Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लग्नाचा उद्देश काय!!!! सेक्सची सोय? साहचर्य? की आणखी काय??????

ट
टर्बोचार्जड फिलॉसॉफर
Tue, 05/16/2017 - 10:44
🗣 253 प्रतिसाद
लग्न ही संस्था कशी अस्तित्वात आली यावर समाजशास्त्रज्ञांनचं एकमत आहे.पुर्वापार पुरुष हे अपत्याला पोसत असल्याने होणारे अपत्य आपलेच असले पाहीजे हा रोख होता ,त्यातून स्त्रीला स्वतःशी बांधुन ठेवले तर तिच्यापासून होणारे अपत्य आपलेच असेल याची बर्यापैकी खात्री असते.यातूनच विवाहसंस्था अस्तित्वात आली.भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास या वि का राजवाडे यांच्या पुस्तकानुसार पुर्वी मुक्त लैंगिक संबंध चालायचे.पुढे ते कमी होत एकपत्नीव्रताला ग्लॅमर आले.मुक्त लैंगिक संबंधात कामभावनेचा निचरा योग्य प्रमाणात होतो हे मी माझ्या आधीच्या एका धाग्यात मांडले होते,अनेकजण त्याच्याशी सहमतही होते. तर ही मुक्त व्यवस्था बंद पडल्याने पुरुषांची पंचाईत झाली .मग ते बिचारे लग्न या एकाच गोष्टीकडे " लैंगिक भावनेचा निचरा म्हणून पाहू लागले.भारतातलं लैंगिकतेला अनैसर्गीक समजण्याचं हिंदूंचं धोरण विवाहसंस्थेला बळकट करु लागले .यात मग स्त्री चे वस्तुकरण होणे अपरिहार्य होते. आजकाल विवाहाचा उद्देश काय हे जेव्हा माझ्या मित्रांना मी विचारतो तेव्हा सेक्सची सोय असे उत्तर मिळते.कुणी फार पुढे जाऊन दोन जिवांचे मिलन,सृजनशिलता,साहचर्य(companionship) अशी मखलाशी करत असतात.प्रत्यक्षात बायकोशिवाय इतरही स्त्रीयांकडे वखवखलेल्या नजरेने हे कल्पितानंदही बघत असतात. प्रत्यक्षात लग्न हा माझ्यामते पुरुषाच्या अनावर कामेच्छेला मोकळी वाट करुन देण्याचा एक करार आहे ,बाकी काही नाही. दो बदन एक जान,अर्धांगिनी,बेटर हाफ,सृजन वगैरे कविकल्पना म्हणून ठीक असतील पण प्रत्यकषात निसर्गाचे नियम फार वेगळे असतात.हा माझा दृष्टीकोण असेल कदाचित पण त्याला वास्तवाची किनार निश्चित आहे. तर,मिपाकरांना याविषयी काय वाटते ते जाणून घ्यायला आवडेल. १ .लग्न ही व्यवस्था "सेक्सची सोय म्हणून आहे असे आपल्याला वाटते का? नसल्यास का नाही? २.एकपत्नीव्रत ह्याला आपला समाज आदर्श मानत असेल तर बहुतांश विवाहीत पुरुष इतर स्त्रीयांकडे कोणत्या उद्देशाने पाहतात्? ३.सिधि बात नो बकवास" याचं भारतीयांना वावडं का आहे? चर्चेदरम्यान येणारे मुद्दे धाग्यात समाविष्ट केले जातील ,धन्यवाद.

प्रतिक्रिया द्या
73332 वाचन

💬 प्रतिसाद (253)
स
संजय क्षीरसागर Wed, 05/17/2017 - 10:54 नवीन
एकतर यांची समज कमी हे वेळोवेळी दाखवून दिलं आहे कारण यांच्या प्रतिसादाला काहीही आगापिछा नसतो. त्यात सदस्याला स्वतःचं संकेतस्थळ असल्यासारखी, काहीही संबोधण्याची यांची हिंमत कशी होते ? या आयडीला योग्य ती समज द्यावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
द
दशानन Wed, 05/17/2017 - 11:42 नवीन
परत निरर्थक प्रतिसाद! अहो जे तुम्ही चुकीचे बोलले /लिहले आहे त्याबद्दल माफी मागा. चूक मान्य करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
अ
अभ्या.. Wed, 05/17/2017 - 12:03 नवीन
क्षणभर मला इथे "मी मराठी " असल्याचा भास झाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
स
संजय क्षीरसागर Wed, 05/17/2017 - 13:25 नवीन
क्षणभर मला इथे "मी मराठी " असल्याचा भास झाला. एखादा कायम भ्रमातच असेल तर त्याला वास्तवाची कल्पना येणं अवघड असतं म्हणतात :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
द
दीपक११७७ Wed, 05/17/2017 - 12:03 नवीन
संजय क्षीरसागर आणि टर्बोचार्जड फिलॉसॉफर हे एकाच व्यक्तिचे दोन ID आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
स
संजय क्षीरसागर Wed, 05/17/2017 - 13:30 नवीन
संकेतस्थळावर व्यक्तीची ओळख त्याच्या लेखनशैलीमुळे असते. तुम्ही एकदम नवखे दिसता त्यामुळे असा गैरसमज झाला आहे. माझे प्रतिसाद वाचत चला, गैरसमज दूर होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दीपक११७७
द
दीपक११७७ Wed, 05/17/2017 - 13:55 नवीन
हे सगळे तुमच्या मागे का लगले आहेत. बरेचदा सर्व प्रतिसाद वचुन सुध्दा कळले नाही. म्हणुन विचारले. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Wed, 05/17/2017 - 14:13 नवीन
माझी मतं ही प्रचलित समाजधारणांविरुद्ध असतात त्यामुळे सदस्यांच्या कल्पनांना धक्का बसतो आणि मग सदस्य मला कोंडीत पकडायचा प्रयत्न करतात, जेणे करुन त्यांच्या कल्पना पुन्हा प्रस्थापित होतील. आता इथेच बघा, विवाह हे बंधन आहे अशी बहुतेकांची ( म्हणजे जवळजवळ सर्वांचीच !) धारणा आहे आणि त्यांचा मुक्त लैंगिक व्यवस्थेला (मनातल्या मनात का होईना :) ) पाठींबा आहे ! माझं मत विवाह संकल्पनेला अनुकूल आहे आणि ती केवळ दोघातली मान्यता असल्यामुळे ते बंधन असू शकत नाही असा दावा आहे. त्यामुळे सदस्य मला कॉर्नर करायच्या प्रयत्नात आहेत आणि मला उत्तरं द्यायला मजा येतेयं !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दीपक११७७
प
प्रसाद गोडबोले Wed, 05/17/2017 - 09:25 नवीन
लग्न हा एक अतिषय निरर्थक प्रकार आहे , ह्या विषयावर आमच्या गुरुदेव ओशोन्नी एक अप्रतिम प्रवचन दिले आहे : OSHO: Marriage and Children - YouTube https://www.youtube.com/watch?v=5ocbZhRQS9I ह्या पेक्षा जास्त आम्हाला काहीही बोलायचे नाही . असो.
  • Log in or register to post comments
स
सानझरी Wed, 05/17/2017 - 12:01 नवीन
+1.. मी पण हीच लिंक डकवणार होते इथे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
स
संजय क्षीरसागर Wed, 05/17/2017 - 13:14 नवीन
पण तुम्ही दिलेल्या लिंकमधे ते साफ चुकले आहेत. दुर्दैवानं ते माझा प्रतिवाद करु शकत नाहीत पण ते करुही शकले नसते हे मात्र नक्की. एनी वे, तुम्हाला ते विचार पटले आहेत तर तुम्ही प्रतिवाद करुन दाखवा. १) ओशो म्हणतात लग्नापेक्षा स्वातंत्र्य महत्त्वाचं आहे ओशोंना कल्पनाच नाही की स्वातंत्र्य ही धारणारहित चित्तदशा आहे आणि विवाह ही केवळ मान्यता आहे. कोणतीही `मान्यता' (ती एकदा मान्यता आहे हा उलगडा झाला की), स्वातंत्र्याला बाधा आणू शकत नाही. २) ओशो म्हणतात की विवाहोत्तर संभोग हा ड्यूटी म्हणून केला जातो आणि स्त्रीच्या अनिच्छेनं केला जातो. दुर्दैवानं ओशोंना एकमेकांप्रती अनुबंध असणारी जोडपी माहिती नाहीत. विवाहोत्तर संभोग हा एकमेकांप्रती कृतज्ञता दर्शवण्यासाठी आणि परस्परांना सुख देण्यासाठी केला जातो याची त्यांना सुतराम कल्पना नाही. ३) ओशो म्हणतात अपत्य ही कम्युनची जवाबदारी असेल ! ओशो कम्युननं अशा एकाही बालकाची जवाबदारी स्वीकारलेली नाही. आणि जगात आजतागायत अनाथालयाशिवाय अशी जवाबदारी स्वीकारणारी कोणतीही संस्था नाही. माझी आज सुद्धा कम्युनची मेंबरशिप आहे. मला तिथले मुक्त लैंगिक संबंधवाले पुरते माहिती आहेत. त्यांना आता लाइक माइंडेड पार्टनर मिळणं अशक्य झालं आहे कारण वय झाल्यावर स्त्रीला तर कुणी विचारत नाहीच आणि वयस्क पुरुषाला तरुणी मिळणं अशक्य झालं आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो. ओशोंनाही मृत्यूपूर्वी स्वतःची चूक लक्षात आली ! ती अशी की पब्लिकला सत्यामधे इंटरेस्टच नाही त्यांना फक्त नव्या पार्टनरमधे रस आहे ! म्हणून ओशो सुद्धा शेवटी म्हणाले की तुम्ही अनेक व्यक्ती एक्सप्लोअर करा पण शेवटी एकाशी सेटल व्हा....अर्थात, तोपर्यंत वेळ निघून गेली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
अ
अद्द्या Wed, 05/17/2017 - 13:36 नवीन
माझा प्रतिवाद करु शकत नाहीत पण ते करुही शकले नसते हे मात्र नक्की
साहेब.. तुम्ही त्यांना गुरु स्थानी मानता असं कुठे तरी वाचलं होत मी.. म्हणजे .. कॉन्फिडन्स असण्याबद्दल काहीच हरकत नाही.. पण हे जरा अति होतंय का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Wed, 05/17/2017 - 13:51 नवीन
पण ओशोंच्या या विचारसरणीमुळे अनेकांच्या जीवनाची वाट लागली ही वस्तुस्थिती आहे. ते म्हणाले होते की सर्व जग हे एक कम्युन होईल तेव्हा पृथ्वी स्वर्ग होईल. पण जिथे त्यांचा कम्युनच, स्वतः ओशो हयात असतांना, सदस्यांच्या अपत्यांची जवाबदारी स्वीकारायला तयार नव्हता (आणि आता तर शक्यच नाही), तिथे सर्व जगात मुक्त लैंगिक संबंध आणि अपत्यही समाजाची जवाबदारी कशी होईल? तस्मात, सामाजिक सुव्यवस्था आणि अपत्याची जवाबदारी यासाठी विवाहसंकल्पनेला पर्याय नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या
अ
अद्द्या Wed, 05/17/2017 - 14:31 नवीन
बरं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
व
विशुमित Wed, 05/17/2017 - 14:20 नवीन
<<<तुम्ही त्यांना गुरु स्थानी मानता असं कुठे तरी वाचलं होत मी.. म्हणजे .. कॉन्फिडन्स असण्याबद्दल काहीच हरकत नाही.. पण हे जरा अति होतंय का ?>>> ==>> गुरु सुद्धा चुकू शकतात ना ? किती ही शिकलेसवरले तरी वैचारिक गुलामगिरी सोडायला कोणी तयार होत नाही, हे दुर्दैव्य. गुरु जे सांगेल ते अंतिम सत्य या विचारसरणी मुळेच तर टनटणी, आसाराम, बाबा, बापूंचे पीक फोपवले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या
स
संजय क्षीरसागर Wed, 05/17/2017 - 14:50 नवीन
थोडा फरक आहे. ओशो सिद्ध होते याबद्दल मला कणमात्र शंका नाही आणि त्याबाबतीत जगातल्या कुणाशीही आणि कोणत्याही फोरमवर मी प्रतिवादाला तयार आहे. पण ओशोंचा विवाहाकडे बघण्याचा दृष्टीकोन चुकीचा होता कारण जी जोडपी त्यांनी बघितली (इन्क्लूडींग हीज ओन पॅरेंटस !) ती सर्व विवाहाला "वास्तविकता" मानत होती. त्यामुळे विवाह ही सुद्धा एक मजेची गोष्ट असू शकते हे त्यांच्या लक्षात आलं नाही. मी कम्युनला गेलो तेव्हा ओशो नव्हते आणि माझं लग्न झालेलं होतं ! त्यामुळे मला तिथल्या तरुणींपेक्षा सत्यशोधनात इंटरेस्ट होता. शिवाय पत्नीशी मी उत्तम धागे जुळवले होते त्यामुळे तिलाही मी तिथे नेलं (तीनं त्यात पुढे काही रस घेतला नाही ती गोष्ट वेगळी) पण माझी कार्डस ओपन होती. तस्मात, विवाह हे ओशोंच्या दृष्टीनं बंधन असेल, माझ्या दृष्टीनं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
स
सूड Wed, 05/17/2017 - 13:38 नवीन
सर असंच ज्ञान द्देत रहा सर!! नाहीतर या प्रगोसारखे ओशोच्या प्रेमात आंधळे झालेले सदस्य लोकांची दिशाभूल करत राहतील. तुम्हीच एक तारणहार आहात घनिष्ट संबंधातली गुंतागुंत समजून सांगायला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
प
प्रसाद गोडबोले Wed, 05/17/2017 - 15:20 नवीन
नमस्कार संक्षी सर ! सर्वात महत्वाचे म्हणजे : हा प्रतिसाद देवुन मी तुमचा प्रतिवाद करायचा प्रयत्न करत नाहीये , मी केवळ माझ्या आकलनावरुन जे काही माझे मत बनले आहे ते मांडत आहे. माझे मत सार्वत्रिक सत्य असेल असे माझे म्हणणे नाही . तसेच ओशो सरही सार्वत्रिक रित्या योग्यच असतील असे ही माझे म्हणणे नाही . जो तो माणुन ज्याच्या त्याच्या जागी आणि ज्या त्या काळी योग्य असतो ( असे माझे वैयक्तिक मत आहे ). १ ) लग्न ह्या संकल्पनेला माझ्या मते अनेक पैलु आहेत : त्यातील महत्वाचे म्हणजे धार्मिक सामाजिक आर्थिक आणि वैयक्तिक. आता धार्मिक दृष्टीने पहायला गेल्यास आजकाल च्या लग्नात जे काही होते तसले काही माझ्या धर्मात अपेक्षित नाही , रादर माझ्या धर्मात लग्ना विषयीच्या ज्या संकल्पना आहेत त्यांत निधर्मी राजसत्तेने घुसखोरी करुन नसत्या संकल्पना घुसवल्या आहेत. तस्मात धार्मिक दृष्टीने मला आजकालची लग्न संकल्पना निरर्थक वाटते. सामाजिक पैलुने पहायला गेल्यास लग्न हे एक प्रकारचे अ‍ॅव्हरेजिंग ऑऊट चाच प्रकार आहे जो की अ‍ॅन्टी नॅचरल आहे असे मला वाटते . प्रत्येकाला प्रजोत्पादनाची संधी मिळालीच पाहिजे असा काहीसा हट्ट आहे त्यात. ह्यामुळे नॅचरल सिलेक्शन चा मुलभुत नैसर्गिक नियम ओव्हर राईड केला जातो असे मला वाटते . आर्थिक पैलुतुन पहायला गेल्यास मात्र लग्न ही संकल्पना सेन्सिबल वाटते कारण पुरुष हे सहसा फक्त विकासाचा प्रगतीचा संमृध्दीचा मार्ग चोखळतात पण त्या नादात सस्टेनेबिलिटी हा महत्वाचा मुद्दा दुर्लक्षिला जातो , आणि योगा योगाने बायकांचा फोकस बहुतांश वेळा सस्टेनॅबिलीटी वर असतो . माझ्या वैयक्तिक अनुभवावरुन तरी किमान मला तसेच वाटते की माझे जर लग्न झाले नसते तर मी आज कमावतो त्या पेक्षा किमान दुप्पट तिप्पट पैसे कमावत असतो पण आज मी फॅमिली मॅन असल्यामुळे जितका लॉन्गटर्म वेल्थ क्रियेशन चा विचार करतो तितका केला नसता आणि बहुतांश पैसा असाच उडवला असता ! आणि लास्टली वैयक्तिक पैलुतुन पहायला गेल्यास मला लग्न ही संकल्पना निरर्थक वाटते कारण ज्या व्यक्तीवर मी प्रेम करतो तिच्या सोबत रहायला आणि सुखाने जयागला मला धर्माची राज्याची आणि समाजाची मान्यता घ्यावी लागते हा एक दुर्दैवी आणि मुर्ख प्रकार आहे असे माझे वैयक्तिक मत आहे ! प्रेम ही नैसर्गिक संकल्पना आहे आणि लग्न ही मानवनिर्मित सोय . आधी प्रेम महत्वाचे लग्न नाही केले तरी हरकत नाही ! ( कदाचित हा विचार तरुणांना पटत असावा म्हणुन सध्या तरी लिव्ह इन रिलेशनशिप हा प्रकार वाढताना दिसत आहे ) २) ओशो संभोग हा ड्युटी म्हणुन केला जातो असे म्हणल्याचे मला तरी आठवत नाही . परत एकदा क्लिप पहातो . ओशो म्हणालेत : प्रेम संपल्यानंतरही केवळ बंधन म्हणुन लग्नात रहायचे , अन अनिच्छेने त्याच व्यक्ती सोबत संभोग करायचा हे नॉन सेन्स आहे त्या पेक्षा एकामेकाला स्पष्ट सांगा की आपले प्रेम होते , आपण सुखाने काही काळीकाळ व्यक्त केला आता प्रेम संपले आहे आप्ण स्वतंत्र होवु , एकमेकाला त्रास देत जगण्यात काय अर्थ ? मलातरी हे विधान १००% पटते ! ३) ओशो म्हणतात की मुले ही कम्युनची जबाबदरी आहे हा विचार मलाही अतिरेकी आदर्शवादी वाटतो , एकदम समाजवाद किंव्वा साम्यवदासारखा ! ह्यावर सोप्पा उपाय म्हणजे प्रजोत्पादनाच्या आधीच स्त्री पुरुषांनी ठरवावे की मुलांची जबाब्दारी आणि ओनरशिप कोण घेनार ते ! मुलगा झाल्यास वडीलांनी जबाबदारी घ्यावी आणि मुलगी झाल्यास आईने ( किंव्वा व्हाईसव्हर्सा) हा सोप्पा थंबरुल असु शकतो ! आता राहिला तो महत्वाचा मुद्दा म्हणजे अध्यात्मिक : अध्यात्मिक मार्गात वाटचाल करताना शुन्य लग्न करणे , एक लग्न करणे किंव्वा अनेक लग्न करणे हे तेन्ही मार्ग मोक्षाप्रत नेणारेच आहेत. ब्रह्मचारी हनुमान किंवा एकपत्नी राम किंव्वा बहुपत्नी दशरथ तिघेही धन्यच आहेत ! धन्यो गृहस्थाश्रमः असे महाभारतात स्पश्टपणे म्हणलेले आहे ! पराशर मत्स्यगंधा, कृष्ण जांबुवंती , भीम हिडींबा, अर्जुन चित्रांगदा हे तर माझे एकदम आवडते कपल्स आहे , एकदम परफेक्ट मॅरेज! ! मग हे असे असताना राजसत्तेने किव्वा समाजाने ह्यातील एकाचाच हट्ट धरावा हे अनाकलनीय , अतार्किक आणि अनैसर्गिक आहे. ह्या असल्या विचित्र नियमांमुळेच सध्याच्या काळातील लग्न संस्था निरर्थक आणि रीडंडंट ठरते . इति शम |
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Wed, 05/17/2017 - 20:34 नवीन
थोडक्यात तुमच्या प्रतिसादाचं सार असं आहे : प्रेम ही नैसर्गिक संकल्पना आहे आणि लग्न ही मानवनिर्मित सोय . आधी प्रेम महत्वाचे लग्न नाही केले तरी हरकत नाही ! आणि त्याला सपोर्ट ओशोंचं हे विधान आहे : ओशो म्हणालेत : प्रेम संपल्यानंतरही केवळ बंधन म्हणुन लग्नात रहायचे , अन अनिच्छेने त्याच व्यक्ती सोबत संभोग करायचा हे नॉन सेन्स आहे त्या पेक्षा एकामेकाला स्पष्ट सांगा की आपले प्रेम होते , आपण सुखाने काही काळीकाळ व्यक्त केला आता प्रेम संपले आहे आप्ण स्वतंत्र होवु , एकमेकाला त्रास देत जगण्यात काय अर्थ ? मलातरी हे विधान १००% पटते ! हे प्रेम संपतं (किंवा संपलं) हे कुणी, केंव्हा आणि कसं ठरवायचं ? मुळात तुमची किंवा ओशोंची प्रेमाची व्याख्या काय आहे ? कारण असं जर संपणारं प्रेम असेल तर ते अर्ध्या तासातही संपू शकतं आणि ते रोज सकाळी उठल्यावर चेक करायला हवं ! मग पुन्हा नव्या प्रेमपात्राची सोय करा, अपत्य झाली असतील तर त्यांची व्यवस्था लावा, जर एकाच्या दृष्टीनं प्रेम संपलं आणि पार्टनरच्या लेखी प्रेम चालू असलं तर मग तो तिढा कसा सोडवणार ? माझ्या मते ओशोंचे विचार फार उथळ आहेत. विवाह हा इतका मॅच्युअर्ड डिसिजन आहे की तुमची पत्नी सर्वार्थानं तुमचाच एक भाग होते, कदाचित म्हणूनच तिला अर्धांगिनी म्हणतात. ज्या जोडप्यात असा अनुबंध असतो त्यांच्या मनात `प्रेम आहे किंवा संपलं' असा विचारच येत नाही. एकमेकांप्रती कृतज्ञतेचे इतके धागे गुंफले जातात की अशा व्यक्तीशी आपण सगळं आयुष्य शेअर करुन बसतो. तीनं केलेला सकाळचा चहा, तिनं आवरलेलं घरदार, तिनं अपत्य जन्माला घालून आपल्या जीवनात आणलेला आनंद, तिनं केलेला रोजचा स्वयंपाक, तिच्या दु:खात आपण तिला दिलेला हात, एकमेकांच्या हॉस्पिटलायजेशन्समधे अनुभवलेले अविस्मरणीय प्रसंग, आप्तांच्या मृत्यूप्रसंगी दोघांनी जागून काढलेल्या रात्री, तिच्या साथीनं केलेल्या सहली, तिच्याबरोबर साजरे केलेले आपले आणि नातेवाइकांचे सोहळे, तिच्या बरोबरीनं घेतलेला अपत्य संगोपनाचा आनंद, मुलामधे आणि आपल्यात निर्माण झालेला गोडवा........माय गॉड ! ओशोंनी हे अनुभवलेलंच नाही. अशा व्यक्तीचा सहवासच इतका मोलाचा असतो की प्रेमाची दुसरी व्याख्याच नाही. माझ्या अनुभवानं, ओशोंनी हे परस्पर अनुबंधाचं जगच पाहिलेलं नाही. त्यामुळे ओशोंना विवाह ही संकल्पनाच समजलेली नाही. त्यांचे विचार हे फक्त त्यांनी बघितलेल्या विसंवादी जोडप्यांवर आधारित आहेत आणि त्यांची प्रेमाची कल्पना अत्यंत बालीश आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
स
संजय पाटिल गुरुवार, 05/18/2017 - 06:56 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
व
विशुमित गुरुवार, 05/18/2017 - 07:39 नवीन
सिम्पली ग्रेट प्रतिसाद ...!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
सानझरी गुरुवार, 05/18/2017 - 15:52 नवीन
+1.. असंच म्हणते..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
च
चित्रगुप्त गुरुवार, 05/18/2017 - 10:25 नवीन
@संक्षीसर, अतिशय सुंदर चपखल प्रतिसाद आहे वैवाहिक जीवनाबद्दल. बरेचदा ओशो हे भाषणाच्या प्रवाहात वाहवत जाऊन भलतेच काही, त्यांच्या प्रशंसकांना सुद्धा न पटण्यासारखे सांगताना दिसतात. कधी कधी मुद्दाम धक्कादायक विधाने करण्याची खोड त्यांना होती की काय, असेही वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
अ
अभिजीत अवलिया गुरुवार, 05/18/2017 - 16:14 नवीन
संक्षि, चांगला प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
प
प्रसाद गोडबोले Fri, 05/19/2017 - 13:36 नवीन
माझ्या मते ओशोंचे विचार फार उथळ आहेत.
आपल्या मताचा आदर आहे संक्षी सर ! मी आधीच म्हणालेलो कि जो तो ज्याच्या त्याच्या जागी आणि काळी योग्य असतो. ओशो ने जे अनुभवविश्व पाहिले त्यात ओशो योग्य होते , तुम्ही जे पाहिले आहे त्यात ते अयोग्य ठरु शकतात. इथे वादाचे काही कारण नाही !
हे प्रेम संपतं (किंवा संपलं) हे कुणी, केंव्हा आणि कसं ठरवायचं ? मुळात तुमची किंवा ओशोंची प्रेमाची व्याख्या काय आहे ?
प्रेम ही खुपच वैयक्तिक बाब असते आणि तस्मात त्याच्या व्याख्या व्यक्तीपरत्वे भिन्न असतात . ओशो ची व्याख्या काय होती मला माहीत नाही आणि माझी व्याख्याही वैयक्तिक असणार सार्वजनीन नाही ! ( मेंदुच्या कोणत्यातरी कोपर्‍यात डोपामाईन नावाचे केमिकल सिक्रीट झाल्यावर आपल्याला आनंदाची " आनंद " ह्या भावनेची जाणीव होते , एखाद्या व्यक्तीच्या सहवासाने किंव्वा नुसत्या आठवणीने आपल्याला अशा आनंदाची जाणीव होत असेल तर त्याला मी प्रेम म्हणतो. तुम्ही ये तेरा जिक्र है हे गाणे ऐकले आहे का गुझारिष चित्रपटातील तसे काहीसे ! किंव्वा तुम्ही धर्मवीर भारतींची कनुप्रिया वाचली आहे का ? एस्पिशली आम्रबौर के गीत की कविता ... तसे काहीसे , मी त्याला प्रेम म्हणतो ! आणि ही प्रेमाची व्याख्या जनरलाईझ करता येते , उदाहरणार्थ अशा कित्येक गोष्टी आहेत व्यक्ती नाहीत , वस्तु आहेत , जागा आहेत , आठवणी आहेत , अनुभव आहेत की त्यांच्या नुसत्या स्मरणाने ही आनंदाची अनुभुती येते . ह्या सार्‍यालच मी प्रेम म्हणतो ! आणि काही काही वेळा मग डोपामाईन सीक्रीट व्हायचे थांबु शकते , मग त्या व्यक्ती सोबत कितीही वेळ घालवा , त्यातुन कणमात्र आनंद होत नाही त्याला प्रेम संपणे म्हणतात. हे होतं , मी स्वतः अनुभवलंय , तुम्ही अनुभवलं नसेल तर तुम्ही नशीबवान आहात ! पण होतच नाही असे म्हणत असाल तर असो. ) प्रेम जसं होतं तसंच ते संपतेही , प्रेम संपण्याला एक्झ्यॅक्ट शब्द नाही पण हे होते हे नक्की ! आणि ते रोज सकाळि उठुन चेक करायची गरज पडत नाही , ते झाल्या क्षणी तुमच्या लक्शात येते !
ज्या जोडप्यात असा अनुबंध असतो त्यांच्या मनात `प्रेम आहे किंवा संपलं' असा विचारच येत नाही. एकमेकांप्रती कृतज्ञतेचे इतके धागे गुंफले जातात की अशा व्यक्तीशी आपण सगळं आयुष्य शेअर करुन बसतो. तीनं केलेला सकाळचा चहा, तिनं आवरलेलं घरदार, तिनं अपत्य जन्माला घालून आपल्या जीवनात आणलेला आनंद, तिनं केलेला रोजचा स्वयंपाक, तिच्या दु:खात आपण तिला दिलेला हात, एकमेकांच्या हॉस्पिटलायजेशन्समधे अनुभवलेले अविस्मरणीय प्रसंग, आप्तांच्या मृत्यूप्रसंगी दोघांनी जागून काढलेल्या रात्री, तिच्या साथीनं केलेल्या सहली, तिच्याबरोबर साजरे केलेले आपले आणि नातेवाइकांचे सोहळे, तिच्या बरोबरीनं घेतलेला अपत्य संगोपनाचा आनंद, मुलामधे आणि आपल्यात निर्माण झालेला गोडवा........माय गॉड !
हे सगळे करायला लग्न ह्या धार्मिक विधीची किंव्वा सामाजिक मान्यतेची किंव्वा सरकारी अ‍ॅप्रुव्हल ची काय गरज हे कळाले नाही . लग्न न करताही हे सारे होतेच की ! मी आधी म्हणल्याप्रमाणे सध्यस्थीतीतल्या लग्न ह्या संकल्पनेतेत एक अडकलेपणा आहे. प्रेम फक्त एकदाच होते / एकदा तरी होतेच. असे कोठे तरी गृहीतक आहे . ते तसे का आहे हे माहीत नाही . काही काही लोकांना प्रेम होतच नाही मग त्यांन्नी लग्न ह्या भानगडीत का पडावे ? ( माझ्या नात्यातली अगदी जवळची एक व्यक्ती आहे की जिने घरी स्पश्ट सांगितले आहे की मला हे प्रेम बिम काही जाणवत नाही , आणि जोवर जाणवत नाही तोवर 'केवळ वय निघुन चाललय' ह्या कारणास्तव लग्न करणार नाही !!) तसेच प्रेम संपलं म्हणुन विवाहबंधनातुन बाहेर पडलेले काही मित्र मैत्रीणी आहेत, केवळ लग्न नावाचा काहीतरी कृत्रीम संस्कार झालाय म्हणुन उगाचच कुढत कुढत एकत्र रहायचं ह्याला काही अर्थ नाही !
माझ्या अनुभवानं, ओशोंनी हे परस्पर अनुबंधाचं जगच पाहिलेलं नाही. त्यामुळे ओशोंना विवाह ही संकल्पनाच समजलेली नाही. त्यांचे विचार हे फक्त त्यांनी बघितलेल्या विसंवादी जोडप्यांवर आधारित आहेत आणि त्यांची प्रेमाची कल्पना अत्यंत बालीश आहे.
परस्पर अनुबंध निर्मांन होणे ही एक नैसर्गिक गोष्ट आहे , त्याला लग्ना सारख्या कृत्रीम विधीची गरज नाही. ओशोंनी विसंवादी जोडपी पाहिली असतील म्हणुन त्यांचे मत प्रतिकुल बनले असेल पण मी सुसंवादी जोडपीही पाहिली आहेत की ज्यांच्या कडे पाहुन एकच जाणवते की ह्यांनी लग्न केले नसते तरी काहीही फरक पडला नसता , लग्नाअधी लिव्ह इन मध्ये असताना ह्यांचे एकमेकांवर जितके जिवापाड प्रेम होते तितकेच आत्ताही आहे ! असो. प्रेम म्हणा किंव्वा लग्न हे सारे आयुष्याच्या अनेक पैलुंपैकी एक आहेत , प्रत्येकाच्या जडणघडणी नुसार , अनुभव विश्वानुसार त्यांच्याकडे पहाण्याचा दृष्टीकोन भिन्न भिन्न असु शकतो , रादर असणारच . आयुष्य बहुरंगी बहुढंगी आहे ! कोणाचाही ज्याच्या त्याच्या जागी योग्यच आहे ! पण " केवळ माझाच दृष्टीकोन केवळ सत्य , बाकीचे असत्य ! लग्न संस्थेला पर्यायच नाही , किंव्वा असतील तर ते भिकारडे " ही एकांगी टोकाची मनोवृत्ती मध्यपुर्वेतील धर्मांच्या प्रभवाने आली असावी असे राहुन राहुन वाटते कारण आपल्या आर्य सनातन वैदिक हिंदु धर्मात तरी असला एकांगीपणा कोठेही दिसत नाही ! I accept and appreciate the beauty of diversity of thoughts ! Life is colorful , Don't see it through someone's monochrome goggles! || जय हनुमान || जय श्रीराम || जय श्री कृष्ण ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Fri, 05/19/2017 - 14:24 नवीन
१) आनंदाचा आणि डोपामाईनचा फारसा संबंध नाही ! आनंदही स्वतःची स्वतःशी कनेक्टिविटी आहे. ज्या व्यक्तीच्या सहवासात तुमची ही कनेक्टिविटी हरवत नाही (आणि तिचीही कायम राहाते) तो सहवास दोघांना प्रिय वाटतो. शिवाय तुम्ही म्हणता तसा आनंदाचा संबंध स्मृतीशी असेल तर तो नेहेमी क्षणिक असेल कारण स्मृतींचा पट फार भराभर बदलत असतो. तस्मात डोपामाईन एकीकडे सिक्रेट होतंय आणि दुसरीकडे थांबलंय असा प्रकार निदान माझ्या अनुभवात तरी होत नाही कारण त्यावर सहवासाचं सुख अवलंबूनच नाही ! २) हे सगळे करायला लग्न ह्या धार्मिक विधीची किंव्वा सामाजिक मान्यतेची किंव्वा सरकारी अ‍ॅप्रुव्हल ची काय गरज हे कळाले नाही सहमत आहे ! पण अपत्य जन्म, संगोपन आणि औरसत्त्वाचा नेमका मुद्दा तुम्ही वगळलायं आणि सहजीवनात तो अत्यंत महत्त्वाचा आहे. ज्यांना असा परिपूर्ण संसार करायचांय त्यांना विवाहावेगळा पर्याय काय ? अपत्याची गरज काय ? असा तुमचा स्टँड असेल तर मग लिव-इनची सुद्धा गरज काय ? मूड येतील तेव्हा, मूड येईल तिथे, दोघं आपपल्या घरी राहून सुद्धा, एकमेकांना भेटू शकतीलच की ! आणि मग एकावेळी अशा मल्टीपल लिव-इन्स चालू शकतील ! आज मूड आला तर हिच्याबरोबर, उद्या तिच्या आठवणीनं डोपामाईन सिक्रेट झालं (आणि नशिबानं तिचं सुद्धा झालं :) ! ) तर तिच्याबरोबर, मग बरेच दिवस डोपामाईन सिक्रेट झालं नाही तर एकटंच खानावळीत जेवायचं आणि ते कधी सिक्रेट होतंय त्याची वाट बघायची ! ३) " केवळ माझाच दृष्टीकोन केवळ सत्य , बाकीचे असत्य ! लग्न संस्थेला पर्यायच नाही , किंव्वा असतील तर ते भिकारडे " पर्याय तर सांगा ना ! ज्याला अपत्य हवंय आणि ज्यांच्या अपत्याला औरसत्त्व हवंय त्यांना लग्नावेगळा पर्याय काय आहे ? लिव-इनमधे अपत्य झाली आणि अचानक रात्रीत डोपामाईन सिक्रेट होत नाही असा साक्षात्कार झाला तर मुलांनी कुणाकडे बघायचं ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
स
संजय क्षीरसागर Fri, 05/19/2017 - 14:33 नवीन
लिव-इनमधे अपत्य झाली आणि अचानक रात्रीत `डोपामाईन सिक्रेट होत नाही' असा साक्षात्कार झाला तर मुलांच्या डोपामाईनचं कुणी बघायचं ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
प
प्रसाद गोडबोले Fri, 05/19/2017 - 14:54 नवीन
पर्याय तर सांगा ना !
सध्याच्या फक्त एक आणि एकच प्रकारच्या प्रचलीत लग्न ह्या प्रकाराला अनेक पर्याय आहेत संक्षी सर ! १) लग्न न करता ब्रह्मचारी रहाणे २) लग्न न करता लिव्ह इन रिलेशनशीप मध्ये रहाणे ३) एकाशी लग्न करणे ४) एकीशी लग्न करणे ५) अनेकांशी लग्न करणे ६) अनेकांशी लग्न करणे ७) अनेकांशी आणि अनेकींशी लग्न करणे ८) मुक्त लग्न करणे ९) समुह लग्न करणे १०) लग्न किंव्वा सहवासही न करता एकामेकाच्या प्रेमात रहाणे !! ११)... १२).... खुप पर्याय आहेत सर पण ते मध्यपुर्वेतील विचारसरणी स्विकारलेल्या लोकांना समजावणे अशक्य आहे Image removed. बाकी औरसत्व एक अत्यंत वाईट संकल्पना आहे , ह्या संकल्पनेने कित्येक निष्पाप लोकांचे आयुष्य जन्माला यायच्या आधीच उध्द्वस्त केले आहे ! ह्या असल्या खुळचट संकल्पना माणुस प्रजाती किती काळ गोंजारत रहाणार आहे देव जाणे ! माझ्या स्पर्मने जन्म झालेले प्रत्येक मुल माझेच असेल. माझेच ! औरस / अनौरस असला फरक नाही ! असो. अजुन चर्चा केली असती पण तुम्ही असे म्हण्त आहात की .... १) आनंदाचा आणि डोपामाईनचा फारसा संबंध नाही ! त्या मुळे इथेच थांबतो =))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
सुबोध खरे Fri, 05/19/2017 - 16:08 नवीन
प्रगो मेंदुच्या कोणत्यातरी कोपर्‍यात डोपामाईन नावाचे केमिकल सिक्रीट झाल्यावर आपल्याला आनंदाची " आनंद " ह्या भावनेची जाणीव होते , एखाद्या व्यक्तीच्या सहवासाने किंव्वा नुसत्या आठवणीने आपल्याला अशा आनंदाची जाणीव होत असेल तर त्याला मी प्रेम म्हणतो. हे मूलभूत गृहितकच चूक आहे. आज आपले आपल्या बायको बरोबर किंवा आईबरोबर भांडण झाले तर तिच्या आठवणीने सुद्धा डोके ठणकते. (आजच्या पुरते का होईना) याचा अर्थ आपले प्रेम नष्ट झाले का? दुर्दैवाने तुमची प्रेमात आणि हव्यास किंवा वासना यात गल्लत होते आहे. "प्रेम जसं होतं तसंच ते संपतेही , प्रेम संपण्याला एक्झ्यॅक्ट शब्द नाही पण हे होते हे नक्की" हे वाक्य असाच दृष्टिकोन दाखवते. आपल्या बायकोचे कुणाबरोबर तरी लफडे आहे या विचाराने अत्यंत क्षुब्ध झालेला माणसाला जेंव्हा हि धारणा/ कल्पना खोटी आहे म्हटल्यावर एकदम प्रेम कसे उफाळून येते? दोन मिनिटापूर्वी संपलं असं वाटलेलं प्रेम एकदम कसं तयार होतं? केवळ डोपामाईन हा एक पदार्थ घेऊन तुम्ही जो इमला उभारला आहे तो मुळात पोकळ आहे. प्रेम हि भावना अजून शास्त्रज्ञाना समजलेली नाही. त्यासाठी असंख्य न्यूरो केमिकलस ( सेक्स संप्रेरके न्यूरोट्रांसमीटर आणि न्यूरो पेप्टाइडस) जबाबदार आहेत केवळ डोपामाईन एकच नव्हे. आणि यांची एकमेकांत काय प्रक्रिया होते हे अत्यंत जटील आहे. ओशो याना सर्वज्ञ मानून तुम्ही त्यांच्या प्रवचनाचा आधार घेतला आहे म्हणून त्याचे लंगडे समर्थन करता आहात. परस्पर अनुबंध निर्मांन होणे ही एक नैसर्गिक गोष्ट आहे , त्याला लग्ना सारख्या कृत्रीम विधीची गरज नाही. बाकी औरसत्व एक अत्यंत वाईट संकल्पना आहे , तुम्ही एखाद्या मित्राची जमीन कसायला घेतलीत. त्याने तुम्हाला सांगितले मला तुमचा पुण्याचा फ्लॅट दे आणि त्याबदल्यात हि जमीन तुझी. मग तुम्ही ७/१२ आणि इतर कागदपत्रे का करता? एखाद्या गोष्टीला legitimacy (औरसत्व) हे महत्त्वाचे आहे. हेच औरसत्व तुमच्या प्रेम संबंधाला देण्यासाठी चार माणसांच्या साक्षीने लग्न केले जाते. "लग्न संस्थेला पर्यायच नाही , किंव्वा असतील तर ते भिकारडे " ही एकांगी टोकाची मनोवृत्ती मध्यपुर्वेतील धर्मांच्या प्रभवाने आली असावी " हि केवळ अशा ओशो हेच बरोबर या मनोवृत्तीतून आली आहे असे वाटते. आपल्याला माहिती असावे कि ज्ञानेश्वर माउली यांच्या आई वडिलांचे लग्नच झालेले होते (हा इतिहास आहे. पुराण किंवा कविकल्पना नाही.) जेंव्हा मध्यपुर्वेचा भारताशी फारसा संपर्क आलेला नव्हता. तेंव्हा उछशृंखल वृत्तीला आधार देण्यासाठी चुकीचे संदर्भ देऊ नका. आपण उद्धृत केलेल्या लग्नसंस्थेच्या सर्व पर्यायात होणाऱ्या मुलांचा किंवा वृद्ध आईबापांचा विचार कुठेच दिसत नाही. वरिल सर्व पर्याय फक्त "farmyard morals" किंवा स्वैराचार दाखवतात एवढेच मी म्हणेन. केवळ मध्य पूर्वच नव्हे अति पूर्व अति पश्चिम अति उत्तर येथे असलेल्या संस्कृती मध्ये सुद्धा लग्नाला समर्थ पर्याय दिसत नाही. माझ्या स्पर्मने जन्म झालेले प्रत्येक मुल माझेच असेल. माझेच ! औरस / अनौरस असला फरक नाही ! तुमच्या एका मैथुनात निर्माण झालेल्या १० अब्ज शुक्राणूंपैकी कोणतया शुक्राणुंमुळे तुमचे मूल जन्माला आले हे तुम्हालाही सांगता येणार नाही. मग बरेच सहचर असणाऱ्या असलेल्या स्त्रीला कसे सांगता येईल हो? लक्षात ठेवा paternity is suspect, maternity is not. पितृत्व हे खात्रीचे नाही, मातृत्व आहे. अफाट संपत्ती असलेल्या माणसाची गोष्ट वेगळी पण optimum utilization of resources च्या आधुनिक जमान्यात तिसऱ्याच माणसाचे मूल वाढवायला तितकी संपत्ती नसलेले पण बेफाट स्वैर विचार असणारे किती पुरुष तयार होतील? उगाच सवंग लोकप्रियता किना सनसनाटी साठी बेफाट विधाने करता आहात असे दुर्दैवाने म्हणावे लागत आहे एकदा https://en.wikipedia.org/wiki/Biological_basis_of_love हे वाचू पहा आणि त्यानंतर त्याचे संदर्भही वाचून पहा. ते समजले कि मलाही समजवा. कारण मला "प्रेम आणि त्याची उत्पत्ती" समजलेले नाही. त्याची अनुभूती येते एवढे मात्र सत्य.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Fri, 05/19/2017 - 18:17 नवीन
नमस्कार सुबोध खरे सर ! हे मूलभूत गृहितकच चूक आहे. आज आपले आपल्या बायको बरोबर किंवा आईबरोबर भांडण झाले तर तिच्या आठवणीने सुद्धा डोके ठणकते. (आजच्या पुरते का होईना) याचा अर्थ आपले प्रेम नष्ट झाले का? दुर्दैवाने तुमची प्रेमात आणि हव्यास किंवा वासना यात गल्लत होते आहे. तुम्ही ना डॉक्टर एकदम एका ऑऊटलायर वरुन अनुमान काढत आहात : चला अजुन एक उदाहरण देवुन बोलु : मी म्हणतोय की माझे आंब्यावर प्रेम आहे , त्याच्या नुसत्या स्मरणाने माझ्या डोक्यात डोपामाईन सीक्रीट होतं आणि मला आनंद होतो, आता एखाददुसरा आंबा मला आंबट लागलेला नाही काय ? लागलाय की , पण चांगले लागलेल्या आंब्याच्या आठवणी त्या आंबट लागलेल्या आंब्याच्या स्मरणावर ओव्हर राईड करतात आणि म्हणुनच माझे आंब्यावर प्रेम आहे . आता समजा मला पुढचे काही सीझन फक्त आंबटच आंबे मिळत राहिले तर ती स्मृती स्ट्राँग होईल आणि मग मला आंब्याच्या आठवणीने डोपामाईन सीक्रीट होणार नाही , आणि मग मला आंबा आवडणे कमी होईल , आणि कालांतराने बंदही होईल , तेव्हा माझे आंब्यावरचे प्रेम संपले असेल ! सो सिंपल ! एका भांडणाने एक क्षण डोपामाईन सीक्रीट होणार नाही पण हीच प्रक्रिया कायम चालु राहिली तर त्या व्यक्तीच्या आठवणीने डोपामाईन व्ह्यायचे थांबेल तेव्हा मग मी प्रेम संपले असे म्हणेन ! काहीही गल्लत नाही सर्ळ स्ट्रेट फॉरवर्ड आहे ! ह्यात समजायला काय अवघड आहे हेच मला स्मजत नाहीये ! केवळ डोपामाईन हा एक पदार्थ घेऊन तुम्ही जो इमला उभारला आहे तो मुळात पोकळ आहे. प्रेम हि भावना अजून शास्त्रज्ञाना समजलेली नाही. त्यासाठी असंख्य न्यूरो केमिकलस ( सेक्स संप्रेरके न्यूरोट्रांसमीटर आणि न्यूरो पेप्टाइडस) जबाबदार आहेत केवळ डोपामाईन एकच नव्हे. आणि यांची एकमेकांत काय प्रक्रिया होते हे अत्यंत जटील आहे. असेलही , पण त्याने डोपामाईन्चे अर्ग्युमेन्ट वीक होत नाही . उल्ट स्ट्राँगच होते . डोपामाईन च्या ऐवजी क्ष्य्झ नावाची १७६० केमिकल्स असतील प्रेमाला कारण ! ती असतील तेव्हा त्याला प्रेम म्हणु , नसतील तेव्हा प्रेम संपले असे म्हणु !! ओशो याना सर्वज्ञ मानून तुम्ही त्यांच्या प्रवचनाचा आधार घेतला आहे म्हणून त्याचे लंगडे समर्थन करता आहात. हि केवळ अशा ओशो हेच बरोबर या मनोवृत्तीतून आली आहे असे वाटते. हे आप ण उगाचच खुस्पट काढत आहात . मी किमान २-३ वेळा वर म्हणालोय की जो तो ज्याच्या त्याचा जागी आणि काळी योग्य असतो . ओशो ओशोंच्या जागी संक्षी संक्षींच्या जागी आणि मी माझ्या जागी ! ओशो कुठेच चुकले नाहीत , ओशो देव आहेत असे मी कुठेतरी म्हणालोय का ? आपल्याला माहिती असावे कि ज्ञानेश्वर माउली यांच्या आई वडिलांचे लग्नच झालेले होते (हा इतिहास आहे. पुराण किंवा कविकल्पना नाही.) जेंव्हा मध्यपुर्वेचा भारताशी फारसा संपर्क आलेला नव्हता. ज्ञानेश्वरांचा संबंध लक्षात आला नाही . मी म्हणालोय की औरसत्व ही एक वाईट संकल्पना आहे , जितका सांब औरस आहे तितकाच सांब आहे , जितका सुतसोम औरस आहे तितकाच घटोत्कच , जितका शृतकीर्ती आणि अभिमन्यु तितकाच बब्रुवाहन ! औरस अनौरस ही संकल्पना फार फार ऊशीरा आलीये , आणि त्याने निश्प्पाप लोकाचे नुकसानच केले आहे ! अगदी शिवकालातही अनौरस मुलांना राजांनी टाकुन दिल्याचे दिसत नाही पण केवळ अनुरस आहेत ह्या एका उल्लेखाने त्यांचे जन्मसिध्द अधिकार हिरावल्याचे दिसुन येते ! बाजीरावांच्या आणि मस्तानीची मुलाची रीतसर मुंज करुन घेतली असती तर कदाचित बाजीराव जास्त जगले असले ! तुमच्या एका मैथुनात निर्माण झालेल्या १० अब्ज शुक्राणूंपैकी कोणतया शुक्राणुंमुळे तुमचे मूल जन्माला आले हे तुम्हालाही सांगता येणार नाही. मग बरेच सहचर असणाऱ्या असलेल्या स्त्रीला कसे सांगता येईल हो? लक्षात ठेवा paternity is suspect, maternity is not. पितृत्व हे खात्रीचे नाही, मातृत्व आहे. तुम्ही डॉक्टर असुन असे विधान करत आहात हे पाहुन आश्चर्य वाटले . साधी सिंपल जेनेटिक टेस्ट करुन मुलाचा बाप कोण ओळखता येते हे बहुतेक तुम्ही जाणत असाल. माझ्या १० अब्ज शुक्राणूंनी १० अब्ज अपत्य जन्माला आली तरी ती सर्वच्या सर्व माझीच असतील अस्से मी म्हणत आहे ! त्यातीक कोणीही अनौरस नसेल इतकेच मी म्हणले आहे ! तेंव्हा उछशृंखल वृत्तीला आधार देण्यासाठी चुकीचे संदर्भ देऊ नका. उगाच सवंग लोकप्रियता किना सनसनाटी साठी बेफाट विधाने करता आहात असे दुर्दैवाने म्हणावे लागत आहे ही दोन्हीही विधाने मला ad hominem वाटतात . वर चाललेल्या चर्चेत मी किंव्वा संक्शींनी कोठेही वैयक्तिक आरोप केलेले दिसत नाहीत. मी तर वारंवार म्हणालोय की मला संक्षींच्या मताचा आदर आहे , त्यांच्या विचारस्वातंत्र्याचा आदर आहे ! तुम्ही मात्र पहिल्याच प्रतिसादात डायरेक्ट व्यक्तीगत टीकेवर उतरेला दिसता . असो , हा येवढा पार्ट सोडुन मला तुमच्या मताचा आणि विचारस्वातंत्र्याचा आदरच आहे ! आणि तुम्हाला तुमच्या विचारसरणी ने जय्गायला मी अडथळा करणार नाही. We hold these truths to be sacred & undeniable; that all men are created equal & independent, that from that equal creation they derive rights inherent & inalienable, among which are the preservation of life, & liberty, &

the pursuit of happiness;

. सर्वेत्र सुखिनः सन्तु ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Fri, 05/19/2017 - 18:44 नवीन
गोल आणि भंपक वितंडवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Fri, 05/19/2017 - 19:00 नवीन
सुखी रहा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
श
शित्रेउमेश Wed, 05/31/2017 - 07:34 नवीन
खूप छान प्रतिसाद ... +++++१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
श
शित्रेउमेश Wed, 05/31/2017 - 07:35 नवीन
खूप छान प्रतिसाद ... +++++१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
सुबोध खरे Wed, 05/17/2017 - 15:34 नवीन
लग्नसंस्था हि लोकशाही सारखी आहे. ती आदर्श नाही पण तिचे पर्याय भयानक आहेत. आणि सध्यातरी त्याला सशक्त असा पर्याय दृष्टी पथात नाही. हे सर्व "खुला संभोग" "लिव्ह इन" इ. हे गेल्या ५०-१०० वर्षातील पर्याय आहेत जेंव्हा पासून संततिप्रतिबंधक साधने उपलब्ध झाली. बहुसंख्य स्त्रीमुक्तीवाद्यांनी पण हे मान्य केलेले आहे कि स्त्रीमुक्तीच्या इतिहासात संततिप्रतिबंधक साधने हा एक फार मोठा टप्पा आहे. सध्या मी एवढेच म्हणेन
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु गुरुवार, 05/18/2017 - 04:53 नवीन
हे सर्व "खुला संभोग" "लिव्ह इन" इ. हे गेल्या ५०-१०० वर्षातील पर्याय आहेत जेंव्हा पासून संततिप्रतिबंधक साधने उपलब्ध झाली. बहुसंख्य स्त्रीमुक्तीवाद्यांनी पण हे मान्य केलेले आहे कि स्त्रीमुक्तीच्या इतिहासात संततिप्रतिबंधक साधने हा एक फार मोठा टप्पा आहे.
बँग ऑन डॉक. पुजा भट ला महेश भटने सल्ला दिला होता पाहीजे तितका स्वैराचार कर पण मुले होऊ देऊ नकोस म्हणुन असे वाचल्याचे आठवते आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
प
पगला गजोधर Wed, 05/17/2017 - 16:06 नवीन
मागे तुम्हीच का कोणीतरी धागा काढला होता नं हो सातारकर ? की केळवण ह्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे नाव, "केळ्याची वन वन , या कार्यक्रमानंतर थांबते", म्हणून पडले असावे, अश्या अर्थाचा ...... चू भू दे घे
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Wed, 05/17/2017 - 16:09 नवीन
ख्याक =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
ब
बदलापुरकर Wed, 05/17/2017 - 16:23 नवीन
Khar aahe.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान गुरुवार, 05/18/2017 - 09:09 नवीन
खरे डॉक्टर,
पण तिचे पर्याय भयानक आहेत.
किंचित असहमत. विवाहसंस्थेस पर्याय नाही! असलाच तर त्यास चामडीबाजार म्हणतात. तसं बघायला गेलं तरी लग्न हाही एक बाजारच म्हंटला जातो. पण त्यात निदान स्त्रीला किमान सुरक्षितता तरी लाभते, जी चामडीबाजारात शून्य असते. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ गुरुवार, 05/18/2017 - 09:26 नवीन
स्त्रीला किमान सुरक्षितता तरी लाभते
सुरक्षितता नव्हे. सुरक्षिततेची अपेक्षा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
स
सुबोध खरे गुरुवार, 05/18/2017 - 09:53 नवीन
स्त्रीला किमान सुरक्षितता तरी लाभते बऱ्यापैकी सुरक्षितता सुद्धा लाभते. साधे गळ्यात मंगळसूत्र असेल तरी इतर पुरुषांचा स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. अगदी मध्यमवर्गात राहणाऱ्या बायका याचसाठी वैधव्य आले तरी कुंकू मंगळसूत्र काढत नाही. दारुडा आणि अगदीच बिनकामाचा(नुसताच कुंकवाचा धनी) नवरा असेल तरी झोपडीत राहणारी बाई त्याला सहन करीत असते कारण कपाळाचे कुंकू पाहून झोपडित राहणारे इतर "लांडगे" तिच्यापासून लांब असतात. न जाणे दारुड्या नवऱ्याने चाकू मारला तर काय घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
द
दीपक११७७ गुरुवार, 05/18/2017 - 10:57 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
द
दीपक११७७ गुरुवार, 05/18/2017 - 11:28 नवीन
श्री श्री माहीतगार जी आणि श्री श्री बिरुटे सर यांच्या प्रतिक्रिया वाचायला नाही मिळाल्यात अजुन.
  • Log in or register to post comments
ट
टर्बोचार्जड फिलॉसॉफर गुरुवार, 05/18/2017 - 13:49 नवीन
मंगळसुत्र असेल तर स्त्रीला सुरक्षीतता मिळते हा गावठी विचार झाला .याचा अर्थ तुमच्या देशात कायद्याचं राज्य नसून लफंग्यांचं राज्य आहे.
  • Log in or register to post comments
द
दीपक११७७ गुरुवार, 05/18/2017 - 15:20 नवीन
माफकरा पण - गावठी या शब्दाला तुच्छ, निम्न या अर्थाने वापरणे हा शुध्द मुर्ख पणा आहे असे वाटते.

पण टर्बोचार्जड फिलॉसॉफर म्हटंल की चालायचच.

ज्या इलाजा मुळे आपल्याला चांगला/इसपित फरक पडत असेल तोच इलाज आपण करणार मग तो युनानी असो, आयुर्वेदिक असो, होमीओपॅथीक असो की अजुन कोणता. आपलं काम झाल्याशी मतलब कायं ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्बोचार्जड फिलॉसॉफर
ट
टर्बोचार्जड फिलॉसॉफर गुरुवार, 05/18/2017 - 13:50 नवीन
मंगळसुत्र असेल तर स्त्रीला सुरक्षीतता मिळते हा गावठी विचार झाला .याचा अर्थ तुमच्या देशात कायद्याचं राज्य नसून लफंग्यांचं राज्य आहे.
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे गुरुवार, 05/18/2017 - 13:54 नवीन
रामराज्य येईल तेव्हा येईल हो. पण मंगळसुत्राच्या निमित्ताने आया बहिणींना सुरक्षितता मिळत असेल तर त्यात वाईट काय आहे. तुम्ही तुमचा पैसा अडका सोनं नाणं घरात उघडे ठेवून दरवाजे सताड उघडे टाकून बाहेर जाता का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्बोचार्जड फिलॉसॉफर
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 05/18/2017 - 13:57 नवीन
तुम्ही तुमचा पैसा अडका सोनं नाणं घरात उघडे ठेवून दरवाजे सताड उघडे टाकून बाहेर जाता का?
या सरकारच्या आधीचे सरकार असतानासुद्धा असेच वाटायचे का असे विचारा सर ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
सतिश गावडे गुरुवार, 05/18/2017 - 14:02 नवीन
अच्छा. हा कंगोरा आहे तर त्या विधानाला. मग चालू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा