Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कार्ड पेमेंटचे २ % , दुकानदार आणि आपण

अ
अप्पा जोगळेकर
गुरुवार, 12/01/2016 - 14:08
🗣 582 प्रतिसाद
नमस्कार, गेले काही दिवस वारंवार कार्ड पेमेंटच्या २ टक्क्यांबद्दल काही प्रतिक्रिया वाचत आहे. हे पैसे सरकारने द्यावेत, ते सबसिडाईज व्हावेत पासून पेमेंट बँकांच्या २ % कमिशनसाठी नोटा बंद झाल्या वगैरे प्रतिसाद वाचले. एका धाग्यावर मोदकशी चर्चा करताना यासंदर्भात १-२ प्रतिसाद दिले होते. ते कॉपी -पेस्ट करुन इथे चिकटवत आहे. सविस्तर लिहिण्यासाठी तूर्तास वेळ नाही त्याबद्दल दिलगीर आहे. माझी माहिती अपूर्ण असू शकते. त्यात कोणी भर घातल्यास आवडेल. या धाग्याचा 'माहिती' यापलीकडे अन्य कोणताही उद्देश नाही. हे चार्जेस शून्य करता येत नाहीत. कारण ते सरकारकडे जात नाहीत. नेटवर्क कंपनीने फुकटात सेवा द्यावी अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. १. जयंत कुलकर्णी - Mon, 28/11/2016 - 16:52 आत्ताच गॅससाठी क्रेडीटकार्डने पैसे भरले. जवळजवळ १ % जास्त भरावे लागले. ट्रान्झॅक्शन चार्जेस म्हणून १ %. म्हणजे एचपी गॅस डिलिव्हरीच्या अगोदर पैसे घेणार व त्यासाठी जास्त पैसे घेणार. कॅशलेस हा माझ्यासाठी आतबट्याचा व्यवहार आहे... :-( २. मोदक - Mon, 28/11/2016 - 17:05 ८०० रूपयांचा सिलेंडर असेल तर १% पैसे म्हणजे ८ रूपये जास्त जातील. सुधारणांचा भाग आणि प्लॅस्टिक मनीला प्रोत्साहन म्हणून सरकार बहुदा हे ही चार्जेस कमी किंवा शून्य करेल. असा माझा अंदाज आहे. ३. अप्पा जोगळेकर - Mon, 28/11/2016 - 17:43 सुधारणांचा भाग आणि प्लॅस्टिक मनीला प्रोत्साहन म्हणून सरकार बहुदा हे ही चार्जेस कमी किंवा शून्य करेल. हे चार्जेस शून्य करता येत नाहीत. कारण ते सरकारकडे जात नाहीत. नेटवर्क कंपनीने फुकटात सेवा द्यावी अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. image ४. मोदक - Mon, 28/11/2016 - 17:54 आप्पा.. सरकार असे मार्ग वापरणार्‍याला सबसिडी देईल.. किंवा खर्चाच्या रकमेची आणखी काहीतरी सवलत देईल. बरोबर..? ५. अप्पा जोगळेकर - Mon, 28/11/2016 - 18:15 नाही. तसे वाटत नाही. देत असल्यास देऊ नये. सबसिडी घेऊन धंदा करणे मला तत्वतः चूक वाटते. पेमेंट बँकिंगचे बिझनेस प्रिन्सिपल 'माझ्या मते तरी उधार मिळते म्हटल्यावर लोक पटकन खरेदी करतात' या ग्रूहीतकावर अवलंबून आहे. म्हणून जगातले पहिले पेमेंट बँकिंग डायनर्स क्लब आणि अमेरिकन एक्स्प्रेस च्या क्रेडीट कार्डांपासून सुरु झाले. हे ग्रूहीतक शॉपिंग मॉल्/डीपार्टमेंटल स्तोअर येथे य्शस्वीपणे चालताना आपण पाहतोच. नंतर 'क्रेडीट कार्ड' साठी नेटवर्क अव्हेलेबल आहे आणि सोय म्हणून डेबिट कार्ड साठी सुद्धा पेमेंट बँकिंग सुरू झाले असावे असे वाटते. आमचे नेटवर्क तुम्ही वापरा (का वापरा तर धंदा वाढेल) आणि नेटवर्कची फी द्या असे हे गणित आहे. शिवाय चेक पेमेंट मधे चेक बाउन्स होऊ शकतो. पेमेंट बँकेत कस्टमरने डिफॉल्ट केले तरी मर्चंटचे पैसे बँकेला द्यावेच लागतात. (बहुधा व्याजासकट. तो वेगळा फायदा.) आपण एखाद्या बँकेचे एटीम वापरतो तेव्हादेखील नेटवर्कची फी द्यावी लागते. दुसर्‍या बँकेचे एटीएम असेल आणि ५ + ट्रान्जाकश्नस असतील तर चार्ज पडतो. पेमेंट बँकिंग वर बहुधा आरबीआय ची रेगुलेशन असावीत असे वाटते. या सगळ्यात सरकार आलेच कुठे ? येऊ नये. देशात पेमेंट बँकिंग वाढावे असे सरकारला वाटत असेल तर असले निर्बंध किंवा सबसिडी देऊ नयेत. ६. डॉ सुहास म्हात्रे - Mon, 28/11/2016 - 20:35 सबसिडी हा शब्द तितकासा बरोबर नाही असे वाटते व कोणत्याही सबळ आणि चांगल्या अर्थव्यवस्थेत सबसिडी एक तात्पुरती तडजोड म्हणूनच वापरलेली असते, काही काळाने ती नष्ट व्हावी हाच उद्येश असला पाहिजे. पण, ट्रांझॅक्शन्सची संख्या मोठा प्रमाणावर वाढली की, इंफ्रास्ट्रक्चरवरील खर्च त्याच्या समप्रमाणात वाढत नसल्याने, दर ट्रांझॅक्शनमागचा खर्च कमी होईल (इकॉनॉमी ऑफ स्केल) आणि ती बचत पूर्ण किंवा त्यातला काही भाग ग्राहकापर्यंत पोचेल. ७. अप्पा जोगळेकर - Mon, 28/11/2016 - 17:40 काका, हा जो काही वाढीव टक्का आहे तो गॅसवाल्याने भरला पाहिजे. उगाच सरकारच्या नावे टाहो फोडून काय होणार मर्चंट (गॅसवाला) --> अक्वायरर कंपनी (अक्सिस बँक वगैरे) --> नेटवर्क कंपनी (विसा/मास्टर कार्ड्/अमेक्स वगैरे) --> कार्ड इश्युअर बँक (आय्सीआय्सीआय वगैरे). उद्या गाळ्याचे भाडे वाढले म्हणून गॅसवाल्याने अडिशनल पैसे घेतले तर तुम्ही द्याल का ? असे वाढीव पैसे देणे चूक आहे. यापेक्षा चेकने पेमेंट करू शकता. ८ रुपये हा मामुली दर आहे हा वेगळा भाग आहे.

प्रतिक्रिया द्या
103511 वाचन

💬 प्रतिसाद (582)
म
मोदक Fri, 12/02/2016 - 06:06 नवीन
मी क्रेडिट कार्ड वर पेट्रोल भरतो, मला चार्जेस लागत नाहीत. स्टेटमेंट नीट बघतो आता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंम्बा
ग
गंम्बा Fri, 12/02/2016 - 06:15 नवीन
माझे डेबिट कार्ड होते ( मी क्रेडीट कार्ड वापरत नसल्यामुळे ) शेल च्या पंपावर पेट्रोल भरले होते. कदाचित एचपी, भापे वर नसेल लागत. हे चार्जेस टाळण्यासाठी पेट्रोकार्ड नावाचा प्रकार असतो ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
स
संजय क्षीरसागर Fri, 12/02/2016 - 09:02 नवीन
चार्जेस लागतातच. ३१ तारखेपर्यंत नॅशनलाइज्ड बँका चार्जेस घेणार नाहीत म्हणजे सरकार चार्जेस बेअर करणारे. त्यापुढे आपल्याला कॅश किंवा चेक (आणि काही प्रमाणात इंटरनेट बँकींग) हेच पर्याय राहातील...म्हणजे गाडी पूर्वपदावर. थोडक्यात, टारझनची `बालनरेंद्र आणि उंदीर-घुशी' ही पोस्ट संपादकीय कारणानकारणानं, तरी मुद्दा वॅलीड आहे. कॅश फॉर्ममधला संपूर्ण काळा पैसा, चलना बाहेर जावा अशी अपेक्षा होती (साधारण ५ ते ७ लाख कोटी रुपये). त्यानं बजेट डेफिसिट कमी होऊन महागाई कमी झाली असती. पण सरकारनं पुन्हा इन्कम-डिक्लरेशन स्कीम बॅक-डोअरनं आणून, डी-मनीटायजेशनची फार मोठ्या प्रमाणावर वाट लावली आहे. ५०% टक्के टॅक्स + २५% ब्लॉकींग असलं तरी, पुन्हा सगळा पैसा चलनात आला की, महागाई पूर्वपदावर यायला वेळ लागणार नाही. शिवाय थोडा साकल्यानं विचार केल्यावर अभिजितचा हा मुद्दा पण २०१४ आणि २०१५ या दोन वर्षांत १ हजार ९२ जणांना पकडण्यात आले होते. त्यापैकी ८८६ जण निर्दोष सुटले आहेत. विचार करण्याजोगा आहे. (काल प्रतिसाद देतांना मी त्या अँगलनं विचार केला नाही याबद्दल अभिजितसाठी दिलगिरी व्यक्त करतो). अतीरेकी हल्ले संपावे अशी आशा होती (किंवा सरकार इंडिरेक्टली क्रेडीट घेत होतं), पण काल पुन्हा जोरदार हल्ला झाला आणि सगळं बोंबलं, असं दिसतंय. एकूणात जुन्या नोटा जाऊन फक्त नव्या नोटा येतील पण ज्याप्रमाणात गोंधळ घातला गेला तेवढं काहीही साध्य होणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंम्बा
स
संजय क्षीरसागर Fri, 12/02/2016 - 09:04 नवीन
थोडक्यात, टारझनची `बालनरेंद्र आणि उंदीर-घुशी' ही पोस्ट संपादकीय कारणानं उडवली, तरी मुद्दा वॅलीड आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
अ
अभिजित - १ Fri, 12/02/2016 - 12:54 नवीन
धन्यवाद .. तेच तेच सरकारी अधिकारी पैसे खातात . निलंबित होतात .. घरी बसून अर्धा पगार खातात. ३ वर्षात परत कामावर रुजू. परत खा पैसे .. पकडलं गेला तरी काळजी नाही. उदा - गणेश बोराडे, सुनील जोशी. मोठे अधिकारी आहेत कल्याण डोंबिवली नगरपालिकेचे. याच्यावर मोदी सरकार काही करणार आहे ? हा प्रकार अख्या देशात चालतोय .. पर्मनंट fire ?? http://m.maharashtratimes.com/maharashtra/thane-kokan-news/thane/corporation-official-arrested-in-case-of-bribe/amp_articleshow/55266623.cms Nov 6, 2016 - दोन वर्षांपूर्वी लाच घेताना अटक करण्यात आलेले पालिकेचे सहाय्यक आयुक्त गणेश बोराडे यांना पुन्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिड लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक http://m.maharashtratimes.com/maharashtra/thane-kokan-news/sunil-joshi/amp_articleshow/44954069.cms लाचखोरी प्रकरणी निलंबित झालेले महापालिकेचे अधिकारी सुनील जोशी यांना पुन्हा सेवेत रुजू करण्यात आले आहे. जोशी यांच्यासह अन्य पाच अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुन्हा पालिका सेवेत घेण्यात आल्याची माहिती पालिका आयुक्त रामनाथ सोनावणे यांनी सोमवारी दिली. महापालिकेचे कार्यकारी अभियंता व सहाय्यक संचालक नगर रचनाकार सुनील जोशी यांना २२ फेब्रुवारी २०१० रोजी पाच लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्यांना महापालिकेच्या सेवेतून निलंबित करण्यात आले होते. विशेष म्हणजे याआधीही १९९५ मध्ये त्यांना लाच स्वीकारताना अटक झाली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
सुबोध खरे Fri, 12/02/2016 - 13:33 नवीन
याच्यावर मोदी सरकार काही करणार आहे ? हा प्रकार अख्या देशात चालतोय देशाच्या कानाकोपऱ्यात भ्रष्ठाचार पसरला आहे तो काय गेल्या दोन वर्षात पसरला किंवा वाढला आहे का? मोदीसरकारचा इतका द्वेष कि जरा कुठे काही झाली कि मोदी साहेबांचीच जबाबदारी आहे असे म्हणून मोकळे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजित - १
अ
अभिजित - १ Fri, 12/02/2016 - 13:48 नवीन
भ्रष्टाचार के खिलाफ जंग वगैरे करण्याच्या बाता ते निवडणुकीच्या वेळी मारत होते म्हणून म्हटले .. आता नाही त्यांची जबाबदारी असे तुम्हाला वाटते तर ठीक आहे ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
संदीप डांगे Fri, 12/02/2016 - 14:06 नवीन
भ्रष्टाचार के खिलाफ जंग बद्दल ताज्या बातम्या: सत्य बातमी आहे, दिशाभूल समजण्याची पूर्ण मुभा आहे. http://m.indiatoday.in/story/demonetisation-bjp-youth-leader-caught-with-20-5-lakh/1/824225.html तमिलनाडु के सेलम में बीजेपी यूथ विंग के एक लीडर को पुलिस ने तब धर दबोचा जब वो बैंक से पैसे बदलने के बाद लौट रहा था। उसके पास से नए और पुराने दोनों नोटों का काफी मात्रा में ज़खीरा मिला है. जिसकी कीमत लगभग 20 लाख रूपये बताई जा रही है।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजित - १
स
सुबोध खरे Fri, 12/02/2016 - 14:17 नवीन
डांगे अण्णा भाजप मध्ये काही सगळे धुतल्या तांदुळासारखे लोक आहेत असा प्रत्यक्ष मोदी साहेबांचाही दावा नाही. देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात कुठेही काही झाले कि मोदी साहेबांची जबाबदारी म्हणून तुम्ही आरडा ओरडा करता. मोदी द्वेषाची कावीळ झाली आहे मी म्हणतो ते हेच. या हिशेबाने तर काँग्रेसच्या काळात झालेल्या अब्जावधी रुपयांच्या घोटाळ्यांसाठी श्रीमती सोनिया गांधी यांनी काय करायला पाहिजे याची अपेक्षा आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Fri, 12/02/2016 - 14:30 नवीन
काँग्रेसच्या काळात काय घोटाळे झाले त्या लोकांना भुजबळ सारखं आत टाका असं आधीच बोललो राव. सोनिया गांधी पासून वद्रा पर्यंत सगळ्यांना आत टाका, मागचे घोटाळे विसरायचे कशाला, गाडीभर पुरावे असतात, 370 पाने पुरावे असतात, कुठे जातात सगळे? मागची लोक घोटाळे करून जाणार त्याना का म्हणून सूट? हे सगळे घोटाळेबाज अटकेत गेले आम्ही तर आधी दहा हजार फटाक्यांची लड लावू व पुराव्यासाठी मिपाच्या युट्युब चॅनेलवर व्हिडियो टाकू! बायदवे, श्रेय घ्यायला मोदीसाहेब पुढे, जबाबदारी आली की 70 वर्षांची घाण हे सोयीस्कर आठवते असं निरीक्षण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Fri, 12/02/2016 - 14:13 नवीन
अभिजित - १ भ्रष्टाचार के खिलाफ जंग वगैरे करण्याच्या बाता मग हे निर्चलनीकरण हा कशाचा भाग आहे असे आपल्याला वाटते? मोदीसाहेबांच्या कडे पैसे नाहीत म्हणून श्रीमंतांच्या विरुद्ध द्वेषाने केलेले राजकारण आहे कि सामान्य माणसांचा द्वेष आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजित - १
स
संजय क्षीरसागर Fri, 12/02/2016 - 19:05 नवीन
मोदीसाहेबांच्या कडे पैसे नाहीत म्हणून श्रीमंतांच्या विरुद्ध द्वेषाने केलेले राजकारण आहे कि सामान्य माणसांचा द्वेष आहे? १) निर्चलनीकरणाचा गाजावाजा झाला तितका फायदा होणार नाही, आणि २) कार्ड चार्जेस हा मूळ मुद्दा असल्यानं, परत पहिले पाढे पंचावन्न होणार. वी विल बी बॅक टू स्क्वेअर वन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
मराठी कथालेखक Fri, 12/02/2016 - 18:55 नवीन
जे जे उत्तम उदात्त उन्नत ते ते मोदींनी केलंय हो.. आणि जे जे वाईट होतं किंवा आहे ते ६० वर्षांपासून चालत आलंय.. बिच्चार्‍या मोदींचा काही दोष नाही त्यात आणि सामान्य जनतेला मोदींच्या निर्णयामुळे काही त्रास सहन करावा लागत असेल तर तो त्याचा देशासाठीचा त्याग, देशप्रेम सिद्ध करण्याची सुवर्णसंधी. बाकी तुम्ही देशद्रोही दिसताय हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजित - १
अ
अभिजित - १ Fri, 12/02/2016 - 13:55 नवीन
http://www.misalpav.com/comment/905007#comment-905007 ८८६ खाबू बाबू सुटले ( ८३ टक्के ) .. फक्त महाराष्ट्रात .. अख्या देशात काय चालले आहे कोणास ठाऊक .. तुम्हाला हे "जरा कुठे" सारखे छोटेसे वाटते .. ठीक आहे ... कोणताही विरोधाचा मुद्दा मांडला कि हे काही मोदींचे काम नाही असे म्हणून भक्त जबाबदारी ज्या पद्धतीने झटकतात त्याची कमाल वाटते ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Fri, 12/02/2016 - 14:11 नवीन
मग आता मोदी साहेबानी काय करावे असा तुमचा सल्ला आहे? प्रत्येक सरकारी अधिकाऱ्याच्या मागे उभे राहून काम कसे करावे हे पाहायचे का? त्यांना साधे वेळेत कार्यालयात यायला पाहिजे एवढे सरकारी अधिकाऱ्यांना समजावयाला लागले. मग खाबू माणसांना मिळणारा मलिदा ते सहजा सहजी सोडतील का? एवढी मोठी जाहिरात तुम्ही दिली त्यात काय लिहिले आहे त्याचा साधा मराठी अनुवाद करून पहा. आपल्या सोयीसाठी मी तो करीत आहे. जर आपण सगळे जालावर आणि भ्रमणध्वनीवर आपले आर्थिक व्यवहार करू लागलो तर भ्रष्टाचार आणि काळा पैसा याच्या निर्मूलनाच्या आपले मोठे योगदान ठरेल. पण तुम्हाला मोदी द्वेषाची कावीळ झाल्यासारखे वाटत आहे म्हणून असे आक्रस्ताळे प्रतिसाद देत आहात. भ्रष्टाचारनिर्मूलन हि एक आदर्श परिस्थिती आहे आणि ती जोवर माणूस लोभी आणि स्वार्थी आहे तोवर ते १०० % साध्य होणारच नाही. ही ७० वर्षे खोल चरत गेलेली जखम अशी दीड दिवसात बरी होईल हि अपेक्षा करणे चूक आहे. हे निरचलनीकरण केवळ आर्थिक क्रांती चा भाग नसून नैतिक क्रांतीचा भाग आहे. या विधानाचा विचार करून पहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजित - १
N
Nitin Palkar Fri, 12/02/2016 - 17:33 नवीन
१००% सहमत. या सर्व बाबीत मला होणारा त्रास आणि दूरगामी फायदा यांचा विचार किमान सुशिक्षितांनी तरी करावा! १००% भ्रष्टाचार निर्मुलन हे कदाचित स्वप्नरंजन असेल, पण म्हणून भ्रष्टाचार कमी करण्याचा प्रयत्न करण्यास विरोध म्हणजे भ्रष्टाचाराच्या दलदलीत खोल जाण्यास मदत करण्यासारखेच ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
अ
अभिजित - १ Sat, 12/03/2016 - 08:41 नवीन
उगाच नैतिक वगैरे च्या बाता मारू नये. दिवास्वप्न आहे हे .. भारतीय लोक आणि नैतिकता !!! इथले लोक तर जाऊ द्या सरकार पण चोर आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वे चा टोल पूर्ण वसूल होऊन हि सरकार तो काढायला तयार नाही. अगदी ताजी बातमी आहे हि. मागच्या आठवड्यातील .. वाचलीत का ? ( विवेक वेलणकर ) ओ अर्धवटराव .. डॉक्टर साहेबानी भाषांतर करून दिले आहे ते वाचा .. मोदी म्हणतात कि "कॅशलेस मुळे करप्शन चे निर्मूलन सुकर होईल" .. इतके तरी मान्य आहे ना ? अशक्य आहे हे .. कॅशलेस मुले फक्त टॅक्स बेस वाढेल .. बाकी काही नाही .. आणि शेवट वयापारी लोक जो काही टॅक्स अधिक मोबाईल wallet फी भरणार तो आपलय डोक्यावर येणार .. कॅशलेस मुले भ्रष्टचार कमी होईल हे स्वप्न आहे. एक टक्का पण फरक पडणार नाहीए. बडे लोक सोन्यात / फ्लॅट मध्ये घेतील. छोटे लोक दुसऱ्या मार्गाने .. उदा - ट्रॅफिक पोलीस काय करेल - चल तो वडापाव वाला आहे त्याला १२० रु पेटीम कर. ( १०० रु लाचेची रक्कम + २० रु वडापाव वाल्याचा convenience चार्ज !! )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
अ
अर्धवटराव Sat, 12/03/2016 - 08:49 नवीन
मला सुरुवातीपासुन खात्री आहे कि मोदि साहेब आणि त्यांच्या अदानी-अंबानी कंपूने आपली चहा-बिस्कीटाची व्यवस्था करायला म्हणुन हा नोटबंदीचा निर्णय घेतला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजित - १
स
सुबोध खरे Sat, 12/03/2016 - 08:51 नवीन
अर्धवटराव जाट म्हणाला :-- खुंट आणि म्हैस इथेच बांधणार. हे नाही का वाचलं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
अ
अभिजित - १ Sat, 12/03/2016 - 08:59 नवीन
उगाच अदानि अंबानी ला मध्ये कशाला आणता ? मी नाव तरी घेतले आहे का त्यांचे. कि आपण प्रतिवाद करू शकत नसलो कि मग घ्या अंबानी ला मध्ये ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
अ
अर्धवटराव Sat, 12/03/2016 - 09:04 नवीन
मी माझा दृष्टीकोन सांगितला बस्स... जसं तुम्ही केशलेसमुळे भ्रष्टाचार बंद करण्याचं मोदिंनी म्हटल्याचा शोध लावला ना... अगदी तसच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजित - १
अ
अभिजित - १ Sat, 12/03/2016 - 11:11 नवीन
मी नको असेल तर , मी काहीतरी नवीनच शोध लावतो असे तुमाला वाटत असेल तर मुद्द्यावर तुम्ही आणि डॉक्टर एकमेकांशी चर्चा करा इथे. त्याला तर काही हरकत नाही ना ? बघूया काय उत्तर बाहेर पडते ते .. कारण डॉक्टर जे म्हणत आहेत ते तुम्ही नाकारत आहेत .. परत तुम्ही दोघे एकाच बाजूचे पण आहेत .. त्या मुले तुमची बाजू किती कच्ची आहे ते दिसतेय .. कारण मोदींना नक्की काय म्हणायचे आहे हे तुम्हाला ( अर्धवटराव तुमि ) समजत नाहीए ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
अ
अर्धवटराव Sat, 12/03/2016 - 19:56 नवीन
आम्हि कुठे दावा केलाय कि आम्हाला मोदि कळतात म्हणुन... तुमच्यासारखे विद्वान समजावुन सांगतात तेंव्हा थोडाफार प्रकाश पडतो आमच्या ज्ञानात. कीप इट अप.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजित - १
ह
हतोळकरांचा प्रसाद Sat, 12/03/2016 - 09:52 नवीन
इथले लोक तर जाऊ द्या सरकार पण चोर आहे
हे अत्यंत बेजबाबदार वक्तव्य आहे असे माझे वैयक्तिक मत आहे.
मुंबई पुणे एक्सप्रेस वे चा टोल पूर्ण वसूल होऊन हि सरकार तो काढायला तयार नाही
थोडीशी माहिती घ्यायचा प्रयत्न केला तर असे लक्षात येईल कि दुर्दैवाने सरकार यात फार काही करू शकत नाही. "बांधा-चालवा-हस्तांतरित करा (बीओटी)" तत्वावर बांधलेले रस्ते हे तत्कालीन सरकारने विकासकाशी केलेल्या कराराने बांधील आहेत. कदाचित न्यायालयातही असे दावे तग धरणार नाहीत. असे असताना सरकाने नक्की काय केले म्हणजे टोल बंद होतील यावर आपले विचार ऐकायला आवडेल.
अशक्य आहे हे .. कॅशलेस मुले फक्त टॅक्स बेस वाढेल .. बाकी काही नाही .. आणि शेवट वयापारी लोक जो काही टॅक्स अधिक मोबाईल wallet फी भरणार तो आपलय डोक्यावर येणार ..
अर्थात टॅक्स बेस वाढवणे हेच तर उद्दिष्ट असायला हवे ना सरकारचे? खरंतर टॅक्स बेस वाढवणे नाही तर खरा टॅक्स बेस उघड करणे हे कॅशलेसचे उद्दिष्ट असावे. आता जे कॅश मध्ये व्यवहार करून पावत्या न बनवता त्यांची खरी उलाढाल लपवतात अशा लोकांना कॅशलेस मध्ये फारसा वाव राहणार नाही, ट्रांसकशन्स ट्रॅक करता येतील. बाकी मी बरेच दिवस कॅशलेस पर्यायांचा वापर करतो आहे, मलातरी कुठेही जास्त पैसे द्यावे लागले नाहीत.
कॅशलेस मुले भ्रष्टचार कमी होईल हे स्वप्न आहे
भ्रष्टाचार म्हणजे फक्त लाच अशी जर आपली संकल्पना असेल तर आपले वक्तव्य बरोबर आहे. कर चुकविणे आणि काळा पैसा जमा करणे व परत तोच काळा पैसा अवैध मार्गांसाठी वापरणे हा भ्रष्टाचार नाहीये का? कर चुकविणे व काळा पैसा जमविणे यावर कॅशलेसमुळे नियंत्रण आल्यामुळे असा भ्रष्टाचार थांबणार नाही का? अवांतर : बाकी स्वतःची कायद्याच्या कचाट्यातून सुटका करून घेण्यासाठी पैसे देणे वगैरे थांबण्यासाठी सरकारने काही करायची गरज नाही, आपण स्वतः ठरवावे कि चूक केलीय तर नियमाने जे काही असेल ते भरेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजित - १
अ
अभिजित - १ Sat, 12/03/2016 - 10:07 नवीन
१. वस्तुस्थिती तशीच आहे. आजचा मटा - ९०० कोटी च्या घपल्या करत एक फालतू जुनिअर इंजिनिअर काढला BMC ने. BMC चा कमिशनर कोण नेमते , CM. आता CM याच्यावर काही करणार नाहीत हीच वास्तस्थिती आहे . कि नाही ? आता इथे चोरागिरी कोण करत आहे ? २. टोल वर तुम्ही हि माहिती कुठून घेतली बुवा ? इथे पण त्याही लिंक टाका .. बघू तरी कोणाचे हात किती बांधले गेलेत ते. आणि म्हैसकर ला फाईट देणार विवेक वेलणकर मूर्ख आणि तुम्ही तेवढे शहाणे !! ३. फुटक्या टाकीत पेट्रोल भरण्या सारखे आहे टॅक्स बेस वाढवणे. आधी करप्शन दूर करा .. निदान काही पाऊले तरी उचला .. मग वाढावा बेस. आत्ता जनता फक्त कर भरते .. नेते / नोकरशाही / ठेकेदार मजा मारते हे चालले आहे . ४. ठीक आहे .. कायद्याच्या कचाट्यातून सुटका करून घेण्यासाठी पैसे देणे वगैरे थांबण्यासाठी सरकारने काही करायची गरज नाही .. पण सरकारी ऑफिस मध्ये, शाळा प्रवेश , रस्तावर जो नाडला जातोय , त्याला स्वछ व्यवस्था पुरवणे हे पण सरकराने काम नाही असे वाटते का तुमाला ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ह
हतोळकरांचा प्रसाद Sat, 12/03/2016 - 10:22 नवीन
आणि म्हैसकर ला फाईट देणार विवेक वेलणकर मूर्ख आणि तुम्ही तेवढे शहाणे !!
चांगल्या शब्दात प्रतिवाद करणे तुम्हाला बहुधा आवडत नसावे, त्यामुळे तुमच्याशी प्रतिवाद करणे मला योग्य वाटत नाही. आपल्या अमूल्य प्रतिसादबद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजित - १
अ
अभिजित - १ Sat, 12/03/2016 - 10:36 नवीन
उगाचच काहीही पुरावा नसताना ऐसा भी हो सकता है , वैसा भी हो सकता है टाईप शब्दांचे बुडबुडे कोणी उडवू लागला तर कडक भाषा वापरावीत लागते . अजून हि पुरावा टाका .. मी मान्य कारेन तुम्हालाच सोपे पडावे प्रतिवाद करायला म्हणून नंबर टाकून मुद्दे मांडले आहेत. सर्व मुद्दयांवर तुमचे काय म्हणणे आहे ते सांगा .. असा पळ काढू नका प्रसादराव !! का प्रतिवाद करू शकत नाही मग ऊ मी नाही जा अशी बालवाडी स्टाईल आहे तुमची !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ह
हतोळकरांचा प्रसाद Sat, 12/03/2016 - 10:43 नवीन
तुम्हाला हवे तसे समजायला तुम्ही मोकळेच आहात, माझी यत्किंचिन्तही हरकत नाही! अगदी माझ्याकडे मुद्दे नाहीत आणि पळ काढतोय हे गृहीत धरलत तरी माझी अजिबात हरकत नाही! पुनःश्च धन्यवाद! :):)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजित - १
स
सुबोध खरे Sat, 12/03/2016 - 11:02 नवीन
जाट म्हणाला :-- खुंट आणि म्हैस इथेच बांधणार. हे नाही का वाचलं? का वाद घालताय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ह
हतोळकरांचा प्रसाद Sat, 12/03/2016 - 11:04 नवीन
वाईच चुकलंच माजं :):)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
संदीप डांगे Sat, 12/03/2016 - 11:08 नवीन
जाट म्हणजे मोदी, खुंट म्हणजे देशभक्ती, म्हैस म्हणजे नोटाबंदी असे आहे काय डॉक? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
अ
अभिजित - १ Sun, 12/04/2016 - 08:07 नवीन
आता जिथे कुठेही मोदी policy वर उत्तर देता येणार नाही तिथे हेच उत्तर वाचायची तयारी ठेवा अंधभक्त कडून ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ओ
ओम शतानन्द Sat, 12/03/2016 - 12:21 नवीन
उदा - ट्रॅफिक पोलीस काय करेल - चल तो वडापाव वाला आहे त्याला १२० रु पेटीम कर. ( १०० रु लाचेची रक्कम + २० रु वडापाव वाल्याचा convenience चार्ज !! ) अजब तर्कट आहे हे, आणि मग दिवसाच्या शेवटी हा वडापाव वाला पोलिसाला लाचेची जमा झालेली रक्कम कशी देणार ? रोखीत कि इ wallet मधून ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजित - १
आ
आनन्दा Mon, 12/05/2016 - 04:37 नवीन
जाऊद्या. त्यांच्या डोळ्यावर चष्मा आहे. नाही तर आपल्या युक्तिवादातील एव्हढे मोठे लूपहोल त्यांना कळले असते. लाच पेटीमने घेणे म्हणजे सरकारला आ बैल मुझे मार करण्यासारखेच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ओम शतानन्द
N
Nitin Palkar Fri, 12/02/2016 - 17:24 नवीन
लाच देतं कोण ? लाच देतं कोण ? लाच घेणाऱ्या इतकाच लाच देणारा दोषी नाही का? यांच्या कडे एवढे पैसे कुठून जमा झाले? माझ काम लवकर होण्याकरता मी पैसे देतो, ‘नियमानुसार काम होऊ द्या’ असे म्हणण्याची माझी तयारी आहे का? आपण नोकरशाहीला विनाकारण घाबरतो.. आणि लाच देतो भ्रष्टाचार आपण करतो हे आपल्या लक्षातच येत नाही....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजित - १
ज
जयंत कुलकर्णी Sat, 12/03/2016 - 02:44 नवीन
सध्या लाच देणारा व लाच घेणारा हा सारखाच दोसी असतो. कोणीतरी, कुठल्यातरी अर्थतज्ञाने हे अत्यंत चउकीचे आहे असे सिद्ध केले आहे. त्याचे म्हणणे फक्त लाच घेणाराच दोसी आहे असा कायदा झाला तर लाच घेणारर्‍या वर्गावर येणार्‍या तक्रारी वाढतील व त्यांना वचक बसेल. आता तेरी भी चूप मेरी भी चूप असे चालले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nitin Palkar
अ
अभिजित - १ Sat, 12/03/2016 - 09:11 नवीन
कधीच होणार नाही मग काम .. शाळेत प्रवेश घ्यायला पैसे भरावेच लागतात .. तुमच्या कडे काही उपाय असेल तर सांगा ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nitin Palkar
ओ
ओम शतानन्द Sat, 12/03/2016 - 12:09 नवीन
अतीरेकी हल्ले संपावे अशी आशा होती पण गरीब बिचारी निष्पाप काश्मिरी जनता यापूर्वी दगडफेक आणि अन्य सद्कृत्ये करीत होती ती मात्र या नोटा रद्द करण्याच्या प्रकार नंतर बंद झालेली आहे , म्हणजे हा नोटाबंदीचा परिणाम अशी शंका घेण्यास वाव आहे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
अ
अभिजित - १ Sun, 12/04/2016 - 08:10 नवीन
नोटबंदी नंतर पण अतिरेकी हल्ले होऊन २२ जवान मारले गेले आहेत .. डोळ्यावरची पट्टी काढा मोदी प्रेमाची ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ओम शतानन्द
न
नितिन थत्ते Fri, 12/02/2016 - 09:27 नवीन
क्रेडिट कार्ड कं आणि पेट्रोल कं यांचा टाअय अप असतो. त्या कंपनीच्या पंपावर पेट्रोल भरल्यास सरचार्ज लागत नाही. उदा . माझ्याकडे सिटीबँक-इंडियन ऑइल चे कार्ड होते त्यावर इंडियन ऑइल च्या पंपावर सरचार्ज लागत नाही. इतर ठिकाणी चार्ज लागतो. तसेच अ‍ॅमेक्सचे कार्ड आहे त्याने हिंदुस्तान पेट्रोलियमच्या पंपावर पेट्रोल भरल्यास चार्ज लागत नाही. इतरत्र लागतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
स
संजय क्षीरसागर Fri, 12/02/2016 - 10:35 नवीन
दोन बँका (दुसरी स्टँडबाय म्हणून) आणि दोन कार्ड एवढंच असलं की काम व्हायला पाहीजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
न
नितिन थत्ते Fri, 12/02/2016 - 10:45 नवीन
साधारण एच पी चे पंप सगळीकडे असतात त्यामुळे एक अ‍ॅमेक्स आणि एक एटीएमचे कार्ड एवढे कॅरी केले की काम भागते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Fri, 12/02/2016 - 11:01 नवीन
माझ्या घराजवळ जर एचपीचा पंप नसेल तर एटीएम कार्डच ना? म्हणजे पुन्हा कॅशच नाही का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
ज
जयंत कुलकर्णी Fri, 12/02/2016 - 11:41 नवीन
थत्तेजी, हे कार्ड विकत घ्यावे लागते का ? आणि त्याला वार्षिक आकार असते का ? त्या कार्डमधे पैसे भरताना नेट बँकिंग किंवा चेकने पैसे दिल्यास त्यालाही काही चर्जेस पडतो का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
न
नितिन थत्ते Fri, 12/02/2016 - 12:05 नवीन
वार्षिक फी असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी
ज
जयंत कुलकर्णी Fri, 12/02/2016 - 12:06 नवीन
मग ती ही कॉस्ट आलीच ना.........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
अ
अप्पा जोगळेकर Fri, 12/02/2016 - 13:28 नवीन
कसली कॉस्ट ? जवळ जवळ सगळ्याच कंपन्या पहिल्या वर्षीचे चार्ज घेत नाहीत. आणि ठराविक रकमेची खरेदी केली नाही तर अगदी मामुली चार्ज पडतो. तसेच वाटले तर वर्षाने नविन कार्ड घेता येते. जुने फेकून देता येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी
अ
अप्पा जोगळेकर Fri, 12/02/2016 - 13:37 नवीन
'घरपोच' 'फुकट' सेवा देणारा वाणी वजनात मारतो ते मुकाट्याने झेलणारे कार्डच्या २% बद्दल तक्रार करताना दिसतात. हे मिपासदस्यांबद्दल नाही. महिनाभर सगळे व्यवहार क्रेडिट कार्डने करावेत.(९०% ठिकाणी चार्जेस लागणार नाहीत. निदान मेट्रो सिटीत नाहीच) ते क्रेडीट बिनव्याजी वापरावे. क्रेडिट पॉईंट मिळवावेत आणि बिल वेळच्या वेळी भरावे. ड्युजकडे नियमित लक्ष द्यावे. बिनव्याजी क्रेडीट + क्रेडिट पॉईंट हा फायदा काही ठिकाणच्या २% पेक्षा खूप जास्त आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
स
सुबोध खरे Fri, 12/02/2016 - 13:58 नवीन
काँग्रेसने जनतेला सर्व गोष्टी सरकारतर्फे "फुकट" मिळण्याची सवय करून ठेवली आहे त्याचा हा परिपाक आहे. उदा वीज, पाणी. "वाजवी दरात" सेवा मिळाली पाहिजे हा विचारच रुजवणे कठीण जात आहे. तसे दर लावले कि लगेच हेच का "तुमचे अच्छे दिन' म्हणून कोल्हेकुई सुरु होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
स
संदीप डांगे Fri, 12/02/2016 - 14:09 नवीन
हा धंद्याचा विषय आहे डॉक, bjp का काँग्रेस हा नाही. फुकट मिळण्याचा काय विषय आहे इथे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा