महापालिका, जिल्हा परीषद निवडणूक निकाल
महापालिका व जिल्हा परीषद निवडणूक निकालांसाठी धागा.
http://www.loksatta.com/bmc-elections-2017/bmc-election-2017-exit-polls-results-pmc-elections-2017-exit-polls-results-thane-municipal-corporation-election-bjp-shivsena-congress-ncp-1415185/
इंडिया टुडे आणि अॅक्सिसने केलेल्या एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना सर्वांत मोठा पक्ष ठरण्याची शक्यता असून, भाजपच्या जागांमध्येही लक्षणीय वाढ होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. इंडिया टुडे आणि अॅक्सिसने केलेल्या एक्झिट पोलनुसार, शिवसेनेला मुंबईत ८६ ते ९२ जागा मिळण्याची शक्यता आहे. त्या खालोखाल भाजपला ८० ते ८८ जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. २०१२ मधील निकालांचा विचार केल्यास भाजपच्या जागांमध्ये लक्षणीय वाढ होण्याचा अंदाज या एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे. काँग्रेसमधील अंतर्गत नाराजीचा परिणाम एक्झिट पोलमध्येही दिसून येतो आहे. काँग्रेसला ३० ते ३४ जागांवर तर राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ ३ ते ६ जागांवरच यश मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. भाजप व शिवसेना या दोघांनाही ३२% मते मिळतील असा अंदाज आहे.
पुणे महापालिकेत सत्तांतर होण्याचा अंदाज एक्झिट पोलने वर्तविला आहे. पुण्यात गेल्या १० वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेवर आहे. पण या निवडणुकीत भाजपला पुण्यात स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज एक्झिट पोलने वर्तविला आहे. एकूण १६२ जागांपैकी ७७ ते ८५ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसला ६० ते ६६ जागा मिळण्याची शक्यता आहे.
ठाण्यामध्ये शिवसेना सत्ता राखण्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे. या महापालिकेत विशेष म्हणजे भाजप तिसऱ्या क्रमांकावर घसरण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस २९ ते ३४ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
नागपूर महापालिकेत भाजपच पुन्हा सत्तेवर येण्याचा अंदाज वर्तविण्यात आला असून, भाजपला ९१ ते १०० जागा मिळण्याची शक्यता आहे. या महापालिकेत एकूण १५१ जागा आहेत.
मुंबई -
शिवसेना – ८६ ते ९२
भाजप – ८० ते ८८
काँग्रेस – ३० ते ३४
मनसे – ५ ते ७
राष्ट्रवादी – ३ ते ६
पुणे -
भाजप – ७७ ते ८५
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस – ६० ते ६६
शिवसेना – १० ते १३
ठाणे -
शिवसेना – ६२ ते ७०
राष्ट्रवादी काँग्रेस – २९ ते ३४
भाजप – २६ ते ३३
नागपूर -
भाजप – ९१ ते ११०
काँग्रेस – ३५ ते ४१
शिवसेना – २ ते ४
_________________________
एबीपी माझा च्या अंदाजानुसार पिंचि मध्ये राष्ट्रवादी, नाशिकमध्ये सेना आणि अकोला, अमरावती व सोलापूर मध्ये भाजप प्रथम क्रमांकावर असेल.
_________________
दिल्ली व बिहार च्या कटु अनुभवापासून मी कोणत्याही सर्वेक्षणावर विश्वास ठेवणे बंद केले आहे.
💬 प्रतिसाद
(296)
अ
अभ्या..
गुरुवार, 02/23/2017 - 08:41
नवीन
येस्स्स्स.
प्रचंड आनंद झालाय. भाजपाच्या जवळपासच सेनेलाही जागा देऊन युतीची अपरिहार्यता दोन्ही पक्षांना लोकांनी जाणवून दिलीय.
जास्त आनंद सुकुची एकाधिकारशाही अन सोलापूरकरांना गृहीत धरण्याची पध्दत संपल्याचा आहे.
.
सर्वाधिक आनंद मी अॅड आणि कॅम्पेनिंग डिझाईन केलेल्या पॅनेलला कम्प्लीट विजय मिळाल्याचा आहे. टोट्टल सगळे आले.
.
अजून एक चिल्लर आनंद आहे. सेनेच्या पराभवासाठी देव पाण्यात घालून बसलेल्यांचे थोबाड फुटल्याचा. बेटर लक नेक्श्ट टैम. ;)
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
गुरुवार, 02/23/2017 - 08:32
नवीन
कॉन्ग्रेस व राष्ट्रवादी कॉन्ग्रेस शहरी भागातून हळू हळू हद्दपार होतेय काय असा सूर हापिसकर्यांच्या बोलण्यात आहे.
नाशिककर आहेत का कुणी? मनसेने प्रेजेन्टेशनमध्ये दाखवल्याप्रमाणे खरोखर कामे केली होती का? असतील तर, मनसेचा दारूण पराभव दु:खद आहे.
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 02/23/2017 - 08:40
नवीन
राजवर लोकांनी जो विश्वास दाखवला होता त्यात तो खरेच खरा उतरला नाही. अगदी पुण्यात सुधा मनसेने काही प्रभाव पाडला नाही २८ नगर सेवक असून. मगच्या वेळेला उत्साहाने मनसे ला मत दिले होते. पण नाणे खोटेच निघाले. आमच्या प्रभागात नगरसेवक मनसेचा पण कामे शेजारच्या वोर्डातला शिवसेनेचा नगरसेवक करायचा.
- Log in or register to post comments
प
प्रसन्न३००१
गुरुवार, 02/23/2017 - 08:36
नवीन
दादर मधून माजी महापौर विशाखा राऊत विजयी
- Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद
गुरुवार, 02/23/2017 - 09:03
नवीन
शिवसेनेचा बालेकिल्ला मुलुंडमध्ये शिवसेनेला मोठा धक्का! ६ पैकी ६ जागा भाजपला - नील सोमय्यासह!
- Log in or register to post comments
व
वरुण मोहिते
गुरुवार, 02/23/2017 - 09:28
नवीन
आणि इस्ट ला २ पैकी सेने नंतर १ मनसे कडे .ह्या वेळी ईस्ट मध्ये मुलुंड मध्ये भाजप अली याच आश्चर्य आहे पण एक नगरसेवक जे १५ वर्ष सेनेचे होते ते भाजप कडे गेले त्यामुळे फायदा झाला . बाकी मुलुंड मध्ये सर्वपक्षीय समभाव आहे .तरी मुलुंड पूर्वेकडील जागा जाणे धक्कादायक आहे . त्याची कारणं वेगळी आहेत .
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
गुरुवार, 02/23/2017 - 09:13
नवीन
आताचे आकडे:

- Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२
गुरुवार, 02/23/2017 - 09:24
नवीन
आता मुंबईत भाजपा - ७३ व शिवसेना - ९२ असे आकडे दाखवत आहेत.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
गुरुवार, 02/23/2017 - 09:25
नवीन
मुंबईत मतमोजणी सुरू होऊन आता जवळपास ६ तास पूर्ण होत आले तरी २२७ पैकी २०० जागांवरीलच कल उपलब्ध आहेत. उरलेले कल यायला इतका वेळ का लागत आहे हे समजत नाही.
मुंबईत शिवसेनेला मात द्यायला भाजपला अपयश आले आहे. गेल्या अनेक मनपा निवडणुकांमध्ये पहिल्यांदाच शिवसेनेने जास्त जागा मिळवल्या आहेत. ठाण्याचा गडही शिवसेनेने राखला आहे.
इतर शहरांमध्ये मात्र भाजपने चांगली कामगिरी केली आहे. विदर्भात तीनही मनपा भाजप जिंकत आहे. नागपूरमध्ये तर स्वीपच आहे. अमरावतीमध्येही अर्ध्यापेक्षा जास्त आणि अकोल्यामध्ये अर्ध्यापेक्षा थोड्याच कमी जागांवर भाजपची आघाडी आहे. पिंपवडमध्ये पहिल्या क्रमांकासाठी भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये चुरस आहे. नाशिकमध्ये भाजपने अर्ध्यापेक्षा थोड्या जास्त जागांवर भाजप पुढे आहे. तर पुण्यात आणि उल्हासनगरमध्ये अर्ध्यापेक्षा थोड्याच कमी जागांवर भाजप पुढे आहे. सोलापूरमध्ये सुशीलकुमार शिंदे या काँग्रेसच्या दिग्गजाचा गड ढासळताना दिसत आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मात्र मोठा धक्का बसला आहे. त्यातल्या त्यात राष्ट्रवादीने पिंपवडमध्ये चांगली कामगिरी केली आहे. भाजपने मुंबईत मागच्यावेळेपेक्षा दुप्पट जागा मिळवल्या असल्या तरी विजय मात्र मिळू शकलेला नाही.
विधानसभा आणि आताच्या महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने एक गोष्ट नक्कीच जाणवते. युती तुटणे हे विशेषतः शिवसेनेला थोडे अधिक प्रगल्भतेने घेता आले असते. ठिक आहे युती होत नाही ना, आम्ही स्वतंत्र लढतो. ज्याला जास्त जागा मिळतील त्याचा मुख्यमंत्री (किंवा महापौर) असे म्हणत एकमेकांवर टिका करण्यापेक्षा कॉंग्रेस-राष्ट्रवादीवर हल्ला चढविला असता तर आताची कटूता आली नसती. काचेला तडा गेला आहे आता परत तो सांधला जाणे फारच कठिण.
- Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२
गुरुवार, 02/23/2017 - 11:32
नवीन
'स्वबळावर सत्ता स्थापन करु' अश्या बाता मारणार्या किंव्हा दैनिक सामना मधून 'जिंकणार तर आम्हीच!' असे बिनबुडाचे लेख लिहिणार्या उद्वव ठाकरेंना साधी तिहेरी संख्या देखिल गाठता आली नाही शिवाय शिवसेनेला मिळालेल्या जागा (८८) आणि भाजपा ला मिळालेल्या जागा (८०) या दोन्ही मध्ये फार काही फरक नाही, तेंव्हा शिवसेनेने युती तोडून स्वतंत्र लढण्याचा घेतलेला त्यांचा निर्णय भाजपाच्या अगदिच पथ्यावर पडला आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेला स्वत:ची निदान लायकी तरी कळली. आता कुणाचा तरी पाठींबा घेतल्याशिवाय शिवसेनेला मुंमपा सत्ता स्थापन करताच येणार नाही, फक्त पुन्हा युती करायच्या निर्णयासाठी भाजपाने सेने समोर हात पूढे करु नये म्हणजे झाले.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
गुरुवार, 02/23/2017 - 12:31
नवीन
आता तर ८४ आणि ८१ इतकाच फरक राहिला आहे. भाजपला ६० पेक्षा कमी जागा द्यायला निघाले होते हे. इतकी वर्षे युती असताना नेमका हाच प्रकार शिवसेनेने केलेला होता.
अन्य एका चर्चेत म्हटल्याप्रमाणे महापालिका निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांचे जाळे आणि लोकसंग्रह जास्त उपयोगी पडतो आणि या दोन गोष्टींमध्ये शिवसेना इतर सर्व पक्षांपेक्षा कितीतरी पुढे आहे हे मुंबईतील कोणीही सांगू शकेल. शिवसेना सर्वात मोठा पक्ष बनणार हे अपेक्षितच होते. पण फरक इतका कमी असेल असे वाटले नव्हते. वरच पोस्ट केलेल्या चित्रांमध्ये दोन पक्षांमधला फरक ३० पेक्षा जास्त होता. आणि शेवटी तो फरक ३ वर आला. शिवसेना पहिल्या क्रमांकावर राहिली त्यामुळे उधोजीराव डरकाळ्या फोडतीलच पण शिवसेनेची भाजपने पुरतीच दमछाक केली हे नक्कीच.
तसेच इतर शहरांमधूनही भाजपची कामगिरी नक्कीच चांगली आहे. एकूणच भाजपसाठी हे निकाल नक्कीच उत्साहवर्धक आहेत.
- Log in or register to post comments
व
वरुण मोहिते
गुरुवार, 02/23/2017 - 12:53
नवीन
भाजप जश्या जागा मित्रपक्षांना देते तसेच आहे . सदाभाऊ खोतांचा मुलगा हरला . रिपब्लिकन कोण नाही, शेट्टी सोडून गेले . त्यामुळे भाजप सोबत अशीच वागणूक हवी. बाकी इतर शहरात अर्धे तर बाकीच्या पक्षातून आणि बाकी यश केंद्रात आणि राज्यात सत्तेत म्हणून त्यात नवीन काय . त्यात प्रचंड फायदा म्हणजे प्रस्थापित विरोधी राजकारण लाट .काँग्रेस ची मत मिळाली मुंबईत कित्येक ठिकाणी . बाकी २०-३० वर्ष सत्तेत असलं कि जागांचा कमी अधिक फरक पडतोच . पण भाजप च्या बाता ऐकून आज १ जागा जरी कमी मिळाली असती भाजप ला तरी मी आनंद साजरा करणार होतो . वाईन प्यावी म्हणतो:))
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Fri, 02/24/2017 - 11:04
नवीन
मुंबईतच नव्हे तर पुण्यातही शिवसेनेचा बालेकील्ला असलेल्या कोथरुड गावठाणात गेली २५ वर्षे अधिराज्य गाजवलेल्या व चांगल्या कामांमुळे लोकांच्या मनात आदराचे स्थान असलेल्या शशिकांत सुतार यांच्या पुत्राची (पृथ्वीराज उर्फ दादा) भाजपच्या नवख्या उमेदवाराने पुरती दम्छाक केली. अॅड मिहीर (मनोज) प्रभुदेसाई हा राजकारणाची कुठलीही पार्श्वभूमी नसलेला संघाचा कोथरुड भागातला स्वयंसेवक सुतांरांविरुद्ध उभा राहीला. सुतारांना ८००० मताधिक्य अपेक्शित होते तिथे मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून मनोज मागे पडलेला असूनही फरक काही केल्या २-३०० मतांपेक्षा वाढेना. दादा टेन्शन मधे आले पण अखेर ६०० मतांनी निवडून आले. त्या प्रभागात उर्वरीत सर्व जागा भाजपला मिळाल्या. सेनेचे खंदे कार्यकर्ते असलेले नवनाथ जाधव यांच्या सौ सेनेने तिकीट कापल्याने उमेदवाराच्या शोधात असलेल्या भाजपकडे आल्या आणि तिकीट मिळाले. केवळ आणि केवळ भाजपची हवा असल्याने सेनेचा म्हणून परिचित असला तरीही आपलाच आहे म्हणून नवनाथच्या सौं ना लोकांनी मत दिले
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
गुरुवार, 02/23/2017 - 11:42
नवीन
इतर शहरांमध्ये मात्र भाजपने चांगली कामगिरी केली आहे.
ट्रुमन साहेब, मी मिपावरच एका चर्चेत म्हटले होते की अनेक पक्षांमधले अनेक लोक सध्या भाजपमध्ये जात आहेत. निवडून आल्यावर मात्र भाजपची टक्केवारी कशी वाढली ह्यावर भाजप-समर्थकांचा सगळा जोर असेल.. आपले वरिल वाक्य माझ्या म्हणण्याला दुजोराच देत आहे.
सद्यस्थितीत कोणता पक्ष निवडून आला हे तांत्रिकदॄष्ट्या बघितले तर ओके .. पण पक्षांची लेबलं लावलेली माणसं बघून निष्कर्ष काढणे महत्त्वाचे. जे कोणी भाजप्च्या बॅनर खाली जिंकले त्याम्ची पूर्वजन्माची कुंडली काढणे आवश्यक आहे..
- Log in or register to post comments
च
चिनार
गुरुवार, 02/23/2017 - 12:52
नवीन
संदीप भाऊ...
राजकारणाविषयी तुमच्या आणि ट्रुमन साहेबांइतका माझा अभ्यास नाही. पण "मासे गळाला लावणे" हा राजकारणाचाच एक भाग नाहीये का? भाजप ने साठ-सत्तर टक्के उमेदवार बाहेरून आयात केले असतील असं समजू पण त्यांचा ओरिजिनल पक्ष त्यांना थांबवू शकला नाही हे अपयश कोणाचे? उदाहरणार्थ :- नाशिकात माणसे ने उत्तम काम केले असं सगळे म्हणतात. मग राज ठाकरे आपल्या लोकांना सोबत घेऊन का राहू शकले नाही ? त्याचा फायदा जर भाजप ने घेतला तर राजकीय आणि संवैधानिक दृष्ट्या त्यात गैर काय ? भाजपचा हा विजय राजकीय पातळीवर आहे असे जेंव्हा आपण म्हणतो त्यावेळेस त्यात राजकारण हा भाग येतोच. राजकारणात कोणी कोणाचे नाही (जनतेचे तर मुळीच नाही !) हे वाक्य निरंतन सत्य आहे.
आता भाजप/काँग्रेस/शिवसेना/राष्ट्रवादी आणि इतर सगळेच, ह्यांच्या नीतिमूल्यांवर चर्चा होऊ शकते. पण आजचा विजय हा भाजपच्या राजकारणाचा आणि त्यातील डावपेचांचा आहे हे तर मान्य करावेच लागेल.
- Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर
गुरुवार, 02/23/2017 - 13:10
नवीन
डांगे साहेब, भाजपच्या धोरणांना विरोध समजू शकतो.
भाजप जिंकले हे दिलदार पणे मान्य करायलापेवढी अडचण का होते.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
गुरुवार, 02/23/2017 - 13:32
नवीन
चिनार, आप्पा, तुमच्या दोघांच्याही प्रतिसादाला थोड्या वेळाने उत्तर देतो... माझ्याकडे आत्ता पूर्ण आकडेवारी आणि नावे आलेली नाहीत.
तूर्तास, जर उद्या सगळे काँग्रेसी अगदी सोन्या-राहूल-सकट भाजपात दाखल झाले आणि शहा-मोदी जोडीला हाकलून (जसे आडवाणी-जोशींना हाकलले) स्वतःचे बस्तान बसवले (अर्थातच कायदेशीर, घटनात्मक राजकारणाचा वापर करुन) तर तेव्हा आपले विचार याबद्दल काय असतील?
- Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर
गुरुवार, 02/23/2017 - 13:49
नवीन
जर तरचे माहीत नाही. तूर्तास फडणवीस जिंकले बाकी सगळे हरले हे मान्य नसेल तर काय बोलायचे.
नावडतीचे मीठ सुद्धा अळणीच असते ना.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
गुरुवार, 02/23/2017 - 13:58
नवीन
जर तर चा विषय नाहीच, तुम्हाला ब्रॉड व्ह्यू मध्ये उदाहरण दिले... नावे आल्यावर माइक्रो लेवल ला खरोखर चे देतो.
लेबल बदलून फसवले तरी कोणाला आनंद मिळत असेल तर असो बापडा...
कोणाला कशात आनंद मिळेल आपण कोण ठरवणार...
- Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर
Fri, 02/24/2017 - 06:39
नवीन
नावे आल्यावर माइक्रो लेवल ला खरोखर चे देतो.
नावे देऊन काय होणार ? या निवडणुकीचे पडसाद मायक्रो लेव्हल ला उमटणार नव्हतेच. कोण नगरसेवक निवडून आला हे तितके महत्वाचे नाही. सगळ्याच पक्षांचे नगरसेवक गणंगच आहेत.
या निवडणुकीचे पडसादच अधिक महत्वाचे आहेत.
काहीसे 'वॉर इज लॉस्ट ऑर वन बाय जनरल्स नॉत बाय सोल्जर्स' तसे.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
गुरुवार, 02/23/2017 - 16:17
नवीन
हो बरोबर आहे. भाजपने इतर अनेक पक्षातले लोक घेतले आहेत. नुसते इतर पक्षांमधले लोक घरी घेतले यापेक्षा अनेक अट्टल गुंडांना पक्षात घेतले आहे हे नक्कीच समर्थनीय नाही. नुसते इतर पक्षांमधल्यांना घेणे चूक नाही (जसे आसाममध्ये सरबानंद सोनोवाल या चांगल्या माणसाला आसाम गण परिषदेतून भाजपमध्ये घेतले) पण गुंडांना घेणे नक्कीच समर्थनीय नाही.
काही प्रमाणावर लोकांनी भाजप या पक्षाच्या नावावर या लोकांचा पुर्वेतिहास लक्षात न घेता मते दिलेली दिसत आहेत. हा खेळ फार काळ चालणार नाही. जर भाजपने असेच उद्योग चालू ठेवले आणि लोकांनी दाखविलेल्या विश्वासाला तडा दिला तर भविष्यात कधीनाकधी या प्रकाराची फळे भोगावी लागतीलच.
- Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे
Fri, 02/24/2017 - 05:52
नवीन
आसामध्येच हिमंत बिस्व सर्मा या उत्तम प्रतिमेच्या काँग्रेसच्या नेत्याला आयात केलं गेल्यावर्षी. राहुल गांधींच्या लहरी कारभाराला कंटाळून आलो भाजपात असं स्पष्ट म्हणालेले ते.
- Log in or register to post comments
व
वरुण मोहिते
गुरुवार, 02/23/2017 - 11:52
नवीन
सेनेला संपवून टाकू हि भाषा करून आज भाजप हरली.कितीही आकडेवारी कोणी सांगितली तरी भाजप हरली. ज्यासाठी काम सोडून मुख्यमंत्र्यांनी केला अट्टाहास ती भाजप हरली . मोदींना आणा तरी आम्ही जिंकू हे बोलणारी शिवसेना जिंकली .वास्तविक आपण मिसळपाव वरती उत्कुष्ट प्रतिसादांना मुकलो आहेत. जर भाजप जिंकली असती तर ते प्रतिसाद वाचायला मिळाले असते . पण असो बाकी जो सत्तेत त्याच्या जागा जास्त हा नियम आहेच महाराष्ट्रात . टाइम टाइम कि बाते है .१९५२ पासून सुरुवात झालेल्या पक्षाने आजपर्यंत कुठलीही सत्ता सलग चालवली नाही यातच सर्व काही आले .बाकी जिंकत तर काँग्रेस पण आलीये आणि महाराष्ट्रात तर राष्ट्रवादी पण .सेना संपणार हि इच्छा असणाऱ्यांना शुभेच्छा .
जात जाता -२०-३० वर्ष सत्ता सर्वपक्षीय विरोधक असताना राखणे आणि एकदाच लाट आली ५ वर्ष म्हणून जागा वाढणे यात फरक आहे बरं का ..
- Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर
गुरुवार, 02/23/2017 - 13:08
नवीन
भाजप ३५ वरुन ८१ वर गेले.
आणि सेना ७५ वरुन ८४ वर.
म्हणजे युती करावीच लागणार ना भाजप शी.
आता काय करायचे बुवा ?
पंकजाताई, खडसे, विनोद तावडे आणि दस्तुरखुद्द उधोजी राजे सगळ्यांचे दात घशात गेले.
- Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर
गुरुवार, 02/23/2017 - 13:12
नवीन
जर मुंबईत सत्ता नसेल तर उधोजी राजे पण वांद्रे लोकलला दिसतील सकाळी बॅग अडकवून बहुधा.
- Log in or register to post comments
व
वरुण मोहिते
गुरुवार, 02/23/2017 - 13:30
नवीन
ते थोडी मोदी आहेत घेतली झोळी चाललो मी , मी तर फकीर आहे असे बोलायला .
- Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर
गुरुवार, 02/23/2017 - 13:47
नवीन
हो . मोदींकडे खंडनीचे पैसे नाहीत हे बाकी खरच आहे.
- Log in or register to post comments
व
वरुण मोहिते
गुरुवार, 02/23/2017 - 13:51
नवीन
भावासारखे गौतम आणि मुकेश असताना कशाला लागतील अतिरिक्त पैसे
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Fri, 02/24/2017 - 11:08
नवीन
आणि भरलेली तळघरेही नाहीत. :)
बाकी नोटबंदीविरुध्द उडवलेली राळ उपयोगी पडली नाही म्हणायची सेनेच्या.
- Log in or register to post comments
ख
खेडूत
गुरुवार, 02/23/2017 - 12:12
नवीन
७२/९४ अश्या फरकाने दोन तास राहिल्यावर ८१/८४ असा कमी फरक राहिला आहे. त्यामुळे मोठा भाऊ असलेला शिवसेना आता जुळा भाऊ झाला आहे! :))
- Log in or register to post comments
न
निष्पक्ष सदस्य
गुरुवार, 02/23/2017 - 12:16
नवीन
ब्रेकिंग न्यूज - आशीष नेहरा २ दातांनी पुढे ....
- Log in or register to post comments
स
सुखीमाणूस
गुरुवार, 02/23/2017 - 13:49
नवीन
मस्त
- Log in or register to post comments
स
सुमीत भातखंडे
गुरुवार, 02/23/2017 - 12:18
नवीन
ही सध्याची टॅली आहे मुंबईत.
- Log in or register to post comments
न
निष्पक्ष सदस्य
गुरुवार, 02/23/2017 - 12:18
नवीन
ब्रेकिंग न्यूज - आशीष नेहरा २ दातांनी पुढे ....
- Log in or register to post comments
A
amit_m
गुरुवार, 02/23/2017 - 12:52
नवीन
भाजप आल्यामुळे..काही लोकांना प्रचंड पोटदुखी चालू झालीये.
असो!!
- Log in or register to post comments
न
निष्पक्ष सदस्य
गुरुवार, 02/23/2017 - 12:53
नवीन
- Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२
गुरुवार, 02/23/2017 - 13:36
नवीन
आता चार अपक्षांनी भाजपाला पाठींबा दिलाय, असे शेलार पत्रकार परिषदेत सांगत आहेत. म्हणजे भाजपाचे ८१ व चार अपक्ष मिळून भाजपा मुंबईत सर्वात मोठा पक्ष झाला आहे. आता मनसे बरोबर आल्यास भाजपा मुंबई महानगर पालिकेत सत्तेवर येऊ शकते कारण या आधीच कॉंग्रेज , राष्ट्रवादी कॉंग्रेज , सपा, व एम आय एम यांनी तटस्थ राहण्याची घोषणा केली आहे त्यामुळे बहुमताचा आकडा आता ९० वर आला आहे.
प्रचंड घमेंडीत उदोजी ठाकरेंनी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 'युती'ची ऑफर नाकारुन स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेतला हे आता सिद्ध झाले.
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
गुरुवार, 02/23/2017 - 14:48
नवीन
एक शैली/इमेज म्हणुन रोकठोकपणा ठीक आहे. बाळासाहेबांनंतर उद्धव साहेबांनी सेना व्यवस्थीत सांभाळली हे हे खरे. पण सेना आपल्या कोषात इतकी का गुरफटली आहे कळत नाहि. इतर पक्षांचे, विशेषतः भाजपाचे दिग्गज बाळासाहेबांपुढे नतमस्तक व्हायचे तेंव्हा त्यांनी आपल्यापुढेही मान तुकवावी हा अट्टहास का बरं. किंबहुना उधोजींनीच इतरांचे जेष्ठत्व मान्य केले असते तर राज्यात सेनेची बीग ब्रदर पोझीशन अबाधीत राहिली असती. पक्षहितापेक्षा स्वप्रतीमेला प्राधान्य दिलं कि तोटा होतोच. स्वतः उधोजी कमी म्हणुन कि काय, ते संजय राऊत वगैरे महाभाग आणखी घोळ घालतात. एव्हान स्वतःच्या सो कॉल्ड आंदोलन छबीतुन बाहेर पडुन एक पक्ष म्हणुन पोक्तपणा अंगी बाणायला हव होता सेनेच्या. तसंही आंदोलकाची इमेज सांभाळणं कठीण आहे. आंदोलनाचे ज्वलंत मुद्दे बदलत असतात. सेना तर आपल्याच सुखात मग्न आहे.
असं म्हणतात कि हि भाजप-सेनेची डमी फाईट होती. काँग्रेस-रा.काँ. ला संधीच मिळु नये म्हणुन भाजप-सेनेनी आपल्यातच संपूर्ण राजकीय अवकाष वाटुन घेतलं. पण तसं असेल तर सेना एक-एक करुन परतीचे दोर कापत चालली आहे. भरती-ओहोटीच्या खेळात असलं काहि महागात पडु शकतं.
- Log in or register to post comments
त
तिमा
गुरुवार, 02/23/2017 - 14:56
नवीन
लेटेस्ट स्कोअर ८४:८२.
आता परत युती कराल तर याद राखा.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
गुरुवार, 02/23/2017 - 15:59
नवीन
महापालिका निवडणुकांचे निकाल---

- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
गुरुवार, 02/23/2017 - 16:08
नवीन
एकूणच शिवसेनेच्या समर्थकांची गंमत वाटत आहे. सुरवातीला म्हणायचे की मुंबई-पुण्यातील आयाम वापरून 'मोदीभक्त' शिवसेनेची नक्की ताकद किती हे अंडरएस्टिमेट करत आहेत. वर दिलेल्या तक्त्यातून कळतच आहे की शिवसेनेला निर्भेळ यश केवळ ठाण्यात मिळाले आहे. तर मुंबईत शिवसेनेला भाजपपेक्षा केवळ २ जागा जास्त आहेत. पण इतर सगळ्या शहरांमध्ये मात्र शिवसेनेला भाजपपेक्षा कितीतरी जागा कमी आहेत.म्हणजे महाराष्ट्र म्हणजे केवळ मुंबई-पुणे नाही हे म्हणणारे शिवसेना समर्थक आता मुंबईतल्याच (पुण्यातल्याही नाही) मिळालेल्या केवळ दोन जागा जास्त या आधारावर मोठे सेलिब्रेशन करत आहेत.
- Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद
गुरुवार, 02/23/2017 - 16:59
नवीन
भाजपला बाहेर ठेवून सत्ता स्थापण्यात शिवसेना यशस्वी झाली तर कदाचित सेलिब्रेशन जास्त मोठे होईल असे दिसते.
बाकी शिवसेना भाजपमधील वादाची ठिणगी हि फक्त मुंबईकारातच होती हे उघड आहे.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 02/23/2017 - 16:18
नवीन
सकाळी लवकर घरातून बाहेर पडून भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना बघण्यासाठी गहुंजेला गेलो होतो. दिवसभर सामना बघून ६ नंतर घरी परत आलो. त्यामुळे इथे लिहायला वेळ झाला नाही.
(१) सर्वप्रथम मी या धाग्यात माझे जे अंदाज दिले होते त्याबद्दल लिहितो.
भाजप ८२, शिवसेना ८४ व काँग्रेस ३१ अशी स्थिती आहे. भाजपबाबतीत जागांचा अंदाज अचूक ठरला. शिवसेना व काँग्रेसच्या बाबतीत अंदाज पूर्ण चुकला. काँगेसची कामगिरी अपेक्षेच्या तुलनेत फारच खालावली. गुरूदास कामत व संजय निरूपम यांच्यातील प्रखर मतभेदांचा जोरदार फटका काँगेसला बसला.
ठाण्यात शिवसेनेने ५०% जागा मिळवून स्पष्ट बहुमत मिळविले आहे. राष्ट्रवादी खूप खाली दुसर्या क्रमांकावर आहे. तर भाजप त्याहून खाली तिसर्या क्रमांकावर आहे.
ठाणे महापालिका बाबतीत माझे सर्व अंदाज पूर्ण चुकले.
अपेक्षेपेक्षा खूपच जास्त जागा मिळवून भाजप प्रथम क्रमांकावर आला. त्याखालोखाल राष्ट्रवादी व नंतर काँग्रेस आहे. सर्व अंदाज बरोबर आले.
जाहीर झालेल्या ११४ जागांपैकी भाजपने ५९ म्हणजे निम्म्याहून अधिक जागा जिंकल्या आहेत. शिवसेना ३४ जागा मिळवून दुसर्या क्रमांकावर आहे. नाशिक संदर्भात अंदाज पूर्ण बरोबर आले.
पिंचिमध्ये राकाँची पाळेमुळे घट्ट गेली होती. परंतु भाजपने जवळपास निम्म्या जागा जिंकून राष्ट्रवादीला दुसर्या क्रमांकावर ढकलले आहे. माझा अंदाज पूर्ण चुकला.
अंदाज पूर्ण बरोबर आला. भाजपला घवघवीत बहुमत मिळाले आहे.
अंदाज चुकला. भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला, तर काँग्रेस व प्रकाश आंबेडकरांचा बहुजन महासंघ भाजपच्या जवळपास सुद्धा आले नाहीत.
इथेही भाजपचा प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरला.
ज्याप्रमाणे नांदेडमध्ये अशोक चव्हाण, बारामतीत पवार त्याचप्रमाणे सोलापूरमध्ये सुशीलकुमार शिंदे यांचे प्रभुत्व होते. जरी शिंदे लोकसभेला हरले तरी शहरात त्यांच्याविषयी सहानुभूती होती. काँग्रेसचा प्रभाव अजून सोलापूरमध्ये टिकून आहे या समजूतीत मी होतो. परंतु या निवडणुकीत आश्चर्यकारकरित्या भाजपने जवळपास बहुमत मिळवून काँग्रेसला दुसर्या क्रमांकावर ढकलले. इथेही माझा अंदाज चुकला.
अंदाज पूर्ण चुकला. भाजप प्रथम क्रमांकावर व शिवसेना दुसर्या क्रमांकावर आली.
(२) मुंबईत भाजप ८४ व भाजप ८२ अशी अत्यंत चुरशीची लढत झाली. स्वतंत्र लढणे हे दोघांनाही फायदेशीर ठरले. शिवसेना ७५ वरून ८४ वर आणि भाजप ३२ वरून ८२ वर पोहोचला. भाजपला एका अपक्षाने पाठिंबा जाहीर केला आहे. महापौरपदासाठी ११४ जागा हव्या आहेत. शिवसेनेला ३० तर भाजपला ३१ जागा कमी पडत आहेत. काँग्रेसला नेमक्या ३१ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे महापौर कोणाचा होणार हे काँग्रेसच्या भूमिकेवर अवलंबून राहील. भाजप किंवा शिवसेना या दोघांनाही पाठिंबा देणे काँग्रेसला महागात जाईल कारण उ. प्र. ची निवडणुक अजून संपलेली नाही. त्यामुळे काँग्रेस एकतर तटस्थ राहील किंवा स्वतःचा स्वतंत्र उमेदवार उभा करेल. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी (९), मनसे (७) व इतर (१४) यांची भूमिका निर्णायक ठरेल.
वाहत्या वार्याचा अंदाज घेऊन मनसेचे नगरसेवक स्वतःहून भाजपच्या गोटात जातील असे मला वाटते. राष्ट्रवादीचे नगरसेवक काय करतील ते सांगता येणार नाही. इतरांपैकी जास्तीत जास्त नगरसेवकांना भाजप गळाला लावण्याचा प्रयत्न करेल.
भाजपपेक्षा जास्त जागा मिळाल्याने शिवसेनेला अस्मान ठेंगणे झाले आहे. सुरवातीला शिवसेना ९३ व भाजप फक्त ५२ जागांवर पुढे असताना संजय राऊतांनी आपल्या नेहमीच्या पद्धतीने असभ्य प्रतिक्रिया देताना "आम्ही भाजप या शाहिस्तेखानाची बोटे कापली" असे तारे तोडले होते. त्यानंतर काही वेळातच चित्र पालटायले लागले व शेवटी दोघांमध्ये फक्त २ जागांचा फरक आहे. अर्थात यामुळे आपण प्रचंड बहुमताने विजय मिळविला या भ्रमात शिवसेना आहे. परंतु इतर ८ महापालिकात मिळालेल्या यशाने भाजपचा आत्मविश्वास प्रचंड वाढलेला असून ते मुंबईचे महापौरपद मिळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणार हे निश्चित. आपण स्वबळावर बहुमत मिळविणार, मतदानानंतर आपण केलेल्या खाजगी एक्झिट पोलनुसार आपल्याला ११० जागा मिळणार, मुंबईत फक्त आमचाच आवाज चालणार, मुंबई फक्त शिवसेनेची नाही कोणाच्या बापाची इ. वल्गना करणार्या शिवसेनेला फक्त ८४ जागा मिळाल्या असून भाजप फक्त २ जागांनी मागे आहे व महापौरपद मिळेल याची अजिबात खात्री नाही.
(३) १० पैकी तब्बल ८ महापालिकांमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. नाशिक, पुणे, नागपूर, अमरावती या चार महापालिकात तर भाजपला स्पष्ट बहुमत आहे. २०१२ मध्ये भाजप फक्त नागपूरमध्ये सत्तेवर होता. आता अजून ७ महापालिका ताब्यात येत आहेत व मुंबईत जवळजवळ समसमान परिस्थिती आहे.
(४) ठाण्यात मात्र शिवसेनेने निर्विवाद यश मिळविले. इथे भाजप तिसर्या क्रमांकावर फेकला गेला.
१९८० च्या दशकात भाजपबरोबर युती करण्यापूर्वी शिवसेना ठाणे व मुंबई या दोन शहरांपुरताच मर्यादित असलेला पक्ष होता. त्या काळात भाजपचे अस्तित्व फारसे नसले तरी कोकण, पुणे, मुंबई, ठाणे, मराठवाडा, विदर्भ अशा महाराष्ट्राच्या अनेक भागातून भाजपचे १-२ आमदार निवडून येत असत. १९८० मध्ये भाजपचे १२ व १९८५ मध्ये भाजपचे १६ आमदार महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून निवडून आले होते. शिवसेनेला १९६६ ते १९८० या चार विधानसभा निवडणुकीत भोपळा मिळाला होता, तर १९८५ मध्ये त्यांचा एकच आमदार मुंबईतून निवडून आला होता.
दोघांची युती झाल्यावर मुंबई-ठाण्याच्या बाहेर प्रथमच शिवसेनेची ओळख महाराष्ट्राला झाली त्यामागचे मुख्य कारण होते भाजपच्या कार्यकर्त्यांची फळी. परंतु आपणच भाजपपेक्षा सामर्थ्यवान आहोत असा शिवसेनेचा सुरवातीला दावा होता व नंतर आपण खरोखरच भाजपपेक्षा दादा आहोत अशी शिवसेनेची मनोमन (गैर)समजूत झाली. त्यातूनच त्यांचा उर्मटपणा, माज व अहंकार वाढत गेला. शेवटी २०१४ मध्ये युती तुटल्यानंतर शिवसेनेपेक्षा दुप्पट जागा स्वबळावर जिंकून कोण दादा होता व आहे हे भाजपने दाखवून दिले. या निवडणुकीतही १० पैकी ८ महापालिकात घवघवीत यश मिळवून व मुंबईत जवळपास शिवसेनेच्या बरोबरीने जागा मिळवून भाजपचे आपला जनाधार अजून वाढविला आहे, तर शिवसेनेचा महाराष्ट्रातून संकोच होणे सुरू असून शिवसेना पुन्हा एकदा १९७०, १९८० च्या दशकाप्रमाणे फक्त मुंबई-ठाणे या दोन शहरांपुरताच मर्यादित असलेला पक्ष या दिशेने घोडदौड सुरू आहे.
(५) आधी भाकित केल्याप्रमाणे मनसे हा पक्ष म्हणून संपला आहे हे पुन्हा एकदा या निवडणुकीने सिद्ध केले. २०१४ मध्ये विधानसभेत केवळ १ आमदार, नुकत्याच संपलेल्या नगरपरीषदांच्या निवडणुकीत ४७०० जागांपैकी जेमतेम ४० जागा आणि आता महापालिकेत सर्व १० महापालिका मिळून जेमतेम ३०-३५ जागा हेच दर्शवितात की मनसेचे अस्तित्व आता नगण्य आहे. अशा परिस्थितीत आता मनसेचे उरलेसुरले कार्यकर्ते व लोकप्रतिनिधी लवकरच मनसेला रामराम ठोकून दुसर्या पक्षाकडे जातील. काही जण आपल्या मूळ शिवसेनेकडे परत जातील तर बहुसंख्य जण उगवत्या सूर्याला नमस्कार या न्यायाने भाजपकडे जातील. मनसेचे एकमेव आमदार शरद सोनवणे यांनी राजीनामा दिल्याची बातमी मागील आठवड्यात एका वाहिनीने दिली होती. परंतु नंतर त्यावर बातमी आली नाही. शक्यता ही आहे की ते मनसेचा राजीनामा देऊन कदाचित भाजपच्या तिकिटावर उभे राहून निवडून येतील.
आपले बुडते जहाज ओळखून राज ठाकरेंनी उधोजींना युतीसाठी चुचकारले होते. परंतु उधोजींनी एक अत्यंत दुर्मिळ असा विचारी निर्णय घेऊन मनसेची मदत नाकारली. समजा युती झाली असती तर सेनेला मनसेला ५० जागा द्याव्या लागल्या असत्या व त्यांची संख्या ८४ पेक्षा खूप खाली आली असती.
(६) नोटाबंदीचा जनतेला प्रचंड त्रास झाला असून जनता भाजपला निवडणुकी धडा शिकवेल. विशेषतः नोटाबंदीमुळे ग्रामीण भागाला सर्वाधिक त्रास झाला असून ग्रामीण जनता आपला संताप मतपेटीतून व्यक्त करेल असे राजकीय पंडीत वाहिन्यांवर सांगत होते. परंतु काल झालेल्या २५ जिल्हा परीषदांच्या निवडणुकी देखील किमान ९ जिल्हा परीषदांमध्ये भाजप सर्वाधिक मोठा पक्ष ठरला आहे. त्यापूर्वी नगरपरीषदांच्या निवणुकीत देखील भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला होता. लोकसभा, विधानसभा व महापालिकेत देखील भाजपच प्रथम क्रमांकावर आहे. म्हणजे महाराष्ट्रात सर्वत्र भाजपच प्रथम क्रमांकावर आहे.
निव्वळ महाराष्ट्रातच नव्हे तर ओरिसातील पंचायत निवडणुकीमध्ये भाजपने २०१२ मधील फक्त ३६ जागांच्या तुलनेत २०१७ मध्ये तब्बल ३०६ जागा मिळवून दुसरा क्रमांक मिळवून आपल्या जागांमध्ये ८५०% इतकी वाढ केली. चंदिगड व फरीदाबाद मधील महापालिका निवडणुकीत देखील भाजपने मोठे बहुमत मिळविले आहे. गुजरात व राजस्थान मध्ये देखील भाजपने मोठे यश मिळविले आहे. एकंदरीत नोटाबंदीचा अजिबात वाईट परीणाम झालेला दिसत नाही. उलट भाजपची २०१४ ची लाट अजूनही बरीचशी कायम आहे असेच चित्र आहे.
(७) मुंबईत ८४ जागा मिळविल्याने शिवसेना अत्यानंदाने फुरफुरत आहे. ८ महापालिका जिंकून ठाण्यात सपशेल पराभव व मुंबईत दुसरा क्रमांक मिळाल्याने 'गड आला पण सिंह गेला' अशी भाजपची परिस्थिती झाली आहे. शिवसेनेची स्थिती याच्या बरोबर उलट म्हणजे 'सिंह वाचला पण गड गेला' अशी आहे.
आपला पाठिंबा वाढला आहे या भ्रमात राहून शिवसेनेने देवेंद्र फडणवीस सरकारचा पाठिंबा काढून घ्यावा अशी माझी इच्छा आहे. शिवसेनेने पाठिंबा काढल्यानंतर आमदार फोडाफोडीच्या भानगडीत न पडता फडणविसांनी राजीनामा देऊन मे महिन्यात मध्यावधी निवडणुक घ्यावी. त्यावेळी भाजपला स्वबळावर मोठे बहुमत मिळेल अशी माझी खात्री आहे व शिवसेनेचा अडथळा कायमस्वरूपी दूर होईल.
(८) काँग्रेस व राष्ट्रवादी सध्या तरी शहरांतून जवळपास हद्दपार झाल्यात जमा आहे. राष्ट्रवादीसुद्धा हळूहळू अस्तित्वहीन होण्याच्या मार्गावर आहे. शेवटी महाराष्ट्रात भाजप व काँग्रेस ही द्विपक्षीय रचना अस्तित्वात येईल अशी चिन्हे आहेत. हे २०१९ पर्यंत होईल का २०२४ पर्यंत होईल याचे भाकीत करणे अवघड असले तरी हे होणार हे नक्की.
- Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे
Fri, 02/24/2017 - 05:13
नवीन
गुर्जी हे निकाल सगळ्यांना माहितियेत. तुमचे अंदाज देखील वाचता येतायत. उगाच, स्वतःच प्रश्नपत्रिका काढायची, स्वतःच उत्तरं द्यायची आणि स्वतःच पेपर तपासायचा हा असला प्रकार का करताय?
- Log in or register to post comments
म
मोदक
Fri, 02/24/2017 - 06:37
नवीन
गुरूजींची उत्तरे चुकली असली तर तुम्हीही सुधारू शकता. त्यांनी प्रतिसाद देण्यावरच आक्षेप आहे का..?
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Fri, 02/24/2017 - 07:21
नवीन
अंदाज ही चुकला आणि निकालाची कळलेली माहीतीही चुकलीय.
भाजपा एक क्रमांकाला असली तरी सेना दोन नंबरला आहे.
भाजपा ४९ (२३ वाढल्या)
सेना २१ (१२ वाढल्या)
काँग्रेस १४ (२९ घटल्या)
एन्सीपी ४ (१२ घटल्या)
एमायएम ९ (९ वाढल्या)
.
मुंबईत पुन्हा युती झाली तर सोलापुरात युती होईल असे संकेत आहेत, बहुमताला बीजेपीला ३ जागा कमी आहेत.
.
झेडपीत
राष्ट्रवादी २३
भाजपा १४
काँग्रेस ७
सेना ५
आघाडी १२
अपक्ष ७
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
गुरुवार, 02/23/2017 - 16:47
नवीन
मागे कुठल्यातरी चर्चेत मी म्हटले होते की २०१९ मध्ये जर शिवसेना भाजपविरूध्द (पक्षी मोदींविरूध्द) लढणार असेल तर सगळे बुबुडाविपुमाधवि शिवसेना कशी धर्मनिरपेक्ष आहे वगैरे गोष्टी बोलायला लागतील आणि irony शंभर नव्हे तर हजार मरणे मरेल. त्यासाठी २०१९ पर्यंत वाट बघायची गरज लागली नाही. ते आताच सुरू झाले आहे. बरखा दत्त, राजदीप सरदेसाई इत्यादी मंडळींनी शिवसेना आणि उधोजीराव यांचे कौतुक आताच सुरू केले आहे.
(शेफाली वैद्य यांच्या फेसबुक भिंतीवरून साभार)
- Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद
गुरुवार, 02/23/2017 - 17:07
नवीन
तुम्ही म्हणता तसे होणारच आहे. पण कौतुक करणे आणि धर्मनिरपेक्ष म्हणणे यात फरक वाटतो. शिवसेनेला धर्मनिरपेक्ष प्रकारात टाकले तर त्यांची मते कमी होतील :):). आणि वरीलपैकी वागळे शिवसेनेकडे फार आधीच झुकलेले आहेत. शेखर गुप्ता म्हणतात ती फॅक्ट वाटते आहे आणि भाजपला २०१९ आधी यावर रणनीती तयार ठेवावी लागेल (किंवा मग असे म्हणता येईल की भाजपची यावरील रणनीती म्हणजे वेगळे लढणे आणि नंतर एकत्र येणे).
- Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ
Fri, 02/24/2017 - 12:25
नवीन
लोकांनी फक्त भाजप चे कौतुक केले तरच ते आदरणीय/निष्पक्ष वगैरे असतात का?
शेखर गुप्ता यांचे विधान काय चुकीचे आहे?
उगीच कुठल्याही गोष्टीला एखाद्या चष्म्यातूनच बघायला लावतात हे लोक(शेफाली)...
भाजप आणि शिवसेना या दोघांनी जागांच्या बाबतीत प्रगतीच केली आहे. हे दोघे नंतर एकत्र पण येतील कदाचित.
पण काळजीची गोष्ट हि वाटते कि ताकदीचा विरोधी पक्ष नसणे! हे सगळे एकाधिकारशाही कडे झुकू नये म्हणजे मिळवली...
मनसेची मात्र पूर्ण वाताहत झालीये... काय झालं नक्की नाशिक मध्ये? कोणी सांगू शकेल का?
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Fri, 02/24/2017 - 12:37
नवीन
मनसेच्या ४० नगरसेवकांपैकी २५ भाजपात गेले.... उरले ते १५.... त्यात स्थानिक पातळीवर मोठे नेते मनापासून ठाकरेच्या सोबत नाहीत... नाशिकमध्ये काम झाले आहे तरी त्याचे श्रेय घेऊन मतदारांपर्यंत जाणे, हवा बनवणे, इत्यादी कार्यकर्ता, नेते पातळीवर अंतर्गत जी उलाढाल आवश्यक असते ती अगदी शून्य होती.... आमच्या प्रभागात तर मनसेचा कोण उभा होता तेही माहित नाही, खरेतर दोन्ही मनसेचे मागचे नगरसेवक भाजपात गेलेत ते दोन्ही निवडून आलेत भाजपच्या तिकिटावर...
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- ›
- »