लग्नाचा उद्देश काय!!!! सेक्सची सोय? साहचर्य? की आणखी काय??????
लग्न ही संस्था कशी अस्तित्वात आली यावर समाजशास्त्रज्ञांनचं एकमत आहे.पुर्वापार पुरुष हे अपत्याला पोसत असल्याने होणारे अपत्य आपलेच असले पाहीजे हा रोख होता ,त्यातून स्त्रीला स्वतःशी बांधुन ठेवले तर तिच्यापासून होणारे अपत्य आपलेच असेल याची बर्यापैकी खात्री असते.यातूनच विवाहसंस्था अस्तित्वात आली.भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास या वि का राजवाडे यांच्या पुस्तकानुसार पुर्वी मुक्त लैंगिक संबंध चालायचे.पुढे ते कमी होत एकपत्नीव्रताला ग्लॅमर आले.मुक्त लैंगिक संबंधात कामभावनेचा निचरा योग्य प्रमाणात होतो हे मी माझ्या आधीच्या एका धाग्यात मांडले होते,अनेकजण त्याच्याशी सहमतही होते.
तर ही मुक्त व्यवस्था बंद पडल्याने पुरुषांची पंचाईत झाली .मग ते बिचारे लग्न या एकाच गोष्टीकडे " लैंगिक भावनेचा निचरा म्हणून पाहू लागले.भारतातलं लैंगिकतेला अनैसर्गीक समजण्याचं हिंदूंचं धोरण विवाहसंस्थेला बळकट करु लागले .यात मग स्त्री चे वस्तुकरण होणे अपरिहार्य होते.
आजकाल विवाहाचा उद्देश काय हे जेव्हा माझ्या मित्रांना मी विचारतो तेव्हा सेक्सची सोय असे उत्तर मिळते.कुणी फार पुढे जाऊन दोन जिवांचे मिलन,सृजनशिलता,साहचर्य(companionship) अशी मखलाशी करत असतात.प्रत्यक्षात बायकोशिवाय इतरही स्त्रीयांकडे वखवखलेल्या नजरेने हे कल्पितानंदही बघत असतात.
प्रत्यक्षात लग्न हा माझ्यामते पुरुषाच्या अनावर कामेच्छेला मोकळी वाट करुन देण्याचा एक करार आहे ,बाकी काही नाही.
दो बदन एक जान,अर्धांगिनी,बेटर हाफ,सृजन वगैरे कविकल्पना म्हणून ठीक असतील पण प्रत्यकषात निसर्गाचे नियम फार वेगळे असतात.हा माझा दृष्टीकोण असेल कदाचित पण त्याला वास्तवाची किनार निश्चित आहे.
तर,मिपाकरांना याविषयी काय वाटते ते जाणून घ्यायला आवडेल.
१ .लग्न ही व्यवस्था "सेक्सची सोय म्हणून आहे असे आपल्याला वाटते का? नसल्यास का नाही?
२.एकपत्नीव्रत ह्याला आपला समाज आदर्श मानत असेल तर बहुतांश विवाहीत पुरुष इतर स्त्रीयांकडे कोणत्या उद्देशाने पाहतात्?
३.सिधि बात नो बकवास" याचं भारतीयांना वावडं का आहे?
चर्चेदरम्यान येणारे मुद्दे धाग्यात समाविष्ट केले जातील ,धन्यवाद.
जर एक स्त्री पाच माणसांबरोबर रत झाली असेल. तर प्रत्येक मूल जन्माला आल्यावर ६५ हजार रुपये खर्च होतील.प्रगोंच्या मुक्त लैंगिक व्यवस्थेत एक स्त्री कितीही पुरुषांबरोबर रत होऊ शकते. दिवसाला एक या (किमान) हिशेबानं, गर्भधारणा होईपर्यंत ती जर शंभर पुरुषांशी रत झाली असेल तर एका मुलामागे डीएनए टेस्टला १३ लाख रुपये लागतील :) ! पहिली गोष्ट हे पैसे भरणार कोण ? दुसरी गोष्ट त्या पुरुषांचा ट्रेस ठेवणार कोण ? पुढे ते सर्व जण टेस्टला तयार व्हायला हवेत आणि सरते शेवटी ती टेस्ट मान्य करुन, प्रगोंचं (माहिती नाही), पण इतर ९९ पुरुषांची जवाबदारी तो एकटा नरपुंगव स्वीकारेल काय ? आणि त्याही पुढे जाऊन, सदर नरपुंगवाची संप्रेरकं (डोपामाईन का काय ते), त्या स्त्रीला पाहून सिक्रीट झालं नाही तरीही तो त्या अपत्याचं संपूर्ण संगोपन करेल काय ?१.पुरुष हे नैसर्गीक polygamous आहेत यावर विज्ञानाने शिक्कामोर्तब केलेले आहे ,तरीही प्रेम या खुळचट संज्ञेला तुम्ही का रेटत आहात?२.एकाचवेळी अनेक स्त्रीयांशी संभोग करण्याची पुरुषांची फॅन्टसी असते हे आपल्याला माहीत नाही काय?ही पुरुषांनी पसरवलेली अफवा आहे. स्त्रीयांना सुद्धा अनेक पुरुषांबरोबर रत व्हायला तितकीच मजा येते याची तुम्हाला कल्पना दिसत नाही ! इन फॅक्ट स्त्रीयांचा क्लायमॅक्स-पॉइंट यायला पुरुषापेक्षा बराच दीर्घकाल लागतो त्यामुळे बहुतांश स्त्रीया आयुष्यात कधी ऑरगॅजम उपभोगूच शकत नाहीत. खरं तर याच कारणानं पुरुषांनी स्त्रीयांना कायम रिसिवींग रोल मधे ठेवलं आहे. जर एका वेळी स्त्री अनेकांशी रत झाली तर तिच्या ऑरगॅजमची शक्यता हमखास निर्माण होते. आणि याच लफड्यामुळे पुरुष स्त्रीयांना कायम वचकून असतात (ही उघड गोष्ट आहे. लग्न केल्यास विदा मागायची गरज उरणार नाही :) ३)३.मध्यमवयीन जोडप्यातले बहुतांश स्त्री पुरुष तरुण ,आकर्षक जोडीदाराची स्वप्न बघत असतात हे वास्तव वेगवेगळ्या सेक्स सर्व्हेमधुन पुढे आलेले असताना monogamyची स्तोम माजवत काय साध्य करायचे आहे?माझा तुम्हाला एकदम सुरुवातीला दिलेला प्रतिसाद पुन्हा वाचा ! अतृप्त कामेच्छा हे दुसरा जोडीदार हवा असं वाटण्याचं मूळ कारण आहे. ज्या जोडप्यात अनुबंध आणि जिव्हाळा आहे त्यांचा प्रत्येक संभोग अधिकाधिक सरस होत जातो कारण ते आपला आनंद एकमेकांशी शेअर करतात. याचा अर्थ फँटसी नसतेच असा नाही पण मी या आधीच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे :१) अपराध शून्य चित्तदशा (नो गिल्ट फिलींग), २) कमालीचा निवांतपणा आणि ३) एकमेकातला अनुबंध ! यात दोघातली कंपॅटिबिलीटी इतकी कमालीची वाढते की दुसरी संधी आली तरी तो माहौल जमून येण्याची शक्यता नसते. तस्मात, वैविध्याचं आकर्षण केवळ फँटसी म्हणून असू शकतं पण पुरेशी मॅच्युरिटी असली की ज्या तीन गोष्टी विवाहित जोडप्यात जमून येतात त्याची खुमारी हिट-अँड-रनमधे कधीही मिळू शकणार नाही हे सहज लक्षात येतं.४)४.अपत्याची जबाबदारी पुरुषाची असते कारण तोच प्रोव्हाईड करु शकतो,जगभरात बापाचे नाव लावण्याची प्रथा कुठुन आली हे आपल्याला ठाऊक नाही काय????कदाचित तुम्हाल फक्त धागे काढण्यातच इंटरेस्ट आहे. प्रतिसाद काय आलेत ? ते आपण नीट वाचलेत का ? त्यावर आपण स्वतःचं मत तयार करु शकतो का ? या गोष्टींमधे काहीही रस दिसत नाही ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. मी तुमच्या या विधानातून निर्माण होणारे प्रश्न वर प्रगोला ऑलरेडी दाखवून दिले आहेत. आता तरी वाचा :अ) जन्मदातीनं मुलावर हक्क सांगितला आणि तीनं बापाकडे बघून तिची संप्रेरकं सिक्रीट होत नाहीत म्हटलं तर बाप काय करणार ?ब) शिवाय अपत्याच्या सुयोग्य संगोपनासाठी दोघांची आवश्यकता असते, जर बापाला मुलाच्या आईकडे बघून डोपामाईन निघत नाहीत असं लक्षात आलं तर तो मुलावरचा हक्क सोडणार की मुलाच्या आईला सोडणार ?क) कायद्यानं मुलाच्या पाचव्या वर्षापर्यंत जन्मदाती हीच योग्य पालक आहे असा नियम आहे. पाच वर्षानंतर अपत्यानं बापाकडे जायला नकार दिला तर बाप काय करणार ?ड) तुमच्या मुक्त संभोग व्यवस्थेत एक बाप हा दहा मुलांच्या जन्माचा नरपुंगव आहे असं निष्पन्न झालं आणि ती सर्व मुलं तथाकथित स्त्रीयांनी त्या थोर बापाच्या दारात आणून ठेवली तर ओशोंच्या ज्या `स्वातंत्र्याच्या सर्वोच्चतेचा' तुम्ही पाठपुरावा करतायंत ते महत्त्वाचं ठरवणार की मुलांचं संगोपन ?प्रगो बहुदा या प्रश्नांची उत्तरं देऊ शकणार नाहीत. तुम्ही किमान प्रश्न जरी नीट वाचलेत तरी तुमच्या धागा काढण्याचं तुम्हालाच सार्थक झाल्यासारखं वाटेल.नॉर्मलस्त्री-पुरुषांसाठी सहजीवनाचा उत्तम पर्याय आहे. प्रगोंचे १० का काय ते पर्यायनॉर्मलस्त्री-पुरुषांसाठी नाहीत. नॉर्मल म्हणजे ज्यांना रोज शक्यतो घरचं जेवण लागतं, अपत्यप्राप्तीची इच्छा आहे आणि एकमेकांबरोबर, दोघांचं मिळून एकच सहजीवन जगण्याची इच्छा आणि तयारी आहे. २) प्रगो प्रणित मुक्त लैंगिक व्यवस्थेत अपत्याची जवाबदारी कुणाची आणि त्याचं संगोपन कसं होणार यावर ते स्वतः कोणतही उत्तर देऊ शकत नाहीत. त्यामुळे वर उल्लेख केलेल्या १० पर्यायातला लिव-इन पर्याय सुद्धा बाद ठरतो. ३) टफिचां नवे विचार मांडण्याचा प्रयत्न सदर विचार जुनाट आणि काल्पनिक असल्यानं फसला आहे.हायपोथेटीकल केस म्हणूनही वाचवत नाही हो असलं काही."आऊटलायर्स" ही संज्ञा अशी टोकाची परिस्थिती/व्यक्ती यांचा निर्देश करण्यासाठी निर्माण केली गेली आहे ! काहींना त्या टोकाच्या स्थळावर (आऊटलायर) रहायला इतके आवडते की ते त्या संज्ञेतल्या "आऊट" लाच "गेट आऊट" करून टाकतात. ;) =))अपत्य संगोपनाचे पैसे आधीच वसूल करून मगच मुलं जन्माला घालावीतपुरुष म्हणाला मला अपत्याची गरज नाही तर स्त्री कुणाकडून पैसे वसूल करणार ? आणि पुन्हा नक्की कोण पुरुष अपत्य जन्माला जवाबदार आहे हे कसं ठरवणार ? तुमच्या सिस्टममधे संगोपनाचा खर्च ५ ते ७ लाख आहे तर कुठला पुरुष संग करण्यासाठी ही रक्कम मोजेल ?'आपण की नै आपापल्यात एकेक स्त्री वाटून घेऊ आणि तिच्यावरच बलात्कार करू आणि मुलगा/गी हवी करत पाहिजे तितकी पोरं काढून घेऊ' असल्या सिस्टीमचा भाग बनू नये.लग्न म्हणजे बलात्कारच हा शोध कुठून लावला ? का लग्नाचा तो एकच हेतू आहे असं तुम्हाला वाटतं ? लग्न म्हणजे दोघात मिळून एक आयुष्य जगणं आहे आणि सेक्स हा त्या सहजीवनाचा आनंद शेअर करण्याचा एक भाग आहे. प्रपंच हा बराच व्यापक विषय आहे.अपत्याची जबाबदारी कोण घेणार हे ठरवून मगच अपत्य जन्माला घालावीत.अर्थात ! पण तुम्ही तर म्हणतायं आधी संगोपनाचा फुल खर्च पुरुषाकडून वसूल करावा. त्यात तुम्हाला विवाह मान्य नाही. त्यामुळे हे फारच इंप्रॅक्टीकल आणि हास्यास्पद आहे. २)प्रत्येक संगातून पोरं पैदा होतात का?हे बरोबरे पण नुसताच संग करायचा असेल तर मग सहजीवनाची तरी गरज काय ? ३)भारतीय कायदा '१५+ वर्षावरील बायकोसोबत नवर्याने केलेला संग हा बलात्कार नसतैच' असे का समजतो? कायद्याचं बोला!फारच उत्तम प्रश्न ! याला दोन कारणं आहेत : अ) कायद्याचं ड्राफ्टींग सुजाण आणि विधायक विचारसरणी असणारे करतात. विवाह हा दोन मॅच्युअर्ड व्यक्तीतला एकत्र राहाण्याचा करार आहे ही किमान समज ठेवून कायदा ड्राफ्ट केला गेला आहे. तुम्ही जो विचार करता (आपण की नै आपापल्यात एकेक स्त्री वाटून घेऊ आणि तिच्यावरच बलात्कार करू आणि मुलगा/गी हवी करत पाहिजे तितकी पोरं काढून घेऊ' ) तितका विक्षिप्त विचार कायद्यात अंतर्भूत नाही. ब) जर उपरोल्लेखित विक्षिप्त विचार करणारे लोक असतील तर थोडा जरी मतभेद झाला तर रोज सकाळी उठून बलात्काराची तक्रार करायला अशा व्यक्ती पोलीस स्टेशन गाठतील आणि अशा निर्बुद्ध केसेस इतक्या बेसुमार होतील की सगळी समाज आणि न्याय व्यवस्थाच कोलमडेल. तस्मात, अशा व्यक्तींनी विवाहापासून दूर राहावं यासाठी ती तरतूद असावी. ४)मी पहिल्या प्रतिसादात जे उदाहरण दिले आहे तिला असल्या प्रवचनाचा काहीही फायदा होणार नाहीबरोबर आहे. आयुष्यात किती आनंद मिळणार आणि ते किती सुखाचं होणार हे व्यक्तिगत दृष्टीकोन आणि बुद्धिमत्ता यावर अवलंबून आहे. मला सुद्धा चार मुलं असती तर कदाचित अशीच ओढाताण झाली असती ! म्हणजे धाकट्याचा अजून अभ्यास घ्यायला लागतोयं, मोठी मुलगी लिव-इनमधे राहायचं म्हणतेयं, धाकटीला उच्चशिक्षणासाठी घर जामीन ठेवून कर्ज घ्यायचंय, थोरले सुपुत्र आणि सुन पाळणाघराची उत्तम सोय म्हणून बरोबर राहातात, पत्नीशी गप्पा मारायला मोकळा वेळ ती हॉस्पिटलमधे अॅडमिट झाल्यावर मिळतो, आणि या सगळ्या उपद्व्यापात जीवाला थोडा विरंगुळा म्हणून मी दुसरीकडे सूत जमवलंय ..... वगैरे. थोडक्यात, संसार किती वाढवायचा हे समजलं नाही की परिणाम भोगावे लागणारच. ५) बाय द वे, वर तुम्ही म्हटलंयसध्याची लग्नव्यवस्था ही उच्च वर्गातले पुरुष आणि निम्न वर्गातल्या स्त्रिया यांच्यावर अतिप्रचंड अन्याय करणारी आहे.मला एका गोष्टीचं कायम नवल वाटतं , पब्लिकला स्वतःपेक्षा दुसरा काय करतो याचीच पडलेली असते :) ! तुम्ही वरील दोन पैकी नक्की कोणत्या गटात येता ? आणि विवाहाचा तुम्हाला नेमका काय त्रास वाटतो ?"It is considered that the concept of marital rape, as understood internationally, cannot be suitably applied in the Indian context due to various factors like level of education/illiteracy, poverty, myriad social customs and values, religious beliefs, mindset of the society to treat the marriage as a sacrament etc."विवाह हा भारतीय संस्कृतीनं मानवाच्या समग्र जीवनाचा विचार करुन जगापुढे ठेवलेला विधायक पर्याय आहे. ( इंटरेस्ट असेल तर याविषयी माझे सुरुवातीचे प्रतिसाद वाचावे). मनेका बाईंना विवाह संकल्पने मागच्या या समग्र परिमाणाची कल्पनाच दिसत नाही आणि ज्यावेळी त्यांनी वैवाहिक बलात्काराची भंपक कल्पना मांडली त्या वेळी ही नव्हती. अर्थात, नंतर त्यांना किमान स्वतःच्या विधानातली व्यर्थता आणि अवास्तविकता कळली आणि त्यांनी ते मागे घेतलं, त्यासाठी मग भले त्या काहीही कारणं देवोत. तुम्हाला बहुदा त्यांच्या ओरिजिनल विधानाच्या प्रभावातून अजून सुद्धा बाहेर पडता येत नाही असं तुमच्या प्रतिसादांवरुन दिसतंय.Answering a question in Rajya Sabha on March 10, Women and Child Development Minister Maneka Gandhi said, “It is considered that the concept of marital rape, as understood internationally, cannot be suitably applied in the Indian context due to various factors like level of education/illiteracy, poverty, myriad social customs and values, religious beliefs, mindset of the society to treat the marriage as a sacrament etc.” The same statement had been read out in Rajya Sabha in April 2015 by Minister of State for Home Haribhai Parathibhai Chaudhary.Months after her statement that "concept of marital rape cannot be applied in the Indian context" created some controversy, Union minister Maneka Gandhi on Tuesday said even if there was a law against it, women are unlikely to complain about this kind of abuse.The Minister for Women and Child Development said women could instead file complaint of marital rape under the existing Domestic Violence law.तुम्हाला इंग्रजी कळत नसेल तर मराठीतून सांगतो. मनेका बाईंना त्यांच्या विधानातला भंपकपणा कळल्यामुळे त्यांनी तसा कोणताही कायदा भारतीय जीवनशैलीत आणता येणार नाही असा स्टँड घेतला आणि तदनंतर स्त्रीयांनी सदर प्रकारची तक्रार असेल तर ती डोमेस्टीक वायलंस म्हणून दाखल करावी असं म्हटलं. त्यांनी स्वतःचा स्टँड केव्हाच बदललायं, तुम्ही मात्र चुकीच्या स्टँडवर अजूनही अडकून आहात.We have a law already on violence against women and that includes marital rape. The point is that there has never been a complaint under it, never...We can use domestic violence (law) and then build on it but at the moment there is not even one complaint," she told an All Women Journalists' Warkshop at Vigyan Bhawan.आता तरी सदर प्रकाश तुम्हाला ही पडो ही कामना : )जर marital rape भारतात क्राइम आहे तरमग तुम्ही म्हणता ती जगबुडीची सिचुएशन का आली नाही ?बाईश्री, एकतर तुमच्या आदर्श मनेकाबाईंनीच मॅरिटल रेपची तक्रार डोमेस्टिक वायलंसखाली गुदरायला सांगितली आहे. तस्मात, तुमची मॅरिटल रेपच्या गुन्ह्याची व्यथा निकालात निघाली आहे (किमान इतपत लॉजिक तरी समजायला हरकत नाही). या उप्पर आता तुम्ही मलाच विचारतायं की जगबुडी का झाली नाही ? माझ्या मते दोन बिएचकेच्या बदल्यात आपल्यावर रोज बलात्कार होतोयं इतकी कॉमेडी कल्पना करणारी विवाहित स्त्री दुर्लभ असेल त्यामुळे डोमेस्टिक वायलंस खाली तक्रारी होत नसतील.