महापालिका, जिल्हा परीषद निवडणूक निकाल
महापालिका व जिल्हा परीषद निवडणूक निकालांसाठी धागा.
http://www.loksatta.com/bmc-elections-2017/bmc-election-2017-exit-polls-results-pmc-elections-2017-exit-polls-results-thane-municipal-corporation-election-bjp-shivsena-congress-ncp-1415185/
इंडिया टुडे आणि अॅक्सिसने केलेल्या एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना सर्वांत मोठा पक्ष ठरण्याची शक्यता असून, भाजपच्या जागांमध्येही लक्षणीय वाढ होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. इंडिया टुडे आणि अॅक्सिसने केलेल्या एक्झिट पोलनुसार, शिवसेनेला मुंबईत ८६ ते ९२ जागा मिळण्याची शक्यता आहे. त्या खालोखाल भाजपला ८० ते ८८ जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. २०१२ मधील निकालांचा विचार केल्यास भाजपच्या जागांमध्ये लक्षणीय वाढ होण्याचा अंदाज या एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे. काँग्रेसमधील अंतर्गत नाराजीचा परिणाम एक्झिट पोलमध्येही दिसून येतो आहे. काँग्रेसला ३० ते ३४ जागांवर तर राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ ३ ते ६ जागांवरच यश मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. भाजप व शिवसेना या दोघांनाही ३२% मते मिळतील असा अंदाज आहे.
पुणे महापालिकेत सत्तांतर होण्याचा अंदाज एक्झिट पोलने वर्तविला आहे. पुण्यात गेल्या १० वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेवर आहे. पण या निवडणुकीत भाजपला पुण्यात स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज एक्झिट पोलने वर्तविला आहे. एकूण १६२ जागांपैकी ७७ ते ८५ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसला ६० ते ६६ जागा मिळण्याची शक्यता आहे.
ठाण्यामध्ये शिवसेना सत्ता राखण्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे. या महापालिकेत विशेष म्हणजे भाजप तिसऱ्या क्रमांकावर घसरण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस २९ ते ३४ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
नागपूर महापालिकेत भाजपच पुन्हा सत्तेवर येण्याचा अंदाज वर्तविण्यात आला असून, भाजपला ९१ ते १०० जागा मिळण्याची शक्यता आहे. या महापालिकेत एकूण १५१ जागा आहेत.
मुंबई -
शिवसेना – ८६ ते ९२
भाजप – ८० ते ८८
काँग्रेस – ३० ते ३४
मनसे – ५ ते ७
राष्ट्रवादी – ३ ते ६
पुणे -
भाजप – ७७ ते ८५
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस – ६० ते ६६
शिवसेना – १० ते १३
ठाणे -
शिवसेना – ६२ ते ७०
राष्ट्रवादी काँग्रेस – २९ ते ३४
भाजप – २६ ते ३३
नागपूर -
भाजप – ९१ ते ११०
काँग्रेस – ३५ ते ४१
शिवसेना – २ ते ४
_________________________
एबीपी माझा च्या अंदाजानुसार पिंचि मध्ये राष्ट्रवादी, नाशिकमध्ये सेना आणि अकोला, अमरावती व सोलापूर मध्ये भाजप प्रथम क्रमांकावर असेल.
_________________
दिल्ली व बिहार च्या कटु अनुभवापासून मी कोणत्याही सर्वेक्षणावर विश्वास ठेवणे बंद केले आहे.
पुणे आणि पिंची मध्ये पवारांचा पक्ष पडला ते चांगलेच झाले. तसे खरंच खूप वाईट वाटलंअरारारा... तुम्ही पण कुंपणावरचे का..?नंतर मनाची समजूत काढली की आताच्या जनतेला विकास नाही गाजरंच जास्त आवडतात.खिक्क.. इतका विकास करून सातत्याने निवडणुकीत तुमचा पक्ष का माती खात आहे म्हणे..? जनतेला गाजरं नाही कमळं आवडत आहेत असे निकालावरुन दिसत आहे. तुम्हाला कमळ शब्दाची अॅलर्जी असेल तर गेट वेल सून.काकडे, जगताप, लांडगे आणि भाई सगळी पवारांनीच घडवलेली माणसे आहेत, भाजपचे कर्तृत्व सांगा? फक्त फोडून आपल्याकडे घेतले एवढेच.मग पवारांनी घडवलेली माणसे त्यांना सोडून का गेली म्हणे..? या मुद्द्यामुळे तुम्ही खुद्द पवारांच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उभे करत आहात हे तुमच्या लक्षात येत आहे ना..?आणखी एक अवांतर शंका- EVM मशीन मध्ये फेरफार झालाय वाटतं TV ९ ला बातमी पाहिली.या शंकेचा पाठपुरावा करा आणि कांही मिळाले तर इथे जरूर टाका. बाकी मुद्द्यांवर पास.१. अनेक ठिकाणी एकूण मतदारांपेक्षा जास्त मतदान झालेले आढळले आहे. २. अनेक उमेदवारांना एकही मत (अगदी त्यांचे स्वतःचेही) नाहीयाचा विदा किंवा सरकारी संस्थळावरील आकडेवारी आहे का..? व्हॉट्सअप किंवा न्युजचॅनेलवरील बातम्या नकोत.पूर्ण चौकशीअंती जे काही बाहेर येईल ते खरे खोटे जाहीर होईलच....ओके, हरकत नाही. याचा इतकाच अर्थ आहे की तुम्ही केलेली पुढील विधाने अजुन सिद्ध झालेली नाहीत. १. अनेक ठिकाणी एकूण मतदारांपेक्षा जास्त मतदान झालेले आढळले आहे. २. अनेक उमेदवारांना एकही मत (अगदी त्यांचे स्वतःचेही) नाही ही विधाने सिद्ध झाली तर नक्की कळवा, सिद्ध झाल्यानंतर या संदर्भात जर तुम्हाला आणखी कोठेही पाठपुरावा करण्यासाठी मदत लागणार असेल तर मी मला शक्य होईल ती मदत करेन. (सर्वमान्य संकेतानुसार वरील प्रतिसाद सुरूवातीला येणे अपेक्षित होते. असो.)