महापालिका, जिल्हा परीषद निवडणूक निकाल
महापालिका व जिल्हा परीषद निवडणूक निकालांसाठी धागा.
http://www.loksatta.com/bmc-elections-2017/bmc-election-2017-exit-polls-results-pmc-elections-2017-exit-polls-results-thane-municipal-corporation-election-bjp-shivsena-congress-ncp-1415185/
इंडिया टुडे आणि अॅक्सिसने केलेल्या एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना सर्वांत मोठा पक्ष ठरण्याची शक्यता असून, भाजपच्या जागांमध्येही लक्षणीय वाढ होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. इंडिया टुडे आणि अॅक्सिसने केलेल्या एक्झिट पोलनुसार, शिवसेनेला मुंबईत ८६ ते ९२ जागा मिळण्याची शक्यता आहे. त्या खालोखाल भाजपला ८० ते ८८ जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. २०१२ मधील निकालांचा विचार केल्यास भाजपच्या जागांमध्ये लक्षणीय वाढ होण्याचा अंदाज या एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे. काँग्रेसमधील अंतर्गत नाराजीचा परिणाम एक्झिट पोलमध्येही दिसून येतो आहे. काँग्रेसला ३० ते ३४ जागांवर तर राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ ३ ते ६ जागांवरच यश मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. भाजप व शिवसेना या दोघांनाही ३२% मते मिळतील असा अंदाज आहे.
पुणे महापालिकेत सत्तांतर होण्याचा अंदाज एक्झिट पोलने वर्तविला आहे. पुण्यात गेल्या १० वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेवर आहे. पण या निवडणुकीत भाजपला पुण्यात स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज एक्झिट पोलने वर्तविला आहे. एकूण १६२ जागांपैकी ७७ ते ८५ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसला ६० ते ६६ जागा मिळण्याची शक्यता आहे.
ठाण्यामध्ये शिवसेना सत्ता राखण्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे. या महापालिकेत विशेष म्हणजे भाजप तिसऱ्या क्रमांकावर घसरण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस २९ ते ३४ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
नागपूर महापालिकेत भाजपच पुन्हा सत्तेवर येण्याचा अंदाज वर्तविण्यात आला असून, भाजपला ९१ ते १०० जागा मिळण्याची शक्यता आहे. या महापालिकेत एकूण १५१ जागा आहेत.
मुंबई -
शिवसेना – ८६ ते ९२
भाजप – ८० ते ८८
काँग्रेस – ३० ते ३४
मनसे – ५ ते ७
राष्ट्रवादी – ३ ते ६
पुणे -
भाजप – ७७ ते ८५
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस – ६० ते ६६
शिवसेना – १० ते १३
ठाणे -
शिवसेना – ६२ ते ७०
राष्ट्रवादी काँग्रेस – २९ ते ३४
भाजप – २६ ते ३३
नागपूर -
भाजप – ९१ ते ११०
काँग्रेस – ३५ ते ४१
शिवसेना – २ ते ४
_________________________
एबीपी माझा च्या अंदाजानुसार पिंचि मध्ये राष्ट्रवादी, नाशिकमध्ये सेना आणि अकोला, अमरावती व सोलापूर मध्ये भाजप प्रथम क्रमांकावर असेल.
_________________
दिल्ली व बिहार च्या कटु अनुभवापासून मी कोणत्याही सर्वेक्षणावर विश्वास ठेवणे बंद केले आहे.
(बारामतीपेक्षा कराड अजून धुळखाऊच दिसतं म्हणून एक भाबडा प्रश्न. का ३ वर्ष पुरेसे नव्हते कराड सुधारायला?)मुख्यमंत्री अख्ख्या महाराष्ट्राचा असतो बर्र का..मग बारामतीचा का विकास झाला ?विकासाच्या व्याख्या बोला. तसे म्हणाल तर मी पण घराच्या बाल्कनीत मला आठवड्याला पुरून शेजारच्यांच्या घरी निर्यात करता येईल इतकी भाजी पिकवतो. करूया का तुलना..? ;)गावाकडेच लक्ष द्यायचं असतं तर सगळ्या मुख्यमंत्र्यांना १०% पण साध्य का झालं नाही .?ते संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करणारे मुख्यमंत्री असतील. आपल्या गावाचा विकास करूया बाकी लोकांना वार्यावर सोडूया असा अॅप्रोच नसेल त्यांचा.१८ मुख्यमंत्री झाले आजवर सगळ्यांनी उत्तम विकास करायला हवा होतामग केला नाही का विकास..? १ मे १९६० पासून पक्ष आणि मुख्यमंत्र्यांचा कार्यकाल काढला तर काँग्रेस - ८७% (१८,०२१ दिवस) शिवसेना - ८% (१,६७८ दिवस) भाजपा - ४% (८४५ दिवस) राष्ट्रपती राजवट १% (१४५ दिवस) कुणाला जास्त संधी होती म्हणे..? का तुमच्या अपेक्षेप्रमाणे विकास न झाल्याचे खापर राष्ट्रपतींवर फोडूया..? (नै, भाजपावर खापर फोडून तुम्हालाही कंटाळा आला असेल म्हणून राष्ट्रपतींचे नाव सुचवले - तेवढाच बदल.)म्हणजे आपण जर म्हणत असाल कि विकास फक्त तिथेच लक्ष देऊन झालादाखवून द्या बरं मी असे कुठे म्हणालो आहे ते.. (बारामतीपेक्षा कराड अजून धुळखाऊच दिसतं म्हणून एक भाबडा प्रश्न. का ३ वर्ष पुरेसे नव्हते कराड सुधारायला?) या वाक्याच्या संदर्भाने बोलत असाल तर ते विशुमीत. उदो उदो करणारे तेच ते.पण नेहमी चुकीचा प्रचार होतो हे घातक आहे .मोघम बोलू नका हो. कुणी चुकीचा प्रचार केला. कसा केला ते सांगा.भाजप च्या झालेल्या चुका ह्यावर कोणी हिरीरीने बोलाय का इकडे ..मोदी काय बोले ह्यावर कोणी मत मांडलाय का?तेच सांगतोय, तुम्ही अभ्यास करा आणि लेख लिहा.बाकी मला काय मी राष्ट्रपती काय भाजप काय सगळ्यांवर बोलेन समोरचा माणूस निष्पक्ष असला तर निश्चित .नुसते बोलायला कांही श्रम लागत नाहीत. अभ्यास करा आणि बोला. धागा काढायला कांही मदत लागली तर जरूर सांगा.