Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

परदेस मत जैय्यो...! (बट व्हाय नॉट?)

प
पिलीयन रायडर
Wed, 02/15/2017 - 17:16
🗣 340 प्रतिसाद
बर्‍याच दिवसांपासून मनात एक प्रश्न आहे. अनेक लोक त्याला झैरात किंवा हुच्चभ्रु किंवा हिरव्या लोकांचे हिरवे प्रश्न (अ‍ॅज इन डॉलर्सवाल्यांचे प्रश्न!) म्हणुन उडवुन लावतीलही. पण हा आयुष्यातला महत्वाचा प्रश्न होऊन बसलाय आणि मला एक ठाम उत्तर मिळत नाहीये. माझं स्वतःचं अमेरिकेत जावं असं काही स्वप्नं नव्हतं. मी मूळात फार मोठी स्वप्नं बघणारी, महत्वाकांक्षी व्यक्ति नाही. माझा नवराही काम उत्तम आणि मनापासुन करणारा माणुस आहे, पण करियर ओरियंटेड वगैरे नाही. आयटी मधले बहुतांश लोक वारी करुन येतातच तसे आम्ही अमेरिकेत पोहचलो. पासपोर्टवर शिक्का बसला ह्याहुन जास्त आम्हाला फार काही वाटले नाही. पण २ महिन्यासाठी आलो ते गेले २ वर्ष झाले इथेच आहोत. पुढचं काही नक्की नाही. आम्ही स्वतःहुन काही प्रयत्नही करत नाही आहोत. सुरूवातीला आलो तेव्हा परत जायचेच आहे ह्याच मनस्थितीत होतो. त्यामूळे हॉटेलात राहिल्यासारखं बॅगांमम्ध्येच निम्मं सामान ठेवुन संसार चालु केला. आजही परत जाण्याचीच तीव्र इच्छा आहे. पण आताशा मनात गोंधळ उडायला सुरुवात झाली आहे. खास करुन जेव्हा पासून मुलगा इथल्या शाळेत जायला लागला. पहिले २ महिने काही विषेश घडतय असं वाटत नव्हतं. पण हळूहळू त्याच्या वागण्या बोलण्यातला बदल, शाळेत शिकवण्याच्या पद्धतीतला फरक इ गोष्टी ठळक व्हायला लागल्या. मला व्यक्तिशः इथली पद्धत जास्त आवडली. इथे लिखाणावर किवा पुस्तकातून शिकण्यावर भर दिला जात नाही. खरं तर मूळाक्षरं किंवा अंक ह्यापेक्षाही वागण्या बोलण्याची पद्धत, इतरांना समजुन घेणे, शेअर करणे इ. वर भर आहे. जे काही शिकवले जाते ते खेळांमधुन किंवा प्रोजेक्ट्स मधुन. पुस्तकं नाहीचे, वही नाही, घरचा अभ्यास नाही. शाळेत वर्गात १५ मुलं आणि २ शिक्षिका. वर्गाचे आर्ट-सायन्स-सॅण्ड-वॉटर-टॉय-बुक-कॉम्प्युटर असे भाग केलेले आहेत. आणि मुलं गट करुन त्यात काही तरी शिकत असतात. पहिल्या दिवशी मुलाला सोडलं तेव्हा दोन गट करुन मुलं भिंगातुन दगडं बघत बसली होती. आणि शिक्षिका त्यांना प्रश्न विचारत होत्या की हात लावुन सांगा, रंग काय आहे सांगा इ. आधी मला वाटलं की हा निव्वळ टाईमपास असणारे. ह्यातून काही आपलं पोरगं फार शिकणार नाहीये. उगाच ४ तास खेळायला सोडल्यासारखं आहे. पण झालंय उलट. गेल्या ४-५ महिन्यात उलट तो फारच वेगवेगळ्या गोष्टी शिकलाय. ह्यात एबीसीडी वगैरे अजिबात नसून आपल्या आजुबाजुच्या वस्तुंचा, पदार्थांचा, घटनांचा आणि माणसांचा समावेश आहे. शाळेभोवती पडलेले दगड पासून ते डोनाल्ड ट्रंप पर्यंत बरंच काही. इथे माझ्यामधली आई गडबडली आहे. पुण्यात असताना माझा शाळेचा अनुभव काही विषेश नव्हता. रोज २-३ पानांचा लिखाणाचा अभ्यास असायचा, ज्याचं नाव काढलं की घरात भयानक रडापड सुरु व्हायची. इथे मात्र कोणताही अभ्यास न करता मुलगा जास्त शिकतोय असं का कोण जाणे वाटत रहातंय. एक जण तर म्हणते की पुढे जाऊन प्रेमात पडावं इतका चांगला अभ्यासक्रम असतो. मला स्वतःला आयुष्यात वारेमाप पैसा असावा, मोठं घर असावं असं काही वाटत नाही. मला उलट भारतात रहावं वाटतं. पण आता मुलाला पाहताना वाटतं की माझ्या संकुचित आकांक्षांपायी मी त्याचे अनुभव तर हिरावुन घेत नाहीये ना? माझे वडील मराठवाडा सोडुन पुण्यात आले म्हणुन आम्हाला आमच्या मावस-चुलत भावंडांपेक्षा काही गोष्टी जास्त मिळाल्या. आज मी मुलाला भारतातुन अमेरिकेत आणुन अजुन जास्त संधी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करतेय. इथे मिळणारे अनुभव जास्त व्यापक असतील. समजणार्‍या गोष्टी अनेकविविध असतील. पुण्यातल्या शाळेत त्याच्या आजुबाजुला साधारण त्याच्याच सारखी मुलं होती. "माझ्या ग्रुपमध्ये मोहमद-मसाया-चार्ली आणि मी आहोत" हे वाक्य मला पुण्यात ऐकु येणं जरा अवघडच आहे. पण दुसर्‍या बाजुने असंही वाटतं की तो स्वतःच्या देशापासून , संस्कॄतीपासुन दूर आहे. हळूहळू त्याची ही ओढ मारली जाईल. आजी-आजोबा-काका-मावशी ही नाती जशी आमच्या आयुष्यात होती, त्याच्या असतील का? तिकडे त्याला कितीतरी भावंडं मिळतील.. इकडे फक्त मित्रच.. शिवाय भारतातही आता अमेरिकेच्या तोडीस तोड उपलब्धता आहे. वस्तु तर आपल्याकडे सगळ्या मिळतातच, पण सुविधाही हळूहळू येत आहेत. अमेरिकेतल्या सोयी आणि भारतातली संस्कॄती (मोठे कुटूंब, जवळपास भरपुर माणसे, त्यांचे येणे जाणे) असे दुहेरी फायदे पुण्यात राहुनही मिळु शकतात. मग अनुभवविश्व जरा सीमीत राहील, पण भावनिकदृष्ट्या तुम्ही जास्त सुरक्षित वातावरणात असाल. हा प्रश्न बराचसा वैयक्तिक आहे ह्याची मला कल्पना आहे. पण काही जणांशी बोलताना जाणवतं की आपण बरेचदा आपल्या वयाला असणार्‍या लिमिटेड व्हिजिबीलीटेने निर्णय घेतो. पण त्याहीपेक्षा वेगळे आणि गुंतागुंतीचे मुद्दे आयुष्यात असतात. किंवा काही काही गोष्टींचा आपण बाऊ करतो, ते तेवढं काही वर्षांनी महत्वाचं रहात नाही. त्यामूळे असे निर्णय घेताना जितके वेगवेगळे विचार ऐकु, दृष्टीकोन समजुन घेऊ, तितकं चांगलं. जशी इथे कर्जाबाबतीत बदललेल्या दॄष्टीकोनाची चर्चा झाली, तसंच आपला देश सोडणे, आपली संस्कॄती-पद्धती दुसर्‍या देशात रुजवणे किंवा नव्या पद्धती सामावुन घेणे ह्या बद्दलही मत बदलत चाललेले दिसते. आपल्या देशात राहुन काम करणे ही देशभक्तीची व्याख्यासुद्धा आता जरा शिथिल झालेली दिसते. परदेशात असणार्‍यांनी, जाऊन आलेल्यांनी, अनेक वर्ष राहुन परत आलेल्यांनी, कायमचं रहाण्याचा निर्णय घेतलेल्यांनी, परदेशाची संधी नाकारुन भारताला निवडणार्‍यांनी.. तुमची तुमच्या निर्णयामागची भुमिका सांगितलीत, तर अनेकांना ह्या महत्वाच्या निर्णयात बराच फायदा होऊ शकतो. किंवा किमान निर्णय घेताना कोण कोणत्या मुद्द्यांचा विचार व्हावा ह्याला तरी दिशा मिळु शकते.
वर्गीकरण
परदेश अनुभव

प्रतिक्रिया द्या
118041 वाचन

💬 प्रतिसाद (340)
स
संदीप डांगे Wed, 02/15/2017 - 17:35 नवीन
मोठा विषय आहे, सवडीने उत्तर देतो. तूर्तास, मला दुबई आणि मलेशिया इथून चांगल्या संधी आल्या होत्या. त्या मी नाकारल्या. कम्फर्टझोन तोडण्याचा स्वभाव असणारा मी त्या संधी का नाकारल्या याचं उत्तर देतो, आणि आज त्याबद्दल, तुमच्या प्रश्नाबद्दल विचार करतांना काय वाटतं तेही सांगतो.
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Wed, 02/15/2017 - 18:07 नवीन
आपल्याकडच्या सीबीएससी शाळांचा वाढता कठीण अभ्यास पाहता अमेरीकेतला तुम्ही म्हणताय तसा हसता खेळता अभ्यासक्रम कधीही चांगला. स्पर्धेत मागे पडू नयेत म्हणून लहान वयात नको तेवढा कठीण अभ्यासक्रम मला वयक्तीक रीत्या नको वाटतो. मुलांचे लहानपण हीरावून घेणारा वाटतो. सद्या भारतातील शाळा स्पर्धांसाठी विद्यार्थी तयार करत आहेत. वागण्या बोलण्याची पद्धत, इतरांना समजुन घेणे, शेअर करणे शिकवले जाते की नाही शंका आहे. सार्वजनिक ठीकाणी वर्तन कसे असावे, स्वच्छता कशी राखावी, दुसर्‍यांना मान कसा द्यावा, रांगे उभे रहाताना खेटून उभे राहू नये, नेहमी आपल्या आधी कोणाचा हक्क आहे का ते पहावे, प्रत्येक ठीकाणी घुसाघुस करु नये, लीफ्टमधून बाहेर येणार्‍यांना आधी प्राधान्य द्यावे, मागून येणार्‍यांसाठी दरवाजा धरून ठेवावा, अनोळखी असला तरी प्रत्येकास हसून अभिवादन करावे, अशा बर्‍याचशा गोष्टी अमेरीकेत शिकवल्या जातात कींवा मुले इतरांना बघून शीकतात. बरीच वर्ष अमेरीकेत राहून आल्यावर वर नमुद केलेल्या गोष्टी भारतात अजीबात दीसत नाहीत. थोडक्यात मुलांना जबाबदार नागरीक बनवले जाते, जे भारतात होताना दीसत नाही. बाकी तुमचे सारे आयुष्य भारतात गेल्यामुळे तुम्हाला भारतातील गर्दी, इथले उत्सवी वातावरण, सगेसोयरे आणि सोशल लाइफ याची सुरवातीला आठवण होत राहील. हे बर्‍याचदा आपल्या स्वभावावर अवलंबून असते. अबोल स्वभावाचे लोक, एकटे रहाण्याची आवड असणारे, कोलाहलापासून दूर रहाण्याची आवड असणारे यांना अमेरीका अवडते. रोज नाक्यावर उभे राहीलेच पाहीजे, आठवड्यातून कमीतकमी दोन वेळा खाणे/पीणे झालेच पाहीजे, गॉसीपींग ची सवय असणारे अशा लोकांना अमेरीका कंटाळवाणी वाटते... :)
  • Log in or register to post comments
द
दिगोचि गुरुवार, 02/16/2017 - 01:09 नवीन
माझ्या मताप्रमाणे मी मुलासाठी तेथे राहणार आहे हे कॉप आउट आहे असे मला वाटते. तेथे राहणार असाल तर तुम्हाला हवे म्हणून रहा नाही तर काही बिघडले तर त्याला दोष द्याल. आणि तिथे जर राहणार असाल तर पूर्णपणे त्या जीवनात मिसळा. म्हणजे भारतीय सम्स्क्रुति सोडा असे मी म्हणत नाही. अनेक जण परदेशी राहतात पण दरवर्शी भारतात पळतात त्यामुळे ज्या देशात ते राहतात तो देशही अनेक वर्षे तेथे राहून त्यानी पाहिलेला नसतो व त्या देशच्या सम्स्क्रुतीची त्याना कल्पनाहि नसते असा माझा अनुभव आहे. जरा स्पष्ट लिहिले आहे रग मानू नका. इतर प्रतिसादकाना माझ्यावर तोफ डागु नका ही विनन्ति. पूर्वी असे घडले आहे म्हणून सान्गत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
म
मराठी कथालेखक गुरुवार, 02/16/2017 - 09:14 नवीन
परदेशात असणार्‍यांनी, जाऊन आलेल्यांनी, अनेक वर्ष राहुन परत आलेल्यांनी, कायमचं रहाण्याचा निर्णय घेतलेल्यांनी, परदेशाची संधी नाकारुन भारताला निवडणार्‍यांनी.. तुमची तुमच्या निर्णयामागची भुमिका सांगितलीत, तर अनेकांना ह्या महत्वाच्या निर्णयात बराच फायदा होऊ शकतो. किंवा किमान निर्णय घेताना कोण कोणत्या मुद्द्यांचा विचार व्हावा ह्याला तरी दिशा मिळु शकते.
तसा 'कधीच परदेशात न गेलेल्या' लोकांचा सल्ला लेखिकेने मागितला नाहीये पण तरी देत आहे. फार थोडक्यात, मुलाची शाळा चांगली आहे, अभ्यासक्रम चांगला आहे ई ई कारणांनी परदेशात स्थायिक होण्याचा निर्णय घेण्यात अर्थ नाही, (त्यातही स्वतःचे मन मारुन तर नाहीच नाही). तुम्हाला दोघांना तिथे रहायला मनापासून आवडणार असेल तर जरुर तसा निर्णय घ्या. पण सध्या तुम्ही तुमचा विचारच प्रथम करा इतकं मी म्हणेन. तुम्ही (तुम्हाला आवडत असल्याने) भारतात परत येवून राहिल्याने मुलाचं काही मोठं नुकसान आहे असा अपराधी भाव मनात आणण्याचं कारण नाही. मुलगा मोठेपणी त्याच्या व्यक्तीमत्व, गुण, आवड याप्रमाणे जगाच्या पाठीवर जिथे जायचं असेल तिथे जाईलंच जाईल (काही लोक याला नशीब असं ही म्हणतात).. जसे तुमचे पालक कधी अमेरिकेत गेले नाहीत तरी तुम्ही ती संधी मिळवलीतच. कदाचित एखादा मुलगा भारतात शिकून गुगलचा CEO होवू शकतो तर अमेरिकेत शिकलेला मुलगाही McDonald मध्ये वेटर असू शकतो... पण परदेशात राहून मुलगा भारतीय संस्कृती शिकेल , मोठेपणी भारतीय संस्कृतीला अनुसरुन वागेल अशी अपेक्षा ठेवू नका. जर तुम्ही अमेरिकेत स्थायिक होत असाल तर तुमचा मुलगा 'अमेरिकन' होईल या वास्तवाचे भान असू द्या..किंवा त्याला तसे घडू देण्यातच त्याचे भले आहे , नाहीतर तो तिथल्या इतर समाजापासून उपराच राहील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिगोचि
स
संदीप डांगे गुरुवार, 02/16/2017 - 09:48 नवीन
बराचसा सहमत. नमस्ते लंडन मध्ये हे चित्र काहीसं दिसतं...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
स
सचिन काळे Fri, 02/17/2017 - 09:00 नवीन
आपला प्रतिसाद मनापासून आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
म
मराठी कथालेखक Fri, 02/17/2017 - 12:24 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचिन काळे
फ
फेदरवेट साहेब Wed, 02/15/2017 - 18:38 नवीन
आई म्हणून प्रश्न पडलाय तुम्हाला, त्यात गैर काही नाही. आमचे स्पष्टवक्तेपण थोडे जास्त आहे म्हणून म्हणतो नमनाला घडाभर नसले तरी चालले असते. :) तुमचे प्रश्न रास्त आहेत. तुम्ही अशी दोलायमान स्थिती झाली की उपलब्ध सोयी विरुद्ध काही जे तुम्हाला तोटे वाटत असतील त्यांना पारड्यात ठेऊन बघा, जे पारडे जड वाटते आहे तिकडे कौल टाकायचा , सिम्पल. "माझ्या ग्रुपमध्ये मोहमद-मसाया-चार्ली आणि मी आहोत" हे वाक्य मला पुण्यात ऐकु येणं जरा अवघडच आहे. काहीच अवघड नाही, असे वातावरण कुठंही मिळेल, मला (भारतात शिक्षण होऊनही) मिळाले. फक्त त्याची एक हिडीस किंमत भारतात मोजावी पुढे आयुष्यभर भरावी लागते (मी भरतोय) :(. एक गोष्ट इथे उघड लिहून देतो ताई, 'मोहम्मद, मेसाया, चार्ली हवेत कश्याला आपल्या सोबत' असे प्रतिसाद तुम्हाला इथेच मिळायची शक्यता प्रचंड जास्त आहे. बाकी भारतीय संस्कृती म्हणजे काय? अहो तुम्ही श्रीनिवास ठाणेदारांचे पुस्तक वाचले आहे का? ते यूएसला गेले तेव्हा एअरमेल सोडून पर्याय नव्हता, तिकिटे महागडी होती, अशात माणूस आपली भाषा लिहू शकत असे पण बोलणे चक्क विसरत असे (एकटे राहावे लागल्यास परदेशात) म्हणजे अडखळत असे बोलण्यात. आजकाल तितके कठीण नाही. ज्यूईश लोक आपल्या पोरांना सब्बाथ शिकवतातच ना? तसेच करायचे, आपल्या संस्कृतीचे व्यवच्छेदक लक्षण म्हणजे थोरामोठ्यांचा माफक आदर अन एक्सटेंडेड फॅमिली आहे असे शिकवायचे. प्रश्न पडल्यास उलट उत्तर न देता आपले मुद्दे मांडणे शिकवा, फॅमिली डे वगैरे (असल्यास) मुलाला आपले हेरिटेज सांगायला लाज वाटली नाही म्हणजे मिळवले. तो पूर्णच विसरेल का अन विसरला तर कसं हा विचार आत्ताच करणे थोडे ताणल्यासारखे नाही वाटत का? अन वोर्स्ट केस , नाही शिकला 'भारतीय संस्कृती' तर काय फरक पडतोय ?? म्हणजे काय इशू काय आहे ? नाही शिकला तर आई बापाकडे जेवायला येताना अपॉइंटमेंट घेऊन येईल अशी भीती आहे का? का सोबत राहता येणार नाही ह्याची भीती आहे? भारतीय पेरेंटिंग मध्ये हे एक मोठे लफडे आहे, पोराना प्रेमापेक्षा इंश्युरन्स पॉलिसी जास्त समजले जाते (तुम्ही समजता असे म्हणत नाहीये) .
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Wed, 02/15/2017 - 18:50 नवीन
नमनाला घडाभर तेल ही माझी पद्धत आहे. आदतसे मजबुर... तुमचा मुद्दा रास्त आहे, की नाही शिकला भारतीय संस्कॄती तर काय बिघडतं? मलाही नाही माहिती की काय बिघडतं. पण माझा मुलगा आत्ताच इथल्या मुलांसारखा बोलतो, इथल्या पद्धतींना पटकन उचलतो. मला सांस्कृतिक धक्का बसतोच अनेकदा. मला प्रामाणिकपणे सांगायचं तर ही सुद्धा भीती वाटते की एका टप्प्यानंतर त्याला माझी मुल्य कळणार नाहीत आणि मला त्याची. आणि मग आमच्यात एक निश्चित अंतर पडेल का? माझ्या आई-वडीलांविषयी मला ज्या तीव्रतेने वाटतं, ते नाही म्हणलं तरी माझ्या मुलाला माझ्याबद्दल वाटत रहावं असं माझ्या डीएनए मध्ये कोरलं गेलंय. ते मिटवणं अशक्य नाहीये.. पण अवघड असेल. कदाचित त्या भीतीतून मला असं वाटत असेल की "भारतीय संस्कॄतीत" राहिला तर आपल्या मनासारखा घडण्याची शक्यता जास्त. ह्याला काही अर्थ नाहीये आणि हे रीझनेबलही नाहीये हे मलाही कळतंय. पण ते वळायला अवघड आहे. मी शब्दात नाही नीटसं मांडु शकत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फेदरवेट साहेब
फ
फेदरवेट साहेब Wed, 02/15/2017 - 18:57 नवीन
नाही म्हणलं तरी माझ्या मुलाला माझ्याबद्दल वाटत रहावं असं माझ्या डीएनए मध्ये कोरलं गेलंय. आऊच! :/ तूर्तास नो कॉमेंट्स. पुढे अजून काही चार चांगले पर्याय येतील, काही प्रतिसादांवर बोलताना तुम्ही अजून सुस्पष्ट होऊ शकाल, तेव्हा फक्त ह्या वाक्याचा एकदा रिव्यु घ्या, असे सुचवेन. अर्थात धागा काढल्याबद्दल तुमचे आभार, आमचं नुकतं 3 महिन्याचं झालंय. अजून काही वर्षांनी आम्ही जात्यात असणार, कामी येईल हा धागा थॉटलाईन ठरवायला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर Wed, 02/15/2017 - 19:06 नवीन
मी विचार करुनही समजलं नाही की ह्यात वावगं काय? मी एक बर्‍यापैकी भारतीय मानसिकता असलेली पालक आहे. मुलांना सोडुन देणे, स्वतंत्र राहु देणे हे करण्याचा प्रयत्न चालु असतो. पण इथल्या आयांशी तुलना करता भारतीय आया आपल्या मुलांना खूपच जपतात आणि अनुषंगाने त्यांच्या अपेक्षाही बर्‍याच असतात. मी त्यातलीच एक आहे. माझ्या आईला मी रोज एक फोन केलाच पाहिजे असं वाटतं, मलाही मी तो केलाच पाहिजे असं वाटतं. ह्यात चूक की बरोबर हा विषय नाहीये. ती ह्या क्षणी माझी मानसिकता आहे. २ वर्षांपुर्वी मी भारत सोडायलाच तयार नव्हते, आज मी ८ महिने झाले रहातेय इथे. तेव्हा कदाचित माझ्या मुलाबद्दलच्या माझ्या अपेक्षाही काही वर्षांनी इतक्या तीव्र असणार नाहीत. अजुन तो बराच माझ्यावर अवलंबुन आहे, तेव्हा तो अहंकार असतोच. उद्या तो जितका सुटा होत जाईल तितका हा अहंकारही गळुन पडेल. पण तरीही भारतीय आईच्या मानसिकतेते सध्या असताना तरी असंच वाटतं की ह्याला भेटायला किमान अपॉईंटमेंट घ्यायला लागु नये. तुम्हाला असं वाटत असेल की उद्या जाऊन बायको आली तरी माझ्याच शब्दात असावा, तर तसा प्रकार नाहीये हा. इथे माझं ऐकण्या बिकण्याशी संबंध नाही. अगदीच दुरावु नये इतकंच वाटतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फेदरवेट साहेब
स
स्रुजा Wed, 02/15/2017 - 19:00 नवीन
आपल्या आणि त्यांच्या मुल्यांमध्ये फार काही फरक नाही आहे. चोरी कर, उद्धटपणे बोल, मोठ्यांना जुमानू नकोस, नीतीमुल्यं पाळू नकोस असं कोणतीही संस्कृती आणि कोणतेही सुजाण पालक आपल्या मुलांना शिकवत नाहीत. फरक आहे तो सोशल कंडीशनिंग मध्ये, कल्चरल कंडिशनिंग मध्ये, नीतीमुल्यांमध्ये नाही ! बाकी येऊन बोलतेच पण या विषयावर मला ही फार प्रश्न पडलेत अर्थात ते मुलांच्या संदर्भात नाहीयेत पण एकुणच ९० मध्ये जितकं सोपं होतं हे म्हणणं की इकडचं जीवनमान भारतापेक्षा चांगलं आहे तितकं आता नाहीये. शेवटी आपापल्या परिस्थितीत प्राधान्य बघून वागणे हेच करावे लागते असं आता ४ वर्षां नंतर वाटायला लागलंय. शिवाय शाळांच्या बाबतीत म्हणशील तर माझा माझ्या भाचीच्या बाबतीत अत्युत्तम अनुभव आहे. मी काही रोज नसते तिच्याबरोबर त्यामुळे तिच्यात पडलेले फरक लगेच जाणवतात मला. "जबाबदार नागरीक" वाली सगळी लक्षणं तिचं डे केअर / नर्सरी तिच्यात हळु हळु कल्टिव्हेट करतंय. ३. ५ वर्षाच्या माझ्या भाचीला , रांगेच्या फायद्यापासून ते खेळ, सूर्यमालिका, बागेत जाऊन काही काम करणे, घरात मदत करणे, जेवण दिल्यावर आईला " तू किती छान शेफ आहेस !" असं म्हणणे, घरी कुणाचा वादी असला की बेक करणे ( लुटुपुटीचं पण हे तिला समर कँप मध्ये शिकवलंय तिच्या नर्सरीने) वगैरे भरपूर मोठी रेंज असलेल्या विषयातल्या गोष्टी अंगवळणी पडतायेत. अर्थातच तिच्या आईबाबांची आणि आजी आजोबांची पण मेहनत आहेच यात. पण आजुबाजुची मुलं आणि तिची नर्सरी हे महत्त्वाचं आहे. शिवाय भारतात राहिल्यामुळे घरी येणारा पै पाहुणा, आजुबाजुची मुलं, लग्न- मुंजींना भेटणारे नातेवाईक या सगळ्यांशी तिचं एक खास - कमी जास्त प्रमाणात बाँडिंग असलेलं - ईक्वेशन आहे. त्यामुळे भारतात हे होत नाही यावर माझा अजिबात विश्वास नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर Wed, 02/15/2017 - 19:14 नवीन
शाळांमध्ये फरक पडत चाललाय हे खरंय. त्याच्या आधीच्या शाळेत सुद्धा हयच टाईपच्या काही चांगल्या गोष्टी सुद्धा होत्याच. पण आपली शिक्षणपद्धत ही अजूनही बर्‍यापैकी पुस्तकांवरच अवलंबुन आहे. रॅट रेसच्या मानसिकतेतून आपण बाहेर पडतोय पण त्या वेगाने आपला अभ्यासक्रम पडत असेल असं वाटत नाही. अमेरिकाही काही नंबर वन नाहीये शिक्षणक्षेत्रात, पण रेवाक्काने वर्णन केल्याप्रमाणे ८ वी नंतरच्या लेव्हलला अमेरिकेत जास्त प्रगल्भ विचार केलेला जाणवतो. शिवाय इथे खेळाला दिलं जाणारं महत्व हा एक मला आवडलेला मुद्द्दा आहे. भारतातही अक्षरनंदन सारख्या शाळा आहेतच अर्थात. ज्या वेगळा विचार करुन मुलांना शिकवतात. बाकी नातेवाईक - कार्य - येणंजाणं हा एक फार महत्वाचा मुद्दा आहे. ते हुकतंय हे खरंच...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा
र
राही गुरुवार, 02/16/2017 - 05:27 नवीन
'मला प्रामाणिकपणे सांगायचं तर ही सुद्धा भीती वाटते की एका टप्प्यानंतर त्याला माझी मुल्य कळणार नाहीत आणि मला त्याची. आणि मग आमच्यात एक निश्चित अंतर पडेल का? ' हे तर इथे राहूनही होतंच. पिढ्यांची दरी आताशा फारच भराभर वाढते आहे. 'आमच्या काळातली' मूल्यं धडाधड कोपर्‍यात फेकली जाताहेत. वागण्या बोलण्याच्या संवाद साधण्याच्या नव्या पद्धती रुजताहेत. इतकंच नव्हे तर आपण बोलत असलेल्या भाषेचं समोरच्याचं आकलन कमी पडल्यामुळे भरपूर गैरसमजही होताहेत. अंतर तर तसंही पडतंच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
स
संजय क्षीरसागर Wed, 02/15/2017 - 18:39 नवीन
काही तरी एकच निवडावं लागेल आणि निर्णय घेतांना सर्वप्रथम दोन्हीतली कंपॅरीजन सोडावी लागेल तरच निर्णयाचं सुख लाभेल. जे तिकडे गेले त्यांची भारताशी नाळ तुटते त्यामुळे तुलनात्मक निर्णय होऊ शकत नाही. वन हॅज टू जस्ट फरगेट इंडीया. हेच दि अदर वे आहे, माझे जे मित्र परत आलेत ते कधीही अमेरिकेची आणि भारताची तुलना कोणत्याही लेवलवर करत नाहीत. दे हॅव अ‍ॅक्सेप्टेड इंडीया अ‍ॅज इट इज. तुम्ही निर्णय आज घ्या की दहा वर्षानी, नो कंपॅरिजन हा एकमेव क्रायटेरीया कामी येईल.
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Wed, 02/15/2017 - 18:44 नवीन
सर्वप्रथम दोन्हीतली कंपॅरीजन सोडावी लागेल तरच निर्णयाचं सुख लाभेल
अगदी योग्य वाक्य आहे! फक्त निर्णय घेताना तुलना होणारच ना. एकदा घेतला की मग विषय संपतो आणि जो पर्याय आहे तो १००% स्वीकारला तरच सुख मिळेल हे ही मान्य आहेच. पण निर्णय घेताना इकडचं काही.. तिकडचं काही खुणावतंय. आणि मी व्यवस्थित गोंधळलेले आहे की महत्वाचं काय असतं नक्की आयुष्यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Wed, 02/15/2017 - 18:57 नवीन
जेव्हा कंपॅरिजन थांबते तेव्हाच निर्णय होतो. तुम्हाला निर्णय घ्यायचा असला तर फक्त दोनच गोष्टी डोळ्यासमोर ठेवा : भारत / अमेरिका. इकडे काय मिळेल आणि तिकडे काय आहे असा विचार अनेक काऊंटरवेलींग उपविचारांना जन्म देतो. योग्य निर्णय हा नेहेमी लग्न करण्याच्या निर्णयासारखा असतो. जस्ट डिसाइड वन थींग अँड फर्गेट अबाऊट एवरी अदर थींग, दॅटस ऑल ! एकदा निर्णय झाला की पुन्हा फेरविचार नाही आणि मागे वळून बघणं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर Wed, 02/15/2017 - 19:17 नवीन
मला कधी नव्हे ते तुम्ही काय म्हणताय ते समजतंय.. आणि बहुदा तेच कामास येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Wed, 02/15/2017 - 19:23 नवीन
मी कायम असाच जगतो. कधीही पश्चात्तापाची वेळ आली नाही आणि येणं शक्य नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
व
वरुण मोहिते Wed, 02/15/2017 - 19:29 नवीन
सर्वप्रथम तुमच्या प्रायॉरिटीज काय आहेत ते ठरवा . म्हणजे पैसा , संस्कृती , कुटुंब इत्यादी. मुलाला चांगलं शिक्षण मिळेल म्हणून निर्णय घेतला असं नको .कारण तुलनेने ऐपत असेल तर भारतातही उत्तम शिक्षण मिळू शकत . दुसरी गोष्ट कितीही चांगलं शिक्षण मिळालं म्हणजे हल्लीच्या इंटरनॅशनल शाळेत मिळालं तरी मुलाच्या फक्त जाणिवा लवकर प्रगल्भ होतात . दुसरा जे थोडं उशिरा शिकेल ते त्यांना लवकर शिकायला मिळत,आत्मसात करायला मिळत . पण शेवटी अकॅडेमिक ऍबिलिटी महत्वाची.उदाहरणादाखल सांगतो आज माझ्यासमोर एमबीए फ्रेशर असतो मुलाखतीला एकजण मेघालय चा एकजण दिल्ली चा एक इंटरनॅशनल स्कूल चा एक स्टेट बोर्ड चा पण मुलाखतीसाठी त्यांना मुंबईत समान पातळीवरच यावं लागत ना . ज्या काही जाणिवा प्रगल्भता येणारे ती वयानुसार ऑपॉप येते आणि योग्य मार्गदर्शनाने .त्यामुळे अमेरिकेत शिक्षण झालं किंवा भारतात उद्या जागतिकीकरणामुळे तुम्हाला आणखी समान पातळीवर यावं लागणारे .तुम्ही कोर्स कुठूनही करा पण एखाद्या बहुराष्ट्रीय कंपनीसाठी भारतातून शिकला किंवा अमेरिकेतून हे महत्वाचं नसत . ह्याला वेळ असेल खूप त्यामुळे शिक्षण हा मुद्दा महत्वाचा ठेऊ नका .बाकी आपल्यावर आहे माझा कलीग ४ वर्षांपूर्वीच ऑस्ट्रेलिया ला मी वर्षभरात परत आलो मला नव्हतं राहायच तेव्हा आणि आताही संधी २-३ ठिकाणी असून नाही जायचंय पण नंतर जाइनही प्रत्येकाचे गोल वेगळे असतात त्यामुळे ते व्यक्तिसापेक्ष आहे .भावनिक ,सुरक्षित वातावरण ,संस्कृती हे सगळं आपल्याला वाटत परदेशात कोण मोठं होत असेल तर त्यांच्या ते मनातही येत नाही .
  • Log in or register to post comments
ए
एस Wed, 02/15/2017 - 20:02 नवीन
धागा आणि प्रतिसाद वाचत आहे.
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Wed, 02/15/2017 - 20:06 नवीन
पिराताई एक सांगू का? 'मुलाला वेगळे/चांगले अनुभव मिळावेत' ही चिंता सोडा. प्रत्येकाचं भांडं वेगळं. ज्याला घ्यायचेत तो वेगवेगळे अनुभव भारतात बसून घेईल, किंवा मोठा होऊन जगप्रवास करेल आणि ते अनुभव घेईल. ज्याला आपल्या डबक्यातून बाहेर पडायचं नाही तो परदेशी युनिमध्ये शिकायला जाऊनही भारतीय मित्र सोडून इतर कुणाशी बोलणार नाही. आपण किती लोड घ्यायचं याचं? तुमचं आयुष्य तुम्ही जगा, तुमचे/तुम्हाला वाटतील ते अनुभव घ्या. मुलाला त्याचे त्याचे अनुभव घ्यायला मोकळं सोडा.
रेवाक्कासारख्यांशी बोलताना जाणवतं की आपण बरेचदा आपल्या वयाला असणार्‍या लिमिटेड व्हिजिबीलीटेने निर्णय घेतो.
या bounded rationalityशी अर्थातच सहमत आहे.
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Wed, 02/15/2017 - 20:20 नवीन
हे ही पटतंय की सतत पालकाच्या भुमिकेतून विचार का करत रहावा? जे मला वाटतंय ते करायला मी मुखत्यार आहेच. आणि शेवटी ज्याचं त्याचं नशीब. पण अगदी त्या केसमध्येही, रेवाक्काशी बोलल्यावर ज्या तृटी विचारांमध्ये जाणवतात, त्याने निर्णय घेताना आपण किमान well informed तरी आहोत का हाच प्रश्न पडतो. मला स्रुजा, रेवाक्का ह्यांच्याशी बोलताना नेहमी जाणवतं की मी एक तर बाऊ करतेय काही मुद्द्यांचा किंवा माझ्या डोक्यातही काही गोष्टी आलेल्या नाहीत. किंवा अनेक बेसिक गोष्टी माहितीसुद्धा नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
ख
खग्या Wed, 02/15/2017 - 20:22 नवीन
एकंदर अमेरिकेतली सुबत्ता आणि पैसे यांचं आकर्षण मला नाही. पण भविष्याच्या दृष्टीने विचार केला तर भारतात असणारं भविष्य आणि अमेरिकेत असणारं भविष्य यात प्रचंड तफावत आढळून येते. भारतात राहिलं कि मुलांना खालील गोष्टींचा सामना करावा लागणार: १) प्रचंड स्पर्धा २) पुस्तकी ज्ञानावर नको तितका भर. ३) भ्रष्टाचार ४) आरक्षण ५) जाती धर्मावर आधारित मित्र मैत्रिणी ६) सुमार दर्जाचे शिक्षक (प्रत्येक मुलगा हुशारच असेल आणि त्याला सगळ्यात भारी ठिकाणी प्रवेश मिळेल असं मानणं चूक आहे. आणि दुसऱ्या किंवा तिसऱ्या दर्जाच्या संस्थांमध्ये सगळेच शिक्षक उच्च दर्जाचे नसणं स्वाभाविक आहे. त्यात नोकरीतील आरक्षण पद्धतीमुळे दर्जा घसरतो ते वेगळंच) (हे अमेरिकेत सुद्धा असू शकत मला अनुभव नाही ) अमेरिकेत राहणाऱ्या मुलांना सामना कराव्या लागणाऱ्या गोष्टींची यादी : १) नातेवाईकांचा अभाव २) आजूबाजूला आपल्या भाषा बोलणारी आणि आणि आपल्या संस्कृतीची माणसं कमी दिसणं ३) कामापुरते मित्र आणि इतर लोक यांचं वाढलेलं प्रमाण ४) खर्चिक आणि महाग शिक्षण ५) दुःख आणि काठिण्याला प्रवेश नसलेली स्वकेंद्रित जीवनपद्धती ६) दूरदर्शन आणि मोबाईल चा अतिरेकी वापर (हे हल्ली भारतात पण मोठया प्रमाणावर चालू आहे). यातून कुठला पर्याय निवडायचा तो वैयक्तिक प्रश्न आहे ..
  • Log in or register to post comments
स
स्रुजा Wed, 02/15/2017 - 21:05 नवीन
काही काही गोष्टींशी असहमत. मुळात भारतात आणि अमेरिकेत मिळणारा पैसा यात नेट ईफेक्ट पाहिलात तर निदान आय टी मध्ये फार फरक नाहीये. आणि बाकी मुद्दे: भारतात राहिलं कि मुलांना खालील गोष्टींचा सामना करावा लागणार: १) प्रचंड स्पर्धा - ही वाईट गोष्ट नाहीये ! भारत सोडता इतर विक्सनशील देशातल्या इमिग्रंट्स ना सगळ्यात मोठी भेडसावणारी चिंता म्हणजे स्पर्धे अभावी कमी होणारा ड्रायव्हिंग फोर्स ! स्पर्धा कमी असण्याचे फायदे तसे तोटे ही आहेत आणि ज्याच्या त्याच्या स्वभावानुसार एखादं पारडं जड होतं. २) पुस्तकी ज्ञानावर नको तितका भर. - हे पण हल्ली खुप बदललंय. रिक्रुटमेंट करताना गेल्या २-३ वर्षातला अनुभव हा आहे की उमेदवार आणि इंडस्ट्री हे दोघं ही आपापल्या अपेक्षांबाबत हुशार ( अवेअर या अर्थाने) झाले आहेत आणि त्याचा जाणवण्याइतपत परीणाम मुलाखत घेण्याच्या पद्धतीमध्ये आणि उमेदवारांच्या तयारीत ( म्हणजे अभ्यासक्रमाच्या पलिकडे जाऊन केलेली तयारी, प्रोजेक्ट्स ई) दिसतोय. ४) आरक्षण - हा अमान्य. इकडे पण ईक्वल एम्प्लॉयमेम्ट ऑपॉर्चुनिटीज दिल्या जातातच. पण आपल्या इतक्या प्रमाणात नाही आणि आपल्याकडे ही खाजगी क्षेत्रात हा मुद्दा फारसा महत्त्वाचा नाहीये. ५) जाती धर्मावर आधारित मित्र मैत्रिणी - हा फार च अमान्य. अमेरिकेत राहणाऱ्या मुलांना सामना कराव्या लागणाऱ्या गोष्टींची यादी : ३) कामापुरते मित्र आणि इतर लोक यांचं वाढलेलं प्रमाण - हे अगदीच अमान्य. उलट वेळ पडली तर अमेरिकन माणूस दिल्या शब्दाला जागेल. नेटवर्क असणं आणि काँटॅक्ट्स कामी येणं हे खर्‍या अर्थाने मी उत्तर अमेरिकेत होताना पाहिलं. आपल्याकडे पण होतंच पण आपल्याकडे गोड बोल्णारा माणूस पण तसा विचार करणारा असेलच असं नाही. इथे मी असं पाहिलंय की पटत असेल तर खरं खुरं पटतं नाही तर नाही, कुणाकडुन अपेक्षा करायची हे फार सोपं होतं आपल्यासाठी. अर्थात हा खुप सब्जेक्टीव विषय आहे, माझा वैयक्तिक अनुभव मला असा आलाय. यावर खुप चर्चा होऊ शकते. ४) खर्चिक आणि महाग शिक्षण - हल्ली हे दोन्ही ठिकाणी सारखंच महाग आहे. ५) दुःख आणि काठिण्याला प्रवेश नसलेली स्वकेंद्रित जीवनपद्धती - परत थोडीशी अमान्य. कुटुंब कुटुंब असतं शेवटी. इथली जीवनशैलीच अशी आहे की प्रत्येकाला खुप कामं असतात घरात त्यामुळे जितकं सहज पणे आपण येताजाता लोकांना भेटू शकतो तितकं इथे करणं शक्य नाहीये एवढंच काय ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खग्या
उ
उपाशी बोका गुरुवार, 02/23/2017 - 16:06 नवीन
४) आरक्षण - हा अमान्य. इकडे पण ईक्वल एम्प्लॉयमेम्ट ऑपॉर्चुनिटीज दिल्या जातातच. पण आपल्या इतक्या प्रमाणात नाही आणि आपल्याकडे ही खाजगी क्षेत्रात हा मुद्दा फारसा महत्त्वाचा नाहीये.
आरक्षण या निव्वळ एका कारणासाठी भारताबाहेर वास्तव्य करावे असे माझे स्पष्ट मत आहे. भारतामधील जीवघेणी स्पर्धा, शिक्षणक्षेत्रातील भ्रष्टाचार आणि आरक्षण यांच्या जाळ्यात तुमच्या मुलांना टाकावेसे वाटते का, याचा विचार प्रत्येक पालकाने केला पाहिजे. सर्वत्र टीका होत असली तरीही भारतात उत्तम दर्जाचे शिक्षण मिळते, असे माझे मत आहे. पण तरीही इतर बाबींचा विचार केला तर भारताबाहेर पडणे तितकेसे वाईट नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा
ट
ट्रेड मार्क Wed, 02/15/2017 - 21:00 नवीन
तुम्ही कुठल्या परिस्थितीत आहात आणि हा विचार का करताय हे मला नक्कीच कळतंय कारण मी यातून गेलोय. प्रत्येकाच्या आवडीनिवडी व प्रायोरिटी असतेच पण तरीही हा एक सामान धागा आहे. सगळ्या गोष्टी लिहिणं अवघड आहे पण जमेल तेवढं लिहितो. सगळं स्वानुभवातून सांगणार आहे त्यामुळे थोडी पार्श्वभूमी आणि थोड्या वैयक्तिक गोष्टी ओघात येणार आहेत. मी सगळ्यात पहिल्यांदा अमेरिकेत आलो ते एकटाच आलो. बायको आणि २ मुली (त्यावेळेला मोठी ६ वीत आणि धाकटी केजीमध्ये) भारतातच राहिल्या. मी आणि बायकोने विचार केला की आधी मी जाऊन बघेन सगळं कसं आहे ते आणि मग विचार करू. मी आल्यावर साधारणतः एक वर्षाने कुटुंब उन्हाळ्याच्या सुट्टीपुरते आले. पण ५ महिने ते राहिल्यावर आम्ही सगळ्यांनीच परत जायचे ठरवले. त्यावेळेला अमेरिकेत येऊन मला दीड वर्ष झालं होतं. भारतात परत गेल्यावर मला out of place असल्यासारखं वाटत होतं, पण तो वेगळा विषय आहे. तर जवळपास ८ महिने भारतात राहिल्यावर कंपनीकडून मला परत अमेरिकेत जा म्हणून प्रेशर आलं. त्यामुळे आम्ही परत अमेरिकेत आलो. छोटी मुलगी इथे प्रीके मध्ये जाऊ लागली. आम्हाला टेन्शन होतं की हिला इंग्लिश बोलणं तर दूरच पण समजत पण नाही तर कसं होणार. पण टीचरने आम्हाला आश्वस्त केलं आणि आमची बया एका महिन्यात मस्त इंग्लिश बोलायला लागली. मोठी मुलगी ८ वीत होती त्यामुळे तिचं पण टेन्शन होतं. पण इथे आधी एक परीक्षा घेतात आणि त्यावरून तुमची लेव्हल ठरवतात. म्हणजे ती ८ वीतच असणार पण एक क्लास वेगळा असतो ज्याला ESL म्हणतात. यात आशियाई टीचर असतात ज्या तुमचं इंग्लिश सुधारण्यावर भर देतात. म्हणता म्हणता मोठी पण मस्त रुळली. मोठी मुलगी ७-८ पर्यंत भारतात शिकल्यामुळे आम्हाला तिथला पण अभ्यासक्रम माहित आहे आणि आता इथला पण माहित आहे. ती तुलना करून सांगतो की इथला अभ्यासक्रम तसेच शिकवण्याची पद्धत खूपच चांगली आहे. पाठांतरावर अजिबात भर नसतो व जिथे पाठांतर आवश्यक आहे तिथे ते अश्या पद्धतीने शिकवतात की मुलांना सहज लक्षात राहतं. एक उदा. देतो, परवाच माझी छोटी मुलगी (आता ३रीत) मला ११x१२ किती माहिती आहे का विचारत होती. म्हणलं मला माहित आहे पण तुला माहित आहे का? तर तिने क्षणात १३२ उत्तर दिलं. म्हणलं तुम्हाला तर पाढे असे शिकवत नाहीत मग तुला कसं माहित? तर त्यांना एका कवितेतून शिकवतात म्हणे. तसेच मोठ्या मुलीला प्रश्नांची उत्तरं साचेबंद लिहायची नाहीत, तुम्ही विषय वाचायचा आणि तुमच्या शब्दात उत्तरं लिहायची असा नियम आहे. ८-९ वी पासूनच त्यांना पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तयार करून ते सगळ्या वर्गासमोर प्रेझेंट करायला सांगतात. उपलब्ध विषयांची एक लिस्ट असते त्यातून तुमच्या आवडीचे ४+४ (पहिल्या सहामाहीचे ४ व दुसऱ्याचे ४) असे विषय निवडता येतात. पहिल्या सहामाहीचे ४ विषय एकदा मधली परीक्षा झाली की परत वार्षिक परीक्षेला नसतात. तुमचे एकूण मार्क (मार्क नसतातच, ग्रेड्स असतात) हे तुम्ही होमवर्क पूर्ण करणे + दर महिन्याच्या क्लास टेस्ट + सहामाही परीक्षा असे असतात. बाकी वर खटपट्या म्हणालेत तसं मुलांना जबाबदार नागरीक बनवले जाते, जे भारतात होताना दिसत नाही. माझ्या लहान मुलीच्या २ रीच्या वर्गात एक मुलगी होती तिला काहीतरी आजार होता. शाळेतसुद्धा तिच्या बरोबर कायम एक ऑक्सिजन सिलिंडर (ट्रॉलीवर) व नाकात नळ्या असायच्या. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे वर्गातल्या प्रत्येक मुलाला रोटेशनने एक एक आठवडा तिच्याबरोबर सतत राहून तिचा सिलिंडर ओढून न्यायचं काम असायचं. आमची कन्या तिच्याकडे जेव्हा हे काम असायचं तेव्हा घरी येऊन आनंदाने सांगायची. हेच भारतात मी कल्पनाच करू शकत नाही कारण रंगावरून, व्यंगावरून, उंची/ जाडी, सांपत्तिक स्थितीवरून वरून सतत चेष्टा होताना बघितलेली आहे (सहनही केली आहे). थोडक्यात तिचा व्यक्तिमत्व विकास होताना दिसतोय. कचरा का करू नये, वस्तू कश्या वापराव्या, आईवडिलांशी, मित्रांबरोबर व बाहेरच्या लोकांशी कसं वागावं हे शिकवलं जातं. शाळेतच antibullying, drug abuse यावर सतत सांगितलं जातं योग्य वयात sex education सुद्धा दिलं जातं. मुलामुलींची निखळ मैत्री पण असू शकते व एखादा मुलगा/ मुलगी आवडतो/ ते हे सहजपणे सांगता येण्यासारखी परिस्थिती असते. पण त्याचबरोबर नकारसुद्धा तेवढ्याच ग्रेसफुली स्वीकारला जातो. अपवाद असतातच पण सर्रास एकतर्फी प्रेमातून हल्ला वगैरे फालतूपणा नसतो. अर्थात सगळंच आलबेल आहे असं नाही. ब्रोकन फॅमिलीज बऱ्याच असल्याने त्याचा मुलांवरही परिणाम होतो. पण अश्या मुलांपासून लांब राहण्याचा पर्याय उपलब्ध असतो व ती मुलं पण मुद्दामून इतरांना त्रास द्यायला येत नाहीत. अगदी टोकाच्या केसेस, म्हणजे शाळेत शस्त्र घेऊन येणे व हल्ला करणे हे पण घडत असतेच. पण शाळेचे नियमच असे बनवले आहेत की मुलांना वाकड्या मार्गाला जाताना त्रास होईल. अगदी मोठ्या मुलांनासुद्धा प्रत्येक क्लास मध्ये वेळेत येण्याचं बंधन असतं. उशिरा आलं तर एकदा समज व नंतर पालकांना कळवले जाते. सुट्टी घेतली तरी शाळेतून ई-मेल व फोन येतो. शिक्षक-विद्यार्थी गुणोत्तर चांगलं असल्याने शिक्षकांचे प्रत्येक मुलावर बारीक लक्ष असते. मागच्याच महिन्यात माझी मोठी मुलगी सांगत होती की तिच्या वर्गात एक मुलगा कायम उशिरा येतो व त्याच्याकडे बघून वाटतं की तो ड्रग्स घेत असावा (असा संशय आहे). पण म्हणे टीचरने हे सगळं शाळेत वरच्यांना व त्याच्या घरी सांगितलं आहे. पण तो मुलगा त्याच्याच विश्वात असतो बाकी कोणाला त्रास द्यायला येत नाही. बाकी संस्कृती म्हणाल तर इथे पण अगदी संक्रांतीपासून ते दिवाळीपर्यंत सगळे सणवार व्यवस्थित साजरे होतात. घरात आपण सांगतच असतो. यापलीकडे इतर धर्मांचे सणसुद्धा मुलांना कळतात. वेगवेगळ्या वंशाच्या (जात तर सोडूनच द्या) मुलामुलींबरोबर समानतेने कसं राहायचं हे शिकायला मिळतं. अर्थात आपली पुस्तकं, संगीत मात्र या मुलांना समजणार नाही याचं मला वाईट वाटतं. नातेवाईकांबरोबर संपर्क सोशल मेडियामुळे सहज शक्य आहे. दोनेक वर्षातून एखादी भारतभेट होतेच त्यातून अजून मदत होते. व्यक्तिशः मला नातेवाईक जरा लांब असलेलेच बरे वाटतात. अरे हो एक सांगायचं राहिलंच... माझी धाकटी मुलगी मराठी शाळेत जाते. प्रत्येक रविवारी सकाळी इथे एक मराठी शाळा भरते, तेवढंच जरा आपली मातृभाषा शिकेल. एखादं पुस्तक समोर आलं तर ही काय चित्र काढलीयेत असं म्हणणार नाही.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 02/15/2017 - 21:12 नवीन
या लेखात मांडलेल्या काही प्रश्न साधारणपणे असे आहेत, असा माझा समज आहे... १. मुलाने कोणत्या जागी (जगातल्या कोणत्या देशात; किंबहुना भारतासारख्या मोठ्या देशातील कोणत्या शहरात असा सुद्धा हा प्रश्न होऊ शकतो) राहिल्यास / शिकल्यास / मोठे झाल्यास चांगले ? २. परदेशात वाढणारे मुल आपली संस्कृती आणि/किंवा भाषा विसरेल का ? ३. परदेशात (उदा, अमेरिकेत) राहण्याने / शिकण्याने / मोठे होण्याने मुलाला पालकांबद्दल (मला हवे तेवढे) ममत्व वाटेल की नाही ? या प्रश्नांची उत्तरे शोधताना इतकी (सर्वसाधारण आणि व्यक्तीगत) व्हेरिएबल्स जमेस धरावी लागतात की, अर्थातच, त्यांची १००% योग्य उत्तरे (वन साईझ फिट्स ऑल) शक्य नाहीत. पण तरीही, नेहमीच्या जीवनात हे प्रश्न नेहमीच पडतात आणि त्यांची उत्तरे शोधायलाच लागतात. ती उत्तरे शोधताना, माझ्या मते, सर्वसाधारण ठोकताळे असे असावेत... १. मुलाने कोणत्या जागी (जगातल्या कोणत्या देशात; किंबहुना भारतासारख्या मोठ्या देशातील कोणत्या शहरात असा सुद्धा हा प्रश्न होऊ शकतो) राहिल्यास / शिकल्यास / मोठे झाल्यास चांगले ? (अ) मुलाचे भवितव्य मध्यवर्ती ठेऊन विचार केल्यास पुढचे विचार जास्त स्पष्ट होतील व या प्रश्नांची उत्तरे शोधणे सोपे होईल. कारण, या सगळ्या प्रयत्नांचा परिणाम मुलाने पुढचे जीवन आनंदाने व्यतीत करण्यात झाला नाही तर वरच्या दोन्ही प्रश्नांची उत्तरे, मूल किंवा पालक, कोणाच्याच दृष्टीने सुखदायक नसतील. (आ) निर्णयप्रक्रियेत कोणाचे मत केव्हा जास्त महत्वाचे असावे ? : या बाबतीत, मुलाच्या भवितव्याच्या दृष्टीने काय जास्त फायद्याचे होईल मुद्दा केंद्रस्थानी असावा. ..... (आ).(१). मुल लहान असताना कोणत्या जागेवरचे कोणते शिक्षण त्याच्या भवितव्याच्या दृष्टीने जास्त चांगले याचा विचार, अर्थातच, पालकांनी करणे अध्याहृत आहे. ..... (आ).(२). मुलाला समज येऊन त्याच्या स्वतःच्या भविष्याबद्दल आवडनिवड पुढे येऊ लागल्यावर पालकांनी माहिती पुरवून मुलाला निर्णय घेण्यात मदत करावी. आपली आवड त्याच्यावर लादण्याचा प्रयत्न करू नये. (इ) शिक्षणाचा प्रकार (विषय, डीग्री, इ), ते घेण्याची जागा, इत्यादी गोष्टी वर सांगीतलेल्या मध्यवर्ती मुद्दा "मुलाचे सुखी भवितव्य" या साध्यासाठी वापरली जाणारी साधने (टूल्स) आहेत. तेव्हा ते साध्य साधण्यासाठी उपयोगी ठरतील अशीच साधने निवडावी. केवळ एखादी गोष्ट 'इन थिंग' आहे किंवा 'बरेच जण असेच्/हेच करतात' या कारणांनी त्यांची निवड केली जाऊ नये. २. परदेशात वाढणारे मुल आपली संस्कृती आणि/किंवा भाषा विसरेल का ? मुलांना आपल्या संस्कृती व भाषा याबद्दल ममत्व वाटणे हे मूल कोणत्या देशात, कोणत्या वातावरणात आणि कोणत्या मुलांबरोबर वाढत आहे यापेक्षा जास्त आपल्या स्वतःच्या घरात कोणती संस्कृती व भाषा सतत वापरात आहे यावर अवलंबून आहे, हे व्यक्तीगत अनुभवावरून व अनेकांच्या निरिक्षणावरून खात्रीने मी सांगू शकतो. ३. परदेशात (उदा, अमेरिकेत) राहण्याने / शिकण्याने / मोठे होण्याने मुलाला पालकांबद्दल (आपल्याला हवे तेवढे) ममत्व वाटेल की नाही ? (अ) मुल जर, (१) सुसंवादी घरात वाढले आणि (२) त्याला आपल्या आवडीचे भवितव्य मिळून सुखी झाले... किंबहुना 'आपल्या भविष्यासाठी, जरूर तेव्हा आपल्याला विश्वासात घेऊन, आपल्या पालकांनी मनापासून प्रयत्न केले आहेत' अशी मुलाची किमान खात्री असल्यास मुलाला पालकांबद्दल ममत्व वाटण्याची जास्त शक्यता आहे. केवळ एवढेच या बाबतीत पालकांच्या हाती असते. (आ) कोणाबद्दल ममत्व वाटणे हे सुसंवाद (पक्षी : कौटुंबिक शिक्षण) आणि मानसिक समाधान यावर जास्त अवलंबून असते... या बाबतीत, देश किंवा शालेय शिक्षणाचा प्रकार हे मुद्दे गौण आहेत. (इ) "मुलाचे भवितव्य उत्तम होणे" यापेक्षा जास्त आनंदाची गोष्ट कोणत्याही सुजाण पालकासाठी असणार नाही. सुजाण पालकांसाठी, "रोजचे बोलणे" किंवा "पाय लागू माताजी/पिताजी" यापेक्षा हा आनंद मोठा असेल. (ई) हा मुद्दा लेखात अभिप्रेत नाही, पण तरीही फार महत्वाचा असल्याने इथे माडत आहे : मुलांना आपल्या "म्हातारपणाची काठी" किंवा "पेन्शनची सोय" किंवा "इन्शूरन्स" समजणे हे, काही सन्माननिय अपवाद सोडता, पालक आपल्या जीवनाचे व्यवस्थापन करण्यात अयशस्वी झाल्याचे लक्षण असते. किंबहुना, आपल्या अपूर्ण इच्छा मुलांच्या जीवनातून पूर्ण करून घेण्याइतका मोठा जुलूम दुसरा नाही. इतका सगळा विचार करून भागेल असेही नाही. कारण हा निर्णय वाढत्या मुलाच्या बाबतीत असतो आणि त्याची अंमलबजावणी अनेक वर्षांच्या कालावधीत करायची असते. वेळ जाते तशी तिच्याबरोबर इतर सर्व व्हेरिएबल्सही बदलत राहतात, आवडीनिवडी बदलतात. तेव्हा अगोदरचा निर्णय चुकीचा किंवा सर्वथा योग्य वाटला नाही तर, धीर दाखवून दिशाबदल करण्याची तयारी ठेवली पाहिजे... कारण घ्येय (जीवन आनंदाने व्यतीत करणे) साधणे स्थायी व सर्वात महत्वाचे असते व बदलत्या परिस्थितीला योग्य त्या प्रकारे साधनांत बदल करणेच योग्य असते. पूर्वी केलेला साधनांचा निर्णय योग्य नव्हता असे कळल्यावरही साधनांत बदल न करता चुकीच्या (सुखकारक ध्येयाच्या विपरित) दिशेने जात राहणे शहाणपणाचे नाही.
  • Log in or register to post comments
ज
जयंत कुलकर्णी Wed, 02/15/2017 - 21:20 नवीन
Pira, When you take decisions, you should always check your assumptions on which your decision is based. You will always find contradictions. Remove them and you will arrive at a satisfactory answer... For example in your case, you assumed that you are going to take a decision for the benefit of your child..on the other hand you also have assumed that you want to live life for yourself.... now... these are two assumptions on which your decision is going to be based. But here you will have to think what is your Goal.... If first one is your Goal then knock out the other assumption and vice versa. Hope you understand... off course this is just an example... You will have to construct a tree of assumptions (honestly) and study them wrt to your goal, for yourself... There is a structured way of taking such decisions where you are in duel minds. Dr. Goldrat has a book on it....I do not remember the name now... I read it long back when I was practicing TOC in our organization... Jayant Kulkarni
  • Log in or register to post comments
स
स्रुजा Wed, 02/15/2017 - 21:20 नवीन
म्हात्रेकाकांच्या प्रतिसादात असलेले प्रश्न महत्त्वाचे आहेत च, पण मला एक अजुन प्रश्न पडलाय. मुलांचे शिक्षण वगैरे एकीकडे , आपल्याला कुठे ही जाऊन नोकरी करायची आहेच. इथे "मायक्रो मॅनेजमेंट" नावाचा प्रकार शुन्य आहे. लोकं बर्‍यापैकी व्यावसायिक मुल्यं पाळतात. चिंधीगिरी , फालतु गॉसिप, एखादे दिवस डबा नाही आणला तर नवर्‍याला कसं काय चालतं वगैरे नाक घालणे होत नाही. माझ्या बॉसचं प्रॉडक्ट संबंधी एखादं मत, एखादी स्ट्रॅटेजी मला पटली नाही तर मी त्याच्या तोंडावर " धिस डझ नॉट मेक एनि सेन्स" म्हणते आणि तो ते योग्य रीत्या स्विकारतो, नव्हे आपण चर्चाच करायला बसलोय आणि मत-मतांतरं व्हायला हवीत हे सगळ्यांना पटतं . यातलं बरंचसं भारतीय कार्यपद्धतीत नाहीये. करायला मिळणार्‍या कामाची प्रत ( हेडक्वार्टर्स ते ऑफशोअर) यात ही फरक आहेच. शिवाय माझ्या रजा माझ्या हातात असतात, माझं येणं जाणं माझ्या वेळेनुसार होतं, मी जास्त थांबले म्हणजेच मी जास्त काम केलं असं कुणाला वाटत नाही. भारतात बर्‍याच गोष्टी या क्लायंट साईड ला मिळणार्‍या व्हिजिबिलिटी वर अवलंबून असतात आणि ती तुम्हाला मिळू नये म्हणुन एखादा बिनडोक मॅनेजर सहज काड्या करू शकतो. मला असा यक्ष प्रश्न पडलाय की इथुन तिथे गेल्यावर या कार्यपद्धतीशी कसं जुळवुन घ्यायचं !! इथुन भारतात गेलेल्यांचे या संदर्भातील अनुभव ऐकायला आवडतील.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 02/15/2017 - 21:37 नवीन
या प्रतिसादात असे दिसून येत नाही का?... इतके समाधानकारक मुद्दे सद्या पालकाच्या जीवनात असल्यावर, असे जीवन मुलालाही मिळू नये, असे कसे वाटेल ?! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा
ट
ट्रेड मार्क Wed, 02/15/2017 - 22:18 नवीन
मी सुद्धा फक्त दीड वर्षातच बास झाली अमेरिका आपला भारतच बरा या विचाराने परत गेलो होतो. पण एवढ्या कमी कालावधीत सुद्धा मला एकदम out of place असल्यासारखं वाटलं... तेसुद्धा माझ्या मातृभूमीत. थोडी कारणमीमांसा करायची झाली तर - १. ऑफिसमधलं राजकारण - हे सगळ्यात मोठ्ठ कारण २. प्रोजेक्टबद्दल मला काय वाटतंय हे मी उघड बोलू शकत नाही. ३. स्वतःचं काम सोडून दुसऱ्याचे पाय खेचायची लोकांची वाईट सवय ४. ऑफिस सोडून मला माझं कुटुंब आहे, बाकी जग आहे हे बॉस मान्य करत नाहीत - माझ्याकडे व्हिसा असूनही मी कौटुंबिक कारणाने अमेरिकेत परत जायला नकार दिला म्हणून माझ्या बॉसने इगो इश्यू केला व तिच्यामुळे अगदी मला अकाउंट मधून बाहेर पडावं लागलं. ५. येण्याजाण्याच्या अनिश्चित वेळा - सकाळी ८ ला येऊन रात्री १० ला गेलं तरी बॉस म्हणणार - इतनी जल्दी जा रहे हो? ६. दुसऱ्याला फसवण्याची किंवा एखाद्याच्या आगतिकतेचा फायदा करून घेण्याची वृत्ती मग बाकी प्रदूषण, ट्रॅफिक, अस्वच्छता ई गोष्टी आहेतच. बादवे, अमेरिकेतही तुम्हाला भारतीय म्यानेजर आला तर तो काही आपला खास भारतीय टच सोडत नाही. माझ्या एका प्रोजेक्टमधला म्यानेजर टीममधल्या एका अमेरिकन मुलीला रात्री ९ ला वगैरे फोन करून स्टेटस वगैरे विचारायचा. ती फ्रेशर होती म्हणून तिने फारसं काही केलं नाही. मला वाटलं हा बाब्या फक्त मलाच रात्री फोन करतो, पण मग त्या मुलीने बोलता बोलता मला सांगितलं. मग आमच्या म्यानेजरलाच समजावून सांगायची वेळ आली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा
र
रेवती Wed, 02/15/2017 - 21:44 नवीन
पिरा, माझे नाव तेवढे लेखातून काढून टाकलेस तर बरे होईल.
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Wed, 02/15/2017 - 22:53 नवीन
वोक्के!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
W
wrushali kulkarni गुरुवार, 02/16/2017 - 01:28 नवीन
पिरा अतिशय चर्चेचा मुद्दा आहे. पण जितकी चर्चा तितके confusion असा माझा अनुभव आहे. २ वर्षांपूर्वी मी असाच मनस्थिती मध्ये होते. हा एकाच मुद्दा होता आमच्या वादाचा भारत कि अमेरिका. माझे मुद्दे बरेच सारखेच : मुलाला कशी कळणार भारतीय संस्कृती ,संस्कार ,नातेवाईक,देशप्रेम आणि हो आपले आई वडील. नवऱ्याचे मुद्दे : कंपनी मधील पॉलीटिकस , ऑफिसची वेळ त्यातून मिळणारा फॅमिली time , मुलाचे शिक्षण आणि नंतर नोकरी(जातीभेद आणि आरक्षण )वर ट्रेड मार्क नि दिलेलेच मुद्दे अर्थातंच सगळं विचार करून मी माघार घेतली.पण आता एकदाचा निर्णय झाल्याने डोके शांत आहे. आणि वाटले तर निर्णय बदलू शकतो म्हणून समाधानही आहे. त्यांच्या मुद्यावर अर्थातच माझ्याकडे उत्तरे नव्हती पण माझ्या सगळ्या मुद्याची उत्तरे मी मिळावली. अर्थात तडजोडच. आपली संस्कृती कळावी या साठी मी सगळे सण करते म्हणजे गुढी पाडव्याला गुढी उभी करते, गणपती ,मोदक ,दिवाळीत पण फराळ, लक्ष्मी पूजन ,नवरात्र संक्रात ला हळदी कुंकू. बाकी मी पूर्णपणे भारतीय सोसायटी मध्ये राहत असल्याने सोसायटी मध्ये रंगपंचमी,५ दिवसाचा सार्वजनिक गणपती असे बरेच सण साजरे होतात. तसे HSS , मराठी विश्व ,आणि अनेक मंदिरातही सण साजरे होतात. इथे नातेवाईक म्हणजे मित्र मैत्रिणी हेच. atleast मावशी, काका, दादा,ताई हि नाती तरी मिळतात. आणि दर वर्षी आमचे आई बाबा इकडे किंवा आम्ही तिकडे असे भेटतोच. फक्त देशप्रेम हा मुद्दा नाही सुटत कारण त्यांच्या साठी हा त्यांचा देश आहे. आपल्यासारखे देश भक्तीपर गाणे -चित्रपट पाहून त्यांच्या डोळ्यात पाणी येईल हे अशक्य आहे. आई वडील आता तरी ६ हिने साठी येऊ शकतात आणि आपण सेट झालो कि त्यांनाही इकडे बोलावून घेऊ शकतो कायमचे बाकी इथले शिक्षण वर सांगितल्याप्रमाणे नक्कीच उत्तम . प्रॅक्टिकल जास्त असते त्यामुळे लक्षात राहते माझा मुलगा २ री मध्ये आहे त्या आत्ता पर्यन्त अळीचे फुलपाखरू कसे होते? ,अंड्यातून कोंबडीचे पिल्लू कसे बाहेर येते ? बी पेरली कि त्याचे झाड कसे येते . या वरून तुम्ही आईच्या पोटातून कसे जन्माला आलात हेही शिकवले. निवडणुकीच्या काळात तर १ महिना निवडणूक कशी असते ,उमेदवार कोण आहेत, निवडून आल्यावर ते काय करणार ,कोठे राहणार पासून पहिले प्रेसिडेंट कोण होते होते हि सगळी माहिती दिली गेली. आपण जसे वाढलो तसे आपली मुले भारतात वाढतील असे आपल्याला वाटते पण ते शक्य नाहीये कारण आता तसे राहिले नाही. आपले मावशी ,काका ,आजी जसे हक्काने रागवायचे किंवा लाड करायचे तसे आता राहिले आहे का? तिकडेही मुले बाहेर खेळताना फार दिसत नाहीत. मराठी बोलताना फार दिसत नाहीत .मोबाइल गेम आणि टीव्हीवर कार्टूनच नाही तर सिरीयल वेडी असताना दिसतात हे माझे मागच्या वर्षी ३ महिने राहून केलेले निरीक्षण. असो मला वाटते आजचा दिवस इथे आहेत तर जगून घ्या उद्याचा विचार करून आजचा दिवस पण वाया नको घालवायला .
  • Log in or register to post comments
इ
इडली डोसा गुरुवार, 02/16/2017 - 02:13 नवीन
तु मुलाच्या भविष्याच्या दृष्टीकोनातून हे प्रश्न मांडले आहेस. पण मी असं म्हणेन कि कुटुंब म्हणुन तुम्हाला सगळ्यांनाच काय हवय याचा सुद्धा विचार पुढचा निर्णय घेताना करावा. माझ्या मुलाचं ज्यात भलं आहे त्यातच मला आनंद आहे असं कितीहि म्हटलं तरी आपण स्वतः सुखी समाधानी असु तरच आपण ते सुख पुढे मुलांपर्यंत पोचवु शकतो. वर कोणी तरी म्हंटल्याप्रमाणे तुमच्या प्रॉयरीटीज काय आहेत त्यानुसार निर्णय घेणं सोप्प जाईल. मागे सांगितलं होतं तसा प्यु मेट्रिक्स करा, निर्णय घेताना उपयोगी पडेल. (तुला एक एक्सेल शीट पाठवलीय ती पण बघ. )
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु गुरुवार, 02/16/2017 - 04:34 नवीन
कॉलिंग मुक्तविहारी काका! जोक्स अपार्ट. लेखात मांडलेल्या प्रश्नाकडे बघण्याचे अनेक दृष्टीकोन असू शकतात. १. जर मुलाचे बालपण व प्राथमिक शिक्षण अमेरिकेतच जाणार असेल तर नंतर तुमचा भारतात परतण्याचा निर्णय त्याच्यासाठी अवघड होऊन जाऊ शकतो. एव्हाना त्याची मुळे अमेरिकेत रुजायला सुरवात झालेली असेल व त्याच्या दृष्टीने अमेरिका हीच त्याची कंट्री झालेली असेल. अशी समस्या बर्याच बॉलिवुड मूवीमध्येही दर्शवलेली आहे. २. जर मुलाची कंडिशनिंगच इथे कायमचे राहायचेच नाही आहे आपल्याला व भारतात परत जायचे आहे तर त्याची मानसिकता कायम निर्वासितासारखी होऊ शकते. माझी एक मावस बहीण काही दिवसांसाठी ऑस्ट्रेलियाहून भारतात आली चाचपणी करायला कि मुले इथे रूळतील का नाही त्याची. पण मुलांची मानसिकता पूर्णपणे ऑस्ट्रीलियन झाली होती त्यामुळे दोघा पती पत्नींनी भारतात परतण्याचा निर्णय बदलला. बाकी मुलाच्या अडनिड्या वयात जर भारतात परत आलाच तर मार्गदर्शन करायला सौ. माधुरी दिक्षित नेने आहेतच कि!
  • Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस गुरुवार, 02/16/2017 - 05:09 नवीन
हे अपर्णा वेलंकारांचे पुस्तक जरूर वाचाच (अजून पर्यंत वाचले नसल्यास ) असे सुचवतो बाकी सविस्तर लिहीन किंवा व्यनि करिन ...
  • Log in or register to post comments
क
कायरा गुरुवार, 02/16/2017 - 07:39 नवीन
अमेरिकेत किंवा इतर ठिकाणी रहाणार्‍या नवरा बायकोचे एकमेकांशी पटत नसेल तर त्यांनी मुलांच्या भविष्यातव्यासाठी कुठे रहावे?
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 02/16/2017 - 08:02 नवीन
दोघांनी मुलांच्या = राहावे ! हळूहळू पटू लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कायरा
व
वेल्लाभट गुरुवार, 02/16/2017 - 08:38 नवीन
तुमच्या संभ्रमाचे शिक्षण व शिक्षणेतर अशा दोन पातळीवर उत्तर देतो. शिक्षण - भारतातली शिक्षण पद्धती भिक्कार आहे; असं सरसकट विधान करत नाही. पण अनेकोनेक वर्ष त्यात काहीही बदल झालेला नाही आणि त्यामुळे ती जुनाट आहे हे नक्की. आपल्या पुस्तकी शिक्षणपद्धतीत सगळ्या मुलांना एकाच पारड्यात तोललं जातं. आणि मग त्यांच्यात मार्क या निकषावर डावं उजवं केलं जातं. या प्रक्रियेत स्वतःचं वेगळेपण घेऊन शाळेत गेलेली मुलं, शाळेतून एकसारखी होऊन बाहेर पडतात. फरक उरतो तो फक्त मार्कांचा आणि टक्क्यांचा. उलटपक्षी शिक्षण या गोष्टीकडे बाहेरच्या देशात वेगळ्या पद्धतीने बघितलं जातं. वैचारिक विकासाकडे जास्त कल असतो, स्पून फीडिंग कमी असतं. उदाहरणार्थ सांगू तर माझी बहीण जेंव्हा भारतातल्या शाळेत सहावीपर्यंत शिकून पुढे लंडनच्या शाळेत गेली तेंव्हा इतिहासाच्या तासाला तिला विचारण्यात आलं, की शिवाजी महाराजांच्या कुठल्या गोष्टी तुला चुकीच्या वाटतात? आपल्याकडे शिवाजी महाराजांच्या चुका काढणं म्हणजे शिक्षकांनी एक तर वर्गाबाहेर काढलं असतं किंवा 'हा बघा, मोठा शहाणा आला' असं करून हिणवलं असतं. पण निपक्षपातीपणे गोष्टींकडे बघताना तुमचा विचार व्यापक होत जातो, प्रगल्भ होत जातो याची प्रचीती पुढे तिला अनेकदा आली. सांगायचा मुद्दा हा की आपली शिक्षणपद्धती मुलांच्या वैचारिक विकासाला मारक आहे. त्यामुळेच आजकाल ऑल्टर्नेटिव्ह एज्युकेशन चं महत्वं अनेक पालकांना वाटतंय. आता बाहेर शिकण्यात तुम्ही काय गमवाल? सकाळची प्रार्थना, शिक्षकांना नमस्कार करणं, मूल्य शिक्षण, आपल्या अभ्यासक्रमात एक्स्लूजिवली असलेले विषय म्हणजे भाषा, (आपला) इतिहास, नागरीकशास्त्र, इत्यादी. शिक्षणाच्या माध्यमाचा मुद्दा आहे पण तो भारतात राहून इंग्रजी माध्यम असेल तर वैध आहे, भारताबाहेर तो मुद्दा येतच नाही. पण हा तोटा होणा-या इतर फायद्यापुढे कमीच आहे असं म्हणेन. तिकडे तुमचा मुलगा एखाद्या खेळात प्रवीण होऊ पहात असेल तर शाळा सर्व सोयी देईल, इथे मधल्या सुट्टीत दहा मिनिटं जास्त खाली खेळलं म्हणूनही पट्ट्या खाल्लेल्या मला आठवतायत. त्यामुळे शिक्षण भारताबाहेरच सरस आहे हे तुमच्या प्रश्नावर माझं मत. पुन्हा नमूद करेन की भारतात की भारताबाहेर यातली ही निवड आहे, आणि भारतातल्या भारतात असेल तर प्राधान्यक्रम वेगळा आहे, निदान माझा. नाही, उगाच मागच्या कुठल्यातरी प्रतिसादात तुम्ही असं म्हणालात मग आता हे कसं वगैरे प्रश्न करू बघणार्‍यांसाठी पुन्हा सांगितलं. शिक्षणेतरः हा प्रश्न सोपा आहे. भारतात तुमची जवळची मंडळी सोडली तर मोहात पाडणारं काहीही उरलेलं नाही. शहरात गटारगर्दी आहे, गावात ती नसली तरी सोयीही कमी आहेत. ही गोष्टही बाहेरच्या देशात उत्तम आहे. उदा. मला तिथल्या कंट्रीसाईडला बेड अँड ब्रेकफास्ट मधे मिळालेलं इंटरनेट कनेक्शन माझ्या ऑफिसच्या कॉर्पोरेट कनेक्शनपेक्षाही जास्त बँडविड्थ चं होतं. हां आता तुम्हाला कोकणातल्या एखाद्या गावात वर्क फ्रॉम होम मिळालं, सुसाट नेट कनेक्शन मिळालं, घर बांधलंत, प्रयोगशील झेडपी शाळेत प्रवेश घेतलात, तर तुम्ही भारतात राहूनही बर्‍याच अंशी समाधानी होऊ शकता. अन्यथा तुम्ही अमेरिकेत आहात हे उत्तम आहे. काही जणं म्हणतात की आपल्याइथे मी बारा वाजताही एकटी येऊ शकते घरी तसं तिथे नाही, एकाट वाटतं इत्यादी. ते जरी खरं असलं तरी ज्या प्रमाणात भारतात गुन्हेगारी वाढते आहे, आणि ज्या प्रकारची वाढते आहे, ती बघता हाही मुद्दा परदेशांच्या बाजूनेच जातो. सातच्या आत घरी येणं, अनोळखी रस्ते टाळणं, अशा काही गोष्टी पाळल्या की तिथल्यासारखी सुरक्षितता भारतात नाही हे जाणवेल. बाकी तुम्ही ठरवालच, तेंव्हा इथे थांबतो. पण जाता जाता, भारतातल्या लोकांच्या शिकूनही अशिक्षित, असंस्कृत असल्यासारख्या वागण्याची चीड आहे हे नमूद करतो.
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Sat, 02/18/2017 - 03:12 नवीन
प्रतिसाद आवडला. शिवाजी महाराजांचे काय चुकले हा विचार जन्मात माझ्या मनाला शिवला नसता. मला विचार करूनही उत्तर समजत नाहीये. पण ह्यात मला वावगेही काही वाटले नाही. अशाही चर्चा आवश्यक आहेतच. ज्या आपल्याकडे होत नाहीत. मी ज्या धन्य पद्धतीने इतिहास शिकलेय त्यात तर नाहीच नाही. खरं सांगायचं तर भारतातले शिक्षण घेऊनच आपण अमेरिकेत गेलोय हे खरं असलं तरी जर माझा नवरा अमेरिकेत शिकला असता तर कदाचित आयटी मध्ये नसताच. तो कदाचित एखादा खेळाडु असता किंवा इतिहासतज्ञ वगैरे.. भारतात ह्या दोन्ही क्षेत्रात आपण पोटापाण्यासाठी काही करु शकतो असं आम जनतेला वाटत नाही. मला अजुनही वाटत नाही. ह्यावरुन आठवलं, माझी बहीण परदेशात शिकताना एका सहलीला गेली होती. आणि तिथे तिच्या वयाची सर्व मुलं इतक्या वेगवेगळ्या विषयात काही तरी करत होती, ज्यांचा आपण विचारही केलेला नसतो. हे २ भारतीयच होते जे इंजीनियरींग करत होते. बाकी मुलांना ते लय भारी वाटत होतं पण हे आपले दोन पंटर मात्र हेव्याने इतरांकडे बघत होते. तिला वाटतं की काय लोक एक एक भारी गोष्टी करतात आयुष्यात आणि इथे मी तिची पोस्ट ग्रॅडमध्ये शिकवण्याची आणि शिकण्याची एकंदरित पद्धत पाहुन माझी डीग्री कोणत्या चुलीत घालावी ह्याचा विचार करतेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
ध
धर्मराजमुटके गुरुवार, 02/16/2017 - 09:02 नवीन
उदाहरणार्थ सांगू तर माझी बहीण जेंव्हा भारतातल्या शाळेत सहावीपर्यंत शिकून पुढे लंडनच्या शाळेत गेली तेंव्हा इतिहासाच्या तासाला तिला विचारण्यात आलं, की शिवाजी महाराजांच्या कुठल्या गोष्टी तुला चुकीच्या वाटतात?
असे विचारणार्‍या शिक्षकाला माझा साष्टांग प्रणिपात ! १२-१३ वर्षाच्या बालकांना शिवाजी महाराज कळणे आणि त्यात चुका काढणे म्हणजे अतिच सुधारलेपणाचे लक्षण मानावे लागेल. असो ! यावर इथे चर्चा नको.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट गुरुवार, 02/16/2017 - 09:07 नवीन
इयत्ता चौथी ९ वर्षाच्या मुलाला अफजलखानाचा वध, कोथळा काढणे इत्यादी शिकवण्यावर काय मत आपलं? सहज विचारलं. स्वतंत्र विचार करायला शिकवण्याचं उदाहरण सांगितलं, त्याव तुम्ही तुमचा स्वतंत्र विचार मांडलात म्हणून फक्त.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
ध
धर्मराजमुटके गुरुवार, 02/16/2017 - 09:14 नवीन
वेगळा धागा काढावा. पिराताईंची चिंता वेगळी आहे. त्यामुळे या धाग्याचा काश्मिर होऊ नये अशी इच्छा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
व
वेल्लाभट गुरुवार, 02/16/2017 - 09:53 नवीन
तुमच्याकडे भक्कम मुद्दे असतील तर नक्की काढा नवीन धागा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
म
मराठी_माणूस गुरुवार, 02/16/2017 - 09:54 नवीन
पण २ महिन्यासाठी आलो ते गेले २ वर्ष झाले इथेच आहोत. पुढचं काही नक्की नाही. आम्ही स्वतःहुन काही प्रयत्नही करत नाही आहोत.
असेच २/३ महीन्यासाठी , भारतात बंगळुर, चेन्नाई , दिल्ली , कलकत्ता कींवा इतर ठीकाणी कामासाठी जावे लागले असते आणि मुक्काम वाढला असता, तर परत पुण्यात यायचे का नाही हा प्रश्न पडला असता का ?
  • Log in or register to post comments
प
पद्मावति गुरुवार, 02/16/2017 - 10:01 नवीन
पिरा, भारत किंवा परदेश कुठे राहायचे याविषयी नाही पण मुलांच्या बाबतीत मी थोडे सांगू शकीन. सुरुवातीला आपल्याला वाटतं की इथे राहून आपली मुले आपल्या देशाला, संस्कृतीला विसरतील का, त्यांना नातेवाईकांची ओढ राहील का. पण अनेक वर्षांच्या अनुभवावरून मी सांगू शकते की असे नाही होत. मी माझ्या नातेवाईकांच्या, मित्र मैत्रिणीच्या आणि माझ्या मुलांवरून सांगते की या मुलांना भारताची, आजी आजोबांची मनापासून ओढ असते. आपल्या रूट्स विषयी, संस्कृतीविषयी आत्मियता असते. माझ्या पाहण्यात आलेली ही मुले ही वय वर्षे पन्नास पासून दोन वर्षे या रेंज मधली आहेत. सर्व जण आपापल्या आई वडिलांशी, नातेवाईकांशी अगदी प्रेमाने राहणारी, त्यांची काळजी घेणारी आहेत. परदेशात राहून अगदी फरक पडत नाही का? तर पडतो. येस. म्हणजे जन मन गण ऐकतांना आजही माझ्या डोळ्यात पाणी येतं ते माझ्या मुलींच्या डोळ्यात नाही येणार. पु. ल देशपांड्यांची पुस्तके ही मुले नाही वाचणार कदाचीत, अमेरिकन आक्सेंट मधे मराठी बोलतील पण मुळं घट्ट असतात त्यांची. आपल्याला भलेही बोलून नाही दाखवीणार पण स्वत:च्या परदेशी मित्र मंडळींसमोर आपल्या नातेवाईकांविषयी, भारताविषयी भरभरून बोलतील. यासाठी मात्र आई वडील म्हणून आपल्याला जरा एक्सट्रा माईल जावं लागतं. भारतात राहून जितकं आपण करणार नाही तितके सणवार इथे साजरे करायचे, भारतात जितके जमेल तितके जाणे आणि मुलांच्या आजी आजोबांना इथे आपल्याकडे आणणे. शक्य तितके भारतीय, मराठी मंडळात आक्टिव असणे इत्यादी. आपल्याला आणि मुलांना थोडं बोर झाले तरी चालेल पण निदान महिन्यातुन एकदा तरी जवळ पासच्या मंदिरांमधे जाणे, तिथल्या आक्टिविटीस मधे मुलांना भाग घ्यायला लावणे आणि हिंदी मराठी मालीका मुलान्सोबत पाहणे. हे जरा फनी वाटेल पण मुलांना टीवी बघायला फोर्स करणारी मी एकमेव आई असेन कदाचित :) जोक्स अपार्ट पण उंच माझा झोका, महाभारत, तारक मेहता, आता बाजीराव पेशवा या मालीका बघून सुद्धा मुलांना आपल्या देशाशी रीलेट करायला मदत होते. इट वर्क्स. बेसिकली मला हे सांगायचे आहे की भारतात जायचे का परदेशात राहायचे हा निर्णय घेण्यामागे अनेक कारणे असतात प्रत्येकाची. पण मुलाविषयी काळजी करू नकोस. ही विल बी फाइन. भारतात काय आणि परदेशात काय मुलं शेवटी आपल्या सारखीच होतात. ती म्हण आहे नं वळचणीचे पाणी ( का अळवा वरचे पाणी?) वळणावरच जाणार, तसंच.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. गुरुवार, 02/16/2017 - 10:26 नवीन
ती म्हण आहे नं वळचणीचे पाणी ( का अळवा वरचे पाणी?) वळणावरच जाणार, तसंच.
\ हाच फरक पडतो. ;) सगळे वरवरचे होते. अर्थात चूक देशाची अथवा वास्तव्याची नाही. काळ न फॅशनच तशी आहे. . येनीवे, टेक लाईट पद्माक्का. अळवावरचे अन वळचणीचे पाणी वेगवेगळे असते. अर्थही खूप वेगळावेगळा आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति
प
पद्मावति गुरुवार, 02/16/2017 - 11:15 नवीन
येनीवे, टेक लाईट पद्माक्का. अळवावरचे अन वळचणीचे पाणी वेगवेगळे असते. अर्थही खूप वेगळावेगळा आहे. ;) ऊप्स..=)) म्हणींमधे मी नेहमी कन्फ्यूज़्ड असते :) आक्च्युयली मला हे म्हणायचे आहे की आपण जसं वागतो, विचार करतो ते मुलं त्यांच्या आणि आपल्या कळत नकळत स्प्न्ज सारखी अब्ज़ॉर्ब करत असतात. आपले संस्कार, विचार सरणी त्यांच्यामधेही येतेच खूप प्रमाणात. आई वडिलांची भारताशी असलेली ओढ मुलं सुद्धा बर्‍याच प्रमाणात उचलतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा