Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मराठी फिल्म इंडस्ट्री मध्ये एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी का आहे ?

ब
बार्नी
Sun, 11/20/2016 - 06:41
🗣 254 प्रतिसाद
माझ्या एका मित्राला तू मराठी फिल्म्स का बघत नाही असे विचारले असता , त्याने ही इंडस्ट्री " of the brahmins , by the brahmins , for the brahmins " आहे असे धक्कादायक उत्तर दिले . त्याच्याशी बराच वाद घातल्यानंतर त्याचे काही मुद्दे खालील होते जे मला मान्य करावे , उदा . १) मराठी फिल्म इंडस्ट्री तील बहुतेक कलाकार ब्राह्मण आहेत . २) मराठी टीव्ही मालिका मधली characters ची नावेही एकाच विशिष्ट वर्गाची असतात . तसेच बोलली जाणारी भाषाही एका विशिष्ट वर्गाची असते , विदर्भ किंवा मराठवाडा येथील भाषा क्वचित असते . सैराट सारख्या ग्रामीण सिनेमा ला मिळालेले यश हेच सांगत नाही काय ? की इंडस्ट्री तील लोक आपण संपूर्ण महाराष्ट्राला represent करतो ह्या भ्रमात आहेत ?
वर्गीकरण
चर्चा

प्रतिक्रिया द्या
50796 वाचन

💬 प्रतिसाद (254)
ह
हतोळकरांचा प्रसाद Fri, 11/25/2016 - 07:13 नवीन
तुम्ही माझी जातीबद्दलची अपेक्षा आणि त्याचा परीघ याबद्दलचा खालचा प्रतिसाद वाचावा! त्यानंतर त्यात फार काही फायदे तोटे शोधण्याचं शिल्लक रहात नाही आणि ती एक नैसर्गिक प्रवृत्ती उरते. बाकी बासरीचं म्हणाल तर ज्याचं त्याचं मत! समाजातून जातपात संपूर्ण संपावी हा दुर्दम्य आशावाद मीहि बाळगून आहे, पण फरक एवढाच आहे कि तुम्ही ऑक्सफर्डमधलं नं. १ (जात) काढून टाका म्हणजे नं. २ (जातीयवाद) रहाणार नाही असे म्हणत आहात आणि मी नं. २ (भारतात सर्वसाधारणपणे अभिप्रेत असलेला जातीयवाद) काढून टाका म्हणजे नं. १ हा अत्यंत कमी महत्वाचं किंवा वैयक्तिक मुद्दा उरेल असं म्हणत आहे. आता यापैकी काय लवकर साध्य होऊ शकतं यावर चर्चा संभवू शकते. स्वातंत्रोत्तर आलेख बघितला तर (आणि मुख्यत्वे आरक्षण) तर समाज नं. १ पासून दूर जाताना दिसत नाही परंतु तेच आंतर्जातीय विवाहांचं प्रमाण बघितलं तर नं. २ कमी होण्याची किमान आशा वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
प
पुंबा गुरुवार, 11/24/2016 - 11:27 नवीन
तुमच्या वैयक्तिक आयुष्यात जात पाळणे, तिच्याशी संलग्न असणे, जातबांधवांशी निष्ठा बाळगणे या गोष्टी दिसायला जरी harmlesss असल्या तरी, त्या तुमचा attitude ठरवतात. आपण आणि ते हा भेद नकळत होतोच. सामाजिक, राजकीय, आर्थिक सर्व विचारांच्या बाबतीत हा attitude मोठा फॅक्टर ठरतो. त्यामुळे व्यक्तीश: मला जातीशी सम्पूर्ण फारकत घ्यावी असे वाटते कारण जात स्वातंत्र्यावर बंधने आणते. परंपरा जसे पाककला, हस्तकला वगैरे जपाव्या ते पण जातीची लेबले न लावता. त्यामुळे, वैयक्तिक आयुष्यात जात पाळावी कि नाही हे जरी व्यक्तीवर अवलंबुन असले तरी त्याला जात हि अजिबातच महत्वाची गोष्ट वाटू नये इथवर जाणे हे आपले समाज म्हणून ध्येय हवे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
स
संदीप डांगे गुरुवार, 11/24/2016 - 11:34 नवीन
सहमत. परंपरा, संस्कृतींना जातीची लेबले लावण्याची गरज नाही. काही जाती अगदी पोटजातीही सेम असल्या तरी त्यांच्यातल्या रितिभाती, खानपान बर्‍याच प्रमानात वेगळं असतं. एकाच जातीत कट्टर मांसाहारी ते कट्टर शाकाहारी असेही पाहायला मिलतात. एकाच जातीच्या दोनप्रकारच्या भौगोलिक व आजूबाजूच्या सामाजिक फरकानेही सांस्कृतिक बदल घडून येतात. जात कशाला सांभाळायची याचे कारण कोणी देईल काय? पटण्यासारखे असेल तर मीही (हार्मलेस पद्धतीने) जात पाळायला लागेन मग..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
म
मोदक गुरुवार, 11/24/2016 - 12:00 नवीन
जात कशाला सांभाळायची याचे कारण कोणी देईल काय? पटण्यासारखे असेल तर मीही (हार्मलेस पद्धतीने) जात पाळायला लागेन मग.. "जात पाळणे = जातीयवाद" असे असताना हार्मलेस पद्धतीने का होईना पण जात पाळण्याचा मार्ग पत्करणे म्हणजे तुम्हाला मान्य असलेल्या विचारसरणीशी प्रतारणा आहे. जात न पाळण्याचा वैयक्तीक पातळीवर प्रयत्न करणे जास्ती सोपे आहे. अर्थात हा प्रयत्न वैयक्तीक पातळीवरच राहणार. आणखी लोकं जमवून असा प्रयत्न केला की "अजात" चळवळीसारखी अवस्था होईल. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे गुरुवार, 11/24/2016 - 12:11 नवीन
सरळ प्रश्न होता, जात कशाला सांभाळायची याचे कारण देता येईल काय, मी काय करेन न करेन ते मुद्दा नंतर घेऊ. आधी जात चळवळ करुन नक्की काय फायदा होतो ते बघूयात. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक गुरुवार, 11/24/2016 - 14:01 नवीन
जात कशाला सांभाळायची याचे कारण देता येईल काय कल्पना नाही. आधी जात चळवळ करुन नक्की काय फायदा होतो ते बघूयात. :) जात चळवळ करून फायदा होईल अशी अजुन अपेक्षा आहे..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
म
मोदक गुरुवार, 11/24/2016 - 10:30 नवीन
"हातोळकर" हम्म्म जातीयवादीच की, गांधीजींना तुमीच मारले की राव. ******* असे लॉजिक असते, काय बोलणार यावर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ह
हतोळकरांचा प्रसाद गुरुवार, 11/24/2016 - 11:22 नवीन
सहमत! खरंच लॉजिक कळत नाही. शिवाय काही मुद्देसूद चर्चा करावी म्हटली कि लगेच 'खबरदार'वतोय असं मत! खरंच काय बोलणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
स
संदीप डांगे गुरुवार, 11/24/2016 - 11:28 नवीन
तुम्ही काय बोलताय, कशाबद्दल बोलताय? कोण खबरदारवतोय इथे तुम्हाला??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ह
हतोळकरांचा प्रसाद गुरुवार, 11/24/2016 - 18:47 नवीन
तुमचा वरचा प्रतिसाद आणि माझा वरचा प्रतिसाद परत एकदा वाचाल का? मी मला कोणी खबरदारवतंय असं नाही म्हणालो. गांधीवधाला अमुक अमुक जात कारणीभूत होती हे मी अगदी अलीकडे सुद्धा काही चांगल्या सुशिक्षित लोकांकडून ऐकलं आहे. हा माझा काही लोकांबाबत अनुभव असल्याने मोदक यांच्या वरचं वाक्य "असे लॉजिक असते" याला सहमती दर्शवली. गांधीवधाशी लावलं जाणारा जातीय लॉजिक कळंत नाही असा माझा मुद्दा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Fri, 11/25/2016 - 04:24 नवीन
ते गांधीहत्येला तुम्ही 'गांधीवध' जे सारखं म्हणत आहात त्यामुळे असेल कदाचित... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ह
हतोळकरांचा प्रसाद Fri, 11/25/2016 - 05:52 नवीन
अच्छा हे लॉजिक आहे तर! बराय! लॉजिक गंडलंय राव पण! पण असो ज्याचं त्याचं वैयक्तिक मत! बाकी तुम्ही हे लॉजिक मानताय काय? नाही म्हणजे स्पष्ट असलेलं बरं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Fri, 11/25/2016 - 05:56 नवीन
मला विचाराल तर कोण्या जातीने कोणाची हत्या (तुमच्या भाषेत वध) केली असे मी मानत नाही, हत्या ह्या मनोवृत्तीतून होतात व मनोवृत्ती कोणा जातीची मक्तेदारी नाही, तसे असते तर महात्मा गांधी हत्येनंतर किंवा इंदिरा गांधी हत्येनंतर जे झालं ते झालं नसतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ह
हतोळकरांचा प्रसाद Fri, 11/25/2016 - 06:56 नवीन
