मराठी फिल्म इंडस्ट्री मध्ये एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी का आहे ?
माझ्या एका मित्राला तू मराठी फिल्म्स का बघत नाही असे विचारले असता , त्याने ही इंडस्ट्री " of the brahmins , by the brahmins , for the brahmins " आहे असे धक्कादायक उत्तर दिले . त्याच्याशी बराच वाद घातल्यानंतर त्याचे काही मुद्दे खालील होते जे मला मान्य करावे ,
उदा .
१) मराठी फिल्म इंडस्ट्री तील बहुतेक कलाकार ब्राह्मण आहेत .
२) मराठी टीव्ही मालिका मधली characters ची नावेही एकाच विशिष्ट वर्गाची असतात . तसेच बोलली जाणारी भाषाही एका विशिष्ट वर्गाची असते , विदर्भ किंवा मराठवाडा येथील भाषा क्वचित असते .
सैराट सारख्या ग्रामीण सिनेमा ला मिळालेले यश हेच सांगत नाही काय ? की इंडस्ट्री तील लोक आपण संपूर्ण महाराष्ट्राला represent करतो ह्या भ्रमात आहेत ?
💬 प्रतिसाद
(254)
प
पी. के.
Mon, 11/21/2016 - 09:56
नवीन
विशिष्ट वर्गाची मक्तेदारी आहे म्हणून मराठी सिनेमा पाहत नाही असा म्हणणारा तुमचा मित्र..
शिक्षण सौंस्थेथ विशिष्ट वर्गाची मक्तेदारी आहे म्हणून शिक्षण सोडून दिले का?
चप्पल बनवण्याच्या धंदयांत विशिष्ट वर्गाची मक्तेदारी आहे म्हणून चप्पल वापरणं सोडून दिले का?
केस कर्तनालया मध्ये विशिष्ट वर्गाची मक्तेदारी आहे म्हणून केस स्वतः कापतो का?
कपडे शिवण्या मध्ये विशिष्ट वर्गाची मक्तेदारी आहे म्हणून कपडे वापरणे बंद केले का?
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Mon, 11/21/2016 - 10:00
नवीन
मिपावर गटारसुद्धा असले पाहिजे याची दक्षता घेणार्यांना अधिकृत पाठिंबा असावा अशी शंका घेण्यास बराच वाव आहे
- Log in or register to post comments
अ
अद्द्या
Mon, 11/21/2016 - 10:41
नवीन
हे असले YZ धागे कायला टाकतात लोक ..
सगळी कडे जात काढत बसतात साले . ज्याला काम करायला जमतं त्याला ते मिळतं .. तुम्हाला जमत नसेल तर फालतू गोष्टी बोलत बसू नये .
- Log in or register to post comments
म
माहितगार
Mon, 11/21/2016 - 11:02
नवीन
विकिपीडियावर मराठी सिनेमात कार्यरत व्यक्तींची दखल पुर्णांशाने दखल घेतली गेली अहे का माहित नाही पण चर्चा चालू आहे तर किमानपक्षी किमान स्वरुपाचा डाटा हवा म्हणून इंग्रजी विकिपीडियावरील खालील दुवे देत आहे.
* https://en.wikipedia.org/wiki/Category:Marathi_film_producers
* https://en.wikipedia.org/wiki/Category:Marathi_film_directors
* https://en.wikipedia.org/wiki/Category:Male_actors_in_Marathi_cinema
* https://en.wikipedia.org/wiki/Category:Actresses_in_Marathi_cinema
- Log in or register to post comments
म
माहितगार
Mon, 11/21/2016 - 11:24
नवीन
मी नेपोटीझम बद्दल चर्चा धागा काढून दोन दिवस झाले एक अपवादात्मक प्रतिसादा शिवाय कुणि फिरकले नाही, ह्या धाग्यावर जातीवार विभागणीचा प्रयत्न झाला की सगळे धावत आले. असो.
क्रोनीझम (मराठीत काय म्हणावे ?) नेपोटीझम (घराणेशाही) ह्या भारतीय समाज जिवनातील गृहीत गोष्टी आहेत त्यात कुणाला फारसे वैषम्य वाटत नाही त्याच प्रमाणे जात हाही भारतातील अविभाज्य घटक आदर्श नसला हत्ती गेला (लांब) शेपुट आहे या न्यायाने शिल्लक आहे. जात धर्म क्रोनीझम घराणेशाही पलिकडच्या लोकांना संधी मिळतच नाहीत असे नसावे, शहारुख खान टिव्ही मालिकेतून पुढे आला, कलावंत एकदा जनतेनी डोक्यावर घेतला की त्याला कुणिही थांबवू शकत नाही. टिव्ही सारख्या माध्यमांनी एंटरटेनमेंट मिडीया बर्यापैकी समानसंधी स्वरुपाचा बनवला आहे गाणे, विनोद, आयकॉन शोध अशा अनेक विषयांवर खुल्या मंचातून नवागतांना जात-पात-धर्म न पहाता संधी मिळताना दिसतात, मला वाटते बरेच चित्रपट कलावंत अभिनय बद्दल क्लासेस वगैरे घेतात फिल्म अँड टेलव्हीजन इन्स्टीट्यूट सारख्या संस्थाही विद्यार्थ्यांना जात धर्म पाहून प्रशिक्षण देत नसाव्यात. एखाद्या विशीष्ट वर्गातून एखाद्या क्षेत्रात अधिक लोक असणे संभवीनीय असू शकते कोणत्याही क्षेत्रात प्रगती होण्यासाठी समावेश न झालेले समाजघटक सोबत आलेले केव्हाही चांगलेच आणि असे घटक सामावून घेण्यासाठी सकारात्मक पाऊले उचलणे कदाचित उपयूक्त असू शकते का यावर विचार व्हावयास हरकत नसावी. असो
- Log in or register to post comments
स
सूड
Mon, 11/21/2016 - 12:24
नवीन
सरकारी कर्मचारी वर्गात मोठ्या प्रमाणात असणार्या सरकारी ब्राह्मणांबद्दल आपलं काय मत आहे?
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 11/21/2016 - 15:05
नवीन
शु: शु:!!! भावना दुखावतील असे बोलु नये हो सुड!!! नाक घासुन माफी माग बरे बार्नीसरांच्या "मित्राची". माझ्यासाठी दोन चमचे चरणतीर्थही आण हो.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Mon, 11/21/2016 - 15:44
नवीन
सूड,
एकदम समर्पक प्रश्न आहे! काम काही नाही. फुकट बसून पगार घेणार. अशांना सह्याजीराव म्हणंत असंत.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 11/22/2016 - 07:04
नवीन
सरकारी ब्राम्हण म्हणून हिनवणारे आणि एकाच वर्गात विशिष्ट वर्गाची मक्तेदारी आहे का, असे म्हणनारे या सर्वांबद्दल त्यांचं सेम मत असावं असं वाटतं.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
न
नपा
Tue, 11/22/2016 - 08:00
नवीन
बरं मग... काय उपाय करायचा म्हणताय?
एक लै भारी काम करता येईल.....मराठी चित्रपटात काम करणाऱ्यांचे फक्त पहिले नाव (First Name ) प्रसिद्ध करायचे
म्हणजे लोकांना (आड)नावावरून होणारे मानसिक क्लेश कमी होतील...
बाकी जो तो ज्याच्या त्याच्या गुणवत्तेने पुढे जाताच राहील त्याला जातीचा त्रास होणार नाही...
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Tue, 11/22/2016 - 18:34
नवीन
हो. मनापन तसाच वाटतो.
मी शालेत आसताना मनापन वाटायचा आपुनपन मराटीतला आजे द्येगाना व्हवा आनी पिरेमी आशीक आवारा आसा गाना म्हणत हिरोंडा चालवावी.
पन मराटी फिलिम इंडष्ट्री मदीं एका यीशीस्ट क्याटेगरीच्या लोकांची म्हाजोरगिरी आसल्यापाय गपचिप तो यीचार मनातना काडून टाकला आणि येवस्तीत शिकून बिकून सोप्टेर इंजिनेर झालो.
पन आता तुमी सरल ह्याज्यात आरकशन मांगा. तुमी पन हिरो व्हाल. तुमची पोरा पन व्हतील. तुमच्या पोरांची पोरा पन व्हतील. फुडच्या पिड्याना टेन्शनचा कामच नाय.
- Log in or register to post comments
न
नाखु
Wed, 11/23/2016 - 04:41
नवीन
कचकून पाठींबा
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Wed, 11/23/2016 - 06:36
नवीन
पिरेमी आशीक आवारा ह्या गाना मना समाजलां, पन ह्या रे कुटला - आजे द्येगाना व्हवा. ह्या नाय समाजलां.
- Log in or register to post comments
न
नाखु
Wed, 11/23/2016 - 07:06
नवीन
बघिटल्या "शिवाय" दिसणारच नै "दृश्यम"आहे ना म्हणून !
देवगण सिनुमा पाहिलेला मनुश्यगण नाखु
- Log in or register to post comments
क
किसन शिंदे
Wed, 11/23/2016 - 05:19
नवीन
मराठी चित्रपटसृष्टीत जातीची अशी मक्तेदारी असली काय किंवा नसली काय, काही फरक पडत नाही, कारण चित्रपटाला डोक्यावर घेणार्या किंवा खाली आदळणार्या रसिक प्रेक्षकांची कुठलीच जात नसते.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Wed, 11/23/2016 - 07:36
नवीन
बार्नी गेला काडी टाकून !
पब्लीक फू़ंकत बसलयं =))
- Log in or register to post comments
क
किसन शिंदे
Wed, 11/23/2016 - 08:21
नवीन
=)) =))
नाहीतर काय.
- Log in or register to post comments
स
सामान्य वाचक
Wed, 11/23/2016 - 10:49
नवीन
दळण अजून सुरूच हाये का
- Log in or register to post comments
म
माहितगार
Wed, 11/23/2016 - 11:21
नवीन
चक्कीचे चालक चक्की चालू करून निघून गेले, चक्की चालू आहे दळण टाकले की पिठ मिळेल, तेही चकटफू !
- Log in or register to post comments
स
सामान्य वाचक
Wed, 11/23/2016 - 11:26
नवीन
जुंधळ आनी भाजनी ठेवून जातो
एकावर एक वतू नका
- Log in or register to post comments
स
सामान्य वाचक
गुरुवार, 11/24/2016 - 12:19
नवीन
मी हॉलीवूड चे चित्रपट बघते
ते गोऱ्यांनी काढलेले, गोऱ्यांन बद्दल आणि गोऱ्यां चेच असतात
पण मला काय प्रॉब्लेम नाय
कारण चित्रपट हा करमणुकीसाठी बघायचा असतो हे माझ्या खांद्यावरच्या डोक्याला माहित आहे
सगळ्या गोष्टींमध्ये आपली मते नोंदवण्याची, किंवा मते form करण्याची देखील गरज नसते, हे सुद्धा माझ्या डोकयाला म्हायती हाये
- Log in or register to post comments
J
jp_pankaj
गुरुवार, 11/24/2016 - 14:09
नवीन
200 होत आले,
अजुन विशीष्ट वर्गाची मक्तेदारी नाय संपली..!
कोण आहे तिकडे?? शिपॉय..!
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
गुरुवार, 11/24/2016 - 16:25
नवीन
संदीप डांगे,
मी माझी संस्कृती म्हणून वैयक्तिकरित्या जात जपत असेन तर मी जातीयवादी कसा काय ठरतो? जात जपणे आणि जातीभेद जपणे यांत फरक आहे ना? तुम्ही हा संबंध कसा जोडलात ते जाणून घ्यायची उत्सुकता आहे.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
गुरुवार, 11/24/2016 - 17:26
नवीन
'संस्कृती म्हणून वैयक्तिकरित्या जात जपत असणे' म्हणजे काय?
जात जपणे आणि जातीभेद जपणे यात काय फरक आहे?
- Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य
गुरुवार, 11/24/2016 - 18:57
नवीन
जो कायद्यानं धर्म पाळणाऱ्या अन धर्मांधांमध्ये आहे.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
गुरुवार, 11/24/2016 - 21:54
नवीन
संदीप डांगे,
काही गोष्टी आपल्याला कुटुंबाकडून मिळालेल्या असतात. उदा. : स्वयंपाक वा पेहराव. ती जर का जातीविहीत बदलत असेल आणि मी तसाच पोशाख करत असेन आणि माझ्या आवडीनिवडी माझ्या जातीला धरून असतील तर मी जात पाळतोय. मात्र मी माझ्या जातीला इतरांपेक्षा श्रेष्ठ मानंत नाही. इतकंच काय मी जातीभेदही मानंत नाही. सर्व जाती सारख्या मानतो. जात आन इजातीभेद मानण्यांत हा फरक आहे.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
गुरुवार, 11/24/2016 - 21:56
नवीन
- Log in or register to post comments
र
रेवती
गुरुवार, 11/24/2016 - 23:31
नवीन
असेच काहीसे लिहिण्याचे मनात होते पण टंकाळा करत होते.
- Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन
Sat, 11/26/2016 - 04:28
नवीन
खाद्यपदार्थ, पोशाख, रीतिभाती ह्याला जात म्हटले तर संस्कृती कशाला म्हणायचे?
एकाच जातीतल्या दोन व्यक्ति वेगवेगळ्या भौगोलिक ठिकाणी गेल्या तर सारखाच पहिराव करतील?
बहुतेकांना ज्यांना "वैयक्तिकरीत्या" जात सांभाळायची असते ते तथाकथित श्रेष्ठ जातीतले असतात असे निरीक्षण आहे. बाकी चालू द्या.
- Log in or register to post comments
र
राही
Sat, 11/26/2016 - 06:27
नवीन
आपला प्रतिसाद वाचला आणि +१ साठी लॉग-इन केले.
खाद्यपदार्थ, रीतिभाती, पोशाख म्हणजे 'जात' असेल तर प्रत्येक जातीची संस्कृती वेगळीच की. मग अखिल महाराष्ट्राची, देशाची संस्कृती ठरवण्याची वेळ आली तर कोणत्या जातीचे रीतिरिवाज, खाणे, पोशाख स्टँडर्ड धरायचा?
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Sat, 11/26/2016 - 09:33
नवीन
राही,
संस्कृती म्हणजे काय या प्रश्नाचीच वाट पहात होतो मी. कारण की संस्कृती या शब्दाचं मूळ इंग्रजीत आहे. हा अर्वाचीन शब्द असून २०० वर्षांपूर्वी हा शब्द भारतीय भाषांत सापडत नसे. महाराष्ट्रापुरतं म्हणायचं झालं तर महाराष्ट्रधर्म आहे. पण संस्कृती नामे पदार्थ पारंपारिक साहित्यात नाही.
तर प्रश्न असा आहे की जातीला धर्म म्हणावं का? हिंदू ही जात आहे का? जाणकारांनी कृपया प्रकाश टाकावा.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Sat, 11/26/2016 - 10:26
नवीन
शिफ्टिंग गोलपोस्ट?????? जातीच्या वर्मावर बोट ठेवले की धर्माच्या गोष्टी?
ह्या धाग्याचा विषय 'जात' हाच आहे हे तुम्हाला ठावूक आहे,
आता जात म्हणजे धर्म आणि हिंदु म्हणजे जात वगैरे आणून शब्दच्छल व बुद्धीभ्रम करण्याचा प्रयत्न करु नका.
- Log in or register to post comments
म
मराठी_माणूस
Fri, 11/25/2016 - 07:08
नवीन
तुमचा मित्र कोणत्या फिल्म्स बघतो ?
- Log in or register to post comments
न
नाखु
Fri, 11/25/2016 - 11:51
नवीन
फिल्मचे "रसग्रहण-परिक्षण" मागणार आहात काय?
असल्यास वेगळा विभाग ठेवावा.
परि क्षण वाचक नाखु
- Log in or register to post comments
म
मराठी_माणूस
Sun, 11/27/2016 - 09:19
नवीन
प्रश्न भाषेशी निगडीत सरळ आणि स्वछ आहे . "रसग्रहण-परिक्षण" कुठुन काढले
- Log in or register to post comments
ल
लीना कनाटा
Sat, 11/26/2016 - 04:21
नवीन
मामोऑ
अरे बार्नीच्या मित्रा, हा भारतीय समाजातला शारीरिक कष्टातून सुटलेला पहिला वर्ग. पिढ्यान पिढ्या डोकॅलिटी ची कामे केल्याने बुद्धीला धार चढलेली. त्यातच वाघिणीच्या दुधाची सगळ्यात आधी धरलेली कास त्यामुळे ज्या ज्या क्षेत्रात गेले तेथे तेथे प्रगती केली आणि तसा सगळीकडे बोलबाला.
आता साधा सरळ हिशेब मांडू हं.
अगदी ८०% हुशार म्हणजे चारात तीन, उरलेल्यातील फक्त २०% हुशारआणि अनुकूल परिस्थितीची संधी असलेले म्हणजे जवळ जवळ वीस.
सुरवातीला प्रगतीचा चढ तीव्र त्यामुळे प्रगतीचा वेग अधिक नंतर मात्र समतल भाग, तीन तिथं समतल पातळीत तर शिक्षणाची संधी आणि अनुकूल परिस्थितीमुळे वीस त्या तिघांना गाठण्याच्या तयारीत तीव्र चढावर.
उरलेल्यांना देखील आता शिक्षणाच्या आणि प्रगतीच्या संधी उपलब्ध तसेच लोकसंख्येची वाढ भौमितिक प्रमाणात त्यामुळे बार्नीच्या मित्रा काही काळाने तू बार्नीला काय सांगशील हो असा आमच्या ह्यांचा प्रश्न ?
मामोऑ
- Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ
Sat, 11/26/2016 - 12:03
नवीन
अहो साधा सरळ हिशेब मांडताय कि कोडे घालताय!! :D
आकडेवारी काहीच झेपली नाही...
"अगदी ८०% हुशार म्हणजे चारात तीन, उरलेल्यातील फक्त २०% हुशारआणि अनुकूल परिस्थितीची संधी असलेले म्हणजे जवळ जवळ वीस."
आता यात, कशातून किती गेले म्हणून २० उरले? ८०% हुशार कशातले? चारात तीन म्हणजे शंभरात ७५ ना?
परत,
"वीस त्या तिघांना गाठण्याच्या तयारीत तीव्र चढावर."
आता हे २० नक्की कुठले? कृपया जरा इस्कटून सांगाल का?? :)
- Log in or register to post comments
ल
लीना कनाटा
Sat, 11/26/2016 - 17:36
नवीन
बम्बाळ काका,
शंभरातल्या साडे तीन, चार पैकी ८०% हुशार म्हणजे तीन
शंभरातल्या उरलेल्या साडे शहाण्णव पैकी फक्त २०% हुशार आणि अनुकूल परिस्थिती लाभलेले म्हणजे साधारणतः वीस
तीन प्रगतीच्या उच्य टप्प्यावर पोहोचलेले, वीस त्यांना गाठू पाहणारे
बदलत्या परिस्थिती मुळे आणि उपलब्ध संधीमुळे शंभरातील उरलेले पंचाहत्तर देखील प्रगती करू पाहणारे
हे चित्र एकीकडे तर दुसरीकडे स्नान संध्या सोडून अभक्ष्य भक्षण, अपेय पान स्वीकारून कटिंग एज (मराठी प्रतिशब्द ?) गमावणारे दुसरीकडे
त्यामुळे काही काळा नंतर काय चित्र दिसेल असा ह्यांचा प्रश्न
- Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ
Sun, 11/27/2016 - 17:01
नवीन
हम्म, इंटरेस्टींग!
"शंभरातल्या साडे तीन, चार पैकी ८०% हुशार म्हणजे तीन"
यासाठी कोणताही दुवा देता येईल का? का त्याची गरजच नसेल ना... हुशारी हि जन्मजातच असते असे काही तुमचे मत आहे का?
"शंभरातल्या उरलेल्या साडे शहाण्णव पैकी फक्त २०% हुशार आणि अनुकूल परिस्थिती लाभलेले म्हणजे साधारणतः वीस"
यासाठी सुद्धा संदर्भाची गरज नसेल ना?
हुशारी ची आपली व्याख्या काय आहे हे ऐकायला आवडेल.
एखाद्या शेतकऱ्याने अभिनव प्रयोग करून शेतीतून फायदा कमावला तर तो आपल्या 'हुशार' च्या व्याख्येत बसतो का? कि तो उच्चशिक्षित नाही, मोठ्या कंपनी मध्ये कामाला नाही, परदेशात गेला नाही म्हणून तो हुशार नाही?
बाकी तुमच्या ह्यांचे विचार बऱ्याच ऍबस्ट्रॅक्ट पद्धतीने मांडले आहेत त्यामुळे नक्की मुद्दा काय आहे ते कळेना...
प्रगतीचा उच्च टप्पा वगैरे तर लोल मुद्दा आहे! कोण कोणाला गाठण्यासाठी कष्ट करत नाही.
प्रत्येक जण स्वतःच्या प्रगतीसाठी आणि राहणीमान सुधारण्यासाठी प्रयत्न करणार, आधी काही लोकांना ती संधी जाणीवपूर्वक नाकारण्यात आली होती. आता त्यांना ती उपलब्ध आहे. त्याच लोकांपैकी फक्त २०% हुशार असतील असे म्हणणे हि त्यांची क्रूर थट्टा करणे वाटते.
- Log in or register to post comments
ल
लीना कनाटा
Sun, 11/27/2016 - 23:02
नवीन
# हुशारी हि जन्मजातच असते असे काही तुमचे मत आहे का? #
अगदी, अगदी आणि अश्या दाव्यांना विदा, दुवा, संदर्भ इत्यादींची गरज नसतेच मुळी !
# त्याच लोकांपैकी फक्त २०% हुशार असतील असे म्हणणे हि त्यांची क्रूर थट्टा करणे वाटते. #
ओ काका, खरे तर २०% देखील जास्तच आहेत, त्यात क्रूर थट्टा कसली?
मूक मोर्चे काढले म्हणजे आपण अतिशहाणे झालो असा समज कोणीही करुन घेऊ नये. - असे प्रतिसाद काय उगाच येतात काय?
- Log in or register to post comments
र
राही
Sat, 11/26/2016 - 06:54
नवीन
खरे तर कोणत्याही कलाप्रवाहात स्थूलमानाने नेहमीच दोन प्रवाह असतात. एक अभिजनांना आकर्षित करणारा आणि एक बहुजनांना. अर्थात ही काही न बदलणारी सीमारेषा नव्हे. हे ढोबळमान आहे. बहुजनवादी कलेचे 'मास अपील' अर्थातच जास्त असते. बहुजनवादी म्हणजे ओबडधोबड किंवा क्रॅश नव्हे. पुरते ग्रामीणही नव्हे. शहरातल्या झोपडपट्टीचे, चाळीचे. गिरणीकामगारांचे चित्रण करणारी कला ही बहुजनांचे चित्रीकरण करणारी अभिजात कलाकृती असू शकते आणि अभिजनांचे चित्रीकरण करणारी बटबटीत भडक असू शकते. तेव्हा या दोनही प्रवाहात त्या त्या थीमला साजेसे कलावंत नांदत असतात. कलात्मक दर्जाच्या दृष्टीने दोघेही सारखेच असतात. मला देऊळ चित्रपट अतिशय आवडला होता. बदलत्या खेड्यातील विरोधाभासाचे चित्रीकरण करणारा हा चित्रपट 'सुवर्णमयूर' पटकावून गेला. यात या दोन्ही प्रवाहांचा सुंदर समतोल साधला गेला आहे. (गिरीश कुलकर्णीच्या साध्यासुध्या मनातली घालमेल, संघर्ष आणि आपल्या फायद्यासाठी देवळाचे महत्त्व वाढवणार्यांचा क्रूर बटबटीतपणा.) अभिजातता आणि बटबटीतपणा हा जातीवर नसतो.अवांतर :
मला तर आजही ब्राह्मणेतर लोकच मराठी चित्रपटसृष्टीत जास्त आढळतात. नैसर्गिकरीत्या नजिकच्या भविष्यकाळात त्यांचे प्रमाण वाढणारच आहे. सो, वाद कशाला?
- Log in or register to post comments
र
राही
Sat, 11/26/2016 - 07:00
नवीन
क्रॅश नव्हे. चुकीचे लिहिले गेले.
- Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ
Sat, 11/26/2016 - 12:12
नवीन
णिषेध!
अशा धाग्यांवर हे असले प्रतिसाद यायला लागले कि टीआरपी वर्धक चर्चा कशा बरे होणार...
लोकांना आम्ही कसे भारी, ते कसे तुच्छ हे सांगायची संधी कशी मिळणार?
एकमेकांवर आंतरजालीय जातीय धागे काढून हिणवण्याची इच्छा पूर्ण कशी होणार?
एकमेकांना नडणे गरजेचे असते हे तुम्हाला माहिती नाही का?
अभ्यास वाढवा... :)
- Log in or register to post comments
र
राही
Sat, 11/26/2016 - 12:54
नवीन
णिषेध कुबूल है!
अनभ्यस्त.
- Log in or register to post comments
प
पुंबा
Sat, 11/26/2016 - 13:01
नवीन
संपूर्ण सहमत. कित्येक मुख्य अभिनेते-अभिनेत्री अब्राह्मण आहेतच पण आघाडीचे दिग्दर्शक निर्माते सुद्धा अब्राह्मणच आहेत. कलेच्या प्रांतात इतकं water tight sagregation शक्य नसतंच. माझ्या जातभाईंनाच घेणार असा विचार केला तर बोऱ्या वाजू शकतोच. ब्राह्मण लोकांचा Eary bird असण्याने मिळणारा फायदा जसजसा संपत जाईल तसतसा नवा crowd या प्रांतात येईल.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Sat, 11/26/2016 - 15:35
नवीन
संदीप डांगे,
ठीके. चर्चेतून धर्म काढून टाका. संस्कृती हा शब्द तर अर्वाचीन आहे. आणि जाती तर पूर्वापार चालंत आलेल्या आहेत. म्हणजेच मी कुठलीही परंपरा पाळली की मी आपोआप जातीयवादी ठरतो. हा तिढा कसा सोडवायचा?
२.
तुमची बुद्धी इतकी तकलादू आहे की माझ्या युक्तिवादाने भ्रमित होईल?
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन
Sun, 11/27/2016 - 16:17
नवीन
तिढा सोडवणे अगदी सोपे आहे. गेल्या दोनशे वर्षातले शब्द चालत नसतील तर गेल्या दोनशे वर्षातले राहणीमानातले सगळे बदलही झुगारुन मग मूळ स्वरुपातली जात पाळावी वैयक्तिकरीत्या. अर्वाचीन काळातले सगळे करायचे; पाहिजे तिथे इंग्रजीचा वापर करायचा आणि फक्त संस्कृती ह्या शब्दाशी वाकड्यात शिरुन जातीचे तुणतुणे वाजवायचे हा प्रकार कोणत्याही लॉजिकवर टिकणारा नाही.
चिंचगुळाची आमटी खाल्ली व मुंज केली म्हणून कोणाला पूर्वी ब्राह्मण म्हणत नसत; किंवा नाचगाणे केले म्हणून कोणाला महार म्हणत नसत. जात जन्मानेच येई व इच्छा असो वा नसो ते सगळे करावेच लागे. आता जीवनपद्धतीला संस्कृती हा शब्द नव्हता पूर्वी म्हणून त्यालाच तुम्ही जात म्हणण्याचा उफराटेपणा करणार असाल तर करा. त्याच निकषाने सिनेमा हा गेल्या २०० वर्षातलाच असल्याने ह्या धाग्यावर तर सिनेमात काम करणारे ब्राह्मण हे ब्राह्मणच नाहीत असे तुमचे मत असले पाहिजे वैयक्तिकरित्या.
अर्वाचीन जीवनपद्धती जगणार्या (म्हणजे ज्याला आपण जिन्स म्हणतो ते अमेरिकन गुराख्यांचे कपडे घालणे; गेल्या दोन-चारशे वर्षांत इकडे आलेले बटाटा, मिरची, कॉफी, पिझ्झा, पास्ता इत्यादी अर्वाचीन पदार्थ खाणे हे करणार्या) लोकांची जात कोणती म्हणायची?
दोनशे वर्षांपुर्वीच्या कोणत्या परंपरा कोण "शुद्ध" रीतिने पाळतो हेही ऐकायला आवडेल. वैदिक काळात ब्राह्मण लोक बळी द्यायचे यज्ञात आणि मांस खायचे किंवा क्षत्रिय लोक सीमोल्लंघन करुन शत्रूप्रदेशात जाऊन यायचे. ह्या प्राचीन परंपरांचे काय? की सोयीस्कर तोच कालखंड निवडायचा परंपरांसाठी?
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Sun, 11/27/2016 - 09:34
नवीन
न म स्का र न म स्का र न म स्का र
कोंबड्यांच्या झुंजीत
बोकडांची टक्क्कर...
बैलांच्या शर्येतीत
गाढवाचा पहिला नंबर...
न म स्का र न म स्का र न म स्का र
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Indian Army Amazing Talent Video... :)
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Sun, 11/27/2016 - 18:08
नवीन
नगरीनिरंजन,
जरूर करेन. कारण पूर्वीच्या काळी लोकं आपापल्या जीवनपद्धतीस जातिधर्म, कुळाचार, वगैरे शब्दांनी ओळखंत असंत. ते सगळे संदीप डांग्यांच्या मते जातीयवादी धरायचे का? त्यांच्या मते तर वैयक्तिकरीत्या जात पाळणारा जातीयवादी आहे. अशा माणसाने कुठलीही परंपरा पाळली तर तिची नाळ जातीशी कशीही जुळवता येईल की! अशा मनुष्यास स्वत:च्या जातील इतर जातींपेक्षा श्रेष्ठ न मानण्याची संधीदेखील द्यायला संदीप डांगे तयार नाहीत.
मग दोनशे वर्षांपूर्वी आणि त्याआधी शतकानुशतके भारतातले बहुतांश लोकं जातीयवादी होते का?
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Sun, 11/27/2016 - 18:49
नवीन
याचे उत्तर मी आधीच दिले आहे, जात हे आदिम इच्छेचेच सुधारित रूप आहे..
आपण 'अमुक जातीचे' आहोत म्हणजे नक्की काय आहोत ह्याचं उत्तर ज्यानेत्याने शोधावं..कसलेही तिढे उद्भवणार नाहीत,
परंपरा आणि जातीचा संबंध ननि यांनी खोडून काढला आहेच, सबब, तुम्हाला मान्य नसेल तर काही उदाहरणे द्या, बघू तरी जातीचा संबंध कसा येतो ते परंपरेशी..
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- ›
- »