Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

महापालिका, जिल्हा परीषद निवडणूक निकाल

श
श्रीगुरुजी
Tue, 02/21/2017 - 18:46
🗣 296 प्रतिसाद
महापालिका व जिल्हा परीषद निवडणूक निकालांसाठी धागा. http://www.loksatta.com/bmc-elections-2017/bmc-election-2017-exit-polls-results-pmc-elections-2017-exit-polls-results-thane-municipal-corporation-election-bjp-shivsena-congress-ncp-1415185/ इंडिया टुडे आणि अॅक्सिसने केलेल्या एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना सर्वांत मोठा पक्ष ठरण्याची शक्यता असून, भाजपच्या जागांमध्येही लक्षणीय वाढ होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. इंडिया टुडे आणि अॅक्सिसने केलेल्या एक्झिट पोलनुसार, शिवसेनेला मुंबईत ८६ ते ९२ जागा मिळण्याची शक्यता आहे. त्या खालोखाल भाजपला ८० ते ८८ जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. २०१२ मधील निकालांचा विचार केल्यास भाजपच्या जागांमध्ये लक्षणीय वाढ होण्याचा अंदाज या एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे. काँग्रेसमधील अंतर्गत नाराजीचा परिणाम एक्झिट पोलमध्येही दिसून येतो आहे. काँग्रेसला ३० ते ३४ जागांवर तर राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ ३ ते ६ जागांवरच यश मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. भाजप व शिवसेना या दोघांनाही ३२% मते मिळतील असा अंदाज आहे. पुणे महापालिकेत सत्तांतर होण्याचा अंदाज एक्झिट पोलने वर्तविला आहे. पुण्यात गेल्या १० वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेवर आहे. पण या निवडणुकीत भाजपला पुण्यात स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज एक्झिट पोलने वर्तविला आहे. एकूण १६२ जागांपैकी ७७ ते ८५ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसला ६० ते ६६ जागा मिळण्याची शक्यता आहे. ठाण्यामध्ये शिवसेना सत्ता राखण्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे. या महापालिकेत विशेष म्हणजे भाजप तिसऱ्या क्रमांकावर घसरण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस २९ ते ३४ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. नागपूर महापालिकेत भाजपच पुन्हा सत्तेवर येण्याचा अंदाज वर्तविण्यात आला असून, भाजपला ९१ ते १०० जागा मिळण्याची शक्यता आहे. या महापालिकेत एकूण १५१ जागा आहेत. मुंबई - शिवसेना – ८६ ते ९२ भाजप – ८० ते ८८ काँग्रेस – ३० ते ३४ मनसे – ५ ते ७ राष्ट्रवादी – ३ ते ६ पुणे - भाजप – ७७ ते ८५ काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस – ६० ते ६६ शिवसेना – १० ते १३ ठाणे - शिवसेना – ६२ ते ७० राष्ट्रवादी काँग्रेस – २९ ते ३४ भाजप – २६ ते ३३ नागपूर - भाजप – ९१ ते ११० काँग्रेस – ३५ ते ४१ शिवसेना – २ ते ४ _________________________ एबीपी माझा च्या अंदाजानुसार पिंचि मध्ये राष्ट्रवादी, नाशिकमध्ये सेना आणि अकोला, अमरावती व सोलापूर मध्ये भाजप प्रथम क्रमांकावर असेल. _________________ दिल्ली व बिहार च्या कटु अनुभवापासून मी कोणत्याही सर्वेक्षणावर विश्वास ठेवणे बंद केले आहे.
वर्गीकरण
निवडणूक

प्रतिक्रिया द्या
49270 वाचन

💬 प्रतिसाद (296)
स
संदीप डांगे Mon, 02/27/2017 - 10:30 नवीन
बरं बरं! ;-) =)) पवारांना क्षुद्र दाखवण्यासाठी आपण घेत आहात ती मेहनत, चिकाटी खरंच कबिले तारीफ आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Mon, 02/27/2017 - 10:39 नवीन
मनःपूर्वक धन्यवाद! जातीय मळमळ बोलून दाखविणार्‍यांना मी महान म्हणू शकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
व
वरुण मोहिते Mon, 02/27/2017 - 10:37 नवीन
पण नितीशकुमार से सीखो ,मायावती से सीखो, करुणानिधी से सीखो ,ममता बॅनर्जी से सीखो अशी काही उदाहरण आहेत का ..असलीस तर शेयर करा वाचायला आवडेलतेवढीच माहितीत भर पडेल. प्रोटोकॉल असताना ठरलेलं असत कि कितपत बोलायचं . बाकी पंतप्रधानाच्या मर्जीवर .म्हणजे मोदी बोलतायत त्यावर लिंबू टीम्बू वैग्रे लोकांना मोदी भाव का देत आहेत . परत एकदा सांगतो मोदी काही निकष नाही ५-१० वर्ष सत्तेवर असतील जातील पण परत परत बाकीचे लोक का येत आहेत ?? स्तुती का करत आहेत ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
व
वरुण मोहिते Mon, 02/27/2017 - 10:45 नवीन
पाळणार असाल तर अजून एक सांगा अख्ख्या दिल्लीत चर्चा चालू असते कि स्वार्थाशिवाय मोदी कोणाशी काहीच बोलत नाहीत .दुर्लक्ष करणं,स्वार्थ असेल तिथेच बोलणं हे त्यांना बरोबर जमत . आज कोणाला पटलं नाही तरी चालेल पण हे सत्य आहे कार्यशैलीचा अनुभव घेतलेली लोकं तरी बोलतात बाबा असं दिल्लीत . खरा खोटं देव जाणे. बाकी मोदी असोत नसोत ४० वर्षांपासून लोकं बारामतीत येत आहेत लिंबू टीम्बू माणसाकडे .केवळ विकासाचा मुद्दा आणि प्रकल्प पाहायला हा. बाकी राजकीय चर्चा जाऊदे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते
श
श्रीगुरुजी Mon, 02/27/2017 - 11:06 नवीन
आपण दिल्लीत कधीपासून आहात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते
श
श्रीगुरुजी Mon, 02/27/2017 - 10:56 नवीन
पवारजीसे सिखो असे पण उदाहरण नाही. जानेवारीत मोदी बिहारमध्ये गेले होते. तिथे त्यांनी नितीशकुमारांची स्तुती केली. त्यांनी पूर्वी ममता बॅनर्जींचेही कौतुक केले होते. ज्या राज्यात ते किंवा इतर नेते आमत्रणावरून भेट देतात, त्या राज्याच्या भेटीत यजमानांची स्तुती करणे ही औपचारिकता असते. त्यापलिकडे त्यात काहीही नसते. बारामतीला अधूनमधून काही नेते का भेट देतात हे कारण मी पूर्वी अनेकवेळा सांगितले. ते नेते स्वतःहून तिथे जात नसून पवार स्वतःहून त्यांना आमंत्रण देतात व त्यांच्या भेटीतून ते स्वतः प्रकाशझोतात राहण्याचा प्रयत्न करतात. त्यानिमित्ताने माध्यमे गॉसिप पसरवतात व त्यायोगे पवार काही दिवस प्रकाशझोतात राहतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते
व
वरुण मोहिते Mon, 02/27/2017 - 11:25 नवीन
म्हणजे मुलायमसिंगची पण करायला हवी .सतत यु पी ला जातात म्हणून . बाकी निवडणुकीच्या वेळी स्तुती आणि बाकी स्तुती यात फरक आहे हो. असो पवारांना स्तुती च सर्टिफिकेट कशाला .. असतील नसतील आपलं तर म्हणणं होत कार्यक्षम मोदी का आले . विकास झाला असता त्याच ६-७ तासात उगाच लिंबू टीम्बू च आमंत्रण कशाला स्वीकारा.कोणपण देईल उद्या आमंत्रण मोदींची हि सवय घातक आहे . ममता बॅनर्जींचे कौतुक ?? ज्या वाजपेयींना त्यांनी हैराण केलं त्याच कौतुक चांगलंय म्हणायचं म्हणजे स्वार्थासाठी मोदी कुठेही जातात हा अर्थ होतोय देशासाठी घातक आहे हे . ज्या नितीश कुमारांनी लालू यादव यांच्यासोबत युती केली त्या नितीशकुमारांचं कौतुक देशासाठी घातक आहे हे . अवांतर_मी दिल्ली ला नसतो अधे मध्ये जातो महिन्यातून आम्ही तर काय इतके मोठे नाही कि बातम्या मिळायला . कानावर आलं दिल्लीत ते बोलो .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Mon, 02/27/2017 - 16:05 नवीन
जेव्हा पंतप्रधान किंवा इतर नेते एखाद्या राज्यात जातात त्यामागचे कारण आधी बघायचे असते. जेव्हा एखादा अधिकृत राज्य सरकारचा किंवा केंद्र सरकारचा कार्यक्रम असतो, एखाद्या प्रकल्पाचे उद्घाटन असते, भूमीपूजन, पुतळ्याचे अनावरण इ. असते अशा प्रसंगी राजकीय टीका नसते. उलट एकमेकांचे आभारप्रदर्शन असते. जेव्हा निवडणुक प्रचारासाठी राज्यात भेट दिली जाते तेव्हा अर्थातच एकमेकांची उणीदुणी काढली जातात. या दोन भेटीमधला फरक लक्षात घेतला तर कधी स्तुती तर कधी टीका असे का ते लक्षात येईल. मोदी २०१४ मध्ये पंतप्रधान झाले. मुलायमसिंग २००७ पर्यंत पंतप्रधान होते. त्यामुळे मोदींनी उ. प्र. मध्ये जाऊन मुलायमसिगांबरोबर एखाद्या अधिकृत कार्यक्रमात जाणे शक्यच नव्हते. २०१४ च्या निवडणुक प्रचारात मोदींनी पवार चाचा-भतीजांवर भरपूर टीका केलेली आहे. परंतु बारामतीला पवारांच्या निमंत्रणावरून भेट घेतल्यावर तिथे राजकीय भूमिका न घेता यजमानांविषयी चार बरे शब्द बोलणे हा शिष्टाचाराचा भाग आहे. त्यापलिकडे यात अर्थ नाही. राहुल व केजरीवाल मोदींवर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात. मोदीही प्रत्त्युत्तर देतात. परंतु तेच मोदी राहुलला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. याचा अर्थ राहुल आणि मोदी एकत्र येत आहेत असा नसतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते
व
वरुण मोहिते Sun, 02/26/2017 - 17:12 नवीन
लक्ष का द्या ??मोदींकडे थोडी वेळ रिकामा आहे पवारांनी बोलावलं कि जायला .असे थोडी कोण मोठे नेते जातात कुठे ?लोक वेळ का देतात भेटायला??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
व
विशुमित Mon, 02/27/2017 - 06:36 नवीन
पवारांकडे दाखवण्यासाठी काहीतरी आहे म्हणून बोलावतात आपल्या घरी. आपण नाही का चांगले घर नसले की मित्र मंडळींना टाळतो घरी बोलावण्यासाठी. त्याच बरोबर आपल्या मतदार संघाची आणखी प्रगती कशी होऊ शकते याचा ध्यास घेणारे नेते उरलेत कुठे भारतात ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते
श
श्रीगुरुजी Mon, 02/27/2017 - 10:16 नवीन
आपण कोणाला घरी बोलाविले आणि आपले घर त्याला आवडले नाही तरी शिष्टाचार म्हणून तो आपले व आपल्या घराचे तोंडदेखले कौतुक करतो. त्याला दिलेले जेवण आवडले नाही तरी तो मिटक्या मारत स्वयंपाकाचे कौतुक करतो. बारामतीला आलेल्या नेत्यांनी पवारांवर स्तुतीसुमने उधळणे हा त्यातलाच एक भाग आहे. एक प्रश्न. महाराष्ट्रातील अनेक छोट्या शहरात, छोट्या गावात अजूनही उघडी गटारे आहेत. बारामतीत काय परिस्थिती आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
स
संदीप डांगे Mon, 02/27/2017 - 10:36 नवीन
गुरुजी, एखाद्यवेळेस मोदींना तुमच्या घरी बोलावणं पाठवा ना जरा... शरद पवारांपेक्षा तुमचे महाराष्ट्रातले महत्त्व कैक पटीने जास्तच आहे, तुम्ही एकदा बोलावणं धाडा आणि जेवायला घालाच समारंभ करून, म्हणजे पवार कसे क्षुद्र ह्यावर नेहमी नेहमी तेच तेच मेगबायटीचे पुरण पाडत बसायची गरज पडणार नाही... =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Mon, 02/27/2017 - 10:42 नवीन
पवार कसे महान असे कौतुक सातत्याने यायला लागल्यावर वस्तुस्थिती मांडणे आवश्यकच असते. त्यात तुम्हाला काय त्रास होतोय ते समजले नाही. पवार दाखविले जातात तितके महान नाहीत ही वस्तुस्थिती समोर मांडल्याने अस्वस्थ झालेले दिसता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Mon, 02/27/2017 - 11:34 नवीन
पवारांना महान म्हणत असंल कोणी तर तुम्हीच सतत अस्वस्थ होऊन मेगाबायटी सडा घालता बॉ! कोणी कोणाला महान म्हणावे हा ज्याचा त्याचा प्रश्न... तुमची अस्वस्थता बघून स्पेशयल पहिल्या धारेचा पवारद्वेष दिसतो... भारतात बरेच महान म्हणवले जाणारे लोक आहेत. कोणी महान आहे की नाही हे वस्तुस्थिती नव्हे तर मानणाऱ्याची मानसिकता ठरवते, 'वस्तुस्थिती' सारख्या शब्दामागे आपले विखारी द्वेष लपवायची गरज नाही! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Mon, 02/27/2017 - 16:12 नवीन
कमाल आहे. पवारा दाखविले जातात तितके मोठे नेते नाहीत हे दाखविले की तुम्ही का अस्वस्थ होता? कोणी कोणाला महान म्हणावे हा ज्याचा त्याचा प्रश्न असेल तर कोणी कोणाला महान म्हणू नये हासुद्धा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. तुम्ही कशाला उगाच अस्वस्थ होताय? वस्तुस्थिती म्हणजे विखारी द्वेष हा जावईशोध कधी लावला तुम्ही? पवारांनी पूर्वी अनेकदा केलेल्या जातीयवादी वक्तव्यांचा संदर्भ मी एका धाग्यात दिला होता. अगदी परवाच्या महापालिका निवडणुकीत सुद्धा पवारांनी "देवेंद्र फडणवीस म्हणजे घाशीराम कोतवालमधील नाना फडणवीस" असे जाहीर वक्तव्य केले होते. यापूर्वी राजू शेट्टींची जात काढणे, माधव गोडबोलेंची जात काढणे, भाजप-सेना युतीबद्दल बोलताना पेशवाईचा संदर्भ देणे, छत्रपती विरूद्ध पेशवे अशी काडी घालणे अशी वक्तव्ये म्हणजे जातीयवादी वक्तव्ये आहेत हे सांगणे हा विखारी द्वेष कधीपासून झाला?
तुमची अस्वस्थता बघून स्पेशयल पहिल्या धारेचा पवारद्वेष दिसतो...
तुमची अस्वस्थता बघून स्पेशयल पहिल्या धारेचा श्रीगुरूजीद्वेष दिसतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
व
विशुमित Mon, 02/27/2017 - 10:38 नवीन
म्हणजे बारामती नाही आवडले दिल्लीतील लोकांना ? एवढे घाण घर असताना मिटक्या मारत हादडणाऱ्यांना बोलावणे शोभते का पवारांना? तुच्छ लेकाचे..!! बारामती अस्वच्छतेचा महामेरू आहे, सुधारणा करण्यात भरपूर वाव आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Mon, 02/27/2017 - 10:44 नवीन
अरेरे. इथले बारामती पुराण, बारामतीचा पवारांनी केलेला विकास इ. बद्दल वाचून बारामती म्हणजे पृथ्वीतलावरील स्वर्ग, नंदनवन अशी माझी समजूत झाली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Mon, 02/27/2017 - 11:00 नवीन
किती 'अ'सुरी आनंद झाला ना हे ऐकून...!! मोदक राव याला म्हणतात भाट गिरी..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
म
मोदक Mon, 02/27/2017 - 11:43 नवीन
तुमचा प्रतिसादरूपी सुखसंवाद त्यांच्यासोबत सुरू राहुदेत. मला मध्ये ओढू नये ही सूचना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
श
श्रीगुरुजी Mon, 02/27/2017 - 16:13 नवीन
यात 'भाटगिरी' कोठून दिसली?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
न
निष्पक्ष सदस्य Mon, 02/27/2017 - 12:54 नवीन
पवारांचा विषय निघताच ज्याअर्थी श्रीगुरूजी धावून येतात,त्याअर्थी गुरूजींचे कधीकाळी पवारांशी सख्य असावे असे भासते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
म
मोदक Mon, 02/27/2017 - 13:26 नवीन
जो असे बोलतो त्याच्याकडे विदा मागा. कुणीही अडवले नाहीये. मी बोललो असेन तर तसे दाखवून द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते
व
विशुमित Mon, 02/27/2017 - 13:22 नवीन
मनाला येईल ते अर्थ स्वतःच काढू नका. शेवटी ताव तवाने बोलण्याने स्वतःची भाटगिरी लपत नाही. बरळणे वगैरे असले शब्द वापरणे बंद वापराने बंद करा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Mon, 02/27/2017 - 13:30 नवीन
हो का..? मग स्वत:ची भाटगिरी लपवण्यासाठी माझ्यावर बिनबुडाचे आरोप करणे टाळा. तुम्ही उदो उदो करून गुलामी मान्य केली असेल तर तो तुमचा प्रश्न आहे. मी आरोप केलेला विदा देताय ना..? का ते पण हवेतले बाण होते..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Mon, 02/27/2017 - 07:33 नवीन
<<<बाकी तुम्ही शरद पवारांचा उदोउदो करत आहात हे तुम्हीच कबुल केले या धाडसाचे कौतुक वाटते.>>> -- खाली दिलेल्यांचे उदो उदो करण्यापेक्षा शरद पवारांचे उदो उदो करणे नक्कीच चांगले म्हणावे लागेल. http://www.loksatta.com/desh-videsh-news/kargil-martyr-daughter-gets-rape-threats-for-opposing-abvp-1420106/ http://www.loksatta.com/mumbai-news/mlc-prashant-paricharak-pandharpur-army-man-wifes-controversial-statement-mahila-ayog-notice-1420132/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
ए
एकुलता एक डॉन Fri, 02/24/2017 - 09:38 नवीन
jar modi yanni prachara kela asta tar?
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Fri, 02/24/2017 - 10:32 नवीन
http://www.loksatta.com/thane-news/thane-municipal-election-results-2017-three-candidate-in-suraj-parmar-suicide-case-win-in-thane-1417956/ ह्यास काय म्हणावे ?
  • Log in or register to post comments
व
विशुमित Fri, 02/24/2017 - 11:02 नवीन
तुम्हीच सांगा यास काय म्हणावे ? जनतेचा कौल आहे, हार्दिक अभिनंदन करा त्यांचे, एवढेच सुचवेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
व
विशुमित Fri, 02/24/2017 - 11:08 नवीन
मुंबईमधील पारदर्शक विकासाला सुरवात पण झाली.... http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/bjp-party-workers-attack-on-mns-corporator/articleshow/57326084.cms
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Fri, 02/24/2017 - 11:12 नवीन
मुंबईमधील पारदर्शक विकासाला सुरवात पण झाली.... http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/bjp-party-workers-attack-on-mns-corporator/articleshow/57326084.cms
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
म
मराठी_माणूस Fri, 02/24/2017 - 11:21 नवीन
"In a democracy people get the leaders they deserve."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
N
NiluMP Fri, 02/24/2017 - 16:49 नवीन
झोपड्या बांधा आणि निवडून या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
अ
अभिजीत अवलिया Fri, 02/24/2017 - 11:50 नवीन
ज्या गतीने ह्या वेळी भाजपामध्ये अन्य पक्षांतील आयाराम येत होते (सर्वच पक्षांकडे येत होते पण भाजपाकडे ओघ खूपच जास्त होता) ते चिंताजनक होते. तिकीट नाही मिळाले, करा पक्षत्याग आणी जो तिकीट देत असेल त्याचा झेंडा घ्या खांद्यावर ही लोकशाहीला अतिशय मारक गोष्ट आहे. त्यामुळे काहीतरी कायदा करून जर एखाद्या व्यक्तीने पक्ष बदलला किंवा एखाद्या अपक्षाने जरी कुठल्यातरी पक्षात प्रवेश केला तरी त्याच्यावर पक्षात प्रवेश केल्यापासून काही काळ (३ वर्षे वगैरे) पक्षातर्फे निवडणूक लढवायला बंदी घालायला हवी. तरच हे आयाराम गयाराम प्रकार कमी होतील.
  • Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर Fri, 02/24/2017 - 13:38 नवीन
काही प्रमाणात आयाराम गयाराम होणे चांगलेच आहे. जरा वचक राहतो. पक्षनिष्ठा वगैरे निरर्थक गोष्टींशी लोकंना काय करायचे आहे. काम करणार्‍या पक्षाला निवडून द्यावे. सर्वोच्च नेते उगाच माजतात पक्षनिष्टेमुळे. आणि जिकडून तिकीट मिळेल तिथे जाण्यात काहीच चूक नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया
स
संदीप डांगे Fri, 02/24/2017 - 13:08 नवीन
स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकार, कर्तव्य, काम करण्याची पद्धत, व्यवस्था याची माहिती नीटपणे घेऊन नंतर विकास व काम ह्या मुद्द्यावर बोलावे. आम्ही विकास करू, किंवा केला असे जेव्हा सांगितले जाते तेव्हा ते त्याच संदर्भात बघावे.
  • Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर Fri, 02/24/2017 - 13:42 नवीन
स्थानिक स्वराज्य संस्था किंवा सरकारचे निर्णय सभाग्रूहात व्हावेत. वांद्र्याच्या बंगल्यावर सेटिंगच्या गप्पा मारत आणि मद्याचे पेले रिचवत होउ नयेत. विकास, मराठी माणूस वगैरे सगळ नंतर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
व
वरुण मोहिते Fri, 02/24/2017 - 13:50 नवीन
जायचं नाही बंगल्यावर मद्य प्यायला . संघाची शिकवण आहे . कि कर्नाटक विधानसभेत बी पी पाहत विकासकामे करावी .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
त
तिमा Fri, 02/24/2017 - 13:25 नवीन
कुठल्याच पक्षाचा समर्थक नसलो तरी 'सामना' मधली भाषा अत्यंत खुपते. बाकी, अच्छे दिन येतील अशा भ्रमात आता कोणीही मुंबईकर रहात नाही.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Fri, 02/24/2017 - 16:36 नवीन
पंचवीस वर्षात सेना सडली नाही. सडायला ती अगोदर घडायला तर हवी होती ना ? आज बाळासाहेब काय बोलणार ,,, आज उधूजी काय बोलणार ... आज उद्धट ठाकरे काय बोलणार .... ? दसरा मेळावा ई ई ई ..... सेनेत भाजपापेक्षा एक माझ्या मते चांगले असावे ते म्हणजे मोहला पातळीवरचे संघटन. पण वर संघटना काही नाही मोदींसारखी जादू ही नाही. सबब मराठी मराठी करून जितकी मते मिळतील तितकी मते आजही सेनेला मिळतात तितक्याच मर्यादित जागा. उद्धव ठाकरे यांच्या अर्थ शास्त्राची समज तर अगदी १ लंबरी अशी आहे. महाराष्ट्र प्रदेशात दूरवर सेना वाढवण्याचे श्रेय मात्र त्यानाच दिले पाहिजे.सेनेचे काही लोक त्या त्या विभागात चांगले काम करतात हे पिन्ची मधेही दिसून आले आहे. मनसेचे ही तसेच थोडेसे आहे. भाउ एकत्र आले व काही आर्थिक सामाजिक अशा प्रकारची वेगळी विचारसरंणी त्यानी मांडली तर आजही महाराष्ट्र त्याना स्वीकारेल पण बोलबच्चन गिरीला त्यानी आवर घालावा तरच पुढे काही घडेल नाहीतर मराठी माणूस या विषयावर महाराष्ट्र पेटविणे हे स्वपन रंजन ठरेल कारण हा मुद्दा मुंबई ठाणे या परिसराशिवाय कुठेही चालत नाही.
  • Log in or register to post comments
व
वरुण मोहिते Fri, 02/24/2017 - 17:02 नवीन
हा विचारच करत नाही . कोणाला हवी आहे सेना?? काही झालं कि सेना हवी हा गैरसमज आहे .मुंबई बाहेर . त्यांचं ग्रॉऊंड वर्क आहे त्या जीवावर ते येतात . कुठेही घाबरायला काय मराठी माणूस पागल आहे का??का मुंबई ठाण्यात सेना लागायला ??का महाराष्ट्रात मराठी लोक घाबरले असं तर नाहीये ना? ज्या ठिकाणी बाकी लोक आले तिथे मराठी माणूस घाबरत नाही का?? हास्यास्पद मांडणी मुंबई बाहेरच्या लोकांची . असा नसतो विचार लोकांचा .
  • Log in or register to post comments
न
निष्पक्ष सदस्य Sat, 02/25/2017 - 07:20 नवीन
काही अपवाद वगळता सत्तेमध्ये असणारे चेहरे तेच आहेत,फक्त त्याला आता भाजप असे म्हणतात. आमच्या इकडे भाजप म्हणजे काय माहित नव्हतं लोकांना,पण आता झेडपी ला पण भरभरून उमेदवार निवडून आलेत,अर्थात पूर्वी ते काँग्रेस अन् राष्ट्रवादी मध्येच होते,आता फक्त पक्षाचं नाव बदललं,पण लोक तेच!
  • Log in or register to post comments
व
विशुमित Sat, 02/25/2017 - 12:00 नवीन
असं कसं... ते वाल्याचे वालमिकी होणार आता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निष्पक्ष सदस्य
श
श्रीगुरुजी Sat, 02/25/2017 - 13:30 नवीन
उद्धव ठाकरेंची राजकीय अपरिपक्वता पुन्हा एकदा दृग्गोचर झाली आहे. अर्थात पोकळ फुशारक्या व बढाया मारणार्‍यांकडून परिपक्वतेची अपेक्षा करणे जरा अवघडच आहे. २०१४ मध्ये भाजप बहुमतापासून तब्बल २२ जागांनी दूर असताना व स्वतःच्या हातात तब्बल ६३ आमदार असताना व भाजपला काँग्रेस/राष्ट्रवादीचा पाठिंबा नको असताना उधोजींनी हातातले पत्ते नीट खेळले असते तर उपमुख्यमंत्रीपद, अर्थमंत्रीपद, सभापतीपद, गृहमंत्रीपद, महसूलमंत्रीपद इ. पैकी काही महत्त्वाची पदे नक्कीच मिळविता आली असती. कदाचित अडीच वर्षांकरीता मुख्यमंत्रीपद सुद्धा मिळविता आले असते. दुर्दैवाने हातातले पत्ते नीट न खेळल्याने शिवसेनेला खूप कमी महत्त्वाची हातात येऊन भाजपच्या हातातले खेळणे बनावे लागले. उधोजींच्या जागी मायावती असती तर तिने एकाच वेळी भाजप व काँग्रेस/राष्ट्रवादीशी गुपचूप बोलणी करून सर्वाधिक फायदा करून घेतला असता. आता पुन्हा एकदा हातातील पाने दाखविण्याची चूक उधोजी करीत आहेत. मुंबईत बहुमतासाठी ११४ जागा हव्या असताना शिवसेना ८४ व भाजप ८२ अशी अटीतटीची परिस्थिती असताना काँग्रेस (३१), राष्ट्रवादी (९), मनसे (७) व इतर (१४) यांना अतोनात महत्त्व आले आहे. अशा वेळी ३ अपक्ष नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे हे जाहीर करून हुरळलेल्या उधोजींनी आपल्या हातातले पत्ते उघड करायला सुरूवात केली आहे. आपली संख्या वाढल्याचे समजल्यावर भाजप दबावाखाली येऊन आपल्या मागण्या मान्य करेल अशा गैरसमजूतीत ते दिसतात. भाजपही बहुमतासाठी जुळवाजुळव करीत असणारच. परंतु भाजपने आपण कोणाचा पाठिंबा मिळविण्याच्या प्रयत्नात आहोत हे अजिबात बाहेर येऊन दिलेले नाही. अगदी आयत्यावेळी ते जाहीर करून सेनेला धक्का देऊन तोंडघशी पाडावे अशी भाजपची योजना असणार. भाजप शिवसेनेला जास्तीत जास्त गाफील ठेवून गुपचूपपणे नगरसेवकांची पळवापळवी करणार हे निश्चित.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 02/25/2017 - 13:35 नवीन
भाजपमधील शिवसेना सहानुभूतीदार नेत्यांनी (गडकरी, मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील इ.) भाजपने शिवसेनेशी पुन्हा जुळवून घ्यावे यासाठी जाहीर विधाने करण्यास सुरूवात केली आहे. गडकरी, मुनगंटीवार व फडणवीस या तिघांचेही कार्यक्षेत्र विदर्भ असल्याने फडणवीस फार मोठे होणे उर्वरीत दोघांना परवडण्यासारखे नाही. त्यामुळे फडणवीसांसमोर अडचणी निर्माण करणे हाच यामागचा हेतू असावा. चंद्रकांत पाटील यांना तर सुरवातीपासूनच सेनेबद्दल मऊ कोपरा आहे. एकीकडे फडणवीस, मोदी व शहा शिवसेनेला पूर्ण नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करीत असताना व त्यांना त्यात यश येत असताना हे इतर नेते मात्र अडथळे आणत आहेत.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 02/25/2017 - 14:22 नवीन
महाराष्ट्रात एक नवीन राजकीय समीकरण उदयाला येण्याची शक्यता दिसत आहे. http://beta1.esakal.com/mumbai/shivsena-congress-alliance-mumbai-32396 मुंबई: मुंबई महापालिकेत 84 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेससोबत गुप्त वाटाघाटी सुरू केल्याची माहिती विश्‍वसनीय सुत्रांनी दिली आहे. या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विश्‍वासू सहकाऱ्यांनी काँग्रेसला एक प्रस्ताव दिला आहे. आज जरी नवनिर्वाचित नगरसेवकांच्या बैठकीत युती आणि महापौरपदाच्या निवडणुकीच्या नियोजनाबाबत चर्चा होणार असली तरी महापालिकेची सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेसची मदत घेण्याची सेनेची मानसिक तयारी झाल्याचेही सांगितले जात आहे. आंधळ्याला लंगड्याची साथ अशी ही नवीन भागीदारी ठरेल का हे आगामी काळच ठरवेल. काँग्रेसची मदत घेणे हे शिवसेना व काँग्रेस या दोघांसाठी फायदेशीर ठरेल का ती दोघांची हाराकिरी ठरेल हे भविष्यात कळेलच. भाजपने शांत राहून होणार्‍या घडामोडी पाहत रहाव्यात. काँग्रेसच्या चिथावणीने शिवसेनेने पाठिंबा काढला तर भाजपसाठी ती इष्टापत्तीच ठरेल. काही काळाने काँग्रेस (४२) + राष्ट्रवादी (४१) + शिवसेना (६३) अशी युती झाली तर एकूण १४६ आमदार होतील व तिघे एकत्रित सरकार स्थापन करू शकतील. हीसुद्धा भाजपसाठी इष्टापत्तीच ठरेल.
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Sat, 02/25/2017 - 15:12 नवीन
काँग्रेसच्या चिथावणीने शिवसेनेने पाठिंबा काढला तर भाजपसाठी ती इष्टापत्तीच ठरेल.
साधारणतः सहमत. आत्ता सरकार पडलं आणि निवडणुका आल्या तर भाजपासाठी चांगलच आहे. १२०पेक्षा जास्तं देखील येऊ शकतील जागा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
स
संदीप डांगे Sat, 02/25/2017 - 17:22 नवीन
पूर्ण सहमत आहे. आता विधानसभेसाठी मध्यावधी झाल्या तर भाजपसाठी उत्तम आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
व
वाल्मिकी Sat, 02/25/2017 - 19:15 नवीन
शिवसेनेने पाठिंबा काढला तरी सरकार पडू शकेल ह्याची १००% नाहीये
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
क
कंजूस Sun, 02/26/2017 - 05:57 नवीन
राणीबाग विकास आराखडा, तिथले प्राणी ,स्थलांतरित करणे , दीडशे वर्षांची जुनी बिनकामाची झाडे काढून तिथे नर्स्रीतली खजुरीची झाडे लावण्याचा आराखडा ,गेंडा,पाणघोडा यांचे स्थलांतर,आणि शेवटी पेन्ग्विन प्रकरणातून विश्वास फार उडाला. तसं झालं नसतं तर १२० जागा शिवसेनेच्या आल्या असत्या.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 02/27/2017 - 11:42 नवीन
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा