कधी थांबणार हा क्रूरपणा???????
काय वेडेपणा चाललाय! सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातलेली जालिकट्टू नावाची क्रूर प्रथा पुन्हा एकदा सुरू करावी यासाठी तामिळींचा जीव चाललाय. काही ठिकाणी बंदी झुगारून जालिकट्टू आयोजित करण्याचे प्रयत्न झाले. पण पोलिसांनी ते हाणून पाडले. तामिळनाडूचे मुख्यमंत्री ओ पनीरसेल्वम् यांनी तर केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय झुगारून जालिकट्टू पुन्हा सुरू करण्याचा अध्यादेश काढावा अशी विनंती करण्यासाठी थेट दिल्ली गाठून पंतप्रधान मोदींची भेट घेतली. सर्वात वाईट भाग म्हणजे संगीतकार रहमान, माजी जागतिक बुद्धीबळ विश्वविजेता विश्वनाथन् आनंद याने सुद्धा जालिकट्टू पुन्हा सुरु करण्यासाठी पाठिंबा दिलाय. ही आमची अत्यंत जुनी परंपरा आहे, आम्ही ती चालू ठेवणारच, आमच्या परंपरेवर बंदी घालण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला कोणी दिला अश्या आविर्भावात निदर्शने सुरू आहेत. जालिकट्टू तामिळींच्या जीवनमरणाचा प्रश्न झाला आहे.
जुनी परंपरा, प्रथा इ. गोष्टी खर्या असल्या तरी असल्या प्रथेत मुक्या प्राण्याचा छळ होतोय त्याचं काय? ते बैल काय स्वतः यातना सहन करून तुमची करमणू़क करण्याकरता या जगात आलेत का? एका वाहिनीवर दाखवित होते. एका बैलाभोवती सातआठ लुंगीधारी उभे होते. त्यातला एकजण बैलाची शेपटी ओढून जोरात पिरगाळत होता. दुसरा एकजण शेपटी दाताखाली धरून चावत होता. अरे कशासाठी त्या बैलाला यातना देता? परंपरा आणि प्रथा म्हणून? ही कसली क्रूर परंपरा? मुक्या प्राण्याला यातना देऊन कसली आलीय करमणू़क आणि प्रथा? अंगात एवढी मस्ती असेल तर एकमेकांशी फ्रीस्टाईल कुस्त्या खेळा की. प्राण्यांचा छळ का करता?
स्वतःच्या जिव्हालौल्यासाठी व करमणुकीसाठी मुक्या प्राण्यांना यातना देऊन त्यांचा छळ करण्याची प्रथा व परंपरा खूप जुनी आहे व जगात अनेक देशात ती अजून जिवंत आहे. स्पेनमध्ये बुलफाईट प्रकारात एका बैलाला गल्लीबोळातून पळविले जाते. अनेक जण बैलाच्या मागे पळून त्याला जखमी करायचा प्रयत्न करीत असतात. बैल पळताना बाजूला उभे असलेले बघ्ये बैलाला छोटे बाणाच्या आकाराचे लोखंडी भाले फेकून मारतात. अंगात ठिकठिकाणी भाले घुसलेला तो बैल शेवटी बुलफाईटच्या मैदानात येतो. तिथे तलवारी घेऊन तीनचार जण त्याला तलवारीने जखमी करतात. शेवटी मुख्य मॅटॅडोर येतो व जीवाच्या भीतिने आकांताने धावून थकलेल्या, तलवारीच्या वारांमुळे व अंगात घुसलेल्या भाल्यांच्या जखमांच्या यातनांनी कळवळणार्या बैलाचे मस्तक तो तलवारीच्या एका घावात घडावेगळे करतो. जमलेले हजारो प्रेक्षक या मुक्या प्राण्याच्या यातनामय कत्तलीचा आनंद लुटत असतात. मुक्या प्राण्याला इतक्या यातना देताना आनंद कसा मिळू शकतो? वेदनांनी कळवणार्या बैलाच्या वेदनांनी करमणूक कशी होऊ शकते?
भारत देखील या घॄणास्पद प्रकारापासून दूर नाही. शेतीसाठी बैल वापरण्याआधी मोठ्या दांडक्याने बैलाचे वृषण चेचून भुगा करून टाकतात जेणेकरून तो गायीबरोबर आपले नैसर्गिक कृत्य करू शकणार नाही. माणूस त्याची नैसर्गिक उर्मीसुद्धा स्वतःच्या स्वार्थासाठी नष्ट करतो व तीसुद्धा अत्यंत वेदनादायक पद्धतीने. उर्मिला पवार यांच्या 'आयदान' पुस्तकात बैलाच्या खच्चीकरणाचे वर्णन दिले आहे. दांडक्याने वृषण चेचले जात असताना बैलाला किती यातना होत असतील. माणूस त्याला एवढ्या यातना का देतो? बैलाचे वृषण खच्ची करण्याचे काम करणार्या नराधमाचे वृषणही असेच चेचून काढले पाहिजेत म्हणजे त्याला त्या यातना कशा असतील ते कळेल. बैलगाडीला जोडण्यासाठी बैलांच्या तळपायात खिळे ठोकून नाल बसवितात. नाल बसविण्यासाठी आधी बैलाला खाली बसवून आडवे पाडतात व त्याचे चारही पाय बांधून मग खिळे ठोकून नाल बसवितात. नाल बसविताना बैलाच्या डोळ्यातून वेदनांनी पाणी वाहत असते. कशासाठी हा क्रूरपणा? मला कधी कधी वाटते की बैलांच्या तळतळाटामुळेच कदाचित शेतकर्यांची हलाखीची परिस्थिती असावी. आपल्याला यातना देणार्याला बैलांचे शिव्याशाप भोवत असतील.
काही दिवसांपूर्वी कोल्हापूरमध्ये झालेली'पारंपारिक' मेंढ्यांची टक्कर दाखवित होते. जमलेले प्रेक्षक दोन मेंढ्यांच्या आपापसातील टकरीचा आनंद लुटत होते. दोन्ही मेंढे आपल्या पूर्ण ताकदीनिशी दुसर्याच्या कपाळावर जोरदार धडक मारत होते. दोघांनाही वेदना होत असणारच. कदाचित कपाळाची हाडेही मोडत असतील. आणि असल्या क्रूर प्रकाराचा प्रेक्षक आनंद लुटत होते.
काही ठिकाणी कोंबड्यांची झुंज सुद्द्धा लावतात. या झुंजीत कोंबड्याच्या एका पायाला ब्लेडचा अर्धा तुकडा बांधलेला असतो जेणेकरून समोरच्या कोंबड्याचे रक्त निघेल. दोन्ही कोंबडे मूर्खासारखे एकमेकांशी लढाई करून जखमी होतात व माणसे आपली करमणूक करून घेतात.
बैलगाडी शर्यत हा असाच एक क्रूर प्रकार. सुदैवाने सर्वोच्च न्यायालयाने या प्रकाराला सुद्धा बंदी घातली आहे. तरीसुद्धा बैलगाडी शर्यत पुन्हा सुरू करावी यासाठी महाराष्ट्रात जोरदार प्रयत्न सुरू आहेत. या शर्यतीतही बैलांना जोरात पळविण्यासाठी शेपटी पिरगाळणे, खिळा लावलेल्या चाबकाचे फटकारे लावणे असे क्रूर प्रकार केले जातात आणि वेदना होत असताना भीतिने बैल जोरात गाडी पळवितात कारण आपली उच्च प्रथा आणि परंपरा!
नवसासाठी व धार्मिक परंपरेसाठी कोंबड्या, बकर्या कापणे हा प्राण्यांना यातना देण्याचाच एक प्रकार. हे बळी थांबावेत म्हणून संत गाडगेबाबांनी प्रबोधन करण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु अजूनही हा प्रकार सुरूच आहे. मांग जातीत एखाद्याचे लग्न ठरताना किंवा त्याआधी काही वर्षे लग्नासाठी नवर्यामुलाच्या नावाने एक डुक्कर सोडले जाते. ऐन लग्नाच्या वेळी हे डुक्कर पकडून त्याला जिवंत जाळून त्याचे मांस खाल्ले जाते. जिवंत जळताना त्या डुकराला किती भयानक वेदना होत असतील. प्रथा व परंपरा या नावाखाली हे क्रूर प्रकार कायमच सुरू राहणार का?
जिव्हालौल्यासाठी जिवंत प्राणी क्रूर पद्धतीने मारणे हे जगभर सर्वत्र केले जाते. कासव, शिंपले, बेडूक, खेकडे इ. प्राण्यांना जिवंतपणीच उकळत्या पाण्यात टाकणे, बदक/हंस इ. प्राण्यांची आत असलेली मान बाहेर काढण्यासाठी त्याच्या तोंडासमोर खाणे धरणे व खाणे खाण्यासाठी त्याने मान सरळ केल्यावर मानेवर घाव घालून त्यांना मारणे अशा क्रूर पद्धतीने हे प्राणी जिभेचे चोचले पुरविण्यासाठी मारले जातात. अरे प्राणी मारायचा असेल तर निदान त्या प्राण्याला भूल देऊन वीजेचा शॉक देऊन वेदनारहीत मरण तरी द्या. हालहाल कशाला करता?
मुक्या प्राण्यांना प्रथा व परंपरेच्या नावाखाली आपल्या करमणुकीसाठी व जिव्हालौल्यासाठी वेदना, यातना देऊन त्यांचा छळ करणे व नंतर मारून टाकणे हे अत्यंत क्रूरकर्म आहे व या प्रकाराचा मला अतिशय संताप येतो. हे सर्व प्रकार तातडीने कायमस्वरूपी बंद व्हायला हवेत. सुदैवाने सर्वोच्च न्यायालय याविषयी सक्रीय असून या प्रकाराला कायद्याने बंदी घालण्यात येत आहे ही समाधानाची गोष्ट आहे.
आपला सौदा पक्का झाला. निम्मे पैसे पण मिळाले. त्यामुळे मी पण इग्नोर मारला.मुक्या जनावरांचा बैलगाडी शर्यत किंवा शेतीच्या कामासाठी यातना देऊन छळ केला जातो. आम्ही बैलाला कुटुंबातील सदस्याप्रमाणे वागवतो असे शेतकर्यांनी मोठ्या तोंडाने कितीही वेळा सांगितले तरी त्यातील दांभिकपणा लपून राहत नाही. आधी बैलाला यातना देऊन त्याच्या पायात खिळे ठोकून नाल बसवायचे, नंतर कोणत्याही प्रकारची भूल न देता बैलाचे वृषण दांडक्याने चेचून किंवा बैलाच्या वृषणाची रक्तवाहिनी चिमट्याने कापून त्याला कायमस्वरूपी नपुंसक बनवायचे व त्याला जीवघेण्या वेदना देऊन त्याचा नैसर्गिक आनंदही हिरावून घ्यायचा, नंतर आयुष्यभर त्याच्या नाकात वेसण घालून त्याला उन्हात राब राब राबवायचे, त्याला गाडीला जुंपून त्याच्याकडून अवजड मालाची वाहतूक करून घ्यायची, तो थकला की त्याला कसायाला विकून टाकून पैसे कमवायचे . . . आणि आम्ही बैलाला कुटुंबातील सदस्याप्रमाणे वागवतो अशा दांभिक गफ्फा हाणायच्या. कुटंबातील कोणत्याही सदस्याला इतक्या यातना देऊन त्याचे हालहाल केले जातात का? मी पूर्वी लिहिल्याप्रमाणे जर शेतकरी विपन्नावस्थेत असतील तर त्यांनी यातना दिलेल्या मुक्या प्राण्यांचे तळतळाट त्यांना भोवताहेत असेच माझे मत आहे.बैलांचा छळ होतो चला मान्य.नशीब छळ होतो हे मान्य तरी करताय. नाहीतर बैलांना आम्ही प्रेमाने वागवतो, बैल आमच्या कुटंबातील सदस्य असल्याप्रमाणे आम्ही त्याला वागणूक देतो, बैलांचा अजिबात छळ होत नाही, बैलांचा छळ होतो हे आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी केलेला अपप्रचार आहे इ. ब्ला ब्ला आतापर्यंत कानावर पडत होते.तुमच्या मते अशा बैलाचं आताच्या घडीला करायचं काय ? त्यांना मुक्त करून जंगलात सोडून द्यायचे की नागपूरला संघाच्या कार्यालयात पिटाळायची? वस्तुस्थिती नुसार उत्तर द्या. उगाच स्वतःची विचारसरणीच आदर्श आणि महान आहे असे उत्तर नकोय.बैलांचा छळ करू नका, त्यांना यातना देऊ नका, छळ करून बळजबरी करून शर्यतीत पळवून त्यात आनंद मानू नका.बैल हा बैलच असतो. तो माणूस नाही बनू शकत. वरच्या एका प्रतिसादात तुम्हीच म्हंटले आहे. हे शेतकऱ्याला ही चांगले माहित आहे. इथे कुटुंबातील सखे भाऊ-भाऊ एकमेकांचा काटा काढतात, शहरातली मुलं आई बापाला वृद्धाश्रमात धाडतात तिथे बैलाचं काय घेऊन बसलात? दांभिकपणाच्या फुकाच्या गप्पा संघात चांगल्या शोभतात.बैल हा माणूस नसला तरी माणसाला जशा वेदना होतात तशाच त्या बैलालाही होतात. बैलालाही तहान, भूक, शारीरिक प्रेरणा आहेत. स्वतःच्या स्वार्थासाठी मुक्या जनावरांना यातना देऊ नका. आणि दांभिकपणाचं म्हणाल तर तुमच्या बारामतीच्या पद्मश्री पद्मविभूषण डबल डॉक्टर क्रिकेटतज्ज्ञ जाणता राजा साहेबांइतकं जास्त दांभिक जगात दुसरं कोणीही नाही.पाप पुण्याचे भांडवल करून अजून किती दिवस लोकांना गंडवणार आहात.यात काहीही गंडवणूक नाही. गंडवायला मी काही शेतकरी नाही किंवा साहेबांच्या पक्षातही नाही. मुक्या जनावरांना यातना देऊन त्यांचा छळ करू नका हेच मी सुरवातीपासून सांगत आहे.बैलाला नाल तर ठोकलीच पाहिजे. नाहीतर त्याचे पाय घसरतील, खुरे खराब होतील.आपले खूर खराब होतील का चांगले राहतील ते बैल बघून घेईल ना. आपल्या प्रचंड वजनाने गच्च भरलेल्या गाड्या बैलाकडून फुकट ओढून घेताना अडथळे येऊ नयेत यासाठी 'पाय घसरतील', "खूर खराब होतील' अशी हास्यास्पद कारणे देणे हा खोटा कळवळा आहे.औताला जुंपायच नाही म्हंटलं तर त्या बैलाला दारात बांधून त्याचा बरोबर सेल्फी काढत चेपुवर पोस्ट करण्याने फायदा होणार नाही.बैलांविषयी खोटा कळवळा दाखवूनही फायदा होणार नाही. शेत नांगरायला ट्रॅक्टर वापरा. नाहीतर स्वतः औताला जुंपुन घ्या. त्यासाठी मुक्या जनावरांचा छळ करू नका.चाप नाही दिला तर काय होईल ते मागे आपण चर्चिले आहेच.तो प्रतिसाद अत्यंत हास्यास्पद होता. बैलाला चाप देण्यामागे किंवा त्याचे वृषण दांडक्याने चेचून त्याला नपुसंक करण्यामागे (दोन्ही प्रकार भूल न देता) फक्त स्वतःचा स्वार्थ आहे. त्यामागे बैलाचे कोणतेही हित नाही. फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी बैलाला प्राणांतिक यातना देऊन त्याचा नैसर्गिक आनंदसुद्धा कायमस्वरूपी हिरावून घेऊन त्याचे समर्थन करणे हा पराकोटीचा ढोंगीपणा आहे.शर्यतीत नाही पळवली तर खिल्लारी जातीच्या बैलांची जपवणूक कशी होईल.ख्यॅ ख्यॅ ख्यॅ . . .बैले नको असतील तर लोक गाई कशाला पाळतील.दोन्ही पाळू नकागाई नसतील तर वासू बारसेला अकृषक लोक नैवद्य कोणाला खाऊ घालतील. गाई नसतील तर संघाच्या कथित महागुरुंची दुकाने कशी चालतील हे महा गुरु(?) नसतील तर भाबडे गोरक्षकांना काम उरेल काय? (कथित) गोरक्षक नसतील तर राष्ट्रीय समस्या कशी निर्माण होईल? राष्ट्रीय समस्या नसतील तर मिपावर लेख/प्रतिसाद कसे झडतील? मिपा ओस पडेल ओस.या प्रश्नांची उत्तरे थोरल्या साहेबांना विचारा. ते डबल डॉक्टर, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, क्रिकेटतज्ज्ञ वगैरे वगैरे आहेत. त्यांना शेतीची, महाराष्ट्रातील समस्यांची खडानखडा माहिती आहे. ते 'अपनी शर्तोंपर" काम करतात. जगात अशी कोणतीच समस्या नाही ज्याचे उत्तर त्यांच्याकडे नाही.बैलाचं करायचं काय ते सांगा. जंगलात सोडायचे का संघाच्या गोशाळेत. (कथित गोरक्षक गोशाळेत गुरांना किती अदबीने सांभाळतात आम्हाला चांगले माहिती आहे. दांभि(स)क कुठचे..!!)कोठेही सोडा. त्यांना पाहिजे तिथे ते जातील. तुम्ही त्यांची खोटीखोटी काळजी करू नका. स्वतःजवळ ठेवायचे असतील तर त्यांचा जीवघेण्या यातना देऊ नका, त्यांचा छळ करू नका, त्यांच्यावर क्रूर अत्याचार करू नका आणि कसायाकडे पाठवू नका.==> ते फक्त संघ विचारसरणी, काही मराठे जे स्वतःला खूप उच्च कोटीचे समजतात, नादान तरुण पिढी आणि अप्पलपोटी नेत्यांना वाटतं. आम्हाला त्यांचे विचार पटतात, कोणाला पटो न पटो.फिदीफिदी फिसफिस फिदीफिदी फिसफिस . . .==> यातना देऊन छळ करणे मान्य पण वर जे काही तुम्हाला यातना वाटतात ते शेतकऱ्यांच्या लेखी बैलांसाठी गरजेचे आहे. आणि ते नकोच असे वाटत असेल तर त्यासाठी उपाय सुचवा. व्यावहारिक असेल तर नक्की स्वीकार करतील शेतकरी. (नाल ठोकणे, वेसण घालणे, चाप देणे, औताला जुंपणे. शर्यतीच्या बाबतीत थोडाफार मी तुमच्या बाजूने आहे, काही गोष्टी मला ही नाही पटत. पण संपूर्ण बंदीला असहमत)ती बैलांची गरज नसून तो निव्वळ तुमचा स्वार्थ आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी मुक्या प्राण्यांना यातना देऊन त्यांच्यावर अत्याचार करू नका.बाकी ते बैलाला कुटुंबातील सदस्याप्रमाणे वागवतो वगैरे बाता निरर्थक असतात हे खरेच आहे. शेतकरी विपन्नावस्थेत वगैरे प्रमाणेच.हहपुवासाफ चूक ! उठसूट सती पाठवायची प्रथा अस्तित्वात नव्हतीच मुळातून. कायद्याने सती बंद केली ही शुद्ध दिशाभूल आहे.धन्य आहे!