसे करायला कोणीही अडविले नाही.
कारण की हा हिंदूंचा देश आहे.
हिंदूंचा देश आहे म्हणून इतरांना उपद्रव द्यायचा मुक्त परवाना मिळालेला नाही.
असेल हिंमत तर रस्त्यावरच्या बुडोत्तानप्रार्थना करून दाखवा बंद. गेलाबाजार प्रभातबांग जरी बंद करवून दाखवलीत तरी काम भागेल. न्यायालयाचा निर्देश आहेच. त्यामुळे संविधान वगैरे कायदेशीर बाबींची चिंता नको.
रस्त्यावर आणले जाणारे सर्वच प्रकार बंद व्हायला हवेत. त्यात जसे ताबूत, नमाज वगैरेंचा समावेश हवा तसाच पुढार्‍यांच्या जयंत्या-मयंत्या, गणेशोत्सव, नवरात्र, दहीहंडी, लग्नाच्या मिरवणुका इ. चाही समावेश हवा. बादवे, नवरात्र, गणेशोत्सव, पुढार्‍यांच्या जयंत्या-मयंत्या, रिक्षावाल्यांचे श्रावणातले सत्यनारायण, दहीहंडी, दिवाळीतले फटाके, लग्न्याच्या मिरवणुका व कार्यालयात लावलेल्या काळ्या भिंती इ. मुळे होणार्‍या ध्वनीप्रदूषणाच्या तुलनेत प्रभातबांगेमुळे होणारे ध्वनीप्रदूषण जवळपास निग्लिजिबल आहे. मी एकदा बांग सुरू झाल्यावर घड्याळ लावून वेळ मोजला होता. साधारणपणे ३-४ मिनिटे बांग सुरू होती. अशी बांग दिवसातून ४-५ वेळा दिली जाते. म्हणजे एका दिवसात बांगेचा एकूण कालावधी १५-२० मिनिटांपेक्षा जास्त नाही. याउलट वर नमूद केलेल्या कोणत्याही एका उत्सवात बांगेच्या कमीतकमी हजारपट ध्वनीप्रदूषण होते. एखादा अपघातात जखमी झाला असेल तर जिथे किरकोळ खरचटले आहे तिथे उपचार करण्यापेक्षा आधी भळभळ वाहणार्‍या जखमेवर उपचार करणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे १५-२० मिनिटांचे किरकोळ ध्वनीप्रदूषण करणार्‍या बांगेकडे लक्ष देण्याआधी काळ्या भिंती उभारून कानठळ्या बसविणारे प्रकार आधी बंद करणे आवश्यक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
स
सतिश गावडे Sun, 02/19/2017 - 10:51 नवीन
गुरुजी, तुमचे असे प्रतिसाद वाचले की प्रश्न पडतो की तुमचा हा विवेकी विचार राजकीय चर्चांच्या वेळी तुम्ही खुंटीला टांगून का ठेवता? :) एक राजकीय अंधभक्ती सोडली तर तुमचे इतर बाबतीतील विवेकी विचार हे आज स्वतःला विज्ञानवादी, विवेकवादी म्हणणार्‍यांच्या विचारांपेक्षाही अधिक परखड आणि अनुकरण करण्यासारखे आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
स
संदीप डांगे Sun, 02/19/2017 - 11:00 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
व
विशुमित Mon, 03/06/2017 - 09:59 नवीन
राजकीय चर्चांमध्ये ही मी गुरुजींचा पंखा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
क
कपिलमुनी Mon, 03/06/2017 - 10:37 नवीन
प्रेमदिनाबद्दल आपले मौलिक विचार वाचायला आवडतील :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
व
वरुण मोहिते Fri, 02/17/2017 - 17:07 नवीन
व्हॅलेंटाईन डे सोडून कोणी प्रेमच करत नाही का बाकी वर्षभरात . का कुठल्या अनैतिक(?) गोष्टी करत नाही. मुळात एक छोटी कन्सेप्ट आहे हि तरुणपिढीला भावत असेल तर काय हरकत आहे त्यांनी साजरा करायला . हिंदूंचेच सण साजरे करा हे सांगणारे आपण कोण आणि कशाला जबरदस्ती. उद्या व्हॅलेंटाईन डे साजरा नाही झाला तर नंतर असणाऱ्या त्या भावना संपणारेत का दुसऱ्या दिवशी असं तर नाही ना ? बाकी साजरा करायचा कि नाही हे ज्याचे त्याचे सुज्ञ पणे ठरवू डे त्यांनाच .व्हॅलेंटाईन डे म्हणजे गैरप्रकारच असतो असा काही ग्रह आहे का?.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Fri, 02/17/2017 - 17:56 नवीन
गॅरी ट्रुमन,
स्वयंघोषित संस्कृतीरक्षक जाम डोक्यात जातात राव.
हाहाहा, मला तुमच्या डोक्यात स्थान दिल्याबद्दल आभार! :-) इथली अनेक लोकं मला कुणाकुणाच्या कसल्याकसल्या अवयवांत जागा द्यायला उत्सुक असतील. त्यामानाने तुमचं डोकं हे खूपंच सुरक्षित स्थान आहे. विनोदाचा भाग सोडतो. संस्कृतीरक्षण का करावं ते सांगेन म्हणतो. त्याचं काय आहे की पाश्चात्य देशांत कुटुंबव्यवस्था मोडकळीस आलेली आहे. त्यातून पुढे गुन्हेगारी वाढते. केवळ एकदोन पिढ्यांत विवाहबाह्य रीतीने जन्मास येणाऱ्या बालाकांचं प्रमाण भयावह प्रकारे वाढलंय. अमेरिकेत ७०+% मुलं एकपालकी कुटुंबातली आहेत. अशा वेळेस संगोपनाचा सगळा भार एकाच पालकावर पडतो. मुलांकडे योग्य तऱ्हेने लक्ष देता येत नाही. अशी दुर्लक्षित मुलं गुन्हेगारीकडे वळण्याचा धोका असतो. हीच मुलं पुढे त्यांच्या मुलांना जन्म देतात तेव्हा त्यांनाही आईवडिलांच्या भूमिका (जेंडर रोल्स) ठाऊक नसतात. हे दुष्टचक्र चालूच राहतं. ते भेदण्याचा मार्ग म्हणजे ते सुरूच होऊ न देणे. त्याची सुरुवात अनैतिक कृत्यांच्या उदात्तीकरणाने होते. व्हया.डेच्या मागे लपून स्वैराचार बोकाळतो आहे. तेव्हा संस्कृतीरक्षण झालंच पाहिजे. तेव्हा होऊ द्या खर्च, धर्मरक्षण आहे घरचं. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Sun, 02/19/2017 - 15:41 नवीन
ते भेदण्याचा मार्ग म्हणजे ते सुरूच होऊ न देणे. त्याची सुरुवात अनैतिक कृत्यांच्या उदात्तीकरणाने होते. व्हया.डेच्या मागे लपून स्वैराचार बोकाळतो आहे. तेव्हा संस्कृतीरक्षण झालंच पाहिजे. तेव्हा होऊ द्या खर्च, धर्मरक्षण आहे घरचं.
आता जे व्हॅलेन्टाईन डे विषयी तुम्ही लिहिले आहेत अगदी तसेच १००-१५० वर्षांपूर्वी स्त्रीशिक्षण, दलितांचे शिक्षण इत्यादी इत्यादी अनेक गोष्टींविषयी बोलले जात असेल. असो. आता संस्कृतीरक्षण या नावाखाली विरोध व्हॅलेन्टाईन डे पर्यंत खाली आला असेल तरी ती बरीच प्रगती म्हणायची. उत्तम. किप इट अप.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
स
संदीप डांगे Sun, 02/19/2017 - 16:05 नवीन
+1000
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
क
कपिलमुनी Mon, 03/06/2017 - 10:39 नवीन
संस्कृतीरक्षण झालंच पाहिजे म्हणणार्‍यांनी नवरात्रीच दांडीया बंद करा :) त्या ९ रात्रीमधे उद्योगाचे प्रमाण फार वाढते .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
श
श्रीगुरुजी Sat, 02/18/2017 - 10:05 नवीन
ओरिसात भाजपने अनेकवेळा आटोकाट प्रयत्न करूनसुद्धा आजपर्यंत तिथे भाजपला स्वबळावर अत्यंत किरकोळ यश मिळाले होते. अगदी मोदी लाटेत सुद्धा ओरिसात भाजपला २१ पैकी फक्त १ जागा मिळाली होती तर बिजदला २० जागा होत्या. त्याला मुख्य कारण होते ते मुख्यमंत्री नवीन पटनाईकांची स्वच्छ छबी व जनतेत त्यांना असलेले अनुकूल मत. २००० पासून जवळपास गेली सलग १६-१७ वर्षे नवीन पटनाईक मुख्यमंत्री आहेत व त्यांनी लागोपाठ ४ निवडणुकात बहुमत प्रचंड बहुमत मिळविले आहे. परंतु गेल्या काही दिवसात झालेल्या पंचायत निवडणुकीमध्ये वेगळाच बदल दिसून येत आहे. ओरिसात ५ टप्प्यात होत असलेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पहिल्या २ टप्प्यांचे मतदान पूर्ण झाले असून निकाल जाहीर झाले आहेत. पहिल्या दोन्ही टप्प्यात बिजद प्रथम क्रमांकावर असला तरी अनपेक्षितपणे भाजपच्या जागा मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. पहिल्या टप्प्यातील १८८ जागांपैकी भाजपने अनपेक्षितपणे ७१ जागा जिंकल्या तर दुसर्‍या टप्प्यातील १६६ पैकी ५५ जागा जिंकल्या. यापूर्वी २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत बिजदने ६५२, काँग्रेसने १२८ तर भाजपने जेमतेम ३६ जागा जिंकल्या होत्या. मात्र २०१७ मध्ये पहिल्या २ टप्प्यातच भाजपने १२६ जागा जिंकलेल्या आहेत. बिजदने पहिल्या २ टप्प्यात १९७ जागा जिंकून प्रथम क्रमांक मिळविलेला आहे. परंतु आजतगायत दुसर्‍या क्रमांकावर असलेली काँग्रेस जेमतेम ३० जागा मिळवून तिसर्‍या क्रमांकावर फेकली गेली आहे. भाजपचे जुएल ओराम यांनी अथक परीश्रम करून भाजपला यश मिळवून दिले आहे. नवीन पटनाईकांना आपल्या कारकीर्दीत प्रथमच आव्हान मिळाले आहे. http://indiatoday.intoday.in/story/odisha-panchayat-polls-bjps-naveen-patnaik-odisha/1/885679.html
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sun, 02/19/2017 - 10:25 नवीन
श्रीगुरुजी, तुमचा वरचा संदेश वाचला. १.
हिंदू जनतेचा व्हॅलेंटाईन डे ला अजिबात विरोध नसून पाठिंबा आहे.
जरी असला तरी त्याविरुद्ध जनमत जागं करायचा हक्क प्रत्येकाला आहे. हे जनमत जागृत करतांना किरकोळ हिंसा घडली तर त्या हिंसेमागील कार्यकारणभाव शोधून मूळ कारण नष्ट करण्यास माझं प्राधान्य राहील. २.
या सणाची गरज आहे का नाही ते लोकांना ठरवू द्या. ज्यांना गरज नाही ते त्यापासून दूर राहतील. ज्यांना गरज वाटते ते साजरा करतील. तुम्ही कशाला जळताय आणि त्रास करून घेताय?
हा बहुसंख्य हिंदूंचा देश आहे. हिंदूहितविरोधी कार्यक्रमांचा निषेध करायचा अधिकार मला आहे. आणि मी तो बजावणारच. ३.
हिंदूंचा देश आहे म्हणून इतरांना उपद्रव द्यायचा मुक्त परवाना मिळालेला नाही.
हिंदूंचा देश आहे म्हणून कुणालाही स्वैर वर्तनाचा मुक्त परवाना मिळालेला नाही. ४.
रस्त्यावर आणले जाणारे सर्वच प्रकार बंद व्हायला हवेत. त्यात जसे ताबूत, नमाज वगैरेंचा समावेश हवा तसाच पुढार्‍यांच्या जयंत्या-मयंत्या, गणेशोत्सव, नवरात्र, दहीहंडी, लग्नाच्या मिरवणुका इ. चाही समावेश हवा.
सहमत आहे. याची सकारात्मक सुरुवात म्हणून स्वैराचरणास प्रोत्साहन देणाऱ्या तद्दन गल्लाभरू व्हयाडे बंद पाडण्यास माझं समर्थन आहे. ५.
प्रभातबांगेमुळे होणारे ध्वनीप्रदूषण जवळपास निग्लिजिबल आहे. मी एकदा बांग सुरू झाल्यावर घड्याळ लावून वेळ मोजला होता.
मुंबईत डोंगरीत निकिता कदम ही हिंदू महिला मतांपायी लाचार होऊन हिजाब घालून प्रचार करते. ठीके ती काँग्रेसची आहे. आढ्याचं पाणी गेलं वळचणीला म्हणूया. पण तुम्हीसुद्धा? तुमच्यारखा हिंदुत्वनिष्ठ घड्याळ लावून बांगेची वेळ मोजण्यात धन्यता मानतोय? विरोध कुठवर करावा याची काही मर्यादा? तुमच्याइतकं सर्वधर्मसमभावी मला बनता येत नाही. एव्हढं बोलून ही चर्चा माझ्याकडून आवरती घेतो. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा