नोटाबंदी : एक अपरिपक्व निर्णय.
बनावट नोटा , दहशतवाद आणि काळा पैसा नष्ट करणे हा नोटाबंदीचा मुख्य उद्देश होता, तो कितपत यशस्वी झाला हे थोड्याच दिवसात कळेल. परंतू, नोटाबंदी हा ह्यावर कायमस्वरूपी इलाज असूच शकत नाही हे सरकारलाही माहीत असताना असा अचानक नोटाबंदीचा निर्णय पंतप्रधानांनी का घेतला असावा?
पंतप्रधानांनी निवडणुक प्रचारादरम्यान स्विस बँकेतील भारतीयांचा काळा पैसा देशात आणू हे आश्वासन दिले होते, सत्तेत येऊन दोन वर्ष झाली तरी एक फुटकी कवडीही आपण आणू शकलो नाही ह्याची सल त्यांना लागून होती. दरम्यान पंतप्रधानांनी मिपावरील माझा हा लेख वाचला असावा, हे काम सोपे नाही हेही त्याना कळून चुकले. लगेचच त्यांनी आपला मोर्चा देशातील काळ्या पैशाकडे वळवला. सरकारी यंत्रणा कमीतकमी वापरून लवकरात लवकर हा काळा पैसा कसा नष्ट करता येईल ह्याबद्दल त्यांनी काही अर्थचक्रमांचे सल्ले घेतले. अधिक मुल्याच्या नोटा रद्द करण्याचा सल्ला त्यांना पटला. हा निर्णय घेताना गुप्तता पाळण्याची अट स्वतःवर लादून घेतली आणि ५०० व १००० च्या जुन्या नोटा रद्द करून २००० ची नवीन नोट चलनात आणून अडचणींच्या खाईत जाणारा 'बायपास' काढला. ८ नोव्हेंबरला नोटाबंदीची घोषणा केल्यानंतर पुढील ५० दिवसात सरकारच्या अपरिपक्व निर्णयाचे दुष्परिणाम दिसू लागले. ५० दिवस सामान्य जनतेचे रोकड टंचाईमुळे हाल झाले. जि.म. बँकांना नोटाबदलीला बंदी व नवीन चलपुरवठा न केल्याने ग्रामीण अर्थव्यवस्था पुर्णपणे कोलमडून गेली. मुळात नोटाबंदीचा निर्णय घेताना पंतप्रधानांनी ग्रामीण भागाचा विचार केलाच नाही. पंतप्रधानांच्या एका अपरिपक्व निर्णयामुळे ग्रामीण जनतेचे झालेले नुकसान भरून निघणे अशक्य आहे.
कुठेही कोणाला काही त्रास नाही सांगतांना कोणता एजेंडा दिसतो मग?मिपावर किंवा अन्य कोठे, कोण म्हणाले आहे की "कुठेही कोणाला काही त्रास नाही..?" लिंका द्या. नेहमी खोटे बोलून बोलून कंटाळा कसा येत नाही हो तुम्हाला..?कुठेही कोणाला काही त्रास नाही सांगतांना कोणता एजेंडा दिसतो मग?हे 'सामान्य निरिक्षण विधान' हे वाचून ह ह पु वा. इतका शब्दच्छल करण्यापेक्षा "कुठेही कोणाला काही त्रास नाही" हे कोणी सांगितले आहे सांगा की.जसं "विरोधक खोटे बोलतायत, दिशाभूल करतायत, राईचा पर्वत करतायत" अशा विधानांचा अर्थ "कुठेही कोणाला त्रास नाही" असा निघतो.हा अर्थ कुठल्या डिक्शनरीत मिळाला..? इटालियन डिक्शनरी असेल तर बरोबरच असेल. तुमची मजबुरी समजू शकतो.ह्याच धाग्यावर दोन-तीन जणांनी ह्या अर्थाचे प्रतिसाद दिले आहेत. तुम्हाला तर काविळ नाहीना, मग तुम्हाला ते का दिसले नाहीत?तुम्ही तुमच्यापुरते बोला हो. तुम्ही या धाग्यावर मत मांडणार्या सगळ्या आयडींचे प्रतिनिधीत्व करता का..? त्यांनी आतापर्यंत केलेल्या सर्व विधानांची जबाबदारी घेता का..? जबाबदारी घेत असला तर असले युक्तीवाद करा नाहीतर असले घोळक्यात लपायचे उद्योग करू नका.एक लक्षात ठेवा. जगातल्या प्रत्येक गोष्टीची नोंद आंतरजालावर होत नसते. आणि आंतरजालावर झालेली प्रत्येक नोंद खरी नसते. तसेच आंतरजालावर आली म्हणजेच घटना घडली असे समजायचे नसते. एवढे साधे ज्ञान तरी जालावर वावरणार्यांना असायला हवे.आंतर्जालावर दिशाभूल करून वातावरण खराब करणार्या आयडींचा प्रतिवाद होतोच होतो. आपण दुसर्यावर प्रछन्न आरोप केले तर आपल्यावरही तसेच आरोप होतील याचेही भान आणि ज्ञान तुम्हाला असेलच. नसेल तर नवीन गोष्ट शिकत आहात असे समजा.मी नोटाबंदीबद्दल विरोधी मत व्यक्त करतो एवड्यासाठी ट्रोलींग करुन मला बदनाम करण्याचे घाट घातले जात आहेत.ट्रोलिंगचा तुमच्या डिक्शनरीमधला अर्थ सांगा बघू. तुमच्या सतत खोटे बोलण्याला उघडे पाडले जाणे म्हणजे ट्रोलिंग असे असेल तर बरोबर अर्थ आहे. फक्त ती इटालियन डिक्शनरी बाजुला ठेवून खरा अर्थ समजुन घ्या. तसेच तुमच्यासाठी ट्रोलिंगचा घाट घालावा इतकेही स्वतःला महत्वाचे वगैरे समजुन नका. "मी खोटे बोलतो आणि डुआयडी पण खोटे बोलतात मग फक्त मलाच का झोडता..?" छाप रडारड जुनी झाली आता.