मराठी फिल्म इंडस्ट्री मध्ये एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी का आहे ?
माझ्या एका मित्राला तू मराठी फिल्म्स का बघत नाही असे विचारले असता , त्याने ही इंडस्ट्री " of the brahmins , by the brahmins , for the brahmins " आहे असे धक्कादायक उत्तर दिले . त्याच्याशी बराच वाद घातल्यानंतर त्याचे काही मुद्दे खालील होते जे मला मान्य करावे ,
उदा .
१) मराठी फिल्म इंडस्ट्री तील बहुतेक कलाकार ब्राह्मण आहेत .
२) मराठी टीव्ही मालिका मधली characters ची नावेही एकाच विशिष्ट वर्गाची असतात . तसेच बोलली जाणारी भाषाही एका विशिष्ट वर्गाची असते , विदर्भ किंवा मराठवाडा येथील भाषा क्वचित असते .
सैराट सारख्या ग्रामीण सिनेमा ला मिळालेले यश हेच सांगत नाही काय ? की इंडस्ट्री तील लोक आपण संपूर्ण महाराष्ट्राला represent करतो ह्या भ्रमात आहेत ?
💬 प्रतिसाद
(254)
आ
आदूबाळ
Sun, 11/20/2016 - 06:46
नवीन
....तडडडडडड - ढयांव.
(पॉपकॉर्न मिळण्याची कॅशलेस सोय इथे आहे.)
- Log in or register to post comments
न
नाखु
Mon, 11/21/2016 - 04:01
नवीन
घाऊक नोंदणी आगाऊ करावी लागेल काय? नोंदणी आगाऊ आहे आम्ही किंवा आपण नाही.तसेच अन्य भुईमूग शेंगा,मक्याची कणसे मिळतील काय?
एक्च्च धाग्यात चार पाच धाग्याचा दारूगोळा असल्याने ही चौकशी करीत आहे,लोभ आहेच तो वाढावा ही अपेक्षा.
अखिल मिपा हिकमती,अल्पमती,कुरापती,उचापती,चायपत्ती धागे निवारण आणि मिपा स्वच्छता अभियान याच्या "एक पाऊल (मिपा) स्वच्छतेकडे" या सदस्यांचे संयुक्त निवेदन.
- Log in or register to post comments
प
पैसा
Sun, 11/20/2016 - 06:51
नवीन
डिसगस्टिंग
- Log in or register to post comments
ब
बार्नी
Sun, 11/20/2016 - 06:57
नवीन
इंग्रजी विशेषणाऐवजी पटणारे मुद्दे मांडले असते तर आवडले असते. असो.
- Log in or register to post comments
प
पैसा
Sun, 11/20/2016 - 07:51
नवीन
असल्या जातीयवादी विचाराला मराठीत उत्तर किंवा शिवी देणेसुद्धा मी मराठीचा अपमान समजते. नावावरून जात ओळखण्याची कला तुम्ही पूर्णत्वाला नेलेली दिसते. शक्य झाल्यास त्याचे क्लास काढा. मराठी सिनेमाची १९१३ पासून आतापर्यंत झालेली वाटचाल कशी झाली याचा अभ्यास करा. विकिपांडित्यसुद्धा पुरे. त्यानंतर काय त्या पिंका टाका.
याला तुम्ही काही उत्तर देताय का, काय उत्तर देताय याची मला फिकीर नाही. कारण असले बिग्रेडी धागे मी संपादक नसल्याने पुन्हा उघडून बघायची मला सक्ती नाही.
- Log in or register to post comments
उ
उपयोजक
Sun, 11/20/2016 - 15:01
नवीन
तुमच्या समाजाची मक्तेदारी कशात आहे?
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Mon, 11/21/2016 - 07:36
नवीन
का? इंग्रजीबद्दलही अशी काही मतं आहेत का तुमची? बाय द ह्यांव फॉर द ह्यांव ऑफ द ह्यांव?
ग्रो अप. एवढंच म्हणेन. इंग्रजीत.
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Sun, 11/20/2016 - 06:56
नवीन
थोड्या दिवसांनी तरी काढायचा ना धागा, सद्ध्या नोटांबद्दल ढोल ताशे वाजतायत ना.
- Log in or register to post comments
ए
एस
Sun, 11/20/2016 - 07:01
नवीन
हे बहुतांशी खरे असले तरी बाय द टिम्ब टिम्ब फॉर द टिम्ब टिम्ब फ्रॉम द टिम्ब टिम्ब असेही नाही. सरधोपट गल्लाभरू सिनेमा काढणारे फार फार तर म्हणता येतील. अनेक सो कॉल्ड ब्राह्मण वगैरे कलाकारांनीही ग्रामीण महाराष्ट्र आणि अगदी दलित, आदिवासी, किंवा अजून कुठले हवे ते समाजघटक घ्या, त्यांच्या आयुष्यावर किंवा त्यांच्या विषयांवर देखील चित्रपट काढले आहेत. आणि ब्राह्मणेतर कलाकारांचीही संख्या अलीकडे वाढते आहे. नाहीच असे नाहीत. सर्वच कसे छान छान आहे असे मीही म्हणणार नाही. पण मराठी चित्रपटसृष्टी केवळ अमुक एका जातीच्या परिघापुरतीच संकुचित झालेली आहे असे नाही.
गिरीश कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, डॉ. मोहन आगाशे, विक्रम गोखले, अमोल पालेकर, सुलभा देशपांडे, ज्योती सुभाष, इत्यादी आणि असे अनेक इतर कलाकार अगदी सहजपणे ब्राह्मणेतर व्यक्तिरेखा देखील तितक्याच ताकदीने रंगवताना, त्यांना न्याय देताना दिसतात, अशा चित्रपटात, नाटकांत भूमिका करतात, निर्मिती-दिग्दर्शन करतात. तेव्हा किमान समांतर चित्रपट प्रवाहाबद्दलतरी हा आक्षेप मान्य होण्यासारखा नाही. (मला बऱ्याच कलाकारांची जात-बीत माहीत नाहीये, तेव्हा चूभूदेघे.)
आता इतर जातींतूनही चित्रपट-नाटकांत काम करण्याला कुटुंबियांचा पाठिंबा मिळू लागला आहे. हा माझ्या मते सर्वात मोठा फॅक्टर आहे. पुरुषोत्तम करंडकासारख्या नाट्यस्पर्धांची व्याप्ती पुणे-मुंबईच्या बाहेरही वाढायला हवी. असे बरेच उपाय सुचवता येतील.
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Sun, 11/20/2016 - 07:20
नवीन
आजतागायत कोणताही सिनेमा पाहताना समोरच्या वा पडद्यामागच्या कलाकाराची जात हा विषयही मनात आला नाही/ करावासा वाटला नाही. विषय/ कथा वगैरे हेच महत्वाचे वाटले. टीव्ही मालिका क्वचित पाहिल्यात पण मालगुडी डेज, टिपरे ह्या मालिका पाहताना कधी जात हा विषय डोक्यात आला नाही, हेही खरेच.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 11/20/2016 - 07:27
नवीन
प्रादेशिक अस्मिता, पैसा, जात, भाषा, रंग, चेहरा, व्यक्तित्व हे आणि असे बरेच फ्याक्टर सर्वच ठिकाणी आपलं अस्तित्व दाखवत आहेत, असे वाटते. म्हणुन आपल्या मित्राच्या मुद्यात अजिबात तथ्यच नाही, असे म्हणायचे आणि समजण्याचे कारण नाही, असे वाटते.
बाकी, चालू द्या.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद
Sun, 11/20/2016 - 07:30
नवीन
याला आधार?
याला आधार? आणि तुम्ही किंवा तुमचा तो मित्र म्हणत असलेली भाषा ही काही कोणत्या विशिष्ट वर्गाची भाषा नसून त्याला प्रमाणLमराठी भाषा किंवा त्याअर्थी पुस्तकी मराठी असे म्हणतात. बाकी विशिष्ट वर्गाची विरुद्ध विदर्भ किंवा मराठवाडा (जे भूभाग दर्शवतात) यांची तुलना चुकीची वाटली नाही का? विदर्भ किंवा मराठवाड्यातील तो विशेष वर्ग तिथली बोलीभाषा बोलतो कि त्या विशेष वर्गाची महाराष्ट्रभर एक वेगळी भाषा आहे?
- Log in or register to post comments
ब
बार्नी
Sun, 11/20/2016 - 07:33
नवीन
प्रश्न केवळ जातीचा नसून region चाही आहे , माझे विदर्भातील कित्येक मित्र मराठी ऐवजी हिंदी चित्रपट बघणे पसंत करतात कारण " अबे त्यायची मराठी आपल्याले समजत नाही " असे आहे . मराठी सिनेमाचा चाहता म्हणून मी ही कित्येकदा विचार करतो की ह्यांना पुण्या-मुंबईबाहेरच्या लोकांच्या कथा सांगू वाटत नाही का , आपणास जातीचा प्रश्न पडला नसेल , परंतु कितीतरी लोकांना असे वाटते आणि तसे वाटण्यास तशी कारणेही आहेत.
" Explaining discrimination to an upper caste is like explaining colours to a blind person , they will never understand it " असे कुठेतरी वाचले होते . प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद
- Log in or register to post comments
म
महासंग्राम
Mon, 11/21/2016 - 06:21
नवीन
अबे मंग तुये दोस्त शाळा शिकेल नास्तिन, नैतर दुसऱ्या देशातले घुसखोर आस्तिन. कारन ईदरभातला पोट्टा किती बी कुचीन असू दे, त्याले मराठी समजत नाई असं होतंच नाई. तवा काय बी फेकत जाऊन विदर्भाचा अपमान करू नई.
- Log in or register to post comments
न
नन्दादीप
Mon, 11/21/2016 - 06:53
नवीन
+११११११११११
- Log in or register to post comments
अ
अगोचर
Tue, 11/22/2016 - 03:16
नवीन
नागपुरी/ वैदर्भिय / ? मराठिचा लहेजा आवडला म्हणुन "निशाणी डावा अंगठा" अनकदा बघितला. त्याची मराठी तुम्हाला कशी वाटली? नेहेमिचेच यशस्वी कलाकार आहेत त्याच्यात.
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Tue, 11/22/2016 - 04:20
नवीन
बाकी सगळे ठीक आहे पण निशाणी डावा अंगठा मध्ये भारत गणेशपुरे अन थोडीफार मक्या वगळता कोणालाच वऱ्हाडी जमलेली नाहीये, अशोकमामा तर त्या बाबतीत चक्क चाचपडत असलेले जाणवले होते. सगळ्यात जास्त डोक्यात गेलेली पात्रं म्हणजे संजय नार्वेकर न रंगवलेले मुस्लिम पात्र अन भरत जाधव न रंगवलेला तोताराम , वऱ्हाडातले मुसलमान हैद्राबादी लहज्यात हिंदी बोलताना दाखवून हसावे का रडावे कळत नाही. वऱ्हाडी म्हणजे फक्त वाक्याला १० वेळा अबे काबे लावून बोलणे नसते, ही एक पुस्ती जोडतो. धन्यवाद.
- Log in or register to post comments
न
नाखु
Tue, 11/22/2016 - 04:26
नवीन
पात्र खबरदार मधील वर्हाडीच धाटणीचे होते का आण्णा चिंबोरी ते सांगा बाप्पू.
या सिनेमांनी भाषेची तोडमोड करून एकही प्रादेशीक भाषा मूळ स्वरूपात लहेजासह आणि उच्चारासह दाखवली नाही अपवाद अभ्यासू सिनेमा निवडुंग्,जैत रे जैत.
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Tue, 11/22/2016 - 05:37
नवीन
नाही, ते पात्रही वऱ्हाडी नीट बोलत नव्हते, पण आपटेंची मेहनत जाणवत होती. बाकी सहमत, अप्रमाणित बोली प्रादेशिक भाषा हेच खरे सौंदर्यस्थान आहे भाषेचे.
(नाखु चाचांना ऐकू जाईल असे स्वगत, वाऱ्यावरची वरात मध्ये अरुण नलावडे ह्यांनी सीताहरण जसे ग्रामीण बाजात मांडले होते, किंवा बॅट्यानें जसे ट्रॉयचे युद्ध बोली टाईप भाषेत लिहिले होते तशी एक पौराणिक कथा इन वऱ्हाडी माला लिहावी काय? दशावतारी अन झाडीबोलीची महान पौराणिक कथा बोलीत मांडायची कला वऱ्हाडीत आणावी काय? बोलो चाचा बोलो)
- Log in or register to post comments
न
नाखु
Tue, 11/22/2016 - 06:05
नवीन
और पूछ पूछ. बिन्धास लिवा, मिपा आपलाच असा.
खरोखरच्या बाल्यांना बोलताना मागच्या कंपनीत पाहून नाटकातले/सिरियलमधले कोकणी बोलणे "नाटकी/ओढून ताणून" लगेच जाणवत असे.
- Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद
Tue, 11/22/2016 - 06:34
नवीन
लिव्हाच बाप्पु!
बाकी, अरुण नलावडेंनी छानच केलंय पण खुद्द पुलंचा साक्षीचा धंदा आणि रामायण लैच भारी!
- Log in or register to post comments
ख
खेडूत
Tue, 11/22/2016 - 06:46
नवीन
+१११
लिहाच बाप्पू!
- Log in or register to post comments
प
पुंबा
Tue, 11/22/2016 - 07:23
नवीन
बापू, अशोक सराफ वऱ्हाडी बोलीमध्ये गंडलेत पण त्यांनी चित्रपटात जाम धमाल आणलीय. लै शकलीचं गाठोडं असणारा बंडू भावडा राठोड त्यांनी खतरनाक उभा केलाय. हा चित्रपटच अफलातून जमून आलाय. साधे साधे प्रसंग पण इतक्या बारकाईने मांडलेत कि बस्स. भारत गणेशपुरे, निर्मिती सावन्त, मक्या, मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर, विनय आपटे, अगदी छोट्या रोल मध्ये असणारे ज्योती सुभाष, विशाखा सुभेदार, मंगेश देसाई सगळेच अक्षरश: सुटलेत. कादंबरीचं माध्यमांतर या प्रकारातील हा उच्च कोटीतील प्रकार आहे. माझ्या मते निशाणी डावा अंगठा हा गेल्या 10 वर्षातल्या सर्वश्रेष्ठ मराठी चित्रपटात नक्कीच येईल. संदीप खरेची गीतं सुद्धा सुंदर जमून आलियेत. अस्सल वऱ्हाडी शब्द असणारी गाणी आहेत ती. सहा मेल सहा फिमेल, आता कामच झालं ना, बे एके बे एक से बढकर एक गाणी.
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
Tue, 11/22/2016 - 07:27
नवीन
+1
कादंबरीसुद्धा मस्त आहे.
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Tue, 11/22/2016 - 07:33
नवीन
प्रश्नच नाही! अशोक मामा आहेत ते, जान आणतात भूमिकेतून, अशोक मामा गंडले आहेत (ह्या चित्रपटात) असे म्हणायचे कारण म्हणजे ते खूप काटेकोरपणे वऱ्हाडी बोलायचा यत्न करत होते पण मधेच हात टेकल्यासारखे फॉर्म सोडून देत असत म्हणून जाणवले मला अन मी नमूद केले, त्यांच्या जावयाच्या अन सहकाऱ्याच्या भूमिकेत ऋषिकेश जोशीने सुद्धा कमाल केली आहे हे ही नमूद करतो, बाकी अबासाहेबांशी सहमत आहे कादंबरी अफलातुन आहे, मुळात ग्रामीण बाजात लिहायला ग्रामीण भाषेची पकड प्रचंड लागते ती उत्रादकरांत आहेच :)
- Log in or register to post comments
प
पुंबा
Tue, 11/22/2016 - 07:48
नवीन
कादंबरी वाचायची आहे पण पिक्चर पाहिला आहे त्यामुळे तीच सगळी पात्र डोक्यात येतील असे वाटते म्हणून वाचली नाही. हॅरी पॉटरचा एकही पिक्चर न बघण्याचं कारण अजून 4 पुस्तकं वाचायची राहिलीयेत हे आहे. :P
- Log in or register to post comments
श
शलभ
Tue, 11/22/2016 - 09:13
नवीन
+११११११११११
- Log in or register to post comments
च
चिनार
Wed, 11/23/2016 - 07:42
नवीन
सहमत बापू ..
मला विचाराल तर अशी ही बनवाबनवी,गंमत-जम्मत, हम पांच ह्यात दिसलेला उत्स्फूर्त अभिनय आजकाल अशोक सराफांच्या भूमिकेत दिसत नाही. हल्ली ते फार सावधगिरीने अभिनय करतात असं वाटते.
- Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद
Wed, 11/23/2016 - 10:38
नवीन
अलीकडच्यापैकी एक डाव धोबीपछाड किंवा एक उनाड दिवस मध्ये जुना फॉर्म दिसलाय म्हणा!
- Log in or register to post comments
प
प्राजु
Sun, 11/20/2016 - 07:45
नवीन
त्याच काय आहे.. कि, ब्राह्मण सगळ्याच क्षेत्रात पुढे असतात.. त्याला कोण काय करणार?? असो.. ! कितीही कुणीही बडबड केली तरी जे सत्य आहे, ते ढळढळीत आहे..! पुन्हा असो.
बर्याच वर्षानी मिपा वर आले, आणि आल्या आल्या असले धागे समोर पडले.. ! अशा धाग्याना एन्टर्टेन केल जातय याच आश्चर्य वाटतं, आणि दु:खही!
(व्यथित) प्राजु
- Log in or register to post comments
र
रेवती
Sun, 11/20/2016 - 13:45
नवीन
हाय प्राजु,
हा धागा अप्रकाशित होण्याआधी तुझ्या येण्याने आनंद झाल्याचे नमूद करून घेते.
मग काय म्हणतेय एंटरटेनमेंट इंडस्ट्री? तू आता रुळलीस बरं का तिथे!
आम्हाला व्हिजिट केल्याबद्दल फार्फार धन्यवाद.
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Mon, 11/21/2016 - 06:51
नवीन
:)
- Log in or register to post comments
प
प्राजु
Mon, 11/21/2016 - 16:45
नवीन
एन्टर्टेन्मेंट इंडस्ट्री मस्त! रुळते आहे मी.
चतुरंग नी मेसेज पाठवला आणि ती आज्ञा शिरसावंद्य समजुन आले मी. शेवटी मैत्रीला जागायला हवच ना! :)
पण मिपा ब्राह्मण द्वेष्टे झाले आहे हे माहिती नव्ह्ते.
येत राहिनच. कारण उत्तर द्यायलाच लागेल अशा धाग्यांना. मूक मोर्चे काढले म्हणजे आपण अतिशहाणे झालो असा समज कोणीही करुन घेऊ नये.
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 11/21/2016 - 16:59
नवीन
मूक नै ओ. त्यांच्या मते मुक आहे ना ते?
- Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ
Tue, 11/22/2016 - 17:08
नवीन
नेहमीप्रमाणे "जात" असलेल्या धाग्यावर प्रतिसादांचे शतक झाले आहे! यावेळी प्रतिसाद देणार नव्हतो पण "इंडस्ट्री " मधल्या व्यक्तीची अशी प्रतिक्रिया पाहून राहावले नाही.
हा धागा आला कि तुम्हाला लगेच मिपा ब्राम्हण द्वेष्टे झाल्याचा साक्षात्कार झालाय! अगदी प्रतिसाद द्यायला परत आलात वाटत! बर काही माहितीपूर्ण प्रतिसाद दिलात का, तर नाही... आम्हाला फक्त राग काढायचा असतो!
"मूक मोर्चे काढले म्हणजे आपण अतिशहाणे झालो असा समज कोणीही करुन घेऊ नये."
या वाक्यावरून आपल्याला काय म्हणायचे आहे आणि आपली देखील विचारसरणी काय आहे हे स्पष्ट दिसून येतंय! दुसऱ्याला बोलायच्या आधी स्वतःकडे देखील पहा...
"इंडस्ट्री " मधल्या लोकांचे विचार पण असेच असतील तर मग, यु जस्ट प्रुव्हड हिज पॉईंट! (हे असे इंग्रजीत लिहिलं कि वजन येत म्हणे वाक्याला!)
आपण बऱ्याच दिवसांनी आलात म्हणताय, या काळात मिपावर मराठा मोर्चा वर डझनभर धागे येऊन गेलेत हजारो प्रतिसाद दिले गेलेत. तेव्हा मिपा मराठा द्वेष्टे होते.
जैन समाजावर धागा येऊन गेला त्यात प्रतिसादामध्ये मिपा जैन द्वेष्टे वाटेल.
मुस्लिम समाजाचं तर काय बोलायचं सध्या एक ताजा धागा आहे तिकडे कळेलच ते!
आरक्षणाचा धागा आला कि मिपा दलित द्वेष्टे वाटेल.
थोडक्यात काय, सर्व जाती/धर्माना समानच वागणूक मिळतिये कि इथे!
त्यामुळे फक्त, ब्राम्हण किती भारी (हे तुम्हीच लिहिलेल्या वाक्यातील लिहितोय, मला उपरोध वगैरे काही करायचा नाही) हे लिहिण्यासाठी येऊन काय फायदा आधीच्या कित्येक धाग्यांवर ते बऱ्याच लोकांनी सांगितलंय! :)
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Tue, 11/22/2016 - 18:00
नवीन
कचकून समर्थन! ज्यांचा ब्राह्मणांवर घसरल्याने तिळपापड होतो, त्यांना असं काही मोरच्यांबद्दल बोलून आपणही तेच करतोय ह्याची जाण नाही...
बाकी मिपावर सर्वांची भादरली तर चालते पण काहींना सूट हवीय? 'आम्ही जातीयवादी नाही पण आमच्या जातीबद्दल बोलाल ता खबरदार: असं म्हणणाऱ्यांची किव येते...
-
- Log in or register to post comments
ब
बाळ सप्रे
Wed, 11/23/2016 - 06:29
नवीन
+१००००००
- Log in or register to post comments
व
विशुमित
गुरुवार, 11/24/2016 - 06:12
नवीन
करकचून समर्थन..!!
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
गुरुवार, 11/24/2016 - 09:31
नवीन
या वाक्याची एक गंमत आहे...समजा अ आणि ब असे दोघे आहेत त्यातला अ हा ब ला "आम्ही जातीयवादी नाही पण आमच्या जातीबद्दल बोलाल ता खबरदार" असे म्हणाला तर त्यावरुन खालील शक्यता निघतात
१ - ब हा अ ला काहीतरी जातीवरून म्हणाला आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून अ ने हे वाक्य वापरले...
२ - अ कधीही ब ला जातीवरून वेगळी वागणूक देत नाही पण ब ने भविष्यात अ ला जातीवरून काही बोलू नये यासाठी अ ने हे वाक्य वापरले...(थोडेफार भारताच्या अणुबाँब धोरणासारखे)...इथे ब भविष्यात कधी असे वागू शकतो अशी शक्यता आहे
३ - अ कधीही ब ला जातीवरून वेगळी वागणूक देत नाही पण ब ने भविष्यात अ ला जातीवरून काही बोलू नये यासाठी अ ने हे वाक्य वापरले...(थोडेफार भारताच्या अणुबाँब धोरणासारखे)...इथे ब भविष्यात कधीही असे वागणार नाही अशी शक्यता आहे
४ - अ कधीही ब ला जातीवरून वेगळी वागणूक देत नाही पण ब ने भविष्यात अ ला जातीवरून काही बोलू नये यासाठी अ ने हे वाक्य वापरले...(थोडेफार भारताच्या अणुबाँब धोरणासारखे)...इथे ब भविष्यात कधी असे वागेल की नाही ते आत्ताच सांगू शकत नाही
यातल्या नेमक्या कोणत्या शक्यतांसाठी किव करावी?
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
गुरुवार, 11/24/2016 - 10:00
नवीन
'मी अमूक एका जातीचा नाही' हे मनात पक्कं ठरवून घेतलं की अशा कोणत्या शक्यता उद्भवतात..?
- Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद
गुरुवार, 11/24/2016 - 10:21
नवीन
एक शंका : मी माझी संस्कृती म्हणून वैयक्तिकरित्या जात जपत असेल तर मी जातीयवादी ठरतो का?
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
गुरुवार, 11/24/2016 - 10:29
नवीन
हो.
- Log in or register to post comments
म
मोदक
गुरुवार, 11/24/2016 - 10:37
नवीन
जातीयवादाची तुमची व्याख्या काय आहे?
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
गुरुवार, 11/24/2016 - 10:47
नवीन
जो जात मानतो तो जातीयवादी ही माझी व्याख्या.
- Log in or register to post comments
ब
बाळ सप्रे
Fri, 11/25/2016 - 07:19
नवीन
+१०००
- Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद
गुरुवार, 11/24/2016 - 11:14
नवीन
ओके. ऑक्सफोर्डनुसार जातीयवाद (पक्षी: कास्टिजम) याचा अर्थ - १. जात व्यवस्थेशी संलग्न असणे २. दुसऱ्या जातीतील कोणा बद्दलही पूर्वग्रहदूषित किंवा द्वेषयुक्त मत ठेवणे. अर्थात हे झालं अर्थाअर्थी किंवा अक्षरशः. आपण सर्वच जाणतो आणि गृहीत धरतो कि "जातीयवाद" म्हणजे वरीलपैकी दुसरं. तुमच्या म्हणण्यानुसार मी वरीलपैकी नं. १ मुळे जातीयवादी असेनहि पण त्यामुळे कोणाला काय त्रास व्हायला हवा? किंबहुना त्यावर कुणाचा काय आक्षेप असायला हवा?
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
गुरुवार, 11/24/2016 - 11:19
नवीन
पहिल्यामुळे दुसर्या शक्यता उद्भवतात. त्यामुळे पहिलेछूट पहिलाच मुद्दा ठेवला नाही तर नंतरच काही होणार नाही.
अवांतरः जात व्यवस्थेशी संलग्न असल्याने काय फायदा होतो?
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
गुरुवार, 11/24/2016 - 14:47
नवीन
अगदी सहमत
- Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद
गुरुवार, 11/24/2016 - 18:39
नवीन
असहमत! मूळ प्रश्नाला बाजूला ठेवून काढलेली उत्तरे टिकत नाहीत. बासरी आवडत नाही म्हणून बांबूचं झाडंच लावायचं नाही हे पटत नाही. चांगली-वाईट बासरी वाजवणारे असायचेच. मी चांगली बासरी ऐकणं पसंद करेन. पण तुमच्या मताचा आदर करतो, आजूबाजूला दिसणाऱ्या परिस्थितीवरून जातीबद्द्ल हे मत बनवलं जातं हे उघड आहे.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Fri, 11/25/2016 - 04:17
नवीन
बासरीचे उदाहरण गंडलय..
बरं, जातीव्यवस्थेशी संलग्न असण्याचे फायदे???
- Log in or register to post comments
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- ›
- »