सहमत! झालं तर मग! हेच न मानणाऱ्या लोकांचं लॉजिक कळत नाही असा वरचा प्रतिसाद होता! ती हत्या होती का वध होता हा अगदी वेगळा विषय होऊ शकतो. तसं याबाबतीत मी अजूनही निष्कर्षाला आलो नाही आणि हे नक्की मानतो कि कायद्याच्या दृष्टिकोनातून ती हत्या होती. तसाही मी जहालमतवाद (पक्षी : एक्स्ट्रिमिजम) फारसा मानत नाही त्यामुळे यावर आपल्यात वेगळी चर्चा संभवू शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Fri, 11/25/2016 - 07:26 नवीन
जहाल, मवाळ, हत्या, वध ह्याचा प्रश्न नाही आहे हो. मनोवृत्तीचा प्रश्न आहे. एका उदाहरणातून आपण जातव्यवस्थेशी संलग्न असल्यावर काय भूमिका घेतो हे लक्षात येईल. - मी ब्राह्मण आहे. चार नातेवाईकांमधे बसलो असतांना एकाने आपला रिवर्स-अ‍ॅट्रोसिटी चा अनुभव सांगितला की अमुक एकाने त्याला "बामन्या, गांधींचा हत्यारा, आमच्यावर लै अत्याचार केले" असे काहीतरी अपमानास्पद बोलले आहे. आता तुम्ही त्याला 'हा त्याच्या स्वतःच्या घाणेरड्या मनोवृत्तीचा प्रश्न आहे, ह्यात तो कोणत्या जातीच्या आहे त्याचा काही संबंध नाही' हे सांगू शकाल काय? असे सांगितले तर इतर चार 'संस्कृती म्हणून जात जपणारी' मंडळी तुमच्या मताला दुजोरा देतात की असहमती व्यक्त करतात? - वरिल उदाहरण कोणत्याही जातीच्या संदर्भात घेतले तरी चालेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ह
हतोळकरांचा प्रसाद Fri, 11/25/2016 - 13:58 नवीन
उदाहरण व्यवस्थित समजलं नाही (पण तरीही गंडलंय असं म्हणणार नाही) पण तरीही - १. होय मी त्याच्या वैयक्तिक मनोवृत्तीचा प्रश्न आहे असं सांगेन (आणि समजा मी तसं नाही सांगू शकलो तर भविष्यात तसं सांगण्याचं धाडस जमवण्याच्या दृष्टीने विचार करेन, पण मी तसं सांगू नाही शकलो तर याचा अर्थ मी ती जातच तसली आहे असं सांगेन असं नाही. ) २. इतर चार खरंच "संस्कृती म्हणून जात जपणारी" मंडळी असतील तर दुजोरा देतील, नाहीतर असहमती दर्शवतील. या "अमुक एकांची" आणि इतर चार मधल्या "नाहीतर" वाल्यांची संख्या कमी होत जाणे म्हणजे जातीयवाद संपणे असे मी मानतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Sat, 11/26/2016 - 06:24 नवीन
उदाहरण गंडलेलं असू शकतं, माझं काय म्हणणं नाही त्याबद्दल! पण स्वजातीय लोकांच्या बैठकीत असा विरुद्ध पवित्रा सहज शक्य होत नाही हे सर्वांना अनुभवाने ठाऊक असेल, (तुमच्याच प्रतिसादात तुम्ही जर तर ची भाषा वापरली आहे की! पण तुम्ही प्रामाणिक आहात हेही त्यावरून दिसतंय) स्वजातीय लोकांना गोळा करून जातीयवादाबद्दल प्रबोधन करणे विरोधाभास आहे. सर्वच जातींच्या संघटना असतात त्या जेव्हा भेटतात, तेव्हा एकमेकां साह्य करू हा एक उद्देश असतो, दुसरा, एकी कायम ठेवायला इतर जाती त्यांच्यावर कशा अन्याय करतात, आपल्यावर जातीमुळे कसा अन्याय होतो, याची उजळणी करतात. आपली जात इतरांपेक्षा कशी वेगळी आहे (श्रेष्ठ वा कनिष्ठ चा संबंध नाही), आपल्याच जातीचे महापुरुष कसे ग्रेट होते ह्याच्या चर्चा व्याख्याने होतात, जातीतल्या पुढारलेल्या व्यक्तींकडून इतरांना प्रगती करण्यासाठी मार्गदर्शन होते (हे सरसकट नाही,असे मार्गदर्शन जातिनिरपेक्षही होते पण तो विषय वेगळा), लग्नसंबंधासाठी वधुवरसंमेलने होतात, (काही लोक म्हणतात की आपल्याच जातीत कोणाची इच्छा असेल लग्न करायचं तर त्यात काय समस्या? याबद्दल आधी एका धाग्यावर चर्चा झालीये), जात हा एक वैशिष्ट्य दर्शवणारा समूह आहे त्याला जपणे म्हणजे भेदाभेद जपणेच होय. खाद्यसंस्कृती, पोशाख, इत्यादीसाठी जात जपतो म्हणणे जन्माधारित विशेषत्व जपणे होय. अनेक परंपरा आज शुद्ध स्वरूपात नाहीत, अनेक घरात तीन पिढ्यांत काहींना काही बदलतं. आज एकाच जातीच्या चार विरुद्ध ठिकाणच्या लोकांमध्ये चार वेगवेगळ्या संस्कृती दिसून येतात, अशावेळेस आपलं 'अमुक तमुक' म्हणून विशेष लेबल सांभाळण्याशिवाय जातीचा उपयोग तो काय? मनुष्याला इतरांपेक्षा वेगळं असावं वाटतं, आपला एक खास कंपू असावा असं वाटतं हे नैसर्गिक आहे. ती भूक भागवायला जातीसारखं नैसर्गिक काही नाही. (काही लोकांनी इथे आपण भेदाभेद पाळत नाही, श्रेष्ठ कनिष्ठ मानत नाही असे म्हटले आहे, असे लोकही आहेतच, नाहीच असे सरसकट म्हणत नाहीये.) आपल्या जातीसंबंधी कोणी काही बोललं कि ते वैयक्तिक नसलं तरी अंगावर घेऊन लोक प्रतिकाराला उभे राहतात तेव्हा कोणती संकृती, पोशाख, चालीरीती इत्यादींचे रक्षण करायला ते उभे असतात? ते फक्त 'जातीय अस्मिता' नावाच्या पोकळ भावनेचे समर्थन करत असतात. (प्रत्येक नियमाला अपवाद असतात, वरील विधाने ते लक्षात घेऊनच केलेली आहेत)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
व
विशुमित Sat, 11/26/2016 - 06:48 नवीन
<<<<<आपल्या जातीसंबंधी कोणी काही बोललं कि ते वैयक्तिक नसलं तरी अंगावर घेऊन लोक प्रतिकाराला उभे राहतात तेव्हा कोणती संकृती, पोशाख, चालीरीती इत्यादींचे रक्षण करायला ते उभे असतात? ते फक्त 'जातीय अस्मिता' नावाच्या पोकळ भावनेचे समर्थन करत असतात.>>>> -- अगदी असंच घडतंय आणि यात कोणतेच जात समूह अपवाद नाहीत. अवांतर: मी जरी मुक मोर्चा समर्थक असलो तरी हे समर्थन फक्त एका लोकसंख्येने मोठ्या समूहाला शैक्षणिक आणि नोकरी मध्ये आरक्षण मिळावे यासाठी आहे. हेतू थोडा स्वार्थी असला तरी इतर ज्यांना आरक्षण नाही ते यातून निभावून पुढे जातील हा विश्वास आहे. त्यामुळे सकल समाजाचे कल्याण होईल. आरक्षणातून मराठा समाजाचा किती फायदा होईल, हे अगदी नोटबंदी मुळे किती फायदा होईल या सारखे आहे, असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
प
पुंबा Sat, 11/26/2016 - 07:50 नवीन
विशुमित भाई, तुमचा उद्देश गरीब मराठा तरुणांना संधी नाकारली जाऊ नये असा आहे हे खरंय, मात्र खूप चांगले गुण असूनपण चांगल्या कॉलेजला प्रवेश मिळत नाही या पेक्षा फी भरायला पैसा नसल्याने शिक्षण घेऊ न शकणाऱ्यांची संख्या जास्त आहे. आता आरक्षण मिळणं कायद्याने तर दुरापास्तच आहे, तर समाजातीलच धनिकांकडून, धुरिणांकडून आपल्या समाजातील गरीब मुलांना मदत होते का? असे ट्रस्ट वगैरे मोठ्या प्रमाणात का उभे राहत नाहीत. अर्थात असतील देखील पण मला माहित नसतील. कारण सरकारकडे मागून जेवढं मिळू शकेल त्याच्यापेक्षा किती तरी पटीने मोठे काम समाज एकत्र येऊन करू शकेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Sat, 11/26/2016 - 08:13 नवीन
समाजातील धनिक आणि धुरिणांकडून स्वतःच्याच समाजातील गरीब मुलांना मदत करायची म्हंटलं की पुन्हा त्यांच्या वर जातीवादाची टीका होणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
श
श्रीगुरुजी Sat, 11/26/2016 - 10:17 नवीन
अवांतर: मी जरी मुक मोर्चा समर्थक असलो तरी हे समर्थन फक्त एका लोकसंख्येने मोठ्या समूहाला शैक्षणिक आणि नोकरी मध्ये आरक्षण मिळावे यासाठी आहे.
सर्व सत्तास्थाने, सहकार क्षेत्र, पोलिस खाते, शेती इ. क्षेत्रे अनेक शतके या समूहाच्याच हातात असताना त्यांना जातीवर आधारीत राखीव जागा देणे अजिबात समर्थनीय नाही.
हेतू थोडा स्वार्थी असला तरी इतर ज्यांना आरक्षण नाही ते यातून निभावून पुढे जातील हा विश्वास आहे. त्यामुळे सकल समाजाचे कल्याण होईल.
ते कसे निभावून जातील? त्यांचे कसे कल्याण होईल? १०० पानांच्या पंगतीतील ५२ पानांवर बसायला यांना परवानगी नाही. उरलेल्या ४८ पानांवर सर्व जातीजमातींचे लोक बसू शकतात. आता या ४८ पानातील २१ पाने काढून एका प्रस्थापित समाजासाठी राखीव ठेवल्यावर उर्वरीत २७ पानांमधून यांचे कसे कल्याण होईल?
आरक्षणातून मराठा समाजाचा किती फायदा होईल, हे अगदी नोटबंदी मुळे किती फायदा होईल या सारखे आहे, असे मला वाटते.
नोटबंदीचे फायदे व तोटे सर्वांसाठीच समान आहेत. राखीव जागातून फक्त मराठ्यांचाच फायदा होईल. इतरांचा, विशेषतः ज्यांना कोठेच राखीव जागा नाहीत, त्यांचा तोटा होणार हे नक्की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Sat, 11/26/2016 - 10:37 नवीन
<<<<सर्व सत्तास्थाने, सहकार क्षेत्र, पोलिस खाते, शेती इ. क्षेत्रे अनेक शतके या समूहाच्याच हातात असताना त्यांना जातीवर आधारीत राखीव जागा देणे अजिबात समर्थनीय नाही.>>>> -पोलिस खाते?? अनेक शतके??? <<<<ते कसे निभावून जातील? त्यांचे कसे कल्याण होईल? १०० पानांच्या पंगतीतील ५२ पानांवर बसायला यांना परवानगी नाही. उरलेल्या ४८ पानांवर सर्व जातीजमातींचे लोक बसू शकतात. आता या ४८ पानातील २१ पाने काढून एका प्रस्थापित समाजासाठी राखीव ठेवल्यावर उर्वरीत २७ पानांमधून यांचे कसे कल्याण होईल?>>> -- मराठ्यांना जर आरक्षण मिळालंच तर फक्त ब्राह्मण समाज आरक्षणावाचून राहील आणि हे तुमचेच विधान आहे या समाजाविषयी- http://www.misalpav.com/comment/887772#comment-887772 <<<नोटबंदीचे फायदे व तोटे सर्वांसाठीच समान आहेत. राखीव जागातून फक्त मराठ्यांचाच फायदा होईल. इतरांचा, विशेषतः ज्यांना कोठेच राखीव जागा नाहीत, त्यांचा तोटा होणार हे नक्की. -- मी फक्त मराठा आरक्षणाचा फायदा मराठा समाजाला होईल का नाही या बद्दल बोलत होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sat, 11/26/2016 - 10:53 नवीन
-पोलिस खाते?? अनेक शतके???
ब्रिटिशांच्या आगमनापासून पोलिस खाते आहेच (किमान १५०+ वर्षे). त्यापूर्वी राजेराजवाड्यांच्या काळात तत्कालीन पोलिस म्हणजे सैन्य ज्यात मराठेच बहुसंख्येने होते.
-- मराठ्यांना जर आरक्षण मिळालंच तर फक्त ब्राह्मण समाज आरक्षणावाचून राहील आणि हे तुमचेच विधान आहे या समाजाविषयी-
बरोबर ना. त्यांना ज्या थोड्याश्या संधी उपलब्ध आहेत त्यावर सुद्धा घाला घालण्याची तयारी सुरू आहे आणि त्यातून त्यांचे कसे कल्याण होईल हाच माझा प्रश्न आहे.
-- मी फक्त मराठा आरक्षणाचा फायदा मराठा समाजाला होईल का नाही या बद्दल बोलत होतो.
मराठ्यांना राखीव जागा दिल्यावर "सकल समाजाचे" कल्याण होईल असा तुमचा दावा होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Sat, 11/26/2016 - 11:15 नवीन
<<<<ब्रिटिशांच्या आगमनापासून पोलिस खाते आहेच (किमान १५०+ वर्षे). त्यापूर्वी राजेराजवाड्यांच्या काळात तत्कालीन पोलिस म्हणजे सैन्य ज्यात मराठेच बहुसंख्येने होते.>>> -- हवेत तिर मारताय असे वाटते. विदा असेल तर द्या. <<<बरोबर ना. त्यांना ज्या थोड्याश्या संधी उपलब्ध आहेत त्यावर सुद्धा घाला घालण्याची तयारी सुरू आहे आणि त्यातून त्यांचे कसे कल्याण होईल हाच माझा प्रश्न आहे.>>> -- त्यातून ही ब्राह्मण समाज फिनिक्स पक्ष्या प्रमाणे झेप घेईल हा विश्वास. <<<< मराठ्यांना राखीव जागा दिल्यावर "सकल समाजाचे" कल्याण होईल असा तुमचा दावा होता.>>> --कृपया "सकल मराठा सामाज्याचे" असे वाचावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
म
मोदक गुरुवार, 11/24/2016 - 11:51 नवीन
अशा लोकांशी मुद्देसूद चर्चा होवू शकत नाही. ते पढवलेल्या विचारसरणीनुसार विचार करतात आणि आपल्या खांद्यावर डोके नावाचा अवयव देवाने दिला आहे हे नेमक्या क्षणी विसरतात. (प्रतिसादातील भावना मला हवी तशी पोहोचेल की नाही असे वाटले होते. समजुन घेतल्याबद्दल धन्यवाद.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
क
कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 11/24/2016 - 12:01 नवीन
बरोबर अन काही लोक देवाने खांद्यावरच्या अवयवाला ठराविक वजन दिले आहे हे विसरून सगळा ताण त्या एका मुंडक्याला अन मगजालाच देतात नाही का मोदकभाऊ. बाकी वैयक्तिक आयुष्यात 'हातोळकर ह्म्म्म' पेक्षा 'कंबळेंच्या पोरासोबत हिंडतो का तुमचा मुलगा हंम्मममम्म' हे वडलांना ऐकवलेलेच जास्त ऐकले आहे. मुद्दा काय व्यक्ती तितक्या प्रकृती! जातीवाद वाईटच, प्रॉब्लेम हा आहे की जात सोडली तर आपले कसे होईल ह्या भीतीतून तथाकथित मुंडके वापरणारे अन तथाकथित मुंडके न वापरणारे सगळेच पिढ्यांपिढ्या तोच गु चिवडत बसतात!असो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक गुरुवार, 11/24/2016 - 12:14 नवीन
प्रॉब्लेम हा आहे की जात सोडली तर आपले कसे होईल ह्या भीतीतून मला वाटते भितीपेक्षाही "पर्याय नाही म्हणून" लोकं जातीला जास्त चिकटून बसतात. अर्थात गावांत सरंजामशाही व्यवस्था असेल तर भिती शिवाय कोणताही पर्यायच राहणार नाही पण जर जातीव्यवस्थेला सक्षम पर्याय मिळाला तर पहिल्या फटक्यात ३०% ते ४०% लोकं तो पर्याय निवडतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
श
शब्दबम्बाळ गुरुवार, 11/24/2016 - 12:22 नवीन
गम्मतच आहे कि राव! इथे होणारी चर्चा " कारण उत्तर द्यायलाच लागेल अशा धाग्यांना. मूक मोर्चे काढले म्हणजे आपण अतिशहाणे झालो असा समज कोणीही करुन घेऊ नये." या वाक्यावर झालीये! कोण कोणाला कसे बोलतंय बघा जरा! पट्टी काढलीत डोळ्यावरून तर दिसू शकेल कदाचित, यात मुद्देसूद चर्चा करण्याचा कुठला मुद्दा दिसतोय?? मोदक यांनी वरच्या प्रतिसादात जे केलं ते व्हिक्टीमयझेशन चे उत्तम उदाहरण आहे! इथे कुठेही काहीही उल्लेख नसताना स्वतःच गांधीहत्येच्या मुद्दा काढायचा, स्वतःच सहानुभूती घ्यायची वा रे वा!! आणि परत तुम्ही त्यालाच सहमती दर्शवून बोलणार कि "खरंच लॉजिक कळत नाही" या सगळ्या गोष्टीच तरी काही लॉजिक लागतंय का तुम्हाला? हीच गोष्ट एका मुस्लिम व्यक्तीने केली तर तो मात्र टीकेस पात्र होतो.. काय बोलणार...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
म
मोदक गुरुवार, 11/24/2016 - 13:36 नवीन
हतोळकरांवर आरोप करून मी सहानुभूती कशी घेतली ते सांगा जरा. त्यांना उदाहरण देताना फक्त सध्या जे काही चालले आहे त्या पद्धतीने उदाहरण दिले बस्स.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
श
शब्दबम्बाळ गुरुवार, 11/24/2016 - 14:11 नवीन
अहो सहानुभूती "तुम्ही" घेतली असे नाही! चर्चेत रेफरन्स नसताना स्वतःच व्हिक्टीमयझेशन करायचे आणि स्वतःच सहानुभूती 'निर्माण' करून द्यायची. असे काहीसे म्हणायचे आहे. नक्की कसे लिहू कळेना पण कदाचित आता समजले असेल तुम्हाला..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक गुरुवार, 11/24/2016 - 14:18 नवीन
रेफरन्स नसताना स्वतःच व्हिक्टीमयझेशन करायचे आणि स्वतःच सहानुभूती 'निर्माण' करून द्यायची असे काहीसे म्हणायचे आहे. नक्की कसे लिहू कळेना मुक मोर्चा सारखे..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
श
शब्दबम्बाळ गुरुवार, 11/24/2016 - 14:23 नवीन
हाहा! पेडगावलाच जायचंय तर ठीक आहे. चालायचंच...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक गुरुवार, 11/24/2016 - 15:40 नवीन
हा हा.. हिंट दिली फक्त. :)) निरीक्षण चुकीचे असले तर सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
ह
हतोळकरांचा प्रसाद गुरुवार, 11/24/2016 - 19:06 नवीन
णि परत तुम्ही त्यालाच सहमती दर्शवून बोलणार कि "खरंच लॉजिक कळत नाही" या सगळ्या गोष्टीच तरी काही लॉजिक लागतंय का तुम्हाला?
माझा वरचा प्रतिसाद वाचावा.
यात मुद्देसूद चर्चा करण्याचा कुठला मुद्दा दिसतोय??
सगळे प्रतिसाद सरमिसळ करून हा निष्कर्ष नको. मी प्रत्येकाने आपापली संस्कृती/परंपरा म्हणून जात जोपासली तर का आक्षेप असावा असा मुद्दा मांडलाय. यात काही गृहीतके स्पष्ट नाहीयेत म्हणून सांगतो - १. मी जातीयवादाच्या (ऑक्सफोर्डवरील नं. २) पूर्णपणे विरोधात आहे आणि मी स्वतःही तो भेद मानत नाही. २. मी जात हि माझ्यासारख्याच चालीरीती/प्रथा/परंपरा/संस्कृती/पद्धती लोकांचा गट एवढ्याच आणि एवढ्याचकरीता मानतो. ३. याव्यतिरिक्त मी जात हि आरक्षण/लग्न/शाळा/व्यवसाय/मदत करताना यापैकीही कुठेही वापरण्याच्या विरोधात आहे. यात गैर काय ते सांगावे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
स
साहेब.. Wed, 11/23/2016 - 07:17 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
क
किसन शिंदे Wed, 11/23/2016 - 05:13 नवीन
कारण उत्तर द्यायलाच लागेल अशा धाग्यांना. मूक मोर्चे काढले म्हणजे आपण अतिशहाणे झालो असा समज कोणीही करुन घेऊ नये.
दाताखाली काचकन खडा यावा तसं वाटलं प्राजुतैचा प्रतिसाद वाचताना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
ल
लालगरूड Wed, 11/23/2016 - 07:15 नवीन
नीट जरा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
म
माईसाहेब कुरसूंदीकर Sun, 11/20/2016 - 08:03 नवीन
काय रे हे बार्न्या? पूर्वी हिंदी चित्रपटसृष्टीत बहुताण्शी नायक पंजाबी हिंदू वा पंजाबी मुस्लिम का असतात असा ह्यांना प्रश्न पडायचा.नायकांमध्ये एकही कर्हाडे वा देशस्थ ब्राम्हण का नाही असेही हे विचारायचे. हिंदी चित्रपटांमध्येही कथानकांत शर्मा,मल्होत्रा,भाटियाच का? वेलणकर्,पाटील्,राणे का नाही असे वाटायचे. काहीना हा पंजाबी लोकांनी केलेला कट वाटायचा तर काहींना हा मुस्लिमांनी हिंदूंविरुद्ध केलेला कट(कारण बहुसंख्य लोक लाहोर व तिकडचे) वाटायचा.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Sun, 11/20/2016 - 08:13 नवीन
१. मराठी चित्रपट सृष्टीला ब्राह्मणांनी वेठीस धरले आहे, मक्तेदारी आहे असे म्हणणे विपर्यास व अनावश्यक भलतीकडे ताणणे आहे. २. कोणतीही इन्डस्ट्री ही तिच्या ग्राहकांवर अवलंबून असते. जैसा देस वैसा भेस... पूर्वी पासून म्हणजे नाटकं फॉर्मात असल्याच्या काळापासून प्रेक्षक कोणत्या वर्गाचे जास्त होते, गरिब असले तरी घरी पुस्तकं विकत आणून वाचणारी, अनेक गोष्टींचे व्यासंग करणारी माणसं कोणत्या वर्गाची जास्त होती हे पाहिले पाहिजे. प्रेक्षक ज्या वर्गाचे जास्त त्या वर्गाला आवडेल असेच सादरिकरण होणार. मराठी इन्डस्ट्री पैसा कमावण्यात मागे राहण्याचे कारण मर्यादित प्रेक्षक वर्ग होता. रवी जाधव यांच्या चित्रपटांपासून हे चित्र बदलण्यास सुरुवात झाली. टाइमपास, बालकपालक हे रुढार्थाने ब्राह्मण कॅरेक्टर दाखवणारे चित्रपट असले तरी त्यातल्या भावना-समस्या-प्रसंग युनिवर्सल होते, दुनियादारी सारखे चित्रपट, त्यांची हाताळणी मास ला अपील होणारी होती, सैराटने जे जग दाखवले ते पुस्तकी ग्रामीण जगापेक्षा वेगळे व सत्याचे स्पष्ट दर्शन होते, इथे हॉलिवुडी चित्रपटांच उदाहरण देतो. साधारणपणे, (सरसकट नाही) 'जगात अमेरिकनच कसे भारी, हुशार, जिनियस, मॅनकाइन्ड ला वाचवणारे' हे दाखवतात, कारण प्रेक्षक ९९ टक्के अमेरिकन आहेत. अमेरिकन लोकसंख्येत ७७% व्हाईट आहेत त्यामुळे अमेरिकन चित्रपटांमधे त्यांच्या अस्मिता अहंकार, रुतून बसलेले श्रेष्ठतेचे संस्कार कुरवाळणे जास्त होते हे माझे वैयक्तिक निरिक्षण आहे. (12 Years a Slave ह्या चित्रपटात व्हाईट व्यक्तिरेखा मेन प्रोटगनिस्टची मदत करतांना दाखवून व्हाईट गिल्ट घालवण्याचा केलेला प्रयत्न) मग हॉलिवुड हे ऑफ द व्हाईट, बाय द व्हाईट, फॉर द व्हाईट. असेच आहे असे म्हटले जाते का? नाही. पापी पेटका सवाल है. धंद्यापुढे कुठल्याही अस्मिता, जातीपाती, धर्म, देश नसतात. धंद्याचा एकच धर्म, ग्राहक. ब्राह्मण जास्त दिसत असले तरी त्यामागे योग्य अशी नैसर्गिक, सामाजिक कारणे आहेत. कोणी हे जाणून बूजून केले असे म्हणणे व त्यावर विश्वास ठेवणे द्वेषमूलक आहे. भलते सलते गैरसमज बाळगण्यापेक्षा स्वतः हे चित्र बदलण्यास सकारात्मकतेने काय होऊ शकते हे बघावे. आजकाल पूर्वीसारखे कठीण काहीही राहिले नाही. ज्याच्यात कर्तृत्व असेल ते गाजवायला युट्यूब आहे. ज्यांना आपल्यावर अन्याय होतोय असं वाटत असेल त्यांनी रडत राहण्यापेक्षा काम करावे. या उपरही आपल्याला घुसायलाच मिळत नाही असं वाटणार्‍यांनी रॉबर्ट रॉडरिग्ज या येडपटाबद्दल व त्याच्या पहिल्या चित्रपटाबद्दल वाचून प्रेरणा घ्यावी. https://en.wikipedia.org/wiki/Robert_Rodriguez
  • Log in or register to post comments
र
रेवती Sun, 11/20/2016 - 13:48 नवीन
कोणाला समजावताय? ही गीता का वाचताय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Sun, 11/20/2016 - 14:55 नवीन
=)) चान्स मिळाला की कुंपणावरच्या डोलकर्‍यांना कुंपणावर ठेवू शकलो तरी खूप झाले....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
म
मार्मिक गोडसे Sun, 11/20/2016 - 08:14 नवीन
दादा कोंडकेंनी सांगितलेला किस्सा, ते एकदा त्यांच्या गावी गेले असता चावडीवरील एका वयस्कर व्यक्तीने त्यांना विचारले, तुझे सगळे सिनेमे जोरात चालतात हे ठिक आहे , परंतू इतकी वर्ष मुंबईत जातोस अजून नोकरीपाण्याची सोय होउन स्थिरस्थावर झालास की नाही? सिनेसृष्टीकडे असा दृष्टीकोन बाळगणार्‍या वर्गाकडून काय अपेक्षा बाळगावी?
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sun, 11/20/2016 - 08:26 नवीन
ओह असा सगळा प्रकार आहे तर. बास ठरलं. एका चित्रपटात अमुक टक्के ओपन, अमुक टक्के ओ.बी.सी. आणि अमुक टक्के एस.सी./एस.टी. भुमिका असायलाचं हव्यात असा कायदा घ्यायचा का पास करुन?
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Sun, 11/20/2016 - 08:31 नवीन
चला कॅप्टन, तुमच्या नेतरुत्वात मोर्च्या काडू...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sun, 11/20/2016 - 08:36 नवीन
नको. तुमच्यासारखे अनुभवी लोकचं ठिक नेतरुत्व करायला. हम किस झाड के गिरे हुए पत्ते की देठ पे बैठी मुंगी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Sun, 11/20/2016 - 08:39 नवीन
मुंग्यांवर अन्याव झाला तर मुंग्यांनीच मोर्च्या काडायला न्हवं...?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sun, 11/20/2016 - 08:42 नवीन
जेंन्ना अन्यावं झाला तेन्नी मोर्चा काडावा. आपण म्हराठी पिच्चरला लैचं वर्षांसुन फाट्यावर मारल्येलं असल्याने आपल्यावर काय अन्याव झाला ते काय कळ्ळबी न्हाय बगा. बाकी आपन ३.५% चं असल्याने अन्यावं झाला तरी गपगुमा सहन क्रायचा अस्तो. नायतर ५५ कोटीचे बळी जात्यात बगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Sun, 11/20/2016 - 08:56 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
भ
भाते Sun, 11/20/2016 - 09:31 नवीन
या क्षेत्रात काम केलेल्या सगळया लोकांची (फक्त पडद्यावरचे कलाकार नाही) आत्मचरित्र वाचले किंवा मुलाखती पाहिल्या तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे त्यांना सुरुवातीच्या काळात करावा लागलेला संघर्ष आणि घरच्यांची भक्कम साथ. संघर्ष कोणालाही चुकलेला नाही. मनोरंजन क्षेत्रात अजुनतरी सुदैवाने आरक्षण लागू झालेले नाही. मराठी किंवा इतर भाषिक प्रेक्षक इतक्या कोत्या मनाचा नक्कीच नाही आहे कि तो एका ठराविक जातीधर्माच्या माणसाला उचलुन धरेल. कोणीही इथे येऊन काम करू शकतो. ज्याचे पारडे जड (सर्वच बाबतीत) तोच इथे टिकतो आणि बाकीचे बाहेर फेकले जातात. जे लोक इथे टिकुन आहेत त्यांनी स्वतःला सिध्द केले आहे. या क्षेत्रात ब्राह्मण जास्त आहेत हे सत्य आहे. बाकीचे इथे टिकत नाहीत आणि त्यामुळे फक्त ब्राह्मण उरतात त्यात त्यांचा काय दोष?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 11/20/2016 - 09:39 नवीन
१) मराठी फिल्म इंडस्ट्री तील बहुतेक कलाकार ब्राह्मण आहेत .
चुकीचे निष्कर्ष आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत कलाकार (लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, भरत जाधव, महेश कोठारे, सिद्धार्थ जाधव, विजय कदम, विजय चव्हाण, संगीतकार अजय-अतुल, पद्मा चव्हाण, रंजना, उषा चव्हाण, उषा नाईक, निळू फुले, दादा कोंडके ... ही यादी फार मोठी आहे) ब्राह्मण नाहीत.
२) मराठी टीव्ही मालिका मधली characters ची नावेही एकाच विशिष्ट वर्गाची असतात . तसेच बोलली जाणारी भाषाही एका विशिष्ट वर्गाची असते , विदर्भ किंवा मराठवाडा येथील भाषा क्वचित असते .
ब्राह्मणांना सरकारी नोकरी, पोलिस खाते, राजकारण, शैक्षणिक क्षेत्र, प्रशासन इ. क्षेत्रात राखीव जागांमुळे मर्यादीत संधी आहे. शेतीतून व खेड्यातून बरेचसे ब्राह्मण हद्दपार झाले आहेत. ज्या क्षेत्रात जातीमुळे संधीला मर्यादा नाहीत तिथे ब्राह्मण जायचा प्रयत्न करतात. त्यामुळेच खाजगी कंपन्या, दूरदर्शन मालिका, वृत्तसंस्था इ. क्षेत्रात ब्राह्मण जायचा प्रयत्न करतात. त्यामुळे या क्षेत्रात त्यांची संख्या जास्त दिसत असावी.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा