मुंबई महानगर पालिका निवडणूक २०१७
नमस्कार !
महाराष्ट्रात भाजप-सेना युतीचे राज्यसरकार बनल्यापासुन अनेक कुरबुरी चालू होत्या. रोज रोज एकमेकांवर आरोप तर करायचे पण एकत्र सत्तेतही राहायचे हे पाहून माझ्यासारख्या सामान्य आणि निष्पक्ष व्यक्तींना नक्कीच उबग आला असेल.
काल २६ जानेवारी २०१७ च्या मुहुर्तावर शिवसेनेने युती तोडण्याची घोषणा केली आणि भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांच्या कार्यकर्त्यांना जितका आनंद झाला नसेल तितका एक सामान्य माणूस म्हणून मला झाला.
प्रत्येक पक्ष आतापर्यंत बेडीकीने बैलाचे सोंग घेतल्याप्रमाणे आपली ताकद फुगवून दाखवत होता त्यांची खरी ताकद आता कळणार आहे.
मुंबई, ठाणे, पुणे आणि इतर शहरात होणार्या पालिका / जि.प. आता भाजपा, सेना स्वतंत्रपणे लढतील तर काही ठिकाणी राष्ट्रवादी-कॉग्रेस युती करतील. शिवाय या खेचाखेचीत निवडणूकांसाठी १ महिन्यापेक्षाही कमी कालावधी राहिला असल्यामुळे या वेळची निवडणूक वेगळी ठरणार आहे. प्रत्येक पक्ष वेगवेगळे लढत असल्यामुळे पक्षातील तिकिट इच्छूकांना बर्याच प्रमाणात वाव मिळेल त्याचप्रमाणे इंपोर्टेड इच्छूकांना देखील बर्याच प्रमाणात वाव मिळेल. एकंदरीत निवडणूकीच्या तोंडावर पक्ष सोडून जाणार्यांची संख्या घटेल असा अंदाज आहे.
शिवाय एकाच वॉर्डात चार ते पाच मोठे पक्ष, स्थानिक वजनदार नेतेमंडळी निवडणूक लढविणार असल्यामुळे ऐनवेळी 'बशी घेणार्या' उमेदवारांना घसघशीत फायदा होण्याचा संभव आहे. पण नोटबंदी नंतरच्या या काळात हा प्रश्न वेगवेगळे पक्ष कसा सोडविणार हे पाहणे रोचक ठरणार आहे.
मुंबईत मागील वेळी मराठी मतांमधे जो सेना-मनसेच्या मागे एकवटण्याविषयी संभ्रम होता तो आता बर्याच प्रमाणात निवळला असून मराठी मतदाराला या दोघांपैकी नेमके कोणाला मत द्यायचे हे नक्की कळाले असावे असाही एक अंदाज आहे. मात्र काही नेते, सेना-मनसे समर्थक अजुनही सेना-मनसे युती होईल असे मनातल्या मनात मांडे खात आहे. मात्र ठाकरेंचा सध्याचा पवित्रा पाहता ते कोणाशीही युती करतील असे वाटत नाही. मात्र मतदानाचे निकाल आल्यानंतर मात्र सगळ्यांनाच सगळे ऑप्शन ओपन असतील असे वाटत आहे.
गुजराती, मारवाडी मतदार प्रामुख्याने भाजपचा मतदार मानला जातो. मात्र मुंबईतील बहुसंख्य गुजराती / मारवाडी समाज व्यापारक्षेत्रात गुंतला आहे. त्यांच्या प्रत्येकाच्या व्यवसायावर नोटबंदीनंतर काय आणि किती प्रमाणात परिणाम झाला यावर त्यांचे यंदाचे मतदान अवलंबून असेल की ते काहीही झाले तरी भाजपालाच मते देतील काय हे बघणे देखील रोचक ठरेल. त्यातच कालच शरद पवार साहेबांना पद्मविभुषण जाहिर झाला असल्यामुळे निवडणूकीच्या तोंडावर भाजपा राष्ट्रवादी अशी नवी युती होणार काय असादेखील संभ्रम उत्पन्न होण्याचा संभव आहे. मात्र अशी शक्यता निकालांअगोदर तरी दिसत नाही. कदाचित शिवसेनेने मुंबई / पुणे राखले तर ते भविष्यात राज्यसरकारमधून बाहेर पडू शकतात व त्यावेळी राष्ट्रवादी मदतीला येऊ शकेल अशीही एक शक्यता दिसते. (साहेबांना पदक अगोदरच्या कामगिरीबद्द्ल मिळाले आहे पण तो वेगळा मुद्दा आहे.)
युपी बिहारी मंडळी आपापल्या राज्यात सपा, बसपा, जनता दलाला आणि काही प्रमाणात भाजपाचे पाठीराखे असले तरी एकेकाळी ही मंडळी मुंबईमधे बर्याच अंशी काँग्रेस समर्थक होती. मात्र सध्याची काँग्रेसची अवस्था पाहता ही मंडळी कोणामागे उभी राहतात हे पाहणे रोचक ठरेल. कदाचित बर्याच ठिकाणी हीच मते निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
मुस्लीमबहूल भागात सपा ची कसोटी लागणार आहे तर ओवेसींची पार्टी काय करते यावर देखील लक्ष ठेवावे लागेल. ओवेसींनी कालच "मोदींना परदेशी दाढीवाले का आवडतात" असा वरवर योग्य वाटणारा सवाल विचारुन टीआरपी खेचून घेतला आहे.
सगळ्यात कठीण अवस्था विविध आंबेडकरवादी पक्षांची आहे. आठवलेंचा पक्ष भाजपाबरोबरच राहतो की कसे हे देखील २८ जानेवारीपर्यंत माहित पडेल. मात्र सध्यातरी त्यांच्यासमोर दुसरा पर्याय दिसत नाहिये.
अगदी ५०-१०० मतांनी पराभव / विजय होण्याची शक्यता असणारी यावर्षीची निवडणूक अगदी रोचक होणार आहे हे नक्की. कोण कोठे जिंकेल हे आजच सांगणे अवघड असले तरी आपण आपापले अंदाज मांडू शकता. मात्र स्थानिक उमेदवाराचे कर्तुत्व, त्याचा इतिहास पाहूनच त्याला निवडून द्यावे ही माझीतरी अपेक्षा आहे. पक्ष कोणताही असो, काही फरक पडू नये असे मला वाटते.
आमच्या ठाण्यात विविध पक्षांनी आपापल्या विभागातील सोसायट्यांना भेटणे सुरु केले आहे. आम्हीही आमच्या समस्या / मागण्या त्यांच्यापुढे मांडून काही अपेक्षा ठेवल्या मात्र सध्या कोणताही उमेदवार कोणतेही वचन देण्यास राजी नाही यावरुन त्यांच्या मनाची अस्थिरता देखील दिसून येते. एकंदरीत उमेदवारांसाठीही ही निवडणूक वेगळी ठरणार आहे हे निश्चित.
तुम्हाला काय वाटते ते जाणून घेण्यास इच्छुक आहे.
अवांतर : मी लेखाच्या शिर्षकात मुंबईचा उल्लेख केला असला तरी धागा मुंबई, ठाणे, पुणे आणि इतर शहरांतल्या निवडणूकींच्या चर्चांसाठी वापरला जाऊ शकतो. राज्यांच्या निवडणूकांवर इथे अगोदरच एक धागा असल्यामुळे त्याची चर्चा त्याच धाग्यावर केली तर ते संदर्भांसाठी उपयुक्त राहिल.
💬 प्रतिसाद
(405)
श
श्रीगुरुजी
Wed, 02/08/2017 - 18:23
नवीन
अशक्य. मुंबईत अशी क्रमवारी असेल.
(१) भाजप (२) कॉंग्रेस (३) शिवसेना (४ व ५) मनसे किंवा राष्ट्रवादी
- Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद
Wed, 02/08/2017 - 18:36
नवीन
हैला भारीच की!
माझा अंदाज -
शिवसेना - ७५-८५, भाजप - ४५-५५, काँग्रेस - ३५-४५, मनसे - २०-३०, राष्ट्रवादी - १०-१२, सपा - ५-१०, अपक्ष - ३५-४०.
अपक्षातले शिवसेनेचे बंडखोर किती येतात यावर बरंचसं अवलंबून असेल असं दिसतं. शिवसेनेला कुणाचा पाठिंबा घ्यायचा(यापुढे युती नाही म्हटल्यामुळे) हा प्रश्न मात्र नक्की पडेल असं मला वाटते.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 02/08/2017 - 10:41
नवीन
मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस धक्कादायक विजय नोंदवणार असे वाटते.
अशक्य
आयसीसीच्या अध्यक्षपदाची मुदत संपल्यानंतर पवारांना परत क्रिकेटमध्ये घुसायचे होते. एखाद्या संघटनेच्या सर्वोच्च पदावर पोहोचून निवृत्त झाल्यावर परत सर्वात खालच्या पदावर पुन्हा जाणे हे पदासाठी अत्यंत हपापलेले असल्याचे लक्षण आहे. असे करणे म्हणजे नारायण मूर्तींनी अध्यक्षपद सोडल्यानंतर पुन्हा एकदा इन्फोसिसमध्ये ट्रेनी प्रोग्रॅमरचा जॉब घेण्यासारखं आहे. एकतर आपलं वय झालेलं आहे, दुसरं म्हणजे आपला क्रिकेटचा काहीही संबंध नाही, तिसरं म्हणजे आपण या क्षेत्रातल्या सर्वोच्च पदावर पोहोचलो होतो, चौथं म्हणजे आपण या क्षेत्रात तब्बल १२ वर्षांहून अधिक काळ असल्याने आता इतरांना संधी द्यायला हवी. पण असला विचार करतील ते पवार कसले? यांना सगळं स्वतःलाच हवं असतं. बीसीसीआयमध्ये घुसण्यासाठी पवारांना मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष व्हायचे होते. आधी मुंबई क्रिकेट संघटनेत घुसूया व नंतर पुन्हा एकदा बीसीसीआय घुसावे आणि नंतर जमलं तर पुन्हा एकदा आयसीसीत तंबू टाकावा अशी त्यांची योजना होती. मुंबई क्रिकेट संघटनेत घुसण्यासाठी त्यांचे नाव मुंबईच्या मतदार यादीत असणे अनिवार्य होते व त्यासाठी आपण मुंबईत निवासस्थान आहे (मालकीचे/भाड्याचे) हे दाखविणे अनिवार्य होते. म्हणून ते मुंबईत आले. तिथे येण्याचा उद्देश बीसीसीआय मध्ये पुन्हा एकदा घुसावे एवढाच होता. त्यामुळे मुंबईत संघटना मजबूत करणे वगैरे असली कामे त्यांनी केलेली नाहीत.
आपली विश्वासार्हता शून्य आहे व आपण आयुष्यभर कोलांट्या उड्या मारणे व काड्या घालणे यापलिकडे काहीही केलं नाही ही खंत ज्या व्यक्तीला कधी वाटली नाही तिला इतर गोष्टींची खंत काय वाटणार?
३) नवी मुंबई मध्ये केलेला विकास जुन्या मुंबईतील जुन्या खोडांच्या डोळ्यासमोर आहे. इन्फ्रास्ट्रक्चर कसे उभे करायचे याचा हातखंडा फक्त पवारांकडे आहे. शिवसेना आणि भाजप यांच्यासारख्या येड्या गबाळ्याचे ते काम नाही. काँग्रेस, मनसे आणि एम आई एम सारखे चुटुरफुटूर पक्ष विकासाच्या बाबतीत खिजगिणतीत पण नाही.
काय विकास केला पवारांनी नवी मुंबईत?
४) सचिन अहिर सारख्या तरुण आणि धडाडीच्या कार्यकर्त्याच्या हातात संघटनेचे नेतृत्व ही सुद्धा जमेची बाजू आहे.
हहपुवा
५) माथाडी कामगार, गिरणी कामगार, गोदी कामगार आणि त्यांच्या संघटनांवर पवारांचा नेहमी वरचष्मा राहिला आहे. त्याचा देखील फायदा होऊ शकतो.
त्यांचा शून्य फायदा झाला. मुंबईत पवारांना स्थान नाही.
६) पवार स्पर्श म्हणजे मिडास टच...जैन, गुजराती आणि सिंधी समाज हे जाणून आहेत. त्यांच्या जुन्या मित्रांची पण आता चांगली बैठक बसत असेल.
मिडास टच म्हणजे हात लावतील त्याचे भाव वाढतील
७) परप्रांतीय लोकांना पवारांनी नेहमीच आधार दिला आहे. निरूपमला त्यांनी मुर्खात काढून त्याचे महत्व कमी करून टाकले आहे.
निरूपम हा मूर्ख आहे हा पवारांना इतक्या उशीरा साक्षात्कार झाला! २००९ व २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत याच पवारांनी व त्यांच्या पक्षाने निरूपमला पाठिंबा दिलेला होता.
८) आता राहिला प्रश्न मुस्लिम समाजाचा. त्यांच्याकडे कोणताच चांगला पर्याय नाहीये. एम आई एम थोडीफार वळवळ करेल पण राष्ट्रवादीसाठी ते लाभदायक असेल.
इशरत जहांसारख्या अतिरेक्याला पाठिंबा देणे (दस्तुरखुद्द पवारांनी तिला निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र दिले आहे), तिच्या घरच्यांना १ लाखाची मदत देणे (डावखरे व आव्हाड), शहीद इशरत जहां असे नाव रंगविलेली अॅम्ब्युलन्स सुरू करणे (आव्हाड) असली घॄणास्पद कृत्ये करणारी राष्ट्रवादी काँग्रेस मुस्लिमांसाठी उत्तम पर्याय असणारच.
- Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक
Wed, 02/08/2017 - 13:08
नवीन
प्रतिसाद आवडला.
हे एकदम पटले !!
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Wed, 02/08/2017 - 14:57
नवीन
हे एकदम पटले !! >> लोल!
- Log in or register to post comments
ख
खेडूत
Wed, 02/08/2017 - 16:42
नवीन
एव्हडंच नाही, तर औरंगजेबाला सूफी संत म्हणवणे वगैरे होतंच.

- Log in or register to post comments
व
विशुमित
गुरुवार, 02/09/2017 - 06:33
नवीन
फोटोमध्ये दाखवलेल्यांच्या मते असेल सुफी संत वगैरे... मला याबद्दल नाही माहिती.
मग पुढे काय झाले या आंदोलनाचे? प्रदर्शित झाला का पिक्चर?
औरंगझेब, बाजीराव मस्तानी, पद्मावती, राजसंन्यास याला विरोध करणाऱ्यांनी सिनेमॅटिक लिबर्टी चे नाव ऐकले होते का नाही कधी? तुच्छ मेले...!!
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
गुरुवार, 02/09/2017 - 07:33
नवीन
पण ते राष्ट्रवादीच्या झेंड्याखाली उपोषण करत आहेत ना?
एम आय एम च्या नाही.
साहेबांची याला संमती होती म्हणायचे का?
- Log in or register to post comments
व
विशुमित
गुरुवार, 02/09/2017 - 10:45
नवीन
मला खरंच या बद्दल माहिती नाही.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
गुरुवार, 02/09/2017 - 11:07
नवीन
श्या! असं कसं व्हायचं विशुमित... इतकं स्पष्ट बोलाल तर पद मिळणं मुश्किल आहे बॉ!
सांगायचं ना "हे स्थानिक पातळीवर स्थानिक कार्यकर्ते काय उपक्रम करतात त्याला राष्ट्रिय नेतृत्वाची सहमती असेलच असे नसते, स्थानिक नेत्यांच्या बावळटपणा म्हणजे पक्षाची अधिकॄत भूमिका, धोरणं नाहीत इ. इ. ब्ला ब्ला ब्ला!"
शिका काहीतरी गुरुजनांकडून....
- Log in or register to post comments
व
विशुमित
गुरुवार, 02/09/2017 - 11:23
नवीन
असं म्हणता..!! असलं जमलंच नाही राव आपल्याला कधी.
त्यात मी गुरुशिष्य परंपरेला कधीच तिलांजली दिली आहे.
- Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे
गुरुवार, 02/23/2017 - 07:51
नवीन
=))
काय आजचा हालहवाल?
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
गुरुवार, 02/23/2017 - 12:32
नवीन
मिपाकर मंदार भालेराव यांचे फेसबुक पोस्ट मार्मिक आहे ह्यावरः
तिकडे 'साहेब' म्हणत असतील,
कोणीही जिंकलं तरी 'गुलाल' आम्हीच उधळणार
पक्ष बदलला तरी सगळीकडे माझीच माणसं !!!
- Log in or register to post comments
व
विशुमित
गुरुवार, 03/02/2017 - 12:06
नवीन
आता पुण्यामध्ये शेवटच्या क्षणी भाजप मध्ये सामील झालेल्या सौ. रेश्मा भोसले यांनी तर विजय झाल्या झाल्याच महापौर होण्याचे स्वप्न बोलून दाखवले. कडी म्हणजे काकडे त्यांचे व्याही आहेत वाटतं. बिचाऱ्या मुक्त टिळकांचे तिकीट कापू नये म्हणजे मिळवले.
- Log in or register to post comments
न
निष्पक्ष सदस्य
Tue, 02/07/2017 - 14:47
नवीन
नोटबंदीनंतर मुंबईकरांना प्रत्यक्षात किती त्रास झाला,यावर सारं डिपेन्ड आहे,जर फारसा त्रास झाला नसेल तर कोणालाही बहुमत मिळणार नाही.आणि जर त्रास झाला असेल तर शिवसेनेचे चान्सेस ज्यादा आहेत,नाही म्हटलं तर सत्तावीस टक्क्यापैंकी वीस टक्के मराठी मते शिवसेनेला मिळायला हवीत.
राष्ट्रवादीची ताकद मुंबईमध्ये अजिबात नाही.त्यापेक्षा काँग्रेस धक्का देवू शकली असती,पण त्यांच्यातसुद्धा फूट आहे अन् एकमेकांची तोंडे विपरीत दिशेला आहेत,त्यामुळे शक्यता कमी आहे.
मला भाजपचा पराभव व्हावा असे व्यक्तीशः वाटते.
भाजप जर जिंकली तर तमाम मराठी बांधवांनी आपला गाशा गुंडाळून उपनगरांमध्ये यावे.(ऑलरेडी बरेच आले आहेत)
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Wed, 02/08/2017 - 05:40
नवीन
असल्या भितीचे बागुलबोवे उभे करण्यात शिवसेनेचा हात कित्येक दशकांमध्ये कोणी धरू शकलेले नाही. दक्षिण मुंबईतून मराठी माणूस उपनगरांमध्येच नव्हे तर सुरवातीला ठाण्याला, मग डोंबिवली-कल्याणला आणि त्यानंतर थेट अंबरनाथ-बदलापूरला स्थलांतरीत व्हायची प्रक्रीया गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे.आणि त्यापैकी कित्येक वर्षे शिवसेनेचाच महापौर मुंबईत होता. मराठी माणसाच्या या स्थलांतराविरूध्द शिवसेनेने काय मोठे तीर मारले होते? बरं महापालिकेला या बाबतीत मर्यादीत अधिकार असतील आणि फार काही करता येत नसेल तर मग भाजप जिंकल्यास मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार व्हावे लागेल अशी कोल्हेकुई कशाकरता? जे काही होईल त्याविषयी महापालिकेला काहीही करता येणार नाही-- मुळातल्या स्थलांतराविषयी नाही आणि ते स्थलांतर थांबविण्याविषयीही नाही-- अगदी कोणीही सत्तेत आले तरी--- शिवसेना/भाजप किंवा काँग्रेसही.
एकूणच कुठल्या तरी समाजगटाविरूध्द लोकांच्या मनात विनाकारण भिती निर्माण करायची आणि मग त्या समाजगटापासून तुमचे संरक्षण करणारा तारणहार आपणच अशा पध्दतीने स्वतःला पुढे आणायचे आणि त्या निमित्ताने मतांची झोळी भरून घ्यायची या प्रकारात शिवसेनेला इतर कोणताही पक्ष पुरा पडू शकणार नाही. 'परप्रांतियांनी' (गुजर**सह) मुंबईची कशी वाट लावली याचा घोषा शिवसेना वर्षानुवर्षांपासून लावत आली आहे. आणि ही वाट कशी लावली हे मराठी माणसाला सांगायला परत एका गुजराथ्यालाच बोलावून घेतले. पण काय करणार. शिवसेना म्हटली की निवडणुक काळात मराठीचे पंचवार्षिक उमाळे येणे आणि त्या खोट्या भावनिक आवाहनाला मराठी माणसाने बळी पडणे आणि परत परत शिवसेनेलाच निवडून देणे हा प्रकार वर्षानुवर्षे चालत आला आहे. यावेळी काही बदल होतो का तेच बघायचे.
- Log in or register to post comments
व
विशुमित
Wed, 02/08/2017 - 06:11
नवीन
म्हणूनच म्हणतो राष्ट्रवादी मुंबईत कैक पटीने चांगली भाजप आणि शिवसेने पेक्षा...!!
- Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद
Wed, 02/08/2017 - 06:22
नवीन
ते राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांमध्ये पक्षाच्या कार्यक्रमातच स्टेजवरच काहीतरी बंदूक तलवारीने भांडण झाल्याचं ऐकले होते, पुढे काय झाले कोणाला माहिती आहे का?
- Log in or register to post comments
व
विशुमित
Wed, 02/08/2017 - 06:38
नवीन
वाद मिटला कधीच..!!
- Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर
Wed, 02/08/2017 - 08:31
नवीन
३८००० कोटीच्या बजेटच्या २ टक्के कमिशन जरी धरले तरी वार्षिक १००० कोटी होतातच. त्या कमिशनचा मोह सुटत नाही आणि त्या कमिशनच्या जोरावर मसल पावर उभी करता येते म्हणून मग मराठी माणूस वगैरे बोलबच्चन द्यावे लागतात.
ठाकरे यांनी व्यंगचित्रकाराची नोकरी सोडल्या नंतर कोणता उद्योग धंदा केला आणि त्यांच्या उत्पन्नाचा स्त्रोत काय होता हा प्रश्न आजवर कोणी विचारला नसावा. विचारला असता तर मुडदाच पडला असता.
इंदिरा गांधींच्या समोर वाघाचे भिजके मांजर झाले होते असे मात्र कुठेतरी वाचले आहे. बाईंना सुद्धा कट मिळत असेल कदाचित.
- Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद
Wed, 02/08/2017 - 08:41
नवीन
हे कोणत्या राजकीय पक्षाच्या बाबतीत खरे नाही?
याचा संदर्भ देता का प्लिज?
बाकी कटचं म्हणाल तर मग काही लाख कोटींचा कट किती निघेल बरे?
- Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर
Wed, 02/08/2017 - 09:02
नवीन
कुठेतरी वाचले आहे असे म्हटले याचा अर्थच मला कुठे वाचले ते नीट आठवत नाही.
केंद्र आणि महापालिका यांची तुलना करु शकत नाही. शिवाय केंद्राला आर्थिक पाहणी अहवाल द्यावा लागतो. क्वचित कॅगला वगैरे उत्तर द्यावे लागते.
त्यामुळे २जी सारखे भ्रष्टाचार उघडकीला येतात. महापालिकेत असे काही नसते बहुधा.
तसे असावे यासाठीच पारदर्शकता हा प्रतिष्ठेचा मुद्दा केला गेला आहे.
थर्ड पार्टी ऑडिटरचा नेमावा हा मुद्दा किरीट सोमैय्या यांनी काढल्यावर उधोजीराजेंचे पित्त खवळले ना ?
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Wed, 02/08/2017 - 10:01
नवीन
आप्पा, असे काही नसते हो. वीस टक्के कमीशन आहेच सरकारी खात्यांमधे. ह्या वीसटक्क्यांत बाबू पासून मंत्र्यांपर्यंत (विरोधी पक्षनेतेही) सर्वजण वाटा घेतात... कॅगचे आर्थिक पाहणी अहवाल हे सरकारने खर्च कुठे कसा केला हे दाखवणार. कॉन्ट्रॅक्टरने खर्च कसा केला हे नाही दिसत त्यात. तसेच उघडकीस येत नाही म्हणून भ्रष्टाचार होत नाही असे नसते. पकडला तर चोर असेही नसते. भ्रष्टाचार उघडकीस आणणारे असंतुष्टच असतात बहुधा ( प्रामाणिक विसल्ब्लोअरांची संख्या बोटांवर मोजण्याइतकी.). आदर्श घोटाळा बाहेर येण्यास तिथे कंत्राट मिळण्यास असफल झालेले कंत्राटदार कारणीभूत होते, अन्यथा आदर्श इमारत उभी राहून सगळे सुखनैव पिढ्यांपिढ्या राहिले असते.
भ्रष्टाचार करण्यात व तो उघडकिस आणण्याची धमकी देऊन त्यावर मलिदा खाण्यास सत्ताधारी व विरोधी दोन्ही पक्ष बरोबरीने सामिल असतात.
- Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद
Wed, 02/08/2017 - 10:36
नवीन
डांगेंजी, बहुतेक मुद्द्यांशी सहमत!
- Log in or register to post comments
व
विशुमित
Wed, 02/08/2017 - 10:43
नवीन
डांगे जी आपल्याकडून ...+1111111
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
गुरुवार, 02/09/2017 - 07:49
नवीन
भारताच्या जीडीपीच्या ४५% टक्के तिन्ही प्रतलांवरच्या शासनांचा खर्च असतो. तर येत्या काळात बाबू आणि राजकारणी ४५%* १२५ लाख कोटी *( १+ (१+७%)+ (१+७%)^२+ ....) इतके पैसे कमवणार आहेत?
तुम्ही काय म्हणताय त्यात २०% जरी तथ्य निघाले तरी देशात २-३ वर्षांत हुकुमशाही आणि न भूतो न भविष्यति अशी विषमता* येईल.
हे वाक्यच विचित्र आहे. एकतर असं नाही. म्हणजे स्ट्रिक्टली तर अजिबात नाही. पण जरी असेल तर योग्य आहे. कंत्राटदाराचा खर्च स्टॅट्यूटरी ऑडिटर पाहतोच. पण तो कॅगने देखिल का पाहावा म्हणे?
शिवाय अलिकडे ज्या १७ लाख कोटी प्रकल्प इ थकले होते , त्यातले अनेक पीपीपी पॉलिसीतून एस पी व्ही माध्यमातून केलेले होते. या एस पी व्ही चा मूळ उद्देशच काय आहे? बिड करणार्या कंपनीच्या बाकी साडेसातींपासून मुक्ती आणि अक्सेस टू अकाउंट्स फॉर द पब्लिक ऑथॉरिटी.
व्यवसाय आणि राजकारणाबद्दल अशी मते असतील तर मुंबईत मते देण्यापेक्षा त्याच्या शेजारी पुरेशी खोली असलेला अरबी समुद्र आहे, तिथे जाऊन चिंतन करावे. डांगे सायेब, जास्ती गॉसिप करायचं काम नाय!!!
==========
*विशुमित शब्दाचा काय संबंध आहे का विषमतेशी?
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
गुरुवार, 02/09/2017 - 11:26
नवीन
>> आम्हाला गणितात बोर्डाने ५२ मार्क्स देऊन उपकृत केले होते, असली गणितं समोर आली की त्याची कचकून आठवण येते. काही हरकत नाही, तुम्ही गणित गणित खेळा....
>> बंधो! तुम्हीच सांगा मग किती भ्रष्टाचार आहे भारतात आणि विषमता किती आहे ती? बाबू लोकांची हुकूमशाहीही तुम्हीच सांगा....
>> आपण छगन भुजबळ हे नाव ऐकलंय का?
>> कॅगने काय करावे हे मी कुठेच म्हटले नाही. तुम्हीच म्हणालात कॅगमुळे भ्रष्टाचार बाहेर येतो ते....
>> मी काय म्हणतो, एक दहा-बारा सरकारी कंत्राटं घेणार्या ठेकेदारांशी भेटून घ्या ना! म्हणजे कसं हे जार्गन ऑन द ग्राऊंड किती अकाऊंटेबल आहे ते कळून येईल...
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
गुरुवार, 02/09/2017 - 11:39
नवीन
नाय हो असं दुसरे सायेब म्हणालेत, मी नै.
अरे भाय, आप समंदरी मछली को बाल्टीभर पानी देख कर आने को बोल रहे है.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
गुरुवार, 02/09/2017 - 11:52
नवीन
असं आहे होय! मग समंदरी मच्छलीने प्रश्न-शंका विचारण्यापेक्षा थेट अनुभव-उत्तरं दिलीत तर बरं होईल... आमच्याही बाल्टीभर पाण्यात भर पडेल!
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
गुरुवार, 02/09/2017 - 11:59
नवीन
गंभीर नोटेवर म्हणतो ....
१. देशाचा जीडीपी १२५ लाख कोटी इ इ आहे.
२. यात सरकारचा उत्पन्न (वा खर्च वा हिस्सा) ४५% असतो.
३. यातले २०% तुमच्या मते बाबू नि राजकारणी यांचा भ्रष्ट हिस्सा आहे.
४. जी डी पी अंदाजे सात टक्क्याने वाढणार आहे.
५. आतापर्यंत केलेला भ्रष्टाचार शून्य मानू.
६. हुतात्मा होणारे सैनिक ते रूळ तपासणारे कामगार ते सफाई कर्मचारी ते राष्ट्रपती सगळेच झाडून करप्ट आहेत असे मानू.
७. राजकारणी आणि बाबू हे लोकसंख्यच्या किती प्रमाणात असावेत? तर २.५/१३० = २%
८. आजचे संपत्तीचे विभाजन सर्वांना स्वीकार्य आहे असे मानू.
मग पुढे या लोकांकडे किती पैसे करप्शनचे जमा होणार आहेत (पगाराचे वेगळे, सरकारी अधिकृत सोयी वेगळ्या) त्याचे गणित मी वर लिहिले आहे.
२% लोकांना हे लै जास्त पैसे झाले. वास्तविक असं होतं असं मानलं तर ३-४ वर्षांत देश फुटेल, बुडेल, इ इ असं मानल्यासारखं होतं. असो.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
गुरुवार, 02/09/2017 - 12:08
नवीन
हे आपण खरंच गंभीरपणे लिहिले आहे?
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
गुरुवार, 02/09/2017 - 12:46
नवीन
अर्थातच. शक्य तितकी सुस्पष्ट, लॉजिकली वाटर्टाइट आणि संख्यात्मक अर्थाची विधाने करण्याकडे माझा कल असतो. ( आता हे गमतीने घ्या - त्यामुळे लोकांच्या मनात माझ्या शिक्षणाबद्दल संभ्रम निर्माण होतात.) मात्र लातूरकडचा खेडूत असल्यामुळे मात्र पुणे-मुंबईकरांसमोर भाशेचा घोळ होतो.
- Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर
गुरुवार, 02/09/2017 - 07:58
नवीन
ओके. म्हणूनच एकाच पक्षाची किंवा कुटुंबाची सत्ता वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी चालू नये.
केंद्रात जसे गांधी घराणे होते तसे मुंबईत ठाकरे घराणे बस्तान बसवून आहे. ही जहागीर नष्ट झालीच पाहिजे.
उद्या केंद्रात जर मोदींनी स्वतःची जहागीर सुरु केली तर त्यांना पण विरोधच असेल.
यासाठी मुंबई महापालिकेत खांग्रेस आले तरी चालेल पण शिवसेनारुपी रावण महापालिका निवडणुकीत मेलाच पाहिजे अशी इच्छा आहे.
शिवसेनेचे मंत्री सीएमना भेटून आले म्हणे आणि सरकार नोटिस वर आहे असे सांगितले.
लाळ अजून गळतेच आहे.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
गुरुवार, 02/09/2017 - 08:24
नवीन
जहागिरी नष्ट झाल्याचे बघायला नक्कीच आवडेल....
जिथे जिथे सरकारात सामील आहेत तिथून संबंध तोडले असते तर मानले असते उधोजीला...
- Log in or register to post comments
व
विशुमित
गुरुवार, 02/09/2017 - 12:26
नवीन
<<<म्हणूनच एकाच पक्षाची किंवा कुटुंबाची सत्ता वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी चालू नये.>>
-- आपलं प्रचंड अनुमोदन.
- Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद
Wed, 02/08/2017 - 10:34
नवीन
CAG ला उत्तर द्यावे लागते म्हणून भ्रष्टाचार सापडतो हा मुद्दा बाजूला ठेवुयात, यावर सहमती होणार नाही. तुम्ही सरसकटपणे २% कट मिळत असेल असे गृहीत धरले आहे म्हणून म्हणालो. थर्ड पार्टी ऑडिटर किंवा CAG महापालिकांसाठीही असावा यावर दुमत असण्याचे कारण नाही. मुद्दा साधा आहे, भाजप हा महत्वाचा मुद्दा मानतो तर नेमकी कोणती पारदर्शिकता अपेक्षित आहे याचे उदाहरण त्यांनी लोकांसमोर ठेवणे आवश्यक आहे. नागपूर महापालिकेमध्ये यासाठी कोणत्या स्टेप्स घेण्यात आल्या(का?) हे सांगणे गरजेचे आहे. हे न सांगता फक्त पारदर्शिकता हवी असे म्हणणे संदिग्ध आहे. शिवाय आर्थिक सर्वेक्षण अहवालात बिएमसी सर्वात पारदर्शक असा उल्लेख आल्याने भाजपला हा मुद्दा अशा संदिग्ध अर्थासह फार परिणामकारकपणे वापरता येईल असे वाटत नाही.
अवांतर : संदर्भ म्हणजे कुठली लिंकच असावी असे नाही, गॅरीसरानी खाली संदर्भ दिला आहे.
- Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर
गुरुवार, 02/09/2017 - 08:01
नवीन
आर्थिक सर्वेक्षण अहवालात बिएमसी सर्वात पारदर्शक असा उल्लेख आल्याने
नाय नाय. तो अहवाल सोयीनुसार वापरला जातोय. काल फडणवीस यांनी बरीच चिरफाड केली.
तुमचे दुमत नसेल कदाचित. उद्धव ठाकरे तर तयार नाहीत ना थर्ड पार्टी ऑडिटला.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
गुरुवार, 02/09/2017 - 08:19
नवीन
एक गोष्ट समजत नाही. अफझलखानाने नेमलेल्या कुठल्या समितीने पाठ थोपटलेली पेंग्विनसेनेला कशी चालते?
- Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद
गुरुवार, 02/09/2017 - 08:46
नवीन
मुद्दा मिस होतोय. बिएमसी पारदर्शक आहे कि नाही हे मला सिद्ध करायचं नाहीये. "बिएमसीत पारदर्शक व्यवहार हवा आहे" म्हणजे नेमके काय हवे आहे याबद्दल भाजप ने जास्त बोलावे असे माझे मत आहे. भाजप जर फक्त मतांकडे डोळा ठेवून हे व्यक्त्यव्य परत परत पुढे आणणार असेल तर ते खोडून काढायला सर्वेचा वापर होणारच आहे. भाजपने नागपूर महानगरपालिकेत पारदर्शिकतेसाठी नेमके काय केले हे सांगायलाच नको का?
अवांतर : फडणवीसांनी केलेली चिरफाड परिणामकारक होती का हा प्रश्नच आहे. आर्थिक सर्वेक्षण अहवालात, पान नं ३०७वर "रँकिंग ऑफ यूएलबीज ऑन ट्रान्स्परन्सी, अकाऊंटेबिलिटी अँड पार्टीसिपेशन" या ग्राफ मध्ये मुंबई नं १ ला दाखवलेली आहे. आता याचा अर्थ ज्याने त्याने आपापल्या परीने लावावा.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
गुरुवार, 02/09/2017 - 09:07
नवीन
तसे भाजपने केले पाहिजेच. ही अपेक्षा ठेवली तर त्यात काही चुकीचे आहे असे वाटत नाही.
या आणि दुसर्या चर्चेत म्हटल्याप्रमाणे माझा या निवडणुकांमध्ये एकच इंटरेस्ट आहे. शिवसेनेचा पराभव व्हायला हवा.कोणीही जिंकले तरी सामान्य मुंबईकराच्या आयुष्यात घंटा काहीही फरक पडेल असे वाटत नाही. तरीही उध्दव ठाकरेंनी २०१४ पासून जे एकेक प्रकार चालविले आहेत त्या माजाचा स्त्रोत असलेली मुंबई महापालिकेची सत्ता गेली पाहिजे. बाकी ताकाला जाऊन भांडे लपविणे, उगीच पोलिटिकली करेक्ट वागणे, गुळमुळीतपणे काहीतरी लिहिणे किंवा ज्याला बिटिंग अराऊंड द बुश म्हणतात तसले प्रकार मला तरी जमत नाहीत (या बाबतीत बाळासाहेब माझे आदर्श आहेत :) ) त्यामुळे या आणि याच कारणावरून शिवसेनेचा पराभव व्हावा असे मला वाटते.
बाकी friends turned enemies असतात त्यांच्यावर मुळातल्या शत्रूपेक्षा अधिक राग असणे ही अगदी स्वाभाविक गोष्ट आहे. मनसेची स्थापना झाल्यानंतर त्यांनीही शिवसेनेचा पराभव व्हावा याकडेच त्यांचे लक्ष केंद्रित केले होते, वाघेलांनी गुजरातमध्ये तसेच लक्ष भाजपचा पराभव होण्यावर केंद्रित केले होते आणि राष्ट्रवादीनेही १९९९ मध्ये तसेच लक्ष काँग्रेसचा पराभव व्हावा याकडे केंद्रित केले होते. त्याच धर्तीवर शिवसेनेचा पराभव व्हावा असे मला वाटते.
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
गुरुवार, 02/09/2017 - 07:27
नवीन
आर्थिक पाहणी अहवाल म्हणजे इंग्रजीत काय?
महापालिकेत देखिल दुसरे का होईना (कॅगसारखेच) ऑडिट असायचेच. अलिकडे कॅगचेच असते.
- Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद
गुरुवार, 02/09/2017 - 09:53
नवीन
इकॉनॉमिक सर्वे :):).
सध्या महापालिकेतील ऑडिट हे स्थायी समिती, आयुक्त आणि जास्तीत जास्त महाराष्ट्र अकाउंटंट्स जनरल इथंपर्यंत असते. CAG बहुतेक पालिकांचं करत नसावं!
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Wed, 02/08/2017 - 09:14
नवीन
शिवसेनेने इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीचे समर्थन केले होते. बाळासाहेबांचा एकाधिकारशाहीवर विश्वास असल्यामुळे इंदिरा गांधींची आणीबाणी त्यांच्या स्वभावाला अनुसरूनच होती. १९७७ च्या निवडणुकांमध्ये शिवसेनेने काँग्रेसला पाठिंबा दिला होता आणि त्याबद्दल वामनराव महाडिक आणि प्रमोद नवलकर यांना विधानपरिषदेवर निवडून आणण्यात काँग्रेसने पाठिंबा दिला होता. १९८० च्या विधानसभा निवडणुकांच्या वेळीही शिवसेनेने काँग्रेसलाच पाठिंबा दिला होता. याविषयी अधिक इथे . तसेच मुंबईचे शिवसेनेचे महापौर हेमचंद्र गुप्ते शिवसेनेतून बाहेर का पडले? कारण १९७७ मध्ये शिवसेनेने महापौर निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या मुरली देवरांना पाठिंबा दिला होता ते हेमचंद्र गुप्तेंना पटले नव्हते.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 02/08/2017 - 10:18
नवीन
२००७ च्या महापालिका निवडणुकीनंतर पुण्यात शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देऊन उपमहापौरपद पदरात पाडून घेतले होते.
- Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद
Wed, 02/08/2017 - 12:59
नवीन
आणीबाणीला समर्थन - बाळासाहेबांच्या काही न आवडलेल्या निर्णयांपैकी तो एक होता आणि याचा नेहमी खेद वाटतो. दुर्दैवाने बाळासाहेबांचं त्यामागचं लॉजिक काय होत यावर फारसं वाचायला मिळत नाही. तुम्ही वर दिलेल्या या सगळ्या राजकीय खेळ्या (भलेही स्वार्थासाठी) होत्या असा निष्कर्ष निघू शकतो. पण म्हणून वाघ मांजर झाला वगैरे पटण्यासारखे नाही. अशा युती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मुद्द्यांवर केल्या जातात, सर्व पक्ष करतात. काश्मीरमधली सध्याची युती सगळ्यांनाच पटली आहे असे नाही. शिवाय शिवसेनेला सुरुवातीच्या दिवसात मोठे करण्याचे काम काँग्रेसनेच केले असावे असे मला वाटते (कम्युनिस्टांवर कुरघोडी करण्यासाठी, वसंतसेना त्यातूनच आले होते का?). मग अशा काँग्रेसच्या जवळ असलेल्या, आणीबाणीचे समर्थन केलेल्या पक्षाशी भाजपनेही इतकी वर्षे युती केलीच की!
- Log in or register to post comments
N
NiluMP
Wed, 02/08/2017 - 14:07
नवीन
++१००
- Log in or register to post comments
N
NiluMP
Wed, 02/08/2017 - 14:07
नवीन
++१००
- Log in or register to post comments
N
NiluMP
Wed, 02/08/2017 - 14:08
नवीन
+१००
- Log in or register to post comments
श
शलभ
Wed, 02/08/2017 - 09:42
नवीन
+११११११
- Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके
Tue, 02/07/2017 - 18:19
नवीन
निवडणूकीनिमित्त सगळीकडून नुसती प्रचाराची राळ अन आरोप प्रत्यारोपांचा धुरळा उडत आहे. एक सामान्य माणूस म्हणून मुर्खपणे बरळणार्यांचा अगदी संताप येतो. बरं राजकारणात चांगल्या व्यक्तींनी यावे आणि राजकारण बदलावे असे म्हणतात पण चांगल्या व्यक्तींच्या संयमाचा बांध फुटावा अशी परिस्थिती आणतात हे लोक !
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- ›
- »