नोटाबंदी : एक अपरिपक्व निर्णय.
बनावट नोटा , दहशतवाद आणि काळा पैसा नष्ट करणे हा नोटाबंदीचा मुख्य उद्देश होता, तो कितपत यशस्वी झाला हे थोड्याच दिवसात कळेल. परंतू, नोटाबंदी हा ह्यावर कायमस्वरूपी इलाज असूच शकत नाही हे सरकारलाही माहीत असताना असा अचानक नोटाबंदीचा निर्णय पंतप्रधानांनी का घेतला असावा?
पंतप्रधानांनी निवडणुक प्रचारादरम्यान स्विस बँकेतील भारतीयांचा काळा पैसा देशात आणू हे आश्वासन दिले होते, सत्तेत येऊन दोन वर्ष झाली तरी एक फुटकी कवडीही आपण आणू शकलो नाही ह्याची सल त्यांना लागून होती. दरम्यान पंतप्रधानांनी मिपावरील माझा हा लेख वाचला असावा, हे काम सोपे नाही हेही त्याना कळून चुकले. लगेचच त्यांनी आपला मोर्चा देशातील काळ्या पैशाकडे वळवला. सरकारी यंत्रणा कमीतकमी वापरून लवकरात लवकर हा काळा पैसा कसा नष्ट करता येईल ह्याबद्दल त्यांनी काही अर्थचक्रमांचे सल्ले घेतले. अधिक मुल्याच्या नोटा रद्द करण्याचा सल्ला त्यांना पटला. हा निर्णय घेताना गुप्तता पाळण्याची अट स्वतःवर लादून घेतली आणि ५०० व १००० च्या जुन्या नोटा रद्द करून २००० ची नवीन नोट चलनात आणून अडचणींच्या खाईत जाणारा 'बायपास' काढला. ८ नोव्हेंबरला नोटाबंदीची घोषणा केल्यानंतर पुढील ५० दिवसात सरकारच्या अपरिपक्व निर्णयाचे दुष्परिणाम दिसू लागले. ५० दिवस सामान्य जनतेचे रोकड टंचाईमुळे हाल झाले. जि.म. बँकांना नोटाबदलीला बंदी व नवीन चलपुरवठा न केल्याने ग्रामीण अर्थव्यवस्था पुर्णपणे कोलमडून गेली. मुळात नोटाबंदीचा निर्णय घेताना पंतप्रधानांनी ग्रामीण भागाचा विचार केलाच नाही. पंतप्रधानांच्या एका अपरिपक्व निर्णयामुळे ग्रामीण जनतेचे झालेले नुकसान भरून निघणे अशक्य आहे.
माझ्या मते बँकेतला पैसा नामसंमत असल्याने जरी बेहिशेबी असला तरी त्याचा मालकाची गचांडी धरता येईल.अर्थात, आणि असे ३ ते ४ लाख कोटी सापडल्याची शक्यता आहे अशी बातमी आजच मटाला आहे. लिंक पण ही नुसती शक्यता आहे आणि असे २० लाख अकाऊंटस आहेत. सो वन कॅन इमॅजीन दि टास्क. जर खरंच हा कार्यक्रम यशस्वी झाला तर इथे सरकारचं अभिनंदन करणारा मी पहिला असेन.५ लक्षकोटी रुपये चलनातनं बाद का व्हायला हवे होते?ज्या पद्धतीनं दहशत निर्माण केली गेली त्यावरनं सरकारची अपेक्षा `बँकेत पैसे न भरता, परस्पर चलनातून बाद होतील अशीच होती' . थोडक्यात, ब्लॅकमनी बँकेत भरायची हिंमत कुणी करणार नाही कारण टॅक्सच्या २००% दंडाची नवी तरतूद सरकारनं केली आहे. त्यामुळे पब्लीकनं काहीही विचार न करता राजरोसपणे सर्व ब्लॅकमनी बँकेत भरला असण्याची शक्यता कमी. आता या बॅकग्राऊंडवरमला एक सांगा की जर सगळा १५ लक्षकोटी रुपये परत बँकेत आले तर नोटाबंदी फसली कशी काय?जर लोक एक्सप्लनेशन देऊ शकले किंवा रकमा २.५० लाखाच्या आत असतील (कारण पैसे ब्लॅक असो की व्हाइट तेवढं एक्झेम्पशन आहेच) तर २० लाख अकाऊंटस तपासून हाती काही लागणार नाही. माझं म्हणणं पुन्हा एकदा सांगतो, ३ लाख कोटी डायरेक्ट चलनातूनच बाद होतील (ते बँकेत भरलेच जाणार नाहीत) ही सरकारची अपेक्षा पब्लीकनं फोल ठरवली आहे. तस्मात,प्रथम चरणातमुख्य उद्देश असफल झालायं. जर हेच ३/४ लाख कोटी बँकेत पकडण्यात सरकार यशस्वी झालं तर मोहीम यशस्वी झाली असा अर्थ होईल. पण ते द्वितीय चरणात असेल. आणि पब्लीकचं साहस बघता ती शक्यता कितपत आहे याविषयी साशंकता आहे.Food inflation was 2.11 percent last month, lower than October's 3.32 percent.असली हायटेक आणि निरुपयोगी माहिती आहे. खरे भाव किराणामालाच्या दुकानात पाहा : तूर डाळ १३०, शेंगदाणे १००, शेंगदाणा तेल १५०, साखर, गहू, तांदूळ भाव जैसे थे. भाज्या (मटार सोडता) साधारण ४० रुपये. रियल इस्टेटमधे नक्की कुठे आणि एक्झॅक्ट किती भाव कमी आलेत ते नक्की कळवा.नोटाबंदीचं जस्टिफिकेशन म्हणून या खोट्या नोटा खूप जास्त आहेत अशी कुजबुज पसरवली गेली होती.येस. पण मी गामांच्या प्रतिसादाला उत्तर दिलंय. गामा म्हणतात त्याप्रमाणे सर्वच्या सर्व नोटा जमा झाल्या तर खोट्या नोटा बाद करण्याचा उद्देश फसला असा अर्थ निघेल कारण बँकानी स्वीकरतांना फक्त वॅलीड नोटाच घेतल्या आहेत.रिलायन्सफ्रेशवाल्याना विचारलं का असं का ते? विचारलं असतं तर तो रिलायन्सचा निर्णय आहे की त्या आऊटलेटचा निर्णय हे तरी कळले असते.कंपनीच्या आदेशाशिवाय एखादं आऊटलेट स्वतःचा असा परस्पर असा निर्णय घेऊ शकतं का , हे प्रथम तुम्ही स्वतःला विचारून पाहिलं का ?अर्ध्या माहितीवर डायरेक्ट सरकारवर टिका करण्याची मजा का गमवाजर सरकार कॅशलेस प्रमोशन करतंय तर रिलायंस सरकारी धोरणाला हरताळ कसं फासू शकतं असा त्यांचा प्रश्न आहे.पण असो, अर्ध्या माहितीवर डायरेक्ट सरकारवर टिका करण्याची मजा का गमवाकंपनीच्या धोरणाशिवाय कोणतंही आऊटलेट स्वतः परस्पर असा निर्णय घेऊ शकत नाही. ब्रांच मॅनेजर या पोस्टला ती ऑथॉरिटीच नाही हे सामन्यज्ञान आहे.रिलायन्स जिओ ने रिलायन्स फ्रेश मध्ये दोनच व्यवहार करू देण्याने कॅशलेसला कसा काय हरताळ फासला जातो तेही सांगा जमलं तर!तुम्ही जमलं तर समजावून घ्या. दोन व्यावहाराची मर्यादा आणि कॅशलेस इकॉनॉमीसाठी अशी कोणतीही मर्यादा नसणं यातला फरक समजेल अशी किमान अपेक्षा आहे.Valid from 19th November 2016 till 08th January 2017कारण सध्या डिस्काऊंट ही नाही आणि वरती ही दोन व्यावहारांची मर्यादा आहे."भारत कॅशलेसकडे हळूहळू का होईना पुढे जातोय" हा माझा निष्कर्ष/आशावाद सोडून द्यावा हा अट्टाहास का बरे? ....शिवाय ते सरकारच्या अपुऱ्या प्रयत्नांमुळे घडले कि लोकांना ते नको होते म्हणून घडले हे त्यावेळच्या परिस्थितीवर ठरवेन की!.....याला काही आधार?कारण कॅशलेसला कॉस्ट आहे आणि सरकारनं ती शून्य करण्याऐवजी लॉटरीचा खेळ चालू केला आहे. साधी गोष्ट आहे, जर पेट्रोलसारख्या नित्यनियमित गरजेला, कधीही वाढत असलेल्या किंमतीखेरीज, पुन्हा वर २.२०% कार्डचार्ज द्यावा लागला तरमोदीसुद्धा, स्वतःच्या पैश्यानी भरायची वेळ येईल तेव्हा कॅशच देतील.मग कसली आलीये घंटा कॅशलेस इकॉनॉमी ?सरकार कॅशलेसला साहाय्यभूत ठरणारे सगळे निर्णय एकाच दिवसात जाहीर करून टाकेल असे मलातरी वाटत नाही. येत्या बजेटमध्ये या मुद्द्यावर सरकार काय करते यातून सरकारचे कॅशलेस धोरण जास्त स्पष्ट होईल असे मला वाटते.कार्ड चार्जेस आणि नेट बँकीग चार्जेसमुळे बँकाना मिळणारा रेवेन्यू किती मजबूत आहे याची तुम्हाला कल्पनाच दिसत नाही. त्यातला कस्टमरच्या बोकांडी मारलेल्या सर्विस टॅक्समधून (जो जीएसटीनंतरही कायम राहील) सरकारला किती उत्पन्न आहे हे देखिल तुम्हाला माहिती नाही. जेटलींनी सर्विस टॅक्स कंप्लीट वेव करायच्या ऐवजी फक्त नोटा उपलब्ध होईपर्यंत गाजर दाखवलंय याचा अर्थ खुद्द सरकार तो मलीदा सोडायला तयार नाही. तुमच्या वर्ल्ड बँकेच्या रिपोर्टमधे तर कॉस्ट ऑफ कॅशलेसचा साधा उल्लेख सुद्धा नाही कारण बहुदा त्यांना वाटतंय की जसा प्रगत देशात प्लास्टीक मनी कॉस्ट फ्री आहे तसाच इथे पण आहे. आता गोलपोस्ट चेंज वगैरे स्टँड सोडा आणि फालतू उदाहरणं देणं थांबवा. आणि फक्तकॉस्ट ऑफ कॅशलेसवर तुमचं काय म्हणणं आहे ते सांगा.