Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मुंबई महानगर पालिका निवडणूक २०१७

ध
धर्मराजमुटके
Fri, 01/27/2017 - 13:10
🗣 405 प्रतिसाद
नमस्कार ! महाराष्ट्रात भाजप-सेना युतीचे राज्यसरकार बनल्यापासुन अनेक कुरबुरी चालू होत्या. रोज रोज एकमेकांवर आरोप तर करायचे पण एकत्र सत्तेतही राहायचे हे पाहून माझ्यासारख्या सामान्य आणि निष्पक्ष व्यक्तींना नक्कीच उबग आला असेल. काल २६ जानेवारी २०१७ च्या मुहुर्तावर शिवसेनेने युती तोडण्याची घोषणा केली आणि भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांच्या कार्यकर्त्यांना जितका आनंद झाला नसेल तितका एक सामान्य माणूस म्हणून मला झाला. प्रत्येक पक्ष आतापर्यंत बेडीकीने बैलाचे सोंग घेतल्याप्रमाणे आपली ताकद फुगवून दाखवत होता त्यांची खरी ताकद आता कळणार आहे. मुंबई, ठाणे, पुणे आणि इतर शहरात होणार्‍या पालिका / जि.प. आता भाजपा, सेना स्वतंत्रपणे लढतील तर काही ठिकाणी राष्ट्रवादी-कॉग्रेस युती करतील. शिवाय या खेचाखेचीत निवडणूकांसाठी १ महिन्यापेक्षाही कमी कालावधी राहिला असल्यामुळे या वेळची निवडणूक वेगळी ठरणार आहे. प्रत्येक पक्ष वेगवेगळे लढत असल्यामुळे पक्षातील तिकिट इच्छूकांना बर्‍याच प्रमाणात वाव मिळेल त्याचप्रमाणे इंपोर्टेड इच्छूकांना देखील बर्‍याच प्रमाणात वाव मिळेल. एकंदरीत निवडणूकीच्या तोंडावर पक्ष सोडून जाणार्‍यांची संख्या घटेल असा अंदाज आहे. शिवाय एकाच वॉर्डात चार ते पाच मोठे पक्ष, स्थानिक वजनदार नेतेमंडळी निवडणूक लढविणार असल्यामुळे ऐनवेळी 'बशी घेणार्‍या' उमेदवारांना घसघशीत फायदा होण्याचा संभव आहे. पण नोटबंदी नंतरच्या या काळात हा प्रश्न वेगवेगळे पक्ष कसा सोडविणार हे पाहणे रोचक ठरणार आहे. मुंबईत मागील वेळी मराठी मतांमधे जो सेना-मनसेच्या मागे एकवटण्याविषयी संभ्रम होता तो आता बर्‍याच प्रमाणात निवळला असून मराठी मतदाराला या दोघांपैकी नेमके कोणाला मत द्यायचे हे नक्की कळाले असावे असाही एक अंदाज आहे. मात्र काही नेते, सेना-मनसे समर्थक अजुनही सेना-मनसे युती होईल असे मनातल्या मनात मांडे खात आहे. मात्र ठाकरेंचा सध्याचा पवित्रा पाहता ते कोणाशीही युती करतील असे वाटत नाही. मात्र मतदानाचे निकाल आल्यानंतर मात्र सगळ्यांनाच सगळे ऑप्शन ओपन असतील असे वाटत आहे. गुजराती, मारवाडी मतदार प्रामुख्याने भाजपचा मतदार मानला जातो. मात्र मुंबईतील बहुसंख्य गुजराती / मारवाडी समाज व्यापारक्षेत्रात गुंतला आहे. त्यांच्या प्रत्येकाच्या व्यवसायावर नोटबंदीनंतर काय आणि किती प्रमाणात परिणाम झाला यावर त्यांचे यंदाचे मतदान अवलंबून असेल की ते काहीही झाले तरी भाजपालाच मते देतील काय हे बघणे देखील रोचक ठरेल. त्यातच कालच शरद पवार साहेबांना पद्मविभुषण जाहिर झाला असल्यामुळे निवडणूकीच्या तोंडावर भाजपा राष्ट्रवादी अशी नवी युती होणार काय असादेखील संभ्रम उत्पन्न होण्याचा संभव आहे. मात्र अशी शक्यता निकालांअगोदर तरी दिसत नाही. कदाचित शिवसेनेने मुंबई / पुणे राखले तर ते भविष्यात राज्यसरकारमधून बाहेर पडू शकतात व त्यावेळी राष्ट्रवादी मदतीला येऊ शकेल अशीही एक शक्यता दिसते. (साहेबांना पदक अगोदरच्या कामगिरीबद्द्ल मिळाले आहे पण तो वेगळा मुद्दा आहे.) युपी बिहारी मंडळी आपापल्या राज्यात सपा, बसपा, जनता दलाला आणि काही प्रमाणात भाजपाचे पाठीराखे असले तरी एकेकाळी ही मंडळी मुंबईमधे बर्‍याच अंशी काँग्रेस समर्थक होती. मात्र सध्याची काँग्रेसची अवस्था पाहता ही मंडळी कोणामागे उभी राहतात हे पाहणे रोचक ठरेल. कदाचित बर्‍याच ठिकाणी हीच मते निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. मुस्लीमबहूल भागात सपा ची कसोटी लागणार आहे तर ओवेसींची पार्टी काय करते यावर देखील लक्ष ठेवावे लागेल. ओवेसींनी कालच "मोदींना परदेशी दाढीवाले का आवडतात" असा वरवर योग्य वाटणारा सवाल विचारुन टीआरपी खेचून घेतला आहे. सगळ्यात कठीण अवस्था विविध आंबेडकरवादी पक्षांची आहे. आठवलेंचा पक्ष भाजपाबरोबरच राहतो की कसे हे देखील २८ जानेवारीपर्यंत माहित पडेल. मात्र सध्यातरी त्यांच्यासमोर दुसरा पर्याय दिसत नाहिये. अगदी ५०-१०० मतांनी पराभव / विजय होण्याची शक्यता असणारी यावर्षीची निवडणूक अगदी रोचक होणार आहे हे नक्की. कोण कोठे जिंकेल हे आजच सांगणे अवघड असले तरी आपण आपापले अंदाज मांडू शकता. मात्र स्थानिक उमेदवाराचे कर्तुत्व, त्याचा इतिहास पाहूनच त्याला निवडून द्यावे ही माझीतरी अपेक्षा आहे. पक्ष कोणताही असो, काही फरक पडू नये असे मला वाटते. आमच्या ठाण्यात विविध पक्षांनी आपापल्या विभागातील सोसायट्यांना भेटणे सुरु केले आहे. आम्हीही आमच्या समस्या / मागण्या त्यांच्यापुढे मांडून काही अपेक्षा ठेवल्या मात्र सध्या कोणताही उमेदवार कोणतेही वचन देण्यास राजी नाही यावरुन त्यांच्या मनाची अस्थिरता देखील दिसून येते. एकंदरीत उमेदवारांसाठीही ही निवडणूक वेगळी ठरणार आहे हे निश्चित. तुम्हाला काय वाटते ते जाणून घेण्यास इच्छुक आहे. अवांतर : मी लेखाच्या शिर्षकात मुंबईचा उल्लेख केला असला तरी धागा मुंबई, ठाणे, पुणे आणि इतर शहरांतल्या निवडणूकींच्या चर्चांसाठी वापरला जाऊ शकतो. राज्यांच्या निवडणूकांवर इथे अगोदरच एक धागा असल्यामुळे त्याची चर्चा त्याच धाग्यावर केली तर ते संदर्भांसाठी उपयुक्त राहिल.
वर्गीकरण
राजकारण

प्रतिक्रिया द्या
61088 वाचन

💬 प्रतिसाद (405)
ग
गामा पैलवान Mon, 02/20/2017 - 13:50 नवीन
श्रीगुरुजी, १.
"मी भ्रष्टाचार केला असेल तर भर चौकात मला फासावर चढवा" असे अनेक भ्रष्टाचारी पुढारी जाहीर सभेत सांगतात. त्याच धर्तीवरचे हे वाक्य होते.
अडवाणी ज्पेयी तर तोंडदेखली जबाबदारीही घ्यायला तयार नव्हते. मुखी सेक्युलर जप सुरू झाला होता. २.
विधानसभा व लोकसभेची निवडणुक असली की बेगडी हिंदुत्वाचा झेंडा नाचवायचा आणि महापालिका निवडणुकीच्या वेळी 'इस्लाम खतरेमें है' या हाळीप्रमाणे 'मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा केंद्राचा डाव आहे' असा कांगावा करून मराठी कार्ड खेळायचे हाच यांचा आजवरचा प्रवास.
तरीपण मराठी माणू अ का निवडून देतो? तो मूर्ख आहे म्हणूनंच ना? मग हे मूर्खपण संपवायचं कार्य मनावर घ्याच. ३.
मुंबईत येणार्‍या परप्रांतियांना बनावट शिधापत्रिका, बनावट अधिवास दाखला देऊन १५ वर्षे वास्तव्याचे प्रमाणपत्रे देण्यामध्ये मुंबई महापालिकेचे अधिकारी व मुंबईतील सर्वपक्षीय नगरसेवक जबाबदार होते.
माझ्या माहितीप्रमाणे हे काम राज्य शासनाच्या अखत्यरीत येतं. शिवसेनेच्या नगरसेवकांना धुतल्या तांदळाची उपमा देता येत नाही. पण तुमचे आरोप इतरत्रही तितकेच लागू पडतात. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 02/21/2017 - 10:09 नवीन
अडवाणी ज्पेयी तर तोंडदेखली जबाबदारीही घ्यायला तयार नव्हते. मुखी सेक्युलर जप सुरू झाला होता.
जबाबदारी कोणीच घेतली नव्हती (अगदी बाळासाहेबांनी देखील).
तरीपण मराठी माणू अ का निवडून देतो? तो मूर्ख आहे म्हणूनंच ना? मग हे मूर्खपण संपवायचं कार्य मनावर घ्याच.
सेनेची स्वतःची मते फार थोडी होती. युतीमुळे सेनेला मते मिळायची. युतीत ७०% हून अधिक जागा सेना लढवित असल्याने जास्त नगरसेवक सेनेचे असायचे. हा मूर्खपणा संपायला सप्टेंबर २०१४ मध्येच सुरूवात झाली आहे. २०१७ ची निवडणुक हा मध्य आहे आणि २०१९ मध्ये मूर्खपणा कायमचा संपेल. बादवे, शिवसेनेवर खालील लेख रोचक आहे. http://www.rediff.com/news/column/is-shiv-sena-changing-the-goalposts-again/20170221.htm त्यातील काही परिच्छेद - The Shiv Sena became popular in Mumbai, but never went beyond the city and neighbouring Thane, as Maharashtrians in the rest of the state did not see outsiders as a threat.
By the early 1980s the Sena had become a marginal political player even in Mumbai, though its fire power was intact.
So it needed to reinvent itself. By this time, Thackeray, who had started nursing pan-Maharashtra ambitions, sensed popular Hindu polarisation in the country in the wake of the Ramjanmabhoomi agitation and the Shah Bano case and decided to champion the cause of Hindutva.
So the Shiv Sena abandoned the Maharashtra for Maharashtrians slogan and adopted Hindutva.
But in Gujarat, backing Patel means another rupture with the BJP.
It means conclusively replacing the Marathi Manoos idea by a pro-Patidar, pro-Maratha appeal.
माझ्या माहितीप्रमाणे हे काम राज्य शासनाच्या अखत्यरीत येतं. शिवसेनेच्या नगरसेवकांना धुतल्या तांदळाची उपमा देता येत नाही. पण तुमचे आरोप इतरत्रही तितकेच लागू पडतात.
ही कामे करून देणारे, त्यासाठी शिफारस करणारे नगरसेवकच असतात. महापालिकेकडे अतिक्रमण हटविण्याचे अधिकार आहेत. परप्रांतियांच्या अनधिकृत बांधकामांवर मुंबई महापालिकेने फारशी कारवाई केल्याचे ऐकिवात नाही. जिथे जिथे स्थानिक आयुक्त हे काम करू पाहतात तिथे तिथे इतर पक्षांबरोबर शिवसेनेचे नगरसेवक सुद्धा आडवे येतात (उदा. अरूण भाटिय, तुकाराम मुंडे, चंद्रशेखर इ.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
व
वरुण मोहिते Tue, 02/21/2017 - 10:41 नवीन
निकालासाठी वेगळा धागा काढा कोणीतरी:)
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Tue, 02/21/2017 - 17:23 नवीन
महापालिका निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर मतदान झाले आहे. मुंबईत ५५% मतदान झाले आहे. मागच्या वेळी हाच आकडा ४५% होता असे एबीपीवर दाखवत आहेत. तसे असेल तर मोठ्या प्रमाणावर मतदानात वाढ झाली आहे असे म्हणायला हवे. हे वाढलेले मतदान नक्की कोणत्या बाजूला होईल यावर सर्व काही अवलंबून असेल. शिवसेना म्हणत आहे की नोटबंदीविरोधात मतदान वाढले आहे तर भाजप म्हणत आहे की शिवसेनेच्या विरोधात हे वाढलेले मतदान आहे. हे वाढलेले मतदान ज्या बाजूला जाईल त्या बाजूचा विजय होईल. अ‍ॅक्सिस-इंडीया टुडेच्या एक्झिट पोलमध्ये शिवसेना आणि भाजप यांच्यात प्रचंड चुरस असेल असा अंदाज व्यक्त केला आहे. शिवसेनेला ८६ ते ९२ तर भाजपला ८० ते ८८ जागा मिळतील असा अंदाज आहे. आतापर्यंत अ‍ॅक्सिसचे अंदाज बर्‍यापैकी बरोबर आले आहेत (दिल्लीत त्यांनी आपला ६० जागा दिल्या होत्या. बिहारमध्येही त्यांचा अंदाज बरोबर आला). तरीही इतकी प्रचंड चुरस असेल तर अगदी ०.१% मतेही इकडची तिकडे झाली तरी प्रत्यक्ष निकाल बदलू शकेल. मनसेला ५ ते ७ जागा मिळतील असा अंदाज या पोलने व्यक्त केला आहे. हे निकाल प्रत्यक्षात आले तर मनसेला बरोबर न घ्यायची शिवसेनेची चूक झाली असे म्हणायला हवे. कारण मनसेच्या ५ ते ७ जागा आणि शिवसेना-मनसेमध्ये मतविभागणी होऊन गमावल्या लागणार्‍या जागा शिवसेनेच्या पारड्यात आल्या असत्या तर स्वबळावर बहुमतही मिळू शकले असते. अर्थातच हे एक्झिट पोल्सच आहेत. त्यामुळे सध्या तरी हे सगळे हवेतले इमले आहेत. प्रत्यक्ष निकालांसाठी अजून ३६ तास थांबावे लागेल.
  • Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद Tue, 02/21/2017 - 17:33 नवीन
मुंबई, ठाणे, उल्हासनगर, नाशिक शिवसेनेकडे तर पुणे, नागपूर, अकोला भाजप कडे जाईल असे वाटते आहे. पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी राखेल असा अंदाज आहे. अमरावती, सोलापूर माहिती नाही काय होईल ते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा