कधी थांबणार हा क्रूरपणा???????
काय वेडेपणा चाललाय! सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातलेली जालिकट्टू नावाची क्रूर प्रथा पुन्हा एकदा सुरू करावी यासाठी तामिळींचा जीव चाललाय. काही ठिकाणी बंदी झुगारून जालिकट्टू आयोजित करण्याचे प्रयत्न झाले. पण पोलिसांनी ते हाणून पाडले. तामिळनाडूचे मुख्यमंत्री ओ पनीरसेल्वम् यांनी तर केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय झुगारून जालिकट्टू पुन्हा सुरू करण्याचा अध्यादेश काढावा अशी विनंती करण्यासाठी थेट दिल्ली गाठून पंतप्रधान मोदींची भेट घेतली. सर्वात वाईट भाग म्हणजे संगीतकार रहमान, माजी जागतिक बुद्धीबळ विश्वविजेता विश्वनाथन् आनंद याने सुद्धा जालिकट्टू पुन्हा सुरु करण्यासाठी पाठिंबा दिलाय. ही आमची अत्यंत जुनी परंपरा आहे, आम्ही ती चालू ठेवणारच, आमच्या परंपरेवर बंदी घालण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला कोणी दिला अश्या आविर्भावात निदर्शने सुरू आहेत. जालिकट्टू तामिळींच्या जीवनमरणाचा प्रश्न झाला आहे.
जुनी परंपरा, प्रथा इ. गोष्टी खर्या असल्या तरी असल्या प्रथेत मुक्या प्राण्याचा छळ होतोय त्याचं काय? ते बैल काय स्वतः यातना सहन करून तुमची करमणू़क करण्याकरता या जगात आलेत का? एका वाहिनीवर दाखवित होते. एका बैलाभोवती सातआठ लुंगीधारी उभे होते. त्यातला एकजण बैलाची शेपटी ओढून जोरात पिरगाळत होता. दुसरा एकजण शेपटी दाताखाली धरून चावत होता. अरे कशासाठी त्या बैलाला यातना देता? परंपरा आणि प्रथा म्हणून? ही कसली क्रूर परंपरा? मुक्या प्राण्याला यातना देऊन कसली आलीय करमणू़क आणि प्रथा? अंगात एवढी मस्ती असेल तर एकमेकांशी फ्रीस्टाईल कुस्त्या खेळा की. प्राण्यांचा छळ का करता?
स्वतःच्या जिव्हालौल्यासाठी व करमणुकीसाठी मुक्या प्राण्यांना यातना देऊन त्यांचा छळ करण्याची प्रथा व परंपरा खूप जुनी आहे व जगात अनेक देशात ती अजून जिवंत आहे. स्पेनमध्ये बुलफाईट प्रकारात एका बैलाला गल्लीबोळातून पळविले जाते. अनेक जण बैलाच्या मागे पळून त्याला जखमी करायचा प्रयत्न करीत असतात. बैल पळताना बाजूला उभे असलेले बघ्ये बैलाला छोटे बाणाच्या आकाराचे लोखंडी भाले फेकून मारतात. अंगात ठिकठिकाणी भाले घुसलेला तो बैल शेवटी बुलफाईटच्या मैदानात येतो. तिथे तलवारी घेऊन तीनचार जण त्याला तलवारीने जखमी करतात. शेवटी मुख्य मॅटॅडोर येतो व जीवाच्या भीतिने आकांताने धावून थकलेल्या, तलवारीच्या वारांमुळे व अंगात घुसलेल्या भाल्यांच्या जखमांच्या यातनांनी कळवळणार्या बैलाचे मस्तक तो तलवारीच्या एका घावात घडावेगळे करतो. जमलेले हजारो प्रेक्षक या मुक्या प्राण्याच्या यातनामय कत्तलीचा आनंद लुटत असतात. मुक्या प्राण्याला इतक्या यातना देताना आनंद कसा मिळू शकतो? वेदनांनी कळवणार्या बैलाच्या वेदनांनी करमणूक कशी होऊ शकते?
भारत देखील या घॄणास्पद प्रकारापासून दूर नाही. शेतीसाठी बैल वापरण्याआधी मोठ्या दांडक्याने बैलाचे वृषण चेचून भुगा करून टाकतात जेणेकरून तो गायीबरोबर आपले नैसर्गिक कृत्य करू शकणार नाही. माणूस त्याची नैसर्गिक उर्मीसुद्धा स्वतःच्या स्वार्थासाठी नष्ट करतो व तीसुद्धा अत्यंत वेदनादायक पद्धतीने. उर्मिला पवार यांच्या 'आयदान' पुस्तकात बैलाच्या खच्चीकरणाचे वर्णन दिले आहे. दांडक्याने वृषण चेचले जात असताना बैलाला किती यातना होत असतील. माणूस त्याला एवढ्या यातना का देतो? बैलाचे वृषण खच्ची करण्याचे काम करणार्या नराधमाचे वृषणही असेच चेचून काढले पाहिजेत म्हणजे त्याला त्या यातना कशा असतील ते कळेल. बैलगाडीला जोडण्यासाठी बैलांच्या तळपायात खिळे ठोकून नाल बसवितात. नाल बसविण्यासाठी आधी बैलाला खाली बसवून आडवे पाडतात व त्याचे चारही पाय बांधून मग खिळे ठोकून नाल बसवितात. नाल बसविताना बैलाच्या डोळ्यातून वेदनांनी पाणी वाहत असते. कशासाठी हा क्रूरपणा? मला कधी कधी वाटते की बैलांच्या तळतळाटामुळेच कदाचित शेतकर्यांची हलाखीची परिस्थिती असावी. आपल्याला यातना देणार्याला बैलांचे शिव्याशाप भोवत असतील.
काही दिवसांपूर्वी कोल्हापूरमध्ये झालेली'पारंपारिक' मेंढ्यांची टक्कर दाखवित होते. जमलेले प्रेक्षक दोन मेंढ्यांच्या आपापसातील टकरीचा आनंद लुटत होते. दोन्ही मेंढे आपल्या पूर्ण ताकदीनिशी दुसर्याच्या कपाळावर जोरदार धडक मारत होते. दोघांनाही वेदना होत असणारच. कदाचित कपाळाची हाडेही मोडत असतील. आणि असल्या क्रूर प्रकाराचा प्रेक्षक आनंद लुटत होते.
काही ठिकाणी कोंबड्यांची झुंज सुद्द्धा लावतात. या झुंजीत कोंबड्याच्या एका पायाला ब्लेडचा अर्धा तुकडा बांधलेला असतो जेणेकरून समोरच्या कोंबड्याचे रक्त निघेल. दोन्ही कोंबडे मूर्खासारखे एकमेकांशी लढाई करून जखमी होतात व माणसे आपली करमणूक करून घेतात.
बैलगाडी शर्यत हा असाच एक क्रूर प्रकार. सुदैवाने सर्वोच्च न्यायालयाने या प्रकाराला सुद्धा बंदी घातली आहे. तरीसुद्धा बैलगाडी शर्यत पुन्हा सुरू करावी यासाठी महाराष्ट्रात जोरदार प्रयत्न सुरू आहेत. या शर्यतीतही बैलांना जोरात पळविण्यासाठी शेपटी पिरगाळणे, खिळा लावलेल्या चाबकाचे फटकारे लावणे असे क्रूर प्रकार केले जातात आणि वेदना होत असताना भीतिने बैल जोरात गाडी पळवितात कारण आपली उच्च प्रथा आणि परंपरा!
नवसासाठी व धार्मिक परंपरेसाठी कोंबड्या, बकर्या कापणे हा प्राण्यांना यातना देण्याचाच एक प्रकार. हे बळी थांबावेत म्हणून संत गाडगेबाबांनी प्रबोधन करण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु अजूनही हा प्रकार सुरूच आहे. मांग जातीत एखाद्याचे लग्न ठरताना किंवा त्याआधी काही वर्षे लग्नासाठी नवर्यामुलाच्या नावाने एक डुक्कर सोडले जाते. ऐन लग्नाच्या वेळी हे डुक्कर पकडून त्याला जिवंत जाळून त्याचे मांस खाल्ले जाते. जिवंत जळताना त्या डुकराला किती भयानक वेदना होत असतील. प्रथा व परंपरा या नावाखाली हे क्रूर प्रकार कायमच सुरू राहणार का?
जिव्हालौल्यासाठी जिवंत प्राणी क्रूर पद्धतीने मारणे हे जगभर सर्वत्र केले जाते. कासव, शिंपले, बेडूक, खेकडे इ. प्राण्यांना जिवंतपणीच उकळत्या पाण्यात टाकणे, बदक/हंस इ. प्राण्यांची आत असलेली मान बाहेर काढण्यासाठी त्याच्या तोंडासमोर खाणे धरणे व खाणे खाण्यासाठी त्याने मान सरळ केल्यावर मानेवर घाव घालून त्यांना मारणे अशा क्रूर पद्धतीने हे प्राणी जिभेचे चोचले पुरविण्यासाठी मारले जातात. अरे प्राणी मारायचा असेल तर निदान त्या प्राण्याला भूल देऊन वीजेचा शॉक देऊन वेदनारहीत मरण तरी द्या. हालहाल कशाला करता?
मुक्या प्राण्यांना प्रथा व परंपरेच्या नावाखाली आपल्या करमणुकीसाठी व जिव्हालौल्यासाठी वेदना, यातना देऊन त्यांचा छळ करणे व नंतर मारून टाकणे हे अत्यंत क्रूरकर्म आहे व या प्रकाराचा मला अतिशय संताप येतो. हे सर्व प्रकार तातडीने कायमस्वरूपी बंद व्हायला हवेत. सुदैवाने सर्वोच्च न्यायालय याविषयी सक्रीय असून या प्रकाराला कायद्याने बंदी घालण्यात येत आहे ही समाधानाची गोष्ट आहे.
💬 प्रतिसाद
(282)
स
सतिश गावडे
Wed, 04/12/2017 - 08:49
नवीन
ते पेशवे आहेत, त्यामुळे ते काहीही म्हणू शकतात. :)
- Log in or register to post comments
व
विशुमित
Wed, 04/12/2017 - 09:00
नवीन
असय वय.
मला संस्कृत कळत नाही. त्यामुळे गप्प बसून विश्वास ठेवला.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
गुरुवार, 04/13/2017 - 22:26
नवीन
श्रीगुरुजी,
तुम्ही दिलेला लेख वाचला. त्यातलं एक वाक्य महत्त्वाचं आहे :
The common deciding factor was often ownership of wealth or property, since all possessions of the widow devolved to the husband's family upon her death.
असे मृत्यू आजही होत असतात. त्यांना हुंडाबळी म्हणतात. च्यायला, पैशासाठी बाई जाळायची आणि पावती सतीच्या नावावर फाडायची. बाई जाळण्याचा सतीशी संबंध नाही.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 04/14/2017 - 16:39
नवीन
साफ चूक. सती व हुंडाबळी हे पूर्ण वेगळे आहेत.
- हुंड्याची प्रथा भारतात सर्वत्र होती. जर सती हा हुंडाबळीचाच प्रकार असता तर सती प्रकरणे भारताच्या सर्व भागात घडली असती. परंतु सती प्रकरणे मुख्यत्वेकरून बंगाल व राजस्थानातच घडलेली आहेत.
- सती हा हुंडाबळीचा प्रकार असता तर सर्व जातीजमातींमध्ये हे प्रकार घडले असते. परंतु सती प्रकरणे काही विशिष्ट सवर्ण जातीतच घडलेली आहेत.
त्यामुळे सती व हुंडाबळीचा संबंध नाही.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Fri, 04/14/2017 - 19:00
नवीन
श्रीगुरुजी,
सती व हुंडाबळी हे पूर्णपणे वेगळे आहेत हे मान्य. मात्र जशी हुंडाबळीत पैशासाठी बाई जाळली जाते तशाच धर्तीवर सतीच्या नावाखाली विधवा जाळली जातेय. विधवा जाळण्याचा सतीशी प्रत्यक्षात काहीही संबंध नाही.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 04/14/2017 - 19:26
नवीन
पुन्हा एकदा चूक. मानापमानाच्या मूर्ख कल्पना, त्याला धार्मिकतेची दिलेली जोड आणि सतीचे केलेले उदात्तीकरण यामुळे सती प्रकरणे घडत होती. केवळ कायदेशीर बंदीमुळेच हा क्रूर प्रकार बंद झाला.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Sat, 04/15/2017 - 23:47
नवीन
श्रीगुरुजी,
आजीबात नाही. पैसे व मालमत्तेसाठी विधवा जाळण्यात येत असे. सती केवळ निमित्त होतं.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
प
पुंबा
Mon, 04/17/2017 - 07:11
नवीन
गापै व श्रीगुरूजी, तुम्ही दोघांनीही सांगितलेले खरे आहे.
हे दोन्हीही सतीच्या प्रथेसाठी कारणीभूत होते. विशेषतः रूपकुंवर प्रकरण हे सतीचे स्वतंत्र भारतातील सगळ्यात भयानक व चर्चीत प्रकरण. तिच्या मृत्यूनंतर जरी सती म्हणून तिचे गौरवीकरण केले गेले(अगदी विजयाराजे सिंधियांनीही या प्रकरणाचे समर्थन केले). तरी नंतरच्या तपासात तिच्या सासरच्या माणसांनी मालमत्तेच्या मोहापायी तिला जाळले असे आढळले. त्यामुळे पुर्वी(सतीवर बंदी घालण्याच्या आधी) 'धार्मिकतेची दिलेली जोड' हे मुख्य कारण होते मात्र नंतरच्या काळात झालेल्या सतीप्रकरणे अधिक गुंतागुंतीची आहेत असे वाटते.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Mon, 04/17/2017 - 11:11
नवीन
सतीला धार्मिकतेची जोड देऊन उदात्तीकरण केले गेले होते. सती गेलेल्या जागेवर तुळशीवृंदावन बांधून सतीची स्मृती जिवंत ठेवण्यात येत असे किंवा त्याजागी मंदीर उभे केले जात असे.
मूळ मुद्दा सती हा नाही. मुद्दा हा आहे की कायद्यामुळे अशा क्रूर प्रथा थांबविल्या जाऊ शकतात. समजा सती जाण्यामागे मालमत्ता हे कारण होते हे क्षणभर गृहित धरले तरी सतीविरोधात कायदा केल्यामुळेच ही प्रथा बंद झाली. असाच कायदा जालिकट्टू, बैलगाडी शर्यत इ. क्रूर प्रकारांविरूद्ध करणे आवश्यक आहे.
- Log in or register to post comments
R
Ranapratap
Sun, 04/16/2017 - 06:41
नवीन
सोडा आता हा बंदीचा नाद. बैल माझा पांढरा, काळा शर्यतीचा नाद खुळा. यात्रा सुरु झाल्या , पुन्हा चैतन्य आले. या 19 तारखेला यात्रेला. आता पुन्हा होणार शर्यतीचा थरार.
भिरर र र र र र , आरारा रा रा रा,
आता जुंपला जाणारा खेळ,
घिनाजी भागूजी थोरात,
मु पो मंचर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे,
आंबेगाव तालुक्यातील एक नामांकित बारी आहे ब्र का मंडळी,
अरे झाली s s s s s s ..........
गोंडा उडवत निघाली थोरातांची बारी,
छान, .. छान, छान ..
अरे उचल कि टाक.
सेकंद 17
ह्याचा थरार तुमाला काय कळणार.
द्या सोडून, घ्या मिटवून.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sun, 04/16/2017 - 12:22
नवीन
ख्यँ ख्यँ ख्यँ . . .
- Log in or register to post comments
प
पुंबा
Mon, 04/17/2017 - 13:44
नवीन
जालिकट्टूत आणखी एक बळी
जालीकट्टूचे आयोजन करणारे कोणत्याही प्रकारची दक्षता घेत असल्याचे दिसत नाही.
- Log in or register to post comments
R
Ranapratap
Tue, 04/18/2017 - 16:31
नवीन
श्री गुरुजी, आजच काही बैलगाडा शौकिनाशी बोलताना समजले की, पुणे शहराच्या आसपास एकाची जमीन शर्यतीचे ठिकाण म्हणून वापरली जाते व गुंडगिरीच्या जोरावर त्याला ती जमीन दिली जात नाही, त्या व्यक्तीने याचिका दाखल करून शर्यतीवर बंदी आणली आहे. खरे, खोटे ती व्यक्तीच जाणे. पण हे खरे असेल तर हे कसले बेगडी प्राणी प्रेम, जरा माहाती घेऊन सांगाल का.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 08/16/2017 - 10:51
नवीन
योग्य निर्णय
http://www.loksatta.com/maharashtra-news/bombay-high-court-bans-bullock-cart-races-across-maharashtra-1531095/
- Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद
Wed, 08/16/2017 - 13:33
नवीन
सरकार नियमावली सादर करत नाही तोपर्यंत मनाई आहे, बंदी नव्हे! बाकी कत्तलखान्यांवर का बरे अशीच मनाई आणत नसतील म्हणे?
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 05/19/2023 - 06:11
नवीन
सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडी शर्यतीला मान्यता दिल्याचा आनंद साजरा करू या.
अश्या किरकोळ घटनांकडे पूर्ण दुर्लक्ष करणे उत्तम. आपली संस्कृती, परंपरा जपणे हेच खरे महत्त्वाचे आहे.
- Log in or register to post comments
इ
इपित्तर इतिहासकार
Fri, 05/26/2023 - 06:46
नवीन
बरीच सुधारणा आहे म्हणायची एकंदरीत !.
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Fri, 05/26/2023 - 10:17
नवीन
आपली म्हणजे नक्की कोणाची?
जैन, भागवत संप्रदायी ब्राह्मण, काही कडक शैव आणि उत्तर भारतातील नामधारी वगैरे मोजके संप्रदाय सोडले इथे कोणीही अहिंसक नाहीये.
तुम्ही उगाचच आपली आपली म्हणून ब्राह्मणी नैतिकतेची व्याख्या ब्राह्मणेतर समाजावर लादू नका.
तुम्ही तुमच्या वरणभात अन् तूप पोळी मध्ये खुष रव्हा अन् पळी पंचपात्रात खेळत बसा.
हिंसा हा क्षात्र वृत्तीचा अविभाज्य घटक आहे, आता कोणी क्षत्रिय नसले म्हणून काय झाले, हिंसा होत राहणारच .
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 05/26/2023 - 11:40
नवीन
आपापसात पाहिजे तितकी हिंसा करा, मुक्या निष्पाप प्राणी पक्षांची हिंसा नको.
- Log in or register to post comments
T
Trump
Sat, 05/27/2023 - 08:49
नवीन
कृपया स्पष्टीकरण द्यावे.
- Log in or register to post comments
T
Trump
गुरुवार, 07/06/2023 - 08:13
नवीन
तुम्हाला विचारुन सुध्द्दा तुमचे स्पष्टीकरण आले नाही, त्यामुळे अधिक स्पष्ट्च विचारतो आता.
-
हे क्षत्रिय कधी संपले? श्री शिवाजी महाराज क्षत्रिय होते का? त्यांचा राज्याभिषेक तुम्हाला मान्य आहे का?
- Log in or register to post comments
R
Ranapratap
गुरुवार, 05/25/2023 - 19:19
नवीन
श्री गुरुजी,
बैल गाड्यांची शर्यत किंवा जलिकाठू हा शेतकऱ्यांचा मनोरंजनाचा भाग आहे. श्रीमंत लोंकाच्य घोडा शर्यती ही होतात त्या वेळी आपण आक्षेप घेत नाही. मग सर्व सामान्य लोकांच्या खेळाला विरोध का?
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 05/25/2023 - 19:25
नवीन
कोणत्याही प्राण्यांच्या शर्यती, टक्कर, झुंजी, नांगर किंवा गाड्याला जुंपून राबविणे, जिव्हारूचीसाठी हत्या या प्रकारांना मी सक्त विरोध केला आहे.
स्वतःच्या मनोरंजनासाठी बैल किंवा इतर कोणत्याही प्राण्यांच्या शर्यती आयोजित करणे आणि त्यासाठी त्यांच्यावर क्रूर अत्याचार करणे अत्यंत निषेधार्ह आहे.
- Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार
Sat, 05/27/2023 - 06:00
नवीन
श्रीगुरुजींशी असहमती व्यक्त करत, मालकांना आपल्या बैलाची किती काळजी असते त्याचा हा पुरावाच देतो,
हा घ्या
https://youtu.be/EhmvOu_mtog
पैजारबुवा,
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sat, 05/27/2023 - 06:25
नवीन
१) हे मालक आपल्या बैलांचे वृषण दांडक्याने किंवा दगडाने ठेचून आणि हा निर्दयी प्रकार करताना त्यांना मरणांंतिक वेदना देऊन त्यांना नपुंसक करतात का?
२) हे मालक त्यांच्या तळपामात नाल ठोकून त्यांना अपार वेदना देतात का?
३) हे मालक बैलांना मरेपर्यंत नाकात वेसण घालून नांगराला जुंपून भर उन्हात राबवितात का?
४) हे मालक बैलांना गाड्यास जुंपून प्रचंड वजन ओढायला लावतात का?
५) हे मालक स्वतःच्या करमणुकीसाठी बैलांना शर्यतीत पळायला लावतात का?
६) शर्यतीत बैलांनी वेगाने पळावे यासाठी हे मालक बैलांची शेपूट पिरगाळणे, कानात लाल मुंग्या सोडणे, मद्य पाजणे, टोकेरी खिळे लावलेल्या चाबकाने मारणे, टाचणी टोचणे असे क्रूर प्रकार करतात का?
७) बैल वृद्ध झाल्यानंतर चाऱ्याचा खर्च टाळण्यासाठी आणि कमाईसाठी हे मालक बैल खाटकाला विकून टाकतात का?
वरीलपैकी एकाही प्रश्नाचे उत्तर होय असेल तर मालकाची बेलांवर कणभरही माया नसून मालक स्वार्थासाठी बैलांवर फक्त अत्याचार करतात हे सिद्ध होते.
बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना पुरणपोळी देणे, शिंगे रंगविणे, गोंडे बांथणे ही माया नसून केवळ देखावा आहे.
- Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे
Sat, 05/27/2023 - 06:02
नवीन
श्री गुरुजी, तुमच म्हणण योग्य असल तरीही ह्या काळात प्रॅक्टिकल वाटत नाही. फार फार तर ह्यात आपण जनावरांना कमीत कमी वेदना कशा होतील याबाबतचे नियम बनवले पाहिजे किंवा असतील तर त्याचे पालन केले पाहिजे.
बैलगाडा शर्यत हा खेळ काही वर्षात नामशेष होईल कारण आत्ताच बैल बघायलाही मिळत नाहीत. सध्याला शेतीची बहुतांश कामे ही यंत्र वापरूनच केली जातात.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sat, 05/27/2023 - 06:30
नवीन
धन्यवाद!
बऱ्याच गोष्टी आज प्रॅक्टिकल वाटत नाहीत असे वाटत असले तरी त्या प्रत्यक्षात आल्या आहेत. नियम पूर्वीपासूनच आहेत, परंतु ते पाळले जात नाहीत ही वस्तुस्थिती आहे. बैलगाडी शर्यत नामशेष होईल आणि शेतीची कामे फक्त यंत्रानेच होतील तो सुदिन.
- Log in or register to post comments
इ
इपित्तर इतिहासकार
Sat, 05/27/2023 - 15:51
नवीन
पण बैलगाडा शर्यती नामशेष वगैरे होतील किंवा येत्या काही वर्षात नामशेष होतील हे म्हणायला बेसिस काय ते कळले तर बरे होईल.
गावाकडे उत्तम सुरू आहेत शर्यती, वेगवेगळ्या पद्धतीने, विदर्भात शंकरपट सुद्धा होतात भरपूर अजूनही (बैलगाडा शर्यतीस तिथे स्थानिक नाव आहे ते)
- Log in or register to post comments
क
कॉमी
Sat, 05/27/2023 - 09:42
नवीन
गुरुजी तुम्ही व्हिगन आहात का ? (प्रश्न शाकाहारी आहेत का असा नाही. ते तर असावेत असा अंदाज आहे.)
- Log in or register to post comments
इ
इपित्तर इतिहासकार
Sat, 05/27/2023 - 17:13
नवीन
- Log in or register to post comments
क
कॉमी
Sat, 05/27/2023 - 18:23
नवीन
हे सर्व गरुड, नंदी, मोर, मूषक हे बोलणारे दैवी प्राणी आहेत. गरुड तर सगळ्यात ताकदवान, इंद्र आणि सर्व देवांना सुध्दा न आवरता येणारा. हे सगळे आपापल्या चालकाचे भक्त आहेत आणि त्यांच्याशी बोलून चालून आहेत.
तुम्हाला पण बोलणारा बैल मिळाला तर खुशाल बसा त्याची परवानगी घेऊन त्यावर. :)
- Log in or register to post comments
इ
इपित्तर इतिहासकार
Sat, 05/27/2023 - 18:33
नवीन
ऐकावं ते नवलच

- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6