Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कधी थांबणार हा क्रूरपणा???????

श
श्रीगुरुजी
गुरुवार, 01/19/2017 - 19:39
🗣 282 प्रतिसाद
काय वेडेपणा चाललाय! सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातलेली जालिकट्टू नावाची क्रूर प्रथा पुन्हा एकदा सुरू करावी यासाठी तामिळींचा जीव चाललाय. काही ठिकाणी बंदी झुगारून जालिकट्टू आयोजित करण्याचे प्रयत्न झाले. पण पोलिसांनी ते हाणून पाडले. तामिळनाडूचे मुख्यमंत्री ओ पनीरसेल्वम् यांनी तर केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय झुगारून जालिकट्टू पुन्हा सुरू करण्याचा अध्यादेश काढावा अशी विनंती करण्यासाठी थेट दिल्ली गाठून पंतप्रधान मोदींची भेट घेतली. सर्वात वाईट भाग म्हणजे संगीतकार रहमान, माजी जागतिक बुद्धीबळ विश्वविजेता विश्वनाथन् आनंद याने सुद्धा जालिकट्टू पुन्हा सुरु करण्यासाठी पाठिंबा दिलाय. ही आमची अत्यंत जुनी परंपरा आहे, आम्ही ती चालू ठेवणारच, आमच्या परंपरेवर बंदी घालण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला कोणी दिला अश्या आविर्भावात निदर्शने सुरू आहेत. जालिकट्टू तामिळींच्या जीवनमरणाचा प्रश्न झाला आहे. जुनी परंपरा, प्रथा इ. गोष्टी खर्‍या असल्या तरी असल्या प्रथेत मुक्या प्राण्याचा छळ होतोय त्याचं काय? ते बैल काय स्वतः यातना सहन करून तुमची करमणू़क करण्याकरता या जगात आलेत का? एका वाहिनीवर दाखवित होते. एका बैलाभोवती सातआठ लुंगीधारी उभे होते. त्यातला एकजण बैलाची शेपटी ओढून जोरात पिरगाळत होता. दुसरा एकजण शेपटी दाताखाली धरून चावत होता. अरे कशासाठी त्या बैलाला यातना देता? परंपरा आणि प्रथा म्हणून? ही कसली क्रूर परंपरा? मुक्या प्राण्याला यातना देऊन कसली आलीय करमणू़क आणि प्रथा? अंगात एवढी मस्ती असेल तर एकमेकांशी फ्रीस्टाईल कुस्त्या खेळा की. प्राण्यांचा छळ का करता? स्वतःच्या जिव्हालौल्यासाठी व करमणुकीसाठी मुक्या प्राण्यांना यातना देऊन त्यांचा छळ करण्याची प्रथा व परंपरा खूप जुनी आहे व जगात अनेक देशात ती अजून जिवंत आहे. स्पेनमध्ये बुलफाईट प्रकारात एका बैलाला गल्लीबोळातून पळविले जाते. अनेक जण बैलाच्या मागे पळून त्याला जखमी करायचा प्रयत्न करीत असतात. बैल पळताना बाजूला उभे असलेले बघ्ये बैलाला छोटे बाणाच्या आकाराचे लोखंडी भाले फेकून मारतात. अंगात ठिकठिकाणी भाले घुसलेला तो बैल शेवटी बुलफाईटच्या मैदानात येतो. तिथे तलवारी घेऊन तीनचार जण त्याला तलवारीने जखमी करतात. शेवटी मुख्य मॅटॅडोर येतो व जीवाच्या भीतिने आकांताने धावून थकलेल्या, तलवारीच्या वारांमुळे व अंगात घुसलेल्या भाल्यांच्या जखमांच्या यातनांनी कळवळणार्‍या बैलाचे मस्तक तो तलवारीच्या एका घावात घडावेगळे करतो. जमलेले हजारो प्रेक्षक या मुक्या प्राण्याच्या यातनामय कत्तलीचा आनंद लुटत असतात. मुक्या प्राण्याला इतक्या यातना देताना आनंद कसा मिळू शकतो? वेदनांनी कळवणार्‍या बैलाच्या वेदनांनी करमणूक कशी होऊ शकते? भारत देखील या घॄणास्पद प्रकारापासून दूर नाही. शेतीसाठी बैल वापरण्याआधी मोठ्या दांडक्याने बैलाचे वृषण चेचून भुगा करून टाकतात जेणेकरून तो गायीबरोबर आपले नैसर्गिक कृत्य करू शकणार नाही. माणूस त्याची नैसर्गिक उर्मीसुद्धा स्वतःच्या स्वार्थासाठी नष्ट करतो व तीसुद्धा अत्यंत वेदनादायक पद्धतीने. उर्मिला पवार यांच्या 'आयदान' पुस्तकात बैलाच्या खच्चीकरणाचे वर्णन दिले आहे. दांडक्याने वृषण चेचले जात असताना बैलाला किती यातना होत असतील. माणूस त्याला एवढ्या यातना का देतो? बैलाचे वृषण खच्ची करण्याचे काम करणार्‍या नराधमाचे वृषणही असेच चेचून काढले पाहिजेत म्हणजे त्याला त्या यातना कशा असतील ते कळेल. बैलगाडीला जोडण्यासाठी बैलांच्या तळपायात खिळे ठोकून नाल बसवितात. नाल बसविण्यासाठी आधी बैलाला खाली बसवून आडवे पाडतात व त्याचे चारही पाय बांधून मग खिळे ठोकून नाल बसवितात. नाल बसविताना बैलाच्या डोळ्यातून वेदनांनी पाणी वाहत असते. कशासाठी हा क्रूरपणा? मला कधी कधी वाटते की बैलांच्या तळतळाटामुळेच कदाचित शेतकर्‍यांची हलाखीची परिस्थिती असावी. आपल्याला यातना देणार्‍याला बैलांचे शिव्याशाप भोवत असतील. काही दिवसांपूर्वी कोल्हापूरमध्ये झालेली'पारंपारिक' मेंढ्यांची टक्कर दाखवित होते. जमलेले प्रेक्षक दोन मेंढ्यांच्या आपापसातील टकरीचा आनंद लुटत होते. दोन्ही मेंढे आपल्या पूर्ण ताकदीनिशी दुसर्‍याच्या कपाळावर जोरदार धडक मारत होते. दोघांनाही वेदना होत असणारच. कदाचित कपाळाची हाडेही मोडत असतील. आणि असल्या क्रूर प्रकाराचा प्रेक्षक आनंद लुटत होते. काही ठिकाणी कोंबड्यांची झुंज सुद्द्धा लावतात. या झुंजीत कोंबड्याच्या एका पायाला ब्लेडचा अर्धा तुकडा बांधलेला असतो जेणेकरून समोरच्या कोंबड्याचे रक्त निघेल. दोन्ही कोंबडे मूर्खासारखे एकमेकांशी लढाई करून जखमी होतात व माणसे आपली करमणूक करून घेतात. बैलगाडी शर्यत हा असाच एक क्रूर प्रकार. सुदैवाने सर्वोच्च न्यायालयाने या प्रकाराला सुद्धा बंदी घातली आहे. तरीसुद्धा बैलगाडी शर्यत पुन्हा सुरू करावी यासाठी महाराष्ट्रात जोरदार प्रयत्न सुरू आहेत. या शर्यतीतही बैलांना जोरात पळविण्यासाठी शेपटी पिरगाळणे, खिळा लावलेल्या चाबकाचे फटकारे लावणे असे क्रूर प्रकार केले जातात आणि वेदना होत असताना भीतिने बैल जोरात गाडी पळवितात कारण आपली उच्च प्रथा आणि परंपरा! नवसासाठी व धार्मिक परंपरेसाठी कोंबड्या, बकर्‍या कापणे हा प्राण्यांना यातना देण्याचाच एक प्रकार. हे बळी थांबावेत म्हणून संत गाडगेबाबांनी प्रबोधन करण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु अजूनही हा प्रकार सुरूच आहे. मांग जातीत एखाद्याचे लग्न ठरताना किंवा त्याआधी काही वर्षे लग्नासाठी नवर्‍यामुलाच्या नावाने एक डुक्कर सोडले जाते. ऐन लग्नाच्या वेळी हे डुक्कर पकडून त्याला जिवंत जाळून त्याचे मांस खाल्ले जाते. जिवंत जळताना त्या डुकराला किती भयानक वेदना होत असतील. प्रथा व परंपरा या नावाखाली हे क्रूर प्रकार कायमच सुरू राहणार का? जिव्हालौल्यासाठी जिवंत प्राणी क्रूर पद्धतीने मारणे हे जगभर सर्वत्र केले जाते. कासव, शिंपले, बेडूक, खेकडे इ. प्राण्यांना जिवंतपणीच उकळत्या पाण्यात टाकणे, बदक/हंस इ. प्राण्यांची आत असलेली मान बाहेर काढण्यासाठी त्याच्या तोंडासमोर खाणे धरणे व खाणे खाण्यासाठी त्याने मान सरळ केल्यावर मानेवर घाव घालून त्यांना मारणे अशा क्रूर पद्धतीने हे प्राणी जिभेचे चोचले पुरविण्यासाठी मारले जातात. अरे प्राणी मारायचा असेल तर निदान त्या प्राण्याला भूल देऊन वीजेचा शॉक देऊन वेदनारहीत मरण तरी द्या. हालहाल कशाला करता? मुक्या प्राण्यांना प्रथा व परंपरेच्या नावाखाली आपल्या करमणुकीसाठी व जिव्हालौल्यासाठी वेदना, यातना देऊन त्यांचा छळ करणे व नंतर मारून टाकणे हे अत्यंत क्रूरकर्म आहे व या प्रकाराचा मला अतिशय संताप येतो. हे सर्व प्रकार तातडीने कायमस्वरूपी बंद व्हायला हवेत. सुदैवाने सर्वोच्च न्यायालय याविषयी सक्रीय असून या प्रकाराला कायद्याने बंदी घालण्यात येत आहे ही समाधानाची गोष्ट आहे.

प्रतिक्रिया द्या
73607 वाचन

💬 प्रतिसाद (282)
व
विशुमित Fri, 01/20/2017 - 07:01 नवीन
अण्णांची बुल फाईट अन वातावरण टाईट..!!
  • Log in or register to post comments
स
संजय पाटिल Fri, 01/20/2017 - 07:49 नवीन
मला माहित नव्हतं हे जालिकट्टु काय आहे ते, म्हणून युट्यूब वर हा व्हिडीओ बहितला. वायझेड पणा आहे सगळा..
  • Log in or register to post comments
N
nanaba Fri, 01/20/2017 - 09:14 नवीन
बरोबर बोलla
  • Log in or register to post comments
स
सुखीमाणूस Fri, 01/20/2017 - 09:40 नवीन
माणसाच्या सुखासाठी जे प्राण्यान्चे हाल केले जातात ते आताच्या काळात तरी थाम्बले पाहिजेत. या शर्यती केवळ मनोरन्जनासाठी असतात, त्यान्ची काय आता आवश्यकता?
  • Log in or register to post comments
म
मालोजीराव Fri, 01/20/2017 - 10:11 नवीन
प्राण्यांच्या वेदना मांडल्याबद्दल लेखकांना बैलगाडा शर्यतीचे फ्री पासेस देण्यात येतील !
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Fri, 01/20/2017 - 10:59 नवीन
जल्लीकट्टू या प्रकाराचे नावही मला अगदी अलीकडल्या काळापर्यंत माहित नव्हते. पण एक गोष्ट नक्कीच सांगाविशी वाटते. जर शेतकरी या प्रकारात बैल वापरत असतील तर बैलांचा छळ करून आपण आपल्याच पायावर धोंडा पाडत आहोत हे त्यांच्या लक्षात येत नसेल असे वाटत नाही. शेवटी गाई-बैलांवर त्यांचे पोट अवलंबून असल्यामुळे त्यांचे प्राण्यांवर पोटच्या मुलांप्रमाणे प्रेम असते असे मला आतापर्यंत वाटत होते. तेच शेतकरी बैलांचा असा अमानुष छळ करत असतील हे अनाकलनीय आहे. त्यातूनच विविध पुरोगामी या प्रकाराविरूध्द एकजात उभे ठाकले आहेत त्यामुळे हा प्रकार इतका अमानुष आहे की तो भरपूर मीठमसाला टाकून सांगितला जात आहे ही शंका अजूनच बळावली आहे. शेवटी भारतीय (किंबहुना हिंदू) मूर्ख कसे हे सांगण्यात त्यांचा जन्म गेला असल्यामुळे अशा लोकांनी कुठल्याही प्रकारात उडी टाकली की ते चिमूटभर नव्हे तर मूठभर मीठासह घ्यावेसे वाटते. मिपावरील सगळ्यात कट्टर प्राणीप्रेमी असतील त्यात माझा नंबर बराच वरचा आहे हे नक्कीच.तेव्हा बैलांचा असा अमानुष छळ होत असेल तर त्याला माझाही प्रचंड विरोध आहे. पण सांगायचे इतकेच की ज्याच्यावर आपले पोट अवलंबून आहे त्याच बैलांचा असा छळ करण्याइतके शेतकरी मूर्ख असतील आणि आपल्याच पायावर धोंडा पाडणारी अशी परंपरा ग्रामीण भागातही इतकी शतके टिकू शकेल यावर विश्वास ठेवायला जड जाते इतकेच.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 01/20/2017 - 11:05 नवीन
तुम्हाला ज्या प्रकारचे पुरोगामी अभिप्रेत आहेत त्यातला मी नाही. परंतु स्वतःच्या स्वार्थासाठी, चरितार्थासाठी व मनोरंजनासाठी मुक्या प्राणीपक्षांचा छळ करून त्यांना मरणांतिक यातना देणे या प्रकाराचा मला अत्यंत संताप येतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ग
गॅरी ट्रुमन Fri, 01/20/2017 - 11:14 नवीन
तुम्हाला ज्या प्रकारचे पुरोगामी अभिप्रेत आहेत त्यातला मी नाही.
नक्कीच :)
परंतु स्वतःच्या स्वार्थासाठी, चरितार्थासाठी व मनोरंजनासाठी मुक्या प्राणीपक्षांचा छळ करून त्यांना मरणांतिक यातना देणे या प्रकाराचा मला अत्यंत संताप येतो.
मलाही. फक्त मुद्दा इतकाच की शेतकरी बैलांवर किती अवलंबून असतात हे जगजाहिर असताना त्यांचाच असा छळ करण्याइतके ते मूर्ख असतात की हा सगळा प्रकार जितका आहे त्यापेक्षा बराच जास्त मीठमसाला लावून सांगितला जात आहे हे समजत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
व
विशुमित Fri, 01/20/2017 - 11:49 नवीन
<<<फक्त मुद्दा इतकाच की शेतकरी बैलांवर किती अवलंबून असतात हे जगजाहिर असताना त्यांचाच असा छळ करण्याइतके ते मूर्ख असतात की हा सगळा प्रकार जितका आहे त्यापेक्षा बराच जास्त मीठमसाला लावून सांगितला जात आहे हे समजत नाही.>>> -- माझे ना जल्लीकट्टू ला समर्थन आहे ना शर्यतींना, हे पहिले नमूद करू इच्छितो. फक्त विनंती आहे सारखे मूर्ख मूर्ख म्हणून शेतकऱ्यांबद्दल नाकाने कांदे सोलू नका. (ह्या वाक्याने झोंबेल बहुतेक ) राहिला प्रश्न जल्लिकट्टूचा किंवा शर्यतींचा सगळीच बैलं त्यासाठी वापरतात का हो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
अ
अप्पा जोगळेकर Fri, 01/20/2017 - 11:03 नवीन
Rules[11] 1.The Bull will be released on the the arena through the entry gate called ‘ Vadivasal’. 2.The bull tamer / contestant should try to ‘catch’ the bull by holding onto its hump only. 3.The bull-tamer should hold onto the bull till it crosses the ‘finish’ line. (Usually it is about 50 feet, marked by hanging overhead marker flags along the line.) 4.If the bull throws the tamer off before the line or if no-one manages to hold on to the bull, then the bull will be declared victorious. 5.If the bull-tamer manages to hold on to the hump till it crosses the ‘finish line’, then the bull tamer is declared the winner. 6.Only one bull tamer should hold on to the bull at one time. If more than one bull tamers hold on to the bull, then there is no winner. 7.The bull tamer should ONLY hold on to the hump. He should NOT hold on to the neck or horns or tails of the bull. Such tamers will be disqualifies. 8.No bull tamer will hit or hurt the bull in any manner. हे जल्लीकट्टूचे नियम विकीवर वाचले. जर असे नियमाप्रमाणे होत असेल तर आक्षेप घ्यावा असे काही नाही.
  • Log in or register to post comments
व
विशुमित Fri, 01/20/2017 - 11:10 नवीन
माझ्या ही वाचनात असेच आले आहे. यात काय बैलांवर अत्याचार होतात हे नाही समजलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
प
पैसा Fri, 01/20/2017 - 11:13 नवीन
Controversy Animal activists, the Federation of Indian Animal Protection Organisations(FIAPO)[14] and PETA India have protested against the practice since 2004.[15] Protestors claims that Jallikattu is promoted as bull taming, but it exploits the bulls' natural nervousness as prey animals by deliberately placing them in a terrifying situation in which they are forced to run away from those they perceive as predators and the practice effectively involves catching a terrified animal.[16] Along with human injuries and fatalities, sometimes bulls themselves sustain injuries which people believe as a bad omen for the village. Other animal welfare concerns surround the handling before the bulls are released. Practices include prodding the bull with sticks or scythes, and extreme bending and biting of the bull's tail.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
फ
फेदरवेट साहेब Fri, 01/20/2017 - 12:26 नवीन
येस आपुनबी ह्येच वाच्यला विकीमंदी. अन हेच्यावरून बुल वर अत्याचार होत असल असे वाटत न्हाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
व
विशुमित Fri, 01/20/2017 - 11:07 नवीन
<<<असा छळ करण्याइतके शेतकरी मूर्ख असतील >>> -- गॉड गॉड भाषा वापरून शब्दाच्या गोफणी शेतकऱ्याच्या तोंडावर नका मारू.
  • Log in or register to post comments
म
मोदक Fri, 01/20/2017 - 11:28 नवीन
इंटरनेटवर बघितलेले एक चित्र आठवले.. डाव्या बाजूने मासे, कोंबडी, बोकड, डुक्कर, गाय आणि सर्वात शेवटी माणूस असे प्राणी क्रमाने दाखवले होते व विचारले होते की "तुमची भूतदयेची रेषा नक्की कोणाच्या मध्ये आहे..?" ते चित्र कुणाला सापडले तर प्लीज द्या.
  • Log in or register to post comments
च
चिनार Fri, 01/20/2017 - 12:30 नवीन
गुरुजी...तुमचा प्राणिमात्रांविषयी असलेला कळवळा दिसतो आहे. अत्यंत पोटतिडकीने तुम्ही लिहिले आहे. कोणत्याही प्राण्याने स्वतःच्या स्वार्थासाठी आणि मनोरंजनासाठी इतर प्राण्याला त्रास देऊन नये असे तुम्हाला म्हणायचे आहे. गुरुजी पण ह्या हिशोबानी तर पुनरुत्पादनाची प्रक्रिया बंदच करायला हवी. त्यातही प्रत्यक्ष क्रियेत,नंतरच्या गरोदरपणाच्या काळात आणि प्रत्यक्ष प्रसूतीमध्ये मादीला खूप त्रास होतो, प्रचंड वेदना होतात. हा उपरोध नाही. प्राण्यांचे खेळ बंद व्हायला हवे असे माझेही मत आहे. पण तुमचा 'सगळंच बंद करा' हा स्टॅन्ड मानवजातीला परवडणारा नाही.
  • Log in or register to post comments
व
विशुमित Fri, 01/20/2017 - 12:45 नवीन
बरं एकवेळ प्राण्यांचे खेळ करून मनोरंजन करणे गैर समजू पण शेतीसाठी बैल पण वापरायचे नाही ? म्हणून गुरुजींचा स्टॅन्ड चुकीचा वाटला. (त्यात अजून ते पेस्ट कंट्रोल करतात का हे समजलं नाही, मग चर्चा अजून रोचक होईल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार
श
श्रीगुरुजी Fri, 01/20/2017 - 12:55 नवीन
>>> गुरुजी पण ह्या हिशोबानी तर पुनरुत्पादनाची प्रक्रिया बंदच करायला हवी. त्यातही प्रत्यक्ष क्रियेत,नंतरच्या गरोदरपणाच्या काळात आणि प्रत्यक्ष प्रसूतीमध्ये मादीला खूप त्रास होतो, प्रचंड वेदना होतात. सहमत आहे. हळूहळू संतती नको असणाऱ्या जोडप्यांची संख्या वाढत आहे. आपल्याला संतती हवी का नको हा दोघांचा निर्णय असायला हवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार
च
चिनार Fri, 01/20/2017 - 13:28 नवीन
गुरुजी...आदरयुक्त नमस्कार स्वीकारावा ! एक डाऊट: गुरुजी नक्की तुम्हीच बोलताय ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
अ
अप्पा जोगळेकर Fri, 01/20/2017 - 13:54 नवीन
गुर्जींचा आय्डी हॅक झाला बहुतेक. दूध पिणार्‍या तान्ह्या बाळाचा बर्‍याच मातांना त्रास होतो. म्हणजे ओढाताण (शब्दशः) सहन होत नाही. (आणि नंतर नवर्‍यांना पण ताप होतो डोक्याला ) काय करायचे ? हे मी हॅकरला एक जोक म्हणून विचारत आहे. गुर्जींना नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
N
nanaba Sun, 01/22/2017 - 15:23 नवीन
Baryach vagaire chukicha samaj ahe.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
N
nanaba Sun, 01/22/2017 - 04:04 नवीन
क्ऱुपया २ अनरिलेटेड गोष्टी मिक्स करू नका. पुनरुत्पादन कुणी 'करायला लावायची ' गरज नाही. मनोरंजनाकरताचे दुसऱ्या प्राण्यावर केलेले अत्याचार प्रकृती नसून विकृती आहेत. गाढवाला पाणी पाजणाऱ्या नाथांच्या महाराष्ट्रात अजूनही ही चर्चा व्हावी - हेच वाईट आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार
फ
फेदरवेट साहेब Sun, 01/22/2017 - 15:01 नवीन
खरंय हो , नाथ गेले वैकुंठी मात्र अजूनश्यानी काही गाढवे जिवंत आहेत... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: nanaba
अ
अप्पा जोगळेकर Fri, 01/20/2017 - 12:42 नवीन
या खेपेला गुर्जींचा स्टान्स अजिबातच पटलेला नाही. अगदी जैन मुनींसारखेच वाटत आहे. श्वास घेताना सुद्धा अनेक सूक्षम्जंतू मरतात.
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Fri, 01/20/2017 - 13:19 नवीन
गुरुजी तुम्ही दूध/दुग्धजन्य पदार्थ खाता का?
  • Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर Fri, 01/20/2017 - 13:49 नवीन
ते सोया मिल्क पीत असतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
R
Ranapratap Fri, 01/20/2017 - 13:57 नवीन
आपण लिहीलेल्या लेखा बाबत मि असहमत आहे. बैलंचि शर्यत ही खास बैलाकडूंन केलि जाते. या बैलाना इत र कोणतेही काम लावले जात नाही. तसेच त्याना मारहांन केलि जात नही. या शर्यति चा हा नियम आहे. आपन शेति व पाळीव जनावरा बाबत किति माहिती आहे या बाबत शंका आहे. बैलांचे खच्चीकरंन है योग्य मानसाकडूंन केले जाते.
  • Log in or register to post comments
फ
फेदरवेट साहेब Fri, 01/20/2017 - 14:53 नवीन
येस मागं आपुन सकाळ ऍग्रो वन मंदी एक न्यूज वाचला होता, जुन्नर साईडला एक रेसिंगच्या बैल समथिंग 15 का 20 लॅक्स ला विकला गेला हुता. तेच्या ओनर ने सांगितला हुता रोज त्येला वन केजी व्हाईट बटर (लोणी) ओन्ली शोल्डर मालिशला युज होत असे. त्येंचा डायट बी लैच रिच हुता, तवा त्येंनी रेस मंदी पळावे म्हणूनश्यांनी त्येंना लैच ओप्रेशन सहन कराया लागते असा काय नाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Ranapratap
स
संदीप डांगे Fri, 01/20/2017 - 14:00 नवीन
क्रूरपणाची उदाहरणे खूप सापडतील, तेव्हा खरंच कोणकोणता क्रूरपणा थांबवावा असं होऊन जाईल.. शेतीमधे किटक, कृमी आणि अळ्या मारायला जबरदस्त औषधे असतात. जबरदस्त म्हणजे ती काम कशी करतात हे बघायचे. साधारणपणे घरात झुरळांवर, मुंग्यांवर हिट स्प्रे केलं की ते तडफडून मरतात असं आपल्या डोळ्यांनी दिसतं. शेतातल्या किटक-कृमी-अळ्यांवर जी औषधे काम करतात त्यात दोन मुख्य प्रकार आहेत. एक म्हणजे सिस्टेमिक (आंतरप्रवाही) व दुसरा कॉन्टॅक्ट (स्पर्शजन्य). आपण घरात जे हिट स्प्रे वापरतो तो सिन्थेटिक पेस्टिसाईड ह्या प्रकारात येतो. ह्यात किटकाच्या रंध्रांमधून रासायनिक पदार्थ थेट आत शरिरात घुसतात व त्याच्या मज्जातंतूंवर हल्ला करुन त्यांचे काम थांबवतात, जीवंत राहण्यासाठी चालू असलेल्या सर्व क्रिया बंद पडतात. एक जीव असा तडफड तडफड करत मरुन जातो. सिस्टेमिक म्हणजे हे औषध झाडांमधे शोषले जाते, झाडांच्या रसवाहिन्यांमधून फिरुन ते पेशीपेशींपर्यंत पोचते, मग अळी-किटक कुठलाही भाग तोडून खाऊ लागले की हे औषध त्यांच्या पोटात जाते व त्याच्या चेतासंस्थेवर घातक परिणाम करुन त्यांना पॅरालाइज करतं. लुळं पडल्याने किटक-अळी काही खाऊ शकत नाहीत व उपासमारीने त्यांचा मृत्यू होतो. (ही किटकनाशके रोप व फळांमधे तशीच राहतात व धूवून जात नाहीत हे विशेष. त्यांचे रेसिड्यू सापडतात व ते मनुष्यास कॅन्सर करतील इतपत हानिकारक असू शकतात. झाडांना दिल्यावर ही ४० दिवसांपर्यंत झाडांमधे राहू शकतात. ) कॉन्टॅक्ट म्हणजे स्पर्शजन्य किटकनाशके थेट किटकांच्या शरिरात प्रवेश करतात, धमन्यांतून सर्व शरिरात प्रवाहित होऊन मेंदूवर आघात करतात, पॅरालाइज होऊन किटक खाऊ शकत नाही व मरतात. (ही किटकनाशके धुवून निघून जातात, मनुष्यास तसा थेट त्रास शक्यतो होत नाही.) मी ज्या सेंद्रीय औषधांसोबत काम केलंय त्यांची मोड ऑफ अ‍ॅक्शन ह्यापेक्षा थोडी वेगळी होती, पानांवर फवारले असता पानांचा भाग कुरडणार्‍या अळीचा तोंडाचा भाग सूजून येतो व ती काही खाऊ शकत नाही, उपाशीच फिरत राहते व दोन-ते-चार दिवसात प्रचंड उपासमारीने तिचे मरण ओढवते. (ह्याचे झाडांवर व माणसांवर परिणाम होत नाहीत.) अजून एक प्रकार म्हणजे प्रीडेटर स्पीसिज, ज्या किटकांचा प्रादुर्भाव झालाय त्या किटकांना खाद्य म्हणून वापरणारे किटक-पक्षी-कृमी आणून सोडणे. ह्यात प्रीडेटर सुखाने बागडत असलेल्या कृमी-किटकांवर निर्मम हल्ला करतात त्यांचे नैसर्गिक इच्छा, आकांक्षा पूर्ण होण्याआधीच मारले जातात. हे सगळं मनुष्य आपल्या स्वार्थासाठी घडवून आणतो. अशा अनेक मोड ऑफ अ‍ॅक्शन असतात ज्यावर खूप विचार संशोधन करुन किटकाला कसे मारायचे ह्याची औषधे तयार होतात आणि वापरली जातात. किटक-कृमींना त्यांचे नैसर्गिक हक्क न देता जीव घेतला जातो. तसेच झाडा-झुडपांनाही अनैसर्गिक रित्या वाढवून, अत्याचार करुन जास्त फळे, फुले काढायला भाग पाडलं जातं. गाईला दूधासाठी इण्जेक्शन देण्याची कथा तशाच झाडांनाही बर्‍याच यातना असतात. तरीही लोक शाकाहाराची इतकी भलामण करतात की बस.... त्यामुळे दृष्टीआड सृष्टी असलेली बरी असते. =))
  • Log in or register to post comments
अ
अनरँडम Fri, 01/20/2017 - 16:07 नवीन
मुक्या प्राण्यांना प्रथा व परंपरेच्या नावाखाली आपल्या करमणुकीसाठी व जिव्हालौल्यासाठी वेदना, यातना देऊन त्यांचा छळ करणे व नंतर मारून टाकणे हे अत्यंत क्रूरकर्म आहे व या प्रकाराचा मला अतिशय संताप येतो.
मलाही संताप येतो. पण मी दुग्धजन्य पदार्थ आहारात वापरतो. गायी-म्हशींचे दुध काढत असतांना त्यांना यातना होत असाव्यात. या गायी-म्हशींना रोज सहन कराव्या लागणार्‍या यातनांपेक्षा 'छळ करणे व नंतर मारून टाकणे' हे नैतिकदृष्ट्या अधिक सरस किंवा कसे हे मला माहीत नाही. त्यामुळे मी नैतिक श्रेष्ठत्वाची भुमिका घेऊ इच्छित नाही. तुमच्या लेखात तुम्ही ते श्रेष्ठत्व घेतलेले दिसते हे मला जाणवले. तुम्ही कुठल्याही प्राण्याला यातना न होता तुमचे आजपर्यंतचे जीवन व्यतित केले आहे हे पाहून तुमचे कौतुक वाटते.
  • Log in or register to post comments
फ
फेदरवेट साहेब Fri, 01/20/2017 - 17:04 नवीन
त्येनला हारत असलेल्या डिबेट मंदी बी स्कोर करायचा असल .तेच्यामुळं त्ये डास बी मारत नसल्याचे स्टेट करत असेल नी. बिज्या तर काय रिजन दिसत नाय :P .
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Fri, 01/20/2017 - 17:12 नवीन
जल्ली कस्ली परंपरा पण सर्वोच्च न्यायालयात विरोधी निकाल देणार साहेब हिंदीभाषिक नसला म्हणजे मिळवली. नाहीतर काही अण्णा लोक्स परत हिंदीविरोधाचे राजकारण करायला पण मागेपुढे पाहणार नाहीत.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Sat, 01/21/2017 - 07:27 नवीन
तामिळनाडू सरकारने जल्लीकट्टूवर काढलेल्या अध्यादेशाला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. राष्ट्रपतींनी त्यावर काही आक्षेप घेतले नाहीत तर जल्लीकट्टू अधिकृतपणे साजरा करता येईल. या प्रकारात बैलांचा खरोखरच अमानुष छळ होत आहे का की नेहमीप्रमाणे पुरोगाम्यांनी हे मीठमसाला लावून चित्र उभे केले आहे हे समजायला मार्ग नाही. काहीही झाले तरी प्राण्यांचा छळ होऊ नये हे नक्कीच वाटते. पण त्याचबरोबर हा प्रकार करणारे सगळे शेतकरी मूर्खच हे चित्र मिडियामध्ये उभे केले जात आहे ते योग्य आहे का हे पण तपासून बघायचा काहीतरी मार्ग हवा असे पण वाटते. (एक प्राणीप्रेमी) ट्रुमन
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 01/21/2017 - 10:05 नवीन
सर्वोच्च न्यायालयात निर्णय प्रलंबित असताना केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पहायला हवी होती. त्याऐवजी तामिळींच्या दबावाखाली येऊन जालिकट्टूला परवानगी देण्याच्या अध्यादेशाला हिरवा कंदील दाखविला. भाजपला तसेही तामिळनाडूत फारसे स्थान नाही व भविष्यात तामिळनाडूतून भरघोस खासदार/आमदार निवडून येण्याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे अध्यादेशाला पाठिंबा देऊन भाजपला निवडणुकीत नारळच मिळणार आहे. त्यामुळे अध्यादेशाला विरोध करून निदान उच्च नैतिक भूमिका तरी घेता आली असती. परंतु अध्यादेशाला केंद्र सरकारने दबावाखाली पाठिंबा दिलेला अजिबात आवडलेला नाही. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे विचारी व संतुलित विचारांचे आहेत. ते दबावाखाली या अध्यादेशावर सही करणार नाहीत अशी अपेक्षा आहे. जर त्यांनी देखील या अध्यादेशाला मान्यता दिली, तरी सुद्धा पेटा किंवा इतर काही प्राणीप्रेमी संघटना तातडीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन अध्यादेशाला स्थगिती मिळवतील अशी दाट शक्यता आहे. एकंदरीत यावर्षी तरी जालिकट्टूला कायदेशीर मान्यता मिळणे अवघड आहे. जालिकट्टूला परवानगी मिळावी यासाठी तामिळींचा जीव चालला आहे. जालिकट्टू हा त्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न झाला आहे. सुशिक्षित व आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळविलेले विश्वनाथन् आनंद, ए आर रहमान, श्री श्री रविशंकर, कमल हासन, रविचंद्रन अश्विन इ. आंतरराष्ट्रीय कलाकार, खेळाडू सुद्धा प्राण्यांचा छ्ळ करण्याच्या या प्रकाराचे परंपरेच्या नावाखाली समर्थन करताहेत ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. हिंदू उत्सवांमध्ये, जत्रेमध्ये केल्या जाणार्‍या प्राणीहत्येविरूद्ध कायम आवाज उठविणारे अंनिसवाले सुद्धा मूग गिळून गप्प आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
अ
अमितदादा Sat, 01/21/2017 - 08:11 नवीन
मुळात जल्लीकट्टू किंवा बैल गाड्याच्या शर्यती ह्या ग्रामीण शेतकऱ्यांच्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे, त्यामुळे हे खेळ परत चालू झाले पाहिजेत. मी लहानपणापासून गावी बैल गाड्यांच्या शर्यती पाहत आलोय , त्यात जसा पैसा आणि बक्षीस ह्या गोष्टी येवू लागल्या तसे थोडी फार क्रूरता येवू लागली. मात्र ह्या क्रूर गोष्टीवर बंदी घालून हे खेळ परत चालू करायला हवेतच. कारण ह्या गोष्टी करणारे लोक अपवादात्मक आहेत आणि बैलांची काळजी घेणारे शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. तसेच बैलांच्या बाबतीत केल्या जाणार्या काही प्रकारना काही कारणे आहेत अन्यथा त्यांची शेतीची उपयोगिता कमी होईल. तसेच आजच्या जागतिकीकरणाच्या आणि भांडवलशाहीच्या जमान्यात शेतकरी सुधा त्यांच्या नफ्या तोट्याचा विचार करणार च, म्हातार्या बैल किंवा गाई ला विकण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीच. खर्या प्राणीप्रेमी संस्थांनी शेतकरी क्रूर आहे असे समजून हि म्हातारी जनावरे सांभाळावीत. बैलांना त्रास होतोय म्हणून ट्रक्टर वापरा म्हणणारी मंडळी मला आधुनिक शेतीचे जनक वाटतायत, हि लोक उद्या स्वताच्या धान्याची पक्ष्यापासून सुरक्षा करणाऱ्या शेतकऱ्याला हि क्रूर ठरवतील. शेतीचे नुकसान करणाऱ्या माकडांना हटवणार किंवा हाकलणार्या शेतकर्यांना हि क्रूर ठरवतील. खर्या प्राणीप्रेमी लोकांचा आदर राखून एवड सांगतो प्राणी आणि निसर्गाची इतर अनेक गंभीर प्रश्न आहेत त्याचा जरूर विचार करावा. कालच महारष्ट्रात काही वाघ आणि बिबटे मारल्याची बातमी वाचलीय. अवांतर> जल्लीकट्टू मिळणारे समर्थन फक्त खेळ सुरु करावा म्हणून नाहीये, अनेक तमिळ शहरी लोकांनी हा खेळ पहिला सुधा नाही. It is matter of tamil pride. लोकांना तामिळनाडू बाहेरची शक्ती (भलेही ती सर्वोच न्यायालय का असेना) तमिळ परंपरा बंद करतेय याचा राग आलाय. माझा एक मित्र ह्या आंदोलनात भाग घेता यावा म्हणुन त्याची planned holiday पुढच्या महिन्यापासून असून सुधा आता गेलाय.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 01/21/2017 - 10:22 नवीन
संस्कृतीच्या नावाखाली मुक्या प्राण्यांचे हाल करणे किंवा त्यांचा छळ करणे निषेधार्ह आहे. या प्रकारात थोडीफार क्रूरता म्हणजे किती प्रमाणात क्रूरता चालू शकेल? शर्यतीत धावणार्‍या बैलांना दारू पाजून पळविणे, गाडी पळविताना शेपटी पिरगाळणे, बारीक खिळे लावलेल्या चाबकांचा वापर करणे, जोरात धावण्यासाठी टाचण्या किंवा पिना टोचणे इतपत क्रूरता चालेल का? गावाकडच्या लोकांना शर्यतीची एवढी आवड असेल तर गावातल्या धट्ट्याकट्टया तरूणांना गाडीला जुंपावे व त्यांची शर्यत लावावी. आपल्या आनंदासाठी बैलांचा छळ कशासाठी? जालिकट्टूची कालच एक चित्रफीत पाहिली. त्यात पळणार्‍या बैलाची शेपटी वारंवार पिरगाळताना दिसत होते. एका भागात दोन बैल एकत्र येऊन एकत्र झुंझायला लागल्यावर त्यांना बाजूला करण्यासाठी त्यांच्या डोळ्यात माती फेकताना दिसत होते. जालिकट्टूत धावणार्‍या बैलांना दारू पाजणे, डोळ्यात तिखट टाकणे इ. प्रकार केले जातात असे वाचनात आले आहे. तामिळींना जालिकट्टू हा अस्मितेचा प्रश्न केलाय यात काहीच नवल नाही. कोणत्याही प्रश्नावर जनमत समर्थन मिळविण्यासाठी त्याला प्रादेशिक अस्मितेची फोडणी देणे हे नवीन नाही. दहीहंडीवर न्यायालयाने अनेक निर्बंध लादल्यावर त्याला महाराष्ट्रीयन अस्मितेची जोड देण्याचे प्रकार झाले होतेच. जालिकट्टू त्याला कसा अपवाद असणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
अ
अमितदादा Sat, 01/21/2017 - 11:10 नवीन
या प्रकारात थोडीफार क्रूरता म्हणजे किती प्रमाणात क्रूरता चालू शकेल? शर्यतीत धावणार्‍या बैलांना दारू पाजून पळविणे, गाडी पळविताना शेपटी पिरगाळणे, बारीक खिळे लावलेल्या चाबकांचा वापर करणे, जोरात धावण्यासाठी टाचण्या किंवा पिना टोचणे इतपत क्रूरता चालेल का?
अहो ह्या गोष्टी प्रत्येक ठिकाणी नाही होत हो उगाच generalization करू नका, मी बैलांच्या शर्यती वरील गोष्टी न करता आणि करता, दोन्ही पद्धतीने पाहिलेल्या आहेत. आणि जिथे ह्या गोष्टी होतात तिथे यांना पूर्ण बंदी घालून शर्यती खेळवल्या पाहिजेत. क्रूरतेचा हि अतिरेक नको आणि तथाकथित प्राणीप्रेमाचा हि अतिरेक नको, खेळ हा खेळ राहूदे.
गावाकडच्या लोकांना शर्यतीची एवढी आवड असेल तर गावातल्या धट्ट्याकट्टया तरूणांना गाडीला जुंपावे व त्यांची शर्यत लावावी. आपल्या आनंदासाठी बैलांचा छळ कशासाठी?
याबद्दल काही प्रतिवाद करत नाही, फक्त आश्चर्य व्यक्त करतो. बोकड आणि कोंबडी कापनार्याना तुम्ही काय सल्ला द्याल याचा विचार करतोय मी सध्या. उगाच अतिरेकी भावनिक मुद्दे मांडू नका.
दहीहंडीवर न्यायालयाने अनेक निर्बंध लादल्यावर त्याला महाराष्ट्रीयन अस्मितेची जोड देण्याचे प्रकार झाले होतेच.
प्रत्येक खेळातील धोकादायक गोष्टी, क्रूरता कमी करून खेळ हा खेळ आपण ठेवू शकतो, न्यायालयाने हि दहीहंडी बंद नाही केली त्यावर निर्बंध घातले तसेच निर्बंध घालून जालिकट्टू आणि बैल गाडी च्या शर्यती सुरु झाल्या पाहिजेत अस ठाम मत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ग
गॅरी ट्रुमन Sat, 01/21/2017 - 11:14 नवीन
बोकड आणि कोंबडी कापनार्याना तुम्ही काय सल्ला द्याल याचा विचार करतोय मी सध्या.
हा प्रश्न कोणी श्रीगुरूजींना विचारू शकेल असे स्वप्न जरी पडले असते तरी त्यावर विश्वास ठेवला नसता :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
श
श्रीगुरुजी Sat, 01/21/2017 - 11:23 नवीन
हहपुवा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
श
श्रीगुरुजी Sat, 01/21/2017 - 11:31 नवीन
अहो ह्या गोष्टी प्रत्येक ठिकाणी नाही होत हो उगाच generalization करू नका, मी बैलांच्या शर्यती वरील गोष्टी न करता आणि करता, दोन्ही पद्धतीने पाहिलेल्या आहेत.
हा युक्तीवाद म्हणजे दारू पिऊन काही सगळ्यांचीच लिव्हर खराब होत नाही किंवा तंबाखू/सिगरेटमुळे सगळ्यांनाच काही कॅन्सर होत नाही अशा युक्तिवादासारखा आहे.
आणि जिथे ह्या गोष्टी होतात तिथे यांना पूर्ण बंदी घालून शर्यती खेळवल्या पाहिजेत. क्रूरतेचा हि अतिरेक नको आणि तथाकथित प्राणीप्रेमाचा हि अतिरेक नको, खेळ हा खेळ राहूदे.
अशा गोष्टी नियमितपणे घाऊक प्रमाणात होतात याविषयी न्यायालयाची खात्री झाल्यानेच यावर बंदी घातली गेली आहे. जर एखाद्या तुरळक ठिकाणी क्वचित असे होत असते तर न्यायालयाला बंदी घालावीच लागली नसती.
याबद्दल काही प्रतिवाद करत नाही, फक्त आश्चर्य व्यक्त करतो. बोकड आणि कोंबडी कापनार्याना तुम्ही काय सल्ला द्याल याचा विचार करतोय मी सध्या. उगाच अतिरेकी भावनिक मुद्दे मांडू नका.
अजिबात कापू नका किंवा कोणत्याही प्रकारे त्यांना मारू नका हाच सल्ला मी देईन.
प्रत्येक खेळातील धोकादायक गोष्टी, क्रूरता कमी करून खेळ हा खेळ आपण ठेवू शकतो, न्यायालयाने हि दहीहंडी बंद नाही केली त्यावर निर्बंध घातले तसेच निर्बंध घालून जालिकट्टू आणि बैल गाडी च्या शर्यती सुरु झाल्या पाहिजेत अस ठाम मत आहे.
दहीहंडीत प्राण्यांचा सहभाग नसतो आणि दहीहंडीत फक्त माणसांचा सहभाग असल्याने व तो ऐच्छिक असल्याने आणि मानवाला आपले बरेवाईट समजण्याचे तारतम्य व बुद्धी असल्यानेच न्यायालयाने पूर्ण बंदी न घालता निर्बंध घातले. जलीकट्टू किंवा बैलगाडा शर्यतीतील प्राण्यांचा सहभाग सक्तीचा असतो. सहभागी न होण्याचा, छळ होऊ न देण्याचा पर्याय त्यांच्याकडे नसतो. त्यामुळे त्यावर बंदी आवश्यक आहे. बादवे, जलिकट्टू माणसांसाठी सुद्धा धोकादायक आहे. कालच वाचलेल्या एका वृत्तानुसार मागील सहा वर्षात जलिकट्टूमध्ये १४ लोकांचे प्राण गेले आहेत व किमान १००० जण जखमी झाले आहेत. हा प्रकार मानव व प्राणी या दोघांसाठीही वाईट आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
अ
अमितदादा Sat, 01/21/2017 - 11:44 नवीन
असो शेवटी हे तुमच मत आहे, त्याच्याशी मी सहमत नाही. लवकरच बैलांच्या शर्यती वरील बंदी उठेल अशी आशा आहे.
अजिबात कापू नका किंवा कोणत्याही प्रकारे त्यांना मारू नका हाच सल्ला मी देईन.
मग असाच सल्ला द्यायचा ना बैल गाडीच्या समर्थकांना, त्यांना तरुण मुलांना जुपा असे अतिरेकी सल्ले देताय यावरून तुमचे बैल प्रेम दिसून येते मात्र मनुष्य द्वेष दिसून येतो :)). बैलांच्या भावनांचा विचार करताय लोकांच्या हि करा थोडा :)) संघाला आता गाई बरोबर बैल पण पूजनीय झाले कि काय (हलके घ्या)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sat, 01/21/2017 - 18:22 नवीन
बैलांच्या शर्यतीवरील बंदी कधीही उठविली जाणार नाही अशी मला आशा आहे. मी दिलेल्या अतिरेकी सल्ल्यातील उपहास तुमच्या लक्षात आलेला दिसत नाही. मी इथे जे विचार मांडलेत त्या विचारांचा व संघाचा काहीही संबंध नाही. हे माझे विचार आहेत. माझे विचार संघ ठरवित नाही किंवा संघाचे विचार मी आंधळेपणाने फॉलो करीत नाही. या विषयाबद्दल संघाचे काय विचार आहेत त्याच्याशी मला कर्तव्य नाही. संघाने किंवा मोदींनी सुद्धा जालीकट्टू किंवा बैलांच्या शर्यतीला पाठिंबा दिला तरी माझा क्रूर प्रकारांना विरोध कायम राहील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
अ
अमितदादा Sat, 01/21/2017 - 18:36 नवीन
अहो गुरुजी मी हि उपहासच केला होता..मलाही माहित आहे कि संघाचा ह्या विषयाशी संबंध नाहीये, तसेच तुमच ते वाक्य सुद्धा जास्त स्ट्रेस करायची गरज नाही. असो तुम्ही तुमचा मताशी ठाम आहात मी माझ्या, त्यामुळे चर्चा इथेच थांबवतो. एक मात्र नक्की बैल गाड्यावरील बंदी नक्की उठणार काही निर्बंध घालून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sat, 01/21/2017 - 18:57 नवीन
असो. आपण दोघेही आपापल्या मतांशी ठाम राहू या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
न
नितिन थत्ते Sat, 01/21/2017 - 09:56 नवीन
जल्लीकट्टूला विरोध = हिंदूंच्या परंपरांना विरोध !!! (म्हणजे हिंदुविरोधी) जल्लीकट्टूका पाठिंबा = गोवंशाच्या सदस्यांच्या छळाला पाठिंबा (म्हणजे पुन्हा हिंदुविरोधी) आता काय करावे बुवा?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 01/21/2017 - 10:14 नवीन
मी इथे हिंदूविरोधी/हिंदूसमर्थक किंवा हिंदू/अहिंदू इ. चष्म्यातून बघतच नाही. प्राणी व पक्ष्यांचा छळ कोणाकडूनही होत असेल तरी माझा त्याला विरोधच आहे. मग ते जालिकट्टू असो किंवा बैलगाडी शर्यत असो किंवा गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत बैलांकडून ओढले जाणारे गणेशाचे रथ असो किंवा शेतकर्‍यांकडून होणारे बैलांचे खच्चीकरण असो किंवा बैलांचा पायात खिळे ठोकून नाल ठोकणे असो किंवा शर्यतीत पळविले जाणारे घोडे असो किंवा जत्रेत बळी दिले जाणारे प्राणी असो किंवा इदला कापले जाणारे बकरे असो . . . ज्या प्रकारात मनोरंजनासाठी, परंपरेसाठी, जिव्हालौल्यासाठी प्राणी किंवा पक्ष्यांचा छळ होतो किंवा त्यांचे हाल केले जातात, त्या सर्व प्रकारांना माझा विरोध आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
ट
टर्बोचार्जड फिलॉसॉफर Sat, 01/21/2017 - 10:32 नवीन
श्रीगुरुजी,भाजप काँग्रेस ब्राह्मण ब्राह्मणेत्तर वाद गेला खड्ड्यात,या तुमच्या धाग्याला सलाम ,अगदी माझ्या मनातल्या भावना मांडल्या आहेत.मी स्वतः ग्रामिण भागात राहात असल्याने हे अत्याचार रोज बघतो,कधीकधी मांसाहारी असल्याने स्वतःचीच चीड येते. आमच्या भागात कडक्डत्या उन्हात बैलगाडीत खच्चून ऊस भरतात व बैलाला जुंपतात,अक्षरषः फेस येतो त्यांच्या तोंडातुन,पाय मोडतात क्ववीत.ह्या विषयाला वाचा फोडल्याबद्दल धन्यवाद (माहीतीसाठी- मी पेटा संघटनेचा स्वयंसेवक आहे,व या क्रुर प्रथांविरोधात जागृती करत असतो)
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 01/21/2017 - 11:00 नवीन
धन्यवाद टफि! मला पेटाचा सदस्य व्हायची इच्छा आहे. सदस्य होण्यासाठी काय करावे लागेल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्बोचार्जड फिलॉसॉफर
ट
टर्बोचार्जड फिलॉसॉफर Sat, 01/21/2017 - 11:20 नवीन
पुर्ण वाचा http://www.petaindia.com/about-peta/intern-or-volunteer-with-peta/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sat, 01/21/2017 - 19:00 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्बोचार्जड फिलॉसॉफर
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा