मराठी फिल्म इंडस्ट्री मध्ये एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी का आहे ?
माझ्या एका मित्राला तू मराठी फिल्म्स का बघत नाही असे विचारले असता , त्याने ही इंडस्ट्री " of the brahmins , by the brahmins , for the brahmins " आहे असे धक्कादायक उत्तर दिले . त्याच्याशी बराच वाद घातल्यानंतर त्याचे काही मुद्दे खालील होते जे मला मान्य करावे ,
उदा .
१) मराठी फिल्म इंडस्ट्री तील बहुतेक कलाकार ब्राह्मण आहेत .
२) मराठी टीव्ही मालिका मधली characters ची नावेही एकाच विशिष्ट वर्गाची असतात . तसेच बोलली जाणारी भाषाही एका विशिष्ट वर्गाची असते , विदर्भ किंवा मराठवाडा येथील भाषा क्वचित असते .
सैराट सारख्या ग्रामीण सिनेमा ला मिळालेले यश हेच सांगत नाही काय ? की इंडस्ट्री तील लोक आपण संपूर्ण महाराष्ट्राला represent करतो ह्या भ्रमात आहेत ?
💬 प्रतिसाद
(254)
व
विशुमित
Mon, 11/21/2016 - 07:33
नवीन
प्रचंड सहमत...!!
- Log in or register to post comments
प
पुंबा
Sun, 11/20/2016 - 09:57
नवीन
ब्राह्मण असतील जास्त(तसा विदा नाही) पण, ब्राह्मण आहेत म्हणून लोक पिक्चर बघायला जात नाहीत, किंवा बहुजन लोक ब्राम्हण आहेत म्हणून जात नाहीत असं आजिबात होत नाही. शिवाय बहुजन समाजातील कलाकारांना संधी नाकारली जाते असं तर खचितच होत नाही. सैराट धुमधडाक्यात चालला आणि त्या स्वप्नील जोशी नावाच्या उकडलेल्या बटाट्याला लोकांनी प्रत्येक पिक्चर पाडून स्मॅश केलंय यावरूनच बघा. भारतीय चित्रपटसृष्टी बाकी काही असो, सेक्युलर आहे. उगाच धर्म, जात बघितली जात नाही इथे.
- Log in or register to post comments
ग
ग्रेंजर
Mon, 11/21/2016 - 07:24
नवीन
स्वप्नील जोशी नावाचा उकडलेला बटाटा - ह. ह. पु. वा. :)
- Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ
Tue, 11/22/2016 - 17:23
नवीन
समजा जर चित्रपट क्षेत्रात एखाद्या समाजाचे जास्त लोक आहेत असे मान्य जरी केले तरी लोक ते चित्रपट स्वीकारत आहेत याचा अर्थ लोकांना काहीच प्रॉब्लेम नाहीये! मराठी चित्रपट अधिकाधिक व्यवसाय करत आहे पण त्याचा गाभा "कथानक" आहे.
म्हणूनच कदाचित आपल्याकडे "सुपरस्टार" वगैरे पद्धत नाहीये. (मराठी शारुख आहे म्हणा! :P )
च्यामारी हौसेने हॉलिवूड चित्रपट पाहतील, तेव्हा त्यांची जात/धर्म काय हे बघून मग बघायला जातील काय?!
आताच्या इंटरनेटच्या युगात मार्केट खुले आहे. जर इच्छा आहे आणि कला पण आहे तर हल्ली शेकड्याने माध्यम उपलब्ध आहेत ती दाखवायला!
उगीच काहीतरी विचार करायचा...
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
Tue, 11/22/2016 - 17:26
नवीन
लोल! ह्यो कोने?
परवाच खफवर "मराठी बच्चन परिवार" असल्याची बहुमूल्य माहिती मिळाली. असंच काहीतरी आहे का?
- Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ
Tue, 11/22/2016 - 17:38
नवीन
तोच कि! गरिबांचा टोनी स्टार्क, चॉकलेट हिरो, लव्हर बॉय, म्हागुरुंचा मानसपुत्र आणि नुकत्याच कळालेल्या नावानुसार उकडलेला बटाटा!!
वळखा बगु!!
बाकी, हे "मराठी बच्चन परिवार" काय असतंय?!!
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
Tue, 11/22/2016 - 18:22
नवीन
ओह! सोपनील होय.
मराठी बच्चन परिवार = डॅमिट, डॅमिटभार्या, डॅमिटसुत* आणि डॅमिटस्नुषा.
---
शब्दश्रेयः कप्तान चिमण
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Tue, 11/22/2016 - 17:56
नवीन
अन मग म्हाग्रु कोण ? मराठीतले पृथ्वीराज कपूर! ??? कधी कधी म्हाग्रु ह्यांचा तोरा असह्य झाला की मी मनात ते तरुण असताना जबलपुरला मामाकडे जाऊन बिडीच्या फॅक्टरीत काम करायला सुरुवात करायच्या अगोदरच आतच त्यांना गब्बर अन कंपनी कसे ठार करून घोड्यावर उलटे निजवते तो सीन आठवून मनातल्या मनात आपल्या असुरी आनंदाची हौस पुरवून घेतो
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Tue, 11/22/2016 - 18:01
नवीन
म्हागृ म्हणजे साक्षात....... म्हागृच! यासम हाच!
- Log in or register to post comments
प
पुंबा
Tue, 11/22/2016 - 19:13
नवीन
हाहाहा.. बापू आता म्हाग्रु दिसले तरी तेच आठवेल
- Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ
Tue, 11/22/2016 - 17:57
नवीन
_/\_
- Log in or register to post comments
य
यसवायजी
Sun, 11/20/2016 - 10:04
नवीन
प्रिन्स्दानं आर्चीला काहून मारलं?
- Log in or register to post comments
म
माझीही शॅम्पेन
Sun, 11/20/2016 - 13:41
नवीन
अरे नशीब समाज प्रिन्स ने मारले जर त्या ठिकाणी कोणी ब्राह्मण पात्र असत तर महाराष्ट्रात दंगली सुद्धा झाल्या असत्या
स्वतः काही करायचं नाही आणि येता जाता ब्राह्मणानं झोडपायच हे नित्याचा झालं आहे
असे सरळ सरळ जातीयवादी धागा जर दलितांवर आला असता तर ?
- Log in or register to post comments
प
प्राजु
Mon, 11/21/2016 - 16:49
नवीन
असे सरळ सरळ जातीयवादी धागा जर दलितांवर आला असता तर ?
तर?? मिपा ब्यान झालं असतं.!
- Log in or register to post comments
ज
जॉनी
Tue, 11/22/2016 - 17:32
नवीन
खरंय राव.. थैमान झालं असतं..
ब्लेम करायला कोणतरी हवं असतं. मग इतिहासाचा आधार घेतला जातो. असं करताना वर्तमानात पायावर धोंडा पडतोय हे कळत नाही.. :(
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Sun, 11/20/2016 - 10:16
नवीन
बार्नी,
मला कलाक्षेत्र काय किंवा क्रिकेट काय दोन्हींतलं फारसं कळंत नाही. पण तुमचा लेख वाचून एक साम्य जाणवलं.
क्रिकेट या खेळात दलितांवर घोर अन्याय झला आहे. क्रिकेटमध्ये कोणी हिंदू दलित दिसून येत नाही. हा ब्राह्मणांनी केलेला कट समजायचा का? भारताच्या (=बीसीसीआयच्या) संघात प्रतिनिधित्व मिळालेले मागासवर्गीय बाळू पालवणकर, विनोद कांबळी आणि दोड्डा गणेश इतुकेच आहेत. तर विजय हजारे आणि चंदू बोरडे हे ख्रिश्चन आहेत.
तुमचा तर्क लावू जाता क्रिकेट जगताने मागासवर्गीयांवर (दलित + सवर्ण दोन्ही) भरमसाट अन्याय केलेला आहे.
आ.न.,
-गा.पै.
अधिक माहितीसाठी वाचा : https://acrazymindseye.wordpress.com/2011/11/23/the-ekalavya-of-indian-cricket/
- Log in or register to post comments
J
jp_pankaj
Sun, 11/20/2016 - 10:26
नवीन
याच कारणांमुळे आमाला वेगळा विदर्भ पायजे.;)
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Sun, 11/20/2016 - 10:42
नवीन
तुम्ही बबन आहात का?
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Sun, 11/20/2016 - 12:36
नवीन
वेगळा नाही. शोभत नाही बरं भासंना!
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Sun, 11/20/2016 - 10:35
नवीन
नायतर काय ! हॉलिवूडवाल्यांनी पण भारतिय लोकांना त्यांच्या जगातल्या संखेपेक्षा फार कमी पिच्चरमधे घेतलंय. आता आपला डोनाल्डदादा निवडून आलाय, त्याला घेऊन हॉलिवूडवर एक मोर्चाच काढूया, नै का ? ;) :)
जात नाही ती जात असे म्हणतात ते उगीच नाही ! शतकमहोत्सवासाठी शुभेच्छा !!
- Log in or register to post comments
ट
टर्बोचार्जड फिलॉसॉफर
Sun, 11/20/2016 - 10:39
नवीन
डिमांड् आणि क्वालीटी सप्लाय हे प्रत्येक क्षेत्राचे बेसिक आहे.ब्राह्मण अभिनय ,नृत्य यात निपुण आहेत हे नाकारता येणार नाही.ब्राह्मणेत्तर शुड प्रुव देअर मेटल.
रिंकु राजगुरुने सैराटमध्ये स्वतःला प्रुव केले व नॅशनल ॲवॉर्ड मिळवले,सई ताम्हणकरने एका चित्रपटात किसिंग सीन ,दुसर्या चित्रपटात कपडे उतरुन बिकीनी घातलि तरीही तिला अजूनही नॅशनल ॲवॉर्ड मिळालेले नाही.
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 11/20/2016 - 10:51
नवीन
सई ताम्हणकर बद्दल सहमत. बाकी रिंकु राजगुरु आणि सैरात= ओव्हररेटेड!!
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Sun, 11/20/2016 - 16:57
नवीन
दुसर्या चित्रपटात कपडे उतरुन बिकीनी घातलि तरीही तिला अजूनही नॅशनल ॲवॉर्ड मिळालेले नाही.
>>>>>>
आत्ता गोव्यात बसलोय त्यावरून डोक्यात व्हिचार आला की बिकिनी घातली म्हणून नॅशनल अवॉर्ड द्यायाचं हा ठराव ठरत असेल तर इकडे एक 400 500 पद्मश्री , 100 200 पद्मभूषण , 13 14 पद्मविभूषण आणि 2 भारत रत्न पाठवून द्या , लागलीच डिस्ट्रिब्युट करून टाकतो , कसें :D
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Sun, 11/20/2016 - 16:59
नवीन
भारतरत्न द्यायला निकष काय आहे?
- Log in or register to post comments
क
कंजूस
Sun, 11/20/2016 - 10:55
नवीन
अभ्यास कमी पडतोय आमचा.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sun, 11/20/2016 - 11:00
नवीन
हा मित्र संभाजी ब्रिगेड या सामाजिक कार्य व समाजसेवा करणार्या संस्थेशी निगडीत असावा किंवा राष्ट्रवादी काँग्रेस नावाच्या देशभक्त, नि:स्वार्थी, स्वच्छ, चारित्र्यवान पक्षाचा कार्यकर्ता असावा.
- Log in or register to post comments
व
विशुमित
Mon, 11/21/2016 - 06:55
नवीन
<<<<<<<<राष्ट्रवादी काँग्रेस नावाच्या देशभक्त, नि:स्वार्थी, स्वच्छ, चारित्र्यवान पक्षाचा कार्यकर्ता असावा.>>>>>
--- जीभ जरा जास्तच सैल सुटत चालली आहे, असे नाही वाटत का?
बा द वे देशभक्त, नि:स्वार्थी, स्वच्छ, चारित्र्यवान चे निकष काय आहेत कळू शकेल का? आणि कोणत्या पक्षाचा त्यावर मालकी हक्क आहे?
- Log in or register to post comments
व
विशुमित
Mon, 11/21/2016 - 07:28
नवीन
काही देश भक्तांची लेटेस्ट यादी मिळाली....
http://www.firstpost.com/india/demonetisation-if-this-is-a-moral-crusade-why-wasnt-janardhana-reddy-shown-his-place-3111684.html
(या लेखाच्या आशयाशी मी पूर्णपणे असहमत आहे, पण या मध्ये पक्षीय गोम सोडणे हे रुचला नाही म्हणून हा प्रतिसाद. या पुढे इग्नोर मारेल पण मुद्दाम खोड काढली तर वाकडेच उत्तरे मिळतील विनाकारण दगड मारणाऱ्यांना)
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Mon, 11/21/2016 - 09:16
नवीन
तो भ्रष्ट पक्ष आहे हे मत मांडायला तुमची परवानगी लागणार आहे का यापुढे? पौड, आळे, शिरवळ, शीळ वगैरे महाराष्ट्रात जेवढे फाटे आहेत त्या सगळ्या फाट्यांवर मारण्यात येत आहे. काय करायचं ते करा.
हहपुवा.तुम्हाला कुणी प्रश्न विचारलेलाच नाही तर उत्तर कुणाला देणार?
- Log in or register to post comments
व
विशुमित
Mon, 11/21/2016 - 09:26
नवीन
ब्वॉर्र....
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Wed, 11/23/2016 - 06:18
नवीन
बाकी काहीही असो, पण ही भाषा लैच आवडलीय बरकां विशुमती !!
आता आपल्या मिपा कारकिर्दीला नीट फॉल्लो केलं पाहिजे
:)
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Mon, 11/21/2016 - 09:35
नवीन
नाही बुवा. साहेबांवर टीका केलेली तुम्हाला खपत नाही. आता साहेबांच्या पक्षाची स्तुती केलेली देखील तुम्हाला चालत नाही. साहेबांच्या पक्षाला देशभक्त, नि:स्वार्थी, स्वच्छ, चारित्र्यवान इ. गुणविशेष लावलेले चालत नसतील तर वरील वाक्य सुधारून खालील प्रमाणे लिहितो.
आता खुष?
चांगल्या गुणांवर कोणाचाही मालकी हक्क नसतो. परंतु वाईट गोष्टींवर तो नक्कीच असतो.
देशभक्ती, चारित्र्य, स्वच्छतेचे निकष - अतिरेक्यांची पाठराखण न करणे, फक्त आपल्या जातीचा उदोउदो करून इतर जातींचा द्वेष न करणे, गुन्हेगारांना पक्षात मानाचे स्थान न देणे, जनतेच्या पैशाने स्वतःच्या तुंबड्या न भरणे, माजोरडेपणा न करणे, जातीजातीत भांडणे न लावणे, इतिहास स्वतःला हवा तसा न बदलणे, ज्या क्षेत्रात आपल्याला ओ की ठो कळ्त नाही तिथे घुसुन मुक्काम न ठोकणे इ. इ.
- Log in or register to post comments
व
विशुमित
Mon, 11/21/2016 - 09:58
नवीन
पवारसाहेब आणि राष्ट्रवादी वरचे विनाकारण, बिनबुडाचे, निरर्थक आणि रडके प्रतिसाद साताराच्या वाढे फाट्यावर मारण्यात येत आहे....!!
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Mon, 11/21/2016 - 10:37
नवीन
हे वाचल्यावर साहेब सुद्धा खो खो हसतील!
बादवे, नोटा रद्द करण्याच्या निर्णयाला काही दिवसांपूर्वी उघड पाठिंबा देणारे साहेब आता नोटा रद्द करण्याच्या विरोधात बोलताहेत. काय कारण असावे? जवळच्या सगळ्या नोटा बदलून झालेल्या दिसतात.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Mon, 11/21/2016 - 10:41
नवीन
म्हणजे?
- Log in or register to post comments
व
विशुमित
Mon, 11/21/2016 - 11:35
नवीन
म्हणजे ?
"सुभाष देशमुखांच्या" च्या...
साहेबांनीच ठेवायला दिल्या होत्या त्याच्या कडे.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Mon, 11/21/2016 - 12:58
नवीन
साहेबांची लीला अगाध आहे. ते काहीही करू शकतात. ज्यांची पालखी नाचवली, तेच परदेशी असल्याचा साक्षात्कार साहेबांना होतो आणि परत त्यांच्यापुढेच पुन्हा साहेब लोटांगण घालतात.
- Log in or register to post comments
व
विशुमित
Mon, 11/21/2016 - 13:20
नवीन
सुभाष देशमुखावरून डायरेक्ट ९० दि मध्ये...
असो वर्तमानातील उत्तर द्याच टाळायचं म्हंटलं की मागची ६० वर्ष आठवतात.
असो क्लीन मास्टर ने क्लीन चिट पण देऊन टाकली..(यात पण साहेबांचा च हात असू शकतो, शंकेला वाव आहे)
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Mon, 11/21/2016 - 13:30
नवीन
९० दि मध्ये ..?
भूतकाळावरूनच वर्तमानाचा अंदाज येतो ना?
- Log in or register to post comments
व
विशुमित
Mon, 11/21/2016 - 13:32
नवीन
<<<भूतकाळावरूनच वर्तमानाचा अंदाज येतो ना?>>>
कसा काय ?
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Mon, 11/21/2016 - 13:36
नवीन
साहेबांचा आजपर्यंतचा विश्वासघाताचा इतिहास बघूनच त्यांच्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही.
- Log in or register to post comments
व
विशुमित
Tue, 11/22/2016 - 13:05
नवीन
पार्टी विद डिफरेन्स च्या देशभक्त आणि चरित्रसंपन्न आमदार पुत्राचे कारनामे...ते पण गृहमंत्राच्या घरा शेजारी...
http://www.loksatta.com/nagpur-news/bjp-mla-son-bang-bang-in-nagpur-bar-1344572/
तरी पण असल्या जुमला पार्टीवर लोक कसे विश्वास ठेवतात देव जाणे??
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 11/25/2016 - 11:16
नवीन
उदयन भोसले (शरद आप्पा लेवे), पद्मसिंह पाटिल (पवनराजे निंबाळकर), आव्हाड (बांधकाम व्यावसायिक परमार) इ. नग ज्या पक्षात होते त्या पक्षाला सुद्धा एकेकाळी थोडीफार मते मिळत होती. मग भाजपला का नाही मिळणार?
- Log in or register to post comments
व
विशुमित
Fri, 11/25/2016 - 11:26
नवीन
चला बरं झालं माझा मुद्दा पटला म्हणायचा.
सगळी कडे आनंदी आनंदच आहे. खाली अंधार देखील.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 11/25/2016 - 11:29
नवीन
हे वाक्य समजलेले दिसत नाही.
- Log in or register to post comments
व
विशुमित
Fri, 11/25/2016 - 12:02
नवीन
ओह आता समजलं.
म्हणजे पुढच्या टर्मला ते आमदार, पुत्र कारनाम्यामुळे पक्षातून आऊट. आऊट तर करावंच लागेल मते पाहिजेत ना..!!
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 11/25/2016 - 16:22
नवीन
अजून नाही समजलेलं दिसत.
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
Wed, 11/23/2016 - 07:58
नवीन
सातारा म्हटले की उदयनराजे आठवतात ते तर साहेबांबरोबर आख्ख्या राष्ट्रावादीला फाट्ञावर मारतात. असो. असोच :)
- Log in or register to post comments
व
विशुमित
गुरुवार, 11/24/2016 - 06:22
नवीन
(दिसत तसं नसतं, आणि म्हणून फसणाऱ्यांच्या प्रतिसादाला आम्ही पुन्हा एकदा वाढे फाट्यावर मारतो..असो...)
- Log in or register to post comments
व
विशुमित
Sat, 11/26/2016 - 12:48
नवीन
इथे तर खुद्द मोदींना च फाट्यावर मारलं-
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/kolhapur-western-maharashtra-news/satara/udyanraje-bhosle-attacked-on-modi/articleshow/55632880.cms
(टीप: पंतप्रधानासाठी राजेंनी वापरलेल्या भाषेविषयी माझा आक्षेप आहे)
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- ›
- »