Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कधी थांबणार हा क्रूरपणा???????

श
श्रीगुरुजी
गुरुवार, 01/19/2017 - 19:39
🗣 282 प्रतिसाद
काय वेडेपणा चाललाय! सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातलेली जालिकट्टू नावाची क्रूर प्रथा पुन्हा एकदा सुरू करावी यासाठी तामिळींचा जीव चाललाय. काही ठिकाणी बंदी झुगारून जालिकट्टू आयोजित करण्याचे प्रयत्न झाले. पण पोलिसांनी ते हाणून पाडले. तामिळनाडूचे मुख्यमंत्री ओ पनीरसेल्वम् यांनी तर केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय झुगारून जालिकट्टू पुन्हा सुरू करण्याचा अध्यादेश काढावा अशी विनंती करण्यासाठी थेट दिल्ली गाठून पंतप्रधान मोदींची भेट घेतली. सर्वात वाईट भाग म्हणजे संगीतकार रहमान, माजी जागतिक बुद्धीबळ विश्वविजेता विश्वनाथन् आनंद याने सुद्धा जालिकट्टू पुन्हा सुरु करण्यासाठी पाठिंबा दिलाय. ही आमची अत्यंत जुनी परंपरा आहे, आम्ही ती चालू ठेवणारच, आमच्या परंपरेवर बंदी घालण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला कोणी दिला अश्या आविर्भावात निदर्शने सुरू आहेत. जालिकट्टू तामिळींच्या जीवनमरणाचा प्रश्न झाला आहे. जुनी परंपरा, प्रथा इ. गोष्टी खर्‍या असल्या तरी असल्या प्रथेत मुक्या प्राण्याचा छळ होतोय त्याचं काय? ते बैल काय स्वतः यातना सहन करून तुमची करमणू़क करण्याकरता या जगात आलेत का? एका वाहिनीवर दाखवित होते. एका बैलाभोवती सातआठ लुंगीधारी उभे होते. त्यातला एकजण बैलाची शेपटी ओढून जोरात पिरगाळत होता. दुसरा एकजण शेपटी दाताखाली धरून चावत होता. अरे कशासाठी त्या बैलाला यातना देता? परंपरा आणि प्रथा म्हणून? ही कसली क्रूर परंपरा? मुक्या प्राण्याला यातना देऊन कसली आलीय करमणू़क आणि प्रथा? अंगात एवढी मस्ती असेल तर एकमेकांशी फ्रीस्टाईल कुस्त्या खेळा की. प्राण्यांचा छळ का करता? स्वतःच्या जिव्हालौल्यासाठी व करमणुकीसाठी मुक्या प्राण्यांना यातना देऊन त्यांचा छळ करण्याची प्रथा व परंपरा खूप जुनी आहे व जगात अनेक देशात ती अजून जिवंत आहे. स्पेनमध्ये बुलफाईट प्रकारात एका बैलाला गल्लीबोळातून पळविले जाते. अनेक जण बैलाच्या मागे पळून त्याला जखमी करायचा प्रयत्न करीत असतात. बैल पळताना बाजूला उभे असलेले बघ्ये बैलाला छोटे बाणाच्या आकाराचे लोखंडी भाले फेकून मारतात. अंगात ठिकठिकाणी भाले घुसलेला तो बैल शेवटी बुलफाईटच्या मैदानात येतो. तिथे तलवारी घेऊन तीनचार जण त्याला तलवारीने जखमी करतात. शेवटी मुख्य मॅटॅडोर येतो व जीवाच्या भीतिने आकांताने धावून थकलेल्या, तलवारीच्या वारांमुळे व अंगात घुसलेल्या भाल्यांच्या जखमांच्या यातनांनी कळवळणार्‍या बैलाचे मस्तक तो तलवारीच्या एका घावात घडावेगळे करतो. जमलेले हजारो प्रेक्षक या मुक्या प्राण्याच्या यातनामय कत्तलीचा आनंद लुटत असतात. मुक्या प्राण्याला इतक्या यातना देताना आनंद कसा मिळू शकतो? वेदनांनी कळवणार्‍या बैलाच्या वेदनांनी करमणूक कशी होऊ शकते? भारत देखील या घॄणास्पद प्रकारापासून दूर नाही. शेतीसाठी बैल वापरण्याआधी मोठ्या दांडक्याने बैलाचे वृषण चेचून भुगा करून टाकतात जेणेकरून तो गायीबरोबर आपले नैसर्गिक कृत्य करू शकणार नाही. माणूस त्याची नैसर्गिक उर्मीसुद्धा स्वतःच्या स्वार्थासाठी नष्ट करतो व तीसुद्धा अत्यंत वेदनादायक पद्धतीने. उर्मिला पवार यांच्या 'आयदान' पुस्तकात बैलाच्या खच्चीकरणाचे वर्णन दिले आहे. दांडक्याने वृषण चेचले जात असताना बैलाला किती यातना होत असतील. माणूस त्याला एवढ्या यातना का देतो? बैलाचे वृषण खच्ची करण्याचे काम करणार्‍या नराधमाचे वृषणही असेच चेचून काढले पाहिजेत म्हणजे त्याला त्या यातना कशा असतील ते कळेल. बैलगाडीला जोडण्यासाठी बैलांच्या तळपायात खिळे ठोकून नाल बसवितात. नाल बसविण्यासाठी आधी बैलाला खाली बसवून आडवे पाडतात व त्याचे चारही पाय बांधून मग खिळे ठोकून नाल बसवितात. नाल बसविताना बैलाच्या डोळ्यातून वेदनांनी पाणी वाहत असते. कशासाठी हा क्रूरपणा? मला कधी कधी वाटते की बैलांच्या तळतळाटामुळेच कदाचित शेतकर्‍यांची हलाखीची परिस्थिती असावी. आपल्याला यातना देणार्‍याला बैलांचे शिव्याशाप भोवत असतील. काही दिवसांपूर्वी कोल्हापूरमध्ये झालेली'पारंपारिक' मेंढ्यांची टक्कर दाखवित होते. जमलेले प्रेक्षक दोन मेंढ्यांच्या आपापसातील टकरीचा आनंद लुटत होते. दोन्ही मेंढे आपल्या पूर्ण ताकदीनिशी दुसर्‍याच्या कपाळावर जोरदार धडक मारत होते. दोघांनाही वेदना होत असणारच. कदाचित कपाळाची हाडेही मोडत असतील. आणि असल्या क्रूर प्रकाराचा प्रेक्षक आनंद लुटत होते. काही ठिकाणी कोंबड्यांची झुंज सुद्द्धा लावतात. या झुंजीत कोंबड्याच्या एका पायाला ब्लेडचा अर्धा तुकडा बांधलेला असतो जेणेकरून समोरच्या कोंबड्याचे रक्त निघेल. दोन्ही कोंबडे मूर्खासारखे एकमेकांशी लढाई करून जखमी होतात व माणसे आपली करमणूक करून घेतात. बैलगाडी शर्यत हा असाच एक क्रूर प्रकार. सुदैवाने सर्वोच्च न्यायालयाने या प्रकाराला सुद्धा बंदी घातली आहे. तरीसुद्धा बैलगाडी शर्यत पुन्हा सुरू करावी यासाठी महाराष्ट्रात जोरदार प्रयत्न सुरू आहेत. या शर्यतीतही बैलांना जोरात पळविण्यासाठी शेपटी पिरगाळणे, खिळा लावलेल्या चाबकाचे फटकारे लावणे असे क्रूर प्रकार केले जातात आणि वेदना होत असताना भीतिने बैल जोरात गाडी पळवितात कारण आपली उच्च प्रथा आणि परंपरा! नवसासाठी व धार्मिक परंपरेसाठी कोंबड्या, बकर्‍या कापणे हा प्राण्यांना यातना देण्याचाच एक प्रकार. हे बळी थांबावेत म्हणून संत गाडगेबाबांनी प्रबोधन करण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु अजूनही हा प्रकार सुरूच आहे. मांग जातीत एखाद्याचे लग्न ठरताना किंवा त्याआधी काही वर्षे लग्नासाठी नवर्‍यामुलाच्या नावाने एक डुक्कर सोडले जाते. ऐन लग्नाच्या वेळी हे डुक्कर पकडून त्याला जिवंत जाळून त्याचे मांस खाल्ले जाते. जिवंत जळताना त्या डुकराला किती भयानक वेदना होत असतील. प्रथा व परंपरा या नावाखाली हे क्रूर प्रकार कायमच सुरू राहणार का? जिव्हालौल्यासाठी जिवंत प्राणी क्रूर पद्धतीने मारणे हे जगभर सर्वत्र केले जाते. कासव, शिंपले, बेडूक, खेकडे इ. प्राण्यांना जिवंतपणीच उकळत्या पाण्यात टाकणे, बदक/हंस इ. प्राण्यांची आत असलेली मान बाहेर काढण्यासाठी त्याच्या तोंडासमोर खाणे धरणे व खाणे खाण्यासाठी त्याने मान सरळ केल्यावर मानेवर घाव घालून त्यांना मारणे अशा क्रूर पद्धतीने हे प्राणी जिभेचे चोचले पुरविण्यासाठी मारले जातात. अरे प्राणी मारायचा असेल तर निदान त्या प्राण्याला भूल देऊन वीजेचा शॉक देऊन वेदनारहीत मरण तरी द्या. हालहाल कशाला करता? मुक्या प्राण्यांना प्रथा व परंपरेच्या नावाखाली आपल्या करमणुकीसाठी व जिव्हालौल्यासाठी वेदना, यातना देऊन त्यांचा छळ करणे व नंतर मारून टाकणे हे अत्यंत क्रूरकर्म आहे व या प्रकाराचा मला अतिशय संताप येतो. हे सर्व प्रकार तातडीने कायमस्वरूपी बंद व्हायला हवेत. सुदैवाने सर्वोच्च न्यायालय याविषयी सक्रीय असून या प्रकाराला कायद्याने बंदी घालण्यात येत आहे ही समाधानाची गोष्ट आहे.

प्रतिक्रिया द्या
73607 वाचन

💬 प्रतिसाद (282)
म
मोदक गुरुवार, 01/19/2017 - 19:49 नवीन
गुरूजी.. धाग्याचा नक्की उद्देश / संदेश काय आहे..? तुम्ही सुरूवातीला प्रश्न विचारून शेवटी "सुदैवाने सर्वोच्च न्यायालय याविषयी सक्रीय असून या प्रकाराला कायद्याने बंदी घालण्यात येत आहे ही समाधानाची गोष्ट आहे. " असे विधान केले आहे म्हणून विचारत आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 01/20/2017 - 10:05 नवीन
प्राणीपक्षांचा छळ थांबवा हा उद्देश आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
र
रामपुरी गुरुवार, 01/19/2017 - 20:45 नवीन
अरेरे! मुर्खांच्या यादीत हे नाव घालावे लागेल असं वाटलं नव्हतं.
  • Log in or register to post comments
र
रेवती गुरुवार, 01/19/2017 - 21:42 नवीन
काय वेडेपणा आहे हा.
  • Log in or register to post comments
व
विशुमित Fri, 01/20/2017 - 06:10 नवीन
जरी वेदनादायक असले तरी नाल बसवणे बैलांसाठी हिताचेच आहे. नांगरट आणि इतर मशागत करताना खुरांना इजा होऊ नये आणि डांबरी रस्त्यावर चालताना पाय घसरू नये म्हणून नाल बसवतात. चाप देणे सुद्धा बैलाच्या आरोग्यासाठी चांगलेच आहे. चाप दिल्यामुळे बैले व्यवस्थित खातात पितात. खिलारी बैले जर अशीच मोकाट ठेवली तर कासरे (दोर खंड) तोडून गाईचं नाही तर माणसांवरती पण उडतील (समर्पक शब्द नाही मिळाला. गैर वाटत असेल तर संपादक मंडळ संपादन करू शकता). म्हणून शेतीसाठी बैल वापरूच नका असे कृपया कोणी फुकटचे सल्ले देऊ नये कारण शेतातले कडे कोपऱ्यांची चांगली मशागत फक्त बैलच करू शकतात. तिथे ट्रॅक्टरचे काम नाही. बाकी बैल मालक (शर्यतीचे आणि शेतात काम करणाऱ्या) बैलाची काय लाड पुरवतात आणि त्यांचे एकमेकांबद्दल काय प्रेम असते ते सांगतो नंतर कधीतरी. <<<मला कधी कधी वाटते की बैलांच्या तळतळाटामुळेच कदाचित शेतकर्‍यांची हलाखीची परिस्थिती असावी. आपल्याला यातना देणार्‍याला बैलांचे शिव्याशाप भोवत असतील.>>> -- शेतकऱ्यांच्या हलाकीचे हे एक कारण असू शकते असे म्हणणे तुमच्या सारख्या अभ्यासू मिपाकराकडून अपेक्षित नव्हते. असो... (अवांतर: एक तर आजकाल देशी गाईंचे वाण कोणी पाळत नाही जर त्यावर असे आणखी बंधने कोणी टाकली तर गोवंशाचे संवर्धन होणे मुश्किल होऊन बसेल.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 01/20/2017 - 10:12 नवीन
बैलांच्या पायात खिळे ठोकून नाल बसविणे आणि दांडक्याने त्याचे वृषण चेचून भुगा करणे हे कोणाच्या हिताचे आहे? बैलाच्या का त्याच्या मालकाच्या? किंवा त्याच्या नाकात वेसण घालून त्याला बैलगाडीला किंवा नांगराला जुंपून वजन ओढायला लावणे हे काय बैलाच्या हिताचे आहे का? त्या प्राण्याची नैसर्गिक कामप्रेरणा सुद्धा क्रूर पद्धतीने नष्ट करून त्याला नैसर्गिक आनंदापासून वंचित ठेवणे हे बैलाचा हिताचे आहे का? बैलाचा मालक आपल्या स्वार्थासाठी बैलाचा छळ करतो. हे करताना त्या मुक्या प्राण्याला मरणांतिक यातना झाल्या तरी मालकाला काय फरक पडतो? एवढ्या यातना व कष्ट देऊन नंतर त्याचे लाड पुरविणे किंवा लाड करणे म्हणजे एखाद्याला वारंवार मरेस्तोवर चोप देऊन नंतर त्याला सॉरी म्हणण्यासारखं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Fri, 01/20/2017 - 10:26 नवीन
म्हणजे बैल शेतीसाठी नाही वापरले पाहिजे असे सूचित करायचे आहे का तुम्हाला ? तसं असेल तर आपला पास... शक्य असेल तर उडणाऱ्या बैलांचे काय करायचे त्याचा उपाय पण सांगा. (बाकी औदयोगिक क्षेत्रात काम करणाऱ्या बैलांचे काय हित होऊ शकतं याचे पण पृथक्करण केला तर बरे होईल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Fri, 01/20/2017 - 10:39 नवीन
म्हणजे बैल शेतीसाठी नाही वापरले पाहिजे असे सूचित करायचे आहे का तुम्हाला ?
हेच सांगायचं आहे. ट्रॅक्टर वापरा, इतर कोणतीही यंत्रे वापरा, माणसे वापरा परंतु स्वतःच्या स्वार्थासाठी मुक्या प्राण्यांना यातना देऊन व त्यांचा छळ करून त्यांचा वापर करू नका.
शक्य असेल तर उडणाऱ्या बैलांचे काय करायचे त्याचा उपाय पण सांगा.
हास्यास्पद प्रश्न
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Fri, 01/20/2017 - 10:45 नवीन
<<हास्यास्पद प्रश्न>>> -- का हास्यापद ? माझ्या कडे २ खोंडे आहेत. दुशी... काय करू त्यांचे ? बांधून ठेवू का सोडून देऊ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
म
मोदक Fri, 01/20/2017 - 11:30 नवीन
औदयोगिक क्षेत्रात काम करणाऱ्या बैलांचे काय हित होऊ शकतं
औदयोगिक क्षेत्रात काम करणारे बैल म्हणजे नक्की कोण..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Fri, 01/20/2017 - 11:37 नवीन
सगळंच विस्कटवून सांगायचे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Fri, 01/20/2017 - 12:33 नवीन
कळाले नाही म्हणून विचारले. सांगण्यासारखे नसेल तर सांगू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
अ
अप्पा जोगळेकर Fri, 01/20/2017 - 12:33 नवीन
औदयोगिक क्षेत्रात काम करणारे बैल म्हणजे नक्की कोण..? काही नाही. शेत कसता येत नाही म्हणून बळच उद्योग क्षेत्रात काम करणार्‍या कर्मचार्‍यांवर दुगाण्या झाडायच्या हा भारतात बर्‍याच शेतकर्यांचा जुनाच धंदा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
व
विशुमित Fri, 01/20/2017 - 13:11 नवीन
तुमचा काही तरी गैरसमज होतोय अप्पा जी. ह्या दुगाण्या शेती न कसणाऱ्यांना साठी नव्हत्या. नोकरी मध्ये बैला सारखे राबवून घेणाऱ्या प्रवृत्तीला होत्या. तुम्ही लगेच शेतकऱ्यांवर बिल फाडून मोकळे झालात. असो तसे ही भारतात बऱ्याच शहरी लोकांचा शेतकऱ्यांची अक्कल काढण्याचा जुनाच धंदा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
श
श्रीगुरुजी Fri, 01/20/2017 - 13:24 नवीन
औद्योगिक बैलांना राबवून जाउन न देण्याचा हक्क/पर्याय असतो. आपली कामप्रेरणा नष्ट होउन न देण्याचा, चाप वावून न देण्याचा, पायात नाल ठोकून न घ्यायचा, नाकात वेसण न घालून घ्यायचा, बैलगाडी / नांगर ओढायला नकार द्यायचा हक्क/पर्याय बैलाकडे असतो का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
श
श्रीगुरुजी Fri, 01/20/2017 - 13:24 नवीन
औद्योगिक बैलांना राबवून जाउन न देण्याचा हक्क/पर्याय असतो. आपली कामप्रेरणा नष्ट होउन न देण्याचा, चाप वावून न देण्याचा, पायात नाल ठोकून न घ्यायचा, नाकात वेसण न घालून घ्यायचा, बैलगाडी / नांगर ओढायला नकार द्यायचा हक्क/पर्याय बैलाकडे असतो का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
अ
अप्पा जोगळेकर Fri, 01/20/2017 - 13:44 नवीन
नाय नाय. मी पण शेत न कसता उगा शंख करणार्‍यांबद्दल बोलतोय. सगळे शेतकरी असे नसतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
अ
अप्पा जोगळेकर Fri, 01/20/2017 - 13:45 नवीन
अवांतर - शेतकर्‍यांना पण हिन्कम टॅक्स लावला तर समान न्याव होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
व
विशुमित Fri, 01/20/2017 - 10:43 नवीन
<<<<दांडक्याने त्याचे वृषण चेचून भुगा करणे हे कोणाच्या हिताचे आहे>>> -- दगडाने चेचण्याची पद्धत मी तरी नाही पाहिली. जुनी असावी बहुतेक. आता नवीन पद्धतीचे पकड सदृश चाप असतात. आमच्या कडे तरी प्रशिक्षित पशु वैदिक अधिकारी ते काम करतात. तुमचा प्राणीमात्रा बद्दलचा कळवळा स्तुत्य आहे पण शेवटी माणूस हा माणूस च असतो आणि बैल हा बैलच. (रच्यक तुम्ही तुमच्या घरात पेस्ट कंट्रोल करता का हो?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Fri, 01/20/2017 - 10:48 नवीन
उर्मिला पवार यांच्या 'आयदान' या पुस्तकात दांडक्याने वॄषण चेचून भुगा करण्याच्या प्रकाराचे वर्णन आहे. अगदी बैलाला भूल देऊन वेदनारहीत त्याचे वृषण काढून टाकतात असे समजले तरी त्या प्राण्याचे हे अवयव काढून टाकण्याचा हक्क बैलांच्या मालकांना कोणी दिला? माणूस हा माणूस असतो व बैल हा बैलच असतो हे खरे असले तरी त्यांच्यात बुद्धीचा फरक असतो. वेदना, यातना, क्षुधा, कामप्रेरणा या भावना दोघांनाही असतात. माणसांना जशा वेदना होतात तशा प्राण्यांनाही होतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Fri, 01/20/2017 - 10:58 नवीन
उर्मिला पवार डॉक्टर आहेत का ? पुस्तकात लिहिलेला मजकूर आता चालू घडीचा आहे की काही वर्ष पूर्वीचा? <<<अवयव काढून टाकण्याचा हक्क बैलांच्या मालकांना कोणी दिला?>> -- ज्याचा बैल आहे त्याला हक्क असणारच. गोवंश हत्या सोडली तर तो हक्क अबाधित असावा नाहीतर पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ते काम केले नसते. <<<माणसांना जशा वेदना होतात तशा प्राण्यांनाही होतात.>> -- ठीक आहे माझी 2 खिलारी खोंडे आहेत देऊ का तुमच्या साम्भाळाय ला? माझ्या पेक्षा जास्त लळा लावू शकाल त्यांना तुम्ही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Fri, 01/20/2017 - 11:01 नवीन
प्राण्यांवर होणार्‍या अत्याचाराचे वर्णन करण्यासाठी डॉक्टरकीची पदवी आवश्यक आहे हे सांगितल्याबद्दल धन्यवाद! एखाद्याच्या मालकीचा बैल आहे याचा अर्थ बैलाचा छळ करून यातना देण्याचा त्याला हक्क मिळतो हे सांगितल्याबद्दल धन्यवाद! तुमच्या खिलारी खोंडांचे हाल करून त्यांना यातना देऊ नका एवढीच विनंती आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Fri, 01/20/2017 - 11:31 नवीन
<<<प्राण्यांवर होणार्‍या अत्याचाराचे वर्णन करण्यासाठी डॉक्टरकीची पदवी आवश्यक आहे हे सांगितल्याबद्दल धन्यवाद!>>> -- चाप देणे यात अत्याचार काय आहे हे नाही समजलं. काम उतेजीत झालेली खोंडे काय उच्छाद मांडतात याची कदाचित तुम्हाला कल्पना नसावी. अशा बैलांनी जर कासरे तोडले तर स्वतःबरोबर इतर प्राण्यांना पण इजा करतील. मनुष्य हानी पण होऊ शकते. (साहेब आमची लहान लेकरं खेळतात ओ गोठ्याजवळ) <<<एखाद्याच्या मालकीचा बैल आहे याचा अर्थ बैलाचा छळ करून यातना देण्याचा त्याला हक्क मिळतो हे सांगितल्याबद्दल धन्यवाद!>>> -- चाप देणे छळ कसा? बैलांना बिलकुल काम क्रीडा करूनच देत नाहीत असा तुमचा गैरसमज झालेला दिसतोय. ज्या वेळेस बैल जास्त त्रास देतो त्याच वेळेस त्याला चाप दिला जातो. त्याने बैलांचे आरोग्य चांगले राहते. बाल ब्रह्मचारी करून नाही ठेवत त्यांना कोणी. तसे असते तर गोवंश वाढलंच नसता. <<<तुमच्या खिलारी खोंडांचे हाल करून त्यांना यातना देऊ नका एवढीच विनंती आहे.>>> -- बरोबर आहे तुम्ही माझ्या खोंडाची जवाबदारी कशी घ्याल? वसू बारसेला नैवेद्य चारण्या पुरती गोभक्ती (प्राणी भक्ती म्हणा) असणारे उपदेशाचे डॉस पाजणारच. तशी मी माझी खोंडे माझ्याच दावणीत ठेवणार. लाड पण करणार आणि जास्त ताप दिला तर चाप पण देणार. मोठी झाल्यावर औताला पण झुंपणार. शेवटी ती बैलच, नांगरायचाच कामाची. (पेस्ट कंट्रोल करता का त्याचे उत्तर नाही दिले अजून. तशी सक्ती नाही आपलं असंच)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
स
सांरा Fri, 01/20/2017 - 12:11 नवीन
म्हातारी झाल्यावर विकू नका म्हणजे मिळवल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Fri, 01/20/2017 - 12:27 नवीन
का विकू नये? बैलं माझी आहेत म्हंटल्यावर विकायचा कि ठेवायची हा अधिकार माझा असणार आहे ना. (भ्रामक कल्पनेतून कृपया बाहेर या)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सांरा
स
सांरा Fri, 01/20/2017 - 13:35 नवीन
घरची सगळी जनावरे दावणीवरच मरण पावली आहेत - म्हातारी होऊन किंवा आजारीपणाने. आम्ही गाईबैलांची किंमत पैशांनी करत नाही. बाकी जैसी जिसकी सोच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Mon, 01/23/2017 - 10:07 नवीन
<<<घरची सगळी जनावरे दावणीवरच मरण पावली आहेत - म्हातारी होऊन किंवा आजारीपणाने>> -- आमची पण.. कुठलंच जनावर निवर्तल्यावर उघड्यावर कधी नाही टाकलं. रीतसर खड्डा खणून मीठ टाकून मूठमाती दिली आहे. <<<बाकी जैसी जिसकी सोच.>>> "म्हातारी झाल्यावर विकू नका म्हणजे मिळवल." हा आगाऊ सल्ला दिल्या मुळे म्हणावं लागलं माझी खोंडे आहेत निर्णय मीच घेणार. तसा शर्यतीला माझा विरोधच आहे पण धागा लेखकाने पाप पुण्याच्या फेऱ्यांमध्ये शेतकऱ्याला विनाकारण ओढलं म्ह्णून हा लेख प्रपंच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सांरा
अ
अप्पा जोगळेकर Fri, 01/20/2017 - 12:53 नवीन
म्हातारे बैल न विकणे परवडेल का कोणाला ? बैल, कोंबड्या, डुक्कर, मेंक्कर्,व्यावसायिक उपयोगासाठीच पाळतात. कोंबडी या प्राण्याला तर भारताची राष्ट्रीय भाजी म्हणून घोषित करावे इतके त्यांचे मरण कॉमन झाले आहे. त्यांना पण मारायचे नाही असे म्हटले तर अवघडच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सांरा
श
श्रीगुरुजी Fri, 01/20/2017 - 12:47 नवीन
हा चाप.कसा देतात ते सांगता का? घरात पेस्ट कंट्रोल आजतागायत केलेले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Fri, 01/20/2017 - 12:57 नवीन
<<<हा चाप.कसा देतात ते सांगता का?>>> -- डिटेलवार उद्या सांगण्याचा प्रयत्न करतो.. <<घरात पेस्ट कंट्रोल आजतागायत केलेले नाही. -- चांगली गोष्ट आहे. डास मारलाय कधी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Fri, 01/20/2017 - 13:15 नवीन
डास? नाही बुवा. का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Fri, 01/20/2017 - 13:21 नवीन
डास ही मारला नसेल तर नक्कीच प्राणिमात्रा बद्दलचा तुमच्या कळवळा खरंच कवतुकास्पद आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sat, 01/21/2017 - 10:06 नवीन
बैलांना लावण्यात येणार्‍या 'चाप' प्रकाराबद्दल जरा सविस्तर माहिती मिळेल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Mon, 01/23/2017 - 11:04 नवीन
शनिवारी पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे गेलो होतो या माहिती साठी पण ते रजेवर होते २ दिवस त्या मुले माहिती नाही मिळू शकली. काही जुन्या जाणत्या बैलवाल्याना विचारलं त्या बाबत. बहुतेक सगळ्याच बैलांना चाप साठी सामोरे जावा लागतं. काही ना खूप लवकर तर काहींना उशिरा. काही खोंडांच्या वृषणाला लहानपणीच रुईचा चीक रोज थोडा थोडा चोळतात. त्यामुळे त्याला नंतर सहसा चाप देण्याची गरज भासत नाही. चाप म्हणजे एक अडकित्यासदृश हत्यार असते. बैलाला जनावरांच्या दवाखान्यातील खांबाला बांधतात. पशु वैद्यक वृषणाला साबण लावून स्वच्छ करतात, मग त्यावर जेली सारखी क्रिम लावून त्या चापाने वृषणाची नस तोडतात. त्या नंतर जास्त आग होऊ नये म्हणून त्यावर दुसरी क्रिम देतात. (त्या कोणत्या क्रिम आहेत त्याची डिटेल माझ्याकडे नाही). साधारण २-३ दिवस बैल कुचमतो. कधी कधी ताप पण येतो. पण ३-४ दिवसांनी व्यवस्थित होतो. चाप कधी देतात-- -- बैल जसा तरुण होत जातो त्याचे वृषण खाली लोम्बत जाते त्याने त्याला चालण्याला त्रास होतो. -- बैलाच्या अंगात ताकत वाढत गेली की खूप मस्तावल्या सारखे करतात. कोणाला ही पुढे येऊन देत नाहीत. मालकाला पण डाफरतात. -- शिंगांनी माती उकरतात. त्यामध्ये त्यांची शिंगे ही मोडू शकतात. -- काम उतेजीत झाले तर शेजारील इतर जनावरांवर उड्या मारतात आणि इजा ही पोहचवतात. गाई माजावर असली तरच त्याला चिटकवून घेते त्यामुळे बैलांचा नैसर्गिक काम दाबला जातो ह्या म्हणायला काही अर्थ नाही. माणसा सारखं नसतं जनावरांचं. -- बैल त्याचे लिंग बाहेर काढून जमिनीवर घासत राहतो त्यामुळे त्या भयंकर इजा होऊ शकते. चाप देण्याचे फायदे: -- बैलांची तब्येत चांगली राहते. (माणसाला नाही का आपण काम वरती संयम राखायला सांगतो) -- बैल मारायचं प्रमाण कमी होते. -- औताला चांगलं काम करतात. -- वृषण जास्त वाढत गेल्याने आरोग्याची समस्या निर्माण होते. (मला नाही समजला हा पॉईंट ) -- चाप देणं हे एक प्रकारची नस बंदीच असते त्याने बैलांच्या कामा क्रीडे वरती काही परिणाम नाही होतं. (यासाठी मी कन्फर्म नाही पशु वैदकांना भेटल्यावर सांगतो) एवढ नक्की की चाप देणे खरंच वेदना दायक आहे. गुरुजींनी या प्रकरणाला पाप पुण्याची झालर दिली म्हणून प्रायश्चित म्हणून जेव्हा वेळ येईल तेव्हा स्वतःची नसबंदी करून घेण्याची मनीषा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Mon, 01/23/2017 - 11:33 नवीन
बापरे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
N
nanaba Tue, 01/24/2017 - 05:45 नवीन
खरच प्रायश्चित्त करायचं असेल तर नसबंदी करताना ॲनेस्थेशिया घ्यायचा नाही आणि बैलाला जितकं निर्जंतुकीकरण करतो तितकच स्वत:लाही करायच - हे ही मुद्दे ॲड करावे लागतील का हो? माणसाची आणि जनावराची काम प्रेरणा सारखी नाही रच्याकने. माणूस २४*३६५ तयार असतो. म्हणून त्याला संयम ठेवणे गरजेचे असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Tue, 01/24/2017 - 05:59 नवीन
मी प्रायश्चित घायचं की नाही हा माझा प्रश्न आहे नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: nanaba
श
श्रीगुरुजी Tue, 01/24/2017 - 09:35 नवीन
-- चाप देणं हे एक प्रकारची नस बंदीच असते त्याने बैलांच्या कामा क्रीडे वरती काही परिणाम नाही होतं. (यासाठी मी कन्फर्म नाही पशु वैदकांना भेटल्यावर सांगतो)
चाप देणे म्हणजे फक्त नसबंदी असते का बैलाला कायमस्वरूपी नपुंसक बनविले जाते? फक्त नसबंदी असेल तर त्यामुळे कामक्रीडेवर परीणाम होणार नाही हे बरोबर आहे. परंतु चाप लावणे म्हणजे फक्त नसबंदी असेल तर त्यांची कामप्रेरणा आहे तेवढीच राहील (फक्त नवीन वासरांना जन्म देण्यास उपयोग होणार नाही) आणि त्याचबरोबर वृषण खाली लोंबणे, शिंगांनी माती उकरणे, मस्तवालपणा, कामोत्तेजित होऊन इतर जनावरांवर उड्या मारणे, लिंग बाहेर काढून जमिनीवर घासणे इ. प्रकार सुरूच राहतील. त्याचप्रमाणे बैलांची तब्येत चांगली राहणे, मारण्याचे प्रमाण कमी होणे, औताला चांगलं काम करणे, वृषण न वाढणे इ. वर सांगितलेले फायदे मिळणारच नाहीत. म्हणजेच चाप लावणे ही फक्त नसबंदी नसून त्याची कामप्रेरणा कायमस्वरूपी नष्ट करून त्याला नपुंसक बनवून टाकण्याची क्रिया असावी. चाप लावताना भूल देतात का तसाच जागतेपणी हा प्रकार करतात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
प
पैसा Fri, 01/20/2017 - 06:24 नवीन
विश्वनाथन आनंदही??? तामिळींच्या एकूण बुद्धिमत्तेबद्दल शंका येण्यासारखे बरेच प्रकार घडत असतात. सगळंच अवघड आहे. माणूस हा सगळ्यात क्रूर प्राणी आहे हे वेगळेच.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 01/20/2017 - 09:56 नवीन
जालीकट्टू समर्थकांच्या मांदियाळीत आता कमल हासन, क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विन आणि श्री श्री रविशंकर हे सुद्धा सामील झाले आहेत. श्री श्री रविशंकर हे आध्यात्म क्षेत्रातील असल्याने प्राण्यांना होणार्‍या यातनांना त्यांचा विरोध असेल असे वाटत होते. शेपटी पिरगाळताना बैलाला होणार्‍या वेदना त्यांना समजत असतील. श्री श्री रविशंकर यांची लांबलचक दाढी एखाद्याने जोरजोरात खेचली आणि उपटली तर त्यांना किती वेदना होतील? अशाच वेदना बैलालाही होत असणार. परंतु 'Thou too Brutus!' असेच आता खेदाने म्हणावे लागेल. माणसांचा क्रूरपणा फक्त बैल, कोंबड्या, बकर्‍या यांच्यापुरताच मर्यादीत नाही. अश्वशर्यतीत धावणारे अश्वसुद्धा माणसांच्या क्रूर करमणुकीचे बळी आहेत. या अश्वांच्या पाठीवर त्यांचा क्रमांकाचा लोखंडी डाग तापवून त्या क्रमांकाचा टॅटू त्यांच्या पाठीवर कायमस्वरूपी उमटविला जातो. तापविलेल्या लालभडक लोखंडी डागाचा चटका बसताना त्या मुक्या प्राण्याला किती वेदना होत असतील याची क्रूरकर्म्यांना फिकीर नसते. एवढ्या यातना मिळूनसुद्धा तो बिचारा मालकासाठी शर्यतीत जीव तोडून धावतो आणि मालकाला मालामाल करताना जमलेल्या प्रेक्षकांचीही करमणूक करतो व त्यातल्या काही जणांना सुद्धा तो मालामाल करतो. परंतु बिचार्‍याचे दुर्दैव इथेच संपत नाही. वॄद्धापकाळामुळे किंवा काही अपघाताने जायबंदी होऊन त्याचे शर्यतीत धावणे थांबल्यानंतर त्याला उर्वरीत आयुष्यात पोसायला नको म्हणून कृतघ्न मालक त्याला क्रूरपणे कपाळावर दोन डोळ्यांच्या मध्यभागी गोळी घालून मारून टाकतात. काही श्वानमालकही असेच क्रूर असतात. कुत्रा म्हणे घाबरला की दोन पायात शेपटी घालून पळतो. त्याची भीति जावी म्हणून काही मालक त्याची शेपटीच मुळासकट कापून टाकतात. इतका मूर्खपणा करणार्‍यांची धन्य आहे. मुळात भीति या भावनेचे प्रकटीकरण म्हणून कुत्रा शेपटी आत घालतो. शेपटी मुळासकट कापली तरी मनातून व वागणुकीतून भीतिची भावना कशी मुळापासून नष्ट होईल? बिचार्‍याला निसर्गाने एक अवयव दिला आहे त्याचा काहीतरी उपयोग असणारच. परंतु दुष्ट माणूस त्याचा हा अवयवही कापून मोकळा होतो. मासे पकडण्यासाठी गळाला टोचली जाणारी गांडुळे, नदीतून पकडलेले खेकडे पळून जाऊ नयेत म्हणून पकडल्यावर लगेच त्यांचे चारही पाय काकडी मोडल्यासारखे मोडून टाकणे, दसर्‍याच्या दिवशी अजूनही काही खेड्यातून रेड्याचे चारही पाय तोडून त्याला देवीसमोर बळी देणे ही अजून काही क्रूरतेची उदाहरणे. दुर्दैवाने प्राणीपक्षांचे हालहाल करून त्यांना यातना देणार्‍या या क्रूर प्रकारांचा व्हावा तितका निषेध होत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
अ
अप्पा जोगळेकर Fri, 01/20/2017 - 11:11 नवीन
मासे पकडण्यासाठी गळाला टोचली जाणारी गांडुळे, नदीतून पकडलेले खेकडे पळून जाऊ नयेत म्हणून पकडल्यावर लगेच त्यांचे चारही पाय काकडी मोडल्यासारखे मोडून टाकणे, गुर्जी, अगदीच राजा अशोकाची राजवट आणायची आहे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
स
सांरा Fri, 01/20/2017 - 12:04 नवीन
तशी वैयक्तिक पातळी वर उतरण्याची मला गरज नाही पण तुम्ही हा लेख आणि प्रतिक्रिया अत्यंत पोटतिडीकीने लिहिलेल्या जाणवल्या. म्हणून मी खालीलप्रमाणे अंदाज लावत आहे. तुम्ही गहू ज्वारी खात असतांना त्या त्या झाडांची न जन्मलेली मुलेच खात असता. पाले भाज्या खात असतांना झाडांची नाके तोडून खात असता. फळे झाडांनी त्यांच्या पुनरुत्पादनासाठी निर्माण केलेई असतात. मटकी तशी फार छान लागते पण तिचे मोड म्हणजे नक्की काय ? झाडांना दुःख होत नाही काय ? त्यासाठी तुम्ही स्वतःला काय शिक्षा दिलीत ? कि झाडे ओरडत नाहीत म्हणून ते माफ आहे ? झाडे एखादा अवयव तोडल्यावर गंध रूपाने अनेक डिस्ट्रेस सिग्नल्स सोडतात. तो गंध आपल्याला खमंग वाटतो. बैलांची गोष्ट कराल तर खच्चीकरण न झालेला बैल फार हिंसक असतो. शेतीची कामे तर सोडा, तो एखाद्याचा जीवही घेऊ शकतो. जर बैल केंद्रित शेतीच नष्ट करायची असेल तर तुम्हाला दुध तर प्यायलाच मिळणार नाही आणि जे काही अन्न मिळेल ते हि अत्यंत महाग मिळेल. ( tractor ची किंमत आणि त्याचे maintenance सर्वांना परवडते, किंवा ज्यांना परवडत नाही ते सर्व स्वतः कुदळ घेऊन नांगरणी करतात, शेणखत नसल्याने रासायनिक खते सर्व जण विकत घेतात, असे गृहीत धरू. पण तुम्ही शेती करत नसल्याने तुम्हाला दुध आणि जेवणाएवढाच फरक पडेल.) दुध पीत असतांना आपण कोणत्या वासराचा हक्क ओरबाडत आहोत याची जाणीव तुम्हाला असावी असे मला वाटते. अमेरिकेसारख्या देशात जेथे फक्त दूधच महत्वाचे आहे तेथे जन्मल्याबरोबर बैलांचे काय होते ते तुम्ही वाचले असेलच. घोड्यांची गोष्ट कराल तर जखमी झालेला किंवा पाय मोडलेला घोडा तसाही फारसा जगत नाही. बाकी मुद्द्यांना पास.. जलेईकत्तु बद्दल जास्त माहित नसल्याने पास.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
इ
इरसाल कार्टं Fri, 01/20/2017 - 12:34 नवीन
आणि खच्चीकरण न केलेला बैल काय उच्छाद मांडू शकतो ते पाहिलेय मी कित्येक वेळा. स्वतः बैलासाठीही ते चांगले असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सांरा
N
nanaba Sun, 01/22/2017 - 03:53 नवीन
पोटाची गरज आणि गमती करताचे क्रौर्य ह्यातला फरक समजून घ्यावा ही नम्र विनंती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सांरा
फ
फेदरवेट साहेब Fri, 01/20/2017 - 06:35 नवीन
आय मस्ट से सॅडली, यु आर हायली अनइंफॉर्म अबाउट जलीकट्टू , तू काय बोलते तुझ्या लेख मंदी ते समदा झूट हाय. ऍटलिस्ट विकिपीडिया तरी वाचायचा असता बिफोर पब्लिशिंग युअर व्हेजीनाझी अजेंडा ऑन ओपन फोरम, १/३ लेख तू स्पॅनिश बुल फायटिंग वर लिवलानी, त्येंचा कल्चरल रिलेशन काय इंडियन जलीकट्टू सोबत त्ये लिव्हलाच नाय, बर लेट इट बी केप्त असाईड. जलीकट्टू मंदी तू कोन्या एका मॅड मॅनला बुलचा टेल चावताना पाहिला. तेच्यावरून तू बध्दा जलीकट्टू रॉन्ग असल्याचा सांगून टाकते, हाऊ अब्सर्ड, बिसाईड्स जलीकट्टू हे 'बुलफायटिंग' सारखा हाय का 'रोडीयो' टाईप हाय हा अभ्यास वापस एकडाव कर बरं तू. अँड येस, आय ऍग्री विथ सन विशुमित अल्सो.
  • Log in or register to post comments
व
विशुमित Fri, 01/20/2017 - 06:36 नवीन
घरात पेस्ट कंट्रोल कोण कोण करतं? जे हात वर करतील ते क्रूर लेकाचे!!
  • Log in or register to post comments
फ
फेदरवेट साहेब Fri, 01/20/2017 - 06:41 नवीन
=)) ए सन पॉईंट हाय हा जबरदस्त हो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
स
संदीप डांगे Fri, 01/20/2017 - 06:56 नवीन
एखाद्या प्रकाराला समर्थन आहे म्हणजे त्या व्यक्तीच्या किंवा व्यक्तीसमूहाच्या बुद्धीमत्तेवर संशय व्यक्त करणे पटत नाही. जलीकटूबद्दल मला व्यक्तिशः जास्त माहिती नाही, त्यामुळे कोणता पक्ष योग्य आहे हे सांगू शकत नाही. पण तमिळ लोक एवढ्या संख्येने त्याला समर्थन करत आहेत म्हणून त्यांची सामुहिक अक्कल काढण्याची गरज वाटत नाही. जगभरात कोणत्याही देशात काही ना काही विचित्र प्रथा असतातच, एका मनुष्यगटाला दुसर्‍या गटाच्या चालीरिती बुद्धिहीन वाटू शकतात ही शक्यता लक्षात असू द्यावी असे वाटते. मुक्या प्राण्यांवर अत्याचार वगैरे सर्व मान्य आहे. पण कधी कधी शंभर पैलूंपैकी एकच पैलू समोर आणून त्याबद्दल अतिरंजितपणा केला जातो का हेही बघायला हवे. प्रत्येक सणात काही ना काही मनुष्यहानी, प्राण्यांना त्रास होतोच होतो. कोणताही धर्म यास अपवाद नसावा. त्यामुळे सगळे धर्म, सगळ्याच चालीरीती, सगळेच सण बंद केले पाहिजेत, हो ना? अगदी कुळाचार-कुळधर्मातही घरच्या स्त्रीला बरेच कष्ट पडतात की. तेव्हा बुद्धिमान लोक काय पवित्रा घेतात हे बघायला पाहिजे. तसेच एखादी व्यक्ती एखाद्या खेळात, कलेत, क्षेत्रात हुशार-बुद्धिमान मानली जात असली म्हणजे ती बुद्धिप्रामाण्यवादीच असावी अशी अपेक्षा गैर आहे. सारासारविवेकबुद्धी, बुद्धिवादी असणे आणि एखाद्या कलेत-खेळात पारंगत असल्याने प्रसिद्ध असणे ह्याचा काही संबंध नाही.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 01/20/2017 - 10:17 नवीन
प्रत्येक सणात काही ना काही मनुष्यहानी, प्राण्यांना त्रास होतोच होतो. कोणताही धर्म यास अपवाद नसावा. त्यामुळे सगळे धर्म, सगळ्याच चालीरीती, सगळेच सण बंद केले पाहिजेत, हो ना? अगदी कुळाचार-कुळधर्मातही घरच्या स्त्रीला बरेच कष्ट पडतात की. तेव्हा बुद्धिमान लोक काय पवित्रा घेतात हे बघायला पाहिजे.
ज्या प्रथांमुळे, परंपरांमुळे प्राणी, पक्षी किंवा माणसांचा छळ होतो, त्या सर्व प्रथा, परंपरा बंद केल्या पाहिजेत. घरच्या स्त्रियांना कष्ट पडत असतील तर कुळाचार, कुळधर्मही बंद व्हायला पाहिजेत. सती, केशवपन इ. घाणेरड्या प्रथा जश्या कायद्याने बंद केल्या तशाच छळाच्या इतर प्रथाही बंद व्हायला हव्यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
प
पुंबा Fri, 01/20/2017 - 10:37 नवीन
ह्याच्याशी सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा