Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नोटाबंदी : एक अपरिपक्व निर्णय.

म
मार्मिक गोडसे
Fri, 01/06/2017 - 17:12
🗣 312 प्रतिसाद
बनावट नोटा , दहशतवाद आणि काळा पैसा नष्ट करणे हा नोटाबंदीचा मुख्य उद्देश होता, तो कितपत यशस्वी झाला हे थोड्याच दिवसात कळेल. परंतू, नोटाबंदी हा ह्यावर कायमस्वरूपी इलाज असूच शकत नाही हे सरकारलाही माहीत असताना असा अचानक नोटाबंदीचा निर्णय पंतप्रधानांनी का घेतला असावा? पंतप्रधानांनी निवडणुक प्रचारादरम्यान स्विस बँकेतील भारतीयांचा काळा पैसा देशात आणू हे आश्वासन दिले होते, सत्तेत येऊन दोन वर्ष झाली तरी एक फुटकी कवडीही आपण आणू शकलो नाही ह्याची सल त्यांना लागून होती. दरम्यान पंतप्रधानांनी मिपावरील माझा हा लेख वाचला असावा, हे काम सोपे नाही हेही त्याना कळून चुकले. लगेचच त्यांनी आपला मोर्चा देशातील काळ्या पैशाकडे वळवला. सरकारी यंत्रणा कमीतकमी वापरून लवकरात लवकर हा काळा पैसा कसा नष्ट करता येईल ह्याबद्दल त्यांनी काही अर्थचक्रमांचे सल्ले घेतले. अधिक मुल्याच्या नोटा रद्द करण्याचा सल्ला त्यांना पटला. हा निर्णय घेताना गुप्तता पाळण्याची अट स्वतःवर लादून घेतली आणि ५०० व १००० च्या जुन्या नोटा रद्द करून २००० ची नवीन नोट चलनात आणून अडचणींच्या खाईत जाणारा 'बायपास' काढला. ८ नोव्हेंबरला नोटाबंदीची घोषणा केल्यानंतर पुढील ५० दिवसात सरकारच्या अपरिपक्व निर्णयाचे दुष्परिणाम दिसू लागले. ५० दिवस सामान्य जनतेचे रोकड टंचाईमुळे हाल झाले. जि.म. बँकांना नोटाबदलीला बंदी व नवीन चलपुरवठा न केल्याने ग्रामीण अर्थव्यवस्था पुर्णपणे कोलमडून गेली. मुळात नोटाबंदीचा निर्णय घेताना पंतप्रधानांनी ग्रामीण भागाचा विचार केलाच नाही. पंतप्रधानांच्या एका अपरिपक्व निर्णयामुळे ग्रामीण जनतेचे झालेले नुकसान भरून निघणे अशक्य आहे.

प्रतिक्रिया द्या
50808 वाचन

💬 प्रतिसाद (312)
ग
गॅरी ट्रुमन Sat, 01/07/2017 - 08:09 नवीन
याला म्हणतात शिफ्टिंग द गोलपोस्ट. समजा दहशतवादी हिंसाचार आणि हवालामध्ये अजिबात फरक पडला नसता तर म्हणायचे "बघा आम्ही सांगत होतो काहीच फरक पडलेला नाही" आणि आता हे आकडे आल्यावर "५०% किंवा ६०% च का आणि १००% का नाही" हे विचारायचे. एकूणच काय की बॉल कोणत्या दिशेने मारायचा आहे हे आधीच ठरवून ठेवायचे आणि मग गोल झालाच पाहिजे अशा पध्दतीने गोलपोस्ट बदलायचे. चालू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
स
संदीप डांगे Sat, 01/07/2017 - 09:11 नवीन
ट्रुमन साहेब, शिफ्टींग गोलपोस्ट तर भाजपसरकार करत आहे. स्वत: मोदींनी नोटाबंदी ही 'भ्रष्टाचार, आतंकवाद व खोट्या नोटा' यांसाठी असल्याचे ८ नोव्हेंबरच्या भाषणात सांगितले. म्हणजे गोलपोस्ट तर त्यांनीच डिफाईन केला ना? तो काही विरोधकांनी डिफाईन केला नाही. आता जी चर्चा होईल ते मोदींनी केलेल्या भाषणातल्या मुद्द्यांसंबंधीच होईल. त्यालाच केंद्र समजून केली पाहिजे. हवाला ५०% आणि हिंसाचारात ६०% ही उपलब्धी असल्याचे सांगीतले जात असेल तर उरलेल्या ५० आणि ४० चे काय? असा प्रश्न येईलच. त्यात उखडण्यासारखे काय आहे? ५० टक्केही होत असेल तर होत आहेच ना? त्यात कोणता गोलपोस्ट शिफ्ट होतोय? १०० टक्के बंद व्हावे अशी इच्छा असणे चुकीचे नसावे बहुतेक. एक उदाहरण देतो. समजा एखाद्या शहरात रोज शंभर चोर्‍या होत आहेत. आणि पोलिसांनी धाडसी कारवाई करुन त्याचे प्रमाण ५० वर आणले तरी पोलिस यशस्वी झाले असे म्हणता येत नाही, ५० टक्के चोर्‍या कमी झाल्या ही उपलब्धी नाही. अजूनही पन्नास होत आहेत ही जबाबदारी आहे. उपलब्धी कशाला म्हणावे. जर एखाद्या शहरात शंभर बेरोजगार असतील आणि त्यातल्या पन्नास लोकांना काही कामधाम मिळाले तर ती सरकारप्रशासनाची उपलब्धी समजली पाहिजे. आता उरलेले पन्नास जरी जबाबदारी असले तरी पहिल्या पन्नासांचे रोजगारक्षम होणे यश साजरे करायला पात्र आहे. कसं आहे, गोलपोस्ट आहे तिथेच आहे पण सरकारसमर्थक 'आम्हाला पाहिजे तसेच खेळा म्हणत आहेत' त्यामुळे समस्या होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
म
मराठी कथालेखक Mon, 01/09/2017 - 08:18 नवीन
मुख्य म्हणजे हवाला वा दहशतवादी कारवाया कमी झाल्या हे ठीक.. पण हा तात्पुरता परिणाम नाही तर दीर्घकालीन परिणाम आहे हे अजून सिद्ध व्हायचे आहे. कदाचित असेही असेल की कमालीची थंडी, हिमवर्षाव ई मुळे दहशतवादी कारवाया काही काळ थंडावल्या आणि श्रेय नोटाबंदीला जात आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
N
Nitin Palkar Sat, 01/07/2017 - 19:00 नवीन
पूर्णपणे सहमत!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
स
संदीप डांगे Sat, 01/07/2017 - 08:11 नवीन
भक्तांना असे काही समजत नसते हो. त्यांना हवे ते बोला बघू. म्हणा अर्धा ग्लास भरलेला आहे. बी ऑप्टिमिस्टिक... नकारात्मकता नको. सकारात्मकता दाखवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
ग
गॅरी ट्रुमन Sat, 01/07/2017 - 08:15 नवीन
भक्तांना असे काही समजत नसते हो.
डांगे, तुमच्याकडून जी अपेक्षा होती ती अगदी पूर्ण केली आहेत. इतरांनी मोदींचे समर्थन कधीही केले तरी बिनदिक्कतपणे भक्त म्हणून मोकळे व्हायचे. अशा माणसांशी कसे डिल करायचे हे मला माहित आहे आणि मी तसेच आता तुमच्याबरोबर करणार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Sat, 01/07/2017 - 08:29 नवीन
माझा प्रतिसाद तुमच्या प्रतिसादाखाली आला त्याल कारण बहुधा दोघांनी एकावेळेस टाकले म्हणून असेल. मी माझा प्रतिसाद देईपर्यंत तुमचा वाचला नव्हता. तुम्हाला उद्देशून किंवा अपरोक्ष भक्त म्हटलेले नाही. तुम्ही भक्त पद्धतीचे वर्तन आजवर तरी दाखवलेले नाही. नोटाबंदीवरचे तुमचे आतापर्यंतचे प्रतिसाद एकमेव म्हणता येतील असे संतुलित, निष्पक्ष, आस्तेकदम आहेत. सो नो गैरसमज प्लीज. तुम्ही टाकलेली बातमी अर्धसत्य आहे. अशा बातम्यांनी भक्तलोक हुरळून जातात आणि जितंमया करत सुटतात असं निरिक्षण आहे. त्याला लॉजिकल काउंटरअर्गुमेंट केले तरी उपयोग होत नाही असे दिसून येते. त्यादृष्टीने माझे विधान आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ह
हतोळकरांचा प्रसाद Sat, 01/07/2017 - 08:42 नवीन
भक्त पद्धतीचे वर्तन
... याबद्दल जरा विस्ताराने टाकाच राव! म्हणजे जाणतेअजाणतेपणी आपण काय तसलं वर्तन वगैरे करत आहोत का ते कळेल आणि मग कोण भक्त आणि कोण नास्तिक वगैरे असलं वर्गीकरण सहज करता येईल, कसे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Mon, 01/09/2017 - 23:22 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ह
हतोळकरांचा प्रसाद Tue, 01/10/2017 - 06:12 नवीन
व्वा छान आहे की! आता या चार्ट नुसार खालील प्रतिसादात कुणाकुणाला तुम्हाला भक्त म्हणायचे होते तेही जमले तर सांगून टाका, उगाच सरसकटीकरण करून संभ्रम कशाला? तुमच्या प्रतिसादावरून तुम्ही गॅरींना म्हणत असाल असेच वाटले, पण तुम्ही स्पष्टीकरण दिलात. मग कोण? http://www.misalpav.com/comment/911499#comment-911499 आणि दुसरं म्हणजे ते भक्त च्या ऐवजी तुम्ही (किंवा कोणीही नॉन-भक्त) चा मेंदू असता तर त्याच सिनॅरिओज मध्ये मेंदूने कसे काम केले असते तेही जमले तर सांगून टाका म्हणजे भक्तांना कसा मेंदू चालवायचा तेही कळेल, कसे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Tue, 01/10/2017 - 06:35 नवीन
भक्तांना कसा मेंदू चालवायचा तेही कळेल, ^^ विनोद जमला बरं का! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ह
हतोळकरांचा प्रसाद Tue, 01/10/2017 - 07:13 नवीन
ते विनोद-बिनोद जाऊद्या हो, भक्त कोण-कोण तेवढं कळलं तर बरं होईल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ग
गामा पैलवान Tue, 01/10/2017 - 08:57 नवीन
संदीप डांगे,
^^ विनोद जमला बरं का! ;-)
चार्टवर तेच लिहिलंय. भक्ताचा मेंदू कसा चालतो ते. मग विनोद कसला? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Tue, 01/10/2017 - 09:10 नवीन
लेट्स डू चमचाफीडींगः भक्तांचा मेंदू चालणे / भक्तांनी मेंदू चालवणे, इनोद हिथं हाय सायबा! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
म
मोदक Tue, 01/10/2017 - 09:26 नवीन
खाली माझ्या प्रतिसादांना उत्तरे देणार आहात ना..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Tue, 01/10/2017 - 09:35 नवीन
एकदा ठरवा नक्की की मी महत्त्वपूर्ण आहे की नाही. तुम्हीच म्हटल्याप्रमाणे मी महत्त्वपूर्ण नाही ना? मग संपला विषय. कशाला मागेमागे फिरायचं उगाच, द्याना उत्तर द्याना उत्तर करत? बाकी जो काय विचार करायचा असेल, वाटून घ्यायचे असेल ते वाटून घ्यायला तुम्ही स्वतंत्र आहात. सुखी राहा. धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
ह
हतोळकरांचा प्रसाद Tue, 01/10/2017 - 10:06 नवीन
तो विनोद आणि चमचाफीडिंग दोन्ही ओढूनताणून वाटलं! पण तरीही अजून एक चमचाफिडींग : मेंदू चालवणे पक्षी डोकं चालवणे, ते स्वतःच चालवायचं असतं! जोक्स अपार्ट, पण ते भक्त कोण-कोण तेवढं सांगितलंत तर वर्तुळ पूर्ण होईल. बाकी जोक्स काय ते तर नेहमीच चालत राहतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Tue, 01/10/2017 - 10:31 नवीन
बाकी लक्षणं दिलीत वर, तेवढ्यावरुन कोण भक्त ते कसं ओळखावं हेही समजत नसेल तर.... असो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ह
हतोळकरांचा प्रसाद Tue, 01/10/2017 - 12:49 नवीन
ते आम्ही सामान्य मिपाकर....कवा कवा मदत...वगैरे...बघा जमलं तर करा मदत! असा नेहमी नेहमी मदतीसाठी याचना करायला लावणे बरे नव्हे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ग
गामा पैलवान Tue, 01/10/2017 - 17:57 नवीन
संदीप डांगे,
लेट्स डू चमचाफीडींगः भक्तांचा मेंदू चालणे / भक्तांनी मेंदू चालवणे, इनोद हिथं हाय सायबा! =))
मग उरलेल्या चार्टचा फापटपसारा कशाला? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
म
मार्मिक गोडसे Sat, 01/07/2017 - 08:18 नवीन
मग काय आता १०० % यश मिळवण्यासाठी परत नोटाबंदी करणार का?
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Sat, 01/07/2017 - 08:42 नवीन
काहीतरी सबळ पुरावे हवेत नै...? खाली काही देतोय, बघून घ्या सबळ आहेत की नाही ते. मोदींच्या ३१ डिसेंबरच्या भाषणातले काही खोटे दावे. https://thewire.in/91122/modi-fact-check/
  • Log in or register to post comments
व
वरुण मोहिते Sat, 01/07/2017 - 08:52 नवीन
अजून खूप वेळ जाणारे निश्चित कळायला . नोटबंदी नंतर पण दहशतवाद्यांकडे २ हजाराच्या नोटा सापडल्या होता , त्यामुळे नोटबंदी हा पर्याय नाही दहशतवादाला मानलं कि १-२ महिने थोडा फरक पडला असेल तर सारखी नोटबंदी करणार का ?? नोटा चलनात आल्यावर परत होणारे ते .त्यामुळे दहशत वाद संपला हा मुद्दा हास्यास्पद आहे . आज बिटकॉइन सारखा चलन आहे वेगवेगळे उपाय आहेत . सध्यातरी दहशत वाद कमी झाला म्हणून ग्रेट असं म्हणता येणार नाही
  • Log in or register to post comments
न
निष्पक्ष सदस्य Sat, 01/07/2017 - 09:51 नवीन
सध्यातरी दहशत वाद कमी झाला म्हणून ग्रेट असं म्हणता येणार नाही
कुठे कमी झालाय?? फक्त त्याच्या बातम्या येत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते
न
निष्पक्ष सदस्य Sat, 01/07/2017 - 08:57 नवीन
वर कोणीतरी रिझल्ट येईपर्यंत वाट पहावी म्हणत आहेत, पण परिक्षाच झाली नाही तर कसल्या रिझल्टची वाट पहायची? बोकीलांच्या एबीपी माझावरच्या दोन मुलाखती तर निवळ्ळ अभिनिवेशी अन् हास्यास्पद आहेत.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Sat, 01/07/2017 - 09:14 नवीन
वर कोणीतरी रिझल्ट येईपर्यंत वाट पहावी म्हणत आहेत,
आणि रिझल्ट आधीच मेरिटमधे आल्याच्या थाटात पेढे वाटायला सुरुवात केली आहे त्याकडे बघायचे नसते. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निष्पक्ष सदस्य
ह
हतोळकरांचा प्रसाद Sat, 01/07/2017 - 09:32 नवीन
परीक्षा झाली कि नाही यावर तुमचे मत काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ग
गामा पैलवान Sat, 01/07/2017 - 11:18 नवीन
पिरा,
म्हणजे जेवढं चलन बाद केलं ते सगळं जवळपास बँकेत परत आलं. मग काळा पैसा कुठे गेला?
हा सगळा काळा पैसा नष्ट झाला आहे. काळ्या पैशाची नोंद नसते. याउलट बँकेत जमा झालेल्या पैशाची नोंद असते. हा पैसा उजेडात आलेला आहे. सबब तो काळा राहिलेला नाही. मात्र जरी तो पैसा पांढरा असला तरी त्याच्या मालकांना आयकर विभागास उत्तरे द्यावीच लागतील. किंबहुना मालकाचे उत्तरदायित्व हाच काळ्या आणि पांढऱ्या पैशातला फरक आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Sat, 01/07/2017 - 11:25 नवीन
गैरसमज आहे. ह्याद्वारे फक्त इन्स्पेक्टर राज आले आहे. आधी बॅन्कवाल्यांनी मजा केली आता आयकरवाले करतील. ज्यांनी अडीच लाख च्या आत भरलेत त्याची चौकशी करणार? आधी सरकार ते करणार नाही असं बोलले होते. म्हणजे सरकार आपल्या वचनाला कलटी मारणार? ज्यांनी चार चार हजार बदलून नेलेत त्यांना कुठे शोधणार? ही शोधमोहिम किती वर्षे चालणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
स
संदीप डांगे Sat, 01/07/2017 - 11:19 नवीन
गुजरात ग्रामपंचायत निवडणूकीत काय झालं ते नगरपालिकांच्या निकालांवर खुश होणार्‍यांनी टाकले की नाही कुठे??
  • Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद Sat, 01/07/2017 - 14:50 नवीन
मला हे काही धागे मिळाले गुगल्यावर, अजून कोणाकडे काही जास्त माहिती असेल तर टाकावी - http://indianexpress.com/article/india/gujarat-panchayat-polls-bjp-felicitates-8000-new-sarpanches-4454979/ "Gujarat panchayat polls: BJP felicitates 8,000 new सर्पांचेस" http://indianexpress.com/article/india/gujarat-rural-polls-una-village-elects-bjp-man-as-sarpanch-4452505/ http://indianexpress.com/article/cities/ahmedabad/gujarat-gram-panchayat-polls-bjp-congress-claim-win/ हि मध्यप्रदेशची एक बातमी - http://zeenews.india.com/madhya-pradesh/good-news-for-bjp-party-sweeps-madhya-pradesh-municipal-elections_1965219.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Sun, 01/08/2017 - 08:32 नवीन
ग्रामपंचायत निवडणुका पक्षचिन्हावर लढवल्या जातात काय? मला माहित नाही म्हणून विचारतोय. अवांतरः अनेक पक्षातले प्रस्थापित लोक (भ्रष्ट+गुंड+आरोपी) आपले पक्ष सोडून भाजपमधे प्रवेश करत आहेत, बहुतेक त्यांचे अच्छे दिन त्यांना मिळाले असावेत. अशा तर्‍हेने कॉन्ग्रेसमुक्त भारत झाला तर काय मजा येईल? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ह
हतोळकरांचा प्रसाद Sun, 01/08/2017 - 09:05 नवीन
माझ्या माहितीनुसार, अशी निवडणूक कुठल्याही पक्षाच्या चिन्हावर लढवली जात नाही पण लढवणारे लोक कुठल्यातरी पक्षाशी निगडित असतातच! त्यामुळे अशा निवडणुकांमधून पक्ष ग्राउंड लेवल ला पोहोचवणे शक्य होत असावे! तुम्ही वर नोटबंदीसंदर्भात त्याचा उल्लेख केला म्हणून वरील लिंका टाकल्या. बाकी, भ्रष्ट + गुंड + आरोपी हे सरसकट विधान न करता केस बाय केस बघुयात ना! असे हे कोण लोक भाजपमध्ये येत आहेत ते निश्चित करून त्याबद्दल चर्चा शक्य आहे. भाजप पूर्णच्या पूर्ण धुतल्या तांदळासारखा पक्ष आहे हा गैरसमज आहे. निष्ठवंतांच्या जोरावर सत्तेत येण्याइतका बेस तयार झाला की असले झुगाड बंद करतील अशी अपेक्षा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ख
खटपट्या Sat, 01/07/2017 - 11:35 नवीन
पण आता अचानक रांगा बंद का झाल्या? आता शेतकरी काय करतायत? व्यवहार चालू झाले ना सर्व? देशात अराजक माजेल वगैरे अंदाज होता. अजून कुठे अराजक माजले नाही ते? काळा पैसा बाहेर आला की नाही हा मुद्दा आहे. त्याबद्दल सरकारचे निवेदन येइपर्यंत थांबूया.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Sat, 01/07/2017 - 12:16 नवीन
असे असेल तर दरवर्षी अधून मधून करत राहावी नोटबंदी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
ख
खटपट्या Mon, 01/09/2017 - 04:33 नवीन
काय हो डांगे साहेब उगाच उत्तर द्यायचं म्हणून देताय काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
सुखीमाणूस Sat, 01/07/2017 - 12:36 नवीन
विरोधक फारच रडतायत. मला तर परवा एक रिक्शावाला "मोदीना अजून १० वर्ष द्यायला हवी तरच सुधारणा होतील" अस म्हणणारा भेटला! खुश होता एकंदरीत मोदींवर म्हणजे नोकरदार खुश आणि गरिब खुश कारण काहीतरी पावल उचलली गेली..... हल्ली फ्लेक्स पण रोडावले आहेत......
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 01/07/2017 - 13:46 नवीन
हल्ली फ्लेक्स पण रोडावले आहेत. चपखल निरिक्षण !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुखीमाणूस
N
Nitin Palkar Sat, 01/07/2017 - 18:23 नवीन
व्यर्थ उधळायला पैसा बंद झाला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
स
सतिश गावडे Sun, 01/08/2017 - 07:01 नवीन
फ्लेक्स प्रिंटींगचा एंट्री लेवलचा पर स्क्वेअर फुटचा दर वडापावच्या किंमतीइतका कमी असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nitin Palkar
ग
गणामास्तर Mon, 01/09/2017 - 07:05 नवीन
नक्की कुठे रोडावलेत म्हणे फ्लेक्स ? बाहेर फिरताना तर हे फ्लेक्स सगळे विश्व व्यापून दशांगुळे उरलेत असे वाटतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nitin Palkar
ग
गणामास्तर Mon, 01/09/2017 - 07:06 नवीन
नक्की कुठे रोडावलेत म्हणे फ्लेक्स ? बाहेर फिरताना तर हे फ्लेक्स सगळे विश्व व्यापून दशांगुळे उरलेत असे वाटतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nitin Palkar
म
मार्मिक गोडसे Sat, 01/07/2017 - 14:40 नवीन
GDP चे आकडेही रोडावतील. जे जे काही रोडावलं जाईल ते नोटाबंदीच्या निर्णयामुळेच ना?
  • Log in or register to post comments
स
सुखीमाणूस Sat, 01/07/2017 - 17:05 नवीन
छापल्यामुळे मिळालेली वाढ आहे का? मग ती फसवीच की?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
स
संदीप डांगे Sat, 01/07/2017 - 17:16 नवीन
हव्या तशा नोटा छापल्याने हवी तशी जिडीपी मिळते हे ज्ञान नवीनच...! आमच्यासारख्या अजाण बालकांवर अजून असे ज्ञानकण उधळावे ही विनम्र प्रार्थना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुखीमाणूस
स
सुखीमाणूस Sat, 01/07/2017 - 18:50 नवीन
नोटा कमी छापल्यामुळे जिडीपी कमी होतो, तर उलट पण होत असेल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Sat, 01/07/2017 - 19:25 नवीन
आधी हे सांगा की नोटा 'कमी छापल्याने' जीडीपी कमी होतो हे कसे कळले तुम्हाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुखीमाणूस
स
सुखीमाणूस Sun, 01/08/2017 - 03:11 नवीन
नोटबन्दीमुळे मन्दी आली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
सुखीमाणूस Sun, 01/08/2017 - 03:17 नवीन
मार्मिक गोडसे पण म्हणतायत तसे... की आता जिडीपी पण कमी होइल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
म
मार्मिक गोडसे Sun, 01/08/2017 - 07:47 नवीन
मार्मिक गोडसे पण म्हणतायत तसे... GDP चे आकडे आल्यावर नोटाबंदीच्या समर्थकांचे जिमनॅस्ट बघायची ईच्छा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुखीमाणूस
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा