Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

महापालिका, जिल्हा परीषद निवडणूक निकाल

श
श्रीगुरुजी
Tue, 02/21/2017 - 18:46
🗣 296 प्रतिसाद
महापालिका व जिल्हा परीषद निवडणूक निकालांसाठी धागा. http://www.loksatta.com/bmc-elections-2017/bmc-election-2017-exit-polls-results-pmc-elections-2017-exit-polls-results-thane-municipal-corporation-election-bjp-shivsena-congress-ncp-1415185/ इंडिया टुडे आणि अॅक्सिसने केलेल्या एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना सर्वांत मोठा पक्ष ठरण्याची शक्यता असून, भाजपच्या जागांमध्येही लक्षणीय वाढ होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. इंडिया टुडे आणि अॅक्सिसने केलेल्या एक्झिट पोलनुसार, शिवसेनेला मुंबईत ८६ ते ९२ जागा मिळण्याची शक्यता आहे. त्या खालोखाल भाजपला ८० ते ८८ जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. २०१२ मधील निकालांचा विचार केल्यास भाजपच्या जागांमध्ये लक्षणीय वाढ होण्याचा अंदाज या एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे. काँग्रेसमधील अंतर्गत नाराजीचा परिणाम एक्झिट पोलमध्येही दिसून येतो आहे. काँग्रेसला ३० ते ३४ जागांवर तर राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ ३ ते ६ जागांवरच यश मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. भाजप व शिवसेना या दोघांनाही ३२% मते मिळतील असा अंदाज आहे. पुणे महापालिकेत सत्तांतर होण्याचा अंदाज एक्झिट पोलने वर्तविला आहे. पुण्यात गेल्या १० वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेवर आहे. पण या निवडणुकीत भाजपला पुण्यात स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज एक्झिट पोलने वर्तविला आहे. एकूण १६२ जागांपैकी ७७ ते ८५ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसला ६० ते ६६ जागा मिळण्याची शक्यता आहे. ठाण्यामध्ये शिवसेना सत्ता राखण्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे. या महापालिकेत विशेष म्हणजे भाजप तिसऱ्या क्रमांकावर घसरण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस २९ ते ३४ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. नागपूर महापालिकेत भाजपच पुन्हा सत्तेवर येण्याचा अंदाज वर्तविण्यात आला असून, भाजपला ९१ ते १०० जागा मिळण्याची शक्यता आहे. या महापालिकेत एकूण १५१ जागा आहेत. मुंबई - शिवसेना – ८६ ते ९२ भाजप – ८० ते ८८ काँग्रेस – ३० ते ३४ मनसे – ५ ते ७ राष्ट्रवादी – ३ ते ६ पुणे - भाजप – ७७ ते ८५ काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस – ६० ते ६६ शिवसेना – १० ते १३ ठाणे - शिवसेना – ६२ ते ७० राष्ट्रवादी काँग्रेस – २९ ते ३४ भाजप – २६ ते ३३ नागपूर - भाजप – ९१ ते ११० काँग्रेस – ३५ ते ४१ शिवसेना – २ ते ४ _________________________ एबीपी माझा च्या अंदाजानुसार पिंचि मध्ये राष्ट्रवादी, नाशिकमध्ये सेना आणि अकोला, अमरावती व सोलापूर मध्ये भाजप प्रथम क्रमांकावर असेल. _________________ दिल्ली व बिहार च्या कटु अनुभवापासून मी कोणत्याही सर्वेक्षणावर विश्वास ठेवणे बंद केले आहे.
वर्गीकरण
निवडणूक

प्रतिक्रिया द्या
49270 वाचन

💬 प्रतिसाद (296)
स
सुबोध खरे Mon, 02/27/2017 - 11:43 नवीन
https://www.google.co.in/amp/m.timesofindia.com/city/mumbai/now-sena-contacts-bandra-mim-corporator/amp_articleshow/57366137.cms सत्तेसाठी काहीही
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Mon, 02/27/2017 - 12:10 नवीन
कश्मिरमध्ये जे घडलं तेच हो... नवीन काय त्यात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
श
श्रीगुरुजी Mon, 02/27/2017 - 16:17 नवीन
हे भारी आहे. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
व
विशुमित Tue, 02/28/2017 - 06:20 नवीन
युद्धाची आणि क्रिकेटची तुलना होऊ शकते? काय वाढून ठेवले आहे हे आजच्या कवळ्या पिढी पुढे? विचार नाही पटले की हाणामारी, बलात्काराच्या धमक्या आणि याची भलामण करणारे २% चे छछोरी क्रिकेटर आणि नाट्यकंपनी ? http://beta1.esakal.com/desh/gurmehar-kaur-drops-out-studentsagainstabvp-campaign-32795
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
म
मोदक Tue, 02/28/2017 - 06:36 नवीन
मग तुम्ही ज्यांचा उदो उदो करता ते साहेब या २% छछोरी क्रिकेटरांचे नेतृत्व का करत होते म्हणे..? (तुम्ही पुन्हा पुन्हा अजाणतेपणे शरद पवारांच्याच कर्तृत्वावर शरसंधान करत आहात असे नम्रपणे दाखवून देत आहे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Tue, 02/28/2017 - 06:46 नवीन
अखिल भारतीय 'लूडबूडक' आले, ट्रोल करायला. फाट्यावर...!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Tue, 02/28/2017 - 06:58 नवीन
खिक्क. उत्तर नांही का..? की काय लिहायचे याचा वरून आदेश आला नाही..? अडचण समजू शकतो. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Tue, 02/28/2017 - 07:10 नवीन
फाट्यावर मारले तरी लूडबूडक भाट चोंबडेपणा काही सोडत नाही. (आगाऊ सल्ला: तुमच्या सारख्या मिपावरील कथित ६ वर्षा पासूनच्या सदस्याची ट्रोल मध्ये गणना होऊ नये, ही ईश्वरचरणी प्रार्थना आहे. सर्व काही तुमच्या हातात आहे. शुभेच्छा..!!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Tue, 02/28/2017 - 08:16 नवीन
ती काळजी तुम्ही कशाला करताय..? मी बघून घेतो. प्रश्नाचे उत्तर नसेल तर तसे सांगा. यांनी केले त्यांनी केले हे कशाला..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
थ
थॉर माणूस Tue, 02/28/2017 - 07:04 नवीन
सुमार दर्जाचे समालोचन आणि ट्रोलिंग इतकेच याच्या हातात राहीले आहे सध्या प्रसिद्धीच्या झोतात रहाण्याकरीता. विनोद कांबळी दर्जाच्या पिंका टाकून ट्विटर अकाउंट चर्चेत ठेवणे ही गरज झाली आहे या माणसाची. बॅटने कमावलेलं एक दिवस या हव्यासापोटी घालवून बसू नये म्हणजे मिळवली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
स
सुबोध खरे Tue, 02/28/2017 - 07:29 नवीन
कारगिल हुतात्म्यांच्या मुलीचा राजकीय कारणासाठी गैरवापर करणाऱ्या राजकीय पक्षांचा निषेध. पाकिस्तानने माझ्या वडिलांना मारले नाही तर "युद्धा" ने मारले असे हि २० वर्षाची मुलगी कुणाच्या सांगण्यावरून म्हणते. युद्ध खेळायला आपले लष्कर काय आनंदाने गेले ? पाकिस्तानने कारगिलमध्ये घुसखोरी केली. तेथे जाऊन आपण काय कबुतरे उडवायची होती? का मेणबत्त्या पेटवायचा होत्या? कि उपोषण करायचे होते. हे युद्ध भारताने सुरुवात केली नव्हती तर पाकिस्तानने लादले होते. जे एन यु चीच पिलावळ दिल्ली विशवविद्यालयात येऊन असला निमनस्तरीय धांगडधिंगा करत आहे. हि पाकिस्तान बद्दल सहानुभूती कुठून आली आहे ? मला या मुलीची "लाज" वाटते. तिच्या वडिलांचा त्याग तिने पाण्यात घालवला असे स्पष्ट मत माझ्या अनेक लष्करी मित्रांनी (ज्यांनी कारगिल युद्धात प्रत्यक्ष भाग घेतला होता) आमच्या ग्रुप वर व्यक्त केले आहे. कारगिल युद्धाचे राजकीयीकरण करणाऱ्या सर्व राजकीय पक्षांचा आणि संघटनांचा परत एकदा निषेध.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
व
वरुण मोहिते Tue, 02/28/2017 - 07:55 नवीन
फार इंटेलेच्युअल असतात हो. आमची एक मैत्रीण होती सेक्रेटरी होती . त्या कॉलेज ची ४-५ वर्षांपूर्वी . ड्रिंक करताना माझ्यासोबत तैवान च्या एका प्रश्नावर तावातावाने बोलत होती . म्हटलं तेरे यहा कॉर्पोरेटर कौन है . मालूम नही बोली .. म्हटलं ओक्के चियर्स .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
संदीप डांगे Tue, 02/28/2017 - 12:13 नवीन
वरील प्रतिसाद लिहिण्याआधी आपण त्या मुलीचा तो प्लकार्ड असलेला पूर्ण विडिओ बघितला का? नसल्यास अर्धवट माहितीवरुन धडाधड जजमेंट पास करत आहात असे म्हणता येईल. गुरमेहर ने अभाविप च्या विरोधात एक प्लकार्ड काय धरले, गणंगांनी तिचे २०१४ च्या जुन्या युद्ध-नको-शांतता-हवी हा संदेश देणार्‍या विडिओचे अर्धवट सोयिस्कर उचलुन ती कशी देशद्रोही आहे हे पसरवायला सुरुवात केली.. तिला बलात्काराच्या डिटेल धम्क्या दिल्यात... ह्याबद्दल आपल्याला काहीही माहिती नाही जणू.... लष्करी अधिकार्‍यांच्या तुमच्या गृपने काय म्हटलं ते तुम्हाला माहित, पण इथे तर काही वेगळंच घडतंय... http://indiatoday.intoday.in/story/army-veterans-vow-to-fight-for-gurmehar-mother-keeps-mum/1/893360.html अभाविप रामजस मध्ये काय करतंय... भाजपच्या आयटीसेलचे सदस्य आयएसआयचे हस्तक म्हणून पकडले गेले, आयएसआय भाजपच्याच लोकांना हेरगीरीसाठी वापरुन उरी सारखे हल्ले बिनचूक करु शकते आहे ह्याबद्दल तुमच्या लषकरी अधिकार्‍यांच्या गृपमध्ये काय मत आहे ते ऐकायला आवडेल.. एका अर्धवट प्लकार्डपेक्षा अख्खी हेरगीरीचे रॅकेट चालवाणारे जास्त घातक असावेत पण त्याबद्दल मात्र मौन...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
व
विशुमित Tue, 02/28/2017 - 12:21 नवीन
+१११११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
L
llपुण्याचे पेशवेll Tue, 02/28/2017 - 13:19 नवीन
सदर मुलगी ही आपची मोठि प्रचारक व समर्थक आहे. बाकी या आझादी गँगची मनोवृत्ती खालील प्रमाणे आहे. Disagreement = Attack Logical counter = Trolling Truth = Hate Speech Expose Lies = Abuse Expose Another Lie = Targeted Harassment Disagree with a Woman = Sexist, Hariyanvi
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Tue, 02/28/2017 - 13:47 नवीन
सदर मुलगी ही आपची मोठि प्रचारक व समर्थक आहे. >>> ग्रेट! ही गोष्ट तिला देशद्रोही ठरवायला पुरेशी आहे. नैका?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 03/01/2017 - 13:06 नवीन
>>> ग्रेट! ही गोष्ट तिला देशद्रोही ठरवायला पुरेशी आहे. नैका? नाही पण तिला किती सिरीयसली घ्यायचं हे ठरवायला पुरेशी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
सुबोध खरे Tue, 02/28/2017 - 13:59 नवीन
कारगिल युद्धाचे राजकीयीकरण करणाऱ्या सर्व राजकीय पक्षांचा आणि संघटनांचा परत एकदा निषेध.डांगे अण्णा माझे पहिले आणि शेवटचे विधान आपण "नीट" न वाचता उगाच बिनबुडाचे आरोप करत आहात. "भाजपच कशाला लष्करात सुद्धा" पाकिस्तानला मदत करणारे लोक आहेत (आणि असतील). त्यांना शोधून काढण्याचे काम लष्कराचे हेरखाते सतत करत असते. प्रत्येक लष्करी अधिकारी सुटीवर जातो तो कुठल्या प्रान्तातील आहे आणि त्याचे कुणाशी संबंध आहेत यावर लष्करी हेरखाते "लक्ष" ठेवून असते हे बऱ्याच लष्करी अधिकार्यांनाही माहित नाही/नसते. त्यातूनच शत्रूराष्ट्राचे हेरही पकडले जातात. ( हा एक वेगळा विषय आहे.) तेंव्हा माझ्या विधानाचा आपण केवळ पक्षीय/ राजकीय दृष्टिकोनातून विचार करता आहात याबद्दल आपला निषेध. हि मुलगी कारगिलमध्ये हुतात्मा झालेल्या अधिकाऱ्याची मुलगी आहे म्हणून तिला एवढी "प्रसिद्धी" मिळाली (दिली गेली). आणि तिच्या विरुद्ध एवढी राळ उडवली गेली आहे. ती सर्व सामान्य माणसाची मुलगी असती तर असे झाले असते का हा विचार करा ? अन्यथा कबुतरे उडवणारे किंवा मेणबत्त्या जाळणारे लोक भारतात लक्षावधी आहेत. त्यांच्या कडे लक्ष देण्याचे कारण नाही. "आयएसआय भाजपच्याच लोकांना हेरगीरीसाठी वापरुन उरी सारखे हल्ले बिनचूक करु शकते आहे" पाकिस्तानची आय एस आय संघटना एवढी दळभद्री नाही कि तिला भाजपच्या चार टिनपाट आयटी सेलच्या लोकांची मदत घ्यावी लागेल, उडी सारखा हल्ला करायला. एका "राष्ट्राची" गुप्तहेर संघटना आहे ती किती हरामखोर असली तरी त्यांच्या क्षमतेबद्दल भारतीय लष्कराला पूर्ण कल्पना आहे. पिवळा चष्मा लावला कि जग कावीळ झाल्यासारखे दिसते म्हणतात ते हेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Tue, 02/28/2017 - 19:20 नवीन
बाकी सर्व फाफटपसारा सोडाहो, तुम्ही कोलांट्या का मारताय? मी विचारले की तुम्ही तिचा पूर्ण विडियो बघितला काय? नसल्यास तिची तुम्हाला 'लाज वाटते' असं म्हणण्याला काही अर्थ आहे काय? तुम्ही व्हिडियो बघितला असता तर 'लाज' वाटते म्हटलेच नसते. पाकिस्तानने माझ्या वडिलांना मारले नाही तर "युद्धा" ने मारले असे हि २० वर्षाची मुलगी कुणाच्या सांगण्यावरून म्हणते. युद्ध खेळायला आपले लष्कर काय आनंदाने गेले ? पाकिस्तानने कारगिलमध्ये घुसखोरी केली. तेथे जाऊन आपण काय कबुतरे उडवायची होती? का मेणबत्त्या पेटवायचा होत्या? कि उपोषण करायचे होते. हे युद्ध भारताने सुरुवात केली नव्हती तर पाकिस्तानने लादले होते. जे एन यु चीच पिलावळ दिल्ली विशवविद्यालयात येऊन असला निमनस्तरीय धांगडधिंगा करत आहे. हि पाकिस्तान बद्दल सहानुभूती कुठून आली आहे ? मला या मुलीची "लाज" वाटते. तिच्या वडिलांचा त्याग तिने पाण्यात घालवला असे स्पष्ट मत माझ्या अनेक लष्करी मित्रांनी (ज्यांनी कारगिल युद्धात प्रत्यक्ष भाग घेतला होता) आमच्या ग्रुप वर व्यक्त केले आहे. हा तुमचा मूळ प्रतिसाद, ह्यावर वरखाली ज्या दोन वाक्यांच्या तटस्थ टोप्या लावल्यात त्यांना ह्या विधानांमुळे शून्य अर्थ राहतो. तुम्ही ज्यांचा निषेध करत आहात त्यांच्यात तुम्हीही सामील होतच आहात. "लष्करात बाप गमावलेल्या पोरीनी युद्धविहिन जगताची संकल्पना मांडणे" ह्यात लाज वाटण्यासारखे काय आहे ते मला जरा समजवा. बिना चष्म्याची कावीळ जास्त घातक असते डॉक्टरसाहेब, चष्मा काढता तरी येतो, सबंध शरिरात संचारलेला काविळ काढता येत नाही इतका सहज. तुम्हाला काय सांगायचं? तुम्ही तर लष्करातले डॉक्टर! जजमेंटल कमेन्ट्स करण्याआधी तेवढे मागचे पुढचे बघून घेत चला, इतकं सुचवू शकतो फारतर. दहा महिने जुना व्हिडियो आहे, आताच का राळ उडवली गेली? ह्या प्रश्नाचे उत्तर सोयिस्कर नाही म्हणून कोलांट्या मारत दुसर्‍यांवर चष्मा-काविळ असले बालिश आरोप करणे सोपे असते. -------------------------------------------------------- तुमच्यासाठी खास तिच्या विडियोचा अनुवाद देतोय. (गजू तायडे यांनी केलाय) त्यांच्या फेसबुकवालवरुन. " गुरमेहरचा हा व्हिडिओ दहा महिने जुना आहे. मात्र त्यातला मागचा-पुढचा संदर्भ टाळून फक्त एकच पाटी दाखवून चारी बाजूनं जी राळ उडवली जातेय ती क्षुब्ध करणारी आहे. म्हणूनच खाली कमेन्टीत दिलेल्या व्हिडिओतल्या प्रत्येक पाटीचा इथं मराठीत अनुवाद करून देतोय. व्हिडिओ पहा, खालचा अनुवाद वाचा आणि मग आपली अक्कल वापरायची की तथाकथित देशभक्तीच्या खात्यात गहाण टाकायची ते आपलं आपण ठरवा. अनुवादाच्या बरेवाईटपणाची संपूर्ण जबाबदारी माझी. मुद्द्यांवर प्रतिवाद शक्य नसल्यास अनुवादातल्या चुका काढू शकता. ------------------------------------------------------------------------------ १) हाय २) माझं नाव गुरमेहर कौर ३) मी जलंधर, भारत येथे राहते ४) हे माझे वडील कॅप्टन मनदीप सिंह ५) ते १९९९ च्या कारगिल युद्धात मारले गेले ६) ते वारले तेव्हा मी २ वर्षांची होते. माझ्याकडे त्यांच्या फार कमी आठवणी आहेत ७) वडील नसल्यानं कसं वाटतं याच्या माझ्याकडे जास्त आठवणी आहेत ८) मला हेही आठवतं की पाकिस्तान आणि पाकिस्तान्यांचा त्यांनी माझ्या वडलांना मारल्यामुळे मी किती द्वेष करायचे ९) मी मुसलमानांचाही द्वेष करायचे कारण सर्व मुसलमान पाकिस्तानी असतात असं मला वाटायचं १०) मी ६ वर्षांची असताना एका बुरखा घातलेल्या महिलेला चाकू मारण्याचा प्रयत्न केला होता ११) ती माझ्या वडलांच्या मृत्यूला जबाबदार आहे असं कुठल्याशा विचित्र कारणानं मला वाटलं होतं १२) माझ्या आईनं मला आवरलं आणि समजावलं की १३) माझ्या वडलांना पाकिस्ताननं नव्हे, युद्धानं मारलं १४) हे कळायला मला जरा वेळ लागला, पण आज मी माझा द्वेष सोडून द्यायला शिकले आहे १५) हे सोपं नव्हतं, पण कठीणही नाही १६) मी हे करू शकते, तर तुम्हीदेखील करू शकता १७) आज मीदेखील माझ्या वडलांसारखीच एक सैनिक आहे १८) मी भारत-पाकिस्तानमधल्या शांतीसाठी लढते १९) कारण आमच्यात युद्ध झालं नसतं तर माझे वडील आजही इथेच असते २०) मी हा व्हिडिओ बनवते आहे कारण माझी अशी मागणी आहे की दोन्ही देशांच्या सरकारांनी ढोंगबाजी बंद करावी २१) आणि समस्या सोडवावी २२) जर २ महायुद्धांनंतर फ्रान्स आणि जर्मनी एकत्र येऊ शकतात २३) जर जपान आणि अमेरिका आपला भूतकाळ मागे टाकून प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू शकतात २४) तर आपणही का नाही? २५) बहुसंख्य सामान्य भारतीयांना आणि पाकिस्तान्यांना शांती हवी आहे, युद्ध नव्हे २६) मी दोन्ही राष्ट्रांच्या नेतृत्वाच्या योग्यतेवर प्रश्नचिन्ह लावते आहे २७) तिसर्‍या दर्जाच्या नेतृत्वाखाली आपण पहिल्या दर्जाचा देश बनण्याचं स्वप्न पाहू शकत नाही २८) कृपा करून कंबर कसा, एकमेकांशी बोला आणि काम तडीला न्या २९) राष्ट्रपुरस्कृत दहशतवाद आता पुरे ३०) राष्ट्रपुरस्कृत हेरगिरी आता पुरे ३१) राष्ट्रपुरस्कृत द्वेष आता पुरे ३२) सीमेच्या दोन्ही बाजूंना भरपूर लोक मेलेत ३३) आता पुरे म्हणजे पुरे ३४) जिथं आपल्या वडलांना गमावलेल्या गुरमेहर कौर नाहीत अशा जगात मला राहायचंय ३५) मी एकटी नाही. माझ्यासारख्या खूप आहेत ३६) #ProfileForPeace "
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
व
विशुमित Wed, 03/01/2017 - 05:11 नवीन
डांगे अण्णा... simply ग्रेट....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 03/01/2017 - 13:09 नवीन
ज्यांनी कोणी भाषांतराचे कष्ट घेतलेत त्यांनी फालतू गोष्टी भाषांतरीत करण्यात फारच वेळ घालवला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
प
पुंबा Tue, 02/28/2017 - 09:00 नवीन
या मुलीचे वडील शहीद झाले ते युद्ध पाकने भारतावर लादलेले होते. जरी युद्धामुळे तिच्या वडिलांचा मृत्यू झाला असला तरी युद्धाचे कारण पाकिस्तान पुरस्कृत घुसखोर होते, तद्वत पाकिस्तान्मुळेच तिचे वडिल शहीद झाले. त्यांच्याविषयी पूर्ण आदर बाळगूनदेखील ती जे म्हणतिये त्याचा निषेधच झाला पाहिजे असे वाटते. जसे तिला तिचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, तसेच टीका करणार्‍या माझ्यासारख्या सामान्यांनादेखील तिच्या ह्या विधानाची खिल्ली उडवण्याचा, कठोर टीका करण्याचा आणि तिचा निषेध करण्याचा अधिकार आहे. मात्र, हे करत असताना तिला बलात्काराच्या धमक्या आल्या, जे आक्षेपार्ह बोलले गेले त्याचासुद्धा निषेध करावा तेवढा कमीच आहे. विचारांना विचारांना प्रतुत्तर द्यायची शक्ती नसलेले मुर्ख अश्या प्रकारे गलीच्छ भाषेत व्यक्त होतात, अश्यांबद्दल कसलीही सहानुभूती नाही, त्यांना देशभक्त म्हणणे 'देशभक्ती' या म्हान मुल्याचा अपमान आहे. रच्याकने, सेहवागच्या ट्वीटमध्ये आक्षेपार्ह काहीही नाही. त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ग
गॅरी ट्रुमन Wed, 03/01/2017 - 05:39 नवीन
या मुलीचे वडील शहीद झाले ते युद्ध पाकने भारतावर लादलेले होते. जरी युद्धामुळे तिच्या वडिलांचा मृत्यू झाला असला तरी युद्धाचे कारण पाकिस्तान पुरस्कृत घुसखोर होते, तद्वत पाकिस्तान्मुळेच तिचे वडिल शहीद झाले. त्यांच्याविषयी पूर्ण आदर बाळगूनदेखील ती जे म्हणतिये त्याचा निषेधच झाला पाहिजे असे वाटते.
पूर्ण सहमत आहे.
जसे तिला तिचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, तसेच टीका करणार्‍या माझ्यासारख्या सामान्यांनादेखील तिच्या ह्या विधानाची खिल्ली उडवण्याचा, कठोर टीका करण्याचा आणि तिचा निषेध करण्याचा अधिकार आहे.
छ्या असे कसे. अभिव्यक्तीस्वातंत्र्य फक्त डाव्यांनाच असते काय समजलात. तिच्या विधानाचा निषेध करणारे इतर सगळे लोक असहिष्णु, फॅसिस्ट इत्यादी इत्यादी आहेत.
मात्र, हे करत असताना तिला बलात्काराच्या धमक्या आल्या, जे आक्षेपार्ह बोलले गेले त्याचासुद्धा निषेध करावा तेवढा कमीच आहे.
पूर्ण सहमत. फक्त या धमक्या देणारा कोणी भट्टाचार्य म्हणून एस.एफ.आय चा कार्यकर्ता आहे असेही म्हटले जात आहे. खरेखोटे माहित नाही. ती शक्यता जास्त आहेच कारण गेल्या दोनेक दिवसांपासून तिला बलात्काराच्या धमक्या दिल्या जात होत्या त्याविषयी चिडीचूप शांतता आहे. आणि दुसरे म्हणजे या प्रकरणात केजरीवाल उतरले आहेत. बहुदा दिल्ली महापालिका निवडणुकांपूर्वी असहिष्णुतेचे वातावरण निर्माण करायचा प्रयत्न दिसत आहे. असहिष्णुतेचे वातावरण निर्माण करून बिहारमध्ये फायदा झाला असे गृहित धरून तसेच वातावरण परत निर्माण करायचा प्रयत्न असेल तर ते अशक्य असेल असे वाटत नाही. आणि या मुद्द्यामध्ये केजरीवाल उतरतात तो मुद्दा जेन्युईन असूच शकत नाही. एकेकाळी असल्या लोकांचा फार फार राग यायचा. पण आता अजिबात राग येत नाही. तर उलट असे लोक पुढे येत आहेत याचा आनंदच वाटतो. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील गुड फॉर नथिंग रिकामटेकडे, विविध फॉरेन फंडेड एन,जी.ओ मधील तथाकथित कार्यकर्ते आणि स्वतःला लै शाने समजणारे बुबुडाविपुमाधवि सोडून इतर कोणाही सूज्ञ भारतीयाचे अफझल-आझादी गँगला समर्थन असेल असे वाटत नाही. जितके हे असले ढोंगी लोक पुढे येतील तितके चांगले होईल. मी तर म्हणतो की २०१९ मध्ये कन्हैय्या-गुरमेहर यांची जोडगोळी मोदी सोडून इतर सर्व भाजप नेत्यांपेक्षा मोदींसाठी जास्त मते मिळवून देईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
व
वरुण मोहिते Tue, 02/28/2017 - 07:10 नवीन
वैग्रे माजी क्रीडापटूंना विचारा कि ... रवी शास्त्री ,गावस्कर , ह्या लोकांना विचारा माजी खेळाडूंसाठी पेन्शन योजना सुरु करणे , स्टेडियम चा विकास करणे , स्पोर्ट अकादमी उभारणे , राजकारण नको विकासावर बोलू. बाकी सेहवाग उत्कुष्ट खेळाडू असूनही असे फोटो टाकत असेल गरज नसताना तर निश्चित छछोर पणा आहे
  • Log in or register to post comments
व
विशुमित Tue, 02/28/2017 - 07:16 नवीन
तुम्ही गुलाम आहेत का शरद पवारांचे? मग इथे मिपावर यायचे नाही, वरून आदेश आला आहे. बिचारे ते तरी काय करणार भाटगिरीचा व्यवसायच वाईट. आहे. ( कृपया हलके घ्या आणि ख्यिक करा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते
व
वरुण मोहिते Tue, 02/28/2017 - 07:27 नवीन
हास्यास्पद असतात ना पवार असो... गुजरात क्रिकेट असोशिएशन अमित शहा विकासात्मक काम सोडून क्रिकेट जमते का खेळले आहेत का शहा क्रिकेट कधी सहज विचारलं हे प्रश्न पवारांना लागू होतात म्हणून भाजप चे राष्ट्रीय अध्यक्ष अश्या बोर्डावर अध्यक्ष कसे राहतात ??? आधी मोदी पण होते विकासाचा वारसा घेऊन भाजप जन्माला आलीये ते का राहतात क्रिकेट संघटनेत
  • Log in or register to post comments
फ
फेदरवेट साहेब Tue, 02/28/2017 - 09:44 नवीन
मिपावर रायचे तर जय भाजप म्हणावे(च) लागेल असे काहीसे इंस्ट्रकशन 'सदस्य व्हायच्या आधी' मध्ये घातले तर बरे होईल, अशी सुचनावजा विनंती मी मालकांना/संपादकांना नम्रपणे करून स्वतःला लाईन ऑफ़ फायर मध्ये उभा करतोय. च्यायला उगा एखाद फायरिंग स्क्वाड समोर उभा असल्याची भावना आली एकदम.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Tue, 02/28/2017 - 11:03 नवीन
आम्ही बी हुभं हाओ तुमच्या संग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फेदरवेट साहेब
L
lakhu risbud Tue, 02/28/2017 - 11:26 नवीन
तसंच काय नाय ओ,जरा तारतम्य वापरलं तरी पन चालतंय !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
फ
फेदरवेट साहेब Tue, 02/28/2017 - 11:30 नवीन
प्लीज बी सिटेड मिस्टर रिसबुद =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: lakhu risbud
फ
फेदरवेट साहेब Tue, 02/28/2017 - 11:29 नवीन
ओ तुम्ही नका बोलू हो! उद्या लोक म्हणतील फेदूदा अन डांगे एकच आयडी आहेत, आमचं बरंय साहेब, एकंदरीत भाजपला प्रश्न विचारणाऱ्या आमच्यासारख्यांचे. कोणीही प्रश्न विचारले का तो थेट तुमचा डु आयडी होतो म्हणे, कसली क्रेडिबिलिटी कमावली आहे तुम्ही...... =)) तरी बरं आता आलेत काही काही जरा नव्या फळीतले कार्यकर्ते =)) सगळे डु आयडी आहेत, सब मिले हुये है जी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Tue, 02/28/2017 - 11:50 नवीन
=)) आमची कसली क्रेडिबिलिटी? सगळी कृपा त्या भगवंताची! भक्तगणंगांना द्वेष म्हणजे विरोध इतकंच शिकवलेलं आहे. त्यामुळं कोणी विरोध करतो, प्रश्न विचारतो म्हणजे द्वेषच करतो असे त्यांच्या संस्कारातून वाटतंय.. बाकी, रिसबूड साहेब, तारतम्याबद्दल बोलतात... ते एक जाम आवडलं... निदान तारतम्याची ओळखतरी आहे हे ऐकून परमानंद जाहला आज मनी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फेदरवेट साहेब
क
कपिलमुनी Tue, 02/28/2017 - 13:40 नवीन
गुरुमेहेर प्रकरणात चिखलफेक करण्याअगोदर पूर्ण व्हिडीओ बघा. संपूर्ण व्हिडीओ मधली केवळ सोयीस्कर एवढी एकच स्लाईड वापरली आहे. "दुरीतांचे तिमिर जाओ" अशा भावनेने शांततेचे आवहन करणार असेल तर त्यात गैर काय ??
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Tue, 02/28/2017 - 13:47 नवीन
इथे या मुद्द्याचा काय संबंध ? आणि महापालिका, जिल्हा परीषद निवडणूक निकालामधे याचे प्रयोजन काय ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
व
विशुमित Wed, 03/01/2017 - 05:14 नवीन
भाजपच्या कर्तृत्वाची पाठ थोपटून घ्याची भारी हौस आहे काही भाटाना, म्हणून एवढा आटापिटा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 03/01/2017 - 13:14 नवीन
असल्या फडतूस आनि बोगस शांततेचेच आम्ही विरोधक आहोत. हा जर काही प्रचार करायचा असेल तर तो पाकीस्तानात जाऊन कर, इथले लोक तुलनेने कमी पाकीस्तान द्वेष्ते आहेत. मुळात ज्या देशाशी शांतता स्थापनेबद्दल बोललं जात आहे तो देश त्या लायकीचाच नाही आणि ती लायकी यायची इतक्यात शक्यताही नाही. वाजपेयींसह अनेकांनी प्रयत्न करून झालेले आहेत त्यामुळे असले तुच्छ आशावाद योग्य जागी मारण्यात येतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
फ
फेदरवेट साहेब Wed, 03/01/2017 - 15:02 नवीन
आवेश एकदम दांडपट्ट्याचे लवलवते पान फिरवत असलेल्या बाजींसारखा जमलाय, मोप माणसे चिरून कोथळे काढून वगैरे तुम्ही यमसदनी, जहंन्नुम मध्ये धाडली असतील नाही का पुपे तुम्ही? असंच पाहिजे, बोगस शांतिदूत लेकाचे, ती बेटी शांतीची कबुतरे तंदूरभट्टीतच कोंबून टाकायला हवीत, शिवाय एखाद्या डॉक्टरला रक्तमांस पाहायची असते तशी तुम्हालापण योद्धे असल्यामुळे लोळागोळा झालेली माणसे, रक्त बाहेर आलेली आतडी वगैरे बघायची सवय असेल अशी मला आशा आहे अन तुमच्यावर अभंग विश्वासही. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
ध
धर्मराजमुटके Wed, 03/01/2017 - 16:49 नवीन
धर्म ही अफुची गोळी आहे ?? असे म्हणणार्‍याने एकदा राजकारणावरच्या चर्चा / हाणामार्‍या पाहायला पाहिजेत म्हणजे तो आपले मत नक्कीच बदलेल. राजकारण हे ब्राऊन शुगर / हेरॉईन / कोकेन आहे असे म्हणायला हरकत नसावी.
  • Log in or register to post comments
प
पुंबा गुरुवार, 03/02/2017 - 09:01 नवीन
सखेद सहमत.. :((
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
श
श्रीगुरुजी गुरुवार, 03/02/2017 - 09:57 नवीन
हे फक्त पुण्यातच होऊ शकते. _________________________________________________________ २१ फेब्रुवारीला मतदानाच्या दिवशी पुण्याचे मावळते महापौर व उपमहापौर यांनी मतदान सुरू होण्यापूर्वी मतदान यंत्राची साग्रसंगीत पूजा केली. . . . . . . . . . . . . . आणि . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . २३ फेब्रवारीला मतमोजणीनंतर काही दिवसांनी पुण्यातच मतदानयंत्राची अंत्ययात्रा निघाली. पुणे तेथे काय उणे!
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 04/21/2017 - 10:41 नवीन
आज लातूर, चंद्रपूर आणि परभणी महापालिका निवडणुक निकालांची मतमोजणी आहे. लातूरमध्ये भाजपने ७० पैकी ३८ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळविले आहे. भाजपखालोखाल काँग्रेसला ३१ जागी विजय मिळाला आहे. २०१२ मधील निवडणुकीत कॉंग्रेसला ४९, राष्ट्रवादीला १३, शिवसेनेला ६ व रिपाईंला २ जागा होत्या. त्यावेळी भाजपला शून्य जागा होत्या. आता भाजपने ० वरून ३८ वर झेप घेतली आहे, तर काँग्रेस ४९ वरून ३१ वर आली आहे. राष्ट्रवादीचा फक्त १ नगरसेवक निवडून आला असून इतरांना भोपळा मिळाला आहे. लातूरमध्ये मागील वर्षी पाण्याची भीषण टंचाई होती. नागरिकांना ३० दिवसातून फक्त १ दिवस नळाने पाणीपुरवठा केला जात होता. परंतु राज्य सरकारने रेल्वेच्या सहाय्याने निरजेहून लातूरला पाणी पाठवून पाणीटंचाईवर अंशतः तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. तब्बल एक महिन्याहून अधिक काळ रोज रेल्वेने २५ लाख लिटर पाणी पुरविले जात होते. त्याच बरोबरीने जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे केल्यामुळे यावर्षी लातूरला पाणीटंचाई जाणवली नाही. लातूरचे विलासराव देशमुख तब्बल ८ वर्षे मुख्यमंत्री पदावर होते. त्याव्यतिरिक्त ते अनेक वर्षे राज्यात व केंद्रात मंत्री होते. लातूरचे एक दुसरे मातब्बर नेते शिवराज पाटील अनेक वर्षे केंद्रात मंत्री होते. या दोघांना लातूरकरांनी अनेकवेळा निवडून देऊनसुद्धा त्यांनी लातूरकरांकरता फारसे काही केले नाही हे दिसून आले. नागरिकांनी राज्य सरकारने पाणीटंचाई कमी करण्याच्या केलेल्या प्रयत्नांना मतपेटीच्या माध्यमातून दाद दिलेली दिसत आहे. चंद्रपूरमधील ६६ पैकी ३१ जागांवर भाजप आघाडीवर आहे तर काँग्रेस फक्त ११ जागांवर आघाडीवर आहे. २०१२ मध्ये चंद्रपूरमध्ये काँग्रेसने विजय मिळविला होता. परभणी महापालिका काँग्रेस राष्ट्रवादीच्या ताब्यातून हिसकावून घेण्याची शक्यता आहे. महापालिकेतील ६५ जागांपैकी ३१ जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे,. भाजप ८ आणि शिवसेना व राष्ट्रवादी प्रत्येकी ७ जागांवर आघाडीवर आहेत. २०१२ मध्ये परभणीत राष्ट्रवादीला ३० जागा मिळाल्या होत्या, तर भाजपला फक्त २ जागा मिळाल्या होत्या. एकंदरीत दोन महिन्यांपूर्वी झालेल्या १० महापालिकांच्या निवडणुकीतील कल अजूनही कायम आहे. आतापर्यंत झालेल्या १३ महापालिका निवडणुकीमध्ये भाजपने ७ महापालिकात स्पष्ट बहुमत मिळविले आहे, एका महापालिकेत बहुमताच्या दिशेने वाटचाल आहे तर २ महापालिकांमध्ये सर्वाधिक जागा मिळविलेल्या आहेत. २०१२ मध्ये भाजप या १३ महापालिकांपैकी फक्त १ महापालिकेत सत्तेवर होता. त्या तुलनेत भाजप आता एकूण १० महापालिकांमध्ये सत्तेवर असणार आहे. या तीन महापालिकेत मनसेला २०१ पैकी फक्त १ जागा मिळाली आहे. राष्ट्रवादीला १२ व शिवसेनेला फक्त ७ जागा आहेत. एकंदरीत मनसेपाठोपाठ हे दोन पक्षसुद्धा अस्तित्वहीन होण्याच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहेत.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 04/21/2017 - 10:44 नवीन
काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काही दिवसांपूर्वी वातानुकुलीत बसमधून काढलेल्या 'संघर्ष यात्रा' नामक नौटंकीचा सुद्धा नागरिकांवर परीणाम झालेला दिसत नाही.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Fri, 04/21/2017 - 10:51 नवीन
लातूर आणि चंद्रपूरमधील ई.व्ही.एम हॅक केलेली होती पण परभणीतील ई.व्ही.एम मात्र एकदम परफेक्ट होती. या महापालिका निकालांचा अर्थ हाच आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Fri, 04/21/2017 - 11:27 नवीन
ळॉळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
प
प्रसाद_१९८२ Fri, 04/21/2017 - 13:20 नवीन
लातूर व चंद्रपुर मधील पराभवाचे खापर, कॉंग्रेजचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ई.व्ही.एम व मुख्यमंत्री फडणविस यांच्यावर फोडायला सुरुवात देखील केलेय. त्यांच्या मते भाजपाने सत्तेचा दुरुपयोग करुन दोन्ही ठिकाणी सत्ता स्थापन केली आहे. मात्र परभणीत, सत्तेचा दुरुपयोग भाजपाने का केला नाही यावर त्यांनी माध्यमांत अजिबात भाष्य केले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
व
वरुण मोहिते Fri, 04/21/2017 - 11:00 नवीन
ह्यांच्यावर दाखवलेला मुख्यमंत्र्यांनी विश्वास सार्थ झाला . विलासराव गेल्यानंतर हे होणारच होते . त्यात पालकमंत्री संभाजीरावांची उमदी कार्यपद्धती लोकांना आवडली अमित देशमुखांच्या तुलनेत . शिवाय पारंपरिक लिंगायत मतांचा भाजप ला फायदा झालाच अनेक वर्ष हे मतदार भाजप चे होते परंतु विलासराव असेपर्यंत ते साध्य झालं नाही . परभणीत राष्ट्रवादीला धोक्याची घंटा आहे तसाच काँग्रेस ला उभारी देणारा निकाल आहे . मनसेच्या २ जागा आहेत वाटत .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा