ताज्या घडामोडी - ३
ताज्या घडामोडी - १
ताज्या घडामोडी - २
मागील धाग्यात ३००+ प्रतिसाद झाल्याने नवीन धागा उघडत आहे.
💬 प्रतिसाद
(314)
स
सुनील
गुरुवार, 01/26/2017 - 15:51
नवीन
अरेरेरे!
शिळ्या कढीला ऊत तरी किती वेळा आणायचा तो?
असो, गांधींचे उपोषण जर पाकिस्तानला ५५ कोटी रुपये देण्यासाठीच होते, तर उपोषणपूर्व भाषणात (१२ जानेवारी १९४८ रोजी संध्याकाळी) त्याचा उल्लेख का नसावा? (त्यांची सर्व भाषणे जालावर उपलब्ध आहेत)
तसेच, ५५ कोटी रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतल्यानंतरही २ दिवस उपोषण का सुरू होते?
वरील दोन प्रश्नांची समाधानकरक उत्तरे जोवर मिळत नाहीत तोवर गांधींचे उपोषण ५५ कोटींसाठीच होते यावर विश्वास ठेवता येत नाही.
टीपा
१) पाकिस्तानला ५५ कोटी द्यावेत असे गांधीचे मत होते हे मान्यच. (फक्त उपोषण त्यासाठीच होते याचा पुरावा नाही)
२) वरील भाषणातील काही वाक्ये उद्बोधक वाटावीत -
The fast begins from the first meal tomorrow. The period is indefinite and I may drink water with or without salts and sour limes. It will end when and if I am satisfied that there is a reunion of hearts of all the communities brought about without any outside pressure, but from an awakened sense of duty.
तसेच, हे वाक्य तर खासच -
That destruction is certain if Pakistan ensures no equality of status and security of life and property for all professing the various faiths of the world, and if India copies her.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
गुरुवार, 01/26/2017 - 12:56
नवीन
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 01/26/2017 - 14:09
नवीन
गांधीवादी असे म्हणणारच हो. त्यांच्यावर विश्वास ठेवणे अवघड आहे.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
गुरुवार, 01/26/2017 - 14:14
नवीन
म्हणजे तुम्हाला जे हवं त्या सोयिस्कर बकवासवरच तुम्ही विश्वास ठेवता, सत्य आणि पुराव्यांवर नाही.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 01/26/2017 - 14:18
नवीन
तुम्ही काय वेगळं करताय?
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
गुरुवार, 01/26/2017 - 14:29
नवीन
हो का? खोडून काढा मग, सत्य पुराव्यांसकट, हातच्या कंकणाला आरसा कशाला?
बाकी तुम्ही खोट्या प्रचारकांवर विश्वास ठेवा असं सूचित करत आहात हे नमूद करतो. ते कशासाठी ह्याचे कारण द्याल काय?
५५ कोटींसाठी उपोषण करुन दबाव आणला हे तथ्यांची मोडतोड आहे हे पुरतं उघड झाले आहे, पण गांधीद्वेषी लोकांना जाणूनबुजून खोटंच कवटाळून बसायचं आहे हे पुन्हा-पुन्हा स्पष्ट होत आहे.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 01/26/2017 - 15:57
नवीन
तेच तेच करायचा कंटाळा आलाय. गांधींजींंशी संबंधित काही विशिष्ट गोष्टींविषयी गांधीवादी नेहमीच बोलण्याचे टाळतात किंवा त्याविषयी असत्य प्रतिपादन करतात (उदा. त्यांचे सत्याचे प्रयोग, ५५ कोटी, हरीदास, वडिलांंचा म्रुत्यु इ.). हा तसाच कांगावा आहे.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
गुरुवार, 01/26/2017 - 16:41
नवीन
ओ येस.... तुम्ही करता ते सत्यप्रतिपादन, गांधीवादी करतात तो कांगावा... बरं बरं!
तरी बरं, हे ५५ कोटी देण्याचा आणि उपोषणाचा संबंध नाही हे गांधीवादी नसलेल्यांनीही सांगितलंय. तरी आपलं उघडं पडलेलं थोतांड निभवून न्यायचंच असेल तर हास्यास्पद परिस्थिती कोणाची होते ते जग बघतंय.
आता जे जे ह्याला असत्य म्हणतील ते सर्व कांगावेखोर आणि गांधीवादीच सम्जायला लागतील. जे ह्याला सत्य समजतील ते हरिश्चंद्राचे अवतार आहेत असे मानायचे बौद्धिक मिळाल्यावर काय बोलायचं... ?
बाकी, ५५ कोटी आणी उपोषणाचा मुद्द्यावरच स्पष्ट प्रश्न विचारला होता, बाकीचे असंबंद्ध मुद्दे काढून दिशाभूल करणे म्हणजे ह्यॅ ह्यॅ ह्यॅ....
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 01/26/2017 - 17:39
नवीन
>>> ओ येस.... तुम्ही करता ते सत्यप्रतिपादन, गांधीवादी करतात तो कांगावा... बरं बरं!
मग काय गांधींवादी करतात ते सत्यप्रतिपादन आणि मी करतो तो कांगावा असं आहे की काय?
>>> तरी बरं, हे ५५ कोटी देण्याचा आणि उपोषणाचा संबंध नाही हे गांधीवादी नसलेल्यांनीही सांगितलंय. तरी आपलं उघडं पडलेलं थोतांड निभवून न्यायचंच असेल तर हास्यास्पद परिस्थिती कोणाची होते ते जग बघतंय.
मणिभवनवाले आणि ठाकूरदास बंग हे गांधींवादी नव्हते या संशोधनाबद्दल अभिनंदन!!!
>>> आता जे जे ह्याला असत्य म्हणतील ते सर्व कांगावेखोर आणि गांधीवादीच सम्जायला लागतील. जे ह्याला सत्य समजतील ते हरिश्चंद्राचे अवतार आहेत असे मानायचे बौद्धिक मिळाल्यावर काय बोलायचं... ?
गांधीवादी जे जे दडपून सांगतात ते ते सत्य असे बौद्धिक मिळाल्यावर काय बोलायचं?
>>> बाकी, ५५ कोटी आणी उपोषणाचा मुद्द्यावरच स्पष्ट प्रश्न विचारला होता, बाकीचे असंबंद्ध मुद्दे काढून दिशाभूल करणे म्हणजे ह्यॅ ह्यॅ ह्यॅ....
जो प्रश्न होता त्याचेच उत्तर दिले आहे.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
गुरुवार, 01/26/2017 - 14:17
नवीन
तसेच, जर गांधीवाद्यांवर विश्वास नाही ठेवायचा तर धादांत खोटा प्रचार करणार्यांवर ठेवावा असं सुचवायचं आहे बहुतेक तुम्हाला... खोट्या प्रचारकांवर विश्वास ठेवायला हवा असं सुचवण्यामागची मजबूरी काय आहे?
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 01/26/2017 - 14:19
नवीन
गांधीवाद्यांवर विश्वास ठेवायचा? ते काय राजा हरिश्चंद्राप्रमाणे किंवा सत्यवचनी रामाप्रमाणे होते का?
- Log in or register to post comments
व
वरुण मोहिते
गुरुवार, 01/26/2017 - 16:30
नवीन
पण ज्या ५५ कोटींची बोलत आहेत ते उपोषणाचे कारण नव्हते . ज्या वेळी फाळणीचा निर्णय झाला त्या वेळी हिंदुस्थान प्रांताची गंगाजळी ३७५ कोटी होती (आकडा वर खाली असू शकतो ) त्या आधारावर ५५ कोटी पाकिस्तान सिंध प्रांताला मिळाले . अनेक पुस्तकात ह्याचा उल्लेख आहे . रामचंद्र गुहा ह्यांच्या इंडिया आफ्टर गांधी ह्यात देखील आहे हे एक उदाहरण पण नंतर खोटा प्रचार जास्त झाला . त्यांची तत्व वेगळी असतील त्या नुसार ते जगले म्हणून एक व्यक्ती म्हणून ते इतकेही छोटे नव्हते कि कोणीही त्यांना काहीही बोलावं . जगातल्या प्रत्येक देशात भारत म्हटलं कि गांधी आठवतात . अनेक नेते इथे आले कि त्यांच्या समाधीचा दर्शन पहिले घेतात .आजही त्यांच्या नावाची गरज पडतेच ना अगदी मोदी सरकार ला हि . असो नोबेल कमिटी ने त्यांचा निधन झाल्यावर दिलगिरी व्यक्त केली कि त्यांना नोबेल पारितोषिक दिला नाही हि आमची चूक झाली . त्यावेळी नोबेल सामाजिक क्षेत्रात कोणालाही मिळत नसे सहजा सहजी. त्यावरून त्यांचा मोठेपण सांगत नाही पण त्यांची मूल्य वेगळी होती . आणि त्यांच्याबाबत बोलताना लोक जी पातळी सोडून बोलतात ते पण योग्य नव्हे . राहता राहिला मुद्दा हरिलाल चा तर प्रकाशाची सावली हे दिनकर जोशी ह्यांचं पुस्तक आहे ते पण वाचावं. वडील आणि मुलाचा वाद असणं आणि त्याला नंतर गांधीच चूक आहेत असा अपप्रचार करणं , भांडवल करणं हे हि चूक आहे . असो लिंक नाहीत हा माझ्याकडे सगळं द्यायला .
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
गुरुवार, 01/26/2017 - 16:36
नवीन
संदीप डांगे,
मणिभवन आणि अरविंद पोतनीस कोण लागून गेलेत मोठे? मणिभवन ज्याची पोळी खातात त्याचीच टाळी वाजवणार, हे आम्हाला कळतं.
रिझर्व्ह बँकेने फाळणीच्या वेळेस दोन्ही देशांचे अर्थव्यवहार हाताळले होते. बँकेच्या मते मोहनदास गांधींनी ५५ कोटी पाकिस्तानास देण्यासाठी उपास सुरू केला. त्यासंबंधी उल्लेख पान क्रमांक २६ च्या तळाशी इथे आहे : https://rbidocs.rbi.org.in/rdocs/content/PDFs/89651.pdf
नेहरूंनी ५५ कोटी देतांना ही भाषा वापरली : ‘Government’s contribution, to the best of their ability, to the non-violent and noble effort made by Gandhiji, in accordance with the glorious traditions of this great country, for peace and goodwill’
गांधीवाद म्हणजे टेररिस्ट फायनान्सिंगच आहे.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
गुरुवार, 01/26/2017 - 16:49
नवीन
काय गंमत आहे बघा, एकिकडे गांधीवादी खोटारडे आणि कांगावेखोर, त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा असे म्हणायचे आणि दुसरीकडे त्यांचेच दाखले देऊन ते म्हणतात ते खरेच आहेत असेही बोलायचे.
एक पे रहना, या तो घोडा बोलो या तो चतुर बोलो!
बाकी दुवा वाचतो आणि कळवतो.. =))
- Log in or register to post comments
फ
फेदरवेट साहेब
Fri, 01/27/2017 - 06:41
नवीन
उदा. त्यांचे सत्याचे प्रयोग, ५५ कोटी, हरीदास, वडिलांंचा म्रुत्यु इ.
इतके सगळे असूनही स्वच्छ भारत विकायला गांधींचेच फोटो लागतात, लोगो मध्ये त्यांचा सिग्नेचर चष्मा लागतो, बहुत काय बोलणे आता ;)
माझा गांधीवादावरही विश्वास नाही अन त्यांच्या विरोधकांच्या अक्कलशून्य बौद्धिकावर सुद्धा. त्यामुळे एकमेकांचे दाखले नाचवत कोणी येऊ नये अशी आगाऊ विनंती.
- Log in or register to post comments
फ
फेदरवेट साहेब
Fri, 01/27/2017 - 06:57
नवीन
बाकी, गांधींवर आलेल्या वर्तमानातील नाटकावर बोलायचं सोडून इतिहासाचा आधार का घ्यायला लागत असेल? :D
- Log in or register to post comments
फ
फेदरवेट साहेब
Sat, 01/28/2017 - 10:06
नवीन
लव्ह हिम ऑर हेट हिम. त्यांची पूजा करा किंवा त्यांचे मूर्तिभंजन करा एक गोष्ट पक्की आहे.
हा मनुष्य जश्या राजकीय गुगली फेकतो त्याला तोड नाही. सत्ताकारण नामे बुद्धिबळात हे नाव एक मजबूत संस्था बनून राहिले आहे हेच खरे.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sat, 01/28/2017 - 11:06
नवीन
जबरदस्त निर्णय
भारतानेही असा निर्णय घेण्याचे धाडस दाखवावे.
- Log in or register to post comments
फ
फेदरवेट साहेब
Sat, 01/28/2017 - 13:54
नवीन
त्यांनी ७ देशांच्या मुस्लिम निर्वासितांना बंदी केली आहे. भारत असा निर्णय कसा अन कधी घेणार ?
भारतात आत्ता निर्वासित कुठं आलेत ? अधिकारीक दृष्ट्या? की ज्यांना कायदा करून बंदी करावी लागेल? ऐतिहासिक चुका झाल्यात अन अजूनही बांगलादेशी घाण येत असते. ते मान्यच आहे. पण ते सगळे अनधिकृत रित्या. घुसखोर अन निर्वासित ह्या संकल्पना आपण परत एकदा वाचायची गरज आहे असे वाटते. दोन्हीना वेगळे शब्द आहेत इंग्लिश मध्ये 'Refugee' (निर्वासित) आणि 'infiltrator' (घुसखोर) असे.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Sun, 02/05/2017 - 09:27
नवीन
कम्युनिस्टांचा अड्डा असलेल्या जवाहरखान नेहरू विद्यापीठात ‘एक भारत अभियान – कश्मीर की ओर’ हा काश्मिरी हिंदूंच्या दुरवस्थेवर प्रकाश टाकणारा कार्यक्रम हिंदुत्वनिष्ठांनी भारतद्रोह्यांच्या नाकावर टिच्चून दणदणीतरीत्या यशस्वी केला. अधिक माहिती : http://sanatanprabhat.org/marathi/2017/02/05/%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%a7%e0%a4%be/
-गा.पै.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sun, 02/05/2017 - 09:51
नवीन
बरोबर.
http://www.dnaindia.com/delhi/report-jnu-students-protest-to-call-off-ek-bharat-abhiyan-kashmir-ki-aur-seminar-2293240
विद्यापीठातील देशद्रोही निधर्मांधांनी या कार्यक्रमाला विरोध केला होता. परंतु त्यांना कार्यक्रम थांबविता आला नाही.
- Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके
Tue, 02/07/2017 - 18:11
नवीन
ही घडामोड ताजी नाही मात्र ऐसी वर अनु राव यांनी ह्या लेखाची लिंक दिली ती वाचली. बरे वाटले. याअगोदरही या माणसाबद्दल वाचलं होतं पण ते एवढं डिटेल नव्हतं.
- Log in or register to post comments
प
पुंबा
Wed, 02/08/2017 - 05:59
नवीन
फार फार धन्यवाद या लिंकसाठी. यांच्यासारखं वागायचा प्रयत्न करीन नेहमी.
- Log in or register to post comments
प
पुंबा
Wed, 02/08/2017 - 06:01
नवीन
त्याच त्या नालायक पक्ष अन राजकारण्यांसाच्या समर्थनार्थ भुंकत बसण्यापेक्षा अश्या सोन्यासारख्या माणसांचे हात बळकटकेले आपण तर ती खरी लोकशाहीची सेवा ठरेल. दुव्याकरता दुवा.
- Log in or register to post comments
प
पुंबा
Fri, 02/10/2017 - 05:19
नवीन
मोदींनी मनमोहन सिंगांवर केलेली टीका काँग्रेस नेत्यांच्या खुप जिव्हारी लागली आहे. त्यांच्या मते, 'रेनकोट घालून आंघोळ करणे' ही अत्यंत असभ्य, गर्हणीय, निरर्गल, गरीमाहीन वगैरे टिका आहे. माझ्या मर्यादीत कल्पनाशक्तीला ताणून, खेचूनसुद्धा यात असभ्य काय आहे हे कळले नाही. मोदी हे २४ बाय ७ राजकारणी आहेत. त्यांची टीका ही मनमोहन सिंग या दुसर्या राजकारण्याच्या धोरणांवर, त्यांनी घेतलेल्या भुमीकेवर आहे. एवढे घोटाळे होत असताना, मनमोहन सिंगांची इमेज मात्र स्वच्छ राहीली यावरील ती टीपण्णी होती. ह्याला वैयक्तीक टीका म्हणणारे लोक हे जाणत नाहीत का की मोदींना खरोखर मनमोहन सिंगांच्या आंघोळीबद्दल बोलायचं नव्हतं, तर ते एक रूपक होते? याला प्रत्त्युत्तर देणे हा मनमोहन सिंगांचा विशेषाधिकार आहे. आता तो ते वापरत नाहीत हा त्यांचा पर्सनल चॉईस झाला. मात्र अश्या टीकेला उत्तर न देणे हीसुद्धा त्यांची राजकिय भुमीकाच आहे स्वतःचे प्रतिमासंवर्धन करण्याची. अश्यावेळी, बारक्या पोरांसारखं 'ह्यानं मला चिडवलं' असं रडून भेकून काय मिळणार? आणि यासाठी संसद बंद ठेवणे हा तर अक्षम्य गुन्हा आहे. फेबूवर वगैरे पण मोदी कसे असंस्कृत असा ओरडा सुरू आहे. पण या टिकेत असंस्कृत काय आहे याचं उत्तर मात्र देत नाहीत.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Fri, 02/10/2017 - 05:34
नवीन
नोटाबंदीवरच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागू नये म्हणून केलेल्या ह्या खेळीत मोदी जिंकणार (आणी नोटाबंदीचे प्रश्न व सामान्य नागरिक हरणार) असेच दिसते.
- Log in or register to post comments
च
चिनार
Fri, 02/10/2017 - 07:24
नवीन
सहमत...
मोदींना घेरण्याची संधी विरोधक प्रत्येक वेळी गमवतात. इतके मुरलेले काँग्रेजी दरवेळी मोदींच्या जाळ्यात कसे फसतात हे कळत नाही. कालही खर्गे " तुम्ही असं काऊन बोलले" हे विचारायला मोदींना भेटले.
हे असं " आम्ही कट्टी..थांब तुय नाव आईले सांगतो" टाईप राजकारण काँग्रेस किती दिवस करणार?
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Fri, 02/10/2017 - 08:38
नवीन
सब मिले हुये है जी... नोटाबंदीच्या काळात राहुल गांधी मोदींना भेटला आणि त्यानंतर लगेचच राजकिय पक्षांना जुन्या नोटा आपल्या खात्यात भरायला मुभा आहे असं जाहिर झालं... विरोधकांना घेरायचेच नसेल किंवा घेरायला गेले की ब्लॅकमेल होत असेल. सोनिया-राहूल-जावाइ-सिंग ह्या सर्वांवर भ्रष्टाचारी, भ्रष्टाचारी म्हणून २४बाय७ (सत्ता आली तरी अजूनही ) तोंडसुख घेणारेभाजपे तीन वर्ष होत आली तरी कोणतेही खटले दाखल करत नाहीयेत.. यावरुन काय ते समजून घ्या. तेरीभी-चूप-मेरी-भी-चूप असा प्रकार आहे.
शेवटचा कोणता मोठा घोटाळा कोणत्याही राजकिय पक्षाने उघडकीस आणला, त्याचा पाठपुरावा केला आणि दोषींना तुरुंगात पाठवले, आठवून बघा.
- Log in or register to post comments
च
चिनार
Fri, 02/10/2017 - 10:06
नवीन
तसंही असेल.."जावई" काँग्रेसला खरंच महागात पडलाय हे नक्की..
खरं सांगू का, त्या भ्रष्टाचाऱ्याला जेलमध्ये टाका, फाशी द्या, जंगलात सोडा किंवा मोकाट सोडा त्याने काहीही फरक पडत नाही. पण त्याने दाबलेले पैसे परत आले पाहिजे. दुर्दैवाने त्यासाठी कायदा नाही.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Fri, 02/10/2017 - 16:42
नवीन
बर्याच केसमधे घोटाळा हा सरकारला झालेले नुकसान असते, त्यासाठी संबंधित मंत्री-अधिकार्याला जी रक्कम मिळते ती त्यामानाने खूप कमी असते. समजा दहा हजार कोटीचा प्रकल्प सहा हजार कोटीमधे होतो, हे वरचे चार हजार कोटी अनेक प्रकारे सरकारकडून काढले जातात, त्यात संबंधित मंत्र्याला-अधिकार्याला किती रक्कम मिळाली हे कधीच सिद्ध होऊ शकत नाही. फार तर भुजबळ टाईप मालमत्ता आणी इन्कम यांचं गुणोत्तर गंडलं तरच पकडू शकतेत... दुसरं उदाहरण. एखाद्या प्रकल्पात समजा सरकारला दहा हजार कोटी फायदा होणार असेल पण तो तेवढा नाही हे दाखवायचे असेल तर संबंधित अधिकारी-मंत्री फारतर दहा टक्के रक्कम कंपनीला होणार्या फायद्यातून मिळवत असतील... कंपनीने सरकारकडून मिळवलेला निधी हा शंभर टक्के व्हाईट असतो, रितसर बिलं देऊन घेतला असतो... कायद्यात पकडणे मुश्किल असते. फारच झाले तर एखादं शालेय गणवेषाचे कंत्राट, बाहेर बाजारात ५०० रुपयाचा उत्तम गणवेष मिळतो पण सरकारला ७५० लावला जातो आणि प्रत्यक्ष डीलिवर झालेल्या गणवेषाचा दर्जा १०० रुपयांचा असतो, त्यात भ्रष्टाचार स्पष्ट दिसून येतो व सिद्धही करता येतो मात्र हेही खूप किचकट आणि फिर्यादीचा कस-दमखम पाहणारे काम असते.... चिक्कीचे उदाहरण ताजेच आहे....
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 02/10/2017 - 10:28
नवीन
न्यायप्रक्रिया अत्यंत संथ असल्याने हे खटले कूर्मगतीने चालतात. लालूला शिक्षा जाहीर होऊन ३ वर्षे होऊन गेली. दोनअडीच महिने तुरूंगात काढल्यावर तो जो सुटला तो अजून जामिनावर बाहेरच आहे. जयललिताचा खटला इतका रेंगाळली की ती वर गेली तरी अजून निकाल आलेला नाही. शिबू सोरेनवर गुन्हा सिद्ध होऊन ७-८ महिने तुरूंगात काढल्यानंतर तो अपीलात सुटला. एका दुसर्या प्रकरणात त्याच्यावर गुन्हा सिद्ध होऊनसुद्धा त्याचे वय लक्षात घेऊन न्यायालयाने त्याला शिक्षा दिली नाही. नरसिंहरावांनी १९९३ मध्ये लोकसभेत विश्वास ठरावावर आपल्या बाजूने मतदान करण्यासाठी झामुमोच्या ५ खासदारांना प्रत्येकी १ कोटी रूपये लाच दिल्याचे सिद्ध होऊनसुद्धा गुन्हा संसदेच्या सभागृहात घडल्याने न्यायालय शिक्षा देऊ शकले नाही.
मागच्याच आठवड्यात झारखंडच्या एका माजी मंत्र्याला ७ वर्षांची शिक्षा झाली आहे. छगनबाप्पा व त्यांचे पुतणे जवळपास वर्षभर तुरंगात आहेत. राष्ट्रवादीचा रमेश कदमसुद्धा जवळपास वर्षभर आत आहे. थोड्या प्रमाणात व अत्यंत संथ गतीने का होऊना पण काही जणांना तरी शिक्षा होत आहे.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Sat, 02/11/2017 - 08:42
नवीन
कृती करायची वेळ आली की न्यायालयाला व संथ गतीला पुढे करायची चाल नेहमीची झाली आहे आता. धमक असेल तर खटले दाखल तर करावेत भाजपने, कोर्टात काय तो निकाल लागेल तो लागेल तेव्हा लागू देत. पुरावे आहेत ना मग सडवा सगळ्यांना आत, पुरावे नसतील तर मग उठसूठ आरोप करणे हा खोटारडेपणा आहे असे समजावे.
कालच मोदी हरिद्वारच्या सभेत म्हणाले: मैं कांग्रेस के नेताओं से कहना चाहता हूं कि जबान संभाल कर रखो, वरना मेरे पास आपकी पूरी जन्मपत्री पडी हुई है।
म्हणजे काय कुंडली आहे ह्यांच्याकडे पण माझ्यावर टिका कराल तर याद राखा, उघड करेन... का रे बाबा, देशाच्या गद्दारांच्या कुंडल्या स्वतःवर टिका होऊ नये म्हणून ब्लॅकमेलिंगसाठी वापरायच्या आहेत का? हीच का तुमची देशसेवा, देशभक्ती? करा ना उघड, होऊ दे दूध का दूध पानी का पानी. तुमची आणि त्यांची सगळ्यांचीच असलियत बाहेर येईल... जनतेला खर्या अर्थाने न्याय मिळेल... तोवर ह्या नुसत्या गफ्फा हाणत बसा.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sat, 02/11/2017 - 17:51
नवीन
काही जणांवर खटले सुरू आहेत (छगनबाप्पा, समीर, रमेश कदम, सोनिया, राहुल व इतर इ.) तर काही जणांची चौकशी सुरू आहे (वडेरा, वीरभ्रद सिंह पतिपत्नी, कृपाशंकर, अजितदादा, तटकरे, अशोक चव्हाण इ.). उशीरा का होईना निकाल लागेलच.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Tue, 02/14/2017 - 14:48
नवीन
डांगे अण्णा
सर्वोच्च न्यायालयाने स्वतः सहारा श्री सुब्रोतो रॉय एक वर्षांपासून तिहारमध्ये बसवले आहे. तरीही त्यांच्या कडून सर्व पैसे अजून वसूल झालेले नाहीत कि खटला पूर्ण झालेला नाही. काळ्यापैशाबाबत सर्वोच्च न्यायालयाने गठीत केलेली विशेष तपासणी समितीचे खोदकाम अजून चालू आहे. हे सर्व सकृतदर्शनी न्यायालयाला मान्य असलेले पुरावे असलेल्या केस मधील कहाणी आहे.
नॅशनल हेराल्ड केसमध्ये सकृतदर्शनी पुरावे असल्याने न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले असून त्याचे गुऱ्हाळ चालू आहेच. या केसेस मध्ये खटले दाखल करणारी व्यक्ती किंवा न्यायालय स्वतः रस घेत असून आणि सकृतदर्शनी पुरावे असूनही हि स्थिती आहे.
राजकारणी लोकांना माहित असले तरी न्यायालयात सिद्ध होतील असे पुरावे गोळा करणे हि सोपी गोष्ट नाही. सलमान खानने काय केले हे जगाला माहित असूनही १९९८ सालची केस (चिंकारा मारल्याची) २०१६ साली शेवटी निकाल लागून तो सज्जड पुराव्याअभावी( संशयाचा फायदा) सुटला. तसेच २००२ सालची दारू पिऊन गाडी चालवल्याच्या केसचा निकाल १३ वर्षांनी लागून २०१५ मध्ये सातासच सुटला.
असे असूनही आणि हीच वस्तुस्थिती मागे एकदा निदर्शनास आणूनही आपण "परत परत" अशीच विधाने करता यात आपला पूर्वग्रह किंवा मोदी/ भाजप द्वेषच दिसून येतो.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Tue, 02/14/2017 - 15:22
नवीन
साहेब, सुब्रतो राय २८ फेब्रुवारी २०१४ पासून जेलमधे आहे. तुम्ही एक वर्षापासून म्हणत आहात. मोदीसरकारच्या नावाखाली खपवायचे आहे काय सहारा प्रकरण?
बरोबर. जो न्याय सलमान खानला तोच नरेंद्र मोदींना २००२ च्या दंगलीतल्या सहभागाबद्दल लावता येतो, तो आपल्याला पटेल काय? 'जगाला माहित आहे' एवढ्या भांडवलावर कोणाला दोषी किंवा निर्दोष ठरवायचे-मानायचे हे पब्लिक-मीडिया ट्रायल सोयिस्कररित्या बदलते असे निरिक्षण आहे.
हा हा हा, तुम्हाला काय पूर्वग्रह द्वेष दिसून येतो तो येत राहो. वरचा प्रतिसाद ज्याला आपण उत्तर दिले आहे त्यात नरेंद्र मोदींचे स्वतः केलेले 'ताजे' वक्तव्य आहे. आणि ते वक्तव्य देशाच्या सर्वोच्च स्थानावर बसून केले आहे. मैं कांग्रेस के नेताओं से कहना चाहता हूं कि जबान संभाल कर रखो, वरना मेरे पास आपकी पूरी जन्मपत्री पडी हुई है। हे ते वक्तव्य. हे जर खरे असेल तर जन्मपत्री उघड का करत नाहीत, कसली वाट बघत आहेत? जर खोटे असेल तर एवढ्या जबाबदार पदावर बसून असल्या पोकळ गफ्फा मारणार्या माणसाबद्दल काय विचार करावा ते तुम्हीच सांगा. निवडणुकीतली भाषणांकडे जास्त लक्ष देऊ नये असे म्हणत असाल तर मोदीजी गेले तीन वर्ष एकच रेकॉर्ड घासत आहेत. ते रेकॉर्ड ऐकून भूलून जाऊन लोकांनी त्यांना निवडून दिले.. सत्तेवर बहुमताने बसले तरी आपले 'परत परत' अशीच विधाने करत आहेत. माझ्यासारख्या क्षुल्लक व्यक्तीचा द्वेष वगैरे बघण्याच्या फंदात पडण्यापेक्षा देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तीचे वर्तन बघा.
एकीकडे देशभक्तीच्या नावाखाली अश्रू ढाळण्याची नाटके करणे आणि दुसरी कडे अशा धमक्या देणे विसंगत आहे. असल्या माणसांवर अंधप्रेम करणार्यांवर, आणि लगेच बचावाला सरसावणार्यांवर आता दयादेखील येत नाही.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 02/10/2017 - 09:35
नवीन
कधी कधी असं वाटतं की मोदी प्रत्येक अधिवेशनाच्या वेळी वादग्रस्त मुद्द्यांवर चर्चा टाळावी यासाठी मुद्दाम काहीतरी वादग्रस्त विधान करतात व लगेच विरोधक तेच विधान धरून बसतात व त्यामुळे संसद बंद पाडणे, त्याच विधानावर सातत्याने बाईट देणे इ. प्रकार करीत राहतात. त्यामुळे मूळ मुद्दा बाजूलाच राहतो व मोदी त्यातून अलगद निसटतात.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Fri, 02/10/2017 - 08:27
नवीन
सौरा,
कुठला रेनकोट आणि कुठली आंघोळ ते तुम्हाला आजूनही कळलेलं नाहीये. ;-)
शेवटी काँग्रेस चोर आहे आणि चोराच्या मनात चांदणे!
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
प
पुंबा
Fri, 02/10/2017 - 09:18
नवीन
काय की... पण नाही कळलं खरंच.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Fri, 02/10/2017 - 14:53
नवीन
अहो, रेनकोट म्हणजे निरोध हो!
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 02/10/2017 - 10:31
नवीन
मोदींनी केलेली "रेनकोट घालून अंघोळ करणे" ही टिप्पणी नक्कीच इतिहासात अजरामर होणार आहे. भविष्यात अनेकवेळा या टिप्पणीचा संदर्भ दिला जाईल. अडवाणींनी "स्युडो सेक्युलर" हा एक नवीन शब्द जन्माला घातला. व्ही के सिंह यांनी "प्रेस्टिस्ट्यूट" हा अत्यंत चपखल शब्द तयार केला. त्याचप्रमाणे ही नवीन टिप्पणी आहे.
- Log in or register to post comments
अ
अमितदादा
Fri, 02/10/2017 - 18:33
नवीन
भारत अणुशक्ती शहर उभारत आहे हा पाकिस्तान ने आरोप करायच्या बर्याच अगोदर, २०१५ साली एका विश्वसनीय स्थळावर (foreignpolicy) लिहिलेला हा एक लांबलचक रिपोर्ट. कर्नाटक मध्ये उभ्या राहिलेल्या दोन अति गुप्त संस्था त्याच्याभोवती होणार्या सैनिकी तळ या विषयी हि माहिती विस्तृत रित्या दिलेय. काही गुप्त कागदपत्रे, अमेरिकन satelite images यांचा हि हवाला दिला आहे. हे स्थळ thermonuclear शस्त्र विकसित करण्यासाठी आहे असा बर्याच जणांचा होरा आहे.
Indian Nuclear City
ह्या रिपोर्ट मधली माहिती sensitive असली तरी बर्याच देशांना आणि लोकांना माहित असल्याने देशाच्या सुरक्षेस धोकादायक नाहीये.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Fri, 02/10/2017 - 18:56
नवीन
अमितदादा,
तुम्ही दाखवलेल्या अहवालात औष्माण्विक (=थर्मोन्यूक्लियर) अस्त्र असा मोघम उल्लेख आहे. मात्र त्यासाठी शुद्ध युरेनियमची गरज पडंत नाही. त्यामुळे हे अस्त्र उत्तेजाण्विक (=बूस्टेड न्यूक्लियर) असावे असा अंदाज आहे. उत्तेजाण्विक अस्त्रासंबंधी इथे एक लेख आहे : https://qz.com/588519/why-its-so-difficult-to-build-a-hydrogen-bomb/
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
अ
अमितदादा
Fri, 02/10/2017 - 19:20
नवीन
शुद्ध युरेनिम म्हणजे उरेनिम-२३५ जे thermo nuclear bomb साठी वापरल जात. (वाचा विकीपेडिया). बाकी मी दिलेली लिंक वरवरची नसून खोलवर माहिती आहे . तसेच तयार होणार केंद्र हे अणुशक्ती (nuclear) चे संशोधन केंद्र हि असणार आहे, लष्करी तळ हि असणार आहे. बाकी वरील बातमी विश्वसनीय न वाटल्यास हरकत नाही.
२०१५ सालची आणखी एक बातमी
News report
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Sat, 02/11/2017 - 16:57
नवीन
अमितदादा,
माझ्या मते संमीलन (=फ्युजन) बॉम्बसाठी अधिमात्र (=एनरिच्ड) युरेनियमची तितकीशी गरज पडंत नाही. मात्र उत्तेजाण्विक (बूस्टेड न्यूक्लियर) बॉम्बमध्ये याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो.
संमीलनध्वम (= फ्युजन बॉम्ब = हायड्रोजन बॉम्ब)थेट फोडता येत नाही. त्याला चालना म्हणून अगोदन एक छोटा भंजनध्वम (= फिशन बॉम्ब = युरेनियम बॉम्ब ) फोडावा लागतो. तर पहिल्या भंजनध्वममध्ये हानी घडवून आणायचं उद्दिष्ट नसल्याने उच्च प्रतीचं युरेनियम वापरायची काहीच गरज नाही.
याउलट उत्तेजाण्विकध्वम (= बूस्टेड न्यूक्लियर बॉम्ब) मध्ये पहिली पायरी छोटा भंजनध्वम, दुसरी पायरी छोटा संमीलनध्वम आणि तिसरी पायरी पुनश्च पण मोठा भंजनध्वम अशी असते. तर तिसऱ्या पायरीच्या भंजनात अधिमात्र (=एनरिच्ड) युरेनियम वापरलं जातं.
दोन्ही तंत्रज्ञानं उच्च प्रतीची आहेत. एकावर प्रभुत्व मिळवलं की लगेचच दुसऱ्यावर मिळवता येतं. त्यामुळे भारताचे दोन्ही आघाड्यांवर घोडदौड चालू आहेसं म्हणायला हरकत नाही.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Fri, 02/10/2017 - 19:36
नवीन
पाकिस्तानी आयएसआयचा भारतीय हस्तक एक भाजप कार्यकर्ता?
मध्यप्रदेश (भाजपशासित) एटीएस ने अवैध टेलिफोन एक्स्चेंज चालवणार्या एका टोळीला अटक केली असून त्यातल्या ११ संशयितांमधे हा एक आहे. विशेष बाब म्हणजे आयएसआय चे हे कथित हस्तक मुस्लिम नव्हेत...
http://aajtak.intoday.in/crime/story/one-of-the-isi-operatives-arrested-by-the-mp-ats-identified-as-dhruv-saxena-was-member-of-the-bjp-it-cell-1-911592.html
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sun, 02/12/2017 - 16:21
नवीन
बरोबर १ वर्षापूर्वी दिल्लीत ज. ने. विद्यापीठात राडा झाला होता. आधी महिषासुर जयंती समारंभ व नंतर ११ फेब्रुवारीला अतिरेकी अफझल गुरू पुण्यतिथी साजरी करणे व त्यावेळी देशद्रोही घोषणा देणे यामुळे सर्वत्र रणकंदन माजले होते. या कार्यक्रमांना आधी अभाविपने विरोध करूनसुद्धा विद्यापीठातील डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांच्या टोळक्याने अट्टाहासाने हे कार्यक्रम घडवून आणले होते. त्यानंतर २-३ महिने जे रामायण झाले ते सर्वश्रुत आहे.
यावर्षी सुदैवाने असले देशद्रोही कार्यक्रम झाल्याचे वाचलेले नाही. बहुतेक मागील वर्षीच्या अभाविपच्या दणक्याने यावर्षी असले कार्यक्रम पुन्हा करण्याची 'सर्वांदेखत रस्त्यावर लघुशंका' फेम कन्हैया कुमार व त्याच्या टोळीतील कोणाचीही हिंमत झालेली दिसत नाही. असले कार्यक्रम पार पडले असल्यास कोणत्याही वाहिनीवर किंवा वृत्तपत्रातून त्याविषयी सांगण्यात आलेले नाही. त्यावेळी या देशद्रोह्यांच्या मदतीला धावून जाणार्या पप्पू, केजरीवाल इ. नी सुद्धा त्याबद्दल मौन बाळगलेले दिसते.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Sun, 02/12/2017 - 16:26
नवीन
हा धागा ताज्या घडामोडींबद्दल आहे की सोयिस्करपणे चिखलफेक करण्यासाठी व गाडलेले मुडदे उखडण्यासाठी ?
चालू घडामोडींबद्दल असेल तर तुमच्या प्रतिसादाच्या अगदीवरच एक बातमी आहे बघा, अगदी ताजी ताजी.... भाषा समजेल ना?
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sun, 02/12/2017 - 16:33
नवीन
ती बातमी होय? काय करू मी त्या बातमीचं?
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Sun, 02/12/2017 - 16:38
नवीन
वाचली का नीट? भाषा समजली काय?
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sun, 02/12/2017 - 16:42
नवीन
नाही समजलं. कृपया नीट, निष्पक्षपणे, त्रयस्थपणे समजावून सांगता का?
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- ›
- »