Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मराठी फिल्म इंडस्ट्री मध्ये एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी का आहे ?

ब
बार्नी
Sun, 11/20/2016 - 06:41
🗣 254 प्रतिसाद
माझ्या एका मित्राला तू मराठी फिल्म्स का बघत नाही असे विचारले असता , त्याने ही इंडस्ट्री " of the brahmins , by the brahmins , for the brahmins " आहे असे धक्कादायक उत्तर दिले . त्याच्याशी बराच वाद घातल्यानंतर त्याचे काही मुद्दे खालील होते जे मला मान्य करावे , उदा . १) मराठी फिल्म इंडस्ट्री तील बहुतेक कलाकार ब्राह्मण आहेत . २) मराठी टीव्ही मालिका मधली characters ची नावेही एकाच विशिष्ट वर्गाची असतात . तसेच बोलली जाणारी भाषाही एका विशिष्ट वर्गाची असते , विदर्भ किंवा मराठवाडा येथील भाषा क्वचित असते . सैराट सारख्या ग्रामीण सिनेमा ला मिळालेले यश हेच सांगत नाही काय ? की इंडस्ट्री तील लोक आपण संपूर्ण महाराष्ट्राला represent करतो ह्या भ्रमात आहेत ?
वर्गीकरण
चर्चा

प्रतिक्रिया द्या
50796 वाचन

💬 प्रतिसाद (254)
श
श्रीगुरुजी Sat, 11/26/2016 - 19:09 नवीन
इथे तर खुद्द मोदींना च फाट्यावर मारलं-
त्यांच्या बरळण्याला विचारतंय कोण? नेहमीपेक्षा जास्त झाली असेल म्हणून असे बरळले असणार. मागे एकदा काढलेल्या "पक्ष गेला खड्ड्यात" या उद्गारांची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Mon, 11/21/2016 - 14:59 नवीन
हो हो आहे ना यादी. १. साधी रहाणी उच्चं विचारसरणी. २. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाउले. ३. पाठीत खंजीर नं खुपसणारा. ४. सद्र्क्षणाय खलनिग्रहणाय वाला. ह्या सगळ्या गोष्टींशी एका विशिष्ट पक्षाचा संबंध कधीही नं आल्याने ह्या गोष्टी कदाचित नवख्या वाटणं सहाजिक आहे. समजुन घ्यायच्या असतील सोदाहरण तर बोला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
वरुण मोहिते Sun, 11/20/2016 - 11:58 नवीन
काय फालतूपणा आहे . कोणीतरी ब्राम्हण आहेतच पुढे असं बोले ..लोल.. हजारो क्षेत्र आहेत हो सगळ्यांना संधी आहे . काय मिळणार असा विचार करून .
  • Log in or register to post comments
र
रेवती Sun, 11/20/2016 - 13:47 नवीन
वरुणजी, प्राजु ही मिपाची जुनी सदस्या आहे व करमणूक क्षेत्रात काम करते. तिने प्रतिसाद उपरोधानं दिलाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते
व
वरुण मोहिते Sun, 11/20/2016 - 13:53 नवीन
माहित आहेत प्राजु ताई . माझा रोख दुसर्यांकडे पण होता . त्यामुळे बोलो .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
R
Ram ram Sun, 11/20/2016 - 12:09 नवीन
गुरजीच पोट दुकतय का
  • Log in or register to post comments
अ
अजया Sun, 11/20/2016 - 12:25 नवीन
सगळीकडेच ब्राम्हण सलतात हे बघून मौज वाटते ब्वा!जातीविषयक चष्मा घातल्याशिवाय हे जाणवणं अशक्य आहे :) जात हा नेहमीच जातीविषयक चर्चा करणाऱ्याच्या मनातला किडा असतो!तो नाही जात!! आरक्षण असलेले चित्रपट बनावेत ही शुभेच्छा आणि हाॅलिवुडवर मोर्चा नेण्यास समर्थन ;)
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Sun, 11/20/2016 - 12:38 नवीन
धागा अप्रकाशित करता येईल काय? डोक्यात गेलेला आहे पूर्णपणे.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sun, 11/20/2016 - 12:52 नवीन
तर काय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
म
माझीही शॅम्पेन Sun, 11/20/2016 - 13:42 नवीन
१००% जातीयवादी धागा सं मं ताबडतोब हा धागा उडवला पाहिजे असे सरळ सरळ जातीयवादी धागा जर दलितांवर आला असता तर ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ह
हतोळकरांचा प्रसाद Sun, 11/20/2016 - 17:37 नवीन
सहमत! लेखाला तथ्यांचा आधार नाहीयेच पण चर्चा जातीयवादाकडे जाण्याची शक्यता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ध
धनावडे Sun, 11/20/2016 - 13:21 नवीन
तुमचा तर्क लावला तर बाकीच्या लोकांनी मतदान नाही केल पाहिजे कारण राजकारणात एका जातीचे लोक बहुसंख्येने आहेत.
  • Log in or register to post comments
र
राही Sun, 11/20/2016 - 13:22 नवीन
चित्रपटात पडद्यामागचंसुद्धा एक मोठं जग असतं. कॅमेरामन, मेक अप आर्टिस्ट, साउन्ड रेकॉर्डिस्ट, एडिटर्स, असिस्टन्ट्स, प्ले बॅक सिंगर्स, संगीत दिग्दर्शक.. अनेक. यामध्ये अनेक बिगर ब्राह्मण असावेत. शिवाय बिगर ब्राह्मण अभिनेते अभिनेत्र्यासुद्धा सुरुवातीला होत्याच. शांता हुबळीकर, चंद्रकांत, सूर्यकांत, जयश्री गडकर, हंसा वाडकर, रत्नमाला, बेबी शकुंतला, वी. शांताराम, मा. विनायक, दादासाहेब तोरणे, सीमा(?), लीला चिटणीस, सुलोचना, अरुण सरनाईक(?) मा. विवेक, सुमती गुप्ते, स्नेहप्रभा प्रधान, वगैरे पुष्कळ आहेत. इन फॅक्ट मराठी चित्रसृष्टीचा पाया भक्कम करण्यात ब्राह्मणेतरच आघाडीवर होते असे म्हणता येईल.
  • Log in or register to post comments
प
पुंबा Tue, 11/22/2016 - 07:34 नवीन
सहमत आता सुद्धा अनेक आघाडीचे अभिनेते ब्राह्मण नाहीत. अभिनेत्र्यांत मात्र ब्राह्मण जास्त दिसतात पण त्याचे कारण शिक्षणाचे अधिक प्रमाण हे असावे. इतर समाजात ग्लॅमर इंडस्ट्रीबद्दल जे गैरसमज होते त्यामुळे तिथून जास्त प्रमाणात कलाकार आले नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
क
कैलासवासी सोन्याबापु Sun, 11/20/2016 - 14:47 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Sun, 11/20/2016 - 15:01 नवीन
एक गाणं डेडिकेट करतो.. पन्नास होतील त्या निमित्त.. तैनु काला चष्मा जंचदा वे जंचदा वे गोरे मुखडे पें!
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Sun, 11/20/2016 - 17:45 नवीन
प्यार तुम्हें किस मोड पे ले आ.......या के दिल करे हाए हाए कोई ये बताए क्या होगा....... ग आला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sun, 11/20/2016 - 17:53 नवीन
गुमनाम है कोइ, बदनाम है कोइ किसको खबर कौन है वो अंजान है कोइ। इ इ इ इ!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
स
संदीप डांगे Sun, 11/20/2016 - 18:26 नवीन
गैरोंपे सितम अपनो पें करम ऐ घाण्या बैला ये जुल्म न कर ये जुल्म न कर! र आला..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
न
नाखु Mon, 11/21/2016 - 04:11 नवीन
नाम मेरा , राजा नाम मेरा अरे जो ना भूल करे ये हाथ जहां पडे मेरा वो काम झटापट चले पतली आ जाडी फिर भि या आडी सबको सिधा करे अरे जो ना भूल करे राजा नाम मेरा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
प
पाटीलभाऊ Mon, 11/21/2016 - 10:10 नवीन
संदीप अण्णा, आता 'गोरे', 'काळे' वरून अजून महाभारत नको...! नाहीतर परत वर्णभेद वरून धागे येतील... :P (ना गोरा ना काळा) -पाटीलभाऊ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ध
धर्मराजमुटके Sun, 11/20/2016 - 15:52 नवीन
तुमच्या मित्राचे आडनाव कळेल काय ?
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Sun, 11/20/2016 - 17:32 नवीन
एकदम बरोबर आहे.. काही बघायला जावं तर गोखले, कुलकर्णी, लागु, दामले, प्रभावळकर.. काही नाही हो.. आडनाव पाहुन एकमेकांना इंडस्ट्रीत ओढुन घेतात. आणि बघणारे सुद्धा आडनाव पाहुनच बघतात. टॅलेंट बिलेंट काही नाही.. त्यांनाच वर्षानुवर्ष डोक्यावर बसवुन ठेवतात, गर्दी काय करतात त्यांच काम पहायला.. सगळा ब्राह्मणी कावा आहे. बरोबर आहे तुमच्या मित्राचं.
  • Log in or register to post comments
J
jp_pankaj Sun, 11/20/2016 - 18:10 नवीन
ही मक्तेदारी मोडुन काढण्यासाठी मुकमोर्चाचे आयोजन चालु आहे. #काढु_मुकमोर्चा_पण_कोण_करणार_खर्चा?
  • Log in or register to post comments
व
विशुमित Mon, 11/21/2016 - 06:57 नवीन
मूक मोर्चा बद्दल धांदात खोटे नाटे पसरवू नका..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: jp_pankaj
म
मारवा Sun, 11/20/2016 - 18:15 नवीन
अफ्रिकेच्या विकास धारणांना बदलण्यासाठी तरी एकवेळ निसर्गचक्रा संदर्भातली भुमिका स्पष्ट करतांनाच आर्थिक मागासलेपणा ही काय मक्तेदारी बनुन राहु नये एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतांना दोन वेळ च्या मॉल फिरण्याची सोय झाली म्हणजे आजपर्यंतचा विदा हा केवळ आसमंतातली चांदणी जणु !!!!!!!
  • Log in or register to post comments
प
पुंबा Sun, 11/20/2016 - 19:05 नवीन
हे असं साधं सुटसुटीत लिहावं कोणी तरी असं फार वाटायचं..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
ख
खटपट्या Sun, 11/20/2016 - 18:24 नवीन
चांगलंय...
  • Log in or register to post comments
म
मारवा Sun, 11/20/2016 - 18:38 नवीन
चांगलंय... इश्श्य !!! काहीतरीच काय !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
ख
खटपट्या Mon, 11/21/2016 - 08:23 नवीन
चांगलंय या प्रतीसादात बरंच काही आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
फ
फेदरवेट साहेब Mon, 11/21/2016 - 03:18 नवीन
एरवी सेक्युलॅरिजम ह्या शब्दाला सर्वाधिक तोडणारे त्याची यथेच्छ टिंगल करणाऱ्या समाजाचेच लोक्स 'मराठी चंदेरी दुनियेत आमच्या समाजाची मक्तेदारी नसून ते क्षेत्र सेक्युलर असल्याचे' आरडताना पाहून मजा आली.
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Mon, 11/21/2016 - 13:51 नवीन
सेक्युलॅरिझमचा जो सोयीस्कर अर्थ काढला जातो त्यावर टीका केली जाते.रच्याकने इथे तर सेक्युलॅरिझमचा संबंधच नाही. हा वाद जातींवरुन आहे. बघा झेपतंय का.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फेदरवेट साहेब
फ
फेदरवेट साहेब Mon, 11/21/2016 - 18:08 नवीन
दोन गटांतर्गत समभाव ही अगदी मूलभूत संकल्पना नाही का सेक्युलॅरिजमची? त्यात समभाव हा फक्त दोन धार्मिक गटातच असायला हवा का? पाश्चात्य राज्यशास्त्र जात ह्या विषयाला अनुसरून सेक्युलॅरिजमची परिभाषा कधीच करू शकणार नाहीये म्हणून का जात्यांतर्गत समभावाला सेक्युलॅरिजम म्हणायचे नाही का? (बहुदा नाहीच झेपणार तरीही)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ब
बोका-ए-आझम Tue, 11/22/2016 - 04:59 नवीन
ती उपरी संकल्पना आहे म्हणूनच या देशात ती लोक स्वीकारत नाहीत. राज्यघटनेत ती नंतर घुसवण्यात आली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फेदरवेट साहेब
न
नितिन शेंडगे Mon, 11/21/2016 - 05:24 नवीन
बार्नी , जमल्यास तुझ्या मित्राला एकदा बोलाव करू चर्चा मग (चाय पे चर्चा नाही बरं का ).
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 11/21/2016 - 05:33 नवीन
माझ्या एका मित्राला तू मराठी फिल्म्स का बघत नाही असे विचारले असता , त्याने ही इंडस्ट्री " of the brahmins , by the brahmins , for the brahmins " आहे असे धक्कादायक उत्तर दिले . त्याच्याशी बराच वाद घातल्यानंतर त्याचे काही मुद्दे खालील होते जे मला मान्य करावे
अॉ.... अच जाल तल!
  • Log in or register to post comments
त
तिमा Mon, 11/21/2016 - 05:37 नवीन
ज्यांच्यात कर्तृत्व नाही तेच लोक दुसर्‍याची जात काढतात.
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Mon, 11/21/2016 - 08:07 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
म
माईसाहेब कुरसूंदीकर Mon, 11/21/2016 - 08:26 नवीन
अगदी योग्य विधान.७०च्या दशकापर्यत समाजात दुसरयाचा धर्म,जात कधीही उघडपणे विचारला जात नसे व त्यावर चर्चाही होत नसे.एवढेच काय, सध्या 'भैय्या'म्हणून हिणवल्या जाणार्या उत्तर प्रदेशच्या लोकांनाही कधी 'आपण मराठी का शिकत नाही ,मराठीत का बोलत नाही?' असे बावळट प्रश्न विचारले जात नसत(जे सध्या तुमच्या त्या 'कोरा' ह्या सायटीवर विचारले जातात असे हे म्हणतात) असो. 'पिंजरा' पाहताना निळू फुलेण्ची जात कोणती हा प्रश्न मनात आला नाही.'जैत रे जैत' पाहताना स्मिता पाटील मराठा की आणी कोणी ह्याचीही चर्चा तेव्हा झाली नाही. सध्याचे वातावरण पाहता देशात सामाजिक अधोगतीच झाली आहे असे म्हणावे लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
A
amit१२३ Mon, 11/21/2016 - 07:57 नवीन
थोडंसं सहमत ..आताच 1 चित्रपट पहिला तर सगळेच्या सगळे कलाकार तेच होते ..असं का असेल बरं हा विचार केला आणि मग लक्षात आलं अरे हे तर फक्त याच क्षेत्रात होत नाहीये . खाजगी कंपन्यांमध्ये पण काही लोक असा विचार करतात आणि फक्त आडनावावरून सिलेक्शन केलं जात. ( हा मला आलेला अनुभव ) बाकी सगळीच बोटे सारखी नसतात. त्यामुळे सगळेच लोक असा विचार करत असतील हे म्हणणे पण चूक आहे. बाय द वे बऱ्यापैकी डायरेक्टर इतर समाजातील हे पाहून आनंद होतो.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Mon, 11/21/2016 - 08:11 नवीन
काय आहे माहिती आहे का अमितभाऊ, नेम्म्मका हाच स्वभावदोष आहे ना मराठी माणसाचा, थोडं पुढे जाऊन भारतीयांचा, त्याहून पुढे जाऊन एकंदर माणसाचा, त्याचा फायदा वेगवेगळी लोकं वेगवेगळ्या प्रकारे घेतात. इंग्रजांनी घेतला, आता राजकारणी व इतर भाषिक जे आपल्यापेक्षा तुलनेने कमी भेदभाव करतात आपापसात, ते घेतायत. एक म्हणजे आपण आपली जात वगळता इतर कुण्या जातीचं कुणी सरस काही केलं की एक तर हेटाळणी करावी किंवा खुसपटं काढावीत, आणि उलट झालं तर मग आमचं भलं झालेलं बघवत नाही वगैरे कल्ला करावा, या दोनपैकी एक गोष्ट ९०% मराठीजन करतात. एक करतो तर मग दुसरा का नाही... या लॉजिकने कुणीच थांबत, थांबवत नाही. शिक्षणाने माणसाला बाकी काही दिलं तरी त्याचं विशेष नाही, पण किमान व्यापक विचार करायची, बाकी कुणी करत नसेल त री ही करायची व इतरांना करायला लावायची बुद्धी दिली तरी पुष्कळ आहे. कुठल्या गोष्टीत आपण अजूनही अडकू पाहतोय आणि त्याने खरंच आपली वृद्धी होणार आहे का? सारासार विचार करावा. लोणी कुणी दुसराच खाऊन जातोय इतकं तरी ओळखावं, प्रत्येकानेच. जात की बात नही; बात की जात समझो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: amit१२३
म
महासंग्राम Mon, 11/21/2016 - 09:07 नवीन
आताच 1 चित्रपट पहिला तर सगळेच्या सगळे कलाकार तेच होते .
असं मोघम विधान नका करू, चित्रपटाचं नाव सांगा >>>
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: amit१२३
म
मराठी कथालेखक Mon, 11/21/2016 - 08:17 नवीन
ज्यांच्याकडे कर्तृत्व आहे असे लोक अनेक शिखरे पादाक्रांत करतात ,भारतीय लोक अमेरिकेतील मोठमोठ्या कंपन्यांचे सीईओ झालेले आहेत (सत्या नाडेला, सुंदर पिचाई) ज्यांना काही जमत नाही ते समजतात की ज्यांना ते मिळालंय ते कर्तृत्वामुळे नाहीतर इतर विशिष्ट कारणाने मिळालंय. बाकी जातीमुळे, संस्काराने -वारशाने काही गोष्टी मिळू शकतात असे जरी मानले तरी प्रयत्नपूर्वक इतर लोक ते कमवू शकतात. उदा : ब्राह्मण कलाकारांना स्पष्ट शब्दोच्चार, खणखणीत आवाज यावर कदाचित कमी मेहनत करावी लागत असेल (असा माझा समज) कारण संस्कारातून आलेली स्पष्ट शब्दोच्चाराची सवय . पण म्हणजे इतरांना हे जमणारच नाही असे नाही. कदाचित थोडी जास्त मेहनत करावी लागत असेल इतकेच.
  • Log in or register to post comments
व
वटवट Mon, 11/21/2016 - 08:30 नवीन
कलेच्या प्रांतात जात, घराणेशाही, आरक्षण नसते ओ चालत... तिथं नाणं खणखणीतच असावं लागतं. जर ते नाणं खणखणीत नसेल तर मग त्याचा "रात्रीस खेळ" होतो...
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Mon, 11/21/2016 - 09:15 नवीन
कला म्हणजे विज्ञान वा अभियाण्त्रिकी नव्हे हो वटवट्या.हिंदी चित्रपटसृष्टीत घराणेशाही नाही असे ते लोकही म्हणणार नाहीत? जॅकी श्रॉफचा तो मुलगा,शक्ती कपूरची कन्या श्रद्धा,राकट्,दांडगट अर्जुन कपूर ही नाणी खणखणीत आहेत? ही मंडळी सामान्य मध्यम्वर्गीय असती तर ह्यांना चित्रपट मिळाले असते? श्रद्धा कपूर श्रद्धा घाटपांडे असती तर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वटवट
ब
बोका-ए-आझम Mon, 11/21/2016 - 09:29 नवीन
या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. बापाच्या नावावर फारतर पहिला चित्रपट/नाटक/संधी मिळत असेल. नंतर तर त्या कलाकाराला स्वतःला सिद्ध करावं लागतं. अमिताभला बघायला जाणारे अभिषेकला बघायला गेले नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
म
माईसाहेब कुरसूंदीकर Mon, 11/21/2016 - 10:39 नवीन
त्याचा अभिनय जेम्तेमच आहे हे केव्हाच कळले होते पण तरीही जवळपास १६ वर्षे टिकून आहे ना तो? दुसरा कोणी असता तर केव्हाच 'रेफ्युजी'झाला असता रेबोक्या.अजूनही यशराज फिलम्स सारखे मोठे बॅनर्स,मणिरत्नमकडे काम करायला मिळणे..मोठ्या अभिनेत्यांसोबत काम करायची संधी मिळणे..हे कशामुळे? वडिल अमिताभ बच्चन व पत्नी ऐश्वर्या आहे म्हणूनच ना? असो. धागा भरकटवत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
व
वटवट Mon, 11/21/2016 - 16:17 नवीन
आ. माईसाहेब, जी काही उदाहरणे आपण दिलीत... ते अभिनेते आहेत?? आयला? सिनेमे मिळणे वेगळे आणि गाजणे वेगळे ओ... त्या अर्थाने म्हणत होतो मी... रसिकाला जातीशी, घराण्याशी देणेघेणे असते ते फक्त टेस्टिंग फेज मधेच... नन्तर रसिकाला जर नाणे खणखणीत वाटले नाही तर तो ते फेकून देतो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
प
प्रकाश घाटपांडे Mon, 11/21/2016 - 09:17 नवीन
पुढचा धागा शिक्षण क्शेत्रात विशिष्ट वर्गाची मक्तेदारी आहे का?
  • Log in or register to post comments
न
नाखु Mon, 11/21/2016 - 10:03 नवीन
मिपावर ठरावीक (विशीष्ठ) वर्गाची मक्तेदारी आहे काय ? कौलेच कौले चोहिकडे गेली चर्चा कुणीकडे या सदाबहार संघटनेच्या "वाय्फळांचा मळा" या अनियतकालीकातून साभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा