Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मुंबई महानगर पालिका निवडणूक २०१७

ध
धर्मराजमुटके
Fri, 01/27/2017 - 13:10
🗣 405 प्रतिसाद
नमस्कार ! महाराष्ट्रात भाजप-सेना युतीचे राज्यसरकार बनल्यापासुन अनेक कुरबुरी चालू होत्या. रोज रोज एकमेकांवर आरोप तर करायचे पण एकत्र सत्तेतही राहायचे हे पाहून माझ्यासारख्या सामान्य आणि निष्पक्ष व्यक्तींना नक्कीच उबग आला असेल. काल २६ जानेवारी २०१७ च्या मुहुर्तावर शिवसेनेने युती तोडण्याची घोषणा केली आणि भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांच्या कार्यकर्त्यांना जितका आनंद झाला नसेल तितका एक सामान्य माणूस म्हणून मला झाला. प्रत्येक पक्ष आतापर्यंत बेडीकीने बैलाचे सोंग घेतल्याप्रमाणे आपली ताकद फुगवून दाखवत होता त्यांची खरी ताकद आता कळणार आहे. मुंबई, ठाणे, पुणे आणि इतर शहरात होणार्‍या पालिका / जि.प. आता भाजपा, सेना स्वतंत्रपणे लढतील तर काही ठिकाणी राष्ट्रवादी-कॉग्रेस युती करतील. शिवाय या खेचाखेचीत निवडणूकांसाठी १ महिन्यापेक्षाही कमी कालावधी राहिला असल्यामुळे या वेळची निवडणूक वेगळी ठरणार आहे. प्रत्येक पक्ष वेगवेगळे लढत असल्यामुळे पक्षातील तिकिट इच्छूकांना बर्‍याच प्रमाणात वाव मिळेल त्याचप्रमाणे इंपोर्टेड इच्छूकांना देखील बर्‍याच प्रमाणात वाव मिळेल. एकंदरीत निवडणूकीच्या तोंडावर पक्ष सोडून जाणार्‍यांची संख्या घटेल असा अंदाज आहे. शिवाय एकाच वॉर्डात चार ते पाच मोठे पक्ष, स्थानिक वजनदार नेतेमंडळी निवडणूक लढविणार असल्यामुळे ऐनवेळी 'बशी घेणार्‍या' उमेदवारांना घसघशीत फायदा होण्याचा संभव आहे. पण नोटबंदी नंतरच्या या काळात हा प्रश्न वेगवेगळे पक्ष कसा सोडविणार हे पाहणे रोचक ठरणार आहे. मुंबईत मागील वेळी मराठी मतांमधे जो सेना-मनसेच्या मागे एकवटण्याविषयी संभ्रम होता तो आता बर्‍याच प्रमाणात निवळला असून मराठी मतदाराला या दोघांपैकी नेमके कोणाला मत द्यायचे हे नक्की कळाले असावे असाही एक अंदाज आहे. मात्र काही नेते, सेना-मनसे समर्थक अजुनही सेना-मनसे युती होईल असे मनातल्या मनात मांडे खात आहे. मात्र ठाकरेंचा सध्याचा पवित्रा पाहता ते कोणाशीही युती करतील असे वाटत नाही. मात्र मतदानाचे निकाल आल्यानंतर मात्र सगळ्यांनाच सगळे ऑप्शन ओपन असतील असे वाटत आहे. गुजराती, मारवाडी मतदार प्रामुख्याने भाजपचा मतदार मानला जातो. मात्र मुंबईतील बहुसंख्य गुजराती / मारवाडी समाज व्यापारक्षेत्रात गुंतला आहे. त्यांच्या प्रत्येकाच्या व्यवसायावर नोटबंदीनंतर काय आणि किती प्रमाणात परिणाम झाला यावर त्यांचे यंदाचे मतदान अवलंबून असेल की ते काहीही झाले तरी भाजपालाच मते देतील काय हे बघणे देखील रोचक ठरेल. त्यातच कालच शरद पवार साहेबांना पद्मविभुषण जाहिर झाला असल्यामुळे निवडणूकीच्या तोंडावर भाजपा राष्ट्रवादी अशी नवी युती होणार काय असादेखील संभ्रम उत्पन्न होण्याचा संभव आहे. मात्र अशी शक्यता निकालांअगोदर तरी दिसत नाही. कदाचित शिवसेनेने मुंबई / पुणे राखले तर ते भविष्यात राज्यसरकारमधून बाहेर पडू शकतात व त्यावेळी राष्ट्रवादी मदतीला येऊ शकेल अशीही एक शक्यता दिसते. (साहेबांना पदक अगोदरच्या कामगिरीबद्द्ल मिळाले आहे पण तो वेगळा मुद्दा आहे.) युपी बिहारी मंडळी आपापल्या राज्यात सपा, बसपा, जनता दलाला आणि काही प्रमाणात भाजपाचे पाठीराखे असले तरी एकेकाळी ही मंडळी मुंबईमधे बर्‍याच अंशी काँग्रेस समर्थक होती. मात्र सध्याची काँग्रेसची अवस्था पाहता ही मंडळी कोणामागे उभी राहतात हे पाहणे रोचक ठरेल. कदाचित बर्‍याच ठिकाणी हीच मते निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. मुस्लीमबहूल भागात सपा ची कसोटी लागणार आहे तर ओवेसींची पार्टी काय करते यावर देखील लक्ष ठेवावे लागेल. ओवेसींनी कालच "मोदींना परदेशी दाढीवाले का आवडतात" असा वरवर योग्य वाटणारा सवाल विचारुन टीआरपी खेचून घेतला आहे. सगळ्यात कठीण अवस्था विविध आंबेडकरवादी पक्षांची आहे. आठवलेंचा पक्ष भाजपाबरोबरच राहतो की कसे हे देखील २८ जानेवारीपर्यंत माहित पडेल. मात्र सध्यातरी त्यांच्यासमोर दुसरा पर्याय दिसत नाहिये. अगदी ५०-१०० मतांनी पराभव / विजय होण्याची शक्यता असणारी यावर्षीची निवडणूक अगदी रोचक होणार आहे हे नक्की. कोण कोठे जिंकेल हे आजच सांगणे अवघड असले तरी आपण आपापले अंदाज मांडू शकता. मात्र स्थानिक उमेदवाराचे कर्तुत्व, त्याचा इतिहास पाहूनच त्याला निवडून द्यावे ही माझीतरी अपेक्षा आहे. पक्ष कोणताही असो, काही फरक पडू नये असे मला वाटते. आमच्या ठाण्यात विविध पक्षांनी आपापल्या विभागातील सोसायट्यांना भेटणे सुरु केले आहे. आम्हीही आमच्या समस्या / मागण्या त्यांच्यापुढे मांडून काही अपेक्षा ठेवल्या मात्र सध्या कोणताही उमेदवार कोणतेही वचन देण्यास राजी नाही यावरुन त्यांच्या मनाची अस्थिरता देखील दिसून येते. एकंदरीत उमेदवारांसाठीही ही निवडणूक वेगळी ठरणार आहे हे निश्चित. तुम्हाला काय वाटते ते जाणून घेण्यास इच्छुक आहे. अवांतर : मी लेखाच्या शिर्षकात मुंबईचा उल्लेख केला असला तरी धागा मुंबई, ठाणे, पुणे आणि इतर शहरांतल्या निवडणूकींच्या चर्चांसाठी वापरला जाऊ शकतो. राज्यांच्या निवडणूकांवर इथे अगोदरच एक धागा असल्यामुळे त्याची चर्चा त्याच धाग्यावर केली तर ते संदर्भांसाठी उपयुक्त राहिल.
वर्गीकरण
राजकारण

प्रतिक्रिया द्या
61088 वाचन

💬 प्रतिसाद (405)
श
श्रीगुरुजी Sun, 02/12/2017 - 11:06 नवीन
सकाळी एका ठिकाणी कामासाठी गेलो होतो. तिथे जरा थांबावे लागणार होते. काम होईपर्यंत वेळ काढावा म्हणून तिथेच पडलेला "सामना" उचलला. पुरवणीत पहिल्याच पानावर पूर्ण पान भरून "उद्धव ठाकरें"च्या दणदणीत, परखड मुलाखतीच्या तिसरा भाग या शीर्षकाखाली त्यांची मुलाखत छापलेली होती. उधोजींनी स्वत:च स्वतःची घेतलेली मुलाखत स्वत:च्याच मुखपत्रात छापून स्वत:च स्वतःचे कोडकौतुक केले होते. "मुलाखतीच्या पहिल्या दोन भागांमुळे विरोधी पक्ष कोमात गेले आहेत", "शिवसेना इतर सर्व प्रादेशिक पक्षांचा बाप आहे" असली मुक्ताफळे वाचून हसू आवरेना. स्वत:बद्दल, स्वतःच्या पक्षाबद्दल आत्मविश्वासाने बोलणे, विजयाचा दावा करणे ठीक आहे, परंतु इतकी हास्यास्पद अतिशयोक्ती, वल्गना दुसरा एखादा पक्ष करीत असल्याचे वाचनात नाही. अर्थात मटासारख्या वृत्तपत्रांनी व काही वाहिन्यांनी लगेच मुलाखतीचा सारांश आपापल्या प्रकाशनातून प्रसिद्ध केला. एकंदरीत मराठी वृत्तपत्रे, मराठी वृत्तवाहिन्या यांना शिवसेनेविषयी बराचसा सॉफ्ट कॉर्नर आहे व तो अजिबात लपून राहत नाही.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Sun, 02/12/2017 - 11:53 नवीन
बरं मग? नक्की काय समस्या आहे ते कळलं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
अ
अस्वस्थामा Mon, 02/13/2017 - 15:03 नवीन
बरं मग? नक्की काय समस्या आहे ते कळलं नाही.
असं कसं ? अत्ता पर्यंत युती होती ना म्हणून समस्या नव्हती. युती तुटी, समस्या उठी.! बादवे, युती असती तर गुर्जी इतके शिवसेनेवर पेटले असते का असा प्रश्न पडतो बुवा. ट्रुमन जितके त्यांच्या भुमिकेबद्दल सुस्पष्ट आहेत (मग तुम्ही सहमत असा/नसा) तितके गुरुजी नाहीत हे नक्की. अर्थात म्हणूनच ट्रुमनसाहेबांबद्दल आदर आहे.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
श
श्रीगुरुजी Mon, 02/13/2017 - 16:12 नवीन
बादवे, युती असती तर गुर्जी इतके शिवसेनेवर पेटले असते का असा प्रश्न पडतो बुवा.
भाजपने शिवसेनेबरोबर केलेली युती मला पहिल्यापासूनच आवडलेली नव्हती (अर्थात माझ्या मताला कोणी हिंग लावून विचारत नाही ती गोष्ट वेगळी). युती असती तर सेनावाले भाजपविरोधात इतक्या खालच्या पातळीवर गेलेच नसते. युती असताना सुद्धा जर सेनेने असा मूर्खपणा केला असता तरी मी सेनेवर इतकाच पेटलो असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अस्वस्थामा
स
संदीप डांगे Mon, 02/13/2017 - 16:24 नवीन
नक्कीच. सहमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अस्वस्थामा
ग
गॅरी ट्रुमन Mon, 02/13/2017 - 06:09 नवीन
रायगड, परभणी आणि उस्मानाबादच्या जिल्हा परिषद निवडणुकांसाठी शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात हातमिळवणी झाली आहे अशी बातमी मटामध्ये आली आहे. या निवडणुका नेहमी स्थानिक पातळीवर लढविल्या जातात आणि स्थानिक पातळीवर स्थानिक गरजांप्रमाणे पक्ष अशी हातमिळवणी करत असतात. हा प्रकार पहिल्यांदा झाला आहे असे नक्कीच नाही. पण समजा भाजपने अशी कुठची युती केली असती तर सामनामध्ये त्यावर पानभरून टिका केली गेली असती. आणि दुसरे म्हणजे रायगडचे समजू शकतो. पण मराठवाड्यात मुंबई पुण्याप्रमाणे परप्रांतिय वगैरे विषय नसताना कट्टर हिंदुत्व आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील निष्ठेने भारलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांची फौजच्या फौज असेल तर परभणी आणि उस्मानाबादमध्ये अशी हातमिळवणी करायची प्रेरणा समजत नाही.
  • Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद Mon, 02/13/2017 - 07:42 नवीन
या युतीची दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी अजून पुष्टी केली नसली तरी उस्मानाबाद युती काही नवीन नाही. सध्याही तिथे काँग्रेस-शिवसेनाच सत्तेत आहे. पद्मसिंह पाटील/राष्ट्रवादीला बाजूला ठेवण्यासाठी हि हातमिळवणी मागेच झालेली आहे. २ जागांचं अस्तित्व असलेला भाजपही या हातमिळवणीत सामील आहेच. शिवाय गोंदियामध्ये जि.प.मध्ये मागच्या वर्षी भाजप काँग्रेसने युती केल्याचं आठवतंय. सगळे पक्ष ह्या बाबतीत एकाच माळेचे मणी झाले असून भविष्यात काँग्रेस शिवसेना आणि भाजप राष्ट्रवादी युती झाली तर आश्चर्य वाटायला नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
श
श्रीगुरुजी Mon, 02/13/2017 - 08:11 नवीन
भविष्यात शिवसेना व राष्ट्रवादीची युती होईल. दोन्ही प्रादेशिक पक्ष आहे, दोन्ही पक्ष एकखांबी आहेत, दोन्ही पक्षांना त्यांचे थोरले भाऊ फारशी किंमत देत नाहीत आणि दोन्ही पक्षांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. काँग्रेस व भाजप राष्ट्रीय पक्ष असल्याने त्यांनी महाराष्ट्रात केलेल्या युतीचा देशातील इतर राज्यात नकारात्मक परीणाम होऊ शकतो. त्यामुळे काँग्रेस शिवसेनेशी किंवा भाजप राष्ट्रवादीशी हातमिळवणी करणे अवघड आहे. शिवसेना व राष्ट्रवादीला महाराष्ट्रात केलेल्या युतीच्या परीणामांची चिंता महाराष्ट्राबाहेर करण्याची गरज नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ग
गॅरी ट्रुमन Mon, 02/13/2017 - 08:23 नवीन
तशीही २००९ च्या लोकसभा निवडणुकांच्या आधी शिवसेना-राष्ट्रवादी युती होणार अशी हवा होतीच. त्यावेळी मीच मिपावर लिहिलेल्या लेखांमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी युती झाली तर आणि नाही झाली तर या दोन्ही शक्यतांमध्ये काय होईल याविषयी लिहिले होते असे आठवते. २००९ मध्ये बर्‍यापैकी त्रिशंकू लोकसभा आल्यास पंतप्रधानपदासाठी शरद पवारांचे नाव पुढे येऊ शकेल अशी हवा निर्माण केली गेली होती. त्या हवेत फारसे तथ्य नव्हते पण अशी हवा निर्माण झाली होती हे खरेच. अशावेळी शिवसेनेने पवारांना मराठी असल्याच्या मुद्द्यावरून नक्कीच पाठिंबा दिला असता (जसा २००७ मध्ये प्रतिभा पाटील यांना दिला होता) . प्रत्यक्षात काँग्रेसने स्वतः आणि मित्रपक्षांबरोबर उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात बर्‍याच जास्त जागा अनपेक्षितपणे मिळविल्या आणि असले काही करायची गरज पडली नाही. तरीही शरद पवार पंतप्रधान व्हायची शक्यता आणि शिवसेना-राष्ट्रवादी युती या दोन्ही गोष्टींची चर्चा त्यावेळी होतीच. कसे असते यांनी भाजपची साथ सोडून राष्ट्रवादीशी युती केली असती तर ते मराठी बाणा जपायला. पण भाजपने यांची साथ सोडली की मग तो दळभद्रीपणा, गद्दारी, पाठीत खंजीर खुपसणे इत्यादी इत्यादी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Mon, 02/13/2017 - 08:49 नवीन
२००९ च्या राष्ट्रवादी-शिवसेनेच्या संभाव्य युतीमागे कारण होते ते त्यांच्यात २००७ अध्ये पुण्यात झालेली युती. २००७ च्या महापालिका निवडणुकीनंतर राष्ट्रवादी व शिवसेनेने निकालोत्तर युती करून राष्ट्रवादीला महापौरपद व सेनेला उपमहापौरपद मिळविले होते. भाजपपेक्षा राष्ट्रवादीशी युती करण्यात फायदा आहे हे त्यावेळी बाळासाहेबांच्या लक्षात आले होते. २००९ मध्ये त्यांच्यातल्या युतीची चर्चा एवढी जोरात होती की शेवटी "राष्ट्रवादीबरोबर युतीचा जो निर्णय घेणार तो लवकर घ्या, म्हणजे भाजपला आपली वाटचाल ठरविता येईल" असे गडकरींनी बाळासाहेबांना जाहीररित्या सांगितले होते. शिवसेना युतीसाठी उत्सुक होती, परंतु पवारांनी आयत्यावेळी कच खाल्य्याने ही युती झाली नाही. शिवसेनेशी युती केल्यास आपण पक्ष सोडू अशी धमकी सदाशिवराव मंडलिक व इतर काही जणांनी दिली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ह
हतोळकरांचा प्रसाद Mon, 02/13/2017 - 09:08 नवीन
आणि १६ पैकी ३ सदस्य असताना स्थायी समिती अध्यक्षपद भाजपला कसं मिळालं होतं म्हणे पुण्यात? भाजपनेही राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली होतीच की!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
व
वरुण मोहिते Mon, 02/13/2017 - 09:18 नवीन
भाजप सोडून बाकीच्या पक्षांचं विचारा. भाजप असं काही करू शकत नाही .विषयांतर करा आता नवीन प्रतिसाद देऊन तुम्ही .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ह
हतोळकरांचा प्रसाद Mon, 02/13/2017 - 10:24 नवीन
तर मुद्दा असा आहे कि काही बाबतीत सर्वच्या सर्व राजकीय पक्ष हे एकाच माळेचे मणी आहेत. त्यामुळे असे जेनेरिक मुद्दे घेऊन एखाद्या पक्षाची प्रतिमा कशी ठरवायची असा मला प्रश्न पडतो. भाजप गुंड लोकांना पक्षात घेतो म्हणजे काहीतरी वेगळे करतो अशी ओरड करणे म्हणजे एकूण दांभिक राजकारणाचे लक्षण आहे. कारण या अशा आरोपांचे दोन अर्थ होतात. १. भाजप हा आता गुंड घेतोय (आता कसे चालतात या चालीवर) म्हणजे आधी तो गुंड घेत नव्हता असा होतो ना! मग त्यावेळी ते उघडपणाने मान्य केल्याचं आठवत नाही. शिवाय २. आता या तथाकथित गुंडाना समजा भाजप ने जनभावनेच्या रेट्याने हाकलले तर परत भाजप हा स्वच्छ पक्ष आहे म्हणून मान्य करणार का? बाहेरून येणाऱ्या गुंडांचा वावडं आहे पण आत असलेले (सगळ्या पक्षांचे) राजकारणी सरसकट गुंड नाहीयेत असं मानायचं का? जोपर्यंत आपण जनता म्हणून असलं राजकारण (सरसकट सगळ्या पक्षांचं) नाकारत नाही तोपर्यंत हे चालत राहणार. त्यामुळे तूर्तास तरी असल्या जेनेरिक गोष्टी आपला कल ठरवण्यासाठी वापराव्यात का हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते
स
संदीप डांगे Mon, 02/13/2017 - 12:12 नवीन
मग 'पार्टी विथ डिफरंस' ह्या टॅगलाइनचा अर्थ काय असावा? ज्या मुद्द्यांवर इतर पक्षांवर टिका करतो तेच मुद्दे तोच पक्ष स्वतःच्या बाबतीत चालवून घेत असेल तर दांभिक राजकारण कोण करतं हे दिसतंच. कोणी काही अधिकृतरित्या म्हटले काय आणि नाही म्हटले काय याने नक्की काय फरक पडतो? कोण काय म्हणतो व प्रत्यक्षात करतो ह्याची तुलना आवश्यक. पण भाजपकडे बोट दाखवलं की इथले भाजपप्रचारक दुसर्‍या पक्षांबद्दल मेगाबायटी लिहित सुटतात, नेमकी उदाहरणं दिलीत की ह्यांना ऐनवेळेला भाषा समजत नाहीत. आत्ताच एका भाजप नेत्याचे वक्तव्य गाजतंय, म्हणे आधी गुंडांना निवडून आणू मग सुधारू... इथले भाजपप्रचारक तर त्यात काय चुकीचं आहे असंही विचारतील... =)) गुंडांना सुधारण्यासाठी त्यांना निवडून आणावे लागते हे नविन शिक्षण भाजपमधे मिळत असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
व
विशुमित Mon, 02/13/2017 - 12:18 नवीन
<<<आधी गुंडांना निवडून आणू मग सुधारू>> -- निर्लज्जपणाचा कळस आहे हा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ह
हतोळकरांचा प्रसाद Mon, 02/13/2017 - 12:54 नवीन
ज्या मुद्द्यांवर इतर पक्षांवर टिका करतो तेच मुद्दे तोच पक्ष स्वतःच्या बाबतीत चालवून घेत असेल तर दांभिक राजकारण कोण करतं हे दिसतंच.
हे केस बाय केस बघुयात का? कोणत्या मुद्द्यांवर भाजपने टीका केली होती आणि आता स्वतः तेच करत आहेत? भाजपने अवलंबलेले धोरण हे अत्यंत चुकीचे आहेच आणि त्यातून होणारे प्रतिमा हनन त्यांना महागात पडेलच. मी मागे एका प्रतिसादात म्हटले होते कि भाजपाला या टॅगलाईनचा अर्थ स्पष्ट करायला हवा. प्रत्येकजण त्यांना हवा तसा अर्थ घेऊन त्यांचे "दात घशात घालायला" त्याचा उपयोग करणारच. बाकी मुद्दा हा आहे कि भाजपने म्हटले म्हणून तुम्ही मानले का? मानले तर मग समजा गुंडाना हाकलले तर तुम्ही परत त्यांना डिफरेन्ट मानणार कि अजून काही वेगळं कारण सांगून हा पक्ष वेगळा नाहीये म्हणणार? शिवाय भाजप गुंडाना घेत नाही हाच एक फरक अपेक्षित आहे का टॅगलाईनमधून? तो एक राजकीय पक्ष आहे आणि वेळोवेळी त्यांना त्यांच्या प्रतिमेशी तडजोड करावी लागली आहे आणि पुढेही करावीच लागेल. जितकी घोंगडी पांघरायाचा प्रयत्न करतील तेवढे उघडे पडतील. अवांतर : जसे भाजपप्रचारक मेगाबायटी लिहितात तसेच भाजपविरोधप्रचारकहि लिहितात. त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Mon, 02/13/2017 - 13:36 नवीन
हे केस बाय केस बघुयात का? कोणत्या मुद्द्यांवर भाजपने टीका केली होती आणि आता स्वतः तेच करत आहेत?
मी काय म्हणतो, आजवरची भाजप नेत्यांची राजकिय सभांमधली भाषणे ऐका... भाजपचे प्रचारसाहित्य चाळा... आपल्या आपण सगळं स्वच्छ होईल की.. प्रत्येकदा स्पूनफीडींग ची गरज असतेच असे नाही. उदा. उत्तरप्रदेशात घराणेशाहीबद्दल भाजप करत असलेली टिका आणि भाजपचे त्याबाबतीत स्वतःचे वर्तन बघावे. भाजपने अवलंबलेले धोरण हे अत्यंत चुकीचे आहेच आणि त्यातून होणारे प्रतिमा हनन त्यांना महागात पडेलच. >> मग, समस्या काय आहे? मी मागे एका प्रतिसादात म्हटले होते कि भाजपाला या टॅगलाईनचा अर्थ स्पष्ट करायला हवा. >> नक्कीच. पण प्रस्तुत अर्थ असा आहे की इतर पक्ष (मुख्यत्वेकरुन काँग्रेस) जे करतं उदा. घराणेशाही, मुस्लिमांचे लांगूलचालन, भ्रष्टाचार इ. आम्ही करत नाही. असा नसेल तर नक्कीच अर्थ स्पष्ट करावा. तो एक राष्ट्रिय मान्यताप्राप्त पक्ष आहे, त्यांची ही नागरिकांप्रति जबाबदारी आहेच. प्रत्येकजण त्यांना हवा तसा अर्थ घेऊन त्यांचे "दात घशात घालायला" त्याचा उपयोग करणारच. >> मग, समस्या काय आहे? बाकी मुद्दा हा आहे कि भाजपने म्हटले म्हणून तुम्ही मानले का? >> मी मानतो न मानतो हा प्रश्न कुठून आला? प्रश्न आहे की जे भाजप बोलतो ते पाळतो का स्वतःसाठी? एवढाच मुद्दा आहे. त्यात इतर कोणी मानणे-न मानणे हा दूरचा आणि असंबंधित विषय आहे. मानले तर मग समजा गुंडाना हाकलले तर तुम्ही परत त्यांना डिफरेन्ट मानणार कि अजून काही वेगळं कारण सांगून हा पक्ष वेगळा नाहीये म्हणणार? >> ज्या ज्या कारणांसाठी हे स्वतःला डिफरंट म्हणवणार त्या त्या कारणांना स्वत: फॉलो करावे लागेल, नैतर त्याला बनचुकेपणा, खोटेपणा म्हणावा लागेल. आता ती कारणे त्यांनी स्वतः ठरवायची आहेत. ते जर तसं पाळणार नसतील तर वेगळं म्हणायचं कारणच काय उरतं...? शिवाय भाजप गुंडाना घेत नाही हाच एक फरक अपेक्षित आहे का टॅगलाईनमधून? >> हा लोडेड प्रश्न आहे. तो एक राजकीय पक्ष आहे आणि वेळोवेळी त्यांना त्यांच्या प्रतिमेशी तडजोड करावी लागली आहे आणि पुढेही करावीच लागेल >> 'तो एक राजकिय पक्ष आहे' ही काय पळवाट झाली काय आपल्या उद्दिष्टे आणि धोरणांपासून लपण्याची? एका पार्टीची धोरणे+उद्दिष्टे+संकल्प दुसर्‍या पार्टीपेक्षा वेगळे असतात, त्यासाठीच तर वेगळी पार्टी बनत असते, तसे नसते तर सर्व भारतात एकच पक्ष राहिला असता की. आता ज्या धोरण+उद्दिष्टांना जो पक्ष स्वतःच हरताळ फासेल तो इतरांपेक्षा वेगळा आहे असं म्हणत असेल तर हास्यास्पद आणि केविलवाणाच दिसेल. आपल्या लिखित, अधिकृत धोरणांना हरताळ फासणारे वर्तन भारतातले बहुतेक सर्वच पक्ष करत असतात. कोणीही धुतल्या तांदळाचा नाही. अवांतरः इथला पक्षप्रचार बंद होईल तर विरोध आपोआप बंद होईल. काळजी नसावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ह
हतोळकरांचा प्रसाद Mon, 02/13/2017 - 16:04 नवीन
कसं आहे डांगेसाहेब, तुम्ही कुणाच्या प्रश्नावर फेरप्रश्न उभे करता, डेटा मागता तेव्हा ते बरोबर असते आणि दुसऱ्याने विचारलं तर स्पूनफीडिंग? म्हणजे आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते...असो. बहुतेक तुम्हाला मुद्दा कळलेलं नाही. "सगळे पक्ष या नैतिक मुद्द्यांच्या बाबतीत एका माळेचे मणी आहेत" हे पटतंय का बघा! मुद्दा साधा आहे. भाजपला धुतळ्या तांदळासारखा समजायला सांगितलं कोणी आहे(भाजपचं सांगत आहे हे उत्तर असू शकत नाही, असे दावे तर एमआयएम आणि आआप वगैरेपण करतात)? ते दावे करतात, खोटे असतील आणि त्यांचे हे तुम्ही म्हणता तसे वरील पद्धतीचे दावे पटत नसतील तर तर त्या पक्षाला किंवा त्यांच्या उमेदवारांना जनतेने नाकारावे. जोपर्यंत हा नकारात्मक विरोध निवडणुकीत दिसत नाही तोपर्यंत राजकीय पक्षांकडून "राजकारण" होतच राहणार. माझी काहीही समस्या नाहीये, माझे मत आहे. याउलट मी विचारतो, तुमची काय समस्या आहे? याघडीला, निवडून यायच्या निकषावर(हे चुकीचंच आहे, त्याबाबतीत स्पष्ट मत आहे माझं) भाजप ने दहा-पाच गुंड लोक घेतले, तर भाजप गुंडांचा पक्ष हे लॉजिक पटत नाही. एकतर स्पष्ट मान्य करावं कि हे दहा पाच जण घेण्याच्या आधी भाजपमध्ये गुंड नव्हते किंवा मग मान्य करावं कि आधीपासूनच गुंड होते पण या दहा पाच जणांच्या येण्याचा इश्यू करायचा आहे आणि विरोधाचा प्रचार करायचा आहे. आता केस बाय केस म्हणजे काय? तर, बाबा गुंडांना घेतलं म्हणजे नेमकं कुणाला घेतलं? त्यांच्यावर नेमके काय गुन्हे आहेत? गुन्हे आहेत की आरोप आहेत? असे आरोप असणारे किती लोक दुसऱ्या पक्षात आहेत किंवा प्रवेश घेतला आहे? या सगळ्याची माहिती मिळेपर्यंत सरसकट आरोप करणे मला योग्य वाटत नाही. काही स्पष्ट उदहाराणांमुळे (पुणे, ठाणे) त्यांचे प्रतिमा हनन होते आहे हे मान्यच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Mon, 02/13/2017 - 16:50 नवीन
कसं आहे डांगेसाहेब, तुम्ही कुणाच्या प्रश्नावर फेरप्रश्न उभे करता, डेटा मागता तेव्हा ते बरोबर असते आणि दुसऱ्याने विचारलं तर स्पूनफीडिंग? म्हणजे आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते...असो.
>> तुम्ही स्पेसिफिक गोष्टी आणि जनरल गोष्टींचा बादरायण संबंध लावून 'संदीप डांगे कसे चुकीचे मांडत आहेत बघा' हा जो प्रकार करत आहात तो बरोबर नव्हे. केस बाय केस बघुया हे तुमचे म्हणणं तुम्हाला तरी पटतंय काय? मी वर उदाहरण दिलंय, भाजपच्या घराणेशाहीवरिल टिकेचं आणि त्यांच्या उमेदवारांमधेच असलेल्या घराणेशाहीचं, तुम्हाला खोटं वाटत असेल तर खोडून काढा की केस बाय केस. कुणी अडवलंय? भाजपच्या नेत्यांनी, मोदींनी घराणेशाहीवर टिका केली हे चुकीचे असेल तर खोडून काढा, त्यांच्या उमेदवारांमध्ये अजिबात घराणेशाही नाही हेही सिद्ध करा. केसबायकेस तर मी इथेच दिलंय तुम्हाला... तरी वरचे विधान माझ्याबाबतीत आपण करत आहात म्हणजे कमाल आहे!
बहुतेक तुम्हाला मुद्दा कळलेलं नाही. "सगळे पक्ष या नैतिक मुद्द्यांच्या बाबतीत एका माळेचे मणी आहेत" हे पटतंय का बघा!
म्हणजे हे मला समजत नाही, पटलं नाही असं वाटतंय काय? कशावरुन असे वाटले ते सांगता काय? मुद्दा साधा आहे. भाजपला धुतळ्या तांदळासारखा समजायला सांगितलं कोणी आहे >> ह्यँ?!?! हा काय प्रश्न आहे? ह्याला काय शेंडाबुडूख आहे की नाही? उगाच लोडेड प्रश्न विचारु नका बॉ! (भाजपचं सांगत आहे हे उत्तर असू शकत नाही, असे दावे तर एमआयएम आणि आआप वगैरेपण करतात) >> बरं मग? करु देत ना... दावे आणि वर्तन म्याच नाही झालं तर टिका तर होणारच, आणि होतेच की... तेव्हा आपण विचारता का कोणी सांगितलं तुम्हाला आप-एमआयएम धुतल्या तांदळासारखी आहे ते? अशा सगळ्या पक्षांवर होणार्‍या सगळ्या टिकांचं मी स्वागतच करतो, तुम्ही नाही करत काय?
ते दावे करतात, खोटे असतील आणि त्यांचे हे तुम्ही म्हणता तसे वरील पद्धतीचे दावे पटत नसतील तर तर त्या पक्षाला किंवा त्यांच्या उमेदवारांना जनतेने नाकारावे. जोपर्यंत हा नकारात्मक विरोध निवडणुकीत दिसत नाही तोपर्यंत राजकीय पक्षांकडून "राजकारण" होतच राहणार.
>> तर आपण 'पक्षात गुंड, भ्रष्टाचारी असणे हे जनमान्यताप्राप्त असल्यानेच बिच्चारे राजकिय पक्ष तरी काय करणार' असे गृहितक मांडून राजकिय पक्षांचा एका अर्थाने बचावच करत आहात की... कोणत्या जनतेने आम्हाला गुंड, आणि भ्रष्टाचारीच हवेत असा हट्ट धरलेला आहे जरा सांगाल काय? दहा बदमाषांपैकी एक निवडा अशी आपली निवडणूक पद्धत आहे, कितीही पटले नाही तरी नाकारायला चान्स कुठे आहे? तुम्ही खुबीने चेंडू जनतेच्या कोर्टात टोलवला आहे पण जनतेकडे रॅकेट नाही हे बघितलं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ह
हतोळकरांचा प्रसाद Tue, 02/14/2017 - 08:17 नवीन
जरा बैजवार होऊद्या डांगेसाहेब. तुम्ही शब्दांचे इमले बांधण्याआधी जरा बेसमेंट पक्कं करू, कसे? आता आधी खालील प्रश्नांची उत्तरे शोधू मग आणि मग पुढे चर्चा करू. हे भाजपचे गुंडाना घेणे मागच्या एक दिड वर्षातले आहे असे गृहीत धरू. म्हणजे भाजप त्याआधी गुंड असणारा पक्ष नव्हता असे आपल्याला म्हणायचे आहे का? भाजप मध्ये किती गुंडानी प्रवेश केला आणि त्यांच्यावर काय काय गुन्हे आहेत हे कळण्याआधी सरसकट आरोप करणे तुम्हाला बरोबर वाटते का? घराणेशाहीचं म्हणाल तर भाजप याबतीत दुटप्पीपणा करतोय हे उघडच आहे की! माझं मत याबतीत थोडा वेगळं आहे. मला घराणेशाही लादण्यावर काहीच प्रॉब्लेम वाटत नाही. जर जनतेला पसंत नाहीये तर त्यांनी नाकारावे. शिवाय फक्त घराणेशाहीतून आला म्हणून एखाद्याचे कर्तृत्व कमी होत नाही. घराणेशाहीतूनच आलेले पण अगदी मुरब्बी असे कितीतरी नेते महाराष्ट्रात आहेत. हो त्यांना घराणेशाहीपुळे ब्रेक लवकर मिळेल इतकेच पण मग ते सगळ्याच क्षेत्रात लागू होते. (काही नैतिक गोष्टींच्या बाबतीत)"सगळे पक्ष या नैतिक मुद्द्यांच्या बाबतीत एका माळेचे मणी आहेत" हे जर पटत असेल तर मग भाजप कडून वेगळी अपेक्षा ठेवायचीच का? या असल्या नैतिक गोष्टींची अपेक्षा कोणत्याही राजकीय पक्षांकडून केली जाऊ शकत नाही हा माझा मुद्दा आहे. अर्थातच टिका कराच की त्यात काय वाद असू शकतो. पण फक्त विरोधी प्रचारासाठी टिका होते तेव्हा ती मला अयोग्य वाटते. जनप्रतिनिधी म्हणजे नेमके काय? ते भ्रष्टाचारी किंवा गुंड असतानांही सर्वाधिक मते घेऊन निवडून येत असतील तर त्यांना जनमान्यताप्राप्त म्हणणार नाही की काय? यात गृहीतक ते काय? यात बचावाचा प्रश्न येतो कुठे (तुम्हाला हवा तसा अर्थ कसा घेता येतो याचे उदाहरण)? एका बाजूला तुम्ही ५-१० गुंड घेतले तर हे कसे चालते म्हणता तर दुसऱ्या बाजूला निवडणुकीत उभे असलेले सगळे बदमाष आहेत असे म्हणता. सगळ्याच पक्षांचे सगळेच बदमाष आहेत तर त्यात अजून ५-१० बदमाष आल्याने अजून काय फरक पडतो? थोडक्यात राजकारणात उतरलेले सगळे गुंड, बदमाष आणि भ्रष्टाचारी आहेत आणि त्यातलाच एक निवडायची सक्ती आपल्यावर होते असे आपल्याला म्हणायचे आहे तर! याच्याशी मी सहमत नाही. दहापैकी जे काही चांगले (किंवा तुमच्यामते कमी वाईट) आहेत त्यांना निवडावे असे मला वाटते. जर जनता कमी वाईट ला निवडत असेल तर सर्व पक्ष कमीत कमी वाईट उमेदवार द्यायचा प्रयत्न करणार नाहीत का? जनतेकडे रॅकेट असायची गरज नाही, जनता रेफ्री आहे इथे! अवांतर : तुम्ही तुम्हाला एखादा प्रश्न विचारला की तो बाळबोध प्रश्न गृहीत धरून त्याला स्पूनफीडिंग असे उत्तर देत आहात आणि आधीहि दोन तीन वेळा हे स्पूनफीडिंग वाचण्यात आलं आहे म्हणून माझं वरच वाक्य होतं. कदाचित अवांतर असेल विषयापासून, पण बादरायण नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Tue, 02/14/2017 - 09:09 नवीन
भाजप मध्ये किती गुंडानी प्रवेश केला आणि त्यांच्यावर काय काय गुन्हे आहेत हे कळण्याआधी सरसकट आरोप करणे तुम्हाला बरोबर वाटते का?
>> काही बेन्चमार्क आहे काय? की अमुक इतके गुंड व अमुक इतके गुन्हे असले तरच टिका करावी.. असे असले तर नक्की कळवा. आणि सरसकट आरोप हा काय प्रकार असतो? एखाद्या पक्षात गुंड भरती केले जात आहेत हे म्हणण्याला सरसकट आरोप कसे म्हणता तुम्ही?
मला घराणेशाही लादण्यावर काहीच प्रॉब्लेम वाटत नाही. जर जनतेला पसंत नाहीये तर त्यांनी नाकारावे. शिवाय फक्त घराणेशाहीतून आला म्हणून एखाद्याचे कर्तृत्व कमी होत नाही. घराणेशाहीतूनच आलेले पण अगदी मुरब्बी असे कितीतरी नेते महाराष्ट्रात आहेत. हो त्यांना घराणेशाहीपुळे ब्रेक लवकर मिळेल इतकेच पण मग ते सगळ्याच क्षेत्रात लागू होते.
>> विषय संपला... राहूल गांधी संसदेत जनतेद्वारे निवडून आले आहेत, त्यांच्याविषयीही आपले हेच (कर्तृत्ववान, मुरब्बी) मत आहे काय? प्रस्थापितांनी घराणेशाही चालवत देशाला परत राजेशाहीकडे घेऊन जावे असे आपले मत दिसते. गांधी घराण्याच्या घराणेशाहीवर टिका करणे हा भाजपचा व्यवच्छेदक गुण होता, आता आपली पाळी आली तर कर्तृत्व वगैरे सुचायला लागलंय.. अमित शहांना.
पण फक्त विरोधी प्रचारासाठी टिका होते तेव्हा ती मला अयोग्य वाटते.
>> 'फक्त विरोधी प्रचारासाठी टिका होते' हे तुम्हाला जे वाटते ते तुमचे वैयक्तिक मत आहे. राजकिय पक्षांनी काहीही केले तर योग्य, मात्र टिकाकारांनी त्यावर टिका केली तर ते अयोग्य असा काहीसा आपला पवित्रा दिसतोय. नाकाने कांदे सोलणार्‍यांवर टिका तर होणारच. त्याबद्दल रडारड करु नये असे मला वाटते.
ते भ्रष्टाचारी किंवा गुंड असतानांही सर्वाधिक मते घेऊन निवडून येत असतील तर त्यांना जनमान्यताप्राप्त म्हणणार नाही की काय?
>> जनतेलाच भ्रष्टाचारी, गुंड असे जनप्रतिनिधी हवे आहेत असा याचा अर्थ होतो आहे. हाच अर्थ अभिप्रेत आहे काय? काही लिंक देतो. वाचून घ्या. बेसिक पक्के करा. http://indiatoday.intoday.in/story/uttarakhand-assembly-election-14-per-cent-with-criminal-cases-adr-report/1/876153.html http://www.news18.com/news/politics/up-elections-2017-107-candidates-with-declared-criminal-cases-in-fray-1347107.html http://adrindia.org/media/adr-in-news/every-third-mp-16th-lok-sabha-has-criminal-charges-adr BJP is leading the chart with as many as 98 winning candidates (35 per cent) out of total 282, are facing criminal charges. While, 8 out of total 44 candidates of Congress are facing criminal charges. In AIADMK 6 out of 37 winners have been booked by police in some cases or other. The percentage of candidates facing criminal charges is highest in Shiv Sena as its 15 candidates out of the total 18 are booked in some cases or other. Trinamool Congress' 7 out of 34 winners are facing criminal charges.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ह
हतोळकरांचा प्रसाद Tue, 02/14/2017 - 11:32 नवीन
कडेलोट टाळण्यासाठी प्रतिसाद खाली दिला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
श
श्रीगुरुजी Tue, 02/14/2017 - 10:30 नवीन
घराणेशाहीचं म्हणाल तर भाजप याबतीत दुटप्पीपणा करतोय हे उघडच आहे की! माझं मत याबतीत थोडा वेगळं आहे. मला घराणेशाही लादण्यावर काहीच प्रॉब्लेम वाटत नाही. जर जनतेला पसंत नाहीये तर त्यांनी नाकारावे. शिवाय फक्त घराणेशाहीतून आला म्हणून एखाद्याचे कर्तृत्व कमी होत नाही. घराणेशाहीतूनच आलेले पण अगदी मुरब्बी असे कितीतरी नेते महाराष्ट्रात आहेत. हो त्यांना घराणेशाहीपुळे ब्रेक लवकर मिळेल इतकेच पण मग ते सगळ्याच क्षेत्रात लागू होते.
इतर पक्षांप्रमाणे भाजपमध्येची घराणेशाही आहे, परंतु ती खूप खालच्या पातळीवर आहे. डाव्या पक्षांमध्येही घराणेशाही भाजपसारखीच अल्प प्रमाणात खालच्या थरावर आहे. भाजपच्या पक्षाच्या सर्वोच्च स्थानांवर, कार्यकारीणीमध्ये, निर्णय घेण्याच्या समितीमध्ये, पक्षाची ध्येयधोरणे ठरविण्याच्या समितीत. . . अशा ठिकाणी घराणेशाही नाही. भाजपचे आजवर किमान १० अध्यक्ष झाले (वाजपेयी, अडवाणी, मुरली मनोहर जोशी, कुशाभाऊ ठाकरे, जाना कृष्णमूर्ती, बंगारू लक्ष्मण, वेंकय्या नायडू, राजनाथ सिंह, नितीन गडकरी आणि अमित शाह). त्यापैकी एकाचाही वारसदार अध्यक्षपदावर आलेला नाही. भाजपमधील कोणाचाही मुलगा/मुलगी पक्ष नियंत्रण करणार्‍या सर्वोच्च समितीत नाही. जी घराणेशाही आहे ती खूप खालच्या थरावर आहे (पंकजा मुंडे, पूनम महाजन इ.). याउलट इतर पक्षातील घराणेशाही पक्षाच्या सर्वोच्च स्थानांवर आहे. त्यामुळे इतर पक्षातील ध्येयधोरणे, निर्णय इ. वर घराणेशाहीचा मोठा प्रभाव असतो. किंबहुना एक विशिष्ट घराणेच सर्व पक्ष नियंत्रित करीत असतो. तसा प्रकार भाजपमध्ये नाही. भाजपमधील घराणेशाही आणि इतर पक्षांमधील घराणेशाही यात मूलभूत फरक आहे तो हाच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
श
श्रीगुरुजी Mon, 02/13/2017 - 16:14 नवीन
भाजपविरोधकांना कमी लेखू नका. ते मेगाबायटी इतके लहान प्रतिसाद लिहीत नाहीत, टेराबायटी प्रतिसाद लिहितात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
श
श्रीगुरुजी Mon, 02/13/2017 - 13:03 नवीन
नक्की कोणत्या वर्षी स्थायी समिती अध्यक्षपद भाजपला मिळाले होते? २००७ च्या निकालानंतर बर्‍याच घङामोडी झाल्या होत्या. त्यापूर्वी सलग अनेक वर्षे महापालिकेत काँग्रेसचे वर्चस्व होते. कलमाडी पुणे महापालिकेचा अनभिषिक्त सम्राट होता. कोण महापौर होणार, कोण उपमहापौर होणार, स्थायी समिती अध्यक्षपद कोणाला मिळणार, तिकिट कोणाला देणार हे सर्व निर्णय कलमाडी घ्यायचा. २००७ मध्ये परिस्थितीत थोडा बदल झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे ४२ नगरसेवक निवडून आले व पुणे महापालिकेत तो सर्वात मोठा पक्ष ठरला. त्याखालोखाल काँग्रेस ३६, भाजप २५, शिवसेना २० अशी स्थिती होती. सुमारे २४ जागा मनसे, रिपब्लिकन व अपक्षांमध्ये वाटल्या गेल्या होत्या. बहुमतासाठी ७४ जागा हव्या होत्या. कोणत्याही परिस्थितीत पुणे महापालिकेतील कलमाडीची एकाधिकारशाही मोडीत काढायची या एकमेव उद्देशाने अजितदादांनी शिवसेनेशी हातमिळवणी केली. कलमाडीसुद्धा स्वस्थ बसला नव्हता. त्याने गुपचूप भाजपशी संधान बांधले व आपण उघड युती न करता तुम्ही मुक्ता टिळक यांना महापौरपदाची उमेदवारी द्या असे सुचविले. आपला भाजपला विरोध आहे, परंतु लोकमान्य टिळकांच्या घराण्यातील व्यक्ती या नात्याने आम्ही भाजप पक्षाला पाठिंबा देत नसून मुक्ता टिळक यांना व्यक्तिगत पाठिंबा देत आहोत असे जाहीर करू असे त्यांनी सुचविले. असे झाले असते तर अजितदादांना शह देता आला असता. उघडउघड युती करणे भाजप व काँग्रेस या दोघांनाही अडचणीचे होते. परंतु भाजपला शिवसेना-राष्ट्रवादी ही युती पसंत नव्हती, त्याचप्रमाणे काँग्रेसची मदत घेणे हे सुद्धा पसंत नव्हते. त्यामुळे भाजपने कलमाडीच्या प्रस्तावाला मान्यता दिली नव्हती. त्यानंतरची पुढील ५ वर्षे म्हणजे अजितदादा व कलमाडी यांच्यात एकमेकांवर कुरघोडी करण्यात गेली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराविरूद्ध जो असेल त्या उमेदवाराला मत देऊन काँग्रेसचा उमेदवार पाडण्याचा प्रयत्न करायचे तर काँग्रेस अगदी तेच राजकारण करीत होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
प
पिजा Mon, 02/13/2017 - 13:25 नवीन
खरतर ही युती पक्षांची नसून नेत्यांची आहे आणि तीही तात्पुरतीच आहे . हि युती राष्ट्रवादीच्याच दोन गटामधल्या राजकारणातून झालेली आहे. फरक इतकाच कि जे नेते काल राष्ट्रवादीत होते ते आज काँग्रेसमध्ये आहेत आणि सेना स्वबळावर सत्ता स्थापू शकत नाही म्हणून हा टेकू घ्यावा लागतो. साधं सूत्र आहे, ज्या गटाचे जास्त मेंबर त्याचा अध्यक्ष मग बाकीचे मग घोडेबाजारात. पक्षाचं काहीही बंधन नाही. भाजपचेही चांगले चान्सेस आहेत यावेळी(सारे काँग्रेस-राष्ट्रवादीतुन आयात ), त्यामुळे निकालानंतर राष्ट्रवादी-भाजप अशीही युती होऊ शकते. अवांतर: सत्तेत असलेल्या भाजपने ह्या नगरपालिका/जि. प. निवडणुका जिकंण्यासाठी जे प्रकार चालवले आहेत ते पाहता राष्ट्रवादीची xerox कॉपी सत्तेत असल्यासारखी वाटते. आदरणीय अजित दादा ज्या गावाने ओवाळून टाकलेल्या टग्यांच्या जोरावर निवडणूक जिंकायची भाषा करत, ते सगळं भाजप करताना दिसतोय. संयमाने राजकारण करण्याची ह्यासुद्धा पक्षाची तयारी नाही हे आपलं दुर्दैव. त्यामुळं राज्यातलं भाजप सरकार फारफार तर पुढची आणखी एक टर्म निवडून येईल त्यापुढं अवघड आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
प
पिजा Mon, 02/13/2017 - 13:56 नवीन
http://timesofindia.indiatimes.com/city/pune/BJPs-Ganesh-Bidkar-elected-standing-committee-chairman/articleshow/7636825.cms
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Mon, 02/13/2017 - 14:01 नवीन
लिन्क देण्याआधी संबंधितांना भाषा विचारुन घेत चला... नैतो आपण दिलेल्या लिन्कची भाषा अचानक त्यांना समजेनाशी होऊ लागते. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिजा
स
सुबोध खरे Mon, 02/13/2017 - 15:35 नवीन
According to NCP leader Nilesh Nikam, "Last year, the NCP had supported the Congress candidate in the elections for the standing committee chairman. According to a pact, it was now the NCP's turn. However, the Congress did not keep its word and contested the election. We had no option but to support the BJP and teach the Congress a lesson."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
श
श्रीगुरुजी Mon, 02/13/2017 - 16:05 नवीन
गणेश बिडकरला स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने पाठिंबा द्यायचे हे एक कारण होते. त्याचबरोबरीने अजितदादा पवार व कलमाडी यांच्यातील पुणे शहरावरील वर्चस्वासाठी सुरू असलेला संघर्षही कारणीभूत होता. काँग्रेसच्या उमेदवाराला पाडण्यासाठी राष्ट्रवादीने स्वतःहून आपला उमेदवार मागे घेऊन भाजप उमेदवाराला पाठिंबा देऊन काँग्रेस उमेदवाराला पाडले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
श
श्रीगुरुजी Mon, 02/13/2017 - 16:08 नवीन
लिन्क देण्याआधी संबंधितांना भाषा विचारुन घेत चला... नैतो आपण दिलेल्या लिन्कची भाषा अचानक त्यांना समजेनाशी होऊ लागते. =))
말도 안되는 얘기하지 마세요
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Mon, 02/13/2017 - 17:41 नवीन
काय गुरुजी... तुम्हाला तर स्थानिक भारतीय भाषा समजत नाहीत पण थेट कोरियन वगैरे बर्‍या समजतात हो? आणि त्यात थेट अपशब्द उच्चाराल ते मला समजणार नाही असे वाटले की काय तुम्हाला? कोरियन हांगुल लिपी मध्ये 'मूर्खासारखा काहीही बरळू नकोस' असं एकेरी बोलत आहात तुम्ही इथे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Mon, 02/13/2017 - 18:20 नवीन
तुम्हाला बरोबर समजलं. गंमत म्हणून टाकलं. सिरियसली घेऊ नका. हीच वाक्ये वाचण्याऐवजी कानावर पडली असती तर अर्थ समजला असता का? मलाही कोकणीत बोललेलं समजत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Mon, 02/13/2017 - 19:25 नवीन
किती खोटं बोलाल गुरुजी.. बस करा आता. इंग्रजीतले रिपोर्टीम्ग तुम्हाला समजत नाही, विधानसभेतलं इंग्रजीतले भाषण तुम्हाला समजत नाही, पर्रिकर इंग्रजीत बोलत आहेत ते तुम्हाला समजत नाही, चक्क देवनागरीतली हिंदी भाषा समजत नाही.. मी लिहिलेलं शुद्ध मराठीही समजत नाही... पण कोरियन मात्र अचूक समजते आणि लिहिता येते हो! असो. तुमचा बुरखा पुरता फाडला गेला आहे. अजून हास्यास्पद बनायचे बाकी असेल तर ते तुम्हालाच माहित. तुम्ही स्वतःसाठी आता खड्डा खोदून घेतला आहे हे तुम्हाला लक्षात आलं नसावं बहुधा. आपला भाषा न समजण्याचा स्टॅन्ड कायम राखणे हे तुमच्यासाठी आव्हान असेल यापुढे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Tue, 02/14/2017 - 10:19 नवीन
परत तेच पालुपद. कितीही वेळा सांगितले तरी समजत नाही का न समजल्याचं नाटक सुरू आहे. तुम्ही दिलेल्या प्रतिसादात तीन चित्रफिती होत्या. त्यातील एक अर्धी इंग्लिश व अर्धी कोकणीत होती. उर्वरीत दोन चित्रफिती पूर्णपणे कोकणीत होत्या. मला कोकणी समजत नाही. ज्याला मराठी समजते त्याला कोकणी समजायलाच हवे हा तुमचा अट्टाहास का? तुम्हाला तुमच्या प्रतिसादावर माझ्याकडून प्रतिसादाची अपेक्षा होती. माझ्या प्रतिसादासाठी इतका आसुसलेला विरळाच. असो. मी प्रतिसाद देण्यासाठी तीनची चित्रफिती आधी बघणे व समजणे आवश्यक आहे. तीनपैकी दोन चित्रफिती समजत नसल्याने अजूनपर्यंत प्रतिसाद दिलेला नाही. आता याबाबतीत इतका त्रागा आणि मेलोड्रामा कशासाठी? जसा मी त्या चित्रफितींवर प्रतिसाद दिलेला नाही तसाच इतरांनीही दिलेला नाही. इतरांनाही त्यात गम्य किंवा तथ्य वाटत नसावे असे दिसते. आणि बुरखा, खड्डे इ. विषयी बोलायचं तर सांस्कृतिकदृष्ट्या किंवा धार्मिकदृष्ट्या माझा बुरख्याशी अथवा खड्डे खणण्याशी अजिबात संबंध नाही. त्यामुळे बुरखा फाटला जाण्याचा किंवा खड्ड्यात पडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अवांतर - भारताने १९९८ मध्ये अणुचाचणी केल्यानंतर काही महिन्यांनी तत्कालीन परराष्ट्रमंत्री जसवंतसिंह अमेरिकेत आले होते. तेव्हा पत्रकारांशी बोलताना एका पत्रकाराने त्यांना विचारले की "भारताने अणुचाचणी करून स्वतःसाठी खड्डा खोदला आहे असे तुम्हाला वाटत नाही का?". त्यावर जसवंतसिंहांनी असे उत्तर दिले होते की "सांस्कृतिकदृष्ट्या अथवा धार्मिकदृष्ट्या आम्ही खड्डे खणत नसतो.". त्यांचे उत्तर राजकीयदृष्ट्या अयोग्य परंतु अत्यंत चपखल होते. माझे वरील विधान हे त्यांच्याच उत्तरावरून घेतले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ह
हतोळकरांचा प्रसाद Tue, 02/14/2017 - 11:37 नवीन
संदीप डांगेंजी, बघा किती सरळ आहे. मी सगळ्या पक्षांबद्दल मत मांडतोय आणि तुम्ही त्यातही बघा भाजपच कशी सगळ्यात जास्त गुंडाना पाळते वगैरे सिद्ध करण्याच्या मागे आहात.
सरसकट आरोप हा काय प्रकार असतो?
"भाजप हा गुंडांचा पक्ष आहे" हा सरसकट आरोप आहे. तो तुम्ही केला नसेल पण त्याबद्दलच चर्चा सुरु आहे ना? तुम्हाला याबद्दल काय वाटते ते सांगा.
राहूल गांधी संसदेत जनतेद्वारे निवडून आले आहेत, त्यांच्याविषयीही आपले हेच.....
बघा काढलात ना तुम्हाला हवा तसा आणि प्रतिसाद देता येईल असा अर्थ :):). घराणेशाहीतून निघालेले सगळेच नेते रागांसारखे असतात का? आणि रागां एवढ्या जास्त मताने निवडून का येतात हो? म्हणजे तिथल्या लोकांचा त्यांना पाठिंबा नाहीये पण घराणेशाहीमुळे निवडून देतात असं म्हणायचं आहे का तुम्हाला? "राजेशाही" लोक निवडून देतात का हो? आणि हो, गांधी घराण्यावर घराणेशाहीची टीका हेच एक घराणेशाहीबद्दलच दुःख आहे का? घराणेशाहीतूनच आलेले अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील, अशोक चव्हाण, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, मनोहर नाईक, फडणवीस आणि गेला बाजार अखिलेश वगैरे इतर अनेक यांना तुम्ही रागांच्याच रांगेत बसवणार का?
'फक्त विरोधी प्रचारासाठी टिका होते' हे तुम्हाला जे वाटते ते तुमचे वैयक्तिक मत आहे. राजकिय पक्षांनी काहीही केले तर योग्य, मात्र टिकाकारांनी त्यावर टिका केली तर ते अयोग्य असा काहीसा आपला पवित्रा दिसतोय.
अर्थातच हे माझे वैयक्तिक मत आहे, नवीन काय सांगताय? राजकीय पक्षांनी काहीही केले तरी योग्य हा जावईशोध कुठला? स्वतःला हवा तसा अर्थ काढून माझ्या तोंडी वाक्ये चिकटवू नका हि विनंती. ते सगळेच बदमाष तरीही भाजपने १०-५ जणांना घेणे गैर व त्यातल्या त्यात कमी बदमाश निवडला तर राजकीय पक्षांचं धोरण पण बदलेल या मुद्द्यांवर मत व्यक्त केलात तर चर्चा योग्य ट्रॅकवर जाऊ शकेल (म्हणजे मूळ मुद्द्यापासून तशीही दूरच गेलीय चर्चा पण तरीही).
  • Log in or register to post comments
व
विशुमित Tue, 02/14/2017 - 12:06 नवीन
<<<<घराणेशाहीतूनच आलेले अजित पवार>>> -- अजित पवार प्रारंभी पक्षाची आणि जनतेची कामे करून स्वकर्तुत्वाने इथं पर्यंत पोहचले आहेत. कारखान्याचे संचालक पदापासून ते जिल्हा बँकच चेयरमन असा राजकीय प्रवास त्यांनी केला आहे. पवार साहेब राष्ट्रीय राजकारण सांभाळत असताना त्यांनी बारामतीची पकड ढिली होऊन नाही दिली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
व
विशुमित Tue, 02/14/2017 - 12:25 नवीन
घराणेशाहीच्या जोरावर पहिली निवडणूक सोपी जाऊ शकते पण नंतरच्या सर्व निवडणुका स्वकष्टावरच लढवय्या लागतात... इति- सुप्रिया सुळे..!! (मिसेस सुळे हे घराणेशाहीचे उत्तम उदाहरण आहे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
ह
हतोळकरांचा प्रसाद Tue, 02/14/2017 - 12:33 नवीन
मला तेच म्हणायचे आहे कि समाज एखादा नेता घराणेशाही करून आला असेल पण त्याने स्वतःचे वलय उभे केले तर ते नाकारणार कसे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Tue, 02/14/2017 - 12:46 नवीन
हो बरोबर आहे... राहुल गांधी, आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे, प्रणिती शिंदे, पूनम महाजन, अमित देशमुख याना म्हणावं तसं स्वतःच वलय प्रस्थापित करता आलं नाही अजून. या उलट अखिलेश यादव, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, ज्योतिरादित्य शिंदे, धनंजय मुंडे, विश्वजित कदम अशी काही उदाहरणे आहेत त्यांनी स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करण्यात यशस्वी झालेले दिसत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ह
हतोळकरांचा प्रसाद Tue, 02/14/2017 - 13:00 नवीन
पंकजा मुंडेना त्या लिस्ट मध्ये नाही टाकता येणार असे मला वाटते. मराठवाड्यातल्या तरुणाईवर त्यांनी बऱ्यापैकी वलय निर्माण केला आहे. वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकून काढलेल्या "पुन्हा संघर्ष यात्रा" पाहता त्यांना वलय निर्माण करता आले नाही म्हणणे त्यांना अंडर इस्टिमेट करण्यासारखे आहे. त्याच जोरावर त्या त्यांच्या बाजूचे असे आमदार बाळगून आहेत. शिवाय २०१४ च्या निवडणुकांमधील त्यांच्या संघर्ष यात्रांना मिळालेला प्रतिसाद बघून निकालानंतर त्यांचे नाव अगदी मुख्यमंत्रीपदासाठी देखील चर्चिले गेले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Tue, 02/14/2017 - 13:13 नवीन
मराठवाड्यातील जनतेला काय वाटतं ह्या बद्दल मी नाही बोलत. इन जेनेरल निपक्ष मत म्हणून मी त्यांना त्या यादीत टाकले आहे. पंकजांकडे वक्तृत्व, दूरदृष्टी, सुसंस्कृतपणा, राजकारणातील साधन सुचिता, समय सूचकता आणि हाजीर जवाबीपणाचा अभाव दिसतो. संघर्ष यात्रेमध्ये त्यांचे स्वतःचे असे कर्तृत्व दिसले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ह
हतोळकरांचा प्रसाद Tue, 02/14/2017 - 15:45 नवीन
पूर्णपणे असहमत! वेळ मिळेल तेव्हा त्यांच्या संघर्ष यात्रेचे विडिओ युट्यूबवरून वगैरे जरूर बघा. शिवाय वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखती वगैरे पण पहा, कदाचित तुमचं मत बदलेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
स
संदीप डांगे Tue, 02/14/2017 - 15:52 नवीन
विशुमित यांनी जी एक ओळ लिहून पंकजाताईंबद्दल विशेषणे जोडली आहेत ती बहुधा सेल्फी-प्रकरणाकडे बघून जोडली आहेत असं वाटतं...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ह
हतोळकरांचा प्रसाद Tue, 02/14/2017 - 16:11 नवीन
हो मलाही तसेच वाटले, किंवा त्या ऑडिओ क्लिप प्रकरणाकडे बघून :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
अ
अभ्या.. Tue, 02/14/2017 - 16:43 नवीन
पंकजा डॅशिंग आहे. बीड परभणी उस्मानाबाद भागातील मोठ्या समुदायावर तिचा होल्ड आहे. भगवानगडावरील सभा प्रकरणात ते प्रुव्ह केलेले आहे. वंजारी समाजावर असलेला मुंडेसाहेबांचा प्रभाव तिने कंटीन्यु केला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
व
विशुमित Tue, 02/14/2017 - 13:07 नवीन
उदयनराजे भोसलेंचा उदाहरण द्याच राहून गेलं. भले हे शिवाजी महाराजांचे वंशज बऱ्याच लिबरल/ संघीय/ सुशिक्षित लोकांना रुचत नाहीत (मला पण नाही रुचत काही वेळा) पण सातारा सारख्या शहराला तेच सांभाळू शकतात. तेथील गुंडगिरी आटोक्यात ठेवायची असेल तर उदयनराजांच्या कार्यपद्धतीचाच उपयोग होताना दिसत आहे. इतर कोणी तेथील नेतृत्व करण्याचा प्रयत्न केला तर तेथील जनता त्याला टिकून देणार नाहीत. (सातारा चे कोणी मिपाकर असतील तर ते योग्य सांगू शकतील ) बारामती बाबत पण तेच आहे. बारामती मध्ये इतके गटतट असून देखील आणि बराच वेळा उमेदवार पटत नसून देखील जनता शेवटी पवार घराण्यावरच विश्वास टाकते. इतरांकडे सत्तेचे सोपान देऊन वाटोळे करून घेण्यात कोणाला हौस आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
म
मोदक Tue, 02/14/2017 - 13:11 नवीन
तुमच्याबद्दलचा आदर दिवसेंदिवस (धरणातल्या गाळाप्रमाणे) वाढतच चालला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Wed, 02/15/2017 - 05:48 नवीन
माझ्या बद्दल फुकाचा आदर ठेवण्यापेक्षा माझे म्हणणे कसे चुकीचे आहे ते इथे लिहा, ही विनंती. माझे ज्ञानार्जन होईल आणि माझे विचार सुधारण्यात मदत ही होईल. व्यक्तिगत टिपण्याकरण्या पेक्षा हे कधीही चांगलेच नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
च
चिनार Tue, 02/14/2017 - 13:36 नवीन
म्हणजे साताऱ्यात तेवढ्यापुरती हुकूमशाही आहे असं म्हणायचं का ? साताऱ्यात गुंडगिरी आहे म्हणून त्यांना सांभाळायला उदयनराजे सारखे माणसं लागतात, असं असेल तर भारतात साताऱ्यापेक्षाही जास्त गुंडगिरी असलेले कितीतरी शहरं आहेत. अश्याने सगळीकडे गुंडेच दिसतील ना विशुमित साहेब. हे म्हणजे असं झालं, "जब शहर के सबसे बडे गुंडे हम हैं और अगले पाच साल दिखनेवाले नही है, तो तुमको छेडेगा कौन?" उदयन राजे प्रवूत्ती हा फक्त माज आहे.आता ह्या अश्या माजाने साताऱ्याचा विकास झाला असे कोणी म्हणत असेल तर धन्य आहे. दोन दिवस साताऱ्यात आर्मि पाठवा सगळे गुंडे थंडे होतील. गुंड्यांना सांभाळायला गुंडे ठेवा हा संतापजनक प्रकार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा