मुंबई महानगर पालिका निवडणूक २०१७
नमस्कार !
महाराष्ट्रात भाजप-सेना युतीचे राज्यसरकार बनल्यापासुन अनेक कुरबुरी चालू होत्या. रोज रोज एकमेकांवर आरोप तर करायचे पण एकत्र सत्तेतही राहायचे हे पाहून माझ्यासारख्या सामान्य आणि निष्पक्ष व्यक्तींना नक्कीच उबग आला असेल.
काल २६ जानेवारी २०१७ च्या मुहुर्तावर शिवसेनेने युती तोडण्याची घोषणा केली आणि भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांच्या कार्यकर्त्यांना जितका आनंद झाला नसेल तितका एक सामान्य माणूस म्हणून मला झाला.
प्रत्येक पक्ष आतापर्यंत बेडीकीने बैलाचे सोंग घेतल्याप्रमाणे आपली ताकद फुगवून दाखवत होता त्यांची खरी ताकद आता कळणार आहे.
मुंबई, ठाणे, पुणे आणि इतर शहरात होणार्या पालिका / जि.प. आता भाजपा, सेना स्वतंत्रपणे लढतील तर काही ठिकाणी राष्ट्रवादी-कॉग्रेस युती करतील. शिवाय या खेचाखेचीत निवडणूकांसाठी १ महिन्यापेक्षाही कमी कालावधी राहिला असल्यामुळे या वेळची निवडणूक वेगळी ठरणार आहे. प्रत्येक पक्ष वेगवेगळे लढत असल्यामुळे पक्षातील तिकिट इच्छूकांना बर्याच प्रमाणात वाव मिळेल त्याचप्रमाणे इंपोर्टेड इच्छूकांना देखील बर्याच प्रमाणात वाव मिळेल. एकंदरीत निवडणूकीच्या तोंडावर पक्ष सोडून जाणार्यांची संख्या घटेल असा अंदाज आहे.
शिवाय एकाच वॉर्डात चार ते पाच मोठे पक्ष, स्थानिक वजनदार नेतेमंडळी निवडणूक लढविणार असल्यामुळे ऐनवेळी 'बशी घेणार्या' उमेदवारांना घसघशीत फायदा होण्याचा संभव आहे. पण नोटबंदी नंतरच्या या काळात हा प्रश्न वेगवेगळे पक्ष कसा सोडविणार हे पाहणे रोचक ठरणार आहे.
मुंबईत मागील वेळी मराठी मतांमधे जो सेना-मनसेच्या मागे एकवटण्याविषयी संभ्रम होता तो आता बर्याच प्रमाणात निवळला असून मराठी मतदाराला या दोघांपैकी नेमके कोणाला मत द्यायचे हे नक्की कळाले असावे असाही एक अंदाज आहे. मात्र काही नेते, सेना-मनसे समर्थक अजुनही सेना-मनसे युती होईल असे मनातल्या मनात मांडे खात आहे. मात्र ठाकरेंचा सध्याचा पवित्रा पाहता ते कोणाशीही युती करतील असे वाटत नाही. मात्र मतदानाचे निकाल आल्यानंतर मात्र सगळ्यांनाच सगळे ऑप्शन ओपन असतील असे वाटत आहे.
गुजराती, मारवाडी मतदार प्रामुख्याने भाजपचा मतदार मानला जातो. मात्र मुंबईतील बहुसंख्य गुजराती / मारवाडी समाज व्यापारक्षेत्रात गुंतला आहे. त्यांच्या प्रत्येकाच्या व्यवसायावर नोटबंदीनंतर काय आणि किती प्रमाणात परिणाम झाला यावर त्यांचे यंदाचे मतदान अवलंबून असेल की ते काहीही झाले तरी भाजपालाच मते देतील काय हे बघणे देखील रोचक ठरेल. त्यातच कालच शरद पवार साहेबांना पद्मविभुषण जाहिर झाला असल्यामुळे निवडणूकीच्या तोंडावर भाजपा राष्ट्रवादी अशी नवी युती होणार काय असादेखील संभ्रम उत्पन्न होण्याचा संभव आहे. मात्र अशी शक्यता निकालांअगोदर तरी दिसत नाही. कदाचित शिवसेनेने मुंबई / पुणे राखले तर ते भविष्यात राज्यसरकारमधून बाहेर पडू शकतात व त्यावेळी राष्ट्रवादी मदतीला येऊ शकेल अशीही एक शक्यता दिसते. (साहेबांना पदक अगोदरच्या कामगिरीबद्द्ल मिळाले आहे पण तो वेगळा मुद्दा आहे.)
युपी बिहारी मंडळी आपापल्या राज्यात सपा, बसपा, जनता दलाला आणि काही प्रमाणात भाजपाचे पाठीराखे असले तरी एकेकाळी ही मंडळी मुंबईमधे बर्याच अंशी काँग्रेस समर्थक होती. मात्र सध्याची काँग्रेसची अवस्था पाहता ही मंडळी कोणामागे उभी राहतात हे पाहणे रोचक ठरेल. कदाचित बर्याच ठिकाणी हीच मते निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
मुस्लीमबहूल भागात सपा ची कसोटी लागणार आहे तर ओवेसींची पार्टी काय करते यावर देखील लक्ष ठेवावे लागेल. ओवेसींनी कालच "मोदींना परदेशी दाढीवाले का आवडतात" असा वरवर योग्य वाटणारा सवाल विचारुन टीआरपी खेचून घेतला आहे.
सगळ्यात कठीण अवस्था विविध आंबेडकरवादी पक्षांची आहे. आठवलेंचा पक्ष भाजपाबरोबरच राहतो की कसे हे देखील २८ जानेवारीपर्यंत माहित पडेल. मात्र सध्यातरी त्यांच्यासमोर दुसरा पर्याय दिसत नाहिये.
अगदी ५०-१०० मतांनी पराभव / विजय होण्याची शक्यता असणारी यावर्षीची निवडणूक अगदी रोचक होणार आहे हे नक्की. कोण कोठे जिंकेल हे आजच सांगणे अवघड असले तरी आपण आपापले अंदाज मांडू शकता. मात्र स्थानिक उमेदवाराचे कर्तुत्व, त्याचा इतिहास पाहूनच त्याला निवडून द्यावे ही माझीतरी अपेक्षा आहे. पक्ष कोणताही असो, काही फरक पडू नये असे मला वाटते.
आमच्या ठाण्यात विविध पक्षांनी आपापल्या विभागातील सोसायट्यांना भेटणे सुरु केले आहे. आम्हीही आमच्या समस्या / मागण्या त्यांच्यापुढे मांडून काही अपेक्षा ठेवल्या मात्र सध्या कोणताही उमेदवार कोणतेही वचन देण्यास राजी नाही यावरुन त्यांच्या मनाची अस्थिरता देखील दिसून येते. एकंदरीत उमेदवारांसाठीही ही निवडणूक वेगळी ठरणार आहे हे निश्चित.
तुम्हाला काय वाटते ते जाणून घेण्यास इच्छुक आहे.
अवांतर : मी लेखाच्या शिर्षकात मुंबईचा उल्लेख केला असला तरी धागा मुंबई, ठाणे, पुणे आणि इतर शहरांतल्या निवडणूकींच्या चर्चांसाठी वापरला जाऊ शकतो. राज्यांच्या निवडणूकांवर इथे अगोदरच एक धागा असल्यामुळे त्याची चर्चा त्याच धाग्यावर केली तर ते संदर्भांसाठी उपयुक्त राहिल.
💬 प्रतिसाद
(405)
क
कपिलमुनी
Wed, 02/08/2017 - 08:51
नवीन
सध्या किंवा मागच्या टर्ममध्ये भाजपा मुंबई - ठाणे - कंडोमपा महापालिकेमधे सत्तेत सहभागी आहे का ?
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Wed, 02/08/2017 - 09:44
नवीन
शिवसेनेचे फ्लिपफ्लॉप---
१. राजकारण म्हणजे गजकरण त्यामुळे आपण राजकारणापासून दूर राहणार याचा एका बाजूने घोषा लावत असतानाच शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर वर्षातच निवडणुकांच्या राजकारणात उतरणे.
२. मुस्लिम लीगच्या नगरसेवकांनी (तत्कालीन भाषेत-- नगरपित्यांनी) महापालिका सभागृहात वंदेमातरमला विरोध केला. हा मुद्दा १९६७ च्या महापालिका निवडणुकांमध्ये गाजला होता. अर्थातच शिवसेनेने वंदे मातरमच्या बाजूने भूमिका घेतली होती. पण नंतर त्याच मुस्लिम लीगचा पाठिंबा घेऊन शिवसेनेचे सुधीर जोशी महापौरपदी विराजमान झाले.
३. १९७९ मध्ये मुस्लीम लीगबरोबर परत एकदा युती करून बाळासाहेबांनी जी.एम.बनातवालांबरोबर नागपाड्यामध्ये सभाही घेतली होती.
४. बाबरी शिवसैनिकांनी पाडली असेल तर त्यांचा मला अभिमान आहे हे जाहिर वक्तव्य करणार्या बाळासाहेबांनीच त्या जागेवर मंदिरही नको मशीदही नको तर मंगल पांडेचे स्मारक बांधा असेही म्हटले.
अशी इतरही उदाहरणे आहेतच. सर्वच राजकीय पक्षांनी असे फ्लिपफ्लॉप कधीनाकधी केले आहेत. पण आपला पक्ष आणि आपला नेता म्हणजे ध्रुवतार्याप्रमाणे अढळ आणि त्याचा प्रत्येक शब्द म्हणजे कधीच न बदलणारा असतो अशा स्वरूपाचा एक गैरसमज शिवसेना समर्थकांमध्ये इतर पक्षांच्या समर्थकांपेक्षा अधिक प्रमाणावर असतो. अर्थातच शिवसेनेच्या नेतेमंडळींमध्ये चांगले शिकलेले, इंटलेक्च्युअल्स फारसे कोणी नाही. एक सुरेश प्रभू होते त्यांचेही भाजपने अपहरण केले. सामान्य शिवसैनिक म्हणाल तर मुद्द्यांपेक्षा गुद्द्यांची भाषा अधिक भावणारे लोक हे. त्यामुळे एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवायचे ठरविले की मग त्याला कोणतेही प्रश्न न विचारता विश्वास ठेवला जायचे प्रमाण सर्वात जास्त!!
- Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर
Wed, 02/08/2017 - 09:58
नवीन
अलीकडे गुद्दे वगैरे सगळेच संपून निव्वळ पेट्यांचे गणित सुरु आहे. बाळासाहेब अॅक्टिव्ह असताना शिवसेनेत फक्त इनकमिंग होते.
नंतर काय झाले ते ठाऊक आहेच जनतेला.
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
गुरुवार, 02/09/2017 - 07:05
नवीन
आपल्याला कधीकधी ज्या संदर्भात ज्या वाक्यरचना सुचतात त्या जाँ फिदा टाईपच्य असतात. (आता गैरसमज नक्की शिवसेनेत सर्वाधिक असावा तुम्ही म्हणत आहात तर ) पण अशा गैरसमजाचा प्रादुर्भाव तरुण शिक्षित लोकांत जास्त असावा. मोदींचे भक्त देखिल यातच मोडतात.
- Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर
गुरुवार, 02/09/2017 - 08:11
नवीन
५. सुपारी घेऊन कामगारांचे संप फोडणे.
६. एन्रॉन- याबद्दल गॅरी भाउनी किंवा श्रीगुरुजींनीच अधिक लिहावे.
७. जावेद मियांदाद भेट
आणि बरेच आहे. तूर्तास एवढे पुरे.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Wed, 02/08/2017 - 14:24
नवीन
गॅरी ट्रुमन,
तुम्हाला स्थानीय लोकाधिकार समिती माहीत असेल. ही नसती तर आज मराठी माणूस मुंबईतल्या सरकारी कार्यालयांत केंव्हाच हद्दपार झाला असता.
रुग्णवाहिका मोठ्या प्रमाणावर चालवणं शिवसेनेने सुरू केलं.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Wed, 02/08/2017 - 17:45
नवीन
स्थानिय लोकाधिकार समितीचे सुरवातीच्या काळातील काम नक्कीच चांगले होते. पण त्या चांगल्या कामाबद्दल मुंबईकरांनी शिवसेनेला महापालिकेमध्ये कित्येक वर्षे सत्ताही दिली आहे. १९९२ ते १९९६ ही चार वर्षे वगळता १९८५ पासून आजपर्यंत मुंबईत शिवसेनेचाच महापौर आहे. १९८५ पूर्वीही शिवसेनेचे महापौर मुंबईत झाले होते.त्या कामासाठी दशकानुदशके सत्ता मिळणे हे जरा जास्त झाले नाही का? गांधी घराण्याने जो काही थोडाफार त्याग केला त्याबद्दल काँग्रेसला कित्येक दशके सत्ता मिळालीच होती त्यापेक्षा हे नक्की कसे वेगळे आहे?
सरकारी नोकर्यांमध्ये मराठी माणसाला स्थान मिळणे हा मुद्दा १९६० आणि १९७० च्या दशकात नक्कीच महत्वाचा होता कारण त्या काळात सरकारी नोकर्या हाच महत्वाची रोजगाराची संधी होती.पण आता तशी परिस्थिती नक्कीच नाही. त्यामुळे ४०-५० वर्षे जुने मुद्दे आणि त्याकाळात केलेले चांगले काम शिवसेना किती वर्षे उगाळत राहणार?
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Wed, 02/08/2017 - 19:11
नवीन
गॅरी ट्रुमन,
एकदा केलेलं असलं म्हणून काय झालं. सदिच्छा मिळतातच ना. शिवाय इतर कामं पण चालू असतातच की. मी सांगत नाही सगळी. ज्याच्यामुळे मतदाराच्या नजरेत राहता येतं अशी काम हुडकून काढण्यात शिवसैनिक तरबेज आहेत.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
गुरुवार, 02/09/2017 - 05:47
नवीन
या न्यायाने विन्स्टन चर्चिल इंग्लंडमध्ये आजीव पंतप्रधान व्हायला हवे होते. इतकेच नाही तर पुढील जन्मात जन्माला आल्यावरही ताबडतोब पंतप्रधानपदीच विराजमान व्हायला हवे होते. पण ब्रिटिश जनतेने कर्तुत्वाच्या परमोच्चबिंदूवर असताना विन्स्टन चर्चिल यांना घरी बसविले कारण युध्द सुरू असताना चर्चिल कितीही चांगले नेते असले तरी युध्दोत्तर काळात त्यांच्यापेक्षा अॅटली जास्त चांगले नेते होतील!! असे काही भारतात आपल्या जिवीतकाळात तरी होणे कठिणच दिसते.
स्थानिय लोकाधिकार समितीने ४०-५० वर्षांपूर्वी केलेल्या कामामुळे लोकांना शिवसेनेविषयी आत्मीयता असेल तर मग शिवसेनेने केलेल्या इतर प्रकारांमुळे दुरावा कसा वाटत नाही हेच समजत नाही. ग.वा.बेहरेंसारख्यांना शिवसैनिकांनी नक्की कशी वर्तणूक दिली होती? जे शब्द मी मिपासारख्या सार्वजनिक व्यासपीठावर लिहूही शकत नाही ते शब्द दसरा मेळाव्यांतून आणि इतर भाषणांमधून स्टेजवरून वापरले जात होते. महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्वाला--- पु.ल.देशपांडेंना बाळासाहेब नक्की काय म्हणाले होते?
असो.
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
गुरुवार, 02/09/2017 - 06:56
नवीन
१९४५ च्या ब्रिटिश मतदात्यांना २०१७ च्या भारतीय मतदात्यांपेक्षा श्रेष्ठ ठरवण्याआधी या ऑफन कोटेड जगाला मूर्खात काढणार्या विधानाचा अभ्यास व्हायला हवा.
शांती काळात चर्चिल नको असण्याचा आणि त्याचा हरण्याचा संबंध ही त्या लोकांनी उथवलेली हूल आहे.
- Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद
गुरुवार, 02/09/2017 - 08:22
नवीन
हे काही पटले नाही. हे प्रकरण या चर्चेत ओढण्याचे कारण समजले नाही. बाळासाहेबांचे या प्रकरणाआधीचे आणि नंतरचे पुलंबद्दलचे मत काहीच महत्वाचे नाहीये का? आणि हे प्रकरण घडले तेव्हा त्याला एक पार्श्वभूमी नव्हती का? आपल्या विचारसरणीच्या विरोधातील असले तरी महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व म्हणून त्यांना पुरस्कार जाहीर करण्याचा सुज्ञपणा युतीच्या सरकारने दाखवला होता (सोयीकर व्यक्तींना पुरस्कार देण्याचा ट्रेंड असतानाही). त्यानंतर हे शिवशाहीचे नाही ठोकशाहीचे सरकार आहे असे राजकीय दृष्टिकोनातून मत व्यक्त करणे बाळासाहेबांना खटकले नसते तरच नवल होते (बाळासाहेबांनी वापरलेल्या वाक्याचे समर्थन करण्याचा हेतु नाही). त्यावेळी वापरली जाणारी भाषा हि त्यावेळच्या एकूण राजकीय वातावरणाला आणि ऐकणाऱ्या लोकांच्या मानसिकतेला धरून वापरली जात नव्हती का? असाच हिशोब आपण अत्रेंच्या भाषणांनाही लावणार का? त्या भाषेला आजच्या दृष्टीने बघितले तर ती योग्य नाहीच वाटू शकत. पण शेवटी शेवटी बाळासाहेबांच्या भाषणांमध्ये तशीच भाषा आपल्याला दिसून येत होती का? असो, अवांतर होतंय. पण बाळासाहेबांची तेव्हाची भाषणे आणि कृती आजच्या चष्म्याने बघितल्या गेल्या तर त्या पटणार नाहीत एवढेच म्हणणे.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
गुरुवार, 02/09/2017 - 08:39
नवीन
ठिक आहे पण इतर मुद्द्यांविषयी तुमचे मत काय?
- Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद
गुरुवार, 02/09/2017 - 09:40
नवीन
शिवसेनेच्या कोलांटीउड्या याबाबतीतल्या मुद्द्यांबद्दल विचारत आहात का? तर मी वर म्हटल्याप्रमाणे सगळे पक्ष याबतीत एकाच माळेचे मणी आहेत. त्यामुळे तुमच्या सर्व मतांशी सहमत. फरक इतकाच कि कोलांट्याउड्या हा निकष लावायचा असेल तर तो सगळ्याच पक्षांना लावून मग कल ठरवायला हवा. कोणीही जिंकले तरी फार फरक पडणार नाही ह्या तुमच्या मताशीही काही अंशी सहमत! पण मुंबईत शिवसेनाच असावी असे माझे वैयक्तिक मत आहे ते भाजपवर अंकुश म्हणून! आणि त्याच न्यायाने त्यांची एकट्याची सत्ता असू नये ती शिवसेनेवर अंकुश म्हणून! मनसेच्या पाठिंब्यावर शिवसेनेची मुंबईत सत्ता हा माझा आवडता पर्याय आहे :):).
- Log in or register to post comments
व
विशुमित
गुरुवार, 02/09/2017 - 09:59
नवीन
<<<<त्यावेळी वापरली जाणारी भाषा हि त्यावेळच्या एकूण राजकीय वातावरणाला आणि ऐकणाऱ्या लोकांच्या मानसिकतेला धरून वापरली जात नव्हती का>>>
-- अजित पवारांच्या वेळेस असली वाक्य कोणाला नाही सुचली. अजून ही बिचारे आत्मक्लेश करत असतात.
- Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद
गुरुवार, 02/09/2017 - 12:15
नवीन
परत एकदा प्रतिसाद वाचा विशुमती साहेब! "पण बाळासाहेबांची तेव्हाची भाषणे आणि कृती आजच्या चष्म्याने बघितल्या गेल्या तर त्या पटणार नाहीत एवढेच म्हणणे." याचा काही बोध लागत असेल तर बघा. आज काय ज्यांचा वाक्यांवर गदारोळ झाला आहे असे अजित पवार एकटेच नाहीत. आताचे समाजकारण, राजकारण व मतदार सगळेच बदलले आहे. त्यामुळे तेव्हाइतके जहाल होता येत नाही.
- Log in or register to post comments
व
विशुमित
गुरुवार, 02/09/2017 - 12:17
नवीन
ओके..
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 02/09/2017 - 11:02
नवीन
राणे २००५ मध्ये पक्ष सोडून गेल्यानंतर "सामना"मध्ये त्यांच्याविरूद्ध इतकं घाण लिहून आलं होतं की वाचतानाच शरम वाटत होती. "मी ह्याला मोठा केला, पण हा चड्डीत चिरकला","या डेडफुट्याचं **त नाही" अशासारखी अनेक अत्यंत घाण वाक्ये लिहिली गेली होती. आपल्या पक्षातील एखादा नेता पक्ष सोडून दुसरीकडे गेल्यानंतर सेना इतकी का बिथरते हे एक गूढच आहे. थोडी परिपक्वता दाखवून हा निर्णय मान्य करायला हवा. जसे तुमच्या पक्षातून काही जण बाहेर जातात तसेच बाहेरचेही काही जण आत येतात. त्याबद्दल इतका थयथयाट व विखारी भाषा कशासाठी?
२००९ मध्ये बिजदच्या नवीन पटनाईकांनी स्वतःहून भाजपबरोबरची युती तोडल्यानंतर दोन्ही पक्षांनी समंजसपणे हा निर्णय स्वीकारला. आपल्याशी युती तोडली म्हणून ना भाजपने थयथयाट केला होता ना बिजदने युती तोडल्यानंतर अभद्र भाषा वापरली होती.
शिवसेनेचं बांगलादेशाच्या क्रिकेट संघासारखं आहे. स्वतः लिंबूटिंबू असले तरी त्यांना पराभव अजिबात सहन होत नाही. त्यामुळे स्वतःचा खेळ उंचावण्याऐवजी दुसर्या संघाला खिजविणे, अभद्र भाषा वापरून अवमान करणे यातच ते धन्यता मानतात.
- Log in or register to post comments
ख
खेडूत
Wed, 02/08/2017 - 16:48
नवीन
मुंबईमध्ये भाजप व रिपाईची आज पहिली प्रचारसभा झाली. यावेळी बोलताना आठवले म्हणाले,
'मुंबई में हार जायेगी शिवसेना, क्योंकि भाजप के साथ आयी हे भीम सेना,
हम गा रहे बाबासाहेब और छत्रपतीजी का गाना,
इस लिए मुंबईकर बोल रहे भाजपा और आरपीआय को साथ लाना...
:))
चॅनेलवाले पण लाईव्ह भाषणं दाखवून टीआरपी मिळवतायत..
- Log in or register to post comments
फ
फेदरवेट साहेब
Wed, 02/08/2017 - 17:41
नवीन
विशुमित भाऊ राष्ट्रवादीचे 'श्रीगुरुजी'पद मिळवल्याबद्दल अभिनंदन! =))
- Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे
Wed, 02/08/2017 - 18:26
नवीन
हा हा हा! अगदी!
- Log in or register to post comments
च
चिनार
गुरुवार, 02/09/2017 - 06:10
नवीन
आयला ह ह पु वा..
पण मेगाबायटी प्रतिसादांमध्ये विशुमित भाऊंना अजून बरीच मजल गाठायची आहे असे निरीक्षण नोंदवतो.
राष्ट्रवादीचे 'होऊ घातलेले श्रीगुरुजी' असे पद देऊ इच्छितो.
- Log in or register to post comments
व
विशुमित
गुरुवार, 02/09/2017 - 06:54
नवीन
फेदरवेट साहेब, अनुप जी आणि चिनार जी लाख लाख धन्यवाद..!!
पण मी एव्हढा पात्र नाही हो गुरुजींसारखा होण्याला. त्यांचा व्यासंग खूप मोठा आहे.
जे समोर अनुभवतोय, थोडे फार वाचतोय आणि तुमच्या सारख्या दिगाजांकडून धडे घेतोय त्याच्यातुनच हा तुटपुंजा लेख प्रपंच चालवला आहे. पदरात घ्या.
- Log in or register to post comments
च
चिनार
गुरुवार, 02/09/2017 - 07:15
नवीन
तेच म्हणतो भाऊ..श्रीगुरुजी पद निभावणं लय कठीण..वर्ष वर्ष धागा लढवावा लागतो त्यासाठी..गरज पडल्यास किलोकिलोंनी लिंका द्याव्या लागतात..आणखीही बरंच आहे..
- Log in or register to post comments
फ
फेदरवेट साहेब
गुरुवार, 02/09/2017 - 08:52
नवीन
सगळ्यात मुख्य म्हणजे, काहीही विचार न करता बेंबीच्या देठापासून ठो ठो करताच आले पाहिजे.
पुढीलांचे कर्तृत्व इतके महान आहे की त्यांच्यावर दशखंडी श्रीगुर्जी मिपालीलामृत नावाचा एखादा ग्रंथ पडावा , असे भारदस्त भविष्य घडवण्याकरतासुद्धा विशुमित भाऊंना हार्दिक शुभेच्छा.
- Log in or register to post comments
व
विशुमित
गुरुवार, 02/09/2017 - 09:54
नवीन
धन्यवाद साहेब...!!
- Log in or register to post comments
अ
अस्वस्थामा
गुरुवार, 02/09/2017 - 16:06
नवीन
बाकी काही म्हणा, पण 'फेदरवेट साहेब' यावेळेस किमान टेस्ट खेळायच्या प्लॅनिंग ने आलेत असं दिसतंय. नाही तर आत्तापर्यंत दर वेळेस टी-२० पण पुरी होत नव्हती आणि पावसात सगळंच वाहून जात होतं.
हो की नै हो ? ;)
- Log in or register to post comments
फ
फेदरवेट साहेब
गुरुवार, 02/09/2017 - 17:11
नवीन
म्हणुन तुमचा आत्मा अस्वस्थ होतोय का? का होतोय म्हणे असा आत्मा अस्वस्थ?
- Log in or register to post comments
फ
फेदरवेट साहेब
गुरुवार, 02/09/2017 - 17:17
नवीन
बाकी मी इथे टेस्ट खेळायला आलो असेन वा एक टप्पा आऊट खेळायला, किंवा ग्राउंड विकत घ्यायला, तुम्हाला चोंबडेपण करायचं कारण कळलं नाही ते?
दूर दूर पर्यंत मुद्द्याला धरून नसलेले कैच्याकै (माझ्याशी) बोलायच्या अगोदर ह्यापुढे १० वेळा विचार करायचा.
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
गुरुवार, 02/09/2017 - 08:40
नवीन
निवडणूकांत लोक कसे मतदान करतात, त्याची कशी गणिते मांडता येतात हे मन विषण्ण करणारे आहे. त्याची तशीच विश्लेषणं करणं हे अजूनच दुखावून जातं. बेरजा वजाबाक्या कशा होतील यात असलेला रस आणि कोणता घोडा जिंकणार आहे, कोणता घोडा जिंकजिं, इ इ वाटणे हे अशाच मनोवृत्तीचे द्योतक आहे. अत्यंत आदराने केलेल्या तुलना समजून घेता येतील परंतु अत्यंत अनादराने केलेल्या तुलना (मला आवडणारा पक्ष सर्वात कमी अनादरणीय कसा आहे, इ इ सूर) कशा समजून घ्यायच्या? असल्या लोकशाहीला काही अर्थ आहे का? आणि निकालाची उत्कंठा का असावी? आपला बलात्कारी (?!?) कोण असणार याबद्दल कसची उत्कंठा? ज्या मूलभूत अस्मितांना घटनात्मक संरक्षण आहे त्यांच्यातच गुरफटून कसले ते निवडणूकांकडे पाहणे?
- Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद
गुरुवार, 02/09/2017 - 09:33
नवीन
तात्विक दृष्ट्या तुमचे म्हणणे खरे आहे, पण मग नेमके काय करायला हवे असे आपले मत पडते?
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
गुरुवार, 02/09/2017 - 12:09
नवीन
शहराची राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, प्रशासकीय, इ इ प्राधान्ये काय आहेत आणि ती पूर्ण करायचा उमेदवारांचा काय प्लॅन आहे.
- Log in or register to post comments
व
वरुण मोहिते
गुरुवार, 02/09/2017 - 08:43
नवीन
परत सगळी चर्चा शिवसेना कशी चुकली यावरच का?असो पण सेनाप्रमुखांचे किंवा पवारसाहेबांचे नाव काढले कि अनेक लोकांच्या मनात काय विद्वेष आहे कळत नाही . ज्यांचे मोठेपण निश्चितच आहे आणि बहुतेक सर्वानी ते मान्य केले आहे अगदी विरोधी पक्षातीलही सर्व लोकांनी . आता राजकारण म्हटलं कि काही चाली चुकायच्याच काही बरोबर पडायच्या तरीही विशेषकरून आंतरजालावर तर अशी गरळ ओकली जाते कि ज्याचे नाव ते. काटेकोर समीक्षा होते अगदी मराठी माणसाचा स्वभावच तो.कित्येक वकुबाने खुजे असलेल्या नेत्यांना त्यांच्या राज्यात पूर्ण सत्ता मिळाली पण महाराष्ट्रात ते होणे नाही.
अजून एक मुद्दा स्थलांतराचा तर मुंबई हि आर्थिक राजधानी आहे त्यामुळे मराठी माणसाचे स्थलांतर होणे स्वाभाविक देशात कुठल्याही शहरात हे झाले असत . पण काही मर्यादांचे भान ठेवणे आवश्यक आहे . मांसाहाराला विरोध हा मुद्दा अनेक मराठी लोकांना पटला नाही मराठीच काय बंगाली आणि दाक्षिणात्य लोकांनाही नाही पटला इतर अनेक मुद्दे आहेत .लॉबिंग करणं मराठी माणसाला कधीच जमलं नाही ती गोष्ट शिवसेनेने एनकॅश केली . त्यामुळे सेनेने बागुलबुवा दाखवला नाही परिस्थितीतील खदखद हेरली . कुठल्या धर्माला दुखावण्याचा हेतू नाही पण आजही मुंबईतील मुस्लिमांवर सेनेचा धाक आहे हि वस्तुस्थिती आहे .
अवांतर - भाजप हरावी असं वाटत ह्याचा कारण सेनेचं समर्थन नाही पण बरीच वर्ष मलिदा खाऊन आता उलट्या बोंबा मारायच्या ह्याला नालायक पणा म्हणतात आणि भाजप चे मुंबईतील नेते अजून नालायक आहेत .
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
गुरुवार, 02/09/2017 - 09:36
नवीन
आणि असाच नालायकपणा उद्धव ठाकरे २०१४ पासून राज्य सरकारमध्ये सत्तेत बसून करत आहेत. एकीकडे भाजपबरोबर सत्तेत बसायचे आणि दुसरीकडे मधूनमधून भाजपला सामनामधून टोले द्यायचे, ज्या पक्षाबरोबर महाराष्ट्रात सत्ता उपभोगायची त्याच पक्षाचा गोव्यात पराभव व्हावा म्हणून कारस्थाने करायची हा पण नालायकपणाच झाला. कित्येकवेळा म्हटल्याप्रमाणे मुंबई महापालिकेत कोणीही जिंकले तरी सामान्य लोकांना फार काही फरक पडणार नाहीये पण मुंबई महापालिकेतल्या सत्तेमुळे राज्य आणि केंद्र पातळीवर नालायकपणा उधोजीरावांना करता येत आहे म्हणून तिथे सेना हरावी.
मतदार नक्की काय बघून मते देतात हा एक गुंतागुंतीचा विषय आहे.वाजपेयींच्या सरकारने अर्थकारण नक्कीच चांगले सांभाळले तरीही त्यांचा पराभव व्हायचा तो झालाच. 'वकूबाने' खुज्या असलेल्या नेत्यांनी त्यांच्या राज्यांमध्ये मतदारांवर अधिक प्रभाव टाकला म्हणून ते निवडून आले. तसा प्रभाव शिवसेनेला महाराष्ट्रात टाकता आलेला नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यासाठी मराठी लोकांच्या मानसिकतेला दोष देणे हा थोडासा 'elitist' प्रकार झाला. हे थोडेसे ट्रम्पला मत दिलेल्या सगळ्या अमेरिकन्सना 'racist' म्हणण्यासारखे झाले.
- Log in or register to post comments
व
विशुमित
गुरुवार, 02/09/2017 - 09:52
नवीन
म्ह्णूनच म्हणतोय या नालायकांपेक्षा राष्ट्रवादी परवडली...!!
- Log in or register to post comments
व
वरुण मोहिते
गुरुवार, 02/09/2017 - 10:02
नवीन
पक्ष वाढीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही एकमेकांवर टीका केली आहे . पण मर्यादेत . काँग्रेस , राष्ट्रवादी कित्येक ठिकाणी वेगवेगळे लढले आहेत .पण आज केंद्रात आणि राज्यात भाजप आहे म्हणून काहीही बोलेले पटत नसावे . हे कुरघोडीचे राजकारण आहे तितकीच बोलताना पातळी भाजप ने हि सोडली आहे .विरोधी भूमिका घेणं वेगळं आणि भ्रष्टाचार भ्रष्टाचार म्हणून ओरडणं वेगळं . भाजप च्या ताब्यात असलेल्या महानगर पालिका भ्रष्टाचाराची चांगली उदाहरण आहेत. मुंबईचा मलिदा खाता यावा जास्त यासाठी हि भाजप ची धडपड चालू आहे . मुंबईत सेनेकडे ४ गोष्टी सांगण्यासारख्या तरी आहेत भाजप ची तर ती पाटी पण कोरी आहे .उगाच नाही विधानसभेच्या वेळी गुजरात वरून ७० च्या वर आमदार प्रचाराला आले तसेच कित्येक पदाधिकारी . त्यामुळे जर काहीच फरक पडणार नसेल असं असेल तर भाजप पेक्षा सेनेला मत का देऊ नये .केवळ सत्तेच्या विरोधात काही बोले म्हणून महानगर पालिकेत हरावी अशी इच्छा असेल तर ओक्के .बाकी मराठी लोकांच्या मानसिकतेचा प्रश्न नाही आणि केवळ मतपेटीतूनच ते दिसावे अशी अपेक्षाही नाही . पण पवार आणि ठाकरे म्हटलं कि काय वाटेल ते लोक बोलतात असं निरीक्षण आहे . ह्या उलट परिस्थिती बाळासाहेबांचं नाव भारतातल्या कुठल्याही राज्यात घेतलं तरी लोक मानतात .पवारसाहेबाना सर्वपक्षीय नेते मान देतात .त्याला अनुसरून हे विधान आहे .
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
गुरुवार, 02/09/2017 - 10:39
नवीन
आणि मुंबईचा मलिदा कायम आपल्यालाच मिळत राहावा यासाठी शिवसेनेची धडपड चालू आहे.
हे आतापर्यंत कित्येकवेळा लिहिले आहे. उधोजीरावांनी २०१४ पासून जे काही प्रकार चालवले आहेत त्यामुळे आणि त्यामुळेच शिवसेनेचा पराभव व्हावा असे मला वाटते. आता परत हे लिहिणार नाही. विधानसभा निवडणुकीच्या वेळी जी कटूता आली ती जाऊ दे-- झाले गेले गंगेला मिळाले असे म्हणत जरी उधोजीराव सरळ वागले असते तर ही वेळ आली नसती.
पवार आणि ठाकरे काय टिकेच्या वर आहेत की काय?
- Log in or register to post comments
व
वरुण मोहिते
गुरुवार, 02/09/2017 - 11:02
नवीन
त्यातही आता भाजप चा जास्त आहे .हे त्यांच्याच मुंबईतील वाचाळवीरांवरून स्पष्ट झाले आहे .
भाजप सरळ वागत आहे उद्धव काय ते चूक वागत आहेत म्हणून सेना हरावी.(उत्तम विश्लेषण ) भाजप चे अनेक भ्रष्टाचार बाजूला ठेऊन आता काहीच फरक पडणार नाही महापालिकेत कारभाराचा पण उद्धव नीट वागत नाही म्हणून हरावी सेना हे पण उत्तम .
टीकेच्या वर कोणीच नाही हो पण टीका मर्यादेत असावी यावरून विधान आहे .(वाटेल ते लोक बोलतात असं निरीक्षण आहे हे मूळ विधान आहे )
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 02/09/2017 - 11:32
नवीन
शिवसेना नेते हे अत्यंत माजलेले आणि अपरिपक्व हे शिवसेना हरावी असे वाटण्यामागे एक कारण आहे. परंतु ते तेवढेच कारण नाही. एकंदरीत शिवसेनेकडे कोणत्याही प्रकारची आर्थैक, सामाजिक, शैक्षणिक इ. धोरणे नाहीत. प्रक्षोभक भाषणे करणे, "सामना"तून अभद्र लिहिणे आणि फुशारक्या व बढाया मारणे एवढेच सेनेला जमते. "मला फक्त १ दिवस भारताचा पंतप्रधान करा. काश्मिर प्रश्न २४ तासांचा आत सोडवून दाखवितो.", "पाकिस्तानवर अणुबाँब टाकून नष्ट का करीत नाही" अशा तर्हेच्या वल्गना करणारे वास्तवापासून शेकडो कोस दूर असतात. ४० लाख झोपडपट्टीवासियांना फुकट घरे देणार, शेतकर्यांना फुकट वीज देणार अशी त्यांची आर्थिक धोरणे. अशा टोळीच्या हातात अजिबात सत्ता नसावी.
- Log in or register to post comments
व
वरुण मोहिते
गुरुवार, 02/09/2017 - 11:58
नवीन
स्विस बँकेतून आणतो, तसेच नाही का २४ तासात पाकिस्तान घालवतो .
काश्मीर प्रश्न लगेच सोडवतो असेही एक आश्वासन होत कोणाचेतरी:))मनमोहन प्रधानमंत्री असताना जे आता सर्वोच्च पदावर आहेत .ते तरी सत्तेत आहेत तरी जमलं नाही.अश्या वक्तव्यांना भावनेचा निकष असतो आणि सगळेच ते करतात . बाकी राम मंदिराचे काय झाले ??झोपडपट्टी वासियांना घरे किंवा वीज हे प्रत्येक पक्षाच्या जाहीरनाम्यात आहे .असो आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक धोरणावरून आठवले काही
आर्थिक धोरण -नोटबंदी
सामाजिक धोरण -राम मंदिर ,हिंदूने १० मुले जन्माला घालावीत
शैक्षणिक धोरण -स्मृती इराणींना मंत्री करणे .
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
गुरुवार, 02/09/2017 - 12:04
नवीन
पाहिजे आहे का?
मंदिर फायजेल का नको, कायतरी एक सांगा.
- Log in or register to post comments
N
NiluMP
गुरुवार, 02/09/2017 - 17:14
नवीन
एकंदरीत शिवसेनेकडे कोणत्याही प्रकारची आर्थैक, सामाजिक, शैक्षणिक इ. धोरणे नाहीत. प्रक्षोभक भाषणे करणे....
+१
- Log in or register to post comments
च
चिनार
गुरुवार, 02/09/2017 - 10:07
नवीन
महाराष्ट्राच्या आर्थीक, सामाजिक, आणि इतर सगळ्या बाबतीतल्या आजच्या स्थानामध्ये बाळासाहेब आणि पवार साहेब ह्यांचे नेमके काय योगदान आहे हे वाचायला आवडेल. इथे महाराष्ट्र म्हणजे त्यातले पूर्ण ३६ जिल्हे असे अभिप्रेत आहे, त्यामुळे फक्त मुंबई,पुणे,नाशिक ह्याविषयीच बोलू नये. शिवाय "त्यांचं जाऊद्या, तुमच्या नेत्याने काय दिवे लावले " टाईप प्रतिसाद देऊ नये ही विनंती.
एक वेगळा धागा काढला तरी चालेल. हा प्रश्न फक्त तुम्हालाच नाही तर सगळ्यांना विचारू इच्छितो.
- Log in or register to post comments
व
वरुण मोहिते
गुरुवार, 02/09/2017 - 10:26
नवीन
चष्मा काढून वाचायला हवेत . सगळंच बरोबर असं कोणीच म्हणत नसत पण केलं ते सगळंच चूक आहे हे दाखवण्यात काही लोकांना बर वाटत,काहींचे हिडन अजेंडे असतात ,काहींचे फॅड असते,काहीजण उगाच सगळे बोलतात म्हणून बोलत असतात . आता काहीच योगदान नाही असं म्हणायचं असेल तर प्रश्नच मिटला .
बाकी इथे बाळासाहेबांच्या मृत्यूनंतरच्या पण काही प्रतिक्रिया किंवा पवारांवर हल्ला झाला त्यावेळच्या प्रतिक्रिया वाचून आम्ही धन्य झालोय त्यामुळे योगदानवीर हि नवीन मालिका आपण चालू करावीत असे आम्ही सुचवतो :))आमच्यात ती ताकद नाय
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
गुरुवार, 02/09/2017 - 10:30
नवीन
माझा जिल्हा सोलापूर. लागून असलेला व सांस्कृतिक जवळीक असलेला जिल्हा म्हणजे उस्मानाबाद. ह्याबाबत बोलायचे झाले तर ठाकरे आणि पवारसाहेबांचाच प्रभाव दिसलेला आहे. स्व. महाजन साहेब व स्व. मुंडेसाहेबांचे राजकारण सेनेला जोडीने घेऊन व मुंडेसाहेंबाचे तर सेनेसारखेच राजकारण होते. काँग्रेसला प्रभावी टक्कर द्यायचे काम सेनेनेच केलेले ८५ सालापासून दिसलेले आहे. मुंबई पुण्यासारखे प्रप्रांतीय वगैरे विषय नसताना कट्टर हिंदुत्व, बाळासायेबांना मानणारे कट्टर कार्यकर्ते ह्यांच्या जीवावर सेनेने प. महाराष्ट्राचा थोडा भाग व मराठवाड्याचा थोडा भाग यशस्वीरित्या लढवलेला आहे. मिपावर भाजपविषयी कट्टरपणा दाखवताना बिनदिक्कत खोटे रेटायचा व मुंबईपुण्याबाहेरची पुस्तकी माहीतीवर दुसर्यांना खोटे ठरवायचा भंपक प्रकार काही आयडीकडून वारंवार होत आहे. त्यांच्या तोंडी लागण्यातही अर्थ नाही हे कळून चुकलेले आहे. काहीही करुन सेना हरावीच अशा मानसिकतेला उत्तर देणे अवघड आहे.
तस्मात... काळच ठरवेल जे काही होईल ते.
जय महाराष्ट्र.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
गुरुवार, 02/09/2017 - 11:02
नवीन
मस्त रे!
- Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद
गुरुवार, 02/09/2017 - 12:31
नवीन
म्याबी तिकडलाच, सहमत तुमच्या मताशी.
- Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर
गुरुवार, 02/09/2017 - 14:07
नवीन
वकूबाचीच गोष्ट करायची झाली तर मोदी सलग ३ टर्म गुजरातेत निवडून येत होते पण इथे शिवसेनेला मुंबई महापालिकेतसुद्धा निवडून येताना सुद्धा दम लागतो ही वस्तुस्थिती पुरेशी बोलकी आहे.
मालवणच्या आव्हान दिल्या गेलेल्या पोटनिवडणुकीत नारायण राणेंनी परशुराम उपरकरचे डिपॉझिटसुद्धा जप्त केले होते.
बहुधा खुद्द बाळासाहेबांना देखील प्रचारासाठी मैदान मिळाले नव्हते. एवढी नारायण राणेंची दहशत होती.
उगाच इतर नेते खुज्या वकुबाचे होते म्हणण्यापेक्षा आणि मराठी माणसाच्या नावे खडे फोडण्यापेक्षा उभ्या महाराष्ट्रात धनुश्य बाणाच्या नावावर आमदार निवडून येतील एवढा बाळासाहेबांचा वकूब नव्हता हे मान्य का करत नाही.
तरीही विशेषकरून आंतरजालावर तर अशी गरळ ओकली जाते कि ज्याचे नाव ते
सामना मधून गरळ ओकले तर चालते असे काही आहे का ?
- Log in or register to post comments
व
वरुण मोहिते
गुरुवार, 02/09/2017 - 15:49
नवीन
कोणी खडे वैग्रे फोडत नाहीये .पुढेच मी सांगितलंय कि मतपेटीतून हे दिसावं अशी अपेक्षाही नाही माझा मुद्दा खालच्या पातळीवर जाऊन टीका करण्याबाबत होता आणि जे लॉबिंग बाहेरच्या प्रांतात जमत ते महाराष्ट्रात कधीच जमत नाही हा होता . त्यामुळे खडे वैग्रे फोडणं राहूद्या .
मतपेटीतून दिसावं अशी अपेक्षा नाही म्हटल्यामुळेच मोदी ३ वेळा जिंकत कि ३० वेळा तो हि मुद्दा नाही . हरण जिंकणं होत असतं. नको ते जिंकले आणि भले भले हरले असं कित्येकदा झालाय भारतात .महाराष्ट्राच्या राजकारणाचा पोत वेगळा आहे इतकाच म्हणायचं होत . आणि त्यासाठी नारायण राणेंचा उदाहरण द्यावं हे अजून हास्यास्पद आहे . सामना मधून गरळ ओकणे हा माझा मुद्दा नव्हता सामना मी वाचत नाही कारण त्या पेपर ला मूल्य नाही .किंबहुना कुठल्याही राजकीय पक्षाचे पेपर, पाक्षिक आम्ही वाचत नाही . तरीही सामनामधून कोणावर गरळ ओकल्याने आपणास त्रास झाला हे सांगितलं तर मत मांडता येईल .
- Log in or register to post comments
व
विशुमित
गुरुवार, 02/09/2017 - 10:35
नवीन
<<<महाराष्ट्राच्या आर्थीक, सामाजिक, आणि इतर सगळ्या बाबतीतल्या आजच्या स्थानामध्ये बाळासाहेब आणि पवार साहेब ह्यांचे नेमके काय योगदान आहे हे वाचायला आवडेल.>>
-- समाज माध्यमांमध्ये भरपूर लिखाण आहे यांच्या वर.
<<<इथे महाराष्ट्र म्हणजे त्यातले पूर्ण ३६ जिल्हे असे अभिप्रेत आहे, त्यामुळे फक्त मुंबई,पुणे,नाशिक ह्याविषयीच बोलू नये. >>>
-- ह्या ३-४ शहरांमध्ये च ३६ जिल्यातील लोक अनंतर्भूत झाले आहेत. बराय किमान ही शहरं तरी विकसित केली नाही तर काय अवस्था झाली असती देव जाणे.
<<<शिवाय "त्यांचं जाऊद्या, तुमच्या नेत्याने काय दिवे लावले " टाईप प्रतिसाद देऊ नये ही विनंती.>>
-- मराठवाडा आणि विदर्भातल्या नेत्यांनी नीट दिवे लावले नाहीत म्हणून तर या दोघांना विचारलं जातंय तुमचे योगदान काय आहे.
<<<एक वेगळा धागा काढला तरी चालेल>>
-- किती ही धागे काढले तरी लोक पूर्वग्रहदूषितपणा सोडणार आहेत का? देईल का कोणी याची ग्यारंटी ?
- Log in or register to post comments
च
चिनार
गुरुवार, 02/09/2017 - 10:55
नवीन
धन्य झालोय हे वाक्य वाचून !
परमेश्वराने आम्हाला उरलेल्या बत्तीस जिल्ह्यांपैकी एकात जन्माला घातले ही त्याचीच चूक म्हणावी लागेल.
आणि त्यातही हा प्रश्न विचारायला आम्ही जिवंत राहिलो ही महाराष्ट्राच्या ह्या दोन सन्माननीय नेत्यांची कृपा !!
असो. थोडक्यात म्हणजे जे आहे ते गोड मानायचे.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- ›
- »