Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ताज्या घडामोडी - ३

श
श्रीगुरुजी
Mon, 10/31/2016 - 15:46
🗣 314 प्रतिसाद
ताज्या घडामोडी - १ ताज्या घडामोडी - २ मागील धाग्यात ३००+ प्रतिसाद झाल्याने नवीन धागा उघडत आहे.

प्रतिक्रिया द्या
66485 वाचन

💬 प्रतिसाद (314)
अ
अमितदादा Sat, 12/10/2016 - 18:48 नवीन
उजळ बाजू India plans to be power surplus in 2016-17 काळी बाजू Many don’t have power in ‘power-surplus India’
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
आ
आनंदयात्री Sun, 12/11/2016 - 20:18 नवीन
या माहितीपूर्ण प्रतिसादासाठी आणि दुव्यांसाठी धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
श
शलभ Mon, 12/12/2016 - 10:15 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
अ
अमितदादा Fri, 12/23/2016 - 16:27 नवीन
भारतीय वैद्यकीय क्षेत्रात होणारा भ्रष्टाचार, नफेखोरी आणि अनियमितता दिवसो दिवस प्रचंड वाढत चाली आहे. हृदयावरील होणार्या angioplasty शस्त्रक्रिये मध्ये वापरण्यात येणाऱ्या stent मध्ये होणार्या भरमसाठ नफेखोरी वरती, तसेच यामध्ये असणाऱ्या दलाल, डॉक्टर, हॉस्पिटल आणि stent कंपन्यातील साखळीवर outlook ह्या मासिकाने वाचनीय अशी कवर स्टोरी लिहिलेली आहे. Heart For Mart Sake The Pass-Pass Scam ह्या बातमीनुसार २०-२५ हजार किमत असणारी stent १.५-२ लाख किमतीने कशी विकली जाते याची इंत्यांभूत माहिती दिलेली आहे. अशी प्रचंड नफेखोरी होत असताना ह्या कंपन्यांचा, दलालंचा आणि डॉक्टरांचा सरकारवर stent चा NLEM मध्ये समावेश करू नये म्हणून असणारा दबाव हि अधोरेखित केला आहे. अवांतर> ह्या बातमीनुसार AIIMS ह्या भारतातील अत्यंत प्रगत आणि अग्रगण्य रुग्णालयाने मागील वर्षी १९५८ angioplasties केल्या तिथे पुण्यातील एका प्रतिष्टीत खासगी रुग्णालयाने २५००० angioplasties केल्या.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Fri, 12/23/2016 - 17:43 नवीन
लोकहो, नुकतीच २० डिसेंबर रोजी रशियाचे तुर्कास्थानातले राजदूत आंद्रेई कारलोव्ह यांची एका तुर्की पोलिसाने गोळी मारून हत्या केली. याच सुमारास मॉस्को येथे रशियन मुत्सद्दी पेत्र पोलशिकोव्ह याची राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या दोन्ही हत्या संबंधित आहेत का हे पहाणं रोचक ठरावं. कारलोव्ह यांची हत्या एका पोलिसाकडून झाली आहे. हे तुर्कस्थानाचे पंतप्रधान अर्दोवान यांची प्रशासनावरील पकड ढिली पडल्याचं लक्षण आहे. जुलै महिन्यात अर्दोवान यांनी पोलीस, सैनिकी, नागरी प्रशासकीय सेवक, शिक्षक, इत्यादिंची घाऊक प्रमाणावर बडतर्फी केली होती. अशा प्रकारे बडतर्फी केल्याने समाजात असुरक्षितता वाढते. यातून असंतोष बळावतो आणि सुरक्षाव्यवस्थेला खिंडारं पडतात. ही यादवीसाठी अनुकूल परिस्थिती मानली जाते. अर्दोवान कसे नियंत्रण प्रस्थापित करतात हे पाहणे रोचक असेल. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
अ
अमितदादा Sat, 12/24/2016 - 21:15 नवीन
मणिपूर हे ईशान्य भारतातील छोट राज्य गेले दोन महिने आर्थिक नाकेबंदी संकटामुळे होरपळून निघत आहे. केंद्र सरकार, राष्ट्रीय माध्यमे ह्या गोष्टीकडे कानाडोळा करत असताना दिसून येत आहेत. मुळात मणिपूर हे राज्यच वांशिक हिंसाचाराने पिडीत आहे, ह्या राज्याचे दोन मुख्य भाग पडतात मध्य मैदानी भाग जिथे मैती लोक राहतात आणि डोंगराळ भाग जिथ नागा आणि कुकी ह्या जमाती राहतात, ह्या प्रमुख जमाती मध्ये होणार्या सततच्या कुरबुरी मुळे हिंसाचार आणि अडवणूक मणिपूर च्या पाचवीला पुजली आहे. मणिपूर ला मुख्य देशाशी जोडणारे राष्ट्रीय महामार्ग हे नागा च्या आधिपत्याखालील भागातून जातात जिथे नागा लोकांनी हे महामार्ग पूर्ण बंद करून ठेवले आहेत ते हि जवळजवळ गेले दोन महिने . अर्थात हे काही तेथील लोकांना नवीन नाही मणिपूर ची मागे हि १०० दिवस आर्थिक नाकेबंदी केली गेली होती परंतु केंद्र सरकार ने कोणताही धडा घेतलेला दिसत नाही आतासुद्धा केंद्र सरकारच्या पातळीवरून गंभीर पणे कोणतीही हालचाल दिसत नाही. भारतातील कोणत्याही मुख्य राज्यात काही झाल्यास जागरूक असणाऱ्या केंद्र सरकार आणि राष्ट्रीय माध्यमांची तत्परता ईशान्येकडील राज्ये २ महिने जळत असताना कुठ जाते हे काही कळत नाही. सध्यातरी किरेन रीज्जू यांची मणिपूर भेट, दलबीर सिंघ आणि राजनाथ सिंघ याचं ब्रीफिंग याच्यापुढ केंद्र सरकार ने काही हि केलेलं दिसत नाही. सध्याच्या नाकाबंदिला मणिपूर मध्ये नागांना विश्वासात न घेता केलेल्या नवीन सात जिल्ह्यांची निर्मिती हे कारण आहे. परंतु ह्यामागे बरीच राजकीय करणे दडलेली आहेत हे नक्की. Manipur’s old patterns of violence reignited Blockades are nothing new to Manipur, but this time it’s different अवांतर>>>> मागे चीन पाकिस्तान आणि रशिया यांच्या जवळकी बद्दल व्यक्त केलेली शंका खरी ठरतीय कि काय अश्या घडामोडी घडत आहेत. एक NDTV वरील सुंदर लेख Pak-Russia-China Get Closer. What That Means For India
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 12/25/2016 - 11:02 नवीन
तब्बल ४ वर्षानंतर सिरियन लष्कराने इसिसच्या ताब्यातून अलेप्पो शहर जिंकून घेतले आहे. इसिसचा काऊंटडाऊन सुरू झाला आहे. अलकायदाप्रमाणे इसिसदेखील काही काळाने जवळपास नामशेष होईल. अर्थात रक्तपाताची चटक असलेले धर्मांध मुस्लिम एखादी नवीन संघटना काढून रक्तपात सुरूच ठेवतील. जरी इसिस संपूर्ण नष्ट झाली तरी अनेक युरोपिअन देशात कायदेशीर/बेकायदेशीर मार्गाने घुसलेले इराकी व सिरियन निर्वासित आपल्या देशात परत जाणार नाहीत. आहेत तिथेच ते आता कायम राहून त्या देशांना उपद्र्व देत राहणार. गेल्या २ वर्षात फ्रान्स, जर्मनी व तुर्कस्तानमध्ये निर्वासितांनी केलेल्या अतिरेकी हल्ल्यात मोठी वाढ झाली आहे. भविष्यात हेच होणार आहे. मानवतेचा कळवळा आणून हा उपद्र्व स्वतःहून गळ्यात बांधून घेतलेल्या या देशांना अतिरेकी हल्ल्यांची शिक्षा मिळणारच आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 12/25/2016 - 11:02 नवीन
तब्बल ४ वर्षानंतर सिरियन लष्कराने इसिसच्या ताब्यातून अलेप्पो शहर जिंकून घेतले आहे. इसिसचा काऊंटडाऊन सुरू झाला आहे. अलकायदाप्रमाणे इसिसदेखील काही काळाने जवळपास नामशेष होईल. अर्थात रक्तपाताची चटक असलेले धर्मांध मुस्लिम एखादी नवीन संघटना काढून रक्तपात सुरूच ठेवतील. जरी इसिस संपूर्ण नष्ट झाली तरी अनेक युरोपिअन देशात कायदेशीर/बेकायदेशीर मार्गाने घुसलेले इराकी व सिरियन निर्वासित आपल्या देशात परत जाणार नाहीत. आहेत तिथेच ते आता कायम राहून त्या देशांना उपद्र्व देत राहणार. गेल्या २ वर्षात फ्रान्स, जर्मनी व तुर्कस्तानमध्ये निर्वासितांनी केलेल्या अतिरेकी हल्ल्यात मोठी वाढ झाली आहे. भविष्यात हेच होणार आहे. मानवतेचा कळवळा आणून हा उपद्र्व स्वतःहून गळ्यात बांधून घेतलेल्या या देशांना अतिरेकी हल्ल्यांची शिक्षा मिळणारच आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 12/25/2016 - 11:27 नवीन
काँग्रेसची उ.प्र. मध्ये जोरदार फजिती होण्याची शक्यता आहे. काही महिन्यांपूर्वी मोठा गाजावाजा करून काँग्रेसने भक्कम पैसे मोजून प्रशांत किशोर यांना उ. प्र. मधील विधानसभा निवडणुकीसाठी धोरण सल्लागार म्हणून नेमले. काँग्रेसने उ. प्र. मध्ये कोणाशीही युती न करता स्वबळावर निवडणुक लढविण्याचे ठरविले होते. राहुल किंवा प्रियांका यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करावे हा प्रशांत किशोरांचा सल्ला काँग्रेसने धुडकावून लावला. नंतर प्रशांत किशोरांच्या सल्ल्यावरूनच ब्राह्मण असलेल्या ७८ वर्षीय शीला दिक्षित यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून जाहीर केले. त्यानंतर शीला दिक्षितांना घेऊन ३ दिवसांची बस यात्रा दिल्लीपासून सुरू केल्यावर तासाभरातच शीला दिक्षितांची प्रकृती बिघडल्याने त्यांना बसमधून उतरून थेट रूग्णालय गाठावे लागले. नंतर सोनिया गांधींनी वाराणशीत जाहीर सभा घेऊन रोडशो सुरू केल्यावर काही वेळाने त्यांना बरे वाटेनासे झाल्यावर त्यांनाही रूग्णालयात हलविण्यात आले. तेव्हापासून त्या सार्वजनिक समारंभापासून दूरच आहेत. नंतर प्रशांत किशोरांच्या सुपीक मेंदूतून आलेल्या कल्पनेनुसार राहुल गांधींनी 'खाट पे चर्चा' नावाची प्रचारमोहीम सुरु केली. ही मोहीम खाटा पळवापळवीनेच गाजल्यानंतर थांबविण्यात आली. 'कर्जा माफ, बिजली बिल हाफ' अशा घोषणा रंगविलेल्या बसमधून राहुल गांधींनी उ.प्र. मध्ये फिरून बर्‍याच सभा घेतल्या होत्या. गेल्या १-२ दिवसांपासून आता बातम्या बाहेर येत आहेत. काँग्रेसने स्वबळाचा नाद सोडून शेवटी समाजवादी पक्षाशी युती करण्याचे ठरविले आहे. या युतीत सपा ३०३ जागा, काँग्रेस ७८ व अजितसिंह यांचा लोकदल पक्ष २२ जागा लढवेल. स्वबळाचा फुशारक्या मारताना शेवटी काँग्रेस ४०३ पैकी जेमतेम ७८ जागा लढविण्यावर समाधान मानणार आहे. फजिती अजून वेगळी काय असते?
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे गुरुवार, 12/29/2016 - 15:28 नवीन
भाजपात आला पवित्र झाला?
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे गुरुवार, 12/29/2016 - 15:34 नवीन
वरच्या प्रतिसादातला विडिओ गायपलाय.. तोच विडियो खाली.. काय मॅटर आहे गोवेकर्स?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 12/30/2016 - 10:40 नवीन
२००८ मधील मालेगावमध्ये झालेल्या बाँबस्फोटामध्ये २००९ मधील निवडणुकीवर डोळा ठेवून भाजपला बॅकफूटवर नेण्यासाठी व मुस्लिमांचे लांगूलचालन करण्यासाठी तत्कालीन युपीए सरकारने साध्वी प्रज्ञासिंग, कर्नल पुरोहित यांच्या सहीत अजून ८-९ जणांना मकोकाखाली अडकविले. ऑक्टोबर २००८ पासून गेली ८ वर्षे २ महिने ते विनाजामीन तुरूंगात आहेत. त्यांच्यावर अनेक खोटे आरोप लावण्यात आले आहेत व खोटे पुरावे जमा केले आहेत. आता यातील अजून एक खळबळजनक घटना बाहेर येत आहे. http://indiatoday.intoday.in/story/malegaon-blast-ats-sadhvi-pragya-col-purohit/1/845839.html
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Fri, 12/30/2016 - 11:31 नवीन
काय खळबळजनक आहे? मुजावरने काही पुरावे दिलेत का? त्यांच्यावर अनेक खोटे आरोप लावण्यात आले आहेत व खोटे पुरावे जमा केले आहेत ^^^ ह्याला काही आधार? आरोप व पुरावे खोटे असतील तर ते अजून आत का आहेत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ग
गामा पैलवान Fri, 12/30/2016 - 14:50 नवीन
संदीप डांगे,
आरोप व पुरावे खोटे असतील तर ते अजून आत का आहेत?
यालाच न्यायाचा गर्भपात म्हणजे miscariage of justice म्हणतात. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
श
श्रीगुरुजी Fri, 12/30/2016 - 16:21 नवीन
त्या सर्वांना फक्त मालेगाव प्रकरणात अडकविले नसून वेगवेगळ्या १५-१६ बाँम्बस्फोटात संशयित आरोपी म्हणून त्यांची नावे टाकली आहेत. त्यांना वेगवेगळ्या कठोर कलमांखाली अडकविले आहे ज्यात जामीनाची तरतूदच नाही. The state ATS, which was initially probing the case, had charged the accused under various sections of the stringent Maharashtra Control of Organised Crime Act and under the Unlawful Activities Prevention Act, Indian Penal Code, Indian Explosives Act and the Arms Act. समजा एका प्रकरणात जामीन दिला गेला तरी इतर सर्व प्रकरणात जामीन मिळाल्याशिवाय ते बाहेर येऊ शकत नाहीत. न्यायालय अत्यंत संथ गतीने या प्रकरणाची सुनावणी करीत आहे. हे प्रकरण २००८ मधील असले तरी त्यापूर्वी अडीच वर्षाहून अधिक काळ घडलेल्या समझोता एक्स्प्रेस बाँबस्फोटाचा निकाल जवळपास ११ वर्षे उलटत आली तरी अजून लागलेला नाही. त्या तुलनेत या प्रकरणाला जेमतेम ८ वर्षे २ महिनेच उलटले आहेत. या लोकांना कसे जाणूनबुजून अडकविण्यात आले आहे याबद्दल एका धाग्यात अनेकांचे अनेक प्रतिसाद आहेत. त्यातील काही मोजक्या प्रतिसादांच्या लिंक्स - http://www.misalpav.com/comment/453587#comment-453587 http://www.misalpav.com/comment/460070#comment-460070 http://www.misalpav.com/comment/456306#comment-456306 हा संपूर्ण धागा वाचावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
श
श्रीगुरुजी गुरुवार, 02/02/2017 - 10:27 नवीन
साध्वी प्रज्ञासिंग व इतरांना अनेक खोट्या प्रकरणात अडकविले आहे. त्यातल्या एका प्रकरणातून काल तिची व इतरांची निर्दोष मुक्तता झाली आहे. http://www.rediff.com/news/report/sadhvi-pragya-7-others-acquitted-in-sunil-joshi-murder-case/20170201.htm संपुआ सरकारच्या काळात अनेक हिंदुत्ववाद्यांना दहशतवादाच्या खोट्या प्रकरणात अडकवून संपुआवाल्यांनी हिंदू दहशतवाद, भगवा दहशतवाद असा प्रचार करून भाजप व संघ परिवाराला बॅकफूटवर नेण्याचा अश्लाघ्य प्रयत्न केला होता. मुस्लिमांची सहानुभूती मिळविणे, भाजपवर कुरघोडी करणे व त्यातून राजकीय फायदा मिळविणे यासाठी ही घृणास्पद कृत्ये संपुआने केली. या सर्व आरोपींवर आरोपपत्र दाखल न करता व त्यांना जामीन मिळून न देता वर्षानुवर्षे त्यांना तुरूंगात डांबून ठेवणे व जोपर्यंत ते तुरूंगात आहेत तोपर्यंत भगवा दहशतवाद असा प्रचार करणे असली घाणेरडी कामे करण्यामध्ये तत्कालीन गृहमंत्री चिदंबरम्, गृहसचिव नारायणन इ. चा समावेश होता. आता यातील काही खटल्यांची सुनावणी सुरू झाली आहे. वरील खटल्याचा निकाल तब्बल ८-९ वर्षांनंतर लागला. २=३ वर्षांपूर्वी मडगाव बाँफस्फोटात जाणूनबुजून अडकविलेल्या सनातनच्या ६ कार्यकर्त्यांची न्यायालयाने निर्दोष सुटका केली होती. तब्बल ११ वर्षे उलटली तरी समझोता एक्सप्रेस बॉम्फस्फोट प्रकरणाचा निकाल लागलेला नाही. मालेगाव प्रकरणात तर तब्बल ८ वर्षांनंतर सुद्धा निकाला लागलेला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
स
संदीप डांगे गुरुवार, 02/02/2017 - 12:56 नवीन
बहुतेक सलमान खानची सुद्धा दोन प्रकरणातून निर्दोष सुटका केली आहे माननीय न्यायालयाने, करीम तुंडा पण...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 02/02/2017 - 19:11 नवीन
ही वेगवेगळी प्रकरणे आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
सतिश गावडे Fri, 12/30/2016 - 14:39 नवीन
नेताजींनी अखिलेशला सहा वर्षांसाठी पक्षाबाहेर काढले.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 12/30/2016 - 16:23 नवीन
आपल्या अपयशावरून जनतेचे लक्ष वळवून जनतेला मूर्ख बनविण्यासाठी व पक्षातील असंतुष्टांना ताब्यात ठेवण्यासाठी हे पितापुत्र नूरा कुस्ती खेळत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
श
श्रीगुरुजी Sun, 01/01/2017 - 16:08 नवीन
अमरसिंह या दलालामुळे काही वर्षांपूर्वी आझमखान नावाचा जातिवंत धर्मांध मुसलमान सपा सोडून बाहेर पडला होता. त्यामुळे सपाला मुस्लिम मते मोठ्या प्रमाणावर गमवावी लागली. ते ओळखून आझमखानचे पाय धरून मुलायमने अमरसिंहला पक्षातून हाकलून आझमखानला पक्षात परत आणले. परंतु आझमखान आपल्या आगलावू भाषणांमुळे व जातीयवादी वक्तव्यांमुळे डोईजड झाला होता. अखिलेशला आपल्या मंत्रीमंडळात आझमखानला घ्यायची अजिबात इच्छा नव्हती. परंतु मुस्लिम मतांचे महत्त्व ओळखून मुलायमने आझमखानला मंत्रीमंडळात घ्यायला लावले. कालांतराने अमरसिंहच्या दलालीचे महत्त्व ओळखून मुलायमने अमरसिंहला परत सपामध्ये घेतले. परंतु अमरसिंह व आझमखान या दोघांशी अखिलेशचे जमत नव्हते. दरम्यानच्या काळात आपण पक्षात वरिष्ठ असल्याने आपणच मुख्यमंत्रीपदासाठी योग्य होतो अशी मुलायमच्या भावाची शिवपालची समजूत होती. त्यामुळे तोसुद्धा अखिलेशच्या विरोधात होता. अखिलेश हा समान शत्रू असल्याने अमरसिंह व शिवपाल यादव एकत्र येऊन त्यांनी अखिलेशला त्रास द्यायला सुरूवात केली होती. दरम्यानच्या काळात मागील पावणेपाच वर्षात उ. प्र. मध्ये अखिलेशविरूद्ध जनतेत नाराजी वाढत होती. अखिलेशच्या अपयशावरून जनतेचे लक्ष वळविण्यासाठी, अखिलेश चांगले काम करीत असून शिवपाल, अमरसिंह इ. मंडळी त्याच्या मार्गात अडथळे आणत आहेत हे दाखवून अखिलेशची प्रतिमा उजळण्यासाठी व शिवपाल, अमरसिंह यांचे पंख कापून त्यांना ताब्यात ठेवण्यासाठी मुलायमने अखिलेशविरूद्ध शिवपालची साथ देऊन आपण शिवपालच्या बाजूने आहोत हे दाखविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आपोआपच शिवपाल हा खलनायक व अखिलेश हा नायक असे चित्र तयार झाले. परवा दोन्ही गटांनी आमदारांची बैठक बोलविल्यावर अखिलेशच्या बैठकीला २०० आमदार उपस्थित राहिले तर शिवपाल व मुलायमच्या बैठकीला जेमतेम १७-१८ आमदार उपस्थित राहिले. त्यामुळे पक्षात कोणाला पाठिंबा आहे ते सिद्ध झाले. आपण तुझ्या बाजूने असलो तरी बहुतेक सर्व आमदार अखिलेशच्या बाजूने आहेत हे शिवपालला दाखवून देण्यात मुलायम यशस्वी झाला. त्यामुळे आता तिकीटवाटपात शिवपाल समर्थकांना फारशी तिकिटे मिळणार नाहीत हे स्पष्ट आहे. आता अमरसिंहला पक्षातून निलंबित केले असून शिवपालचे पंख कापले गेले आहेत. एकंदरीत अखिलेशचा मार्ग निर्धोक झाला आहे. शिवपालला खलनायक ठरवून अखिलेशची प्रतिमा उजळविण्याचा व अखिलेशच्या अपयशावरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न यशस्वी झाला आहे. हे होत अस्तानाचा आपण तुझ्या बाजूने आहोत हे शिवपालला दाखवून मुलायमने पक्षातील संभाव्य फूट टाळलेली आहे. एकंदरीत हे सर्व ठरवून केलेले नाटक होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
व
वरुण मोहिते Fri, 12/30/2016 - 16:32 नवीन
गुरुजी यांचा प्रतिसाद बरोबर आहे . बाकी सपा चे चित्र सध्या तरी रोचक आहे .
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Fri, 12/30/2016 - 18:51 नवीन
लोकहो, ओबामं येडंय. त्याने काल २९ डिसेंबरास पस्तीस रशियन मुत्सद्द्यांची अवांछित व्यक्ती (= पर्सोना नॉन ग्राटा) म्हणून हाकलपट्टी केली. कारण काय तर म्हणे अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रशियन तत्ज्ञांनी संगणकी हल्ले करून निकाल बदलला ! हे शक्य तरी आहे का? आणि असल्यास अमेरिकेच्या दुर्बल सुरक्षानीतीचा असा डंका पिटणे कितपत उचित आहे? हे सगळं ओबाम्याला सांगणार कोण! आता बीसबावीस दिवसंच उरलेत बाहेर पडायला. जरा धडपणे नीघ की! परवा २८ डिसेंबरास ट्रंपना इस्रायलास आवाहन करावं लागलं की मी २० जानेवारीस सूत्रं हाती घेईस्तोवर जरा संयम राखा. कारण की २५ डिसेंबरास रशियाचे एक लष्करी विमान काळ्या समुद्रात कोसळलं. यात मोसादचा हात असावा अशी शंका येणं स्वाभाविक आहे. कारण याच प्रकारच्या तुपालोव्ह-१५४ जातीच्या विमानांवर पूर्वी असे हल्ले झाले आहेत. मात्र कृष्णपेटिकेतल्या माहितीवरून घातपाताची शक्यता दिसंत नाही असं २९ डिसेंबर रोजी जाहीर झालं. बहुधा ट्रंप यांनी खबरदारी म्हणून मोसादचा हात गृहीत धरून लगोलग इस्रायलला शांतता राखायचं आवाहन केलं. आता ट्रंप यांच्यासमोर नव्या डोकेदुख्या उभ्या करण्यासाठीच म्हणून ओबाम्याने रशियाच्या पस्तीस अधिकाऱ्यांची हाकलपट्टी केली आहे. ओबाम्या, क्लिंटन इत्यादि कंपूस रशियाविरुद्ध युद्ध करायचंय. परंतु रशियाने एकतर तुर्कस्थानास आपल्या बाजूला वळवलंय आणि शिवाय सीरियात निर्णायक हल्ले करून अलेप्पोत विजय मिळवलाय. त्यामुळे ओबाम्याच्या कंपूचा तिळपापड होतोय. ओबाम्याची ही नीती अमेरिकेच्या परराष्ट्रधोरणास रसातळास घेऊन जाणारी आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 01/01/2017 - 16:15 नवीन
काहीतरी गडबड आहे. नुकताच एक नवीन प्रतिसाद लिहिला. परंतु त्यानंतर सुद्धा हा धागा "नवीन लेखन" या पानावर दिसत नाही.
  • Log in or register to post comments
अ
अमितदादा Sun, 01/08/2017 - 19:54 नवीन
म्यानमार मध्ये भारतीय लष्कराच्या para regiment ने केलेल्या surgical strike विषयी जरा डेटेल मध्ये माहिती. 2015 Myanmar Special Operations : How Indian Army Commandos Destroyed Terror Camps
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 01/10/2017 - 03:54 नवीन
कृष्णा नदीच्या पाणीवाटपावरून तेलंगणची याचिका फेटाळून लावत सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी महाराष्ट्राच्या वाट्याला येणाऱ्या ६६६ टीएमसी पाण्यावर शिक्कामोर्तब केले. कृष्णा नदीच्या पाण्याचे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगण राज्यांमध्ये प्रकल्पनिहाय पुनर्वाटप करण्याची मागणी करणारी तेलंगणची याचिका सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मदन लोकूर आणि न्या. पी. सी. पंत यांच्या खंडपीठाने सोमवारी फेटाळून लावली. यापूर्वी कृष्णा पाणी लवादानेही आंध्र-तेलंगणची ही मागणी फेटाळून लावली होती. लवादाच्या निर्णयाला तेलंगणने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. आंध्र प्रदेश राज्यनिर्मिती कायद्यानुसार तेलंगण आणि आंध्र प्रदेशने त्यांच्या वाट्याचे १००५ टीएमसी पाणी आपसात वाटून घ्यावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. http://m.maharashtratimes.com/nation/krishna-river-issue-maharashtra-will-get-666-tmc-water/articleshow/56428771.cms
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 01/17/2017 - 10:49 नवीन
५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत आता रंग भरायला सुरूवात झाली आहे. उ.प्र. मध्ये पितापुत्रांचा नूरा कुस्तीत पुत्राने बाजी मारली आहे. सर्व अधिकार व सत्ता पुत्राच्या हातात विनासायास जावी यासाठी पित्यानेच नाटक केलेले दिसते. आता अखिलेशची पक्षावर पूर्ण पकड बसलेली आहे. अखिलेश, अजितसिंगचा लोकदल व काँग्रेस यांच्यात युती होणे जवळपास नक्की झाले आहे. काँग्रेसने १ वर्षापूर्वीच मोठा आव आणून आपल्या बेटकुळ्या फुगवून स्वबळावर ४०३ जागा लढविण्याचे जाहीर केले. त्यासाठी स्ट्रॅटेजिस्ट प्रशांत किशोर यांना मोठी रक्कम मोजून धोरण सल्लागार म्हणून नेमले. राज्य काँग्रेसच्या अध्यक्षपदी राज बब्बरला आणले. प्रशांत किशोर यांनी काँग्रेसला ब्राह्मण व वरीष्ठ जातींवर लक्ष केंद्रीत करण्यास सांगितले. त्यांच्या सल्ल्यानुसार ७९ वर्षीय शीला दिक्षित यांचे नाव भावी मुख्यमंत्री म्हणून जाहीर केले. सोनिया गांधींनी शीला दिक्षितांबरोबर दिल्ली ते लखनौ बस यात्रा सुरू केल्यावर तासाभरातच शीला दिक्षितांची प्रकृती बिघडल्याने मध्येच उतरून त्या रूग्णालयात रवाना झाल्या. नंतर रोड शो करताना सोनिया गांधींची प्रकृती बिघडल्याने त्याही रूग्णालयात रवाना झाल्या. नंतर राहुलने सुरू केलेल्या 'खाट पे चर्चा' अभियानाचा बोजवारा उडाला. नंतर राहुलने काढलेल्या बस यात्रेत 'कर्जा माफ, बिजली बिल हाफ' अशी आश्वासने देण्यात आली. आणि आता सर्व योजना गुंडाळून सपबरोबर युती करून ४०३ पैकी जेमतेम १०० किंवा त्यापेक्षाही कमी जागी लढण्यात काँग्रेस खूष आहे. काँग्रेस + सप + रालोद ही युती उ. प्र. मध्ये बर्‍यापैकी प्रभावी ठरेल असा अंदाज आहे. त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे. जर निवडणुकीत कोणत्याही पक्षाला/आघाडीला पूर्ण बहुमत मिळाले नाही तर भाजप व बसप पुन्हा एकदा एकत्र येतील. भाजप अजितसिंहांना केंद्रात मंत्रीपद देऊन राज्यात रालोदचा पाठिंबा मिळवेल असे वाटते. गोव्यामध्ये भाजपची साथ मगोपने सोडली. संघातून बंडखोरी करून बाहेर पडलेले वेलिंगकर यांचा पक्ष, शिवसेना व मगोप युती करून सर्व ४० जागा लढवित आहे. दुसरीकडे काँग्रेस व आआप देखील निवडणुक लढवित आहे. त्यामुळे गोव्यात चौरंगी लढत आहे. मनोहर पर्रीकर पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून परतू शकतात असे पिल्लू भाजपने सोडून दिल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. पंजाबमध्ये अजून गंमत आहे. आपल्या पक्षाला किमान ९०-१०० जागा मिळतील असे केजरीवाल व आआपचे नेते मागील वर्षभर सांगत होते. त्यामुळे आआप जोमाने पंजाबमध्ये निवडणुक लढवित आहे. दुसरीकडे भाजपची साथ सोडून गेल्यावर सिद्धूने प्रथम आआपची चाचपणी केली. आआपने कोणतेही ठोस आश्वासन न दिल्याने शेवटी सिद्धूने स्वतःचा एक वेगळा पक्ष काढला व काल शेवटी तो राहुलच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये सामील झाला. २००४ पासून १२ वर्षे भाजपमध्ये काढताना सिद्धूने राहुल व काँग्रेसवर अत्यंत कठोर शब्दात टीका केली होती. आता मात्र त्याला राहुलचेच पाय धरावे लागले. कालाय तस्मै नम:. सिद्धूच्या आगमनामुळे स्वतःला भावी मुख्यमंत्री समजणारे कॅ. अमरिंदर सिंग मात्र धास्तावले आहे. जर कॉग्रेसला बहुमत मिळाले तर राहुल आपल्याऐवजी सिद्धूची निवड करू शकेल या शंकेने अमरिंदर सिंग अस्वस्थ आहेत कारण त्यांनी पूर्वीच राहुलला काँग्रेसचे अध्यक्ष करण्यास विरोध केला होता. त्यामुळे अमरिंदर सिंग सिद्धूला पाडण्याचा प्रयत्न करणार हे निश्चित. करमणूक मूल्य यापलिकड सिद्धूला फारसे महत्त्व नाही. भारतीय राजकारणात राहुल, केजरीवाल, सिद्धू, उद्धव असे विदूषक वेगवेगळ्या पक्षात स्थान राखून होते. आता एकाऐवजी दोन विदूषक आल्याने करमणूक क्षेत्रात काँग्रेसचे पारडे जड झाले आहे. या ३ राज्यांच्या तुलनेत उत्तराखंड व मणिपूरमध्ये फारश्या हालचाली नाहीत. उत्तराखंड मध्ये भाजप साधे बहुमत मिळवून काँग्रेसकडून सत्ता हस्तगत करेल असे वाटते. मणिपूरमध्ये देखील भाजपने बर्‍यापैकी प्रगती केलेली आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 01/21/2017 - 10:31 नवीन
अत्यंत आनंदाची बातमी - भारतीय जवान चंदू चव्हाणची पाकिस्तानकडून सुटका
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sat, 01/21/2017 - 10:50 नवीन
प्लस वन श्रीगुरुजी! अशी बातमी यापूर्वी कधी ऐकण्यात आलेली नव्हती. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Mon, 01/23/2017 - 16:18 नवीन
उत्तम बातमी जम्मू-काश्मीरच्या खोऱ्यात काश्मिरी पंडितांचे पुनवर्सन करण्यासाठी राज्य सरकारने तब्बल १०० एकर जमीन देऊ केली आहे. १९९० मध्ये दहशतवादामुळे काश्मीरमधून विस्थापित झालेल्या काश्मिरी पंडितांना विस्थापित व्हावे लागले होते. त्यानंतर अनेकदा काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर सध्या सत्तेत असलेल्या पीडीपी-भाजप सरकारने काश्मीर खोऱ्यातील आठ ठिकाणी काश्मिरी पंडितांच्या पुनवर्सनासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये ही जागा पसरलेली असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयातील वरिष्ठांनी दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या पुनर्वसनासाठी आतापर्यंत ६२ हजार विस्थापित कुटुंबांनी सरकारकडे नोंदणी केली असून यापैकी ४० हजार लोक जम्मू, २० हजार लोक दिल्ली आणि २ हजार लोक भारताच्या अन्य भागात वास्तव्याला आहेत. २०१४ मध्ये भाजप सत्तेत आल्यानंतर काश्मीरी पंडितांच्या पुनर्वसनासाठी ५०० कोटींचा निधी देण्याची घोषणा केली होती. केंद्रात सत्तेत आल्यानंतर गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी तत्कालीन मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांना पत्र लिहून विस्थापितांच्या पुनर्वसनासाठी जमीन देण्याची मागणी केली होती. ही जागा विस्थापित लोक पूर्वी राहत असलेल्या ठिकाणांच्याजवळ आणि सुरक्षेच्या दृष्टीकोनातून दिली जावी, असे या पत्रात म्हटले होते. मात्र, त्यावेळी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने हा मुद्दा बाजूला पडला होता. याशिवाय, काश्मिरी पंडितांच्या या वस्त्या पुन्हा दहशतवाद्यांचे सोपे लक्ष ठरू शकतात, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली होती. दरम्यान, नंतरच्या काळात केंद्राने राज्य सरकारला सरकारी नोकरीत असलेली काश्मिरी पंडितांसाठीची सर्व पदे भरण्याचे आदेश दिले होते. सूत्रांच्या माहितीनुसार, या सहा हजार जागांपैकी १७०० पदे पूर्वीच भरण्यात आली होती. केंद्राच्या आदेशानंतर उर्वरित ४३०० जागांवरही भरती करण्यात आली.
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Tue, 01/24/2017 - 20:47 नवीन
पाकिस्तानने अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्रांची लागोपाठ दुसरी चाचणी या महिन्यात घेतली आहे असे वृत्त बिझनेस इन्सायडरने दिले आहे. अजूनतरी भारतीय मीडियामध्ये हि बातमी दिसलेली नाही.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 01/25/2017 - 08:06 नवीन
डॉ. शरद पवारांना 'पद्मविभूषण' पुरस्कार जाहीर झाला आहे. आता फक्त 'भारतरत्न', 'नोबेल पुरस्कार', पंतप्रधानपद' व 'राष्ट्रपतीपद' शिल्लक आहे. --))
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Wed, 01/25/2017 - 08:22 नवीन
पुरस्कारवापसीच्या वेळेस असं ऐकलं होतं की हे पुरस्कार सरकारची चापलूसी करणार्‍यांना, कथित पुरोगाम्यांना सरकार देतं म्हणून... किंवा पुरस्कार समितीत असे एकमेकांची पुरस्काराची सोय लावणारे असतात म्हणून... मोदी सरकार आल्यापासून अशा चापलूसांची गठडी वळलीये इत्यादी, असं बरंच काही वाचल्याचं आठवतंय... तेव्हा असे पुरस्कार काही महत्त्वाचे नसतात अशा निष्कर्षावर आलो होतो. आता श्रीगुरुजींनी बातमी टाकल्यावर परत गोंधळ झालाय...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ग
गामा पैलवान Wed, 01/25/2017 - 14:19 नवीन
लोकहो, अजि म्यां ब्रह्म पाहिले!अमेरिका राष्ट्रसंघातनं बाहेर पडायचं म्हणतेय? अधिक माहिती : https://www.rt.com/usa/374754-us-leave-united-nations-bill/ आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Wed, 01/25/2017 - 14:48 नवीन
आत्माच जणू शरीर त्यागायचं म्हणतोय ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
श
श्रीगुरुजी Wed, 01/25/2017 - 16:00 नवीन
कायआप्पा वर फिरत असलेली पोस्ट _______________________ ('हे राम... नथुराम...' नाटकाचे निर्माते-लेखक-दिग्दर्शक-अभिनेते व शिवसेना उपनेते श्री. शरद पोंक्षे यांनी आपल्या फेसबुक पेजवर स्वतः शब्दबद्ध केलेला लेख...!!! ) ११ जानेवारी ते १५ जानेवारी कोकण दौरा खुपच संघर्षमय झाला. कणकवलीत सकाळी पोचलो. साधारण १० वा.हॉटेलवरच कळल की नाटकाचं बुकिंग थांबवलय. कणकवली, कुडाळ, मालवण, या तिन्ही ठीकाणची पोस्टर्स ऊतरवली व बुकिंग थांबवल. का...? विचारल तर तिथले स्थानिक व्यवस्थापक म्हणाले, आम्हाला आमदार नितेश राणेंचा फोन आला व त्यांनी प्रयोग होऊ देणार नाही, तेव्हा सगळ थांबवा, अशी धमकी दिली. ते म्हणाले, साहेब आम्हाला ईथेच रहायचय. तुम्ही प्रयोग करुन जाल मग आम्हाला राणे साहेब त्रास देतील. त्यांचं बरोबरच होतं. मग मी तशाच बँगा रुमवर टाकल्या. मी व माझे सहनिर्माते प्रमोद धुरत असे दोघेही, दातही न घासता, शिवसेना आमदार मा.वैभवजी नाईक साहेबांना भेटलो. तर ते नेमके आपल्या मतदारसंघात कुडाळला गेले होते. त्यांचे बंधु भेटले, त्यांनी दिलासा दिला.व वैभवजींना फोन लावला. परीस्थीती सांगीतली व फोन माझ्या हातात दिला. वैभवजींना मी सगळ सांगीतल. ते तात्काळ म्हणाले हे तिनही प्रयोग मी करणार पण प्रयोग हे होणारच...! मग सुरु झाली वणवण. तसेच आम्ही एसपी साहेबांना भेटायला गेलो. त्यांना पोलीस बंदोबस्त हवा म्हणुन पत्र दिलं. तिथुन मग जिल्हाधिकारींना भेटलो. त्यांनाही पत्र दिलं. विचीत्र मनःस्थितीत सकाळच काहीही न आवरता हे सगळ करत होतो. त्यातही पोलीस, जिल्हाधिकारी कार्यालयातले कर्मचारी त्याही अवस्थेत फोटो काढायला धावले. आंघोळ नाही काही नाही. तशाच अवस्थेत १०० एक फोटो तरी काढले असतील. नाही म्हणताच येत नाही. मायबाप रसिक आहेत ते. तिथुन निघालो पण मनात एकच विश्वास प्रयोग वाट्टेल ते झाल तरी करायचाच. मग पुन्हा वैभवजींना भेटायला गेलो. त्यांना म्हटलं.तिकीट विक्री सुरु झाली पाहिजे साहेब. 2 दिवस बंद आहे. पहिल्याच दिवशी ३६ हजार झाली होती. म्हणजे नाटक नक्की हाऊसफुल्ल होणार. पण नंतर दोन दिवस ती थांबली. पोस्टर्स ही काढली गेली. लोकांना वाटल नाटकाचा प्रयोग बहुतेक रद्द झाला असावा. हे सगळ करुन दु.२ वाजले. तेव्हा एक रिक्षा फिरायला सुरवात झाली. सगळे शिवसैनिक कामाला लागले. तिकीट विक्री दु २ ला पु्नहा सुरु झाली. म्हटल हुश्य पण कसल काय....! तेवढ्यात बातमी आली की मराठा नाट्यगृहने अचानक परवानगी नाकारली. मग वाटल प्रयोग करणार कुठे? तेवढ्यात दुसरही नाट्यगृह आहे अस कळलं.तिथे गेलो. तो पर्यंत तेही खोटा कार्यक्रम सांगुन बुक केलं गेल. तेही गेलं. मग त्याच्याच बाजुला एक लग्नाचा हॉल आहे. तो बघितला. ते म्हणाले हा नक्की मिळेल. मग दु 3.30 वा.आम्ही हॉटेलवर आलो. तर कळल की तोही बुक केलाय. हे सगळ राणे समर्थक करत होते. आता ठिकाणच राहीलं नाही. तिकीटविक्री पोलीस बंदोबस्तात सुरु झाली. पण नाटकाच्या ठिकाणाचा पत्ताच नाही. मी व प्रमोद हॉटेलवर गेलोच नाही. पुन्हा वैभवजींकडे. मग ते म्हणाले कुठेही स्टेज ऊभं राहील का? मी म्हटल रस्त्यावर सुध्दा प्रयोग करेन पण प्रयोग हा व्हायलाच हवा...! ते म्हणाले हरकत नाही. तुम्ही निश्चिंत व्हा मी सभागृह बघतो.मग मी व प्रमोदजी हॉटेलवर आलो ५ वाजता. न आवरता जेवलो. तेव्हा कळल की काहीच न खाता भटकत होतो. मग रुमवर आलो व तासभर झोपलो. संध्याकाळी ७.३० वा.एक ४०० खुर्च्या राहतील एवढ लग्नाच सभागृह मिळालं. तिकडे तिकीट काढायला आलेले लोक विचारत ठिकाण कुठे आहे? त्यांना द्यायला ऊत्तरच नाही. ते परत जायचे. अस करता करता बस ८.३० ला त्या सभागृहाजवळ पोचली. सेट म्हणजे काय मधला एक चौथरा तेवढा लागला. पुढचा पडदा नाही. लाईट लावायला जागा नाही. तरीही जस जमेल तस सगळ लावलं व एकदाचा प्रयोग होणार हे निश्चीत झालं. बुकिंग मात्र ३६ हजारावरच थांबल. एखाद्या आमदाराची केवढी दहशत तिथल्या लोकांमधे जाणवली. दादागीरी जबरदस्त. सिनेमात दाखवतात तशी. इतिहासही तसाच होता. पण शासन सरकार मात्र सगळ माहित असुनही हतबल. काहीच करु शकत नाही. सेंसॉर झालेलं, कोर्टाने मान्यता दिलेलं, सर्वसामान्यांनी डोक्यावर घेतलेलं, नाटकही करु द्यायचं नाही. आमदारकीची ताकद वापरायची. लोकशाही ह्याला म्हणतात का? पण ही वस्तुस्थीती आहे. सगळीकडेच. पण शिवसेना आमदार वैभव नाईक साहेब व शिवसैनिक, सर्व पोलीस दल ह्यांनी मात्र पुर्ण पाठिंबा दिला व प्रयोग सुरु झाला १०.३० वा.आणि खर रामायण पुढेच सुरु झालं कारण त्यांच्या हद्दीत जाऊन एवढी दहशत असुनही प्रयोग मात्र सुरु होणार होता.लोकही आधी दुसर्या सभागृहात गेले. त्या प्रत्येक ठिकाणी शिवसैनिक ऊभे होते. ते प्रयोगाच ठिकाण दाखवत होते. त्यामुळे लोकांना पोचायला ऊशिर होत होता. शेवटी प्रयोग ११ वा प्रयोग पोलीस बंदोबस्तात सुरु झाला. पहिल्या रांगेत स्वतः आ.नाईक बसले. आजुबाजुला शिवसैनिक होतेच प्रयोग सुरु झाला. एखाद्या युध्द भुमिवर प्रयोग आहे की काय असा भास झाला. पहिला प्रसंग पार पडला. दुसरा सुरु झाला आणि दोन अडीचशे लोकांचा मोर्चा आला. एवढासा हॉल. त्या घोषणा स्पष्ट कानावर यायला लागल्या. लोकही व कलाकारही डिस्टर्ब झाले. दरवाजा बाहेर एवढी लोक घोषणा देत होती. शरद पोंक्षे मुर्दाबाद. नथुराम गोडसे मुर्दाबाद. त्यात चुकुन एकजण महात्मा गांधी मुर्दाबाद असही म्हणाला. मला वाटत जुनी सवय. पुर्वी दुसर्या पक्षात दिल्या असतील कदाचीत. तर थोडक्यात काय तर नाटक थांबल. बराच वेळ हा घोळ चालला. पोलीसांनी चोप चोप चोपलं. परत पाठवलं.नाटक २० मिनीटांनी पुन्हा सुरु झालं. अर्धा तासाने.पुन्हा मोर्चा. मुंबईचे भाडेकरु आणुन मोर्चा काढला होता. स्थानीकांनीच सांगीतल आम्हाला की हे कोणीच कणकवलीतले नाहीत. परत तोच राडा. ह्यावेळी सभागृहाच्या आत यायचा प्रयत्न केला पण शिवसैनिकांनी व पोलीसांनी पुन्हा त्यांना हाकलुन दिल. काहींना अटक केली. २० मी नाटक थांबलं. मग तर चवताळले व त्यांनी अपेक्षेप्रमाणे विजेची वायरच कापली व लाईटस् गेले. आता काय करायचं. मी निश्चल ऊभा होतो. लोकांना सांगीतल. जागेवरुन हालु नका. लोकांनीही साथ दिली. बायका मुली लहान मुल. कोणीही घाबरल नाही की जागेवरुन हालल नाही हे विशेष. मग आ.नाईक धावले. त्यांनी जनरेटर आणला तो लावला व सुरु केला. लाईट्स आले. ३५ मिनीटं नाटक थांबल होतं. ११ ला सुरु झालेल नाटक दोन तास पंधरा मि.चाललं होतं. मग मी रसिकांना म्हटल की आता मध्यंतर घेत नाही.सलग करतो.लोकांनीही होकार दिला. मग प्रयोग सुरु झाला.१० मि झाली असतील.तेवढ्यात त्या अंधारात काही कॉंग्रेसच्या स्त्रीया येऊन बसल्या होत्या. त्या अचानक ऊठल्या व हातातली दौतीची भरलेली बाटली एकीनी स्टेजवर माझ्या अंगावर फेकली.ते मला कळायच्या आत .दुसरी बाई ऊठली तीने दुसरी बाटली फेकली. नशिब बाटल्या दोन्ही बाजुन मागे सेटवर पडल्या.माझ्या अंगावर तोंडावर काळी शाई पडली.माझ्या चेहर्यावरची एकही रेषा हलली नाही. मग त्या बायकांना पकडल.व बाहेरच्या पोलीसांच्या वँनमध्ये बंद करुन ठेवल. त्या सतत माझ्या नावाचा ब्रह्मणांचा ऊध्दार करत होत्या . मग पुन्हा मी शांतपणे संवाद सुरु केले व नाटक शेवटपर्यंत पुर्ण केलं. त्यांच्या एरीयात जाऊन.त्यांच्या विरोधाला न जुमानता.नाटकाचा प्रयोग पुर्ण केला. सर्व वर्तमान पत्रांमधे बातमी आली. शरद पोंक्षेंनी विरोध मोडुन प्रयोग केला.तर राणेंच्या प्रहार मधे बातमी आली.की कॉंग्रेयच्या कार्यकर्त्यांना वंदे मातरम घोषणा देताना पोलीसांनी लाठीचार्ज करुन ताब्यात घेतलं व शरद पोंक्षाची पळता भुई थोडी झाली. आता ऊद्याचा मालवण व परवाचा कुडाळचा प्रयोग सुध्दा ऊधळुन लावु पण प्रयोग कोणताच ऊधळु शकले नाहीत.पोलीस व शिवसैनिक ह्यांच्या मदतीने.मी प्रयोग करतच राहीलो. हाऊस फुल्ल गर्दित. रसिकांनी कायमच नाटकावर प्रेम केलय. करत राहतील. कायदा सुव्यवस्था लोकांनी कधीच बिघडवली नाही. अगदी गांधीवादी रसिक, मुसलमान रसिकही नाटक बघुन गेले. कोणालाच काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त राजकारणी लोकांनाच नाटकाचा त्रास होतो. तोही सोयीनं. विशेषतः निवडणुका जवळ आल्या की. हा विरोध.गांधी प्रेम सगळ ऊफाळुन येतं. मग पुन्हा शांत होतात. अहिंसेच्या नावाखाली सगळे हिंसाच घडवतात. सत्याच्या नावाखाली सगळे असत्यच बोलतात. प्रत्येक नेता हा समाजाचा मालक समजायला लागतो. मग त्याच्या विरोधात कोणी बोलल की त्याला सहन होत नाही. त्याचा अहंकार दुखावला जातो. पण तुम्ही जर विचारांवर ठाम असाल तर तुमच आत्मबल वाढत.व कार्य सिध्दीस नेण्यास मदत होते. आता २१ पासुन नागपुरात प्रयोग आहे.आजच्याच पेपरात बातमी आहे. कॉंग्रेस गांधींच्या मारेकर्याचं ऊदात्तीकरण कदापी सहन करणार नाही. नाटक न बघताच. बाकी ओवेसी सहन करणार. कन्हैया सहन करणार. पुरंदर्यांना जिवंत कसा? किंवा गडकरी पुतळा तोडणार्यांना ५ लाखाच ईनाम देणार नितेश राणे सहन करणार .गांधी आमचे सावरकर तुमचे म्हणणारे राहुल सहन करणार. सावरकरांची काव्य अंदमानातुन पुसणारे नेते सहन करणार. भ्रष्टाचार सहन करणार. माणुस मारुनसुध्दा निर्दोष सुटणारे सुपरस्टार सहन करणार. बलात्कार करुन अल्पवयाचा फायदा घेउन सुटणारे नराधम सहन करणार. राष्ट्रद्रोह्याच्या मयताला गर्दि करणारे सहन करणार. घर घर में.अफजल निकलेगा म्हणणारे सहन करणार. बलात्कार करने वाले बच्चे है म्हणणारे यादव सहन करणार. सगळ सहन करणार. तेव्हा ह्यांची ताकद कुठे जाते? फक्त नथुराम गोडसे तेवढा सहन करणार नाही. ह्या गलीच्छ दलदलीतुन भारतमातेला आता आपल्यालाच सोडवाव लागणारे. तेव्हा.आतातरी जागे व्हा. एक व्हा. भारतीय फक्त भारतीय म्हणुन एक व्हा. भारत माता की जय आपला, -शरद पोंक्षे.
  • Log in or register to post comments
फ
फेदरवेट साहेब Wed, 01/25/2017 - 18:47 नवीन
सर्व वर्तमान पत्रांमधे बातमी आली. शरद पोंक्षेंनी विरोध मोडुन प्रयोग केला.
द्या बरं एखादं कात्रण किंवा लिंक वगैरे, पोंक्षेचा विजयोत्सव वाचायला आवडेल :). एरवी मला पोंक्षे -गोडसे वगैरे खास ममत्व नाही पण त्या राणेंच्या तोंडावर टिच्चून प्रयोग केला ह्याचा आनंद आहेच. बाकी पोंक्षेचे लेखन (म्हणजे त्यांनीच केले असेल असा पुरावा नसताना अन कायप्पावरून आले असतानाच) नावाला जगल्यासारखे विस्कळीत आहेच. पोंक्षेना भरभरून बोलायचे असते, अन आज बोललो नाही तर उद्या जळप्रलय होऊन पूर्ण धरती बुडून जाईल व परत आपल्याला बोलायचा चान्सच मिळणार नाही असा त्यांचा समज असावा. एकाच लिखाणात किती विषय अन किती माणसांवर टीका केल्ये? जरा निगुतीने एक एक विषय घेतला असता तर काय घोडं अडलं असतं म्हणे? मला तर भीती पडली होती आता शेवरच्या वाक्यात 'पंतप्रधान पदाला निवडून द्या पुढल्यावेळी मलाच' वगैरे काही टाकतात का काय ते =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ह
हतोळकरांचा प्रसाद गुरुवार, 01/26/2017 - 06:13 नवीन
पुरावा त्यांचं चेपुवरलं पेज पाहून मिळू शकेल. मी पाहिलं, त्यांनीच लिहिलं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फेदरवेट साहेब
फ
फेदरवेट साहेब गुरुवार, 01/26/2017 - 08:37 नवीन
असं आहे दादा, त्यांनी लिहिल्याचा पुरावा मी मागितलेलाच नाहीये, किंवा गुरुजींनी पेस्ट केलेला लेख (?) पोंक्षेचा नाहीच असेही माझे म्हणणे नाहीये. मी पेपरात जे त्यांनी म्हणल्याप्रमाणे छापून आलंय (पोंक्षेंनी केला प्रयोग वगैरे) त्याचा पुरावा उर्फ एखादे कात्रण वगैरे किंवा एखाद्या पेपरची लिंक असल्यास मागितली आहे. बघा फरक लक्षात येतोय का!. तसंही नितेश राणेंच्या गोटात खरेच खेळ केला असेल त्यांनी तर आदरच आहे म्हणा. बाकी पोंक्षे काही फार सोज्वळ सालस किंवा लैच भारी असंही काही नाही वाटत मला. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
फ
फेदरवेट साहेब गुरुवार, 01/26/2017 - 08:43 नवीन

शरद पोंक्षेचे वाक्य

सर्व वर्तमान पत्रांमधे बातमी आली. शरद पोंक्षेंनी विरोध मोडुन प्रयोग केला.
मला ह्याच संदर्भात काही बातम्या (कात्रण/लिंक स्वरूपात) हवे आहेत. जमा करून ठेवायला. आता पोंक्षे खुद्दच म्हणतात की बुआ सगळ्या वर्तमानपत्रांत बातमी आली, शरद पोंक्षेंनी विरोध मोडून प्रयोग केला. तर एखादे वर्तमानपत्र किंवा वर्तमानपत्राचे संस्थळ इथला एखादा दुवा सहज उपलब्ध होईल न?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फेदरवेट साहेब
ह
हतोळकरांचा प्रसाद गुरुवार, 01/26/2017 - 09:28 नवीन
बाकी पोंक्षेचे लेखन (म्हणजे त्यांनीच केले असेल असा पुरावा नसताना अन कायप्पावरून आले असतानाच) नावाला जगल्यासारखे विस्कळीत आहेच.
तुमच्या ह्या वाक्यासाठी ते लेखन कायप्पावरून जरी आलं असलं तरी चेपुवर त्यांनीच लिहिले आहे एवढी(च) "माहिती" सांगण्यासाठी माझा वरचा प्रतिसाद होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फेदरवेट साहेब
स
संदीप डांगे Wed, 01/25/2017 - 16:31 नवीन
असे दुसर्‍यांनी शब्दबद्ध केलेले फेसबुकवरचे, कायप्पावर आलेले इथे मिपावर टाकले तर चालते काय? मागे टारझनने लिहिलेले साहनाने इथे टाकले तेव्हा फटाककन उडवला लेख... म्हणून आपलं एक कुतूहल...
  • Log in or register to post comments
फ
फेदरवेट साहेब Wed, 01/25/2017 - 19:44 नवीन
हिंदी नाटककार असगर वजाहत यांचे गोडसे @ गांधी.कॉम हे हिंदी नाटक सध्या चर्चेत आहे. या नाटकाचा मराठी अनुवाद झाला असून हे नाटक मंचावर सादर झाले आहे. असगर वजाहत यांनी गांधी विचारांबाबत अतिशय महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करून सर्वांनाच अंतर्मुख होण्यास भाग पाडले आहे. नाटकाची कल्पना अशी आहे. गांधींना गोळी लागते पण त्यांचा मृत्यू होत नाही. या गोळीबारातून गांधी वाचतात. गोडसेला तुरूंगात टाकले जाते. खटला उभा राहतो तेंव्हा गांधी गोडसेच्या विरोधात कुठलीही साक्ष न देता त्याला माफ करून टाकतात. आणि इथूनच मोठी पंचाईत सुरू होते. गांधी आपले समाजसेवेचे व्रत बिहार मधील एका छोट्या गावात चालु करतात. गांधींच्या कामाने नेहरूंचे सरकार अडचणीत येते. ज्या परिसरात गांधींचा हा आश्रम आहे त्या परिसरातील लोक एकत्र येवून श्रमदान करतात, आपली कामे आपणच करतात, सरकार नावाची दिल्लीत बसलेली यंत्रणा नाकारतात. त्यांचा हस्तक्षेप नको म्हणतात. इतकेच काय निवडणुका न घेता आपले प्रतिनिधी आपणच बीनविरोध निवडून देतात. सरकार शाही बळकट करण्यात गुंंतलेल्या नेहरू- -पटेल-आझाद आदींना धक्का असतो. निवडणुकात गांधींनी कॉंग्रेसला पाठिंबा द्यावा असा त्यांचा आग्रह असतो. गांधी तर कॉंग्रेसच बरखास्त करा असा आग्रह धरतात. गांधी कॉंग्रेसचा त्याग करतात. शेवटी सरकार विरोधी करवाया केल्या म्हणून गांधींना अटक करण्यात येते. सरकार किमान असावे असा गांधींचा आग्रह होता. ही बाब नेमकी नेहरूनीतीच्या विरोधात जाणारी आहे. आज गांधी आणि नेहरू यांच्यात मतभेद होते असं म्हटलं तर कोणी कबुल करत नाही. गांधींना गोडसेने मारले तेंव्हा गोडसेला सावरकरांना भाजप मोदीला संघाला शिव्या देणे सोपे असते.  आपण मात्र गांधी विचारांचे पालन करत नाहीत. उलट त्यांच्या काहीसे विरोधीच आहोत हे इतर सर्व विचारसरणीचे लोक लपवून ठेवतात. असगर वजाहत यांनी पुढे आणलेला हा किमान सरकारचा मुद्दा आज तपासून पाहिला तर असे लक्षात येईल की गांधींचा उदो उदो करणार्‍या नेहरू आणि पुढे इंदिरा गांधी, राजीव गांधी ते अगदी अलिकडे सोनिया गांधी प्रणीत मनमोहन सिंग या सर्वांनी गांधी विचारांना हरताळ फासलेला आहे. गोडसेने तर गांधींची शारीरिक हत्या केली. या सर्वांनी गांधी विचारांची राजरोस हत्या केली आहे. सरकार नावाची प्रचंड यंत्रणा उभी केली जी की एकुण उत्पन्नाच्या 70 टक्के इतका वाटा अधिकृत रित्या पगाराच्या रूपाने खावून टाकते.  याचा परिणाम आज काय झाला? आज जेंव्हा शासन पुर्णपणे कर्जबाजारी बनले आहे तेंव्हा शासनाने हात झटकायला सुरवात केली आहे. महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान सुरू केले. याचा अर्थ काय होतो? आम्ही निर्माण केलेली न्यायदानाची यंत्रणा अपुरी , कुचकामी वेळखावू ठरली आहे. तेंव्हा आता लोकांनी पुढे येवून आपआपसातले भांडण-तंटे मिटवून घ्यावेत. शासनाकडे येवू नये. मग गांधी तरी काय सांगत होते. आमच्या गावात आमचे सरकार हेच तर गांधींचे म्हणणे होते.  गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान. याचा अर्थ असा की आम्ही ज्या स्थानिक स्वराज्य संस्था निर्माण केल्या आहेत.  त्या तूमच्या गावाची/शहराची स्वच्छता करण्यास असमर्थ आहे. तेंव्हा आता तूम्ही तूमची स्वच्छता तूमच्याच पैशाने करून घ्या. मग गांधी काय म्हणत होते. आमचे गाव आम्हीच स्वच्छ करणार. 65 वर्षानंतर आपण परत गांधींपाशीच येवून पोचलो आहोत. गांधीं हे अ-सरकारवादी होते. पण आजचे सगळे डावे समाजवादी सरकारी हस्तक्षेपाची वारंवार मागणी करतात. महात्मा गांधींच्या नावाने मनरेगा योजना सरकारने काढली. या योजनेत एका मजुराला एका दिवसाला मिळाणारा रोजगार हा 180 रूपयांच्या आसपास आहे. आणि खुल्या बाजारात कुठल्याही जिल्ह्याच्या गावी सकाळी मजुरांचा बाजार भरतो तिथे कुठल्याही मजुराला किमान 250 रूपये रोजाने रोजगार उपलब्ध आहे. मग आता सामान्य लोकांवर विश्वास ठेवणारा  गांधीविचार  यशस्वी ठरला की डाव्या समाजवाद्यांचा सरकारी हस्तक्षेप यशस्वी ठरला?  या नाटकात महात्मा गांधींना सरकार विरोधी हालचालींसाठी तुरूंगात टाकल्यावर ते गोडसेच्याच बराकीत राहण्याचा आग्रह धरतात. पुढे गांधी आणि गोडसे यांचा संवाद चालत राहतो. गांधी गोडसेला मुलभूत प्रश्न विचारतात. तूम्ही हिंदू आहात का? अर्थातच गोडसे उत्तर देतात हो. मग गांधी विचारतात तूम्हाला आत्मा अमर आहे हे मंजूर आहे का? यालाही गोडसे होकार देतात. मग गांधी विचारतात माझ्या आत्म्याची हत्या न करता तूम्ही माझ्या शरीराची हत्या करून काय साधणार होता? या प्रश्नावर गोडसे निरूत्तर होतात. अखंड भारत प्रश्नावर गांधींनी गोडसेची घेतलेली फिरकी तर अफलातून आहे. गांधी गोडसेला विचारतात, तूमचे अखंड भरतावर प्रेम आहे मग तूम्ही हा अखंड भारत फिरून बघितला आहे का? माझ्या गुरूंनी मला भारत फिरण्यास सांगितले होते तेंव्हा मी तो फिरून बघितला आहे. गोडसेला यावर उत्तर देता येत नाही. मग अखंड भारताचा गोडसेचा नकाशा पाहून गांधी विचारतात, तूमचा हा भारत तर अशोकाच्या भारतापेक्षाही लहान आहे. तूम्ही हिंदूत्वाला इतके संकुचित का करता? गांधींच्या या प्रश्नावरही गोडसेला काही उत्तर सापडत नाही.  नाटकाचा शेवट अप्रतिमरितीने असगर वजाहत यांनी केला आहे. गांधी आणि गोडसे या दोघांचीही तुरूंगातून एकाच दिवशी सुटका होते. दोघे जेलच्या दारातून बाहेर पडून दोन दिशांनी चालायला सुरवात करतात. दोघांचीही एकमेकांकडे पाठ आहे. अचानक गांधी थांबतात. गोडसेही थांबातात. मागे वळून न पाहता गांधी हात मागे करतात. गोडसे वळून गांधीकडे येण्यास निघालेला असतो.  सगळ्यांना परत गांधी विचारांकडेच परतावे लागते असा एक संदेश असगर वजाहत यांनी दिला आहे.  या नाटकाचा शेवट बदलून एक संहिता नुकतीच औरंगाबाद येथे सादर झाली. या बदललेल्या नाटकात शेवटी गोडसे गांधीवर गोळ्या घालतो व त्यांना मारतो असे दाखवले आहे. आता जर हेच दाखवायचे तर नाटक संभवतच नाही कारण मूळात गांधींना गोळ्या घातल्या गेल्या व त्यात त्यांचा मृत्यू झाला हे सत्य आहे. यावर चर्चा करताना दिग्दर्शकाने मुद्दा उपस्थित केला होता की आज दाभोळकर-पानसरे-कलबुर्गी यांची हत्या केल्या गेली तो संदर्भ मला जोडावा वाटला.  त्याला प्रश्न विचारला गेला की दाभोळकर, कलबुर्गी हे ठीक आहेत पण ज्यांनी हिंसेचे समर्थन केले, ज्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही त्या कम्युनिस्ट चळवळीतल्या गोविंद पानसरे यांना गांधीविचारांच्या रांगेत कसे उभे करायचे ? आणि असे असेल तर हाही एक प्रकारे गांधी विचारांचा डाव्यांवर मिळवलेला विजय म्हणावा लागेल. असगर वजाहत यांच्या या नाटकाने तथाकथित डाव्या आणि उजव्या दोघांचीही गोची करून ठेवली आहे. गरिबांसाठी काय करायला पाहिजे असे विचारले असता गांधीजी म्हणाले होते, ‘गरीबांचे भले करण्याच्या नावाखाली त्यांच्या छातीवर तूम्ही बसला आहात. ते आधी उठा.’ आज विविध योजनांच्या नावाने गरीबांच्या छातीवर बसून आपला फायदा करण्यात नोकरशाही, डावे समाजवादी एनजीओ वाले आणि आता भाजपवालेही पुढे आहेत.  अमेरिकेत फेसबुकच्या कार्यालयास भेट दिल्यावर त्यांच्या भिंतीवर भाजपाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गांधींचा अहिंसेचा विचार लिहावा लागला हाही एक काळाने उगवलेला सुडच म्हणावा लागेल.  दुष्यंतकुमार या हिंदी कविच्या ओळी फार सुंदर आहेत.  कल नुमाईश मे मिला वो चिथडे पहने हुए मैने पुछा के नाम तो बोला के हिंदुस्थान है सामान कुछ नही है फटेहाल है मगर झोले मे उसके पास कोई संविधान है एक बुढा आदमी है मुल्क मे या यु कहो इस अंधेरी कोठरी मे एक रोशनदान है
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Wed, 01/25/2017 - 19:56 नवीन
_/\_ _/\_ (जर हे व्हॉट्सप फॉरवर्ड नसेल तर) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फेदरवेट साहेब
फ
फेदरवेट साहेब Wed, 01/25/2017 - 20:05 नवीन
नाही हो व्हाट्सऍप फॉरवर्डच आहे साहेबा. आमची कुठली अक्कल इतकी तरल चालायला अन आम्ही upper intellectual circles मध्ये बसायला (ब्रिटिश अक्कल म्हणजे कवडीची लायकी नसताना नाके अपरी करून हिंडत येण्याची कला होय, शु: सीक्रेट हाय) फॉरवर्ड एका प्राध्यापकांनी केलाय आमच्या (आम्हाला शिक्षित करायचा एक प्रयत्न म्हणुन) आम्हीही असेच हात जोडले होते :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
र
राजेश घासकडवी गुरुवार, 01/26/2017 - 01:10 नवीन
नाटकाचा सारांश आणि संदेश आवडला. इथे सादर केल्याबद्दल धन्यवाद. सेंट्रलायझेशन आणि डीसेंट्रलायझेशन हे वेगवेगळ्या पातळ्यांवर मागेपुढे होत राहातं. दोनचारशे वर्षांपूर्वी सगळंच डीसेंट्रलाइझ्ड होतं. लहान लहान राज्यं, तीही त्याहून लहान लहान सुभेदाऱ्यांनी बनलेली असं काहीसं चित्र होतं. कुठेतरी आख्ख्या भारतावर हक्क सांगणारा बादशाह असे, पण त्याला पुरेशी खंडणी दिली की तुमच्या राज्यात काहीही करण्याची तुम्हाला मुभा असे. 'गल्लीत घाला गोंधळ आणि दिल्लीत मुजरा करा' हे वेगवेगळ्या पातळीवर होतं. अजूनही थोडं आहेच. मात्र पूर्णपणे डीसेंट्रलायझेशनचा गांधीवाद उपयुक्त ठरलेला नाही हेही तितकंच खरं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फेदरवेट साहेब
ग
गामा पैलवान गुरुवार, 01/26/2017 - 09:18 नवीन
लोकहो, गांधीवाद म्हणजे नक्की काय? मोहनदास गांधींनी गांधीवादाच्या नावाखाली टेररिस्ट फायनान्सिंग सुरू केलं. अत्याचारी आणि आक्रमक पाकिस्तानला ५५ कोटी रुपये द्या म्हणून गांधी उपासाला बसले. मग या गांधीवादाचं लोढणं भारताच्या गळ्यात का म्हणून? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे गुरुवार, 01/26/2017 - 09:47 नवीन
अजून किती काळ खोट्याला खुट्यासारखं धरुन बसणार... ५५ कोटीसाठी उपोषण नव्हतं हे आता जाहिर झालंय... तरी कूजबूज मोहिम माघार घेण्याचं नाव घेत नै बॉ!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
श
श्रीगुरुजी गुरुवार, 01/26/2017 - 11:45 नवीन
>>> ५५ कोटीसाठी उपोषण नव्हतं हे आता जाहिर झालंय... हे कोणी जाहीर केलंय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे गुरुवार, 01/26/2017 - 12:39 नवीन
http://www.gandhi-manibhavan.org/main/q3.htm बाकी तुमचा हा --(हे कोणी जाहीर केलंय? ) --- प्रश्न समजला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा