Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नोटाबंदी : एक अपरिपक्व निर्णय.

म
मार्मिक गोडसे
Fri, 01/06/2017 - 17:12
🗣 312 प्रतिसाद
बनावट नोटा , दहशतवाद आणि काळा पैसा नष्ट करणे हा नोटाबंदीचा मुख्य उद्देश होता, तो कितपत यशस्वी झाला हे थोड्याच दिवसात कळेल. परंतू, नोटाबंदी हा ह्यावर कायमस्वरूपी इलाज असूच शकत नाही हे सरकारलाही माहीत असताना असा अचानक नोटाबंदीचा निर्णय पंतप्रधानांनी का घेतला असावा? पंतप्रधानांनी निवडणुक प्रचारादरम्यान स्विस बँकेतील भारतीयांचा काळा पैसा देशात आणू हे आश्वासन दिले होते, सत्तेत येऊन दोन वर्ष झाली तरी एक फुटकी कवडीही आपण आणू शकलो नाही ह्याची सल त्यांना लागून होती. दरम्यान पंतप्रधानांनी मिपावरील माझा हा लेख वाचला असावा, हे काम सोपे नाही हेही त्याना कळून चुकले. लगेचच त्यांनी आपला मोर्चा देशातील काळ्या पैशाकडे वळवला. सरकारी यंत्रणा कमीतकमी वापरून लवकरात लवकर हा काळा पैसा कसा नष्ट करता येईल ह्याबद्दल त्यांनी काही अर्थचक्रमांचे सल्ले घेतले. अधिक मुल्याच्या नोटा रद्द करण्याचा सल्ला त्यांना पटला. हा निर्णय घेताना गुप्तता पाळण्याची अट स्वतःवर लादून घेतली आणि ५०० व १००० च्या जुन्या नोटा रद्द करून २००० ची नवीन नोट चलनात आणून अडचणींच्या खाईत जाणारा 'बायपास' काढला. ८ नोव्हेंबरला नोटाबंदीची घोषणा केल्यानंतर पुढील ५० दिवसात सरकारच्या अपरिपक्व निर्णयाचे दुष्परिणाम दिसू लागले. ५० दिवस सामान्य जनतेचे रोकड टंचाईमुळे हाल झाले. जि.म. बँकांना नोटाबदलीला बंदी व नवीन चलपुरवठा न केल्याने ग्रामीण अर्थव्यवस्था पुर्णपणे कोलमडून गेली. मुळात नोटाबंदीचा निर्णय घेताना पंतप्रधानांनी ग्रामीण भागाचा विचार केलाच नाही. पंतप्रधानांच्या एका अपरिपक्व निर्णयामुळे ग्रामीण जनतेचे झालेले नुकसान भरून निघणे अशक्य आहे.

प्रतिक्रिया द्या
50808 वाचन

💬 प्रतिसाद (312)
स
संजय क्षीरसागर Sat, 01/14/2017 - 08:17 नवीन
प्रतिसाद खाली दिला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
फ
फेदरवेट साहेब गुरुवार, 01/12/2017 - 12:13 नवीन
इफ यु वॉन्टेड की,माझ्या पोस्टला क्रिटीसाईजच करायचा हुता तर तू डायरेकली करू शकला असता नी दिकरा. पहिला सेंटन्स मंदी तू बोलते रिलायन्सला इचारला काय (विथ अ क्वेश्चन मार्क) , अने दुसऱ्याच सेंटन्स मंदी तू मला ऍक्युज करते फॉर 'हाफ इंफॉर्म क्रिटीक ऑफ गव्हर्नमेंट' , व्हॉट इज धिस? आपुन काही तुझ्यावर खुन्नस खाऊन न्हाय मंग तू का असा करते रे? नॉट गुड हा आय टेल यु! माझ्या सवाल वापस वाच नी तू, "व्हॉट डज द गव्हर्नमेंट वांट्स?" नाऊ टेल मी ह्यात इतका अग्रेसिव्ह होऊनश्यानी माझा कंडिशन मालूम नसतानी थेट मला अँटीएस्टॅब्लिशमेंट का म्हनला तू? माझ्या क्वेश्चन मंदी तुला कुठे टीका दिसला? नाऊ, लेट मी एलबोरेट माय पॉईंट अगेन ओन्ली फॉर अ गुड जेन्टलमॅन लाईक युवरसेल्फ. (तसा तो संजू दिकरा ने इसक्तला हाय पर आपुनच्या मोरल रिस्पॉन्सीबिलिटी मुळे आपुन वापीस एलबोरेट करते हा) पॉईंट १ कंट्री गव्हर्नमेंट चालवते, बराबर? पॉईंट २ गव्हर्नमेंट पब्लिक गुड करता एक स्कीम आणते, बराबर?? पॉईंट नंबर ३ पब्लिक गुडच्या ते स्कीमला सक्सेस कराया गव्हर्नमेंट स्टेप घेते बराबर?? ते गुड म्हंजी कॅशलेस इकॉनॉमी हाय असा आपुन समजते, ते इम्प्लेमेन्ट कराया सरकार समद्या बँक अने अदर फायनान्शियल इंस्टिट्यूशनला गाईडलाईन इश्यू करते? बराबर?? आता एक कंपनी ते गाईडलाईन फ्लाउट करते, जे मला दिसते बराबर? मी काय त्या कंपनीचा शेर होल्डर नाय, पर मी गव्हर्नमेंटचा एक टॅक्स पेयर म्हणूनश्यानी स्टेक होल्डर हाय का नाय? पब्लिक गुडचा डिसीजन घेयाला म्हणूनश्यानी मी गव्हर्नमेंटला वोट दिलाय माझा, मग त्याच्यात जर डीसक्रियपंसी दिसला किंवा कोन डिसीजन फ्लाउट करताना दिसला तर आपुन प्रश्न कोणाला इचारला पायजे? सीन्स व्हेन क्वेश्चनिंग अमौन्टेड टू क्रिटीसीझम? मी रिलायन्सला विचारला का नाही हे व्हेग हाय रे, फक्त मला बीट करायचा म्हणून झोडपू नको तू. आज तू म्हणते असा फ्लायर पाहून तू रिलायन्सला का इचारला नाहीस? उद्या म्हनशील crime होताना पाहून तू स्वता क्रिमिनलचा एन्काऊंटर का नाय केला? बाबा आपुन साधा माणस असते, आपन समदे नाय करू शकते ते बद्धा गोस्ट करायला तर आपुन गव्हर्नमेंट निवडते, तरी एका सिटीझनचा ड्युटी म्हणुन आपुन रिलायन्स फ्रेशच्या कंप्लेंट बुकात हे सारा चुकीचा आहे अने त्यांनी गव्हर्नमेंटला एका नोबल कॉज मंदी हेल्प करायला असला डिसीजन रोल बॅक कराया पायजे, असा क्लिअरली लिहूनश्यानी आला आहे, तेच्या नंतर आपुन सरकार ला प्रश्न इचारला आहे, होप धिस सॅटिसफाईज युवर क्वेश्चन ऑन माय मोटिव्ह फॉर अस्किंग अ रिलेटीवली सिम्पल क्वेश्चन. बाकी ते पहिला क्वेश्चनला आनसर यायच्या आंदीच माझ्या मोटिव्हला सस्पेक्त करने वाज हायली मॅनरलेस, पर आंतरजाल कम्स विथ अ स्टारमार्क ह्या रुलचा पालन करून आपुन त्येला इग्नोर करते हाय, तुला असा का बोलावा वाटला, तुझा अजेंडा काय हाय हे आपुन तुझ्या काँसीयांस वर सोडते, बीकॉज आय हॅव नो कंट्रोल ऑन इट ना सन, यु आर अ स्वीट बॉय गॉड ब्लेस यु हा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ह
हतोळकरांचा प्रसाद गुरुवार, 01/12/2017 - 12:30 नवीन
ह.ह.पु.वा. फेदरवेटसाहेब! छान रिप्लाय आहे. ते एवढा मनाला कशाला लावून घेते! जर लई मनाला लागला अशीन तर माझ्याकडून माफी, हाय काय आन नाय काय? बाकी तुमच्या त्या वरच्या पोस्टचा उद्देश समजायला फार काही तज्ज्ञ असावं लागत नाही. त्यामुळे तुमचं चालू द्या! बाकी ते मॅनरलेस, स्टारमार्क, काँसीयांस एकसे बढकर एक! मीबी ते वरच्या पोस्टमंदी काय अजेन्डा सांगायचं होता ते तुमच्या काँसीयांस वर सोडते आणि ऍग्री टू डिसऍग्री म्हणते! गॉड ब्लेस यु टू हा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फेदरवेट साहेब
फ
फेदरवेट साहेब गुरुवार, 01/12/2017 - 12:52 नवीन
ए तू पॉईंटला कांविनियंट डिटूर देते हाय रे, पॉईंट वर बोल नी, काय सुचला नाही का ह ह पु वा लिवने सोपे असले तरी इट्स अ साइन ऑ ल्युनसी यु नो, आय नो यु आर अ सेन पर्सन, तवा हिंमत जमा कर अने टू द पॉईंट बोल ने तू, आय थ्रो यु एन ओपन चॅलेंज फॉर डिबेट, इफ यु हॅव द गट्स टू टॉक पॉईंट्स अँड नॉट गेट पर्सनल, गॉड ब्लेस एव्हरीवन.... मनाला लावून घेण्याचा चिंता करू नको हा तू, आय हॅव स्पेसिफिकली मेन्शन डॅट अंतरजाल कम्स विथ अ स्टार मार्क, एकतर प्रश्न ईचारून उत्तर यायचा वाट पाहायचा नाही, स्वतःचा ट्रायल मांडून लोकाला बदनाम करायचा अने नंतर हाहापुवा लिवायचा, चिप मेंटलिटी. नाऊ आयदर यु अपोलोजाईज टू मी फॉर युवर लूज रिमार्क्स पर्सनली, ऑर आय वूड बी कंपेल्ड टू लॉज अ कंप्लेंट अगेन्स्ट यु थँक्स इन ऍडव्हान्स.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ह
हतोळकरांचा प्रसाद गुरुवार, 01/12/2017 - 13:17 नवीन
फेदरवेटसाहेब, वरच्या प्रतिसादात मागितलेली माफी तुम्ही बघितली नसेल असे ग्रुहित धरून हि घ्या अजून एक सपशेल माफी! एखाद्याला आपल्या बोलण्याचं वाईट वाटलेलं असेल तर आपल्याला माफी मागण्यात काहीच वाईट वाटत नाही! सो अनकंडिशनल अपोलोजि! आता कुठे काय पर्सनल वाटलं जे तुम्हाला बदनाम करणारं आहे ते सांगून टाका म्हणजे ते पटले तर परत एक अपॉलॉजी टाकायला वाईट नाही वाटणार मला! शिवाय संपादक मंडळींना सांगून ते उडवून पण टाकता येईल. तुम्हाला वरच्या प्रतिसादांत कुठे काही टू द पॉईंट वाटलं असेल किंवा नसेल तर त्याला रिप्लाय म्हणून तुमचा मुद्दा मांडा म्हणजे चर्चा होऊ शकेल (व्हायलाच पाहिजे असे काही नाही). अवांतर : मला वैयक्तिक वादविवाद यात अजिबात रस नसल्याने हा माझा अनकंडिशनल माफीनामा समजून तुम्ही पुढचा प्रतिसाद धाग्याच्या विषयाला धरून टाकलात तर तुमच्याबद्दलचा आदर वाढेल, कसे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फेदरवेट साहेब
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 01/12/2017 - 19:45 नवीन
तुमच्या स्टाईल आणि बेअरींगला सलाम ! ब्रिटीश सभ्यतेनं मस्त टोला हाणला आहे. ए तू पॉईंटला कांविनियंट डिटूर देते हाय रे, पॉईंट वर बोल नी, काय सुचला नाही का ह ह पु वा लिवने सोपे असले तरी इट्स अ साइन ऑफ ल्युनसी यु नो, हे निरिक्षण तर झकासंच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फेदरवेट साहेब
फ
फेदरवेट साहेब Fri, 01/13/2017 - 02:34 नवीन
साला आपुन (एक आय बारीक करून मिस्कील हसत) तुला एक सिक्रेट सांगू काय? आपुन इंडियन सिटीझन हाय, पर ब्रिटीस इंडियन हाय, साला कोन सुब्रह्मण्यम ने एलोरा बांधून culture मंदी कान्ट्रीब्युत केला इंडियाच्या तर कोनी योगी ने योगा मार्केटिंग केला, आपुन ब्रिटीस लोक्स काय दिला इंडियाला तर स्नॉबिश ऱ्हायचा कला दिला, साला घर मंदी खायला दाना नसला तरी चालल पर नाक हवेत फ्लोट करूनश्यानी पॅन्टच्या बिज्या पॉकेट मंदी हात घालत व्हीसल ब्लो करत चालता येने इज अ मस्ट हा भावसाहेब, आपुन प्रत्येका करता प्रे करते म्हणून आपुन कोणाचा लूज टॉक बी टोलरेट करीत नाय. सिम्पल गॉड ब्लेस यु टू भावसाहेब ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
साहेब.. Fri, 01/13/2017 - 03:53 नवीन
तुमच्या स्टाईल आणि बेअरींगला सलाम !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फेदरवेट साहेब
स
संजय क्षीरसागर Fri, 01/13/2017 - 07:01 नवीन
आपुन ब्रिटीस लोक्स काय दिला इंडियाला तर स्नॉबिश ऱ्हायचा कला दिला, साला घर मंदी खायला दाना नसला तरी चालल पर नाक हवेत फ्लोट करूनश्यानी पॅन्टच्या बिज्या पॉकेट मंदी हात घालत व्हीसल ब्लो करत चालता येने इज अ मस्ट हा भावसाहेब, आपुन प्रत्येका करता प्रे करते म्हणून आपुन कोणाचा लूज टॉक बी टोलरेट करीत नाय. सिम्पल मागचे जन्माला आपुन बी ब्रिटीस असला पायजे भावसाहेब. इकडचा पब्लिक इनम्रता इनम्रता म्हंते आनी एन वक्ताला शेपूट घालते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फेदरवेट साहेब
ह
हतोळकरांचा प्रसाद Sat, 01/14/2017 - 06:42 नवीन
ब्रिटीश सभ्यतेनं मस्त टोला हाणला आहे.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Wed, 01/11/2017 - 18:05 नवीन
इंडीयात गव्हर्नमेंटही कंपनी आहे आणि रिलायंस ती चालवते !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फेदरवेट साहेब
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 01/13/2017 - 02:01 नवीन
थत्तेसाहेबांचा स्वभावच फार विनोदी ! बर्‍याचदा ते असं करतात आणि लोकांना ते खरंच खरं आहे असं वाटतं =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
फ
फेदरवेट साहेब Fri, 01/13/2017 - 04:13 नवीन
चाचा भावसाहेब मौक्यावर चौका मारते नी, पर मंदीच नाईट वाचमन वानी इकेट फेकून देते कवा कवा हिट विकेट बी होऊनश्यानी जाते चाचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संदीप डांगे Fri, 01/13/2017 - 05:04 नवीन
संक्षिसर! बघा आता, 'आपल्या' सरकारच्या विरोधात एक साधा विनोद देखील पचत नै बॉ!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
ग
गामा पैलवान Wed, 01/11/2017 - 15:57 नवीन
संजय क्षीरसागर, १.
३ लाख कोटी डायरेक्ट चलनातूनच बाद होतील (ते बँकेत भरलेच जाणार नाहीत) ही सरकारची अपेक्षा पब्लीकनं फोल ठरवली आहे. तस्मात, प्रथम चरणात मुख्य उद्देश असफल झालायं.
ही अपेक्षा सरकारने कशाच्या आधारावर केली हे माहीत नाही. मात्र प्रथम चरणात अपेक्षाभंग झाला हे मान्य. म्हणूनंच पुढील चरणांत यशस्वी होण्याची वाढीव जबाबदारी शासनाला पेलावी लागणार आहे. २.
कॅश अ‍ॅवलेबिलीटी कमी होऊन (लेस-कॅश) महागाई कमी होईल असा सरकारचा दावा होता.
हा ही फसला आहे हे मान्य. ३.
जर १५ लाख कोटी जमा झाले तर तोही उद्देश फसला आहे किंवा खोट्या नोटा अपेक्षापेक्षा कमी होत्या असा निष्कर्श निघतो.
कसा काय? अधिकृत माहितीनुसार ५०० आणि १०००च्या नोटांचे १४.२ लक्षकोटी रुपये बाजारात विनिमयात होते. १५ लक्षकोटी ही रक्कम जास्त आहे म्हणजे खोट्या नोटा खपवल्या गेल्या आहेत, नाहीका? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Wed, 01/11/2017 - 17:43 नवीन
>>अधिकृत माहितीनुसार ५०० आणि १०००च्या नोटांचे १४.२ लक्षकोटी रुपये बाजारात विनिमयात होते. १५ लक्षकोटी ही रक्कम जास्त आहे १४.२ लाख कोटी हे सुरुवातीचे एस्टिमेट होते. जे मीडियाने आर बी आयच्या मार्च २०१६ च्या रिपोर्टवरून घेतले होते. नंतर स्टेट बँकेने सुधारित एस्टिमेट दिले होते. त्यात अडीच लाख कोटी परत येणार नाहीत असा अंदाज "अधिकृतपणे" व्यक्त झाला होता. http://economictimes.indiatimes.com/industry/banking/finance/rs-2-5-lakh-crore-wont-come-back-into-banking-system-sbi/articleshow/55756927.cms As per the SBI analysis, the market estimate of Rs 14.18 lakh crore currency -- excluding cash with banks -- is based on March 2016 data while in reality it should be based on data available as on November 9, a day after demonetisation was announced. SBI noted that going by data as on November 9, the amount of high currency denomination notes was Rs 15.44 lakh crore (excluding cash in the banks), an increase of Rs 1.26 lakh crore compared to the March figure.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
न
नितिन थत्ते Wed, 01/11/2017 - 17:47 नवीन
नोव्हेंबर मध्ये नोट बंदी झाल्यावर सहा (की दहा) महिन्यांपासून तयारी चालली होती असे सरकारतर्फे सांगण्यात आले. जर इतक्या आधीपासून नोटाबंदी करण्याचा प्लॅन असेल तर मार्च ते नोव्हेंबर या काळात रिझर्व बँकेने आणखी सव्वा लाख कोटी रुपयांच्या नोटा बाजारात का आणल्या हा प्रश्न उरतोच !! प्लॅनिंगवर आणखीच प्रश्नचिन्ह निर्माण करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
स
संदीप डांगे Wed, 01/11/2017 - 17:48 नवीन
पण एसबीआय हे आकडे अधिकृतपणे का देत आहे. हे तर आरबीआयने द्यायला हवे होते. कि आम्ही किती काळात किती छापल्या नोटा. हे नेमकं काय गौडबंगाल आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
स
संजय क्षीरसागर Wed, 01/11/2017 - 17:55 नवीन
इथे मूळ मुद्याला असे काही फाटे फोडणारं पब्लीक आहे की शेवटी विषय काय होता आणि प्रतिसाद काय चालू आहेत याची टोटल लागेनाशी होते. तुम्ही म्हणतायं : अधिकृत माहितीनुसार ५०० आणि १०००च्या नोटांचे १४.२ लक्षकोटी रुपये बाजारात विनिमयात होते. १५ लक्षकोटी ही रक्कम जास्त आहे म्हणजे खोट्या नोटा खपवल्या गेल्या आहेत, नाही का ? नक्की नोटा किती होत्या म्हणजे १४.२० लाख कोटी की १५.४० लाख कोटी यावर सगळी दरोमदार आहे. ब्लूमर्गच्या रिपोर्टनुसार खालील फिगर्स आहेत It has been reported that 97%[41][42][43] of the demonetised notes are back in banks and banks have received Rs 14.97 trillion ($220 billion) as of December 30 out of the 15.4 trillion rupees that were demonetised. This is against the government's initial estimate that 5 trillion rupees would not return to the banking system. The return of 97% of money back in bank have a negative impact on government's move against black money. लिंक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ह
हतोळकरांचा प्रसाद Wed, 01/11/2017 - 18:11 नवीन
इथे मूळ मुद्याला असे काही फाटे फोडणारं पब्लीक आहे...
बरं झालं हे लवकर लक्षात आलं ते. इथे नुसत्या प्रतिसादांची टोटल लागेना, आणि सरकारने भारतातल्या ढीगभर बँकांच्या नोटांची टोटल मात्र "साधी" वाटते, मौज आहे:):)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Wed, 01/11/2017 - 18:37 नवीन
चर्चा भरकटवल्यामुळे प्रतिसादाची टोटल लागत नाही, पक्षी नक्की काय चर्चा चालू आहे ते समजत नाही असा अर्थ आहे. सरकारने भारतातल्या ढीगभर बँकांच्या नोटांची टोटल मात्र "साधी" वाटते, मौज आहे हे फारच विद्वत्तापूर्ण विधान आहे. विषय नीट समजावून घ्या. ही टोटल रोजच्या रोज घेतली जात होती आणि बँका आरबीआयला रिपोर्ट करत होत्या . त्या आधारेच किती नव्या नोटा चलनात आणायच्या हे ठरत होतं. तस्मात संपूर्ण डेटा आरबीआयकडे आहे, नव्हे असायलाच हवा इतका कॉमनसेन्स कुणालाही असायला हरकत नाही. आता तुम्ही ज्या आकड्यावर नजर लावून बसला आहात तो डिक्लेअर न होण्यामागे आरबीआय `डबल काऊंटींग' हे कारण देते आहे. म्हणजे वास्तविकात जमा झालेल्या नोटा आणि बँकांनी रिपोर्ट केलेल्या फिगर्स टॅली करतायंत. हा शुद्ध टिपी आहे कारण बँकानी नोटा मोजूनच आरबीआयकडे पाठवल्या आहेत. आता आरबीआय पुन्हा काय घंटा मोजणार ? त्यात म्हणे खोट्या नोटा सापडतायंत का शोधतायंत! मग बँकानी काय डोळे झाकून नोटा घेतल्या काय ? बँका म्हणजे काय मार्केट यार्डचा बाजार आहे का? पोलीसकेसची भीती घालून खोट्या नोटा बँकांनी तिथल्या तिथे श्रेडरमधे घातल्या आहेत. आणि तुमच्या माहितीसाठी, हे पूर्वीपासूनच चालू होतं. निर्चनीकरणानंतर तर बँकानी आणखी दक्षता घेतली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ह
हतोळकरांचा प्रसाद गुरुवार, 01/12/2017 - 07:45 नवीन
म्हणजे वास्तविकात जमा झालेल्या नोटा आणि बँकांनी रिपोर्ट केलेल्या फिगर्स टॅली करतायंत. हा शुद्ध टिपी आहे कारण बँकानी नोटा मोजूनच आरबीआयकडे पाठवल्या आहेत..
हे फारच विद्वत्तापूर्ण विधान आहे. मुद्दा जरा समजून घ्यायचा प्रयत्न करा. अहो साध्या बँकेतून काढलेल्या किंवा एटीएममधून काढलेल्या दहा नोटा बँकेने/मशीनने मोजलेल्या असतानाही परत मोजल्या जातात. मग बँकांनी आरबीआयने लोकांना वाटायला दिलेल्या नोटांमध्ये घातलेल्या गोंधळलच्या पार्शवभूमीवर आरबीआय ने दररोज पाठवलेला डेटा (फक्त नंबर्स, नोटा नाही ), आता रोजच्या रोज येणाऱ्या नोटांशी टॅली करायचं ठरवलं तर त्यात चुकीचं काय? शिवाय, या येणाऱ्या नोटांची संख्या किती मोठी आहे हे एक तज्ज्ञ म्हणून तुम्हाला नक्कीच माहित असेल अशी अपेक्षा आहे. एवढ्या मोठ्या संख्येने येणाऱ्या नोटा आरबीआय ने डोळे झाकून बरोबर आहेत म्हणून बाजूला ठेवून द्याव्यात असे आपले म्हणणे आहे का? एवढ्या मोठ्या प्रमाणावर नव्या नोटा मागच्या दराने बाहेर काढत असल्याचे आरोप होत आहेत ते काय बँका काय मार्केट यार्डचासारखा बाजार आहेत म्हणून का? शिवाय खोट्या नोटांच्या बाबतीत बँकांनी काय करायला पाहिजे (जप्त करून आरबीआयने दिलेली प्रोसेस फॉल्लो करून जमा करणे) हे या खालील दोन लिंकांमध्ये दिले आहे. म्हणजे बँकांनी आरबीआयचे नियम धाब्यावर बसवून (अगदी डिमॉनेटायझेशनमध्ये सुद्धा) सापडलेल्या खोट्या नोटा श्रेडरमध्ये घातल्या असे आपले म्हणणे आहे तर! मग तर बँकांवर योग्य ती कारवाई करायला नको का? https://www.rbi.org.in/scripts/NotificationUser.aspx?Id=8989&Mode=0#1 http://www.firstpost.com/investing/what-banks-do-when-they-spot-a-fake-note-558582.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 01/12/2017 - 15:54 नवीन
वैचारिक क्लॅरिटी यायला हवी. मग तर बँकांवर योग्य ती कारवाई करायला नको का? याचं उत्तर तुमच्याच लिंकमधे आहे. If five or more fake notes are detected in a single transaction, the fake notes are forwarded to the local police station. But, that's not all. A first information report (FIR) is also filed for further investigation. हेच कारण सांगून, त्या नोटा परत चलनात जाऊ नयेत आणि बँकाना आणि कस्टमरला पुढची झंझट नको म्हणून बँकानी तो प्रॅक्टीकल उपाय शोधला आहे. एवढ्या मोठ्या संख्येने येणाऱ्या नोटा आरबीआय ने डोळे झाकून बरोबर आहेत म्हणून बाजूला ठेवून द्याव्यात असे आपले म्हणणे आहे का? म्हणजे आरबीआयकडे वेळोवेळी आलेल्या जुन्या नोटा न मोजताच नुसत्या ठेऊन घेतल्या होत्या की काय? आणि आत्ता मोजायला सुरुवात केलीये ? किती समजूत काढणार स्वतःची ? आता खरा प्रकार काय आहे तो अत्यंत बारकाईनं केलेल्या या आभ्यासात आहे While the RBI Is Silent, Its Numbers Tell Us Demonetisation Has Failed . आणि त्याचाही निष्कर्श नेमका मी म्हणतो तसाच आहे : Is the RBI waiting for the government to first work out what spin it wants to give to this otherwise deeply embarrassing picture, particularly given the severe pain that demonetisation has inflicted on the people? It’s hard to think of any other plausible explanation for the RBI’s reticence, because one thing that is certain is that it’s not possible that the RBI does not have the data or hasn’t been able to put it together. It’s silence on the figures, however, only serves to confirm what its own data indirectly reveals. This silence, which must be broken at some time, can therefore achieve very little other than damaging further the credibility of India’s central bank.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ह
हतोळकरांचा प्रसाद गुरुवार, 01/12/2017 - 16:18 नवीन
संक्षि, तेच तेच मुद्दे परत येत असल्याने, ऍग्री टु डिसऍग्री म्हणून माझा पास! तुम्ही वर टाकलेला रिपोर्ट वाचला, खूप जास्त टेक्निकल डेटा वाटल्याने समजला नाही. जमलं तर सोप्या भाषेत रूपांतरित करून इथे टाका म्हणजे थोडेफार समजेल माझ्यासारख्या सामान्य मिपाकरांना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 01/12/2017 - 16:45 नवीन
मुद्दा काहीही असला तरी `परत तेच तेच मुद्दे' म्हणायंच आणि काही सुचलं नाही की `निष्कर्श आधीच काढला आहे' म्हणायचं ! जमलं तर सोप्या भाषेत रूपांतरित करून इथे टाका म्हणजे थोडेफार समजेल माझ्यासारख्या सामान्य मिपाकरांना. सगळा लेख मराठीत मांडणं अशक्य आहे पण त्याचा मराठीत सारांश असा आहे : रिझर्व बँक बहुदा या शोचनीय स्थितीत सरकार काय पलटी मारतंय याची वाट बघते आहे कारण देशवासीयांनी निर्चलनीकरणाचा अतोनात त्रास सोसला आहे. रिझर्व बँकेच्या वेळ काढूपणाचा या वेगळा निष्कर्श काढणं अवघड आहे कारण रिझर्व बँकेकडे डेटा नाही किंवा त्यांना (अजून) त्याचं एकत्रिकरण करता येत नाही हे अशक्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ह
हतोळकरांचा प्रसाद गुरुवार, 01/12/2017 - 17:25 नवीन
संक्षि, १. मला काय येतं येत नाही हा धाग्याचा विषय नाही, त्यामुळे त्यावर माझा परत पास. २. सारांश तर तुम्ही आधीच्या प्रतिसादात टाकलाच आहे आणि तो तुमच्या मताशी साध्यर्म दाखवतो हेही लिहिलंय, माझी विनंती आकड्यांबाबत होती कारण ते खूप क्लिष्ट वाटत आहेत. तुम्ही त्या विषयाशी संबंधित आहात म्हणून तुम्हाला विनंती केली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
श
शब्दबम्बाळ Fri, 01/13/2017 - 10:16 नवीन
हि लिंक पहा. RBI ची आकडेवारी आहे. i) Currency in Circulation 16634.६(March -१६), 17974.६(४ नोव्हेंबर २०१६) (आकडे billion मध्ये) आता त्यातल्या ८६% या १००० आणि ५०० च्या नोटा म्हणजे १७९७४*८.६= १५४५७.६४ बिलियन, म्हणजेच १५.४५७ लाख कोटी! तरीपण ५०हजार कोटींचा ताळमेळ लागत नाहीत जर ब्लूमबर्ग चा रिपोर्ट खरा मानला (RBI च्या अनेक रिपोर्ट मध्ये ब्लूमबर्ग ची आकडेवारी वापरली जाते) तर हा एवढाच काळा पैसा बाद झाला मानता येईल!! आता अजून एक मला पडलेला प्रश्न RBI च्या नवीन रिपोर्ट नुसार 1.1.1 Notes in Circulation--->11,642.37 (Nov. 25)|| 9,576.75 (Dec. 9)|| 9,349.55 (Dec. 16) || 9,185.93(Dec25 ) || 9,137.63 (Dec. ३०) (आकडे बिलियन मध्ये) डिसेंबर ९ नंतर आकडेवारी मध्ये फारसा बदल दिसतच नाहीये. पण लोक तर नोटा बदलून घेतच होते. आता RBI च्या म्हणण्यानुसार १०डिसेंबर पर्यंत ४००० बिलियन च्या नवीन नोटा वितरित केल्या गेल्या होत्या. म्हणजे ९५७६-४०००=५५७६ billion जुन्या नोटा १० डिसेंबर ला सर्क्युलेशन मध्ये होत्या. त्यापैकी 86% नोटा मोठ्या किमतीच्या (१०००/५००)पकडू या म्हणजे ५५७६ *.८६ = ४७९५.३६ बिलियन म्हणजेच (४.७लाख कोटी ) १. नंतर किती नव्या नोटा छापल्या गेल्या यावर अजून अंदाज बांधता येतील पण डिसेंबर मध्ये आकडेवारीत फारसा बदल का दिसत नसावा? २. लेस कॅश्श/ कॅश लेस करायचे असेल तर इतक्या मोठ्या प्रमाणात नोटा परत व्यवहारात येणारच आहेत त्यामुळे पुन्हा पहिले पाढे.... हेच होण्याची शक्यता नाही का? ३. RBI ने नोव्हेंबर पर्यंत सगळ्या अर्थ व्यवस्थेचा Payment System Indicator दिलेला आहे पण त्यानंतर काहीही update दिलेली नाहीये असे का? हीच गोष्ट देशातील सगळ्या ATM च्या transaction च्या बाबतीत हि केली गेली आहे! कृपया लिंक पाहाव्यात. अभ्यासपूर्ण प्रतिसाद वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ओ
ओम शतानन्द गुरुवार, 01/12/2017 - 11:27 नवीन
copy paste from facebook S. Gurumurthi's Analysis of NoteBandi in simple Marathi गुरूमूर्ती यांचे नोटबंदीवरिल विचार अत्यंत सोप्या शब्दात १९९९ मधे सामान्य GDP च्या ९.४% रोकड जनतेकडे होती. यांत्रिकीकरण, संगणकीकरण, बँकिंग आणी डिजीटल व्यवहार, इंटरनेटचा वापराच वाढत प्रमाण लक्षात घेता, २००७-२००८ पर्यंत खर तर रोकड बाळगण्याचं प्रमाण कमी व्हायला हवं होतं. पण ते कमी नं होता, सामान्य GDP च्या १३% झालं ! त्यातही २००४ मधे ५००/१०० च्या जितक्या नोटा लोकांकडे होत्या (३४%) तेच प्रमाण २०१० मधे ७९% इतकं झालं. याचाच अर्थ कितीतरी रकमेच्या मोठ्या नोटा लोकांकडे कॅश स्वरूपात पडुन होत्या! स्रोत पुढील टेबल नीट बघा :- साल ===== ५००/१००० च्या नोटा २००४ ===== ३४% २०१० ===== ७९% ८ नोव्हेंबर २०१६ ===== ८७% म्हणजेच मोठ्या चलनी नोटांच्या संख्येत २००४ ते २०१० मधील सरासरी वाढ होत होती ५१%. तर २०१३-१४ मधे ६३%. रिझर्व बँकेने स्पष्ट केलंय कि १०००च्या दोन तृतीयांश (२/३) आणि ५००च्या एक तृतीयांश (१/३) नोटा छापल्यानंतर कधी बँकेत आल्याच नाहीत. अश्या नोटांचं एकूण मूल्य आहे ६ लाख करोड…! दुर्लक्षीत मोठ्या चलनी नोटांमुळे जमिनी आणि सोन्याचे दर वाढले, पैसा काळा झाला. हवाला मार्गे देशाबाहेरही गेला. हवाला मार्गे मुख्यतः भारताबाहेर गेलेला पैसा PARTICIPATORY NOTES म्हणुन पुन्हा शेअर बाजारात गुंतवला गेला. शेअर बाजारात परकीय गुंतवणुक या गोंडस नावाखाली. २००४ साली PARTICIPATORY NOTES होत्या ६८,००० कोटींच्या, तर २००७ मध्ये ३.८१ लाख करोड किंमतीच्या. हे आकडे भयभीत करणारे नाहीत काय? जमिनींची दरवाढ UPA साठी HIGH GROWTH कशी ठरली? अतिप्रचंड फुगलेले विक्रीमूल्य असलेल्या मालमत्तांची विक्री उत्पन्नामध्ये आणी मग GDP मध्ये जोडली गेली. समभाग विक्रीवर अत्यल्प security transaction tax मुळे या व्यवहारातील फायदाही GDP मधे मोजला गेला. अतिरीक्त पैशाने, अतिरीक्त-गैरवाजवी खर्चही वाढले. याचाच अर्थ मोठ्या चलनी नोटांच्या आधारे खोट्या संपत्तीला UPA ने HIGH GROWTH म्हणुन दाखवलं. बँकेबाहेर असलेल्या मोठ्या चालनी नोटा सोनं, शेअर्स आणि जमिनीत गुंतवला गेल्या. पण जर याच नोटा बँकिंग प्रणालीत आणल्या असत्या, तर लहान-लहान उद्योगांना अर्थपुरवठा झाला असता, खरीखुरी संपत्ती तयार झाली असती. व्याजदर आणि महागाई कमी झाली असती. ह्यामुळे निर्माण झाली – CATCH 22 परिस्थिती (ज्याला आपण मराठीत “इकडे आड तिकडे विहीर” असं म्हणतो.) जमिनींच्या भाववाढीमुळे रोजगार निर्मितीत शून्य वाढ झाली आणि हे तो पर्यंत सुरु राहील जोपर्यंत या दुर्लक्षित ५००/१००० च्या नोटा चलनात आहेत. २००४ नंतर ५००/१००० च्या नोटांच्या सततच्या वाढत्या संख्येच्या मागणीने मनमोहन सिंगांसारखा अर्थतज्ञ विचारात पडला नसेल, हे शक्य नाही. त्यांना अर्थवस्थेतील हे धोक्याचे संकेत नक्की मिळाले असणार. त्यांना हे थांबवणं शक्य होतं. ५००/१००० च्या चलनी नोटां ऐवजी, लहान किंमतीच्या नोटा बाजारात आणुन सामान्यांना दिलासा देता येऊ शकला असता. अर्थव्यवस्थेला फक्त short term danger झालं असतं. पण दुर्दैव. सिंगांच्या निर्विवाद निष्क्रियतेमुळे देशास CATCH 22 समोर जावं लागलं. या परिस्थितीत सत्तेवर आलेल्या मोदी सरकारकडे फक्त दोन पर्याय होते. १ – जे सुरु आहे, ते तसंच रेटत ठेवायचं…फसवी-खोटी वृद्धी खरी समजायची किंवा २ – तात्पुरती घट, पण कालांतराने रोजगार निर्मिती करणारी उपाययोजना आमलात आणायची. त्यांनी दुसरा पर्याय निवडला !!! जर अजुन ५-६ वर्ष ५००/१००० च्या नोटा चलनात ठेवल्या असत्या, तर कदाचीत कुठलंच सरकार त्यावीरुद्ध उपाययोजना करू शकलं नसतं. याचे अंतर्गत आणि बाह्य परिणाम अधिक धोकादायक ठरले असते. मोठ्या चलनी नोटांनी भ्रष्टाचार आणि दहशतवाद्यांना मदत होत होती हे सत्य नाकारण्याजोगे नाही. अर्थशास्त्राचा अंडर ग्राड्युएटही सांगेल की थोडा वेळ वेगाने पाळल्याने त्रास होतो…पण कालांतराने फायदाही! आताही थोडा वेळ त्रास होईल….पण प्रगतीतर थांबणार नाही. अर्थतज्ञ मनमोहन सिंगांनी प्रचंड गैरव्यवस्थापन केलेल्या अर्थव्यवस्थेचा अत्यंत महत्त्वाचा आणिप्रचंड मोठा गैरप्रकार मोदी दुरुस्त करू पहात आहेत. अपेक्षेप्रमाणे सिंगांनी अर्थतज्ञाच्या दृष्टिकोना ऐवजी त्यांची प्रतिमा मलीन करणाऱ्या “राजकीय नेत्याच्या” नजरेतुन त्यांचा लेख लिहीला असावा, असा विचार उगीच डोक्यात आला. म्हणूनच एस गुरुमुर्तींच्या लेखाचा सार मराठीत उपलब्ध करून द्यावासा वाटला. इ.स. 2000 मध्ये मी फ्लॅट घेतला फक्त 6 लाखामध्ये। आज त्याची किंमत झालीय 36 lakh रुपये। 2006 मध्ये मी सोनं खरेदी केलं साडे पाच हजार तोळे भावाने। आज त्याचा भाव आहे 27 हजार तोळा। जगतविख्यात अर्थतज्ञ म्हणून प्रसिद्ध असलेल्या तेव्हाच्या पंतप्रधान मनमोहन सिंग नावाच्या बेजबाबदार पंतप्रधानाने तेव्हाच जर आजच्या सारखी धडाकेबाज कामगिरी करून त्या कृत्रिम भाववाढीला वेळीच आळा घातला असता तर आज करोडो मध्यमवर्गीय मुंबई सोडून विरार आणि ठाण्याच्या पलीकडे राहायला गेले नसते। त्यांच्या पुढच्या पिढ्या पुन्हा मुंबईत राहायला केव्हाच येऊ शकणार नाहीत हि काळ्या दगडावरची रेघ आहे। तरीही कुठल्यातरी पक्षाचा झेंडा हातात घेऊन मोदींच्या भ्रष्टाचार विरोधी कार्यक्रमाला विरोध करून आपल्याच पोरांच्या पायावर धोंडा घालणाऱ्या गुलामांचे डोळे कधी तरी उघडणार आहेत कि नाही ? मनमोहन सिंग नावाच्या बेजबाबदार पंतप्रधानाच्या कर्तृत्वाची सजा आज देशातील सर्व शहरातील मध्यमवर्गीय भोगतो आहे। गेल्या 15 वर्षात असं काय घडलं कि ज्यामुळे रियल इस्टेटचे आणि सोन्याचे भाव गगनाला भिडले। अर्धे अधिक राजकारणी बिल्डर झाले। सगळा काळा पैसा अवघ्या 15 वर्षात रियल इस्टेट, सोनं आणि शेअर बाजारमध्ये गुंतवला गेला आणि हा महान अर्थशास्त्री मुकाट्याने मूग गिळून सगळं पहात राहिला। देशाच्या इतिहासात ताटाखालचं मांजर बनून राज्यकारभार करणाऱ्या मनमोहन सिंगनी येणाऱ्या असंख्य पिढ्यांचं भविष्य अंधकारमय करून टाकलंय। त्यांनी करून ठेवलेली घाण दूर करता करता नरेंद्र मोदींना नाकी नऊ येणार आहेत। जर मोदी पंतप्रधान झाले नसते तर हे असंच आणखी 70 वर्ष चाललं असतं। 70 वर्षात कोणीतरी देशाला शिस्त लावायलाच हवी होती। मोदींनी त्याची सुरुवात तर दणकेबाज केलीय आणि त्यांच्याकडील प्रचंड इच्छा शक्ती पहिली तर येत्या काळात देशात प्रचंड बदल घडून येईल याविषयी माझ्या मनात तरी यत्किंचितही शंका नाही। गेले 50 दिवस नोटबंदी मुळे मोदी अयशस्वी व्हावेत म्हणून देव पाण्यात बुडवून बसलेल्या मोदी विरोधकांचा येत्या काळात प्रचंड भ्रमनिरास होणार आहे। कारण देशातील 70% जनता कायम मोदींच्या पाठीशीच उभी राहिलीआहे।
  • Log in or register to post comments
व
विशुमित गुरुवार, 01/12/2017 - 12:05 नवीन
एस गुरुमूर्ती--स्वदेशी मुव्हमेंट --राष्ट्रीय स्वयंसेवक संघ--भाजप-- मोदीजी--नोटबंदी--समर्थक-- बाकी चालू द्यात जोरात... विठ्ठल विठ्ठल,, जय हरी विठ्ठल..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ओम शतानन्द
स
संदीप डांगे गुरुवार, 01/12/2017 - 13:06 नवीन
विशुमित... एस गुरुमूर्तिंसारख्या निष्पक्ष, निर्भिड, स्वतंत्र विचाराच्या विचारवंत व अधिकारी अर्थतज्ञांवर अशी टिका योग्य नाही. ते जे काही बोलतील ते ब्रह्मसत्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित गुरुवार, 01/12/2017 - 13:20 नवीन
<<<ते जे काही बोलतील ते ब्रह्मसत्य आहे.>>> -- कोणी ठरवलं ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
र
रामपुरी गुरुवार, 01/12/2017 - 15:23 नवीन
"एस गुरुमूर्ती--स्वदेशी मुव्हमेंट --राष्ट्रीय स्वयंसेवक संघ--भाजप-- मोदीजी--नोटबंदी--समर्थक" बेम्बट्या, 'काय' म्हटलंय या पेक्षा 'कुणी' म्हटलंय हे महत्वाचे. काय? हॅ हॅ हॅ हॅ चालू द्यात जोरात... विठ्ठल विठ्ठल,, जय हरी विठ्ठल..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
स
संदीप डांगे गुरुवार, 01/12/2017 - 16:31 नवीन
बेम्बट्या, 'काय' म्हटलंय या पेक्षा 'कुणी' म्हटलंय हे महत्वाचे. काय? हॅ हॅ हॅ हॅ >>> हो ना, आमचे आदरणीय सरांनीच म्हटले आहे, कोणाचंही मत विचारात घेतांना ते कुणी म्हटलं हे बघून घ्यावं, त्या व्यक्तीचं आधीचं वर्तन, कुठले संबंध, विचारसरणी, ते कोणाला पाठिंबा देतंय, भूतकाळात त्यांनी काय काय केलंय.... आणि त्या क्षेत्रातले इतर जाणकार काय म्हणतात ते. दोन महिने झालेत आता नोटाबंदी होऊन. पण काळापैसा ह्या विषयावर तज्ञ असलेल्या व त्या विषयावर एक पुस्तक लिहिलेल्या अरुण कुमार साहेबांचा इथे कोणीही रेफरन्स दिला नाही. मी पण जाणून बुजून दिला नाही. म्हटलं बघूयात तर आकडेवारी आणि अभ्यासासह मतं मांडणार्‍यांना कोणत्या आधारावर किंमत दिल्या जाते - ते मोदीविरोधक आहेत की समर्थक. आता खरोखरंच मलाही माहिती नाही अरुणकुमार २०१४ पूर्वी कोण होते काय होते कुणासोबत होते. त्यांची ही एक मुलाखतः http://www.caravanmagazine.in/vantage/demonetisation-arun-kumar-economist-black-money
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामपुरी
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 01/12/2017 - 16:23 नवीन
तुमच्या प्रदीर्घ प्रतिसादाचा सारांश असा आहे : बँकेबाहेर असलेल्या मोठ्या चालनी नोटा सोनं, शेअर्स आणि जमिनीत गुंतवला गेल्या. पण जर याच नोटा बँकिंग प्रणालीत आणल्या असत्या, तर लहान-लहान उद्योगांना अर्थपुरवठा झाला असता, खरीखुरी संपत्ती तयार झाली असती. व्याजदर आणि महागाई कमी झाली असती.५००/१००० च्या चलनी नोटां ऐवजी, लहान किंमतीच्या नोटा बाजारात आणुन सामान्यांना दिलासा देता येऊ शकला असता. मोदींनी त्याची सुरुवात तर दणकेबाज केलीय आणि त्यांच्याकडील प्रचंड इच्छा शक्ती पहिली तर येत्या काळात देशात प्रचंड बदल घडून येईल याविषयी माझ्या मनात तरी यत्किंचितही शंका नाही आता तर ९७% नोटा बँकेत भरल्या गेल्या आहेत मग सरकारनं (तुमच्या भाषेत मोदींनी) आनंदोत्सवच करायला हवा होता. पण सरकार (म्हणजे जेटली) तर आरबीआयच्या फिगर्स येऊ द्या, मला नक्की आकडा माहित नाही असं म्हणतंय. या हिशेबानं जर सगळ्याच्या सगळ्या नोटा बँकेत आल्या असत्या तर निर्चलनीकरण १००% यशस्वी झालं असा अर्थ झाला असता की नाही ? मग सरकार (पक्षी मोदी) का गप्प बसलेत ? यावर तुम्ही प्रकाश पाडाल का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ओम शतानन्द
म
मार्मिक गोडसे गुरुवार, 01/12/2017 - 12:59 नवीन
2006 मध्ये मी सोनं खरेदी केलं साडे पाच हजार तोळे भावाने। आज त्याचा भाव आहे 27 हजार तोळा। २००६ साली सोन्याचा सरासरी भाव ८४०० असताना ५५०० भावाने सोने मिळाले असेल तर तुम्ही त्या सरकारचे आभार मानायला हवे. सोन्याचा जागतीक बाजारपेठेतील भाव, डॉलर-रुपया विनिमय दर हे आपल्या सरकारच्या हातात असतात का?
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे गुरुवार, 01/12/2017 - 13:02 नवीन
सरासरी भाव ८४०० लिंक
  • Log in or register to post comments
प
पैसा Sat, 01/14/2017 - 06:32 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद Sat, 01/14/2017 - 07:28 नवीन
मकरसंक्रांतीच्या तुम्हालाही हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
स
संजय क्षीरसागर Sat, 01/14/2017 - 08:16 नवीन
कॉस्ट ऑफ कॅशलेस वरचं माझं (आणि इतर बरयाच सन्माननीय सदस्यांचं) मत कार्ड पेमेंटस धाग्यावर आलंच होतं, ते इथे परत चर्चिण्याची आवश्यकता वाटत नाही. तुम्हाला त्या धाग्याला परत भेट द्यायची असेल तर अवश्य द्या प्रायवेट बँकात खाती उघडून चार्जेस वाचवा असल्या भोंगळ सल्या व्यतिरिक्त काहीही निष्पन्न झालेलं नाही. तुम्ही परत धागा काढून नीट वाचा. कारण जिथे सरकारलाच मार्ग दिसत नाही तिथे इथले सदस्य काय करणार ? आणि इतकं असून तुम्हाला काही नामी शक्कल सुचली असेल तर इथे सांगा, जाहीर आभार मानले जातील. चर्चा ऑलरेडी झालीये करुन मुद्याला बगल मारु नका. हि कॉस्ट नसावीच याबद्दल कोणाचं दुमत असण्याची गरज नाही. पण नुकतीच कॅशलेसला सुरुवात झाली नाही तोपर्यंत दिलं तर सगळं परिपूर्ण द्या नाहीतर तुम्हाला काही करायचेच नाही हे मान्य करा हे तर्कट अजब वाटतं. जिथे कार्ड चार्जेस नाहीत तिथे कोणताही दत्तू कार्डच वापरतो त्यामुळे कुणी काहीच करत नाही हा भ्रम सोडा. आणि हे फार पूर्वापार चालू आहे. जिथे चार्जेस आहेत तिथे कॅशलेस करायला सरकार काय करणारे हा तुम्हाला प्रश्न आहे. ते चार्जेस मर्चन्टला किंवा बँकेला सहन करावे लागतातच ना वगैरे निराशावाद दाखवून कॅशलेसला विरोध मी तरी करणार नाही. हे तुफान विनोदी आहे. चार्जेस कुणी बेअर केले याचा जनतेला काही फरक पडत नाही. आणि सध्या जिथे बँक किंवा मर्चंट ते बेअर करतात त्या सेवा कॉस्टलेस आहेत इतकाच मुद्दा मी मांडला होता. त्याला निराशावाद वगैरे भानगड तुम्ही जोडली आहे. तो ही गैरसमज काढा. शेवटचा प्रतिसाद आपला म्हणजे आपण विजयी असे अजिबात नाही हे मत मलाही पूर्णपणे पटलेले आहे. ही मुद्दे संपल्यामुळे मनाची काढलेली समजूत असावी . कसला आलायं विजय ? तो दृष्टीकोनच चुकीचा आहे. एकतर तुमच्याकडे उत्तर आहे किंवा नाही. कॅशलेस कॉस्टलेस करण्यासाठी सरकारनं काय पावलं उचललीयेत ? आणि कॉस्टलेस पर्याय उपलब्ध झाल्याशिवाय कॅशलेस प्रमोट होणार नाही याचा तुम्ही काय प्रतिवाद करणार ? तुम्हाला २०१९ पर्यंत वाट बघायची तर बघा पण त्याचा अर्थ इतकाच की सध्या तुमच्याकडे काहीही उत्तर नाही.
  • Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद Sat, 01/14/2017 - 09:52 नवीन
तुमचा ऍग्री टू डिसऍग्री वर विश्वास नसेल, माझा आहे. कारण प्रतिसादावर प्रतिसाद पाडून एकापाठोपाठ गाझापट्ट्या तयार करण्याचं कौशल्य माझ्या-तुमच्यासकट बऱ्याच सदस्यांमध्ये आहे हे उघड आहे. पण शेवटी विचारसरणीचा फरक असतो. उत्तर आहे कि नाही पेक्षा टाकलेल्या प्रतिसादातील एकातरी भागावर प्रत्युत्तर टाकता येईल का ते बघायचं आणि बाकीचे मुद्दे सोडून तेवढाच प्रतिवाद करायचा एवढं सोपं आहे ते. त्यामुळे माझ्याकडे उत्तर नाही वगैरे सोयीस्कर अर्थ काढायला तुम्ही मोकळेच आहात की! आपल्यापेक्षा दुसऱ्याचे विचार वेगळे असू शकतात आणि सगळेच प्रश्न उत्तरात बसणार नाही हे पटत असेल तर खालचा प्रतिसाद वाचा. नसेल तर माझ्याकडे उत्तर नाही हा (सोयीस्कर) अर्थ काढून हा आणि खालचा प्रतिसाद फाट्यावर मारलात तरी चालेल, कसे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
ह
हतोळकरांचा प्रसाद Sat, 01/14/2017 - 10:00 नवीन
समोरच्याकडे मुद्दे नाहीत, माहिती नाही, काही समजत नाही हे आधीपासूनच ठरवलं कि शेवटी "उत्तर नाहीये म्हणून सांगा ना" हा एक प्रतिसाद अपेक्षितच असतो. तुमचे बहुतेक सगळे प्रतिसाद "सरकार काहीच करणारच नाहीये" ह्या एका ठाम विश्वासावर आधारित आहेत. त्यामुळे त्याभोवती गुंफलेला सरकार काय करणार आहे हा प्रश्न अत्यंत असंबद्ध आहे. मी काही सरकारचा प्रवक्ता नाहीये. सरकारने कॅशलेस होण्यासाठी कॉस्टलेस व्हावं हे तुम्ही मान्य करता आणि मीही. फरक हा आहे कि त्यासाठी सरकारला वेळ द्यायला पाहिजे हा माझा मुद्दा आणि हे सरकार ते करेल हा माझा आशावाद तर "ते सरकारने आताच का केले नाही किंवा आतापर्यन्त का केला नाही हा तुमचा मुद्दा आणि हे सरकार ते काही करणारच नाही हा तुमचा विश्वास". हा फक्त विचारसरणीचा फरक आहे. आता राहता राहिला मुद्दा चार्जेस चा - प्रायव्हेट बँकांमध्ये खाते उघडू नयेत असा सल्ला आपण एक तज्ज्ञ म्हणून देत आहात का? आणि नामी शक्कल वगैरेची गरज नाही. तो धागा उघडून वाचा परत! अनेक लोकांनी सांगितलेले आहे कि त्यांच्या कार्ड्स वर कुठेलेही चार्जेस लागत नाहीत. त्यावर तुमचे म्हणणे होते की, चार्जेस लागतातच फक्त ते इतर कोणीतरी सहन करतं! म्हणजे जर मला लागत नसतील तर माझ्या खिशाला चाट लावून वगैरे मुद्दे बाजूला पडतात. परत तुम्ही म्हणत आहात कि हे चार्जेस म्हणजे सरकारचा मलिदा आहे. एक तज्ज्ञ म्हणून हे तुम्हाला पटते? हा मलिदा सरकार नावाच्या माणसाच्या खिशात जातो का? हाच हिशेब लावून उत्पन्नकर पण मलिदाच आहे का मग? तुम्ही परत म्हणालात की चार्जेस मधून सरकारला येणार उत्पन्नही मजबूत आहे. मग हे मजबूत उत्पन्न सरकारने बाजूला सरायचं ठरवलं तर त्याचा विचार बजेटमध्ये व्हावा कि आता लगेच व्हावा. त्यामुळे मी वर म्हटलंच कि बजेटमध्ये कॅशलेसला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार काय करेल ते पाहू. शिवाय कॅशलेस व्यवहारांसाठी भीम सारखे अँप आणले आहेच कि ज्यात चार्जेस लागत नाहीत (शिवाय ते पुढेही लागूच नयेत यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचे ऐकिवात आहे). गेली दोन वर्षे जास्तीत जास्त लोकांकडे बँक अकाउंट आणि कार्ड असावे यासाठी सरकारने प्रयत्न केले नाहीत का? आणि यापुढेही ते करणार नाहीत का? त्यामुळे सरकार एक एक पावले उचलेल असे माझे मत आहे. सरकार हे फक्त दाखवण्यासाठी करत आहे हे मला पटत नाही. दाखवायसाठी असला काही न करता ६० वर्षे सरकार टिकवता येतं हे सिद्धच आहे की!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Sat, 01/14/2017 - 10:20 नवीन
सरकारने कॅशलेस होण्यासाठी कॉस्टलेस व्हावं हे तुम्ही मान्य करता आणि मीही.....हा फक्त विचारसरणीचा फरक आहे. सहमत. अनेक लोकांनी सांगितलेले आहे कि त्यांच्या कार्ड्स वर कुठेलेही चार्जेस लागत नाहीत. त्यावर तुमचे म्हणणे होते की, चार्जेस लागतातच फक्त ते इतर कोणीतरी सहन करतं! अर्थात ! नाही तर चार्जेस कुठे अदृश्य होतात ? म्हणजे जर मला लागत नसतील तर माझ्या खिशाला चाट लावून वगैरे मुद्दे बाजूला पडतात. असं कसं ? कस्टमरला पडले नाहीत म्हणजे झालं हा माझा पहिल्यापासून स्टँड आहे. हाच हिशेब लावून उत्पन्नकर पण मलिदाच आहे का मग? मलीदा शब्द पटला नसेल तर उत्पन्न म्हणू. बजेटमध्ये कॅशलेसला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार काय करेल ते पाहू २०१९ च्या वाद्यापेक्षा हे योग्य आहे. शिवाय कॅशलेस व्यवहारांसाठी भीम सारखे अँप आणले आहेच कि ज्यात चार्जेस लागत नाहीत सगळ्या इंटरनेट एनेबल्ड सर्विसेसला डेटा चार्जेस लागतात आणि एकूण हिशेब तोच होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
स
संदीप डांगे Sat, 01/14/2017 - 08:39 नवीन
हातोळकर, आपला फार गोंधळ होत आहे. सरकारवर टिका किंवा सरकारची भलामण हे दोन्ही मुद्दे मुळासकट दुर्लक्षून फक्त अर्थव्यवहार ह्या मुद्द्यावर विचार करुन बघा. कसंही करुन प्रसंगी खिशाला चोट लावून कॅशलेस यशस्वी करुच असा बाणा धरुन उपयोग नाही. बाजाराला देशभक्ती माहित नसते हे चिरंतन सत्य लक्षात ठेवा. व्यवहार करतांना लोक फक्त स्वतःचा फायदा बघतात. वेगवेगळ्या बॅन्कांच्या कॅशलेस सुविधांच्या चार्जेसबद्दल (कोणीही बेअर करेना का) माहिती घ्या.
  • Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद Sat, 01/14/2017 - 09:16 नवीन
ओक्के! आपल्या सल्ल्याबद्दल धन्यवाद!
सरकारवर टिका किंवा सरकारची भलामण हे दोन्ही मुद्दे मुळासकट दुर्लक्षून
हे बाकी बरोबर बोलतात! आपणही हेच लक्षात ठेवा! म्हणजे माझ्याइतका गोंधळ आपला होणार नाही , काय म्हणता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
न
नितिन थत्ते Sat, 01/14/2017 - 09:14 नवीन
आताच एका फर्निशिंगच्या दुकानात गेलो होतो. तिथे कस्टमर जोडपे आणि दुकानदार यांच्यात बिलावरून बोलणी चालू होती. बिल घेतले नाही तर सोफ्याची गॅरंटी मिळणार नाही या भीतीने ते बिल घेणार होते. दुकानदाराने कच्चे बिल घेऊन आलात तरी गॅरंटी आहे असे सांगितल्यावर त्या जोडप्याने लगेच विदाउट बिल खरेदीचा निर्णय घेतला.
  • Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद Sat, 01/14/2017 - 09:18 नवीन
घ्या! आणि आम्ही योजना फेल झाली कि सरकारला दोष देतो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
स
संदीप डांगे Sat, 01/14/2017 - 09:35 नवीन
सत्तर वर्षांच्या घाणीसाठी आपण कुणाला दोष देतो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ह
हतोळकरांचा प्रसाद Sat, 01/14/2017 - 10:21 नवीन
मी तरी अशा योजना न आणणाऱ्या सरकारला आणि आणल्या तर त्या मातीत घालण्याचं काम करणाऱ्या "सर्वसामान्य" जनतेला देतो. तुमचं काही वेगळं मत आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Sat, 01/14/2017 - 10:50 नवीन
माझं काही मत नाही हो! मी फक्त निरीक्षण करतो , तसेही, माझा जन्म 2014 नंतर नाही झाला! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ह
हतोळकरांचा प्रसाद Sat, 01/14/2017 - 11:33 नवीन
ओके! मंग बरुबरंय तुमचं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा